Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज हिंदु वार्ताचा प्रथम वर्धापनदिन (तिथीनुसार)


(म्हणे) 'पुरोगाम्यांचे मारेकरी नथुरामच्या विचारसरणीचे !' - श्रीपाल सबनीस

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ
पिंपरी, १६ जानेवारी (वार्ता.) कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, कलबुर्गी यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांची हत्या करणारे नथुरामच्या विचारसरणीचे असून त्या मारेकर्‍यांचा मी निषेध करतो, असे हिंदुद्वेषी विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. पिंपरी येथील 'हिंदुस्थान अँटिबायोटिक्स'च्या मैदानावर १६ जानेवारी या दिवशी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सबनीस बोलत होते. 
 संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माजी कृषीमंत्री शरद पवार, पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय्. पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, महापौर सौ. शकुंतला धराडे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष सदानंद मोरे, तसेच खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

प्रवेश परवाना पद्धतीसाठी मेघालय आणि मणीपूर या राज्यांमध्ये प्रचंड हिंसाचार !

       पूर्वोत्तर भारतातील तीन राज्यांत चालू असलेली ही प्रवेश परवाना पद्धत आता आमच्या राज्यांतही चालू करा, अशी मागणी मेघालय आणि मणीपूर या दोन राज्यांतून (ही राज्येही ख्रिस्तीबहुल बनली आहेत आणि तेथेही अशीच मागणी होते, हाही योगायोग मानू नये.) मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांची ही निवळ मागणी नसून त्यासाठी प्रचंड हिंसाचार केला जात आहे. तेथील अल्पसंख्य हिंदू केंद्रशासनाकडे आशेने पहात आहेत. यावर त्वरित उपाय न योजल्यास भविष्यात भारतात आणखी दोन विदेश निर्माण होतील, अन् आपल्याला पुन्हा तेथे प्रवेशासाठी परवाना मिळवण्याच्या रांगेत तिष्ठत उभे रहावे लागेल ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती. (२७.१२.२०१५)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे झालेल्या 'उच्छिष्ट गणपति यज्ञा'चे अनेक मान्यवरांनी घेतले दर्शन !

यज्ञाचे दर्शन घेतांना डावीकडून श्री. राजेश कवळेकर, सौ. ज्योती ढवळीकर,
कु. मिथिल ढवळीकर आणि मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, तसेच यज्ञकुंडासमोर
प.पू. रामभाऊस्वामी अन् त्यांच्या मागे सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग
     रामनाथी (गोवा) - 'हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साकार होण्यासाठी आणि विश्‍वकल्याण व्हावे', या हेतूने १६ जानेवारी या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 'उच्छिष्ट गणपति यज्ञ' भावपूर्ण वातावरणात पार पडला. तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली हा यज्ञ झाला. अनेक हिंदुत्ववादी, लोकप्रतिनिधी यांनी आज यज्ञाचे दर्शन घेतले. या यज्ञाचे यजमान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ होते. सकाळी यज्ञवेदीचे भावपूर्ण पूजन झाले. या वेळी यज्ञवेदीच्या चारही बाजूंनी ठेवलेल्या समया सुवासिनींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर प.पू. रामभाऊस्वामींनी नारळ, फुले, आदी पवित्र वस्तूंच्या यज्ञात आहुती दिल्या. या वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश गोस्वामी उपस्थित होते. यज्ञाचे पौरोहित्य श्री. महेश्‍वरन् आणि श्री. राधाकृष्णन यांनी केले. सायंकाळी पूर्णाहुती होऊन यज्ञाची सांगता

जिहाद्यांनो, दाढी ठेवू नका, तसेच पाश्‍चात्त्यांप्रमाणे पोषाख करा !

अशा धूर्त इसिसशी दोन हात करण्यासाठी भारत शासनाकडे कोणती नियमावली आहे ?
सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी इसिसची क्लृप्ती
     इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने तिच्या आतंकवाद्यांना दाढी न ठेवण्याचा, तसेच संपूर्ण पाश्‍चात्त्य पद्धतीचा पोषाख करण्याची सूचना दिली आहे. सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी इसिसने आतंकवाद्यांसाठी सेफ्टी आणि सेक्युरिटी गाईडलाइन फॉर लोन वुल्फ मुजाहिदिन ही ५८ पानांची नियमावली सिद्ध केली आहे. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. यात पुढे म्हटले आहे,
१. सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी दाढ्या कापाव्यात, दात घासण्यासाठी मिसवाकचा (एक प्रकारची वनस्पती) वापर करू नये, कुर्ता परिधान न करता पाश्‍चात्त्य पद्धतीचा पेहराव करा, इस्लामी साहित्य जवळ बाळगू नका. 
२. तुम्ही स्वत: ख्रिस्ती आहात, असे भासवा.

महाविद्यालयात जातांना विद्यार्थिनींनी लिप्स्टिक लावण्याची आवश्यकता नाही ! - कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला

आता स्त्रीमुक्तीवाले राज्यपालांच्या विरोधात मोहीम उघडणार, हे निश्‍चित !
     महाविद्यालयात जातांना विद्यार्थिनींनी लिप्स्टिक लावण्याची अथवा वैशिष्ट्यपूर्ण केशरचना करण्याची आवश्यकता नाही. महाविद्यालयात विद्यार्थिनी शिकण्यासाठी जातात कि सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी ? - वाजूभाई वाला, राज्यपाल, कर्नाटक.(१२.१.२०१६)

पाकमधील आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा ! - योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा यांच्या आवाहनानुसार शासन आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करील का ?
     इट का जबाब पत्थर से देंगे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सांगत सुटले होते. त्याचीच मला आता मोदी यांना आठवण करून द्यावीशी वाटत आहे. पाकिस्तानने आपल्या २ सैनिकांची मुंडकी उडवली असतील, तर आपण त्यांच्या १० सैनिकांची मुंडकी उडवून त्यांना इट का जबाब पत्थर या पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची आज आवश्यकता आहे. असे केले, तरच देशवासियांमध्ये मोदी शासनाविषयी एक विश्‍वासाची भावना निर्माण होईल. - योगऋषी रामदेवबाबा (१२.१.२०१६) 

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करता येणार नाही ! - सर्वोच्च न्यायालय

हिंदूंनो, धर्मशास्त्र जाणून घ्या !
      केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करता येणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अधिवक्त्यांच्या एका संघटनेने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मंदिराच्या परंपरेनुसार तरुण मुलींना आणि महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. या याचिकेवर न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती एन्.व्ही. रमण यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. हे सार्वजनिक मंदिर असून प्रत्येक व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.(१३.१.२०१६) आज श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा

कर्जत (जिल्हा रायगड) - १७ जानेवारी २०१६ या दिवशी श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा पार पडणार आहे. दिंडीची सुरुवात गोगटेवाडा, कर्जत येथून सकाळी ८.३० वाजता होईल आणि कर्जत (मार्केट यार्ड) ते कोंढाणे असा प्रवास करून दिंडीचे मंदिरात आगमन होईल.

धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍यांच्या विरोधात शंकराचार्य, संत, महंत आणि धर्माचार्य यांनी रणशिंग फुंकले !

प.पू. ह.भ.प. दिनकर महाराज अंचवले यांचा अमृतमहोत्सव समारोह
उपस्थित संत, महंत आणि धर्माचार्य

शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍यांवर शासनाने योग्य ती कारवाई करावी ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज
नगर, १६ जानेवारी (वार्ता.) - पुरोगामित्व आणि कथित स्त्री-पुरुष समानतेचा डांगोरा पिटणार्‍या काही पुरो(अधो)गामी महिलांकडून शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या लोकांना धर्माविषयी काही देणे-घेणे नाही, अशा लोकांकडून जाणीवपूर्वक अशा कृती केल्या जात आहेत. हे सर्व प्रकार म्हणजे लोकांची धर्मावरील श्रद्धा अल्प करण्याचा भाग आहे. त्यामुळे ही सभा त्यांचा निषेध करते. त्याचबरोबर आम्ही शासनाला सांगतो की, देवतांचे नियम पाळले गेले पाहिजेत. त्याच्या विरोधात जाऊन परंपरा तोडण्याचा प्रयत्न करणारे अतिरेकी विचारसरणीचे जे लोक आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर सर्व धर्माचार्यांचे मत विचारात घेऊन त्याप्रमाणे योग्य ती पावले उचलावीत, असे मार्गदर्शनपर उद्गार प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी काढले. प.पू. (ह.भ.प.) दिनकर महाराज अंचवले यांच्या अमृतमहोत्सवाचा समारोह कार्यक्रम श्री विठ्ठलनगरी, श्री क्षेत्र वरूर (धाकटी पंढरी), तालुका शेवगाव, जिल्हा नगर येथे संपन्न झाला. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी प.पू. (ह.भ.प.) दिनकर महाराज अंचवले आणि त्यांच्या धर्मपत्नी यांची ग्रंथ आणि साखर यांद्वारे तुला करण्यात आली. तसेच उपस्थित शंकराचार्य, संत, महंत आणि धर्माचार्य यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा भरघोस प्रतिसाद

देहली येथील विश्‍व पुस्तक मेळा
प्रदर्शनस्थळी स्वामी अवधेशानंद (उजवीकडे) आणि
श्री. विनय पानवलकर

(म्हणे) आयएस्आयएस् आणि सनातन संस्था यांसारख्या संघटना धार्मिक कट्टरता निर्माण करून तरुणांना स्वत:कडे खेचत आहेत ! - डॉ. सुरेश खैरनार

राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेची आयएस्आयएस्शी 
बरोबरी करणे म्हणजे डॉ. खैरनार यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल !
     बार्शी (जिल्हा सोलापूर), १६ जानेवारी - आयएस्आयएस् आणि सनातन संस्था यांसारख्या संघटना धार्मिक कट्टरता निर्माण करून तरुणांना स्वत:कडे खेचत आहेत. त्यामुळे देशासमोर नवीन आवाहने निर्माण होत आहेत. इतिहास आणि संस्कृती यांचे विद्रूपीकरण करणार्‍या सनातनी व्यवस्थेपासून तरुणांनी सावध रहावे, अशी मुक्ताफळे अभ्यासक आणि संशोधक (?) डॉ. सुरेश खैरनार यांनी उधळली आहेत. राष्ट्र सेवा दल आणि समविचार संघटना यांनी येथील संत तुकाराम सभागृहात जिजाऊ आणि विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आवाहने या विषयावरील व्याख्यानाच्या प्रसंगी ते बोलत होते.

ठाणे, अंबरनाथ आणि शहापूर येथे समितीच्या कार्यकर्त्यांना स्थानिक समितीमध्ये घेणार ! - ठाण्याचे तहसीलदार

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम ! 
डावीकडून श्री. दीपक महाराणा, श्री. अतुल देव, 
सौ. सुप्रिया गायकवाड आणि ठाण्याचे तहसीलदार श्री. दिनेश कुर्‍हाडे
    ठाणे, १६ जानेवारी (वार्ता.) - न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून हिंदु जनजागृती समितीचा अशासकीय संस्था म्हणून समावेश करण्यात येईल, असे आश्‍वासन ठाणे जिल्हा तहसीलदार, सामान्य शाखा श्री. दिनेश कुर्‍हाडे, अंबरनाथ नगरपालिकेचे तहसिलदार श्री. सानप, तसेच शहापूर येथील तहसीलदार श्री. अविनाश कोष्टी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. या प्रसंगी समिती स्थापन करण्यासाठी श्री. कुर्‍हाडे यांनी तत्परतेने जिल्हाधिकार्‍यांच्या अनुमतीसाठी अंतर्गत कार्यालयीन पत्र देण्याचे निर्देश सहकार्‍यांना दिले. या वेळी बजरंग दलाचे श्री. कमलेश गुप्ता, श्री. प्रदीप सिंग, राष्ट्राभिमानी श्री. दीपक महाराणा, स्वराज्य ग्रुपचे श्री. रूपेश शेळके, श्री. स्वप्नील शिवराम भोईर, वाहतूक चालक-मालक संघटनेचे श्री. संजय तांबोळी, राष्ट्राभिमानी श्री. श्रीकांत काबाडी, श्री. सुशांत खिसमतराव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल देव, सौ. सुप्रिया गायकवाड तसेच सनातन संस्थेच्या सौ. वैशाली कोथमिरे आणि श्री. बाऊसकर उपस्थित होते. कल्याण येथे निवेदन देतांना भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहर उपाध्यक्ष श्री. उपेंद्र डहाके आणि हिंदु धर्माभिमानी श्री. उमेश बडे उपस्थित होते.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदुत्ववाद्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 
डावीकडून सौ. सुप्रिया गायकवाड, सौ. सविता लेले, 
श्रीमती सारंगी महाजन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना
     ठाणे, १६ जानेवारी (वार्ता.) - शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भारतीय संस्कृतीविषयी खोटा आणि अवमानजनक माहिती देणारा आणि महाराष्ट्रातील संत अन् देवता यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारा एन्.सी.ई.आर्.टी.चा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, तसेच काश्मीर येथील हिंदूंवरील अत्याचारांना वंशसंहाराची मान्यता देऊन न्यायिक लवादाद्वारे त्याची चौकशी करण्यात यावी आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे स्वतंत्र भागात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, या मागण्यांसाठी ठाणे येथे ९ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन १२ जानेवारी या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. सौ. अश्‍विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सर्व मागण्या शासनाच्या संबंधित विभागांना कारवाईसाठी पाठवण्यात येतील, असे सौ. जोशी यांनी सांगितले. सारा फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी महाजन, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुप्रिया गायकवाड आणि सौ. सविता लेले याप्रसंगी उपस्थित होत्या.

भारत आणि इस्रायल पाक अण्वस्त्रांच्या कक्षेत !

हाफिज सईदचे फुत्कार
इस्लामाबाद - भारत आणि इस्रायल ही दोन्ही शत्रू राष्ट्रे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या कक्षेत आहेत, असे फुत्कार लष्कर-ए-तोएबा या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील २६/११च्या आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याने लाहोर येथील सभेत काढले.

अध्यक्षपद मिळाल्यास चीनला वठणीवर आणीन ! - डेव्डिड ट्रम्प

      वॉशिंग्टन - चीनने अमेरिकेला व्यापारात मागे टाकले आहे; पण चीनने चलन अवमूल्यनासारख्या खेळी करणे थांबवले नाही, तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर चिनी वस्तूंवर कर लावीन आणि चीनला वठणीवर आणीन, असे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

(म्हणे), मसूद अझरला अटक नव्हे, तर प्रतिबंधात्मक कोठडी !

पाकची धूळफेक चालूच !
     इस्लामाबाद - पठाणकोटमधील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार मानल्या जाणार्‍या मौलाना मसूद अझरला अटक झाली नसून त्याला केवळ प्रतिबंधात्मक कोठडी देण्यात आल्याचे पाकचे कायदामंत्री राणा सानौल्लाह यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपद मिळाल्यास चीनला वठणीवर आणीन ! - डेव्डिड ट्रम्प

      वॉशिंग्टन - चीनने अमेरिकेला व्यापारात मागे टाकले आहे; पण चीनने चलन अवमूल्यनासारख्या खेळी करणे थांबवले नाही, तर मी अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर चिनी वस्तूंवर कर लावीन आणि चीनला वठणीवर आणीन, असे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सदैव सिद्ध ! - सैन्यप्रमुख

     नवी देहली - भारतीय सैन्य कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सिद्ध आहे. नेपाळ तसेच देशात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही साहाय्य करण्यासाठी सैन्याने पुढाकार घेतला होता, असे मत भारतीय सैन्यप्रमुख दलबिरसिंह सुहाग यांनी मांडले. ते ६८ व्या सैन्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रध्वज समितीवर सदस्यत्व देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

राष्ट्रध्वजाचा मान राखा ! - चळवळ 
उपजिल्हाधिकारी (उजवीकडे) श्री. सुलाणे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     नंदुरबार - जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रध्वज अवमान रोखण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करावी, असा न्यायालयीन आदेश आहे. त्याप्रमाणे समिती स्थापन करण्यात यावी आणि त्या समितीवर हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आज पंढरपुरात (जिल्हा सोलापूर) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बचाव आंदोलन

समस्त वारकरी, फडकरी, संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटनाचा आंदोलनास पाठिंबा
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १६ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर अधिग्रहण कायदा करून मंदिर भक्तांच्या कह्यातून शासनाच्या नियंत्रणात घेतले. तेथे धर्मविरोधी आणि मनमानी कारभार चालू केला. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. शासनाने नेमलेली मंदिर समिती परंपरा आणि धर्मशास्त्र यांनुसार पूजाअर्चा करत नसल्याने मंदिराचे पावित्र्य अल्प झाले आहे. या निषेधार्थ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बचाओ आंदोलनाच्या वतीने रविवार, १७ जानेवारी २०१६ या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पश्‍चिमद्वार येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात समस्त धर्माभिमानी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनात सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी सहभागी होणार आहेत.

(म्हणे) भारत उद्ध्वस्त करणे आणि हिंदूंना ठार मारणे हे अल्लाकडून मिळालेले वरदान !

मौलवी इरफान-उल्-हक यांचा पराकोटीचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष !
      भारतातील मूर्तीपूजा नष्ट केल्यास आणि हिंदूंना ठार मारल्यास पाकिस्तान्यांना अल्लाकडून वरदान लाभेल, असे वक्तव्य मौलवी इरफान-उल-हक यांनी केले आहे. जगाच्या पाठीवर भारत हे एकमेव स्थान आहे, जेथे लोक मूर्तीपूजा करतात. भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याची संधी उपलब्ध होणे, हा पाकिस्तान्यांना अल्लाकडून मिळालेला मोठा सन्मान आहे. भारतात युद्ध होईल आणि हे युद्ध घझवा-ए-हिंद असेल, असा दावा प्रेषिताने केल्याचे मौलवीने सांगितले. भारत आणि हिंदु धर्म पाकिस्तानच्या हातून हरणार आहे, असा अल्लाचा संदेश असल्याचे मौलवींनी सांगितले. (१३.१.२०१६)

मालदा हिंसाचारातील प्रमुख आरोपी अजूनही मोकाट !

मालदा हिंसाचारातील प्रमुख आरोपींना तृणमूल काँग्रेसचा वरदहस्त 
असल्याचे लोकांना वाटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
     मालदा (बंगाल) - मालदा हिंसाचार होऊन ११ दिवस लोटल्यावरही बंगाल पोलीस हातावर हात धरून बसले आहेत. याप्रकरणी ११ जणांना अटक केली आहे; परंतु या हिंसारातील प्रमुख ४ आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. पोलीस अधिकारी अभिषेक मोदी यानी दिलेल्या माहितीनुसार अताऊल्ला शेख आणि अब्दुर रऊफ या दोघांच्या संदर्भात प्रथमदर्शी अहवाल दाखल करण्यात आला आहे, तर राजू मुराल फरार असून अशदुर बिश्‍वासला चौकशीसाठी अद्याप बोलावण्यात आलेले नाही. 
     अताऊल्ला यानेच हा मोर्चा बोलावला होता, रऊफवर गर्दी जमवण्याचा आरोप आहे, तर तृणमूलचा नेता विश्‍वास कालियाचकमध्ये तृणमूल काँग्रेसच्या निरीक्षकाची भूमिका निभावत होता, तसेच राजूवर हिंसक जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे.
    हिंदू महासभेचे नेते श्री. कमलेश तिवारी यांनी पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या कथित अनुद्गाराच्या विरोधात धर्मांधांनी मालदा येथे हिंसाचार घडवला होता. यात पोलीस ठाण्यासह मोठ्या प्रमाणात वाहने आणि घरे यांवर आक्रमण करण्यात आले होते.


ममता शासन बरखास्त करा ! - बजरंग दलाची मागणी

बंगाल शासनाच्या निषेधार्थ देहलीत बंग भवनसमोर निदर्शने
देहली येथील बंग भवनाच्या समोर आंदोलन
करतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते
     नवी देहली - बंगालमधील मालदा हिंसाचाराच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देहली येथील बंग भवनाच्या समोर जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी बंग भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. या वेळी आंदोलकांनी ममता शासन बरखास्त करावे, अशी मागणी केली. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 
     या वेळी आंदोलकांनी आरोप केला की, बंगालच्या ममता शासनाने अल्पसंख्यांकांना खुली मोकळीक दिली आहे. मालदा येथे हिसाचार करतांना कोणालाही प्रतिबंध करण्यात आला नाही. कोणावरही विशेष कारवाई करण्यात आली नाही. जी काही कारवाई करण्यात आली, तीही दिखावा करण्यासाठी होती. ममता शासन राजधर्माचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हे शासन बरखास्त करण्यात यावे. हिंदू महासभेचे नेते तिवारी यांनी मोहंमद पैंगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अनुद्गाराच्या विरोधात ३ जानेवरी या दिवशी मालदा येथे सुमारे अडीच लाख मुसलमानांनी मोर्चा काढला होता. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गोमांस घेऊन जाणार्‍या एका गाडीचा अपघात; ४ जण जखमी

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची 
कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
      पुणे, १६ जानेवारी - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने गोमांस आणि जनावरांची मुंडकी घेऊन जाणारे झायलो हे चारचाकी वाहन आणि एक ट्रक यांचा अपघात झाला आहे. ही घटना १४ जानेवारी या दिवशी पहाटे ५.४५ वाजता मळवली येथील देवळे गावाजवळ घडली. या अपघातामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. त्या सर्वांना सोमाटणे फाटा येथील पायोनियर या खाजगी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रगीताला उभे न राहिल्यामुळे दिग्दर्शक नीरज पांडे याला चित्रपटगृहाबाहेर काढले

राष्ट्र्रगीताचा अवमान रोखण्यासाठी संघटित होणार्‍या 
नागरिकांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या नागरिकांनी यातून बोध घ्यावा !
     मुंबई, १६ जानेवारी - गोरेगाव पूर्वेकडील एका मल्टीप्लेेक्स चित्रपटगृहामध्ये वजीर चित्रपट चालू आहे. त्या ठिकाणी रात्री ८ वाजताचा चित्रपटाचा खेळ पहाण्यासाठी दिग्दर्शक नीरज पांडे २ मित्रांसह गेले होते. चित्रपटाचा खेळ चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावल्यावर नीरज पांडे उभे राहिले नाहीत. त्यामुळे संतप्त प्रेक्षक आणि नीरज यांच्यामध्ये वादावादी झाली. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रेक्षकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी नीरज यांना पुढच्या खेळाची प्रवेशिका देऊ, असे सांगत चित्रपटगृहाच्या बाहेर काढले. या प्रकरणी नीरज यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. (गुन्हा प्रविष्ट न होण्यामागील कारण जनतेला समजले पाहिजे, हे शंकास्पद आहे. - संपादक)

४ एके-४७ बंदुका घेऊन धर्मांध पोलीस फरार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील बिजबेहारा येथून हवालदार मशूक अहमद ४ एके-४७ बंदुका घेऊन फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार २४ डिसेंबरला बिजबेहारामध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात पोलीस अधीक्षक इरशाद अहमद घायाळ झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी मशूकला ठेवण्यात आले होते; परंतु दोन दिवसांपासून तो कार्यालयात आला नाही, तसेच याच काळात पोलीस ठाणे परिसरातील तपासाच्या वेळी ४ एके-४७ बंदुका बेपत्ता झाल्याचेही आढळून आले. त्यानंतर या बंदुका चोरल्याचा संशय मशूकवर व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी त्याला कह्यात घेण्यासाठी दक्षिण काश्मीरमध्ये सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.


(म्हणे) सनातनचे असेच चालू राहिले, तर भविष्यात जनताच अशांची दखल घेईल !

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुन्हा एकदा सनातनच्या विरोधात वक्तव्य !
     महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्या करणारे अजून सापडत नाहीत. विद्यमान राज्यशासनाचा सनातनसारख्या संस्थांना आतून पाठिंबा आहे; म्हणूनच यांची मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना धमकी देण्याची हिंमत झाली. सनातनचे असेच चालू राहिले, तर भविष्यात जनताच अशांची दखल घेईल; कारण प्रत्येकालाच स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. जनक्षोभ उफाळून आल्यास धमक्या देणारे शिल्लक रहाणार नाहीत, या शब्दांत नारायण राणे यांनी सनातनला पुन्हा एकदा चेतावणी दिली. ते कणकवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जि. प. सदस्य मधुसूदन बांदिवडेकर उपस्थित होते. (११.१.२०१६) दोन पत्नी असणार्‍या उमेदवारांना नोकरी नाही !

शासन असा निर्णय देशातील इतरही राज्यांमध्ये का लागू करत नाही ? केवळ शिक्षकांच्या 
भरतीसाठीच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रातील भरतीसाठी हा नियम लागू करावा !
ऊर्दू शिक्षकांच्या भरतीसाठी उत्तरप्रदेश शासनाचा आदेश
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशमध्ये प्राथमिक शाळांतील ३ सहस्र ५०० ऊर्दू शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. याकरता इच्छुक उमेदवारांना त्यांचा वैवाहिक तपशील देणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. त्यानुसार ज्यांना दोन पत्नी आहेत, अशा उमेदवारांना शिक्षकांच्या नोकरीसाठी आवेदन देता येणार नाही, असा आदेश राज्यशासनाने काढला आहे, तसेच सवत असलेल्या महिलेलाही या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
       शासनाच्या या अटीमुळे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. हे मुसलमान कायद्याचे उल्लंघन असून मुसलमानांवर हा अन्याय आहे. इस्लामध्ये चार विवाह करण्याची मुभा आहे; मात्र केवळ १ टक्का मुसलमानच दोन लग्न करतात, असे बोर्डाने म्हटले आहे. (भारतीय कायदे न मानणारे उद्दाम मुसलमान ! - संपादक) यावर उमेदवाराच्या मृत्यूनंतर मिळणार्‍या सवलती कोणाला द्यायच्या, यासंदर्भात गोंधळ होऊ नये; म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे राज्यशासनाचे म्हणणे आहे. 

(म्हणे) गोहत्येचा आरोप लावून आम्हाला धमकावले जाते !

क्रिकेटपटू महंमद शमीच्या वडिलांचा कांगावा !
      मेरठ (उत्तरप्रदेश) - महंमद शमी याची भारतीय संघात निवड झाल्यापासून आमचे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले. ही गोष्ट काहींना आवडली नाही. त्यामुळे अनेक जण आमच्याशी शत्रुत्वाच्या भावनेने वागत आहे आणि आम्हाला धमकावण्यासाठी गोहत्येसारखे सूत्र उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहंमद शमीचे वडील तौसीफ अहमद यांनी केला आहे.
१. पोलिसांच्या माहितीनुसार अमरोहा येथे पोलिसांनी एका गोतस्कराला पकडले होते.
२. त्यानंतर महंमद शमीचा भाऊ महंमद हसीब काही सहकार्‍यांसह पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने गोतस्कराला सोडवण्याचा प्रयत्न केला.

मदरसे आतंकवादाची केंद्रे बनत असल्याचे उदाहरण !

पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकमधील मदरशावर कारवाई !
     इस्लामाबाद - पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकमधील एका मदरशावर छापा घालून त्याला टाळे ठोकण्यात आले. हा मदरसा भारताच्या सीमेजवळ असलेल्या सियालकोट येथील असून जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेकडून तो चालवण्यात येत होता. पठाणकोट आक्रमणात याच संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या मदरशातून काही पुस्तके, सी.डी. आदी साहित्य हस्तगत केली.

पाक गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमस्थळी शिवसैनिकांकडून पाकिस्तानी राष्ट्र्रध्वजाची होळी !

राष्ट्रहिताच्या बाजूने केवळ शिवसेनाच आवाज उठवते, हे लक्षात घ्या !
    थिरूवनंतपूरम् - पाक गायक गुलाम अली यांच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी पाकिस्तानी राष्ट्र्रध्वजाची होळी करून पाकविरोधातील रोष प्रकट केला. थिरूवनंतपूरम् येथील निशागांधी थिएटर येथे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली आणि त्यांचा मुलगा यांच्या चांदनी की रात गुलाम अली के साथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला होता. शिवसैनिकांच्या या विरोधानंतरही आयोजकांनी हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेेतला. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. शिवसैनिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुलाम अली यांचे मुंबई आणि देहली येथील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रहित करण्यात आले होते. त्यानंतर भारतातील काही पाकप्रेमी मंडळींनी बंगाल आणि केरळ येथे गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेनेने यास विरोध केला होता.

भारताला चेतावणी देण्याचे धाडस करणार नाही, असा धडा आतंकवाद्यांना शिकवा !

फलक प्रसिद्धीकरता
भारत पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या कक्षेत आहे, असे फुत्कार पाकची आतंकवादी संघटना 'लष्कर-ए-तोएबा' चा म्होरक्या आणि मुंबईतील २६/११च्या आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याने काढले.


हिंदू तेजा जाग रे !

Jago : Bharat Pakistani anvastronke lakshyame aata hai, aise LaT ke Hafiz Said ne kaha.
- kya Bharat aise atankvadionko sabak sikhayega ?

जागो ! : भारत पाकिस्तानी अण्वस्त्रों के लक्ष्य में आता है, ऐसे 'लष्कर-ए-तोएबा' के हाफिज सईद ने कहा. - क्या भारत एैसे आतंकवादिआेंको सबक सिखाएगा ?

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट !

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शाळकरी मुलाची काळजी घेण्याचे पत्र पोलिसांना पाठवून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी अप्रत्यक्षरित्या त्या मुलास खुनाची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी कॉम्रेड दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबीय यांनी येथील विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर १५ जानेवारी या दिवशी रात्री उशिरा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात श्री. पुनाळेकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता ५०६(२) या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. 

बुर्किना फासोत या आफ्रिकेतील देशात जिहादी आतंकवादी आक्रमणात २० ठार

संपूर्ण जगात असुरक्षितता आणि असहिष्णुता वाढवणारा जिहादी आतंकवाद ! भारतातील 
कथित पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेष्टे अशा घटनांविरोधात काही बोलतील का ?
     ओगाडुगू (बुर्किना फासो) - पश्‍चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोत या देशाची राजधानी असलेल्या ओगाडुगूमधील एका पंचतारांकित हॉटेलवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात २० जण ठार झाले, तर १५ जण गंभीर घायाळ झाले. फ्रेंच सैन्याच्या साहाय्याने देशातील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रतिआक्रमणात तिनही आतंकवादी ठार झाले असून हॉटेलमधील १२६ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या इस्लामिक मगरिब या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले. संपूर्ण आफ्रिका खंडाला इस्लाममय करण्याच्या उद्देशातूनच हे आक्रमण केले असल्याचे समजते.

पंजाबात प्रतिवर्षी ७ सहस्र ५०० कोटींच्या अंमली पदार्थाची तस्करी

पाक भारताला चोहोबाजूंनी पोखरत असतांना त्याला धडा शिकवणारे नेतृत्व 
देशाला मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
पंजाबला अंमली पदार्थांचा विळखा
      चंडीगड - पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावरील आक्रमणानंतर पाकिस्तानी आतंकवादी आणि अमली पदार्थांचे तस्कर यांची युती असून सीमेपलीकडून पंजाबमध्ये प्रतिवर्षी ७ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या तस्करीत केवळ हेरॉइनचा वाटा ६ सहस्र ५०० कोटी रुपयांचा असल्याचे एम्सच्या अहवालात म्हटले आहे. 
१. एम्सच्या राष्ट्रीय अमली पदार्थ अवलंबन उपचार केंद्राने हे सर्वेक्षण केले. या अहवालानुसार अमली पदार्थांच्या तस्करांना पाकच्या गुप्तहेर संस्थांचा पाठिंबा आहे. 

महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी यांच्या निमित्ताने दिशाहीन नको, तर फलनिष्पत्तीपूर्ण उपक्रम राबवायला हवेत !

      हिंदुत्वाची पताका विदेशात फडकावणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी या दिवशी एका शहरात ठिकठिकाणी उपक्रम राबवण्यात आले. या निमित्त एका संघटनेच्या वतीने एका महाविद्यालयात सेल्फी विथ स्वामी विवेकानंद हा उपक्रम राबवण्यात आला. त्या संघटनेने उपक्रम राबवून स्वामी विवेकानंद यांचे पुण्यस्मरण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी सेल्फीचा उपक्रम अल्प फलनिष्पत्तीदायी आहे. तरुण मुले स्वामी विवेकानंद यांच्या चित्रासमवेत सेल्फी काढून तो सामाजिक संकेतस्थळांवर टाकतील अथवा काही दिवस व्हॉटस् अ‍ॅपवर प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवतील. पण त्याच्या पुढे काय ? खरेतर राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती पहाता आज शेकडो स्वामी विवेकानंद निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापुरुषांचे पुण्यस्मरण करतांना समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारे, धर्म आणि राष्ट्र हितासाठी कृतीशील करणारे उपक्रम राबवले जायला हवेत. तरच स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणार्‍या समर्थ आणि सशक्त भारताची निर्मिती होईल. 
- एक राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक

गीताधर्म मंडळ, पुणे यांच्याकडून गीता उच्चारण वर्गांचे आयोजन

       पुणे, १६ जानेवारी - येथील गीताधर्म मंडळाच्या गीता संथा वर्ग यांच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत गीता उच्चारण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, कोथरूड, बिबवेवाडी, चिंतामणीनगर, मित्र मंडळ आणि तळेगाव दाभाडे या भागांत विनामूल्य आयोजित केले आहेत. यामध्ये सहभाग घेऊ इच्छिणार्‍यांनी सौ. शुभांगी जोशी भ्र.क्र. ९८५०४७०४२७ आणि श्री. चिंतामणी जोशी भ्र.क्र. ९४२०४८०५३० यांवर संपर्क करून सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नेपाळचे भविष्य : हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना कि निधर्मी राजवटीवर शिक्कामोर्तब ?

परिचय
श्री. निरंजन ओझा
श्री. त्रिलोक ज्योती श्रेष्ठ
     श्री. निरंजन ओझा हे नेपाळ येथील रहिवासी आहेत. ते नेपाळमधील त्रिभुवन विद्यापिठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. श्री. ओझा हे हिंदुत्वनिष्ठ असून हिंदुविरोधी घटनांमध्ये ते हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडतात. ते नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या बाजूतील असून त्यासाठी प्रयत्नरत आहेत. ते १० ते १५ जानेवारी २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्यास होते.
      श्री. त्रिलोक ज्योती श्रेष्ठ हे नेपाळ येथील हिंदुत्ववादीही श्री. ओझा यांच्यासमवेत आले होते. श्री. श्रेष्ठ हे शिवसेना, नेपाळ या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीतून प्रवासानुभव !

श्री. चेतन राजहंस
      डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर, रायपूर, देहली आणि मुंबई या भारतातील चार महानगरांमध्ये प्रवास करण्याचा योग आला. या प्रवासाच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने आलेले अनुभव सांगणारे हे सदर...
भाग १
बेशिस्तपणा मुरलेल्या नागरिकांच्या 
देशात मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची सफलता !
     गांधीजयंतीचे निमित्त साधून २ ऑक्टोबर २०१४ या दिवशी नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान आरंभले, तेव्हा मोदींचे हे अभियान म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी केलेली कृती, अशी विरोधकांची प्रतिक्रिया होती. या अभियानाच्या संदर्भात आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात बोलतांना मोदी म्हणाले होते की, शासनाने स्वच्छतादूत नेमून स्वच्छ भारत अभियान निर्धारावर अवलंबून आहे.

हिंदुहिताचे रक्षण करणारी एकमेवाद्वितीय इंटरनेट वृत्तवाहिनी हिंदू वार्ता !


हिंदु वार्ताच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त...
     गेल्या वर्षी पौष शुक्ल पक्ष अष्टमी (२९.१२.२०१४) या दिवशी हिंदु वार्ता या इंटरनेटवरील वृत्तवाहिनीला आरंभ झाला. सध्या लाइव चॅनलच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने वार्तापत्रांची निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात माहितीजाळावरील (इंटरनेटवरील) या वृत्तवाहिनीला सहस्रो लोकांनी पाहिले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वैचारिक बळ देणार्‍या या वाहिनीचा आज प्रथम वर्धापनदिन ! यानिमित्ताने वर्षभरात तिच्या वाढलेल्या कार्याचा या लेखाच्या माध्यमातून घेतलेला वेध !!

पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे का ?

      इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेची पाळेमुळे भारतात किती खोलवर रूजली आहेत, याचा प्रत्यय हिंदूंना प्रत्येक दिवशी येत आहे. इसिससाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काम करणार्‍या धर्मांध तरुणांची वाढती संख्या पहाता, भारत हा इसिसचा जगातील सर्वांत मोठा आतंकवाद्यांचा पुरवठादार होईल कि काय, इतकी सध्याची विदारक स्थिती आहे. अशात कायद्याचे रक्षक असणार्‍या पोलिसांनी या जहाल आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळणे अपेक्षित आहे; मात्र पोलिसांची सध्याची भूमिका याच्या अगदी उलट आहे.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

      येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.
व्यक्तीला पोट भरण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणे आणि रेटून खोटे 
बोलणे सत्य मानले जाणार असणे 
     उदरम्भरता स्वार्थः सत्यत्वे धार्ष्ट्यमेव हि ।
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक ६
अर्थ : आपले पोट भरणे, हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल. 

अरुणाचल प्रदेशातही बांगलादेशी मुसलमानांचा लव्ह जिहाद!

      अरुणाचल प्रदेशमध्ये जायचे झाल्यास विशिष्ट परवाना काढावा लागतो. या राज्यात कामासाठी आलेला एक बांगलादेशी मुसलमान मजूर स्थानिक जनजातीच्या मुलीला घेऊन पळून गेला होता. आपल्याला भारतीय नागरिक असूनही प्रवेश मिळायला येथे अनेक अडचणी येतात, तर बांगलादेशी मुसलमान या राज्यात प्रवेश मिळवून तेथील मुलींना पळवून लव्ह जिहादचे कारस्थान तेथेही राबवत आहेत. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती (२७.१२.२०१५)

ही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी !

     हा सावरकर कोण ?, असा प्रश्‍न विचारून वास्को (गोवा) येथील माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गोेवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी त्यांचे अज्ञान आणि हिंदुद्वेष ७ जानेवारी २०१६ या दिवशी प्रकट केला. बायणा, वास्को येथील रवींद्र भवनाच्या एका सभागृहाला वीर सावरकर हे नाव देण्यात आले आहे. (१२.१.२०१६) 
     सर्व संघटनांनी आपला अहंकार बाजूला ठेवून भारताला गौरवशाली बनवण्यासाठी पुढे यायला हवे. - अधिवक्ता मधुमुकुल त्रिपाठी, सर्वोच्च न्यायालय (२५.१२.२०१५)

तथाकथित पुरोगाम्यांच्या चळवळी !

      सध्या पुरोगामी चळवळीच्या नावे कार्यरत असलेल्या धर्मविरोधकांकडून हिंदूंच्या सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना विरोध केला जात असून कोणतीही धार्मिक श्रद्धा नसतांनाही त्यांच्याकडून श्रद्धाभंजनाच्या कृती चालू आहेत. यात त्यांचा फुकटात मिळणार्‍या स्वप्रसिद्धीचा हेतूच अधिक दिसत आहे. - श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती (८.१.२०१६) हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात रान उठवणार्‍या वृत्तवाहिन्या या वृत्ताविषयी गप्प का ?

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! 
     नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून अमानुष मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत. 
     मुलांना ३ वर्षे अनाथालयात कोंडून ठेवण्यात आले. त्यांना देण्यात येणार्‍या अन्नात झुरळ सापडत असत. त्यांचे जीवन कारागृहापेक्षाही कठीण होते, असे मुलांनी सांगितले.
(संदर्भ : इंडिया टुडे) (१३.१.२०१६) 
     काँग्रेसचे नारायण राणे यांच्या राजवटीत शिक्षण महर्षींऐवजी शिक्षणसम्राट निर्माण करून शिक्षणाचा खरा बट्याबोळ करण्यात आला. - श्री. विनायक राऊत, खासदार, शिवसेना (१२.१.२०१६) 

अधिवक्त्या वर्षा देशपांडे हे धाडस करतील काय ?

      सोळशी (जिल्हा सातारा) येथील शनि मंदिराच्या चौथर्‍यावर १० ते १५ महिलांना नेऊन शनिमूर्तीस तैलाभिषेक घालण्याचे धाडस त्यांनी केले. वास्तविक, कायदा जाणणार्‍यांनी धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये. तसे करणे हीच असहिष्णुता आहे. शबरीमला येथे जाऊन कार्तिकेय स्वामी (अय्यप्पा) मंदिरात त्या कुलूप तोडून प्रवेश करून दाखवतील काय ? कारण हे मंदिर वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेस महिलांसाठी खुले असते. असे कितीतरी धार्मिक अलिखित नियम सर्व धर्मांत आहेत. सर्वांनी आपापला धर्म पाळावा, त्यातच मानवाचे कल्याण आहे. हिंदु धर्मीय लोकच हिंदु धर्माविषयी, असे काही विचित्र करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा खेद वाटतो. मुसलमान महिलांना घेऊन मशिदीत जाऊन नमाज पढण्याचे त्या धाडस करतील काय ? त्या वकील असल्या, तरी कायदा हातात घेणे, दुसर्‍यांच्या भावना दुखावणे किंवा लोकांच्या भावनांशी खेळण्याचे त्यांना अधिकार नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे. 
- प्रमोदभाऊ पेटकर, सातारा (सेवानिवृत्त महसूल अधिकारी, सातारा आणि पुणे)वैज्ञानिक आणि यज्ञासंदर्भातील अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करण्याची विनंती !

     उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी हे अग्नीमध्ये आहुती देतात, त्या वेळी त्या अग्नीमध्ये अग्नितत्त्व जागृत होऊन प्रत्यक्ष अग्निदेवाचे रूप दिसते आणि अग्नीमध्ये प्रकट झालेल्या या अग्निदेवाला पाहून त्यांची भावजागृती होते. प.पू. रामभाऊस्वामी हे या यज्ञकुंडावर अग्नी प्रज्वलित असतांना झोपतात.
१. प.पू. रामभाऊस्वामी यांना अग्नीची दाहकता जाणवत नाही. त्यांच्या देहाला कोठेही भाजत नाही, तसेच कोणतीही शारीरिक इजा होत नाही, यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. तसेच यज्ञातील अग्निमध्ये प्रवेश करूनही त्यांच्या देहावरील परिधान केलेली वस्त्रे किंवा शाल जळत नाही; परंतु हीच शाल अन्यत्र अग्नीमध्ये धरल्यास ती लगेचच जळते, याचे वैज्ञानिक कारण काय ?

उच्छिष्ट गणपति यज्ञातून निर्माण होणार्‍या धुराचा वातावरणावर होणारा सूक्ष्मातील परिणाम

यज्ञात आहुती दिल्यानंतर सर्वत्र प्रक्षेपित होणारा सात्त्विक धूर
     सत्य आणि त्रेता युगांमध्ये मंत्रांचा नाद संपूर्ण आसमंतात गुंजत असे. यज्ञ, हवन आणि याग यांमुळे वातावरणाची शुद्धी होत असे. सत्य आणि त्रेता युगांतील हे वातावरण आज सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातही पहायला मिळेल. ज्याप्रमाणे यज्ञयागातून निर्गुण ईश्‍वराला यज्ञविधी आणि पवित्र मंत्र यांच्या माध्यमांतून तत्त्वस्वरूपात भूमंडलावर आकृष्ट केले जाते, त्याचप्रमाणे यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या धुरामुळेही वातावरणाची शुद्धी होते. या संदर्भात अनेक वैज्ञानिक संशोधनेही झालेली आहेत.

मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय
  • भारतातच विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे !
  • शनिशिंगणापूर देवस्थानची धार्मिक परंपरा मोडण्यासारखी धर्मविरोधी कृत्ये करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !
  • मालडा (पश्‍चिम बंगाल) येथे दंगल घडवणार्‍या आणि गोळीबार करणार्‍या अडीच लाख धर्मांधांवर कारवाई व्हावी !
वार आणि दिनांक : मंगळवार, १९ जानेवारी २०१६
वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ५
स्थळ : आझाद मैदान, मुंबई.
भ्रमणभाष क्रमांक : ९७६९६३४८०९ / ९३२२४६९०४० / ९९२०२०८९५८ / ९५५२४०२९९९
आयोजक : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

प.पू. रामभाऊस्वामी यज्ञकुंडावर (अग्नीच्या ज्वाळांंवर) स्वत:चा देह ठेवला असतांना पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

पू. (सौ.) योया वाले
शरणागत भाव
१. शरणागत भाव प.पू. रामभाऊस्वामी यांचे आज्ञाचक्र आणि 
अनाहतचक्र यांच्या स्थानी निर्माण होऊन तो कार्यरत होणे
१ अ. शरणागत भाव प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडून ईश्‍वराकडे प्रवाहित होणे
तारक शक्ती
२. तारक शक्तीचा प्रवाह प.पू. रामभाऊस्वामी 
यांच्या आज्ञाचक्रस्थानी आकृष्ट होणे
     हा यज्ञ करण्याचा त्यांच्या गुरूंचा संकल्प असल्याने, तसेच प.पू. रामभाऊस्वामी यांची एकाग्रता, भक्ती, साधना आणि सतत ईश्‍वराशी असलेले अनुसंधान (ध्यानावस्था) यांमुळे असे होते.

आज भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय : एन्.सी.ई.आर्.टी.चा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यात यावे !
वेळ : सायंकाळी ५ ते ७
स्थळ : शिवाजी चौक, भिवंडी
भ्रमणभाष क्रमांक : ९९८७०२७४२७ / ९३२४८६८९०६
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

एकमेवाद्वितीय तंजावरचे प.पू. रामभाऊस्वामी ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यज्ञस्थळी उपस्थित असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले
      मी गेली १५ वर्षे सूक्ष्म-परीक्षण केलेले नाही. १५.१.२०१६ या दिवशी प.पू. रामभाऊस्वामींनी केलेल्या यज्ञाच्या वेळी सूक्ष्म-परीक्षण का करावेसे वाटले, हे मला कळले नाही. सूक्ष्म-परीक्षण आपोआपच झाले. ते येथे दिले आहे. प.पू. स्वामी हे समर्थ संप्रदायाचे आहेत. त्यांनी सोबत आणलेली श्रीरामाची भावगीते यज्ञाच्या वेळी लावण्यात आली होती. त्यामुळेही वातावरणनिर्मितीला साहाय्य झाले.

प.पू. रामभाऊस्वामी यांनी गोवा येथील सनातन आश्रमात केलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यज्ञाला प्रारंभ होण्यापूर्वी त्या ठिकाणी यु.टी.एस्.द्वारे चाचणी करतांना
     यज्ञ हे सनातन वैदिक धर्मातील एक महत्त्वाचे अंग आहे. राजसूय, अश्‍वमेध, पुत्रकामेष्टी आदी यज्ञांविषयी सविस्तर माहिती धर्मग्रंथांत आढळते. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. यज्ञसंस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असणारे तंजावूर तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी हे वैशिष्ट्यपूर्ण यज्ञांद्वारे समाजाला भौतिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील लाभ मिळवून देण्याचे दैवी कार्य करत आहेत. त्यांनी १५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

परवान्याविना वाहन चालवण्याची स्वतःची चूक समजल्यावर परवाना काढून घेईपर्यंत सायकलचा वापर करणारे श्री. विजय सरगर यांची अनुकरणीय कृती !

      बरेच जण वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतांनाही दुचाकी अथवा चारचाकी चालवतात. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांच्या सत्संगात उपस्थित असणारे चेंबूर, मुंबई येथील श्री. विजय सरगर यांच्याकडूनही तशीच चूक होत होती. हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी एका कार्यकर्त्याने त्यांना परवान्याविना वाहन चालवू नका, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुचाकी चालवणे बंद करून सायकल चालवायला आरंभ केला आणि परवाना काढल्यानंतरच दुचाकी वापरणे चालू केले.
      परवाना नसतांनाही वाहन चालवून शासकीय नियमाचे उल्लंघन करणार्‍यांसमोरच श्री. सरगर यांनी आदर्श ठेवला आहे.

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या उत्कट भावमुद्रा

     प.पू. रामभाऊस्वामी यज्ञ करतात, तेव्हा त्यांच्याकडे पहाणार्‍याचाही भाव सहज जागृत होतो. असे वाटते की, ते अत्यंत शरणागतीने अग्निनारायणाला आळवत आहेत. त्याच्याशी संवाद साधत संकल्पपूर्तीसाठी विनवणी करत आहेत. त्यामुळेच तेजाची उपासना करणार्‍यांमध्ये एरव्ही जाणवतो, तसा उग्रपणा प.पू. रामभाऊस्वामी यांच्यात जाणवत नाही. त्यांच्या डोळ्यांत करूणाभाव, तसेच प्रीती जाणवते. त्यांच्या भावमुद्रांची काही वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

भगवंताचा लोकमताशी, बहुमताशी काहीही संबंध नाही !

      भक्त एकटा असतो, एकाकी असतो. कोटीकोटीत एखादाच भक्त असतो. कोटीकोटी एकीकडे आणि एकटा भक्त एकीकडे असतो. कोणते बरोबर ? भक्तच बरोबर. भगवान हाच सत्य आहे. भगवंताचा लोकमताशी, बहुमताशी काहीही संबंध नाही. बहुमताने सत्याचा निर्णय होत नाही.
(संदर्भ : घनगर्जित, ऑगस्ट २०१५)

सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचा सचित्र वृत्तांत

गोमातेचे पूजन करतांना डावीकडून १. पू. (सौ.) अंजली गाडगीळ, २. पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     रामनाथी (गोवा) - साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रथमच १५ जानेवारी या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी, तसेच यज्ञाचे यजमान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते वैदिक मंत्रांच्या घोषात विधीवत गोपूजन, गजपूजन आणि धर्मध्वजपूजन पार पडले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते यज्ञाचा संकल्प सोडण्यात आला.

इतिहास गौरव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : २६ जानेवारी
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ 
जानेवारी या दिवशी दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे 
उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !  
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७
Sanatan Shop.com

सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी

बिंदूदाबन उपचारपद्धतीवर मार्गदर्शक सनातनचे ग्रंथ !
१. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक 
त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख)
     प्रत्येकालाच आपण सदा निरोगी आणि आनंदी रहावे, असे वाटत असते; परंतु आजकाल निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे. प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. याऐवजी बिंदूदाबन उपचारपद्धत अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह विकारावर मूलगामी उपचार होण्यासही साहाय्य होते. बहुतेकांना बिंदूदाबन उपचारपद्धत ही चीनमधून आलेली आहे, असे वाटत असते; परंतु प्रत्यक्षात तिचा उगम हिंदुस्थानातच झालेला आहे. या शास्त्राची तोंडओळख सनातनचा ग्रंथ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख) यात दिली आहे.

कासारगोड, केरळ येथील सौ. गिरिजा व्ही. नायक (वय ६५ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करतांना डावीकडून सौ. मंजुळा रामानंद गौडा

उच्छिष्ट गणपति यज्ञापूर्वी आणि विधींच्या वेळी सौ. रंजना गडेकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

सौ. रंजना गडेकर
१. यज्ञाला आरंभ होण्यापूर्वी
१ अ. ११.१.२०१६ या दिवशी जेथे उच्छिष्ट गणपति यज्ञ होणार आहे, तेथे यज्ञवेदीवर धूरकट आणि पारदर्शक गणपतीचा आकार निर्माण झाल्याचे दिसले.
१ आ. ऋषी सूक्ष्मातून यज्ञ करतांना दिसल्यावर देवाने यज्ञ आधीच संपन्न केल्याचे जाणवणे : १२.१.२०१६ या दिवशी सकाळी ऋषी सूक्ष्मातून यज्ञ करतांना दिसले. त्यामुळे देवाने सूक्ष्मातून अगोदरच तो यज्ञ संपन्न केलेला आहे आणि आता तो स्थुलातून होत आहे, असे वाटले. याच दिवशी सायंकाळी यज्ञशाळेच्या वातावरणात पिवळा, नारिंगी आणि लालसर रंग वातावरणात पसरलेला दिसला. तसेच वातावरणात सोनेरी कण पसरतांना दिसले.

जिज्ञासेनेच ज्ञानप्राप्ती होते !

'रामभाऊ गोस्वामी (भारतीय लोक त्यांना रामभाऊस्वामी असे म्हणतात आणि विदेशातील लोक त्यांना फायरयोगी म्हणतात.) हे सिद्ध पुरुष यज्ञकुंडात २ तास बसू शकतात', असे मी जेव्हा एका याज्ञिकांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, "हा यज्ञपुरुषाचा अपमान आहे. यज्ञकुंडाच्या वर नाही, तर बाजूला मानवाचे स्थान आहे'. त्यांच्यातील जिज्ञासूपणाचा अभाव लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटले, ते सिद्ध पुरुष यज्ञात केवळ लाकडाच्या आहुत्या देत नाहीत, तर आपला देहही ते अग्निदेवाला समीधा म्हणून अर्पण करतात. त्यांचा भाव पाहून अग्निदेव त्यांचे रक्षण करतो. यावर ते याज्ञिक काही बोलले नाहीत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०१५)
पू. सौरभ जोशी प्रत्यक्षात यज्ञस्थळी आलेले नसूनही ते सूक्ष्मातून तेथे उपस्थित असल्याची साधकाला आलेली प्रचीती !

     १५.१.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास प्रारंभ झाला. या दिवशी सकाळपासून पू. सौरभदादा पुष्कळ आनंदात होते. खोलीत येत असलेल्या सर्व साधकांना ते पुष्कळ आनंद देत होते, तसेच अधूनमधून ते चल, चल, असे सांगत होते; म्हणून मी त्यांना विचारले, यज्ञस्थळी जायचे आहे का ? ते हो म्हणाले.
१. यज्ञस्थळी गेल्यावर तेथे घडणार्‍या 
घटना पू. सौरभदादांना सूक्ष्मातून सांगणे
     मी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यज्ञाचे दर्शन घेण्यासाठी यज्ञस्थळी गेलो होतो. तेथे मला श्रींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले. अनेक संत आणि साधक तेथे उपस्थित होते. त्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी प्रज्वलीत यज्ञकुंडात प्रवेश करत होते. काही वेळा ते यज्ञवेदीवर आडवे पडत होते, तर कधी ते यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालत होते. यज्ञस्थळावरून सूक्ष्मातून मी पू. सौरभदादा यांना जे घडत होते, ते सांगत होतो.

हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून हिंदूसंघटनाच्या दृष्टीने मार्गक्रमण करा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी


केवळ पाश्चाुत्त्यांचे अनुकरण हे देशाच्या आणि समाजाच्या एकात्मतेला पूर्ण मारक आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या पहिल्या दिवशी विकलांग अवस्थेतील सनातनचे पू. सौरभ जोशी यांनी समष्टीच्या कल्याणार्थ होत असलेल्या या यज्ञामुळे स्वतःला झालेला आनंद त्यांच्या वडिलांना नाचायला सांगून व्यक्त करणे

१. पू. सौरभदादा सकाळपासून अतिशय आनंदात असणे 
      १५.१.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास प्रारंभ झाला. या दिवशी सनातनचे पू. सौरभ जोशी (पू. दादा) हे सकाळी उठल्यापासून अतिशय आनंदात होते.
२. कपडे धुण्यासाठी निघतांना पू. दादांनी हाक मारणे आणि 
नाचायला सांगून धिन्...धिन्... असे शब्द उच्चारून ठेका धरणे
      नेहमीप्रमाणे मी पू. दादांना स्नान घालून पलंगावर ठेवले आणि त्यांचे सर्व आवरून मीसुद्धा स्नान केले. नंतर मी कपडे धुलाई यंत्रात कपडे धुण्यासाठी निघालो. तेव्हा पू. दादांनी मला हाक मारली. त्यांना पूर्ण वाक्य बोलता येत नसल्याने ते केवळ एक-दोन शब्दांत बोलत होते. त्या वेळी आम्हा दोघांमध्ये पुढील संभाषण झाले.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत जिज्ञासा नसते, शिकण्याची वृत्ती नसते आणि मला सर्व समजते, असा अहंकार असतो !’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०१५)

तळमळ, प्रीती, चिकाटी, श्रद्धा आणि भावपूर्ण सेवा या गुणांमुळे बेळगाव येथील सनातनचे साधक शंकर गुंजेकर ५६ व्या संतपदी विराजमान !

पू. शंकर गुंजेकर यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सन्मान करतांना पू. (कु.) स्वाती खाडये

यज्ञ-यागादी कर्मकांडांचे महत्त्व

भगवान श्रीकृष्णाने गीतेत 'यज्ञानाम् जपयज्ञोऽस्मि' ।, 'म्हणजे यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे काही जण यज्ञ-यागांकडे तुच्छतेने पहातात. बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, "यज्ञात आहुती न देता ते तूप इत्यादी गोरगरिबांना द्या". अशा व्यक्तींत जिज्ञासा नसते, शिकण्याची वृत्ती नसते आणि मला सर्व समजते, असा अहंकार असतो. यज्ञ-यागांसंदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे की, यज्ञ-याग ही व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना अधिक प्रमाणात आहे. यज्ञ-यागामुळे पर्यावरणाची शुद्धी होते, पाऊस पडतो, तसेच अनिष्ट शक्तीही दूर जातात. असे होण्यासाठी व्यष्टी साधना करणार्‍याची पातळी न्यूनतम ६० टक्के तरी असावी लागते. समाजात असे फारच थोडे असल्यामुळे यज्ञ-याग करणे महत्त्वाचे आहे.

- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०१५)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

शनिमाहात्म्याची परीक्षा !

संपादकीय
     शनिशिंगणापूर हा सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चालू असलेला विषय आहे. शनिदेव मंदिराच्या चौथर्‍यावर चढून महिलांना दर्शन घ्यायचा अधिकार हवा, ही एक मागणी पुरोगामी चळवळीतून होत आहे. ती प्रथा मंदिरात नाही; म्हणून हा वाद ! शनिमंदिरात शनिदेवांचे दर्शन घेण्याविषयी काही नियम घातले गेले आहेत. पूर्वापार ते चालू आहेत. पुरुष आणि महिला या दोघांसाठी हे नियम आहेत. शनिदेवांचे दर्शन घेण्याची पद्धत सर्वांसाठी सारखीच असल्यामुळे अधिक दर्शन आणि न्यून दर्शन असा भाग त्यात येत नाही. जे भाविक दर्शनासाठी मंदिरात जातात, त्या सर्वांनांच सारखाच लाभ होत असून कुणाची हानी झाली किंवा कुणाची भरभराट झाली, असे अनुभव नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn