Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खार (मुंबई) येथे मुसलमानबहुल गोळीबार वसाहतीत हिंदू भोगत आहेत नरकयातना !

महाराष्ट्राच्या राजधानीतच अशा घटना घडत असतील, तर 
राज्यात इतरत्र स्थिती काय असेल, याचा विचारच न केलेला बरा !
  • धर्मांधांकडून हिंदु महिलांची प्रतिदिन भररस्त्यात छेडछाड !
  • ३ हिंदूंना धर्मांधांकडून अमानुष मारहाण, एकाचा मृत्यू !
  • पोलिसांकडून धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न !
     खार (मुंबई) - येथील मुसलमानबहुल गोळीबार वसाहतीत हिंदूंना प्रतिदिन नरकयातना भोगाव्या लागत आहेत. धर्मांधांकडून हिंदु विवाहित महिला आणि युवती यांची प्रतिदिन भररस्त्यात छेड काढली जाते. काही दिवसांपूर्वीच (२१ डिसेंबर २०१५ला) एका विवाहित महिलेची भररस्त्यात छेड काढत असलेल्या कुख्यात धर्मांध गुंडाला त्या महिलेचा पती अजिंक्य यांनी विरोध केला.

खार (मुंबई) येथे हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाचा मृत्यू झाल्याचा सूड म्हणून धर्मांधांकडून ३ हिंदूंना अमानुष मारहाण, एका हिंदूचा मृत्यू !

हिंदू संघटित असते, तर हिंदुबहुल देशात त्यांना
धर्मांधांचे अत्याचार सहन करावे लागले असते का ? 
      मुंबई - येथील खारमधील गोळीबार वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु-मुसलमानांमध्ये तणावाचे वातावरण आहे. धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. एका विवाहित हिंदु महिलेला दोन वर्षांपासून तेथील एक कुख्यात धर्मांध गुंड आणि त्याचे मित्र अश्‍लील शेरेबाजी करून अनेक वर्षांपासून त्रास देत होते. या विरोधात खार येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात त्या हिंदु कुटुंबाने अनेक तक्रारीही प्रविष्ट केल्या; मात्र पोलिसांनी त्यावर गांभीर्याने कठोर कारवाई केली नाही.
     त्यामुळे २१ डिसेंबर २०१५ या दिवशी तो धर्मांध पुन्हा हिंदु महिलेची छेडछाड करून तिला त्रास देऊ लागला. त्या वेळी त्या महिलेचे पती अजिंक्य यांनी पोलिसांना दूरध्वनी करून तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा, असे सांगितले.

इसिसचे आकर्षण न्यून करण्यासाठी गृहमंत्रालयाचा भारतीय संस्कृतीवर भर

आतंकवाद कसा संपवायचा, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले
असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे आणि इसिसमध्ये भरती होण्यापासून
तरुणांना वाचवण्यासाठी समुपदेशनावर भर देणारे गृहमंत्रालय !
     नवी देहली - क्रूर जिहादी आंतकवादी संघटना इसिसच्या आकर्षणापासून भारतीय तरुणांना वाचवण्यासाठी गृहमंत्रालय आणि गुप्तचर संस्था आता कौटुंबिक संस्कार आणि भारतीय संस्कृती यांवर भर देणार आहेत. गृहमंत्रालयाला आतापर्यंत कौटुंबिक समुपदेशन आणि चर्चा यांच्या माध्यमातून १०० हून अधिक तरुणांना इसिसच्या प्रभावातून वाचवण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे या उपायांवर गृहमंत्रालय अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
     भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आतंकवादी संघटना इसिस च्या संदर्भात गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांचे प्रमुख, तसेच १३ राज्यांचे पोलीस प्रतिनिधी यांची विशेष बैठक घेतली

आंदोलन कराल, तर अटक करू !

शनिशिंगणापूर चौथर्‍यावर प्रवेश करण्याची धर्मद्रोही चेतावणी 
देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांची तंबी
     पुणे - शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना घेऊन प्रवेश करण्याची धर्मद्रोही चेतावणी देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना नगर पोलिसांनी फौजदारी नियम १४९ अन्वये नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटले आहे की, भूमाता ब्रिगेडकडून २६ जानेवारी या दिवशी होणार्‍या आंदोलनाने नगर जिल्ह्यातील स्थिती तणावपूर्ण होईल. जर आंदोलन करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवाल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यात अटकेचाही समावेश असेल. ही नोटीस तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात बोलावून देण्यात आली आहे.

बांगलादेशमधील रामकृष्ण मिशनच्या प्रमुखासह ४ जणांना जिहादी संघटनेची धमकी

बांगलादेशला सर्वतोपरी साहाय्य करणारे भारत शासन तेथील हिंदू आणि हिंदूंचे संत
यांच्या रक्षणासाठी काही करतांना दिसत नाही, असे कोणाला वाटल्यास चूक ते काय ?
      ढाका (बांगलादेश) - बांगलादेशमधील बलीयाटी येथील रामकृष्ण मिशन सेवाश्रमाचे प्रमुख स्वामी परिमुक्तानंद यांच्यासह ४ जणांना अन्सारुल्ला बाहिनी या जिहादी आतंकवादी संघटनेकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस अन्वेषण करत आहेत. जगप्रसिद्ध असलेली रामकृष्ण मिशन ही संस्था तिच्या आश्रमाच्या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार करते. त्याचसमवेत अन्य धर्मांतील प्रेषित आणि संत यांची पूजाही या आश्रमात विशिष्ट दिवशी केली जाते; मात्र मिशनचे हे कार्य कट्टरपंथीय मुसलमानांना मान्य नाही. त्यामुळेच अन्सारुल्ला बाहिनी या जिहादी आतंकवादी संघटनेने स्वामी परिमुक्तानंद यांना धमकीचे पत्र पाठवले.
     या पत्रात म्हटले आहे, तुम्ही तुमच्या मर्यादेचे उल्लंघन करू नये. ते अल्लाला मान्य नाही. तुम्ही अत्यंत तुच्छ काफिर आहात.

सिया के राम दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन

स्टार प्लसवाहिनीचा हिंदुद्वेष्टेपणा
हिंदु जनजागृती समितीकडून वाहिनीकडे तक्रार
      नवी देहली - स्टार प्लसवरून प्रसारित करण्यात येणार्‍या सिया के राम या दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी हिंदु जनजागृती समितीकडे आल्या आहेत. या तक्रारीविषयी आढावा घेतल्यानंतर समितीने स्टार प्लसला पत्र पाठवून सदर मालिका स्टार प्लस वाहिनीवरून काढून टाकण्याची विनंती केली आहे.
     या मालिकेतील काही दृष्ये दिशाभूल करणारी आहेत आणि मूळ वाल्मिकी रामायणाशी फारकत घेणारी आहेत. रामायण आणि हिंदु धर्म यांवर निधर्मी आणि उदारमतवादी विचार थोपवण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे, तसेच प्रेक्षकांच्या मनावर चुकीचे संस्कार केले जात आहेत. या मालिकेमधून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचा दावा करण्यात येतो; मात्र प्रत्यक्षात या मालिकेतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

केंद्रशासनाचा पर्यटन विभाग १३ धार्मिक तीर्थस्थळांचा विकास करणार !

यात्रास्थळांचा विकास पर्यटन क्षेत्र म्हणून न करता सांस्कृतिक ठेवा म्हणून
करावा. त्यामुळे अशा स्थळांचा जनतेला खर्‍या अर्थाने लाभ होईल !
      गुरुवायूर (केरळ) - केंद्रशासनाच्या पर्यटन विभागाने प्रसाद या योजनेखाली देशातील १३ धार्मिक तीर्थस्थळांचा विकास करणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी दिली. या योजनेअंतर्गत श्री पद्मनाभस्वामी मंदिराची निवड यापूर्वीच झाली असून गुरुवायूर आणि साबरीमाला या मंदिरांचे प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यांच्या समावेशासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम् राजशेखरन् यांनी विनंती केली होती, असे मंत्री शर्मा यांनी सांगितले. या १३ धार्मिक यात्रा स्थळांमध्ये अजमेर, अमृतसर, अमरावती, द्वारका, गया, कामाख्या, कांचीपुरम, केदारनाथ, मथुरा, पाटणा, पुरी, वाराणसी आणि वेलान्कांनी या ठिकाणांचा समावेश आहे.

इसिसकडून सिरियातील ३०० जणांची सामूहिक हत्या !

     दमास्कस (सिरिया) - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरियाच्या ३०० लोकांचे अपहरण करून त्यांची सामुहिक हत्या केली. यामध्ये स्थानिक पोलीस आणि ५० सैनिक, तसेच सैन्याचे कुटुंबीय यांचा समावेश होता. (भारतातील इसिसच्या समर्थक आतंकवाद्यांचे समुपदेशन करणार्‍या पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक) सिरियाच्या सैन्याने आतंकवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात ४२ आतंकवादी ठार झाले. सिरियाचे पंतप्रधान अल्-हलाकी यांनी हे भ्याड वृत्तीचे आक्रमण असल्याचे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र्रसंघानेही अल्-जोर भागातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

मुलायमसिंह यादव कुटुंबातील ११ सदस्य विविध राजकीय पदांवर विराजमान !

कुठे पंतप्रधानपदी असूनही स्वत:च्या मुलाला पदाचा लाभ न मिळू 
देणारे लालबहाद्दूर शास्त्री, तर कुठे आजचे राजकारणी !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - राजकारणातील घराणेशाहीवर एरवी सडकून टीका करणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील तब्बल ११ सदस्य विविध राजकीय पदांवर विराजमान आहेत. मुलायमसिंह यांचे पुत्र अखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, तर स्नुषा डिंपल यादव खासदार आहेत. याशिवाय मुलायमसिंह यादव यांचा पुतण्या अभिषेक यादव (इटावा), पुतणी संध्या यादव (मैनपुरी) आणि अन्य एक नातेवाईक वंदना यादव (हमीरपूर) हे तिघे जण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विजयी झाले होऊन त्या त्या जिल्हा परिषदांचे अध्यक्षही झाले आहेत.


मराठी साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये उर्दू साहित्याचे कक्ष !

उर्दू साहित्य संमेलनात मराठी भाषेतील साहित्य 
संपदेचे ग्रंथप्रदर्शन मांडल्याचे कधी ऐकले आहे का ?
      पिंपरी - ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिकच्या पटांगणात चालू आहे. या संमेलनामध्ये लावण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये ३ कक्ष हे इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, तसेच जमात ए इस्लामी आणि अहमदिया मुस्लिम जमात या संघटनांनी लावले आहेत. या कक्षामध्ये इस्लामचे साहित्य मराठी भाषेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संमेलनात अहमदिया मुस्लिम जमात या संघटनेकडून विश्‍वशांतीचा संदेश देण्यासाठी एक पुस्तक भेट स्वरूपात सर्वांना देण्यात आले. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्टचे शेख अजीमुद्दीन यांनी सांगितले की, आतंकवादामुळे लोकांमध्ये इस्लामविषयी चुकीची माहिती देश-विदेशांत पसरली आहे.

वाराणसी येथील काशीमठ संस्थानचे प.पू. सुधींद्र तीर्थस्वामीजी यांचा देहत्याग

     वाराणसी - येथील काशीमठ संस्थानचे प.पू. सुधींद्र तीर्थस्वामीजी (वय ९१ वर्षे) यांनी १६ जानेवारीला रात्री १ वाजून १५ मिनिटांनी हरिद्वार येथे देहत्याग केला. स्वामीजींचे उत्तर आणि दक्षिण भारतात १० लाखांहून अधिक अनुयायी आहेत. ते भगवान वेदव्यास यांचे उपासक होते. त्यांना वाचासिद्धी होती, तसेच ते राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन करत असत. प.पू. सुधींद्र तीर्थस्वामीजी हे हिंदु राष्ट्रासाठी सदैव प्रार्थनाही करत असत. काही काळापूर्वी सनातन संस्थेवर बंदीचे संकट असतांना त्यांनी प्रसाद पाठवला होता.

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीसाठी नगर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ग्रामस्थ महिला यांचे कृतीशील संघटन !

धर्मरक्षणासाठी संघटित झालेल्या
हिंदु महिला आणि पुरुष हीच हिंदु धर्माची शक्ती !

प्रशासन आणि पोलीस यांना देण्यात आलेल्या निवेदनातील मागणी
     तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नसतांना जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच २६ जानेवारी या दिवशी तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्या ४०० महिला पुन्हा एकदा श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशा प्रकारांमुळे शनिभक्त आणि लक्षावधी हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि त्यांना नगर जिल्हा बंदी करावी !

गोमंतकियांवर वसाहतवादी राजवट लादल्याविषयी पोर्तुगिजांनी गोमंतकियांची क्षमा मागावी !

मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांचे विधानसभेत रोखठोक प्रतिपादन
या मागणीसाठी श्री. सुदिन ढवळीकर यांचे अभिनंदन !
किती नेत्यांमध्ये असा राष्ट्राभिमान आहे ? 
श्री. सुदिन ढवळीकर
      पणजी - पोर्तुगिजांनी केलेले अत्याचार गोमंतकीय कदापि विसरू शकत नाहीत. गोमंतकियांनी पोर्तुगिजांना मान द्यावा, असे पोर्तुगिजांना वाटत असेल, तर गोव्यावर वसाहतवादी राजवट लादल्याबद्दल आणि वर्ष १९६१ मध्ये गोवा सोडून जाण्यापूर्वी गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोर्तुगिजांनी गोमंतकियांची क्षमा मागायला हवी, असे रोखठोक प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केले. मूळ गोमंतकीय असलेले आंतानियो कोस्ता हे पोर्तुगालचे पंतप्रधान झाल्याबद्दल काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मांडलेल्या अभिनंदन ठरावावर बोलतांना हे राष्ट्राभिमानी वक्तव्य मंत्री श्री. ढवळीकर यांनी केले.
     आम्ही इतिहास विसरू शकत नाही. ते एक मूळ गोमतंकीय आहेत; म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो. याचा अर्थ आम्ही पोर्तुगालला क्षमा केली, असा होत नाही, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. पोर्तुगीज राजवटीत गोव्याचा विकास झाला नाही.

परंपरागत सेवेकर्‍यांना सहा मासांत त्यांचे अधिकार मिळवून देणारच ! - ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात 
वारकरी आणि हिंदुत्ववादी यांनी फुंकले रणशिंग !
हिंदुत्ववादी आणि वारकरी संघटना यांचे पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बचाव आंदोलन !
      पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ जानेवारी २०१४ या दिवशी शासनाच्या कह्यात गेले. त्यास २ वर्षे पूर्ण झाली. मंदिरातील नित्योपचार आणि धार्मिक विधी शासकीय यंत्रणेने बंद केले. आम्हाला आमच्या परंपरांचा अभिमान आहे. ब्राह्मणद्वेषी राजकारण करून खाजगीवाले, होळकर संस्थान यांच्या पूजा बंद केल्या गेल्या. आम्हाला सेवेकर्‍यांच्या सेवा आणि त्यांचे योगदान मान्य आहे; म्हणून त्यांना परंपरागत विधीवत् नित्योपचार करण्याचे अधिकार मिळावेत, या मागणीसाठी हे आंदोलन म्हणजे हा शंखनाद आहे. येत्या सहा मासांत सेवेकर्‍यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यास शासनाला भाग पाडू, असे परखड प्रतिपादन ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्याकडून पाक गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन !

शिवसेनेचा विरोध 
हे आहे जीतेंद्र आव्हाड यांचे खरे स्वरूप !
     ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने पाकमधील गझलगायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी मासात हा कार्यक्रम होणार आहे. गुलाम अली यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली. आव्हाड यांनी शिवसेनेला जे करायचे ते करू दे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यास आव्हाड यांनी कार्यक्रम करूनच दाखवावा, अशा शब्दांत प्रतिआव्हान दिले आहे.

हिदुत्ववादी आणि वारकरी संघटना यांचे पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बचाव आंदोलन !

    
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ह.भ.प. वीर महाराज
      पंढरपूर - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले, जगात १५७ ख्रिस्त्यांची, ५२ मुसलमानांची, ज्यूंचे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. पण १०० कोटी हिंदूंचा भारत मात्र निर्धमी राष्ट्र आहे. याच एका निधर्मीपणाच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन करून हज यात्रा आणि मौलवींचे मानधन यावर १ सहस्र कोटींची खैरात केली जाते, तर दुसरीकडे हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांवर कर लादला जातो. हा कसला निर्धमीपणा ? सरकरीकरणाच्या नावाखाली भारतातील लक्षावधी मंदिरे कह्यात घेतली आहेत. केवळ हिंदूंची मंदिरे नष्ट करून हिंदू आणि हिंदू धर्म संपवण्याचे कुटील कारस्थान हे पुरोगामी शासनाला वेठीस धरून करत आहेत. हा आघात केवळ विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सेवेकर्‍यांवरील नाही, तर हिंदू आणि हिंदु धर्मावरही होत आहे. आपण अन्यायाविरुद्ध केवळ याचना करतो. याचकाला काही मिळत नाही, तर लढणार्‍यालाच मिळते.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत इतिहास गौरव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २६ जानेवारी
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारी
या दिवशी दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

मुंबई येेथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय : 
  • भारतातच विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे !
  • शनिशिंगणापूर देवस्थानची धार्मिक परंपरा मोडण्यासारखी धर्मविरोधी कृत्ये करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !
  • मालडा (पश्‍चिम बंगाल) येथे दंगल घडवणार्‍या आणि गोळीबार करणार्‍या अडीच लाख धर्मांधांवर कारवाई व्हावी !
वार आणि दिनांक : मंगळवार, १९ जानेवारी २०१६
वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ५
स्थळ : आझाद मैदान, मुंबई.
भ्रमणभाष क्रमांक : ९७६९६३४८०९ / ९३२२४६९०४० / ९९२०२०८९५८ / ९५५२४०२९९९
आयोजक : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधातील तक्रार अर्ज न्यायालयात प्रविष्ट करणार !

     कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट (दाखल) केला असला, तरी अदखलपात्र गुन्ह्याचे अन्वेषण कधीही होत नाही. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचे पत्र आणि कॉ. दिलीप पवार यांचा तक्रारअर्ज हा न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. यावर न्यायालय पुढील निर्णय घेईल, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी १६ जानेवारीला पत्रकारांना दिली.

चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुरेंद्रमहाराज देव यांची आत्महत्या

     चिंचवड, १७ जानेवारी - येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुरेंद्रमहाराज धरणीधर देव (वय ६३ वर्षे) यांनी मंगलमूर्ती वाड्यातील त्यांच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना झाली आहे. ही घटना १७ जानेवारी या दिवशी पहाटे झाली असून आत्महत्येचे कारण अद्यापी स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, स्नुषा आणि २ नाती असा परिवार आहे. सुरेंद्रमहाराज देव हे वर्ष २००१ पासून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त पदावर कार्यरत होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती म्हणून काम पाहिले होते. ते टाटा मोटर्स या आस्थापनामध्ये अधिकारी या पदावर होते, पण त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

मद्यपी पोलिसांकडील एक गावठी कट्टा आणि २ काडतुसे चोरीला

अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे ?
     पुणे, १७ जानेवारी - नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने हे मद्याच्या नशेत पुणे रेल्वे स्थानक येथील पदपथावर झोपले होते. (अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक) त्या वेळी त्यांच्याकडे असलेला एक गावठी कट्टा आणि २ काडतुसे चोरट्यांनी चोरली आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या एका गुन्ह्यातील गावठी पिस्तुल आणि २ जीवंत काडतुसे यांची मुंबईच्या कलिना येथील प्रयोगशाळेत पडताळणी करायची होती. त्यासाठीच माने हे पिस्तुल घेवून मुंबईकडे निघाले होते. हा प्रकार १५ जानेवारी या दिवशी रात्री घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याधिकार्‍यांना निवेदन

     यवतमाळ - राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी शासनाने काढलेले विविध शासकीय निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांना १५ जानेवारीला निवेदन देण्यात आले.
     निवेदन स्वीकारतांना जिल्हाधिकार्‍यांनी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे सर्वश्री पिल्लेवार, दत्तात्रय फोकमारे, कैलास सुरसे, अमित जयस्वाल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप

      पुणे - चिंचवडचे आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांची भाजपच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार दिलीप गांधी यांनी यासंदर्भातील घोषणा केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे संघटन बळकट करून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. जगताप यांनी सांगितले.

गनिमीकाव्याने महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण !

तीन वर्षे विलंब झाल्याने क्रांती दल आक्रमक !
     जळगाव - बहिणाबाई उद्यान परिसरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे येथील क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी १४ जानेवारी या दिवशी पहाटे ५ वाजता अचानकपणे अनावरण केले. पुतळा पाण्याने स्वच्छ करून, दुग्धाभिषेक करून आणि पुष्पहार घालून पुतळ्याचे अनावरण झाल्याचे त्यांनी घोषित केले; मात्र पोलिसांनी तो परत काळ्या कापडाने झाकला. त्यामुळे परत त्याची विटंबना होत आहे. समितीने पुतळा तात्काळ मोकळा करावा अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी क्रांती दलाचे अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विसनजीनगर येथील राजपूत समाज मंदिर येथे १४ जानेवारी या दिवशी दुपारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. पुतळा अनावरणासाठी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्थेकडून होत असलेल्या विलंबामुळे क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे अनावरण केले. 

फलक प्रसिद्धीकरता

स्वरक्षणासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
     खार (मुंबई) येथील गोळीबार वसाहतीत एका विवाहित महिलेची भर रस्त्यात छेड काढत असलेल्या कुख्यात धर्मांध गुंडाला महिलेचा पती विरोध करत असतांना गुंड ठार झाला. याचा सूड म्हणून धर्मांधांनी तिच्या पतीच्या ३ मित्रांना अमानुष मारहाण करून एकाला ठार केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Khar, Mumbaime 3 Hinduonko kattarpanthiyo dwara amanviya marpitme 1 ki mrutyu.
Aise Hindu aur kitane din mare Jayenge ?
जागो !
: खार (मुंबई) में ३ हिन्दुआें को कट्टरपंथियों द्वारा अमानवीय मारपीट में एक की मृत्यु !
एैसे हिंदू और कितने दिन मारे जाऐंगे ?

सवंग लोकप्रियतेसाठी लाळघोटेपणा !

     पिंपरी येथे चालू असणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली. ते अध्यक्षपदी निवडून येताच त्यांच्या अंगात वारे शिरले आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तोंडसुख घेणारे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने सबनीस यांच्या विरोधात आंदोलनच चालू केले होते. त्यामध्ये सबनीस यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढणे, प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ करणे, सबनीस यांच्या कार्यक्रमात जाऊन निषेधाच्या घोषणा देणे, पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करणे आदी सर्व प्रकारे आंदोलन केले.

मराठी Expression ला English चा टेकू !

चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
इंग्रजाळलेल्या मराठी भाषेविषयी साहित्यिकांनी मांडलेले विचार
मराठी भाषिकाने माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे, याचे भान ठेवायला हवे !
१. काळाच्या प्रवाहात माणसांसमवेतच भाषेवरही परिणाम होणे : भाषा हे दोन माणसांमधील संवादाचे आणि भावनांच्या अभिव्यक्तीचे प्रगत माध्यम समजले जाते. संस्कृतीच्या प्रगल्भतेची खूण, बोलणार्‍या माणसाच्या व्यक्तीमत्त्वाची ती महत्त्वाची ओळख असते. काळाच्या प्रवाहात माणसे अंतर्बाह्य पालटतात. विचार, आचार, पोषाख आणि राहणीमान इत्यादींमध्ये पालट घडतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या भाषेवर होणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे.
२. मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची धास्ती ! : वेगवेगळ्या शब्दांमधील शब्दांचा सहज स्वीकार करणार्‍या आमच्या मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची, खरेतर अतिक्रमणाची धास्ती वाटत आहे. अशाने आपली शुद्ध भाषा एक दिवस मरून जाईल, अशी भीती भाषाप्रेमींना सतावत आहे.

इंग्रजाळलेली मराठी अर्थात् अद्याप दास्यवृत्ती !

१५ जानेवारी ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होत 
असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने... 
१. इंग्रजी शिक्षणाच्या भ्रामक कल्पनेमुळे पालकांनी मुलांना सांस्कृतिक मूल्यांपासून दूर करणे
     वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही. राजकारणाच्या सोयीसाठी आमचे राजकीय नेते आमच्यातील मराठी अस्मिता चेतवू पहात असले, तरी अभिजात आळसामुळे आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांमुळे मायबोलीच्या शुद्धतेविषयी जागरूक रहाण्याची निकड आम्हाला उमजत नाही. जगाची खिडकी मानल्या गेलेल्या इंग्रजी भाषेतून शिकलो, तरच आमच्या मुलांचा भाग्योदय होईल, या भ्रामक कल्पनेत जगणारे आमचे पालक सांस्कृतिक मुळे तोडून आपल्या मुलांना ना अरत्र, ना परत्र, असे अधांतरी सोडत आहेत. त्यांना अमेरिकी व्हिसाकडे डोळे लावायला बसवून संस्कृतीपासून तोडत आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

   भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
 (संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

तळमळ, प्रीती आणि चिकाटी हे गुण असलेले अन् भावपूर्ण सेवा करणारे रामनगर, बेळगाव येथील सनातनचे साधक शंकर गुंजेकर ५६ व्या संतपदी विराजमान !

पू. शंकर गुंजेकर
     बेळगाव - तळमळ, चिकाटी, प्रीती आणि गुरूंवर अपार श्रद्धा असणारे अन् भावपूर्ण सेवा करणारे साधक श्री. शंकर लक्ष्मण गुंजेकर (वय ५० वर्षे) हे सनातनच्या संतरूपी शृंखलेत ५६ वे संतरत्न म्हणून विराजमान झाले आहेत, असे सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी येथील एका कार्यक्रमात घोषित केले. या वेळी उपस्थित साधक भावविभोर झाले. पू. गुंजेकरकाका हे कोल्हापूर सेवाकेंद्रात व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका कु. तृप्ती गावडे यांचे मामा आहेत.
साधकांनो, व्यष्टी साधना वाढवा ! - पू. गुंजेकरकाका
     पू. गुंजेकरकाका म्हणाले, साधकांची साधना होऊन त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प.पू. डॉक्टरांची पुष्कळ तळमळ आहे. यासाठी साधकांनी व्यष्टी साधना वाढवायला हवी. साधकांचा भाव वाढायला हवा. सर्व कृती देव करत आहे, असे भाव ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. साधकांनी आनंदी राहून साधना करायला हवी.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिकांना आलेल्या अनुभूती

सौ. अश्‍विनी सावंत
सौ. अश्‍विनी सावंत
१ अ. प.पू. रामभाऊस्वामी यज्ञामध्ये स्वतःची आहुती देत असतांना ते साक्षात् विष्णूला प्रसन्न करत आहेत, असे वाटणे, त्या वेळी उच्च लोकांमध्ये असल्याचे जाणवणे : प.पू. रामभाऊस्वामी यज्ञामध्ये स्वतःची आहुती देत असतांना ते अग्निदेवता आणि श्री गणेश यांना प्रसन्न करून घेत आहेत, असे वाटले. हा विलक्षण क्षण अनुभवतांना मी उच्च लोकांमध्येच आहे, असे जाणवून पुष्कळ भावजागृती होत होती.
१ आ. प.पू. रामभाऊस्वामी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सनातन संस्था आणि साधक यांना त्यांचे आशीर्वाद, शक्ती आणि चैतन्य देत आहेत, असे जाणवणे आणि ही साक्षात् श्रीविष्णूची लीला आहे, असे वाटणे : प.पू. रामभाऊस्वामी यज्ञामधे स्वतःचीच आहुती देऊन, तसेच प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सनातन संस्था आणि साधक यांना त्यांचे आशीर्वाद, शक्ती आणि चैतन्य देत आहेत, असे जाणवले.

उच्छिष्ट गणपति यज्ञाचे कु. कल्याणी गांगण यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. कल्याणी गांगण
१. यज्ञ चालू होण्यापूर्वी गणेश पंचायतनाची पूजा केली. तेव्हा तिथे श्री गणपतीचे अस्तित्व जाणवत होते.
२. मंत्रोच्चार होत असतांना अवकाशातून देवतांचे चैतन्य आकृष्ट होत होते.
३. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञकुंडाची पहिली पूजा केली. तेव्हा श्री गणपतीने यज्ञकुंडाची शुद्धी करून यज्ञकुंडाभोवती कवच निर्माण केले आहे, असे जाणवले.
४. यज्ञकुंडात फुले आणि नारळ यांची आहुती दिली. तेव्हा वेगळाच धूर यज्ञकुंडातून बाहेर पडत होता; परंतु तो धूर चैतन्याच्या गोळ्यांच्या रूपात सर्वत्र पसरत होता.
५. यज्ञकुंडात मोदकाची आहुती दिली. तेव्हा त्या धुरातून ॐ गँ गणपतये नमः । हा नामजप सर्वत्र जात आहे, असे जाणवले.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साकार होण्यासाठी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाची सांगता !

    
पुढील रांगेत डावीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. डॉ. मुकुल गाडगीळ,
 श्री गणेश गोस्वामी आणि यज्ञात आहूती देतांना प.पू. रामभाऊस्वामी
रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकार होण्यासाठी आणि विश्‍वकल्याण व्हावे, या हेतूने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाची १७ जानेवारी या दिवशी सांगता झाली. शेकडो धर्माभिमानी, समाजातील मान्यवर, सनातनचे साधक यांनी दिवसभरात यज्ञाचे दर्शन घेतले.

प.पू. रामभाऊ दुपारपासून संध्याकाळपर्यंत यज्ञात आहुती देत असतांना कु. संध्या माळी यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. संध्या माळी
१. प.पू. रामभाऊस्वामी दुपारपासून संध्याकाळपर्यंत आहुती देत असतांना अग्निदेवतेच्या तत्त्वाशी एकरूप झाले आहेत.
२. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या ईश्‍वराप्रतीच्या उत्कट भावावस्थेमुळे सत्ययुग आले आहे.
३. काही वेळा प.पू. रामभाऊस्वामी हे प्रभु श्रीराम असल्याचे दिसत होते.
४. ते अग्नीला विविध प्रकारे याचना करून हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रजेचे (संपूर्ण मानवजातीचे) संरक्षण करण्यास विनवणी करत आहेत.
५. अग्नी ही पंचमहाभूतांतील मुख्य देवता असल्यामुळे अग्निदेवतेला पंचतत्त्वांचे संतुलन राखण्यास स्वतः प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत जाऊन याचना करत आहेत.
६. प.पू. रामभाऊस्वामी हा धर्म असल्याचे जाणवले.

प.पू. रामभाऊस्वामी यांनी स्वतःला अग्निकुंडात समर्पित केल्यावर होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

कु. प्रियांका लोटलीकर
     युगानुसार मनुष्याने कोणती साधना करायची ?, हे ईश्‍वराने मानवाला ठरवून दिले आहे. सत्ययुगामध्ये सर्व सोऽहम् भावामध्ये होते. त्रेतायुगामध्ये ध्यानधारणा, द्वापरयुगामध्ये यज्ञयाग आणि कलियुगामध्ये नामजप अशा साधना सांगण्यात आल्या आहेत. कलियुगातील मनुष्याभोवती असणार्‍या रज-तमाच्या आवरणामुळे आणि नीतीमत्तेच्या र्‍हासामुळे ध्यानधारणा आणि यज्ञयागानुसार साधना करणे शक्य नसले, तरी त्यातून प्राप्त होणारे फलित हे अधिक आहे. त्रेतायुगातील ध्यानधारणेप्रमाणे मनुष्याला साधना करणे कलियुगात शक्य नसले, तरी कलियुगामध्ये यज्ञयागानुसार साधना अल्प प्रमाणात केली जाते.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

पुढील रांगेत डावीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ यज्ञकुंडाचे पूजन करतांना
पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि प.पू. रामभाऊस्वामी आणि श्री. गणेश गोस्वामी
     हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकार होण्यासाठी आणि विश्‍वकल्याण व्हावे, या हेतूूने १५ ते १७ जानेवारी या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. १५ आणि १६ जानेवारी या दिवशी झालेल्या यज्ञाच्या वेळी सनातन आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेले त्रास येथे देत आहोत.

यज्ञ आणि प.पू. रामभाऊस्वामी यांच्यातील चैतन्यामुळे साधिकेला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचे प्रकटीकरण होणे

     १६.१.२०१६ या दिवशी सकाळी १० वाजता यज्ञस्थळी उपायांसाठी बसले. तेव्हा यज्ञाची सिद्धता करणे चालू होते. प.पू. रामभाऊस्वामी यांचे आगमनही झाले नव्हते, तरीही मला त्रास देणारी मोठी वाईट शक्ती पूर्णपणे प्रकट होती. माझे जपामध्ये लक्ष अजिबात लागत नव्हते. माझ्या मनाला पुष्कळ अस्वस्थता जाणवत होती. देवतांच्या गीतांचे पार्श्‍वसंगीत चालू असतांना मी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांसमोर बेभान होऊन नृत्य करत होते. वास्तविक पहाता मला नृत्य अजिबात करता येत नाही. ते प्रकटीकरण कसे थांबवावे, हे मला कळत नव्हते. थोड्या वेळाने प.पू. रामभाऊ स्वामी यांचे आगमन झाले. तेव्हा मला त्रास देणार्‍या मोठ्या वाईट शक्तीचे नृत्य थांबले आणि ती स्थुलातून प्रकट होऊ लागली. तेव्हा पू. सौ. योयाताईंनी माझ्या जवळ येऊन मला धरले आणि प्रकटीकरण शांत होण्यासाठी दोन्ही हातांनी कानांच्या पाळ्यांवर दाब देण्यास सांगितले. तेव्हा प्रकटीकरण थोडे अल्प झाले. नंतर मला यज्ञाच्या बाजूला असलेल्या सभागृहात बसवण्यात आले. तेथे यज्ञाच्या चित्रीकरणाची ऑनलाईन सेवा चालू होती. तेथील संगणकावर प.पू. रामभाऊस्वामींचे मला दर्शन होत होते. त्यांचे चैतन्य सहन न झाल्याने मोठी वाईट शक्ती त्यांच्याकडे एकटक पहात त्राटक करत होती.
- कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०१६)

यज्ञाभोवती परिक्रमा करतांना यज्ञातून निघणार्‍या धुराची जाणवलेली वैशिष्ट्ये

१. सकाळी ज्या समिधांची यज्ञात आहुती दिली, त्या आहुतीमधून निघालेल्या धुराशी प.पू. रामभाऊस्वामींनी संवाद साधला. यज्ञाला परिक्रमा घालत असतांना ते यज्ञातून निघालेला धूर ब्रह्मांडात जेथे-जेथे आवश्यक आहे, त्या दिशेने पाठवत असल्याचे जाणवले.
२. प.पू. रामभाऊ स्वामी यज्ञाला परिक्रमा घालतांना प्रत्यक्ष अग्निदेव ज्वाळांच्या स्वरूपात यज्ञाला परिक्रमा घालत असल्याचे जाणवले.
३. प.पू. रामभाऊस्वामींनी यज्ञाभोवती परिक्रमा घालणे, म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीभोवतीच परिक्रमा आहे. त्यामुळे सृष्टीच्या कल्याणासाठी होत असलेल्या यज्ञातील दैवी धुराला ते चारही दिशांना पाठवत असल्याचे वाटले.

१६.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील उच्छिष्ट गणपति यज्ञाविषयी लेख वाचतांना प.पू. रामभाऊस्वामी यांच्याप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे

    यज्ञापूर्वी सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनाप.पू. रामभाऊस्वामी म्हणाले, साधकांचे त्रास दूर होण्यासाठी मी स्वत: समिधा होईन. दैनिक सनातन प्रभातमध्ये या ओळी वाचतांना माझी भावजागृती झाली. त्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त होऊन माझ्या अंगावर शहारे येत होते. त्या वेळी मला जगाच्या कल्याणा संतांची विभूती या वाक्याची आठवण झाली. 
- कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या पहिल्या दिवशी आलेल्या अनुभूती

सौ. आरती पुराणिक
१. यज्ञस्थळी दिवे लावतांना विश्‍वात कुठेतरी अज्ञातस्थळी चैतन्याची स्थाने निर्माण होऊन त्यांतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : १५.१.२०१६ या दिवशी सकाळी उच्छिष्ट गणपति यज्ञ चालू होण्यापूर्वी श्री गणेशाच्या कृपेने मला दीपपूजन करण्याची संधी मिळाली. मी दिवे लावत असतांना जशी जशी प्रत्येक ज्योत प्रज्वलित होत होती, तसतसे विश्‍वात कुठेतरी (कुठे ते कळले नाही.) चैतन्याची स्थाने निर्माण होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे, असे मला जाणवले.
२. मला यज्ञस्थळी पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि प्रत्येक कृती करतांना पुष्कळ भावजागृतीही होत होती.
- सौ. आरती पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प.पू. रामभाऊस्वामी यज्ञस्थळी बसल्यावर त्यांच्याकडे पाहून जाणवलेली सूत्रे

१. प.पू. रामभाऊस्वामी हे श्री गणेश आणि त्यांचे गुरु यांना अत्यंत तळमळीने अन् भावपूर्ण प्रार्थना करत आहेत.
२. यज्ञाच्या वेळी ते त्यांच्या गुरूंशी संपूर्णतः एकरूप झाले आहेत आणि जरी त्यांचा देह येथे असला, तरी ते सूक्ष्म रूपाने संपूर्ण ब्रह्मांडात व्यापले आहेत.
३. यज्ञाच्या वेळी यज्ञातून प्रज्वलित झालेल्या ज्वाळा आणि धूर यांच्याशी प.पू. रामभाऊस्वामी हे प्रकाश भाषेत संवाद साधत आहेत अन् ते यज्ञदेवतेला प्रत्येक आहुती ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
४. यज्ञात प्रत्येक आहुती देण्यापूर्वी ते यज्ञदेवता, अग्निदेवता, श्री गणेश आदींचे स्मरण करून शरणागत भावाने आहुती अर्पण करत आहेत.

यज्ञाच्या आरंभी गोमाता, गजराज, अग्नि आदींचे पूजन चालू असतांना केलेले सूक्ष्म परीक्षण

कु. नंदिता वर्मा
१. यज्ञस्थळी प.पू. रामभाऊस्वामींच्या गुरूंचे छायाचित्र लावणे
अ. यज्ञाला आरंभ होण्यापूर्वी यज्ञकुंडाजवळच्या कनातीवर प.पू. रामभाऊस्वामींच्या गुरूंचे छायाचित्र लावण्यात आले. तेव्हा त्यातून प्रचंड प्रमाणात चैतन्य यज्ञस्थळी प्रक्षेपित झाले.
आ. त्या छायाचित्राकडे पहातांना मला त्यांचे तेज सहन होत नव्हते. त्यामुळे सूर्याकडे पाहिल्याप्रमाणे माझे डोळे विस्फारले गेले.
२. गोपूजन
अ. यज्ञस्थळी प.पू. रामभाऊस्वामी आल्यावर त्यांच्यात श्री गणपतीचे अस्तित्व जाणवले.

अग्नीला स्पर्श होताच पेट घेणारी कापराची वडी यज्ञकुंडावर ठेवूनही न पेटणे, तसेच प.पू. रामभाऊस्वामी स्वतःला यज्ञकुंडात समर्पित करूनही त्यांना अग्नीची दाहकता न जाणवणे

     श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तमिळनाडू, तंजावूर येथील प.पू. रामभाऊस्वामी १५ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीमध्ये सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ करत आहेत. आज प.पू. रामभाऊस्वामी यांनी यागाला प्रारंभ करण्यापूर्वी कापराची एक मोठी वडी काल केलेल्या यज्ञकुंडावर धरली, तरी ती जळली नाही. या यज्ञकुंडातील अग्नी आजही प्रज्वलित होता. तीच कापराची वडी त्यांनी त्या ठिकाणी लावलेल्या समईतील ज्योतीवर धरल्यावर त्या कापराच्या वडीने लगेच पेट घेतला.

प.पू. रामभाऊस्वामींच्या यज्ञकुंड प्रवेशामुळे आठवण होते गोव्यातील श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुनदेवाच्या शिर्षारान्नी उत्सवाची !

     श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवाचा वार्षिक जत्रोत्सव असतो. एका वर्षी शिर्षारान्नी आणि दुसर्‍या वर्षी वीरामेळ हे उत्सव होतात. दोन्ही उत्सव भाविकांसाठी उत्कंठा वाढवणारे आणि रोमांचकारी आहेत.
    शिर्षारान्नी शिष+रांधणी मिळून शिर्षारान्नी हा शब्द बनला आहे. या उत्सवाला दुपारी ३ वाजल्यापासून प्रारंभ होतो. यात भाग घेणारे गडे, वेळीप आणि भगत मिळून देवाला गार्‍हाणे घालून प्राकारात येतात. तीन ठराविक गड्यांच्या डाव्या दंडावर गरे (गळ) टोचले जातात. तिन्ही गड्यांना एकमेकांजवळ डोकी ठेवून आडवे झोपवले जाते. त्यांच्या तिन्ही शिरांची (शिर्षांची) रांधण (चूल) करून त्यावर मातीचे भांडे ठेवून त्यात अर्धा किलो तांदुळ शिजवला जातो. 
- श्री. नारायण द. नाईक गावकर, देळे, काणकोण

प.पू. रामभाऊस्वामी दुर्वांच्या आहुतीच्या वेळी यज्ञाच्या ज्वाळांमध्ये स्वतःला समर्पित करत असतांना केलेले परीक्षण

कु. रजनी कुर्‍हे
१. प.पू. रामभाऊस्वामी स्वतः समिधा बनून समष्टी कल्याणासाठी स्वतःच्या देहाची, म्हणजेच पंचतत्त्वाची दैवी आहुती देत आहेत.
२. धगधगत्या यज्ञकुंडामधे प.पू. रामभाऊस्वामींनी स्वतःला समर्पित केल्यावर त्यांची शाल थोडी जळली. याचे कारण मी देवाला विचारल्यावर देवाने सांगितले, समष्टी पाप आणि वाईट शक्तींचा जोर पुष्कळ वाढला असल्याने संतांच्या जिवावर बेतेल एवढा भयानक आपत्काळ येणार असल्याचे ते द्योतक आहे; मात्र ईश्‍वराच्या कृपाशीर्वादामुळे सर्व साधकांचे रक्षण होणार आहे.
३. भावाच्या अत्युच्च स्थितीत 
श्री गणेशाला समर्पित करत असल्याचे जाणवणे
     प.पू. रामभाऊस्वामी यज्ञाच्या कठड्यावर बसून यज्ञाच्या ज्वाळा अधिक प्रज्वलित होण्यासाठी स्वतःमधील अग्नीतत्त्व वाढवत असल्याचे जाणवले. यज्ञात अग्नी संपूर्णपणे प्रज्वलित झाल्यावर प.पू. रामभाऊस्वामी यांनी त्यात दुर्वांची आहुती दिली. त्या वेळी ते भावाच्या अत्युच्च स्थितीत जाऊन श्री गणेशाला दूवार्र् समर्पित करून दुर्वांसमवेत स्वतःची आहुती श्री गणेशाला समर्पित केली, असे वाटले.

उच्छिष्ट गणेशयागासाठी बनवलेल्या यज्ञवेदीकडे बघतांना श्रीकृष्णाने दाखवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

पू. सखदेवआजी यांना आलेली अनुभूती आणि झालेला त्रास

१. पू. आजींनी गजाला नमस्कार केल्यावर त्याने सोंड 
वरच्या दिशेने करून त्यांना आशीर्वाद दिल्याचे जाणवणे
पू. (सौ.) आशालता सखदेव
    उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या आरंभी गजाचे पूजन करण्यात येणार होते. यज्ञस्थळी जाण्यापूर्वी गजाला एके ठिकाणी उभे केले होते. ते ठिकाण पू. आजींच्या खोलीच्या खालच्या बाजूला होते. तेथे गज २५ - ३० मिनिटे होता. पू. आजींनी गजाचे डोळेभरून दर्शन घेतले. पू. आजींनी गजाला नमस्कार केल्यावर त्याने सोंड वरच्या दिशेने केली. जणू त्याने पू. आजींना आशीर्वाद दिला, असे वाटले. (गजाला पाहिल्यावर तो गज नसून प्रत्यक्ष गणपति आहे, असे वाटत होते. टंकलेखन करतांना हत्ती या शब्दाऐवजी गज हा शब्द लिहिला गेला. - कु. राजश्री)

उच्छिष्ट शब्दाचे अर्थ

प.पू. रामभाऊस्वामी
१. गुरूंनी सर्व भोजन स्वीकारल्यावर त्यांचा कृपाप्रसाद म्हणून शेवटी जे शिल्लक रहाते, त्याला उच्छिष्ट असे म्हणतात. ते सर्वांत उत्तम असते. शिष्यासाठी गुरूंच्या उच्छिष्टाला पुष्कळ महत्त्व आहे.
२. भगवंताचे वर्णन करतांना वेद नेति नेति, म्हणजे तो हा नाही, तो हा नाही, असे म्हणतात. असे प्रत्येक गोष्ट तो नाही, तो नाही, असे म्हटल्यावर शेवटी उत्तम जे शिल्लक रहाते, ते म्हणजे परब्रह्म. उच्छिष्ट (उत् + शिष्ट), म्हणजे सर्व व्यापून शिल्लक राहिलेले, म्हणजेच परब्रह्म. येथे उच्छिष्ट गणपति म्हणजेच महागणपति किंवा परब्रह्मस्वरूप गणपति.
- प.पू. रामभाऊस्वामी, तंजावर, तमिळनाडू.
उच्छिष्ट गणपति यज्ञ
     गणपति हा ॐकार स्वरूप आहे. त्या गणपतीरूपी परब्रह्माला उद्देशून केलेला यज्ञ म्हणजे उच्छिष्ट गणपति यज्ञ !

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या दुसर्‍या दिवशी (१६.१.२०१६) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जाणवलेली सूत्रे

     समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या निमित्ताने...
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना 
आलेले वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती
यज्ञस्थळी उपस्थित असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले
अ. यज्ञाच्या विभूतीला सुगंध येतो.
आ. प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडात बसलेले असतांना त्यांनी माझ्याकडे एक क्षणभर पाहिले. तेव्हा त्यांच्या दृष्टीतील तेज मला सहन झाले नाही.
२. यज्ञाचा धूर
अ. आज यज्ञकुंडातील ज्वाळा १० - १५ मिनिटे ८ - १० फूट उंच होत्या.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
      अहो रूपम् अहो ध्वनिः । म्हणजे (गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत.
 तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला 
पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 
परात्पर गुरु डॉ. आठवले
    मुसलमान स्व धर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माबद्दल विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कोणी विचारत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

जर्मनीसमोरील जाज्वल्य प्रश्‍न !

      युरोपीय संघात जर्मनी हा दादा देश म्हणून ओळखला जातो. रशियावर आर्थिक निर्बंध घालणे किंवा दिवाळखोरीत निघालेल्या ग्रीसला साहाय्य करावे कि नाही, यांविषयी जर्मनी सांगेल ती पूर्व दिशा ! जर्मनीच्या व्हाईस चान्सलर अँजेला मर्केल या खमक्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विरोधकच काय; पण स्वकियांच्या विरोधालाही न जुमानता घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही करणे, हा त्यांचा स्वभाव. इसिसच्या अत्याचारांना कंटाळून स्वतःच्या माता-पित्यांसह सिरीयातून युरोपला निघालेल्या आयलन कुर्दीचा बुडून अंत झाला. आयलन याचा निपचित पडलेल्या मृतदेहाची छायाचित्रे जगभर प्रसारित झाली. ही छायाचित्रे पाहून मर्केलबाईही हळव्या झाल्या आणि त्यांनी इसिसला कंटाळून देश सोडणार्‍या निर्वासितांसाठी जर्मनीचे द्वार उघडले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn