Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


प.पू. राऊळ महाराज पुण्यस्मरण, कुडाळ


स्वामी विवेकानंद जयंती (तिथीनुसार)अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरेमहालक्ष्मी किरणोत्सव प्रारंभ, कोल्हापूर


पाकमध्ये लाखो हिंदूंसाठी 'हिंदु विवाह कायदा' संमत करावा ! - 'डॉन' वृत्तपत्राची मागणी

केंद्रातील शासन पाकमधील हिंदूंविषयी काही करील का ?

भारतातील वर्तमानपत्रे पाकमधील हिंदूंसाठी तर नाहीच आणि भारतातील हिंदूंसाठीही
काही मागणी करत नाहीत, उलट हिंदूंवर सातत्याने टीका करण्यातच धन्यता मानतात !

इस्लामाबाद - पाकिस्तानात वास्तव्यास असणार्‍या लाखो हिंदु नागरिकांना विवाहासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही, असे पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रातील संपादकियात म्हटले आहे. डॉनमधील हिंदु विवाह विधेयक या संपादकियात पाकिस्तानातील राजकारणावर टीका केली आहे. (पाकिस्तानशी मित्रता करणारे केंद्रातील शासन नवाज शरीफ यांना हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे काही मागणी करील का ? - संपादक)

सौदी अरबमधील शिया मशिदीत झालेल्या आक्रमणात ४ ठार, १८ घायाळ

रियाध (सौदी अरब) - सौदी अरबच्या मेहसिन शहरातील अल-रीदा या शिया पंथियांच्या मशिदीत दोन आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जण ठार, तर १८ जण घायाळ झाले. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हे आक्रमण झाले. सुरक्षारक्षकांनी त्यांचा विरोध केला, तेव्हा एका आतंकवाद्याने स्वतःला बॉम्बने उडवले. दुसर्‍याला अटक करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यावरून ४८ जणांना अटक

पहाटे ध्वनीवर्धकावरून होणारी अजान आणि मुसलमानांच्या धार्मिक उत्सवांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण यांवरून मुसलमानांना अशी अटक करण्याचे धाडस पोलिसांत आहे का ?

कोल्हापूर - गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणार्‍या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत त्यांना कळंबा कारागृहात रहावे लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीवर बंदी असतांना शिरोली परिसरात काही गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे उल्लंघन करून डॉल्बी लावून धिंगाणा घातला. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने गणेशोत्सवात डॉल्बी लावून धिंगाणा घातला जातो. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या उत्सवांत शिरलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात चळवळ राबवतांना हिंदूंना धर्मशिक्षण देते. उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी मंडळांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील कार्यक्रम ठेवावेत. - संपादक) त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

भारतातील किती वृत्तपत्रे हिंदूंसाठी असा आवाज उठवतात ?

फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानात वास्तव्यास असणार्‍या लाखो हिंदु नागरिकांना विवाहासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे तेथे अनेक वर्षांपासून प्रलंबित हिंदु विवाह विधेयक संमत करण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉन ने केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये हिंदु तरुणांचे धर्मांतर करणार्‍या आणि गोमांस खायला लावणार्‍या व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काढली गाढवावरून धिंड !

हिंदु धर्मावर सातत्याने आघात करणार्‍यांच्या विरोधात शासन कारवाई करत नसल्यामुळेच हिंदूंना अशा प्रकारे संताप करावा लागत आहे !

उरई (उत्तरप्रदेश) - तीन हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तसेच गोमांस खायला घालण्याच्या आरोपावरून अवधेश नामक एका व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून धिंड काढली. कार्यकर्त्यांनी अवधेशचे डोके, भुवया यांवरील केस आणि मिशी कापली तसेच त्याला चपलांचा हार घातला. यानंतर त्याला गाढवावर बसवून संपूर्ण शहरात फिरवण्यात आले. हे प्रकरण उरईच्या रेढर येथील आहे.
रेढर येथे रहाणार्‍या संगम नामक मुलाला या व्यक्तीने फसवले. सत्संगाच्या निमित्ताने त्याला मिर्जापूर येथील कछवाह गावात घेऊन जाऊन त्याला ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यासह आणखी दोन तरुणांनाही अशा पद्धतीने फसवण्यात आले आहे, असे संगम याने सांगितले.
जेवढ्या मुसलमानबंधूंना पकडाल, त्याच्या १०० पटींनी बाँबस्फोट करू !

पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएस्आय'च्या नावाने धमकीचे पत्र

लोकहो, पकडलेल्या जिहादी आतंकवाद्यांना त्वरित फासावर लटकवून शासनाने आयएस्आयला जशास तसे उत्तर द्यावे, अशी जनतेची मागणी आहे !

नवी देहली - पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएस्आय'च्या नावाने पाठवण्यात आलेले धमकीचे पत्र मिळाले आहे. उत्तराखंडच्या रुडकी येथील भारतीय सैन्याच्या तळावर पाठवण्यात आलेल्या पत्रात अस्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, कितीही सतर्कता बाळगली, तरी आम्ही बॉम्बस्फोट करणार. सैन्य, पोलीस, डॉक्टर आणि अधिवक्ते यांच्या मुलांना ठार करण्याची धमकीही पत्रातून देण्यात आली आहे. जेवढ्या मुसलमानबंधूंना पकडाल, त्याच्या १०० पटींनी बॉम्बस्फोट करू. कितीही सुरक्षा ठेवली, तरी आम्ही याआधीही यशस्वी झालो आहोत आणि पुढेही होणार आहोत. वाट पहा, असे शेवटी पत्रात म्हटले आहे.


इतके दिवस इसिसच्या कारवाया चालू असतांनाही ही संकेतस्थळे यापूर्वीच बंद का केली नाहीत ?

      गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात इसिसचे आतंकवादी पकडले गेल्यानंतर आता सुरक्षायंत्रणांनी इसिसच्या कारवाया थोपवण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास आरंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने इसिसशी संबंधित ९४ संकेतस्थळांवर कारवाई करून ती बंद केली आहेत.
- विवेक फणसळकर, आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख.

अबूधाबीहून देहलीत आणलेल्या इसिसच्या तीन आतंकवाद्यांना अटक

लोकहो, इसिसच्या सर्व जिहादी आतंकवाद्यांवर तात्काळ खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्याची केंद्रशासनाकडे मागणी करा !

नवी देहली - अबूधाबी येथे कह्यात घेऊन भारतात पाठवण्यात आलेल्या 'इस्लामिक स्टेट'च्या तिघा आतंकवाद्यांना राष्ट्रीय अन्वेेषण यंत्रणेने अटक केली आहे. या तिघांवर इस्लामिक स्टेटमध्ये युवकांची भरती करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. या तिघांमध्ये महाराष्ट्रतील फरहान शेख, काश्मीरचा शेख अझर उल इस्लाम आणि कर्नाटकचा अदनान हसन याचा समावेश आहे. अबूधाबी येथे नोकरी देतो, असे सांगून पैशाचे आमीष दाखवून ते तरुणांना इसिसच्या जाळ्यात खेचत होते. हे तरुण भारतात अल्प आणि अबूधाबीत अधिक काळ असायचे.


(म्हणे) तुम्हाला लष्कर-ए-तोयबाच्या कह्यात देईन !

असे आतंकवादी विचारसरणीचे भारतात आमदार बनतात, 
ही भारतीय लोकशाहीची निरर्थकताच नव्हे का ?
काश्मीरमधील अपक्ष आमदार राशिद यांची भाजप नेत्यांना चेतावणी
     जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत गोमांस मेजवानी दिल्यामुळे चर्चेत आलेले अपक्ष आमदार राशिद यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जिहादी मानसिकतेचे दर्शन घडवले. या वेळी राशिद यांनी राज्यातील भाजप नेत्याला चेतावणी दिली आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात ते भाजप नेत्याला तुम्हाला लष्कर-ए-तोयबाच्या कह्यात देईन, अशी चेतावणी देत आहेत. लष्कर-ए-तोयबा ही आतंकवादी संघटना असून त्या संघटनेशी राशिद यांचे संबंध असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.


मध्यप्रदेशात धर्मांतराच्या प्रकरणी अंध जोडप्यासह १३ जण अटकेत

धर्मांतराची समस्या कायमची सोडवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही !
     धार (मध्यप्रदेश) येथील देहार गावात हिंदूंना लालूच दाखवून आणि बलपूर्वक ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका अंध जोडप्याचाही समावेश आहे. पोलीस अजून चौघांचा शोध घेत आहेत. अटक झालेले सर्व जण बडवानी येथील पेंटेकोस्टल चर्चशी संलग्न होते. अटक करण्यात आलेल्यांनी आम्ही धर्मांतर केले नाही, केवळ जिझसची आज्ञा पाळली, असे सांगत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.


पेण येथे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की शाळेत क्रांतीकारकांच्या माहितीच्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन

फ्लेक्स फलकांवरील माहिती समजून घेतांना विद्यार्थी

सनातन संस्थेकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी मार्गदर्शन

पेण - येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या सचित्र माहिती देणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. जांभळेगुरुजी यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचा लाभ आजूबाजूच्या गावातील २१३ विद्यार्थी आणि १३ शिक्षक यांनी घेतला.
प्रदर्शनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आणि सरस्वतीदेवीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. मनोहर वर्तक आणि शाळा समितीचे अध्यक्ष श्री. जोमा पाटील अन् प्रभारी अध्यक्ष श्री. तुळशीदास गावंड यांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वतीदेवीचे पूजन केले. शिर्की प्राथमिक शाळेचे अध्यक्ष श्री. रमाकांत पाटील यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.

'इसिस'शी लढण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सक्षम ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

नोएडा - भारतीय सुरक्षा यंत्रणा सक्षम असून 'इसिस'मुळे संभवणार्‍या कोणत्याही आपत्तीशी लढण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला. सध्या इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेकडून भारतात जाळे पसरवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अलीकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कह्यात घेण्यात आलेल्या इसिसशी संबंधित १४ संशयित आतंकवाद्यांकडून ही माहिती मिळाली आहे.


बंगालमध्ये हिंदु मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली ३ धर्मांधांना फाशी, तर ३ जणांना जन्मठेप !

हिंदूंनो, प्रत्येक बलात्कार्‍याला अशीच कठोर शिक्षा होण्याची आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी करा !

कोलकाता - येथून २० किमी अंतरावर असलेल्या कामदुनी या गावी एका २० वर्षीय हिंदु विद्यार्थिनीचे ७ जून २०१३ या दिवशी ८ जणांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली. या प्रकरणी कोलकाता सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संचिता सरकार यांनी ३ धर्मांधांना फाशीची, तर ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमिनुल अली, सैफुल अली आणि अन्सार अली या तिघांना फाशी, तर इमानुल इस्लाम, अमिनुल इस्लाम आणि भोला नासकर यांना जन्मठेप झाली आहे.

भारतमातेच्या रक्षणासाठी इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी व्हा ! - पारस राजपूत

आय.एस्.आय.एस्.च्या जिहादी आतंकवाद्यांना राष्ट्रभक्त
 भारतियांचे आय.ए.आय.एस्.द्वारे चोख प्रत्युत्तर
आतंकवादाला आळा घालण्यासाठी आतंकवादविरोधी कठोर कायदा करावा
 
डावीकडून सर्वश्री अभिजीत देशमुख, अधिवक्ता देवदास शिंदे, पारस राजपूत, राहुल कौल
      पुणे - इंटरनेटच्या माध्यमातून आय.एस्.आय.एस्.च्या जिहादी आतंकवाद्यांनी विश्‍वभरातील ६५ देशांमधून जवळपास ३० सहस्र लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढले आहे. आय.एस्.आय.एस्.चे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी जनअभियानासारखे इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट (आय.ए.आय.एस्.) हे अभियान चालवले जात आहे.

पोलिसांकडून हिंदूवर झालेल्या अन्यायाची चौकशी करण्यास गेलेले बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना बांगलादेशी पोलिसांनीच धमकावले !

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी झटणारे अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या सुरक्षेसाठी 
केंद्रातील शासन बांगलादेश शासनावर दबाव आणणार का ?
अधिवक्ता रवींद्र घोष 
     ढाका - बांगलादेशमधील चितगाव जिल्ह्यातील हाथझरी येथे सुमनकुमार डे या व्यावसायिकाचा पोलिसांनी खंडणीसाठी छळ चालवला होता. या छळाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बांगलादेश मायनॉरीटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना हाथझरी येथील पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी दूरध्वनीवरून या प्रकरणाची चौकशी केल्यास महाग पडेल, अशी धमकी दिली, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कळवले आहे. (भारतात अल्पसंख्यांकांच्या कोटकल्याणासाठी चढाओढीने प्रयत्न करणारे कधी बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी आवाज उठवतील का ? भारतात अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी तथाकथित पुरोगामी आवाज उठवतात; मात्र बांगलादेशमध्ये कोणीही पुरोगामी नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंना वार्‍यावर सोडले जाते, एखादी तस्लीमा नसरीन यासाठी प्रयत्न करते, तेव्हा तिला देशातून पळवून लावले जाते ! - संपादक)

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

नाशिक येथील विश्‍वास रेडिओच्या माध्यमातून धर्मजागृती सभेचा प्रसार

३ लक्ष लोकांपर्यंत विषय पोहोचला !
विश्‍वास ९०.८ रेडिओवर बोलतांना श्री. सुनील घनवट
      नाशिक - येथील विश्‍वास ९०.८ रेडिओवर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे ३१ जानेवारी या दिवशी होणार्‍या धर्मजागृती सभेची माहिती दिली. नाशिक येथील ३ लक्ष लोकांपर्यंत या रेडिओच्या माध्यमातून सभेचा विषय पोहोचला. विश्‍वास रेडिओच्या माध्यमातून धर्मजागृती सभेचा विषय विनामूल्य पोहोचवण्यासाठी श्री. विश्‍वास ठाकूर आणि श्री. विवेक ठाकूर यांनी सहकार्य केले. हे निमंत्रण ३० आणि ३१ या दिवशी दिवसातून १६ वेळा पुनर्प्रसारित करण्यात येत आहेे.शनिशिंगणापूरच्या मंदिरातील प्रथा ही स्त्री-पुरुष समानतेच्या सूत्रावर चर्चा करण्याचा विषय होऊच शकत नाही ! - अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र
अधिवक्ता
श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
     मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर महिला किंवा पुरुष यांपैकी कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय मंदिर न्यासाने ६ वर्षांपूर्वी घेतलेला आहे. या ठिकाणी केवळ महिलांनाच प्रवेश नाकारला जातो, असा भाग नाही. त्यामुळे शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावरील प्रवेश हा महिला समानतेच्या सूत्रावर चर्चा करण्याचा विषय होऊच शकत नाही, असे ठाम मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवर २८ जानेवारीला झालेल्या चर्चासत्रात मांडले. 
    निधी राजदान यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात भाजपच्या प्रवक्त्या शायना एन्.सी., काँग्रेसच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या खुशबू सुंदर, पत्रकार साबा नक्वी, साम्यवादी पक्षाच्या आणि ए.आय.पी.डब्ल्यू.ए. या संघटनेच्या सचिव कविता कृष्णन् सहभागी झाल्या होत्या.

(म्हणे) मुसलमान आतंकवादी आहेत, असा समज हिंदूंमध्ये पसरवला जातो !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार दिनेश अमिनमट्टु यांचे मुसलमानप्रेम !
     बेंगळुरू - प्रत्येक स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर संशयित आतंकवादी म्हणून काही मुसलमानांना अटक करण्यात येते. मुसलमान आतंकवादी आहेत, असा समज सामान्य हिंदूंमध्ये पसरवला जातो, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार दिनेश अमिनमट्टु यांनी केला आहे. बेंगळुुरू येथे आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
     अमिनमट्टु पुढे म्हणाले की, बहुसंख्यांक हिंदूंकडून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, असा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या काही शतकांपासून देशातील मुसलमानांची संख्या १४ टक्के इतकीच राहिली आहे. त्यामध्ये वाढ झालेली नाही. तसेच देशातील ख्रिश्‍चनांची संख्याही २ टक्क्यांपेक्षा वाढलेली नाही. 
    (२०११ च्या जनगणनेनुसार मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ झाली असून हिंदूंची लोकसंख्या घटली आहे, असा स्पष्टपणे उल्लेख आहे. असे असतांनाही मुलमानप्रेमापायी खोटे बोलणारे अमिनमट्टु ! - संपादक)

महाराष्ट्राच्या मानवी हक्क आयोगातील रिक्त पदे का भरली नाहीत, याचे स्पष्टीकरण द्या !

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला खडसवले !
     मुंबई - महाराष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे आयोगासमोरील याचिकांची सुनावणी प्रलंबित रहात आहे, त्यामुळे अध्यक्षांसह अन्य पदे भरली जावीत, अशी जनहित याचिका मुंबई येथील अधिवक्ता श्री. प्रकाश साळसिंगीकर यांनी केली होती. त्याची सुनावणी २९ जानेवारी २०१६ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कानडे आणि मोहिते-डेरे यांच्या खंडपिठासमोर झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडतांना वर्ष २०१२ मध्ये याचिका दाखल केलेली असली, तरी आयोगात अजून एक सदस्यपद रिक्त आहे, त्यामुळे याचिकेतील तथ्यांश अजून आहे, हे नमूद केल्यावर खंडपिठाने शासनाला या संदर्भातील वस्तूस्थिती विषद करा आणि रिक्त पदे का भरली जात नाहीत ? त्याचे स्पष्टीकरण द्या, असे आदेश दिले.

मूकबधीर असणारा अस्लम मंदिराबाहेर भीक मागून करत होता इस्लामिक स्टेटसाठी हेरगिरी !

हिंदूंनो, मूकबधीरही इस्लामिक स्टेटसाठी प्रयत्नशील आहेत, 
हे जाणा आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !
     राजकोट - हरियाणाच्या अंबाला येथून अटक करण्यात आलेला इस्लामिक स्टेटचा आतंकवादी मूकबधीर आहे. या आतंकवाद्याला ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही. तसेच लिहिताही येत नाही. अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांना अद्याप त्याचे नावही समजू शकलेले नाही. त्यामुळे तो नेमके कशा प्रकारे हेरगिरी करत होता, हेही या अधिकार्‍यांना स्पष्ट होऊ शकलेले नाही. 
   गेल्या १० वर्षांपासून तो राजकोटच्या साईं मंदिराबाहेर भीक मागत होता. राजकोट येथील एका पडीक घरात रहात होता. येथील दुकानदारांकडे केलेल्या चौकशीतून या आतंकवाद्याचे नाव असलम असल्याचे समजले आहे. अन्वेषण अधिकार्‍यांना माहिती मिळाली होती की, त्याचे कर्णावती (अहमदाबाद) येथे रहाणार्‍या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याशी संबंध होते.

कानपूर येथील भाजपचे आमदार सतीश महाना यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून सौ. अनीता महाना, दैनिक सनातन प्रभात
 वाचतांना श्री. सतीश महाना आणि डॉ. दुर्गेश सामंत
     रामनाथी, गोवा - उत्तरप्रदेशातील कानपूर येथील भाजपचे आमदार श्री. सतीश महाना यांनी २८ जानेवारीला गोव्यातील रामनाथी येथील, सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ. अनीता महाना याही होत्या. सनातन संस्थेचे साधक डॉ. दुर्गेश सामंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या विविध सेवांची माहिती करून दिली.
    श्री. महाना यांनी आश्रम पाहिल्यावर अभिप्राय देतांना म्हणाले की, आश्रमातील साधक अत्यंत भाग्यवान आहेत की ते येथे येऊन साधना करत आहेत. आणि मीही भाग्यवान आहे की येथे येऊ शकलो. येथे स्नेह आहे, समर्पित भाव आहे, परस्पर सहचर्याचा भाव आहे. आजच्या तरुणांना अध्यात्माची ओढ नाही; मात्र ज्यांना याची ओढ आहे आणि ज्यांनी यातला आनंद घेतला आहे, ते अध्यात्माला, साधनेला कधीही सोडू शकत नाहीत, ते येथे अनुभवता येत आहे.
     देशातील कथित असहिष्णुतेविषयी श्री. सहाना म्हणाले की, भारतात अहिष्णुता कधीही नव्हती. जे अहिष्णुतेची ओरड करत आहेत, तेच मुळात असहिष्णु आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची भेट

कोल्हापूर येथे माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना अध्यात्म 
विश्‍वविद्यालय ग्रंथ भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करतांना समितीचे 
कार्यकर्ते आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे (उजवीकडून पहिले) आणि श्री. आनंद पाटील

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सिद्ध केलेले कृत्रिम तलावही बुजवले !

सातारा नगरपालिकेची आणखी एक संशयास्पद कृती !
     सातारा नगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करत शहरातील तलावांमध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला होता. त्यामुळे २० लक्ष रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात आले होते. हे तलाव कायमस्वरूपी रहातील, असे आश्‍वासनही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र अचानक पालिका कर्मचार्‍यांनी कृत्रिम तलाव बुजवण्याची चळवळ हातात घेतली आहे.

सावंतवाडी येथे सापडलेले ते गोमांसच : नजीर जमादारला शिक्षा

आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनाही आता शिक्षा करा !
     महाराष्ट्रात गोमांस विक्रीवर बंदी असतांना सावंतवाडी येथून ११ जुलै २०१५ या दिवशी दुचाकीवरून मांसाची वाहतूक करतांना संशयित नजीर मो. जमादार, बाहेरचावाडा, सावंतवाडी याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. 
     त्या वेळी जमादार याच्यावर महाराष्ट्र पशूसंवर्धन १९९५ चे सुधारित कलम ५ अन् ७ सी (९) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली होती. त्या वेळी जमादार याच्याकडून हस्तगत केलेले मांस फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आणि आरोपी जमादार याला पोलिसांनी न्यायालयासमोर उपस्थित केले. या वेळी जमादार याने स्वतःहून ते मांस गोमांस होते आणि आपण त्याची वाहतूक केल्याची स्वीकृती दिली. त्यामुळे न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण यांनी जमादार याला २ सहस्र रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

जळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा समावेश !

     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी याविषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याची विनंती केली होती. त्या वेळी त्यांनी आम्हाला अशा स्वयंस्फूर्तीने कार्य करणार्‍यांची आवश्यकता आहे, असे सांगितले होते आणि १८ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या ३ सदस्यांना जिल्हास्तरीय समितीमध्ये आणि ६ सदस्यांना तालुका स्तरावरच्या समितीमध्ये सहभागी करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशाद्वारे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी भारतालाही जीकाच्या संकटाची शक्यता !

     जिनेव्हा (स्वित्झर्लंड) - अमेरिकेतील २४ देश सध्या नवजात बालकांना होणार्‍या जीका नावाच्या विषाणूच्या गंभीर आजाराने ग्रासले आहेत. गर्भवती महिलांना जीका विषाणूंची बाधा झाल्यास जन्माला येणार्‍या मुलांच्या शिराचा आकार छोटा असतो. जीकाच्या विषाणूंचा संसर्ग भारतालाही होऊ शकतो, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. ऐडीज नावाचे डास या विषाणूंचे वाहक आहेत. अशा प्रकारचे डास सापडणार्‍या भारतासहित अन्य देशांनाही ही चेतावणी देण्यात आली आहे. ऐडीज डास जीका विषाणूंना जन्म देतात. या विषाणूंमुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजारही होतात. हे दोन्ही आजार भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

सैन्यदलाला भ्रष्टाचाराची कीड लागणे, हे भारतासाठी धोकादायक !

बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात दोन सैन्याधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश !
     नवी देहली - बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या प्रकरणी सध्या सेवेत असलेले मेजर जनरल अशोक कुमार आणि मेजर जनरल एस्. एस्. लांबा या दोघांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने २९ जानेवारी या दिवशी दिले. लेफ्टनंट जनरलची तीन रिक्त पदे भरण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याच्या आलेल्या तक्रारीवरून या दोघांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोघांना गेल्याच वर्षी अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

विज्ञान आणि हिंदुत्व यांच्या आधारावर हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे, हीच सावरकरांची शिकवण ! - खासदार नितीन गडकरी

रत्नागिरीत २८ व्या स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या 
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत !
     रत्नागिरी, ३० जानेवारी (वार्ता.) - धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. हिंदुत्व ही जीवनपद्धत आहे. ती पूर्वापार चालत आलेली भारतीय जीवनपद्धत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञानाचे सातत्याने समर्थन केले. समाजातील अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत, हेही त्यांनी सांगितले. विज्ञान आणि हिंदुत्व यांच्या आधारावर हिंदु राष्ट्राची निर्मिती केली पाहिजे, अशी त्यांची शिकवण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

प.पू. रामभाऊस्वामी
तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यात आला. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे देत आहोत.

१. 'मी ज्याप्रमाणे माझे गुरु आणि समर्थ रामदासस्वामी यांना विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनाही आता विसरू शकणार नाही. हे तिघे माझ्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्याप्रमाणे आहेत.
२. प.पू. डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे त्यांना चालणेही कठीण होते. मी त्यांच्यासाठी यज्ञ करणार आहे. या यज्ञातून त्यांना केवळ चालण्याचीच नव्हे, तर धावण्यासाठीही शक्ती मिळेल !

शासन श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीने प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता !

शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाण्यास महिलांच्या असलेल्या आग्रहाचे प्रकरण

पुणे - शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी महिलांनी केलेल्या आंदोलनाने निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला आहे. पुरुष आणि महिला यांना चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याची अनुमती मिळावी अथवा चौथर्‍यावरून दर्शनाला कायमस्वरूपी बंदी करावी, यांपैकी एक पर्याय निवडण्याचा प्रस्ताव श्री श्री रविशंकर यांनी समोर ठेवला आहे. श्री श्री रविशंकर यांचे राजकीय वर्तुळातील आदराचे स्थान लक्षात घेता त्यांच्या माध्यमातून शनिशिंगणापूर प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनाकडून चालू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून स्त्री-पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळे नियम लावण्याला विरोध दर्शवला होता. 'स्थानिक पातळीवर चर्चेतून तोडगा काढा', असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या परिसरातील देवस्थान न्यासाच्या सदस्यांना मात्र धार्मिक परंपरा जपायच्या आहेत.


आजपासून श्री महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाला प्रारंभ होणार !

     
      कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील या वर्षीच्या पहिल्या पर्वातील किरणोत्सवाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत हा किरणोत्सव सोहळा साजरा होणार आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची पाहणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या वतीने गेल्या आठवड्यात केलेल्या पहाणीचा अहवाल ८ फेब्रुवारीपर्यंत महापालिका प्रशासनला देण्यात येणार आहे.

हिंदु महासभेच्या वतीने आज बाबाराव स्मारक येथे प्रांतिक सभा आणि जाहीर सभा !

     सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने रविवार, ३१ जानेवारी या दिवशी सांगली येथील क्रांतीवीर बाबाराव स्मारक प्रतिष्ठान येथे अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी १.३० प्रांतिक सभा आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ जाहीर सभा घेण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्यउपाध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांना न स्वीकारणे, ही असहिष्णुता ! - केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू

     पुणे - लोकशाही पद्धतीने बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात काहीजण स्वीकारत नाहीत. ही असहिष्णुता नव्हे का ?, असा प्रतिप्रश्‍न केंद्रीय नगरविकास आणि संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी एम्आयटीमधील एका कार्यक्रमात बोलतांना केला. एका विद्यार्थ्याने नायडू यांना अमीर खान यांनी भारत सोडण्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने होणारी टीका ही असहिष्णुता नाही का ? याविषयी तुमचे मत काय ?, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, अमीर माझा मित्र आहे; पण त्याच्या वक्तव्याने देश, तो स्वत: आणि मी दुखावलो आहे.

भारत हिंदु राष्ट्रच होते आणि ते पुढेही हिंदु राष्ट्रच रहाणार आहे !

निवृत्त ख्रिस्ती स्वातंत्र्य सैनिक
     एर्नाकुलम् (केरळ) - भारत हिंदु राष्ट्रच होते आणि ते पुढेही हिंदु राष्ट्रच रहाणार आहे. आम्हीही पूर्वी हिंदूच होतो, मात्र नंतर धर्मांतरित झालो, असे उद्गार एका निवृत्त ख्रिस्ती स्वातंत्र्य सैनिकाने काढले. त्यांचे सध्याचे वय ९० वर्षे असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करणारे वक्तव्य केले.

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव द्यावे - डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

     नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस हे जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक शिकलेले होते. नेहरू केंब्रिज विश्‍वविद्यालयातील अनुत्तीर्ण विद्यार्थी होते. नेताजी भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. तरीही त्यांनी इंग्रज शासनाची नोकरी लाथाडली होती. त्यामुळे देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाचे नाव पालटून नेताजी सुभाषचंद्र बोस विश्‍वविद्यालय असे केले पाहिजे. इतकेच नव्हे, तर नेहरू आणि इंदिर गांधी यांच्या नावाने जितक्या शिक्षणसंस्था आहेत, त्यांचीही नावे पालटली पाहिजेत. 
    डॉ. स्वामी यांच्या मागणीवर संतप्त झालेले काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी म्हटले आहे की, भाजपला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी इतकेच प्रेम आहे, तर त्यांनी नेताजींच्या नावाने ४ नवीन विश्‍वविद्यालये स्थापन करावीत. भाजप बंगालच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारचे राजकारण करत आहे.

नाशिक येथे हिंदु धर्मजागृती सभा

नाशिक येथे हिंदु धर्मजागृती सभा
दिनांक : ३१ जानेवारी, वेळ : सायंकाळी ५
स्थळ : आर्.पी. विद्यालय मैदान, निमाणी बस स्थानकाजवळ, पंचवटी, नाशिक.
भ्रमणभाष क्रमांक : ९४०४९ ५६४८१
नाशिक येथील सभेत सहभागी वक्ते
१. पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्थेच्या संत
२. श्री योगेश महाराज साळगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार
३. श्री. बाळासाहेब सानप, आमदार आणि शहराध्यक्ष, भाजप
४. श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समितीपुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या कालावधीत साधकांना स्फुरलेल्या कविता

कृष्णाची राजसभा
कृष्णाची राजसभा आली आता समीप ।
ध्येयवेडे झाले सर्व गोपी आणि गोप ॥
प्रत्येक खेडे वाटे आता कृष्णाचे गोकुळ ।
धर्मवीरांची मने आणली कृष्णानेच जवळ ॥
कृष्ण विचारे, गोकुळवासी कसे येणार सभेला ? ।
गोपी वदती, केशवा तूच घेऊन ये प्रत्येकाला ॥
आनंद दिला ना या सेवेने प्रत्येकाला, ऐसे जेव्हा कृष्ण पुसती ।
तेव्हा भगवंता आशीर्वादही तुझा मिळावा आम्हा या आनंदासोबती ॥
कृष्ण गोड हसत असे गालात ।
आशीर्वाद असे प्रत्येकाला जो तनासह मनानेही असे सेवेत ॥
कृष्ण दाखवी एकीकडे बोट । गुरुदेवांकडे असे ते थेट ।
कृष्ण सांगे, यांचा जो लाडका होई । निःसंशय तो मोक्षास जाई ॥
- श्री. मिलिंद धर्माधिकारी, पुणे

न भूतो न भविष्यति, ऐसी सभा व्हावी ।
हर हर महादेव, हर हर महादेव, गर्जती शिवरायांचे मावळे ।
हिंदवी राज्य आहे ते स्थापणे, स्फुल्लिंग चेतवले शिवबाने ॥ घोड्यावर होऊनी स्वार, मावळे अखंड लढले ।
देऊनी प्राणांची आहुती, सिंहगडासारखे गड जिंकले ॥
तैसेचि नियोजन साधकांचे, ध्येय ठेवूनी हिंदु राष्ट्राचे ।
करूनी पादाक्रांत येवलेवाडी, कोंढणपूर, हर हर महादेव हा पुन्हा गरजे सूर ॥
लाभले आशीर्वाद भगवान श्रीकृष्णाचे ।
उच्चाटन केले संकटांचे श्रीमत् नारायणाने ॥
आता एकच ध्येय एकच ध्यास, हिंदु राष्ट्राची बघायची आहे पहाट ।
न भूतो न भविष्यति, ऐसी सभा व्हावी, हीच प्रार्थना असे दिनरात ॥
- सौ. ज्योती दाते, पुणे

हिंदू तेजा जाग रे !

jago ! : Pak me raha rahe Hinduonke liye Hindu vivaha kanun karo : Pak ka samacharpatra Don
kya hamari shasanbhi en Hinduonke liye aage ayegi ?

जागो ! : पाक में रह रहे लाखो हिंदूआेंके लिए हिंदु विवाह कानून करो : पाकका समाचारपत्र डॉन
क्या हमारी शासनभी इन हिंदूआें के लिए आगे आयेगी ?
शनिशिंगणापूर येथील परंपरांचे पालन व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या आणि सनातनच्या साधिका यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर परखडपणे मांडलेली धर्माची बाजू !

धर्मद्रोही आणि पुरो(अधो)गामी महिलांच्या वैचारिक आतंकवादाला ठामपणे प्रत्युत्तर 
देणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या रणरागिणी ! 
सौ. नंदिनी सुर्वे
कु. प्रियांका लोणे 
सौ. नयना भगत
सौ. सुनीता पाटील
कु. कृतिका खत्री
सौ. मनाली नाईक मोदी शासनाने बचावात्मक पवित्रा न घेता शत्रूला आक्रमक वृत्तीने प्रत्युत्तर देऊन नामोहरम करणे आवश्यक !

पू. सत्यवान कदम
१. भारताला चांगले नेतृत्व मिळाल्याने भारतियांच्या अपेक्षा 
उंचावल्या जाणे; परंतु पदरी मात्र निराशाच !
    काही दिवसांपूर्वी पठाणकोट हवाईदलावर पाकस्थित आतंकवाद्यांनी आक्रमण केले. ते मोडून काढण्यासाठी आपल्या भारतीय सैनिकांना ७२ घंटे लागले. या आक्रमणात आपले ३ सैन्याधिकारी आणि ५ कमांडो मारले गेले. यापूर्वीही मुंबईवरील आक्रमणात काही पोलीस अधिकारी आणि निरपराध लोकांचे बळी गेले होते. हे आक्रमण पाकिस्तानी आतंकवाद्यांनीच केले आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. नेहमीप्रमाणे त्याचे पुरावे आपण पाकिस्तानला दिले; परंतु पुढे त्या पुराव्यांचे काय होते ?, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, तरीसुद्धा आपण पुरावे देतच असतो. काँग्रेस सत्तेत असतांना आपल्याला त्या पक्षाकडून कसल्याही अपेक्षा नव्हत्याच; परंतु आता चांगले नेतृत्व भारताला मिळाल्यामुळे त्यांच्याकडून भारतियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; परंतु पदरी निराशाच आली.

मेक इन इंडियाचे बोधचिन्ह निर्माण करण्यास भारतात एकही पात्र व्यक्ती नाही का ?

पू. अशोक पात्रीकर
      मेक इन इंडियाचे बोधचिन्ह अमेरिकेतील एका अमेरिकन आस्थापनाच्या भारतीय शाखेकडून बनवून घेतल्याची बातमी वाचून या देशातील कोणत्याही राष्ट्राभिमानी व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल. केंद्रशासनाच्या वतीने हे बोधचिन्ह बनवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या आणि कायर्र्पद्धतीप्र्र्रमाणे हे सर्व केले गेले, असे समर्थन करण्यात येईल; पण निविदांच्या अटींमध्येच केवळ या देशातील आस्थापनांनी निविदा भराव्या, अशा अटी घालणे आवश्यक होते. याला विदेशियांनी विरोध केल्यास हा उपक्रम भारतातील आहेे. तेव्हा त्याचे बोधचिन्ह कुणी बनवावे, हा निर्णय भारताचा आहे, असे शासन ठामपणे सांगू शकले असते.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

लोक चिंतेने ग्रासले जातील आणि मानवाचे सरासरी आयुर्मान ५० वर्षांवर येणार असणे
क्षुत्तृड्भ्यां व्याधिभिश्‍चैव सन्तप्स्यन्ते च चिन्तया ।
त्रिंशद्विंशति वर्षाणि परमायुः कलौ नृणाम् ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक ११
अर्थ : लोक तहान-भूक, रोग आणि अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील. कलियुगामध्ये माणसाचे अधिकाधिक आयुष्य ५० वर्षे असेल.

प्रा. गोपाळ मयेकर यांच्यासारखा मराठी अभिमान असणारे किती जण आहेत ?

     निवडणुकीपूर्वी राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी मराठीचा आधार घेतात; मात्र सत्तेवर आल्यानंतर सत्तेसाठी मराठीचा बळी दिला जातो. मराठी राजभाषा करण्यासाठीचे शांतीचे मार्ग आता पुरे झाले. राजकारण्यांना वठणीवर आणणारे गोवा बंदसारखे प्रखर मार्ग अवलंबा. मी आता वृद्ध झालो आहे. तरी रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मी मराठीसाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे.
- प्रा. गोपाळराव मयेकर, माजी अध्यक्ष, मराठी गोमंतक अकादमी, गोवा      अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालॅण्ड या राज्यांमध्ये एकूण ख्रिस्ती लोकसंख्येचे प्रमाण ७० ते ९३ टक्के झाले आहे. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

लष्करी गाडीचा वापर करून अतिरेकी कुठेही आक्रमण करतील ! आपल्या गाड्या सांभाळता न येणारे लष्कर भारताचे काय रक्षण करणार ?

     २४ जानेवारी २०१६ या दिवशी लोधी गार्डन परिसरातून लष्कराच्या रुग्णालयाचे चिन्ह असलेली पांढर्‍या रंगाची सँट्रो गाडी चोरीला गेली आहे. यामुळे पोलीस आणि सुरक्षायंत्रणा सावध झाल्या असून गाड्यांचा तपास चालू आहे.

सदोष चलनी नोटांच्या छपाईचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा आणि त्यांना निलंबित करा !

     नाशिक येथील चलन मुद्रणालयात एक सहस्र रुपयाच्या ३० कोटी सदोष नोटा छापण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
     आज हिंदूंवर चोहोबाजूंनी आणि सर्व प्रकारची संकटे घोंघावत आहेत. अशा स्थितीत हिंदूंच्या सर्व विचारधारांना हिंदु राष्ट्राच्या प्रेरणेने एका व्यासपिठावर आणण्याचा हिंदु जनजागृती समितीचा प्रयत्न अद्भूत आहे. - अधिवक्ता मधुमुकुल त्रिपाठी, सर्वोच्च न्यायालय
     हिंदुत्ववाद्यांनी सशांप्रमाणे न रहाता सिंहासारखे राहिले पाहिजे, तरच येत्या काळात हिंदूंचे रक्षण शक्य आहे.- श्री. अनुराग मलिक, अध्यक्ष, हिंदु युवक सभा, सोनीपत, हरियाणा
     एन्.सी.ई.आर.टी.च्या पाठ्यपुस्तकांत मोगलांचा जिहाद झाकण्यासाठी त्यांनी विस्तारवादासाठी भारतावर आक्रमण केले, असे सांगून त्यांना झुकते माप दिले आहे. - नीरज अत्री, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

अशा पोलिसांना गुन्हेगारांचे साथीदार म्हणून शासनाने शिक्षा करावी !

     मुंबई शहरातील खार परिसरातील गोळीबार वसाहतीमध्ये काही धर्मांध तेथील एका विवाहित महिलेची नेहमी छेडछाड करून तिला त्रास देत होते. २१ डिसेंबर २०१५ या दिवशी एक धर्मांध त्या हिंदु महिलेला त्रास देऊ लागला. त्याला महिलेच्या पतीने विरोध केला असता झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर या दिवशी अजिंक्य (विवाहितेचा पती) यांच्या जवळच्या तीन हिंदु मित्रांचा या घटनेशी कुठलाही संबंध नसतांना ते केवळ त्याचे मित्र आहेत; म्हणून धर्मांधांनी अमानुषपणे त्यांच्या हाता-पायाची बोटे ठेचून आणि तीक्ष्ण ब्लेडने गाल कापून त्यांना गंभीर घायाळ केले. त्या तिघांपैकी विकास कांबळे यांचा काही दिवसांनंतर उपचाराच्या वेळी मृत्य झाला. 
    याप्रकरणी दोन गंभीर घायाळ झालेल्या हिंदूंनी मृत्यू पावलेल्या विकास कांबळे यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांची नावे पोलिसांना सांगितली. त्या वेळी पोलिसांनी ती नावे लिहून घेतली आणि थोड्या वेळाने त्या कागदावर आणखीन काही हिंदु मुलांची नावेही स्वतःहून घातली. 

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !

     नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून अमानुष मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत. जेव्हा अनाथालयाला कुणी मान्यवर भेट देण्यास येत असत, तेव्हा या मुलांना नवीन कपडे घालून रांगेत उभे करण्यात येत असे आणि त्यांना बायबलमधील उतारे म्हणून दाखवण्यास सागितले जायचे. जर कुणी वाचन करण्यात चुकला, तर त्याला नंतर काठीने आणि पट्ट्यांनी अमानुष मारहाण केली जात होती. (संदर्भ : इंडिया टुडे)

संचारबंदीतही हिंदूंचा खून करणार्‍या धर्मांधाला पोलीस रोखू शकले नाहीत, म्हणजे संचारबंदीही नावापुरतीच होती !

     देवास (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांनी एका हिंदूवर भर बाजारात चाकूने आक्रमण केल्याच्या घटनेनंतर येथे दंगली भडकली. या घटनेनंतर प्रशासनाकडून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. ही संचारबंदी लागू असतांना १६ जानेवारी २०१६ या दिवशी धर्मांधांच्या जमावाने नरेंद्र राजोरिया या २५ वर्षांच्या युवकाला रस्त्यात अडवून त्याच्या गुप्तांगावर वार केले. या आक्रमणात तो गंभीररित्या घायाळ झाला. त्याच्यावर इंदूर येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. एकाही राजकीय पक्षाच्या शासनाने राष्ट्राचे आणि हिंदूंचे रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या ६८ वर्षांत ठोस पावले उचलली असती, तर हिंदूंना असे संघटन करावे लागले नसते !

     आज इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे हस्तक आणि समर्थक गावागावांत सापडत आहेत. काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकवणारे, राजस्थानात इसिस जिंदाबादच्या घोषणा देणारे, तमिळनाडूत इसिसचे टी-शर्ट घालणारे किंवा ठाणे, हैद्राबाद आणि कर्नाटक येथे अटक करण्यात आलेले इसिसचे समर्थक म्हणजे भारतात इसिस पसरत असल्याचा ठळक पुरावा आहेत. भारत शासनाने इसिसवर बंदी घालून इसिसविरोधी वैश्‍विक लढ्यात भारत सहभागी असेल, असे घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतातील इसिसच्या कारवाया रोखणे, हे जसे शासनाचे काम आहे, तसेच ते एक उत्तरदायी नागरिक म्हणून भारतियांचेही कर्तव्य आहे. भविष्यात प्रत्येक रस्त्यावर लढण्याची सिद्धता करणार्‍या इसिसवाद्यांना प्रत्येक रस्त्यावर रोखण्यासाठी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी बलीदान करण्याची क्षमता असणार्‍या युवकांच्या शोधार्थ आम्ही इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ही चळवळ चालू केली आहे. 
- श्री. पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम चोर आहे, तर पोलिसात द्या ! जाळून मारण्याचा हक्क कोणी दिला ?

     १३ जानेवारी २०१६ या दिवशी पुणे येथे बंजारा समाजातील सावन राठोड याला चोर समजून ३ धर्मांधांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळले. उपचाराच्या कालावधीत १४ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला.

अशा पोलिसांवर गुन्हेगारांचे साथीदार म्हणून शासन कारवाई करेल का !

     पुणे येथे बंजारा समाजातील सावन राठोड याला ३ धर्मांधांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. उपचाराच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला. सावनचे अधिवक्ता असलेले नातेवाईक रमेश राठोड यांनी पोलिसांना सावनचा जबाब घेण्यास सांगितले असता ते लगेच आले नाहीतच उलट त्यांनी त्यासाठी नकार दिला.
     महाराष्ट्र हा हिंदूंच्या संतांचा कि पुरोगाम्यांचा आहे ? - श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती 
जोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी ! - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर, जिल्हा सोलापूर
कोणताही ख्रिस्ती असा नाही की, ज्याने बायबल वाचले नसेल. कोणताही मुसलमान असा नाही की, ज्याने कुराण वाचले नसेल आणि एकही हिंदु असा नाही की, ज्याने गीता वाचली असेल ! - चिन्मय मिशनच्या स्वामिनी विमलानंदजी, म्हापसा, गोवा.


धर्मप्रसाराची सेवा करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आलेले अनुभव

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
हरिद्वार कुंभमेळ्याविषयी उत्तराखंड 
येथील धर्मनिरपेक्ष शासनाची उदासीनता !
      हरिद्वार येेथील कुंभमेळा मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर १४.१.२०१६ पासून प्रारंभ झाला. पहिल्या घोषणेनुसार १५.११.२०१५ पासून जागा वाटप होणार होते. त्यासाठी २२.११.२०१५ या दिवशी मी हरिद्वार येथे गेलो होतो. त्या वेळी मेळा कार्यालयात सामसूम होती. अद्याप जागा कह्यात न आल्याने जागा वाटपाची प्रक्रिया चालू नाही, असे मोघम सांगण्यात आले. तेथील अधिकार्‍यांना भेटलो असता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अतिशय थंडी असल्याने लोकांची गर्दी नसते. खर्‍या अर्थाने मार्च-एप्रिल मध्ये मेळा भरेल. आमच्या या मेळ्यात कोणतेही आखाडे किंवा संप्रदाय येत नाहीत. त्यामुळे तेही आकर्षण नसते, असे त्यांनी सांगितले. (प्रत्यक्षात शासन आणि आखाडा परिषद यांमध्ये वाद असल्याने या मेळ्यात कोणतेही आखाडे येत नाहीत, असे एका महंतांनी सांगितले, तसेच आखाडा परिषद आणि शासन यांनी निश्‍चित केलेल्या अर्धकुंभमेळ्याची तिथी अन् वर्ष यांमध्येही एक वर्षाचे अंतर असते, असे एका अधिकार्‍याने सांगितले.)

सत्याला असत्य सिध्द करू पहाणार्‍या पुरोगाम्यांनो, आता तरी शहाणे व्हा !

श्री. शंकर नरुटे
१. सनातन संस्थेवर दोषारोप करणारे पुरोगामी 
(धर्मद्रोही) चित्रपटांतील हिंसाचारावर बंदी 
घालण्याची मागणी करतांना दिसत नाहीत !
       समीर गायकवाड याने क्षात्रधर्म साधना हा ग्रंथ वाचून कॉम्रेड पानसरेंची हत्या केली, अशी अफवा सनातनचे विरोधक असलेले पुरोगामी (धर्मद्रोही) उठवत आहेत. खरेतर चित्रपटांतून अनेक हत्या, दंगली, बलात्कार अशा गोष्टी दाखवल्या जातात. त्यांचा पहाणार्‍यांवर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, याचा विचार का केला जात नाही ? त्यांच्यावर बंदी का आणली जात नाही ?

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

स्वातंत्र्यवीर सावरकर - आरोप आणि वास्तव !

श्री. रणजित सावरकर
     रत्नागिरी येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने... 
       साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. इतिहास संशोधनाच्या नावाखाली लेखक निरंजन टकले यांनी वस्तूस्थितीचा विपर्यास करून एका महान क्रांतीकारकाचा अपमान केला आहे. या लेखातील प्रत्येक सूत्र याआधी अनेकदा खोडून काढले गेले असतांनाही द वीकने एक नवीन संशोधन सादर करण्याच्या आविर्भावात नुराणी आणि शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले निराधार आरोप पुन्हा सादर केले आहेत. त्याचे खंडण या लेखातून करत आहे.
     वर्ष १९०५ मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत वर्ष १९३० पर्यंत काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते. अशा असामान्य धैर्यशाली व्यक्तीवर चिखलफेक करणार्‍या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चार आरोप करण्यात आले आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे 
स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ
१. काही वर्षांपूर्वी विविध नियतकालिकांत यासंदर्भात 
लिहिलेल्या लेखांवर आधारित ग्रंथ संकलित करण्याचा उद्देश
      १९८४ ते १९९० या काळात शारीरिक आणि मानसिक विकारांवर सह्याद्री, लोकप्रभा, सर्वज्ञानी, मुंबई सकाळ, गावकरी, सर्वज्ञानी आदी अनेक नियतकालिकांत आमच्या (डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या) प्रसिद्ध झालेल्या लेखमालांवर हे ग्रंथ आधारित आहे. १९९५ मध्ये मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करणे बंद करून साधना करू लागलो. त्यामुळे या ग्रंथांत पूर्वीचे लेख घेतले आहेत. संमोहन उपचाराच्या पद्धती आणि त्यांचे परिणाम यांसंदर्भात नवीन पद्धती अजून उपलब्ध नाहीत; म्हणून जुनाच मजकूर घेतला आहे. साधनेच्या पद्धती जुन्या होत नाहीत, तसेच हे आहे.

गुन्हेगारांना मोठे स्थान देऊन हिरो करणारी प्रसारमाध्यमे समाजापुढे कोणता आदर्श ठेवणार ?

१. छोटा राजनला पकडल्याचे वृत्त आल्यावर सर्व दूरचित्रवाहिन्यांनी दिवसभर राजनची स्पेशल स्टोरी दाखवणे : इलेक्ट्रॉनिक मिडियावाले डोक्यावर पडलेत कि काय...? हा प्रश्‍न आम्हाला सातत्याने पडतो. त्यांच्याकडे चांगल्या-वाईटाचे तारतम्य राहिलेले दिसत नाही. परवा छोटा राजनला पकडल्याचे वृत्त आले आणि सर्व दूरचित्रवाहिन्यांनी दिवसभर राजनची स्पेशल स्टोरी दाखवणे चालू केले. एबीपी माझासारख्या आघाडीच्या वाहिनीनेही स्पेशल स्टोरी दाखवणे चालू ठेवले होते. विशेष म्हणजे राजनला स्पेशल स्टोरीचा विषय ठरवून सर्व माहिती सांगितली जात होती.

धर्मद्रोह्यांना श्री. बाळासाहेब बानकर यांच्याप्रमाणे उत्तर द्या !

      आमच्या परंपरेला तडा गेला, तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू, असा सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केला आहे. याआधीही तृप्ती देसाई यांनी येथील परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वेळी आम्ही शांततेत त्यांना गावाबाहेर जाऊ दिले. आता पुन्हा आमच्या भावना दुखावल्या गेल्यास शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि इतर सर्व संघटना मिळून त्यांना अतिथी देवो भव या पद्धतीने नाही, तर आमच्या पद्धतीने उत्तर देऊ.
- श्री. बाळासाहेब बानकर, सरपंच, शनिशिंगणापूर

सनातनवर प्रेम असलेले नाशिकचे आमदार श्री. बाळासाहेब सानप !

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीतून प्रवासानुभव !
श्री. चेतन राजहंस
     डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर, रायपूर, देहली आणि मुंबई या भारतातील चार महानगरांमध्ये प्रवास करण्याचा योग आला. या प्रवासाच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने आलेले अनुभव सांगणारे हे सदर...
श्री. बाळासाहेब सानप

      नाशिकचे आमदार श्री. बाळासाहेब सानप यांनी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमध्ये सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याला साहाय्य केल्याचे अनेक साधकांकडून ऐकले होते. नागपूर विधानभवनात त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली. तेथे गेल्यानंतर कळले की, सनातनच्या विधानभवनातील पत्रकारांचे एकत्र भेटण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे सानप साहेबांचे कार्यालय होते. सानप साहेबांना भेटल्यानंतर सनातन संस्थेच्या कार्याविषयी आपुलकीने चौकशी करतांना त्यांनी सनातनचा गोव्यातील आश्रम पहाण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना आश्रमात येण्याविषयी आमंत्रण देतांना नाशिकमधील कुंभमेळ्यात केलेल्या साहाय्याविषयी आभार व्यक्त केले.

मडगाव स्फोटप्रकरणी कारागृहातून निर्दोष सुटलेेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव वाचून आलेले अभिप्राय

      गेल्या काही दिवसांपासून दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होत असलेले सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचनात आले. ते वाचून मनात पुढील विचार आले.
१. कारागृहातील वातावरण नरकासमान असल्याचे वाटणे
      सध्याच्या सर्वच यंत्रणांची कार्यपद्धत कशी आहे ?, ते पहायला मिळाले. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याची पद्धत, निरपराध लोकांनाही शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागणे, यावरून हे सर्व नरकासमान कसे आहे ?, ते लक्षात आले.

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

  • सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
  • विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७

भारताला मित्रराष्ट्र म्हणवणार्‍या अमेरिकेचा धूर्तपणा !

      मुंबईत आतंकवादी आक्रमण होणार, ही माहिती आतंकवादी हेडलीकडून अमेरिकेच्या अन्वेषण अधिकार्‍यांना मिळाली होती, तरीही त्या संदर्भात भारताला व्यवस्थित माहिती देण्याचे टाळून अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आड्रियन लेवी या इंग्रजी लेखकाच्या दी सीज नावाच्या पुस्तकात २६.११.२००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा प्रमुख सूत्रधार डेविड हेडली याच्याविषयी खळबळजनक खुलासा करण्यात आलेला आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेला मुंबईवर आतंकवादी आक्रमण होणार याची संपूर्ण माहिती होती, असे स्वतः हेडलीनेच सांगितले होते.
(संदर्भ : मासिक मेरू, नोव्हेंबर २०१५)

सनातनच्या विविध आश्रमांसाठी स्वयंपाकोपयोगी भांडी उपलब्ध करून देऊन अथवा त्याकरिता धनरूपात साहाय्य करून राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
'सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देऊन सेवा करण्यास इच्छुक साधकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील भांड्यांची तातडीने आवश्यकता आहे.


जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील प्रकारची भांडी उपलब्ध करून देऊ शकतात अथवा त्याकरिता धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उज्जैन कुंभमेळ्यासाठी पुढील साहित्याची विनामूल्य उपलब्धता करून देऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात हातभार लावा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
२२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ पर्व असणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसारासाठी कुंभस्थळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षण देण्यासाठी विविध प्रदर्शनकक्ष लावण्यात येणार आहेत. त्याकरता तंबू उभारण्यासाठी हिरव्या रंगाच्या २,४०० फूट जाळीदार कापडाची (नेटलॉनची) आवश्यकता आहे.
कुंभपर्वाच्या कालावधीत उज्जैन येथे कडक उन्हाळा असल्याने सेवेमध्ये सहभागी होणार्‍या साधकांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्या त्रासाची तीव्रता अल्प व्हावी, यासाठी ओ.आर.एस्. पावडर, नाईसिल पावडर, तसेच डेटॉल यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देऊ शकतात, त्यांनी श्री. निषाद देशमुख यांच्याशी ९८२६७४२८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- (पू.) कु. स्वाती खाडये (२९.१.२०१६)

सनातन प्रभातच्या वार्ताहर सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना सूचना
गेल्या १६ वर्षांपासून धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत असलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. प्रारंभी दैनिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या ४ होती. आता ही पृष्ठसंख्या प्रतिदिन ८ आणि रविवार १० अशी झाली आहे. आगामी काळात ही पृष्ठसंख्या आणखी वाढणार आहे. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांचे प्रमाण सर्वत्रच दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व वार्ता वेळोवेळी सनातन प्रभात नियतकालिकांमधून प्रसिद्ध होण्यासाठी वार्ताहर साधकांची आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडी आपल्या भागात घडत असतील, तर त्या घडामोडींचे वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखित स्वरूपात पाठवणे, ही आपली साधना आहे. जे साधक वार्ताहर सेवा शिकण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून नजिकच्या दैनिक कार्यालयात पाठवावीत. साधकांची नावे प्राप्त झाल्यानंतर वार्ताहर सेवेविषयीचे प्रशिक्षण देण्याविषयी कळवण्यात येईल.
स्थानिक संपर्क : ९४०४९५६०८७
इ-मेल : panveldainik@gmail.com
भेदभाव विसरून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करा ! - प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

सरवली ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्ववाद्यांचा हुंकार !
डावीकडून सौ. सुनीता पाटील, श्री. विक्रम भावे आणि श्री. प्रसाद वडके
     सरवली (भिवंडी) - सध्या केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. धर्मांतर केल्यावर कुणी काही बोलत नाही; पण घरवापसी केल्यावरच ओरड चालू होते. असे का ? आपण सर्वांनी भेदभाव विसरून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. २९ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे उपस्थित होते. या सभेला ह.भ.प. चिंतामणी महाराज, दिंडीगड, भिवंडी तसेच दयानंद महाराज गिरी, कानिफनाथ मंदिर, भादवाड या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.

प्रवक्ता आणि पत्रकार यांच्यातील भेद वडिलकीच्या नात्याने सांगणारे शिवसेना नेते दिवाकर रावते !

  
श्री. दिवाकर रावते
    नागपूर येथील विधानभवनात राज्याचे परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते माननीय श्री. दिवाकर रावते यांना भेटण्याचा योग आला. सनातनवर प्रेम असल्याने त्यांनी सनातन प्रभातचे मंत्रालयातील वार्ताहर श्री. अरविंद पानसरे आणि मला चहापानासाठी बसवले. बोलण्याच्या ओघात श्री. अरविंद पानसरे यांनी हिंदुत्वनिष्ठ शासन असूनही सनातनच्या साधकांचा छळ का केला जात आहे ?, असा प्रश्‍न विचारला. संवाद साधतांना मीही श्री. पानसरे यांची री ओढली. तेव्हा रावते यांनी मला सूचकपणे थांबवले आणि म्हणाले, मी तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगतो, तुम्ही प्रवक्ता आहात. प्रवक्त्यासारखे बोलले पाहिजे. अरविंद पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकारासारखा प्रश्‍न विचारला तर चालते. हेच सूत्र आम्हाला सुलभपणे समजावे, यासाठी त्यांनी राजकारण्यांशी बोलतांना पत्रकार आणि प्रवक्ता यांनी कोणती पथ्ये पाळावीत, हे पुढील शब्दांत सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली आध्यात्मिक उपायांसाठीची खोक्यांची उपयुक्तता अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      एखादी व्यक्ती शारीरिक स्वच्छतेविषयी ज्याप्रमाणे सजग असते, त्याप्रमाणे तिने स्वतःच्या आध्यात्मिक स्तरावरील स्वच्छतेविषयीही, म्हणजे स्वतःभोवतीची आणि स्वतःतील त्रासदायक स्पंदने दूर करण्याविषयी सजग असायला हवे. दैनंदिन जीवनात विविध आध्यात्मिक कारणांमुळे सर्वसाधारण व्यक्तीभोवती त्रासदायक स्पंदने निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या स्वतःच्या, तसेच तिच्या संपर्कातील इतरांच्याही शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो. व्यक्तीभोवतीची त्रासदायक स्पंदने दूर करण्यासाठी (आध्यात्मिक उपायांसाठी) रिकाम्या खोक्यांचा वापर करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितली आहे. या पद्धतीची उपयुक्तता जाणण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

हिंदु धर्मजागृती सभेच्या दोन दिवस आधी कडाक्याची थंडी पडणे; मात्र धर्मजागृती सभेच्या वेळी मैदानात थंडी नसल्याने २५ सहस्र हिंदूंची उपस्थिती लाभून श्रीकृष्णाची अद्भुत लीला अनुभवता येणे

कु. प्रतीक्षा कोरगावकर
     २७.१२.२०१५ या दिवशी जळगाव येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या २ दिवस आधी तेथील तापमान ७ - ८ अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत खाली आले होते. त्यामुळे येथे पुष्कळ थंडी पडली होती. सायंकाळी वातावरणात पुष्कळ गारवा असायचा; मात्र सभेच्या वेळी शिवतीर्थ मैदानावर मुळीच थंडी नव्हती. त्यामुळे श्रीकृष्णकृपेने धर्मजागृती सभेला २५ सहस्र इतक्या मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित राहिले. धर्मजागृती सभा संपल्यानंतर रात्री पुन्हा थंडीचे प्रमाण पूर्वीप्रमाणे वाढले. धर्मजागृती सभेला हिंदूंची उपस्थिती राहून त्यांच्यात धर्मजागृती व्हावी आणि धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पाडावी; म्हणून देवानेच त्या काळात थंडी न्यून केली केली, असे जाणवले. - कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव (२९.१२.२०१५)

बलात्कारित युवतीच्या बाजूने आंदोलन करणार्‍या चित्रपट कलाकारांना फलकाद्वारे अंतर्मुख करणारे आणि पीडित तरुणीसंदर्भात संवेदनशीलता बाळगून कृतीशील होणारे पुणे येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. अरविंद देसाई !

श्री. अरविंद देसाई
     डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या निर्भयावरील बलात्काराच्या अमानुष प्रकरणाने देशभरचे वातावरण ढवळून निघाले. निर्भयावर ओढवलेल्या प्रसंगाच्या संदर्भात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. २९ डिसेंबर २०१२ या दिवशी निर्भयाच्या मृत्यूनंतर मुंबई येथे चित्रपट कलाकारांनी मूकमोर्चा काढण्याचे ठरवले होते. त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्या वेळी सध्या पुणे येथे असणारे दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. अरविंद देसाई आणि त्यांचा धाकटा मुलगा श्री. तेजस देसाई हे मुंबई येथे होते. त्यांनी या मूकमोर्च्याचे औचित्य साधून स्वयंप्रेरणेने ख्रिस्ती नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर या दिवशी होणारी चित्रपट कलाकारांची मेजवानी रहित करण्यासाठी, किमान त्या दृष्टीने कलाकारांची विचारप्रक्रिया तरी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले; कारण एकीकडे बलात्कारित युवती आणि तिचे कुटुंबीय यांच्यासाठी सहानुभूती दर्शवतांना दुसरीकडे दोनच दिवसांत चित्रपट कलाकारांनी मौजमजा करत मेजवानी करणे, हा विरोधाभास देसाई यांना खटकत होता. जेथून मोर्चा निघणार होता, त्या ठिकाणी श्री. देसाई पोहोचले. त्यांनी कलाकारांना अंतर्मुख करणारी माहिती असलेला प्रबोधनात्मक फलक हातात धरला होता. त्या फलकावर लिहिलेल्या माहितीचा आशय असा होता, हा प्रसंग माझ्या मुलीवरच ओढवला आहे, असे मला वाटते. मी ३१ डिसेंबरची मेजवानी साजरी करणार नाही. तुम्ही काय करणार ? हा फलक पाहून अनेक कलाकारांनी या विचारांना सहमती दर्शवली, तर काही कलाकारांनी त्यांच्या हावभावातून असंतोष व्यक्त केला. (मेजवानी रहित करण्याविषयी अप्रसन्नता दर्शवणार्‍या कलाकारांनी गाळलेले निर्भयासाठीचे अश्रू हे नक्राश्रूच म्हणावे लागतील ! - संपादक)

प.पू. गुरुदेवांनी दिलेल्या विचारामुळे ख्रिस्ती मिशनर्‍याला सडेतोड उत्तर देता येणे

श्री. व्यंकटेश अय्यंगार
      मी आगगाडीने बेंगळुरू ते मंगळुरू असा प्रवास करत होतो. त्या वेळी एका ख्रिस्ती मिशनर्‍याने माझ्याशी संवाद साधला.
मिशनरी : हिंदु लोक पुष्कळ स्वार्थी असतात. ते देवाकडे मी तुला हार, नारळ आणि पैसे अर्पण करतो. माझ्या मुलीला चांगले स्थळ मिळू दे. माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू दे, अशा मागण्या करत असतात.
मी : तुम्ही मिशनरी होण्यापूर्वी काय करत होतात ?
मिशनरी : मी पंजाबी हिंदु होतो. मला अनेक अडचणी (समस्या) होत्या. मी धर्मांतर केल्यानंतर माझ्या सगळ्या समस्या दूर झाल्या.
मी : म्हणजे तुम्ही स्वार्थासाठीच धर्मांतर केले ना ? आम्ही लोक देवाकडे लहानशी मागणी करतो, ती पूर्ण झाली तर ठीक, नाही झाली तर पुन्हा मागणी करतो; पण आमच्या समस्या सुटाव्यात; म्हणून आम्ही आमचा धर्म सोडत नाही. (मी असे म्हणताच त्याचा तोंडवळा लाल झाला. मी संवाद थांबावा या दृष्टीने त्याला म्हणालो) या जगात तुम्ही एका तरी राष्ट्राचे नाव सांगा, ज्या राष्ट्राने प्रत्येक तत्त्वज्ञान, संप्रदाय, ख्रिश्‍चन आणि इस्लाम यांना सहन केले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पुुरुषांनो, स्त्रियांचे जीवन किती कठीण असते, हे लक्षात घेऊन स्त्रियांना सर्वतोपरी साहाय्य करा !

      
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे जीवन किती कठीण असते, याची कल्पना पुरुषांना नसते.
१. जीवनातील अवस्था
१ अ. लहानपण : ९ - १० वर्षांचे वय झाले की, त्यांना आई-बाबांचे घर हे आपले घर नाही. आपल्याला हे घर कधी ना कधी सोडून जावेच लागणार आहे, याची जाणीव व्हायला लागते. लहान बहीण-भावांचे भांडण झाले की, भाऊ बहिणीला चिडवतो, हे माझे घर आहे. तू जा.
१ आ. सासरचे जीवन : पुरुषी अहंकारामुळे पत्नीला आयुष्यभर पतीचे ऐकावे लागते.
१ इ. वृद्धावस्था : पतीच्या मृत्यूपर्यंत पत्नी त्याचे सर्वकाही करते; पण तिला स्वतःला वृद्धापकाळामुळे स्वतःच्या दैनंदिन कृती करता येईनाशा झाल्या की, तिच्याकडे मुलगा, सून इत्यादी कोणी लक्ष देत नाही. काही जण तिला वृद्धाश्रमात ठेवतात. त्यामुळे तिचे शेवटचे आयुष्य दुःखातच जाते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांकडून मिळवायच्या गोष्टी
देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : 'देण्यासाठी आमच्याकडे काही नाही' मधील 'काही' शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. 'सर्वकाही घेऊ शकतो' मधील 'सर्वकाही' अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)
आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे गुन्हा करावा, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कोणी गुन्हा करत नाही. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निरर्थक लोकशाही !
लोकशाहीत कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन उपाय करत नाहीत, तर वरवरचे उपाय करतात आणि तेही भ्रष्टाचारामुळे बहुतेक वेळा निरर्थक ठरतात, उदा. एखाद्या गुन्हेगाराचा गुन्हा उघडकीस आला की, त्याला पकडतात. नंतर वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया चालते आणि शेवटी त्याला शिक्षा केली जाते. कारागृहातून बाहेर आल्यावर त्याचा स्वभाव पालटलेला नसल्यामुळे तो पुनःपुन्हा गुन्हे करतो. गुन्हेगाराला गुन्हा करण्याची बुद्धी होऊ नये; म्हणून काहीही शिकवले जात नसल्याने सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी राष्ट्रप्रेम जागवणार्‍या कृती करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

अरुणाचलचे अराजक !

संपादकीय
     अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारीच केंद्रानेही सर्वोच्च न्यायालयात त्याला पुष्टी देणारे उत्तर सादर केले आहे. राजखोवा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातील अनेक कारणांपैकी एक कारण राज्यात राजरोसपणे होणार्‍या गोहत्या हेही आहे, हे विशेष ! यासह राज्यपाल राजखोवा यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. याविषयी न्यायालयानेही परिस्थिती गंभीर आहे, अशी टीपणी केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn