Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इसिसच्या ८ आतंकवाद्यांना अटक !

जिहादी आतंकवाद्यांना समज देऊन सोडून देणे म्हणजे त्यांना हिंदूंच्या हत्या करण्याची आणखी एक संधी देणेच होय ! हे प्रकार त्वरित थांबवा !

इसिसचा भारतात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे उघड !

इसिसच्या विचारधारेप्रमाणेच एक जिहादी आतंकवादी संघटना देशात विकसित करण्याचे काम या आतंकवाद्यांनी आरंभले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. नवीनांशी संपर्क करणे, त्यांची भरती करणे, स्फोटके आणि शस्त्रास्त्रे यांच्या उपलब्धतेची साखळी तयार करणे, नवीन भरती झालेल्यांना आतंकवादाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने योग्य जागांची पाहणी करणे आणि तशी शिबिरे आयोजित करणे, त्या शिबिरात शस्त्रांचे प्रशिक्षण देणे, भारतातील पोलीस अधिकारी, विदेशी नागरिक यांना लक्ष्य करण्यास आणि भारतात अनेक ठिकाणी घातपात घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा कृत्यांमध्ये सध्या अटक करण्यात आलेले आतंकवादी सहभागी असल्याची अत्यंत धोकादायक माहिती त्यांच्या चौकशीतून पुढे येत आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गोपनीय धारिका उघड !

एका थोर स्वातंत्र्यसैनिकाविषयीच्या धारिका सार्वजनिक होण्यास ३० वर्षे घेणार्‍या व्यवस्थेला पारदर्शक राज्यव्यवस्था म्हणता येईल का ? 
नवी देहली - थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित १०० गोपनीय धारिका नेताजींच्या ११९ व्या जन्मशताब्दीनिमित्त २३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उघड करण्यात आल्या. या वेळी नेताजींचे नातेवाईक उपस्थित होते. यापुढे प्रत्येक महिन्याला यासंबंधीच्या २५ डिजिटल धारिका उघड करण्यात येणार आहेत. उघड केलेल्या धारिकांमध्ये १९७६ मधील प्रपोजल ऑफ एम्बेसी ही महत्त्वाची धारिकाही आहे. या धारिकांचे प्रदर्शन भारतीय अभिलेखागारमध्ये भरवण्यात आले आहे. नेताजींच्या नातेवाइकांनी नेताजींशी संबंधित धारिका उघड करण्याची मागणी केली होती.

मोदी शासनाने लंडनहून सरस्वतीदेवीची मूर्ती परत आणावी !

धार येथील हिंदुत्ववादी आणि भाविक यांच्याशी
संवाद साधतांना शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती
भोजशाळेतील सरस्वतीदेवीची मूर्ती लंडनहून परत आणण्याचे हिंदूंचे स्वप्न मोदी शासन पूर्ण करेल, अशी अशा आहे !
श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती यांची मागणी
धार (मध्यप्रदेश) - काशी येथील सुमेरूपीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती यांनी हिंदू महासभेच्या पदाधिकार्‍यांसह येथील भोजशाळेची पाहणी करून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी स्वामीजींनी दगडांपासून सिद्ध करण्यात आलेल्या आकृत्यांचीही पाहणी केली.

'एन्आयए'कडून पोलीस अधीक्षक सलविंदर सिंह यांना क्लिन चिट

नवी देहली - पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाप्रकरणी संशयाच्या घेर्‍यात अडकलेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंह यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) कसून चौकशी करण्यात आली. अखेर सिंह यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा एन्आयएने दिला.

वर्णभेदामुळे मला चर्चमधून हाकलले ! - मार्लोन जेम्स

हिंदूंच्या मंदिरांतील कथित स्त्री-पुरुष भेदाविषयी नाहक टाहो फोडणारे पुरो(अधो)गामी 
चर्चमधील या वर्णभेदाविषयी काहीच का बोलत नाहीत ?
चर्चमधील असहिष्णुतेची झळ सहन केलेले बुकर पुरस्कार विजेते लेखक मार्लोन जेम्स यांची व्यथा
     जयपूर (राजस्थान) - येथे चालू असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात सहभागी झालेले बुकर पुरस्कार विजेते लेखक मार्लोन जेम्स यांनी, त्यांनी अनुभवलेल्या चर्चमधील असहिष्णुतेविषयी उपस्थितांना सांगितले. जेम्स यांचा वर्ण काळा आहे. जेम्स म्हणाले, मी बर्‍याच वेळा चर्चमध्ये वास्तव्य करण्यास जायचो. चर्च हे एक सुरक्षित स्थान आहे, अशी माझी धारणा होती; पण वर्णभेदामुळे मला तेथून हाकलून दिले जायचे.


इंग्रजी शाळांच्या अनुदानाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी न होण्याचा भाजपचा कार्यकर्त्यांना आदेश !

अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी इंग्रजी शाळांचे अनुदान कायम ठेवून मातृभाषेचा गळा घोटणारी 
भाजप म्हणजे दुसरी काँग्रेस बनली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही !
     इंग्रजी शाळांना अनुदान देण्यास विरोध करणार्‍या संघटनांच्या आंदोलनात सहभागी होऊ नका, असा असा स्पष्ट आदेश भाजपचे नेते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या नेत्यांनी भाजप नेते, आमदार आणि कार्यकर्ते यांना दयानंद स्मृती सभागृहात प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी बोलावलेल्या मेळाव्यात दिला. 
      अशी शिकवण असलेले कधीतरी समाजात शांतता आणि सभ्यता प्रस्थापित करू शकतील का ?

अमरावती येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री. गीते

अमरावती - राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अमरावतीमध्येसुद्धा व्हावी. प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत, तसेच कुठल्याही प्रकाराने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकडे जिल्ह्यामध्ये शासकीय स्तरावर उपक्रम राबवून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, अशी विनंती या वेळी जिल्हाधिकारी श्री. किरण गीत्ते यांना करण्यात आली.
त्याचप्रमाणे मालदा (पश्‍चिम बंगाल) येथे झालेल्या दंगलीमध्ये सहभागी धर्मांधांवर त्वरित कारवाई करून हिंदूंना न्याय मिळावा, अशीही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद साखरे, कु. मुक्ता खापरे, कु. श्रृतीका वानखडे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. सावरकर, श्री. संजय चौधरी उपस्थित होते.

अंबरनाथ येथील गावदेवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम आणि देवीची आभूषणे यांची चोरी !

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच ! 
     अंबरनाथ - अज्ञात चोरट्यांनी कानसई परिसरात असलेल्या गावदेवी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि देवीची सोन्याची आभूषणे चोरून नेली. २२ जानेवारीच्या पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मंदिरातील पुजारी नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला; मात्र नेमकी किती रक्कम चोरीला गेली आहे, ते अद्याप कळू शकले नाही.

बांगलादेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलात्कार

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! जागतिक मानवाधिकारवाले बांगलादेश आणि पाकिस्तान या 
देशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी कधीच आवाज का उठवत नाहीत कि इस्लामी 
देशात हिंदूंना मानवाधिकार नसतो ?
     चित्तगांव - बांगलादेशच्या चित्तगांव शहरामधील गुलजेर मूर येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे महंमद सोहेल राणा या धर्मांधाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले.
    ही मुलगी चित्तगांव शहरातील कुसुम कुमारी या मुलींच्या शाळेत शिकत होती. चांदनी बससाठी थांबली असता महंमद राणा आणि इतर धर्मांधांनी तिचे अपहरण केले. चांदनीचे अपहरण झाल्याचे कळताच तिचे वडीलांनी चॉकबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली; मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. तिच्या वडीलांनी बांगलादेश मायनॉरिटी वॉचशी संपर्क साधून साहाय्याची मागणी केली. बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या नेत्याने चित्तगांवच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून पीडित कुटुंबाची तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यानंतर चॉकबाजार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

ऐतिहासिक चित्रपट करतांना मूळ विषय पालटणे चुकीचेच ! - ज्येेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल

सत्य इतिहासाला चिरडू पहाणारे संजय भन्साळी यातून बोध घेणार कि स्वतःचेच घोडे पुढे दामटवणार ?
पुणे - इतिहास हा वारसा असल्यामुळे त्याचा विपर्यास होणे योग्य नाही. ऐतिहासिक घटना उघड असतात. त्यांचा अर्थ लावण्याविषयी दुमत असू शकते; परंतु त्या घटना खर्‍याच दाखवल्या गेल्या पाहिजेत. मूळ विषयच पालटणे चुकीचेच आहे. त्यामुळेच बहुतेक ऐतिहासिक चित्रपट या सूत्रावर अयोग्य ठरतात, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले.
'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स'वात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सेन्सॉरशिप या विषयावर रवी गुप्ता यांनी बेनेगल आणि जाहिरात तज्ञ भरत दाभोळकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी प्रेक्षकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना बेनेगल बोलत होते.

राज्यात वर्षभरात पोलिसांविरुद्ध ६ सहस्र ५२८ तक्रारी प्रविष्ट

समाजात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती उपाययोजना करणार आहे ?
'महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४' अहवाल
नगर - राज्याचा गुन्हेगारी आढावा घेणारा महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये राज्यात वर्षभरात पोलिसांविरुद्ध ६ सहस्र ५२८ तक्रारी नागरिकांकडून प्रविष्ट झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक ७७४ तक्रारी ठाणे आयुक्तालयातील पोलिसांविरुद्ध प्रविष्ट झाल्या. त्यानंतर नांदेड ५२४, सोलापूर ग्रामीण ४१०, नगर जिल्हा पोलीस दल ११३ अशा तक्रारी नागरिकांनी दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी मानवी हक्काचे उल्लंघन केल्याविषयीचा एकही गुन्हा प्रविष्ट झालेला नाही.

(म्हणे) 'मुसलमान तरुणांनी आग्रही भूमिका घेऊन समान नागरी कायद्याची मागणी केली पाहिजे !'

तथाकथित पुरो(अधो)गाम्यांचा भाबडा आशावाद ! 
पुणे, २३ जानेवारी (वार्ता.) - आपण 'राष्ट्र' हा शब्द वापरतो; पण हा देश सामाजिकदृष्ट्या कधीही एक नव्हता. देश एकात्म करण्यासाठी हिंदु आणि मुसलमान यांच्यातील धर्मांत कायद्यामुळे निर्माण झालेली भिंत तोडायला हवी. ती तोडण्यासाठी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तसे केल्यासच एकात्मता अस्तित्वात येईल. हिंदु मूलतत्व वादापेक्षा मुस्लिम मूलतत्ववाद अधिक घातक आहे. मुस्लिम मूलतत्ववाद्यांकडून जगभरात निष्पाप जिवांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा देश एकात्म करण्यासाठी मुसलमान तरुणांनी आग्रही भूमिका घेऊन समान नागरी कायद्याची मागणी केली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत (?) डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली. येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एकता परिषदेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मकता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शनिशिंगणापूरमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून लावण्यात आलेली भित्तीपत्रके विरोधकांनी फाडली !

विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता भित्तीपत्रके फाडून झुंडशाहीचे दर्शन घडवणार्‍यांची हिंदुद्वेष्टी मानसिकताच दिसून येते !
शनिशिंगणापूर, २३ जानेवारी (वार्ता) - येत्या २६ जानेवारीला नास्तिकवादी महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ चालू केली आहे. त्याअंतर्गत २६ जानेवारीला चला शनिशिंगणापूरला असे अभियान चालू केले आहे. त्या अभियानाचा प्रसार व्हावा, यासाठी येथील वेगवेगळ्या भागामध्ये भित्तीपत्रके लावलेली होती. त्यांपैकी दोन ठिकाणची भित्तीपत्रके अज्ञातांनी फाडली.
फाडण्यात आलेली भित्तीपत्रके

हवालाद्वारे पैसे पुरवणारा इराणी विद्यार्थी आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात

जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे माहेरघर बनलेले पुणे शहर !
     पुणे, २३ जानेवारी - शिक्षणासाठी आलेला आणि पारपत्राची समयमर्यादा संपूनही १० वर्षांपासून भारतात अवैधपणे रहाणारा महंमद उदेजउल्ला ताकिजादे या इराणी विद्यार्थ्यास आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले आहे. हा विद्यार्थी हवालाद्वारे शहरातील इराणी विद्यार्थ्यांना पैसे पुरवण्याचे काम करत होता. त्याला पुन्हा इराणमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आतंकवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी दिली.

सावंतवाडी येथे सापडलेले ते गोमांसच : नजीर जमादारला शिक्षा

आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनाही आता शिक्षा करा !
  • ११ जुलै २०१५ या दिवशी सावंतवाडी येथे घडलेले गोमांस तस्करीचे प्रकरण
  • आरोपीला वाचवण्याचा पोलिसांनी केला होता प्रयत्न
     सावंतवाडी - राज्यात गोमांस विक्रीवर बंदी असतांना सावंतवाडी येथून ११ जुलै २०१५ या दिवशी दुचाकीवरून मांसाची वाहतूक करतांना संशयित नजीर मो. जमादार, बाहेरचावाडा, सावंतवाडी याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. 
    त्या वेळी जमादार याच्यावर महाराष्ट्र पशूसंवर्धन १९९५ चे सुधारित कलम ५ अन् ७ सी (९) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली होती. त्या वेळी जमादार याच्याकडून हस्तगत केलेले मांस फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आणि आरोपी जमादार याला पोलिसांनी न्यायालयासमोर उपस्थित केले. या वेळी जमादार याने स्वतःहून ते मांस गोमांस होते आणि आपण त्याची वाहतूक केल्याची स्वीकृती दिली. त्यामुळे न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण यांनी जमादार याला २ सहस्र रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

समीर गायकवाड यांच्या विरोधात थेट नव्हे, तर परिस्थितीजन्य पुरावे ! - अधिवक्ता हर्षल निंबाळकर

     पुणे, २३ जानेवारी (वार्ता.) - समीर गायकवाड यांच्या विरोधात आतापर्यंत थेट पुरावे दिसत नाहीत; मात्र परिस्थितीजन्य पुरावे पुष्कळ आहेत. त्या दृष्टीने मांडणी करून गायकवाड यांच्या जामिनाला २५ जानेवारी या दिवशी विरोध दर्शवण्यात येईल, असे वक्तव्य कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले अधिवक्ता हर्षल निंबाळकर यांनी केले. २३ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उजनी धरणाच्या क्षेत्रात अवैध वाळूउपसा करणार्‍या ४० बोटी स्फोटाने उडवल्या !

प्रशासनाने वाळू तस्करांवरही कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, ही अपेक्षा !
     इंदापूर, २३ जानेवारी - उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलाशयात अवैध वाळूउपसा करून वाळूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या ४० बोटी स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई २२ जानेवारी या दिवशी बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव आणि महसूल विभागाच्या पथकाने केली. अवैध वाळूउपसा करणार्‍यांच्या विरोधात राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांची जवळजवळ २ कोटी ५० लक्ष रुपयांची हानी झाली आहे.

प्रार्थनास्थळावरील चादर जाळल्याच्या प्रकरणी नंदुरबार येथे आठ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

     नंदुरबार - शहरातील एका प्रार्थनास्थळातील थडग्यावरील चादर जाळल्याच्या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आठ संशयीत तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तथापि टीपू सुलतान चौकाच्या फलकाशेजारील वाढदिवसाचा फलक लावण्यावरून झालेल्या वादातून हे घडवले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
१. नंदुरबार शहरातील बागवान गल्लीत शहीद टीपू सुलतान चौक, असे नामकरण केलेला वादग्रस्त फलक आहे. या फलकाजवळच असलेल्या खांबावर भारतीय जनता युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष खुशाल चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा फलक २१ जानेवारी २०१६ या दिवशी सकाळी लावण्यात आला होता. 

अमेरिकेला बसलेल्या भीषण हिमवादळाच्या तडाख्यात आठ जणांचा मृत्यू !

  • विमानांची ७ सहस्र ५०० उड्डाणे रहित 
  • ५ कोटी नागरिकांना फटका 
     वॉशिंग्टन - अमेरिकेला शतकातील सर्वांत भीषण हिमवादळाचा तडाखा बसला आहे. वादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या पूर्वेकडील शहरांना बसला आहे. प्रतिघंटा ७३ किलोमीटर वेगाने हिमवादळ आले आहे. हिमवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका सुमारे ५ कोटी नागरिकांना बसला असून प्रतिकुल वातावरणामुळे विमानांची ७ सहस्र ५०० उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. वॉशिग्टनमधील बहुतांश भाग बर्फाच्छदित झाला आहे, तसेच रस्त्यावर १-२ फूटांपर्यंत बर्फ साचला आहे. हवामान खात्याकडून काही भागात अडीच ते तीन फूट हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शासनाने शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषित केली आहे. वॉशिंग्टनमध्ये यापूर्वी वर्ष १९२२ मध्ये असेच वादळ आले होते.करण जोहरला चोपून काढा !

सातत्याने देशातील सहिष्णुतेविषयी वक्तव्ये करून जगात देशाविषयी 
अपसमज पसरवणार्‍या सेलिब्रिटीजवर बहिष्कार टाका !
निर्माते करण जोहर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर व्ही.के. सिंह यांचा संताप
     जोधपूर - देशात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, हा एक विनोद आहे. इतकेच नव्हे, तर देशात लोकशाही आहे, हा तर त्याहीपेक्षा मोठा विनोद आहे, असे वक्तव्य चित्रपट निर्माते करण जोहर यांनी केल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी करणला चोपून काढा, माझ्या मागे मात्र लागू नका, अशा शब्दांत करणच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्यामुळे देशात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे, तर भाजपने भारतच सर्वाधिक सहिष्णु देश असल्याचा दावा केला आहे.

तेलुगु चित्रपटात मुसलमान समुदायाचा अवमान केल्याचा मुसलमानांचा आरोप !

हिंदूंच्या देवतांचे विडंबन झाल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर त्या चित्रपटातील दृश्यांना 
कात्री लावण्यास परिनिरीक्षण मंडळ नकार देते. आता धर्मांधांनी चित्रपटाद्वारे त्यांच्या धार्मिक 
भावना दुखावल्याचे सांगितल्यावर परीनिरीक्षण मंडळाने तात्काळ कारवाई केल्यास आश्‍चर्य ते काय ?
     भावनगर (तेलंगण) - देवी श्रीप्रकाश दिग्दर्शित तेलुगु चित्रपटात मुसलमान समुदायाचा जाणूनबुजून अवमान केल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. त्यामुळे तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. नन्नाकू प्रेमाथो या तेलुगु चित्रपटाच्या फलकावर अभिनेत्रीला अपुर्‍या कपड्यात दाखवण्यात आल्या आहे आणि तिच्या मागे पडद्यावर इस्लामी आयता दाखवण्यात आल्या आहेत. हा इस्लामचा अवमान असल्याचे सांगून मुसलमानांनी निषेध व्यक्त केला आहे. खाजा तन्वीर अहमद यांनी तेलंगण आणि आंध्रप्रदेश अल्पसंख्यांक आयोगाशी संपर्क साधून चित्रपटाच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखण्याचे आवाहन केले आहे. त्याला अनुसरून अल्पसंख्यांक आयोगाने हैद्राबाद पोलीस आणि परिनिरीक्षण मंडळ यांच्याशी संपर्क साधून दिग्दर्शकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन अल्प करण्यासाठी शाळांचे अजब उपाय

पुणे - शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे अल्प करण्याविषयी शासनाने जुलै २०१५ मध्ये निर्णय जाहीर केला. तरीही दप्तराचे वजन कायम राहिले. त्यानंतरही दप्तराचे वजन अल्प करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिला. गेल्या मासात पुण्यात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत ५६ प्रतिशत विद्यार्थ्यांचे दप्तर वजनदारच असल्याचे समोर आले. त्यानंतर दप्तराचे वजन अल्प करण्याचे दायित्व शिक्षण संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांच्या खांद्यावर लादले. त्यासाठी अनेक शाळांकडून उपक्रम चालवले जात असतांना काही शाळांमध्ये देण्यात येणार्‍या अजब सूचनांनी पालकही गोंधळून गेले आहेत. त्यामध्ये आधीच्या सत्रातील अभ्यासक्रमाचा भाग पुस्तकातून फाडून टाका, दप्तरच पालटा, कापडी पिशवीच आणा, पिण्याचे पाणी आणू नका, अशा सूचना काही शाळांकडून देण्यात येत आहेत. (अशा हास्यास्पद उपाययोजना उपाययोजना देणार्‍या शाळा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! दप्तराचे वजन अल्प करण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत ! - संपादक)

नास्तिकतावादी महिलांना न रोखल्यास शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील ! - शिवसेना महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन

पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन देतांना शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या
धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ चळवळीमध्ये सहभागी झालेल्या शिवसेना महिला आघाडीचे अभिनंदन !
नगर, २३ जानेवारी (वार्ता.) - २६ जानेवारीला पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी महिला शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पोलिसांनी या नास्तिकतावादी महिलांना रोखावे अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी शिवसेना महिला आघाडीच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर यांनी दिली. याविषयीचे निवेदन त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्री. मालकर यांना २२ जानेवारी या दिवशी दिले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका कांता बोठे, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अरुणा गोयल आदी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चौथर्‍यावर चढण्याच्या नास्तिकतावादी कृत्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत. पोलिसांनी या नास्तिकतावादी महिलांचे षड्यंत्र हाणून पाडावे अन्यथा आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने संबंधित महिलांवर वेळीच कारवाई करून त्यांना नगर जिल्हा प्रवेशबंदी करावी. तसे न झाल्यास चौथर्‍यावर चढण्याचा चुकीचा प्रकार थांबवण्यासाठी शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल

अभाविपच्या माटुंगा येथील कार्यालयावर आक्रमण !

     मुंबई - मुंबईतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर काही जणांनी आक्रमण केले. या आक्रमणात कार्यालयातील काचा आणि सामान यांची तोडफोड करण्यात आली. या आक्रमणात अभाविपचे फ्रान्सिस डिसुझा यांच्यासह आणखी एक कार्यकर्ता जखमी झाले आहेत. माटुंगा पश्‍चिम रेल्वे स्थानकासमोर असलेल्या मार्बल आर्क या इमारतीत अभाविपचे कार्यालय आहे. या कार्यालयाची ६ जणांनी बॅट आणि हॉकी स्टीक घेऊन तोडफोड केली. राहुल गांधी यांच्या विद्यार्थी संघटनांतील कार्यकर्त्यांसह काही मृतप्राय झालेल्या संघटनांनी हे आक्रमण केल्याचा दावा अभाविपचे प्रदेश संघटनमंत्री यदुनाथ देशपांडे यांनी केला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी भव्य वाहन फेरी !

हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले धुळे शहर
     धुळे, २३ जानेवारी (वार्ता.) - हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त २२ जानेवारी या दिवशी विशाल वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धर्मध्वजाचे पूजन आणि शंखनाद करून वाहन फेरीचा प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन श्री. नानाभाऊ जोशी यांनी केले, तर श्री. श्रेयस पिसोळकर यांनी पौरोहित्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्री. कपिल शर्मा यांनी पुष्पमाला अर्पण केली.

मस्तीखोर मुलाची हत्या करणार्‍या आईला अटक !

वाढते अराजक आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण यांमुळे नातेसंबंध संपुष्टात 
येऊन समाज रसातळाला पोहोचल्याचे दर्शवणारी उदाहरणे ! 
स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वडिलांना अटक !
     मुंबई - शिवाजीनगर (गोवंडी) येथे वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून वडील तिच्यावर अत्याचार करत होते. यासंदर्भात तिने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करून माहिती दिल्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. 
    वांद्रे, मुंबई - येथील मस्तीखोर मुलाच्या (वय ९ वर्षे) त्रासाला कंटाळून वर्ष २०१३ मध्ये त्याची हत्या करणार्‍या आईला अटक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा शवविच्छेदनाचा अहवाल तीन वर्षांनंतर आल्यानंतर कसून करण्यात आलेल्या चौकशीतून हे वास्तव समोर आले. न्यायालयाने आईला पोलीस कोठडी सुनावली आहे.
     मुलगा मस्तीखोर असल्याने शाळा आणि वसाहतीमधील मुले सतत त्याची तक्रार करायचे. एकदा तो शाळेतून घरी आल्यानंतर आईने त्याला जेवण दिले. जेवण झाल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याला विष देऊन त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. 

संगमनेर (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहातून ८ सहस्र किलो गोमांस शासनाधीन

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा ! 
    संगमनेर, २३ जानेवारी - येथील शहरातील भारतनगरमध्ये चालू असलेल्या पशूवधगृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संगमनेरचे पोलीस निरीक्षक गोविंद आमासे यांनी २० जानेवारी या दिवशी पशूवधगृहावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे सुमारे ८ सहस्र किलो मांस पोलिसांनी शासनाधीन केले. हे मांस नष्ट करण्याची कारवाई रात्री विलंबापर्यंत चालू होती. 

ठाणे येथे १४ प्रतिशत पाणीपुरवठा दूषित

गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याची ओरड करणारी 
अंनिस ठाणे येथील जलप्रदूषणाविषयी गप्प का ?
  • महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालाचा निष्कर्ष 
  • तीन लक्ष ठाणेकरांकडे दूषित पाणीपुरवठा 
     ठाणे - जलकुंभामध्ये शुद्ध पाणीपुरवठा होत असला, तरी तिथून वसाहतींमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये आणि पुढे घराघरांत होणारा जवळपास १४ प्रतिशत पाणीपुरवठा दूषित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आला आहे. त्यानुसार जवळपास तीन लक्ष ठाणेकरांच्या घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे अधोरेखित होत आहे. एरव्ही नेहमी हिंदूंच्या सणांना प्रदूषणाची आठवण येणारी आणि त्यातल्या त्यात वर्षातून केवळ एकदाच येणार्‍या गणेशोत्सव कालावधीत प्रदूषण होत असल्याची ओरड करत कृत्रित तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा हेकेखोरपणा करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाण्याच्या या प्रदूषणाविषयी गप्प का ? या उदाहरणावरून अंनिसचा दुतोंडीपणा उघड होत असून अंनिस केवळ हिंदु धर्माच्या विरोधातच काम करते, हेच वारंवार सिद्ध होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

इसिसला पायबंद बसण्यासाठी या जिहादी आतंकवाद्यांना कठोर शिक्षा करा !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने देशातील ६ विविध शहरांमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये इसिसच्या संपर्कातील आणि भारतात घातपात घडवून आणण्याचे षड्यंत्र आखत असलेल्या १४ संशयित जिहादी आतंकवाद्यांना मागील दोन दिवसांत अटक करण्यात आली.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : NIA dwara keval 2 dinme ISIS se sambandhit 14 jihadi atankwadionko bandi banaya gaya.
kya hamari ISIS se ladhaneki siddhata hai ?

जागो ! : एन्आयए द्वारा केवल २ दिन में इस्लामिक स्टेटसे संबंधित १४ जिहादी आतंकवादीआेंको बंदी बनाया गया.
क्या हमारी इस्लामिक स्टेट से लढने की सिद्धता है ?

आतंकवादी आक्रमणांचे संकट भारतात सर्वत्र असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही भूमाता ब्रिगेडच्या महिलांना देशद्रोहाविषयी कारागृहात टाका !

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोह करू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांना शासनाची सणसणीतच चपराक बसली आहे. पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त श्री. शि.ग. डिगे यांनी, 'या महिलांनी २६ जानेवारी २०१६ या दिवशी चौथर्‍यावरच नव्हे, तर शनिमंदिरातही येऊ नये', असे त्यांना पाठवलेल्या नोटिसगीत म्हटले आहे.


पॅराशूट कंपनीची नारळाच्या तेलाची सीलबंद बाटली दुप्पट-तिप्पट किमतीला 'होली ऑईल' म्हणून विकून 'फाइव्ह पिलर्स चर्च'कडून हिंदूंची फसवणूक !

बिलिव्हर्सवाल्यांच्या पराकोटीच्या अंधश्रद्धेला बळी पडणारे हिंदू !
सार्वजनिक जीवनामध्ये समाजात सर्व विषयांवर चर्चा होतांना आढळून येते. ख्रिस्ती आणि मुसलमान स्वधर्माविषयी अनेक वेळा चर्चा करतांना आढळतात. ख्रिस्ती शासकीय कार्यालयातसुद्धा सर्वांना रविवारच्या प्रार्थनेची (मिस) आवर्जून आठवण करून देतात. मुसलमान त्यांच्या धर्मबांधवांना बुरखा घालणे, दाढी राखणे, नमाजपठण आदींविषयी सतत स्मरण करून देत असतात. मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्या धर्माविरुद्ध कधीच बोलतांना आढळत नाहीत. उलट त्यांच्या धर्माच्या विरोधात कोणी अन्य धर्मीय बोलल्यास त्याला त्वरित प्रत्युत्तर देतात. दुर्दैवाने हिंदूबहुल भारतात हिंदु धर्माविषयी पुष्कळ ज्ञान उपलब्ध असतांना हिंदु धर्मीय आपापसांत कधीही हिंदु धर्माविषयी आस्थेने चर्चा करतांना दिसून येत नाहीत. याउलट हिंदु धर्मातील भोंदूगिरीच्या विरोधात गरळओक करण्यामध्ये हिंदूंची चढाओढ लागलेली असते. या विषयाचा अभ्यास नसतांनादेखील हिंदु धर्माविरुद्ध, संतांविरुद्ध टीका करण्यात हिंदू स्वत:ला धन्य मानतात. गोव्यात असे चित्र मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. या सर्वांचा अनिष्ट परिणाम गोवा राज्यातील हिंदूंवर होत आहे.

मानखुर्द येथे लव्ह जिहादविषयी स्त्रियांचे प्रबोधन

मार्गदर्शन ऐकतांना स्त्रिया
     मानखुर्द - येथील स्थानिक धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने महिलांसाठी लव्ह जिहादच्या दृष्टीने प्रबोधन आणि जनजागृती यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. रघुनाथ शिंदे यांनी केले होते. समितीच्या सौ. नयना भगत यांनी लव्ह जिहादविषयी स्त्रियांना माहिती दिली आणि काही चलचित्रे (व्हिडिओ) दाखवले. महिलांनी शंकानिरसनही करून घेतले आणि हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या लव्ह जिहादच्या ग्रंथांची मागणीही केली. या कार्यक्रमात ६०हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रीक्षेत्र पाल (जिल्हा सातारा) येथील खंडोबादेवाच्या यात्रेतील हत्तीच्या मिरवणुकीवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
     श्रीक्षेत्र पाल येथील खंडोबादेवाच्या यात्रेसाठी केवळ तीनच दिवस शेष असतांना सातारा जिल्हा प्रशासनाने यात्रेमध्ये वन्य प्राण्यांना बंदीचे कारण पुढे करत खंडोबादेवाच्या यात्रेतील हत्तीच्या मिरवणुकीवर बंदी घातली. यामुळे श्रीक्षेत्र पाल (जिल्हा सातारा) येथील खंडोबादेवाच्या यात्रेची शेकडो वर्षांची असलेली हत्तीच्या मिरवणुकीची परंपरा खंडित झाली.
      गत वर्षी हत्तीच्या डोळ्याला खोबर्‍याची वाटी लागून हत्ती उधळल्याची घटना घडली होती, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात दुर्घटना कशामुळे झाली होती, याविषयी निश्‍चिती नाही.

साहित्यविषयक परिसंवादामध्ये साहित्यिक मंडळींचीच वानवा !

यावरून साहित्य संमेलनाची फलनिष्पत्ती काय असेल, याचा विचारच न केलेला बरा !
    पिंपरी-चिंचवड येथे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बदलते सामाजिक आणि राजकीय अस्तित्व अन् दलित आणि ग्रामीण साहित्य या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात साहित्यिकांपेक्षा उद्योजक आणि राजकीय व्यक्तीच अधिक होत्या. साहित्यविषयक परिसंवादामध्ये साहित्यिक मंडळींचीच वानवा असल्याने मराठीप्रेमींमध्ये असंतोष होता.

अमरावती येथे १६७ जिलेटीन आणि २३३ डिटोनेटर यांचा साठा शासनाधीन !

अशा घटना म्हणजे राज्यात कायदा-सुव्यस्था नसल्याचे द्योतक ! 
     अमरावती - मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पापळ शिवारातून जिलेटिन आणि डिटोनेटर या स्फोटकांचा साठा २१ जानेवारीच्या रात्री शासनाधीन करण्यात आला. त्यात १६७ जिलेटीन आणि २३३ सुपर पॉवर डिटोनेटर यांचा समावेश आहे. या प्रकरणी हेमसिंग सजनसिंग राठोड, ओमप्रकाश अक्तुकुमार, पूनमसिंग खुमानजी कुमार, मदनसिंग नारायणसिंग चव्हाण आणि माघू लाडू कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
   काही व्यक्ती अवैधरीत्या ब्लास्टिंगचे काम करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने धाड घातली. पोलिसांच्या चौकशीनंतर ५ आरोपींनी अवैधरीत्या ब्लास्टिंग करत असल्याचे मान्य केले, तसेच घातक स्फोटक पदार्थांचा साठाही दाखवला.

पुरस्कार वापसीपेक्षा मोदींच्या पाठीशी उभे रहा ! - खासदार शत्रुघ्न सिन्हा

पुरस्कार वापसी करणारे आतातरी मोदींच्या पाठीशी उभे रहातील का 
कि अजूनही सहिष्णु आणि असहिष्णु वाद वाढवत रहाणार ?
     पुणे, २३ जानेवारी - मोदींच्या रूपाने देशाला चांगले प्रधानमंत्री लाभले आहेत. वादविवाद आणि राजकारण यांमध्ये वेळ दवडण्यापेक्षा मोदींचे हात बळकट करायला हवेत. सहिष्णु आणि असहिष्णु हा वाद मला मान्य नाही. पुरस्कारवापसी करण्यापेक्षा सध्याच्या खडतर परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले.

तेच ते आणि तेच ते !

      पुणे - भाग्यनगर (हैदराबाद) विद्यापिठातील रोहित वेमुला या देशविरोधी विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांवर निशाणा साधण्याची संधी शोधत असलेल्या कथित पुरोगामी संघटना पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. १३ जानेवारी या दिवशी पुण्यात सावन राठोड या मुलाची हिंदु असल्याच्या कारणावरून धर्मांधांनी पेटवून देऊन हत्या केली होती. त्या संदर्भात मिठाची गुळणी धरून बसलेल्या संघटना राठोड याच्या मृत्यूनंतर चारच दिवसांत झालेल्या वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी मात्र अभाविपवर बंदी घाला, उजव्या विचारसरणीमुळे दलितांमध्ये असुरक्षित वातावरण अशा प्रकारची वक्तव्ये करत केंद्रशासन, मनुवाद (?), अभाविप यांच्या विरोधात निषेध आंदोलन करत आहेत.

हिंदूंमधील तथाकथित दलित समाजाचा मुसलमानांकडून राजकीय स्वार्थासाठी वापर !

अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
     भाग्यनगर (हैदराबाद) येथील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे दलित समाजाचा उपयोग स्वार्थासाठी मुसलमानांतील काही धर्मांध कसे करून घेत आहेत, हे उघडकीस आले. याकूब मेमनच्या फाशीनंतर जाणीवपूर्वक चिथावणीखोर स्वरूपाची आंदोलने भाग्यनगर विद्यापिठाच्या अधिकृत परिसरातच करण्यात आली. या वेळी विद्यापिठाचे विद्यार्थी आंदोलनांना मिळत नसल्याने अल्पसंख्यांकांचे प्राबल्य असलेल्या भागातून शेकडो गुंड प्रवृत्तीचे धर्मांध बोलावून भारताच्या विरोधातच उघड भाषणे आणि घोषणा देण्यात आल्या. एका याकूबला फाशी दिल्यास शेकडो याकूब जन्माला येतील, असा फलक हातात धरलेल्या ज्या विद्यार्थ्याचे चित्र प्रसारमाध्यमांत झळकले, त्यानेच आज आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण समजून घेणे आणि त्याविषयी प्रसारमाध्यमांनी अपप्रचाराची जी राळ उठवली आहे, तिचे निराकरण करणे आवश्यक आहे.
संकलक : अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

कुठे देवतांचे सर्वत्र विडंबन होत असतांना त्या संदर्भात काही न करणारे मृतवत् हिंदू, तर कुठे कारागृहातही देवतांचे विडंबन करणारा चित्रपट दाखवण्यास विरोध करणारे धर्माभिमानी हिंदू !

श्री. विनय तळेकर
१. ओऽ माय गॉड चित्रपट दाखवला जाऊ नये, 
यासाठी विरोध करण्यापूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना करणे
     २८.११.२०१२ या दिवशी एका कैद्याने येऊन मला सांगितले, उद्या सर्व कैद्यांना ओऽ माय गॉड (Oh My God) हा चित्रपट दाखवणार आहेत. हे ऐकून मला चीड आली; कारण या चित्रपटात हिंदु देवतांचे विडंबन केले आहे. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, हा चित्रपट इथे दाखवला जाऊ नये, यासाठी विरोध करण्यास तूच मला शक्ती देऊन माझ्याकडून कृती करवून घे. साहाय्यक अधीक्षक (Asst. Supritendent) किंवा बंदीपाल (Jailor) यांनी मला यासंदर्भात काहीच सांगितले नव्हते.
२. या चित्रपटात हिंदु देवतांचे विडंबन असल्याने चित्रपट 
पहाणार नसल्याचे साहाय्यक अधीक्षकांना मोठ्या आवाजात सांगणे
     २९.११.२०१२ या दिवशी मी औषधालयामध्ये (Dispensary) काम करत होतो. साधारण सकाळी ९.३० वाजता तेथे साहाय्यक अधीक्षक, बंदीपाल, हवालदार आणि दोन पहारेकरी (Sentry) आले. साहाय्यक अधीक्षकांच्या हातात ओऽ माय गॉड या चित्रपटाची ध्वनीचित्रफीत होती. तेव्हा माझ्यासमवेत दोन अन्य कैदी होते. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

शाळेतील विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी यांना राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी होण्यास प्रवृत्त करणारे निजामाबाद येथील श्री. घनश्याम व्यास !

श्री. घनश्याम व्यास
     निजामाबाद येथील श्री. घनश्याम व्यास पुष्कळ तळमळीने सेवा करतात. त्यांची सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर अपार श्रद्धा आहे. १०.१०.२०१५ या दिवशी सनातनवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात इंदूरमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले. या आंदोलनासाठी श्री. व्यास यांनी स्वयंस्फूर्तीने अधिकाधिक लोकांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या शाळेतील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या संदर्भात सांगून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. सतत ३ दिवस त्यांनी १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना धर्मकार्यामध्ये सहभागी होण्याचे महत्त्व सांगून प्रेरित केले. त्यामुळे १५ विद्यार्थी आंदोलनामध्ये उपस्थित होते.
     श्री. व्यास यांनी इंदूरमधील श्रीराम युवा सेनेचे शहरप्रमुख श्री. संजू पुरोहित यांना संपर्क केला. त्यांना सनातनविषयी सांगून एका बैठकीचे आयोजन केले. श्री. व्यास यांनी सर्व विषय सांगितला. त्यांच्या तळमळीमुळे श्रीराम युवा सेनेचे ७५ तरुण आंदोलनामध्ये उपस्थित राहिले. निःस्वार्थ भावाने आणि तळमळीने आंदोलनाची सेवा करणारे श्री. व्यास यांच्याकडून सर्व साधकांना पुष्कळ शिकायला मिळाले.
- श्री. चंद्र मोगेर, भाग्यनगर, आंध्रप्रदेश. 

प्रखर हिंदुत्ववाद्यांनो, आता असहिष्णुतेच्या नावाने लागलेले ग्रहण दूर करून भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेण्याविना पर्याय नाही !

श्री. स्वप्नील भोसले
     सध्या असहिष्णुता या शब्दाने देशात वादळ उठले आहे. या संदर्भात जागतिक स्तरावर भारताविषयी चुकीची भूमिका मांडली जात आहे. काही मोजकी मंडळी हिंदूंसमवेत देशालाही वेठीस धरत आहेत. त्यांच्याद्वारे प्रसारमाध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी उघडपणे स्वार्थ साधत आहेत. अल्पसंख्यांक या नावाने उद्दाम बनलेल्या धर्मांधांभोवती एक वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रकरणांतून सत्यता जाणून न घेता असत्याची कास कशा प्रकारे धरली जाते ?, हेच सर्वांना लक्षात येते. या प्रकरणी सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकून त्यावर उपाय सुचवण्याचा हा एक लहानसा लेखरूपी प्रयत्न !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या धर्मश्रद्ध संघटनांना १० वर्षांपूर्वीही विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

पुरोगाम्यांनो, मुंडकोपनिषदात म्हटल्याप्रमाणे सत्यमेव जयति, 
म्हणजे अंती सत्याचा (ईश्‍वराचा) जय होईल, हे लक्षात घ्या !
     महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या जून २००५ च्या अंकात ज्ञानसूर्याला झाकणारे हरतात हा इतिहास आहे ! या शीर्षकाखालील अग्रलेखात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या धर्मश्रद्ध संघटनांवर टीका करण्यात आली होती. त्या वेळी या विषारी टिकेच्या संदर्भात आवाज न उठवणारे; आज डॉ. दाभोलकरांना सनातनने विरोध केला होता, असा टाहो फोडतात ! पुरोगाम्यांनो, हे समजून घ्या की, आस्तिकतावादी आणि नास्तिकतावादी यांच्यात युगानुयुगे संघर्ष चालू आहे आणि मुंडकोपनिषदात म्हटल्याप्रमाणे सत्यमेव जयति, म्हणजे अंती सत्याचा (ईश्‍वराचा) जय होईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाच्या गलथान कारभाराविषयी आलेले कटु अनुभव !

१. कार्य करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता नसल्याने तीन जणांचा वेळ वाया जाणे
     आमच्या घराचा विद्युत पुरवठा पूर्ववत करायचा होता. संकेतस्थळावर यापूर्वीचे देयक पूर्ण भरल्याची पावती घेऊन मी संबंधित कार्यालयात गेलो. तेथील अधिकार्‍यांना विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास सांगितले. त्या अधिकार्‍यांनी मला शेजारील कार्यालयात जाऊन तेथून सध्याचे देयक घेऊन येण्यास सांगितले. मी तेथे गेल्यावर संबंधित कर्मचारी म्हणाले, आपली विद्युत जोडणी पी.डी (परमनन्ट डिसकनेक्ट) दाखवत असल्याने वीज देयक मिळू शकत नाही. यापूर्वीचे देयक आम्ही पूर्ण भरले असल्याचे त्या कर्मचार्‍याने माझ्याकडील पूर्वीच्या देयकावर लिहून घेऊन त्यावर स्वतःची स्वाक्षरी केली. मी परत अधिकार्‍याकडे जाऊन त्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले, दीड-दोन घंट्यांनी शेजारील कार्यालयात एक साहेब येतील. त्यांच्याकडून आपण देयक पूर्ण भरल्याची लेखी प्रत घेऊन या. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीतून प्रवासानुभव !

  
श्री. चेतन राजहंस
  डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर, रायपूर, देहली आणि मुंबई
 या भारतातील चार महानगरांमध्ये प्रवास करण्याचा
 योग आला. या प्रवासाच्या काळात राष्ट्र आणि धर्म 
यांच्या दृष्टीने आलेले अनुभव सांगणारे हे सदर...
भाग २
महाराष्ट्र विधानभवनातील सरकारी कारभार 
सांगणारे आणि मराठीची हत्या करणारे प्रवेशपत्र !
     नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनात जाण्याचा योग आला. अधिवेशनात विशेष सुरक्षाप्रबंध असल्याने विधानभवनात प्रवेशपत्राविना प्रवेश अशक्य असतो. माझ्याकडे जलसंधारणमंत्र्यांना भेटायचे नाशिकचे आमदार माननीय श्री. बाळासाहेब सानप यांचे पत्र असल्याने मला प्रवेशपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. प्रवेशपत्र मिळण्यासाठी मी रीतसर विधानमंडळ सचिवालयात अर्ज केला.

२६ जानेवारीला चला शनिशिंगणापूरला !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना आयोजित हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियान 
      कथित पुरोगामी, नास्तिकवादी यांच्यापासून हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि प्रथा यांच्या रक्षणार्थ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी हे अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी सर्व धार्मिक, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शनिशिंगणापूर देवस्थानचे रक्षण करणार असून त्याभोवती सुरक्षाकडे करणार आहेत. या अभियानासाठी गावातील महिलांसह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शनिभक्त उपस्थित रहाणार आहेत. तरी अधिकाधिक महिला-शनिभक्त यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी सर्वत्रचे हिंदुत्ववादी, शनिभक्त आणि धर्माभिमानी हिंदू यांनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना ९४०४९ ५६५३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.

भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभा

दिनांक - २९ जानेवारी २०१६, वेळ - सायं. ६ वा.
स्थळ - समाज मंदिर कार्यालय, पहिला मजला, ग्रामपंचायत कार्यालयावर, हनुमान मंदिरासमोर, सरवली गाव, भिवंडी, ठाणे
संपर्क क्र. - ९३२४८६८९०६
हिंदूंनो, या सभेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हा !

सनातनची ग्रंथमालिका

भावी आपत्काळातील संजीवनी 
मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १)
     सुखी जीवनासाठी, तसेच मानसिक विकारांवर उपाय म्हणून संमोहन उपचार आवश्यक आहेत. प्रस्तुत ग्रंथात मनोविकारांवरील उपचार पद्धती, संमोहन उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह केला आहे. या ग्रंथात स्वसंमोहनशास्त्राचा वापर करून झोपेत बोलण्याची सवय, न्यूनगंड, भीती आदी मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणे दिली असून व्यसनमुक्त होण्यासाठी आणि परीक्षेतील अपयशावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

न्यायव्यवस्थेवर विश्‍वास नसणार्‍या स्मिता पानसरे !

     कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन लढ्याबरोबर रस्त्यावरील लढाई लढू. - स्मिता पानसरे, कॉ. पानसरे यांची मुलगी

देशात शासन आहे का ?

१. उत्तरप्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील जहानाबाद येथे हिंदूंनी मकरसंक्रांतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी जोरदार आक्रमण केले. 
२. बंगालमध्ये एका गुन्हेगाराचा पाठलाग करणार्‍या पोलिसांच्या जीपने एका तरुणाला धडक दिली. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी सार्वजनिक बसगाड्या आणि पोलीस यांवर दगडफेक केली, तसेच पोलिसांच्या जीपवर पेट्रोल टाकून ती जाळून टाकली. याशिवाय धर्मांधांनी दिसेल त्या वाहनावर जोरदार दगडफेक केली. या घटनेत ३ पोलीस घायाळ झाले. जमाव हिंसक झाल्याने जीव वाचवण्यासाठी पोलिसांवर घटनास्थळ सोडून पलायन करण्याची नामुष्की ओढवली.

मोर्चा काढूनही सुधारणा न करणारे पोलीस जनतेने क्रांती करावी, अशी अपेक्षा करत आहेत का ? धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्यासाठी हिंदूसंघटन हाच उपाय; कारण शासन काही करणार नाही !

     नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर शहरातील दोन अल्पवयीन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे, तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने नवापुरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदु रक्षा समिती, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष असे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हिंदुप्रेमी कार्यकर्ते एकत्र आले. या वेळी निघालेल्या महिलांच्या मूक मोर्च्यात महिलांनी मेणबत्त्या घेतल्या होत्या.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे 
हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे. 
नैसर्गिक असमतोलामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार असणे
        अनावृष्ट्या विनङ्क्ष्यन्ति दुर्भिक्षकरपीडिताः ।
        शीतवातातपप्रावृड्हिमैरन्योन्यतः प्रजाः ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक १०
अर्थ : कधी कोरडा दुष्काळ पडेल; तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल; तर कधी हिमवर्षाव होईल, कधी तुफान होईर्र्ल, कधी उष्णता वाढेल; तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. 

वादंग माजवणार्‍या आणि स्वतः त्रस्त राहून दुसर्‍यांनाही त्रास देणार्‍या माणसांना दुरूनच नमस्कार !

      तीन प्रकारची माणसे असतात.
 १. पहिल्या प्रकारची माणसे धर्म आणि धार्मिक कृती समजून घेऊन श्रद्धेने आचरण करतात अन् त्यांना त्यांपासून लाभ होतो. साधी अंघोळ केली, तरी स्वच्छ वाटते. पूजा, महापूजा केली, तर पवित्र झाल्यासारखे वाटते, समाधान मिळते. अन्य अनेक धार्मिक कृती सदाचारी बनवणार्‍या आणि पावन करणार्‍या आहेत.
२. दुसर्‍या प्रकारची माणसे धर्म आणि धार्मिक कृतींचे शास्त्र समजून न घेता; पण श्रद्धेने धर्माचरण करतात, त्यांनाही धर्माचरणाचा लाभ होतो.
३. तिसर्‍या प्रकारची माणसे धर्माचे शास्त्र समजून न घेताच त्याला थोतांड म्हणतात. अशी माणसे धर्माचा अभ्यास न करता स्वतःला सर्वज्ञ समजतात. हे समाजाला सद्वर्तनी बनवणारे धार्मिक आचरण आणि परंपरा यांना नष्ट करण्याच्या मागेच लागलेले असतात; पण समाजाला उन्नत, निर्व्यसनी अन् सदाचारी बनवण्याचा वेगळा पर्याय त्यांच्याकडे नसतो, ना तशी त्यांची इच्छा असते, ना कृती !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत इतिहास गौरव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २६ जानेवारी
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारी या दिवशी 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !
     हिंदु राष्ट्राचा पुरस्कार कोणताही पक्ष करणार नाही, तर ते हिंदु संघटनांचेच दायित्व आहे. ! - अधिवक्ता शैलेंद्र जयस्वाल, दिल्ली उच्च न्यायालय 
     नेहमी दुर्बल लोकांचाच बळी दिला जातो. कधीही घोडा, हत्ती किंवा सिंह यांचा बळी दिला जात नाही, तर बकरीचाच बळी दिला जातो. त्यामुळे हिंदूंनी प्रथम सबल बनले पाहिजे.
- अधिवक्ता शैलेंद्र जयस्वाल, दिल्ली उच्च न्यायालय
    मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या आंदोलनाला गोमंतक मराठी अकादमीचा पाठिंबा आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचे आश्‍वासन देऊन ते न पाळणार्‍या शासनाला चांगलाच धडा शिकवू. 
- श्री. संजय हरमलकर, अध्यक्ष गोमंतक मराठी अकादमी, गोवा

एन्.सी.ई.आर.टी.च्या पाठ्यपुस्तकांतून अहिंदूंची कुकर्मे झाकण्याचा प्रयत्न

     आज पाठ्यपुस्तकांतून अक्षरशः खोटा इतिहास शिकवला जात आहे. अहिंदूंचा जिहाद आणि त्यांच्या अयोग्य गोष्टी हेतूतः झाकून त्यांच्यासमोर हिंदूंना डावलण्यात आले आहे. - नीरज अत्री, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आसुरी इंग्रजी भाषा शिक्षणाची भाषा ठेवून मुलांना धर्म आणि राष्ट्र यांपासून दूर नेणारे गोव्यातील भाजप शासन !

     मराठी आणि कोकणी भाषांतून प्राथमिक शिक्षण आणि पाचवीपासून इंग्रजी शिक्षण, असे शासनाचे स्पष्ट धोरण आहे. त्याचबरोबर मुलांना इयत्ता पहिलीपासून एक विषय इंग्रजीचा सक्तीचा केलेला आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

तथाकथित पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आणि हिंदुद्वेष्टे या अश्‍लाघ्य शिकवणीविषयी आता तोंड उघडतील का ?

    अल्लाहाने मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर महिलांवर बलात्कार करण्याची आणि त्यांना अपमानित करण्याची अनुमती दिली आहे.
- प्राध्यापिका सुआद सालेह, अल्-अझहर विद्यापीठ, इजिप्त 
गृहमंत्रालयाचा हास्यास्पद उपाय ! 
     क्रूर जिहादी आतंकवादी संघटना इसिसच्या आकर्षणापासून भारतीय तरुणांना वाचवण्यासाठी गृहमंत्रालय आणि गुप्तचर संस्था आता कौटुंबिक संस्कार आणि भारतीय संस्कृती यांवर भर देणार आहेत. गृहमंत्रालयाला आतापर्यंत कौटुंबिक समुपदेशन आणि चर्चा यांच्या माध्यमातून १०० हून अधिक तरुणांना इसिसच्या प्रभावातून वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे या उपायांवर गृहमंत्रालय अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

सहस्रावधी शिखांची हत्या करणार्‍या काँग्रेसने हिंदुत्ववादी सनातन संस्थेला आतंकवादी ठरवणे म्हणजे काँग्रेसची सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ही वृत्ती असल्याचे सिद्ध होते !

     सनातन संस्था आतंकवादी संस्था नाही. त्यामुळे या संस्थेवर बंदी घातली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रशासनाने घेतली. सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केली होती. ही मागणी शासनाने स्पष्टपणे फेटाळून लावली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या एका साधकास संशयित म्हणून अटक केल्यानंतर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी २३ नोव्हेंबर २०१५ या दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाला सनातन संस्थेच्या विरोधात निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी सनातन संस्थेला आतंकवादी घोषित करून या संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यवस्था आणि पोलीस हे त्या त्या राज्यशासनाचे दायित्व आहे, असे सांगत काँग्रेसच्या मागणीला केराची टोपली दाखवली.
     ज्यांची धर्मावर श्रद्धाच नाही, अशांनी आम्हाला धर्म शिकवू नये. हिंदूंनी कधीही बलपूर्वक धर्मांतर आणि माय-भगिनींवर अत्याचार केलेले नाहीत ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

कोण काय करील, हे सांगण्याऐवजी विहिंपने स्वत: काय करणार ? हे सांगणे अपेक्षित होते !

     राममंदिर उभारण्याचा निर्णय धर्माचार्य आणि हिंदू घेतील, अशी भूमिका विश्‍व हिंदु परिषदेने घेतली आहे. - श्री. त्रिलोकीनाथ पांडेय, वरिष्ठ नेते, विश्‍व हिंदु परिषद

गुन्हा करण्याची अक्कल आहे, तर त्याचे परिणामही भोगले पाहिजेत !

     नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर शहरातील दोन अल्पवयीन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने नवापुरात संतापाची लाट उसळली आहे. हे धर्मांध अल्पवयीन असल्यामुळे या गोष्टीचा लाभ उठवण्यासाठी आता ते प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे.

अशा पोलिसांना गुन्हेगारांचे साथीदार म्हणून फाशी द्या !

      मुंबई शहरातील खार परिसरातील गोळीबार वसाहतीमध्ये काही धर्मांध तेथील एका विवाहित महिलेची नेहमी छेडछाड करून तिला त्रास देत होते. २१ डिसेंबर २०१५ या दिवशी एक धर्मांध त्या हिंदु महिलेला त्रास देऊ लागला. त्याला महिलेच्या पतीने विरोध केला असता झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर या दिवशी अजिंक्य यांच्या जवळच्या तीन हिंदु मित्रांचा या घटनेशी कुठलाही संबंध नसतांना ते केवळ त्याचे मित्र आहेत; म्हणून धर्मांधांनी अमानुषपणे त्यांच्या हाता-पायाची बोटे ठेचून आणि तीक्ष्ण ब्लेडने गाल कापून त्यांना गंभीर घायाळ केले. त्या तिघांपैकी विकास कांबळे यांचा काही दिवसांनंतर उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची नोंद पोलिसांनी श्‍वसननलिकेमध्ये अन्नाचा कण अडकल्याने मृत्यू, अशी केली. अशी नोंद सिद्ध झाल्यावर त्यावर उपस्थित हिंदूंच्या सह्या घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता; मात्र हिंदूंनी नकार दिला. त्यावर पोलिसांनी या गुन्ह्यात हिंदूंना अडकवण्याची धमकी दिली.

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात रान उठवणार्‍या वृत्तवाहिन्या या वृत्ताविषयी गप्प का ?
     नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून अमानुष मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत. मुलाकडून बायबलचे उतारे म्हणण्यात चूक झाली, तर त्या मुलाला ३ दिवस अन्न मिळत नसे. (संदर्भ : इंडिया टुडे) ओवैसींना धडा शिकवून हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

     ओवैसीने हिंदूंना संपवण्याची भाषा केली, तर चालते आणि हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांना मात्र असहिष्णु संबोधले जाते. ओवैसी हिंदु राष्ट्र होऊ न देण्याची भाषा करत आहे. आज सर्वांनी आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करण्याचे काम हाती घेतले, तर ओवैसींना धडा शिकवून हिंदु राष्ट्राची निर्मिती धर्माभिमानी हिंदु निश्‍चितच करतील.
- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

शनिशिंगणापूरवर चालून येणार्‍या महिलांनो, थांबा ! जरा संयम धरा ! राग आवरा ! सत्यतत्त्वाचा आणि देवतत्त्वाचा आदर करा !

     येत्या २६ जानेवारीला ४०० महिलांची तुकडी श्री शनिशिंगणापूरवर चालून येणार आहे. मंदिर परिसरातील पवित्र चौथर्‍यावर चढून श्रीशनिदेवाचे दर्शन आणि पूजा करणार असल्याचे पुण्यातील भूमाता ब्रिगेडने घोषित करून खळबळ उडवून दिली आहे. त्याविरोधात शनिदेव मंदिर देवस्थान, स्थानिक महिला, पंचक्रोशीतील महिला मंडळे, इतर जिल्ह्यांतील शेकडो शनिभक्त महिला आणि पुरुष एकत्रित येऊन त्या चालून येणार्‍या महिला तुकडीला तेवढाच जोरकस विरोध करून रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याअनुषंगाने पुणे येथील अध्यात्मशास्त्राचे अभ्यासक आणि श्रीशनिभक्त श्री. सुरेंद्रदादा जगताप यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

तोंडवळा सतेज आणि प्रसन्न होण्यासाठी विविध आस्थापनांनी निर्माण केलेले क्रीम नव्हे, तर साधनाच उपयुक्त !

श्री. अविनाश जाधव
     १०.११.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये चार आठवड्यांत तोंडवळा उजळवण्याचा दावा करणार्‍या एका आस्थापनाला ग्राहक न्यायालयाने १५ लक्ष रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त वाचनात आले. या वृत्तामध्ये तोंडवळा उजळवण्यासाठी क्रीम सिद्ध करणार्‍या या आस्थापनाने चार आठवड्यांत तोंडवळ्याचा रंग गोरा होण्याचा दावा केला होता. हा दावा खोटा ठरल्याने आस्थापनाच्या विरोधात ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला होता. हे वृत्त वाचून श्रीकृष्णाने सुचवलेले विचार येथे देत आहे.
१. क्षणिक सौंदर्यासाठी भरमसाठ पैसा व्यय करून
 स्वतःची फसवणूक करून घेणारा समाज !
     समाजात अमुक दिवसांत तोंडवळ्याचे सौंदर्य वाढवणार्‍या किंवा रंग गोरा करण्याचे आश्‍वासन देणार्‍या असंख्य आस्थापनांची सध्या रेलचेल झाली आहे. ही आस्थापने नवनवीन विज्ञापनांच्या माध्यमातून समाजाला आकर्षित करून सातत्याने समाजाची फसवणूक करत असतात. समाजही डोळ्यांवर पट्टी बांधून क्षणिक गोष्टींसाठी या भूलथापांना फसतो आणि या अस्थापनांच्या उत्पादनांना बळी पडून पैसे व्यय करतो. सातत्याने क्रीमचा वापर केल्यामुळे हे क्रीम लावल्याविना तोंडवळा चांगला दिसणारच नाही, अशी शरिराला एकप्रकारे सवयच लागून जाते. त्यामुळे प्रत्येक पंधरवड्याला किंवा मासाला (महिन्याला) यांसाठी पैसे मोजावे लागतात.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

शनिशिंगणापूर पावित्र्यरक्षण चळवळीस राज्यभरातून संत-महंत, आध्यात्मिक संस्था, हिंदुत्ववादी संघटना, धर्माभिमानी, शनिभक्त यांचा उत्स्फूर्त पाठिंबा !

श्री. चंद्रकांत खैरे
धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना 
आक्रमक होईल ! - खासदार श्री. चंद्रकांत खैरे, शिवसेना
     हिंदु धर्मशास्त्रात ढवळाढवळ करायचा अधिकार कोणालाही नाही. जर तुम्ही देव मानत नाही, तर तुम्ही तेथे जाताच कशाला ? हा निवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. जर धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना आक्रमक होईल. हिंदु शास्त्र मानणार्‍या, देव मानणार्‍या आपल्या अनेक धर्माभिमानी महिला पुणे, संभाजीनगर, नगर, तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येत्या २६ जानेवारीला शनिशिंगणापूरला जाऊन त्या पुरोगामी महिलांना अडवणार आहेत. शनिशिंगणापूरच्या धार्मिक परंपरा रक्षण चळवळीला पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या धर्मपरंपरेमध्ये लुडबूड करण्याचा काहीच अधिकार नाही. २००२ ला ज्या वेळी दाभोलकरांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांना आम्ही अडवले होते. याही वेळी ही हिंदूंची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांना रोखू.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या दोन दिवसांचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

१५.१.२०१६
श्री. राम होनप
१. यज्ञकुंडातील अग्नीत एका देवतेचे दर्शन झाले; परंतु ती देवता कोणती आहे ?, हे ओळखता आले नाही.
२. यज्ञस्थळी एका साधकाने सांगितले, प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्म-परीक्षणात यज्ञाचा धूर विश्‍वात पसरत आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे आपण या धुरातील चैतन्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करूया ! तेव्हा या संदर्भात काय घडते ?, हे सूक्ष्मातून बघितल्यावर पृथ्वी लहान चेंडूप्रमाणे असून मी पृथ्वीच्या बाहेरून पृथ्वीकडे बघत आहे, तसेच या यज्ञाचा धूर पृथ्वीवर सर्वत्र पसरला आहे आणि काही ठिकाणी लहान स्वरूपातील अग्नीही आहे, असे दिसले.
३. प.पू. रामभाऊस्वामी हे यज्ञकुंडात आहुती स्वरूपात समर्पित झाल्यावर ते लहान बाळाप्रमाणे निश्‍चिंत आहेत, असे जाणवले.
४. प.पू. रामभाऊस्वामी यज्ञातून बाहेर आल्यावर त्यांच्या शालीला दोन ठिकाणी अग्नी लागला होता. तो विझवण्यासाठी तेथील पुरोहितांनी धाव घेतली; परंतु प.पू. रामभाऊस्वामींनी हाताने खुणावून त्यांना तसे न करण्याविषयी सूचित केले. त्या वेळी त्यांची अग्निनारायणावर पूर्ण श्रद्धा असून ते निर्भय आहेत, असे जाणवले.

प.पू. रामभाऊस्वामी म्हणजे प्रभु रामचंद्रांनी सनातनच्या रक्षणासाठी श्री गणेशाला सांगून पृथ्वीवर पाठवलेला स्थुलातील अग्निदेव असणे

श्री. श्रीकांत भट
     १५.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या संदर्भातील माहिती वाचत असतांना मला अचानक अग्नीचे तेज आणि प्रभाव जाणवू लागला. तसेच प.पू. रामभाऊस्वामी म्हणजे पृथ्वीवरील जिवांसाठी स्थुलातून प्रकट झालेले अग्निदेव असून श्री गणेशाच्या आज्ञेनुसारच त्यांचे पृथ्वीवर भ्रमणकार्य चालू आहे. येणार्‍या भीषण आपत्काळाची झळ सनातनला आणि सर्वत्रच्या साधकांना बसू नये, यासाठीच त्यांना रामनाथी आश्रमात श्रीरामरायाने पाठवले आहेे, असे वाटले.

अत्यंत उच्च तापमानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाचे तापमान सर्वसाधारण ठेवू शकणारे तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान मोजतांना
 
 मिनी रे थर्मामीटर
(या उपकरणाने ४ फूट अंतरावरील 
व्यक्ती अथवा वस्तूचे तापमान मोजता येते.)
१. उच्छिष्ट गणपति यज्ञाची १७.१.२०१६ या दिवशी 
तापमानमापक (मिनी रे थर्मामीटर) यंत्राद्वारे केलेली निरीक्षणे 
टीप : या उपकरणाने यज्ञकुंड आणि शाल यांपासून ४ फूट अंतरावरून त्यांचे तापमान मोजले आहे. हे उपकरण थेट देहावरील तापमान मोजता येण्यासाठी बनवलेले नाही. त्यामुळे देहावरील शालीचे तापमान मोजले आहे.
२. विवरण
     यज्ञकुंडातील तापमान १४६.५ अंश सेल्सिअस होते. त्या वेळी त्या यज्ञकुंडात समर्पित झालेल्या प.पू. रामभाऊस्वामींच्या देहावरील शालीचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस होते. प.पू. रामभाऊस्वामींच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे यज्ञकुंडातील अत्यंत उच्च तापमानातही त्यांच्या देहावरील शालीचे तापमान वाढलेले नाही.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

असे अनुभव आले असल्यास आम्हाला कळवावे !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
     साधक किंवा वाचक यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाच्या गलथान कारभाराविषयी या लेखात दिल्याप्रमाणे किंवा अन्यही काही अनुभव आले असल्यास त्यांनी ते आम्हाला कळवावे. पुढे त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात,२४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या तिसर्‍या दिवसाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले सूक्ष्म-परिक्षण !

यज्ञात आहुती देतांना प.पू. रामभाऊस्वामी
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना 
आलेले वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती
अ. माझे डोळे ४ - ५ मिनिटे खूप चुरचुरले.
आ. यज्ञस्थळी लावलेल्या संगिताच्या तालावर ४ - ५ मिनिटे हाताची, पायाची आणि शरिराची हालचाल होत होती.
इ. आज ७ - ८ फूट व्यासाचा पांढरा शुभ्र धूर यज्ञकुंडातून येत होता.
२. यज्ञाग्नि प्रदीप्त केल्यावर केलेले सूक्ष्म-परीक्षण
अ. अग्नीच्या ज्वाळांवर वरून पाण्याचा धबधबा पडत आहे, असे २ मिनिटे दिसले. नंतर काहीच दिसले नाही. केवळ पांढरा प्रकाश दिसला.

सनातन संस्थेचे विरोधक संतांच्या मनात सनातनविषयी विकल्प निर्माण करू न शकणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले
    प.पू. रामभाऊस्वामींच्या मुलाबरोबर बोलतांना त्याने पुढील माहिती सांगितली. आम्ही सनातन संस्थेच्या आश्रमात जायचे ठरवल्यावर दूरचित्रवाहिन्यांवरील वार्तांमुळे आम्हाला सर्वांकडून विरोध झाला. सनातन संस्था चांगली नाही, असे प्रत्येक जण सांगत होता. अनेकांचे या संदर्भात दूरभाषही आले. त्यामुळे पहिल्या वेळी आश्रमात यायचे नियोजन आम्हाला रद्द करावे लागले. सनातन संस्था चांगली आहे, याची आम्हाला खात्री असल्यामुळे दुसर्‍या वेळी कोणालाही न सांगता आम्ही रामनाथी आश्रमात आलो. येथे आल्यावर आम्हाला संस्थेबद्दल जी खात्री होती, ती योग्य असल्याचे आम्ही अनुभवले.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)
नोकरी किंवा व्यवसाय करतांना साधना होईल, असे करा !


परात्पर गुरु डॉ. आठवले
'यासंदर्भात थोडक्यात असे म्हणता येईल की, लायक आणि गरजू साधकांना, तसेच धार्मिक संस्थांना अल्प मूल्य घेऊन किंवा विनामूल्य साहाय्य करा. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत. 
१. शिक्षक : लायक आणि गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणे
२. वैद्य : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर विनामूल्य उपाय करणे
३. लेखापरीक्षक : संत, साधक, हिंदुत्ववादी, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था यांचे लेखा अहवाल विनामूल्य करणे. पुढे पैशांचा नाही, तर पाप-पुण्याचा हिशोब ठेवता आला पाहिजे.
४. अधिवक्ता : राष्ट्र आणि धर्म प्रेमींची, तसेच सात्त्विक जनांची बाजू मांडणे
५. साहित्यिक : राष्ट्र आणि धर्म यांचे वैचारिक हितरक्षण, तसेच यांसाठी कार्य करणार्‍या व्यक्ती, तसेच संघटना यांना वैचारिक पाठबळ मिळेल अशा साहित्याची निर्मिती करणे
६. व्यापारी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना लाभ न मिळवता वस्तू विकणे / अर्पण करणे किंवा धन अर्पण करणे
७. शेतकरी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना फळे, फुले आणि धान्य देणे
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धर्मसेनेची आवश्यकता !

संपादकीय 
     इसिस या क्रूर आतंकवादी संघटनेने भारतात प्रवेश केला आहे का ?, या विषयावर सध्या जोरदार खल चालू आहे. याविषयी आजचे चित्र पूर्णतः वेगळे आहे. काही मासांपूर्वी विषय जेव्हा चालू झाला, तेव्हा केंद्रशासनाने प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी इसिसचा देशात प्रभाव नाही, तिच्या आहारी कुणी भारतीय तरुण जाणार नाहीत, असे आत्मविश्‍वासाने सांगितले होते. अर्थात् आज ती स्थिती नाही. देशात ठिकठिकाणी घडणारे प्रसंग त्याची प्रचीती देतात. पुणे शहरात नुकतीच घडलेली घटना विचारात घेता, इसिसची विचारधारा देशात पसरली आहे, असा संशय घ्यायला पुरेशी जागा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn