Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज मकरसंक्रांत

आज मकरसंक्रांत
SSRF.org चा आज वर्धापनदिन
Forum For Hindu Awakning.org चा आज वर्धापनदिन

सनातन संस्था आतंकवादी नाही; संस्थेवर बंदी नाहीच ! - केंद्रीय गृहमंत्रालय

सहस्रावधी शिखांची हत्या करणार्‍या काँग्रेसने हिंदुत्ववादी सनातन संस्थेला आतकंवादी
ठरवणे म्हणजे काँग्रेसची सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ही वृत्ती असल्याचे सिद्ध होते !
हिंदूंनो, सनातनवर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !
  • सनातनला आतंकवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घालण्याची गोवा काँग्रेसची मागणी केंद्रशासनाने फेटाळली !
  • सनातन संस्था आतंकवादी नसल्याचा केंद्रशासनाकडून दुसर्‍यांदा खुलासा !
  • यापूर्वीही काँग्रेस आणि भाजप यांच्या शासनांनी सनातनवर बंदी घालणार नसल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. तरीही गोवा काँग्रेसने अशी मागणी करणे म्हणेज कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि ठार मारा, हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.
  • गोव्यातील एका जाहीर कार्यक्रमात आलेल्या तालिबान या जिहादी आतंकवादी संघटनेच्या प्रवक्त्याला विरोध न करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस धर्मप्रेमी सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करते, हे लक्षात घ्या !

(म्हणे) आम्हीही भारताला जशास तसे उत्तर देऊ !

कुत्र्याचे शेपूट... ही म्हण सार्थ ठरवणारे पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ !
पाकवर चोहोबाजूंनी दबाव वाढल्यावर मुशर्रफ यांचा थयथयाट
     नवी देहली - आमचा देशही काही लहान नाही, हे तुम्हाला चांगले ठाऊक असेल. भारताने आम्हाला धमकावणे चालू ठेवले, तर आम्हालाही जशास तसे उत्तर देण्यासाठी पावले उचलावी लागतील, अशी चेतावणी पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे. पाकने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेवर केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर समा या खाजगी वृतवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी ही चेतावणी दिली.

महाराष्ट्रात इसिसच्या गुप्त कारवाया चालू ! - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू

अशा देशद्रोह्यांना शोधून फ्रान्सप्रमाणे शासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
भारतात इसिसला थारा मिळणार नाही, असे म्हणणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे ?
     संभाजीनगर - मुसलमानांची लोकसंख्या असलेला भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश असून याचाच लाभ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) घेत आहे. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इसिसच्या गुप्त कारवाया चालू आहेत. इसिसकडे तरुणवर्ग आकर्षित होत असून त्यात महाराष्ट्राचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. आपली सुरक्षायंत्रणा सतर्क असून घातपाती कारवाया हाणून पाडण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केले. (आणखी किती घातपाती कारवाया हाणून पाडण्यात येणार आहेत ? यापेक्षा इस्रायल आणि फ्रान्स यांच्याप्रमाणे प्रतिआक्रमण करून आतंकवाद्यांचे मूळ केव्हा नष्ट करणार, याविषयी शासन धोरण आखेल का ? - संपादक)

नंदुरबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशाल मेळाव्यात सरसंघचालकांची हिंदूंना एकजुटीची हाक !


सरसंघचालक श्री. मोहन भागवत मेळाव्यात मार्गदर्शन करतांना
    नंदुरबार - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी वनवासी बंधू आपले कुटुंबीयच असल्याने त्यांच्या संपूर्ण समस्या संपवण्यासाठी एकजूट करा, असे विशाल मेळाव्यात आवाहन केले. नंदुरबार येथील सर्कस मैदानावर १४ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदु मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात ३५ सहस्र नागरिकांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या पूर्वी मोर्चा काढण्यात आला.
याविषयी अधिक वृत्त उद्या वाचा

राममंदिरासाठी १०० कोटी हिंदू न्यायालयाच्या निकालाची वाट बघणार नाहीत ! - तोगाडिया

     कानपूर - राममंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा प्रश्‍न आहे. म्हणून १०० कोटी हिंदू न्यायालयाच्या निकालाची वाट बघणार नाहीत, असे प्रतिपादन विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केले. राममंदिराबाबत सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखी कठोर भूमिका घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

भारत-पाक यांच्यातील सचिव पातळीवरील चर्चा पाककडून रहित

यावरून पाकला चर्चेत किती रस आहे, हे स्पष्ट होते ! भारताने आता पाकशी चर्चा करत
 बसण्यापेक्षा त्याला धडा शिकवावा, हीच समस्त जनतेची मोदी शासनाकडून अपेक्षा आहे !
  • बैठक रहित होण्याची दुसरी वेळ
  • ठोस कारणाशिवाय घेतला निर्णय 
  • पाककडून मसूर अझरच्या अटकेला दुजोरा नाही
      नवी देहली - पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या हवाई तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाक या दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये १४ जानेवारी या दिवशी होणारी नियोजित चर्चा पाककडून रहित करण्यात आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र्र मंत्रालयाचे प्रवक्ता क्वाझी खलिल्लुह यांनी ही चर्चा तूर्त रहित करण्यात आली असल्याचे सांगितले. दोन्ही देशांच्या सचिव पातळीवर चर्चा रहित होण्याची ही दुसरी वेळ आहे.

बेळगाव येथे 'मराठी टायगर्स' मराठी चित्रपटावर प्रशासनाकडून बंदी !

मराठीद्रोही प्रशासनाकडून सीमा भागातील मराठी भाषिकांची मुस्कटदाबी ! 
 हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाची लाट 
     बेळगाव, १४ जानेवारी (विशेष प्रतिनिधी) - येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित 'मराठी टायगर्स' हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे. (प्रशासनाची मराठी भाषिकांवर ही दडपशाहीच म्हणावी लागेल. असा निर्णय अन्य पंथियांच्या चित्रपटांविषयी घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ? - संपादक) ज्येष्ठ अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला 'मराठी टायगर्स' हा चित्रपट फेब्रुवारी मासात महाराष्ट्रासह बेळगाव येथेही प्रदर्शित होत आहे. प्रशासनाने असा अयोग्य निर्णय घेतल्यामुळे समस्त हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

एरव्ही यज्ञ-यागांवर टीका करणारे; मात्र प.पू. रामभाऊ स्वामी यांचे वैशिष्ट्यपूर्ण याग पाहूनही त्यांच्या महानतेची प्रांजळपणे कबुली न देणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

     एरव्ही यज्ञ-यागाला थोतांड म्हणणारे, हिंदु धर्मानुसार साधना केल्याने प्राप्त होणार्‍या सिद्धींविषयी प्रश्‍न उपस्थित करून त्याला हातचलाखी म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी एक महान योगी त्यांच्या साधनेद्वारे अग्निप्रवेश करतांना तेथे उपस्थित राहूनही त्यांची दखल घेत नाहीत, तेव्हा त्यांचे वैचारिक खुजेपण प्रकर्षाने लक्षात येते. तंजावूर (तमिळनाडू) येथील महान योगी प.पू. रामभाऊ स्वामी यज्ञात आहुती देतांना ध्यानावस्थेत जातात आणि त्याच स्थितीत ते धगधगत्या यज्ञकुंडात जाऊन प्रत्येक वेळी १० मिनिटांपर्यंत पहुडतात. त्या वेळी त्यांच्या अंगावर केवळ एक शाल असते. या यज्ञयागांची माहिती, चलत्चित्रे (व्हिडिओ) आणि छायाचित्रे त्यांनी www.fireyogi.com या त्यांच्या संकेतस्थळावरही ठेवली आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तमिळनाडू येथील महान योगी संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

प.पू. रामभाऊ स्वामी आणि परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची मंगल भेट
    रामनाथी (गोवा), १४ जानेवारी (वार्ता.) - सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी आणि गणपतीचे उपासक संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश स्वामी यांच्यासह १३ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. या वेळी त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. या भेटीत त्यांचा सन्मान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले उपस्थित होते.   
      आश्रमभेटीच्या वेळी प.पू. रामभाऊ स्वामी यांनी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या वेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना प.पू. महाराज म्हणाले, गुरूंचे महत्त्व फार आहे. गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी । जेव्हा आपण गुरुमंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्याला आध्यात्मिक बळ प्राप्त होते. ज्याप्रमाणे योग्य प्रकारे बीज रोवल्यावर त्याचे रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये होते, त्याप्रमाणे बीजाक्षरांचा व्यापक प्रभाव तयार होत असतो.

तुर्कस्थानमध्ये बॉम्बस्फोटात ५ ठार, ३९ घायाळ

इस्लामी राष्ट्रात असा हिंसाचार का होतो ?, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी द्यावे !
     इस्तंबूल - तुर्कस्थानच्या आग्नेय भागात आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या एका स्फोटात ५ नागरिक ठार झाले, तर ३९ जण घायाळ झाले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या संघटनेने सिनार शहरातील एका गाडीमध्ये हा स्फोट घडवून आणला. तुर्कस्थानला सध्या आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेसह कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या संघटनेशी सामना करावा लागत आहे.
    स्फोट झालेल्या ठिकाणी २ जण जागीच ठार झाले, तर या शक्तीशाली स्फोटामुळे घटनास्थळाच्या जवळ असलेली इमारत कोसळली. त्यात अन्य ३ जण मृत्यूमुखी पडले. तुर्कस्थानने आय.एस्.आय.एस्.विरुद्ध मोहीम उघडल्यानंतर देशांतर्गत आतंकवादी गटांवरही आक्रमणे चालू केली. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी हा गट गेल्या अनेक वर्षांपासून तुर्कस्थानमध्येच एका अन्य स्वतंत्र देशाची मागणी करत आहे.

आम्हाला बुलेट ट्रेन नको; पण आमच्या सैनिकांना बुलेटप्रुफ जॅकेट द्या !

अधिवक्त्या सगिना वाल्यात यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
अधिवक्त्या सगिना
      मुंबई - मला भारतीय सैनिकांचा पुष्कळ अभिमान वाटतो की, ते देशासाठी सर्वस्व पणाला लावतात; पण हा देश त्यांना सुरक्षेच्या पुरेशा सुविधा पुरवत नसल्याविषयी भीतीही वाटते. त्यामुळे आम्हा भारतियांना एक वेळ बुलेट ट्रेन नाही मिळाली, तरी चालेल; पण आमच्या देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना बुलेटप्रुफ जॅकेट (चिलखत) द्यायला हवे, अशी मागणी अधिवक्त्या सगिना वाल्यात यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. चेन्ज डॉट ओआर्जी (change.org) या संकेतस्थळावर त्यांनी हे पत्र ठेवले असून तेथे त्यांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६६ सहस्रांहून अधिक जणांनी स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

बार्शीत (जिल्हा सोलापूर) अतिक्रमण विभागाच्या कारवाईत १ मदरशासह ७ मंदिरे जमीनदोस्त

भाविकांचा विरोध, पोलिसांचा बंदोबस्त 
     बार्शी (जिल्हा सोलापूर), १४ जानेवारी (वार्ता.) - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येथील नगर परिषदेने चालू केलेल्या शासकीय जागेवरील रस्त्याला अडथळे निर्माण होणार्‍या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या कार्यवाहीस नुकताच प्रारंभ झाला. अंमलबजावणीच्या दुसर्‍या दिवशी ४२२ परिसरातील १ मदरस्यासह ७ मंदिरे अतिक्रमण विभागाच्या वतीने पाडण्यात आली. यात चिंतामणी गणेश मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिर हे स्वत:हून काढून घेतले, तर लोकप्रिय अशा प्रसन्नदाता गणेश मंडळाने मंदिर स्थलांतरीत करण्यासाठी नगरपालिकेकडे अनुमती मागितल्यानंतर प्रस्ताव मान्य करून स्थलांतरीत करण्यासाठी १ महिन्याची मुदत प्रसन्नदाता गणेश मंडळास मिळाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकारीपदी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ११ जानेवारीपासून चालू झालेली अनधिकृत धार्मिक स्थळांवरची कारवाई दुसर्‍या दिवशीही कायम होती. या वेळी प्रांताधिकारी शहाजी पवार, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांसह नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंढे यांच्या गाडीवर वाळूमाफियांचे आक्रमण !

जिल्हाधिकारीही सुरक्षित नसलेल्या राज्यात सर्वसामान्यांची काय कथा ! 
     कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर), १४ जानेवारी - जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. १२ जानेवारीला सकाळी शेटफळ-कुर्डूवाडी रस्त्यावर लऊळ गावाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी डंपरचालक सचिन मिसाळ याच्यावर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 

बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाचे मत मागवले

नैतिकतेचे अधःपतन रोखण्यासाठी धर्मशिक्षणाशिवाय पर्याय नाही ! 
समाज धर्माचरणी झाला, तरच बलात्कारासारखे प्रकार थांबतील !
गेल्या ५ वर्षांत अशा गुन्ह्यात प्रत्येक वर्षी सरासरी १५१ टक्के वाढ !
      नवी देहली - ज्या आरोपींच्या विरोधात लहान मुलांवर बलात्कार केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत, त्यांना कायद्यानुसार देण्यात येणार्‍या शिक्षेसह शस्त्रक्रिया करून अथवा रासायनिक प्रक्रियेने नपुंसक केले, तरच असे प्रकार थांबू शकतील. यावर केंद्रशासनाची काय भूमिका आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने महाअधिवक्त्यांकडे केली आहे. या संबंधात सर्वोच्च न्यायालयातील महिला अधिवक्त्यांच्या संघटनेच्या वतीने संघटनेच्या सरचिटणीस प्रेरणा कुमारी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी हिवाळी सुटीनंतर घेण्यात येईल.

अल् कायदा आणि आय.एस्.आय.एस् यांना नेस्तनाबूत करू ! - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा

कुठे आतंवादी संघटनांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार करणारी अमेरिका, 
तर कुठे आतंकवाद्यांना पोसणारा भारत ! 
     वॉशिंग्टन - ज्यांना स्वत:सह इतरांच्याही जीवनाचे मूल्य नाही, ते इतरांना मोठी हानी पोहोचवू शकतात. अल् कायदा आणि आय.एस्.आय.एस् या आतंकवादी संघटनांपासून अमेरिकेला थेट धोका असून त्यांना नेस्तनाबूत करणे, हे आमचे लक्ष्य आहे, असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेला संबोधित करतांना व्यक्त केला. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील त्यांचे हे शेवटचे भाषण होते.

पर्यावरण रक्षणासाठी देशी गायींना पशूवधगृहात पाठवण्यावर देशात बंदी आणावी !

गोरक्षणासाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता अश्‍विनी कुमार यांचे अभिनंदन !
राष्ट्रीय हरित लवादाकडे अधिवक्ता अश्‍विनी कुमार यांची याचिकेद्वारे मागणी
     नवी देहली - पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने देशी गायींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोठ्या संख्येने त्यांची पशूवधगृहात हत्या होत असल्याने देशी गाय हा प्रकार भारतातून लुप्त होईल कि काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. त्यामुळे देशी गायींना पशुवधगृहात पाठवण्यावर संपूर्ण देशभरात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता अश्‍विनी कुमार यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे एका याचिकेद्वारे केली. न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली लवादाने यासंदर्भात देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवून त्यांचे यासंदर्भात काय म्हणणे आहे, ते मांडण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी २ फेब्रुवारी २०१६ या दिवशी होणार आहे.

हिंदू सेनेकडून पाकिस्तान एअरलाईन्सच्या कार्यालयाची तोडफोड

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी शासन कशाची वाट पहात आहे ? 
     नवी देहली - पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात हिंदू सेनेने येथील बाराखंभा मार्गावरील पाकिस्तान एअरलाईन्सच्या कार्यालयावर राग काढला. या कार्यालयाची सेनेच्या ४-५ कार्यकर्त्यांनी नुकतीच तोडफोड केली आणि पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रकरणी एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले, "पाकिस्तान एअरलाईन्सने भारतातील त्यांची कार्यालये बंद केली पाहिजेत. आमच्या कार्यकर्त्यांनी काही बॉम्ब फोडला नाही. हा भारतीय लोकांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात वाढत असलेला संताप आहे. आतंवादाच्या विरोधात लोकांमध्ये संताप आहे, हे शासनाला समजले पाहिजे."

संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात नवा वाद निर्माण केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल ! - माधव भंडारी

नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना चेतावणी 
     पुणे, १४ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलेली क्षमायाचना संदिग्ध आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ५ जानेवारीला पत्र पाठवले होते, तर इतके दिवस तसे का सांगितले नाही ? संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला, तर यांना परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे.

धाराशिव येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम ! 
     धाराशिव, १४ जानेवारी (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारीच्या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांंच्या वतीने तहसीलदार श्री. शिवकुमार स्वामी यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार स्वामी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीच्या वतीने सर्वश्री विलास पुजारी, तानाजी गोरे, सौ. सुमन स्वामी, सौ. लक्ष्मी पिंपळे यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

धार्मिक प्रकरणांमध्ये न्यायालयाचा अनावश्यक हस्तक्षेप ! - तमिळनाडूतील हिंदुत्वादी संघटना

तमिळनाडूतील जल्लिकट्टू या बैलाच्या खेळावरील बंदीचे प्रकरण
     नवी देहली - तमिळनाडूतील जल्लिकट्टू या बैलाच्या खेळावरील बंदी उठवणार्‍या केंद्रशासनाच्या अधिसूचनेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे तमिळनाडूतील हिंदुत्वादी संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी धार्मिक प्रकरणांमध्ये हा न्यायालयाचा अनावश्यक हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. 
      देशातील काही राज्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यंती आणि तमिळनाडूतील जल्लिकट्टू या बैलाच्या खेळावरील बंदी उठवणारी अधिसूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काढली. या अधिसूचनेला १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पोंगल सणाच्या निमित्ताने केंद्राच्या पर्यावरण खात्याने ही बंदी उठवली होती. त्या विरोधात प्राणी संरक्षण संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मेक इन इंडियाचे बोधचिन्ह विदेशी आस्थापनेने सिद्ध केले !

भारतीय बुद्धीवंत जगात विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव गाजवत असतांना मेक इन इंडियाचे बोधचिन्ह 
निर्मितीचे कार्य विदेशी आस्थापनाला देणे, म्हणजे भारतियांवर अविश्‍वास दाखवणे होय !
     भोपाल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया या उपक्रमाचे बोधचिन्ह विडेन+केनेडी या विदेशी आस्थापनाने तिच्या भारतीय शाखेत सिद्ध केल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत समोर आले आहे. 
      मध्यप्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी ही माहिती मिळवली. माहिती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मेक इन इंडियाच्या बोधचित्रासाठी वर्ष २०१४-१५ मध्ये क्रिएटिव्ह एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या होत्या. त्या आधारे अमेरिकेच्या विडेन+केनेडी इंडिया लि. या विज्ञापन आस्थापनाची निवड करण्यात आली आणि या आस्थापनानेच मेक इन इंडियाचे बोधचिन्ह सिद्ध केले. मेक इन इंडियाच्या प्रचार प्रसिद्धीचे कार्य विडेन+केनेडी या आस्थापनाकडे देण्यात आले आहे. त्याकरता या आस्थापनेला ११ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असेही उत्तरात म्हटले आहे. भारतामध्ये कल्पक प्रतिभेची कमतरता नाही. त्यामुळे भारतीय आस्थापनाकडून बोधचिन्ह सिद्ध केले असते, तर अधिक प्रभावी संदेश पोहचला असता, असे चंद्रशेखर गौर यांनी सांगितले.

विदर्भ झाला, तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही ! - श्रीहरि आणे

     नागपूर - विदर्भ झाला तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे महाधिवक्ता श्रीहरि आणे यांनी पुन्हा एकदा केले आहे. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
स्वतंत्र विदर्भ व्हावा कि नाही, या सूत्रावर जनचाचणी घेण्यात यावी. वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत आहेत का ? विदर्भातील जनमत घेतले, तर ८० टक्के लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असतील, असे वादग्रस्त वक्तव्य अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. विधीमंडळात अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेनेने हक्कभंग प्रस्तावही आणला होता. त्यांनी आणे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती.

मुुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानसोबत १ सहस्र कोटींचा करार

     नवी देहली, १४ जानेवारी - 'नदी म्हणावे कि गटार म्हणावे' अशा दयनीय अवस्थेला पोहोचलेल्या पुण्यातील मुळा आणि मुळा या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्रशासनाने जपानमधील 'जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी' (जायका) या आस्थापनाशी १ सहस्र कोटी रुपयांचा करार केला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि जायकाच्या अधिकार्‍यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी ४० वर्षांच्या मुदतीने जायका आस्थापन १ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. ही शुद्धीकरणाची योजना वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या करारांतर्गत ११ नवीन 'मल-जल शोधन' यंत्र निर्माण केले जाणार आहेत. या शुद्धीकरणावर ९९०.२६ कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यात केंद्रशासनाचा ८४१.७२ कोटी, तर पुणे महानगरपालिकेचा १४८.५४ कोटी रुपयांचा वाटा असेल. (शुद्धीकरणाच्या जोडीला नदी प्रदुषित होऊ नये, यासाठीही कठोर उपाययोजना केल्या जाणे आवश्यक आहे. नदी शुद्धीकरणासाठी आतापर्यंत राज्यकर्ते, अधिकारी आणि नागरिक यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते, तर आज १ सहस्र कोटी रुपये व्यय करण्याची वेळ आली नसती. - संपादक)

भूमाता ब्रिगेडने मशिदीतील स्त्रियांच्या प्रवेशाविषयीही बोलावे ! - विक्रम एडके, लेखक

     नवी मुंबई, १४ जानेवारी (प्रतिनिधी) - सध्या शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर आंदोलन करण्याची भाषा करणार्‍यांनी जरा मशिदींमध्ये घुसून तिथे स्त्रियांना प्रवेश द्यावा, असे आवाहन लेखक विक्रम एडके यांनी हिंदुद्वेष्ट्या भूमाता ब्रिगेडला केले. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान, सानपाडा आयोजित 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कैलास ताजणे होते. 

मुंबई येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभा ! 
दिनांक : १७ जानेवारी २०१६ वेळ : सायं. ६ वाजता 
स्थळ : चुनाभट्टी, म.न.पा. शाळेचे सभागृह, व्ही.एन्. पुरव मार्ग, 
चुनाभट्टी(पू.), मुंबई - २२ 
संपर्क क्र. : ९९६७३२३८९५ 
 हिंदूंनो, या सभेला आपण सहकुटंब उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 
पुण्यतिथीनिमित्त प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध ! 
     स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४ मार्च या दिवशी तिथीनुसार तर २६ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार पुण्यतिथी आहे. त्या निमित्त पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. 
१. 'ए ५' आकारातील पाठपोट पत्रक 
२. स्वा. सावरकर यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार सांगणारे ८ फूट (रुंदी) ७ फूट (उंची) या आकारातील प्रबोधनपर फलक 
     या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून ते सुयोग्य ठिकाणी लावावेत.


हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सातारा, पलूस, तासगाव आणि जत येथे प्रशासनाला निवेदने सादर

हिंदुत्ववाद्यांना प्रत्येक वर्षी अशी मागणी का करावी लागते ? प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची 
निर्मितीच होऊ नये, यासाठी शासन कठोर कायदा का नाही करत ?
राष्ट्रध्वजाचा मान राखा ! चळवळ
      सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, निवासी नायब तहसीलदार श्री. बी.एल्. मोरे आणि पोलीस अधिकारी श्री. संजय सुर्वे यांना देण्यात आले. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची छुप्यारितीने विक्री करणार्‍या दुकानदारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
      या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, बजरंग दलाचे श्री. मुकुंदराव पंडित, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश निकम, हेमंत सोनवणे, संदीप ढवळे, पंकज जगताप, शिवाजी दळवी, विलास कुलकर्णी, महेश गायकवाड उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

आताही भारतात आय.एस्.आय.एस्. ला थारा नाही, असे म्हणणार का ?
     भारतात विशेषत: महाराष्ट्रात आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या गुप्त कारवाया चालू आहेत. त्यांच्याकडे तरुण वर्ग आकर्षित होत असून त्यात महाराष्ट्राचे प्रमाण अधिक दिसून आले आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Maharashtrame ISISki gupta gatividhiya chalu. - kendriya gruha rajyamantri Kiran Rijiju
Es atankvad ko ham kab rokenge ?
जागो !
महाराष्ट्र में इसिसकी गुप्त गतिविधीया चालू. - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू
इस आतंकवाद को हम कब रोकेंगे ?

आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये ! - परवेझ मुशर्रफ यांचे फुत्कार

भारताने पाकिस्तानला धडा शिकवला असता, तर पाकच्या माजी 
शासकाचे भारताला धमकावण्याचे धाडस झाले नसते !
     दुबई - भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये, असे फुत्कार पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी काढले. आतंकवादाचा बीमोड करण्यासंदर्भात भारत पाकिस्तानवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. आतंकवाद्यांना अटक करण्यासंदर्भात पाकिस्तानवर अमेरिकेचाही दबाव आहे.

बडव्यांना नित्यपूजेचा अधिकार आहे ! - बडवे समाजाचा कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जानेवारी - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समस्त बडव्यांना श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्याचा अधिकार कायद्याने काढून घेतलेला नाही. तरीदेखील मंदिर समिती बडव्यांना नित्यपूजा करू देत नाही, यामुळे 'मंदिर समितीने बडव्यांना पूजा-अर्चा करण्यास अडवू नये', यासाठी समस्त बडवे समाजाच्या वतीने येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट करण्यात आला आहे. या दाव्याविषयी मंदिर समिती उच्च न्यायालयात अपील करणार असून याविषयी मुदत मिळावी; म्हणून त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे. याची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. समस्त बडवे यांच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे आणि अधिवक्ता आशुतोष बडवे काम पहात आहेत. 

पुणे शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे

पुणे शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार ! 
     पुणे, १४ जानेवारी - पुणे शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ८० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी मंडळाकडून गणवेश, स्वेटर, रेनकोट, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले जाते. त्यासाठी महानगरपालिका कोट्यवधी रुपयांचा व्यय करते; परंतु विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशाच प्रकारे शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे सभागृह नेते बंडू केमसे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर स्थायी समितीच्या बैठकीत दाखवले. हे गणवेश ६ मासांतच फेकून देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचेही केमसे यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेले बूटही विसंगत मापांचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आयुक्तांनी या गणवेशांची पडताळणी करून त्याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (नुसता अहवाल सादर करून उपयोगी नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा चौकशी आणि अहवाल हा निव्वळ फार्स ठरेल ! - संपादक) 

राज्यात गेल्या वर्षभरात ५८ सहस्र अपघातात १२ सहस्र जणांचे मृत्यू

दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघातांचे प्रमाण हे चिंताजनक आहे. 
याचाच अर्थरस्ते हे मृत्यूचे सापळे झालेे आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही ! 
     पुणे, १४ जानेवारी - गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये ५८ सहस्र अपघात झाले असून त्यामध्ये १२ सहस्र जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये झाले आहेत. यात पुण्यामध्ये सर्वाधिक १ सहस्र ३३९ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही भीषण वस्तुस्थिती राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे.

वाण म्हणून सात्त्विक वस्तूंचे दान द्या !

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने....
तिथी : हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी दर ऐंशी वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. हल्ली मकरसंक्रांतीचा दिवस १५ जानेवारीला आहे. 
इतिहास : संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. 
संक्रांतीविषयी पंचांगात असलेली माहिती : पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा वगैरे माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या बदलाला अनुसरून असते. संक्रांती ज्या वस्तू धारण करते, त्या वस्तू महाग होतात, असे म्हटले जाते.

केवळ कायद्याने नव्हे; तर नीतीमत्तापूर्ण आचरणानेच देशातील समस्यांची उकल करणे शक्य !

१. केवळ कायद्याने नव्हे, तर प्रत्येक भारतियाच्या प्रतिज्ञाबद्ध आचरणानेच भ्रष्टाचार थांबणे शक्य
     नजीकच्या काळात देशात अनेक चळवळी, आंदोलने उभी राहिली. या घटनांवर अनेक वृद्धांना पारावर बसून आपापली मोठमोठी मत मांडतांना मी बघितले. ती मते किती उथळ, फसवी होती, याचा मी अनुभव घेतला. देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पेटले. प्रचंड लोकमानसाच्या रेट्यात देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट होतो कि काय असे वाटू लागले; पण या आंदोलनातील माणसे पाहिली की, माझे मन साशंक होत होते. तरुण मंडळीच्या हातातले महागडे भ्रमणभाष (मोबाईल), त्यांच्या महागड्या दुचाकी पाहून मला वाटायचे, यांच्या वडिलांना विचारावे की, आपल्या मुलाचे हे लाड पुरवण्यासाठी पैसा कुठून येत आहे ? भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांतूनच भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे रहात नाही ना ?, असा प्रश्‍न मनात उभा राहिला.

वृद्धत्व आणि परिपक्वता

१. निवृत्तीनंतर ग्रंथ वाचन केल्याने विचारांची परिपक्वता (Maturity) येऊ शकणे : नोकरीतून निवृत्त झाल्याचा प्रत्येक माणसाला पुष्कळ आनंद होतो. नोकरीच्या जाचातून मुक्त झाल्याचे समाधान लाभते. मलाही लाभले; परंतु जीवनात एक पोकळी निर्माण होणार या भीतीपोटी चिंताही वाटू लागली. अशा वेळी सुंदर पुस्तके आणि ग्रंथ यांचा आधार घ्यावा. मला दुसरा पर्याय आवडला. मनाला पडणार्‍या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधता आली. 
    विल्यम जेम्स नावाच्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने म्हातारी माणसे ही वयाने मोठी झालेली मुले आहेत. (They are grown up children), असे म्हटलेले माझ्या वाचनात आले. याचे कारण देतांना तो म्हणतो, त्यांच्यात वृद्धपणाला साजेशी परिपक्वता (Maturity) नसते.

देहलीतील सम-विषम वाहतुकीच्या नियमाची निरर्थकता !

श्री. चेतन राजहंस
     डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर, रायपूर, दिल्ली आणि मुंबई या भारतातील ४ महानगरांमध्ये प्रवास करण्याचा योग आला. या प्रवासाच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने आलेले अनुभव सांगणारे हे सदर...
भाग १
    देहली शहर हे गॅस चेम्बर झाले आहे, अशी टीका सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर देहली शासनाने प्रदूषणात घट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चारचाकी वाहनांसाठी सम-विषम नियमाची आचारसंहिता निश्‍चित केली. रविवारी, तसेच देशातील राष्ट्रपती, पंतप्रधानादी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महिला, प्रवासी गाड्या इत्यादींना सवलत देणार्‍या या नियमाविषयी देहलीतील पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले, तर उर्वरित लोकांनी त्याला तुघलकी फर्मान संबोधून अप्रसन्नता व्यक्त केली. हा प्रयोग चीनमधील शांघाय नगरात यशस्वी झाला असल्याने देहलीतही यशस्वी होईल, अशी आशा बाळगली जात असतांनाच देहलीत गेल्या ५ दिवसांत लोकांची झालेली असुविधा न्यायालयाने टिपून हा प्रयोग तूर्त अल्पकालावधीसाठी करण्याची सूचना केली. देहलीतील वास्तव्यात या नियमाची अव्यवहार्यता लक्षात आली. त्यातील काही ठळक सूत्रे पुढे दिली आहेत.

आजचे मुक्त साहित्य मानवी जीवनातील उच्चतम मूल्ये जोपासण्यात, त्यांचे संवर्धन करण्यात अपयशी ठरली आहेत !

१५ ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी येथे होत असलेल्या 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
       दुर्भाग्याने, आजच्या साहित्याने मुक्त (म्हणजे अनिर्बंधाचे, स्वैराचाराचे) भरण-पोषण चालवले आहे. अश्रद्ध, अस्वस्थ, बेचैन जीवनदर्शन हेच आता साहित्याचे उद्दिष्ट झाले आहे. एक साहित्यिक मित्र सांगतात, मानवी मनाचे सूक्ष्मतिसूक्ष्म व्यापारप्रवाह उत्कटतेने प्रकट करण्यात आजच्या साहित्याने अमाप यश संपादन केले आहे. सूक्ष्मतिसूक्ष्म मनोव्यापार, प्रवाह म्हणजे लैंगिकतेचे प्रवाहच ना ! त्यांची परस्पर सुसंगत आणि विसंगत आवर्तने ही सगळी कामवासनेचीच ना ? स्थूल आणि सूक्ष्म पातळीवरचे विचार, सगळे कामवासनेचेच. आप्तस्वकीय, जीवनातील अस्तित्वाची श्रद्धेने जोपासलेली उच्चतम मूल्ये (Higher Values) निपटून टाकून, जे जीवनदर्शन घडेल ते विमनस्क, उद्ध्वस्त आणि उपरे, भोगलोलुप, कामुक, या रसायनांनीच भरलेले असेल. नेमके तेच आजच्या साहित्यात ओतप्रोत आहे.

हिंदु शरणाथिर्र्ंना न्याय मिळालाच पाहिजे !

     पाकिस्तानी गायक अदनान सामीला नुकतेच भारताचे नागरिकत्व देण्यात आले; परंतु पाकमधून आलेल्या शेकडो हिंदूंना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही. शासन अदनान सामीला भारताचे नागरिकत्व देते, मग आम्हाला का नाही ? असा प्रश्‍न या शरणार्थिंनी विचारला आहे. भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी पाकमधील हिंदूंनी काय करायला हवे, हे केंद्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे लोटली; पण आजपर्यंतच्या कोणत्याच शासनाला त्यांना न्याय देण्याची सुबुद्धी झाली नाही. नागरिकत्वाच्या सूत्रावर इतक्या वर्षांत ठोस निर्णय न होणे लांच्छनास्पद आहे. प्रचलित कायद्यानुसार पाकमधील हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्यात अडचणी असतील, तर त्यांत तातडीने पालट करून शरणार्थ्यांना दिलासा दिला गेला पाहिजे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

साहित्यिकांचे लिखाण आणि संतांचे लिखाण यांतील भेद

१. साहित्यिकांचे लिखाण (बाह्य कल्पनाविश्‍वावर आधारलेले) : मायेतील मोठमोठे साहित्यिक जे लिखाण करतात, त्यात केवळ सुख प्रदान करण्याची क्षमता असते; कारण हे लिखाण केवळ अनुभवांच्या बाह्य कल्पनाविश्‍वावर आधारलेले अथवा चितारलेले असते आणि यात भावनिक लोकेषणाही असते. 
२. संतांचे लिखाण (आत्मानुभूतीतून उमटलेले) : याउलट संतांचे लिखाण मात्र चैतन्यमय असते; कारण संतांना आत्मानुभूती आलेली असल्याने त्यांच्या पवित्र अशा चैतन्यमय विचारांतून, ईश्‍वराच्या चिंतनातून, गुरूंच्या स्मरणातून आणि आशीर्वादातून त्यांनी सर्वज्ञतेच्या स्तरावर ते ते आत्मबोध देणारे लिखाण केलेले असते. 
- एक विद्वान (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण एक विद्वान, गुरुतत्त्व आदी नावांनीही प्रसिद्ध आहे., (६.८.२०१२), सायं. ७) 

लेखकाचे स्वातंत्र्य !

१. लेखकाचे स्वातंत्र्य हे एक सार्वभौम मूल्य असणे
     लेखकाचे स्वातंत्र्य हे एक सार्वभौम मूल्य आहे कि नाही ? लेखकाने काय लिहायचे हे कोण ठरवणार ? शेक्सपियर आणि कालिदास यांनी काय लिहावे, हे एखादा गणवेशातला अधिकारी ठरवू शकेल काय ? तसे करण्याचा त्याला अधिकार देणे योग्य आहे काय ? तशी त्याची पात्रता आहे का ? गणवेशामुळे मिळालेला अधिकार सोडला, तर वाङ्मय विषयात निर्णय देण्याचा अधिकार त्याला का मिळावा ? वाङ्मय हा मुळी त्याचा प्रांतच नव्हे. त्या विषयातला तो अधिकारी पुरुष, तज्ञ असेलच, असे नाही. तसा तो नसण्याचा संभव अधिक आहे. मग एखादे नाटक रंगभूमीवर यावे कि नाही, एखादी कादंबरी बरी कि वाईट हे ठरवण्याचा ठेका त्याला का मिळावा ? मिळू नये, असेच प्रथमदर्शनी वाटते. तत्त्वतः लेखकाचे स्वातंत्र्य हे एक सार्वभौम मूल्यच मानले पाहिजे.

अखेर अधिवक्ता पुनाळेकर यांचा सल्ला सबनिसांना मोलाचा आणि फायद्याचा ठरला कि नाही ?

     पंतप्रधान मोदी यांच्यावर एकेरी भाषेत हिणकस वक्तव्य करणार्‍या श्रीपाल सबनिसांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी वैचारिक मळमळ कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाण्याचा मोलाचा सल्ला दिला; परंतु सबनिसांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून पराचा कावळा केला, असो. एक मात्र झाले, त्यांनी पुनाळेकर यांचा निषेध म्हणून का होईना, काही पुरो(अधो)गाम्यांना घेऊन एक दिवस मॉर्निंग वॉक केलेच. त्याचा त्यांना झालेला फायदाही लगेच म्हणजे अगदी एका दिवसात दिसून आला. त्यांनी मोदी यांची दिलगीरी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते शांत झाले असतीलच; परंतु सबनिसांच्या मनातील वादळही नक्कीच शांत झाले असेल. सकाळी एकांतात फिरायला गेल्याने मन एकाग्र अन् अंतर्मुख होते. काय योग्य आणि अयोग्य, याचा विवेकबुद्धीने विचार करता येतो. आपसूकच घेतलेले निर्णय योग्य ठरतात. हेच सबनिसांच्या बाबतीत झाले असावे. मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली असावी. त्यामुळेच त्यांनी उशिरा का होईना, मोदींची दिलगीरी मागितली, म्हणजे अखेर अधिवक्ता पुनाळेकर यांचा सल्ला सबनिसांना मोलाचा आणि फायद्याचा ठरला कि नाही ! 
- अधिवक्ता योगेश जलतारे, अकोला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील महान योगी आणि गणपतीचे उपासक तंजावूर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ स्वामी यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी कु. कल्याणी गांगण यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

प.पू. रामभाऊ स्वामी
कु. कल्याणी गांगण
१. प.पू. रामभाऊ स्वामी यांचे 
आश्रमात आगमन झाल्यावर
अ. १३.१.२०१६ या दिवशी प.पू. रामभाऊ स्वामी यांचे आगमन झाले. त्या वेळी त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना मागच्या काही युगांपासून ओळखत आहे. प.पू. डॉक्टरांचाही त्यांच्याशी युगायुगापासून संपर्क आहे, असे जाणवले. (प.पू. डॉक्टरांशी बोलतांना तेही अशाच अर्थाचे वाक्य म्हणाले. - संकलक)

प.पू. रामभाऊ स्वामी आणि त्यांचे शिष्य यांच्याविषयी कु. संध्या माळी यांना जाणवलेली सूत्रे

कु. संध्या माळी
प.पू. डॉक्टरांशी झालेल्या भेटीच्या वेळी प.पू. रामभाऊ
 स्वामी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१. प.पू. रामभाऊ स्वामी यांना बघितल्यावर
     प.पू. रामभाऊ स्वामी यांच्याकडून शांती आणि प्रीती यांची स्पंदने येत असल्याचे जाणवले.
२. बोलतांना
२ अ. यज्ञाविषयी : वातावरणात चंदेरी रंगाचे चमकणारे एक इंच व्यासाचे गोल आकाराचे गोळे पसरत आहेत.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

प.पू. रामभाऊ स्वामी यांच्याकडून थंड हवेचा झोत येत असल्याचे जाणवणे आणि त्यांच्या आगमनापूर्वी मनात महागणपतीच्या नृत्याच्या संदर्भात विचार येणे

  
आधुनिक वैद्या
(कु.) आरती तिवारी
   १३.१.२०१६ या दिवशी प.पू. रामभाऊ गोस्वामी आश्रम पहात असतांना खोली क्रमांक ३२४ मध्ये आले. त्या वेळी त्यांच्याकडून थंड हवेचा झोत माझ्याकडे येत असल्याचे मला अनुभवायला आले. ते येण्याच्या आधी माझ्या मनात अधून-मधून महागणपतीच्या नृत्याच्या संदर्भात विचार येत होते.
- आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०१६)

शिरवळ (जिल्हा सातारा) येथील श्रीमती रत्नप्रभा देशमुखआजी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून झाल्या जीवन्मुक्त !

श्रीमती रत्नप्रभा देशमुखआजी यांचा
सत्कार करतांना कु. वैभवी भोवर (डावीकडे)
     शिरवळ (जिल्हा सातारा), १४ जानेवारी (वार्ता.) - इतरांना साहाय्य करण्यासाठी सदा तत्पर असणार्‍या आणि कठीण प्रसंगात स्थिर रहाणार्‍या श्रीमती रत्नप्रभा देशमुखआजी (वय ७२ वर्षे) या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जीवनमरणाच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याची आनंददायी घोषणा ६४ टक्के पातळीच्या कु. वैभवी भोवर यांनी केली. १० जानेवारी या दिवशी शिरवळ येथे एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कु. वैभवी भोवर यांनी एक भावजागृतीचा प्रयोग घेतला. भावजागृतीच्या प्रयोगानंतर साधकांनी प्रयोगाच्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे सांगितली. त्यानंतर कु. वैभवी यांनी देशमुखआजींच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता सांगितली. आजींच्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता कळताच उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली. कु. वैभवी भोवर यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्रीमती देशमुखआजींचा सत्कार करण्यात आला.
      सर्व काही गुरुदेवांनीच करवून घेतले, अशी प्रतिक्रिया श्रीमती देशमुखआजी यांनी व्यक्त केली.

वयाच्या ७२ व्या वर्षी तळमळीने सेवा करणार्‍या आणि प्रत्येक कृती ईश्‍वराशी जोडणार्‍या शिरवळ (जिल्हा सातारा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रत्नप्रभा भगवान देशमुखआजी !

      शिरवळ (जिल्हा सातारा) येथील श्रीमती रत्नप्रभा भगवान देशमुखआजी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. नेमकेपणाने बोलणे
      आजी मितभाषी आहेत. त्या नेमकेपणाने बोलतात. आजींचे बोलणे शांत असल्याने ऐकावेसे वाटते. - सौ. शिल्पा पानसे आणि सौ. कल्पना निवृत्ती देशमुख
२. शिक्षिकेची नोकरी करत असतांना त्यांनी चार मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. 
- सौ. कल्पना निवृत्ती देशमुख
३. आजी कधीच रागावत नाहीत. त्या शांत आहेत, तसेच सर्वांशी मिळून-मिसळून वागतात. 
 - श्रीमती अंबुताई कुंभार आणि श्रीमती उर्मिला धूत

सिंगापूर येथे एस्.एस्.आर्.एफ्.ने आयोजित केलेल्या प्रथम कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त...
     नोव्हेंबर २०१५ मधे सिंगापूर येथील साधकांसाठी २ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, आध्यात्मिक त्रास कसे ओळखावे ?, सत्सेवेचे महत्त्व, साधनेच्या अंतर्गत कृतीच्या स्तरावर करावयाचे प्रयत्न इत्यादी विषयांवर मार्गदर्शन, तसेच आध्यात्मिक संशोधनावर आधारलेली चलतचित्रांचे (व्हिडिओ) प्रदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे साधकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठीही प्रतिदिन एक सत्र होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्यातील भीती वाटणे या स्वभावदोषात झालेले पालट !

सौ. श्‍वेता क्लार्क
      जून-जुलै २०१५ मध्ये आम्ही मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे गेलो होतो. या कालावधीत तिथे हिवाळा असतो. या वेळी आम्हाला मेलबर्नच्या दक्षिणेला असलेल्या फिलिप या बेटावर जाण्याची संधी मिळाली. तेथेे एक निसर्ग विहारउद्यान (नेचर पार्क) आहे. आमच्यासमवेत श्री. वाम्सीकृष्णा आणि सौ. रूची अन् बालसाधक तेज होता. समुद्राच्या मध्यभागी एक मोठा खडक असून तेेथे शेकडो सील जलचर प्राणी असल्याने त्या खडकाला सील रॉक असे म्हणतात. फिलिप बेटावरून सील रॉककडे जाण्याचा ४० मिनिटांचा बोटीचा प्रवास हे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे.

महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ५१मध्ये प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या पहिल्या भेटीविषयीचे वर्णन करणे आणि या भेटीचा उल्लेख करतांना या नाडीवाचनाला अद्भुत अशी उपमा देणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
      महर्षींनी नाडीवाचनात सांगितले, लक्ष्मी आठ प्रकारच्या आहेत आणि आजचे हे नाडीवाचन ऐकण्यासाठी आपण येथे सातच्या संख्येने उपस्थित आहोत. अष्टलक्ष्मीमधील आठावर येथे जमलेल्यांची संख्या म्हणून सात ठेवले असता ८७ ही संख्या निर्माण होते. बरोबर १९८७ याच वर्षी प.पू. भक्तराज महाराज आणि परम गुरुजी यांची प्रथम भेट झाली. (टीप १) तुम्हाला हे ऐकून आश्‍चर्य वाटेल; परंतु आम्हाला आश्‍चर्य वाटत नाही; कारण आम्हाला सर्वकाही ठाऊक असते. याच वर्षी प्रधान गुरूंनी (प.पू. भक्तराज महाराजांना संबोधून) परम गुरुजींना (प.पू. डॉक्टरांनी) आपल्यात सामावून घेतले. आम्हीच (महर्षींनी) प्रधान गुरूंना याच दिवसात परम गुरुजी तुमच्या जीवनात येणार आहेत, असा दृष्टांत दिला होता. अनेक शिष्य बसले होते, त्यात केवळ परम गुरुजींकडे हात करून त्यांना प्रधान गुरूंनी पुढे बोलावले. ही घटना शुक्रवारच्या दिवशी घडली. तू (कार्तिक पुत्रीला उद्देशून) माझ्यावर विश्‍वास ठेव किंवा नको ठेवूस, ही गोष्ट १४ लोकांना (सप्तलोक आणि सप्तपाताळ) माहिती आहे की, याच दिवशी प्रधान गुरूंनी परम गुरूजींना त्यांचे उत्तराधिकारी केले.

पू. सौरभ जोशी आणि श्री. अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका) यांची भेट, म्हणजे एक संस्मरणीय भावसोहळाच !

पू. सौरभदादांसमवेत सौ. सुनीती आठवले आणि श्री. अनंत आठवले. (ती. भाऊकाका)
     पू. सौरभदादा २.१.२०१६ या दिवशी दिवसभर आणि रात्री त्यांना जेवण भरवतांना तोंडात घास असतांनाही ते भाऊ, भाऊ, असे अनेकवेळा म्हणत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका, आध्यात्मिक स्तर ६८ टक्के) ४.१.२०१६ या दिवशी पू. सौरभदादांना भेटण्यासाठी आले होते. त्या भावसोहळ्यात पू. सौरभदादा, ती. भाऊकाका आणि सौ. काकू यांच्यातील निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव अनुभवता आला. ती. भाऊकाका पू. सौरभदादांना म्हणाले, अरे, मी कुठेही असलो, तरी तुझ्याजवळच आहे. श्रींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) कृपेमुळे अनुभवता आलेला हा सोहळा त्यांच्या कृपेने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे.
 गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  स्वातंत्र्यापासून एकाही क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे, असे दिसत नाही. ही आहे भारतीय लोकशाहीची ६८ वर्षांची फलनिष्पत्ती. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता लक्षात येते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अझरला दुःख कधी देणार ?

संपादकीय 
     पठाणकोटच्या हवाईतळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मौलाना मसूद अझर याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आले होते. खरे तर वर्ष १९९४ मध्येच भारतीय सुरक्षा दलांनी तो दुसर्‍या एका आतंकवादी संघटनेचा पदाधिकारी असतांना त्याला अटक केली होती; मात्र वर्ष १९९९ मध्ये अफगाणिस्तानातील कंदहर येथे इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करुन प्रवाशांना वेठिस धरल्याने त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने जैश-ए-मोहंमद या आतंकवादी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर काश्मीरमध्ये एक आक्रमण करून त्याने ९ जणांचा बळी घेतला होता. ज्या सैनिकांनी जिवाची बाजी करून त्याला पकडले त्यांना वर्ष १९९९ मध्ये त्याची सुटका झाल्यावर काय वाटले असेल आणि तो सूत्रधार असलेल्या पठाणकोटच्या आक्रमणात गेलेल्या ५ कमांडो आणि ३ सैन्य अधिकारी यांच्या मृत्यूनंतर काय वाटले असेल, याची कल्पना करा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn