Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धर्मांधांकडून चार राज्यांत हिंसाचार !

उद्दाम धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी शासन अजून 
अशा किती घटना होण्याची वाट पहाणार आहे ?
हा आहे धर्मांधांचा उद्दामपणा !
उत्तरप्रदेश
  • धर्मांधांकडून फतेहपूर येथे हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण !
  • हिंदूंवर दगडफेक
  • २७ जणांना अटक
     फतेहपूर - फतेहपूर जिल्ह्यातील जहानाबाद येथे हिंदूंनी मकरसंक्रांतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी मोठे आक्रमण केले. १४ जानेवारीला घडलेल्या या घटनेत २ जण घायाळ झाले असून आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. या शोभायात्रेत हिंदूंनी दिलेल्या घोषणांवर धर्मांधांनी आक्षेप घेतला. यानंतर धर्मांध मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंदूंवर दगडफेक केली. घटनास्थळी गोळीबारही झाला. यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. धर्मांधांनी हिंदूंची दुकाने आणि वाहने पेटवून दिली. यानंतर घटनास्थळी पोलीस आले. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी झालेल्या धुमःश्‍चक्रीत अनेक पोलीसही घायाळ झाले. पोलिसांनी फतेहपूर येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे.

हा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुरोगामित्वाच्या नावाखाली शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश 
करून धार्मिक प्रथा मोडण्याच्या प्रकरणासंदर्भातील वास्तव
डावीकडून अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, सौ. रश्मी नाईक, 
कु. मोनिका गावडे, श्री. सुनील घनवट, श्री. विजय गावडे
     पुणे - देव भक्तीने प्रसन्न होतो, अहंकाराने नाही. स्वतःला शनिभक्त म्हणवून घेणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कथित पुरोगामी महिला २६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे. धार्मिक प्रथा मोडण्यासाठी कथित पुरोगामी महिला येणार असल्या, तरी धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या रक्षणार्थ अनेक महिला शनिभक्तही पुढे सरसावल्या आहेत. त्या देवस्थानाभोवती कडे करून चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न हाणून पाडतील. हा पुरोगामी महिला विरुद्ध श्रद्धाळू महिला असा लढा नसून नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. १५ जानेवारी या दिवशी शिवाजीनगर येथील स्पॅन एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२६ फेब्रुवारीला सांगली येथे हिंदु महासभेच्या वतीने प्रांतिक सभेचे आयोजन

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त
     कोल्हापूर - २६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त सांगली येथील सिद्धार्थ परिसर, गावभाग, क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक मंडळ येथे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने प्रांतिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. या सभेला इतिहास आणि सावरकर प्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारत हिंदु महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
     २६ फेब्रुवारी १९६५ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रयोपवेशनाद्वारे आत्मसमर्पण केले होते. सावरकरप्रेमी हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करतात. या घटनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने सावरकरप्रेमी त्यांच्या विचाराचा जागर वर्ष साजरा करणार आहेत. ज्यांना या सभेत सहभागी होऊन देणगी द्यायची असेल, त्यांनी ९३७२४३०५२२ या भ्रमणभाषवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र सुरवसे, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी आबा लांडे यांची निवड

     मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - येथील भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र सुरवसे, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी माजी तालुकाध्यक्ष आबा लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मंगळवारी डॉ. बुरकूल रुग्णालयावरील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत नूतन अध्यक्ष सुरवसे यांची, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी गणेशवाडीचे आबा लांडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नियुक्तीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्हा निवडणूक समितीचे सहप्रमुख राजेंद्र मिरगणे, जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुख राजकुमार पाटील, माजी तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, दत्तात्रय यादव, अशोक माळी, तालुका प्रचार प्रमुख सुरेश जोशी यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशातील ८० कोटी हिंदूंनी स्वसामर्थ्याच्या बळावर एक झाल्यास देशातील समस्या सुटून भारत जगद्गुरु होईल !

नंदुरबार येथील विराट मेळाव्यात 
सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
विराट मेळाव्यापूर्वी झालेल्या मोर्च्यात सहभागी हिंदू
नंदुरबार - हिंदु एक होऊ नयेत, यातच आपला लाभ आहे. असे मानणारी मंडळी हिंदूंमध्येच वेगवेगळ्या कारणांनी वाद पेटवत असून त्या वादावर आपली पोळी शेकून घेत आहेत. आज शेळ्यांमध्येच वाढल्याने स्वशक्तीचा विसर पडलेल्या वाघासारखी आज हिंदूंची स्थिती झाली आहे. विविधतेतील एकतेच्या शक्तीचा हिंदूंना विसर पडला आहे. देशातील ८० कोटी हिंदू स्वसामर्थ्य ओळखून जेव्हा एक होतील, तेव्हा आपोआपच देशातील समस्या सुटायला साहाय्य होईल आणि हा भारत देश संपूर्ण जगाचे प्रश्‍न सोडवणारा जगद्गुरु बनू शकेल, असे प्रतिपादन सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. नंदुरबार येथील सर्कस मैदानावर १४ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या सातपुडा हिंदु मेळाव्यात ते बोलत होते. हरिद्वार येथील प.पू. महामंडलेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंद महाराज आणि स्वागताध्यक्ष मधुकरराव गावित, कार्याध्यक्ष चैत्राम पवार, देवगिरी प्रांत प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला अतीदुर्गम भागातून आलेल्या आदिवासींसह अंदाजे ३५ सहस्रांहून अधिक उपस्थिती होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील अनेक राजकीय पदाधिकारीही आवर्जून उपस्थित होते.

शनिशिंगणापूरच्या धार्मिक परंपरा रक्षण चळवळीला पूर्ण पाठिंबा ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे

     संभाजीनगर - जे लोक देवाला मानत नाहीत, त्यांना आमच्या धर्मपरंपरेमध्ये लुडबूड करण्याचा काहीच अधिकार नाही. शनिशिंगणापूरला होणार्‍या हिंदुत्ववाद्यांच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. २००२ ला ज्या वेळी दाभोलकरांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांना आम्ही अडवले होते. याही वेळी ही हिंदूंची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांना रोखू. लवकरच प्रसिद्धी माध्यमांसमोर ही भूमिका मांडू, असे आश्‍वासन संभाजीनगरचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होेते. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धार्मिक परंपरा रक्षण चळवळीची माहिती दिली, तसेच २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूर येथे होणार्‍या आंदोलनाची माहिती दिली. या वेळी संभाजीनगरच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे, श्री. अशोक कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा आणि सौ. निकम उपस्थित होते. या वेळी श्री. चंद्रकांत खैरे सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, सनातन प्रभात हे कट्टर हिंदुत्ववादी आणि जबरदस्त नियतकालिक आहे.

मध्यप्रदेशमध्ये गोमांसाच्या संशयावरून रेल्वेतस्थानकावर धर्मांध आणि गोरक्षक यांच्यात हाणामारी

भविष्यात गोमासांच्या सूत्रावरून देशात अशा घटना टाळण्यासाठी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना 
लक्षात घेऊन शासनाने देशभर सक्षम गोहत्याबंदी कायदा लागू करावा आणि त्याची 
प्रभावी अंमलबजावणी करावी !
    इटारसी (मध्यप्रदेश) - गोमांस असल्याच्या संशयावरून कुशीनगर एक्स्प्रेसने यात्रा करणार्‍या हरदानिवासी मुसलमान दांपत्याची रेल्वेतच गोरक्षकांनी चौकशी केली. पुढे वादविवाद वाढून मुसलमान दांपत्याचे समर्थक आणि गोरक्षक यांच्यात बाचाबाची झाली. रेल्वे पोलिसांनी २ गोरक्षक आणि ८ धर्मांध यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट केला.
१. महंमद हुसैन त्यांच्या पत्नीसमवेत कुशीनगर एक्स्प्रेसने मध्यप्रदेशमधील हरदा या त्यांच्या निवासस्थानी चालले होते.
२. मध्यप्रदेशमधीलच खिरकिया या रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबली असतांना हेमंत सिंह आणि संतोषसिंह राजपूत यांनी रेल्वेत प्रवेश केला आणि त्यांनी महंमद यांच्याजवळ असलेल्या सामानाची चौकशी करण्यास चालू केले.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

बांगलादेशकडून १७८ भारतीय मच्छिमारांची सुटका

देशाच्या नागरिकांविषयी उदासीन शासन !
या मच्छिमार सागरी सीमा ओलांडू नये, यासाठी शासन उपाययोजना का करत नाही ?
     काकद्विप (बंगाल) - गेल्या दोन मासांपासून बांगलादेशच्या कारागृहात असलेल्या १७८ भारतीय मच्छिमारांची बांगलादेश शासनाने १२ जानेवारी या दिवशी सुटका केली. ते समुद्रात मच्छिमारी करत असतांना सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री मॉन्तुराम पखीरा यांच्या मतानुसार बांगलादेशमधील बगरहत कारागृहात गेल्या २ मासांपासून १७९ भारतीय मच्छिमार शिक्षा भोगत होते; परंतु कारवाईच्या काळात संजय समंता या मच्छिमाराचा मृत्यू झाला होता. सर्व मच्छिमार हे बंगालमधील रहिवासी आहेत.

लाचखोर पोलीस हवालदार सुभाष शिवगण निलंबित

अशा भ्रष्ट कर्मचार्‍यांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांची सर्व संपत्ती जप्त करून कठोर कारवाई करा !
     वैभववाडी - अपघाताच्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी मागितलेली २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष श्रीधर शिवगण (वय ४० वर्षे) यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली होती. सध्या त्यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. कोकीसरे, वैभववाडी येथील रेल्वे फाटकाजवळ साई दरबार बिअर शॉपीचे मालक शैलेश गावडे यांचा अपघात झाला होता. या प्रकरणी साहाय्य करण्यासाठी गावडे यांच्याकडे लाच मागितली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी खात्यांतर्गत कारवाई म्हणून शिवगण यांना निलंबित केले आहे.

(म्हणे) हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा !

कॉ. दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबियांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
     कोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शाळकरी मुलाची काळजी घेण्याचे पत्र पोलिसांना पाठवून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी अप्रत्यक्षरित्या त्या मुलास खुनाची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा, अशा मागणीचे निवेदन कॉम्रेड दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबियांनी येथील विशेष पोलीस महानिरीक्षक अन् पोलीस अधीक्षक यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतांना पानसरे कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या स्नुषा मेधा पानसरेे, कॉ. दिलीप पवार, अधिवक्ता विवेक घाडगे, अधिवक्ता प्रकाश मोरे उपस्थित होते.

तमिळनाडूतील जलिकट्टुनंतर आता आसाममधील बुलबूल पक्ष्यांच्या झुंजीवरही बंदी !

तमिळनाडूतील जलिकट्टु आणि आसाममधील बुलबूल झुंज यांविरोधात न्यायालयाकडे मागणी लावून धरणार्‍या प्राणीप्रेमी संघटना देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्याची मागणी कधी लावून धरणार ?
  • प्राणीप्रेमी संघटनेच्या विरोधानंतर उच्च न्यायालयाचा आदेश !
  • बंदीच्या निर्णयावर आसाममधील स्थानिकांचा प्रचंड रोष !
     गौहत्ती (आसाम) - तमिळनाडूत साजर्‍या करण्यात येणार्‍या जलिकट्टु या पारंपरिक प्रथेत होणार्‍या बैलांच्या झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याला तमिळनाडूतील स्थानिकांचा विरोध होत असतांनाच आसामच्या उच्च न्यायालयाने आसाममध्ये संक्रांतीच्या दिवशी साजर्‍या करण्यात येणार्‍या एका पारंपरिक प्रथेवरही बंदी घातल्याने येथील आसामवासियांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आसाममध्ये संक्रांतीच्या दिवशी बुलबूल पक्ष्यांची झुंज लावण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. प्राणीप्रेमी संघटनेचा या प्रथेला विरोध आहे. त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने या प्रथेवर बंदी घातली.

तुर्कस्थानचे इसिसच्या तळांवर मोठे आक्रमण

आतंकवाद संपवण्यासाठी चर्चा, मैत्रीसंबंध आदी उपायांपेक्षा आक्रमण हाच सर्वोत्तम उपाय 
असल्याचे तुर्कस्थानही जाणतो. भारतीय राज्यकर्ते हे सत्य केव्हा लक्षात घेणार ?
२०० आतंकवादी मारल्याचा दावा !
     अंकारा (तुर्कस्थान) - इस्तंबूलमध्ये केलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर तुर्कस्थानने इराक आणि सिरिया या देशांत असणार्‍या इसिसच्या (आय.एस्.आय.एस्.च्या) तळांवर जोरदार आक्रमण केले. या आक्रमणात सुमारे २०० आतंकवादी ठार झाल्याचा दावा तुर्कस्थानचे पंतप्रधान अहमद दावुतोग्लू यांनी केला.
     दावुतोग्लू म्हणाले, तुर्कस्थानच्या तोफखान्याने इराक आणि सिरिया या देशांतील इसिसच्या सुमारे ५०० तळांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला. या आक्रमणात किमान २०० आतंकवादी ठार झाले असून ४०० हून अधिक आतंकवादी घायाळ झाले. गेल्या ४८ घंट्यांत हे आक्रमण करण्यात आले असून सिरियाचा सीमावर्ती भाग आणि इराकचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी असलेल्या आतंकवादी तळांना विशेष लक्ष्य करण्यात आले.

चोरट्यांनी टायरच्या साहाय्याने एटीएम् यंत्र पळवले

एटीएम् यंत्र भूमीवर व्यवस्थित न बसवणे आणि बाहेर सुरक्षारक्षक
 नसणे या अक्षम्य चुकांसाठी संबंधितांवर कठोर कारवाई करा !
     सोलापूर - जिल्ह्यातील तिर्‍हे गावात चोरट्यांनी एटीएम्चे यंत्र टायर लावून पळवल्याची घटना घडली आहे. आयडीबीआय अधिकोषाचे हे एटीएम् यंत्र असून या यंत्रामधून त्यांनी ५ लाखांची रोकडही पळवण्यात आली. १० तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरी पकडली जाऊ नये म्हणून या चोरट्यांनी कॅमेरा फोडून त्याची हार्डडिस्कही पळवली. हे एटीएम् यंत्र भूमीत व्यवस्थित बसवलेले नसल्याने या चोरट्यांना ते पळवता आले. एटीएम् सेंटरबाहेर सुरक्षारक्षक आणि धोक्याची घंटाही नव्हती. (असुरक्षित सोलापूर ! - संपादक)
     नवी देहली - अमेरिकेच्या एफ्बीआय प्रयोगशाळेने पाठवलेल्या सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेरा अहवालाचा एम्सच्या वैद्यकीय मंडळाने अभ्यास केल्यानंतर त्याचा निष्कर्ष देहली पोलिसांना कळवला असल्याची माहिती देहलीचे पोलीस आयुक्त बी.एस्.बस्सी यांनी ट्विटरवरून दिली. विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) दीपक मिश्रा आणि विशेष अन्वेषन पथक यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर या संदर्भात माध्यमांना माहिती देण्यात येईल, असे बस्सी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर दोन वर्षांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. एम्सच्या वैद्यकीय मंडळाने सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा निष्कर्ष काढला होता; परंतु नेमके विष स्पष्ट केले नव्हते. त्यासाठी सुनंदा यांचा व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी वॉशिंग्टनच्या एफ्बीआय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. (देशाच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही भारताला व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी अमेरिकेचे साहाय्य का घ्यावे लागते ? - संपादक)

प्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे ! - अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू

बेंगळुरू येथे पार पडली धर्मजागृती सभा
हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मजागृती सभेत
डावीकडून सौ. शीला नारायण, अधिवक्ता सिद्धेश
उम्मत्तूरू (दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. मोहन गौडा
     बेंगळुरू (कर्नाटक) - हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील (कामाक्षीपाळ्यच्या) धनंजय पॅलेस येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण उपस्थित होत्या. या सभेत २३० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

कर्जत येथे श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा

      कर्जत (जिल्हा रायगड) - येथील कोंढाणे गावात श्री योगेश्‍वरी देवी मंदिर आणि श्री व्याडेश्‍वर देव मंदिर आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा असणार आहे. दिंडीची सुरुवात गोगटेवाडा, कर्जत येथून सकाळी ८.३० वाजता होईल. कर्जत (मार्केट यार्ड) ते कोंढाणे असे साधारण १० ते ११ किमी.चा प्रवास करून दिंडी मंदिरात पोहोचेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री. अनिल गोगटे यांना ९२७१६१८१८४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महाधिवक्ता श्रीहरि अणे शासकीय पक्षाची बाजू मांडणार !

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
      कोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी कॉ. पानसरे प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांनी उच्च न्यायालयात केली होती. या खटल्यात शासकीय पक्षाच्या वतीने आता महाधिवक्ता श्रीहरि अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्यशासनाने त्यांची नियुक्ती केली आहे. या खटल्यात महाधिवक्त्याची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीय यांच्या वतीने त्यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या सुटीवर असल्याने या खटल्याची १४ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूर येथे चालणार कि अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला.

फलक प्रसिद्धीकरता

फतेहपूर भारतात आहे कि पाकमध्ये ? उत्तरप्रदेशमध्ये शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ?
     फतेहपूर जिल्ह्यातील जहानाबाद येथे हिंदूंनी मकरसंक्रांतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी जोरदार आक्रमण करून दगडफेक केली, तसेच दुकाने आणि वाहने पेटवली. यात २ जण घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     UPke Fatehapur me Hinduonki makarsankranti ki shobhayatrapar dharmandhonka akraman, 2 ghayal. - kya UPme shasan hai ?
जागो !
     उत्तरप्रदेशके फतेहपूर में हिंदूआेंकी मकरसंक्रांती की शोभायात्रापर धर्मांधोंका आक्रमण, २ घायल
- क्या युपीमें शासन है ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीद्वारे नांदी

      पिंपरी, १५ जानेवारी (वार्ता.) - वेगवेगळ्या वादांमुळे गेले काही दिवस चर्चेत असणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास १५ जानेवारी या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. महानगरपालिकेच्या इमारतीपासून एच्.एच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या साहित्य मंडपापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. भगवे फेटे घातलेल्या पारंपारिक वेशातील महिलांचे पथक यांसह अन्य पथकेही दिंडीमध्ये सहभागी झाली होती. १६ जानेवारी या दिवशी साहित्य संमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा होणार आहे.

भारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार

     नवी देहली - आतापर्यंत भारतातून अमेरिकेत सुमारे ९ लाख ५० सहस्र शास्त्रज्ञ आणि अभियंते स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती नॅशनल सायन्स फाउण्डेशन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. अमेरिकेत अन्य देशांतून येणार्‍या शास्त्रज्ञ आणि अभियंते यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याची योजना रचणार्‍या ४ भारतीय मुसलमान युवकांना सिरियात अटक

भारतीय मुसलमानांमध्ये आय.एस्.आय.एस्.चे वाढते आकर्षण !
     सिरिया - आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याची योजना करणार्‍या ४ भारतीय मुसलमान नागरिकांना सिरियाने अटक केल्याची माहिती सिरियाचे उपपंतप्रधान वालिद अल् मुआउलम् यांनी दिली. सिरियाचे परराष्ट्रमंत्री म्हणून दायित्व पहाणारे वालिद यांच्यानुसार हे युवकांनी जॉर्डनच्या मार्गाने सिरियात प्रवेश केला होता. या सर्वांना दमिश्कच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. वालिद म्हणाले, या संदर्भात आम्ही भारतीय दुतावासाच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली आहे. आतंकवाद विरोधी अभियान आणि गुप्त सुचनांचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने मी भारताचा दौरा केला आहे. या वेळी वालिद यांनी त्या ३९ भारतियांना सोडण्यास असमर्थता व्यक्त केली. ज्यांना वर्ष २०१४मध्ये इराकच्या मोसुल या शहरातून आय.एस्.आय.एस्.ने कह्यात घेतले होते.

कर्नाटकात धर्मद्रोही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा नकोच ! - कर्नाटकातील हिंदुत्ववाद्यांचा पवित्रा

कर्नाटकात ६ ठिकाणी झाले राष्ट्रीय हिंदू आंदोलन
मंगळुरू
गदग

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

      रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
      स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

इसिसच्या आतंकवाद्यांनाही धडकी भरवणारा इस्रायल !

     इस्रायल या छोट्या देशाची लोकसंख्या ८० लाखांच्या जवळपास आहे; परंतु १५० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे ५६ मुसलमान देश इस्रायलला घाबरतात. ताजे उदाहरण म्हणजे संपूर्ण अरब देशात आय.एस्.आय.एस्. गोंधळ घालत आहे, लोकांना मारत आहे; परंतु त्यांनी आजपर्यंत सीरियाच्या शेजारचा देश असणार्‍या इस्रायलवर एकही गोळी चालवली नाही; कारण इस्रायलला त्यांनी थोडा जरी त्रास दिला, तरी इस्रायलकडून त्यांच्यावर मिसाईल सोडले जाईल, याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्याकडे मानवाधिकारसारखी निरर्थक बडबड करणारा कोणी नाही.
     इस्रायलला ही प्रतिष्ठा सहज नाही मिळाली. ज्या वेळी यहुदी लोक हिटलरपासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इस्रायलला पोहोचले, त्या वेळी इस्रायलची निर्मिती झाली. अरब देशातील मुसलमानांनी १९४८ मध्ये प्रथम इस्रायलवर आक्रमण केले होते. त्या वेळी इस्रायलची निर्मिती नुकतीच झाली होती. त्यांच्याकडे मोठी सेना, दारूगोळा, बॉम्ब नसूनसुद्धा इस्रायलने अगदी सहजच १९४८ मध्ये अरब देशाचा पराभव केला. तेव्हापासून आतापर्यंत सहा वेळा अरब देशांनी इस्रायलबरोबर युद्ध केले आहे आणि प्रत्येक वेळेला इस्रायलने या मुसलमान देशांना हरवले आहे. संख्यात्मक दृष्टीकोनातून पाहिले, तर १९४८ पासून आजपर्यंत अरब देश आणि इस्रायल यांच्यातील युद्धात इस्रायलचे २२ सहस्र सैनिक, तर मुसलमान देशांचे ९१ सहस्रांहून अधिक सैनिक मारले गेले. इस्रायलचा नकाशा बघितला, तर हा देश चारही बाजूंनी मुसलमान देशांनी वेढला गेला आहे आणि तरीही एकही मुसलमान देश किंवा इसिस यांची इस्रायलला छेडण्याची हिंमत होत नाही. इस्रायलला तो इस्लामी देशांचा काळ आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

दैव देते आणि कर्म नेते...!

     टीचभर पोटासाठी मनुष्य काही ना काही उद्योग करत असतो. आता हे उद्योग श्रीमंतांचेही असतात आणि गरिबांचेही...टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या उद्योगाचा विचार केला, तर त्यांना टीचभर पोटासाठी करोडो रुपयांची संपत्ती कशाला लागते, असा आपल्याला प्रश्‍न पडेल; पण बड्या माणसांचे उद्योग वेगळे आणि सामान्य माणसाचे वेगळे !! बड्या उद्योगपतींच्या उद्योगातून स्वत:समवेत सहस्रो लोकांचे पोट भरत असते, तर सामान्य माणसाचा उद्योग हे त्याच्यासमवेत त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. येथे उद्योग हा शब्द कामधंदा या अर्थाने वापरला; पण काही लोकांचे उद्योगच वेगळे. कोणाचा कचर्‍यातून प्लास्टिक गोळा करण्याचा, तर कोणाचा भीक मागण्याचा...हो, हाही एक उद्योगच ना ! उदरनिर्वाहासाठी भीक मागणे, हाही एक आता आपल्याकडे उद्योगच झालाय.

दोन शतके काटेकोर हिशोब ठेवणारा फ्रान्स !

      आफ्रिकेतील उत्तर टोकाला अल्जेरिया नावाचा देश आहे. सतराव्या शतकाच्या आरंभी अल्जेरियातील लुटारूंनी समुद्रातील अनेक राष्ट्रांची जहाजे लुटून धुमाकूळ घातला होता. वर्ष १६०३ पासून त्यांनी फ्रान्स या देशाची जहाजे लुटणे चालू केले. शंभर वर्षे ही लुटालूट चालू होती. फ्रान्समधील राजे या लुटीत झालेल्या हानीची काटेकोरपणे नोंद ठेवत असत. त्यानंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, नेपोलियनने अर्धा युरोप लुटला आणि त्याचा वर्ष १८२१ या वर्षी त्याचा अंतही झाला; पण अल्जेरियन लुटारूंना कोणीही थोपवू शकले नाही. या पूर्ण कालावधीत झालेल्या हानीच्या नोंदी घेणे मात्र फ्रान्समध्ये अविरतपणे चालू होते. वर्ष १८३० या वर्षी लुटीची एकूण बेरीज ५ कोटी ५६ लक्ष ८४ सहस्र ५२५ सुवर्ण फ्रँक एवढी झाली. १८३० या वर्षी फ्रान्सने अल्जेरियाविरुद्ध युद्ध पुकारले. फ्रेंच लष्करी अधिकारी अल्जेरियाच्या कोषागारापर्यंत पोहोचले. कोषागार उघडून तेथील लुटीचे मोजमाप करून मूल्यांकन केले गेले. हे मूल्यांकन ५ कोटी ५६ लक्ष ८४ सहस्र ५२७ सुवर्ण फ्रँक झाले. २२७ वर्षांनंतर केलेल्या हिशोबात केवळ २ सुवर्णनाणी अधिक मिळाली ! फ्रान्सला ही सर्व संपत्ती आणि त्याच्या व्याजापोटी अल्जेरियाचे राज्य मिळाले.
      (कुठे शत्रूराष्ट्राने केलेल्या लुटीचा काटेकोरपणे हिशोब ठेवणारा फ्रान्स आणि कुठे निर्मितीच्या वेळी शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला उधार म्हणून दिलेल्या ५५ कोटी रुपयांकडे दुर्लक्ष करणारा भारत ! - संपादक)
(आश्‍चर्य कथा, साम्यविज्ञान) 

खालावत चाललेला भारतीय शैक्षणिक दर्जा, ही एक मोठी समस्या !

१. शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालवल्यानेच मुलांचा खाजगी शाळांमध्ये ओघ !
     पाटणा येथे आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एका मुलाने निःशब्द केले. या संमेलनात नालंदा येथील ७ वर्षांच्या कुमार राज याने बिहारची शिक्षणव्यवस्था या विषयावर भाषण करतांना आपल्या शिक्षणव्यवस्थेचे पितळ उघडे करत म्हटले की, शासकीय आणि खासगी शाळांची व्यवस्था दोन प्रकारची आहे. श्रीमंतांची मुले ही नामांकित खासगी शाळांमध्ये, तर गरिबांची मुलेच केवळ शासकीय शाळांमध्ये जातात. यावरून हे सिद्ध होते की, खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा चांगला नाही.

भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवण्याची गरज !

१. इंग्रजीच्या अवडंबरामुळे भारतियांमध्ये स्वभाषेविषयी न्यूनगंड !
     भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे. भारतियांमध्ये स्वभाषेविषयी सतत न्यूनगंड दिसून येतो.
२. इंग्रजी ही व्यापाराची भाषा असल्याने ती जगावर थापली गेली आहे
     आज भारतच नाही, तर जपान, चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या स्वभाषेचा अभिमान बाळगणार्‍या देशांमध्येही आता इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे; कारण इंग्रजी ही व्यापाराची भाषा झाली आहे. आर्थिक व्यवहाराच्या निकडीतून इंग्रजी भाषा जगावर थापली गेली आहे. जागतिकीकरणानंतर प्रसारमाध्यमांनीही सतत प्रगती करत जाणार्‍या इंग्रजी भाषेचा प्रभाव असलेल्या (upwardly mobile) ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित केले. या वर्गाच्या तोंडात वसलेली भाषा इंग्रजी होती. त्याचा परिणाम माध्यमांच्या भाषेवरही झालेला दिसतो. आज मराठी भाषेच्या अस्तित्वाची ओरड करणारा सुशिक्षित शहरी वर्गच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो. मराठीतील पुष्कळ मोठमोठ्या साहित्यिकांची मुले आणि नातवंडेही इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत.

इतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना यांच्या गोष्टी साहित्यिक कधी लिहिणार ?

    
श्री. अरविंद कुळकर्णी
१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

      राष्ट्रपर्वच्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला होता. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
१. साहित्यिकांचे उत्तरदायित्व !
      साहित्यिक हा देवी शारदा आणि श्रीगजानन यांच्या अक्षुण्ण वर्तमानपत्रातील वार्ताहर असतो. तो लिहितो, म्हणजे ईश्‍वरसेवा करतो. तो इथे जे पहातो त्यातील कथायोग्य विषय निवडून त्यावरील लेखनाद्वारे कर्तव्याची पूर्ती त्याने प्रामाणिकपणे करावी, अशी अपेक्षा असते. आमचे साहित्यिक अप्रामाणिक होते, असे नाही. पण धन्योऽहम् न मे कर्तव्य मस्ति । असे म्हणण्याचा अधिकार प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी कावळे-चिमण्यांचा संसार न रंगवता मोठे विषय लेखनासाठी निवडले पाहिजेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

इतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना यांच्या गोष्टी साहित्यिक कधी लिहिणार ?

१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होणार असलेल्या 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
श्री. अरविंद कुळकर्णी
     राष्ट्रपर्वच्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला होता. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 
१. साहित्यिकांचे उत्तरदायित्व !
     साहित्यिक हा देवी शारदा आणि श्रीगजानन यांच्या अक्षुण्ण वर्तमानपत्रातील वार्ताहर असतो. तो लिहितो, म्हणजे ईश्‍वरसेवा करतो. तो इथे जे पहातो त्यातील कथायोग्य विषय निवडून त्यावरील लेखनाद्वारे कर्तव्याची पूर्ती त्याने प्रामाणिकपणे करावी, अशी अपेक्षा असते. आमचे साहित्यिक अप्रामाणिक होते, असे नाही. पण धन्योऽहम् न मे कर्तव्य मस्ति । असे म्हणण्याचा अधिकार प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी कावळे-चिमण्यांचा संसार न रंगवता मोठे विषय लेखनासाठी निवडले पाहिजेत.

मुंबई येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभा !
दिनांक : १७ जानेवारी २०१६ वेळ : सायं. ६ वाजता
स्थळ : चुनाभट्टी, म.न.पा. शाळेचे सभागृह, व्ही.एन्. पुरव मार्ग, चुनाभट्टी(पू.), मुंबई - २२
संपर्क क्र. : ९९६७३२३८९५
हिंदूंनो, या सभेला आपण सहकुटूंब उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावा !

धर्मपरंपरेनुसार केवळ पुरोहितांनाच चौथर्‍यावर प्रवेश असावा ! - श्री श्री रविशंकर

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचाही 
शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करण्याला विरोध
     फोंडा (गोवा) - शनिशिंगणापूर मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने बाहेरूनच प्रदक्षिणा घालणे योग्य आहे. कुठल्याही स्त्री-पुरुषाला चौथर्‍यावर प्रवेश करण्याची अनुमती देण्यात येऊ नये. धर्मपरंपरेनुसार केवळ तेथील पुरोहित-पंडित यांनाच चौथर्‍यावर जाऊ द्यावे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी हिंदुहितासाठी कार्यरत असलेल्या हिंदु वार्ता या इंटरनेट वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना मांडले. याद्वारे त्यांनी सध्या महराष्ट्रात महिलांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याची मागणी करणार्‍या हिंदुद्रोह्यांना विरोधच केला आहे.

साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न

 
यज्ञाचा संकल्प करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे)
   रामनाथी (गोवा) - साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रथमच १५ जानेवारी या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वांचे कल्याण व्हावे अन् जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली झालेल्या या यज्ञाने हिंदु धर्मातील यज्ञ संस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा प्रत्ययास आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. अनंत (भाऊ) पवार, प.पू. कलावती आई यांच्या निस्सीम भक्त सौ. स्मिता (माई) नाईक आणि सौ. लक्ष्मीछाया देसाई यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

      कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस, कुडाळ येथील श्री. अनंत उपाख्य भाऊ आत्माराम पवार (वय ६३ वर्षे) आणि साळगाव, कुडाळ येथील प.पू. कलावती आई यांच्या निस्सीम भक्त सौ. स्मिता उपाख्य माई नाईक (वय ६८ वर्षे) आणि पिंगुळी येथील सौ. लक्ष्मीछाया रंजन देसाई (वय ५९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी १४ जानेवारी या दिवशी घोषित केले. पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सनातनचे साधक उपस्थित होते.
सौ. लक्ष्मीछाया देसाई (उजवीकडे) यांचासत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये
श्री. भाऊ पवार (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये

सौ. स्मिता (माई) नाईक (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये

पिंगुळी
      सौ. लक्ष्मीछाया देसाई या सनातनचे साधक श्री. रंजन देसाई यांच्या धर्मपत्नी होत. त्या घरातील प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करतात. जेव्हा त्यांना शक्य असेल, तेव्हा त्या पिंगुळी, कुडाळ येथील सेवाकेंद्रात येतात. त्यांचा स्वभाव स्थिर, प्रेमळ असा असून त्या अतिशय सहनशील आहेत. श्री. रंजन देसाई गेली १५ वर्षे सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करत आहेत. सौ. देसाईकाकू यांनी इतकी वर्षे पूर्ण घराचे दायित्व उत्तम रितीने सांभाळले.

उपजतच सात्त्विकतेची आवड असणारा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा मुंबई येथील कु. देवर्ष तावडे (वय ७ वर्षे) !

कु. देवर्ष तावडे
      उद्या पौष शुक्ल पक्ष अष्टमी (१७.१.२०१६) या दिवशी मुंबई येथील कु. देवर्ष साकेत तावडे याचा वाढदिवस आहे. तो देवद आश्रमात सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सत्यवती दळवी (वय ८० वर्षे) यांचा पणतू (मुलीचा नातू) आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आजी आणि पणजी यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. देवर्ष तावडे याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. चित्रकलेची आवड असणे
      कु. देवर्ष अभ्यासात हुशार आहे. त्याला चित्रकलेची आवड आहे. सनातनचे श्रीकृष्णाचे चित्र तो हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करतो.

ती. भाऊकाकांच्या सहज वागण्यातून प.पू. डॉक्टरांची आठवण होऊन कृतज्ञता वाटणे आणि आनंद होणे

श्री. अनंत आठवले
१. ती. भाऊकाकांकडे सेवेला गेल्यावर न कळलेल्या 
धारिकेतील सूत्रांचे आकलन होऊन आनंद अनुभवता येणे
      ती. भाऊकाकांना (प.पू. डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत आठवले) जी धारिका पहाण्यासाठी द्यायची होती, ती मी आदल्या दिवशी वाचली; पण मला त्या धारिकेतील काहीच समजले नव्हते. दुसर्‍या दिवशी मी ती. काकांकडे सेवेला गेल्यावर धारिका पडताळतांना तिच्यातील सूत्रांचे सहज आकलन होऊन अर्थ समजत होता आणि आनंदही अनुभवता आला.

उच्छिष्ट गणपति यज्ञापूर्वीच्या विधींचे कु. रजनी कुर्‍हे यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. रजनी कुर्‍हे
१. गोपूजन
अ. गोपूजनाच्या वेळी ३३ कोटी देव प्रत्यक्ष येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संपूर्ण विश्‍वाला आणि सर्व साधकांना आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचे जाणवले.
आ. गोमातेचे पूजन संपन्न झाल्यावर तिने गोमूत्र दिल्याने तो यज्ञासाठी शुभसंकेत असल्याचे जाणवले.
२. गजपूजन
अ. गजपूजनाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीगणेश श्रीगजाच्या माध्यमातून आला आहे, असे वाटले.
आ. गजआगमनाच्या वेळी सर्वत्र आनंद लहरी पसरल्याने हे हिंदु राष्ट्र लवकरच स्थापन होण्याचे शुभसंकेत आहेत, असे वाटले.

रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ जानेवारी या दिवशी झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण

उच्छिष्ट गणपति यज्ञ चालू 
होण्यापूर्वी कु. संध्या माळी यांना जाणवलेली सूत्रे
कु. संध्या माळी
१. यज्ञकुंडाभोवती गणेशतत्त्वाच्या पिवळ्या रंगाच्या ज्ञानमय लहरी गोल आकारात संथ गतीने फिरत होत्या.
२. यज्ञ चालू होण्यास काही कालावधी असल्याने कार्य करण्याच्या दृष्टीने गणेश लहरी सिद्ध असून प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आज्ञेची वाट पहात होत्या.
३. पूजन करण्यासाठी गाय आणल्यावर
     यज्ञाभोवतीच्या ५० फूट वातावरणातील चैतन्य स्थिर न रहाता संथ गतीने कार्याच्या उद्देशानुसार आकाशाच्या दिशेने प्रवाहित होण्यास प्रारंभ झाला.
४. पूजन करण्यासाठी हत्ती आणल्यावर
अ. हत्तीत गणेशलहरी ब्रह्मांडातून खेचून आणण्याची क्षमता अधिक प्रमाणात असते. हत्तीच्या माध्यमातून गणेशपूजन केल्यावर चैतन्य, शक्ती आणि गणेशलहरी एकत्रित होऊन कार्याच्या दिशेने कार्यान्वित झाल्या.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

कु. संध्या माळी यांनी उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी केलेले सूक्ष्म-परीक्षण

१. प.पू. डॉक्टर यांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर : प.पू. डॉक्टरांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर यज्ञाच्या उद्देशाप्रमाणे कार्य करण्यासाठी ब्रह्मांडातील ज्ञानलहरी वेगाने यज्ञकुंडाकडे आल्या आणि यज्ञकुंडापासून १०० फूट अंतरावर येऊन थांबल्याचे जाणवले.
२. प.पू. डॉक्टरांनी संकल्प सोडल्यावर : पंचमहाभूते आणि सर्व देवता यज्ञस्थळी उपस्थित होत्या. त्यांनी कार्याला आशीर्वाद दिला आणि पुष्पवृष्टी केली.
३. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात आहुती दिल्यावर पंचतत्त्वातील अग्निदेवता स्थुलातून यज्ञकुंडात उभी असल्याचे दिसले.

समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याचे सौ. रंजना गडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

प.पू. रामभाऊस्वामी
     तंजावूर, तमिळनाडू येथील गणपतीचे उपासक प.पू. रामभाऊस्वामी यांचा सन्मान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते १४ जानेवारीला करण्यात आला. त्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.
१. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या डोक्यावर समर्थ 
रामदासस्वामी यांचे दर्शन होणे आणि प.पू. डॉक्टर अन् 
प.पू. रामभाऊस्वामी यांच्या भेटीचा ते आनंद घेत असल्याचे जाणवणे
     प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी आगमन होण्यापूर्वी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आसंदीवर नारींगी रंगाचे गोलाकार वलय दिसले. सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी आसन ग्रहण केल्यावर त्यांच्या डोक्यावर समर्थ रामदासस्वामी यांचे दर्शन झाले. संपूर्ण सोहळा होईपर्यंत समर्थ रामदासस्वामी यांचे अस्तित्व जाणवत होते. प.पू. रामभाऊस्वामी प.पू. डॉक्टरांशी बोलत असतांना भावजागृती होत होती. वातावरणात राम राम ... असे शब्द सर्वत्र पसरतांना दिसले. प.पू. डॉक्टर आणि प.पू. रामभाऊस्वामी ज्या ठिकाणी बसले होते, तेथे समोर मोकळ्या जागेत समर्थ रामदासस्वामी अधांतरी बसलेले दिसले. ते प्रसन्न आणि हास्य मुद्रेने या भेटीचा आनंद घेत असल्याचे जाणवले. जणू काही त्यांनीच त्यांच्या शिष्यासाठी हे जुळवून आणले आहे. समर्थ रामदासस्वामी यांच्याकडून प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडे नारींगी रंगाची शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. 
आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.५.२०१५)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचे महत्त्व !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पालकांची महत्त्वाकांक्षा !

संपादकीय 
     राजस्थानमधील कोटा येथे अलीकडेच १४ वर्षीय भानुकुमार या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त वृत्तपत्रांत झळकले. बिहारमधील सहारसा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भानुकुमार यास आय.आय.टी. प्रवेश प्रशिक्षणवर्ग आणि बारावीची शाळा यांचा तणाव सहन न झाल्याने त्याने हे अंतिम पाऊल उचलले, असे चौकशीअंती उघड झाले. आत्महत्या करण्याची ही एकच घटना नाही. कोटा येथील आय.आय.टी. प्रवेश प्रशिक्षणवर्गात शिक्षण घेणार्‍या ११ विद्यार्थ्यांनी एका वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. हीच संख्या वर्ष २०१४मध्ये १४ तर २०१३मध्ये २६ होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn