Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

पू. पद्मावती केंगेआजी यांचा आज वाढदिवस

राज्यशासनाने वाटलेल्या लॅपटॉपवरूनच चालू होता इसिसशी संपर्क !

जिहादी मानसिकता असणारे शासनाने दिलेल्या सुविधांचाही देशाच्या विरोधातच वापर
करतात, हेच स्पष्ट होते. भारतातील सर्वच राजकारणी यातून काही बोध घेतील का ?
उत्तरप्रदेशमध्ये पकडलेल्या अलीमकडून उघड झाली धक्कादायक माहिती
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पक्षाने निवडणुकीच्या काळात शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना विनामूल्य लॅपटॉप वाटले होते. त्या लॅपटॉपच्याच साहाय्याने देशविरोधी कारवाया केल्या जात असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, आतंकवादविरोधी दल आणि भाग्यनगर (हैद्राबाद) गुन्हे विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत इसिस या आतंकवादी संघटनेशी संधान साधलेला अलीम अहमद याला येथून नुकतीच अटक करण्यात आली. तो लॅपटॉपच्या साहाय्यानेच इसिसच्या संपर्कात होता आणि त्या संघटनेचे जाळे भारतात पसरवण्याच्या प्रयत्नात होता. हा लॅपटॉप अजूनही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. अलीमने तो कुठेतरी लपवून ठेवला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिहादकडे वळण्यामागे मागासलेपणा आणि अशिक्षितपणा ही कारणे नसून कट्टरतावादी मानसिकताच ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

जिहादी आतंकवाद्यांच्या मानसिकतेचा संबंध त्यांना लहानपणापासून दिल्या जात असलेल्या
 धार्मिक कट्टरतावादाच्या शिक्षणाशी आहे. कित्येक उच्चशिक्षित आणि धनवान धर्मांधही 
जिहादकडे वळले आहेत. त्यामुळेच जिहादी आतंकवाद नष्ट करायचा झाल्यास सर्वप्रथम
 बालपणापासून देण्यात येणार्‍या विखारी कट्टरतावादी शिक्षणावरच बंदी घालायला हवी !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारत तसेच विदेशातही जिहादी आतंकवादी कारवाया वाढण्यामागे मुसलमान समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले मागासलेपण आणि अशिक्षितपणा ही कारणे असल्याचा डांगोरा कथित निधर्मीवाद्यांकडून पिटला जातो. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाने मात्र अशांच्या डोळ्यांत नक्कीच अंजन पडेल; कारण सातत्याने पुढे करण्यात येणारी ही कारणे खोटी असल्याचे सिंह यांनी येथे केलेल्या एका भाषणातून स्पष्ट होते. येथील गोमतीनगर भागातील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापिठाचा तेरावा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील इसिसशी संबंधित ९४ संकेतस्थळे केली बंद !

इतके दिवस इसिसच्या कारवाया चालू असतांनाही ही संकेतस्थळे यापूर्वीच बंद का केली नाहीत ?
     मुंबई - गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात इसिसचे आतंकवादी पकडले गेल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी इसिसच्या कारवाया थोपवण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास आरंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने इसिसशी संबंधित ९४ संकेतस्थळांवर कारवाई करून ती बंद केली आहेत, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसळकर यांनी दिली.

अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा ! - उद्धव ठाकरे यांचा घणाघात

     मुंबई - केवळ देवळात घंटा वाजवणारा हिंदु नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू या देशात उभा राहणार आहे कि नाही ? केवळ शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या मार्गावरून आपण चाललो आहोत, असा होत नाही. इसिसचे जाळे देशभरात खोलवर पसरले आहे. आम्ही त्यांच्याकडे केवळ ईदचे बकरे बनून जायचे का ? चालवा, आमच्या मानेवर सुरा चालवा !, असे म्हणायचे का ? शासन जर आमचे संरक्षण करायला समर्थ नसेल, तर हिंदूंनाही त्याच भाषते उत्तर द्यावेच लागेल. ही शिकवण जर आपण पाळली नाही, तर स्वतःला वाघ नव्हे, तर शेळ्या-मेंढ्या म्हणवून घ्या, असे घणाघाती उद्गार श्री. उद्धव ठाकरे यांनी काढले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत हिंदुष्ट्यांवर प्रहार केला.

कोणत्याही परिस्थितीत धर्मपरंपरांचे रक्षण करणारच ! - शनिभक्त महिला आणि ग्रामस्थ यांचा निर्धार

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियान अंतर्गत चला शनिशिंगणापूरला चळवळ
     शनिशिंगणापूर - येत्या २६ जानेवारीला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी महिलांकडून श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याविरोधात येथील ग्रामस्थ, शनिभक्त महिला आणि हिंदुत्ववादी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून २ सहस्रांहून अधिक शनिभक्त महिला आणि हिंदुत्ववादी सहभागी होणार आहेत. धर्मपरंपरेचे रक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे, याचे प्रथम दायित्व पोलीस आणि प्रशासन यांचेच असणार आहे; पण त्यांच्याकडून ते न झाल्यास ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत धर्मपरंपरांचे रक्षण करतील, असा निर्धारच शनिभक्त महिला आणि ग्रामस्थ यांनी केला आहे.

पठाणकोट आक्रमणातील दोषींवर पाकने कठोर कारवाई करण्याची भारताची मागणी योग्यच ! - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॉन्सुआ ओलांद

 • या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी फ्रॉन्सुआ ओलांद
 • ओलांद यांच्या दौर्‍याला चंदीगडपासून प्रारंभ
     नवी देहली - पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशा आशयाची भारताने पाकिस्तानकडे केलेली मागणी ही पूर्णत: योग्य असल्याचे मत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॉन्सुआ ओलांद यांनी व्यक्त केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष २४ जानेवारीपासून भारताच्या तीन दिवसीय दौर्‍यावर आले असून ते भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या राष्ट्रीय संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणूनही उपस्थित रहाणार आहेत. या प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथीच्या रूपात उपस्थित रहाणारे ओलांद हे फ्रान्सचे पाचवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. प्रजासत्ताक दिनी होणार्‍या संचलनामध्ये भारतीय सैन्यासह फ्रेंच सैनिकांची तुकडीही सहभागी होणार आहे. ओलांद यांनी त्यांच्या दौर्‍याचा प्रारंभ चंदीगड येथील दोन देशांमधील व्यापारी परिषदेपासून केला आहे.

मुंबई विद्यापिठातील कर्मचार्‍यांनी घातलेल्या सत्यनारायण पूजेला स्टुडंट फ्रंट या विद्यार्थी संघटनेचा तीव्र विरोध !

देवतांचा अवमान करणार्‍या घोषणा देणारे असे धर्मद्रोही विद्यार्थी ज्ञानाजर्नास पात्र आहेत का ?
असे विद्यार्थी पुढे देशाचे भवितव्य काय घडवणार ?
सत्यनारायण मुर्दाबादच्या घोषणांमुळे तणाव !
     मुंबई - मुंबई विद्यापिठाच्या कलिना परिसरात २२ जानेवारी या दिवशी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शैक्षणिक परिसरात धार्मिक कार्यक्रम होऊच नयेत, अशी मागणी करत विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत सत्यनारायण हाय हाय, बेकायदेशीर सत्यनारायण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी कर्मचार्‍यांनी सुरक्षारक्षकांकरवी या विद्यार्थ्यांना दूर केले. (देशासमोर सहस्रो समस्या असतांना त्यासाठी काही न करता धार्मिक गोष्टींवर तथाकथित नियमांच्या आधारे विरोध करून हे विद्यार्थी वेळ आणि शक्तीच दवडत आहेत ! - संपादक)

नंदुरबार येथे बंदकाळात झालेल्या दगडफेकीत ३ पोलीस अधिकारी आणि ५ पोलीस कर्मचारी घायाळ

दगडफेकीत घायाळ होणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? राज्यातील 
वाढते अराजक रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
     नंदुरबार - भाग्यनगर येथील रोहित आत्महत्येप्रकरणी शहरात पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात काळी मशिदीच्या परिसरात लग्नकार्य चालू होते; मात्र त्याच वेळी अचानक दगडफेक चालू झाली. यात तीन पोलीस अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक घायाळ झाले आहेत. तसेच काही वाहनांचीही हानी झाली आहे. दगडफेकप्रकरणी १७ जणांना कह्यात घेतले आहे. 
१. २१ जानेवारीला भाजपचे कार्यकर्ते खुशाल चौधरी यांच्या वाढदिवसाचा फलक शहरातील बागवान चौकात लावण्यात आला. त्यावर राणी लक्ष्मीबाई मित्र मंडळ चौक असे लिहिण्यात आले; मात्र काही काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने फलकावर पट्टी लावण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे.
२. नंदुरबार बंदच्या काळात झालेल्या दगडफेकीत गुरांचा चाराही जाळण्यात आल्याने दोन घरांची हानी झाली आहे.

२६ वर्षे विस्थापितांचे जीवन जगणार्‍या काश्मिरी हिंदूंकडून जंतर-मंतर येथे निषेध सभा !

मोदी शासनाने विस्थापिताचे जीवन जगणार्‍या काश्मिरी हिंदूंची समस्या सोडवणे अपेक्षित आहे !
     नवी देहली - स्वतंत्र भारतात राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे काश्मिरी हिंदू गेली अनेक वर्षे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. त्यांना विस्थापित होऊन यंदा २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर काश्मिरी समिती देहलीच्या वतीने जंतर-मंतर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेला उपस्थित असणार्‍या हिंदुत्ववाद्यांनी आतापर्यंतच्या सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांसमवेतच केंद्रातील वर्तमान भाजप शासनाविषयीही संताप व्यक्त केला. या सभेत काश्मिरी समिती देहलीचे अध्यक्ष श्री. विजय रैना, पनून कश्मीरचे श्री. अजय च्रोंगु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते. या निषेध सभेनंतर या परिसरातच एक निषेध फेरीही काढण्यात आली. त्यात आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हिमवादळामुळे अमेरिकेतील १० राज्यांत आणीबाणी

येणार्‍या आपत्काळात अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होणार आहे. आपत्काळाला सामोरे 
जाण्यासाठी प्रत्येकाने साधना करून भगवंताची कृपा संपादन करणे, ही काळाची आवश्यकता आहे !
 • १ लाख २० सहस्रांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित !
 • गेल्या ९० वर्षांतील सर्वांत मोठे हिमवादळ !
 • १० राज्यांतील शाळांना सुट्टी !
       वॉशिंग्टन - अमेरिकेला गेल्या ९० वर्षांतील सर्वांत मोठ्या हिमवादळाचा तडाखा बसला असून वॉशिंग्टन डी सी, उत्तर कॅरोलिना, मेरिलँड, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, व्हर्जिनिया, न्यूजर्सी यांसह एकूण १० राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसला असून तेथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आतापर्यंत या वादळामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे या राज्यांतील वीज व्यवस्थेसह अन्य पायाभूत सुविधाही कोलमडल्या आहेत. तब्बल १ लाख २० सहस्रांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. १० राज्यांतील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पनवेल येथे उरुसामुळे होणार्‍या विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकाचे नगराध्यक्षांना पत्र

समस्या न सुटल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देणार !
     पनवेल - येथे अनेक वर्षांपासून पीर करमअलीशहा बाबांचा उरुस होत आहे. या उरुसामुळे गेल्या ४-५ वर्षांपासून प्रचंड अतिक्रमण, गुन्हेगारी आणि उरुसाच्या कालमर्यादेत होणारी वाढ यांमुळे सतत वाद होत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उरुसाला पारंपरिक प्रथेप्रमाणे केवळ ३ दिवसांची अनुमती द्यावी, उरुसातील विक्रेत्यांना पदपथावर बसण्याची अनुमती देण्यात येऊ नये, तसेच सर्व नियमांचे पालन करण्यात यावे अशा मागण्या शिवसेनेचे नगरसेवक श्री. प्रथमेश सोमण यांनी पत्राद्वारे नगराध्यक्षांकडे केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयीची माहिती काँग्रेसने दडपली ! - प्रकाश जावडेकर

काँग्रेसने दडपलेली देशातील सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्त यांची माहिती 
शासनाने सर्वांसाठी उघड करावी, हीच केंद्रशासनाकडून अपेक्षा !
     पुणे, २४ जानेवारी - देशात केवळ एकाच घराण्याला इतिहास असल्याचे काँग्रेस आतापर्यंत सांगत होते. त्यामुळे इतर स्वातंत्र्यसेनानी पडद्याआड राहिले; परंतु आमच्यासाठी सर्व देशभक्त समान आहेत; म्हणूनच आम्ही काही स्वातंत्र्यसेनानींच्या नावे नव्या योजना लागू केल्या आहेत. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दूर ठेवले. यापूर्वी काँग्रेसने नेताजींविषयीची खरी माहिती दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नेताजींचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या कामातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी निगडित गोपनीय धारिका उघड करण्याच्या केंद्राच्या भूमिकेविषयी ते येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ताजिकिस्तानमध्ये इस्लामी प्रथांवर बंदी

भारताला जिहादी आतंकवादापासून वाचवण्यासाठी ताजिकिस्तानच्या 
राष्ट्राध्यक्षांकडून येथील राज्यकर्ते बोध घेतील का ?
धार्मिक मूलतत्त्ववादापासून देशाला वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांकडून उपाय
 • १३ सहस्र नागरिकांच्या दाढ्या काढण्यात आल्या !
 • पारंपरिक मुसलमान पोशाख घालण्यावर बंदी !
 • अरेबिक वाटणार्‍या नावांवरही बंदी ! 
    नवी देहली - अफगाणिस्तानमधील धार्मिक मूलतत्त्ववादी लाटेचा प्रभाव ताजिकिस्तानमध्येही पसरू नये, याकरिता येथील धर्मनिरपेक्ष शासन विशेष काळजी घेत आहे. या अनुषंगाने परकीय मूलतत्त्ववादापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी येथील सुमारे १३ सहस्र नागरिकांची दाढी काढण्यात आली असून पारंपरिक मुसलमान पोशाख विकणारी १६० दुकानेही बंद करण्यात आली आहेत.
१. ताजिकिस्तान हे मध्य आशियामधील अत्यंत महत्त्वाचे राष्ट्र आहे. ताजीकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एमोमली रहमान यांनी देशात धर्मनिरपेक्षता कायम रहावी, यासाठी ताजिकिस्तानच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक ठरू शकणार्‍या प्रथांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मी मरत आहे, मला माहीत नाही मी कधीपर्यंत जगू शकेन... - पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांची व्यथा

     इस्लामाबाद - पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि हिंदु खेळाडू दानिश कनेरिया हेही पाकिस्तानच्या इस्लामी कट्टरवादापासून सुटलेले नाहीत. मी मरत आहे, आता माझ्याजवळ अतिशय अल्प पैसे शिल्लक आहेत. मला नाही माहीत की मी कधीपर्यंत जगू शकेन. माझ्यावर ही वेळ याकरता आली की मी हिंदु आहे, जे पाकिस्तानात अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ माझे ऐकूनसुद्धा घेत नाही, अशी परिस्थिती हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने जगासमोर मांडली; मात्र लवकरच त्याने कोलांटऊडी घेऊन मी असे म्हणालोच नाही, माझे वृत्त तोडून-मोडून सादर करण्यात आले. मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे, असेही सांगितले. यातून कनेरियावर पाकिस्तानी कट्टरतावाद्यांनी दबाव आणला असावा, असे म्हणण्यास वाव आहे. (पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेले अत्याचार बघता कनेरियावर वक्तव्य पालटण्यासाठी दबाव आणला गेल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! - संपादक) स्पॉट फिक्सिंगच्या कथित आरोपाखाली पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून कनेरियावर क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो गेल्या ४ वर्षांपासून क्रिकेट खेळू शकला नाही.

देशात असहिष्णुता नाही ! - दिग्दर्शक प्रकाश झा

याविषयी तथाकथित पुरोगामी आणि चित्रपट क्षेत्रातील लोक यांना काय म्हणायचे आहे ?
     पुणे, २४ जानेवारी - देशात असहिष्णुता असल्याचे मलातरी दिसत नाही, तसेच वैयक्तिक पातळीवर मला देशात असहिष्णुतेचा अनुभव आलेला नाही. करण जोहर यांनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला असेल. कोणी अप्रसन्न असेल, तर त्यांना तसे मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, असे मत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केले. (याचा अर्थ असा नव्हे की, कोणीही आपले मत जाहीर कार्यक्रमात व्यक्त करावे, याचेही समाजभान ठेवणे आवश्यक आहे. - संपादक)
    ते पुणे आतंकवादविरोधी पथकाच्या कार्यालयात जय गंगाजल या चित्रपटाचे विज्ञापन (प्रमोशन) करण्यासाठी आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पथकाचे साहय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, अन्य मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. 

नैराश्यग्रस्त तरुणाने महिलांच्या लोकलगाडीच्या डब्याला आग लावली !

    मुंबई - एका नैराश्यग्रस्त तरुणाने चर्चगेट-मरीन लाइन्स स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या महिलांच्या डब्याला २४ जानेवारीच्या पहाटे आग लावली. या प्रकरणी त्याला कह्यात घेण्यात आले. हा तरुण गेल्या ६ मासांपासून बेकार असल्यान नैराश्यात आहे. कारागृहात गेलो, तर घरच्यांचा त्रास सहन करावा लागणार नाही, या विचारानेच हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. त्याने लावलेल्या आगीत महिलांच्या डब्यासह शेजारील डब्याचीही पुष्कळ हानी झाली आहे. (सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी ! - संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा ! - ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज

मलकापूर, ता. कळंब (जिल्हा धाराशिव) येथे लोमटे महाराजांचे भक्तांना आवाहन !
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने महाराजांची घेतली भेट
ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज (डावीकडे) 
यांना ग्रंथ भेट देतांना श्री. आप्पासाहेब सांगोलकर
     मलकापूर ता. कळंब (जिल्हा धाराशिव), २४ जानेवारी (वार्ता.) - बार्शी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला भक्तांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येथील ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज यांनी पौर्णिमेनिमित्त आलेल्या सहस्रो भक्तांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मजागृती सभेला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रसारानिमित्त समितीचे श्री. तानाजी गोरे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी ह.भ.प. लोमटे महाराजांची मलकापूर येथे भेट घेतली. त्या वेळी त्यांनी उपस्थित भक्तांंना आवाहन केले. या वेळी सनातनचे श्री. सांगोलकर यांनी महाराजांची भेट घेऊन सभा घेण्याचा उद्देश विशद केला. आणि हिंदु राष्ट्र का हवे ? हा ग्रंथ महाराजांना भेट दिला. या वेळी महाराजांनी सभेला आशीर्वाद दिले. तसेच सभेला उपस्थित रहाणार्‍या मान्यवर वक्त्यांची नावेही उपस्थित भक्तांना सांगितली.

बांगलादेशमध्ये वासनांध मुसलमानांकडून हिंदु महिलेवर पाशवी बलात्कार

बांगलादेशमध्ये हिंदु असुरक्षित !
    ढाका - बांगलादेशच्या होबीगंज जिल्ह्यातील बनियाचाँग उपजिल्ह्यामध्ये उत्तर शंगर गावात महंमद मोनु मिहा आणि महंमद उस्तार मिहा या वासनांध मुसलमानांनी एका २२ वर्षीय हिंदु महिलेवर पाशवी बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी महंमद मोनु मिहा याला अटक केली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
    १४ जानेवारी या दिवशी हिंदु महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून धर्मांधांनी तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. पीडित महिलेचे पती घरी परतल्यानंतर त्यांनी या घटनेविषयी स्थानिक पंचांकडे तक्रार केली. पंचांनी महंमद मोनु मिहा या आरोपीची झडती घेतली असता त्याने गुन्हा मान्य केला; मात्र त्याचा लहान भाऊ महंमद उस्तार मिहा याने पंचांशी हुज्जत घातली आणि दोघे जण तेथून निसटले. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे श्री. रवींद्र घोष यांच्याशी संपर्क साधला. श्री. घोष यांनी बनियाचाँग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

इस्लाममध्ये बुद्धीबळ खेळणे निषिद्ध !

बौद्धिक विकास साधणार्‍या बुद्धीबळावर निर्बंध घालणारे मौलवी कोणत्या युगात वावरत आहेत ?
सौदी अरबच्या सर्वोच्च इमामांचा फतवा
     रियाध - सौदी अरब येथील सर्वोच्च इमाम मुफ्ती शेख अब्दुल्ला यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात इस्लाममध्ये बुद्धीबळ खेळणे निषिद्ध आहे, असे सांगितले. बुद्धीबळ हा एकप्रकारे जुगारच आहे. या खेळामुळे वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होण्यासह खेळाडूंमध्ये शत्रूत्वाची भावना वाढते, असे कारण देत त्यांनी हा फतवा लागू केला. (बुद्धीबळामुळे शत्रुत्व वाढते कि मदरशांमध्ये मुलांना जहाल शिक्षण दिल्यामुळे ते वाढते ? बुद्धीबळाला जागतिक मान्यता आहे. तो खेळ खेळल्यामुळे मुलांना लाभच होतो. असे असतांना नेहमी जगापेक्षा आम्ही काहीतरी वेगळे आहोत, हे दाखवण्यासाठी मुल्ला-मौलवींकडून असे फतवे काढले जातात ! तथकथित सुधारणावादी मुसलमान याला विरोध करणार का ? - संपादक) यापूर्वी इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरु अयातोल्ला अली अल सिस्तानी यांनीही इस्लामनुसार बुद्धीबळ खेळणे निषिद्ध असल्याचे म्हटले होते.

फलक प्रसिद्धीकरता

लोकहो, राष्ट्रध्वजाचा मान राखा !
१. ध्वजसंहितेच्या नियमाप्रमाणे फडकवलेला राष्ट्र्रध्वज सायंकाळी ६ पूर्वी उतरवा !
२. रस्त्यावर, नाल्यात आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेले राष्ट्र्रध्वज उचला !
३. तोंडावळा अथवा कपडे यांवर राष्ट्रध्वज रंगवणार्‍यांचे प्रबोधन करा !

पनवेल येथील ४ गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आध्यात्मिक सेवा समिती, रेवदंडा यांचा उपक्रम 
      पनवेल - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आध्यात्मिक सेवा समिती, रेवदंडा यांच्या वतीने येथील देवद, विचुंबे, शिवनगर आणि विकासवाडी या ४ गावांमध्ये २४ जानेवारी या दिवशी ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात एकूण ४१० युवकांनी सहभाग घेतला. या अभियानाच्या अंतर्गत देवद येथील सनातन आश्रमाच्या समोरील रस्ता आणि सनातन संकुल येथील परिसर यांची स्वच्छता करण्यात आली. अशा प्रकारचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रातही राबवण्यात आले. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. 

एकांगी आणि केवळ हिंदुद्वेषी वृत्त दाखवणारी वृत्तवाहिनी !

      शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचे भूमाता ब्रिगेड संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठरवले. त्याअनुषंगाने एका वृत्तवाहिनीकडून ब्रिगेडच्या या आदेशामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या पायाखालची भूमीच सरकली आहे, अशा आशयाचे वृत्त दाखवण्यात येत होते. प्रत्यक्षात बिग्रेडने केलेल्या आवाहनानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन महिलांना चौथर्‍यावर जाण्यास देऊ नये, यासाठी जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत प्रशासनाला निवेदने देणे, आंदोलने करणे, पत्रकार परिषद घेणे, स्थानिक महिलांचे प्रबोधन करणे अशा अनेक स्तरांवर प्रयत्न केले; मात्र वृत्तवाहिनीच्या हिंदुद्वेषामुळे केवळ भूमाता ब्रिगेडच्या संदर्भातील वृत्तेच वाहिनीवरून दाखवण्यात आली. इतकेच नव्हे, तर प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरील संबंधितांचीही या प्रकरणाच्या संदर्भातील मते वाहिनीने आवर्जून दाखवली; मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या धर्महानी थांबवणार्‍या प्रयत्नांची वृत्तवाहिनीने नोंदही घेतली नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशातील विविध भागांमध्ये शासनाला निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्र्रध्वजाचा मान राखा ! चळवळ
सुरक्षा विभागाचे डेप्युटी कमांडर अर्जुनचंद्र मांझी
यांना निवेदन देतांना डावीकडून ए.डी. नाथ,
अधिवक्ता विभूतिभूषण पलई आणि श्रीराम काणे 
     देहली - २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने होणारा राष्ट्र्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रमाणात चळवळ राबवण्यात येते. या अनुषंगाने देशातील विविध भागांमध्ये शासनाला दिवेदन देण्यात आले, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राऊरकेला (ओडिशा) येथे प्रशासनाकडून चळवळीला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन
    राऊरकेला - १४ जानेवारी या दिवशी येथील नागरी सुरक्षा विभागाचे डेप्युटी कमांडर अर्जुनचंद्र मांझी यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी सर्वश्री अधिवक्ता परिषदेचे सचिव अधिवक्ता विभूतिभूषण पलई, सदस्य अधिवक्ता तपन पंडा, सनातन संस्थेचे ए.डी. नाथ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्रीराम काणे उपस्थित होते. यावेळी मांझी यांनी समितीचे कार्य जाणून घेतले आणि संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago: Gantantradivas jihadi atank ke saaye me : Delhime high alert !
     Bhaymukt vatavaranme Rashtriya tatha Dharmik utsav manane hetu Hindu Rashtrahi avashyak !
जागो
: गणतंत्रदिवस जिहादी आतंक के साये में : देहलीमे रेड अ‍ॅलर्ट !
     भयमुक्त वातावरणमें राष्ट्रीय तथा धार्मिक उत्सव मनाने हेतु हिन्दु राष्ट्रही आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व विभागांना पत्र

 • हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे यश ! 
 • राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करा ! 
     सांगली, २४ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये, यांसाठी सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना द्याव्यात, तसेच आपल्या अखत्यारित येणार्‍या सर्व संस्थांना हा विषय कळवावा, असे पत्र सर्व विभागांना पाठवले आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सदरचे पत्र सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त, उपमुख्यकार्यकारी अधिकारी-जिल्हापरिषद, शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

शासकीय योजनांच्या नावातील हिंदुहृदयसम्राट शब्दास आक्षेप !

     मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून त्यांच्या नावाने सहा योजनांची घोषणा परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी १९ जानेवारी या दिवशी केली. राज्य परिवहन (एस्.टी.) आणि परिवहन विभाग यांच्या वतीने चालू करण्यात येत असलेल्या या योजनांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख असा करण्यात आला आहे. त्यावर शासकीय योजनांमध्ये धर्म आणि राजकीय पक्ष यांचा उल्लेख करणे हा केवळ संकेतांचाच भंग नव्हे, तर भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या विरोधातही असल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. (राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द घुसडून आणि त्याच्या आडून अनेक वर्षे हिंदूंना फसवणार्‍या काँग्रेसला असे बोलण्याचा नैतिक अधिकार उरतो का ? - संपादक)

असहिष्णुतेचा कांगावा करत पुरस्कार वापसी करणार्‍या १० साहित्यिकांनी पुन्हा पुरस्कार स्वीकारले !

 • पुरस्कार परत केल्याने देशाचा होऊन गेलेला अवमान परत मिळवता येणार आहे का ? 
 • या साहित्यिकांनी जनतेची क्षमा मागितली पाहिजे !
     नवी देहली - देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या नावाने पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांपैकी नयनतारा सहगल यांच्यासह दहा साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पुन्हा स्वीकारले आहेत. असहिष्णुतेच्या प्रकरणात पुरस्कार परत करणार्‍या लेखकांमध्ये सहगल आघाडीवर होत्या. साहित्य अकादमीच्या सांगण्यावरून या साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पुन्हा स्वीकारले आहेत. (असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करून देशातील वातावरण बिघडवणार्‍या साहित्यिकांना जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - संपादक)

शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकवा आणि महानगरांमधील शाळांची समयमर्यादा वाढवा !

मोदी शासनाला संघ परिवारातील विद्या भारतीचा सल्ला
     नवी देहली, २४ जानेवारी - नवीन शैक्षणिक धोरण बनवण्यासाठी मोदी शासनाने समाजातील विविध घटकांकडून प्रस्ताव मागवल्या आहेत. अनेक संघटनांनी मानव विकास मंत्रालयाकडे त्यांचे प्रस्तावही पाठवले आहेत. यांपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शैक्षणिक विभाग विद्या भारतीने सुचवले आहे की, महानगरातील (मेट्रो शहरे) शाळांच्या वेळा १२ घंट्यांच्या असाव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषा शिकण्याची संधी मिळेल. विद्या भारतीने म्हटले आहे की, शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना संस्कृतही शिकवले पाहिजे. यामुळे भारतीय भाषांतील विदेशी शब्दांची घुसखोरी रोखली जाईल. विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरापासूनच संस्कृत शिकवले, तर ते मातृभाषा चांगल्या प्रकारे बोलू आणि लिहू शकतील. संस्कृत शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचे उच्चार आणि वर्तणूकही योग्य राहील.

स्त्रियांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या फेमिनिझम्च्या (स्त्रीवादाच्या) बुरख्याआडचा मुखवटा !

     अलीकडेच व्होग या संकेतस्थळाने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचा माय चॉइस हा व्हिडिओ प्रदर्शित केला. २८ मार्च २०१५ या दिवशी तो व्हिडिओ यु-ट्यूबवरून प्रसिद्ध झाला आणि दोन-तीन दिवसांतच लाखो जणांपर्यंत पोहोचला. या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोन यांच्यासमवेत वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावलेल्या महिलांनी स्त्रीसक्षमीकरणावर चर्चा केली आहे. या लेखात वैशाली चिटणीस यांनी हा व्हिडिओ म्हणजे फेमिनिझमचा बुरखा असून त्यामागे मार्केटिंग फंडे राबवणार्‍यांचा, स्त्रीवादाच्या चुकीच्या कल्पना बाळगणार्‍यांचा मुखवटा कसा दडलेला आहे, याविषयी मांडले आहे.
    हा व्हिडिओ व्होग मॅगझिनने त्यांच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त व्होग एम्पॉवर या चळवळीअंतर्गत प्रसिद्ध केला होता. वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजेच स्त्री सक्षमीकरण या विषयावर लोकांनी विचार करावा, बोलावे, कृती करावी, या हेतूने व्होगने हा व्हिडिओ सिद्ध करून यु-ट्यूबवर प्रदर्शित केला. या व्हिडिओत दीपिका पदुकोन या एकट्याच नाहीत, तर देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावलेल्या ९९ महिला या दोन मिनिटे ३४ सेकंदांच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडिओमध्ये आहेत; पण आज तो दीपिकाचा व्हिडीओ म्हणूनच ओळखला जात आहे.

नथुरामी परंपरा कोणती, हे सबनिसांनी सांगावे !

     अखिल भारतीय मराठी संमेलनात अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्ष यांनी दाभोलकर-पानसरे यांच्या हत्या नथुराम परंपरेंने केल्या, असा आरोप केला. त्यांनी नथुरामची परंपरा म्हणजे नक्की कोणती, हे स्पष्ट करावे आणि साहित्य संमेलनात निर्माण केलेला संभ्रम दूर करावा. येथे प्रथम नथुराम विचारसरणी म्हणजे नेमकी कोणती विचारसरणी, असा आमचा प्रश्‍न आहे; कारण विनाकारण मराठीजनांनी त्याचा अर्थ उजवी विचारसरणी करणे उपयुक्त होणार नाही. श्रीपाल सबनीस वर्षभरासाठी मराठी भाषेतील विचारवंतांचे नेतृत्व करणार आहेत. त्यांना आम्ही सल्ला देण्याचे शहाणपण करणार नाही; पण तरीही त्यांनी इतरांना तुच्छ लेखून आणि राजकारण करून अध्यक्ष बनल्याने स्वतःची बुद्धी खूप प्रगल्भ आहे, असे मानण्याचा प्रयत्न करू नये, असे आम्हाला वाटते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीचा उघड खून पाडण्याचे रचले गेलेले षड्यंत्र संपवण्याचे काम प्रथम करावे, त्यांचा तेवढाच विषय आहे. उगाच आपले काम सोडून दुसरीकडे नाक खुपसू नये. दाभोलकर पानसरे यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी पोलीस, सीबीआय आणि न्यायालये आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्या.
(विशेष संपादकीय, दैनिक सनातन प्रभात, १७.१.२०१५)

जर्मनीमध्ये विस्थापित धर्मांधांनी केलेल्या अत्याचारांचा नागरिकांनी घेतलेला प्रतिशोध योग्यच !

प.पू. पांडे महाराज
     इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाचातून सुटका होण्याच्या उद्देशाने वर्ष २०१५ मध्ये सिरिया, इराक इत्यादी देशांतून १० लक्ष धर्मांध मुसलमान विस्थापितांनी जर्मनीमध्ये आश्रय घेतला. जर्मनीनेही मानवतेच्या आधारावर त्यांना देशात आश्रय दिला; मात्र देशातील कोलोन, हॅमबर्ग आणि अन्य शहरांमध्ये त्यांतील अनेकांनी नववर्ष साजरे करणार्‍या काही जर्मन महिलांवर अमानवी लैंगिक अत्याचार केल्याचे आढळून आले. अशा ६०० हून अधिक तक्रारी तेथील पोलिसांकडे आल्या आहेत. अशा आशयाचे वृत्त नुकतेच वाचनात आले. 
     मती गुंग करणार्‍या या वृत्तातील अमानवी कृत्य करणार्‍यांना मानव म्हणता येईल काय ? असे लोक पृथ्वीला भारच आहेत. अशा दुष्ट वृत्तीच्या लोकांचा नाश करणेच योग्य आहे. त्या दृष्टीने तेथील नागरिक घेत असलेला प्रतिशोध योग्यच आहे, असे मला वाटते. 
- (प.पू.) परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१.२०१६) 

पुरोगामी आणि त्यांची माध्यमे यांची नाटके !

श्री. नित्यानंद भिसे
    मागील दोन-तीन आठवडयांत दोन विषय दोन चाकांवरून अवघ्या महाराष्ट्रात गरागरा फिरत होते. कधी या वृत्तवाहिनीवर, तर कधी त्या वृत्तवाहिनीवर या विषयांची मागणी होती. ते दोन विषय म्हणजे ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या सबनिसांची वाचाळ बडबड आणि त्यानंतर त्यांच्या मागे लागलेली प्रसिद्धीमाध्यमे अन त्यातून सुटका करवून घेण्यासाठी त्यांची झालेली दमछाक, तर दुसरा विषय म्हणजे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरसह राज्यात जेथे जेथे शनिदेवाचा चौथरा असेल, तेथे लागलीच तथाकथित स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्यवाले यांच्या चार बायका एकत्र येेणे आणि त्या शनिदेवाविषयी मनात काडीचीही श्रद्धा नसतांना उगाच वरकरणी पूजा करण्याचा आव आणून स्त्रीहक्काची भाषा करणे. या दोन नाटकांनी अवघ्या महाराष्ट्राला इतके व्यस्त ठेवले की, एक क्षणाचीही उसंत घ्यायला माध्यमवाल्यांना वेळ मिळेनासा झाला.

सेल्फी नामक विकृती !

    सेल्फी नामक विकृतीचे लोण सर्व जगभर फोफावले आहे. असे असतांना त्यात भारत तरी कसा मागे राहील ? शाळा-महाविद्यालयांत जाणार्‍यांत मात्र याविषयी भलतेच आकर्षण आहे. आस्थापनांतील कर्मचारीही या जोखडातून सुटलेले नाहीत. याच सेल्फीचा जीवघेणा फटका वांद्रे (मुंबई) येथील बॅण्डस्टॅण्ड येथे दोन तरुणींना बसलाच शिवाय यांच्या बचावार्थ पुढे गेलेले शिवसैनिक श्री. रमेश वळंजू यांनाही बसला. त्या तीन तरुणींचा मूर्खपणा वळंजू यांचे प्राण घेऊन गेला, हे नक्कीच चीड आणणारे आहे. चूक कोणाची आणि प्राण मात्र जीव धोक्यात टाकून त्यांच्या बचावासाठी उसळत्या समुद्रात उडी घेणार्‍यास गमवावा लागला.

बार्शी येथील हिंदु धर्मजागृती सभेला मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहू !

त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बबलू साळुंके यांचे समितीच्या कार्यकर्त्यांना आश्‍वासन !
श्री. बबलू साळुंखे यांच्याशी चर्चा करताना
श्री. सांगोलकर (उजवीकडे)
     बार्शी (जिल्हा सोलापूर), २४ जानेवारी (वार्ता.) - येथे ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहू, असे आश्‍वासन त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बबलू साळुंके यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त समितीचे कार्यकर्ते श्री. तानाजी गोरे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी श्री. बबलू साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली होते. तेव्हा त्यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी श्री. सांगोलकर यांनी समितीचे कार्य आणि धर्मजागृती सभा घेण्याचा उद्देश विषद केला. या वेळी श्री. साळुंके यांचे घरातील सदस्य उपस्थित होते. 

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

शनिदेवाचा कोप सहन करायला सिद्ध असल्यास महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्यास काय हरकत ?

    शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर स्त्रियांना प्रवेश मिळण्याच्या संदर्भात सध्या भूमाता ब्रिगेडवाले आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, तर हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरांचे रक्षण होण्यासाठी जनप्रबोधन करत आहेत. त्यासंदर्भात आमच्या एका वाचकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि त्याचे उत्तर बाजूला दिले आहे. 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत इतिहास गौरव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक २६ जानेवारी
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारी या दिवशी 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

कोई भी आतंकी साजिश इस देश में न रह पाएगी ।

पू. दिव्य जीवनदासजी महाराज
जब कसाब पर बिरयानी की बारिश होने लगती है,
आतंकी सर चढते हैं, साजिश होने लगती है ।
जब सद्दाम की मौत पर भारत बंद कराया जाता है,
ऐसा करके आतंकी का मान बढाया जाता है । 
जब ओसामा बिन के शव पर वोट बैंक रो देता है, 
ठीक उसी पल आतंक का एक बीज यहां बो देता है ।
बडे-बडे जब मेमन की फांसी रुकवाने अडते हैं,
यह दृश्य देख इन आतंकी के और होसले बढते हैं ।
जब हाफिज सईद के पीछे साहब जोडा जाता है, 
ऐसा करके सेनाआें का साहस तोडा जाता है ।

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

आतंकवादी आक्रमणांचे संकट भारतात सर्वत्र असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही भूमाता ब्रिगेडच्या महिलांना देशद्रोहाबद्दल कारागृहात टाका !

     श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोह करू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांना शासनाची सणसणीतच चपराक बसली आहे. पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त श्री. शि.ग. डिगे यांनी, या महिलांनी २६ जानेवारी २०१६ या दिवशी चौथर्‍यावरच नव्हे, तर शनिमंदिरातही येऊ नये, असे त्यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

जाणूनी गुरूंचे मनोगत, अशा भावाने सेवा करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि मनमोकळेपणा अन् प्रेमभाव असलेल्या साधिका सौ. मंजिरी आगवेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मनमोकळेपणा, सकारात्मकता, प्रेमभाव ।
अन् करूनी सदा इतरांचा विचार ॥
चुकांचा केला तत्परतेने स्वीकार ।
सौ. मंजिरीताईंवर गुरूंनी केला कृपावर्षाव ॥

प्रभुत्व ज्याचे सर्व विषयांवर ।
श्रद्धापूर्वक सहज असतो वावर ॥
परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवेतूनी चेतनदादा ।
स्थिर झाला श्रीचरणांवर ॥
     रामनाथी - भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे, तीव्र तळमळीचे मूर्तीमंत स्वरूप असलेले अन् सनातनचा चालता-बोलता माहितीकोषच असलेले अष्टपैलू साधकरत्न, सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवेद्वारे ईश्‍वराच्या समीपच असलेल्या सौ. मंजिरी आगवेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंददायी घोषणा पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी २४ जानेवारीला येथे केली. एका अनौपचारिक सोहळ्यात करण्यात आलेल्या या घोषणेमुळे साधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, तर श्री. चेतन राजहंस आणि सौ. मंजिरी आगवेकर यांनी मात्र निःशब्द कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी ग्रंथ विभागातील साधकांसह श्री. चेतन यांच्या बहिणी सौ. अवनी आळशी, सौ. नंदिनी चितळे, मेहुणे श्री. नीलेश चितळे, तर सौ. मंजिरी यांचे पती श्री. विनायक आगवेकर उपस्थित होते. श्री. चेतन राजहंस आणि सौ. मंजिरी आगवेकर यांचा सत्कार सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

धर्माचरण करणाराच श्रेष्ठ ! - भैय्याजी जोशी

     पुणे - धर्माचे ज्ञान सांगणारे अनेक जण आहेत; पण त्याप्रमाणे आचरण करणार्‍या व्यक्ती अल्प आहेत. त्यामुळे धर्माचरण करणाराच श्रेष्ठ आहे. ज्ञानग्रंथ जाळल्याने त्यातील विचार संपत नाहीत. वेदवाङ्मय कुठल्याही आक्रमणापुढे नष्ट होणारे नसले, तरी वेदांचे रक्षण केलेच पाहिजे. मंदिरांचे रक्षण झाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांनी केले. सद्गुरु ग्रुपच्या वतीने २० जानेवारी या दिवशी येथील बालगंधर्व कलादालनात वेदरत्न आणि शास्त्ररत्न या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी एम्आयटीचे अध्यक्ष श्री. विश्‍वनाथ कराड, मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे, यज्ञेश्‍वर महाराज सेलूकर उपस्थित होते.

वेगवेगळ्या वैद्यांकडून अनेक तपासण्या करूनही डोळे दुखण्याचे निदान न होणे, प.पू. पांडे महाराज यांनी दिलेला मंत्रजप भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करण्यात अडथळे येणे आणि नंतर ते दूर होऊन डोळ्यांचे दुखणे थांबणे

     
श्री. सुरेश कदम
जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले. माझ्या आजाराचे निदान होत नव्हते. एकदा एका संतांची भेट झाली. त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हा मी डोळे दुखत असल्याचे सांगितले. त्या संतांनी एका साधिकेला प.पू. पांडे महाराज यांना याविषयी विचारायला सांगितले. प.पू. पांडे महाराज यांनी लगेच संगणकीय पत्राद्वारे, तसेच ध्वनीमुद्रित करून मंत्र पाठवला.
     तो मंत्रजप भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करून घेण्यास पुष्कळ अडथळे आले. वेगवेगळे भ्रमणभाष आणले; पण त्यात मंत्र ध्वनीमुद्रित होत नव्हता. ध्वनीमुद्रित झालेले पुसले जायचे. असे १२ दिवस झाले. मग देवाला प्रार्थना केली, देवा, तूच काय ते बघ. त्यानंतर मंत्र भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) झाला. तेव्हापासून मंत्रजप करणे चालू केले. नंतर मला चक्कर यायला लागली. दुसर्‍या दिवशी देवानेच जाणीव करून दिली की, हा मंत्रजपातील अडथळा आहे. त्याही अवस्थेत मंत्रजप चालू केला. मंत्रजपामुळे माझे डोळ्यांचे दुखणे थांबले. त्यासाठी प.पू. गुरुदेव आणि प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी कृतज्ञ आहे. ऋषीमुनींनी सांगितलेल्या मंत्राचे सामर्थ्य आणि संतांचा संकल्प यांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
- श्री. सुरेश कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२५.४.२०१५)

कडुनिंबाच्या सात्त्विक झाडासंदर्भात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. तुकाराम लोंढे यांना आलेल्या अनुभूती

     
श्री. तुकाराम लोंढे
एका संतांच्या निर्णयानुसार मी माझ्या आई-वडिलांच्या सेवेसाठी ४.६.२०१५ पासून गावी रहायला गेलो. आमचे गाव केकतसारणी, तालुका केज, जिल्हा बीड येथे असून त्याची लोकवस्ती ५ सहस्र आहे. शेतातील घरात माझे आई-वडील दोघेच असतात. वस्तीच्या भोवती ९ - १० कडुनिंब आणि बाभळीची झाडे आहेत. मराठवाड्यात वातावरण नेहमी उष्णच असते.
१. नामजपाला अन्य झाडाखाली बसल्यावर जाणवणारी अस्वस्थता नेहमीच्या कडुनिंबाच्या झाडाखाली बसल्यावर दूर होणे आणि थंडगार वार्‍याच्या झुळुका येऊन आल्हाददायक वाटणे : मी प्रतिदिन सकाळी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र एका आसंदीमध्ये ठेवून त्यांच्यासमोर बसून जप करतो. नामजपाला मी एका झाडाखाली बसतो आणि रात्री झोपतोही तिथेच. ते विशिष्ट झाड मी जाणीवपूर्वक निवडले नाही. एके दिवशी मी काही कारणास्तव अन्य एका झाडाखाली जप करण्यासाठी बसलो होतो; परंतु मला त्या झाडाखाली अस्वस्थ जाणवले. तरीही प्रयत्नपूर्वक मी तेथेच बसलो. तेव्हा मला पुष्कळ उष्मा जाणवला. शेवटी मी माझ्या नेहेमीच्या जपाच्या ठिकाणी त्या विशिष्ट झाडाखाली जाऊन बसल्यावर मला थंडगार वार्‍याच्या झुळुका जाणवल्या आणि आल्हाददायक वाटले.

उच्छिष्ट गणपती यज्ञाच्या संदर्भात श्रीकृष्णाकडून साधिकेला मिळालेले ज्ञान

कु. संध्या माळी
प्रश्‍न : उच्छिष्ट गणपती यज्ञाच्या शेवटी १८.१.२०१६ ला दुपारी ४.१५ नंतर प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन आश्रमाच्या अंगणातील प्रवेशद्वाराच्या कोपर्‍यात दही-भाताचा नैवेद्य दाखवला. यज्ञाला असलेले प.पू. रामभाऊस्वामी यांचे शिष्यगण, यजमान आणि पुरोहित यांना त्या जागी उभे राहून आश्रमाकडे बघून दोन्ही आेंजळीत लाह्या घेऊन त्या स्वतःच्या डोक्यावरून मागे फेकण्यास सांगण्यात आल्या. स्वतः प.पू. रामभाऊस्वामी यांनीही तसे ५ - ६ वेळा केले. त्याचे कारण काय ?
श्रीकृष्ण : यज्ञाला असलेले प.पू. रामभाऊस्वामी यांचे शिष्यगण, यजमान आणि पुरोहित यांना दृष्ट लागल्यास ती निघून जावी, यासाठी त्यांना तसे करण्यास सांगण्यात आले.
- कु. संध्या माळी (१८.१.२०१६, सायं. ५.२४)

उच्छिष्ट गणपति यज्ञात वाईट शक्ती जळत असल्याचे जाणवणे

     १५.१.२०१६ या दिवशी यज्ञाच्या धुराकडे पाहिल्यावर मला त्यात सूक्ष्मातून वाईट शक्तींचे आरडाओरडा करणारे पुष्कळ तोंडवळे दिसले. मी सूक्ष्मातून देवाला विचारले, हे काय आहे ? तेव्हा देवाने सांगितले, या ५ व्या आणि ६ व्या पाताळातल्या वाईट शक्ती आहेत. त्यांना या यज्ञाचा त्रास होत असल्याने त्या ओरडत आहेत. या यज्ञात त्या जळत आहेत. 
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत.
- कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०१६)

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती

सौ. क्षिप्रा जुवेकर
१. यज्ञाला आरंभ होण्यापूर्वी
अ. संपूर्ण पृथ्वी आतून थरथरत असल्याचे वाटत होते. पाताळातील वाईट शक्ती अस्वस्थ झाल्या होत्या.
आ. अलंकारांनी आभूषित श्रीरामाचे विशाल रूप प्रसन्न मुद्रेत दिसत होते. त्याच्या हातात धनुष्यबाणही होते. त्या वेळी मनातून श्रीरामाचा नामजप चालू झाला.
इ. यज्ञस्थळी प.पू. रामभाऊस्वामी यांचे आगमन झाल्यावर तेथे प.पू. भक्तराज महाराजही उपस्थित आहेत आणि यज्ञ संपेपर्यंत ते तेेथे असणार आहेत, असे वाटत होते.
२. विधींना आरंभ झाल्यावर 
     यज्ञ आरंभ होताच पृथ्वीचे थरथरणे काही प्रमाणात अल्प झाल्यासारखे वाटले.
२ अ. गोपूजन : पू. गाडगीळकाका आणि पू. (सौ.) गाडगीळकाकू गोपूजन करत असतांना गोमातेने वातावरणातील सगळी काळी शक्ती नष्ट केली, असे वाटले. (त्या वेळी काळी शक्ती वातावरणातून पळून जातांना दिसली.)

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या ठिकाणी नामजप करतांना आलेल्या अनुभूती

सौ. श्रद्धा पवार
१. यज्ञस्थळी डोळे उघडे ठेवून नामजप करतांना माझ्या मनात कोणतेच विचार येत नव्हते आणि मला अन्य गोष्टींचा विसर पडला होता.
२. प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडे पहातांना अखंड भावजागृती होत होती.
३. तेथून नामजप करून उठतांना प्रथम आपण केवळ दहा-पंधरा मिनिटेच नामजपाला बसलो आहोत, असे मला वाटले; पण घड्याळ पाहिल्यावर लक्षात आले की, माझ्याकडून तेथे बसून ३.४० घंटे नामजप झाला.
      प.पू. रामभाऊस्वामी आणि प.पू. डॉक्टर, आपल्या कृपाशीर्वादामुळेच यज्ञस्थळी मला नामजप करण्याची संधी मिळाली. आपण आम्हा साधकांसाठी घेत असलेल्या कष्टाची जाणीव सतत आमच्या मनात राहून कृतज्ञताभावाने आणि निरपेक्षपणे साधना करता येऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उच्छिष्ट गणपति यज्ञाचे वृत्त असलेला दैनिक सनातन प्रभातचा अंक पाहून पू. सौरभ जोशी यांनी व्यक्त केलेला आनंद !

१. उच्छिष्ट गणपति यज्ञाचे वृत्त असलेला दैनिक सनातन 
प्रभातचा अंक पू. सौरभदादांनी सलग ६ घंटे स्वतःच्या हातात धरणे
      सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचे सचित्र वृत्त १७.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. पू. सौरभदादा यांना प्रतिदिन सकाळी जेव्हा जाग येते, त्या वेळी मी त्यांना दैनिक सनातन प्रभात वाचण्यास देतो. अशा प्रकारे १७ जानेवारी या रात्री २ वाजता पू. दादा जागे झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्यांना १७ जानेवारीचा दैनिक सनातन प्रभातचा अंक वाचण्यास आणून दिला. रात्री २ वाजल्यापासून सकाळी ८.१५ वाजेपर्यंत पू. सौरभदादा दैनिक वाचत होते. सकाळी ८.१५ नंतर त्यांनी दैनिक बाजूला ठेवून दिले.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी झालेल्या सूक्ष्मातून झालेल्या सुर-असुर युद्धाच्या प्रत्यक्ष साक्षीदार बनलेल्या पू. (सौ.) सखदेवआजी !

    
पू. सौ. आशालता सखदेवआजी
१५, १६ आणि १७.१.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात तंजावूर, तमिळनाडू येथील अग्निस्वरूप योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली उच्छिष्ट गणपति यज्ञ झाला. साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, हे या यज्ञाचे उद्देश होते. यज्ञाच्या या उद्देशांमुळे अनिष्ट शक्ती यज्ञात किंवा अन्य प्रकारे त्रास देतात. देवही भक्तासाठी धावत येऊन त्याचे रक्षण करतो. असाच एक अनुभव पू. (सौ.) सखदेवआजींना आला. स्थुलातून जे दिसले, पहायला मिळाले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
१. पू. आजींना झालेले त्रास
१ अ. १४.१.२०१६ (यज्ञाच्या आदल्या दिवशी)
१. यज्ञाच्या आदल्या दिवसापासूनच सूक्ष्मातील युद्धाला आरंभ झाला. पू. आजींना श्‍वास घेण्यास नेहमीच्या तुलनेत अधिक त्रास होत होता. त्या त्रासाचे स्वरूप इतके होते की, त्यांना त्रासावर उपाय शोधायचे सुचत नव्हते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमिष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शासकीय अनुदानावर पोसलेला जिहादी आतंकवाद !

संपादकीय 
     आपल्या देशातील राजकारणाचा बाजच निराळा आहे. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की, राजकारणी मतदारांवर निरनिराळ्या वस्तूंची खैरात करत असत. आता या ना त्या मार्गाने महागड्या वस्तूंची मतदारांवर खैरातच करण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्या वस्तूंचा किती विधायक वापर होतो, ते पहाण्याचे कष्ट कोणी घेत नाहीत. समाजवादी पक्षाने शासकीय निधीतून वाटलेल्या भ्रमणसंगणकांचा (लॅपटॉपचा) कशा प्रकारे वापर होत आहे, ते आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळेच शासन लोकप्रसिद्धी मिळवण्यासाठी शासकीय निधीची जी उधळपट्टी करत आहे, त्याविषयीच आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच हैद्राबाद (भाग्यनगर) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अलीम अहमद नावाच्या आतंकवाद्याला कह्यात घेतले आहे. अलीम सातत्याने जिहादी आतंकवादी संकेतस्थळांना भेट देत असे. तो भाग्यनगर येथील इसिसच्या चार संशयितांच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळेच गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे ही जिहादी संकेतस्थळे पहाण्यासाठी तो शासनाकडून मिळालेल्या भ्रमणसंगणकाचा वापर करत असे. तो इयत्ता बारावीत असतांना त्याच्या महाविद्यालयातून शासकीय योजनेतील हा भ्रमणसंगणक मिळाला होता. त्याचाच वापर करून तो सातत्याने इसिसच्या चार जिहाद्यांच्या संपर्कात होता, असे अन्वेषण अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn