Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. गुळवणी महाराज पुण्यतिथी


महसूल गुप्तचर विभागातील अधिकार्‍याचे पाक तस्करांशी संबंध

अशा देशद्रोह्यांना फासावर लटकवा !
  • पाक सीमेतून भारतात अमली पदार्थांची तस्करी
  • भारतातील इतर तस्करांशी ओळख
     अमृतसर - तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले महसूल गुप्तचर विभागातील बडतर्फ साहाय्यक उपनिरीक्षक रंजीत सिंह यांच्याकडून अजनाला (जिल्हा अमृतसर) पोलिसांनी पाकिस्तानी आणि भारतीय सिम कार्ड, भ्रमणभाष संच आणि एक नोंदवही जप्त केली आहे. या नोंदवहीत १५ पाकिस्तानी तस्करांची नावे आढळून आली आहेत. (गुप्तचर विभागातील पोलीसच देशद्रोह करत असतील, तर देशाचे रक्षण कसे होणार ? गेल्या काही महिन्यांत सैन्यातील अनेक जणांना हेरगिरी करतांना अटक करण्यात आली आहे. अशांना त्वरित खटला चालवून फाशीची शिक्षा दिल्याशिवाय इतरांना याचा वचक बसणार नाही. यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, अशीच जनतेची मागणी आहे. - संपादक)

श्री शनैश्‍वर देवस्थान न्यासाचे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करण्याचा ठराव

शनिशिंगणापूर येथे ग्रामसभा
  • श्रीशनिशिंगणापूर विश्‍वस्त निवडींविरोधात ग्रामस्थ एकवटले !
  • श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समिती स्थापन
      श्री क्षेत्र शनिशिंगणापूर - श्री शनिशिंगणापूर देवस्थान विश्‍वस्तांची निवड पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मर्जीतील झाली असून या निवडीच्या विरोधात संपूर्ण गाव एकवटले आहे. २६ जानेवारी या दिवशी झालेल्या ग्रामसभेत सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ठराव मांडून तो संमत करण्यात आला. (राजकारण्यांपेक्षा भक्तांची विश्‍वस्त म्हणून नेमणूक व्हावी, यासाठी झटणार्‍या शनिशिंगणापूर ग्रामस्थांचे अभिनंदन ! - संपादक) यामध्ये विश्‍वस्त मंडळ विसर्जित (बरखास्त) करून प्रशासकाची नेमणूक करावी आणि नव्याने विश्‍वस्त मंडळ निवडावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी ५०० हून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षर्‍यांची चळवळ राबवली आहे. यासाठी राज्यशासनाकडे दाद मागण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यावर पर्याय म्हणून श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. तिच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य संपर्कप्रमुख श्री. संभाजी दहातोंडे यांची ग्रामसभेत ठरावानुसार निवड करण्यात आली.

कोल्हापूर येथील धर्मजागृती सभेच्या प्रसाराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. राजन बुणगे ग्रामस्थांना विषय सांगतांना
कागल तालुक्याच्या वतीने सभेची माहिती देणारा फलक
     कोल्हापूर, ३१ जानेवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या पटांंगनावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने ठिकठिकाणी प्रसार करतांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या धर्मसभेचा प्रसार शहरातील सर्व गल्ली, चौक आणि परिसर येथील घरोघरी जाऊन जोरात करण्यात येत आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनचा साधक आणि संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांच्यावर पुरोगामी संघटनांनी केलेले आरोप आणि प्रसिद्धीमाध्यमांतून आलेली चुकीची वृत्ते यांमुळे जनमानसात सनातनविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे याविषयी सनातनची नेमकी भूमिका आणि दृष्टीकोन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही धर्मसभेला निश्‍चित येणार आहे, असे नागरिक आणि महिला यांच्याकडून सांगितले जात आहे. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.

पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभा पार पडली !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सनातनचे पू. नंदकुमार जाधव, आयएआयएस् संकेसतस्थळाचे
 संपादक श्री. पारस राजपूत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख

(म्हणे) सनातनचा लोकशाहीवर विश्‍वास नाही; सनातनचे गोव्यात मुख्यालय आहे, याची लाज वाटते !

गुजरातमधील दांडी येथील परिसंवादात ढोंगी पुरोगाम्यांनी
 सनातनवर नाहक तोंडसुख घेऊन कंड शमवला !
     कर्णावती - गांधी यांनी गुजरातमधील दांडी येथे १२ मार्च १९३० या दिवशी मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटीश सत्तेला आव्हान दिले होते. त्याच दांडी येथे ३० जानेवारीला गांधी पुण्यतिथीचे निमित्त साधून देशातील तथाकथित पुरोगाम्यांनी एक परिसंवाद आयोजित केला होता. असहिष्णुतेला विरोध करण्यासाठी आयोजित या परिसंवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघ यांच्या सोबत सनातन संस्थेवर टीका करण्याची संधी धर्मद्रोह्यांनी सोडली नाही. पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतील अध्यक्षाच्या निवडीपासून ते भाग्यनगर येथील रोहित वेमुला याच्या आत्महत्येसाठी मोदी शासनास उत्तरदायी धरून त्यांची ब्रिटीश राजवटीतील ईस्ट इंडिया कंपनीपासून हिटलरच्या नाझी राजवटीशी तुलना करून पुरोगाम्यांनी प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. गोवा येथील श्री. दामोदर मौझो हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.

राजकारण्यांमुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात ! - प.पू. मुनिश्री १०८ अक्षय सागर महाराज

    हुपरी (जिल्हा कोल्हापूर) - भारताने याआधीही अहिंसेला महत्त्व दिले आहे आणि यापुढेही ते दिले जाईल; मात्र स्वार्थी आणि ढोंगी राजकारण्यांपासून सावध रहावे. ते आपल्या उन्नतीसाठी तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे वळवत आहेत. त्यामुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे मार्गदर्शन प.पू. मुनिश्री १०८ अक्षय सागर महाराज यांनी केले. ते हुपरी (तालुका हातकणंगले) येथे दिगंबर जैन समाज आणि वीरसेवा दलाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या अहिंसा, स्वातंत्र्य एवं राष्ट्रविकास या विषयावरील प्रवचनात मार्गदर्शन करत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा !

क्रांतीकारकांना भारतरत्न देण्यासाठी ठराव करावा लागतो, हे सर्व शासनांना लज्जास्पद होय !
रत्नागिरीतील २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात एकमुखी ठराव !
     रत्नागिरी - राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असा एकमुखी ठराव येथील २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात समारोपाच्या दिवशी करण्यात आला. याशिवाय मार्सेलिस (फ्रान्स) येथे स्वातंत्र्यविरांनी मारलेल्या जगप्रसिद्ध उडीला यंदा १०६ वर्षे पूर्ण होत असून तेथे स्मृतीस्तंभ उभारला जावा आणि अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिरंतन स्मारक उभारले जावे, असेही ठराव एकमुखाने टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष श्री. दादा इदाते, श्री. रवींद्र साठे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबईचे श्री. विनायक दाते उपस्थित होते.

इसिसचा कमांडर अल्पवयीन असल्याच्या दाव्यामुळे त्याची सुधारगृहात रवानगी !

अल्पवयीन असणारा आतंकवादी कारवाया करू शकतो, बलात्कार करू शकतो, 
हे सिद्ध होत असल्याने अशांनाही कठोर शिक्षेचा कायदा करा !
     मुंबई - मागील आठवड्यात आतंकवादविरोधी पथकाने उत्तरप्रदेशातील कुशीनगर भागातून अटक करण्यात आलेल्या इसिसच्या कथित सेकंड कमांडर असणार्‍या आतंकवाद्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले; मात्र तो अल्पवयीन (१६ वर्षे आठ महिने) असल्याचा दावा त्याच्या अधिवक्त्यांनी केला. त्यासाठी जन्मदिनांक असलेली त्याची दहावीची सनदच सादर केली. त्यामुळे न्यायालयाने या आतंकवाद्याची सुधारगृहात रवानगी केली. सरकारी पक्षाने मात्र त्यावर आक्षेप घेतला. या आतंकवाद्याचे वय २० वर्षे असून त्याचे नाव मतदार सूचीत असल्याचे सांगितले. त्यावर ८ फेब्रुवारी या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांनी आणखी पुरावे सादर करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.

पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमण्याविषयी धर्मशास्त्रीय भूमिका

  
श्री. सुनील घनवट
     झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील चर्चेत पंढरपूर येथील श्री रूक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमले आहेत. या धोरणाचे स्वागत करणार का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना विचारण्यात आला. त्याविषयीची धर्मशास्त्रीय भूमिका येथे देत आहोत.
 १. प्रत्येक मंदिरात पौरोहित्य करण्याचे निकष आणि पूजा करण्याच्या पद्धती या कर्मकांडातील नियमानुसार अन् परंपरेनुसार ठरलेल्या असतात. हे नियम आणि परंपरा त्या मंदिरात वंशपरंपरेने पूजा करणार्‍या पुरोहितांना अवगत असतात. पौरोहित्य करणार्‍यांमध्ये अचानक पालट झाल्यास दैनंदिन पूजेच्या प्रथा परंपरांमध्ये खंड पडतो. शासनाने श्री रुक्मिणी मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून पूजा करणार्‍या उत्पातांना तडकाफडकी हटवून पूजाविधी अवगत नसलेल्या महिला पुजार्‍यांची नियुक्ती करून धार्मिक परंपरांची पुष्कळ मोठी हानी केली आहे आणि त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा पोचली आहे.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पुण्यातील अनेक शैक्षणिक संस्थांची संकेतस्थळे असुरक्षित

हॅकिंगचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा अनुपलब्ध
संकेतस्थळांच्या हॅकिंगचे प्रकार रोखण्याचे आव्हान शासन कसे स्वीकारणार आहे ? सायबर
 सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती आणि सुरक्षितता यांसाठीच्या उपाययोजना केव्हा करणार ?
     पुणे - येथे अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी येत असतात. त्यांना ऑनलाइन माहिती मिळावी आणि शैक्षणिक कारभार यासाठी त्या संस्थांनी संकेतस्थळे चालू केली आहेत. सर्वांच्या सोयीसाठी संकेतस्थळे असली, तरी त्यांच्या सुरक्षेविषयी संस्थांनी लक्ष दिलेले नाही. अनेक संस्था संकेतस्थळांच्या सुरक्षेसाठी उत्तम पद्धतीची संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) वापरत नसल्याने त्यांची संकेतस्थळे हॅक होत आहेत. संकेतस्थळे हॅक होऊ नयेत, यासाठी एच्टीटीपीएस् ही प्रणाली वापरणे आवश्यक आहे, असे आर्थिक आणि सायबर शाखेचे सहायक आयुक्त किशोर नाईक यांनी सांगितले.
     नगर - पुणे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ विठ्ठल फुगे हे नातेवाइकाच्या लग्नासाठी येथे आले असता त्यांचे पिस्तुल चोरीला गेले. काही कामानिमित्त त्यांनी पिस्तुल पत्नीच्या पर्समध्ये ठेवले होते. ही पर्सच सरस्वती मंगल कार्यालयातून चोरीला गेली आहे. त्या पर्समध्ये पिस्तुल, एक मासिक, १० जिवंत गोळ्या, २ लक्ष रुपये, दागिने आणि अन्य वस्तू चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी फुगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

(म्हणे) नथुराम गोडसेमुळे देशात सर्व ब्राह्मणांकडे संशयी दृष्टीने पहाण्याची भूमिका निर्माण झाली !

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
      पुणे, ३१ जानेवारी - सध्या नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैव आहे. जगातील स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांचे प्रेरणास्थान गांधीजी आहेत. विदेशातील लोक त्यांना आदर्श म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात; परंतु पुण्यातील करंट्या लोकांना मात्र त्यांचे महात्म्य पटत नाही. नथुरामवर गोव्यात पुस्तक काढले जाते, हे खेदजनक आहे. नथुराम गोडसेमुळे देशात सर्व ब्राह्मणांकडे संशयी दृष्टीने पाहण्याची भूमिका निर्माण झाली. काही पापी ब्राह्मण नथुरामचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नामुळे तुमच्या बुद्धीचे दिवाळे निघाले असून ब्राह्मणजातीचे वाटोळे करत आहात, अशी टीका संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. (यावरून सबनीस यांनी आपला ब्राह्मणद्वेषच प्रकट केला आहे ! - संपादक)

आमच्या देशात लोकशाही स्थिर झाली; मात्र ती प्रगल्भ झाली नाही ! - अधिवक्ता किशोर जावळे

२८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 
सावरकरांच्या कल्पेनेतील हिंदु राष्ट्र या विषयावरील परिसंवाद !
     रत्नागिरी, ३१ जानेवारी (वार्ता.) - भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली तरीही राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद यांचा मुलभूत निर्णय आजही लागलेला नाही. आमच्या देशात लोकशाही स्थिर झाली हे जरी खरे असले; तरी ती प्रगल्भ झाली नाही, असे उद्गार अधिवक्ता किशोर जावळे यांनी काढले. २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आयोजित केलेल्या सावरकरांच्या कल्पेनेतील हिंदु राष्ट्र या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी हिंदुत्ववादी विचारवंत डॉ. श्रीरंग गोडबोले हेही या परिसंवादात सहभागी झाले होते. अधिवक्ता किशोर जावळे म्हणाले, जगात अमेरिका, इंग्लंड यांसारख्या प्रगत राष्ट्रांतील लोकशाहीचा अभ्यास केल्यास तेथे मध्यवर्ती डावा आणि मध्यवर्ती उजवा असे दोन पक्ष असलेले दिसतात. या दोहोंमध्ये एक समान दुवा असावा लागतो; मात्र भारतात अशी व्यवस्था दृढमूल झालेली दिसत नाही. मध्यवर्ती डाव्या पक्षाची भूमिका काँग्रेसने ६५ वर्षे निभावली; मात्र मध्यवर्ती उजवा पक्ष आपल्याकडे निर्माण होऊ शकला नाही. वर्ष १९५० च्या दरम्यान स्थापन झालेला जनसंघ किंवा आताचा भाजप मध्यवर्ती उजव्या पक्षाचे राजकीय अवकाश व्यापेल असे वाटले होते; मात्र तसे झालेले दिसत नाही. याला कारण आधुनिक राष्ट्र चालवायला जो प्रगल्भ प्रशासकीय विचार लागतो, तो त्यांच्याकडे दिसत नाही. काँग्रेसला मात्र हे तत्त्वज्ञान नेहरूंनी दिले, मग ते चुकीचे असो वा नसो.

उपासनेविषयी भेदभाव आम्ही राज्यकर्ते कदापिही सहन करणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मशास्त्राविषयीचे निर्णय संत, महंत आणि धर्माचार्य यांना विचारून 
घेतल्यास अधिक योग्य होऊ शकते, हे शासनाने लक्षात घ्यावे !
     पुणे - आज २१ व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी कि नाही, याविषयी चर्चा होते, हे चुकीचे आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार आपण समाजात रुजवण्यात मागे आहोत, असे म्हणावे लागेल. असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते कदापिही सहन करणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
     येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याची संधी महिलांना द्यावी, यासाठी काही नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी २६ जानेवारी या दिवशी आंदोलन केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. या प्रसंगी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते.

नृत्यांगनांवर पैसे उधळणार्‍या एका पोलीस अधिकार्‍यांसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित !

विजापूर मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार
अनैतिकता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
     विजापूर - विजापूर येथील मध्यवर्ती कारागृहात प्रजासत्ताकदिनी बंदीवानांना सोडल्याच्या आनंदात नृत्यांगनांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या हिडीस प्रकारामुळे एका पोलीस अधिकार्‍यासह २ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यनारायणराव यांनी दिली. ३९ बंदीवानांच्या मनोरंजनासाठी मुंबईहून २ नृत्यांगनांना बोलवण्यात आले होते. (बंदीवानांच्या सुटकेनंतर समाजात नैतिकता आणि चांगले गुण वाढवणारे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता अश्‍लील कार्यक्रम आयोजित करून पोलीस विभागाची लाज घालवणारे पोलीस अधिकारी ! - संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी !

आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
आमदार बाळासाहेब पाटील यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
आमदार प्रभाकर घार्गे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते 
      सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) - अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी २३ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता १२ महिला आणि ४० पोलीस समवेत घेऊन सोळशी (जिल्हा सातारा) येथील शनीच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. या धर्मद्रोही कृत्याचे पडसाद सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार प्रभाकर घार्गे आणि अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या भेटी घेऊन त्यांना धर्मद्रोही अधिवक्ता वर्षा देशपांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, राहुल कोल्हापुरे, संकल्प झांझुर्णे उपस्थित होते.

मौलानाकडून ७ वर्षांच्या बालिकेवर ६ मास बलात्कार : नागरिकांकडून बेदम चोप !

अशा वासनांधांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची, दगडांनी ठेचून मारण्याची 
शिक्षा देण्याची मागणी कोणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
      आगरा - येथील शहीदनगरामध्ये शिकवणीसाठी घरी येणार्‍या ७ वर्षांच्या बालिकेवर २२ वर्षीय मौलाना अब्दुल इस्लाम हाफिजने ६ मास बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मौलवी चाकूचा धाक दाखवून या मुलीवर बलात्कार करत होता. याची माहिती कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तो देत होता. त्यामुळे ही बालिका घरी भयग्रस्त झाली होती. कुटुंबातील लोकांना तिच्या वागणुकीतील पालट लक्षात आल्यावर तिची विचारपूस केली. यावर तिने याची माहिती दिली. त्यानंतर संतप्त लोकांनी मौलानाला पकडून त्याला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. 

श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांचे सनातनला आशीर्वाद !

प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांना 
साप्ताहिक सनातन प्रभातची माहिती 
सांगतांना सनातनच्या सौ. विदुला हळदीपूर
      हुबळी (कर्नाटक) - श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी माझे सनातनला आशीर्वाद आहेत, असे उद्गार काढले. येथील सनदी लेखापाल श्री. चंद्रशेखर दवळीक यांच्या घरी झालेल्या या भेटीत सनातनच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी स्वामीजींना साप्ताहिक सनातन प्रभात विषयी माहिती सांगितली. कर्नाटक शासन राज्यात करत असलेल्या प्रास्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी स्वामीजींना माहिती दिल्यावर ते म्हणाले, या कायद्याविषयी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि त्यांना हा कायदा न करण्याविषयी सांगीन. गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात नुकत्याच पार पडलेल्या उच्छिष्ट गणपती यज्ञाविषयी त्यांना माहिती दिली. या प्रसंगी सनातनचे श्री. अशोक भोज, सौ. गीतांजली काडीवाळ, आदी साधक उपस्थित होते.

नागपूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सनातन संस्थेकडून लव्ह जिहाद या विषयावर प्रबोधन

     नागपूर - नागपूर येथे शिवसेनेच्या वतीने सुरेंद्रनगर येथे संक्रातीनिमित्त हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. गौरी जोशी यांनी लव्ह जिहाद या विषयावर तसेच सध्या धर्म आणि राष्ट्र यांवरील आक्रमणांची ज्वलंत परीस्थिती उपस्थित भगिनींना विषद करून सांगितली.
     या वेळी बोलतांना सौ. गौरी जोशी म्हणाल्या की,
१. लव्ह जिहाद म्हणजे मुसलमानांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदु समाजाविरुद्ध पुकारलेले युद्ध. याचा उद्देश म्हणजे इस्लामीकरण करून हिंदु वंशवृद्धीचा एक स्रोत नष्ट करणे आणि इस्लामी वंशवृद्धी करणे. विवाहानंतर अनेक अपत्ये जन्माला घालून त्यांचा आत्मघातकी पथकांसाठी वापर करणे. अश्‍लील छायाचित्रे काढून पैसा मिळवणे.

बंगालमध्ये हिंदु संघटनांकडून वार्षिक मेळाव्याचे आयोजन !

      कामारपुकुर (बंगाल) - श्रीरामकृष्ण परमहंस यांचे जन्मस्थान असलेल्या कामारपुकुरमध्ये तेथील स्थानिक हिंदु संघटनांनी नुकतेच हिंदु संघटनांच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक आदिवासी लोकांचे पारंपरिक कार्यक्रमचाही समावेश होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे १५० गावकर्‍यांनी याचा लाभ घेतला. सभेच्या प्रारंभी उपस्थितांना संबोधित करतांना आरामबागचे हिंदुत्ववादी श्री. वासुदेव हाजरा म्हणाले, सध्या जगामध्ये हिंदूंचा एकही देश नाही. हिंदू संघटित नसल्यानेच त्यांना सामाजिक आणि राजकीय स्तरावरील अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती, पाश्‍चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम, हिंदु संघटनाची आवश्यकता तसेच आचारधर्मानुसार कृती करण्यामागील शास्त्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. श्री. सुराल पुढे म्हणाले की, सध्या उदबत्तीचे पाकीट, तांदुळाची गोणी यांसारख्या वस्तूंवर देवतांची चित्रे छापली जातात. या वस्तूंचा उपयोग झाल्यानंतर त्यांची वेष्टने कचर्‍यामध्ये टाकली जातात किंवा पोत्यांचा पुसण्यासाठी वापर केला जातो. यामुळे देवातांचा अवमान होतो. यासाठी देवतांची चित्रे असलेली साहित्य खरेदी करणे टाळावे.


जर्मनीतील पेगिडा संघटनेकडून युरोपच्या इस्लामीकरणाच्या विरोधात १४ देशांमध्ये निदर्शने करण्याची योजना !

  • हिंदूंनो, बांगलादेशमधील ५ कोटी घुसखोरांवर कारवाई करण्यास शासनाला पावले उचलण्यास भाग पाडा !
  • इस्लामीकरणाचा धोका लक्षात येताच विस्थापितांवर वचक बसवण्यासाठी तत्परतेने निदर्शने करणार्‍या पेगिडाकडून भारतीय काही शिकतील का ?
    बर्लीन (जर्मनी) - उत्तर आफ्रिका आणि पश्‍चिम आशियाकडील देशांमधील लक्षावधी विस्थापित युरोपमधील देशांमध्ये आश्रय घेत आहेत. यामध्ये बहुसंख्य विस्थापित हे मुसलमान आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये या विस्थापितांनी हिंसाचार आणि महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 
      यासंदर्भात जर्मनीतील पेगिडा या प्रखर राष्ट्रवादी आणि इस्लाविरोधी संघटनेने या विस्थापितांविरूद्ध ६ फेब्रुवारी या दिवशी चेक प्रजासत्ताक, एस्तोनिया, फिनलंड, जर्मनी, पोलंड, स्लोवाकिया आणि स्वित्झर्लंडसह चौदा युरोपीय देशांमध्ये निदर्शने करण्याची योजना बनवली आहे. या निदर्शनांमध्ये अन्य समविचारी संघटनाही सहभागी होणार आहेत. याविषयी पेगिडाच्या एका नेत्याने सांगितले की, युरोपचे इस्लामीकरण होण्यापासून वाचवणे, हे या निदर्शनांमध्ये सहभागी असणार्‍या संघटनांचे प्रमुख उदिष्ट आहे.

श्री गणेशाची प्रतिमा असलेल्या टी-शर्टची विक्री थांबवण्याची हिंदूंची मागणी

अमेरिकेतील प्रिंट सिंडिकेट आस्थापनाकडून श्री गणेशाचे विडंबन
     कोलंबस (अमेरिका) - अमेरिकेच्या कोलंबस शहरातील प्रिंट सिंडिकेट आस्थपनाच्या टी-शर्ट आणि इतर काही उत्पादनांवर श्री गणेशाची विडंबनात्मक प्रतिमा छापण्यात आली आहे. श्री गणेशाचे विडंंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री थांबवण्यात यावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. मात्र प्रिंट सिंडिकेटचे सह संस्थापक रॉबिन्सन यांनी सांगितले आहे की, आमची उत्पादने विनोद आणि विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. आमच्या ग्राहकांना ती आवडतात. (हिंदूंच्या देवता विनोदासाठी आणि विविधतेसाठी नाहीत, हे भारतीय शासन आणि हिंदुत्ववादी संघटना प्रिंट सिंडिकेट या आस्थापनाला सांगतील का ? - संपादक)

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचाराला वेग

  • पंचक्रोशीतून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • २९ गावांतील प्रसार पूर्ण
      बार्शी (जिल्हा सोलापूर), ३१ जानेवारी (वार्ता.) - येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त लोकांना धर्मसभेची माहिती देणे आणि पंचक्रोशीत जाऊन बैठकांमध्ये विषय मांडणेे, तरुण मंडळांमधील कार्यकर्ते, महाविद्यालये, शाळा येथील युवक, मंदिरे, बचतगट, भजनी मंडळे, वसतीगृहे, अभ्यासिका, दुकाने, आस्थापने आदी अनेक ठिकाणी उपस्थित असणार्‍या सहस्रो धर्माभिमान्यांपर्यंत हिंदुत्व अन् धर्मशिक्षण यांची आवश्यकता सांगून संघटित करणे आदी माध्यमांतून धर्माभिमान्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फलक लिहिणे, रिक्शांवर धर्मसभेचे निमंत्रणाचे पत्रक लावणे, भित्तीपत्रके, चौकाचौकांमध्ये मोठे फलक (होर्डिंग) लावणे, मेगाफोनद्वारे उद्घोषणा करणे आदी नानाविध माध्यमांतून धर्मजागृती सभेची आवश्यकता आणि महत्त्व यांविषयी अवगत करण्यात येत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

गुप्तचर विभागातील अशा फितुरांना कठोर शिक्षा करा !
     तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले महसूल गुप्तचर विभागातील बडतर्फ साहाय्यक उपनिरीक्षक रंजीत सिंह यांच्याकडून अजनाला (जिल्हा अमृतसर) पोलिसांनी पाकिस्तानी सिम कार्डसह १५ पाकिस्तानी तस्करांची नावे असलेली एक नोंदवही जप्त केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bhartiya guptachar vibhag ke adhikari Ranjeet Singhka Pak taskaronse sambandh !
Aise deshdrohiyonke viruddh kya sarkar kathor karyavahi karegi ?
जागो !
: भारतीय गुप्तचर विभाग के अधिकारी रंजीत सिंह का पाक तस्करों से संबंध !
ऐसे देशद्रोहियों के विरुद्ध क्या सरकार कठोर कार्यवाही करेगी ?

रामदुर्ग येथे पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरी

पोलिसांची असुरक्षित निवासस्थाने !
     बेळगाव - रामदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज कोळ्ळी यांच्या बंद घराचे कुलूप काढून अज्ञात चोरट्यांनी पिस्तुल, ५ जिवंत काडतुसे, ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४० सहस्र रुपये असे एकूण २ लक्ष ५० सहस्र रुपयांचे साहित्य चोरून नेले. रामदुर्ग पोलीस स्थानकाच्या शेजारीच उपनिरीक्षकांचे शासकीय निवासस्थान असून या चोरी प्रकरणाने पोलीस दलात खळबळ माजली आहे. (पोलीस अधिकार्‍यांच्याच घरी चोरी होत असेल, तेथे सामान्य नागरिकांच्या घरांच्या संरक्षणाची काय कथा ? - संपादक)

हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारा व्हिडिओ गेम हटवण्याची फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगची मागणी

     न्यूयॉर्क - श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने गमाया आस्थापनाकडे केली आहे. 
     हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या देवतांचा खेळामध्ये वापर करणे अयोग्य आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये हिंदु देवतांविषयीची आदराची भावना नष्ट होईल, असे फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने गमाया आस्थापनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. गमाया आस्थापनाने फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगच्या पत्राला अद्याप कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही.

धनबाद, कतरास, बोकारो, रांची आणि जमदेशपूर या ठिकाणी मार्गदर्शन अन् चर्चासत्र यांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीकडून झारखंड राज्यात धर्मप्रसार
झारखंडमध्ये उपस्थित हिंदुत्ववाद्यांना
मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे
     धनबाद (झारखंड) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद, कतरास, बोकारो, रांची आणि जमदेशपूर या ठिकाणी मार्गदर्शन आणि चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी हिंदु धर्माची सद्यस्थिती, हिंदूसंघटनाची आवश्यकता, पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे दु:ष्परिणाम, आचारधर्म, आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना कशी करायची ? आदी विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमांचा समितीच्या संकेतस्थळाशी संबंधित हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते, तसेच बुद्धीजीवी यांनी लाभ घेतला. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मोठ्या संख्येने धर्मबांधवांना हिंदु धर्मजागृती सभेला घेऊन येणार !

पिंपळवाडी (जिल्हा धाराशिव) येथील ग्रामपंचायत 
सदस्य श्री. हनुमंत गायकवाड यांचे आश्‍वासन ! 
      परांडा (जिल्हा धाराशिव), ३१ जानेवारी (वार्ता.) - ७ फेब्रुवारीला बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने धर्मबांधवांना घेऊन येणार आहे, असे आश्‍वासन पिंपळवाडीचे (जिल्हा धाराशिव) ग्रामपंचायत सदस्य श्री. हनुमंत गायकवाड यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. ७ फेब्रुवारी या दिवशी बार्शी येथे होणार्‍या धर्मसभेच्या प्रसारासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. तानाजी गोरे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी मौजे पिंपळवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव येथे श्री. हनुमंत गायकवाड यांची २९ जानेवारीला भेट घेतली असता त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर - आरोप आणि वास्तव !

रत्नागिरी येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत झालेल्या स्वातंत्र्यवीर 
सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
श्री. रणजित सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर
     २४ जानेवारी २०१६ च्या द वीक साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. इतिहास संशोधनाच्या नावाखाली लेखक निरंजन टकले यांनी वस्तूस्थितीचा विपर्यास करून एका महान क्रांतीकारकाचा अपमान केला आहे. या लेखातील प्रत्येक सूत्र याआधी अनेकदा खोडून काढले गेले असतांनाही द वीकने एक नवीन संशोधन सादर करण्याच्या आविर्भावात नुराणी आणि शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले निराधार आरोप पुन्हा सादर केले आहेत. त्याचे खंडण या लेखातून करत आहे.

दत्ता पडसलगीकरांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी पदभार स्वीकारला

नाशिक येथे ३१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती 
सभा पार पडली. या सभेचा वृत्तांत वाचा उद्याच्या अंकात...
     मुंबई - मुंबईचे नवे पोलीस आयुक्त श्री. दत्ता पडसलगीकर यांनी पदभार स्वीकारला आहे. ते १९८२ च्या बॅचचे आयपीएस् अधिकारी आहेत. श्री. पडसलगीकर देहलीत गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) कार्यरत होते. गेल्या १७ वर्षांपासून ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. गुप्तचर विभागात दुसर्‍या क्रमांकाच्या म्हणजे अप्पर संचालक पदावर २८ एप्रिल २०१४ पासून ते कार्यरत. श्री. पडसलगीकर मुंबईच्या लोकलमधील साखळी स्फोटांच्या तपास पथकात होते.

चौथर्‍याचा वाद चव्हाट्यावर या चर्चासत्रातून काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि भूमाता ब्रिगेडचा प्रसिद्धीचा हव्यास चव्हाट्यावर !

झी २४ तास वाहिनीवरील चर्चासत्र
डावीकडून सूत्रसंचालक डॉ. उदय निरगुडकर, भाजपचे श्री. केशव उपाध्ये, हिंदु
विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती
समितीचे श्री. सुनील घनवट
      झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील रोखठोक या चर्चासत्राच्या चौथर्‍याचा वाद चव्हाट्यावर या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, भाजपचे प्रवक्ता श्री. केशव उपाध्ये आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रियांका जगताप हे सहभागी झाले होते. या चर्चासत्रात भूमाता ब्रिगेड करत असलेली शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याची मागणी कायद्याच्या स्तरावर उभी राहू शकेल, अशी शक्यता नाही, हे लक्षात आले, तसेच भूमाता ब्रिगेडच्या प्रियांका जगताप यांना त्याविषयीचेे उत्तरही देता आले नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी मात्र सूत्रसंचालक आणि प्रियांका जगताप यांच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देतांना प्रतिप्रश्‍न विचारून त्यांना अनुत्तरित केले. यातून काँग्रेस शासनाचे भ्रष्टाचाराचे, तर भूमाता ब्रिगेडसारख्या तथाकथित संघटनेचे प्रसिद्धीच्या सुप्त हेतूचे सूत्र चव्हाट्यावर आले !

महत्त्वाच्या गोष्टी ३ आठवड्यांमध्ये न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास मान्यता

राजकीय व्यक्तींना शासकीय भूमी नाममात्र 
मूल्यात दिल्याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेची याचिका
      मुंबई - राजकीय व्यक्तींना शासकीय भूमी नाममात्र मूल्यात देऊन शासनाची हानी केल्याविषयी वर्ष २०१२ मध्ये महालेखापालांनी आक्षेप नोंदवत अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. वर्ष २०१२ मध्येच या विषयावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारी २०१६ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कानडे आणि मोहिते-डेरे यांच्या खंडपिठासमोर झाली. या प्रकरणी शासनाच्या महसूल आणि वन विभागाने त्यांचेे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून काही महत्त्वाच्या गोष्टी न्यायालयासमोर मांडण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्या वतीने केली. त्यास खंडपिठाने मान्यता देत ३ आठवड्यांमध्ये या गोष्टी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश दिले.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

दिग्विजय सिंह म्हणतात, मी हिंदुत्वाला मानत नाही, मी सनातन धर्माचे पालन करतो !

      वाराणसी - हिंदुत्व असा काही शब्दच नसून मी हिंदुत्वाला मानत नाही. मी सनातन धर्माचे पालन करणारी व्यक्ती आहे. सनातन धर्माच्या साधकाप्रमाणे माझी वागणूक असून माझे कुटुंब त्यानुसारच चालवतो, असे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. (सनातन धर्माचे पालन करणारी व्यक्ती कधीही राममंदिराला आणि हिंदुत्वाला विरोध करणार नाही. दिग्विजय सिंह यांचे विधान म्हणजे खोटेपणाचा अतिरेकच होय ! - संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आज कोल्हापूर येथे भव्य वाहन फेरीचे आयोजन !

     कोल्हापूर - येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने १ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. वाहन फेरीचा प्रारंभ राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानापासून होणार आहे. शहरातील शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, आझाद चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मी रोड, फोर्ड कॉर्नर, उमा चित्रपटगृह, आझाद चौक या मार्गाने पुन्हा राजारामपुरी येथे कोपरा सभा घेऊन फेरीची सांगता होईल. या वाहन फेरीला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले आहे.

इतरांचे अंधानुकरण करण्यापेक्षा वेश, भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करा !

     वेशो भाषा सदाचारः रक्षणीयम् इदं त्रयम् । 
     अन्धानुकरणमन्येषाम् अकीर्तिकरमुच्यते ॥
अर्थ : वेश, भाषा आणि राष्ट्रीय संस्कृती या त्रिसूत्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे. राष्ट्राप्रतीचा भाव प्रकट करणार्‍या या त्रिसूत्रांची अवहेलना करून दुसर्‍यांचे अंधानुकरण केल्याने अपयशच पदरी पडते.
- डॉ. अशोक पानगडिया, तांत्रिक विज्ञान तथा राज्य आयोजन मंडळाचे सदस्य, जयपूर (राज.), गीता स्वाध्याय, ११.२.२०१२

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांना सूचना

प्रतिदिन रात्री जेवणानंतर हळद आणि काळी मिरी (मिरपूड) घालून दूध प्या !
       घरी रहाणार्‍या ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रतिदिन रात्री जेवणानंतर हळद आणि काळी मिरी (मिरपूड) घालून एक पेलाभर दूध प्यावे. हे दूध प्राशन करतांना ॐ निसर्गदेवो भव । आणि वेदम् प्रमाणम् । हा जप करावा. असे केल्याने आपत्कालात देवतांकडून भूमीवर येणारी चांगली शक्ती साधकांना ग्रहण करणे सोईचे होईल; म्हणून हा उपाय महर्षींनी करण्यास सांगितले आहे. यामुळे देवतांकडून येणारी दैवी स्पंदने रक्तात लगेच प्रवाहित होणे शक्य होईल. आपत्कालात देहाचे रक्षण व्हावे, यासाठीचा हा उपाय आहे.
      ज्यांना दुधाचे पथ्य आहे किंवा ज्यांना दूध आवडत नाही, त्यांनी केवळ एक चमचा दूध तीर्थ म्हणून प्राशन करावे. आश्रमात साधक संख्येने अधिक असल्याने आणि सर्वांना एक पेलाभर दूध देणे शक्य नसल्याने प्रत्येकाने एक चमचा दूध प्राशन केले तरी चालेल. दूध किती घेतो यापेक्षा ते कसे आणि कोणत्या भावाने प्राशन करतो, यालाच अधिक महत्त्व आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (२८.१.२०१६, रात्री ९.०१)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेल्या भावचित्रांतून ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. उमा रविचंद्रन्
कु. सर्वमंगला मेदी
१. फुलांच्या चित्रातून भगवंत 
साधकांमध्ये भेदभाव करत 
नसून सर्व साधक त्याला 
एकसमान असतात, हे शिकायला मिळणे
चित्र क्रमांक १ : या चित्रामध्ये साधिकेने विविध फुलांच्या रूपातील गुण भगवंताच्या चरणकमली अर्पण केले आहेत. याउलट चित्र क्रमांक २ या चित्रामध्ये पू. (सौ.) बिंदाताईंनी भगवंताच्या चरणकमली अर्पण केलेली साधकरूपी फुले ही एकसारखी आहेत. यावरून भगवंत साधकांमध्ये भेदभाव करत नसून सर्व साधक त्याला एकसमान असतात, हे मला शिकायला मिळाले.
चित्र क्रमांक १
चित्र क्रमांक २

प.पू. दादाजी वैशंपायन यांनी संकट निवारणार्थ सांगितलेल्या दत्तमाला मंत्राचे पठण चालू केल्यावर झालेले त्रास

श्रीमती अदिती देवल
१. पठणासाठी दोन्ही सत्रांत नियमित गेल्यावर 
अंग पुष्कळ दुखून ताप येणे आणि औषधे 
घेऊन ताप उतरल्यावर गळून गेल्यासारखे होणे
      रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात प.पू. दादाजी वैशंपायन यांनी संकट निवारणार्थ सांगितलेल्या दत्तमाला मंत्राचे पठण चालू आहे. पठण दोन सत्रांत केले जाते. मी दोन्ही सत्रांत नियमित पठणासाठी जात होते. थोडे दिवसांनी (ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात) एक दिवस मी अकस्मात् रुग्णाईत झाले. त्या वेळी माझेे अंग पुष्कळ दुखत होतेे. मार बसल्यावर दुखावे, तसे अंग दुखले आणि ताप आला. त्यासाठी औषधे घेतली. ४ - ५ दिवसांनी ताप उतरला आणि मला एकदम गळून गेल्यासारखे झाले. त्यामुळे मला कटीच्या खाली शक्तीच नाही, असे वाटून मी घाबरले.

महर्षींची सनातनच्या साधकांवर अपार कृपा असल्याचे दर्शवणारे उदाहरण

      चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचनामध्ये (नाडीवाचन क्रमांक ५५ मध्ये) महर्षींनी साधकांना उद्देशून पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले - येणारा आपत्काल हा अत्यंत कठीण आहे. या काळात आपला जीव वाचणे महत्त्वाचे आहे. या काळात पंचमहाभूतांचा कोप तर होणारच आहे, शिवाय सर्वत्र युद्धसदृश स्थिती निर्माण होणार आहे. या काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी देवताही भूतलाकडे मोठ्या प्रमाणावर दैवी स्पंदने पाठवतील. ही स्पंदने ग्रहण करता यावीत, यासाठी साधकांनी प्रतिदिन रात्री जेवणानंतर हळद आणि काळी मिरी (मिरपूड) घालून दूध प्यावे. हे दूध प्राशन करतांना ॐ निसर्गदेवो भव । आणि वेदम् प्रमाणम् । हा जप करावा. यामुळे साधकांच्या देहातील रक्तात चांगली शक्ती प्रवाहित होण्यास साहाय्य मिळेल. आपत्कालात साधकांचा देह चांगली शक्ती ग्रहण करण्यास सक्षम बनवण्यासाठीच आम्ही ही प्रक्रिया आतापासून चालू केली आहे.

फुलपाखराचे बागडणे पाहून मनात येणार्‍या वाईट प्रसंगाचा विसर पडणे आणि देव प्रत्येक प्रसंगात सांभाळून नेत असल्याची जाणीव होणे

      मी भोजन करत असतांना एक वाईट प्रसंग आठवून मला रडू आले. मला रडतांना पाहून माझा मुलगा चि. वल्लभ म्हणाला, हे श्रीकृष्णा, माझ्या आईला रडू नको, असे सांग. त्याच वेळी खोलीचे दार बंद असतांनाही एक फुलपाखरू खोेेलीत येऊन आनंदाने बागडू लागले. ते पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून म्हणाले, प.पू. डॉक्टर, तुम्ही या अज्ञानी जिवाला अजून किती सांभाळून घेणार आहात ? नंतर ते फुलपाखरू माझ्या ओढणीवर बसले आणि तेथून ते माझ्या पाठीवर बसले. हे पाहून चि. वल्लभला आणि मला पुष्कळ आनंद झाला. ते फुलपाखरू श्रीकृष्णानेच पाठवले असेल, असे मला वाटले. त्यानंतर मला आठवलेला वाईट प्रसंग विसरून आम्ही त्या फुलपाखराकडे आनंदाने पहात होतो. तेवढ्यात ते आमच्यासमोर येऊन बसले. तेव्हा चि. वल्लभ म्हणाला, हे फुलपाखरू किती चांगले आहे ! त्या वेळी मी त्याला म्हटले, ते श्रीकृष्णाने पाठवले आहे. तेव्हा वल्लभ म्हणाला, मला ते माझ्या हातावर पाहिजे. मी त्याला सांगितले, तू जर चांगला वागलास, तर श्रीकृष्ण फुलपाखराला तुझ्या हातात देईल. तो त्याला अंघोळीला चल, असेही म्हणाला. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझ्याकडून प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. थोड्या वेळाने ते फुलपाखरू निघून गेले. वरील प्रसंगामुळे प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकून पुढे कसे जायचे ?, हे माझ्या लक्षात आले. याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

स्वतःला पालटण्याच्या तीव्र तळमळीमुळे केवळ ७ दिवसांत मनाच्या अडथळ्यांवर मात करण्याचे ध्येय ठेवणारी ६१ टक्के अध्यात्मिक पातळीची कु. कनकमहालक्ष्मी देवकर !

     
कु. कनकमहालक्ष्मी देवकर
२३.१२.२०१५ ते ३०.१.२०१६ या कालावधीत कु. कनकमहालक्ष्मी देवकर सनातनच्या ग्रंथांची संरचना शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात वास्तव्याला होती. आश्रमातून मंगळुरूला जाण्याच्या १ आठवडा अगोदर तिने पू. बिंदाताईंना लिहिलेले पत्र पुढे देत आहे. त्या पत्रातून ध्येय साध्य करण्याची तिच्यातील तीव्र तळमळ आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव दिसून येतो.
पू. बिंदाआई,
१. कनकने केलेली क्षमायाचना
     मी काल माझ्या मनातील विचार तुम्हाला लिहून दिले होते. त्यात माझे काही चुकले नाही ना ? माझ्या मनात नकारात्मकता, अपेक्षा आणि तुलना यांचे विचार होते. आई, मला क्षमा कर.
२. प.पू. गुरुमाऊलीला अपेक्षित अशी 
साधना करण्याची कनकमधील तळमळ !
     आई, देवाच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी देवानेच मनात एक विचार दिला, पुढील ७ दिवसांत ग्रंथांची संरचना करण्याची सेवा शिकण्याचा आणि आंध्रप्रदेशात जाऊन स्वतःतील स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करण्याचा !

नावाची गंमत !

      पू. (सौ.) अंजली गाडगीळ पू. (श्री.) मुकुल गाडगीळ यांना म्हणाल्या, विनायक आणि विद्या (सनातनचे साधक श्री. विनायक अन् सौ. विद्या शानबाग) ! तसे तुम्ही मुकुल आणि मी अनुकूल ! त्या वेळी तेथेच उपस्थित असणारी त्यांची कन्या कु. सायली म्हणाली, मग मी प्रतिकूल ! त्यानंतर पू. मुकुल गाडगीळ सायलीला म्हणाले, नाण्याला जशा २ बाजू असतात, तशा तुम्ही माझ्या २ बाजू आहात, एक अनुकूल आणि दुसरी प्रतिकूल !

कलियुगात संन्यस्त वृत्तीने भगवंताची सेवा कशी करावी ?, याचा आदर्श घालून देणारे प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई !

प.पू. पांडे महाराज
      प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई हे बांद्याजवळील गौतमारण्यात स्थापन केलेल्या राममंदिराच्या शेजारी संन्यस्त वृत्तीने कुटीत रहातात. त्यांनी आपले सर्वस्व प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले असून ते तेथे राहून मारुतिरायाप्रमाणे प्रभु रामचंद्राची सेवा करतात. त्यांचे जीवन खरोखरच आदर्शवत् आहे. आजच्या कलियुगात संन्यस्त वृत्तीने भगवंताची सेवा कशी करावी ?, हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

धर्मशिक्षणवर्ग घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली नावे कळवावीत !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि धर्मशिक्षणवर्गात
 नियमित येणार्‍या धर्मप्रेमींना नम्र विनंती !
     सद्यस्थितीत समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. विविध जिल्ह्यांत पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभांमधून अनेक जिज्ञासू आपल्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मोठ्या प्रमाणात मागणीही करत आहेत; परंतु वर्ग घेऊ शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत असल्याने बर्‍याच ठिकाणी अजूनपर्यंत वर्ग चालू झालेले नाहीत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोचता यावे, यासाठी वर्ग घेण्यास इच्छुक असलेल्या आणि नियमितपणे वर्गात उपस्थित असणार्‍या धर्मप्रेमींनी स्थानिक साधकांना, तर इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांना आपली नावे कळवावीत.

देहभान विसरून सेवा करणार्‍या आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असल्याने भावानंदात रहाणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्मिता जाधव यांची सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये !

     
कु. स्मिता जाधव
देवद आश्रमात सेवा करणार्‍या कु. स्मिता जाधव यांच्यात पुष्कळ साधकत्व आणि भाव आहे. त्या झोकून देऊन सेवा करतात आणि सतत आनंदी असतात. पौष कृष्ण पक्ष अष्टमी (१ फेब्रुवारी) कु. स्मिता यांचा वाढदिवस आहे. त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
कु. स्मिता यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सेवेची तळमळ
१ अ. देहभान विसरून सेवा करणे : स्मिताताईंना जेव्हा लेखा विभागात सेवा देण्यात आली, तेव्हा या सेवेच्या अंतर्गत पुष्कळ सेवा प्रलंबित होत्या. त्या वेळी स्मिताताईंनी झोकून देऊन अन्य साधकांच्या साहाय्याने समयमर्यादेत सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
      कित्येक वेळा रात्री उशिरापर्यंत, तर काही वेळा पहाटेपर्यंत त्या एकट्याच विभागात सेवा करत असतात. याविषयी विचाल्यावर त्या म्हणाल्या, सेवा करतांना मला वेळेचे भानच रहात नाही.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
पूर्णवेळ साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या आश्रमांत अनेक सज्ञान तरुण-तरुणी येतात. तेव्हा बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द पूर्णपणे विसरून सनातनवाले तरुणांना पळवतात, असा उद्घोष करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

पाकला उत्तर द्या !

संपादकीय
     इसिस या क्रूर धोरणाच्या आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून देशभरात तरुणांची धरपकड चालू आहे. दोन दिवसांपूर्वी अबूधाबी येथे कह्यात घेऊन तीन जणांना देशात आणण्यात आले. महाराष्ट्राचा फरहान शेख, काश्मीरचा शेख अझर उल इस्लाम, कर्नाटकचा अदनान हसन असे हे तीन तरुण आहेत. भारतीय शासन इसिसचा भारतात प्रसार होऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याने संयुक्त अरब अमरातीमध्ये जाऊन भारतीय पोलिसांनी तेथे वास्तव्यास असलेल्या आणि इसिसशी संबंध ठेवणार्‍या भारतीय नागरिकांना कह्यात घेतले, हे येथे अधोरेखित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn