Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथे दोन अल्पवयीन धर्मांधांचा अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार

निर्भया प्रकरणात तिच्यावर अत्याचार करणारा धर्मांध अल्पवयीनच होता. शासकीय अनास्थेमुळे
 त्यातून तो सहिसलामत सुटला. या प्रकरणातही अल्पवयीन धर्मांध गुन्हेगार सुटले, तर आश्‍चर्य 
वाटायला नको ! शासनाने अल्पवयाची मर्यादा १६ वर्षे ठेवून ते सुटायची तरतूद केलीच आहे !
  • हिंदु मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात त्वरित संघटित होणार्‍या महिला आणि मुली यांचे अभिनंदन !  
  • अशा घटना रोखण्यासाठी महिलांनी कृतीशील व्हावे !
  • ५ सहस्रांहून अधिक महिला आणि मुली यांचा मूक मोर्चा !
  • आज नवापूर बंद !
      नंदुरबार (प्रतिनिधी) - नवापूर शहरातील दोन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे, तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने नवापुरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामागे कोणती प्रवृत्ती आहे, याचा कडक तपास करावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे, या मागणीसाठी १७ जानेवारीला रात्री पाच सहस्रांहून अधिक महिलांनी मूक मोर्चा काढला.

अल्लाहकडून मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर महिलांवर बलात्कार करण्याची अनुमती !

इजिप्तमधील प्राध्यापिका सुआद सालेह यांचे संतापजनक विधान
तथाकथित पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आणि हिंदुद्वेष्टे या
 अश्‍लाघ्य शिकवणीविषयी आता तोंड उघडतील का ? अशी शिकवण 
असलेले कधीतरी समाजात शांतता आणि सभ्यता प्रस्थापित करू शकतील का ?
     वॉशिंग्टन - अल्लाहने मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर महिलांवर बलात्कार करण्याची आणि त्यांना अपमानित करण्याची अनुमती दिली आहे, असे संतापजनक विधान इजिप्तमधील प्राध्यापिका सुआद सालेह यांनी केले. सालेह या इजिप्तची राजधानी काहिरा येथील अल्-अझहर या विद्यापिठात प्राध्यापिका आहेत. सालेह यांनी इजिप्तमधील अल्-हयात या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे संतापजनक विधान केले आहे. या विधानाची चित्रफित उघड झाल्याने मुसलमानेतर धर्मियांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सोमनाथ मंदिरातील सोने सुवर्ण ठेव योजनेत गुंतवणार

सुवर्ण ठेव योजनेत अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संपत्तीचा
 किती समावेश झाला आहे, हे शासनाने घोषित करावे !
     कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातमधील सोमनाथ मंदिर न्यासाने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमनाथ मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त पी.के. लाहिरी म्हणाले, सध्या मंदिरात शुद्ध सोने आणि दागिने स्वरूपात ३५ किलो सोन्याचा साठा आहे. यांपैकी वापरात नसलेले सोने या योजनेत गुंतवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, तसेच तिरुपति बालाजी मंदिर यांच्याकडून या योजनेत सोन्याची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुसलमानांचे तुष्टीकरण थांबवा ! - विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

     बेंगळुरू - मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे धोरण न संपणारे आहे. परिणामी देशाची हानी होत आहे; यामुळे त्यांचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे सहसरचिटणीस सुरेंद्रकुमार जैन यांनी सर्व राजकीय पक्षांना केले आहे. विहिंपने आयोजित केलेल्या बजरंग दलाच्या दोन दिवसांच्या अखिल भारतीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी जैन पत्रकारांशी बोलत होते. जैन पुढे म्हणाले, देशातील मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक वेगाने वाढत असल्यामुळे लोकसंख्येविषयी समान धोरण निश्‍चित केले जाण्यावरही विहिंपने भर दिला आहे.
     सर्वोच्च न्यायालयानेही समान लोकसंख्या धोरणाच्या बाजूने मत मांडले आहे. मुसलमानांच्या लोकसंख्येचा एकूण जननक्षमता दर (टोटल फर्टीलिटी रेट) प्रत्येक दिवशी वाढत असून आता हिंदु संख्येने धोकादायक स्तरापर्यंत अल्प झाले आहेत. हिदूंची संख्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्क्यांहून अल्प झाली आहे. ही गोष्ट मानसिकदृष्ट्या निराश करणारी आहे.

लुधियाना (पंजाब)मधील संघ कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार : १ स्वयंसेवक घायाळ

हिंदुबहुल भारतात हिंदू असुरक्षित !
     लुधियाना - किडवई नगरमधील राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर २ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. १८ जानेवारीला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कार्यालयात स्वयंसेवक अभ्यास करत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी कार्यालयावर गोळीबार केला. आक्रमण होत असल्याचे लक्षात येताच स्वयंसेवकांनी त्वरित स्वत:चा बचाव केला. यात नरेश कुमार या स्वयंसेवकाच्या हाताला गोळी घासून गेली. त्यामुळे तो घायाळ झाला. दोघे हल्लेखोर पळून गेले. आक्रमणासाठी वापरलेल्या दुचाकी वाहनावर क्रमांक नव्हता. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लुधियानाचे पोलीस आयुक्त परमराज सिंह म्हणाले, घटनास्थळी ३२ बोरच्या पिस्तुलाचे रिकामे काडतूस सापडले असून पोलीस सर्व कारणांचा शोध घेत आहेत.

संमेलनाध्यक्षांच्या मुलाखतीमध्ये ब्राह्मणद्वेषाचा दुर्गंध

      ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच पिंपरी येथे चालू असणार्‍या ८९ व्या संमेलनात संमेलनाध्यक्षांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मात्र या मुलाखतीच्या कालावधीत अध्यक्षीय भाषणाप्रमाणेच मराठी भाषा, मराठी शाळा, साहित्य यासंदर्भातील प्रश्‍नांना फाटा देत स्वतः जातीने ब्राह्मण असले, तरी बहुजन असल्याचा अभिमान असल्याचे सांगत विविध कोट्या आणि वक्तव्ये करून ब्राह्मणद्वेष व्यक्त करण्याची हौस भागवून घेतली. ब्राह्मण असूनही जानवे घालत नसल्याचे अभिमानाने सांगणे असो, इतिहासलेखन करतांना ब्राह्मण इतिहासकारांनी मुसलमान आणि आदिवासी क्रांतीकारकांची नावे घेतली नसल्याचे सांगत ब्राह्मण इतिहासकारांवर टीका करणे असो, ब्राह्मणद्वेष, हिंदुत्वद्वेष नसानसात भरलेल्या विद्रोहींचा गौरव करणे असो कि सदाशिव पेठेत जन्म झाला नसल्याविषयी आभार व्यक्त करणे असो, सबनीस यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ब्राह्मण समाजाविषयी अनुचित विधाने केली. त्यामुळे जातीद्वेषाच्या डबक्यात डुंबलेली अशी मंडळी मराठीचे हित काय साधणार, अशीच चर्चा मराठीप्रेमींमध्ये होती. संतोष शेणई, चक्रधर दळवी, प्रसन्न जोशी यांनी १६ जानेवारीला सायंकाळी सबनीस यांची मुलाखत घेतली. 

(म्हणे) विघातक शक्तींचा बीमोड करणारे वातावरण शासनाने निर्माण करावे !

स्वतः राष्ट्रासाठी काहीही न करणार्‍या साहित्यिकांना 
शासनाला असे फुकाचे सल्ले देण्याचा काय अधिकार ?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
     ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारी देशातील वाढती आक्रमणे, वाढती असहिष्णुता, त्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या लेखक, कलावंत, कार्यकर्ते यांच्या हत्या, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांचा अजूनही शोध न लागणे हे सारे वास्तव भयावह आणि सुन्न करणारे आहे.
     हे संमेलन असे वातावरण निर्माण करणार्‍या शक्तींचा निषेध करते. केंद्र आणि राज्य शासन यांनी अशा विघातक शक्तींचा बीमोड करणारे आश्‍वासक आणि निर्भय वातावरण निर्माण करावे, असा ठराव ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मुंबईतील आझाद मैदानात आज हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

मुंबई येथे पत्रकार परिषदेत घोषणा 
  • शनिशिंगणापूर प्रथेचे रक्षण करा ! 
  •  काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करा ! 
  •  मालदा (पश्‍चिम बंगाल) येथे ममता बॅनर्जींचे शासन विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करा ! 

डावीकडून श्री. विशाल पटनी, श्री. राजेंद्र सावंत,
श्री. विनिवेश रैना, डॉ. उदय धुरी, सौ. नयना भगत, कु. स्नेहल जाधव
     मुंबई, १८ जानेवारी (वार्ता.) - श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथांचे रक्षण होण्यासाठी, काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी, तसेच मालदा (पश्‍चिम बंगाल) जिल्ह्यात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या निषेधार्थ १९ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार आहे. येथील आझाद मैदानात दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार्‍या या आंदोलनात अनेक महिलांसह विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी १८ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती. या वेळी 'युथ फॉर पनून कश्मीर'चे मुंबईचे उपसमन्वयक श्री. विनिवेश रैना, भारतीय नारी शक्तीच्या कु. स्नेहल जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र सावंत, बजरंग दलाचे प्रखंड संयोजक श्री. विशाल पटनी आणि सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांच्यासह अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

प्रसारमाध्यमांकडूनच हिंदूंवर वैचारिक आतंकवाद लादण्याचा प्रयत्न ! - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

चुनाभट्टी येथे हिंदु धर्मजागृती सभा चुनाभट्टी 
डावीकडून सौ. नयना भगत, अधिवक्ता
श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि डॉ. उदय धुरी

     (मुंबई), १८ जानेवारी (वार्ता.) - आज हिंदूंवर आतंकवादाचा आरोप केला जातो. हिंदूंना आतंकवादाच्या पिंजर्‍यात उभे करण्याची हिंदुद्रोह्यांची पद्धतशीर व्यवस्था आहे. एका बाजूला 'सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना गोळ्या घाला', अशी वक्तव्ये करणार्‍यांच्या विरोधात काही बोलायचे नाही आणि सबनीस यांच्याविषयी अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या ट्विटचा मात्र चुकीचा अर्थ काढायचा. हा वैचारिक आतंकवाद प्रसारमाध्यमेच आमच्यावर लादत आहेत. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पुढाकाराने शासनाच्या कह्यात असलेल्या अनेक मंदिरांतील घोटाळे उघडकीस आले. या देवस्थान समितीत भ्रष्टाचार करणार्‍यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. ते १७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितच्या वतीने आयोजित केलेल्या चुनाभट्टी (पू.) येथील हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. 

हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष म्हणजे स्वाभिमान हरवल्याचे लक्षण ! - श्री. पंडित दिवाकर जोशी, वि.हिं.प. धर्माचार्य

भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात बोलतांना श्री. पंडित जोशी
     भिवंडी, १८ जानेवारी (वार्ता.) - हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण त्याकडे काही देणघेणे नसल्याच्या दृष्टीने पहाणे म्हणजे आपला स्वाभिमान हरवल्याचे लक्षण आहे. हिंदूंनी आपल्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन लढायला हवे. त्यासाठी नुसते हातात झेंडे घेऊन चालणार नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे धर्माचार्य श्री. पंडित दिवाकर जोशी यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. 'काश्मिरी पंडीतोंको न्याय दो । ये सब आश्‍वासन बकवास है । हिंदूओंका नारा है, अखंड काश्मिर हमारा है ।' अशा घोषणा देत भिवंडी येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी स्थानिकांना समवेत घेऊन अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून रणशिंग फुंकले. 

सर्व महिलांनी धर्म आणि परंपरा यांचे पालन करायला हवे ! - ह.भ.प. गजानन महाराज राजपूत (वरसाडेकर)

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
   
  जळगाव - महिला ही हिंदु धर्मात पूजनीय आहे; पण मर्यादा सोडून वागणे योग्य नव्हे. सर्व महिलांनी धर्म आणि परंपरा यांचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. गजानन महाराज राजपूत (वरसाडेकर) यांनी केले. मालदा दंगल, शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेली हिंदु धर्मशास्त्रबाह्य कृती, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि एन्.सी.ई.आर्.टी.चा धर्मद्रोही अभ्यासक्रम या विषयांवर येथे महानगरपालिकेजवळ हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

साहित्य संमेलन परिसर झाला सेल्फी पॉईंटस्चा बालेकिल्ला !

      साहित्य संमेलनाच्या आवारात संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, मोरया गोसावी यांचे थर्माकोलचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवेशद्वारापाशी बोधचिन्हाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी, तसेच छायाचित्र काढण्यासाठी एकच गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 
मध्यभागी इंग्रजी DPU
    साहित्य संमेलन हे मराठी भाषेचे असले, तरी संमेलन भरवणार्‍या डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे इंग्रजी आद्याक्षरातील DPU असे नाव सर्वत्रच्या फलकांवर लिहण्यात आले होते, तसेच संमेलनस्थळाच्या मुख्य भागात DPU असे लिहलेले चिन्हही साकारण्यात आले होते. (छायाचित्र पाठवले आहे.)

(म्हणे) 'पुरस्कार नको, सुरक्षा द्या !'

असहिष्णु वातावरणाचा बागुलबुवा करत लेखक असुरक्षित असल्याचा कांगावा 
     ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - असहिष्ण वातावरणाच्या विरोधात पुरस्कार परत करणे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पुरस्कारांपेक्षा लेखकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे लेखकांना पुरस्कारापेक्षा सुरक्षा द्या, असे मत वाड्.मयीन पुरस्कारांचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान या परिसंवादात सहभागी वक्त्यांनी केले. पत्रकार मधुकर भावे, लेखक संजय भास्कर जोशी, मनोज तायडे, किशोर बेदाकीयाळ, सुरेश बंदिले यात सहभागी झाले होते. या वेळी केवळ श्री. बंदिले यांनी पुरस्कारवापसीच्या विरोधात मत व्यक्त केले. (डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यानंतर जे पुरस्कारवापसीचे लोण आले, ते काश्मिरी हिंदूंच्या हत्या आणि अन्य हिंदुत्ववाद्यांच्या संदर्भात दिसून आले नाही. यातच पुरस्कारवापसी चळवळीचा हिंदुद्वेष दिसून येतो. - संपादक) 

ईश्‍वरपूर येथे तहसीलदारांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ
     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) - राष्ट्रध्वजाचा मान राखा या चळवळीच्या अंतर्गत ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने नायब तहसीलदार श्री. विपीन लोकरे, गटशिक्षण अधिकारी श्री. मोहन गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. जीवन राजगुुरु यांना निवेदने देण्यात आली. गटशिक्षणाधिकार्‍यांनी आम्ही शाळेतील बैठकीत विषय सांगतो, अशी ग्वाही दिली, पोलीस उपनिरीक्षकांनी विक्रेत्यांना नोटीस पाठवून प्लास्टीकचा ध्वज विक्री करू नका, असे सांगतो असे सांगितले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. अशोक वीरकर, श्री. बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे श्री. श्रीकांत काळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजाराम मोरे, संतोष कुंभार, उत्तम मोरे, राम आवटी हे उपस्थित होते.

प्रांताधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि पोलीस ठाणे येथे निवेदन सादर

      गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) - २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील साहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कारकून श्री. दिलीप इंदूरकर आणि पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार पां.गो. गुरव यांना १६ जानेवारीला निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. कुणाल खेमणार यांनी निवेदनाची नोंद घेऊन यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पाटील, उमेश विचारे, सौ. लतिका साबळे, सौ. शामला चव्हाण, सनातन संस्थेच्या सौ. वर्णेकर उपस्थित होत्या.

साहित्य संमेलनाच्या ठिकाणी खाद्यपदार्थांचीच रेलचेल (?)

याला सोय म्हणावे कि लूट ?
      अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळी नागरिकांसाठी खाद्यपदार्थांचे कक्षही थाटण्यात आले आहेत. चहा, पॉपकॉर्न, पिठलं-भाकरी, हुरडा, कच्छी दाबेली आदी पदार्थ उपलब्ध करून देण्यात येत असले, तरी त्यांची चढ्या दराने विक्री होत आहे. चहाचा एक कप २० रुपयांना, हुरड्याची एक ताटली ५० रुपयांना विकण्यात येत आहे, तर कच्छी दाबेली ३० रुपये, पराठे आणि डोसा ५० रुपये ते ८० रुपये अशा दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात लेख असणारे चपराक मासिकाचे अंक संयोजन समितीकडून जप्त

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍यांकडूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ! 
मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची असहिष्णुता जाणा !
गदारोळ झाल्यानंतर क्षमा मागत संयोजन समितीकडून अंक प्रकाशकांना परत !
      ज्ञानोबा-तुकाराम साहित्य नगरी (पिंपरी) - अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे वादग्रस्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात लेख असणारे चपराक मासिकाचे अंक साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने १७ जानेवारी या दिवशी जप्त केले. संयोजन समितीच्या या कृतीमुळे, उठता-बसता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍यांकडूनच विरोधी विचार आणि टीका न पचवता मासिकाचे अंक जप्त करण्याचा असहिष्णु प्रकार झाल्याने या मंडळींचा विरोधाभास उघडा पडला. याप्रकरणी आवाज उठवला गेल्यानंतर संयोजन समितीने माफी मागत साधारणपणे सकाळी ८ वाजता जप्त केलेले अंक दुपारी दीडच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनात लावण्यात आलेल्या चपराक प्रकाशनाच्या कक्षावर परत आणून दिले.

संस्कृत भाषेचा जात आणि धर्म यांच्याशी संबंध नाही ! - डॉ. सत्यपाल शास्त्री

     ज्ञानोबा-तुकोबा साहित्य नगरी (पिंपरी) - संस्कृत ही देवभाषा आहे. १ सहस्र वर्षे ती लोकभाषाही राहिली होती. ती संपूर्ण देशाची भाषा होती. संस्कृत भाषेचा जात आणि धर्म यांच्याशी संबंध नाही. भारतातील अनेक भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. संस्कृत ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. सत्यपाल शास्त्री यांनी व्यक्त केले. १७ जानेवारी या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवाद या सत्रात ते बोलत होते. सौ. मंगला खाडिलकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवाद साधला.


वार्‍याने ग्रंथप्रदर्शन दालनाचे पत्रे उडाले !

     १७ जानेवारी या दिवशी वावटळीमुळे ग्रंथप्रदर्शनाच्या दालनाचे पत्रे उडाले. या दुर्घटनेत विशेष हानी झाली नसली, तरी पत्रा उडाल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

आशा भोसले यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम हा गर्दी खेचण्यासाठी का ?

    साहित्य संमेलनाच्या कालावधीत १८ जानेवारी या दिवशी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या गीतांचा म्हणजेच संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची पुष्कळ गर्दी झाली होती. आशा भोसले यांची गाणी सुश्राव्य असली, तरी साहित्य संमेलनामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव खरेच आवश्यक होता का ?, अशी चर्चा मराठीप्रेमींमध्ये होती. त्याच दिवशी सकाळी झालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवादाच्या कार्यक्रमासाठी मात्र प्रेक्षकांची तुरळक गर्दी होती. 

८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप

८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात युवकांसाठी आयोजित परिसंवाद 
 श्रीकृष्णाचे नाव उच्चारले जाण्यासाठी पुस्तकातील 
मुख्य पात्राचे नाव श्रीकृष्णाच्या नावांपैकीच ठेवतो ! - चेतन भगत 
     पिंपरी-चिंचवड, १८ जानेवारी (वार्ता.) - माझ्या प्रत्येक पुस्तकातील मुख्य पात्राचे नाव हे श्रीकृष्णाचेच एक नाव आहे; कारण श्रीकृष्ण म्हणतो, 'जो मेरा नाम चलायेगा, वो मेरा प्यारा होगा ।' पुस्तकात श्रीकृष्णाचे नाव मुख्य पात्रास दिल्यामुळे कोट्यवधी वेळा श्रीकृष्णाचे नाव वाचकांच्या मुखातून उच्चारले जाते. यातच मला समाधान आहे, असे वक्तव्य युवा पिढीचे आवडते प्रसिद्ध लेखक श्री. चेतन भगत यांनी केले. ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. 

धर्मविरोधकांना रोखण्यासाठी शनिशिंगणापूरला संघटित व्हा !

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 

     नंदुरबार - धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगर जिल्ह्यात अटकाव करावा, एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमातील आक्षेपार्ह भाग वगळणे, मालदा येथील दंगलखोरांवर कारवाई व्हावी आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. तसेच २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूर येथे चौथरा चढू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडला विरोध करण्यासाठी नंदुरबारच्या धर्मप्रेमी महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य संघटनांचे हिंदुप्रेमी कार्यकर्ते यांत सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी निदर्शने करून घोषणा दिल्या. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, हे कधीपर्यंत चालू देणार ?
     नवापूर (नंदुरबार) येथे २ अल्पवयीन धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार केला. हिंदूंच्या दबावानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ ५ सहस्र हिंदु महिला रस्त्यावर उतरल्या असून १९ जानेवारीला नवापूर बंद घोषित करण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Hinduon, Ye kab tak chalne doge ? - Maharashtrake Navapurme 2 alpvayin dharmandhone alpvayin Hindu ladkipar Attyachar kiya. Hindu Mahilaonka tivra virodh.
जागो !
      हिंदूंओ, ये कब तक चलने दोगे ? - महाराष्ट्रके नवापूर में २ अल्पवयीन धर्मांधोंने अल्पवयीन हिंदु लडकीपर अत्याचार किया. हिंदु महिलाआेंका तीव्र विरोध.

संस्कृती टिकवण्यासाठी मराठीतच बोलले पाहिजे !

मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा या परिसंवादातील सूर
      ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - मराठी भाषेच्या सुदृढतेसाठी शासन कार्य करेलच; पण आपणही आपले कर्तव्य म्हणून मराठीत बोलले पाहिजे. संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मराठी भाषेत बोललेच पाहिजे, असे प्रतिपादन मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा या परिसंवादात सहभागी वक्त्यांनी केले. भोपाळ येथील मराठी अकादमीच्या सौ. वैशाली पत्की, भाग्यनगर येथील डॉ. शैलजा जोशी, देहली येथील आयएएस् अधिकारी आनंद पटेल, श्री. शैलेश पांडे, लातूर येथील डॉ. जयद्रथ जाधव, श्रीमती अनुराधा ठाकूर आदी मान्यवर सहभागी झाले होते. 

समीक्षाविषयक परिसंवादाचीच समीक्षा अशाने मराठीला चांगले दिवस कधीतरी येऊ शकतील का ?

     ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी - पिंपरी येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच १७ जानेवारीला मराठी समिक्षा : किती थिटी, किती संपन्न ? या विषयावर आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी डी.वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपस्थित रहाणे बंधनकारक करण्यात आले होते. एवढेच नाही, तर संमेलनाला उपस्थित असणार्‍यांच्या एका कागदावर नाव लिहून स्वाक्षर्‍या घेतल्या जात होत्या. त्यामुळे सभागृहात अल्पशी उपस्थिती दिसत असली, तरी ती अशा प्रकारे जमा केलेल्या विद्यार्थ्यांची होती. त्यातून मराठीच्या संवर्धनासमोर असलेले प्रश्‍नचिन्ह अधिकच ठळक होईल, यात शंका नाही. 

एक गाव एक शिवजयंती साजरी करण्याचा स्तुत्य निर्धार !

     चिंचवड १८ जानेवारी - सर्व हिंदूंनी संघटित व्हावे आणि प्रखर हिंदुत्व निर्माण व्हावे यांसाठी एक गाव एक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प चिंचवड येथील धर्माभिमान्यांनी केला. या स्तुत्य उपक्रमाच्या संदर्भात १० जानेवारी या दिवशी चिंचवडगाव येथील काळभैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ उत्सव समिती, समस्त ग्रामस्थ यांचे वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
     या बैठकीमध्ये ग्रामस्थांची, तसेच शिवजयंती साजरी करणारी मंडळे आणि धर्माभिमानी यांची मते जाणून घेण्यात आली. अलीकडील काळात शिवजयंती ही तीन वेळा साजरी होते. असे न होता हिंदु धर्मातील सर्वच सण ज्याप्रमाणे तिथीनुसार साजरे केले जातात, त्याप्रमाणे शिवजयंतीसुद्धा तिथीनुसार साजरी केली जावी आणि नवा आदर्श निर्माण करून सर्व ग्रामस्थांचे संघटन करावे, असे मत धर्माभिमानी श्री. धनंजय गावडे यांनी व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी याला अनुमोदन दिले. प्रत्येक गावाने एक किल्ला दत्तक (संवर्धनासाठी) घ्यावा असेही विचार या वेळी मांडण्यात आले. या बैठकीला काळभैरवनाथ उत्सव समितीचे विश्‍वस्त, तसेच सर्वश्री राहुल भोईर, शेखर चिंचवडे, कैलास गावडे, राजन चिंचवडे, गणेश गावडे, राजेंद्र चिंचवडे, सूरज भोईर, प्रसन्न डांगे, सिद्धेश गोलांडे, महेश साठे, आशिष गावडे, कैलास साठे, महेश चिंचवडे, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह १५० हून अधिक ग्रामस्थ आणि धर्माभिमानी उपस्थित होते. 

मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे ! - शरद पवार

     ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे. तिचे संवर्धन झाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. इंग्रजी शाळांमधून मराठी आणि मातृभाषेची सक्ती असली पाहिजे. त्याचप्रमाणे अमराठी भाषांच्या शाळेतही मराठी असली पाहिजे. प्रसंगी कोणतीही तडजोड न करता संघर्ष करावा लागला, तरी चालेल. शासनानेही शाळांना परवाने देतांना याचा विचार करायला हवा, असे मत ८९ व्या अखिल भारतीय मरठी साहित्य संमेलनात घेण्यात आलेल्या मुलाखतीत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कधी होणार ?

१९ जानेवारी या दिवशी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिनाच्या निमित्ताने...
श्री. रमेश शिंदे
श्री. चेतन राजहंस
    १९ जानेवारी १९९० या दिवशी जिहादी मुसलमानांनी बलपूर्वक काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोरे सोडण्यास भाग पाडले. हा काळाकुट्ट दिवस उलटून आज २६ वर्षे उलटली, तरी काश्मिरी हिंदूंचे पुन्हा त्यांच्या जन्मभूमीत पुनर्वसन न होणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि भारतीय लोकशाहीला कलंकित करणारे आहे. पनून कश्मीर (आमचे काश्मीर) ही संघटना काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी गेली २६ वर्षे अथक संघर्षरत आहे. केंद्रात, तसेच काश्मीर राज्यातही हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तारूढ होऊनही जन्मभूमी असलेल्या काश्मीर खोर्‍यात परतण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने पनून कश्मीर संघटनेने २६ डिसेंबर २०१५ या दिवशी देशातील प्रमुख देशभक्त संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील संवादाच्या निमित्ताने पनून कश्मीरच्या प्रतिनिधींनी उलगडलेली रहस्ये ऐकून आम्ही अवाक् झालो. बैठक संपल्यानंतर एकच प्रश्‍न आमच्या मनात राहिला की, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होणार कधी ?

मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी समाजातील संभ्रम !

१. मराठी भाषा शिकण्यासाठी येणार्‍या अडचणी 
अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे. इंग्रजीचे वाढते प्रस्थ आणि त्या भाषेला मिळणारा सन्मान, त्यामुळे इंग्रजीकडे सगळ्यांचा ओढा असतो. इंग्रजी लिहिता-बोलता आली, तर त्याचे भवितव्य अन् प्रभाव आणि तसे नाही झाले, तर त्याचा आत्मविश्‍वासावर होणारा परिणाम, हे प्रतिदिन आसपास पहाता येते. इंग्रजी शिकवण्यासाठीचे वर्ग आणि उपाय यांनी बाजारपेठ भरलेली आहे. एखाद्याला मराठी शिकायचे असेल, तर त्याला काही सापडत नाही. 

वाहतुकीची विदारक स्थिती !

     गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये ५८ सहस्र अपघात झाले असून त्यामध्ये १२ सहस्र जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये झाले आहेत. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक १ सहस्र ३३९ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही भीषण वस्तूस्थिती राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे. पुण्यामध्ये प्राणघातक अपघातांची संख्या वर्ष २०१५ मध्ये ४१६, तर वर्ष २०१४ मध्ये ती संख्या ३७८ इतकी होती. या अपघातात ४३५ लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.

हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होऊ देणार्‍या ममता बॅनर्जी सिंगूर, नंदीग्राम विसरल्या का ?

श्री. भाऊ तोरसेकर
१. मतांच्या लांगूलचालनासाठी जातीय-धर्मांध दंग्याविषयी 
निष्क्रीय रहाणार्‍या ममता बॅनर्जी !
      सध्या म्हणजे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यापासून जे काही चालले आहे, त्याला अराजक यापेक्षा वेगळा शब्द वापरता येत नाही. अर्थात तसे ममता यांना वाटत नाही कि त्यांच्या समर्थकांना कधी दिसत नाही; म्हणूनच मालदा या सीमावर्ती जिल्ह्यात वा अन्यत्र जे जातीय-धर्मांध दंगे आणि हिंसाचार चालू आहे, त्याबाबतीत ममता अगदी निष्क्रीय आहेत. मालदा जिल्ह्यातील कालियाचक नावाच्या शहरवजा गावात मुसलमानबहुल लोकवस्ती आहे आणि तिथे लाखोंच्या संख्येने मुसलमानांचा जमाव जमवला गेला.

शत्रूराष्ट्राचा नायनाट केल्यावरच भारताचा संरक्षण व्यय न्यून होईल !

     पुढचे पाकिस्तान समवेत होणारे युद्ध हे शेवटचे युद्ध ठरावे आणि त्या करता पुढील १-२ पंचवार्षिक योजनांचे काम पुढे ढकलावे लागले, तरी चालेल. या युद्धानंतर आपल्या शत्रूचा नायनाट होईल आणि त्यानंतर भारताचा संरक्षण व्यय पुष्कळच न्यून राहील. - श्री. माधव चिं. खाडिलकर (संदर्भ : प्रज्वलंत, १५ अ‍ॅाक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २००१) 

अल्पसंख्यांकांची नेमकी व्याख्या स्पष्ट करा !

     अल्पसंख्यांकांची नेमकी व्याख्या काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. ज्या शहरात, जिल्ह्यात, तालुक्यात १० टक्के मुसलमान लोकसंख्या आहे, तेही अल्पसंख्यांक आणि जेथे ६८ टक्के मुसलमान आहेत तेही अल्पसंख्याक. हा विरोधाभास का लक्षात घेतला जात नाही ? - गिरीराज सिंह, लघुउद्योग राज्यमंत्री (१.१.२०१६)

मुसलमानबहुल देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा आहे, तर भारतात का नाही ?

     मलेशिया, इंडोनेशिया यांसारख्या मुसलमानांची लोकसंख्या अधिक असलेल्या देशांतही लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. तेथील मुसलमान या कायद्याचे तंतोतंत पालन करतात. मग भारतातच कायदा का नाही ? - गिरीराज सिंह, लघुउद्योग राज्यमंत्री (१.१.२०१६)
          भारतीय अभिजन वर्गाने पश्‍चिमी (अ)सभ्यता आणि (अ)संस्कृती यांच्यासमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) निरपेक्ष प्रीतीच्या धाग्याने सर्वांना साधनेशी जोडणार्‍या आणि साधकांच्या साधनेची तळमळ असणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     भगवंताच्या कृपेने आणि त्याच्या लीलेनेच जानेवारी २०१५ पासून मला पू. (सौ.) गाडगीळकाकूंच्या सत्संगात रहायला मिळाले. पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणजे गुणांची देवता, अध्यात्मज्ञानाचे शिखर आणि प्रेमाचे मूर्तीमंत रूप ! त्यांच्या सहज वागण्यातही अनेक पैलू आणि अध्यात्मातले दृष्टीकोन दडले आहेत. त्यांच्यात असलेल्या अनेक गुणांपैकी काही गुण येथे लिहून गुरुचरणी अर्पण करतो.
१. पू. काकूंचे सर्वांशी वागणे आणि बोलणे, म्हणजे निरपेक्ष प्रेमच !
      गेल्या काही वर्षांपासून पू. (सौ.) गाडगीळकाकू भारतातील तीर्थक्षेत्रांच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यावर असतांना ज्या ठिकाणी साधक नाहीत, त्या ठिकाणी त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये रहावे लागते आणि उपाहारगृहात जेवावे लागते. मंदिरांत, प्राचीन स्थळी, वस्तू संग्रहालये इत्यादी ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा अनेक जणांशी संपर्क येतो. या सर्व ठिकाणी त्यांचे वागणे-बोलणे प्रेमभावाचे असते.
१ अ. सर्वांना हात जोडून नमस्कार करणे : पू. काकूंच्या संपर्कात एखादी नवीन व्यक्ती आली की, पू. काकू त्यांना हात जोडून नमस्कार करतात.

गोव्यातील श्री. जगन्नाथ पांडुरंग हजारे, श्रीमती कुमुद कामत आणि श्री. संजीव नाईक यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

      रामनाथी - गुळेली, वाळपई येथील श्री. जगन्नाथ पांडुरंग हजारे (वय ९२ वर्षे), मिरामार, पणजी येथील श्रीमती कुमुद कामत (वय ७९ वर्षे) आणि मडकई येथील श्री. संजीव नाईक (वय ५२ वर्षे) या साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी १६ जानेवारीला घोषित केले. सनातनच्या रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञानिमित्त जमलेल्या साधकांना पू. (सौ.) सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता दिली आणि यज्ञाचे चैतन्य अनुभवलेल्या साधकांचा आनंद द्विगुणित केला. श्री. जगन्नाथ पांडुरंग हजारे हे सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे साधक श्री. संदेश हजारे यांचे वडील आहेत. श्री. जगन्नाथ हजारे यांच्या कुटुंबियांनी त्यांची सहजता, उत्साह, प्रेमळपणा, स्थिरता आदी वैशिष्ट्ये सांगितली.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
    मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

चंदीगढ येथील सनातनचे साधक श्री. गौरव सेठी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. गौरव सेठी यांचा सत्कार करतांना पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
(याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या अंकात)

वैज्ञानिक आणि यज्ञासंदर्भातील अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करण्याची विनंती !

     उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी हे अग्नीमध्ये आहुती देतात, त्या वेळी त्या अग्नीमध्ये अग्नितत्त्व जागृत होऊन त्यांना प्रत्यक्ष अग्निदेवाचे रूप दिसते. प.पू. रामभाऊस्वामी हे या यज्ञकुंडावर अग्नी प्रज्वलित असतांना त्यात स्वत:ला समर्पित करतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रामपंचायतन नीलासरस्वतीसमवेत उच्छिष्ट गणपति अभिषेक संपन्न !

    
रामपंचायतन नीलासरस्वतीसमवेत उच्छिष्ट गणपति अभिषेक करतांना
 प.पू. रामभाऊस्वामी. सोबत डावीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. डॉ. मुकुल
 गाडगीळ आणि मागील बाजूस सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग
  रामनाथी - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकार होण्यासाठी आणि विश्‍वकल्याण व्हावे या हेतूने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञानंतर १८ जानेवारी या दिवशी रामपंचायतन नीलासरस्वतीसमवेत उच्छिष्ट गणपति अभिषेक भावपूर्ण वातावरणात झाला. तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली हा अभिषेक पार पडला.
     यज्ञाचे यजमान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ हे होते. मूर्ती ठेवलेल्या देव्हार्‍याच्या चारही बाजूंनी ठेवलेल्या समया सुवासिनींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर प.पू. रामभाऊस्वामींच्या हस्ते देवतांवर अभिषेक करण्यात आला.

श्री. विनायक शानबाग आणि चि.सौ.कां शिल्पा करी यांचा विवाह भूलोकात होत नसून ब्रह्मा, विष्णु अन् महेश या देवतांच्या उपस्थितीत उच्च लोकात होत आहे, असे जाणवणे

     २२.१२.२०१५ या दिवशी दुपारपासूनच माझे मन उत्साही आणि आनंदी होते. २२ आणि २३.१२.२०१५ या दिवशी मला श्री. विनायक शानबाग आणि चि.सौ.कां. शिल्पा करी यांच्या विवाहानिमित्त आलेल्या पाहुण्यांना आश्रम दाखवण्याची सेवा होती. २४.१२.२०१५ या दिवशी मला पाहुण्यांना आश्रम दाखवण्यासाठी सांगण्यात आले. त्या वेळी माझा रक्तदाब (Blood pressure) वाढला होता. त्यामुळे मी त्या सेवेसाठी जाऊ शकणार नाही, असे मला वाटत होते. प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करतांना मला सेवेपासून वंचित रहायचे नाही, अशी मी प्रार्थना केली आणि सेवा करण्यासाठी गेलो. मी पाहुण्यांना खाली सभागृहाच्या दिशेने घेऊन गेल्यावर मला गेले दोन दिवस जाणवत असलेल्या आनंदामागचे कारण लक्षात आले.

लहानपणापासून आध्यात्मिकदृष्ट्या घडवून गुरुचरणी भावपूर्ण अर्पण करणार्‍या आईप्रती (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती) भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली गाडगीळ आणि तिची मैत्रिण कु. शायरी मराठे !

कु. सायली गाडगीळ
हे भगवंता,
काय सांगावे आमच्या आईविषयी तुला ।
जिने आध्यात्मिक जीवन जगण्या शिकवले आम्हाला ॥ १ ॥
नाही केली पर्वा आमच्या भावनांची ।
पण बीज मात्र रोवले भावाचे या मनी ॥ २ ॥
अशी मिळाली आम्हाला आध्यात्मिक आई ।
जिने धाडले आम्हाला भगवंताच्या चरणी ॥ ३ ॥

पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     ११.१.२०१६ या दिवशी पू. (सौ.) अंजलीताई यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर त्या मला भेटण्यासाठी खोलीत आल्या. पू. काकूंचे बोलणे आणि आचरण यांतून साधनेची कित्येक सूत्रे शिकायला मिळाली. त्यांच्या सहज वागण्यातून आपलेपणा जाणवत होता. पू. काकूंच्या सत्संगात मला पुष्कळ चैतन्य, प्रीती आणि आनंद अनुभवता आला.
१. पू. काकू देवीप्रमाणे भासणे
    पू. काकू चेन्नई, तसेच बेंगळुरू येथून पुष्कळ प्रवास करून रामनाथी आश्रमात आल्या होत्या; परंतु त्यांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना प्रवासाचा शीण किंवा थकवा आल्याचे अजिबात जाणवत नव्हते. पू. काकू संत असल्याने त्यांच्यात कार्यरत असणार्‍या चैतन्यामुळे त्या देवीप्रमाणे दिप्तीमान दिसत होत्या.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी स्वयंपाक आणि मोदक बनवण्यासाठी आलेले श्री. रघुराम राव आणि श्री. श्रीनिवास अय्यंगार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. रघुराम राव
१. अखंड सेवारत असणे
      श्री. रघुराम राव आणि श्री. श्रीनिवास अय्यंगार हे अगदी भक्तीभावाने सेवा करत होते. ते लांबचा प्रवास करून आल्यावरही त्यांनी त्याच दिवशी सकाळी आल्यापासून सेवेला आरंभ केला. त्यानंतर त्यांनी गेल्या तीन दिवसांत एकही दिवस दिवसा विश्रांती घेतली नाही. पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत ते अखंड सेवारत आहेत. रात्रीही झोपायला उशीर होऊनही ते एकही क्षण न बसता पूर्ण दिवस उत्साहाने सेवा करतात.

उत्कट भावावस्थेत असलेले प.पू. रामभाऊस्वामी !

कु. कुशावर्ता माळी
     प.पू. रामभाऊस्वामी हे कर्मकांडानुसार साधना करतात; पण त्यांनी ती इतकी भावपूर्ण आणि परिपूर्ण केली की, साधनेचे सर्व योग शेवटी एकत्र येतात, या सिद्धांतानुसार ते कुठल्याही मार्गानुसारच्या बंधनात न रहाता उत्कट भावावस्थेत गेले आहेत. यामुळे साधनेतील प्रत्येक कृती भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे किती आवश्यक अन् महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. गुरूंनी सांगितलेली साधना मनोभावे करण्यात मानवाच्या जीवनाचे आणि शिष्याचे कल्याण असते. यातून मनोलय आणि बुद्धीलय यांचे अपार महत्त्वही लक्षात येते, तसेच त्यांच्या निर्विचार आणि दोष अन् अहंभाव विरहित कृतीतून आपणही असेच व्हावे, अशी तळमळ निर्माण होते. ते अग्नीवर निस्सीम प्रेम करतात. आईचे मुलांवर जसे प्रेम असते तसे किंवा त्याहीपेक्षा ते अनेक पटींनी गुणवत्तेचे आहे.
- कु. कुशावर्ता माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.१०१६)

स्वयं अग्नीस्वरूप असलेल्या प.पू. रामभाऊस्वामी यांचे सूक्ष्म-चित्र

असे एकातरी बुद्धीप्रामाण्यवाद्याच्या कधी लक्षात येते का ? 
१. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आज्ञाचक्राभोवती गुरुतत्त्व कार्यरत असणे : त्यामुळे त्यांना गुरुतत्त्वाकडून मार्गदर्शन मिळते.
२. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आज्ञाचक्राभोवती संकल्पशक्ती कार्यरत होणे : प.पू. रामभाऊस्वामी हे समष्टी संत असून ते राष्ट्ररक्षणासाठी यज्ञ करत असल्याने त्यांच्या आज्ञाचक्राभोवती दैवी संकल्पशक्ती कार्यरत झालेली आहे.
३. ईश्‍वरी अनुसंधान : प.पू. रामभाऊस्वामी यांचे ईश्‍वराशी सतत अनुसंधान असते.

कोणत्याही कार्यक्रमाची पुरेशी माहिती जाणून घेऊनच तेथे जाण्याचा निर्णय घ्यावा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !
     एका शहरात एका हिंदुत्ववादी संघटनेने ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता धर्मजागृती सभा आयोजित केली होती. आयोजकांच्या मागणीनुसार समितीच्या एका कार्यकर्त्याने सभेची अधिक माहिती न घेता, तसेच उत्तरदायी साधकांना न विचारता सभेस वक्ता म्हणून येण्याविषयी आयोजकांना होकार कळवला. आयोजकांनी सभेच्या दिवशी दुपारी ४ वाजता समितीच्या आणखी एका कार्यकर्त्यासही वक्ता म्हणून येण्याची विनंती केली. त्या वेळी सभेत राष्ट्र-धर्माविषयी मार्गदर्शनानंतर उपस्थितांकरता मेजवानीसह मद्यपानाची व्यवस्था केली असल्याचे समजले. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी या सभेस जाण्याचे टाळले.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

सौ. अनुश्री साळुंके
१. १५.१.२०१६ या दिवसापासून प.पू. रामभाऊस्वामी जो उच्छिष्ट गणपतियाग यज्ञ करत आहेत, त्या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि भावजागृती होत होती.
२. त्या यज्ञातून निघणार्‍या धुरामुळे सर्व आश्रम आणि परिसर शुद्ध होत आहे, असे वाटत होते. त्यात जी आहुती पडत होती, त्या माध्यमातून सर्व अनिष्ट नष्ट होत आहे, असे वाटत होते.
३. यज्ञ चालू असतांना पसरलेल्या चैतन्यामुळे मला ग्लानी आल्यासारखे होत होते आणि डोळे आपोआप मिटले जात होते.
४. पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू देवीसमान भासत होत्या.

अत्यंत अल्प आहार घेणारे आणि मागील ४० वर्षे पाणीही न प्यायलेले ७८ वर्षीय प.पू. रामभाऊस्वामी यांच्या वैद्यकीय चाचणीतील माहिती आणि काही अनुत्तरित प्रश्‍न !

    
प.पू. रामभाऊस्वामी
समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या निमित्ताने...

      तमिळनाडूतील तंजावूर येथील ७८ वर्षीय प.पू. रामभाऊस्वामी यांनी वर्ष १९७५ पासून पाणी प्यायलेले नाही. ते वर्ष १९७७ पासून केवळ दोन केळी आणि एक पेला दूध दिवसातून एकदा घेत आहेत. असे असूनही ते पूर्णपणे कार्यक्षम आहेत. वर्ष २००० मध्ये ते ६३ वर्षांचे असतांना त्यांच्या रॅनबॅक्सी लॅब (Ranbaxy Labs) आणि कोलन लॅब्स (Cholan Labs) यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांशी संबंधित माहिती द फायर योगी या माहितीपटात दिली आहे. त्यातील निवडक भाग अभ्यासकांसाठी पुढे दिला आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  आदी शंकराचार्य जेथे जन्मले ते केरळ आणि स्वामी विवेकानंद जेथे जन्मले ते बंगाल या ठिकाणी हिंदूंनी हिंदु धर्म सोडून धर्मद्वेष्ट्या साम्यवादाचा स्वीकार केल्यामुळे त्यांची स्थिती आज सर्वांत दयनीय झाली आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.१.२०१६)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

साहित्य संमेलनात सावरकर उपेक्षितच !

संपादकीय 
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७ दशकांच्या राजवटीत काँग्रेस शासनाने ज्या क्रांतीकारकांची घोर उपेक्षा केली त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ उत्तम साहित्यिकच नव्हते, तर ते प्रतिभावान कवीही होते. त्यांनी लिहिलेली वीरश्री गीते आकाशवाणीवरून गायला तर बंदी होतीच; पण पाठ्यपुस्तकातून सावरकरांवर एका ओळीचे लिखाणही कधी आढळले नाही. राजकीय व्यासपिठावरची ही उपेक्षा साहित्याच्या व्यासपिठावरही पहायला मिळणेे संतापजनक आहे. सावरकरद्वेषाचा हा कित्ता ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही नेटाने गिरवला गेला. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष या नात्यानेही सावरकरांचे साहित्याच्या व्यासपिठावरून स्मरण न होणे, त्यांच्या विचारांचा सन्मान न होणे, हा निवळ हिंदुद्वेषच होय. सावरकरांच्या साहित्यसंपदेला सुस्पष्ट आणि निश्‍चित अशी दिशा होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn