Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शनिशिंगणापूर (जिल्हा नगर) येथे नास्तिकवाद्यांना पाय ठेवू देणार नाही !

 • शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ सर्व पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना यांची चेतावणी ! 
 • या मोर्च्यास विविध पक्ष आणि संघटना यांचे कार्यकर्ते पद आणि पक्ष विसरून धर्मासाठी एकत्र आल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! 
 • धार्मिक प्रथा मोडणार्‍यांना रोखणे आणि धार्मिक भावना दुखावणे या प्रकरणी नेवासा पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट
मोर्च्यामध्ये सहभागी झालेले हिंदुत्ववादी
      नेवासा - नेवासा ही संतांची भूमी आहे. येथील सर्वपक्षीय हिंदु आणि विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रित येऊन हिंदूंच्या श्रद्धा मोडू पहाणारे तथाकथित पुरो(अधो)गामी, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड नामक संघटना यांना १३ जानेवारी या दिवशी एका मोर्च्याद्वारे धर्मरक्षणार्थ चेतावणी दिली की, आम्ही तुम्हाला शनिशिंगणापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही !
     काही तथाकथित पुरोगामी, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड नामक संघटना धर्मातील रूढी, परंपरा आणि श्रद्धा यांवर जाणीवपूर्वक आघात करत आहेत. हिंदूंच्या श्रद्धा मोडण्यासाठी २६ जानेवारी या दिवशी तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांसारख्या संघटना ४०० महिलांना घेऊन श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश करणार आहेत.

(म्हणे) कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळवणारच !

धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या सौ. तृप्ती देसाई यांचा धर्मद्रोही अट्टाहास
     नगर - शनिशिंगणापूर येथे महिलांना देवदर्शन करण्याचा हक्क मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही २६ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीमध्ये दुपारी १२.३० वाजता श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन शनीचे दर्शन घेणार आहोत. दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी ४ वाजता चौथर्‍यावर जाऊन पूजादेखील करणार आहोत. त्या ठिकाणी प्रवेश करतांना आमच्यावर कितीही गुन्हे प्रविष्ट झाले, तरी आम्ही मागे हटणार नाही, असे विखारी प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या सौ. तृप्ती देसाई यांनी केले आहे. (धर्मशास्त्र समजून न घेता स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली केवळ विरोधासाठी विरोध करणारे पुरोगामी हिंदुद्वेषीच होत ! भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या मुसलमान महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अशाच ठाम निर्धाराने मशिदीमध्ये घुसून दाखवतील का ? - संपादक)

श्रीपाल सबनीस आणि माधवी वैद्य यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

संमेलानाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट ?
     मुंबई - ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट असल्याचा आरोप होत आहे. काही साहित्यिक आणि प्रकाशक यांनी आता नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या निवडीवरच प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. संमेलन अध्यक्षांची निवडणूक प्रकिया भ्रष्ट असल्याचा आरोप करत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. विश्‍वास पाटील, राजन खान, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, भारत सासणे यांच्यासह अनेक साहित्यिकांनी मुंबईतील व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
     यामध्ये काही खोट्या मतपत्रिका असणे; ९० टक्के मतदान झालेले नसणे; माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत या संदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.

मसूद अझरसह १२ आतंकवाद्यांना पाकमध्ये अटक

शासनाने या आतंकवाद्यांना भारताच्या कह्यात देण्यास पाकला भाग पाडावे !
पठाणकोट आक्रमण प्रकरण
      इस्लामाबाद - पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या हवाई तळावर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी जैश ए महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्यासह १२ आतंकवाद्यांना पाकिस्तान शासनाने अटक केली. अटक केलेल्या आंतकवाद्यांमध्ये अझरचा भाऊ आणि मेव्हणा यांचाही समावेश आहे. याशिवाय पाक शासनाने मसूद अझहरच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकून त्यांना टाळे ठोकले. पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकने केलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत सविस्तर आढावा घेतल्यानंतर आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईची माहिती उघड करण्यात आली.

मालेगाव स्फोटप्रकरणी आरोप निश्‍चितीवर सुनावणी होणार !

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह
सर्व आरोपींवरील खटल्याच्या सुनावणीला २ फेब्रुवारीपासून आरंभ
     मुंबई - मालेगाव येथे २००८ मध्ये बॉम्बस्फोट होऊन सात वर्षे उलटल्यावर या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर नेमके काय आरोप निश्‍चित करायचे याविषयीची सुनावणी अखेर २ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे या प्रकरणी मुख्य आरोपी आहेत. २९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगाव येथील मुसलमानबहुल परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना बॉम्बस्फोटाचा कट रचणे अन् त्याची कार्यवाही करणे या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

मध्यप्रदेशमध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण

देशभरातील धर्मांधांची वाढती आक्रमणे शासनाच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करतात !
 • ९ जण घायाळ बसगाड्या, दुचाकी यांना आग लावली
 • अनेक दुकानांची तोडफोड शस्त्रास्त्रांनी आक्रमण
      धार (मध्यप्रदेश) - स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी मनावर येथे काढलेल्या शौर्य यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, दोन बसगाड्या आणि दुचाकी यांना आग लावण्यात आली. अनेक दुकांनांची तोडफोड करण्यात आली, तसेच शस्त्रास्त्रांद्वारेही आक्रमण करण्यात आले. दगडफेकीमध्ये दोन पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मिळून ९ जण घायाळ झाले. शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

माघ मेळ्याच्या यात्रेकरूंकडून अधिभार गोळा करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय !

हज यात्रेसाठी विमाने आणि हिंदूंच्या यांत्रांच्या वेळी मात्र 
यात्रेकरूंकडून करवसुली ! हिंदु असणे, हे जणू पापच !
     प्रयाग (अलाहाबाद) - येथे १४ जानेवारीपासून चालू होणार्‍या माघ मेळ्यानिमित्त येणार्‍या यात्रेकरूंकडून रेल्वे भाड्याव्यतिरिक्त आगाऊ अधिभार गोळा करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे माघ मेळ्याला जाणार्‍या यात्रेकरूंना अधिकचा भूर्दंड पडणार आहे. या काळात प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या अतिरिक्त सुविधांसाठी हा अधिकचा भार हिंदूंना सोसावा लागणार असल्याचे समजते. (पूर्वीच्या काळी राजे यात्रेकरूंना सोयीसुविधा पुरवणे म्हणजे पुण्यकर्म समजत होते, तर हल्लीचे राज्यकर्ते यात्रेकरू म्हणजे पैसा गोळा करण्याचे साधन समजतात ! - संपादक)
१. हा मेळा १४ जानेवारी ते ७ मार्चपर्यंत चालणार आहे. या काळात हा अधिभार उत्तरप्रदेशातील नैनी रेल्वे स्थानकापासून प्रयागपर्यंत प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना द्यावा लागणार आहे.

इसिसकडून पुणे आतंकवादविरोधी पथकाच्या प्रमुखांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

आतंकवादविरोधी पथक आता इसिसचे समुपदेशन करत 
बसणार कि आतंकवाद संपवण्यासाठी कंबर कसणार ?
     पुणे - इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेकडून पुण्याच्या आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाला १० जानेवारीला हे धमकीचे पत्र मिळाले आहे. विशेष शाखेकडून या पत्राची पडताळणी चालू आहे. सध्या पथकाकडून पुण्यात विविध ठिकाणी तरुणांना इसिसमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेश करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानमधील भारतविरोधी आक्रमणातही पाकचाच हात

      काबूल - अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर ३ जानेवारी या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्येही पाकच्याच सैन्याचा हात आहे, असा दावा बल्ख प्रांताचे पोलीसप्रमुख सय्यद कमाल सादात यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, घातपात करणारे हल्लेखोर पाकमधून आले होते. ते पाकचे प्रशिक्षित सैनिक होते. या सैनिकांना दरी, पश्तो या अफगाण भाषांसह उर्दू भाषाही अवगत होती.

कोल्हापूर येथे २३ जानेवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन - खासदार धनंजय महाडिक

     कोल्हापूर - देश-विदेशातील कृषी क्षेत्रातील आस्थापनांचा सहभाग आणि पशुधनाचा सहभाग असलेले भीमा कृषी प्रदर्शन २३ ते २६ जानेवारी या दिवशी येथील मेरी वेदर मैदानात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात यंदा खासकरून पाणी सिंचनाच्या विविध योजना आणि उपाय यांची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी ११ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्वश्री सत्यजित भोसले, श्रीधर बिरंजे, सुजित चव्हाण, डॉ. धैर्यशील बावसकर उपस्थित होते.
      खासदार श्री. महाडिक म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचे प्रदर्शन होत आहे. त्यात दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रामुख्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. ठिंबक आणि तुषार सिंचनातून पाण्याची बचत करण्यापासून ते पाणी अडवून आणि जिरवून साठे उपलब्ध करण्यापर्यंतची माहिती तज्ज्ञांद्वारे दिली जाणार आहे.

पुणे येथे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

 • गंभीर जखमी झालेले उपायुक्त माधव जगताप यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार चालू
 • धर्माभिमानी श्री. शैलेंद्र दीक्षित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग येऊन कारवाईस प्रारंभ
     येरवडा, १३ जानेवारी - येथील गुंजन चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर स्थानिक उद्दाम धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याची घटना १२ जानेवारी या दिवशी घडली. महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांचे पथक अनधिकृत उपाहारगृहावर कारवाई करण्यासाठी गेले असता शिरजोर धर्मांध मुसलमानांनी काठ्या, बांधकामासाठी जवळच पडलेले सिमेंटचे ठोकळे, बाटल्या अधिकार्‍यांवर फेकून मारल्या. यामध्ये अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप गंभीर जखमी झाले असून रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी लालू हसन शेख, मौला हसन शेख, इम्रान मौला शेख या तीन धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. अधिकार्‍यांवर झालेल्या आक्रमणानंतर महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुढील कारवाईची सूत्रे हातात घेऊन धर्मांधांचे अनधिकृत हॉटेल जमीनदोस्त केले.

स्लोव्हाकियाने मुसलमानांना देशात प्रवेश नाकारला

स्लोव्हाकियासारखा एक लहानसा देश एकाही विस्थापिताला देशात न घेण्याचा निर्धार करतो, 
तर जगातील मोठ्या देशांमध्ये गणना होणारा भारत कोट्यवधी बांगलादेशी 
मुसलमानांना देशात आश्रय देतो !
     ब्रॅटीस्लाव्हा (स्लोव्हाकिया) - सिरीया, इराक येथून आलेल्या लक्षावधी धर्मांध मुसलमानांना जर्मनीने मानवतेच्या आधारावर देशात आश्रय दिला आहे. त्यांतील अनेकांनी नववर्ष साजरा करणार्‍या काही जर्मन महिलांवर अमानवी अत्याचार केल्याचे आढळून आले. याची धास्ती घेऊन स्लोव्हाकिया देशाने कुठल्याही मुसलमान विस्थापितास देशात प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी घोषणा त्या देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी केली.

जर्मनीतील संतप्त नागरिकांकडून धर्मांध विस्थापितांना मारहाण

नववर्षाच्या पूर्वसंध्येला धर्मांध विस्थापितांनी केलेल्या जर्मन 
महिलांवरील अमानुष लैंगिक अत्याचाराचा प्रतिशोध !
विस्थापितांच्या विरोधात फलक धरून
आंदोलन करणारे जर्मन नागरिक
     बर्लिन, १३ जानेवारी - येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्‍या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. जर्मन पोलिसांनी या घटनांचे अन्वेषण चालू कले असले, तरी जर्मनीतील संतप्त नागरिकांनी मात्र अनेक गट स्थापन करून या विस्थापितांना शोधून त्यांना मारहाण करण्यास आरंभ केला आहे. जर्मन महिलांवर केलेल्या अत्याचाराचा हा प्रतिशोध असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोटप्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सांगोल्यात राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी !

जय भवानी, जय शिवाजीचे जयघोष आणि पोवाडे यांनी वातावरण शिवमय !
      सांगोला (जिल्हा सोलापूर) - हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षपणे साकारण्यासाठी आपला मुलगा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांंना घोडेस्वारीपासून ते तलवारबाजीपर्यंतच्या जवळपास सर्वच क्षेत्रांत निपुण बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊंची काल १२ जानेवारी या दिवशी ४१८ वी जयंती होती. जयंतीदिनी दुपारी २ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांच्या आणि छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस छत्रपती शिवाजी चौक येथे पुष्पहार अर्पण करून सर्व शिवप्रेमींनी वंदन केले.
     या वेळी अरविंद केदार, बापूसाहेब भाकरे, बाळासाहेब शिंदे, प्रा. संजय देशमुख, आनंद घोंगडे, दत्तात्रय नलवडे, गुंडादादा खटकाळे यांसह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते.

यजमानांंचे समाधान हेच पुरोहितांचे व्रत असावे ! - भागवताचार्य वा.ना. उत्पात

     सोलापूर - ब्राह्मण समाजातील पुरोहितांकडे अन्य समाज एक आदर्श चारित्रवान म्हणून पहात आहे. त्यामुळे पुरोहितांनी आपल्या यजमानांचे समाधान होईल, अशा पद्धतीने त्याच्याकडे कर्म केले पाहिजे. त्यांचे समाधान हेच पुराहितांचे व्रत असावे, असे प्रतिपादन भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी केले. हुतात्मा स्मृती मंदिरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने जिल्हा ब्राह्मण संघाच्या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुधाकर परिचारक, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
     भागवताचार्य वा.ना. उत्पात पुढे म्हणाले, या देशात इंग्रज आले आणि त्यांनी या देशाची सर्व शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

सोळशी (जिल्हा सातारा) येथील श्री शनीच्या चौथर्‍यावर 
धर्मद्रोही अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी प्रवेश केल्याचे प्रकरण
     सातारा, १३ जानेवारी (वार्ता.) - २३ डिसेंबर २०१५ या दिवशी सकाळी ८ वाजता युवक क्रांती दलाच्या अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी ८ ते १० महिलांना समवेत घेऊन सोळशी (जिल्हा सातारा) येथील श्री शनिच्या चौथर्‍यावर बलपूर्वक प्रवेश केला. याचे पडसाद सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटले. या प्रकरणात धर्मद्रोही अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयबापू शिवतारे यांना देण्यात आले.

बांगलादेशात धर्मांधांकडून अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात भारत कधी आवाज उठवणार ?

बांगलादेशमध्ये हिंदु मुलींवर झालेल्या बलात्कारांच्या विरोधात निदर्शने
     ढाका - कोमिल्ला येथील देविद्वार शाळेतील हिंदु मुलींवर याच शाळेच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष खोर्शेद याने बलात्कार केल्याच्या निषेधार्थ बांगलादेशमधील रिसर्च अ‍ॅन्ड एमपॉवरमेंट फाऊन्डेशन या संघटनेने कोमिल्ला येथील प्रेस क्लब समोर सकाळी १० वाजता मानवी साखळीचे आयोजन करून निदर्शने केली. या मानवी साखळीत अनेक हिंदूंसह इतर धर्मियांनी उत्स्फूर्त भाग घेतला. या वेळी बांगलादेश मायनॉरीटी वॉच या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रविन्द्र घोष आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

हरिदासपूर येथील स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (वय ११२ वर्षे) यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला शुभाशीर्वाद !

स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (उजवीकडे) यांची भेट घेतांना डॉ. भूपेश शर्मा
      फरीदाबाद - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी उत्तरप्रदेशमधील हरिदासपूर येथील स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती (वय ११२ वर्षे) यांची फरीदाबादच्या खेडी कला गाव येथे भेट घेतली. या वेळी त्यांना संस्था आणि समिती यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली, तसेच हिंदी भाषेतील सनातन पंचांग आणि हिंदी मासिक सनातन प्रभात भेट स्वरूपात देण्यात आले. या वेळी संस्था आणि समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना स्वामी म्हणाले, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ आदी सर्व सूत्रांना सोबत घेऊन सनातन संस्थेचे कार्य चालू आहे.

देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस ! - उमा भारती

देशात असहिष्णुता वाढली, असे म्हणणारे आणि
डाव्या विचारांचे लोक याविषयी उत्तर देतील का ?
     संभाजीनगर - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफ्टीआयआय) अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. देहली विद्यापिठात सुब्रह्मण्यम् स्वामींना प्रवेश करण्यापासून अडवले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे, तर काय आहे ? अमीर खानची सुरक्षा काढली; म्हणून आमच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाते. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा न्यून-अधिक केली जाते. तरीही शासनाला दोषी ठरवले जाते. देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोप केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी केला

(म्हणे) चौथर्‍यावर महिलेने पूजा केली, तर शनिदेव अपवित्र कसा काय होतो ? - डॉ. हमीद दाभोलकर

नास्तिकतावाद्यांना देवा-धर्माविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
     सातारा, १३ जानेवारी (वार्ता.) - शनिदेव कोणत्या तरी महिलेच्याच पोटी जन्माला आला असेल ना ? तेव्हा तो अपवित्र ठरला नाही; मात्र चौथर्‍यावर जाऊन एखाद्या महिलेने पूजा केली, तर तो अपवित्र कसा काय ठरतो, असा धर्मद्रोही प्रश्‍न अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला. (शनि उपासनेविषयीचे शास्त्र जाणून न घेता त्यावर अनावश्यक प्रश्‍न उपस्थित करणे, ही नास्तिकतावाद्यांची बौद्धिक दिवाळखोरीच होय ! - संपादक) कराड (जिल्हा सातारा) येथील मलकापूरमधील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात अंधश्रद्धा निर्मूलन समज-गैरसमज या विषयावर ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन !

     धुळे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या आदर्शावर आधारित हिंदु राष्ट्र (रामराज्य) राज्यघटनेद्वारे घोषित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धुळे येथे २४ जानेवारी २०१६ या दिवशी श्री अग्रसेन पुतळ्याच्या मागे, अग्रवाल नगर, मालेगाव रोड, धुळे या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. या जनजागृतीच्या कार्यात हिंदु जनजागृती समितीच्या समवेत सनातन संस्था तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटना, धर्मप्रेमी आणि संप्रदाय हेही सक्रीयपणे सहभागी आहेत.

पाकिस्तानला एफ्-१६ विमाने विकण्यावर अमेरिकी संसदेची स्थगिती

अमेरिकेची संसद पाकिस्तानच्या विरोधात कृती करते. भारताची संसद 
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कधी प्रयत्न करणार ?
पठाणकोट आक्रमणाचा परिणाम
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेने पाकिस्तानला ८ नवीन एफ्-१६ लढाऊ विमाने विकण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या वृत्तपत्राने संसद आणि राजकीय सूत्र यांचा संदर्भ देऊन प्रकाशित केले आहे. भारताच्या पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर झालेल्या आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा पाकिस्तानला विमाने विकण्याचा निर्णय पूर्णत: रहित झाला नसला, तरी त्याला सध्यातरी चाप बसला आहे; तसेच यापुढे अमेरिकेच्या पाक शस्त्रास्त्र पुरवठ्यावरही संक्रांत येण्याची शक्यता आहे.

पाकच्या क्वेटामधील बॉम्बस्फोटात १४ ठार !

     क्वेटा (पाकिस्तान) - येथील सॅटेलाईट टाऊनमध्ये आयोजित केलेल्या पोलिओ कॅम्पमध्ये झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात १४ जण ठार झाले, तर जण घायाळ झाले. घायाळांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात हालवण्यात आले.
अफगाणिस्तानातील पाक दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४ ठार !
    काबुल (अफगाणिस्तान) - येथील जलालाबादमध्ये असणार्‍या पाकच्या वाणिज्य दूतावासाजवळ झालेल्या आत्मघाती आक्रमणात ४ जण ठार झाले. घटनास्थळापासून भारत आणि पाक या देशांचा दूतावास २०० मीटर अंतरावर आहे.

उपस्थित धर्माभिमान्यांना हिंदुत्ववाद्यांनी केलेले क्षात्रतेजयुक्त मार्गदर्शन

सर्व हिंदुत्ववादी शनिशिंगणापूर देवस्थानचे रक्षण करणार ! - संतोष पंडुरे, बजरंग दल
      शनिशिंगणापूर देवस्थान हे नेवासा तालुक्यात येत असल्यामुळे आम्ही सर्वजण धर्मरक्षण करणार आहोत. तालुक्याचे दायित्व म्हणून आम्ही सर्व हिंदुत्ववादी एकत्र येऊन धर्मपरंपरा जपणार आहोत. त्यासाठी आम्ही १०० गावांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या बैठका घेऊन संघटन करणार आहोत. त्यामुळे जो कोणी प्रथा मोडण्यासाठी येईल, त्याला आम्ही धडा शिकवू.
आम्ही धर्मपरंपरा मोडू देणार नाही ! - गणेश निमसे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान
     नास्तिकवादी शनिशिंगणापूर येथे जे कृत्य करणार आहेत, त्यामुळे आम्हा हिंदूंची मने दुखावली जाणार आहेत. त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत.

धार्मिक प्रथा मोडणार्‍यांना रोखणे आणि धार्मिक भावना दुखावणे या प्रकरणी नेवासा पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      नेवासा - शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश करण्यासाठी काही नियम आहेत. चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नसतांना नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्या महिलांकडून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आम्हा समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भूमाता ब्रिगेडसह काही पुरोगामी संघटना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर २६ जानेवारी या दिवशी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, श्रद्धा यांच्यावर जाणीवपूर्वक आघात केला जाणार आहे. यामुळे लक्षावधी शनिभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रा जिल्हाधिकार्‍यांच्या आपत्कालीन आराखड्याप्रमाणेच ! - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

     सोलापूर, १३ जानेवारी (वार्ता.) - येथील सिद्धेश्‍वर यात्रा ही जिल्हाधिकार्‍यांनी सिद्ध केलेल्या सुधारित कृती आराखड्याप्रमाणेच भरवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. सिद्धेश्‍वर यात्रा आपत्कालिन आराखड्यानुसार व्हावी, यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर ८ जानेवारी या दिवशी न्यायालयाने निकाल दिला होता. या आदेशानुसार उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना सूचना देतांना योग्य त्या उपाययोजना, कायदा आणि कार्यवाही (अंमलबजावणी) करणार्‍या संस्थेच्या वतीने करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी भूमीवर चटई (मॅट) अंथरण्याऐवजी पाणी मारून रोलर फिरवावा, दोन रस्ते आपत्कालीन म्हणून सोडावेत आणि सुधारीत आराखड्याच्या इतर २८ सूत्रांची कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर खटला चालवण्याचा निर्णय !

 • २२ जानेवारीला समीर गायकवाड जामिनासाठी अर्ज करणार !
 • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
      कोल्हापूर, १३ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा खटला कोल्हापूरबाहेर चालवण्याविषयी श्री. समीर गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. या अर्जावर १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथेच खटला चालवण्याचा निर्णय दिल्यास २२ जानेवारीपासून कोल्हापूर येथे खटल्याच्या कामकाजाला लगेचच प्रारंभ करण्यात येईल, असा निर्णय १३ जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी घेतला. २२ जानेवारी या दिवशी श्री. समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला जाईल, असे श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने कोल्हापूरबाहेर खटला चालवण्याचा आदेश दिल्यास हा खटला कोल्हापूरऐवजी बाहेरील जिल्ह्यात चालू होईल.

उ. कोरियाला प्रत्युत्तर देण्यासाठी टोकियोत त्रिराष्ट्रीय बैठक !

    टोकियो (जपान) - उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी येथे १६ जानेवारी २०१६ ला दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान या देशांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. तिन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री या बैठकीत एकमेकांना भेटणार आहेत.

देशात प्रतिवर्षी ८ लक्ष हिंदूंचे धर्मांतर ! - विहिंप

हे रोखण्यासाठी विहिंपने उपाययोजना काढावी, ही हिंदूंची अपेक्षा !
     गोहत्ती - भारतात प्रतिवर्षी ८ लक्ष हिंदू ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांत धर्मांतरित होतात. हिंदूंचे धर्मांतर राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार मोठा धोका आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महासचिव श्री वाय. राघवुलू यांनी मांडले. ते विश्‍व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ नेते श्री. मोहनलाल अग्रवाल यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

काँग्रेसच्या राजवटीप्रमाणे भाजपच्याही राजवटीत हिंदूंना राममंदिराच्या निर्मितीची मागणी करावी लागत असेल, तर हिंदूंना दोन्ही राजवटींतील भेद कसा कळणार ?

हिंदूंच्या विविध तीर्थक्षेत्रांतील तीर्थ घेऊन तमिळनाडूतील धर्माभिमानी अयोध्येला मार्गस्थ
तमिळनाडूहून अयोध्येला मार्गस्थ
होतांना हिंदु धर्माभिमानी
     चेन्नई - हिंदूंच्या विविध तीर्थक्षेत्रांतील तीर्थ घेऊन तमिळनाडूतील १२ जिल्ह्यांतील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे २५ धर्माभिमानी अयोध्येला नुकतेच मार्गस्थ झाले. या तीर्थांमध्ये कन्याकुमारी, रामेश्‍वरम् (दक्षिण काशी), कुंभकोणम् आदी पवित्र तीर्थक्षेत्रांतील तिर्थाचा समावेश आहे. अयोध्येला जाऊन या तीर्थाचा अभिषेक करून राममंदिर उभारणीची मागणी करण्यात येणार आहे. भारत सुरक्षा परिषदेचे श्री. राजगुरु हे या यात्रेचे नेतृत्व करत आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
     विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी मध्यप्रदेशातील मनावर येथे काढलेल्या शौर्य यात्रेवर धर्मांधांनी सशस्त्र आक्रमण करून जोरदार दगडफेक केली, बसगाड्या आणि दुचाकी जाळल्या अन् दुकानांची तोडफोड केली. यात पोेलीस कर्मचार्‍यांसह ९ जण घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Madhyapradesh ke Manavar me VHP aur Bajrang dal ki shourya yatra par dharmandhonka akraman.
- kya Hindu unkehi deshme asurakshit nahi ?
जागो !
मध्यप्रदेश के मनावर में विश्‍व हिन्दू परिषद और बजरंग दल की शौर्य यात्रा पर धर्मांधों का आक्रमण !
- क्या हिंदू उनके ही देश में असुरक्षित नही ?

फॉर्च्यून मासिकाने अ‍ॅमॅॅझॉन आस्थापनाच्या मुख्याधिकार्‍यांना दाखवले श्रीविष्णूच्या रूपात !

 • अमेरिकेतील हिंदूंचा तीव्र विरोध !
 • फॉर्च्यून मासिकाने व्यक्त केली दिलगिरी !
      वॉशिंग्टन - फॉर्च्यून या मासिकाच्या मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांना हिंदूंचे आराध्य दैवत असणार्‍या भगवान विष्णु यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेतील हिंदू संतप्त झाले असून त्यांनी या कृत्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातूनही फॉर्च्यून मासिक आणि अ‍ॅमेझॉन आस्थापन यांच्या हिंदुद्वेषी कृत्यांवर टीकेचा भडीमार करण्यात आला. त्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा कुठलाही उद्देश नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रिया मासिकाचे संपादक अ‍ॅलन मरे यांनी एका ट्विटद्वारे व्यक्त केली.

अमेरिकेतील सोसायटी ६ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

      न्यूजर्सी - अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ चे विडंबन केले आहे, अशा आशयाच्या तक्रारी अमेरिकेतील अनेक धर्माभिमान्यांनी तेथील फोरम फॉर हिंदु अवेकनिंग (एफ्.एच्.ए.) या हिंदुत्ववादी संघटनेकडे नोंदवल्या होत्या. एफ्.एच्.ए.ने त्वरित सोसायटी ६ या आस्थापनास तसेच जेने विल्सन यांना पत्र पाठवून निषेध नोंदवला आणि ही उत्पादने संकेतस्थळावरून काढून टाकण्याची मागणी केली. या पवित्र चिन्हाचा कपडे आणि इतर साहित्यावर वापर केल्यामुळे जगातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत सोसायटी ६ तसेच जेने विल्सन यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 
धर्माभिमानी खालील ई-मेल पत्यांवर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

हिदु जनजागृती समितीच्या झारखंड राज्यातील धर्मप्रसार कार्याला वेग

गावोगावी धर्मजागृती करून धर्मरक्षण करण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार
बैठकीला संबोधित करतांना श्री. प्रकाश मालोंडकर
आणि त्यांच्या बाजूला पू. उमाकांत महाराज
      राऊरकेला - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील पत्राटोली येथे हिंदुसंघटन बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावोगावी धर्मजागृती करून धर्मरक्षण करण्याचा उपस्थित धर्माभिमान्यांनी निर्धार केला. या बैठकीला रामरेखा धाम येथील पू. उमाकांत महाराज यांनी उपस्थित राहून संबोधित केले. हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्याचे समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी धर्माचरण, हिंदुसंघटन आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आदर्श नागरिक घडवण्यासाठी शासनाकडून उपयुक्त परीक्षा पद्धतीचा अवलंब व्हावा, ही अपेक्षा आहे !

परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याची मुभा !
केंद्रीय मनुष्यबळ विभागाचा ओपन बुक टेस्टचा प्रस्ताव
    नवी देहली - केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक स्तरावरील परीक्षांसाठी राज्य आणि केंद्रीय शाळांसमोर ओपन बुक टेस्ट चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या परीक्षा पद्धतीमध्ये पाठांतरापेक्षा विद्यार्थी उपलब्ध माहितीचा उपयोग कशाप्रकारे करतात, यावर भर असणार आहे.
     २८ ऑक्टोबर २०१५ या दिवशी झालेल्या ४२ शैक्षणिक महामंडळाच्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे सचिव एस्. सी. खुंटिया यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रस्तावाच्या अंतर्गत प्रश्‍नपत्रिकेचा सामाईक आराखडा सिद्ध करण्यासाठी आठ सदस्यीस समितीची स्थापना केली होती. या प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडवतांना नोट्स आणि पाठ्यपुस्तकांचा वापर करता येणार आहे. पाठ्यपुस्तकातील माहिती केवळ कागदावर उतरवण्यापेक्षा पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन परीक्षार्थी एखाद्या प्रश्‍नाचे किंवा परिस्थितीचे विश्‍लेषण कसे करतात ? हा या परीक्षा पद्धतीचा केंद्रबिंदू असणार आहे.

हिंदूविरोधी कट्टरवाद म्हणजेच धर्मनिरपेक्षता !

      आपण धर्मनिरपेक्षतेला चांगले किंवा आदर्श मानता का ?, आपण धर्मनिरपेक्ष रहाणे चांगले मानता का ?, या प्रश्‍नांचे आपले कोणतेही उत्तर असेल; मात्र त्यापूर्वी खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे काय असायला हवीत, याचा विचार करा !
१. संपूर्ण जगामध्ये ५२ मुसलमान राष्टे्र आहेत. यांपैकी असे कोणते मुसलमान राष्ट्र आहे का, ज्याचे शासन आपल्या नागरिकांना हज यात्रेसाठी अनुदान देत आहे ? 
२. ज्या प्रकारे भारतात इस्लाम पंथाचे विशेष अधिकार स्वीकारले गेले आहेत, त्याच प्रकारच्या अधिकारांना कोणत्याही मुसलमान राष्ट्रामध्ये हिंदूंसाठी स्वीकृती दिली गेली आहे का ?
३. जगातील असे कोणते मुसलमान राष्ट्र आहे, जेथे अन्य पंथाचा नागरिक राष्ट्रपती अथवा पंतप्रधान झाले आहेत ? 

आजकालची (साहित्य) संमेलने

१. प्रचंड खर्चिक संमेलने
      आजकाल संमेलने फक्त नुसत्या फसफसत्या उत्साहाच्या, चटकमटक जेवणावळीच्या आणि प्रचंड खर्चिक बाह्य सजावटीच्या पातळीवर जुळू लागली आहेत, हे जाणवतेच. संमेलनाचा खर्च मोठा असतोच; पण तो वाजवी आणि भपका अन् तारांकित प्रथा टाळून आटोक्यात आणणे शक्य नाही का ? याचे मुख्य दायित्व आहे साहित्यिकांवर आणि अर्थात रसिकांवर. साहित्यपंढरी म्हणायचे आणि तारांकित व्यवस्थेतही थोडे उणं झाले, तर रुसवेफुगवे. ही काय साहित्याशी किंवा साहित्यावर जिवापाड प्रेम करणार्‍यांशी इमानदारी म्हणायची ? ज्यांना रसिक देव मानतात, त्यांचे पाय तर सामान्यांहून मातीचे दिसतात. रसिकांनी भाबडेपण टाकून जरा चौकस व्हायला हवे.

परभणी येेथे झालेले साहित्य संमेलन !

साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे समाजकारण आणि राजकारण यांचे चर्वितचरण करणारे स्थान नव्हे ! : समाजाचे वैैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण आणि अभ्यास करणार्‍या विचारवंताचे हे एक टोक, तर साहित्यिक अन् समतावादी म्हणवणार्‍या मुखंडांचे (पुढार्‍यांचे) दुसरे टोक. दुसर्‍या प्रकारचे उदाहरण अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नारायण सुर्वे यांचे आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे काही समाजशास्त्र, राजकीय विचारप्रणाली (ideology) यांचे चर्वितचरण करणारे स्थान नव्हे. साहित्य हे मानवी जीवनाचेच अंग असल्यामुळे त्यात त्याचे प्रतिबिंब उमटणे स्वाभाविक आहे; पण पुरोगामी, मार्क्स यांचे नगारे वाजवण्याचे एकांतस्थळ म्हणून ते व्यासपीठ परिवर्तित होत असेल, तर ठणकावून सांगितले पाहिजे, बाबा रे, चिखल कालवू नकोस. श्री. सुर्वे हे मान्यवर कवी आहेत; परंतु साहित्याची सामाजिक बांधिलकी दावणीसारखी होऊ नये आणि ते समाजकारण वा राजकारण यांची बटीक 
बनू नये. (संदर्भ : त्रैमासिक प्रज्ञालोक, मार्च १९९५) 

१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी येथे होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या अवनतीला कारणीभूत होणारी साहित्यनिर्मिती 
करण्यापेक्षा समाजाचा सर्वांगीण विकास होईल, अशी साहित्यनिर्मिती करा !
     आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. हे सगळे यौनसंबंधाचे कामुक स्त्रैण साहित्य (काव्य, नाट्य, कादंबरी, ललित लेखन आणि अन्य समस्त साहित्य) व्यक्ती, समाज, राष्ट्र असे सर्वांना तेजोहीन, दयनीय दीन बनवणारे आहे. मानवाला आचारहीन, संस्कृतीशून्य आणि मूर्ख बनवते. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.
       या सगळ्याचे पातक त्या स्त्रैण कामुक साहित्यिकांच्या डोक्यावर येणार आहे, ते राष्ट्रघातकी आहेत. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना विफलतेच्या, आत्मघाताच्या गर्तेत लोटण्याचे पाप त्यांच्या डोक्यावर येणार आहे. व्यक्तीव्यक्तीने, समाजाने, शासनाने सावधपणे अशा दीन बनवणार्‍या वैफल्यग्रस्त कामुक साहित्यांचा आणि त्या साहित्यिकांचा जाहीर निषेध केला पाहिजे. त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
   स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

महाकवी गंग यांची ईश्‍वरनिष्ठा आणि अकबराचे क्रौर्य !

१. महाकवी गंग यांनी बादशहाच्या प्रशंसेपेक्षा नेहमी ईश्‍वरभक्तीच्या 
कविता दरबारात ऐकवणे अन् ही गोष्ट राजाला खटकणे
     अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते. त्यांच्या कविता ईश्‍वरभक्तीने परिपूर्ण असायच्या. त्यांनी कधीही बादशहाला त्याच्या प्रशंसेची एकही कविता ऐकवली नाही आणि ही गोष्ट अकबराला खटकत असे. 
२. अकबराने स्वतःची स्तुती करणारी कविता करण्यास कवी गंग यांना उपहासात्मक 
सांगणे अन् गंग यांच्याशी ईर्ष्या करणार्‍यांना मनोमन प्रसन्न वाटणे
       एके दिवशी अकबर बादशहाने भरदरबारात कवी गंग यांना उपहासाने म्हटले, कविराज ! तुम्ही वेळोवेळी उत्कृष्ट आध्यात्मिक कविता ऐकवून आमचे मन प्रसन्न केले आहे; पण कधी माझे गुणगान असेल, मी आश्रयदाता आहे, असा उल्लेख असेल, अशी कविता ऐकवली नाही. मी मनात आणले, तर कोणालाही मालामाल करू शकतो अथवा धुळीसही मिळवू शकतो. तुम्ही अशी कविता लिहा, जिचे शेवटचे पद सब मिल आस करें अकबरकी । असे असेल. या ओळीचा आशय स्पष्ट होता की, कविता शहेनशहाच्या स्तुतीची असली पाहिजे. त्या वेळी कवी गंग यांच्याशी ईर्ष्या करणारे लोक मनोमन प्रसन्न झाले.

निवडणूक नको, निवड हवी !

       बहुतेकांना अपरिचित असणारी श्रीपाल सबनीस नामक व्यक्ती अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यापासून वलयांकित झाली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळणे म्हणजे जणू सिंहासनारूढ होणे, अशी भ्रामक कल्पना साहित्य वर्तुळात आणि समाजात रुजली असल्याने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा जणू थोर विचारवंत असतो, असा वैचारिक गंज बहुतेकांना आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे नको इतके उदात्तीकरण केले जाते. त्यातूनच मग समाजातून मिळणार्‍या मानसन्मानामुळे सुखावलेला नियोजित अध्यक्ष मग साहित्येतर क्षेत्राशी संबंधित अभ्यासशून्य विधाने करण्याचा सपाटा लावतो. श्रीपाल सबनीस यांच्या संदर्भातही नेमके असेच घडले आणि सबनीस यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील विधानाने सामाजिक वातावरण ढवळून निघाले.

मराठीसाठी दुःखी होण्यासारखे काळीज कुणाचेच राहिले नाही का ?

       एक लहान मुलगा आईला समवेत घेऊन वाचनालयात गेला. तो तिला आई नव्हे, तर मम्मी म्हणायचा. वाचनालयात मुलाचा हात चुकून एका पुस्तकावर पडला. त्याने ते उघडले, तसे ते पुस्तक शहारले, पाने फडफडली आणि आनंदीत झाली. त्यांना वाटले, निदान आज तरी कोणी वाचेल आपणाला. त्या मुलाने (त्याच्या भाषेत) विचारले, मम्मी, कोणत्या भाषेतले पुस्तक आहे गं हे ! त्याची मम्मी हुशार होती, मुलाचे हित जाणत होती. ती उद्गारली, अरे ! तुझ्या आजोबांचे आजोबा (खापर पणजोबा) यांच्या काळात मराठी भाषा अस्तित्वात होती, ती ही भाषा आहे. राहू दे ते, आता नाही कोणी बोलत ती (मराठी) ! तत्क्षणी पुस्तक कोमेजले आणि पाने शांत झाली. ती निपचित्, निराश आणि ग्लानी आल्यासारखी पहुडली, पानापानांतून अश्रू ठिबकले; पण हळहळ वाटण्याचे काहीच कारण नव्हते; कारण मराठीसाठी दुःखी होण्यासारखे काळीज कुणाचेच उरले नव्हते. - श्री. मयूर गायकवाड, अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी
(संदर्भ : तेरणांकुर २०१४, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव (उस्मानाबाद) यांचे मासिक)
कथा महाराष्ट्राची आणि व्यथा मराठीची !
राज्य संपले आता, परकीय राजांचे ।
प्रभुत्व आहे मराठीवर आता, परकीय भाषांचे ॥

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

फरिदाबाद येथील सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यातील जिज्ञासूंचा उल्लेखनीय प्रतिसाद !

१. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात सर्वतोपरी 
साहाय्य करणारे श्री. पवन बंसलजी !
     फरिदाबाद येथील रामलीलेचे अध्यक्ष श्री. पवन बंसलजी यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी हिंदी मासिक सनातन प्रभातच्या सत्यकथन विशेषांकाचेेही प्रायोजक केले, तसेच प्रदर्शनस्थळावर साधकांना काही अडचण येऊ नये, याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिले. श्री. पवन बंसलजी यांच्या मोठ्या भावाच्या कु. निकुंज बंसल आणि कु. माधव बंसल या मुलांनीही ग्रंथप्रदर्शनावर साधकांना साहाय्य केले.

हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना सूचना

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा 
आढावा पाठवतांना पुढील सूत्रे लक्षात घ्या !
      हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांनी प्रत्येक मासात त्यांच्या प्रभागात अथवा राज्यात केलेल्या समितीच्या कार्याचा आढावा सनातन प्रभातमध्ये प्रसिद्धीसाठी पाठवण्याची कार्यपद्धत आहे. या अंतर्गत समन्वयक प्रभागात अथवा राज्यात केलेल्या सर्व उपक्रमांची माहिती, उदा. राष्ट्रीय हिंदु आंदोलने, प्रवचनेे, लोकप्रतिनिधींच्या भेटी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणे आदी लिखित स्वरूपात पाठवतात. बहुतांश वेळा या नियमित उपक्रमांना कार्याच्या दृष्टीने विशेष फलनिष्पत्ती मिळालेली नसते, तरीही त्यांची माहिती समन्वयकांकडून पाठवली जाते.

अंगी नम्रपणा असलेले आणि सकारात्मक वृत्तीमुळे स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारे चिक्कमंगळुरू, कर्नाटक येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिवाकर भट (वय ६५ वर्षे) !

     मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संपर्कात असलेले श्री. दिवाकर भट हे सनातनचे हिंतचितक असून ते रामनाथी आश्रमात येऊन गेले आहेत. आश्रम पाहिल्यानंतर आता ते अन्य साधकांसह प्रसारसेवेतही सहभागी होत आहेत. त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. घरी अप्रिय घटना घडूनही स्थिर रहाणे
    ३ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी एक अप्रिय घटना घडली होती. त्या वेळी ते स्वतः स्थिर राहिले आणि पत्नीलाही आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन स्थिर केले. आजही त्यांना पाहिल्यावर ते स्थिर असल्याचे जाणवते.

श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाला सुचलेल्या विविध प्रार्थना

     ७.११.२०१४ या दिवशी नेहमीप्रमाणे जयसिंगपूर ते कोल्हापूर (माझे नोकरीचे ठिकाण कोल्हापूर आणि निवासाचे ठिकाण जयसिंगपूर आहे.) प्रवास करतांना नामजपाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने पुढील प्रार्थना सुचवल्या.
१. तुझ्या इच्छेविना झाडाचे पानही हलू शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे मी नाम घेतो, हे किती हास्यास्पद आहे ! माझे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. तेव्हा हे भगवंता, तूच माझ्या मुखातून नाम घेत आहेस, यासाठी मी तुझ्या चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञ आहे.
२. माझ्याकडून तू करवून घेत असलेला नामजप माझ्या श्रवणेंद्रियांकडून श्रवण केला जाऊ देत.

संक्रातीला वाण म्हणून सनातनचा रांगोळी हा लघुग्रंथ देऊन अध्यात्मप्रसार कार्यात सहभागी होणार्‍या सौ. मालन जाणकर !

     सातारा येथील एका साधकाने सौ. मालन जाणकर यांना संक्रांतीला वाण देण्यासाठी सनातनचा रांगोळी या लघुग्रंथाविषयी सांगितले होते. त्या वेळी त्यांनी त्वरित १०० लघुग्रंथांची मागणी दिली. इतर कोणते साहित्य देण्यापेक्षा हा ग्रंथ दिला, तर लोकांचे ज्ञान वाढेल, असे त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांच्या आस्थापनात धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी १ घंटा वेळही दिला.
- सौ. माधुरी दीक्षित, सातारा

कोणत्याही तंत्रज्ञानाविना साधिकेचे श्रीकृष्णाशी असलेले अनुसंधान !

सौ. कमलिनी कुंडले
     श्रीकृष्णाकडे ब्लॅकबेरी आस्थापनाचा महागडा भ्रमणभाष नाही; पण तो माझा आवडता संपर्क (फेव्हरेट कॉन्टॅक्ट) आहे. तो फेसबूकवर नसला, तरी माझा चांगला सखा (बेस्ट फ्रेंड) आहे. तो ट्विटरवरही नाही; पण तरीही मी त्याची फॉलोअर आहे. तो व्हॉटस् अ‍ॅपवरही नाही; पण तो नेहमीच ऑनलाइन असतो आणि माहितीजाळाविनाही (इंटरनेटविनाही) आम्ही दोघे एकमेकांशी कनेक्टेड आहोत.
- सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.११.२०१५)

हिंदु धर्मजागृती सभेच्या कालावधीत झालेल्या अपघातांच्या वेळी श्रीकृष्णाने रक्षण केल्याची साधिकेला आलेली अनुभूती

कु. वसुधा कुलकर्णी
१. सभेच्या पूर्वी दोन्ही हात पुष्कळ दुखत असून 
क्रेप बँडेज बांधून सेवा करत आहे, असे दृश्य दिसणे
      १८.१.२०१५ या दिवशी पुण्यातील शनिवारवाडा येथे हिंदु धर्मजागृती सभा होती. त्यापूर्वी २ दिवस, म्हणजे १६.१.२०१५ या दिवशी माझे दोन्ही हात दुखत आहेत. क्रेप बँडेज बांधून मी सेवा करत आहे, असे दृश्य मला दिसत होते आणि त्या अनुषंगाने माझ्या मनात विचार येत होते. (महाविद्यालयीन जीवनात झालेल्या एका अपघातात माझ्या दोन्ही हातांच्या मनगटांचे स्नायू दुखावले गेले. जड वस्तू उचलल्यास, थंडीमुळे अथवा मनगटावर अन्य काही जोर पडल्यास त्या स्नायूंना सूज येते किंवा हात आखडला जातो. त्यामुळे काही काळ हात क्रेप बँंडेजमध्ये बांधून ठेवावा लागतो.) सभेच्या दिवशी क्रेप बँडेजसमवेत ठेवूूयात, थंडीमुळे ऐनवेळी हात आखडेल, असाही विचार मनात येत होता; परंतु हे विचार मानसिक आहेत, असे काहीही होणार नाही, असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केले.

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचे सनातनला आशीर्वाद

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांना सनातनचे ग्रंथ 
दाखवतांना सनातनचे साधक श्री. सत्यकाम कणगलेकर आणि त्यांचे मार्गदर्शन 
घेतांना सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ अन् इतर साधक. (११.३.२०१५) 
वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे आणि गणपतीचे 
उपासक असलेले प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचा परिचय
     तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला. वर्ष १९८९ मध्ये प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांनी देहत्याग केला. प.पू. रामभाऊ गोस्वामी गणपतीची उपासना करतात. वर्ष १९७२ पासून केवळ पोहे आणि दूध एवढाच त्यांचा आहार होता. ते वर्ष १९७५ पासून दिवसभरात अत्यल्प (काही थेंब) पाणी ग्रहण करतात. वर्ष १९७७ पासून त्यांनी आहाराचे प्रमाण अल्प केले असून सध्या दिवसभरात केवळ १ केळे आणि एक कपभर दूध एवढाच दोन वेळी आहार घेतात. रात्री ते केवळ ३ घंटेच झोपतात. वर्ष १९७९ पासून त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करून संन्यासी जीवन स्वीकारले. वर्ष १९८३ पासून त्यांचा आगीच्या संपर्कात रहाण्याच्या कालावधीत लक्षणीय वाढ झाली. प.पू. रामभाऊ गोस्वामी करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण यज्ञामुळे ते सुप्रसिद्ध आहेत. सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी ते यज्ञ करत आहेत. त्यांच्या गुरूंनी दिलेल्या ३२ अक्षरी गुरुमंत्रामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कठीण समय येता कोण कामास येतो ? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, कठीण समय येता देवच कामास येतो !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.३.२०१५)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संयमाची आवश्यकता !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      संस्कृती हा केवळ विद्वत्तापूर्ण चर्चा करण्याचा विषय नसून नित्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, हीच खरी संस्कृती !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

भारतासमोरील भीती आणि महासत्तेला उपरती !

संपादकीय 
     अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्र्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला उद्देशून १३ जानेवारीला शेवटचे संसदीय भाषण केले. यात त्यांनी पाकिस्तान हा आतंकवाद्यांचे आश्रयस्थान ठरू शकतो, असे सांगितले. भारताच्या शत्रूविषयी ओबामा यांनी केलेले निरीक्षण अचूक असले, तरी नवीन नाही. प्रश्‍न आहे तो अमेरिकेच्या पाकविषयी असलेल्या दुटप्पी धोरणाचा आणि त्याचा भारतावर होणार्‍या विपरीत परिणामांचा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn