Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाककडून भारताचा पुन्हा विश्‍वासघात !

पठाणकोट आतंकवादी आक्रमणातील सूत्रधार मसूद अझरला अटक नाही !
पाकने वारंवार आतंकवादी आक्रमणे करायची, आक्रमणानंतर भारतीय शासनाने पुरावे 
पाठवायचे आणि त्यावर पाकने कोणतीही कारवाई करायची नाही, हे आपण किती दिवस चालू
 देणार आहोत ? पाकला कायमची अद्दल घडवण्यासाठी भारताने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
     नवी देहली - पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या विमानतळावरील आक्रमणाच्या संदर्भातील सर्व पुरावे भारताने देऊनही पाकिस्तानने जैश-ए-महंमद ही आतंकवादी संघटना, तसेच या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझर याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार मौलान मसूद अझर याला अटक केल्याच्या वार्ता दिशाभूल करणार्‍या होत्या, अशी माहिती भारतीय गुप्तचर अधिकार्‍यांच्या हाती लागली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या संचलनावर इसिसच्या आक्रमणाचा धोका

प्रजासत्ताकदिनाला फ्रान्सचे राष्ट्रपती उपस्थित रहाणार
राष्ट्रीय सण वारंवार आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करणारा जगातील एकमेव देश भारत !
      नवी देहली - देशाच्या ६७ व्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद आणि त्या देशाचे बॅण्ड पथक सहभागी होणार आहे. त्याची सिद्धता सध्या जोरात चालू आहे. राजपथावर पहाटे प्रतिदिन फ्रेंच सैनिक आणि बॅण्ड पथक संचलन करत आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात परदेशी बॅण्ड पथकाने सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे या सोहळ्यावर इसिस (आय.एस्.आय.एस्.) या आतंकवादी संघटनेकडून आक्रमण होऊ शकते, अशी शक्यता सुरक्षायंत्रणांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये इसिसने फ्रान्समध्ये आतंकवादी आक्रमण केले होते. यात १३० लोक मारले गेले होते.

लोकसत्ताचे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांचे निधन

     मुंबई - लोकसत्ताचे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांचे १९ जानेवारी या दिवशी सकाळी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. लोकसत्ताला नवे रूप देण्यात टिकेकरांचा मोलाचा वाटा आहे. लोकसत्ताच्या वेगवेगळ्या पुरवण्या काढण्याची संकल्पना त्यांची होती. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. अभ्यासू पत्रकार तसेच ग्रंथप्रेमी म्हणून त्यांची ओळख होती.

(म्हणे) काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये परत यावे, अशी भीक मागत कुणी त्यांच्या मागे फिरणार नाही !

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचे संतापजनक विधान !
     नवी देहली - काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये परत यावे, अशी भीक मागत कुणी त्यांच्या मागे फिरणार नाही, असे संतापजनक विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असतांना काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी अनेकदा प्रयत्न केले. काश्मीरमध्ये शेवटची गोळी (आतंकवाद्यांची) संपेपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता नाही. येथून विस्थापित झालेल्या बहुतेक हिंदूंची घरे, तसेच भूमी विकून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता परत काश्मीरमध्ये परत यायचे असल्यास त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना जिवे मारण्याची इसिसची धमकी

गोवा सचिवालयात मिळाले पत्र
     पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र गोवा पोलिसांना पाठवण्यात आले आहे. इसिस या आतंकवादी संघटनेच्या नावाने हे पत्र पर्वरी सचिवालयात पाठवण्यात आले आहे. तुम्ही गोमांस खायला देत नाही. तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी हे पत्र गोव्यातील सगळ्या पोलीस ठाण्यांत पाठवलेे आहे. याविषयीची चौकशीची सूत्रे गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात पोस्टकार्डवर लिहिलेले हे धमकीचे पत्र राज्य सचिवालयात मिळाले होते. हे पत्र कुठून आले, कुणी पाठवले आदीचा शोध घेण्यात येत आहे. पोस्टकार्डच्या तळाशी इसिस असे लिहिलेले आहे.

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा ! चळवळ

जयसिंगपूर येथे निवासी नायब तहसीलदारांना निवेदन
निवासी नायब तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
     जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) - येथे १८ जानेवारी या दिवशी निवासी नायब तहसीलदार श्री. वैभव पिलारे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे जयसिंगपूर येथील अध्यक्ष श्री. विजय धंगेकर, भाजप जिल्हा चिटणीस श्री. पोपट पुजारी (शिरोळ), दैनिक महान कार्यचे पत्रकार श्री. सुनील क्षीरसागर, शिवसेनेचे श्री. सूरज भोसले आणि श्री. अरुण लाटवडे, हिंदु धर्माभिमाभिमानी श्री. संजय वैद्य यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

धर्मप्रथा तोडण्याच्या आणि हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आझाद मैदानात १८ हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या !
शनिशिंगणापूरची धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडवर कठोर कारवाई करा !
विस्थापित काश्मिरी हिंदूंना केंद्रशासित पनून कश्मीर द्या !
मालदा (बंगाल) येथील दंगलीचे न्यायिक अन्वेषण करा !
धर्मप्रथा तोडण्याच्या आणि हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
      मुंबई - २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथा मोडण्यासाठी जाणार असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर पूर्वीच कायदेशीर कारवाई करून हिंदूंच्या धार्मिक भावना जपाव्यात, काश्मीरमधून विस्थापित झालेल्या साडेचार लाखांहून अधिक हिंदूंच्या पुनर्वसनासाठी पनून कश्मीर नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी, तसेच मालदा (बंगाल) येथे अडीच लाख धर्मांधांनी केलेल्या जातीय हिंसाचाराचे न्यायिक अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी आदी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात १९ जानेवारी या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. १८ हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदुत्ववाद्यांच्या वरील मागण्यांसाठी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनांवर शेकडो नागरिकांनी या वेळी स्वाक्षर्‍या केल्या. उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात हिंदूंना कृतीशील संघटन करण्याचे आवाहन केले. या आंदोलनास २७५ हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते.

शाहरूख आणि सलमान खान यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार

शाहरूख खान आणि सलमान खान यांनी अशा प्रकारचा उद्दामपणा त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये केला असता 
का ? कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे असे प्रकार रोखण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटनच 
आवश्यक आहे ! 
मंदिरामध्ये जोडे घालून ध्वनीचित्रीकरण केल्याचे प्रकरण
     उत्तरप्रदेश, १९ जानेवारी - शाहरूख खान आणि सलमान खान यांनी एका खाजगी दूरचित्रवाहिनीवरील बिग बॉस या कार्यक्रमासाठी श्री कालीमातेच्या मंदिरामध्ये जोडे घालून ध्वनीचित्रीकरण केले होते. त्या विरोधात अखिल भारत हिंदू महासभेचे पदाधिकारी भरत राजपूत यांनी विशेष मुख्य न्यायाधीश संजीव कुमार यांच्या न्यायालयात तक्रार याचिका प्रविष्ट केली आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात तक्रार याचिका प्रविष्ट करणारे भरत राजपूत यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामध्ये बिग बॉस या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, शाहरूख खान, सलमान खान, यु ट्यूब संकेतस्थळ आणि अन्य जण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कारंजा (जिल्हा वाशिम) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

  
स्वाक्षर्‍या करतांना हिंदू
   कारंजा - विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी पनून काश्मीर द्या, शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करा, महाराष्ट्रातील भारतीय संस्कृतीविषयी खोटी, अवमानजनक माहिती देणारा एन्.सी.ई.आर.टी.च्या पाठ्यपुस्तकातील मजूकर त्वरित पालटण्यात यावा, तसेच चुकीची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १७ जानेवारी या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ह.भ.प. प्रकाशमहाराज सुपलकर यांची वंदनीय उपस्थिती होती. तरुणांचाही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी हिंदूंनी मागण्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍याही केल्या.

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला हरियाणातील मशिदीतून अटक

आतंकवादाला धर्म नसतो, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     पुन्हाना (हरियाणा) - देहली पोलिसांच्या विशेष पथकाने हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील पुन्हानामध्ये १८ जानेवारीला अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या अब्दुल सामी या आतंकवाद्याला अटक केली. सामी झारखंडच्या जमशेदपूरचा रहिवासी आहे. गेल्या ४० दिवसांपासून तो हरियाणात होता. त्याला पुन्हाना बस स्थानकाच्या जवळ असलेल्या आरा मार्केटमधील मशिदीतून अटक करण्यात आली.

(म्हणे) सनातन संस्थेवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी !

सातारा येथे मुक्तीवादी संघटनेचा कांगावा !
     सातारा - सनातन संस्था आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघ परिवारातील धर्मांध आणि फॅसिस्ट मनोवृत्तीच्या संघटना आहेत. आतंकवादी वक्तव्ये आणि कारवाया यांच्या माध्यमातून या संघटना भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन संस्था आणि लोकशाही विरोधी धर्मांध संघटना यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करत मुक्तीवादी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (सनातन आणि संघ परिवारातील संघटना धर्मांध आणि फॅसिस्ट असत्या, तर हे तथाकथित मुक्तीवादी एवढ्या मुक्तपणे असे बरळू शकले असते का ? सनातनने आतापर्यंत कोणतीही आतंकवादी विधाने केलेली नाहीत, तसेच सनातन आतंकवादी संघटना नाही, त्यामुळे तिच्यावर कारवाई करू शकत नाही, हे शासनाने अनेकदा सांगूनही मुक्तीवाद्यांना कळत कसे नाही ? - संपादक)

मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी मान्यवरांचे ओजस्वी विचार

स्त्री-मुक्तीवाल्यांनी हिंदु धर्माचा अभ्यास करावा आणि 
निधर्मीवाल्यांच्या आमिषापासून दूर रहावे ! - पू. महामंडलेश्‍वर स्वामी स्वरूपानंद 
     या देशात ४६ संस्कृती होत्या आणि आज केवळ १ हिंदू संस्कृती आहे आणि यापुढेही रहाणार आहे. निधर्मी लोकांनी हिंदूंना प्रेम शिकवू नये, सर्वधर्मसमभाव शिकवू नये कारण यहुदी आणि पारशी लोकांना जगात जेव्हा कुठेच आश्रय दिला नाही, तेव्हा त्यांना भारताने आश्रय दिला. प.पू. डॉ. आठवले, संत श्री आसारामजी बापू हिंदूंना एकसंध करण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीर समस्या ही नेहरूंमुळे आणि बांगलादेशची समस्या इंदिरा गांधींमुळे निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृतीत जेवढा नारीचा सन्मान केला जातो, तेवढा कुठेच केला जात नाही म्हणून स्त्री-मुक्तीवाल्यांनी हिंदु धर्माचा अभ्यास करावा आणि निधर्मीवाद्यांंच्या आमिषापासून दूर राहावे. हिंदूंनी संस्कारासमवेत अर्थ आणि क्षात्रतेज यांचे संवर्धन करावे. त्यामुळे कोणीही हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने बघणार नाही. 

इंग्रजी न येणार्‍या मुसलमान महिलांना मायदेशात परत धाडणार ! - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन

भारताच्या प्रादेशिक भाषा नीट बोलता न येणार्‍या मुसलमानांच्या 
संदर्भात मोदी शासन असा निर्णय घेईल का ?
ब्रिटनचा भाषाभिमान ! इंग्लंडमध्ये आल्यावर अडीच वर्षांत इंग्रजी भाषा शिकणे बंधनकारक 
      लंडन, १९ जानेवारी - ब्रिटन या देशात रहायचे असेल, तर इंग्रजी यावेच लागेल. त्यामुळे इंग्रजीच्या परीक्षेत उत्तीर्ण न होणार्‍या मुसलमान महिलांना त्यांच्या देशात परत धाडण्यात येईल. हा निर्णय कठोर आहे; परंतु इंग्रजी आले, तर अनेक संधी मिळतात, असे भाषाभिमान दर्शवणारे स्पष्ट प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केले आहे. ते बीबीसी रेडियो ४ यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. (असा भाषाभिमान भारतीय राज्यकर्ते बाळगतील का ? - संपादक) या निर्णयाचा फटका ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झालेल्या सगळ्यांनाच बसणार असला, तरी तज्ञांच्या मते हा प्रश्‍न मुख्यत: मुसलमानांना जाणवणार आहे. ब्रिटनमध्ये जवळपास १ लक्ष ९० सहस्र मुसलमान महिलांना इंग्रजी नीट येत नाही, तर ३८ सहस्र महिलांना इंग्रजीचा गंधही नाही.

श्रीक्षेत्र पाल (जिल्हा सातारा) येथील खंडोबा देवाच्या यात्रेतील हत्तीच्या मिरवणुकीस जिल्हा प्रशासनाकडून बंदी

सातारा जिल्हा प्रशासनाचा तुघलकी निर्णय !
     सातारा - यात्रेसाठी केवळ तीनच दिवस शेष असतांना सातारा जिल्हा प्रशासनाने यात्रेमध्ये वन्य प्राण्यांना बंदीचे कारण पुढे करत खंडोबा देवाच्या यात्रेतील हत्तीच्या मिरवणुकीस बंदी घातली आहे. ही यात्रा २१ जानेवारीपासून चालू होणार आहे. यामुळे श्रीक्षेत्र पाल (जिल्हा सातारा) येथील खंडोबा देवाच्या यात्रेची शेकडो वर्षांची असलेली हत्तीच्या मिरवणुकीची परंपरा खंडित होणार आहे. (प्रत्येक वेळी हिंदूंच्या मिरवणुकांवर आणि उत्सवांवर प्रशासन बालंट का आणते ? हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे काही निर्णय घेण्याचे धैर्य प्रशासनात आहे का ? - संपादक) १. गत वर्षी घडलेल्या हत्तीच्या डोळ्याला खोबर्‍याची वाटी लागून तो उधळला होता, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात दुर्घटना कशामुळे झाली होती, याविषयी निश्‍चिती नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात्रेमध्ये कोणत्याही प्राण्यास न आणण्याविषयीचा प्रयत्न केला आहे. (यात्रेत दुर्घटना घडू नये, याचे सर्व दायित्व प्रशासनाचेच आहे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूंच्या पारंपरिक परंपरांना फाटा देणे, ही उपाययोजना नव्हे ! - संपादक)

महिलांनो, जिजाऊंचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मुलाला घडवा आणि हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार करा ! - वैद्य उदय धुरी

छत्रपती शिवराय प्रतिष्ठानकडून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा !
    
मार्गदर्शन करतांना वैद्य उदय धुरी
कोपरखैरणे - राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारत यांतील वचनांनी घडवले. श्रीरामाने सीतेला सोडवण्यासाठी वानरांचे संघटन केले आणि रावणाच्या राज्यात घुसून त्याचा वध केला. श्रीकृष्णानेही कंसाचे अत्याचार थांबवण्यासाठी त्याच्याच राजवाड्यात त्याला ठार मारले. अशा उदाहरणांतून बोध घेऊनच शिवाजी महाराजांनीही अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. शाहिस्तेखानाच्या शमियानात घुसून त्याची बोटे छाटली. औरंगजेबाच्या दरबारात त्याला मुजरा न करता ते आग्याच्या बंदीवानातून सुखरूप बाहेर पडले. ही सर्व शिकवण जिजाऊंनीच त्यांना दिली अन् त्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहिल्या.

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी सिद्ध केलेले कृत्रिम तलावही बुजवले : शाहूनगरवासियांचे लक्षावधी रुपये पाण्यात !

सातारा नगरपालिकेची आणखी एक संशयास्पद कृती ! 
     सातारा, १९ जानेवारी (वार्ता.) - सातारा नगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करत शहरातील तलावांमध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला होता. त्यामुळे २० लक्ष रुपये खर्च करून कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. हे तलाव कायमस्वरूपी रहातील, असे आश्‍वासनही पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र अचानक पालिका कर्मचार्‍यांनी कृत्रिम तलाव बुजवण्याची चळवळ हातात घेतली आहे. (यामागे भ्रष्ट अर्थकारण आहे कि काय, अशी शंका आल्यास त्यात नवल ते काय ? - संपादक) 

श्री काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये पान, गुटखा आणि तत्सम पदार्थ खाण्यास बंदी

  • श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाचा स्तुत्य निर्णय !
  • धर्मशिक्षणाच्या अभावी मंदिर सेवेकरी, कर्मचारी आणि भक्त यांच्याकडून केली जात होती अयोग्य कृती !
     वाराणसी, १९ जानेवारी - श्री काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये पान, गुटखा आणि तत्सम पदार्थ खाण्यास मंदिर प्रशासनाने बंदी घातली आहे. अनेक जण हे पान खाऊन मंदिराच्या भिंतींवर थुंकून त्या घाण करतात. मंदिरामध्ये पान खाऊन मंत्रोच्चार करणे किंवा पूजा करणे आदी चुकीच्या कृतीही मंदिर कर्मचारी आणि सेवेकरी यांच्याकडून होतात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असल्याविषयीच्या तक्रारी अनेक भक्तांनी मंदिर प्रशासनाकडे प्रविष्ट केल्या आहेत. त्यावर मंदिर प्रशासन न्यास परिषदेने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भक्त, सेवेकरी आणि मंदिराचे इतर सर्व कर्मचारी यांना बंधनकारक करण्यात आला असल्याची माहिती न्यास परिषदेचे अध्यक्ष आचार्य पंडित अशोक द्विवेदी यांनी दिली. (मंदिरात अशा प्रकारची व्यसने करू नका, हे हिंदूंना सांगावे लागते, ही दुर्दैवाची स्थिती धर्मशिक्षणाची आवश्यकता प्रतिपादित करते ! - संपादक)
     तसेच त्यांनी असेही सांगितले की, जे कोणी हा नियम पाळणार नाहीत, त्यांना दंड करण्याचा विचार असून त्यासाठीचा प्रस्ताव न्यास परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. भक्त, सेवेकरी आणि मंदिराचे इतर सर्व कर्मचारी यांना शिस्त लागण्यासाठी हा प्रस्तावही पारित केला जाणार आहे. 

चिनी चॉकलेटवरील भारतीय बाजारपेठेतील बंदी उठणार !

एकीकडे चीन हा आपल्या देशात घुसखोरी करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी 
करण्याच्या प्रयत्नात असतांना चिनी चॉकलेटवरील बंदी उठवणे, हे घातकच !
     पुणे, १९ जानेवारी - दुग्धजन्य पदार्थ आणि चॉकलेटमधील मेलामाईन घटकाचे प्रमाण निश्‍चित केल्याने गेल्या ७ वर्षांपासून बंदी असलेल्या चिनी चॉकलेटसाठी भारतीय बाजारपेठेची दारे पुन्हा उघडी होणार आहेत. पावडर, द्रवपदार्थ आणि इतर अन्न पदार्थ अशी वर्गवारी करून केंद्रीय आरोग्य खात्याने त्यातील मेलामाईनचे प्रमाण निश्‍चित केले आहे. आतापर्यंत मेलामाईन घटक असलेल्या पदार्थांवर भारतीय बाजारपेठेत बंदी आहे. त्यामुळे चिनी चॉकलेटवरील ही बंदी या निर्णयानंतर मागे घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इस्रायलसमवेतचे संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्रायलमध्ये !

इस्रायल आतंकवाद्यांना जसे सडेतोड प्रत्युत्तर देतो, त्याचे अनुकरण परराष्ट्रमंत्र्यांनी 
तेथून आल्यावर करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     जेरुसलेम, १९ जानेवारी - भारताच्या इस्रायलसमवेतच्या संबंधांना पुष्कळच महत्त्व आहे. ते दृढ होऊन त्याचे प्रतिबिंब सर्वच क्षेत्रांत व्हावे. भारताचे इस्रायलसमवेतचे संबंध सर्व बाजूंनी विकसित व्हावेत, याला भारताचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याजवळ केले. 
     १८ जानेवारी या दिवशी त्या इस्रायल येथे पोहोचल्यावर नेतन्याहू यांनी त्यांचे स्वागत केले. पश्‍चिम आशियाई क्षेत्रातील स्वराज यांचा हा पहिलाच दौरा आहे.
      या वेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी दोन्ही देशांतील संबंधांसमवेतच विज्ञान, तंत्रज्ञान, सायबर, संरक्षण आणि कृषी या क्षेत्रांतील वाढत्या सहकार्याकडेही लक्ष वेधले. या दौर्‍याच्या कालावधीत स्वराज या राष्ट्रपती रेउविन रिबलिन आणि संरक्षणमंत्री मोशे यालो यांच्याशीही चर्चा करणार आहेत. स्वराज १७ जानेवारी या दिवशी पॅलेस्टाईनमध्ये होत्या. त्यांनी रमल्ला येथे वेस्ट बँक शहरात पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास आणि विदेशमंत्री रियाद अल मलिकी यांच्याशी चर्चा केली. भारत-पॅलेस्टाईन डिजिटल लर्निंग अ‍ॅण्ड इनोव्हेशन सेंटरच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. भारत शासनाच्या पुढाकाराने ही योजना आकाराला येत आहे. 

भारतात ५९ कोटी लोक प्रातर्विधीसाठी उघड्यावर जातात !

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत देशातील हे वास्तव जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत, 
ही अपेक्षा ! स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही देशात अशी स्थिती असणे, हे लज्जास्पद आहे. 
     देहली, १९ जानेवारी - भारतात अंदाजे ५९ कोटी ७० लक्ष नागरिक प्रातर्विधी उघड्यावरच करतात. प्रातर्विधीसाठी शौचकूप न वापरणारे जगातील ५० प्रतिशतपेक्षा अधिक नागरिक हे भारतातील आहेत. देशातील अनेक जिल्ह्यांत स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे ही भुईसपाट करण्यात आली आहेत. (शौचालये वापरण्याची लोकांची मानसिकता नाही कि या योजनेत भ्रष्टाचार झाला कि शासनाने ती अयोग्य ठिकाणी उभारली होती ? - संपादक) अशी स्वच्छतागृहे पाडणार्‍यांना प्रत्येकी १२ सहस्र रुपये दंड भरण्याचा आदेश शासनाने दिला आहे. 

कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीसाठी नगर जिल्ह्यातील 
कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड येथील हिंदुत्वनिष्ठांचे कृतीशील संघटन ! 
धर्मरक्षणार्थ कृतिशील झालेले सर्व हिंदुत्ववादी 
आणि शनिभक्त महिला यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा ! 
     नगर, १९ जानेवारी (वार्ता.) - तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच २६ जानेवारी या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना जाऊ देणार्‍यांवर कारवाई, तसेच त्यांना नगर जिल्हा बंदी करावी, अशी तक्रार कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड (जिल्हा नगर) या पोलीस ठाण्यात करण्यात आली. 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यामुळे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती टिकून आहे ! - नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !
फलटण येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे नायब तहसीलदारांकडून कौतुक
नायब तहसीलदारांना निवेदन देतांना कार्यकर्ते
     फलटण (जिल्हा सातारा), १९ जानेवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे सर्वच उपक्रम अतिशय चांगले असतात. सध्याच्या लोकांना स्वातंत्र्य म्हणजे आयते ताट मिळाले आहे. त्यामुळे त्यांना त्याचे मूल्य नाही. तुम्ही करत असलेले राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य कौतुकास्पद आहे. खरेतर या कार्यात सहस्रोंच्या संख्येने सहभागी होणे अपेक्षित आहे; परंतु तसे घडत नाही. या उलट प्रशासनाकडून काही वैयक्तिक लाभ करून घ्यावयाचा असेल, तर मात्र पुष्कळ लोक लगेच येतात. महाभारताच्या काळात काही लोक चांगले होते. त्यांच्यामुळे राष्ट्र, धर्म, संस्कृती टिकून राहिली, त्याचप्रमाणे तुम्ही समितीचे थोडेच जण आहात. तुमच्यामुळे आपली संस्कृती टिकून आहे. तुमच्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा !, असे गौरवोद्गार येथील नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन फलटण येथील तहसीलदार श्री. विजय पाटील यांना देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत निवेदन नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांनी स्वीकारले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे सर्वश्री आशिष कापसे, मंगेश खंदारे, अभिजीत कापसे, प्रदीप जाधव, संदीप काशिद, सौ. मनीषा बोबडे आणि श्रीमती डोईफोडे उपस्थित होत्या. 

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरमधील मुसलमान नेत्यांची हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !
     काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये परत यावे, अशी भीक मागत कुणी त्यांच्या मागे फिरणार नाही, असे संतापजनक विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     J&K ke Ex-CM Farooq Abdulla ne kaha Kashmiri Hinduonko wapas Kashmirme aane ki bhik koi nahi mangega ! - Ye hai inka Hindudwesh !
जागो !
      जम्मू-कश्मीरके पूर्व मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला ने कहा कश्मिरी हिंदूंओंको वापस कश्मीरमे आने की भीख कोई नही मांगेगा ! - ये है इनका हिंदूद्वेष !

धर्म परंपरा मोडू पहाणार्‍यांना शिवसेना उत्तर देईल ! - सदाशिव लोखंडे, खासदार

     नगर, १९ जानेवारी (वार्ता.) - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी चढण्याची कृती ही पूर्णपणे चुकीची आहे. अशा धर्म परंपरा मोडू पहाणार्‍या नास्तिकवादी महिलांना शिवसेना विरोध करणार आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने त्या महिलांना उत्तर देईल. तसेच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी त्या नास्तिकवादी महिलांना येत्या २६ जानेवारीला चौथर्‍यावर चढण्यापासून रोखण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. सदाशिव लोखंडे यांनी केले. हिंदुत्ववादी आणि शनिभक्त यांनी खासदार श्री. लोखंडे यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी निवेदन दिले. 

विश्‍वामध्ये सुराज्य येण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! - पराग गोखले, हिंदु जनजागृती समितीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना
श्री. पराग गोखले, त्यांच्या उजवीकडे सौ. रूपा महाडिक आणि श्री. दैवेश रेडकर
     बांबवडे (जिल्हा कोल्हापूर), १९ जानेवारी (वार्ता.) - विश्‍वामध्ये सुराज्य येण्यासाठी सर्वांचे लक्ष भारताकडे लागले आहे; मात्र भारतातील निधर्मी आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहेत. देव, देश आणि धर्म या त्रिसूूत्रीवर आम्ही चालतो. संप्रदाय कुठलाही असो, मूळ सनातन वैदिक हिंदु धर्म आणि वेद मानणे, हे आमचे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. रामराज्य आपल्या सर्वांसाठी आहे. आम्हाला कोणतेही वैभव नको, आम्हाला केवळ हिंदु राष्ट्रच हवे. विश्‍वामध्ये सुराज्य येण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी प्राणत्यागाचीही सिद्धता ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले (पुणे) यांनी येथे केले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. 
     या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर (सिंधुदुर्ग) आणि रणरागिणीच्या सौ. रूपा महाडिक (सातारा) उपस्थित होते. 

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी शासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही केली जाईल ! - शिरस्तेदार एफ्.ए. फैजी

शिरस्तेदार एफ्.ए. फैजी यांना निवेदन
देतांना धर्माभिमानी 
    बेळगाव, १९ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अध्यादेश काढून पाठवून देण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती जिल्हाधिकार्‍यांना देऊन त्याविषयी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन शिरस्तेदार एफ्.ए. फैजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.

पेण येथे नायब तहसीलदारांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना नायब तहसीलदार (उजवीकडे)
    पेण - येथे नायब तहसीलदार किरण पाटीलसाहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे ह.भ.प. दशरथ भोपतराव महाराज, न्यू स्टार मित्रमंडळाचे श्री. शेखण बामणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. काका हजारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलदास म्हात्रे आणि सनातनचे श्री. अरुण भोईर उपस्थित होते. 
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे हे राष्ट्रकर्तव्य ! 
- जगन्नाथ जांभळे गुरुजी, माजी प्राचार्य
  पेण - राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे शाळा-महाविद्यालयांतून मुलांचे प्रबोधन व्हावे, यासाठी व्याख्याने घेणे, क्रांतीकारकांची प्रदर्शने आयोजित करणे यांसारखे उपक्रम राबवत आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन सादर

डावीकडून श्री. मंगेश म्हात्रे, मध्यभागी महापौर
सुधाकर सोनवणे, डॉ. उदय धुरी आणि श्री. हेमंत म्हात्रे
     नवी मुंबई - येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी महापौरांनी कार्यक्रमाची प्रशंसा करत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रतीवर्षी विविध वृत्तपत्रांत यासंबंधी विज्ञापन देऊन प्रबोधन करत असल्याचे सांगितले. या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. मंगेश म्हात्रे, श्री. हेमंत म्हात्रे, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी आणि वसंत सणस उपस्थित होते. हिंदु महासभेनेही यासंदर्भात स्वतंत्र निवेदन दिले.

हिंदूंनो, समाजाची बिकट स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची अनिवार्यता लक्षात घेऊन त्यासाठी कटीबद्ध व्हा !

प.पू. पांडे महाराज
      सध्याची स्थिती पहाता राज्यकर्ते, पोलीस, प्रशासन, तसेच जनता या सर्वांचे वागणे देश विनाशाकडे जाईल, असेच झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आणणे, हाच एकमेव पर्याय आहे. सद्यःस्थितीत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्याची विनाशाकडे जाणारी स्थिती कशामुळे निर्माण झाली ? आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचे परिणाम काय होतात आणि यानुसार कृतीमध्ये काय पालट करायला हवेत ?, हे आपण येथे पहाणार आहोत. 
१. स्वार्थ आणि दुष्ट प्रवृत्ती यांमुळे समाजाची होणारी हानी 
१ अ. सामान्य जनतेला आमिषे दाखवून आणि फसवून आपल्या पक्षात घेणारे अन् त्यांच्याकडून हवे ते करवून घेणारे राजकीय पक्ष ! : सध्या समाजात कर्मामध्ये आसक्त झालेले अनेक जण स्वार्थासाठी समाजातील अज्ञानी लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून आपल्याला हवी तशी कृती करवून घेत आहेत. समाजामध्ये जे घडत आहे, ते अज्ञानी लोकांना सत्य वाटते आणि ते त्यामध्ये फसतात. यामध्ये राजकीय पक्ष सामान्य लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आणि फसवून आपल्या पक्षात घेतात अन् त्यांच्याकडून स्वतःला हवे ते करवून घेतात. काही संप्रदायांमध्येही असेच दिसते.

जे स्वत: द्वेषभावनेने किंवा अधर्माने वागतात ते समाजाला काय दिशा देणार ?

सौ. अनघा जोशी
१. दूरचित्रवाहिन्यांवर प्रतिदिन हिंदूंना न्यून लेखून विरोध केला, 
तरी हिंदुत्वनिष्ठ तुम्हाला न घाबरता संघटित होतीलच !
     कोणतेही चांगले कार्य हाती घेतल्यावर त्याला विरोध हा होतोच. हिंदूंचे संघटन होत असलेले पाहून काही हिंदुद्वेष्टे संचालक दूरचित्रवाहिन्यांवर चर्चासत्रे आयोजित करून हिंदूंना न्यून (कमी) लेखत उघड-उघड विरोध करत असल्याचे नेहमीच दिसते. त्यांना वाटते की, आपण विरोध केल्याने हिंदुत्वनिष्ठ घाबरतील. 
      त्यांना असेही वाटते, आपण समाजाला दिशा देतो. पण त्यांचा तो भ्रम आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. जे नि:स्वार्थीपणाने समाजासाठी खर्‍या अर्थाने झटतात आणि ज्यांना समाजाला दिशा देण्याची प्रामाणिक तळमळ आहे, तेच समाजाला योग्य दिशा देऊ शकतात !

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
      स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

शाळेतील व्यसनाधीन शिक्षक व्यसनमुक्त आदर्श शिक्षक कधी होणार !

       पान, तंबाखू, सिगारेट, विडी असे कोणतेही व्यसन करत असलेल्या शिक्षकांवर कारवाई करून तसा अहवाल देण्याचा आदेश ७ जानेवारी या दिवशी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांना दिला आहे. ओरिएन्टल ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरम या संस्थेने केलेल्या पाहणीत राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना व्यसन असल्याचे निदर्शनास आले. दादर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेत स्वच्छतेचे काम करणार्‍या तरुणाने लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने जनहित याचिकेद्वारे सुरक्षेसंबंधी दिलेल्या सुनावणीत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली आहे. हे कॅमेरे लावल्यानंतर शाळेत शिक्षक वेळेत कधी येतात, जातात, वर्गात किती वेळ शिकवतात, बाहेर किती वेळा जातात, याची नोंद होणार आहे. त्यामुळे कामचुकार शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृत्यूच्या वेळी स्वतःला झालेल्या वेदनांविषयीचे अनुभूतीजन्य लिखाण करण्यासाठी शेवटच्या क्षणी लेखणी आणि कागद मागणारा लेखक !

     तो एक महान लेखक होता. कर्करोगाने पीडित झाल्यामुळे मृत्यूशय्येवर पडला होता. आपला मृत्यू जवळ आला आहे, हे त्याला ठाऊक होते. मृत्यूची छाया दिसू लागताच एकाएकी तो लेखणी आणि कागद शोधू लागला. नोकराच्या साहाय्याने तो कसाबसा उठून बसला आणि हळूहळू काहीतरी लिहू लागला.
     नोकर घाबरून गेला आणि म्हणाला, पडून रहा मालक. त्याने काकुळतीने विचारले, आताच लिहायला हवं, असे काय महत्त्वाचे आहे ? त्यावर लेखक म्हणाला, माझ्या नव्या कादंबरीत मी एका पात्राच्या मृत्यूचे वर्णन केले आहे, ते योग्य नाही. आता त्या वेदना जेव्हा मला होत आहेत, तेव्हा मी त्या चांगल्या वर्णन करू शकेन. 
(संदर्भ : साप्ताहिक जय हनुमान, १८.१.२०१४)

राष्ट्रापुढील महत्त्वाच्या प्रश्‍नांवर साहित्य संमेलनात चर्चा न होणे आणि त्याविषयीच्या लेखनाचा अभाव जाणवणे

     जे प्रश्‍न आज जगाला भेडसावत आहेत, त्याविषयी आवश्यक असे कोणतेच लेखन केले जात नाही कि साहित्य संमेलनात चर्चा होत नाही. वाढत्या लोकसंख्येचा विस्फोट, आतंकवाद, भ्रष्टाचार, पाणी प्रश्‍न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवर अत्याचार, बलात्कार, काश्मीरमधील हिंदु निर्वासित, बांगलादेशियांची घुसखोरी, लोकराज्य (शाही) मधील निवडणुका, स्वातंत्र्यानंतर अजून ६३ वर्षानंतरही न होणारा समान नागरी कायदा, राजकारणातील गुन्हेगारी, गुंडगिरी या गोष्टी साहित्यात नाहीतच ! 
      तसेच विकत मिळणारे पत्रकार आणि पैसे देऊन बातम्या छापावयास लावणारे पुढारी, यांवर चर्चा का नाही ? केवळ प्रसिद्धी अन् छायाचित्रे यासाठी येणारे आणि साहित्याची किंमतही न कळणारे पुढारी, अशांना साहित्य संमेलनात व्यासपिठावर का बोलावले जाते ? हुजरेगिरी करण्यासाठी ? ज्यात आजच्या कोणत्याही प्रश्‍नावर चर्चाच नाही, असे निरुद्योगी साहित्य संमेलन काय उपयोगाचे ? 
- श्री. अजित लिमये, ठाणे (लोकजागर, नोव्हेंबर २०१०)

साहित्य संमेलनांची उपयुक्तता पडताळून पहाण्याची आवश्यकता !

     पिंपरी-चिंचवड येथे नुकतेच ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. साहित्य संमेलन मोठे शानदार झाले असले, तरी त्यात मराठी साहित्याच्या उत्थानासाठी, लोप पावत चाललेल्या मराठी भाषेविषयी काही विचारविमर्ष झाल्याचे दिसले नाही. नेहमीच्याच चर्चा आणि नेहमीचेच परिसंवाद यांमुळे संमेलन हा प्रतिवर्षीप्रमाणे पार पाडलेला एक सोपस्कार होता का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच याविषयी दैनिक लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) कृतज्ञ मी तव चरणी देवा ।


कृतज्ञ मी तव चरणी देवा ।
साधनेचा ध्यास लाविला ॥ १ ॥

साम, दाम, दंड, भेद दावूनी ।
देवा तू साधना घेशी करवूनी ॥ २ ॥

अवघड पेपर साधनेचा ।
सोपा करूनी देशी देवा ॥ ३ ॥

६० टक्के प्रथम वर्ग देऊनी । 
मुक्त करीशी जन्म-मृत्यूतूनी ॥ ४ ॥

मोक्षाची ही वाट दाविशी ।
देवा कृतज्ञ मी तव चरणांशी ॥ ५ ॥

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या पहिल्या दिवशी आलेल्या अनुभूती

सौ. पल्लवी हंबर्डे
१. स्वतःचे अस्तित्व न जाणवता स्वतः गोपी आहे,
असे वाटणे आणि हलकेपणा जाणवून तहान-भूक हरपणे
     १५.१.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यापासून मला पुष्कळ आनंद वाटत होता. वातावरणातच चांगला पालट झाला होता. मला तहान-भूक कशाचीच जाणीव नव्हती. शरीर हलके झाले असून सर्व सेवा आपोआप होत आहेत, असे मला वाटत होते. तसेच मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते आणि मी एक गोपी आहे, असे वाटत होते.
२. यज्ञस्थळी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या ठिकाणी साक्षात् 
अग्निदेवताच बसली आहे, असे जाणवणे आणि 
सभामंडपात उष्णता न जाणवता गारवा वाटणे
     मी यज्ञस्थळी दीपपूजनासाठी गेल्यावर मला प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा मला यज्ञस्थळी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या ठिकाणी साक्षात् अग्निदेवताच बसली आहे, असे जाणवत होते.

साधकांनी इतर कैद्यांना केलेले साहाय्य आणि त्यांच्यामध्ये झालेले परिवर्तन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

कु. मधुरा गद्रे
१. यज्ञविधी चालू होण्यापूर्वी
अ. यज्ञविधी चालू होण्यापूर्वीपासून मला शांत वाटत होते आणि आनंद जाणवत होता. आपण आश्रमात नसून कोणत्यातरी ऋषींच्या आश्रमात आहोत, असे वाटत होते.
आ. प.पू. रामभाऊस्वामींना बघितल्यावर ते मोठे ऋषीच असावेत, असे वाटत होते.
इ. वातावरणात एक वेगळाच सुगंध जाणवत होता.
२. यज्ञ चालू झाल्यावर
अ. येणार्‍या आपत्काळात साधक सुरक्षित रहावेत, यासाठी जणू देवच संरक्षक कवच निर्माण करत आहे, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
आ. प.पू. रामभाऊस्वामी यांना बघितल्यावर आपोआप भावजागृती होत होती.
इ. प.पू. डॉक्टर यज्ञस्थळी आले, तेव्हा ते बसलेल्या ठिकाणी ते तेथे स्थुलातून आहेत, असे मला जाणवतच नव्हते.

निरपेक्ष प्रीतीच्या धाग्याने सर्वांना साधनेशी जोडणार्‍या आणि साधकांच्या साधनेची तळमळ असणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     भगवंताच्या कृपेने आणि त्याच्या लीलेनेच जानेवारी २०१५ पासून मला पू. (सौ.) गाडगीळकाकूंच्या सत्संगात रहायला मिळाले. पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणजे गुणांची देवता, अध्यात्मज्ञानाचे शिखर आणि प्रेमाचे मूर्तीमंत रूप ! त्यांच्या सहज वागण्यातही अनेक पैलू आणि अध्यात्मातले दृष्टीकोन दडले आहेत. त्यांच्यात असलेल्या अनेक गुणांपैकी काही गुण येथे लिहून गुरुचरणी अर्पण करतो.
१. पू. काकूंचे सर्वांशी वागणे आणि बोलणे, म्हणजे निरपेक्ष प्रेमच !
     गेल्या काही वर्षांपासून पू. (सौ.) गाडगीळकाकू भारतातील तीर्थक्षेत्रांच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यावर असतांना ज्या ठिकाणी साधक नाहीत, त्या ठिकाणी त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये रहावे लागते आणि उपाहारगृहात जेवावे लागते. मंदिरांत, प्राचीन स्थळी, वस्तू संग्रहालये इत्यादी ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा अनेक जणांशी संपर्क येतो. या सर्व ठिकाणी त्यांचे वागणे-बोलणे प्रेमभावाचे असते.
१ अ. सर्वांना हात जोडून नमस्कार करणे : पू. काकूंच्या संपर्कात एखादी नवीन व्यक्ती आली की, पू. काकू त्यांना हात जोडून नमस्कार करतात.

श्री. शंकर गुंजेकर संत झाल्याची शुभवार्ता समजल्यावर त्यांची बहीण ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शेवंती गुंजेकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्रीमती शेवंती गुंजेकर
१. भाऊ संत होणार याची आठ दिवसांपूर्वी पूर्वसूचना मिळणे
      १६.१.२०१६ या शुभदिवशी रामनगर, बेळगाव येथील माझे भाऊ श्री. शंकर गुंजेकर हे संत झाल्याची शुभवार्ता मिळाली. मी शेतीकामासाठी घरी असतांना आठ दिवस अगोदर मला स्वप्नात हे दृश्य दिसले होते. त्या वेळी माझा भाऊच मला त्या जागी दिसत होता. पू. दादांनी कोणता सदरा घातला आणि कोणत्या फुलांचा हार त्यांना सन्मानाच्या वेळी घातला होता, हेही मला स्वप्नात दिसले होते. मला दादा संत होणार हे आधीच समजले होते. त्या वेळी पू. स्वातीताईच त्यांचा सन्मान करतील, असे मला वाटले होते. प्रत्यक्षातही पू. स्वातीताईंनीच पू. दादांचा सन्मान केला.
     रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ चालू झाला होता. त्याचे चैतन्य मिळावे; म्हणून कालच आम्ही दोघी बहिणी मी आणि कु. मंगल रामनाथी आश्रमात आलो आणि आज प.पू. डॉक्टरांनी ही आनंदवार्ता देऊन आनंदित केले; म्हणून आम्ही गुंजेकर कुटुंबीय त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत

उच्छिष्ट गणपति यज्ञाचे कु. नंदिता वर्मा यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण (१५.१.२०१६)

कु. नंदिता वर्मा
१. प.पू. रामभाऊस्वामी अग्नीप्रवेश करतांना
अ. १५.१.२०१६ या दिवशी सायंकाळी ४ नंतर प.पू. रामभाऊस्वामी अग्नीप्रवेश करत असतांना मला त्यांच्या देहाभोवती चैतन्याचे सुरक्षाकवच असल्याचे दिसले.
आ. वातावरणातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले होते. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले.
इ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी अग्नीप्रवेश केला, तेव्हा त्यांच्या नजीक असलेल्या अग्नीचे तेज शांत झाले, असे मला जाणवले.
ई. प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडात समिधा टाकत असतांना ते समिधांतील तेज शांत करत आहेत, असे जाणवले.
उ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञकुंडात दुर्वांची आहुती दिल्यावर अग्नीचा रंग पालटून भगवा झाल्याचे आणि तेथे अधिक प्रमाणात गणेशतत्त्व आल्याचे दिसले.
ऊ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी अग्नीप्रवेश केलेला पाहून माझा कृतज्ञताभाव दाटून आला आणि संत जनकल्याणासाठी किती करतात, या विचाराने मन भरून आले

कु. शिवांजली होसाहोळलू (वय १५ वर्षे) हिला यज्ञाविषयी जाणवलेली सूत्रे आणि केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. शिवांजली होसाहोळलू
१. यज्ञाच्या ज्वाळांची वैशिष्ट्ये
अ. यज्ञाच्या ज्वाळांमध्ये सतत ॐ दिसत होता.
आ. यज्ञात गुलाबी रंगाच्या ज्वाळा दिसत होत्या.
२. यज्ञस्थळी गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. सकाळी ८.३० वाजता यज्ञस्थळी गेल्यावर शांत आणि शीतल वाटत होते.
आ. अग्नीकडे पहातांना भावजागृती होत होती.
इ. प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन अश्रू दाटून येत होते.
ई. पृथ्वी मंद गतीने फिरत असल्याचे जाणवले.
उ. देहाचे अस्तित्व संपून अंतरात्म्याचे अस्तित्व जाणवले आणि तो हलका झाला.
ऊ. प.पू. डॉक्टरांना राम, राम असे संबोधले जात होते.
ए. थोड्या वेळाने यज्ञस्थळी हनुमान चालिसा लावण्यात आली.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये


भावावस्थेतील प.पू. रामभाऊस्वामी
कु. मधुरा भोसले
     समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या निमित्ताने...
       १५.१.२०१६ या दिवशी तंजावूर तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी आणि त्यांचे शिष्यगण यांच्या शुभहस्ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये ३ दिवसांच्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचा शुभारंभ झाला. त्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. आध्यात्मिकदृष्ट्या अलौकिक व्यक्तीमत्त्व असणारे प.पू. रामभाऊस्वामी !
     शिव आणि दुर्गा यांचे कार्य प्रामुख्याने लयाशी संबंधित असले, तरी श्री गणेश प्रामुख्याने स्थितीचे कार्य करतो. द्वापरयुगात श्री गणेशभक्त महर्षि व्यास यांनी जे अलौकिक कार्य केले होते, तसेच अद्वितीय कार्य प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडून कलियुगात घडत आहे.
     प.पू. रामभाऊस्वामी हे तपोलोकातील उन्नत आहेत. ते मागील जन्मांतही याज्ञिक होते आणि त्यांनी त्रेताग्निव्रताचे कठोर पालन करून द्वादश अग्नींवर प्रभुत्व प्राप्त करून अग्निलोकावर तपःसामर्थ्याने विजय प्राप्त केलेला आहे. त्यांचे सूर्यलोकावरही अधिपत्य असल्याने त्यांना केवळ अहिताग्नी म्हणून संबोधणे उचित नाही.

चंदीगढ येथील सनातनचे साधक श्री. गौरव सेठी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

     रामनाथी - चंदीगढ येथील प्रतिष्ठित व्यावसायिक तथा सनातनचे साधक श्री. गौरव सेठी (वय ४२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांना दिली. रामनाथी येथील सनातन आश्रमात १८ जानेवारी या दिवशी झालेल्या सत्संग कार्यक्रमात श्री. गौरव सेठी यांची पातळी घोषित केली. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते श्री. गौरव सेठी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्री. गौरव सेठी आणि त्यांच्या पत्नी सौ. अनन्या सेठी हे रामनाथी, गोवा येथील आश्रमात आले होते. श्री. गौरव सेठी यांच्यात पालट झाल्याचे सर्व साधकांना जाणवत होते.
     श्री. सेठी यांच्यातील साधकत्व, सहजता, नम्रता या गुणांमध्ये वृद्धी झाली असल्याचे जाणवते, असे सत्संगाला उपस्थित असलेल्या साधकांनी सांगितले.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१०.२०१५)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      इतरांच्या चुका दाखवणे सोपे असते; पण इतरजन सुधारावेत, असे खरोखरच वाटत असेल, तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मृताच्या टाळूवरील लोणीखाऊ !

संपादकीय
    जीव कुणाचाही असो, तो केव्हाही अमूल्यच आहे आणि तो कुठल्याही प्रकारे जाणे, हे दु:खद आहे. याची जाणीव सर्व जनतेला आहे; पण संधीसाधू राजकीय पक्षांना ती नाही. उलट त्याचे राजकारण करण्यात आपल्या देशातील संधीसाधू राज्यकर्त्यांचा जगात कुणीही हात धरू शकत नाही. भाग्यनगर येथील रोहित वेमूला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn