Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. झुरळे महाराज यांची आज पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

पू. पृथ्वीराज हजारे यांचा आज वाढदिवस

ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी यांच्या संघटनशक्तीचा विजय !


पोलिसांनी दुपदरी बॅरिकेड्स लावून ठेवला चोख बंदोबस्त !
शनिदेवाच्या कृपेने भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही महिलांना सुपे येथे पोलिसांनी अडवले !
शनिशिंगणापूर येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीचे प्रकरण !
शनिभक्तांनी जागृत शनिदेवाच्या अस्तित्वाची घेतली प्रचीती !
    
     देशात आज आतंकवादी आक्रमणाचे सावट असतांना या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी पोलीस बळाचा वापर होणे आवश्यक आहे; मात्र शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोह करू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांना रोखण्यासाठी शनिशिंगणापूर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. अशा धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही महिलांना देशद्रोहाबद्दल कारागृहात टाका !
  श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, २६ जानेवारी (वार्ता.) - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेव ! त्या ठिकाणी असणार्‍या स्वयंभू शनिदेवाच्या प्रचिती आतापर्यंत अनेकांनी घेतल्या आहेत. धर्मो रक्षति रक्षितः । म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो, या धर्मवचनाची अनुभूती २६ जानेवारीच्या दिवशी आली. स्वतःला श्री शनिदेवांचे भक्त म्हणवून घेत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तीव्र अहंकाराने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारले होते. शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसाठी प्रवेश निषिद्ध असूनही त्या चौथर्‍यावर चढून दर्शन करण्याचा या महिलांचा हेका होता.
या आंदोलनाची ठिणगी पेटताच धर्माभिमानी, शनिभक्त, हिंदुत्ववादी महिला, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे सदस्य यांनी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा वणवा पेटवला.

वसंत पंचमीला भोजशाळेत हिंदू पूर्ण दिवस पूजन करणारच !

महाराजा भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा
धर्मसभेला उपस्थित सहस्रो हिंदूंचा निर्धार
     यंदा १२ फेब्रुवारीला वसंत पंचमी येत असून या दिवशी शुक्रवार आहे. वसंत पंचमी हा हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने वर्षातून एकदा केवळ याच तिथीला या मंदिरात पूजन करण्याची संधी हिंदूंनी दिली जाते, तर प्रत्येक शुक्रवारी मुसलमान नागरिकांना या मंदिराच्या आवारात अवैधरित्या बांधण्यात आलेल्या कमाल मौलाना दर्ग्यात नमाजपठण करण्यास दिले जाते. शुक्रवारी येणार्‍या वसंत पंचमीच्या दिवशी पूर्ण दिवस लाखोंच्या संख्येत जमणार्‍या हिंदूंना तेथे पूजन करण्याची अनुमती देऊन मुसलमान नागरिकांना अन्यत्र नमाजपठण करण्यास द्यावे, अशी मागणी येथील हिंदू करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांच्या बैठका घेऊन चर्चा चालू केली आहे आणि काही सुवर्णमध्य निघतो का, ते पाहिले जात आहे. त्यासमवेतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करू शकतील, अशांची आधीच धरपकड करण्यास पोलीस प्रशासनाने आरंभ केला आहे.

(म्हणे) करसेवकांवर गोळीबाराचा आदेश दिल्याविषयी आजही दुःख वाटते !

असे आहे, तर मुलायमसिंह करसेवकांची क्षमा मागणार का ?
मुलायमसिंह यादव यांचे नक्राश्रु
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - करसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याविषयी मला आजही दुःख वाटते; पण धार्मिक स्थळाच्या संरक्षणासाठी तसा आदेश देणे आवश्यक होते, असे विधान करत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे.

धार्मिक भावना दुखावल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ ! - श्री. बाळासाहेब बानकर, सरपंच, शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर येथे पत्रकार परिषद
      शनिशिंगणापूर - आमच्या परंपरेला तडा गेला, तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू, असा सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केला आहे. याआधीही देसाई यांनी येथील परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वेळी आम्ही शांततेत त्यांना गावाबाहेर जाऊ दिले. आता पुन्हा आमच्या भावना दुखावल्या गेल्यास शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि इतर सर्व संघटना त्यांना अतिथी देवो भव या पद्धतीने नाही, तर आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असे प्रतिपादन येथील सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी केले. येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ते बोलत होते.
अरुणाचल प्रदेशात राष्ट्र्रपती राजवट लागू
      नवी देहली - भारताच्या इशान्येकडील अरुणाचल प्रदेशात राष्ट्र्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या या शिफारसीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यता दिली. त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या आणखी एकाने न्यून झाली आहे. या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, तसेच काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मावळते मुख्यमंत्री नबाम टुकी यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्र्रपतींची भेट घेऊन हस्तक्षेपाची मागणी केली.
      गेल्या काही मासांपासून अरुणाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजपने आमदारांची फोडाफोडी करून राज्यातील काँग्रेसचे नबाम टुकी यांच्या नेतृत्वाखालील शासन पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी घरोघरी पुजारी जाणार !

तेलुगु नववर्षानिमित्त आंध्रप्रदेश शासनाची विशेष योजना !
आंध्रप्रदेश शासनाचा आदर्श इतर राज्यांनीही घ्यावा !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - आंध्रप्रदेशच्या नायडू शासनाकडून तेलुगु नववर्ष युगादी (गुढीपाडवा) पासून नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक मंदिरांचे पुजारी विवाह आणि जन्मासह विशेष घटनांच्या वेळी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देणार आहेत. एखाद्या कुटुंंबात निधन झाल्यास स्थानिक शिव मंदिराचे पुजारी पवित्र अभिषेक जल घेऊन संबंधित कुटुंबाकडे जातील. राज्यशासनाचे मंत्री पी. माणिक्याला राव म्हणाले, ही योजना मुख्यत्वे दलित समाजामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून सिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार करण्यात येणार असून ही सेवा विनामूल्य असणार आहे.

नेताजींच्या विरोधात नेहरू आणि माऊंटबॅटन यांनी रचले होते षड्यंत्र !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात्यातील राजश्री चौधरी यांचा आरोप
      मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - नेताजींच्या जीवनाशी संबंधित आतापर्यंत सार्वजनिक झालेल्या धारिकांमध्ये त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात पुष्कळ मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. त्या षड्यंत्राचे मुख्य सूत्रधार नेहरू आणि माऊंटबॅटन होते, असा गंभीर आरोप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भगिनी स्नेहलता यांची नात राजश्री चौधरी यांनी केला. येथील स्वतंत्रता सेनानी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चौधरी पुढे म्हणाल्या, नेताजींच्या जीवनाशी निगडित सर्वच धारिका सार्वजनिक करायला हव्या. त्याचसमवेत नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपत्तीशी संबंधित रहस्यमय गोष्टीही उलगडून सांगायला हव्यात. ज्यांनी ती संपत्ती तेव्हा लुटली, त्यांच्या वंशजांकडून आता तिची परतफेड करून घ्यायला हवी; कारण ते धन राष्ट्रकार्यासाठी एकत्र करण्यात आले होते. त्याच कामासाठी त्याचा विनियोग व्हायला हवा, तसेच देशात आझाद हिंद सेनेच्या नियमानुसार कारभार चालू केल्यास या देशाचा खर्‍या अर्थाने उद्धार होईल.


भारतात दुधाच्या कारखान्यांहून पशूवधगृहांची संख्या अधिक !

गेल्या ६८ वर्षांमध्ये आतापर्यंतच्या शासनांनी देशाची
केलेली अधोगती ! गोवंश हत्या रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेले भयानक वास्तव !
महाराष्ट्रात सर्वाधिक पशूवधगृहे
      नवी देहली - भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक आहे; परंतु देशात दुधाचे कारखाने आणि प्रकल्प यांच्याहून पशूवधगृहांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत पशूवधगृहे आहेत, तर दुधावरील प्रक्रिया करणारे केवळ २१३ नोंदणीकृत कारखाने आणि ७९३ द्रव दुधाचे प्रकल्प आहेत. माहिती अधिकराच्या अंतर्गत ही माहिती मिळवणारे रमेश वर्मा म्हणाले, देशातील मांस निर्मितीचे कारखाने दूध उत्पादनाच्या कारखान्यांपेक्षा अधिक आहेत. ही धक्कादायक गोष्ट आहे.

तलाक असे तीन वेळा उच्चारल्याने घटस्फोट होत नाही, तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक ! - उच्च न्यायालय

आता न्यायालयाचा हा निर्णय न मानणार्‍यांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे ?
      मुंबई, २६ जानेवारी - तलाक असे तीन वेळा उच्चारल्याने घटस्फोट होत नाही, तर त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका मुसलमान दांपत्याच्या पोटगी प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले. तलाक घेण्यापूर्वी संसार व्यवस्थित चालण्यासाठी मध्यस्थांकडून किंवा नातेवाइकांकडून दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
      त्यात सकारात्मकता असल्याचे याचिकाकर्त्याने सिद्ध करायला हवे. तसे न झाल्यास हा तलाक कायदेशीर समजला जाणार नाही, असे निकालात म्हटले आहे.

अयोध्येत राममंदिरावरच मशीद बांधण्यात आली !

संचालक पदावर असतांनाच महंमद यांनी यासाठी कृती का केली नाही ?
अयोध्येत राममंदिराविषयी कितीही पुरावे मिळाले, तरी हिंदुद्वेष्टे आणि अल्पसंख्यांक
तेथे राममंदिर उभारू देणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे उत्तर विभागाचे माजी संचालक डॉ. के.के. महंमद यांचा दावा
      नवी देहली - पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अयोध्येत राममंदिरावर मशीद बांधण्यात आली, असा दावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे उत्तर विभागाचे माजी संचालक डॉ. के.के. महंमद यांनी केला आहे. डॉ. महंमद यांनी अयोध्येतील पौराणिक पुराव्यांवर आधारित मल्याळम् भाषेतील न्यान एन्ना भारतीयन (मी एक भारतीय) या पुस्तकात म्हटले आहे की, पुरातत्व सर्वेक्षणाच्या वेळी वादग्रस्त ढांच्यामध्ये सापडलेले अनेक पौराणिक अवशेष अयोध्येत राममंदिरावरच मशीद बांधण्यात आल्याचे दर्शवतात. डॉ. महंमद यांच्यानुसार वर्ष २००२-०३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त ढाच्याच्या आसपास उत्खनन करण्यात आले. तेथेही वादग्रस्त ढाच्याप्रमाणेच जवळपास ५० स्तंभ मिळाले होते. डॉ. महंमद यांच्यानुसार या उत्खननात मंदिरांच्या कळसाच्या खाली लावण्यात येत असलेला गोल दगड मिळाला. हा दगड केवळ मंदिरातच लावला जातो. अशाच प्रकारे जलाभिषेकाच्या नंतर मगरीच्या आकाराची जल प्रवाहित करणारी पद्धतीही आढळून आली आहे. या उत्खननामध्ये अनेक मुसलमान अधिकारी आणि कर्मचारी यांनासुद्धा विशेष करून सहभागी करण्यात आले होते.

आतंकवादाच्या सावटामुळे भारताचा ६७ वा प्रजासत्ताकदिन पार पडला कडेकोट बंदोबस्तात !

राष्ट्रीय सण वारंवार आतंकवादाच्या सावटाखाली पार पाडणारा जगातील एकमेव देश भारत !
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा औलांद यांची प्रमुख उपस्थिती
  • ४९ सहस्र सुरक्षा सैनिकांचा कडक बंदोबस्त
  • विविध राज्यांचे दर्शन घडवणारे रंगीबेरंगी चित्ररथ कार्यक्रमाचे आकर्षण
     नवी देहली - भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन, भारताच्या ताफ्यातील क्षेपणास्रे, सैनिकांचे पथसंचलन आणि चित्तथरारक कसरती, विविध राज्यांच्या परंपरा आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारे रंगीबेरंगी चित्ररथ, तसेच हवाई शो यांसह फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा औलांद यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ जानेवारी या दिवशी भारताचा ६७ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात पार पडला. या वर्षी पहिल्यांदाच फ्रान्सचे सैनिक पथसंचलनात सहभागी झाले होते. इसिसकडून होणार्‍या आतंकवादी आक्रमणाच्या धोक्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून देहलीत अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले होते.

भोंग्यावरून दिली जाणारी बांग ही राष्ट्रविरोधी !

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा इस्लामच्या प्रथांवर प्रहार
भारत शासन हे लक्षात घेईल का ?
     तेल अवीव - भोंग्यावरून कर्कश आवाजात देण्यात येणारी बांग ही एक राष्ट्रविरोधी आणि ध्वनीप्रदूषण करणारी कृती आहे. त्यामुळे अशा देशविरोधी कृतींवर बंदी आणायला हवी, अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इस्लामच्या प्रथांवर जोरदार टीका केली. ते कॅबिनेट बैठकीत बोलत होते. नेत्यानाहू पुढे म्हणाले, बांग ही देशांतर्गत कायद्याच्या विरोधात आहे. भोंग्यावरून ओरडायलाच हवे, असा कुठलाही नियम नाही. त्यामुळे अशा प्रथा बंदच करायला हव्यात. मशिदींच्या नजिक रहाणारे कित्येक अरब मुसलमानही या कर्कश आवाजामुळे त्रस्त आहेत. धर्माच्या नावाखाली मशिदीत होणार्‍या अशा अनेक देशविरोधी कृत्यांवर भविष्यात बंदी घालण्याचा शासन विचार करत आहे.

देहविक्रीसाठी हिंदु मुलींची आखाती देशात तस्करी करणार्‍या मुसलमान जोडप्यास अटक

      थिरुवनंतपुरम (केरळ) - राज्यातील हिंदु आणि अन्य गैरमुस्लीम मुलींना चांगल्या नोकर्‍यांचे आमिष दाखवून आखाती देशात पाठवायचे आणि नंतर तेथे त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलायचे, असे गुन्हे करणार्‍या अब्दुल नसीर आणि शाजीदा मसूर या जोडप्यास पोलिसांनी मुंबई विमान तळावरून अटक केली आहे. त्यांच्या सोबत अजून चौघांना अटक केली असून सर्वांना कोची येथील गुन्हे शाखेत आणण्यात आले आहे.
जवळपास ६३ हिंदू आणि गैर-मुस्लीम मुलींना चांगल्या वेतनाच्या नोकर्‍यांची आमिषे दाखवायची आणि एकदा आखाती देशात नेल्यावर त्यांच्यावर अनैतिक कृत्ये करण्याची बळजबरी करायची अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. अब्दुल नसीर आणि शाजीदा मसूर हे जोडपे बहरीन या देशातून परत आल्यावर चेन्नई येथे पळून जाण्याच्या बेतात होते, असे आतंकवाद विरोधी पथकाचे महानिरीक्षक निकेश कौशिक यांनी सांगितले.


(म्हणे) 'युतीचे शासन सनातनवादी आहे काय ?'

वैचारिक गोंधळाचा परिपाक असणारे श्रीपाल सबनीस यांचा प्रश्‍न 
     नंदुरबार - सनातनने दिलेल्या धमकीनंतर आपल्याला देण्यात आलेले पोलीस संरक्षण ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट असून युतीचे शासन सनातनवादी आहे काय, असा प्रश्‍न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला. (सनातनने सबनीस यांना कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नसतांना धादांत खोटा आरोप करणार्‍या सबनीस यांच्यासारख्या साहित्यिकांचे साहित्य कशा प्रकारचे असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनात सबनीस बोलत होते. येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित सहाव्या नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनात सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पत्रकारांनी स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे अयोग्य विचारांचा प्रतिवाद करावा ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून १. अब्दुल हमीद राही, २. क्रांतीकुमार वैघ, ३. दलजीत सिंह गुरुदत्ता,
४. पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे, ५. कपूर यादव आणि ६. बैजू शर्मा
     उज्जैन - सध्या समाजात भ्रष्टाचाराने व्यापक रूप धारण केले आहे. केवळ धनाच्या नव्हे, तर विचार आणि आचारातही भ्रष्टता आली आहे, त्याचबरोबर धर्मद्रोह्यांकडूनही भारतीय समाजात अयोग्य विचार पसरवले जात आहेत. अशा स्थितीत पत्रकारांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन अयोग्य विचारांचा प्रतिवाद करण्यासह समाजाला योग्य विचारांची दिशा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पोलीस लुटत असल्याने सागरी सुरक्षेसाठी सहकार्य न करण्याची मच्छीमारांची चेतावणी !

कायद्याचे रक्षक नव्हे भक्षक बनलेेल्या पोलिसांवर
 राष्ट्राची सुरक्षा लक्षात घेऊन तत्परतेने कारवाई होईल का ? 
मच्छीमारांनो, राष्ट्रीय सुरक्षा सर्वांत अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या ! 
     वसई - समुद्रात मासेमारी करीत असतांना गस्तीवरील पोलीस मच्छीमारांच्या बोटी अडवून त्यांच्याकडून मासे बळजोरीने नेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर कारवाई करावी, अन्यथा सागरी सुरक्षेसाठी मच्छीमार पोलिसांना सहकार्य करणार नाहीत, अशी चेतावणी कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिली आहे. (पोलिसांच्या वैयक्तिक गैरकृत्याचा राग राष्ट्राच्या सुरक्षेवर काढणे योग्य नाही. पोलिसांपेक्षा राष्ट्र मोठे आहे, हे माठक यांनी लक्षात घ्यायला हवे. कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच जर अशा प्रकारे मच्छीमारांची लूट करत असतील, तर त्यांच्यावर जनतेचा विश्‍वास तरी कसा ठेवायचा ? - संपादक) 

खंडणीची मागणी करणार्‍या धर्मांध माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवून इतरांना लुबाडणार्‍या धर्मांधावर पोलीस काय कारवाई करणार ?
मुंबई - बांधकाम अवैध असल्याचा आरोप करून एका बांधकाम कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी करणार्‍या धर्मांध अफजल लखानी या खोट्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोेलीस कोठडी दिली. अटकेच्या कारवाईनंतरही आणखी ५ जणांनी धर्मांध अफजलने खंडणी उकळल्याची तक्रार पोलिसांत दिली.
१. अफजल माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवत असे. परिसरातील अनधिकृत बांधकामे, तसेच इतर कामे करणार्‍यांविरुद्ध महानगरपालिकेत तक्रार करण्याची धमकी देऊन तक्रार न करण्यासाठी खंडणी घ्यायचा.
२. एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने खंडणीसाठी धमकावले. बांधकामाला पालिकेची अनुमती नसल्याचा आरोप करत त्याने पालिकेत जाण्याची धमकी कंत्राटदाराला दिली. तक्रार न करण्यासाठी त्याच्याकडे १५ सहस्र रुपये मागितले. त्यानंतर कंत्राटदाराने त्याच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरात ९० बाटल्या रक्तसंकलन !

    सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने विश्रामबाग येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ९० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. याचे आयोजन सांगली उपशहरप्रमुख श्री. नितीन काळे यांनी केले होते. याचे उद्घाटन आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपजिल्हाप्रमुख श्री. अजिंक्य पाटील, सर्वश्री संजय विभूते, अनिल शेटे, महेंद्र चंडाळे, प्रसाद रिसवडे, धमेंद्र कोळी यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

यवतमाळ येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री. फोकमारे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतांना विद्यार्थी
यवतमाळ - येथील न.प. माध्यमिक शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. दत्ताभाऊ फोकमारे यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर व्याख्यान घेतले. या वेळी इयत्ता ५ वी ते १० वीतील ६५ विद्यार्थी उपस्थित होते. आमच्यात राष्ट्राभिमान जागृत होऊन राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची प्रेरणा मिळाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या वेळी मुख्याध्यापक श्री. शेखर गुल्हाने यांच्यासमवेत ७ शिक्षक उपस्थित होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनीही कार्यात सहभाग घेतला.

मालाड (मुंबई) येथे कृष्ण यजुर्वेद घनपारायण !

   मालाड (मुंबई) - येथे १७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजता आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ या वेळेत कृष्णयजुर्वेद घनपारायण आयोजित केले आहे. कृष्ण यजुर्वेद म्हणजे व्यासांनी वेदांचे चार भागांत विभाजन केले. त्यातील दुसरा यजुर्वेद असून त्याच्या कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद या २ शाखा असतात. घनपाठ म्हणजे वेदांच्या अष्ट विकृतींपैकी एक विकृती म्हणजे घनपाठ (विकृती म्हणजे वेद संहितेतील पदांचा उच्चार विशिष्ट पद्धतीने करणे)
सर्व वेदप्रेमींनी श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वेदांचे जतन करणे, हा व्यासांचा मूळ उद्देश होता. या पारायणाचा उद्देश समाजकल्याण आणि समाजोन्नती अन् सनातन वैदिक धर्माचा प्रसार हा आहे.
पारायणकर्ते : श्री. वेदमूर्ती चंद्रशेखर द्रविड घनपाठी (वाराणसी) आणि श्री. वेदमूर्ती श्रीकांत घनपाठी (चेन्नई)
पारायण स्थान : ०१, श्रीनिवास सहनिवास, लिबर्टी गार्डन रस्ता क्रमांक १, दुर्गा क्रॉस लेन, मालाड (प.), मुंबई.

पाचशे विस्थापित मुसलमानांकडून फ्रान्सच्या कॅलेस बंदरावर आक्रमण !

मुसलमान विस्थापित समस्येच्या आगीत होरपळणारे युरोपातील देश !
जहाजावर अवैधरित्या चढण्याचा प्रयत्न करणार्‍या ३५ लोकांना अटक !
      पॅरिस - येथील कॅलेस बंदरावर पाचशे मुसलमान विस्थापितांनी आक्रमण केल्याची घटना घडली. बंदराचे फाटक तोडून सुमारे पन्नास लोक तेथे उभे असलेल्या स्पिरिट ऑफ ब्रिटेन जहाजावरही चढले. फ्रान्समध्ये घुसलेल्या विस्थापितांच्या समर्थनार्थ दोन सहस्त्र मुसलमानांनी कॅलेस शहरामध्ये एक मोर्चा काढला होता. या मोच्यार्र्मध्ये सहभागी झालेल्या पाचशे विस्थापितांनीच हे आक्रमण केले. ब्रिटन खाडीच्या एका टोकाला कॅलेस बंदर आहे, तर दुसर्‍या टोकाला ब्रिटनची भूमी आहे. आक्रमण करणारे हे विस्थापित ब्रिटन येथे जाण्याच्या प्रयत्नात होते. 
      स्थानिक पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणत जहाजावर चढलेल्या पन्नास विस्थापितांना खाली उतरवले. या वेळी सुमारे पस्तीस विस्थापितांना अटक करण्यात आली. फ्रान्स २४ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या बातमीमध्ये कॅलेस शहरात सुमारे चार सहस्त्र विस्थापितांना आश्रय देण्यात आला आहे. या विस्थापितांमध्ये आफ्रिका आणि मध्य पूर्व आशिया येथील देश, तसेच अफगाणिस्तान अन् पाकिस्तान येथील विस्थापितांचा समावेश आहे.

२ भारतीय संगणक अभियंते इसिसच्या सैन्यात !

अशिक्षितपणामुळे भारतीय मुसलमान तरुण गुन्हेगारीकडे वळतात, हा दावा धादांत खोटा ! 
 संशयित आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड
     नवी देहली - प्रजासत्ताकदिनाच्या तीन दिवस आधी इसिसशी संबंधित १४ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. हैद्राबाद येथून पकडण्यात आलेल्या ४ संशयितांच्या चौकशीतून त्यांचे संगणक अभियंता असलेले २ मित्र सिरियात इसिससाठी आतंकवादी कारवाया करत असल्याचे सामोरे आले आहे. अटक करण्यात आलेल्या १४ संशयितांपैकी मुदब्बीर मुश्ताक शेख हा इसिसची भारतीय शाखा 'जनूद-उल-खलीफा-ए-हिंद'चा स्वयंघोषित प्रमुख आहे. महाराष्ट्रात इसिसचा प्रभाव महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मान्य केला आहे, तसेच सुरक्षा यंत्रणांकडून देशातील मोठ्या शहरांमध्ये सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

रामनाथ (अलिबाग) येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. नंदिनी सुर्वे
रामनाथ (अलिबाग) - येथे २१ जानेवारी या दिवशी वेळावली खाणाव गावात श्री संप्रदायाच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी मकरसंक्रांतीमागील धर्मशास्त्र, तसेच लव्ह जिहाद आणि शनिशिंगणापूर मंदिरातील पुरोगाम्यांचा हस्तक्षेप यांविषयी मार्गदर्शन केले.
हिंदु भगिनींचे भविष्य अंधारमय होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक ! - सौ. नंदिनी सुर्वे
   रामनाथ (अलिबाग) - आज आपल्या अनेक हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदु भगिनींचे भविष्य अंधारमय होऊ नये, यासाठी आपण सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपण आपला धर्म आणि संस्कृती विसरत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. नंदिनी सुर्वे यांनी कोळीवाडा, शिवलकर नाका येथील हळदीकुंकू समारंभात केले. या वेळी ८५ महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. येथेही लव्ह जिहादच्या घटना घडत आहते. त्यामुळे आपण सावध होणे आवश्यक असल्याचे सौ. सुर्वे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मंडळाचे सदस्य, तसेच नगरसेवक श्री. संदीप शिवलकर, कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. गजानन टिके, श्री. सुधीर आग्रावकर, श्री. अनिल चोप्रा, श्री. मुकेश जैन आणि श्री. अशोक जैन यांनी समितीचे आभार मानले.

धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वेसेवा खोळंबली !

     नवी देहली - अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम देशातील अनेक राज्यांत दिसून येत आहे. उत्तर भारतात तर दाट धुक्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून तब्बल १३५ रेल्वेगाड्या त्यांच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत. २० गाड्या तर पूर्णतः रहित करण्यात आल्या आहेत.

किल्ल्यांचे संवर्धन महाराष्ट्रातूनच झाले पाहिजे ! - उद्धव ठाकरे

     महाड - शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणार्‍या राज्यातील किल्ल्यांचे जतन करण्याचे काम इतिहासाचा गंध नसलेल्या केंद्रातील पुरातत्व खात्याच्या हाती आहे. त्यामुळे किल्ल्यांचे संवर्धन यापुढे महाराष्ट्रातूनच झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी येथे मांडली. ते रायगड महोत्सवाच्या २४ जानेवारीला झालेल्या सांगता समारंभात बोलत होते. 

महाराष्ट्रासह बारा राज्यांमध्ये इसिसचा प्रभाव वाढला ! - आतंकवादविरोधी पथक

इसिसचा राज्यातील आणि देशातील प्रभाव नष्ट 
करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे ? 
     पुणे - महाराष्ट्रासह १२ राज्यांत इसिसचा प्रभाव वाढला आहे, राज्यातील काही युवक या संघटनेकडे आकर्षित झाले आहेत, अशी कबुली राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस्) विवेक फणसळकर यांनी २४ जानेवारी या दिवशीच्या पत्रकार परिषदेत दिली. या भरकटलेल्या तरुणांना परावृत्त करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकानेे प्रयत्न चालू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आतंकवादविरोधी पथक लवकरच संकेतस्थळ चालू करु त्याद्वारे तरुणांचे प्रबोधन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

पुराव्याअभावी आरोप सिद्ध होत नसल्याने समीर गायकवाड यांना जामीन मिळालाच पाहिजे ! - अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा जोरदार युक्तीवाद

समीर गायकवाड यांच्या जामीन अर्जावर २८ जानेवारीला अंतिम सुनावणी होणार ! 
कॉ. गोविंद पानसरे प्रकरण 
     कोल्हापूर, २६ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी पोलिसांनी अजून कोणताही सबळ पुरावा सादर केलेला नाही. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना जवळजवळ १ वर्ष पूर्ण होत असतांनाही पोलिसांना अजून खरे गुन्हेगार मिळालेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सकृतदर्शनी आरोप सिद्ध न झाल्यास संशयित आरोपींना जामीन देता येतो. यानुसार श्री. गायकवाड यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयाने जामीन संमत करावा, असा जोरदार युक्तीवाद श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी आज न्यायालयात केला. कॉ. पानसरे यांच्या बाजूने विशेष शासकीय अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मांडून झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले यांनी २८ जानेवारीपर्यंत जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. या दिवशी श्री. समीर गायकवाड यांच्या जामीन अर्जावर अंतिम आदेश दिला जाणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आज अधिवक्ता, पत्रकार आणि नागरिक यांची गर्दी झाली होती. 

जळगाव येथे तीळगूळ देण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदूंच्या संघटनासाठी तीळगूळ घ्या आणि हिंदु राष्ट्रासाठी एकत्र या ! चळवळ
जळगाव - येथे मकरसंक्रांतीनिमित्त १५ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्ववाद्यांना तीळगूळ देण्याचा उपक्रम घेण्यात आला. साधारणतः १ सहस्र ८०० लोकांपर्यंत समितीचे कार्यकर्ते तीळगूळ देण्यास पोहोचले. एका केंद्रात मकरसंक्रांतीची पत्रके वाटण्यात आली, तसेच ४ ठिकाणी फलकप्रसिद्धी करण्यात आली. काही केंद्रांमध्ये समितीशी जोडली गेलेली नवीन हिंदुत्ववादी मुलेही मोहिमेत सहभागी झाली होती. या अभियानात पोलीस निरीक्षक, पोलीस, नगरसेवक, आमदार, हिंदुत्ववादी, पत्रकार, धर्माभिमानी, अधिवक्ता, व्यापारी आणि काही प्रतिनिधी यांना भेटून तीळगूळ देण्यात आले.
१. अनेकांनी सांगितले, मकरसंक्रांतीचे महत्त्व लोक विसरत आहेत. तुम्ही केलेल्या या प्रयत्नांमुळे सणाचे महत्त्व वाटते.
२. समितीच्या कार्यकर्त्यांचे तीळगूळ घ्या आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक व्हा ! असे बोलणे ऐकून समाजातील लोकांचा उत्साह वाढत होता.
३. समितीचे कार्यकर्ते पत्रकारांना तीळगूळ देतांना म्हणाले, सर्व हिंदूंमधील एकमेकांविषयीचे प्रेम, जवळीक आणि संघभाव वाढून हिंदूंचे संघटन होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येवो, अशा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा !, असे म्हणत होते. त्या वेळी समोरील पत्रकारही उस्फूर्तपणे कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत होते. काही जण कार्यालयातील कामे थांबवून तीळगूळ आणि शुभेच्छा घेत होते.

मागील वर्षांत ३ सहस्र २२८ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

   मुंबई - महाराष्ट्रामध्ये २०१५ या वर्षात ३ सहस्र २२८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्यशासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राज्यशासनाने १ सहस्र ८४१ शेतकरी हानीभरपाईस पात्र आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दोन्हीही आकडेवारी योग्यच असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने न्यायालयात सांगितलेली संख्या ही फक्त शेतीसंबंधी कारणांसाठी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची असून तेच भरपाईस पात्र आहेत.

पुणे येथील लोहियानगर गणपति मंदिरातील दानपेटी चोरणार्‍या धर्मांधाला अटक !

    पुणे, २६ जानेवारी - येथील अखिल लोहियानगर मित्र मंडळाच्या गणपति मंदिराचे दार २२ जानेवारीच्या रात्री तोडून मंदिरातील दानपेटी चोरणारा धर्मांध अस्लम उपाख्य बटल्या खान याला अटक करण्यात आली आहे. या वेळी त्याच्याकडून दानपेटी, रोख रक्कम आणि समई असा एकूण ७ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज शासनाधीन करण्यात आला आहे. अल्पवयीन असतांना बटल्या खानवर वाहनचोरीचे ४ गुन्हे आणि घरफोडीचा १ गुन्हाही प्रविष्ट आहे. न्यायालयाने खान याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

अध्यात्माचा विचार हा वैश्‍विक विचार ! - अविनाश धर्माधिकारी

   पुणे, २६ जानेवारी (वार्ता.) - अध्यात्माचा विचार हा वैश्‍विक विचार आहे. त्यामध्येच मानवाचे कल्याण आहे. इंग्रजांनी भारतात येताच भारतियांच्या श्रद्धास्थानांना तोडले. त्यामुळेच ते भारतावर राज्य करू शकले. म्हणूनच आपण आपल्या संस्कृतीला धरून राहिलो पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. १७ जानेवारी या दिवशी कॅम्पमधील इस्कॉन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या कर्मांचा चित्रगुप्ताला हिशोब द्यावाच लागतो, असेही श्री. धर्माधिकारी यांनी सांगितले. इस्कॉनचे श्री. केशवानंद प्रभू यांनी सर्व समस्यांची उत्तरे भगवद्गीतेमध्ये सापडतील, असे आश्‍वस्त करून प्रतिदिन गीता वाचण्याचे आवाहन केले.

मद्यविक्रेत्यांकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून केरळच्या दुसर्‍या मंत्र्याचे त्यागपत्र

असे लाचखोर मंत्री लोकशाहीची निरर्थकताच सिद्ध करतात !
     कोची - केरळ राज्यात मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश राज्यशासनाने काढल्यानंतर ती परत खुली करण्यासाठी मद्यविक्रेत्यांकडून १० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केरळचे अबकारी मंत्री के. बाबू यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी त्यागपत्र देण्याच्या काही घंटे आधीच तेथील सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा आदेश भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला दिले होते. या प्रकरणात त्यागपत्र दिलेले के. बाबू हे माजी अर्थमंत्री के.एम्. मणी यांच्यानंतर केरळमधील दुसरे मंत्री आहेत. यापूर्वी केरळ काँग्रेसचे के.एम्. मणी यांनी त्यागपत्र देतांना बरीच आडकाठी घेतली होती. त्यांनी केरळच्या युती शासनास दिलेला केरळ काँग्रेसचा पाठिंबा काढून टाकण्याची चेतावणी देण्यापर्यंत मजल गाठली होती.

मुसलमानबहुल भागामध्ये खाद्यपदार्थ घरपोच करण्यास नकार देणार्‍या मॅकडोनॉल्डला अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस !

खाद्य आस्थापने मुसलमानबहुल भागात खाद्यपदार्थ घरपोच करण्यास 
का धजावत नाहीत, याचा विचार मुसलमानांनी करावा !
     नवी देहली - आंतरराष्ट्रीय स्तरावरील फास्ट फूड आस्थापन मॅकडोनॉल्डकडून मुसलमानबहुल भागांमध्ये घरपोच मागणी (ऑर्डर) पोहोचवली जात नाही, अशी तक्रार ओखला येथील नागरिकांनी देहली अल्पसंख्यांक आयोगाकडे केली असून आस्थापनावर भेदभावाचा आरोप केला आहे. या प्रकरणी आयोगाने मॅकडोनॉल्डला नोटीस पाठवली असून स्पष्टीकरण मागितले आहे. (मुसलमानांच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेणारा अल्पसंख्य आयोग हिंदू अल्पसंख्य असणार्‍या परिसरातील हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करतो ! - संपादक)
      ओखला येथील गफ्फार मंजिलमधील निवासी तारिक खान म्हणाले की, त्यांनी मॅकडोनॉल्डच्या एका शाखेकडे घरपोच जेवणाची मागणी दिली होती. जेव्हा १ घंट्यानंतरही मागणी पूर्ण करण्यात आली नाही, तेव्हा त्यांनी या आस्थापनेच्या सदर शाखेकडे स्पष्टीकरण मागितले. तेव्हा त्यांना सदर भागात मुसलमान लोकसंख्या अधिक असल्यामुळे अन्न वितरण करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. (यावरून) त्यानंतर खान यांनी आयोगाकडे आस्थापनाच्या विरोधात ४ जानेवारी या दिवशी तक्रार दाखल केली.
ओखला येथे ७० टक्के मुसलमान ! - कमर अहमद, अध्यक्ष, अल्पसंख्यांक आयोग 
     याप्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष कमर अहमद म्हणाले, आयोगाने मॅकडोनॉल्डच्या मुख्य कार्यालयाला नोटीस दिली असून त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे. ओखला येथील २ लाख लोकसंख्येपैकी ७० टक्के मुसलमान आहेत.


योगऋषी रामदेवबाबा यांना वनौषधींसाठी वन भूमी देण्यात येत असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार ! - वन विभागाचा खुलासा

    मुंबई - योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाला औषधी वनस्पतींसाठी वन खात्याच्या अखत्यारितील वन भूमी देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या, ज्या पूर्णत: निराधार आहेत, असा खुलासा वन विभागाने केला आहे. 
       खुलाशात विभागाने खालील सूत्रे प्रामुख्याने स्पष्ट केली आहेत. 
१. राज्यामध्ये वनक्षेत्राच्या जवळपास १५ सहस्र ५०० गावे आहेत. लोकसहभागातून वन आणि वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. 
२. बहुतांशी गावे ही आदिवासी लोकसंख्येने व्याप्त अशी आहेत. 
३. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी बनवलेल्या हस्तकला, औषधी वनस्पती आणि गौण वन उत्पादन यांना बाजारपेठ नसल्याने त्यांना योग्य भाव प्राप्त होत नाही.

देव, देश आणि धर्म यांचा द्रोह करणार्‍यांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक ! - ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे

बामणोली, चिपळूण येथील हिंदूसंघटन मेळाव्याला ४०० हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती 
डावीकडून दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प
अभयमहाराज सहस्रबुद्धे, श्री. संजय जोशी
आणि श्री. परेश गुजराथी
     चिपळूण, २६ जानेवारी (वार्ता.) - भारतात धर्मांध ठिकठिकाणी हिंदूंवर अत्याचार करत आहेत. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहादच्या माध्यमातून हिंदूंचे जीवन असुरक्षित बनवले जात आहे. आपला धर्म संकटात असतांना धर्मवीर संभाजी महाराजांप्रमाणे धर्मरक्षणासाठी प्रसंगी सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता हिंदूंनी ठेवली पाहिजे. परखड हिंदुत्वामुळेच देशाचा सन्मान राखता येईल. देव, देश आणि धर्म यांचा द्रोह करणार्‍यांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे, असे मत वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटनेचे ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 
     अलीकडेच बामणोली येथील श्रीदेवी चंडीकाई-वाघजाई देवस्थानच्या प्रांगणात दुपारी ३ ते ५ यावेळेत हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

   मुसलमान अल्पसंख्य आहेत, हा त्यांचा दोष नाही. त्यांच्या अनेक पिढ्या येथे रहात आल्या आहेत. ते राष्ट्रभक्त आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हुतात्माही झाले आहेत; पण त्यांची, तसेच आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांची नावे स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत नाहीत. ब्राह्मण इतिहासकारांनी त्यांची नावे लिहिली नाहीत. आपला समाज, देश यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यायला हवी. जेव्हा संपूर्ण विश्‍व धर्मातीत भूमिका घेईल, त्या वेळी सर्व धर्म बाद होतील आणि तोच मानवाच्या कल्याणाचा मार्ग असेल.
- श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन ! श्री. विनोद रसाळ

७ फेब्रुवारीला बार्शीत (जिल्हा सोलापूर) हिंदु धर्मजागृती सभा ! 
धर्मसभेच्या सिद्धतेच्या दृष्टीने आयोजित बैठकीसाठी उपस्थित धर्माभिमानी

     बार्शी (जिल्हा सोलापूर), २६ जानेवारी (वार्ता.) देशासमोरील विविध समस्यांवर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या आदर्शांवर आधारित 'हिंदु राष्ट्र' (रामराज्य) राज्यघटनेद्वारे घोषित होणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी बैठकीत व्यक्त केले. बार्शी येथील सभेच्या पूर्वतयारीसाठी बार्शी येथे २४ जानेवारी २०१६ या दिवशी रेणुका मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. विनोद रसाळ बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भगवंत मैदानावर ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सायंंकाळी ५.३० वाजता या वेळी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी २२ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. 

कर्जतमध्ये शिवसेनाप्रमुखांचा फलक फाडल्याने तणाव

     कर्जत - शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी फलक लावले होते. त्यापैकी काही विज्ञापनांचे फलक हे एका विज्ञापन एजन्सीच्या फलकावर लावण्यात आले होते. ते फलक एजन्सीच्या कामगारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच काढून टाकले. विज्ञापन फलक फाडून रस्त्यावर फेकल्याने कर्जत तालुक्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि काही काळ कर्जत शहरात तणाव निर्माण झाला.

अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना 'पद्मश्री' पुरस्कार

     मुंबई - प्रख्यात कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार घोषित झाला आहे. 'पद्मश्री ' सन्मान पटकावणारे निकम हे पहिलेच शासकीय वकील आहेत. 
     या पुरस्कारामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना पुष्कळ आनंद झाला आहे. हा पुरस्कार आई-वडिलांना समर्पित करत आहे. या पुरस्कारामुळे माझ्यावरील दायित्व वाढले आहे. मी राज्यशासन, मुख्यमंत्री आणि केंद्रशासन यांचा आभारी आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणांपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

फलक प्रसिद्धीकरता

गोवंशाची हत्या रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक असतांना देशात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत पशूवधगृहे, तर दुधावर प्रक्रिया करणारे केवळ २१३ नोंदणीकृत कारखाने असल्याची माहिती उघड झाली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

जागो !
भारत में दूध के प्रकल्पों से अधिक है कसाई खानों की संख्या !
क्या ये गोपूजक हिन्दुआें का अपमान नही है ?
Jago ! 
Bharatme dudhke prakalponse adhik hai kasai khanonki sankhya !
Kya ye Gopujak Hinduonka apman nahi hai ?

कुतुबमिनार नव्हे, तर ध्रुवस्तंभ !

     प्राध्यापक एम्.एस्. भटनागर हे वर्ष १९६१ मध्ये काही विद्यार्थ्यांसमवेत कुतुबमिनार बघण्यास गेले होते. तेथे त्यांना सोबतीला एक शासकीय मार्गदर्शक (गाईड) मिळाला. त्याच्याशी झालेल्या प्रश्‍नोत्तरावरून प्रा. भटनागर यांना जी माहिती प्राप्त झाली, त्यावरून कुतुबमिनार या वास्तूविषयी पुढील गोष्टी लक्षात आल्या. 
१. कुतुबमिनार ही वास्तू महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ बांधली गेली, असे म्हटले जाते. तथापी उभयतांमधील लढाई पानिपत येथे झाली असतांना घोरीने हा स्तंभ देहलीत का उभारला ? या प्रश्‍नाला उत्तर नाही. 
२. देहली ही गझनीची राजधानी नव्हती. तो गझनी येथे रहात होता. जर महंमद घोरीने हा स्तंभ उभारला असता, तर त्याचे नाव कुतुबमिनार कशाला ठेवले असते; घोरीमिनारच ठेवले असते ना !
३. हा मिनार घोरीच्या कुतुबुद्दीन ऐेबक नावाच्या गुलामाने बांधला, असे म्हटले जाते; मात्र कुतुबुद्दीन ऐबक हा लाहोर प्रांताचा शासक होता. मग कुतुबमिनार देहली येथे का बांधला ? याला उत्तर नाही.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे संस्कृतीप्रेम आणि जवाहरलाल नेहरू यांचा अट्टाहास !

डॉ. राजेंद्रप्रसाद
१. देशाचे प्रथम राष्ट्रपती आणि संविधान सभेचे प्रथम अध्यक्ष 
डॉ. राजेंद्रप्रसाद यांना निवृत्तीनंतर रहायला चांगले 
घरही न देणारे नेहरू !
     भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या व्यक्तीमत्वामुळे पंडित नेहरूंना कायम असुरक्षित असल्याचे वाटत असे. डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा अपमान करण्याची कोणतीही संधी नेहरूंनी दवडली नाही. १२ वर्षे देशाचे राष्ट्रपती राहिल्यानंतर ज्या वेळी राजेंद्रबाबू राष्ट्रपती पदावरून मुक्त होऊन पाटण्याला जाण्यास निघाले, त्या वेळी नेहरूंनी त्यांच्या रहाण्यासाठी शासकीय निवासस्थानाची व्यवस्था केली नाही, त्यांच्या प्रकृतीचीसुद्धा काळजी घेतली गेली नाही. देहलीहून पाटण्याला पोहोचल्यावर राजेंद्रबाबू सदाकत आश्रम, बिहार विद्यापीठ या ठिकाणी एका दमट (ओलसर) खोलीत रहायला लागले. आधीच त्यांची प्रकृती ठीक नव्हती, पाटण्याला गेल्यावर ती आणखीनच बिघडली. त्यांना दमा असल्याने ओलसरपणा असलेल्या खोलीत राहिल्याने त्यांचा दमा वाढला. त्यांना भेटण्यासाठी श्री. जयप्रकाश नारायण गेले होते. राजेंद्रबाबूंची स्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले. देशाचे प्रथम राष्ट्रपती आणि संविधान सभेचे प्रथम अध्यक्ष अशा खोलीत रहात असल्याचे बघून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचे मित्र आणि सहयोगी यांच्या साहाय्याने त्यांनी राजेंद्रबाबूंची खोली रहाण्यालायक केली. २८ फेब्रुवारी १९६३ या दिवशी त्याच खोलीत त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

देशासाठी लढता लढता हुतात्मा होणार्‍या सैनिकांनो, तुम्हाला आजचे स्वार्थी आणि देशद्रोही नेते न्याय देऊ शकत नाहीत !

देशभक्त भारतीय सैनिकांनो आणि नागरिकांनो, तुमच्या त्यागाचे सार्थक व्हावे, 
यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास कटीबद्ध व्हा !
Add caption
१. पठाणकोटमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये नेत्यांच्या घरचे कोणी 
नसल्याने देशद्रोही नेत्यांना कसलेही सुवेरसुतक नसणे
     पठाणकोटमध्ये झालेल्या आक्रमणाचे वृत्त पाहून मन अशांत झाले आहे. धैर्य संपत चालले आहे आणि मनामध्ये अनेक प्रश्‍न उद्भवून मन अस्थिर झाले आहे. पठाणकोटमध्ये ५ अतिरेकी येतात काय आणि आपल्या ७ वीर सैनिकांना मारण्याचे धाडस दाखवतात काय ! पठाणकोटमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये नेत्यांच्या घरचे कोणी नव्हते. त्यांच्यापैकी कोणाचाही मुलगा, वडील किंवा भाऊ यांना गोळी लागली नाही. कुठल्याही नेत्याचा नुकताच लग्न झालेला मुलगा या कारवाईत हुतात्मा झाला नाही ! या हुतात्म्यांच्या चितेवर हे नेते आपली राजकीय पोळी का भाजून घेत आहेत ? खरे देशद्रोही तर हे नेतेच आहेत. आतंकवाद्यांना देशात घुसण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून आपल्याच सैनिकांना मारू देणारे राज्यकर्ते असलेला भारत हा जगातील एकमेव देश असावा !

अध्यात्म समजून घ्या !

     स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती एका शब्दात सांगितली, ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! ही पवित्र परंपरा आणि सुसंस्कृतपणा याचा उगम भारतियांना अध्यात्मामुळेच लाभला. भारत म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे भारत ! एवढी एकच ओळख सर्व अंगांनी आणि अर्थांनी भारतियांचे विश्‍लेषण करण्यास पूरक आहे. पुरातन काळापासून भारत आणि भारतीय यांची ओळख ही आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्ती आणि देश याच अर्थाने संपूर्ण जगात होती. या देशाला अध्यात्मशास्त्र वेगळ्या अंगाने शिकवायची किंवा समजावून द्यायची निकडच नसायची. अगदी बाल्यावस्थेपासूनच व्यक्तींच्या प्रत्येक कृतीत आध्यात्मिक दृष्टीकोन अंतर्भूत असायचा. साहजिकच व्यावहारिक कार्यासोबतच अध्यात्म श्‍वासागणिक जगले जायचे. अभ्यास आणि कृती यांची योग्य सांगड असल्यामुळे उगीचच विरोधासाठी विरोध होत नव्हता. एकूणच सर्वांचे आयुष्य आनंदी आणि आत्यंतिक समाधानाने भरलेले असायचे.

हिंदूंना नपुंसक बनवणारी सर्वधर्मसमभाव संकल्पना ही गांधींची निर्मिती !

१. सर्वधर्मसमभावामुळे हिंदु समाज पुरुषार्थहीन
     सर्वधर्मसमभाव स्वीकारणारे आमचे शासन आदर्श निर्माण करील, हे साफ खोटे आहे. हिंदू समाज नपुंसक बनवणारी ही धारणा आहे. सर्वधर्मसमभाव गांधींची निर्मिती आहे. त्यामुळे हिंदु समाज पुरुषार्थहीन होत आहे. सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मांचा समान आदर करणे. हिंदु निधर्मीवाद (Hindu secularism) म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे. तो निर्लज्जपणा आहे.
२. सर्वधर्मसमभाव ही मूळची इंग्रजी संकल्पना
      धर्म म्हणजे काय ? त्याच्या अर्थाची आम्ही इथे चर्चा करत नाही, त्याची आवश्यकता नाही. गांधी (महात्मा) हे इंग्रजीत चिंतन करायचे आणि इंग्रजीत लिहायचे. सर्वधर्मसमभाव ही मूळची संकल्पना (phrase ) इंग्रजी आहे. त्यामुळे इथे धर्म हा religion (रिलिजन) चा अनुवाद आहे.
      गांधींना काय सांगायचे आहे ? ख्रिस्ती, इस्लाम आणि सनातन हिंदु धर्म यांना समान लेखा, समान आदर द्या. आता काही लोक समजतात की, सर्वच धर्म समान असून सत्य आहेत. गांधी नेहमी तसेच सांगत होते.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २००७) 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

जे शासनाने करायला हवे, ते मंदिर करते !

      पेडणे, गोवा येथील श्री भगवती देवस्थान समितीने रस्त्यावर बसणार्‍या आणि अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या भटक्या गुरांच्या गळ्यात रेडियमचा पट्टा बांधण्याची योजना राबवली आहे. रात्री काळोखात रस्त्यावर बसणार्‍या गुरांचा अंदाज न आल्याने अपघात होऊन प्राण्यांचा जीव जातो, तसेच वाहनचालकांनाही कधीकधी जीव गमवावा लागतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भटक्या गुरांच्या गळ्यात रेडियमचा पट्टा बांधण्याची योजना राबवली जात आहे.

पूजा करतांना पू. पात्रीकरकाकांनी सांगितल्याप्रमाणे भाव ठेवल्यावर श्री. सिद्धेश करंदीकर यांना आलेल्या अनुभूती

श्री. सिद्धेश करंदीकर
१. पू. पात्रीकरकाकांनी पूजा करतांना समोर 
गुरुदेवच आहेत, या भावाने त्यांची पूजा करण्यास
सांगून त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव वाढवण्यास सांगणे
      काही दिवसांपूर्वी पू. पात्रीकरकाकांनी मला विचारले, तुम्ही गुरुदेवांना फूल वाहता का ? त्या वेळी मला त्यांच्या या प्रश्‍नाचा अर्थ कळला नाही; म्हणून मी त्यांना त्याचा अर्थ विचारला. त्या वेळी ते म्हणाले, तुम्ही ध्यानमंदिरात पूजा करतांना मानसरूपाने गुरुदेवांच्या चरणी फूल वाहता का ? कारण गुरुदेवच आपले सर्वस्व आहेत. त्यांनीच आपल्याला सर्व शिकवले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रतीचा आपला कृतज्ञताभाव वाढायला हवा. त्यानंतर ते म्हणाले, पूजा करतांना समोर गुरुदेवच आहेत, या भावाने त्यांची पूजा करून त्यांच्या चरणांवर तीन फुले वाहावीत. प्रदक्षिणा घालतांना आपण गुरुदेवांच्या ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन रूपांना प्रदक्षिणा घालत आहोत, असा भाव ठेवून प्रयत्न करावा; म्हणजे तुमच्या आनंदात वाढ होईल. हे पाठशाळेतील सर्वांनाच सांग.

प्रेमळ आणि स्वतः अंतर्मुख राहून दुसर्‍यांना साधनेत साहाय्य करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वैष्णवी वेसणेकर (वय १६ वर्षे) !

      
कु. वैष्णवी वेसणेकर
कु. वैष्णवी वेसणेकर हिचा पौष कृष्ण पक्ष तृतीया (२७.१.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या सहसाधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. वैष्णवी वेसणेकर हिला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. प्रेमभाव
      एकदा मी आणि वैष्णवीताई झोपाळ्यावर बसलो असतांना ती मला एक गोष्ट सांगत होती. त्या वेळी एका ताईने आम्हाला एक चॉकलेट दिले. तेव्हा वैष्णवी मला म्हणाली, तू घे ते चॉकलेट. तेव्हा तिच्यात किती प्रेमभाव आहे आणि तिच्यात आवड-निवडही नाही, असे वाटले. - कु. वैभवी झरकर, (वय ११ वर्षे)

अशी अनुभवली साधकांनी सौ. मंजिरी आगवेकर आणि श्री. चेतन राजहंस यांच्या ६१ टक्के पातळी गाठण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घोषणेतील गुपिताची गंमत !

१. बैठकीसाठी बोलवल्याने साधिकांना ताण येणे 
आणि बैठकीत स्थिर रहाता येण्यासाठी प्रयत्न करणे
      आज दुपारी २.४५ वाजता बैठककक्षात सौ. जान्हवी शिंदे, सौ. मंजिरी आगवेकर आणि कु. प्रियांका लोटलीकर यांना पू. बिंदाताई बैठक घेणार असून बैठकीसाठी बोलावले असल्याचे त्यांनी मला सांगितले. तेव्हा कोणत्या कारणासाठी बैठक होणार आहे, याची आमच्यात चर्चा चालू होती. प्रत्येकजण आपापले तर्क लावत होता. मला आणि धैवतदादाला बैठकीसाठी न बोलवल्याने मला वाटले, मला आणि धैवतदादाला त्रास असल्याने आम्हा दोघांना साधनेच्या दृष्टीने सांभाळण्याचे दायित्व पू. बिंदाताई त्या तिघींकडे वाटून देतील. नंतर हळूहळू ग्रंथ विभाग, ग्रंथ मुखपृष्ठ विभागातील साधकांनाही बैठकीला बोलावल्याचे समजू लागले. तेव्हा त्या प्रत्येकाला असेच वाटत होते, स्वतःच्याच चुकांची बैठक होणार आहे. नंतर कु. प्रियांकाने सांगितले, ५ - ६ दिवसांपूर्वी जो प.पू. रामभाऊस्वामी यांनी उच्छिष्ट गणपतियज्ञ केला, त्यासंदर्भातील चुकांची बैठक आहे. नंतर कोणाकडूनतरी वार्ता ऐकू आली, एका महत्त्वाच्या सेवेच्या समन्वयाच्या संदर्भात गंभीर चूक झाल्याचे कळले आहे. त्यामुळे त्या तिघी त्यांच्याकडून या प्रसंगांमध्ये काय काय चुका झाल्या, हे आठवत होत्या. त्या तिघीही आपापल्या परीने स्थिर आणि सकारात्मक रहाण्यासाठी प्रयत्न करत होत्या. जान्हवीताईने स्थिर रहाण्यासाठी श्रीकृष्णाचे चित्र समवेत घेतले. बैठकीला जायची वेळ झाल्यावर तोंडचे पाणी पळाल्यामुळे मंजिरीताईने पाणी पिऊन घेतले आणि समवेत पाण्याची बाटलीही घेतली अन् बैठकीत चुका सांगितल्यावर रडू येईल या दृष्टीने रुमालही समवेत घेतला आणि प्रियांकाने जातांना मला सांगितले, आमच्यासाठी प्रार्थना कर, बैठक निर्विघ्नपणे पार पडूदे आणि आमची स्वीकारण्याची स्थिती राहूदे. त्यानुसार मी प्रार्थना केली आणि धैवतदादालाही करण्यास सांगितली.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या देवतेप्रती आणि प.पू. डॉक्टरांप्रती असणार्‍या भावाचे दर्शन घडवणारी काही उदाहरणे

१. अमावास्येच्या दिवशी गाड्यांची शुद्धी व्हावी, म्हणून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी गाड्यांच्या चाव्या देवाच्या मूर्तीच्या चरणांवर ठेवणे आणि या कृतीतून त्यांच्या देवतेप्रतीच्या भावाचे दर्शन घडणे : आम्ही तिरुवण्णामलई, तमिळनाडू येथे असतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आमच्या चारचाकीची चावी मागून घेतली, तसेच त्यांच्याही गाडीची चावी घेऊन त्यांनी या दोन्ही गाड्यांच्या चाव्या देवाच्या मूर्तीच्या चरणांवर ठेवल्या. या दिवशी अमावास्या असल्याने गाडीची शुद्धी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच दिवशी त्यांनी नारळावर कापूर ठेवून तो पेटवून गाडीवरून ओवाळून टाकला. ते अगदी बारीकसारीक गोष्टीकडेही लक्ष देऊन त्या गोष्टी देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे.

ध्यानमंदिरातील भृगू महर्षींची प्रतिमा हलत असल्याचे दिसल्यावर सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याने प्रतिमा हलत असल्याचे महर्षींनी सांगणे

      २६.१२.२०१५ या रात्री ९ वाजता ध्यानमंदिरात उपायांसाठी बसले होते. थोड्या वेळाने माझे लक्ष ध्यानमंदिरातील महर्षि भृगू यांच्या प्रतिमेकडे गेले. त्या प्रतिमेसमोर लावलेल्या दिव्याकडे पाहिल्यावर दिव्यातून पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज बाहेर प्रक्षेपित असल्याचे जाणवले. काही वेळानंतर भृगू महर्षींची प्रतिमा मला तिरकी झालेली दिसली आणि नंतर ती हलतांना दिसली. क्षणभर वाटले, हा माझ्या डोळ्यांना भास झाला आहे; परंतु भृगू महर्षींची प्रतिमा खरोखरच हलतांना जाणवत होती. महर्षींना ती प्रतिमा का हलत असावी ?, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याने ही प्रतिमा हलत आहे. हे ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. त्या दिवसापासून महर्षींच्या प्रतिमेशी बोलल्यावर तेही माझ्याशी बोलत आहेत, असे जाणवते आणि भृगू महर्षींच्या प्रतिमेत पूर्वीपेक्षा अधिक जिवंतपणा जाणवतो.

सहस्रारचक्रातील चैतन्याच्या स्रोताविषयी आधुनिक वैद्य प्रवीण मेहता यांना आलेली अनुभूती

आधुनिक वैद्य प्रवीण मेहता
१. अधिवेशनाच्या कालावधीत आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवणे आणि तीन दिवस सहस्रारचक्रात आनंदाची स्पंदने जाणवून ध्यान लागणे : मी जून २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी चतुर्थ अखिल भारतीय हिंदु अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. १५.६.२०१५ या दिवशी सकाळपासूनच मला आश्रमामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे जाणवू लागले आणि त्यामुळे माझ्या सहस्रार चक्राच्या ठिकाणी आनंदाची स्पंदने जाणवून माझे मधे मधे ध्यान लागत होते. ही स्पंदने मला सलग तीन दिवस जाणवत होती आणि आनंद मिळत होता.
२. नामजप करतांना आनंद आणि शक्ती जाणवून दोन वेळा आसंदी मागे जात असल्याचे जाणवणे : १८.६.२०१५ या दिवशी मी एका संतांच्या खोलीच्या वर असलेल्या दुसर्‍या मजल्यावरील आगाशीत नामजप करत बसलो होतो. त्या वेळी मला पुष्कळ प्रमाणात आनंद आणि शक्ती जाणवत होती. तेव्हा माझी आसंदी आपोआप मागे जात असल्याचे मला दोन वेळा जाणवले. त्या वेळी ध्यान लागल्यामुळे तेथून उठू नये, असे मला वाटत होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

सौ. मंजिरी आगवेकर
१. प.पू. डॉक्टरांनी मंजिरीताईचे 
मन निर्मळ असल्याचे सुचवणे
      साधारणपणे २ वर्षांपूर्वी सकाळी सौ. मंजिरीताई विभागात नसतांना प.पू. डॉक्टर ग्रंथलिखाणाच्या सेवेसाठी आले. आदल्या दिवशी रात्री मंजिरीताईने तिची पर्स प.पू. डॉक्टरांच्या आसंदीवर ठेवली होती. मला प.पू. डॉक्टर आल्याचे न कळल्याने त्यांनीच ती पर्स उचलून तिच्या पटलावर ठेवली आणि मला म्हणाले, मंजिरीची पर्स नेहमीच हलकी असते ना ! काहीच नसते त्यात, तेव्हा मला वाटले, प.पू. डॉक्टर जणू मला सांगत आहेत, तिचे मन किती निर्मळ असते. तसे तुला तुझे मन निर्मळ करायचे आहे !
२. एकाग्रतेने प्रार्थना करणे
      मंजिरीताई सेवा करतांना अधूनमधून हात जोडून आणि डोळे बंद करून अत्यंत एकाग्रतेने प्रार्थना करते. त्या वेळी आजूबाजूला तिचे अजिबात लक्ष नसते.

स्वतःच्या प्रारब्धाची इतरांच्या प्रारब्धाशी तुलना करून दुःखी आणि निराश होऊ नका !

पू. संदीप आळशी
      त्रास असलेल्या साधकांना प्रारब्धामुळे आपली अशी स्थिती झाली आहे, हे ठाऊक असते. असे असले, तरी बरेच साधक चांगली स्थिती असणार्‍या साधकांच्या प्रारब्धाशी स्वतःच्या प्रारब्धाची तुलना करून दुःखी आणि निराश होतात. त्यांना हे कळत नाही की, चांगली स्थिती असणार्‍या साधकांनी गतजन्मांमध्ये खडतर प्रारब्ध भोगलेलेच आहे. समजा आपला सध्याचा दहावा जन्म चालू असेल, तर चांगली स्थिती असणार्‍या साधकांचा विसावा जन्म कशावरून चालू नसेल ? याचाच अर्थ त्यांनी आपल्यापेक्षा दुप्पट जन्मे प्रारब्ध भोगण्यात खर्ची घातलेलीच आहेत ! त्यामुळे तुलना करणे निरर्थक ठरते. याउलट प.पू. डॉक्टर आपल्याला मोक्षगुरु म्हणून लाभले असून त्यांनी आपल्याला पुत्रवत् स्वीकारलेले असल्याने आपण मोक्षाला जाईपर्यंत ते आपला हात कधीच सोडणार नाहीत, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती । चालोनिया हाती धरोनिया ॥, असे ते करत असल्यामुळे याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली पाहिजे. प.पू. डॉक्टरांची आपल्यावर असलेली कृपा आणि त्यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना आपण करत असल्याने अग्नीमुळे जसे गवताचे भारे जळून भस्मसात होतात, तसेच आपले प्रारब्ध भस्मसात होत आहे, याचा उलट आनंदच व्हायला पाहिजे. तसेच प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे सध्याच्या आपत्काळातही आपले प्रारब्ध त्यातल्यात्यात सुसह्यच होत आहे, याविषयी कृतज्ञताही वाटली पाहिजे.
- (पू.) श्री. संदीप आळशी (१७.१.२०१६)

दिसेल ते कर्तव्य या भावाने आचरण करणारे सनातनचे पू. पृथ्वीराज हजारेकाका !

      
पू. पृथ्वीराज हजारे
पौष कृष्ण पक्ष तृतीया (२७.१.२०१६) या दिवशी पू. पृथ्वीराज हजारेकाका यांचा वाढदिवस आहे.
पूू. पृथ्वीराज हजारेकाका यांच्या चरणी 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
       ८.११.२०१५ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत होतो. काही वेळाने तेथे महाप्रसाद वाढून घेण्यासाठी सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक आणि सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे (पू. काका) आले. त्या वेळी ताट पुसतांना त्यांच्या लक्षात आले की, सर्व ताटपुसणी (ताट पुसण्याची कापडे) ओली झाली आहेत. त्या वेळी पू. काकांनी सर्व ताटपुसणी स्वच्छ धुतली, घट्ट पिळली आणि ताट पुसण्याच्या ठिकाणी ठेवली. त्यांच्या या कृतीतून मला दिसेल ते कर्तव्य हा गुण शिकायला मिळाला.
     हे श्रीकृष्णा, पू. काकांप्रमाणे दिसेल ते कर्तव्य या भावाने माझ्याकडून सतत आचरण होऊ दे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.
- श्री. भास्कर खडपे, रत्नागिरी (११.११.२०१५)

काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात आनंद मिळण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले
     बसून नामजप करण्यापेक्षा काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. याचे कारण म्हणजे जे ध्यानमार्गी असतात, त्यांना बसून नामजप करणे चांगले वाटते. समष्टी साधना करणार्‍यांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१.२०१६)

प.पू. डॉक्टरांना आजारी असल्याचा झालेला लाभ !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     मी १० वर्षांपूर्वीची १५ वर्षे सर्वत्र जाऊन सत्संग घेत असे. संतांच्या भेटीगाठी घेत असे, तसेच जाहीर सभाही घेत असे. मी गेली १० वर्षे आजारपणामुळे आश्रमाबाहेर कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे इकडे तिकडे न फिरता, दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रांत वेळ फुकट न घालवता ग्रंथलिखाणावर मन केंद्रित करू शकतो. त्या ग्रंथांमुळेच देश-विदेशांत सहस्रो साधक तयार झाले आहेत आणि होत आहेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या,
तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
      कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी, हे ध्येय असणारा हिंदु धर्म ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मक रहा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शनिशिंगणापूर प्रकरण : हिंदूऐक्याची तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांना चपराक !

विशेष संपादकीय !
      २६ जानेवारी २०१६ ! हिंदूऐक्याने महाराष्ट्रवासियांना घालून दिलेला धड्यामुळे इतिहासात कोरून ठेवण्यासारखा दिवस ! धर्मविरोधी भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांना २६ जानेवारी या दिवशी हिंदूंच्या संघटितपणामुळे शनिचौथर्‍यावर प्रवेश करता आला नाही. हा तथाकथित स्त्रीमुक्तीवाद्यांचा, त्यांच्या पाठीराख्या राष्ट्रवादी काँग्रेस, नास्तिकवादी संघटना यांचा पराभव असून हिंदुशक्ती जर संघटित झाली, तर श्रद्धास्थानांवरील आघात परतवून लावता येतात, हे यातून सिद्ध झाले आहे !

अभियांत्रिकी शिक्षणाची एैसी की तैसी !

    नुकतेच ऐस्पायरिंग माइंड्सने ६५० अभियांत्रिकी महाविद्यालयांत दीड लक्षांहून अधिक विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून सादर केलेल्या नॅशनल एंप्लॉयबिलीटी रिपोर्टमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांविषयी काही धक्कादायक निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. या अहवालानुसार देशात अभियांत्रिकीची पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांमधील ८० प्रतिशत विद्यार्थी हे कोणत्याही प्रकारच्या चाकरीसाठी पात्र नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे. लक्षावधी रुपये व्यय करूनही, जर १०० मधील ८० विद्यार्थी चाकरी करण्याच्या पात्रतेचे नसतील, तर एक प्रकारे हा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच पराभव आहे, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. ज्या भारतातील तक्षशीला, नालंदा विद्यापिठात जगातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत त्या भारतातील शिक्षणाची ही लाजिरवाणी स्थिती होण्यासाठी या देशावर बहुतांश काळ राज्य केलेले काँग्रेसी राज्यकर्तेच त्याला उत्तरदायी आहेत. केवळ अभियांत्रिकीच नव्हे, तर बहुतांश सर्वच क्षेत्रांतील विद्यार्थ्यांची हीच अवस्था आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn