Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी शासनाने यापुढेही सतर्क रहावे ! - हिंदु जनजागृती समिती

     पुणे - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचे दर्शन घेण्यात देवस्थानाने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केलेला नाही. सर्वांना ठराविक अंतरावरून दर्शन घेण्याची सुविधा असतांना थेट शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा अट्टाहास करणार्‍या काही अहंकारी आणि प्रसिद्धीलोलूप महिलांना रोखले गेले. हे देवस्थान मंडळ, शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघशक्तीचे यश आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी घेतलेल्या न्याय्य भूमिकेचे आम्ही स्वागत करतो; मात्र हा धोका अद्याप पूर्णतः टळलेला नाही. यापुढे अशा प्रकारे अनुचित आणि धार्मिक प्रथांना गालबोट लावणारे प्रकार शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होऊ नयेत; म्हणून शासन यंत्रणेने कायमस्वरूपी सतर्क राहून उपाययोजना काढावी, अशी आमची मागणी आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

शनिशिंगणापूर ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त

     आम्ही परंपरा राखण्यात यशस्वी ठरलो, असे म्हणून शनिशिंगणापूरच्या ग्रामस्थांनी २६ जानेवारी या दिवशी सायंकाळी जल्लोष केला. त्यानंतर ग्रामस्थ महिला आणि पुरुष यांनी आनंद व्यक्त करत गावातून मोर्चा काढला. काही ग्रामस्थ शनिभक्त महिला नास्तिकवादी महिलांना विरोध दर्शवण्यासाठी देवस्थानच्या बाहेरीला बाजूस सकाळपासून आंदोलनाला बसल्या होत्या. पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या महिलांना अडवल्यानंतर उत्स्फूर्तपणे आंदोलनकर्त्या भाविक महिलांनी श्रीशनिदेवाच्या मंदिरात येऊन श्री शनैश्‍वर भगवान की जय, अशा उत्स्फूर्तपणे घोषणा देत शनिदेवाचे दर्शन घेतले.
     भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी दुपारी १२ वाजता दर्शन घेऊन दुपारी ४.३० वाजता पूजा करणार, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात दुपारी पावणेचारच्या सुमारास त्या सुपा येथे पोहोचल्या. त्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी, सुरक्षारक्षक यांच्याकडूनही हा वेळकाढूपणा म्हणजे स्टंटबाजीचाच प्रकार आहे., अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्‍न सोडवावेत !

शनिशिंगणापूर येथील वादाच्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
धार्मिक प्रथांच्या पालनाचे महत्त्व जाणून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा
     मुंबई - ईश्‍वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्‍न सोडवले पाहिजेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत की, संघर्ष टाळून संवाद प्रस्थापित करावा. भारतीय परंपरेत आणि हिंदु धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहिले आहे. प्रथा परंपरांमध्ये कालसापेक्ष पालट हीच आमची संस्कृती आहे, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ जानेवारी या दिवशी केले आहे. २६ जानेवारीला भूमाता ब्रिगेड संघटनेने शनिचौथर्‍यावर केलेल्या अयशस्वी प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी केले आहे.
लवकरच तोडगा निघेल ! - राज्यमंत्री राम शिंदे
     महाराष्ट्र शासन शनिशिंगणापूर मंदिराचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते यांच्याशी बोलणे चालू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असे राज्यमंत्री राम शिंदे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे पाठवली नोटीस

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे प्रकरण
     नवी देहली - अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासन आणि अरुणाचलचे राज्यपाल यांना नोटीस पाठवली आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारी धारिका न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिला. अरुणाचलमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेे.

जयपूरमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ५ जणांना घेतले कह्यात

राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या आरोपींवर देशद्रोहाचा
 खटला भरून त्यांना कायमचे कारागृहात टाका !
     जयपूर - येथील बिचून गावातील एका शाळेत प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. हा राष्ट्रध्वज काढून त्याचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना कह्यात घेतले आहे. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
     येथील कन्या उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते. सायंकाळी गावातील ५ जणांच्या राष्ट्रद्रोही टोळक्याने शाळेत येऊन राष्ट्रध्वज खाली उतरवला आणि त्याचा अवमान करून तो जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाळेतील कर्मचार्‍यांनी तेथे येऊन आग विझवली. ही घटना गावात वार्‍यासारखी पसरल्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शाळेत एकत्र आले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. आरोपींच्या विरुद्ध ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. या आरोपींमध्ये ३ अल्पवयिनांचाही समावेश होता.

हिंदूसंघटनामुळे साध्य झालेल्या विजयासाठी धर्माभिमान्यांनी शनिदेवाप्रती व्यक्त केली कृतज्ञता !

ग्रामस्थांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार !
     शनिशिंगणापूर चौथर्‍यावर महिलांनी चढण्याच्या विरोधाचे प्रकरण !     
डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आणि यांचा सत्कार
करतांना ग्रामस्थ भीमा महाले सोबत इतर ग्रामस्थ आणि कु. प्रियांका लोणे
      शनिशिंगणापूर - शनिशिंगणापूर येथील परंपरेवर आलेले हे संकट केवळ शनिदेवावरीलच नाही, तर धर्मावरील संकट कसे आहे, याविषयी हिंदु जनजागृती समितीने आम्हाला जागृत केले. समितीने येथे येऊन हिंदु धर्माचा प्रसार केला. अनेक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आणि परंपरेवर आलेले संकट परतवून लावता आले. आमच्या एकाही हिंदु बांधवाला अटक झाली नाही, ही आमची जमेची बाजू आहे. हिंदूंच्या संघटित शक्तीचा हा विजय आहे, शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ, भाविक यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे आभार व्यक्त करतो, असे उद्गार शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी काढले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे आणि वैद्य उदय धुरी यांचा सत्कार करण्यात आला.

गोरखपूरमधील मदरशात राष्ट्रध्वज फडकवण्यास विरोध !

राष्ट्रीय सणांना राष्ट्रध्वज न फडकवणार्‍या मदरशांचा देश कोणता ? भारत कि पाकिस्तान ?
    गोरखपूर - प्रजासत्ताकदिनाला गोरखपूर जिल्ह्यातील गोला येथील एका मदरशात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही या मदरशाकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्यात न आल्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
     गोरखपूर जिल्ह्यातील गोला येथील मदरशात प्रजासत्ताकदिनाला राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नाही. याविषयी माहिती मिळताच काही नागरिक राष्ट्रध्वज घेऊन मदरशात पोहोचले; त्यामुळे मदरशातील कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी या राष्टवादी नागरिकांशी वाद घातला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. नागरिकांनी मदरशासी संबंधित लोकांवर देशद्रोहाचा आरोप केला आहे.

हाजीपूर (बिहार) येथे मंदिर तोडण्यासाठी आलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी पिटाळले !

या घटनेत पोलीस आणि प्रशासन यांना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागले; बहुतांश वेळा 
सहिष्णु हिंदूंच्या मंदिरांवर बुलडोझर चालवले जातात. त्या तुलनेत अल्पसंख्यांकांच्या 
प्रार्थनास्थळांवर साधी कारवाई करण्याचेही धाडस प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !
  • जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
  • संतप्त ग्रामस्थांचा मंदिराजवळ ठिय्या
      वैशाली - हाजीपूर येथील बगमली भागात न्यायालयाच्या आदेशानुसार वासुदेव मंदिर तोडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी घटनास्थळी उपस्थित अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे वाहन आणि एका ट्रॅक्टरलाही आग लावली. जमावाच्या या उद्रेकात अनेक पोलीस घायाळ झाले आहेत. जमावाचा संताप पाहून उपस्थित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळावरून पाय काढता घ्यावा लागला. संपूर्ण भागात तणाव असून संतप्त ग्रामस्थ मंदिराजवळ ठिय्या मांडून बसले आहेत.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

अंबरनाथ येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ लहान मुले जखमी

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा न काढून जनतेच्या जिवाशी खेळणारे निष्क्रिय प्रशासन !
     अंबरनाथ - अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर गणपती मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच मुले जखमी झाली आहेत. सर्व जखमी मुले दोन ते पाच वर्षे वयोगटातील आहेत.
     घराशेजारी खेळतांना प्राजक्ता गायकर (वय ५ वर्षे) आणि अंजन कृष्णा (वय ६ वर्षे) या दोन मुलींचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. तर आजीच्या कडेवर असलेल्या सहा महिन्यांच्या काव्यावरही कुत्र्याने हल्ला केला. याशिवाय इतर दोन मुले रस्त्यावरून जात असतांना भटक्या कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतला.
     कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलांना प्रारंभी अंबरनाथ पालिकेच्या बी.जी. छाया रुग्णालयात दाखल केले; मात्र त्या ठिकाणी रेबीजचे इंजेक्शन नसल्याने त्यांना बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले.

हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी सरवली गाव, भिवंडी येथील धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! - श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन 

     भिवंडी - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी या सभेला उपस्थित रहा, असे आवाहन श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. येथील सोनाळे गावात आयोजित भिवंडी आगरी महोत्सव २०१६ च्या दुसर्‍या दिवशी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. 

सनातनसारख्या संस्था कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे ! - समर्थभक्त मोहनबुवा रामदासी

 समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांचा सन्मान करतांना श्री. शिवाजी वटकर
     पनवेल - सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो. सनातनसारख्या संस्था आज कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे. समर्थांचे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत, असे भावपूर्ण उद्गार समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी काढले. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातनचे साधक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. या वेळी त्यांना सनातनचे गोसंवर्धन आणि हिंदुराष्ट्र स्थापनेची दिशा हे ग्रंथ भेट देण्यात आले. आश्रमात चालणार्‍या विविध विभागांतील कार्याविषयी श्री. वटकर यांनी त्यांना अवगत केले. 

काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे मोडतात ? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

अल्पसंख्यांक दर्जाविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तुत केलेला प्रश्‍न भारतीय राज्यकर्त्यांच्या लक्षात 
का आला नाही ? का लक्षात येऊनही ते लांगुलचालनासाठी आणि राजकीय लाभ उठवण्यासाठी 
त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ?
     नवी देहली - शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ? अल्पसंख्यांकाचा दर्जा हा राज्यातील त्या समाजाच्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर देण्यात यावा, असे आम्हाला वाटते. त्यासाठी संपूर्ण देशातील लोकसंख्येचा विचार केला जाऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने मांडले. पंजाबमधील शिक्षणसंस्थांमध्ये शीख विद्यार्थ्यांना ५० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे मत मांडले. याप्रकरणी केंद्रशासनाला एक सूचना पाठवून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. पुढील सुनावणी ४ आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे.
    डिसेंबर २००७ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीद्वारा संचालन करण्यात येणार्‍या शिक्षणसंस्थांमध्ये शीख विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील अधिसूचना रहित करण्याचा निर्णय दिला होता. राज्यात शिखांना अल्पसंख्यांक म्हणता येणार नाही, असे मत तेव्हा उच्च न्यायालयाने मांडले होते. पंजाब शासन आणि प्रबंधक समिती यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयान दाद मागितली होती.

भारतियांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखूया ! - नीलेश देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन   
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. नीलेश देशमुख
कोपरखैरणे (नवी मुंबई) - सहस्रो क्रांतिकारकांच्या बलिदानाने हा भारताचा राष्ट्रध्वज उभा राहिला आहे. आजही सहस्रो सैनिकांच्या त्यागाने हा तिरंगा गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतियांच्या आशा आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधत्व करतो. त्यामुळे त्याचा सन्मान राखा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. नीलेश देशमुख यांनी केले. येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत २५ जानेवारी या दिवशी ते विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रबोधन करत होते. यानंतर राष्ट्रध्वजातील रंगांचे अर्थ विचारून विद्यार्थ्यांना त्याची महती सांगण्यात आली. या मार्गदर्शनाचा २०० विद्यार्थी आणि शिक्षक यांनी लाभ घेतला.

दुर्गादेवीचा अवमान करणारे बंगाल शासन उखडून टाका !

     दुर्गापूर (बंगाल) - बंगालच्या इतिहासात यापूर्वी केव्हाही दुर्गादेवीच्या पूजनास विरोध झाला नाही; पण लांगूलचालनापायी बंगालच्या वर्तमान शासनाने मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घातली. दुर्गादेवीचा अवमान करणार्‍या बंगालच्या तृणमूल शासनाला उखडून फेका, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बंगालच्या जनतेला केले. बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून घेण्यात आलेल्या सभेत त्या बोलत होत्या. इराणी पुढे म्हणाल्या, "बंगालमधील जनता दुर्गादेवीची भक्त आहे. अशा राज्याच्या शासनाने दुर्गादेवीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यावर बंदी घातली. हा दुर्गादेवीचा अवमान आहे. असे शासन बंगालमध्ये न येऊ देणे, हेच देवीभक्तांचे कर्तव्य आहे."

प्रजासत्ताकदिनी सनातन संस्थेचे साधक श्री. विलास भिडे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

     
 महापौरांच्या हस्ते सत्कार स्वीकारतांना श्री. विलास भिडे (डावीकडे)

पुणे, २७ जानेवारी (वार्ता.) - शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याविषयी सनातन संस्थेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विलास भिडे यांचा प्रजासत्ताकदिनी महापौर श्री. दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापालिकेचे आयुक्त श्री. कुणाल कुमार उपस्थित होते. क्रीडा, शिक्षण, साहित्य, कला, संगीत, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या २०५ व्यक्तींचा २६ जानेवारी या दिवशी स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. 

(म्हणे) एम्.आय.एम्.चा पराभव झाल्यास अल्पसंख्यांकांना गोमांस खाणे सोडावे लागेल !

एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा कांगावा 
     भाग्यनगर (हैद्राबाद) - जर निवडणुकीत एम्.आय.एम्.चा पराभव झाला, तर अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांना गोमांस खाणे सोडावे लागेल. महाराष्ट्रात गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे, येथेही बंदी घातली जाईल, अशी भीती एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुसलमान मतदारांना दाखवली आहे. भाग्यनगर येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या एका प्रचार सभेत ते बोलत होते. (विरोधकांविषयी विविध भयगंड निर्माण करून निवडणुका जिंकणारे राजकीय पक्ष लोकराज्यासाठी लायक आहेत का ? - संपादक)

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही !

  • हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी असे ठामपणे किती हिंदु नेते सांगतात ?
  • भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा ठाम विश्‍वास
     कोल्हापूर - देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. देशाच्या राज्यघटनेनेही आम्हाला हा अधिकार दिला आहे, असा ठाम विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी व्यक्त केला. डॉ. स्वामी कोल्हापूर येथे आले असता हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री आनंद पाटील, राजन बुणगे आणि आधुनिक वैद्य मानसिंह शिंदे यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली. 
    या वेळी डॉ. स्वामी म्हणाले, अयोध्येत श्रीराम मंदिर आणि देशात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. त्यासाठी सर्वच हिंदुत्ववादी संघटना मिळून कार्य करतील, असे नाही. एकत्र येऊन कार्य करणे अतिशय कठीण आहे; परंतु आम्हाला पुढे जायचेच आहे.
    देशातील हिंदुत्ववादी संघटनांना नष्ट करणे, हे एक फार मोठे षड्यंत्र आहे. जगद्गुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यावर लावण्यात आलेला हत्येचा आरोप असो किंवा पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर लावण्यात आलेले आरोप, सर्व खोटे आहेत, असेही डॉ. स्वामी म्हणाले.

(म्हणे) मी याच देशात जन्मलो आणि येथेच मरणार !

आधी देशविरोधी वक्तव्य करायचे आणि नंतर सारवासारव करून संधिसाधूपणा करायचा, 
असे करणार्‍या अमीर खानपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे !
भारतात कथित असहिष्णूता असल्याच्या कारणावरून देश सोडून 
जाण्याची गोष्ट करणार्‍या अमीर खानला झाली उपरती ! 
    नवी देहली - भारतात असहिष्णुता असल्याचा कांगावा करत देश सोडून जाण्याची गोष्ट करणार्‍या अभिनेते अमीर खान यांना दोन मासानंतर उपरती झाली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते प्रसारित केले गेले. मी आणि माझ्या पत्नीने देश सोडणे किंवा भारतात असहिष्णुता असल्याचे कधीच म्हटले नव्हते. माझा जन्म याच देशात झाला आहे आणि मी येथेच मरीन. मी विदेशातही २ आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहू शकत नाही, मला त्वरीत घरी परतण्याची ओढ लागते. त्यामुळे मी असे पाऊल कधीच उचलणार नाही, असे स्पष्टीकरण अमीर यांनी नुकतेच दिले आहे. भारतामध्ये वाढत्या असहिष्णुमुळे पत्नी किरण राव यांनी देश सोडण्याचा विचार व्यक्त केला होता, असे अमिर खान यांनी दोन मासांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलतांना सांगितले होते. या वक्तव्यावरून अमिर खान यांच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणात टिका झाली होती.


वाराणसी येथे महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या वासनांध मौलानाविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

कथित आरोपांखाली आणि राजकीय हेतूने अटक करण्यात आलेल्या हिंदु संतांविषयी सातत्याने 
गरळओक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे वाराणसीतील मौलानाच्या कुकृत्याविषयी 
साधा ब्रही का काढत नाहीत ? हाच का प्रसारमाध्यमांचा सर्वधर्मसमभाव ?
    वाराणसी (उत्तरप्रदेश) - अविवाहित असल्याचे खोटेच सांगून शारीरिक संबंध ठेवणार्‍या, तसेच अनैसर्गिक लैंगिक शोषण करणार्‍या इटावा (उत्तरप्रदेश) येथील वासनांध मौलाना जरजीस यांच्या विरोधात येथील एका अविवाहीत महिलेने गुन्हा प्रविष्ट केला आहे.
   या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या मौलाना जरजीस यांच्या व्याख्यानांच्या ध्वनीचित्रचकतींमुळे त्यांच्याविषयी तिला माहिती मिळाली. साधारण दोन वर्षांपूर्वी धार्मिक चर्चा करण्यासाठी तिने त्या ध्वनीचित्रचकतीवर छापलेल्या क्रमांकावरून मौलानाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांची एकमेकांशी भेट होऊ लागली. काही मासांतच त्यांच्यात चांगली मैत्री झाली. साधारणपणे दीड वर्षापूर्वी मौलाना वारणसीत आले असतांना तेथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी महिलेला बोलावले. त्यांनी स्वतःला अविवाहित असल्याचे दर्शवत त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. त्या दिवसानंतर अनेक वेळा त्यांनी असे संबंध ठेवण्यास चालू केले. जेव्हा महिलेने त्यांना विवाहाविषयी विचारले, तेव्हा त्यांनी ते विवाहित असल्याचे, तसेच त्यांना मुलेही असल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतर मौलानाने महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावण्यास चालू केले.

थोरले माधवराव पेशवे यांचे अप्रकाशित चित्र उजेडात !

     पुणे - सध्या कॅलिफोर्निया येथे वरिष्ठ माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले मनोद दाणी यांना थोरले माधवराव पेशवे यांचे पुष्कळ जुने चित्र येल विद्यापिठाच्या संग्रहात आढळले आहे. या चित्राच्या मागे माधवराव बालाजीराव आणि चित्रकार भोजराज अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे इतिहासाचा हा जुना अज्ञात ठेवा प्रकाशित झाला आहे. त्याविषयी दाणी यांनी सांगितले की, भोज राज हा चित्रकार मूळचा राजस्थानमधील जयपूर येथील आहे. शनिवारवाड्याच्या भित्तीचित्रांच्या संबंधात त्याचे नाव जुन्या कागदपत्रांमध्ये आहे. थोरले माधवराव यांच्या शैलीचे; परंतु सवाई माधवराव दर्शवणारे एक उत्तरकालीन चित्र ब्रिटीश ग्रंथालयात आहे. त्यावरून ही चित्रे एकाच शैलीचा भाग आहेत. ते चित्र माधवराव पेशवे यांचे आहे, असे स्पष्ट मत इतिहास तज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान यांनी व्यक्त केले.

नाशिक येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन !

     नाशिक - प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून नाशिक शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले. हे प्रदर्शन पाहून २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची प्रचीती आल्याचे सांगितले. या प्रदर्शनात श्री. राजेश चौधरी आणि सौ. वसुधा चौधरी यांनी सेवा केली.
     राष्ट्रप्रेमाच्या अभावामुळे आज देशात अनेक आघात होत आहेत. समाजाची भावी फळी असणार्‍या विद्यार्थ्यांवरच राष्ट्रप्रेमाचा पगडा निर्माण होण्यासाठी समितीकडून राष्ट्रवीरांच्या गौरवगाथेचे सचित्र फलक प्रदर्शन विद्यालयात भरवण्यात आले होते.

नवी मुंबई पोलिसांकडून २६ वर्षांतील २२ सहस्र ३३० आरोपींचा शोध चालू

अकार्यक्षम पोलीस यंत्रणा !
     नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील २० पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत सुमारे २२ सहस्र ३३० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींची ही संख्या गेल्या २६ वर्षांतील आहे. त्यापैकी ३०४ जणांना फरार घोषित करण्यात आले असून यामध्ये छोटा राजन, रवी पुजारी यांसह अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी फरार असणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहे. असे अकार्यक्षम पोलीस जनतेला वेळेत न्याय मिळवून काय देणार ? - संपादक)
     नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. देशातील सर्वांत वेगाने विस्तार होणार्‍या शहरांमध्ये या परिसराचा समावेश आहे. परिसराच्या विकासा समवेत येथील गुन्हेगारी आणि तिचे स्वरूपही पालटू लागले आहे. पूर्वी चोरी, घरफोडीचे गुन्हे सर्वाधिक होत होते. आताही हे प्रमाण गंभीर असले, तरी त्याहीपेक्षा फसवणूक, सायबर गुन्ह्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

सावन राठोड यांना मारणार्‍या धर्मांधांना फासावर लटकवा ! - हिंदुप्रेमींची मागणी

हिंदु असल्याच्या कारणावरून धर्मांधांनी सावन राठोड याच्या केलेल्या क्रूर हत्येचे प्रकरण 
     पुणे, २७ जानेवारी (वार्ता.) - केवळ हिंदु असल्याच्या कारणावरून अमानुषपणे ठार मारण्यात आलेल्या सावन राठोड याच्या हत्यार्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी २७ जानेवारी या दिवशी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील आंबेडकर पुतळ्यापासून विधानभवनापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्च्यात शेकडो धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. 'तू हिंदू आहेस का ?', असे विचारून हिंदु असल्याची निश्‍चिती पटल्यानंतर इब्राहिम शेख, जुबेर तांबोळी, इम्रान तांबोळी या धर्मांधांनी सावन राठोड याची जाळून हत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ, तसेच 'आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी', या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 

इराकी असल्याचे सांगणारे ४ संशयित भुवनेश्‍वरमधून बेपत्ता : ओडिशात 'हाय अ‍ॅलर्ट'

देशातून आतंकवादाला हद्दपार करण्यासाठी मुळावर प्रहार करा ! 
* ओळखपत्रे दाखवण्यास नकार 
* संशयितांच्या कारचा क्रमांक बनावट 
     भुवनेश्‍वर (ओडिशा) - स्वत:ला इराकी असल्याचे सांगणारे ४ संशयित अचानक बेपत्ता झाल्यामुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ताठ मानेने आणि अभिमानाने देव, देश आणि धर्म यांचे रक्षण केले ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


गारगोटी येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या धारातीर्थ यात्रेचा समारोप 
पू. भिडेगुरूजींसमवेत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (मध्यभागी)

     गारगोटी (जिल्हा कोल्हापूर), २७ जानेवारी (वार्ता.) - मोगलांच्या काळात देश आणि धर्म यांविषयीचा अभिमान संपला होता. क्षात्रतेज संपले होते. त्या वेळी अनेक सरदारांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. अनेक जण मोगलांंना शरण गेले होते. अशा वेळी जिजाऊंच्या प्रेरणेने आणि संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. त्यांनी १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. अत्यंत ताठ मानेने आणि अभिमानाने देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करत स्वराज्य स्थापन केले. राजेंची प्रशासकीय नीती सर्व जगात प्रसिद्ध होती. त्याच नीतीवर महाराष्ट्राचा कारभार करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रांगणागड ते श्री भुदरगड या धारातीर्थ यात्रेचा समारोप गारगोटी येथे झाला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

रुडकी येथील मदरशाकडून सामाजिक संकेतस्थळे आणि भ्रमणभाष यांच्या वापरावर बंदी !

मुसलमान तरुण आतंकवादाकडे का वळतात, याचे कारण त्यांना मदरशांतून मिळणार्‍या शिकवणीत 
आहे, हे आतापर्यंत उघड झाले आहे. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळे आणि भ्रमणभाष 
यांच्यावर बंदी घालण्यासह मुसलमान तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होईल, 
असेही शिक्षण दिल्यास ते आपसुकच आतंकवादापासून लांब रहातील ! 
     रुडकी (हिमाचल प्रदेश) - गेल्या काही दिवसांमध्ये इसिस या क्रूर जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित अनेक मुसलमान तरुणांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतंकवादाच्या आहारी जाण्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी येथील इमामब्दुल इस्लाम या मदरशाने सामाजिक संकेतस्थळे आणि भ्रमणभाष यांच्या वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी या संदर्भातील निर्णयाची पत्रकेही सर्वत्र लावली आहेत. इसिसच्या प्रभावापासून तरुणांना लांब ठेवण्यासाठी मदरशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. आपली मुले संकेतस्थळाचा वापर कशासाठी करत आहेत, याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन मदरशाचे प्रमुख मौलाना नवाब अली यांनी पालकांना केले आहे.

गोव्यात लिक्विड बॉम्बने आक्रमण करण्याचा इसिसचा डाव होता !

आतातरी शासन जिहादी आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणार का ? 
      पणजी, २६ जानेवारी (वार्ता.) - गोव्यात विध्वंसक अशा लिक्विड बॉम्बने आक्रमण करण्याचा इसिसचा डाव होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या चौकशीत उघडकीस आली आहे. अटक केलेल्या इसिसच्या १४ अतिरेक्यांच्या चौकशीच्या काळात ही माहिती दिली. 
   या आतंकवाद्यांनी गोव्यात आक्रमण करण्यासाठी जागाही निश्‍चित केल्या होत्या, तसेच या आक्रमणांसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यात आले होते. अन्वेषण यंत्रणांनी हे साहित्य जप्त केले आहे. या आतंकवाद्यांकडून कोठे आणि केव्हा आक्रमण केले जाणार, याची नेमकी माहिती त्यांना पकडण्यापूर्वीच पोलिसांना होती; मात्र त्यांना साहित्यासह पकडण्यासाठी थोड्या कालावधीनंतर पोलिसांनी एकाच वेळी कारवाई करून त्यांना अटक केली. उत्तर गोव्यात लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात येणार होते, अशी माहिती मिळाली आहे. नेपाळ आणि उत्तरप्रदेश येथील सीमेवर पकडलेला निजामुद्दीन याला पकडल्यानंतर त्याच्याकडून बरीचशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. इसिसशी संबंधित अन्य दोन अतिरेकी अबु अना (वय २४ वर्षे) आणि नफिस खान (वय २४ वर्षे) यांना अधिक चौकशीसाठी देहली येथे नेण्यात येणार आहे.

ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी यांच्या संघटनशक्तीचा विजय !

     श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, २६ जानेवारी (वार्ता.) - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेव ! त्या ठिकाणी असणार्‍या स्वयंभू शनिदेवाच्या प्रचिती आतापर्यंत अनेकांनी घेतल्या आहेत. धर्मो रक्षति रक्षितः । म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो, या धर्मवचनाची अनुभूती २६ जानेवारीच्या दिवशी आली. भूमाता ब्रिगेडच्या हेकेखोर कार्यकर्त्याही धर्मशास्त्र मानायला सिद्ध नसल्याने २६ जानेवारी या दिवशी धर्मपरंपरा मोडण्यासाठी पुण्याहून नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती उद्भवणार, नास्तिकतावादी तिकडे जाऊ शकणार कि त्यांना रोखले जाणार ?, यासंदर्भात दुपारपर्यंत अनिश्‍चितता होती. शनिदेवांना मात्र धर्मपरंपरांचे रक्षण होणेच अपेक्षित असल्याने श्री शनिदेवांनी पोलीस-प्रशासन यांच्या माध्यमातून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अन्य महिला कार्यकर्त्या यांना जिल्ह्याच्या वेशीवर सुपा येथेच अडवले आणि नंतर त्यांना कह्यात घेतले.

फलक प्रसिद्धीकरता

अशांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना कायमचे कारागृहात टाका !
     राजस्थानच्या बिचून नावाच्या गावात एका शाळेत प्रजासत्ताकदिनी फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज गावातील ५ जणांच्या देशद्रोही टोळक्याने सायंकाळी खाली उतरवला आणि त्याचा अवमान करून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Rajsthan ke 1 vidyalay me 5 rashtradhrohi ladkone rashtradhwaj ko jalane ka prayas kiya.
Aise rashtradrohionko Bharat me kadi saja milegi ?
जागो
: राजस्थानके एक विद्यालय में ५ राष्ट्रद्रोही लडकों ने राष्ट्रध्वज को जलाने का प्रयास किया.
एैसे राष्ट्रद्रोहीआें को भारत में कडी सजा मिलेगी ?
     पुणे, २७ जानेवारी - जवळजवळ १ किलो १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन मुंबईहून पुण्यात विक्रीसाठी घेऊन येणार्‍या दोघांना शनिवारवाड्याजवळ पोलिसांनी अटक केली. अजित सोढा आणि चंदन माळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शासनाधीन केलेल्या मालाची किंमत १ कोटी रुपये आहे. (ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळून तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्याचे षड्यंत्र आखणार्‍यांची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत, ही सर्वसामान्यांची अपेक्षा ! - संपादक)

पनवेल येथील कु. कृष्णाली जोशी हिला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक !

कु. कृष्णाली जोशी हिचे अभिनंदन ! 

     पनवेल - येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. कृतिका कृष्णकांत जोशी यांची मुलगी कु. कृष्णाली जोशी हिने पनवेल पंचायत समिती, शिक्षण विभाग, पनवेल तालुका विज्ञान प्रदर्शनातील वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या गटातील एकूण १५० मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेत दिलेल्या 'फास्ट फूडचे शरिरावर होणारे दुष्परिणाम' या विषयावर तिने भाषण केले. स्पर्धेेला जातांना तिला अनेक अडचणी आल्या; परंतु सनातन प्रभातमध्ये देण्यात येणार्‍या उपायांविषयीच्या माहितीमुळे तिने तशी कृती केली आणि अडचणींवर मात करून यश मिळवले. कु. कृष्णालीने भारतीय संस्कृती सोडून आपण करत असलेले पाश्‍चात्त्यांचे अनुकरण, फास्टफूडमधील अतिरिक्त चरबीमुळे होणार्‍या व्याधी आणि त्यांचे धोके अन् हिंदु संस्कृतीमधील चौरस आहाराचे महत्त्व यांविषयीची सूत्रे तिने भाषणातून सांगितली. 

शनिशिंगणापूर प्रकरण : हिंदूऐक्याची तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांना चपराक !

     २६ जानेवारी २०१६ ! हिंदूऐक्याने महाराष्ट्रवासियांना घालून दिलेला धड्यामुळे इतिहासात कोरून ठेवण्यासारखा दिवस ! धर्मविरोधी भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांना २६ जानेवारी या दिवशी हिंदूंच्या संघटितपणामुळे शनिचौथर्‍यावर प्रवेश करता आला नाही. हा तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांचा, त्यांच्या पाठीराख्या राष्ट्रवादी काँग्रेस, नास्तिकवादी संघटना यांचा पराभव असून हिंदुशक्ती जर संघटित झाली, तर श्रद्धास्थानांवरील आघात परतवून लावता येतात, हे यातून सिद्ध झाले आहे !

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी झेड सुरक्षा स्वीकारली ! - गोवा पोलीस

     पणजी - केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी झेड सुरक्षा स्वीकारल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक टी.एन्. मोहन यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. केंद्रीयमंत्री पर्रीकर यांनी यापूर्वी संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतरही गोव्यात वास्तव्यास असतांना झेड सुरक्षा स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. पोलीस महासंचालक मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांना गोवा पोलिसांनी संरक्षणमंत्री पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पोस्टकार्ड सचिवालयात प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. या धमकी प्रकरणाचा तपास चालू आहे.

धमकीचे पत्र पाठवल्याच्या प्रकरणी सिरीयाचा नागरिक चौकशीसाठी पोलिसांच्या कह्यात

विदेशी नागरिक राज्यात अवैध वास्तव्य कसे करतात ? असे किती विदेशी नागरिक 
अवैधरित्या वास्तव्य करत आहेत, त्याचा शासनाने शोध घ्यावा ! 
    पणजी - संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान यांना हानी पोहोचवण्याची धमकी दिल्याचे पत्र पाठवल्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांनी एका सिरियन नागरिकाला कह्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिरीयाचा उपरोल्लेखित नागरिक देशात अवैधरित्या वास्तव्य करत होता. सिरीया येथील एक नागरिक देशात अवैधरित्या वास्तव्य करतांना हरवल्याची आणि तो गोव्यात वास्तव्यास असल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. या नागरिकाला २५ जानेवारी या दिवशी कह्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी चालू आहे. याबरोबरच येमिनी आणि नायजेरिया येथील प्रत्येकी एका नागरिकाला बागा येथील एका कॅसिनोमधून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. यांची आतंकवादविरोधी पथक आणि कळंगुट पोलीस चौकशी करत आहेत.

भारतियांनो, नाकर्ते राज्यकर्ते काही करतील, अशा भ्रमात न रहाता देश वाचवण्यासाठी संघटित होऊया !

कु. चेतना सकपाळ
      जानेवारी २०१३ मध्ये आमच्या दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सदर निबंध ईश्‍वराने सुचवला. त्याच्याच कृपेने या निबंधाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. निबंधाचे विषय महाविद्यालयाकडूनच सांगण्यात आले होते. त्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे. 
१. मुसलमानांची धर्माविषयीची कट्टरता 
१ अ. मुसलमान विद्यार्थिनींमध्येही धर्माविषयीची सतर्कता असणे : निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यावर हा निबंध सर्वांना वाचण्यासाठी बाहेरील काचपेटीत लावण्यात आला. त्या वेळी फारच थोड्या हिंदु मुलांनी तो निबंध वाचला; परंतु मुसलमान मुलींनी मराठी नीट वाचता येत नसूनही पूर्ण निबंध वाचला. यावरून त्यांच्यातील धर्माविषयीची सतर्कता लक्षात येते.

ढासळलेली अभिरुची !

     दूरचित्रवाहिनी ही आजच्या काळात आवश्यक बनलेली गोष्ट आहे. दूरचित्रवाहिनी शिवायही पूर्वी जग होते आणि त्या वेळी लोक मनाने अधिक जवळ होते, हे आजच्या पिढीला खरे वाटत नाही. आजच्या तथाकथित आधुनिक जगात विभक्त कुटुंबेच अधिक त्यामुळे सदस्यांची घरात कमतरता असल्यामुळे संभाषणही मोजकेच होते. त्यात प्रत्येक जण त्याच्यापाशी उपलब्ध असलेला वेळ कुटुंबासोबत व्यतीत न करता सामाजिक संकेतस्थळे किंवा दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पहाण्यास प्राधान्य देतो. सध्या सर्व वयोगटातील लोकांसाठी असंख्य वाहिन्या, असंख्य कार्यक्रम उपलब्ध असतात. त्यामुळे प्रत्येक जण सरासरी ३-४ घंटे त्याच्यासमोर बसतो. त्यावर दाखवत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाशी पूर्णपणे समरस होऊन स्वत:च्या आयुष्यात त्या गोष्टी अंतर्भूत करायचा प्रयत्न करत असतो. याच कारणास्तव त्याला इडियट बॉक्स म्हटले जाते.

तथाकथित सुधारक महिलांनो, धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करून श्री शनैश्‍वराचा कोप ओढवून घेऊ नका !

सौ. अंजली अजय जोशी
१. पुरुषांची बरोबरी करणार्‍या पुरोगामी महिलांचा उच्छाद ! 
    सध्या सर्वत्र पुरुषांची बरोबरी करण्याच्या कल्पनेने पुरोगामी महिलांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत पुरुषांसारखी केशभूषा, वेशभूषा, शिक्षण, नोकरी, परदेशगमन इथपर्यंत हिंदु समाजाने खपवून घेतले; कारण ते कौटुंबिक क्षेत्रापुरते मर्यादित होते; पण हा महिलांचा उच्छाद आता पराकोटीला पोचून तो धर्मक्षेत्रातही हस्तक्षेप करू लागला आहे.
२. हिंदु धर्माची महानता !
अ. धर्म हा हिंदूंचा प्राण आहे. प्राणावर कुणी आघात करत असेल, तर जसा मनुष्याला आक्रमणकर्त्याला विरोध करण्याचा आणि आक्रमण परतवून लावण्याचा अधिकार असतो, त्याचप्रमाणे संत अन् हिंदुत्वनिष्ठ यांना धर्मावरील आक्रमण परतवून लावण्याचा अधिकार आहे.
आ. हिंदु धर्म हा अपौरुषेय म्हणजेच भगवंतनिर्मित आहे. या धर्माच्या रक्षणार्थ संतमहंतांनी, राजेमहाराजांनी प्राणांचे बलीदान दिले आहे.

...राष्ट्रगीतासाठी उभे रहाण्याची तसदीही न घेणारे आम्ही भारत माझा देश आहे, असे म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे आहोत काय ?

          
     २६ जानेवारीला देशप्रेमाचे उमाळे सर्वत्र पहायला मिळाले. दूरचित्रवाहिन्या, प्रसिद्धीमाध्यमे तसेच सर्वच स्तरांवरून देशप्रेम, तसेच त्याच्याशी संबंधित कार्यक्रम दाखवले जात असल्याने दोन-चार दिवस जवळपास प्रत्येक भारतीयाची छाती गौरवाने फुलून जाते; मात्र सगळ्यात महत्त्वाचे आहे की हेच देशप्रेम वर्षभर कुठे जाते ? अगदी छोटे उदाहरण द्यावयाचे म्हटले तर, सर्वत्र शाळांमध्ये प्रार्थनेच्या अगोदर राष्ट्रगीत म्हटले जाते. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणारे पालक बहुतांश वेळा या राष्ट्रगीताच्या कालावधीत त्या परिसरातच असतात. त्याच समवेत अनेक शाळांचे-महाविद्यालयांचे राष्ट्रगीत रस्त्यावर असलेल्या नागरिकांना ऐकू जाते; मात्र हे राष्ट्रगीत चालू असतांना केवळ एक मिनिटही जागेवर उभारण्याची अनास्थानच सर्वत्र दिसून येते. चित्रपटगृहांमध्ये बहुतांश पहिला खेळ चालू होण्यापूर्वी आणि काही ठिकाणी सर्वच खेळांपूर्वी राष्ट्रगीत वाजवण्यात येते. यांसाठी उभारणेही आता भारतियांच्या जीवावर येत आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
    स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

विदेशातील भोगवादी वातावरणात कुटुंबव्यवस्थेची झालेली विदारक स्थिती !

१. इंग्लंडसारख्या सुधारलेल्या देशातील घटस्फोटांचे विस्मयकारक प्रमाण 
अ. पालकांनी घेतलेल्या घटस्फोटामुळे प्रतिवर्षी २ लक्ष मुलांना कौटुंबिक स्नेहापासून वंचित व्हावे लागते. 
आ. पालकांच्या घटस्फोटामुळे प्रतिवर्षी ५ सहस्र मुलांना अतिनिर्घृण वागणुकीचे शिकार बनावे लागते.
इ. लग्न आणि घटस्फोट यांचे प्रमाण १० वर्षांपूर्वी १०:१ (एक दशांश) होते , तर आज ते प्रमाण २:१ (एक द्वितीयांश) इतके वाढले आहे. 
ई. घटस्फोट न झालेल्यांशी वा घटस्फोटितांशी नवविवाहेच्छू मुलामुलींचे लग्न जमण्याचे प्रमाण ५०:५० असे आहे.
उ. कॅन्टरबरी येथील आर्चबिशप डॉ. डोनाल्ड कॉगन यांनी हाऊस ऑफ कॉमन्स या वरिष्ठ सभागृहात या घटस्फोटामुळे सामाजिक दायित्वाची वृत्ती आणि नैतिक पातळी यांचा र्‍हास झाल्याची तक्रार (गार्‍हाणे) करून कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. आतातरी कुटुंब कल्याण खाते उघडा अशी मागणी केली आहे.

अण्वस्त्रांसहित युद्धसज्ज पाकिस्तानकडून मैत्रीची अशा ठेवणे विफल !

     भारताने लष्करी कारवाई करू नये, यासाठी पाकिस्तानने ११० ते १३० अण्वस्त्रे सज्ज ठेवली आहेत. कदाचित हा आकडा मोठाही असू शकेल. शिवाय पाकच्या अण्वस्त्रसज्ज्तेमुळे दक्षिण आशियातील या दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांत आण्विक युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही अमेरिकी काँग्रेसच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पाकने कोणत्या कारणासाठी अण्वस्त्रे सज्ज ठेवली आहेत, हे अण्वस्त्रांच्या आकड्यांसहित अमेरिकेला ज्ञात आहे. असे असतांना एव्हाना भारताचा मित्र म्हणून अमेरिकेने आतंकवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकवर भारतास सोबत घेत आक्रमण करणे अपेक्षित होते. अमेरिकेची पाकच्या संदर्भातील भूमिका नेहमी भारतासाठी हानीकारक आणि पाकसाठी लाभदायक ठरली आहे. महत्त्वाचे सूत्र म्हणजे आपल्या कह्यातील अण्वस्रांच्या सुरक्षिततेविषयी जागतिक समुदायाच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न पाक करत आहे.

हिंदु धर्म शास्त्रावर अभ्यासहीन टीका करून स्वतःची अनंत जन्मांची अपरिमित हानी करून घेऊ नका !

सौ. वर्षा ठकार
     २६.१.२०१६ या दिवशी तृप्ती देसाई नावाची स्त्री शनि शिंगणापूर येथे चौथर्‍यावर प्रवेश करणार असल्याचे समजले. त्या वेळी घडलेेली विचारप्रक्रिया येथे देत आहे.
१. हिंदु धर्म एक थोतांड असल्याचे मानून अधर्मी विचार बळावणे 
    माझ्या आयुष्यात सनातन संस्था आली नसती, तर आज मीसुद्धा तृप्ती देसाईंप्रमाणे एक स्टंट वूमन झाले असते ! सर जे.जे. गर्ल्स स्कूल, फोर्ट, मुंबई या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुद्धीचा भेद करणारे पुस्तक वाचून मीसुद्धा हिंदु धर्मातील प्रथा, धर्माचरण, देवी-देवता, यांविषयी विकल्प आल्याने हे सर्व थोतांड आहे, असा अधर्मी विचार करू लागले होते. त्या वेळी माझ्या मनात पुढील प्रश्‍न थैमान घालत होते.

आंग्ल संस्कृतीला डोक्यावर चढवणारे भाजप शासन !

     गोवा येथे पर्यटनाच्या दृष्टीने फेणी (काजू अथवा माडापासून बनवलेले मद्य) लोकप्रिय करण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे. काजू फेणीला हेरिटेज स्पिरिट म्हणून मान्यता मिळणार आहे. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेणीसंबंधी धोरण शासन घोषित करणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

     मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो, तरी माझ्या वडिलांनी कधी जानवे वापरले नाही आणि मीही वापरले नाही. मी वडिलांना जानवे कशासाठी घालायचे ?, असा प्रश्‍न विचारत असे तेव्हा, किल्ली अडकवण्यासाठी, असे ते मला उत्तर द्यायचे. मला ब्राह्मण मित्र कमी आणि बहुजन, दलित, मुसलमान मित्र अधिक आहेत. मला संकटकाळी बहुजनांनीच तारले. ही मानवता मला अधिक भावते. - श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे (दैनिक सनातन प्रभात, २०.१.२०१६)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) तृप्ती देसाई यांचे दर्शन नव्हे, प्रदर्शन !

     भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना सुपा येथे अडवल्यानंतर काहीही झाले, तरी आम्ही शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढणारच, असे दर्पयुक्त उद्गार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काढले. या त्यांच्या वक्तव्यातून त्यांना शनिदेवाचे दर्शन घ्यायचे नसून, केवळ प्रदर्शन करायचे आहे, हेच स्पष्ट होते.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्या यांचे सामाजिक संकेतस्थळावरून उघड झालेले खरे स्वरूप !

     भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना २६ जानेवारी २०१६ या दिवशी पोलिसांनी कह्यात घेताच ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जयघोष केला. त्यांच्यासमवेत असलेल्या महिला या भक्त नसून काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या, तसेच तृप्ती देसाई यांनी वर्ष २०१२ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेसकडून लढवली आहे. तृप्ती देसाई यांच्या फेसबूकवर त्यांचे काँग्रेस नेत्यांनी सत्कार करतांनाचे छायाचित्र, तसेच राजकीय कार्यक्रमांची छायाचित्रे आहेत. स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्या अशा प्रकारच्या मोहिमा काढून हिंदु धर्मविरोधी भूमिका घेत आहेत. शनिशिंगणापूर आंदोलनाविषयी तृप्ती देसाई यांनी कालपर्यंत सर्वांना फसवले; मात्र आता त्यांचा खरा राजकीय चेहरा आणि हेतू उघड झाला. तृप्ती देसाई यांनी हे आंदोलन केवळ राजकीय हितसंबंधातूनच उभे केले आहे, हेच यातून उघड झाले आहे.

शनिचौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याविषयी संत-महंत यांची भूमिका आणि धर्मशास्त्र

शनिचौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यास हरकत नसावी !
 - महंत नरेंद्र गिरी, अध्यक्ष, आखाडा परिषद
     अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही शनिशिंगणापूरमधील शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळण्यास कोणतीही हरकत नसावी, अशी भूमिका मांडली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी महिलांना कोणत्याही मंदिरात प्रवेशबंदी नाकारली जाऊ नये. महिला असो वा पुरुष मंदिर प्रवेशाबाबत दोघांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
श्री श्री रविशंकर यांनीही केले महिलांचे समर्थन !
     शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या महिलांचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही समर्थन केले. अशा प्रकारे महिलांशी भेदभाव करणे योग्य नाही. आपल्या शास्त्रात अशा बंदीबाबत कुठेही उल्लेख नाही. महिला आणि पुरुष यांना समान अधिकार मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

घरात तीव्र वास्तूदोष असूनही दांपत्याला केवळ गुरुकृपेमुळे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करता येणे शक्य होत असल्याचे पू. भैय्याजींच्या सेवाधारीने सांगितल्यावर प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

१. घराचा नकाशा पाहून पू. भैय्याजींच्या सेवाधारीने घरात वास्तूदोष आणि पितृदोष असल्याचे अन् केवळ गुरुकृपेने पूर्णवेळ साधना करू शकत असल्याचे सांगणे : पू. भैय्याजींच्या उपायांना गेले असतांना स्वतःला आणि माझ्या यजमानांना होणार्‍या त्रासासंदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी घरात वास्तूदोष आणि पितृदोष असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्या एका सेवाधारीला आमच्या घराचा नकाशा दाखवला. त्या वेळी ते म्हणाले, घरात तीव्र वास्तूदोष आहे. अशा वास्तूत राहून कोणी साधना करूच शकत नाही. तुम्ही दोघेही गुरूंजवळ राहून पूर्णवेळ साधना करत आहात; म्हणूनच इतकी प्रतिकूल वास्तू असूनही साधना करू शकता. हे केवळ गुरूंच्या कृपेमुळेच आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेने शक्य होत आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही दोघेही आश्रमात राहून साधना करत असल्यामुळे सर्व काही गुरूंवर सोडायचे; कारण तेच आपला सर्व भार सांभाळत असतात, बाकी काही काळजी करायची नाही.

कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणारी कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे) !

कु. ऐश्‍वर्या जोशी
१. प.पू. डॉक्टरांनी बालसाधकांना कु. ऐश्‍वर्याकडून शिकण्यास सांगणे
      आमची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद झाला. तिच्यामुळे आमच्या बालसंस्कारवर्गाचे चित्रीकरण झाले. प.पू. डॉक्टर म्हणाले, ऐश्‍वर्याकडून शिका, प्रयत्न करा. त्यांनी तिला सांगितले, तुझ्यामुळे या सर्वांना किती आनंद झाला ! सर्वांना किती आनंद देतेस !
२. पोट दुखत असतांना भावजागृतीचे उपाय केल्यावर पोटदुखी थांबणे
     एकदा माझ्या पोटात पुष्कळ दुखत होते. तेव्हा तिने माझ्या पोटावर हात ठेवून भावजागृतीचा प्रयत्न केला. ती म्हणाली, श्रीकृष्ण, आपल्याला आताच भेटत आहे. त्याचे चैतन्य तुला जाणवत आहे. श्रीकृष्ण तुझ्या पोटावर हात ठेवून तू ठीक होशील. काळजी करू नकोस, असे सांगत आहे. तिने असे सांगितल्यावर माझे पोट दुखणे थांबले आणि माझा नामजप चालू राहिला. त्यामुळे मी पुढची सेवा आनंदाने केली. (साधिकेतील उत्कट भावामुळे तिला आलेली ही अनुभूती आहे. ती सर्वांनाच येईल, असे नाही ! - संपादक)

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून अंतर्मनाची शुद्धी करण्याचे महत्त्व

      अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेसाठी मी सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास होतो. त्या वेळी मी रहात असलेल्या खोलीची स्वच्छता करण्यास आरंभ करणार इतक्यात माझ्या मनात खोली स्वच्छ दिसत असल्याने स्वच्छतेची आवश्यकता नाही, असा विचार आला. मात्र प्रत्यक्षात खोलीची स्वच्छता करण्यास आरंभ केल्यावर खोलीच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांत पुष्कळ कचरा असल्याचे मला दिसू लागले. कुठे कुठे कचरा आहे, हे शोधून काढून स्वच्छता करायला हवी, असे लक्षात आले. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, मी आणि माझे मन या खोलीप्रमाणे आहे. आरंभी आपल्याला मी चांगली व्यक्ती असून माझ्यात फारसे स्वभावदोष नाहीत, असे वाटते; परंतु ज्या वेळी आपण स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा विविध दोष वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर पडू लागतात, म्हणजेच विविध प्रसंगांत प्रकट होऊ लागतात. ते दोष नष्ट करणे आवश्यक आहे.
- श्री. अतुल बाली, देहली, भारत (२४.५.२०१५)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने नायगारा, कॅनडा येथे घेण्यात आलेल्या प्रवचनांतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

१. थोरोल्ड, कॅनडा
      ७.१०.२०१५ या दिवशी प्रारब्ध या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात उपस्थित जिज्ञासूंनी मनमोकळेपणाने पुष्कळ प्रश्‍न विचारले. त्यामुळे हे केवळ प्रवचन न रहाता आध्यात्मिक चर्चा वाटत होती.
१ अ. जिज्ञासूंनी विचारलेले प्रश्‍न
१. आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी प्रारब्धाने घडत असतील, तर अपघाताने काही घडू शकते का ?
(उत्तर : अपघात प्रारब्धाने किंवा क्रियमाण कर्माने घडू शकतो.)
२. माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती आणि मी वेगवेगळे नामजप करत असू, तर त्यातून काही समस्या निर्माण होतील का ?
(उत्तर : प्रारंभिक अवस्थेत काही समस्या निर्माण होत नाहीत. दोघांपैकी एक पुढच्या पातळीचा असेल, तर त्याचा दुसर्‍यावर परिणाम होतो आणि तो त्याच्या साधनेला पूरक ठरतो. दोघांची साधना निरनिराळी असली, तरी समस्या निर्माण होत नाही.)

स्वीकारण्याची वृत्ती नसणे या अहंच्या पैलूवर मात करण्याच्या संदर्भात स्पिरिच्युअलसायन्स रिसर्च फाउण्डेशनचे प्रमुखमार्गदर्शक पू. सिरियाक वाले यांनी केलेले मार्गदर्शन

पू. सिरियाक वाले
१. स्वीकारण्याची वृत्ती नसणे या दोषाची कारणे
अ. ईश्‍वरावरील श्रद्धा अल्प असणे
आ. स्वतःकडून आणि इतरांकडून अपेक्षा असणे
इ. मला इतरांपेक्षा जास्त कळते हा अहं असणे
ई. स्वतः साधना करत असल्याने कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यापासून स्वतःला वेगळे समजणे
उ. भविष्याची काळजी / चिंता वाटणे
ऊ. नवीन परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटणे
ए. माझा चांगला हेतू इतरांच्या लक्षात यावा, असे वाटणे

सप्तर्षी जीवनाडीचे वैशिष्ट्य

१. महर्षींच्या आज्ञेशिवाय जीवनाडी वाचण्याचे शिक्षण एखाद्याला 
दिले, तर तो केवळ वाचन करू शकणे; परंतु त्याचे फळ त्याला न मिळणे
      पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षी जीवनाडीचे वैशिष्ट्य सांगितले की, पुढे सप्तर्षी जीवनाडीचे वाचन कोण करणार ?, या काळजीने समजा आपण एखाद्याला नाडीपट्टी वाचण्याचे शिक्षण दिले, तर तो ती वाचू शकेल; परंतु महर्षी म्हणतात, त्याचे फळ मात्र त्याला मिळणार नाही; कारण त्याने नाडीपट्टी वाचावी, अशी आमची इच्छा नाही.

हेवा वाटणे, या स्वभावदोषाच्या संदर्भात पू. (सौ.) योया वाले यांनी केलेले मार्गदर्शन

      एखाद्या साधकातील गुणाविषयी आपल्याला हेवा वाटत असेल, तर त्या साधकाकडून तो गुण आपल्यामध्ये विकसित करण्यास मिळत असल्याविषयी आपण त्याच्याप्रती कृतज्ञ रहायला शिकायला हवे. हेवा करण्यापेक्षा समोरच्या गुणसंपन्न साधकातील गुण आत्मसात करून स्वतःची प्रगती करून घ्यावी

अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे

पू. (सौ.) योया वाले
     अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाला आरंभ झाल्यावर खोलीतील चैतन्यात वाढ होऊन संपूर्ण खोली चैतन्याने भरून गेली. मला सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर आमच्यासमोर उभे असून कार्यशाळेत उपस्थित साधकांकडे ते पहात आहेत, असे जाणवले आणि मला पुष्कळ आनंद वाटला. तसेच सूक्ष्मातून मला प.पू. डॉक्टर पृथ्वीवर उभे आहेत. त्यांच्या आज्ञाचक्र स्थानी देवतातत्त्व आकृष्ट होत असून त्यांचा तोंडवळा आनंदी आणि तेजस्वी झाला आहे. संपूर्ण विश्‍वाला व्यापून टाकणारे प्रकाशरूपी चैतन्य प.पू. डॉक्टरांच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत झालेे आणि हे प्रकाशरूपी चैतन्य संपूर्ण विश्‍वभर पसरत आहे, असे दिसले.
- (पू.) सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्., युरोप (१०.९.२०१५)

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका डॉ. (सौ.) लिंडा बोरकर यांना आलेल्या अनुभूती

डॉ. (सौ.) लिंडा बोरकर
१. अनेक वर्षांपासून होणारे शारीरिक 
त्रास आध्यात्मिक उपाय केल्याने न्यून होणे
      तरुणपणापासून मला मधेच अंधूक दिसून डोळ्यांसमोर वेड्यावाकड्या (चमकणार्‍या) रेषा दिसायच्या. त्यानंतर डोके दुखून कधी कधी उलटी होत असे. उलटी सहजपणे होत असे किंवा काही वेळा बरे वाटण्यासाठी उलटी काढावी लागत असे. त्यानंतर आले आणि लिंबू यांचा रस घेतल्यावर मला चांगली झोप लागून बरे वाटत असे. उलटी झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर मला डोकेदुखीचा त्रास होत असे.
      हे त्रास मला अचानक आणि वर्षातून ४ ते ६ वेळा उद्भवत असत. वर्ष २००४-२००५ मध्ये मला या त्रासावर आध्यात्मिक उपाय सांगण्यात आले. त्याप्रमाणे एकदा त्रास होऊ लागल्यावर मी उदबत्ती लावणे, डोळ्यांवरील त्वचेवर विभूती लावणे, मीठ-पाण्याचे उपाय करणे, नामजप करणे आदी उपाय केले. त्यानंतर मी मिठाच्या पाण्याने माझा तोंडवळा धुतला. त्याच क्षणी माझी डोकेदुखी थांबली. त्यानंतर प्रत्येक वेळी मी उपाय करण्यास आरंभ केला आणि त्यामुळे डोकेदुखीचा कालावधी अल्प होत गेला. वर्ष २००८ मध्ये एकदा रस्त्यावरून चालतांना अचानक पुन्हा मला त्रास चालू झाला.

कु. पूनम साळुंखे हिचे गुपित आधीच समजणारी कु. अनुराधा जाधव !

     कु. पूनम साळुंखे हिने पू. जाधवकाका आणि त्यांची मुलगी कु. अनुराधा यांना दूरभाष करून सांगितले, हिंदू वार्तामध्ये आज एक महत्त्वाची बातमी आहे. ती पहा. त्यावर पू. जाधवकाका म्हणाले, बरं !; मात्र कु. अनुराधा म्हणाली, आज गायत्रीताईने (मोठ्या बहिणीने) बातम्या सादर केल्या आहेत ना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे,
 स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास 
तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

  
परात्पर गुरु डॉ. आठवले
   आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा 
Add caption
     नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

शस्त्रास्त्रांचे केवळ प्रदर्शन नको !

संपादकीय
     प्रजासत्ताकदिन किंवा स्वातंत्र्यदिन या दिवशी देहलीच्या राजपथावर भारतीय सैन्याचे ध्वजसंचलन असते. ते बघण्यासाठी भारतीय जनतेमध्ये कमालीची उत्सुकता असते. ती असायलाच हवी; कारण त्या वेळी आपला देश किती युद्धसज्ज आहे, याचा अंदाज देशवासियांना होतो आणि आपली छातीही अभिमानाने फुलून येते. हे ध्वजसंचलन करण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. स्वतःकडील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन घडवून शत्रूवर वचक बसवणे आणि जनतेलाही आश्‍वस्त करणे, ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. हे दोन्ही हेतू साध्य होतात का ?, हा कळीचा प्रश्‍न आहे. प्रतिवर्षी भारतीय सैन्यात नवनवीन आधुनिक शस्त्रे भरती होत असतात; पण त्यांच्या निर्मितीमुळे किंवा त्यांच्या प्रदर्शनामुळे पाक किंवा चीन यांच्या उरात धडकी भरत नाही. असे का ? या वेळचा प्रजासत्ताकदिन साजरा करतांना पठाणकोटच्या कटू आठवणी भारतियांच्या मनात घोळत होत्या. इसिसच्या वाढत्या कारवाया, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इसिसच्या हिटलिस्टवर असल्यामुळे या वेळी अधिकच सुरक्षा बाळगली जात होती. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन घडवायचे, हा विरोधाभास झाला. या संचलनाच्या वेळी झालेला आर्थिक खर्च आणि वापरण्यात आलेले मनुष्यबळ जर आतंकवादी आणि शत्रूराष्ट्र यांना धडा शिकवण्यासाठी वापरले असते, तर त्याचा कैकपटीने देशालाच लाभ झाला असता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn