Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


आज प्रजासत्ताकदिन

ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांना प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
लोकहो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या
विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !

शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर कोणत्याही महिलांनी चढू नये ! - ग्रामसभेचा ठराव

ग्रामसभेत उपस्थित महिला आणि पोलीस अधिकारी

ग्रामसभेत बोलतांना शनिशिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर आणि उपस्थित महिला पदाधिकारी
    शनिशिंगणापूर, २५ जानेवारी (वार्ता.) शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी न चढण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोडणे म्हणजे महिलांचा अवमान नसून त्यामागे धर्मशास्त्र आहे. देवाच्या उपासनेत स्त्रियांना कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यामुळे स्त्रीवादाच्या नावाखाली कोणीही धार्मिक परंपरामध्ये ढवळाढवळ करू नये. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चौथर्‍यावर चढून दाखवणार असल्याची घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. यास शनिशिंगणापूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यामध्ये महिलांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही; मात्र अशाप्रकारे अपप्रकार करून कोणी धर्मभावना दुखावणार असेल, तर पोलिसांनी त्यावर कठोर कार्यवाही करावी, असा ठराव शनिशिंगणापूर येथे २५ जानेवारी या दिवशी झालेल्या महिला ग्रामसभेत करण्यात आला.

एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात क्रांतीकारकांना नगण्य स्थान

अभ्यासक्रमात क्रांतीकारकांना नगण्य स्थान देणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या
 उत्तरदायींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तरच पुढे असा इतिहासद्रोह कोणी करणार नाही !
केंद्रीय माहिती आयोगाने एन्.सी.ई.आर्.टी.ला फटकारले !
नवी देहली - भारतीय युवकांमधील राष्ट्रभावना जागृत करणे आवश्यक असतांना एन्.सी.ई.आर्.टी.च्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या) अभ्यासक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक क्रांतीकारकांशी संबंधित महत्त्वाच्या माहितीला कात्री लावण्यात आली. याविषयी केंद्रीय माहिती आयोगाने एन्.सी.ई.आर.टी.ला फटकारले असून स्पष्टीकरण मागितले आहे. (अशा अभ्यासक्रमातून राष्ट्रप्रेमी नागरिक नाही, तर राष्ट्रद्रोही नागरिक निर्माण झाल्यास आश्‍चर्य नाही ! - संपादक)
१. या संदर्भात जयपूर येथील सूर्यप्रताप सिंह राजावत यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
२. १२ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात स्वामी विवेकानंद यांची माहिती १ सहस्र २५० शब्दांवरून ३७ शब्दांमध्ये का आटोपली ? तसेच ही माहिती ८ व्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातून संपूर्ण का काढण्यात आली ? असा प्रश्‍न आयोगाने एन्.सी.ई.आर्.टी.ला विचारला.

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी देहलीत लष्कराच्या गाडीची चोरी !

    नवी देहली - २४ जानेवारी या दिवशी लोधी गार्डन परिसरातून लष्कराच्या रुग्णालयाचे चिन्ह असलेली पांढर्‍या रंगाची सँट्रो गाडी चोरीला गेली आहे. यामुळे पोलीस आणि सुरक्षायंत्रणा सावध झाल्या असून गाड्यांचा तपास चालू आहे. गर्दीची ठिकाणे आणि प्रसिद्ध बाजारपेठा अशा ३१ ठिकाणी, तसेच १३ महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर बिनतारी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे.

मुंबईत सुरक्षेसाठी ३५ सहस्र पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या १२ कंपन्या

आतंकवादमुक्त राष्ट्रीय दिन साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
    मुंबई, २५ जानेवारी - प्रजासत्ताकदिन सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबईत जवळपास ३५ सहस्र पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या १२ कंपन्या कार्यरत आहेत. पठाणकोटचे आक्रमण आणि गेल्या काही दिवसांतील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या छाप्यांनंतर देशात इसिसचे (आय.एस्.आय.एस्.चे)े जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाल्याने २६ जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईसह देशभरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी २५ जानेवारीपासून संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. गस्तीतही वाढ झाली आहे. शहरातील हॉटेल, गेस्ट हाऊस यांची तपासणी चालू असून भाड्याने रहाणार्‍या व्यक्तींविषयी माहिती घेण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत.

भारतियांनो, प्राचीन वैज्ञानिक आणि ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास जाणा !

विज्ञान जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळणे
    विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती. या क्वाँटम् सिद्धांताच्या आधारावरच सध्याचे आधुनिक रसायनशास्त्र, जीव-रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक आणि संगणक आहेत. (मासिक हिंदु व्हॉईस, मार्च २००६, पृष्ठ क्र. ११)
न्यूटनच्या आधी किमान १ सहस्र वर्षे गुरुत्वाकर्षणाची संकल्पना आद्य शंकराचार्यांनी मांडलेली असणे
    प्रश्‍नोपनिषदातील एका मंत्रावर भाष्य करतांना आद्य शंकराचार्य म्हणतात, पृथ्वीच्या प्रख्यात देवतेने अपानास साहाय्य करून खाली ओढून धरले नसते, तर हे शरीर जड असल्यामुळे अंतरिक्षात कुठेही गेले असते किंवा पडले असते. वैदिक विज्ञानास धरूनच शंकराचार्यांनी भाष्य केले आहे. शंकराचार्यांचा काळ उशिरात उशिरा इ.स. ८०० मानलेला आहे. त्यामुळे न्यूटनच्या अगोदर किमान १ सहस्र वर्षे शंकराचार्य होऊन गेले आहेत. तरी आम्ही म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला ! (संदर्भ : वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १८६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)

देशातील वातावरण असहिष्णु वाटणारे खान हे सावन राठोड हत्या प्रकरणाच्या संदर्भात संदर्भात गप्प का ? - पू. नंदकुमार जाधव

धुळे येथे हिंदु धर्मजागृती सभेला ८ सहस्र धर्माभिमान्यांची उपस्थिती !
७ घोड्यांच्या रथात बसलेले संतद्वयी (पू. नंदकुमार
जाधव आणि पू. (कु.) स्वाती खाड्ये)आणि अन्य...
     धुळे, २५ जानेवारी (वार्ता.) - मालदा येथील दंगलीत धर्मांधांनी पुष्कळ हिंसाचार घडवला. पुण्यात केवळ हिंदु आहे; म्हणून सावन राठोडला जिवंत जाळले, तर त्याविषयी अभिनेता शाहरूख खान, आमीर खान काहीच बोलत नाहीत; पण किरकोळ दादरी प्रकरणाविषयी लगेचच विधाने केली जातात. देशात असहिष्णुतेच्या वक्तव्याविषयी क्षमा मागतांना शाहरूख खानने माझा चित्रपट यशस्वी (सुपरहिट) होऊ दे. मग बघतो, अशी धमकीही दिली होती. या खानांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालायला हवा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. येथे २४ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अग्रसेन पुतळ्यामागील मैदानावर हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. त्या सभेत ते बोलत होते.

फलक प्रसिद्धीकरता

अभ्यासक्रमात क्रांतीकारकांना नगण्य स्थान देणार्‍या 
एन्.सी.ई.आर्.टी.च्या उत्तरदायींवर कठोर कारवाई करा !
अभ्यासक्रमात स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते आणि क्रांतीकारक यांच्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती वगळण्यात आल्यामुळे राष्ट्रीय माहिती आयोगाने एन्.सी.ई.आर्.टी.ला (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला) फटकारले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Swatantrata senaniyonse judi samagriyon ko NCERTne apni pustakome sankshipta me prakashit kiya. - kya shasan uttardayionpar karvai karegi ?
जागो ! : स्वतंत्रता सेनानियों से जुड़ी सामग्रियों को एन्सीईआर्टी ने अपनी पुस्तकों में संक्षिप्त में प्रकाशित किया. - क्या शासन उत्तरदायीआेंपर कारवाई करेगी ?

श्रीकृष्णाच्या आणि साधू-संतांच्या आशीर्वादाने साकार होईल हिंदु राष्ट्र !

डॉ. श्रीपाल सबनिसांना वाटते मरणाची खोटी भीती ।
सनातनला गोवण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांची नवीन रणनीती ॥ १ ॥ 

संजीव पुनाळेकरांनी सबनिसांना दिला आरोग्याचा सल्ला ।
सबनीस अन् प्रसिद्धीमाध्यमांना वाटला हा प्राणघातक हल्ला ॥ २ ॥ 

सबनीस प्रसिद्धीमाध्यमांच्या समोर न येता करतात शब्दांचा खेळ ।
अशी चर्चासत्रे घेऊन प्रसिद्धीमाध्यमे घालवत आहेत समाजाचा अमूल्य वेळ ॥ ३ ॥ 

सबनिसांना केले आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ।
त्यांनी विचार मांडताना द्यावे दुसर्‍याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे लक्ष ॥ ४ ॥ 

प्रसिद्धीमाध्यमे आणि विद्रोही साहित्यिकांनी केला त्यांच्या खोटेपणाचा खुलासा ।
समाजकंटक आणि धर्मद्रोही यांना हिंदु राष्ट्रात होईल साधनेची शिक्षा ॥ ५ ॥ 

सनातनवर आरोप करून सबनीस मिळवत आहेत दिलासा ।
सनातनलाच द्यावी लागते सारखी अग्निपरिक्षा ॥ ६ ॥ 

सनातनला दोष देणार्‍यांनी स्वतःचे करावे आत्मपरीक्षण ।
समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण यांसाठी सनातनकडून घ्यावे धर्मशिक्षण ॥ ७ ॥ 

निद्रिस्त राज्यकर्ते, जनता आणि प्रसिद्धीमाध्यमे झाले आहेत धृतराष्ट्र ।
श्रीकृष्णाच्या आणि साधू-संतांच्या आशीर्वादाने साकार होईल हिंदु राष्ट्र ॥ ८ ॥ 

- श्री. अभिजीत विभूते आणि सौ. जान्हवी विभूते, मडगाव, गोवा. (१०.१.२०१६)

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी लावणारे भास्कराचार्य

प्राचीन काळातच विविध शोध लावून आधुनिक विज्ञानाला मागे 
टाकणार्‍या आपल्या बुद्धीमंत पूर्वजांकडून स्फूर्ती घ्या ! 
    भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले. भास्कराचार्यांनी यौगिक गणित (कालवाचक गणित - वेदातील शब्द) लिहिले. नवीन ग्रहावर गेल्यासच माणसाला ते कळेल. 
    भास्कराचार्य (इ.स. १२ वे शतक) यांनी आपल्या सिद्धांतशिरोमणी या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितले आहे.

भारतियांनी प्रजासत्ताकदिनाला काय करावे ?

  • देशासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली, तरी ती देऊ शकतो, ही जाणीव स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा !
  • स्वातंत्र्याचा फायदा नेहमी सत्च्या कार्यासाठी करावा !
  • भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी भारतातील संत सातत्याने प्रयत्नशील आहेत. सर्व देशांमध्ये आदर्श मानल्या जाणार्‍या भारतीय संस्कृतीवर अनेकांनी आक्रमण करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संतांच्या आणि ईश्‍वराच्या आशीर्वादाने ही संस्कृती टिकून आहे. या भारतीय संस्कृतीला तडा जाऊ नये, यासाठी लढायला हवे !

पुरातन वास्तूंद्वारे भारताला मिळालेली वैभवसंपन्न इतिहासाची देणगी !

पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा ! 
    जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी ! एरंडोलचे प्राचीन नाव ऐरणवेल किंवा अरुणावती असे होते. ते अंजनी नदीच्या काठी वसले आहे. महाभारताच्या आधी पांडव अज्ञातवासात असतांना ते याच एकचक्रानगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा ! आजही एरंडोलमध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोलपासून १५ किलोमीटरवर असलेल्या पद्मालय येथे जाऊन भीमाने बकासुराचा वध केला. आजही पद्मालयापासून दीड किलोमीटरवर भीमकुंड, भीमाचे जाते, तसेच भीम आणि बकासुर यांच्या युद्धांच्या खुणा पहायला मिळतात. एरंडोल येथे भीमाची वाटी अजूनही दिसते. वाड्याच्या जवळच असलेल्या विहिरीला द्रौपदीकूप असेही म्हणतात. अनेक पर्यटक महाभारतकालीन पांडववाडा आणि पद्मालय येथे भेट देतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा शासकीय गॅझेटमध्ये (राजपत्रामध्ये) पांडववाडा असा उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमातही पांडववाड्याचा एक धडा अभ्यासासाठी होता. त्यामुळे शालेय मुलांच्या सहलीही पांडववाडा पहाण्यासाठी यायच्या.

हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

      रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने आणि धनुर्विद्येच्या कौशल्यानेे घोरीचा शिरच्छेद करणारा पृथ्वीराज चौहान, शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विजनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्कराय, अकबराच्या सैन्याला जेरीस आणणारा पराक्रमी महाराणा प्रताप आणि पाच पातशाह्या मोडून काढून हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे पराक्रमी अन् धर्मवीर राजे हिंदु धर्मात होऊन गेले. या राजांच्या गौरवशाली इतिहासावर थोडक्यात टाकलेला प्रकाश....

हाजी मलंग, लोहगड आणि पुणे येथील दर्ग्यांचा खरा इतिहास !

हाजी मलंग दर्गा
लोहगड
     पूर्वी मोगल आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून त्यांचे दर्गा आणि मशिदी यांत रूपांतर केले. या वेळी मोगलांच्या गुलामीत दिवस कंठणार्‍या भोळसट हिंदूंनी या दर्ग्यांवर चादर चढवणे, त्यांना नवस बोलणे आदी प्रकार करण्यास प्रारंभ केला. ते तेथील उरुसाला इमानेइतबारे जाऊ लागले. तेथील सुफी संतांना मानू लागले. आजही ही परंपरा धर्मनिरपेक्ष भारतात चालू आहे. हिंदू त्यांचा खरा इतिहास विसरल्याचे हे द्योतक आहे. हाजी मलंग, लोहगड आणि पुणे येथील दर्गे यांचा मूळ इतिहास पाहिला, तर ती हिंदूंची श्रद्धास्थाने होती. ती नष्ट करून मोगल आक्रमकांनी त्यांचे दर्ग्यांत रूपांतर केले. हिंदूंच्या माहितीसाठी या दर्ग्यांचा खरा इतिहास येथे देत आहोत. 
१. लोहगडावर लोमेश ऋषी, बहिरोबा, शिवशाहीपासून पेशवाईपर्यंतच्या वास्तू यांपैकी कसलेच अवशेष नाहीत; मात्र शेख उमरचा दर्गा व्यवस्थित, त्यामुळे मन अस्वस्थ होते !
    लोहगड पहातांना मन मात्र अस्वस्थ होते. लोमेश ऋषी, बहिरोबा, शिवशाहीपासून पेशवाईपर्यंतच्या वास्तू यांपैकी लोहगडावर कसलेच अवशेष नाहीत; मात्र शेख उमरचा दर्गा व्यवस्थित ! इतिहासाची पाने धुंडाळली. तेराव्या शतकातला एक महत्त्वाचा धागा सापडला. हा धागा हाजी मलंग, लोहगड आणि पुणे यांना जोडणारा समान धागा होता.

मरावे परि कीर्तीरूपे उरावे !...

    स्वत:साठी जगणारी माणसे पुष्कळ असतात; पण काही माणसे केवळ दुसर्‍यासाठीच जगतात आणि मरतातही. नागपूर येथील गौरव सहस्रबुद्धेचे जगणे आणि मरणेही असेच दुसर्‍यासाठी होते. सहस्रबुद्धे दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या गौरवची कामगिरीही गौरव वाटावी अशीच होती. दहावीत शिकणार्‍या गौरवने हिंगाणा रोडवरील टाकळी सीम भागातील अंबाझरी तलावात बुडतांना चौघांना पाहिले आणि त्याने क्षणाचाही विचार न करता स्वत:स तलावात झोकून देत तिघांना बाहेर काढले; मात्र चौथ्याला सुखरूप बाहेर काढतांना गौरव प्राणाला मुकला.

ताजमहाल हे मंदिर असल्याचे पुरावे !

१. ताजमहालाच्या मुख्य घुमटाच्या कळसावर त्रिशूळ आहे. ते शिवाचे शस्त्र म्हणून प्रचलित आहे. 
२. मुख्य घुमटाच्या वरील छतावर साखळी लटकत आहे. सध्या तिचा उपयोग होत नाही; पण मुसलमानांच्या आक्रमणापूर्वी तिला एक भांडे लावण्यात येत होते आणि त्याद्वारे शिवलिंगावर अभिषेक होत असे.
३. ताजमहाल २ मजल्यांचा आहे. खरी आणि रिकामी कबर खालच्या माळ्यावर आहेत, तर २ रिकाम्या कबरी पहिल्या मजल्यावर आहेत.
४. मुसलमानांच्या कुठल्याही वास्तूत प्रदक्षिणा मार्ग नसतो; पण ताजमहालमध्ये प्रदक्षिणा मार्ग उपलब्ध आहे. 
    ताजमहाल येथील मंदिरात असलेल्या शिवलिंगाला तेजोलिंग असे नाव होते. या मंदिराला तेजोमहालय असे संबोधले जायचे. हे शिवाचे मंदिर अग्रेश्‍वर नावाने प्रसिद्ध होते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भारतीय राज्यघटना आणि मनूने सांगितलेली शाश्‍वत मूल्ये !

१. शासनाने राज्यघटनेलाच धर्मग्रंथ मानणे
    दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान (घटना) दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश भारत शासनाने दिले आहेत. वर्ष २०१५ हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंतीवर्ष आहे. ११ ऑक्टोबर २०१५ या दिवशी मुंबई येथील इंदूमिलच्या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणार्‍या संकुलाचा शिलान्यास करतांना ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या आधी २६ नोव्हेंबर हा विधी दिवस (Law day) म्हणून साजरा करण्यात येत होता. पंतप्रधान मोदींनी याच वेळी (शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०१५) लोकसभेमध्ये निक्षून सांगितले की, For the government, the only dharma is India First, the only dharma granth (holy book) is the constitution. (शासनासाठी भारत हा धर्म, तर संविधान हा एकमेव धर्मग्रंथ आहे.) ७० मिनिटे दिलेल्या पंतप्रधानांच्या भाषणात या विषयावर बरेच काही सांगितले गेले. भारताच्या घटनेसंदर्भात जे अनेक समज आणि गैरसमज आहेत, त्यामध्ये या विधानामुळे भरच पडणार आहे. धर्म आणि पंथ या संकल्पनांची गफलत ही भारतियांना तरी नवीन नाही.

श्री. संजीव पुनाळेकरजी, साभार धन्यवादासह आपला त्रिवार जयजयकार !

श्री. संजीव पुनाळेकर
श्री. दत्तात्रय पटवर्धन
आदरणीय श्री. संजीव पुनाळेकरजी ।
धर्म-अधर्म युद्धात मारली आपण
धर्माची बाजी ॥ १ ॥

धर्म-अधर्म युद्धात एक मडगाव युद्ध जिंकले ।
तद्वत अधर्मी वृत्तवाहिन्यांना पूर्ण
चीतपट केले ॥ २ ॥

हे सर्व ऐकून, पाहून स्वामी विवेकानंद आठवले ।
आणि माझे अंत:करण खरोखर भावाने भारावले ॥ ३ ॥

स्वामी विवेकानंद आणि आपणांत आहे एक साम्य अन् वेगळेपणा ।
की जे द्वैत असूनही आहे अद्वैत आगळे ॥ ४ ॥

घटनेविना देश विकसित राष्ट्र होऊ शकतो, हे सिद्ध करणारा इंग्लंड !

आजही इंग्लंडला लिखित राज्यघटना नाही.


घटना समितीतील सदस्यांचा अहंकार !

   २४ जानेवारी १९५० ला घटनासमितीची बैठक बोलावण्यात आली. एच्.व्ही. आर्. अय्यंगार यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे नाव पहिले राष्ट्रपती म्हणून सुचवले आणि त्यांची त्याकरता एकमताते निवड झाली. २६ जानेवारी १९५० ला हाच मसुदा भारताची राज्यघटना म्हणून अंमलात आला.
   २४ जानेवारीच्या सभेमध्ये घटनासभेच्या सर्व सभासदांनी त्या हस्तलिखित मसुद्याखाली स्वाक्षर्‍या केल्या. अर्थातच पहिली स्वाक्षरी जवाहरलाल नेहरू यांची होती. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सर्वांत शेवटी स्वाक्षरी करण्याचे नाकारले. शेवटी सर्वसंमतीने हस्तलिखित घटनेची शेवटची ओळ आणि नेहरूंची स्वाक्षरी यामध्ये असलेल्या लहान जागेमध्ये डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपली स्वाक्षरी केली. अधिकार आणि श्रेष्ठत्वाच्या बाबतीत पंतप्रधानांच्या वरती राष्ट्रपती आहेत, हेच बहुधा राजेंद्रप्रसाद यांनी यातून दाखवून दिले. (संदर्भ : त्रैमासिक सद्धर्म, जानेवारी २०१६)

धर्मनिरपेक्षतावाल्यांचा मुखवटा आणि चेहरा !

      माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाच्या वतीने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विज्ञापनात मूळ घटनेची प्रस्तावना छापली होती. या प्रस्तावनेत सोशालिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द नाहीत. यामुळे तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्यांचा पोटशूळ उठला. त्यांनी मोदी शासनावर विविध आरोप केले. या संदर्भात अधिवक्ता त्रिलोक राठी यांनी तथाकथित धर्मनिरपेक्षवाल्यांचा बुरखा फाडणारा लेख लिहिला आहे. यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने तो आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

हिंदूंनो, या दिव्य भूमीतून परत एकदा तुम्हीच सोने पिकवा !

स्वा. सावरकर यांचे मौलिक विचार
      आंतरराष्ट्र्रीय पातळीवर सशस्र क्रांतीकारकांचे जाळे उभारण्यासाठी आणि बॅरिस्टर होण्यासाठी स्वा. सावरकर ख्रिस्ताब्द १९०६ मध्ये लंडनला गेले. तेथून त्यांनी महाराष्ट्र्रातील वर्तमानपत्रांना वार्तापत्रे पाठवली. त्या वेळी इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर या राजकीय पक्षांसह समाजवाद्यांचाही एक पक्ष उदयाला येत होता. या पक्षाच्या हिंडमन या पुढार्‍याने लंडनमधील एका भाषणात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ओझरता विषय काढला होता. या संदर्भात स्वदेशवासियांना सावधगिरीचा इशारा देतांना एका वार्तापत्रात २३ वर्षांचे सावरकर लिहितात,

अतीसूूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !

      वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली. ती महाभारत, पुराणे इत्यादि ग्रंथात समाविष्ट केलेली आढळते. श्रीमद् भागवत पुराणात ३/११ येथे पुढीलप्रमाणे कोष्टक दिलेले आहे.
१ अहोरात्र = ८ प्रहर = २४ तास
१ अह = १ रात्र = ४ प्रहर = १२ तास
६ नाडिका = १ प्रहर = ३ तास
२ नाडिका = १ मुहूर्त = १ तास = ६० मिनिटे

प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडात स्वतःला समर्पित करतांना अंगावर घेत असलेल्या शालीची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊस्वामी सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यासाठी वर्ष १९७० पासून यज्ञ करत आहेत. या यज्ञांचे वैशिष्ट्य म्हणजे यात ते स्वतःची आहुती देतात. ते धगधगत्या यज्ञकुंडात जाऊन प्रत्येक वेळी १० मिनिटांपर्यंत स्वतःला समर्पित करतात. त्या वेळी त्यांच्या अंगावर एक शाल असते. या शालीचा तिच्याभोवतीच्या वायूमंडलावर कसा परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना
अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे
बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत मला कळते, तेच सत्य, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुणाचेही वाईट चिंतू नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट चिंतणे आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

इसिसच्या विळख्यात भारताचे प्रजासत्ताक !

    ६७व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारत आता केवळ आयएस्आयचे नव्हे, तर इसिसचे (आयएस्आयएस्चे) संकट माथ्यावर घेऊन वावरत आहे. भारत या विश्‍वाचा एक भाग असल्याने जागतिक पातळीवर निर्माण होणार्‍या संकटांची झळ भारताला पोहोचणे अपरिहार्य होते; मग आर्थिक मंदी असो, ग्लोबल वॉर्मिंग असो, इंधन दरवाढ असो, अथवा शीतयुद्ध असो. वर्तमानस्थितीत जगावर आलेल्या इसिस नावाच्या भयंकर संकटातही भारत असाच होरपळणार आहे. मुसलमानांचे राज्य निर्माण करत इस्लामचे साम्राज्य वाढवण्यासाठी इसिसने जगभरातील मुसलमान युवकांना या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि आश्‍चर्य म्हणजे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स यांसारख्या विकसित राष्ट्रांत चांगले वेतन घेणारे उच्चशिक्षित मुसलमान तरुण-तरुणी सिरियात येऊन दाखल झाले आणि हाती सुरा घेऊन माणसांचे गळे चिरू लागले. त्या क्रूरतेचे चित्रीकरण करून पुन्हा हेच तरुण-तरुणी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून त्याचा जगभर प्रसार करून इसिसविषयी दहशत निर्माण करत राहिले आहेत. या क्रूरतेमुळे मुसलमान तरुण आकर्षित झाल्याने पाश्‍चिमात्य राष्ट्रे चिंतेत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn