Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पू. सीताबाई मराठे (गोवा) यांची आज पुण्यतिथीप्रतिदिन उघडपणे होणार्‍या गोहत्यांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट ! - राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी शिफारस करतांना म्हटल्याचे उघड

देशाच्या इतिहासातील पहिली घटना ! अरुणाचल प्रदेशचे 
राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांचे अभिनंदन !
आता अशा प्रकारचा निर्णय काश्मीर ते तमिळनाडू आणि गुजरात
 ते मणीपूरपर्यंत घेण्यात यावा, अशी मागणी हिंदूंनी करावी !
     नवी देहली - अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरून वाद चालू आहे. अशा वेळी राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी गोहत्यांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. येथे प्रतिदिन उघडपणे गोहत्या होत आहेत, असे राज्यपालांनी त्यांच्या शिफारसपत्रात नमूद केले आहे.

शनी देव नसून ग्रह असल्यामुळे महिलांनी त्याची पूजा करू नये ! - द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     मुंबई - महिलांनी शनीच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी भांडण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी शनीची पूजाच करायला नको, पूजा ईश्‍वराची होते, ग्रहाची नाही, त्यामुळे शनीची पूजा करण्याऐवजी त्याच्यापासून दूर रहायला हवे, असे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

(म्हणे) महंत आणि पुजारी यांनाही महिलांनीच जन्माला घातले आहे !

बसपच्या नेत्या मायावती यांचे अभ्यासहीन वक्तव्य
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - शनिशिंगणापूर येथील मंदिराच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी निघालेल्या महिलांना रोखण्यात आले. त्याविषयी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी टीका केली आहे. जे महंत आणि पुजारी महिलांना मंदिरात जाण्यापासून अडवत आहेत, त्यांनाही महिलांनीच जन्माला घातले आहे, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असे वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलतांना केलेे. मायावती पुढे म्हणाल्या, आजही दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणाची समिक्षा करण्याची गोष्ट करून दलितांवर मोठा आघात केला आहे. हे सर्व आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र आहे. (देशात कोणत्याच मंदिरात दलितांविषयी भेदभाव करण्यात येत नसतांना केवळ सत्ता मिळवण्यासाठी हिंदूंमध्ये सवर्ण आणि दलित अशी फूट पाडणार्‍या राजकारण्यांपासून जनतेने सावध रहावे ! - संपादक)

शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथा मोडीत काढण्याच्या काँग्रेसच्या षड्यंत्राला बळी पडू नका ! - हिंदु जनजागृती समिती

     मुंबई - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचे दर्शन घेण्यात देवस्थानने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केलेला नाही. सर्वांनी चौथर्‍याच्या खालूनच श्री शनिदेवाचे दर्शन घ्यावे, असा नियम मंदिर विश्‍वस्तांनी पूर्वीपासूनच केला आहे. या प्रकरणी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा अट्टाहास करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वर्ष २०१२ मध्ये पुणे महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. तृप्ती देसाई यांना २६ जानेवारी २०१६ या दिवशी पोलिसांनी कह्यात घेतल्यावर बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जयघोष केला होता. देसाई यांच्या फेसबूकवर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे सत्कार केल्याची छायाचित्रे आहेत. या अकाऊंटवर देसाई यांची आपच्या कार्यक्रमांतीलही छायाचित्रे आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई या भाविक नसून स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्या अशा प्रकारच्या मोहिमा काढून हिंदु धर्मविरोधी भूमिका घेत आहेत. शनिशिंगणापूर आंदोलनाविषयी त्यांनी सर्वांना फसवले; मात्र आता त्यांचा राजकीय चेहरा आणि हेतू उघड झाला आहे. तृप्ती देसाई यांनी हे आंदोलन राजकीय हितसंबंधांतूनच उभे केले आहे.

पाकमध्ये तिरंगा फडकवणार्‍या भारतीय क्रिकेटपटूच्या समर्थकास होऊ शकते १० वर्षांची शिक्षा

     लाहोर - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा समर्थक उमर दराझने घरावर तिरंगा फडकावल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विराट कोहलीमुळे भारताला विजय मिळवता आला होता. या विजयानंतर उमर दराझ या कोहलीच्या समर्थकाने त्याच्या घराच्या छतावर जाऊन भारताचा झेंडा फडकावत आनंद साजरा केला होता. याविषयीची तक्रार देण्यात आल्यानंतर उमरला अटक करण्यात आली होती. (इस्लामिक स्टेट, लश्कर-ए-तोयबा आदि जिहादी आतंकवादी संघटनांचा तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज देशभरात फडकवण्यात येतो. पाकिस्तानच्या एखाद्या विजयावर भारतात फटाके फोडले जातात; परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. दुसरीकडे मात्र पाकिस्तानात भारताचा राष्ट्रध्वज फडकवणार्‍याला त्वरित कारागृहात डांबले जाते. भारत पाकिस्तानकडून देशप्रेम शिकेल का ? - संपादक)

स्वयंभू मूर्तीचे पावित्र टिकवून ठेवण्यासाठी सेवेकर्‍यांव्यतिरिक्त शनिचौथर्‍यावर कोणालाच प्रवेश नको ! - महंत नरेंद्र गिरी महाराज, अध्यक्ष, आखाडा परिषद यांचा खुलासा

      शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर शनिदेवाची स्वयंभू शिळा आहे. या ठिकाणचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी या शिळेला स्पर्श करण्याची अनुमती सेवेकर्‍याव्यतिरिक्त अन्य कुणालाही देता कामा नये. कुठल्याही देवतेच्या मूर्तीसंदर्भात आणि मंदिरातील गर्भगृहातील प्रवेशासंदर्भात हाच नियम योग्य आहे. यात महिला आणि पुरुष, अशा भेदभावाचा प्रश्‍नच नाही. मी उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज (अलाहाबाद) येथे आहे. या ठिकाणी काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आले. त्यांनी मला चौथर्‍यावरील प्रवेशाविषयी न विचारता मंदिरात महिलांना प्रवेशाविषयी चुकीचा प्रश्‍न विचारला आणि त्याविषयीचे माझे सरळ वक्तव्य शनिशिंगणापूरच्या प्रकरणाशी जोडून चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (यावरून वृत्तवाहिन्यांची भामटेगिरी आणि पाट्याटाकू वृत्ती दिसून येते. अशा वृत्तवाहिन्यांवर किती विश्‍वास ठेवायचा ते आता जनतेनेचे ठरवावे ! - संपादक)

चर्चा करू; पण ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांशी तडजोड केली जाणार नाही !

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टची धर्मरक्षणार्थ ठाम आणि स्तुत्य भूमिका !
     श्री क्षेत्र शनिशिंगणापूर - श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रश्‍न मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ जानेवारी या दिवशी केले होते. यासंबंधी श्री शनैश्‍वर देवस्थानचे कोषाध्यक्ष श्री. योगेश बानकर यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांचे अधिकृत पत्र देवस्थानला प्राप्त झालेले नाही. त्यांचे पत्र मिळाल्यानंतर ग्रामस्थांशी बोलून भूमाता ब्रिगेडशी चर्चा करण्यात येईल. या चर्चेला मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, देवस्थानचे विश्‍वस्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सुरक्षारक्षक आदी सर्वजण उपस्थित रहातील. श्री शनिमंदिरासमवेत ग्रामस्थांच्या धार्मिक भावना जोडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना न दुखावता यातून मार्ग काढण्याच्या विषयावरच चर्चा केली जाईल. ही चर्चा करतांना ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांशी तडजोड केली जाणार नाही.

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस 
ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाने केले असते का ? हिंदूंनो,
 तुमच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संकेतस्थळावर बहिष्कार घाला !
     मुंबई - ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन केले आहे. साधूंच्या वेषात विक्री करणार्‍या एका व्यक्तीला बीभत्स हालचाल करतांना आणि अश्‍लाघ्य संवाद करतांना दाखवले आहे. या विज्ञापनामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत. (हिंदूंनो, संघटितपणे आणि संयत मार्गाने या संकेतस्थळाला विरोध करा, तसेच अन्य धर्मियांप्रमाणे तुमच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या ! - संपादक)

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटामध्ये ७ पोलीस कर्मचारी हुतात्मा !

४५ वर्षांनंतरही नक्षलवाद संपवू न शकणारी लोकशाही !
     पलामू (झारखंड) - येथील छत्तरपूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटामध्ये सात पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले, तर सहा पोलीस घायाळ झाले आहेत. नक्षलवाद्यांनी रस्त्यावर भूसुरुंग पेरून ठेवले होते. पोलीस कर्मचारी गाडीतून जात असतांना हा स्फोट घडवून आणण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकारी एम्.एस्. भाटीया यांनी दिली.

कुरुक्षेत्र येथे ९० वर्षीय महंत जमना दास आणि त्यांच्या मुलीची हत्या

     कुरुक्षेत्र - हरियाणातील कुरुक्षेत्रातील ज्योतिसर येथे सीता-राम मठाचे महंत जमना दास आणि त्यांची ३५ वर्षीय दत्तक मुलगी राजेंद्र कौर उर्फ सोनिया उर्फ देवा यांची हत्या करण्यात आली आहे. मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आली, तर महंतांच्या डोक्यावर मारहाणीच्या जखमा आहेत. दोघांची शव नग्न स्थितीत आढळून आली आहेत. खोलीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते, त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

ईदच्या किती मिरवणुकांवर कारवाई केली ? - उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्‍न

आतापर्यंत केवळ हिंदूंच्या मिरवणुकांवर बडगा उगारणार्‍या
 पोलिसांचे आता खरे स्वरूप उघड होईल !
     पुणे - प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात गुन्हे प्रविष्ट केले जातात; परंतु ईद-ए-मिलादला हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर काय कारवाई केली, याचा तपशील आतापर्यंत पोलीस किंवा प्रशासन यांच्याकडून उघड होत नव्हता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात डॉ. महेश बेडेकर यांनी राज्य शासनाविरुद्ध जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
     याचिकेच्या सुनावणीच्या कालावधीत वर्ष २०१५ चा गणेशोत्सव आणि २४ डिसेंबर २०१५ या दिवशी हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुका यांवर ध्वनीप्रदूषण कायद्यांतर्गत किती नोटिसा बजावण्यात आल्या, तसेच त्या नोटिसा बजावलेल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल उच्च न्यायालयाने पोलिसांकडून मागवला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयानेच पोलिसांना फटकारल्याने शासनाने आता परिपत्रक काढून ही माहिती मागवली आहे.

इसिसकडून मुंबईतील मालवणी भागातील धर्मांध तरुणांना बॉम्ब बनवण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण !

  • मागास आणि अशिक्षित असल्याने मुसलमान आतंकवादाकडे वळतात, असे म्हणणार्‍या धर्मनिरपेक्षतावाद्यांना चपराक !
  • इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी धर्मसेना स्थापन करून स्वसंरक्षण प्रशिक्षण चालू केल्यावर ओरड करणारे आता काही बोलतील का ?
     मुंबई - इसिसच्या जिहादी आतंकवाद्यांनी आता तिथेच शिका, तिथेच उडवा हे धोरण हाती घेतले आहे, अशी माहिती मिळाली आहे. मालवणीतून बेपत्ता झालेल्या धर्माध युवकांना बॉम्ब बनवण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. आतंकवादविरोधी पथकाने उत्तरप्रदेशात पकडलेल्या खालीद ऊर्फ रिझवान अली याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. 
१. खालीद हा इस्लामिक स्टेच्या भारतातील आमीर-उल तवाहीद फी बिलाल ए हिंद या संघटनेचा सेकंड कमांडर असून मालवणीतील तरुणांना तो दोनदा भेटल्याचे समोर आले आहे.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

काँग्रेसच्या नगरसेविका आयेशा नायकवडी यांचा जातीचा दाखला अवैध !

     सांगली, २८ जानेवारी (वार्ता.) - माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मिरज येथील नगरसेविका आयेशा नायकवडी यांचा जातीचा दाखला अवैध ठरला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने विभागीय जात पडताळणी समितीने हा निकाल दिला आहे. यामुळे आयेशा नायकवडी यांचे पद आता धोक्यात आले आहे. या प्रकरणी साजिद अली पठाण यांनी अपील केले होते. (जातीचा दाखला अवैध ठरल्याने पुढे जर न्यायालयाने आयेशा नायकवडी यांचे नगरसेवकपद रहित केले, तर या निवडणुकीवर झालेला भुर्दंड प्रशासन कोणाकडून वसूल करणार आहे ? तसेच या प्रभागात फेरनिवडणूक लागल्यास त्याचा भुर्दंड नागरिकांवर का ? - संपादक) 

मानवकल्याणासाठी सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! - स्वामी श्री सुकचरानन्दजी, शिवसेना, उत्तर प्रदेश

स्वामी श्री सुकचरानन्दजी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट ! 
स्वामी श्री सुकचरानन्दजी यांना ग्रंथ भेट देतांना
श्री. शिवाजी वटकर (डावीकडे), समवेत श्री. वाल्मिकी (उजवीकडे)

     देवद (पनवेल), २८ जानेवारी (वार्ता.) - हिंदु धर्मावरील आघात रोखून सनातन संस्था सनातन हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. मानवकल्याणासाठी होत असलेले हे कार्य प्रशंसनीय आहे. हिंदु धर्मरक्षणाचे कार्य वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये सनातन संस्थेला सहकार्य करू. आश्रमात एवढे साधक आणि कार्य होत असतांनाही येथे पुष्कळ शांतता आहे, हे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर प्रदेश येथील उपप्रमुख स्वामी श्री सुकचरानन्दजी यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमाला २७ जानेवारी या दिवशी भेट दिल्याच्या प्रसंगी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी आश्रमात केल्या जाणार्‍या सेवांविषयी त्यांना अवगत केले. 

ऋषीमुनींच्या तपःसामर्थ्यामुळे हिंदु संस्कृती वैभवाला जाईल ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

    पुणे - जगात आतापर्यंत ४६ संस्कृतींचा अस्त झाला; पण केवळ हिंदु संस्कृती टिकून राहिली आहे. हिंदु संस्कृती पुन्हा वैभवाच्या शिखराला जाईल. हे सर्व ऋषी आणि संत यांच्या तपःसामर्थ्यामुळे होईल; पण आपण त्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. २६ जानेवारी या दिवशी आकुर्डी येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉनच्या) मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या प्रेरणा समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. ८०० हून अधिक युवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इस्कॉनचे श्री. गोविंदप्रभु यांनी प्रास्ताविक केले.

(म्हणे) काही हिंदु संघटनांचे वर्तन मुसलमान कट्टरवाद्यांसारखे !

मुसलमान कट्टरवाद्यांविषयी कधीही तोंड न उघडणारे गीतकार जावेद अख्तर यांची बडबड
      कोलकाता - देशातील काही हिंदु संघटना आता मुसलमान कट्टरवाद्यांप्रमाणे वागत आहेत; त्यांचा अपवाद वगळता भारतीय समाज सहिष्णुच आहे, असे मत गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी मांडले. शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका साहित्यिक कार्यक्रमात अख्तर बोलत होते. (हिंदूंनो, जावेद अख्तर यांनी यापूर्वी मुसलमान कट्टरतावाद्यांविषयी कधी असे विधान केले नव्हते, हे लक्षात घ्या ! अजूनही ते काश्मीरमधून विस्थापित झालेल्या साडेचार लाख हिंदूंविषयी बोलत नाहीत. मात्र अख्तर यांनी त्यांच्या विधानातून हे मान्य केले आहे की भारतीय म्हणजेच हिंदु समाज सहिष्णु आहे. परंतु अख्तर त्यांच्या धर्मियांविषयी असे म्हणू शकतात का ? - संपादक)

समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज नाकारला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
  • पुढील सुनावणी ९ फेब्रुवारीला 
  • जलदगती न्यायालयात खटल्याची त्वरित सुनावणी चालू करण्याची अधिवक्ता समीर पटवर्धन यांची मागणी! 
     कोल्हापूर, २८ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी आणि सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज २८ जानेवारीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी फेटाळून लावला. यानंतर श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि श्री. आनंद देशपांडे यांनी न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. यामध्ये त्यांनी श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करून जलदगती न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीस त्वरित प्रारंभ करावा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात शासकीय पक्षाने म्हणणे मांडावे, असा आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी दिला. 

कोणताही अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

शनिशिंगणापूर येथील शनिचौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याविषयीचे प्रकरण 
     संभाजीनगर, २८ जानेवारी - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी महिलांना बंदी आहे. ती बंदी उठवण्यात यावी, या आशयाची याचिका डॉ. वसुधा पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठामध्ये प्रविष्ट केली आहे. त्या याचिकेत म्हटले आहे की, महिलांना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणे, अभिषेक करणे आदी गोष्टी या कायद्याच्या आधाराने करता याव्यात. या याचिकेच्या सुनावणीवर न्यायमूर्ती आर्.एम्. बोर्डे आणि न्यायमूर्ती ए.आय.एस्. चिमा यांच्या खंडपिठाने या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे.

सिंबायोसिस विद्यापिठाचे संकेतस्थळ हॅक करून अरेबिक भाषेत इलेक्ट्रॉनिक युद्धाची धमकी

अशा घटना म्हणजे देशात सायबर सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचेच द्योतक !
     पुणे - येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावर २५ जानेवारीच्या मध्यरात्री १२.३० नंतर अरेबिक भाषेत इलेक्ट्रोनिक युद्धाची धमकी देण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षेसंदर्भात व्यापक स्तरावर जनजागृती करणे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व मार्गांचा अवलंब करणे आवश्यक ! - संपादक)

(म्हणे) मुसलमानांना मारण्यासाठीच धर्मसेनेची स्थापना करण्यात आली आहे !

१५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला झाल्यास २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना संपवून टाकतील, 
अशी गरळओक करणार्‍या अकबरुद्दीन ओवैसी यांना अन्य संघटनांवर आक्षेप घेण्याचा नैतिक 
अधिकार तरी आहे का ?
हिंदूंचे प्रभावी संघटन पाहून धडकी भरलेल्या एम्आयएम्चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा कंठशोष
      भाग्यनगर (हैद्राबाद) - इसिसच्या विरोधात लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली हिंदूंची धर्मसेना ही प्रत्यक्षात मुसलमानांना मारण्यासाठीच बनवण्यात आली आहे, असे विधान एम्आयएम् या पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. (उत्तरप्रदेशमध्ये हिंदु स्वाभिमान संघटनेकडून इसिसच्या विरोधात लढण्यासाठी धर्मसेनेची स्थापना करण्यात आली आहे. धर्मसेनेची उद्दिष्टे आणि ध्येयधोरणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. यात कुठेही देशातील मुसलमानांच्या विरोधात कृती करण्याचा उल्लेखही नाही. तरीही अशी विधाने करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करायची आणि देशातील मुसलमानांचा कैवार आणण्याची भूमिका घेत त्यांची मते मिळवायची, हाच कुटील डाव ओवैसी यांच्या विधानामागे असल्याचे स्पष्ट होते. - संपादक)

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा ओडिशा राज्यात शुभारंभ !

डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. मुरली मनोहर शर्मा, श्री. अनिल धीर आणि श्री. जितेंद्र गुप्ता
      भुवनेश्‍वर - हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट मोहिमेचा शुभारंभ ओडिशा राज्यात पार पडल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २७ जानेवारीला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय समन्वयक श्री. मुरली मनोहर शर्मा, राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर आणि राज्य उपप्रमुख श्री. जितेंद्र गुप्ता उपस्थित होते.

शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबई दौरा रहित !

हिंदूंनो, शिवसेनेसारखा धाक संपूर्ण देशभरात निर्माण करण्यासाठी संघटित व्हा ! 
     मुंबई - शिवसेनेच्या विरोधामुळे चित्रपट दिग्दर्शक शोएब इल्यासी यांनी गुलाम अली कार्यक्रम रहित केला आहे. शोएब इल्यासी यांच्या 'घर वापसी' या हिंदी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम २९ जानेवारी या दिवशी अंधेरी येथे आयोजित करण्यात आला होता. (पाकिस्तान्यांना कार्यक्रमासाठी बोलावणार्‍या शोएब इल्यासी यांच्या चित्रपटांवर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य ते काय ! - संपादक) या सोहळ्यासाठी गुलाम अली अंधेरी येथील 'द कल्ब'मध्ये येणार होते. पाकिस्तानी गायक आणि खेळाडूंना आम्ही येथे पाय ठेवू देणार नाही, असे झाल्यास आयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागेल, असे शिवसेना चित्रपट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले होते. त्यानंतर इल्यासी यांनी कार्यक्रम रहित केला.

येत्या शैक्षणिक वर्षापासून छत्रपति शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी नवे पुस्तक

छत्रपति शिवाजी महाराजांचा राष्ट्र आणि धर्म यांविषयी
 प्रखर अभिमान शिकवणारे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, 
ही काळाची आवश्यकता जाणून शासनाने त्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! 
     पुणे, २८ जानेवारी - पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत केला पाहिजे. इयत्ता ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपति शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यांची, पराक्रमाची ओळख आहे. ती आवश्यकच आहे. त्याचसमवेत महाराज 'व्यवस्थापन गुरु' आणि 'कुशल प्रशासक' होते, त्याचीही ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ४ थीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पालट करण्यात आला आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याची ओळख करून देणारी ८ पाने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. (छत्रपति शिवाजी महाराज यांच्या विषयीच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात अधिक प्रमाणात समावेश करणार्‍या भाजपचे श्री. तावडे यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामुळे त्यांच्यातील 'व्यवस्थापन गुरु' याची ओळख या पुस्तकातून होईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून श्री. शशिधर जोशी, श्री. सुनील घनवट, ह.भ.प. धोंगडे महाराज आणि अन्य पत्रकार
     नाशिक - राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांची जाणीव व्हावी, तसेच त्यावर उपाय म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जानेवारीला विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मजागृती सभेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्र-धर्म प्रेम आणि अभिमान रुजवणे आवश्यक आहे. राष्ट्र-धर्म कर्तव्य म्हणून सर्वांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. सभेच्या निमित्ताने येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. धोंगडे महाराज, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. शशिधर जोशी उपस्थित होते. 

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

     
  यवतमाळ - येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य नागरिक यांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी रस्त्यात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी राष्ट्रध्वज सन्मान पेटी ठेवण्यात आली होती. समितीच्या आवाहनावरून नागरिक रस्त्यात पडलेले ध्वज त्यात टाकत होते.

राजस्थानात वायूसेनेने पाडलेला फुगा पाकिस्तानचा ! - संरक्षणमंत्री पर्रीकर

फुग्यांनाही घुसखोरी करण्यापासून रोखू न शकणारा भारत !
      जयपूर - राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात २६ जानेवारीला एक संशयास्पद फुगा (बलून) उडतांना आढळून आला होता. वायूसेनेच्या विमानाने या फुग्याला नष्ट केले होते. देहलीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळही २७ जानेवारीला एक संशयास्पद फुगा आढळला होता. २६ जानेवारीला पाडलेल्या संशयास्पद फुग्याविषयी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, हे फुगे पाकिस्तानातून आले होते. (असे फुगे पाठवणार्‍या पाकिस्तानला कधी आणि कसा धडा शिकवणार हेही शासनाने जनतेला सांगणे अपेक्षित आहे ! - संपादक)

अमेरिकेत दाढी आणि पेहराव यांवरून मुसलमानास मारहाण

अमेरिकेत इसिसच्या विरोधात किती संताप आहे, हे या घटनेवरून लक्षात येते. 
भारतात असे कधी घडत नाही, तरीही असहिष्णुतेचा कांगावा करत हिंदूंची अपकीर्ती केली जाते !
     न्यूयॉर्क - दाढी आणि पेहराव यांवरून येथील नागरिकांनी बांगलादेशी निवासी मुजिबूर रहमान यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील या वृत्तानुसार न्यूयॉर्कमध्ये मुजिबूर मार्गाने जात असतांना त्यांच्याकडे पाहून तेथील नागरिक इसिसच्या विरोधात घोषणा देऊ लागले. त्यानंतर त्यांनी मुजिबूर यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोके आणि तोंडवळा यांना मार लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले. 

यात्रेत सहभागी होणारे हिंदू विश्‍वासाठी प्रार्थना करणार!

महाशिवरात्रीनिमित्त दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये यात्रेचे आयोजन 
      जोहान्सबर्ग (दक्षिण अफ्रिका) - महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिंदु समन्वय परिषदेच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी येथील लॅनसिया भागातून एक यात्रा काढण्यात येणार आहे. जवळपास ८ किलोमीटर चालणार्‍या या २४ व्या यात्रेत विविध प्रकारचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. शेवटी विश्‍वाच्या कल्याणाकरता प्रार्थना करण्यात येणार आहे.

आर्थिक गुन्हे करणार्‍यांवर कडक कारवाई आवश्यक ! - डॉ. रणजीत पाटील

     मुंबई - गुंतवणूकदारांच्या ठेवी बुडवणार्‍या संस्थांवर वचक बसावा आणि अशा गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा यासाठी आर्थिक गुन्हे करणार्‍यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे, असे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. (याविषयी गृह राज्यमंत्र्यांनी अशा गुन्हेगारांवर काय कारवाई करणार, हेसुद्धा स्पष्ट करावे. - संपादक) 

आज भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभा !


स्थळ : समाज मंदिर कार्यालय, १ ला मजला, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वर, हनुमान मंदिराच्या समोर, सरवली गाव, भिवंडी
वेळ : सायंकाळी ६

उरण (जिल्हा रायगड) येथील सनातनचे साधक श्री. चंद्रहास गावंडगुरुजी 'ग्लोबल अचिव्हर २०१६' पुरस्काराने सन्मानित !

श्री. चंद्रहास गावंडगुरुजी

     उरण - येथील सनातनचे साधक श्री. चंद्रहास गावंडगुरुजी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईच्या वतीने 'ग्लोबल अचिव्हर २०१६' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इतिहासजमा होणारे खेळ म्हणजे दांडपट्टा, सुदर्शनचक्र, साखळी बाण, झोरकाठी, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारबाजी, खंजीर यांचे शास्त्रीय ज्ञान, तसेच कराटे खेळाचे ज्ञान त्यांना असल्यामुळे अकादमीने त्यांना पुरस्कार दिला. 
     या अकादमीच्या वतीने अमेरिका येथे होणार्‍या परिषदेमध्ये 'जागतिक गुणवंत गुणीजन २०१६' या पुरस्कारासाठीही त्यांची निवड करण्यात आली आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

आता अशा प्रकारचा निर्णय देशातील सर्वच राज्यांमध्ये घेण्याची मागणी हिंदूंनी करावी !
     अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी गोहत्यांमुळे राष्ट्र्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले आहे. येथे प्रतिदिन उघडपणे गोहत्या होत आहेत, असे राज्यपालांनी त्यांच्या शिफारसपत्रात नमूद केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Arunachal me chal rahi khuleaam gouhattya ke karan vaha rashtrapati shasan.
kya aisi mang pure desh ke liye Hindu karenge ?
जागो !
     अरुणाचल में चल रही खुलेआम गौहत्या के कारण वहा राष्ट्रपती शासन.
क्या एैसी मांग पुरे देश के लिए हिंदू करेंगे ?

चिलीतील समुद्रकिनार्‍यांवर मृत माशांचा खच !

आपत्काळात केवळ मनुष्यालाच फटका बसत नाही, तर प्राण्यांनाही बसतो, याचे हे उदाहरण ! 
या आपत्काळात तरून जाण्यासाठी आता अधिकाधिक साधना करण्याविना तरणोपाय 
नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! 
     सांटा मारिया - १५ जानेवारी या दिवशी चिली देशातील सांता मारिया येथील समुद्रकिनार्‍यावर विविध जातींचे मासे समुद्रकिनार्‍यावर मरून पडल्याचे आढळून आले आहे. समुद्रकिनार्‍यावर माशांचा खच पडला असून यात सेफरपॉड नावाचे सुमारे १० सहस्र मासे मरून पडल्याचे आढळले आहेत. वर्ष २०१५ च्या डिसेंबर मासात चिलीमधीलच पेटागोनिया समुद्र किनार्‍यावरील ३३७ मृत व्हेल मासे समुद्रकिनार्‍यावर आढळले होेते. शास्त्रज्ञांच्या मतानुसार मृत झालेले व्हेल मासे हे लुप्त होत चाललेल्या एका विशिष्ट प्रजातीतील आहेत. 
     सांता मारियामध्ये जलप्राणी मरण्यामागे अल् निनो वादळामुळे पाण्याच्या तापमानात वाढ होणे, हे कारण असू शकते का, याविषयी शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. जानेवारीच्या आरंभी तमिळनाडूमधील समुद्रकिनार्‍यावर ४२ मृत देवमासे आढळले होते. सध्या जगातील विविध देशांच्या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात जलप्राणी मरून पडलेले आढळत आहेत. शास्त्रज्ञ याविषयी संशोधन करत असून त्याविषयी नेमके कारण समजलेले नाही.

सिरियातील विस्थापितांना युुरोपमधील देशांत सोडण्यावर नियंत्रण आणणार !

तुर्कस्तानच्या पंतप्रधानांचे जर्मनीला आश्‍वासन !
     बर्लिन (जर्मनी) - येथे सिरियामधून आलेल्या विस्थापितांकडून हिंसा आणि अत्याचार करण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी तुर्कस्थानचे पंतप्रधान एहमत दावुतोगलू यांच्याशी बर्लिन येथे चर्चा केली. या वेळी दावुतोगलू यांनी तुर्कस्तानमार्गे युरोपमधील देशांत जाणार्‍या विस्थापितांच्या संख्येवर शक्य तेवढे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. मर्केल यांनी दावुतोगलू यांना तुर्कस्तानच्या नागरिकांना स्केन्जेन क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी व्हिसा उपलब्ध करून देण्यास साहाय्य करण्याविषयी आश्‍वस्त केले. युरोपीय युनियनचे सदस्य असलेले २६ देश स्केन्जेन क्षेत्र या नावाने ओळखले जातात.
     वर्ष २०१५ मध्ये युरोपीय देशांनी सिरियातील लाखो विस्थापितांना आश्रय दिला होता. यामध्ये बहुतांश लोक मुसलमान होते. सिरियाच्या शेजारी असलेल्या तुर्कस्तान या देशामधून विस्थापितांनी युरोपमध्ये प्रवेश केला. आता या विस्थापितांकडून हिंसा आणि अत्याचार करण्याच्या घटना समोर येत आहेत. जर्मनीमध्ये याला तीव्रतेने विरोध होत आहे.

दक्षिण अमेरिकेतील अल् साल्वादोर देशात जीका विषाणूंचा धोका !

शासनाचा महिलांना २०१८ पर्यंत गर्भधारणा न करण्याचा सल्ला !
     सॅन साल्वादोर (अल् साल्वादोर ) - दक्षिण अमेरिकेतील अल् साल्वादोर देशात सध्या नवजात बालकांमध्ये पसरणार्‍या जीका नावाचा विषाणूचा गंभीर धोका लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने महिलांना २०१८ पर्यंत गर्भधारणा न करण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. या देशात डासांचे प्रमाण अधिक आहे. डासांमुळेच जीका विषाणूंचे वहन होते. या विषाणूंचा नवजात बालकांच्या डोक्यावर आणि शरीरिरावर विकृत परिणाम होतो. 
      देशातील जनतेने या सल्ल्यावरून शासनावर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या वेनिसा नामक महिलेने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, बालकांना जन्म देणे, हे शासनावर नाही देवावर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन वर्षांसाठी कोणी गर्भधारण करण्यापासून थांबण्याची शक्यता अल्प वाटते.
       जीका नाव्याच्या या विषाणूंमुळे दक्षिण अमेरिकेतील कैबेरियन देश त्रासले आहेत तर ब्राझिलमध्ये १० लक्ष लोक या आजारामुळे त्रस्त आहेत. या भागात या विषाणूंची बाधा असणारी सुमारे ४ सहस्र बालके जन्माला आली आहेत. अल् साल्वादोरच्या जवळपासच्या देशांनी त्यांच्या नागरिकांना असाच सल्ला दिला आहे. कोलंबिया आणि इक्वाडोरचे अधिकारीही या विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प होईपर्यंत गर्भधारणा करू नका, असा सल्ला देत आहेत. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य

रत्नागिरी येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या 
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
स्वातंत्र्यवीर सावरकर
१. जन्मजात देशभक्त आणि जन्मजात कवी असलेल्या सावरकरांनी अवघ्या ११ व्या वर्षी माधवराव पेशव्यांवर काव्य रचणे
    सावरकर सागरास आव्हान देऊन ऐकवतात,
        माझी मातृभू कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एकक्षणी तुज प्याला रे 
      तर कुसुमाग्रज म्हणतात, 
        रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल ! उठतील या ज्वालेमधूनी भावी क्रांतीचे नेते ! 
     सावरकर जन्मजात देशभक्त आणि जन्मजात कवी होते. त्यामुळेच वर्ष १८९४ मध्ये वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी माधवराव पेशव्यांवर ते काव्य रचू शकले. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकही त्यांचे बालवयातील थोर काव्य पाहून आश्‍चर्यचकित झाले; पण सावरकरांना अभिमान शिवला नाही; कारण बालवयात ज्ञानेश्‍वरी रचणारे असू शकतात. त्या दृष्टीने स्वतःचे काव्य काही विशेष नाही, असे त्यांना वाटे.

स्वा. सावरकर म्हणजे यज्ञसमिधेप्रमाणे धगधगणारे जीवन, मूर्तीमंत त्याग, मूर्तीमंत धीरता, हृदयता !

      स्वा. सावरकर म्हणजे यज्ञसमिधेप्रमाणे धगधगणारे जीवन, मूर्तीमंत त्याग, मूर्तीमंत धीरता, हृदयता ! त्यांनी चिमण्यांचे ससाणे केले. जीवन्मृतांत प्राण ओतला. त्यांच्यातील तेजाचा किरण नुसता तळपत होता. तो दिवा जळत होता, तरी पुरे होते. त्यांचे असणे उपकारक होते, प्रेरक होते. आपल्या नुसत्या असण्यानेही सागर वातावरण आर्द्र ठेवतो, भव्यतेची कल्पना जागृत ठेवतो. आपल्या नुसत्या असण्यानेही सूर्य वास्तूजातास प्रकाश देतो, पृथ्वीला तेज देतो, मनुष्याला उष्णता देतो. - पु.भा. भावे (स्वातंत्र्यवीर, फेब्रुवारी-मार्च २०१०)

एका हातात साहित्याचे कमलपुष्प आणि दुसर्‍या हातात सशस्त्र क्रांतीचे कृपाण असलेले भारतभूचे लाडके सुपुत्र - नाटककार सावरकर !

१. उःशाप, सन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया या तीन नाटकांच्या माध्यमातून अस्पृश्योद्धार, शुद्धी, 
अहिंसेच्या अतिरेकाचे राष्ट्रीय दुष्परिणाम, हिंदुत्वनिष्ठ राजकारण आणि मराठ्यांचा पराक्रमी इतिहास 
या गोष्टींकडे नाट्यरसिक अन् आमजनता यांचे लक्ष वेधून घेणारे नाटककार सावरकर !
     एका हातात साहित्याचे कमलपुष्प आणि दुसर्‍या हातात सशस्त्र क्रांतीचे कृपाण असणार्‍या भारतमातेच्या या सुपुत्राचे, म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तीमत्त्व हे शतपैलू आविष्कारांचे होत ! 
       त्यांच्या जीवनातील रत्नागिरी येथील स्थानबद्धतेच्या काळात म्हणजेच वर्ष १९२७ ते मे १९३७ या कालखंडात मराठीचे भूषण ठरलेली माझी जन्मठेप जन्मली. याच काळात त्यांनी उःशाप, सन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया अशा तीन संपूर्ण संगीत नाटकांची निर्मिती केली (बोधीवृक्ष हे त्यांचे अपूर्ण नाटक आहे) आणि नाट्यक्षेत्रात आपल्या उत्तुंग प्रतिमेचा ठसा उमटवला. सारांशाने एकाच वाक्यात असे म्हणता येईल की, सावरकरांनी या तीन नाटकांच्या माध्यमातून अस्पृश्योद्धार, शुद्धी, अहिंसेच्या अतिरेकाचे राष्ट्रीय दुष्परिणाम, हिंदुत्वनिष्ठ राजकारण आणि मराठ्यांचा पराक्रमी इतिहास या गोष्टींकडे नाट्यरसिकांचे अन् आमजनतेचे लक्ष वेधले हे निःसंशय !

प्राचीन काळापासून पवित्र नद्यांच्या परिसरामध्ये साधना करण्याची उज्ज्वल परंपरा दर्शवणारी काही उदाहरणे

      भारत वर्षामध्ये पुराणकाळापासून नद्यांना पवित्र आणि दैवी समजले जाते. वैतरणी, गंगा, शरयू आणि यमुना या नद्यांचे माहात्म्य आपण जाणतोच. गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी राजा भगिरथाने ६० सहस्र वर्षे तप केले. शरयू नदी तर श्रीरामाच्या वास्तव्याने पुनीत झालेली आणि जेथे श्रीकृष्ण त्याच्या सवंगड्यांसमवेत खेळला, ती यमुना ! या सर्व नद्या म्हणजे आपले वैभव आहे. अनेक ऋषीमुनींनी त्यांच्या काठावर बसून खडतर तप केले. या नद्यांचे जल, त्यांचे काठ, त्यांच्या काठावरील वाळू आणि झाडे-झुडपे सर्वच तपश्‍चर्या करून पवित्र झाले आहेत. 
     आजच्या कलियुगातील देवद, पनवेल येथील गाढी नदी, जिच्या काठावर सनातनचा देवद आश्रम दिमाखाने उभा आहे. येथे राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करून साधना करणारे अनेक साधक आहेत. 
- श्री. अरुण डोंगरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०१५)

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

हिंदु कोणाला म्हणायचे ?

१. आसिंधुसिंधु भारतभूमी ही याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदु !
आसिन्धु सिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्‍चैव स वै हिन्दुरिति स्मृतः ॥ 
प्राकृत गीती (समश्‍लोकी) : 
भारतभूमि असे ही सिंधूपासोनि सिंधुपावेतो ।
हिंदु म्हणा तयासी जो पितृभू पुण्यभू तिला म्हणतो ॥ 
     अर्थ : जे सिंधू नदीपासून दक्षिण सिंधूपर्यंत (समुद्रापर्यंत) पसरलेल्या विशाल भूभागाला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी समजतात, ते सर्व हिंदू होत.
२. हिंदु या शब्दामध्येच हिंदुसंघटनेचा पाया असणे 
     हिंदु हा शब्द हिंदुसंघटनेचा केवळ पायाच आहे. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट वा ढिला, चिरंतन वा चंचल आहे, त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदूसंघटनेचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्कम आणि टिकाऊ ठरणारे आहे.

धर्म समजण्यासाठी साधनाच हवी !

    सध्या शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश देण्याच्या कारणावरून चालू असलेल्या आंदोलनाविषयी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनीही एक वक्तव्य केले आहे. संभाजीनगर येथे ते म्हणाले की, प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे, दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांमध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये. पाटेकर यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बीड आणि इतर ठिकाणी समाजात जाऊन कार्यक्रम घेतले. ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन कुटुंबाला दिलासा दिला, त्यांना साहाय्य निधी दिला. यातून त्यांनी निद्रिस्त आणि या प्रश्‍नावरून राजकारण करणार्‍या राज्यकर्त्यांना जागे केले. या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या; मात्र प्रत्येक गोष्टीची बुद्धीच्या पातळीवर आपण चिकित्सा करू शकत नाही; हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

... तर गुलाम अलींचा गजल गायनाचा कार्यक्रम व्हायलाच हवा !

श्री. भाऊ तोरसेकर
जाणते साहेब,
यांच्या सेवेशी.
     ठाण्याचे सर्वांत लढाऊ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोमाने फुले-शाहू-आंबेडकरांचे कार्य हाती घेतल्याचे वाचले; म्हणून हा पत्रप्रपंच ! आपल्याला आठवतच असेल, सहाआठ महिन्यांपूर्वी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम पत्र लिहून एक आवाहन केलेले होते. अधिक माहितीही पुरवली होती. आमदार जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांचे कार्य करत असतात. त्यात बाधा आणण्याचे प्रकार घडत असल्याने आपण चिंताक्रांत होऊन ते पत्र लिहिले होते. अर्थात् मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पनाच नसल्याने त्यांनी आपल्या पत्राची फारशी दखल घेतली नाही आणि आव्हाडांना आपले काम गुंडाळून विधानमंडळाच्या आवारात चिक्कीवाटपाचे काम हाती घ्यावे लागलेले होते.
     स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनात आहे इतके नाट्य, संघर्ष, रोमहर्षकता, अद्भुतता, काव्यात्मकता, शिक्षकधर्म, विज्ञाननिष्ठा, आत्मलोपवृत्ती आणि कर्मयोग अन्य कोणाच्या जीवनात प्रकर्षाने आढळतो ? तरी स्वातंत्र्यवीर सावरकर नीट समजून घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवलेच असेल, तर आमचे पाऊल पुढे कसे पडेल ? - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक (सल्लागार) संपादक, सनातन प्रभात, मुंबई.

कुठे अनैतिकतेला प्रोत्साहन देणारे साहित्य निर्माण करणारे सध्याचे समाजद्रोही साहित्यिक, तर कुठे गुन्हेगारी ठेचण्याचे मनोबल निर्माण करणार्‍या साहित्याचे निर्माते स्वातंत्र्यवीर सावरकर !

     आचार्य प्र.के. अत्रे आणि ना.सी. फडके यांची साहित्यसेवा सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांना एकदा विचारण्यात आले, फडके यांच्या साहित्यात स्त्री-पुरुष संबंधाचे वर्णन आहे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यातही आहे. मग या दोघांच्यात फरक काय ? (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळे पाणी, मला काय त्याचे या पुस्तकांत मुसलमान गुंडांनी हिंदु स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांची माहिती आहे.) अत्रे त्यावर ताड्कन उत्तरले, फडक्यांची वर्णने वाचून बलात्कार करावासा वाटतो, तर स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य यांचे वाचून बलात्कार्‍याचे लिंग छाटावेसे वाटते ! 
- श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

     चैतन्यवाद आणि जडवाद या संकल्पना पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. ईश्‍वर मानणार्‍यांची चैतन्यवादी धार्मिक परंपरा विधायक आहे. ईश्‍वर या संकल्पनेमुळे समाजातील पशुत्वाचे प्रमाण काही अंशी कमी होत असेल, तर धर्म ही संकल्पना काही प्रमाणात उपयुक्त आहे. तरीही या शोषणाच्या संस्था आहेत. मार्क्स, आंबेडकर यांनी मांडलेली जडवादाची म्हणजे नास्तिकवादाची भूमिका मानवतावादी आहे. मला भौतिक प्रश्‍न जास्त जवळचे वाटतात. लैंगिक प्रश्‍नांसंदर्भात आजही मोकळेपणाने बोलले जात नाही. या सगळ्यामध्ये स्त्रियांची घुसमट होते. आज भाकरीच्या प्रश्‍नांना तत्त्वज्ञान आहे; पण लैंगिकतेच्या प्रश्‍नांना तत्त्वज्ञान मिळाले नाही. मोजके जण सोडले, तर या संदर्भात कुणीही लिखाण करत नाही. - श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे

सप्टेंबर २०१५ मध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आलेल्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेच्या वेळी एका साधिकेला आलेल्या अनुभूती

१. आश्रमात येण्यासाठी गाडीत 
बसताक्षणी नामजप आपोआप चालू होणे
      गोवा विमानतळावरून आम्हाला रामनाथी आश्रमात घेऊन जाण्यासाठी आश्रमातून चारचाकी गाडी आली होती. गाडीत बसताक्षणी माझा नामजप आपोआप चालू झाला आणि आश्रमात पोहोचेपर्यंत तो अखंड होत होता. आश्रमात आल्यावर पू. योया वाले आणि पू. सिरियाक वाले यांना भेटल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

श्रीकृष्णाच्या भक्तीत रममाण झालेल्या मुंबई येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका श्रीमती शिरीन चायना यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्रीमती शिरीन चायना
      २.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला. ही सेवा करतांना मला विविध अनुभूती आल्या. त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. २.७.२०१४ या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. सेवेला आरंभ करण्यापूर्वी कमरेपर्यंतच्या श्रीकृष्णाचे दर्शन होणे : ग्रंथाच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वीच मला सूक्ष्मातून कमरेपर्यंतच्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि माझ्या तोंडून राधा मैया, मीरा मैया, माझ्या लाडक्या श्रीकृष्णापर्यंत माझे प्रेम पोेचवण्यासाठी मला अनुमती द्या, असे शब्द आले.

सहजता, परिपूर्ण सेवेची तळमळ आदी गुण असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची मिळालेली पूर्वसूचना
सौ. मंजिरी आगवेकर
      डिसेंबर २०१५ मध्ये मी पू. बिंदाताईंनी बनवलेल्या विविध विषयांच्या चौकटींचे विषयानुरूप वर्गीकरण करण्याची सेवा करत होते. त्या सेवेत मंजिरीताई मला साहाय्य करत असल्याने तिच्यातील विविध गुणांचा मला जवळून प्रत्यय आला.
      मंजिरीताईसमवेत सेवा करतांना माझ्या मनात तार्ईमध्ये एवढे गुण असूनही अजूनपर्यंत तिची ६१ टक्के पातळी का घोषित झाली नसेल ? असा विचार यायचा. त्यानंतर काही दिवसांनीच तिच्या प्रगतीची आनंदवार्ता ऐकून देवाने त्या वेळी आपल्याला पूर्वसूचनाच दिली होती, हे लक्षात आले. ताईविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. सहजता
     धारिकांना संकेतांक देण्याची महत्त्वाची सेवा ताईकडे असूनही त्याविषयी तिला अहं वाटत नाही. तिचे वागणे-बोलणे सहजतेने असते. चौकटींच्या वर्गीकरणाची सेवा करतांना मला सुचलेली सूत्रे मी तिला मोकळेपणाने सांगू शकत असे. मी सांगितलेली सूत्रेही ती सहजतेने स्वीकारत असे.

सात्त्विकतेची आवड असलेल्या आणि चिकाटीने स्वभावदोषांवर मात करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर !

१. सात्त्विकतेची आवड असणे
     सौ. मंजिरी मुळातच सात्त्विक वृत्तीची असल्यामुळे तिची प्रत्येक गोष्ट सात्त्विक असते. तिचे आचार-विचार, रहाणे, खाण्या-पिण्याच्या आवडी सर्वच सत्त्वप्रधान आहेत. तिचा तोंडवळाही सात्त्विक असल्यामुळे ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी छायाचित्रे हवे असल्यास आधी तिचेच नाव सुचते. तिची वेशभूषा, तसेच वापरातील अन्य वस्तूंचे रंग, आकार यांची निवडही सात्त्विकच असते. सात्त्विकतेच्या आवडीमुळेच कि काय, देवाने तिला माहेर आणि सासर अगदी सात्त्विक दिले.

नाडीपट्टीवर असणार्‍या अक्षरांमध्ये साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे वास्तव्य आहे, असे महर्षींनी सांगणे आणि याविषयीचे तात्त्विक अन् कार्यविषयीचे विवरण

     होसूर तमिळनाडू येथे झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी नाडीपट्टीवर असणार्‍या अक्षरांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य सांगितले. महर्षी म्हणाले, सप्तर्षी जीवनाडीपट्टी ही ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तत्त्वांनी परिपूर्ण आहे. नाडीपट्टीवर असणार्‍या वाक्यांमध्ये ब्रह्माचा आशीर्वाद आहे, तर वाक्यातील अक्षरे म्हणजे साक्षात् शिव आहे आणि अक्षरांमधील प्रकाश म्हणजेच श्रीविष्णु आहे.

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वातील सेवांमध्ये सहभागी होणार्‍या साधकांनी ५.२.२०१६ या दिवसापर्यंत गूगल स्प्रेडशीटमध्ये नावनोंदणी करावी !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
     २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ पर्व असणार आहे. तेथे विविध सेवांसाठी १.४.२०१६ या दिवसापासून साधकांची आवश्यकता आहे.
१. साधकांनो, पुढील गटांनुसार सेवेत सहभागी व्हा !
२. इच्छुक साधकांची माहिती गूगल स्प्रेडशीटमध्ये भरावी !
     हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे करण्यात आलेले नियोजन रहित करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे सेवेला जाण्यासाठी नावनोंदणी केलेल्या साधकांनी, तसेच उज्जैन येथे कुंभसेवेसाठी जाण्यास इच्छुक साधकांनी उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून गूगल स्प्रेडशीटमध्ये स्वतःची माहिती ५.२.२०१६ या दिवसापर्यंत भरावी. (याविषयीची शीट जिल्ह्यांना शेअर करण्यात आली आहे.) यामध्ये काही शंका असल्यास श्री. निषाद देशमुख यांना ९८२६७४२८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

महर्षींच्या संदर्भात येणार्‍या अनुभूतींविषयी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितलेली काही मौलिक सूत्रे आणि त्या संदर्भातील विवेचन

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
     आम्ही एकदा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना विचारले, महर्षी आपल्याला दर्शन देतात, म्हणजे नेमकेपणाने काय होते ? याविषयी बोलतांना ते म्हणाले
१. सूक्ष्मातील दर्शनाचे तीन प्रकार असणे
       सूक्ष्मदेह, सूक्ष्मप्राण आणि सूक्ष्म प्रकाश यांचे दर्शन.
१ अ. सूक्ष्मदेहाचे दर्शन केवळ बाह्यरेखेच्या स्वरूपात असणे : सूक्ष्मदेहाच्या रूपात दर्शन होतांना महर्षींच्या देहाची मला केवळ बाह्यरेखा दिसते.
१ आ. सूक्ष्मप्राणाचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष रूप दिसणे : सूक्ष्मप्राणाचे दर्शन होतांना महर्षींचे प्रत्यक्ष रूपही दिसते आणि त्यांची हालचालही जाणवते, तसेच कोणते महर्षी (वशिष्ठ, विश्‍वामित्र का आणखी कोणी..) बोलत आहेत, याचे ज्ञान होते.
१ इ. सूक्ष्म प्रकाशाच्या दर्शनात महर्षींचा संवाद सुरू असण्याची केवळ जाणीव होणे : सूक्ष्म प्रकाशाचे दर्शन होतांना मात्र केवळ महर्षींचा संवाद सुरू आहे, याची जाणीव असते. सूक्ष्म प्रकाश दिसतांना बर्‍याच वेळा त्यातील दिव्यत्व जाणवते.

छोट्याशा कुटुंबात होतात, तशी भांडणे सनातनच्या आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही होत नाहीत !

      एखाद्या कुटुंबात फक्त नवरा-बायको असले, तरी त्यांची आपसात भांडणे होतात. एकत्र कुटुंबात १० - १५ जण असले, तरी त्यांची भांडणे होतात; मात्र सनातनच्या देवद आणि रामनाथी येथील आश्रमांत नातेसंबंध नसलेले शेकडो साधक एकत्र रहात असूनही त्यांच्यात भांडणे होत नाहीत. यावरून साधनेचे महत्त्व लक्षात येते ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.२.२०१४)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. ज्याचा
 त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, भगवान श्रीकृष्णाने गीतेत दिलेले ज्ञान समजून घ्या !
     अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ११
अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस.
     बुद्धीप्रामाण्यवाद्यांची विद्वत्ता किती वरवरची आहे, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरची आहे, हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून जाणवते; पण अध्यात्माचा गंध नसल्यामुळे ते त्यांच्या लक्षात येत नाही आणि ते विद्वानांसारखा युक्तिवाद करत रहातात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

वारे फिरले...?

संपादकीय 
     काही हिंदु संघटना या धर्मांध मुसलमानांसारख्या वागत असल्या तरी त्यांचा अपवाद सोडला, तर हिंदु समाज हा सहिष्णु आहे, अशी उपरती प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना झाली आहे. कोलकाता येथील साहित्य संमेलनात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली. एवढेच नव्हे, तर मुसलमान लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याप्रमाणेच तेही म्हणाले की, पिकेसारखा चित्रपट हिंदूंमुळेच हिट झाला आहे. उद्या कोणी इस्लामिक देशात जाऊन त्या धर्मातील प्रतीकांचा वापर करून पिकेसारखा चित्रपट काढून तो यशस्वी करून दाखवला, तर आश्‍चर्यच वाटेल. दुसरीकडे जे देशातील असहिष्णुनामक वादळात भोवरा निर्माण करणारे अमीर खान यांनी मी याच देशात जन्मलो आणि येथेच मरणार असे वक्तव्य करून २६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn