Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

राजमाता जिजाऊ भोसले यांची आज जयंती
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती

विनम्र अभिवादन !


     हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती


देशभरातून इसिसच्या ११ संशयित आतंकवाद्यांच्या आवळल्या मुसक्या !

  • भारताला इसिसचा धोका नाही, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मारले छापे !
  • देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा इसिसचा कट अन्वेषण यंत्रणांनी उधळला !
     मुंबई - देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) अधिकार्‍यांनी उधळला. यांसदर्भात मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून ११ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पकडण्यास आलेल्या सर्व जणांचा इसिसशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

काश्मीरमध्ये अल्लाहचे राज्य आणणार असल्याची इसिसची घोषणा

हिंदूंनो, इसिसच्या जिहादी आतंकवादाचा सामना 
करण्यासाठी संघटित होण्याशिवाय तरणोपाय नाही !
     नवी देहली - भारतात इसिसचा विस्तार करण्यास आम्ही सक्षम आहोत. भविष्यात काश्मीरमधील लोक इसिसचे समर्थन करतील आणि आम्ही तेथे अल्लाहचे राज्य प्रस्थापित करू, असे जिहादी फुत्कार इसिसचा कमांडर शेख हफीद सईद खान उर्फ हफीदुल्लाह याने काढले आहेत. इसिसने दाबिक या तिच्या नियतकालिकात हफीदुल्लाह याची मुलाखत प्रकाशित केली आहे.
     त्यात हफीदुल्लाह म्हणतो, काश्मीरमधील गोपूजक हिंदु आणि पथभ्रष्ट मुसलमान यांच्याकडून आम्ही काश्मीर हिसकावून घेऊ. पाक आणि काश्मीरमधील जनता हे केवळ स्वार्थासाठी काम करत आहेत. त्यांना इस्लामचे काहीच पडलेले नाही. अल् कायदा आणि पाक यांनीही कधी इस्लामसाठी कार्य केलेले नाही. आम्ही मात्र काश्मीरमध्ये ते करून दाखवू.

एका राज्यातील आतंकवादविरोधी पथकाकडून सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या अन्य राज्यांतील साधकांविषयी चौकशी !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी तन-मन-धनाचा त्याग करणार्‍या साधकांची चौकशी करण्यात
 वेळ घालवण्यापेक्षा इसिसशी संबंधित भारतातील धर्मांधांना शोधण्यासाठी आणि 
त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तोच वेळ दिला असता, तर राष्ट्राचे भले झाले असते !
     एका राज्यातील आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांनी सनातनच्या आश्रमात येऊन आश्रम व्यवस्थापकांची भेट घेतली आणि आश्रमात रहाणार्‍या अन्य राज्यांतील साधकांची माहिती मागितली. अधिकार्‍यांनी ही मागणी तोंडी केल्यामुळे आश्रम व्यवस्थापकांनी त्यांना लेखी निवेदन करून मागणी करण्याची विनंती केली. त्यानंतर हे अधिकारी परत गेले.

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट (आय.ए.आय.एस्.) भारतमातेसाठी बलीदान करण्याची क्षमता असणार्‍या युवकांच्या शोधात ! - पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटच्या (आय.ए.आय.एस्.च्या)
राष्ट्रव्यापी चळवळीला अनेक राज्यांतून मोठा प्रतिसाद
    मुंबई - आज इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे हस्तक आणि समर्थक गावागावांत सापडत आहेत. काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणारे, राजस्थानात इसिस जिंदाबादच्या घोषणा देणारे, तमिळनाडूत इसिसचे टी-शर्ट घालणारे किंवा आज ठाणे, हैद्राबाद आणि कर्नाटक येथे अटक करण्यात आलेले इसिसचे समर्थक म्हणजे भारतात इसिस पसरत असल्याचा ठळक पुरावा आहेत. भारत शासनाने इसिसवर बंदी घालून इसिसविरोधी वैश्‍विक लढ्यात भारत सहभागी असेल, असे घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतातील इसिसच्या कारवायांना रोखणे, हे जसे शासनाचे काम आहे, तसेच ते एक उत्तरदायी नागरिक म्हणून भारतियांचेही कर्तव्य आहे. भविष्यात प्रत्येक रस्त्यावर लढण्याची सिद्धता करणार्‍या इसिसवाद्यांना प्रत्येक रस्त्यावर रोखण्यासाठी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी बलीदान करण्याची क्षमता असणार्‍या युवकांच्या शोधार्थ आम्ही इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ही चळवळ चालू केली आहे.

२६ जानेवारीला अधिकाधिक महिलांनी शनिशिंगणापूर येथील मानवी साखळीत सहभागी व्हावे ! - श्रीमती सारंगी महाजन

     संभाजीनगर - प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही महिला आपल्या परंपरा मोडीत काढण्याचे उद्योग करत आहेत. शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाण्याचे पाप करून भावना दुखावणार्‍या महिलांना रोखण्यासाठी येत्या २६ जानेवारीला अधिकाधिक महिलांनी मानवी साखळीत सहभागी व्हावे, असे आवाहन सारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी महाजन यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवतीने शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले.

हिंदु असल्यानेच माझ्या मुलाची जाळून हत्या ! - सावन राठोडचे वडील

     पुणे - सावन याच्या अंगावर पेट्रोल टाकण्यापूर्वी आरोपींनी (धर्मांधांनी) त्याचा धर्म विचारला. सावनने हिंदु असल्याचे सांगताच त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून (स्कूटरची बॅटरी चोरल्याच्या आरोपावरून) त्याला जाळण्यात आले, असा आरोप सावन राठोड याच्या वडिलांनी केला आहे. उपचाराच्या कालावधीत १४ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. सावनच्या काही नातेवाइकांनी भ्रमणभाषमध्ये रुग्णालयात त्याचे मृत्यूपूर्व चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायलर झाले आहे. त्यामध्ये त्याने वरील गोष्ट सांगितली आहे. ही घटना साबापेठ परिसरात घडली होती. या प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी २५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

देश लुबाडणार्‍या भ्रष्ट नेत्यांच्या जमिनी शासनाने प्रथम शेतकर्‍यांच्या नावे कराव्यात ! - हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

देवस्थानांच्या इनामी जमिनींचा आग्रह हे डाव्यांचे धर्मविरोधी षड्यंत्र !
     मुंबई - राजे-महाराजे यांच्या प्राचीन काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेसाठी मोठमोठी मंदिरे बांधून त्यांचा भार राजकोषावर येऊ नये; म्हणून त्यांना स्वतंत्र जमिनी इनाम म्हणून दिल्या. यातून शेतकर्‍यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होण्यासह मंदिरांचा खर्चही निघत होता. स्वातंत्र्यानंतर राजेशाही निकालात निघाल्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून राजसत्ता मिळालेल्या राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून देशच बुडीत काढला. यात मंदिरांचा कोणताही दोष नसतांना आता मंदिरांच्या भूमींवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न करणे, हे धर्माला अफूची गोळी मानणार्‍या डाव्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी ते शेतकर्‍यांना पुढे करून स्वार्थ साधत आहेत.

कुंभमेळ्यासमवेत रेल्वेगाड्या आणि देहलीतील महत्त्वाची ठिकाणे आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांचे लक्ष्य !

आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !
केंद्रीय गृहमंत्र्यांना भारतातील धर्मांध आय.एस्.आय.एस्
.मध्ये सहभागी झाल्याचा आणखी कोणता पुरावा हवा ?
     नवी देहली - उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर शहरात १९ जानेवारीच्या रात्री अटक करण्यात आलेले आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेचे चार अतिरेकी हरिद्वार येथे चालू असलेला अर्धकुंभमेळा उधळून लावण्यासमवेत, येणार्‍या रेल्वे गाड्यांवर आणि राजधानी देहलीतील काही महत्त्वाच्या ठिकाणांवरही आक्रमण करण्याच्या प्रयत्नात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अखलाक उर-रेहमान, महंमद ओसामा, महंमद अझीम शहा आणि मेहरोझ, अशी या अतिरेक्यांची नावे असून, त्यांना बुधवारी देहलीतील न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

याकूब मेमनसाठी नमाजपठण करायचा रोहित वेमुला ! - अ.भा.वि.प.चे नेते सुशीलकुमार यांचा गौप्यस्फोट

या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून सत्य समोर आणण्याचे 
धारिष्ट्य अन्वेषण यंत्रणा दाखवतील का ? 
निदर्शनाच्या वेळी तुम कितने याकूब मारोगे ? हर 
घरसे याकूब निकलेगा । (वर्तुळात) असा फलक 
धरलेले एएस्एचे विद्यार्थी
    ज्ञानदानाचे पवित्र ठिकाण असणार्‍या विद्यापिठात देशद्रोही याकूब मेमनच्या समर्थनार्थ आंदोलन करणे योग्य आहे का ? आंबेडकरांनी सिद्ध केलेल्या राज्यघटनेच्या आधारेच याकूबला फाशी देण्यात येत असतांना आंबेडकरांच्याच नावाने संघटना चालवणार्‍यांचा त्याला विरोध का होता ? या सर्व सूत्रांना बासनात बांधून केवळ दलित असल्याने त्याच्यावर अन्याय केला असल्याच्या बोंबा मारत समाजात तेढ निर्माण करणार्‍या आणि जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेत तपासाची दिशाभूल करणार्‍या काँग्रेस, आप आदी पक्ष अन् कथित पुरो(अधो)गामी संघटना यांच्यावरच देशद्रोहचा खटला भरण्यात यावा !

सावन राठोड याची हत्या इसिसच्या कार्यपद्धतीसारखी ! - बंजारा क्रांतीदल आणि समस्त हिंदू आघाडी

सावन राठोड हत्येचे अन्वेषण
आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवण्याची मागणी
      पुणे - १३ जानेवारी या दिवशी सावन राठोड या अल्पवयीन मुलाची तो हिंदु असल्याच्या कारणावरून जाळून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. इब्राहीम शेख, जुबेर तांबोळी आणि इम्रान तांबोळी या धर्मांधांनी राठोड हिंदु असल्याची खात्री पटल्यावर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. धर्मांधांची ही कार्यपद्धत इसिसशी मिळतीजुळती आहे. त्या धर्मांधांवर अतिरेक्यांचा प्रभाव आहे, हे गृहित धरून राठोड याच्या हत्येचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी बंजारा कृती दल आणि समस्त हिंदु आघाडी यांच्या वतीने २१ जानेवारी या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या क्रूर हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २७ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकाधिक जणांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक येथे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वतीने महानुष्ठानाचा संकल्पविधी

     नाशिक - योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वय ९६ वर्षे) यांच्या उद्दिष्टांपैकी काही प्रमुख गोष्टींच्या इच्छापूर्तीसाठी नुकताच योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी संकल्प सोडून महानुष्ठानास प्रारंभ केला आहे. नाशिक, श्रीक्षेत्र वाराणसी आणि श्रीक्षेत्र रामेश्‍वर येथे महामृत्युंजय आणि अन्य विधी करण्याकरिता ५८ ब्रह्मवृंदानी यज्ञयाग, महापूजा आदी चालू केले आहे.

उद्योगपती डी.एस्. कुलकर्णी यांच्या हस्ते योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा सत्कार

उद्योगपती डी.एस्. कुलकर्णी आणि सौ. हेमा कुलकर्णी  योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा सत्कार करतांना


      येथील प्रसिद्ध उद्योगपती डी.एस्. कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्यालयात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा नुकताच सत्कार केला.

(म्हणे) मासिक पाळी असतांना महिलांनी देवपूजा करावी आणि मंदिरात दर्शन घ्यावे !

रामनाथ (अलिबाग) येथील सत्यनारायण पूजेत मुक्ता दाभोलकर यांनी उधळली मुक्ताफळे
हिंदु धर्माचा काडीचाही अभ्यास न करता पूजेच्या ठिकाणी वाटेल ते 
बरळणार्‍या मुक्ता दाभोलकर यांना धर्मप्रेमी हिंदूंनी खडसवायलाच हवे !
     रामनाथ (अलिबाग) - मासिक पाळी चालू असतांना महिलांनी देवपूजा करावी आणि मंदिरात देवाचे दर्शनही घ्यावे, असा धर्मद्रोही सल्ला अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी हिंदूंना दिला. (हिंदूंची दिशाभूल करू पहाणार्‍या मुक्ता दाभोलकर ! - संपादक) बालाजी नाका मित्रमंडळ, अलिबाग आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त येथे १५ जानेवारी या दिवशी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण देतांना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन, जागर वैद्यानिक दृष्टीकोनाचा आणि महिलांचे चार दिवस (मासिक पाळीचे) या विषयावर पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती, तसेच ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते.

नास्तिकवादी महिलांनी धर्म परंपरा न थांबवल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल ! - शिवसेनेच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर

शनिशिंगणापूर येथे धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या नास्तिकवादी महिलांना शिवसेनेची चेतावणी !
हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीमध्ये शिवसेनेचा कृतीशील सहभाग !
* शिवसेनेची नगर येथे पत्रकार परिषद 
* धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ चळवळीमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेचे आभार !
     नगर, २२ जानेवारी (वार्ता) - येत्या २६ जानेवारीला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी महिलांकडून श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी चढण्याची कृती ही पूर्णपणे चुकीची आहे. त्या महिलांची ही धर्मविरोधी कृती ही केवळ शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी करणारी आहे. त्या नास्तिकवादी कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या नास्तिकवादी महिलांना शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल.

पुरो(अधो)गाम्यांचा लोकांची धर्मावरील श्रद्धा अल्प करण्याचा डाव !

     पुरोगामीत्व आणि कथित स्त्री-पुरुष समानतेचा डांगोरा पिटणार्‍या काही पुरो(अधो)गामी महिलांकडून शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या लोकांना धर्माविषयी काही देणे-घेणे नाही, अशा लोकांकडून जाणीवपूर्वक अशा कृती केल्या जात आहेत. हे सर्व प्रकार म्हणजे लोकांची धर्मावरील श्रद्धा अल्प करण्याचा भाग आहे.- प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे विराट धर्मजागृती सभेचे आयोजन

      धुळे - हिंदूमध्ये धर्माभिमान वाढावा, त्यांना राष्ट्रावरील, धर्मावरील म्हणजेच पर्यायाने त्यांच्यावरील संकटांची जाणीव व्हावी, या समस्यांवर उपाय म्हणजे हिंदु-राष्ट्र स्थापना, हे लक्षात यावे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने धुळे येथे २४ जानेवारी २०१६ या दिवशी श्री अग्रसेन पुतळ्याच्या मागे, अग्रवालनगर, मालेगाव रोड या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात आतापर्यंत १३०० हून अधिक धर्मसभा घेण्यात आल्या आहेत. या जनजागृतीच्या कार्यात हिंदु जनजागृती समिती समवेत सनातन संस्था तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटना, धर्मप्रेमी आणि संप्रदाय हेसुद्धा सक्रीयपणे सहभागी आहेत.

आतंकवादामुळे सिरियातील देर-अल्-जारमधील जनतेवर भूक भागवण्यासाठी सोने विकण्याची पाळी : कुपोषणामुळे २४ जणांचा मृत्यू

    बैरूत (सिरिया) - सिरियाच्या पूर्व शहरात देर-अल्-जार येथे परिस्थिती बिकट आहे. हे शहर एक वर्षापासून आतंकवाद्यांच्या कह्यात असून येथील लोक आता भुकेपोटी त्यांच्याजवळचे सोने विकत असल्याचे भयंकर वास्तव समोर येत आहे. सैनिक आणि इसिस यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी हे लोक घरदारही विकत आहेत.
    एकीकडे इसिसचे अतिरेकी, तर दुसरीकडून देशाचे सैनिक यांच्यातील संघर्षाच्या भयानक दुष्टचक्रात अडकलेल्या लोकांना भूक भागवण्यासाठी जवळचे आहे नाही ते विकायची वेळ आली आहे. अगदी घरदार विकून हे लोक आता भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वनधनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वनमंत्र्यांनी घेतली योगऋषी रामदेवबाबा यांची भेट

पतंजली उद्योग समूहासमवेत लवकरच सामंजस्य करार
  मुंबई - आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर (वनातील औषधी वनस्पती) प्रक्रिया करून सिद्ध केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, तसेच या माध्यमातून आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा, त्यातून त्यांची जीवनोन्नती व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योगऋषी रामदेवबाबा यांची भेट घेतली. योगऋषी रामदेवबाबा यांनी वन विभागाकडून मध, कोरफड जेल, आवळा यांसारख्या वस्तू खरेदी करण्याची सिद्धता दर्शवली आहे. यासंबंधीच्या अटी आणि शर्ती निश्‍चित झाल्यानंतर लवकरच वन विभाग आणि पतंजली उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार केला जाईल, ज्यातून पतंजली उद्योगसमूह या वनधनापोटी निश्‍चित रक्कम वन विभागास प्रदान करील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत विद्यार्थ्यांना चंद्रकोर आणि टिकली लावण्यास शाळेतील शिक्षकांकडून बंदी !

हिंदुत्ववाद्यांच्या दणक्यानंतर मुख्याध्यापकांकडून अनुमती !
     मुंबई - विक्रोळी कन्नमवारनगर २ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत विद्यार्थ्यांना चंद्रकोर आणि टिकली लावण्यास काही शिक्षकांनी बंदी घातली होती अन् काही मुलांना निलीमा पाठक या शिक्षिकेकडून शिक्षासुद्धा करण्यात आली होती. (शिक्षकांना मुलांना टिकली लावून येण्यास बंदी घालण्याचा काय अधिकार ? हे शिक्षक मुसलमान मुलींना टिकली लावा, असे सांगण्याचे धैर्य करतील का ? - संपादक) याविषयी हिंदुत्ववाद्यांना कळल्यावर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना याविषयी जाब विचारल्यानंतर त्यांनी मुलांना चंद्रकोर आणि टिळा लावण्यास तसेच मुलींना टिकली लावण्यास अनुमती दिली. (शिक्षकांना जाब विचारणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्ववादी हीच हिंदु धर्माची शक्ती आहेत ! - संपादक)

धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे तहसीलदारांना निवेदन

    
पाचोरा येथे निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     जळगाव - धरणगाव येथे तहसीलदार श्री. शशिकांत खैरनार यांना राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी निवेदन दिले. या वेळी सर्वश्री मोहित पाटील, परेश चौधरी, विनोद शिंदे, राहुल धनगर आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
     पाचोरा - येथे नायब तहसीलदार श्री. राजेंद्र नजन यांना शनिशिंगणापूर येथे शनिच्या चौथर्‍यावर जाऊ पहाणार्‍या पुरोगामी महिलांना रोखण्यात यावे, याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे श्री. सचिन येवले, सनातन संस्थेच्या सौ. रेखा जाधव, सौ. मीना जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रणव नागणे, हिंदुत्ववादी संदीप पाटील, विनोद जगताप उपस्थित होते.

फ्रान्सकडून प्राचीन हरिहर मूर्तीचे शीर कंबोडियाला परत

१३० वर्षांपूर्वी पळवले होते मूर्तीचे मस्तक ! 
     नोम पेन्ह (कंबोडिया) - येथील श्री विष्णु आणि शिव यांचा एकत्रित तोंडवळा असलेल्या हरिहर या देवतेच्या मूर्तीचे शीर फ्रान्समधील एका संशोधकाने वर्ष १८८२ मध्ये चोरून नेले होते. गेली १३० वर्षे ते तेथील गुईमेत संग्रहालयात ठेवण्यात आले होते. फ्रान्सने ते कंबोडियाला परत केले असून २१ जानेवारी २०१६ या दिवशी ते पुन्हा मूर्तीच्या धडाला चिकटवण्यात आले. (जगभरातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी भाजप शासनाने पुढाकर घ्यावा, ही अपेक्षा आहे ! - संपादक)

ख्रिस्ती धार्मिक नेत्याने पत्नीची हत्या केल्याची ९ वर्षांनी दिली स्वीकृती

स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचे रहस्य तब्बल ९ वर्षे दडवून ठेवणारे ख्रिस्त्यांचे धार्मिक नेते 
समाजाला काय दिशा देणार ? असे नेते शांतीचे उपासक कसे असू शकतात ?
     केंट (अमेरिका) - ख्रिस्ती धार्मिक नेते सॅम्युुअल बोर्नट्रेगर यांनी स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचे तब्बल ९ वर्षांनंतर पोलिसांसमोर मान्य केले. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवणारे बोर्नट्रेगर गुन्ह्याची भावना मनात ठेवून चर्च आणि धार्मिक कार्यक्रम येथे धार्मिक शिक्षण देत होते; परंतु ९ वर्षांनंतर त्यांना उपरती झाली आणि शेवटी त्यांनी पत्नीच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय बोर्नट्रेगर अमेरिकेच्या ओहायोमधील बाऊलिंग ग्रीनपासून जवळपास ८० किलोमीटर लांब आणि ५० लोकांच्या समूहात रहातात. मिसूरीच्या ग्रामीण भागात रहात असतांना बोर्नट्रेगर यांनी वर्ष २००६ मध्ये २६ वर्षी पत्नी एन्ना योडरला विष पाजून ठार केले होते. एन्नापासून त्याला ४ मुले आहेत. बोर्नट्रेगर यांच्या कृत्यावर प्रारंभी त्यांच्या अनुयायांचा विश्‍वास बसला नाही; मात्र हे सत्य त्यांना स्वीकारणे भाग पडले.

अमेरिकेत शाळेच्या दिनदर्शिकेत दीपावलीची सुट्टी अंतर्भूत

     बाल्टिमोर - सर्वसमावेशक शालेय दिनदर्शिका बनवतांना हॉवर्ड काऊंटी शिक्षण मंडळाने प्रथमच हिंदु, चिनी आणि मुसलमान विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील मूळ भारतियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.हॉवर्ड काऊंटी शिक्षण मंडळाने देशातील विविध संस्कृतीचा आदर करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे, असे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा ख्रिस्टीन ओ कोन्नोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिक्षण मंडळाच्या सुट्टीच्या सूचीमध्ये दीपावलीचा समावेश व्हावा, यासाठी हिंदु विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या मोहिमेला अनुसरून हॉवर्ड काऊंटी शिक्षण मंडळाने शाळेच्या दिनदर्शिकेत दीपावलीची सुट्टी अंतर्भूत केली आहे.

बिहारच्या प्रशासनात महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण !

आरक्षणाचा भस्मासुर ! गुणवत्तेनुसार नव्हे, तर जात आणि लिंग यांनुसार प्रशासकीय 
पदे भरणारे देशाचा विकास काय साधणार ?
     पाटणा - बिहारच्या मंत्रीमंडळाने पोलीस खात्यात महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा ठराव काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यापाठोपाठ आता सर्व खात्यांत आणि संबंधित शासकीय सेवांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा ठराव संमत केला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्य सचिव ब्रजेश महरोत्रा यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली. ब्रजेश महरोत्रा यांनी पुढे माहिती दिली की, सध्या अनुसूचित जातींसाठी १६ टक्के, अनुुसूचित जमातींसाठी १ टक्का, अत्यंत मागासवर्गियांसाठी १८ टक्के आणि मागासवर्गियांसाठी १२ टक्के आरक्षण आहे. या आरक्षित जागांमधील ३५ टक्के जागा त्या त्या वर्गातील महिलांसाठी राखीव असतील, तसेच खुल्या प्रवर्गातील ५० टक्के जागांपैकी ३५ टक्के म्हणजे एकूण जागांच्या १७.५ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.

समीर गायकवाड यांच्या जामीन आवेदनावर २५ जानेवारी या दिवशी सुनावणी : विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
    कोल्हापूर, २२ जानेवारी (वार्ता.) - कॉ. पानसरे हत्या प्रकरणी एका विशेष शासकीय अधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पानसरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाने पुणे येथील अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. अधिवक्ता निंबाळकर हे २२ जानेवारी या दिवशी उपस्थित नव्हते. त्यामुळे श्री. समीर गायकवाड यांच्या जामीन आवेदनावर २५ जानेवारी या दिवशी सुनावणी घेण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयात सत्र न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे आणि अधिवक्ता आनंद देशपांडे हे उपस्थित होते. शासनाच्या वतीने शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी बाजू मांडली. न्यायाधिशांनी पुढील सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंच्या वतीने प्रत्येक एकच अधिवक्ता बाजू मांडेल, अशी सूचना केली.

वाळूचोरी न रोखल्यास तहसीलदारांना उत्तरदायी धरून कारवाई करण्याची राज्यशासनाची सूचना

वाळूचोरी प्रकरणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि आवश्यक पोलीस यंत्रणा उपलब्ध 
केल्यास त्याला काही प्रमाणात आळा बसू शकेल. त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती 
शासनाने दाखवावी, ही अपेक्षा !
    पुणे, २२ जानेवारी - राज्यशासनाने वाळू तस्करांवर कारवाई करण्यासमवेतच तहसीलदारांनाही उत्तरदायी धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येथून पुढे ज्या ठिकाणी वाळूचोरीच्या तक्रारी येतील, त्यांची चौकशी करून संबंधित तहसीलदारांना उत्तरदायी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळमधील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

     एर्नाकुलम् (केरळ) - राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एर्नाकुलम्चे जिल्हाधिकारी राजमाणीकम् यांना निवेदन सादर केले. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरावर बंदी आणावी, तसेच त्याचा योग्य आदर राखला जावा, यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन्, श्री बालकृष्ण, कु. अदिती सुखटणकर आणि श्री. प्रवीण उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची जागृती करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

कोल्लूर येथील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांना सनातन पंचांग
भेट देतांना सनातनचे साधक श्री. प्रभाकरन् (उजवीकडे)
     कोल्लूर - येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी स्वामीजी यांना सनातनचे तमिळ भाषेतील ग्रंथ, तसेच सनातन पंचांग भेट देण्यात आले. ते मंगळुरू येथे प्रवास करत असतांना त्यांनी रेल्वेत सनातनचा तमिळ भाषेतील गुरुकृपायोग हा लघुग्रंथ विकत घेतला होता. तो वाचून ते पुष्कळ प्रभावित झाले आणि तेव्हापासून त्यांना सनातन संस्थेविषयी समजले. त्यानंतर त्यांनी थिरूवन्नामलई येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावरून दत्त हा तमिळ भाषेतील ग्रंथ विकत घेतला होता.

नंदुरबारमध्ये टीपू सुलतानच्या फलकाशेजारी राणी लक्ष्मीबाईच्या नावाचा फलक लावल्याने तणाव !

  • फलक, मार्ग आणि शहरे यांना असलेली हिंदूंवर अनन्वित अत्याचार केलेल्या टीपूसारख्या परकीय क्रूरकर्म्यांची नावे कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूंनो, परकीय आक्रमकांच्या नावांचे काय करायचे ते एकदा कायमचे ठरवून टाका ! 
     नंदुरबार, २२ जानेवारी (वार्ता.) - टीपू सुलतान चौक असा फलक असलेल्या जागेशेजारी वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावून राणी लक्ष्मीबाई चौक असे लिहिले असल्याने येथील मुसलमान संतप्त झाले. यानंतर मुसलमान तरुणांनी थेट तणाव निर्माण करीत पोलिसांना पाचारण केले आणि तणाव वाढवला. २१ जानेवारीच्या सकाळपासून चालू झालेल्या या तणावाची धग २२ जानेवारीलाही कायम होती. त्यामुळे अर्ध्या शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला, तसेच काही शाळांनी विद्यार्थ्यांना परत पाठवून देत सुटी जाहीर केली.

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन

     यवतमाळ - प्रजासत्ताकदिनी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रभारी उपपोलीस अधीक्षक श्री. मोहन प्रजापती, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुचिता पाटेकर यांना निवेदन देण्यात आले.
     या वेळी निवेदन स्वीकारतांना श्री. प्रजापती म्हणाले, हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य पुष्कळ चांगले असून राष्ट्रध्वजाची विटंबना करणारे आणि प्लास्टिकचे ध्वज विक्रेते यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कार्यवाही करू. त्यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत सोळंके, दत्तात्रय फोकमारे आणि सनातन संस्थेच्या सौ. सिंधू देऊळकर उपस्थित होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान येथील प्रस्तावित स्मारकाच्या जागेसाठी कार्यवाही करण्याचे पंतप्रधानांचे आदेश

     पनवेल - अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी येथील महाराष्ट्र मंडळ प्रयत्नशील आहे. या स्मारकासाठी १० एकर जागा उपलब्ध करण्याविषयी प्रस्ताव मंडळाचे आजीवन सदस्य आणि सल्लागार, तसेच सामाजिक कार्यकर्ते असलेले श्री. विष्णु गवळी यांनी सिद्ध केला होता. हा प्रस्ताव शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी अंदमानच्या नायब राज्यपालांकडे सादर केला होता. याविषयी श्री. विष्णु गवळी यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना देहली येथे जाऊन निवेदनही दिले होते. तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने श्री. गवळी यांचा प्रस्ताव त्वरित अंदमान निकोबार प्रशासनाला पाठवून त्याविषयी तात्काळ कार्यवाही करून त्याचा तपशील प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक लवकरच अंदमान येथे साकार होईल, असा विश्‍वास श्री. गवळी यांनी व्यक्त केला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भारताला इसिसचा धोका नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !
     देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट रचणार्‍या इसिसशी संबंधित १४ आतंकवाद्यांना मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून राष्ट्रीय चौकशी यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

(म्हणे) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वागणे असहिष्णू !

साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
     पुणे, २२ जानेवारी - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही सूत्रे आक्षेपार्ह आहेत, असे सांगणे म्हणजे महामंडळाचे हे वागणे असहिष्णूपणाचेच आहे. महामंडळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे कि विरोधात, हे त्यांनी एकदाचे सांगावे. महामंडळाला सेन्सॉरशिपचा अधिकार कोणी दिला ? छपाईपूर्वी त्यांना माझे भाषण वाचायचे असेल, तर ते निश्‍चित वाचू शकतात, पण त्यातल्या काही सूत्रांवर आक्षेप घेणे आणि भाषण छापण्यात दिरंगाई करणे, हे योग्य नव्हेच. महामंडळाकडून झालेली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशा शब्दांत ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महामंडळावर टीका केली. (सबनीस यांना जर एवढा आक्षेप असेल, तर त्यांनी संमेलनाध्यक्ष पद का भूषवले ? आता ते पदाचे त्यागपत्र देणार का ? - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     ISIS Kashmir me chahata hai Allah ka shasan ! Pak aur Al-Kaida ka bhi kiya virodh !
     kya ISIS se shasan hamari raksha karegi ?
जागो !
     इस्लामिक स्टेट कश्मीर में चाहता है अल्लाह का शासन : पाकिस्तान और अल-कायदा का भी किया विरोध !
     क्या इस्लामिक स्टेटसे शासन हमारी रक्षा करेगी ?

बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजेे धगधगते अग्नीकुंडच !

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
श्री. संजय राऊत
     शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण विविध कारणांनी होत असते. बाळासाहेबांचे विस्मरण म्हणजे राष्ट्राचे मरण. महाराष्ट्रासह देशातील मरगळ झटकण्याचे काम बाळासाहेबांनी आयुष्यभर केले. आज देशाची आणि राज्याची जी अवस्था आहे, ती पहाता बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण येते.
१. बाळासाहेब ठाकरे यांची आजही देशाला आवश्यकता भासणे
    पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सांगितले, बाळासाहेब ठाकरे हे ज्याप्रमाणे भारताचे हिरो (नायक) होते, तसा आमचा हिरो हाफिज सईद आहे. हाफिज सईद कोण आहे ? हाफिज सईदचे पाकिस्तानात काय स्थान आहे? तो काय डरकाळ्या फोडतो आणि काय वल्गना करतो ते सोडून द्या. जनरल मुशर्रफने बाळासाहेबांची तुलना हाफिज सईदशी केली; म्हणून आपल्याला बोटे मोडण्याची गरज नाही. पाकिस्तानचा माजी राज्यकर्ता आणि लष्करशहासुद्धा मान्य करतो की, बाळासाहेब हे भारताचे हिरो आहेत. बाळासाहेबांनी कधीच मुख्यमंत्रीपद किंवा पंतप्रधानपद भूषवले नाही. आजच्या राजकारण्यांमागे ज्याप्रमाणे बिल्डर लॉबी, उद्योगपतींची लॉबी, अंबानी, अदानी उभे राहतात, तसे बाळासाहेबांच्या मागे कुणीच पैशाचे पाठबळ उभे केले नाही. तरीही बाळासाहेब हे आजही देशाचे हिरो आहेत आणि आज बाळासाहेब हवे होते, असे बोलले जाते. हा आजच्या सर्व राजकारण्यांचा आणि राज्यकर्त्यांचा पराभव आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बालवयातील राष्ट्राभिमानी कृती !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने...
१. मोठेपणी मोठी कामे करायची असल्याचे 
जाणून सुभाषचंद्र बोस यांनी लहानपणीच 
कष्टमय जीवन जगण्याची सवय करणे
    एकदा हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री सुभाषचंद्र बोस यांच्या आई प्रभावतीदेवी यांना जाग आली. तेव्हा त्यांना किशोरवयीन सुभाषची चिंता वाटून त्या त्याच्या खोलीत गेल्या. सुभाष पलंगावर न झोपता भूमीवर सतरंजी अंथरून झोपलेला पाहून त्यांना पुष्कळ दुःख झाले आणि त्यांनी सुभाषला जागे केले. त्या वेळी त्यांच्यात पुढील संवाद झाला. 

शिवसेनाप्रमुखांसारखी अशी सडेतोड आणि रोखठोक भाषा बोलायला हिंदुत्ववादी संघटना शिकतील का ?

१. एकतर मुसलमानी धर्मांधता आणि आतंकवाद यांपासून हिंदूंना वाचवायचे नाही. तेथे शेपट्या हालवत किंवा घालून बसायचे आणि त्या आतंकवादाशी मुकाबला करण्यासाठी हिंदूंनी काही हालचाली केल्याच, तर त्यांना कलंकित करून संपवायचे.
२. जे मुस्लीम अतिरेकी अनेक वर्षे हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करून निरपराध्यांचे बळी घेत आहेत, त्यांचा उल्लेख मीडियावाले कधी मुस्लीम अतिरेकी असा करत नाहीत. तेथे त्यांना पत्रकारितेमधील नीतीमत्ता, नैतिकता आणि आचारसंहिता वगैरे आठवते. मग हिंदूंबाबत ती कुठे जाते ? हे दुर्दैव हिंदु समाजाचे नसून देशाचे आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनमोल रत्न देणार्‍या राजमाता जिजाऊ !

राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
    ख्रिस्ताब्द १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्या शहाजीराजांची पत्नी आणि छ. शिवाजी महाराजांची माता होत्या. त्यांना रामायण-महाभारत आणि पुराणे यांतील कथा अतिशय आवडत होत्या. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मुघलांनी अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. राष्ट्ररक्षणासाठी सुपूत्र दे, अशी प्रार्थना जिजाऊंनी भवानीदेवीला केली. बाल शिवाजीच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले. पुण्यात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली आणि जोगेश्‍वरी अन् केदारेश्‍वर मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तत्कालिन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालीत होती.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

नद्यांचे अश्रू

    पुण्यामधून वाहणार्‍या नालासदृश मुळा-मुठा या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्रशासनाने जपानी आस्थापनासमवेत एक सहस्र कोटी रुपयांचा करार केला असून त्या माध्यमातून जलशुद्धीकरणाचे ११ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घोषित केलेल्या देशातील ३०२ प्रदूषित नद्यांमध्ये मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश होता. वर्ष २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कराराद्वारे मिळणार्‍या या अर्थसाहाय्याला भ्रष्टाचार, चालढकलपणा, उदासीन वृत्ती, पर्यावरणाला हानीकारक दृष्टीकोन अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असल्याने शुद्ध नदीचे खळाळते रूप कधी पहायला मिळणार, याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे.

मालदा, पूर्णिया आदी दंगलींनंतर कोणी असहिष्णूतेची बांग दिली नाही !

श्री. सच्चिदानंद शेवडे
     भर दिवसा राजरोसपणे कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत आणि सर्व माध्यमे जणू काही घडलेच नाही, अशी शांतता धरून बसली होती. जेव्हा सामाजिक माध्यमांमधून मालदा दंगलीला वाचा फुटली, तेव्हा जणू जाग आली. मग चर्चांचे गुर्‍हाळ आणि त्यात नेहमीचे यशस्वी कलाकार, असा खेळ चालू झाला. रोम जळत होते, तेव्हा तेथील राजा निरो फिडल (एकप्रकारचे वाद्य) वाजवत बसला होता, असे म्हणतात. येथे ते प्रत्यक्ष दिसले. ममता बॅनर्जी यांनी मालदातील मोर्चा अत्यंत शांततापूर्ण रितीने झाल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांतून मोर्चा हिंसक रितीने झाल्याची बातमी आली, तरी सर्व आलबेल होते. चर्चेतून एकाही सेक्युलर महाभागाने असहिष्णूता वाढल्याची बांग दिली नाही. हेच हिंदूंच्या बाबतीत नेमके उलटे कसे होते ? पण असा प्रश्‍न विचारला की, विचारणारा लगेच जातीयवादी ठरतो. ही धर्मनिरपेक्ष सिलेक्टिव्ह चाल आता लोकांना कळू लागली आहे. मात्र तेच यांना कळत नाही, त्याचे काय करावे ?
     हिंदूंच्या धार्मिक परंपरा कोणीही मोडू शकत नाही. आम्ही त्याला विरोध करू. यासाठीच सर्वांनी आपल्या संस्कृतीचे आचरण जाणून घेऊन केले पाहिजे !
- करवीरपीठाचे जगदगुरू शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) पाक भारताला चोहोबाजूंनी पोखरत असतांना त्याला धडा शिकवणारे नेतृत्व देशाला मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

     पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावरील आक्रमणानंतर पाकिस्तानी आतंकवादी आणि अमली पदार्थांचे तस्कर यांची युती असून सीमेपलीकडून पंजाबमध्ये प्रतिवर्षी ७ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या तस्करीत केवळ हेरॉइनचा वाटा ६ सहस्र ५०० कोटी रुपयांचा असल्याचे एम्स्च्या अहवालात म्हटले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

     स्त्रिया, बालके आणि आदिवासी यांच्या विचार प्रवाहाची भूमिका ही निधर्मीपणाच्या भूमिकेतून पुढे आली आहे. याचे विकसित रूप म्हणून धर्माचा विरोध आणि धर्माचा विलय असा अपेक्षित आहे. मुळात निधर्मीपणाचा जन्म हा धर्माची चिकित्सा करण्यासाठीच झाला आहे.

माहेरी गेल्यावर पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !

सौ. प्राची मेहता
१. भाववृद्धीसाठी प.पू. गुरुदेवांची मानसपूजा करतांना 
भक्तीभाव किंवाआनंद न जाणवल्याने अपराधीपणा
 वाटणे आणि श्रीकृष्णाला कोणत्याही अपेक्षेविना भावाचे
 प्रयत्न करायला शिकव, अशी प्रार्थना करणे
     काही दिवसांपूर्वी मी माहेरी गेले होते. तेव्हा माझे आजोबा-आजी (श्री. आणि सौ. हर्षे) यांना भेटले आणि त्यांना विचारले, मी भावजागृती आणि भाववृद्धी होण्यासाठी काय प्रयत्न करू ? त्यावर आजोबांनी (श्री. श्रीपाद हर्षे यांनी) मला प.पू. गुरुदेवांची मानसपूजा करायला सांगितली. त्यानुसार मी १-२ दिवस मानसपूजा करूनही त्यात मला भक्तीभाव किंवा आनंद जाणवत नव्हता; उलट कर्मकांडात अडकल्याप्रमाणे मला वाटत होते. तेव्हा मी मनातील अपराधीपणाचा विचार सांगतांना आजोबांना म्हटले, गुरूंची पाद्यपूजा करण्यातील आनंद अनुभवता येत नसल्याने मला कंटाळवाणे वाटत आहे.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या 
सनातनच्या साधकांचे अनुभव !
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले.

आधुनिक वैद्य प्रकाश घाळी यांना नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्य प्रकाश घाळी
१. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ 
केल्यापासून नामजप आतून होत असल्याची अनुभूती येणे
     मी वर्ष १९९७ पासून, म्हणजे सुमारे १८ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. वर्ष १९९७ पासून मी गुरुकृपायोगानुसार कुलदेव आणि दत्त यांचा नामजप करण्यास आरंभ केला. केवळ ५ वर्षांमध्ये माझा आतून नामजप होऊ लागला. नंतर संस्थेच्या मार्गदर्शनानुसार कालमहिम्याप्रमाणे वेगवेगळे नामजप करण्यास सांगण्यात आले; पण कोणताही नामजप असला, तरी थोड्या कालावधीनंतर आतूनच तो नामजप होत होता. याविषयी प.पू. गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, आतून आपोआप नामजप होणे आणि आवश्यकतेनुसार पालट होणे, हे चांगले आहे. नामजप आतून जरी होत होता, तरी तो संतांसारखा (पश्यंती वाणीमध्ये) २४ घंटे होत नव्हता. प.पू. गुरुदेवांनी तो साधारण ७ - ८ घंटे होत आहे, असे सांगितले होते.
२. घरी असतांना नामजप अत्यल्प वेळ होणे आणि रामनाथी 
आश्रमात आल्यापासून पुष्कळ वेळ नामजप होणे
     आता सर्वांना सांगितल्याप्रमाणे मी ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप करतो. आताही नामजप आतून आपोआप होत आहे; पण तो रज-तम आणि सत्त्व या गुणांप्रमाणे अल्पाधिक प्रमाणात होतो, उदा. गेल्या १० - ११ मासांपासून (महिन्यांपासून) माझ्या आईला बरे वाटत नसल्याने मी घरीच होतो. आमच्या गावी पुष्कळ रज-तम असल्याने तेथे नामजप आतून अत्यल्प वेळच होत होता.

जीवनातील अगदी छोट्या छोट्या कृतींकडेही महर्षींचे लक्ष असते, हे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेल्या मार्गदर्शनातून लक्षात येणे

(पू.) सौ. अंजली गाडगीळ
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे स्पंदनांच्या अभ्यासाला पुष्कळच
 महत्त्व देत असणे आणि आपत्कालात असा अभ्यास 
करणे अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव होणे
     पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे स्पंदनांच्या अभ्यासाला पुष्कळच महत्त्व देतात. एखादी व्यक्ती आपल्याशी बोलायला आल्यानंतर भावनेच्या भरात आपणही तिच्याशी बोलणे चालू ठेवतो. आता आपत्काल चालू झाल्याने प्रत्येक व्यक्ती कोणत्या उद्देशाने आपल्याशी बोलायला आली आहे, हे प्रथम पाहिले पाहिजे. नाहीतर तिच्यातील नकारात्मक स्पंदनांच्या परिणामामुळे आपल्याला आध्यात्मिक त्रास होऊ शकतो.
     काळ वाईट असल्याने आता प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातच आपण सतर्क असले पाहिजे, हेच यातून शिकायला मिळाले.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (२१.१२.२०१५, सकाळी ७.०९)
२. मंदिराच्या ठिकाणी भेटलेल्या साधूशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा महर्षींनी
बोलावलेल्या ठिकाणी अपेक्षित वेळेत पोहोचणेच अधिक आवश्यक असल्याचे
शिकवणारा प्रसंग (दोन योग्य गोष्टींमध्ये अधिक योग्य गोष्ट कोणती ?
याची पारख करण्यास शिकणे महत्त्वाचे !)
     एकदा तिरुवण्णामलई येथील शिवमंदिराच्या ठिकाणी आम्हाला काही साधूसंन्यासी भेटले. त्यातील एक साधू चांगले वाटले; म्हणून मी त्यांना संस्थेचे कार्य सांगण्यास प्रारंभ केला.

देवद आश्रमातील वयस्कर साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. नियमितपणा : आश्रमात प्रतिदिन सकाळी योगासनाचा वर्ग होतो. या वर्गाला काही वयस्कर साधक आणि संत नियमितपणे उपस्थित असतात.
२. भावपूर्ण योगासने करणार्‍या मालखरेआजी ! : मालखरेआजी योगासनाच्या वर्गात जे प्रकार करतात, ते सर्वच भावपूर्ण असतात, उदा. आजी योगवर्गात दळण दळण्याचा प्रकार करतात, तो एवढा भावपूर्ण असतो की, प्रत्यक्ष जनाबाईच दळण दळत आहे, असा अनुभव येतो.
३. इतरांचा विचार करणारे जाधवआजोबा ! : श्री. जाधवआजोबांना चालण्याचा थोडे त्रास होत असल्याने ते लंगडत चालतात.

प.पू. डॉक्टरांच्या चालण्यातून निर्माण होणार्‍या नादाची साधकाला आलेली अनुभूती

१. प.पू. डॉक्टर चालत असतांना नाद ऐकू येणे
     ३.४.२०१४ या दिवशी सकाळी ५.३० ते ६ या कालावधीत मला प.पू. डॉक्टर चालतांना दिसले. ते चालत असतांना मला नाद ऐकू आला. प.पू. डॉक्टर चालतांना त्यांच्या चरणांचा जमिनीला जो स्पर्श होतो. त्यातून सूक्ष्म नाद ऐकू येतो, हे भगवंताने लक्षात आणून दिले. या नादलहरी पुष्कळ चैतन्यमय होत्या. त्यात दैवी लहरींचे प्रमाण ७० प्रतिशत आणि नादलहरींचे प्रमाण ३० प्रतिशत होते.
२. नादलहरी
     या ईश्‍वरी अस्तित्वाची जाणीव करून देतात. नादामुळे मन शांत होते. जेव्हा मन अशांत असते, तेव्हा नादलहरी ऐकल्याने ते शांत होते. नाद सूक्ष्म असतात.

पू. अनुराधा वाडेकर यांच्या रूपाने लाभलेल्या आध्यात्मिक आईचे विविध प्रसंगी अनुभवलेले निर्मळ वात्सल्य !

श्री. अमेय पाटकर
पू. (कु.) अनुराधा वाडेकर
प.पू. डॉक्टर,
     काय बोलू ?, काहीच कळत नाही. मी देवद आश्रमात सेवा करत असतांना एका प्रसंगामुळे मला पुष्कळ ताण आला. घरी जाऊया, असा विचार करून मी घरी गेलो.
१. एका प्रसंगाचा ताण येऊन घरी जाणे, पू. अनुताईंनी देव काळजी घेईल, असे सांगितल्याचे कळताच ८० टक्के ताण न्यून होणे आणि दुसर्‍या दिवशी आश्रमात परत येणे
     एका प्रसंगाविषयी एका साधिकेने पू. अनुताईंना (पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांना) सांगितले, अमेयला ताण आला आहे. तेव्हा पू. अनुताई तिला म्हणाल्या, देव त्याची काळजी घेईल. त्या साधिकेने मला दूरभाष करून पू. ताईंचा संदेश सांगितला. तेव्हा माझ्या मनावर असलेला ताण ८० टक्के न्यून झाला. त्वरित आश्रमात जावे, असे मला वाटले; परंतु रात्र झाल्याने मी दुसर्‍या दिवशी सकाळी आश्रमात परत आलो.
२. पू. अनुताईंची भेट झाल्यावर उर्वरित ताणही न्यून होणे, पू. अनुताईंशी बोलल्यावर 
त्या आईप्रमाणेवाटणे आणि तत्त्व एकच असते, हे प.पू. डॉक्टरांनी
 सांगितलेले सूत्र त्यांच्या कृपेने अनुभवता येणे
     आश्रमात आल्या आल्या मला पू. अनुताई समोर दिसल्या. मी त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनावरील उरलेला २० टक्के ताणही न्यून झाला.प.पू. डॉक्टर, मी केवळ तुम्हालाच आई-वडील मानत असे. मला तुम्हीच माझे आई-वडील वाटत होता; परंतु पू. अनुताईंशी बोलल्यानंतर त्यासुद्धा मला माझ्या आईच वाटू लागल्या आहेत. प.पू. डॉक्टर, घडलेल्या प्रसंगाविषयी तुम्हालाच सांगावे, असे मला वाटत होते. एकदा तुमची अमूल्य भेट झाली.

स्वतःच्या आवडीपेक्षा इतरांना प्राधान्य देणारी कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे) !

कु. वैभवी झरकर
     एकदा कु. वैभवी झरकर माझ्या खोलीबाहेर तीर्थ शिंपडत होती. एका साधकाने घरी बनवलेला केक चांगला असल्यामुळे मी तिला केकचा एक तुकडा खायला दिला. तिला तो आवडला; म्हणून तिला विचारले, अजून देऊ का ? तेव्हा ती म्हणाली, नको. तुम्ही घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.१.२०१६)

प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या यंत्रामुळे आलेली अनुभूती आणि त्यातून जाणवलेले संतांमधील अपार सामर्थ्य

प.पू. पांडे महाराज
     प.पू. पांडे महाराजांनी मला जवळ ठेवण्यासाठी एक यंत्र दिले होते. मी ज्या क्षणी हे यंत्र उजव्या हातात घेतले, त्याच क्षणी मला माझ्या उजव्या पायातून शक्तीप्रवाह जात असल्याचे जाणवले. यानंतर मला अधूनमधून उजव्या पायातून शक्तीप्रवाह जात असल्याचे जाणवते. यावरून संतांमधील सामर्थ्याची प्रचीती मला आली. मला दिलेले यंत्र आणि मला आलेली अनुभूती यासाठी मी प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. - आधुनिक वैद्य मनोज वसंतलाल सोलंकी, मडगाव, गोवा (३१.१०.२०१५)


सनातनच्या मागे साडेसाती !

     हल्ली प्रतिदिन कुठेना कुठे सनातनच्या साधकांची पोलीस चौकशी, सनातनच्या साधकांना मारहाण, सनातनच्या कार्य बंद पाडण्यासाठी धर्मद्रोह्यांच्या कारवाया, सनातनवर बंदी घालण्यासाठी निधर्मी राजकारण्यांची धडपड अशा सनातनविषयी काहीना काही वाईट घटना घडत आहेत. एखाद्या व्यक्तीला साडेसाती चालू झाली की, त्याच्या जीवनात लागोपाठ वाईट घटनांची शृंखला चालू होते, तसेच सनातनच्या बाबतीत घडत आहे. थोडक्यात सनातनला साडेसाती चालू झाल्यासारखीच सध्याची स्थिती चालू झाली आहे. ख्रिस्ताब्द २०२२ मध्ये ही साडेसाती संपेल आणि २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि सगळीकडेच आनंदी आनंद असेल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१२.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी/पौर्णिमा (२३.१.२०१६) सकाळी ७.३१ वाजता
समाप्ती - पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.१.२०१६) सकाळी ७.१५ वाजता
आज पौर्णिमा आहे.

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनुष्याची बलवान शस्त्रे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जीवनसंग्राम यशस्वी करण्याकरता अनेक शस्त्रांची आवश्यकता असते; पण सर्वांत बलवान शस्त्रे म्हणजे धैर्य आणि योग्य वेळ हीच होत ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  व्यक्तीस्वातंत्र्यवाले लव्ह जिहादला बळी पडून घरातून पळून गेलेल्या मुलीबद्दल एक अक्षरही बोलत नाहीत; पण साधनेसाठी घरातून सनातनच्या आश्रमात आलेल्या मुलींसंदर्भात आकाश-पाताळ एक करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विकासाच्या सूत्राला अप्रत्यक्ष साहाय्य !

संपादकीय 
    आय.एस्.आय.एस्. म्हणजे इसिस या क्रूर संघटनेने चालवलेला क्रौर्याचा हैदोस आज कुणाला ठाऊक नाही, असे नाही. इराक आणि सिरिया या देशांत मूळ असलेली ही संघटना नरसंहार करून जगभरात स्वत:चे प्रस्थ वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. तिला हवे असलेल्या भौगोलिक राज्याचा नकाशाही तिने ठरवला आहे. त्यात भारतीय भूमीचा अंतर्भाव असून त्यात यशस्वी होण्याच्या उद्देशाने भारतीय युवकांचे साहाय्य मिळवण्यासाठी त्यांना आपल्या कह्यात घ्यायची तिची सिद्धता चालू असून भारतीय नेते मात्र असे काही होणार नाही, भारतीय युवक इसिसच्या आहारी जाणार नाहीत, असे बरळत सुटले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार आणि त्यातील विविध माध्यमे लक्षात घेता भारतीय नेत्यांनी त्यांची सर्व समीकरणे दूर ठेवून इसिसच्या कारवायांकडे अधिक बारकाईने पहायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn