Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येऊन पुरोगाम्यांचे षड्यंत्र हाणून पाडू ! - नगरच्या माजी महापौर सौ. शीलाताई शिंदे

शनिशिंगणापूर येथे धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या नास्तिकवाद्यांना 
रोखण्यासाठी नगरमधील रणरागिणी एकवटल्या !
हिंदु जनजागृती समिती आयोजित आंदोलनाला उपस्थित हिंदुत्वववादी
     नगर - पुरोगामी संघटना आणि भूमाता ब्रिगेड यांच्या महिला २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी (शनीदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश) करणार आहेत. त्या धर्मद्रोही कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर आम्ही महिला शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र होऊन हा मनसुबा (षड्यंत्र) पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसेनेच्या माजी महापौर सौ. शीलाताई शिंदे यांनी दिली.

धार्मिक प्रथा मोडणार्‍यांना रोखण्यासाठी आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण
पोलिसांना निवेदन देतांना महिला कार्यकर्त्या
     नगर - तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नसतांना तेथे जाण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्या ४०० महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर २६ जानेवारी या दिवशी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पंतप्रधानांच्या अवमानाच्या प्रकरणी श्रीपाल सबनीस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त !

     पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केलेला एकेरी उल्लेख आणि त्यांच्या संदर्भात वापरलेले शब्द मी मागे घेतो. माझ्या वक्तव्याविषयी अनेक मान्यवर आणि सहकारी यांनी मला जाणीव करून दिली. माझ्या वक्तव्यांमुळे ज्यांची मने दुखावली असतील, त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. १२ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पत्रकार परिषद घेतली.
     या वेळी सबनीस यांनी झाले गेले गंगेला मिळाले, असे सांगू सर्व गोष्टी विसरून जाण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी पत्रकारांना कोणतेही प्रश्‍न विचारू नका, असे सांगितले.

बायबल वाचण्यास नकार दिल्याने अनाथालयातील मुलांना पंख्यांना टांगून मारले अन् उपाशी ठेवले !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात रान 
उठवणार्‍या वृत्तवाहिन्या या वृत्ताविषयी गप्प का ?
     नवी देहली - नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून बेदम मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत.
१. या मुलांनी दिलेल्या माहितीवरून ती सर्व गरीब घरांतील होती. त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.
२. त्यांना ३ वर्षे अनाथालयात कोंडून ठेवण्यात आले. त्यांना देण्यात येणार्‍या अन्नात झुरळ सापडत असत. त्यांचे जीवन कारागृहापेक्षाही कठीण होते, असे मुलांनी सांगितले.

(म्हणे) अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करा ! - आम आदमी पक्ष

देशातील आतंकवाद, मालदा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधांनी 
घडवलेल्या दंगली आदी घटनांविषयी आम आदमी पक्ष कधी बोलतो का ?
     पुणे - अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या सनातन संस्थेचे अधिवक्ता आहेत. (कोणत्याही न्यायव्यवस्थेने सनातन संस्थेला दोषी ठरवलेले नसतांना तिला आरोपी म्हणणे, हे निवळ सनातनद्वेषापोटीच आहे ! - संपादक) अधिवक्ता पुनाळेकर यांनी आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना मॉर्निंग वॉकला जात चला, असा धमकीवजा सल्ला उघडपणे दिला आहे. हा धमकावण्याचा प्रकार असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला छेद देणारा आहे. (उलट आम आदमी पक्ष अशी असहिष्णु विधाने करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत नाही का ? - संपादक) याद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक दहशत माजवली जात आहे. त्यामुळे अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
     डॉ. सबनीस यांनी मध्यंतरी काही अशोभनीय वक्तव्ये करून घातलेल्या वैचारिक गोंधळाचे समर्थन करणे शक्य नाही, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (असे आहे, तर सबनीस यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांना क्षमा मागण्यास सांगण्याचे धाडस आपने का केले नाही ? - संपादक)

बनावट नोटांच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच धर्मांधांकडून मालद्यातील पोलीस ठाण्यावर आक्रमण !

  • धर्मांध थेट पोलीस ठाणे जाळून टाकतात, यावरून मालद्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती भयंकर असेल, याची कल्पना येते !
  • गुन्हा उघड होऊ नये, यासाठी धर्माच्या आड हिंसाचार करणार्‍या उन्मत्त धर्मांधांविषयी निधर्मी प्रसारमाध्यमे गप्प का ?
  • मालद्याचे पाक झाल्याचा पुरावा !
  • कोठडीचे कुलूप तोडून बनावट नोटांच्या प्रकरणातील अटकेतील आरोपींचीही केली सुटका ! 
  • बनावट नोटांच्या प्रकरणाचा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा करणार होती तपास !
मालदा हिंसाचार प्रकरण
धर्मांधांच्या आक्रमणात भस्मसात झालेल्या गाड्या

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मराठी राजभाषा होण्यासाठी राजकारण्यांना वठणीवर आणणारा मार्ग अवलंबा !

पणजी येथील सहस्रो मराठीप्रेमींच्या उपस्थितीतील 
महामेळाव्यात प्रा. गोपाळराव मयेकर यांचे आवाहन !
संस्कृतीरक्षणार्थ ठाम भूमिका घेणारे मंत्री सुदिन ढवळीकर यांचे अभिनंदन !
सर्वच नेत्यांनी त्यांच्याकडून आदर्श घ्यावा !
     पणजी - निवडणुकीपूर्वी राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी मराठीचा आधार घेतात; मात्र सत्तेवर आल्यानंतर सत्तेसाठी मराठीचा बळी दिला जातो. मराठी राजभाषा करण्यासाठीचे शांतीचे मार्ग आता पुरे झाले. राजकारण्यांना वठणीवर आणणारे गोवा बंदसारखे प्रखर मार्ग अवलंबा, असे आवाहन प्रा. गोपाळराव मयेकर यांनी पणजी येथे १० जानेवारीला मराठीप्रेमींच्या महामेळाव्यात केले. मराठी राजभाषा समितीने आयोजित केलेल्या या महामेळाव्यात आझाद मैदानावर सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष श्री. गो.रा. ढवळीकर, श्री. शाणूदास सावंत, श्री. मोहन डिचोलकर, श्री. सुदेश कामत, श्री. दिवाकर शिंक्रे, कु. भारती परांजपे, श्री. राजन कडकडे, श्री. शांताजी गावकर, श्री. शशिकांत सरदेसाई, सौ. अर्चना कोचरेकर, अधिवक्ता शिवाजी देसाई, श्री. अजितसिंह राणे, श्री. मच्छिंद्र च्यारी, माजी मंत्री श्री. पांडुरंग राऊत, मगो पक्षाचे अधिवक्ता नारायण सावंत, डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ आदींची आवेशपूर्ण भाषणे झाली.

मिरज येथे प्रांत कार्यालयात निवेदन

     मिरज - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखला जावा यांसाठी मिरज येथील प्रांत कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने १२ जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना उद्योगआघाडी सेनेचे श्री. तात्या कराडे, श्रीराम सेनेचे श्री. शुभम भोरावत आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चिदंबर कारकल आणि मनोज गवळी उपस्थित होते. या वेळी शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांचा आक्षेपार्ह प्रकार आणि अशा धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

शिराळा येथे तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी, तसेच शाळांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ !
गटशिक्षणाधिकारी श्री. मंद्रुपकर
(डावीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     शिराळा (जिल्हा सांगली) - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखला जावा, यांसाठी तहसीलदार श्री. विजय पाटील, गटशिक्षण अधिकारी श्री. एस्.एन्. मंद्रुपकर, तसेच ५ शाळांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. विजय पाटील यांनी सांगितले की, समितीच्या अभियानास पूर्ण सहकार्य करू. पोलीस ठाणे, तसेच शिक्षणाधिकारी यांना परिपत्रक पाठवू. या वेळी श्री. पाटील यांनी प्रबोधनासाठी दाखवण्यासाठी ध्वनीचित्र-चकतीही मागणी केली. श्री. मंद्रुपकर यांनी सर्व मुख्याध्यापकांच्या बैठकीत विषय मांडण्यास अनुमती दिली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. निखिल घोघावकर, धर्माभिमानी श्री. अशोक मस्कर, श्री. ऋषीकेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजाराम मोरे, श्री. संतोष कुंभार उपस्थित होते.

शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी 

आंदोलनात घोषणा देतांना साधक आणि कार्यकर्ते
     नाशिक - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली. या मागणीसमवेतच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी 'पनून काश्मीर' या केंद्रशासित प्रदेशास मान्यता देण्यात यावी, महाराष्ट्रातील संत-देवता यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारा, भारतीय संस्कृतीविषयी खोटी, अवमानजनक माहिती देणारी 'एन्.सी.ई.आर.टी.'च्या पाठ्यपुस्तकांतील माहिती त्वरित पालटण्यात यावी तसेच बंगालमधील मालदा येथे धर्माधांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी मोदी शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) श्री. जी.एम्. गाडीलकर यांना याविषयी निवेदन देण्यात आले. 

तुळजापूर तहसीलदारांकडून पोलीस आणि प्रशासन यांना राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन 
हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ ! 
     तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १२ जानेवारी ( वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने २६ जानेवारीच्या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर तहसीलदार श्री. पाटील यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा, महाविद्यालये, शिक्षणाधिकारी आणि नगरपालिका यांना आदेश काढण्यास सांगितले. (राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एवढ्या तत्परतेने आदेश देणारे तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांचे अभिनंदन ! - संपादक) हे निवेदन देतांना समितीच्या वतीने सर्वश्री कदम, विनायक माळी, सचिन काबंळे, तानाजी धनके, बालाजी बेले, आकाश म्हेत्रे, महेश लोहार, राजेंद्र लोहार, धनजंय बगडी, सौ. पुनाताई होरडे यांसह १५ धर्माभिमानी उपस्थित होते.

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करता येणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अधिवक्त्यांच्या एका संघटनेने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मंदिराच्या परंपरेनुसार तरुण मुलींना आणि महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. या याचिकेवर न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती एन्.व्ही. रमण यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. हे सार्वजनिक मंदिर असून प्रत्येक व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

नंदुरबार येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची 'हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ' ! 
   
रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाअधिकारी
     नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्‍या 'भूमाता बिग्रेड'च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाअधिकारी सुलाणे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने स्वीकारले. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर, सौ. निवेदिता जोशी सौ. वनिता पाटील, सौ. माळी, सौ. आव्हाड, श्रीमती भावना कदम, सौ. सोनार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्यातील चित्रपटगृहात ध्वनीचित्रचकती दाखवण्याचा प्रयत्न करणार ! - निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे

 निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बर्गे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची ध्वनीचित्रचकती त्यांना या वेळी दाखवण्यात आली. ही ध्वनीचित्रचकती पाहून श्री. बर्गे यांनी जिल्ह्यातील चित्रपटगृहात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले. 

पुणे जिल्ह्यात बलात्कार आणि विनयभंग याचे सर्वाधिक गुन्हे नातेवाइकांकडून !

  • यावरुन समाज धर्माचरणी असणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! 
  • 'कुंपणानेच शेत खाण्या'चा हा प्रकार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या बलात्काराच्या घटना पहाता छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या कठोर शिक्षांचा अवलंब करायला हवा, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? 
     पुणे, १२ जानेवारी - पुणे जिल्ह्यात वर्ष २०१५ मध्ये बलात्कार आणि विनयभंग या गुन्ह्यांच्या बहुतांश घटनांमध्ये पीडित महिलेवर नातेवाईक आणि परिचित व्यक्तीनेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटना पहाता पीडित महिलांसाठी त्यांच्या घराच्या भिंतीच असुरक्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्याात वर्ष २०१५ मध्ये गंभीर स्वरूपाचे ९ सहस्र ८५७ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. सरत्या वर्षांत पुणे जिल्ह्यात बलात्कार, विनयभंग, प्राणांतिक अपघात, चोरी, फसवणूक आणि दुखापत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ११ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. 

शाळांच्या परिसरातून जंक फूड हद्दपार करा !

संपूर्ण भारतात जंक फूडवर बंदी घालण्याविषयी शासन प्रयत्न करेल का ?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे शाळांना आवाहन
     नवी देहली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएस्ई) त्याच्या अधिकारक्षेत्रात येणार्‍या शाळांच्या २०० मीटर परिसरात आणि शाळांच्या उपाहारगृहांमध्येही जंक फूड मिळणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन शाळांना केले आहे. त्यासंबंधी सूचनेचे परिपत्रक संबंधित शाळांना पाठवण्यात आले आहे. (राज्यशासनानेही राज्यातील शाळांसाठी असे परिपत्रक काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा आहे ! - संपादक)

(म्हणे) शिवरायांनी मोहन भागवतांच्या कानाखाली लावली असती !

तांदुळवाडी (जिल्हा सोलापूर) येथील शाखेच्या उद्घाटनात 
श्रीमंत कोकाटे यांची अश्‍लाघ्य आणि अपमानास्पद मुक्ताफळे ! 
     तांदुळवाडी (जिल्हा सोलापूर) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुण्यात मेळावा झाला. या मेळाव्यात छत्रपती शिवरायांची अपकीर्ती करत आशीर्वाद देणारी प्रतिमा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद दिलेली कोणतीही प्रतिमा शासनमान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दैववादी बनवण्याचे षड्यंत्र मोहन भागवत रचत आहेत. शिवरायांची अपकिर्ती आम्ही खपवून घेणार नाही. जर शिवराय आज असते, तर आशीर्वाद दिला नसता, त्यांनी मोहन भागवतांच्या कानाखाली लावली असती, अशी अश्‍लाघ्य आणि अपमानास्पद मुक्ताफळे इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांनी माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात उधळली
     नवी देहली - केंद्रशासनाच्या धोरणामुळे देशातील जनता नाराज असल्याचे योगऋषी रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. रामदेव बाबा म्हणाले, शासन त्याचे काम करत असले, तरी त्यापासून कोणतेही मोठे पालट दिसून आलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या धोरणांवर नागरिक नाराज असल्याचे मला वाटते. शासन अद्याप विदेशातून काळे धन परत आणू शकलेले नाही. परेदशातील काळा पैसा अल्प होण्याऐवजी त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. रामदेव बाबा हे पंतप्रधान मोदी यांचे मोठे समर्थक समजले जातात.

पठाणकोट आक्रमणात आतंकवाद्यांना संपवण्यास विलंब झाला ! - सुशीलकुमार शिंदे

कसाब आणि महंमद अफजल यांना फाशी देण्यास वेळकाढूपणा करणारे 
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना अशी टीका करण्याचा अधिकार आहे का ? 
     करमाळा (जिल्हा सोलापूर), १२ जानेवारी - पठाणकोट तळावर भारताचे ५० सहस्र सैनिक अहोरात्र उपलब्ध असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य त्या सूचना वेळेत न दिल्यामुळे आतंकवाद्यांना संपवण्यास विलंब झाला, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. करमाळा येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळांत सीसीटीव्ही बसवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

     मुंबई - दादरमधील एका प्रथितयश शाळेत पाचवीतील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. असे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक आहे, असे निर्देशही न्यायालयाने ११ जानेवारीला दिले. (राज्यशासन एवढ्या गंभीर घटनेविषयी स्वत:हून उपाययोजना केव्हा करणार ? - संपादक) 
१. दादर पश्‍चिमेकडील एका शाळेत ८ जानेवारी या दिवशी पाचवीतील मुलीवर शाळेच्या भोजनालयात (कँन्टीन) काम करणार्‍या १८ वर्षांच्या कर्मचार्‍याने स्वच्छतागृहात बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी घाबरून तिथेच लपून बसली होती. 

आग्रा येथे लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु तरुणीला धर्मांधाकडून तलाक !

उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या राजवटीत हिंदु महिला आणि मुली असुरक्षित ! 
लव्ह जिहाद रोण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - लव्ह जिहादला बळी पडलेल्या एका हिंदु तरुणीला संबंधित धर्मांधाने तलाक दिला आहे. उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना रोखण्यात समाजवादी पक्षाचे शासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एका सिद्ध झाले आहे.
१. आग्रा येथील सदर क्षेत्र येथील एक २४ वर्षीय हिंदु युवती एम्. कॉम् करत होती. त्याच वेळी ती एका इंश्युरन्स आस्थापनेत सेल्स मॅनेजर पदावरही काम करत होती. 
२. तेथे तिची त्याच आस्थापनात काम करणार्‍या सलमान नावाच्या धर्मांध युवकाशी ओळख झाली.

फलक प्रसिद्धीकरता

ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे खरे स्वरूप लक्षात घ्या !
     नोयडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून बेदम मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Bibal padhanese nakar denepar UPke noyda aur Merath ke khristi anathalayome ladkonko pitkar bhuka rakha.
     kya yahi Khristionki manavata hai ?
जागो !
     बायबल पढने से नकार देने पर उत्तरप्रदेश के नोयडा और मेरठ के ख्रिस्ती अनाथालयों में लडकों को पीटकर भुका रखा.
     क्या यही ख्रिस्तिआेंकी मानवता है ?

(म्हणे) 'शिवरायांनी मोहन भागवतांच्या कानाखाली लावली असती !'

तांदुळवाडी (जिल्हा सोलापूर) येथील शाखेच्या उद्घाटनात 
श्रीमंत कोकाटे यांची अश्‍लाघ्य आणि अपमानास्पद मुक्ताफळे ! 
     तांदुळवाडी (जिल्हा सोलापूर) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुण्यात मेळावा झाला. या मेळाव्यात छत्रपती शिवरायांची अपकीर्ती करत आशीर्वाद देणारी प्रतिमा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद दिलेली कोणतीही प्रतिमा शासनमान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दैववादी बनवण्याचे षड्यंत्र मोहन भागवत रचत आहेत. शिवरायांची अपकिर्ती आम्ही खपवून घेणार नाही. जर शिवराय आज असते, तर आशीर्वाद दिला नसता, त्यांनी मोहन भागवतांच्या कानाखाली लावली असती, अशी अश्‍लाघ्य आणि अपमानास्पद मुक्ताफळे इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांनी माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात उधळली

शासनाने महाधिवक्त्याची (अ‍ॅडव्होकेट जनरलची) नियुक्ती करावी ! - मेधा पानसरे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
     कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी सनातनचे साधक आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. श्री. गायकवाड यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी राज्यशासनाने महाधिवक्त्याची (अ‍ॅडव्होकेट जनरलची) नियुक्ती करावी, अशी मागणी कॉ. पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. सुनावणीला अवघे २ दिवस शिल्लक असल्याने शासनाने लवकर निर्णय घ्यावा, यासाठी मेधा पानसरे यांनी तातडीने ११ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. 

तुर्कस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणात १० ठार

     इस्तंबूल - येथीला सल्तनत चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले आहेत. इसिसच्या (आय.एस्.आय.एस्.च्या) आत्मघातकी आतंकवाद्याने हा स्फोट घडवला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या स्फोटात १५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

मुंबईत काँग्रेसच्या मुख्यालयात दोन गटांमध्ये हाणामारी

हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस कायद्याचे राज्य काय देणार ? 
     मुंबई, १२ जानेवारी - राहुल गांधी यांच्या दौर्‍याच्या नियोजनावरून मुंबईत काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. नसीम खान आणि असलम शेख यांच्यात हाणामारी झाली, तर संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांचे कार्यकर्तेही एकमेकांना भिडले.

कोडुंगल्लूर (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मसत्संग

     चेन्नई - केरळ राज्यातील कोडुंगल्लूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ डिसेंबर या दिवशी धर्मसत्संग आयोजित करण्यात आला. कु. रश्मी परमेश्‍वरन् आणि कु. प्रणीता सुखटणकर यांनी या वेळी धर्माचरण आणि धर्मप्रसार यांचे महत्त्व सांगितले. धर्मप्रसार ही काळाची आवश्यकता आहे. धर्मप्रसाराच्या माध्यमातून आपण अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोहोचू शकतो, असे कु. परमेश्‍वरन् यांनी सांगितले. त्यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व विषद केले. 
क्षणचित्रे 
१. सनातनचे धर्मग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२. एका धर्माभिमान्याने नामजप केल्यानंतर आलेली अनुभूती कथन केली.
३. कु. प्रणीता यांनी धर्मप्रसाराच्या विविध पद्धती सांगितल्यानंतर काही धर्माभिमान्यांनी त्यामध्ये भाग घेण्याची सिद्धता दर्शवली.

(म्हणे) भारत उद्ध्वस्त करणे आणि हिंदूंना ठार मारणे हे अल्लाकडून मिळालेले वरदान !

अशी मानसिकता असलेल्यांशी चर्चेने संबंध सुधारण्याची अपेक्षा करणे, 
म्हणजे स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतल्यासारखे आहे !
मौलवी इरफान-उल-हक यांचा पराकोटीचा भारत आणि हिंदुद्वेष !
     इस्लामाबाद - भारतातील मूर्तीपूजा नष्ट केल्यास आणि हिंदूंना ठार मारल्यास पाकिस्तान्यांना अल्लाकडून वरदान लाभेल, असे स्फोटक वक्तव्य मौलवी इरफान-उल-हक यांनी केले आहे. जगाच्या पाठीवर भारत हे एकमेव स्थान आहे, जेथे लोक मूर्तीपूजा करतात. भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याची संधी उपलब्ध होणे, हा पाकिस्तान्यांना अल्लाकडून मिळालेला मोठा सन्मान आहे. भारतात युद्ध होईल आणि हे युद्ध घझवा-ए-हिंद असेल, असा दावा प्रेषिताने केल्याचे मौलवीने सांगितले. भारत आणि हिंदु धर्म पाकिस्तानच्या हातून हरणार आहे, असा अल्लाचा संदेश असल्याचे मौलवींनी सांगितले.


चीनमध्ये माओ त्से तुंग यांचा पुतळा उभारण्यापूर्वीच नष्ट होणार !

कुठे व्यक्तीपूजा बोकाळेल म्हणून माओचा पुतळा नष्ट करण्याचा निर्णय घेणारा चीन, 
तर कुठे व्यक्तीपूजेत गुंतलेला भारतीय समाज आणि राज्यकर्ते !
     बीजिंग - चीनचे बहुचर्चित आणि अनेक वर्ष सत्तेत असलेले तात्कालीन अध्यक्ष माओ त्से तुंग यांचा १२० फूट उंचीचा सोनेरी पुतळा उभारण्यापूर्वीच त्याला तोडून टाकण्याचा निर्णय चीनच्या शासनाने घेतला आहे. 
    या पुतळ्याची छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यावर अनेक नागरिकांनी विपरीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष म्हणजे ज्या हेनान प्रांतात हा पुतळा सिद्ध करण्यात आला, तेथे माओच्या धोरणांचा फार मोठा फटका बसला होता. या प्रांतातूनच या पुतळ्यास सर्वाधिक विरोध झाला. त्यातच चीन शासनाच्या धोरणांनुसार व्यक्तीपूजेला विरोध आहे. हा पुतळा उभारल्याने व्यक्तीपूजेला मोठा वाव मिळेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चीन शासनाने हा पुतळा तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि तशा आशयाची छायाचित्रेही सामाजिक संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहेत.

जिहाद्यांनो, दाढी ठेवू नका, तसेच पाश्‍चात्यांप्रमाणे पोषाख करा !

अशा धूर्त इसिसशी दोन हात करण्यासाठी भारत शासनाकडे कोणती नियमावली आहे ?
सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी इसिसची क्लृप्ती
     लंडन - इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने तिच्या आतंकवाद्यांना दाढी न ठेवण्याचा, तसेच संपूर्ण पाश्‍चात्य पद्धतीचा पोषाख करण्याची सूचना दिली आहे. सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी इसिसने आतंकवाद्यांसाठी सेफ्टी आणि सेक्युरिटी गाईडलाइन फॉर लोन वुल्फ मुजाहिदिन ही ५८ पानांची नियमावली सिद्ध केली आहे. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. 
यात पुढे म्हटले आहे,
१. सुरक्षायंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी दाढ्या कापाव्यात, दात घासण्यासाठी मिसवाकचा (एक प्रकारची वनस्पती) वापर करू नये, कुर्ता परिधान न करता पाश्‍चात्य पद्धतीचा पेहराव करा, इस्लामी साहित्य जवळ बाळगू नका. 

३१ डिसेंबर आणि शिर्डीचे साई मंदिर

      भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा आणि गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ३१ डिसेंबरला श्री साई मंदिर रात्रभर उघडे ठेवले गेले. त्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती आणि १ जानेवारी या दिवशीची काकड आरती झाली नाही. मंदिर सरकारीकरणामुळे देवता, संत यांनाही कशाप्रकारे तिष्ठत ठेवले जाऊ शकते, नित्योपचारांची मोडतोड करण्याचा अश्रद्धपणा केला जाऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण सर्वांसमोर आले आहे. राज्यशासन, मंदिर संस्थान यांना याविषयी जोपर्यंत धारेवर धरले जात नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

धोका हायड्रोजन बॉम्बचा !

      गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केल्याने जगभरात खळबळ उडाली. उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाच्या हाती अशी महाविध्वंसक अस्त्रे पडणे हा जागतिक शांततेसाठी मोठा धोका समजला जात आहे.
अण्वस्त्रांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
१. अणुबॉम्ब : यात युरेनियम-२३५ किंवा प्लुटोनियम-२३९ यांसारख्या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणूंवर मंदगती न्यूट्रॉन्सचा मारा करतात आणि अणूंचे विखंडन (न्यूक्लियर फिशन) केले जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार्‍या ऊर्जेने प्रचंड विध्वंस घडवून आणता येतो.
२. हायड्रोजन (थर्मोन्यूक्लियर) बॉम्ब : यामध्ये अणुभंजनाऐवजी अणू सम्मीलनाची (न्यूक्लियर फ्यूजन) अभिक्रिया घडवली जाते. हायड्रोजनच्या ड्युटेरियम किंवा ट्रिटियम या हलक्या समस्थानिकांच्या अणूंवर प्रचंड दबाव देऊन त्यांचे मीलन घडवून आणले जाते. त्यातून हेलियमसारख्या तुलनेने जड मूलद्रव्याचे रेणू घडतात. या प्रक्रियेत विखंडनापेक्षा खूप अधिक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान तिप्पट विध्वंसक असतात. यात प्राथमिक स्फोट अणुबॉम्बसारखा होतो आणि नंतर त्याच्या प्रभावाने अणुसम्मीलन घडून येते.
३. न्यूट्रॉन बॉम्ब : या प्रकारच्या अण्वस्त्रामध्ये स्फोटाचा परिणाम काहीसा कमी करून प्राणघातक किरणोत्सर्गाची मात्रा वाढवलेली असते. त्यामुळे वित्तहानी कमी होऊन प्राणहानी जास्त होते.

उर्मट आणि असभ्य भाषेला कोणी बाणेदार आणि सडेतोड समजत नाही !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
सर्वसामान्य व्यक्तीलाही नाव माहीत नसणारे असभ्य 
सबनीस म्हणे संमेलनाध्यक्ष !
माणसाला कुठे आणि काय बोलावे, हे कळले नाही, तरी चालेल; पण कुठे आणि काय बोलू नये हे कळायला हवे, असे जुने लोक म्हणत ! त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्या पंतप्रधानांविषयी असभ्य शब्दांत बोलून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. मुळात त्यांची निवड होताच, कोण हे श्रीपाल सबनीस, अशी पृच्छा अनेकांनी केली, यातच त्यांची ओळख पटायला हरकत नाही. कित्येकांना त्यांचे नावच नीट घेता येत नव्हते. श्रीपादपासून शिशुपालपर्यंत अनेक नावांनी ते ओळखले जाऊ लागले. योगायोगाने श्रीपाल कि शिशुपाल हे लोकमान्यांच्या केसरीचे एक शीर्षक होते. अनेक वर्षांनी ते असे सार्थ होईल, असे स्वतः त्यांनादेखील वाटले नसेल !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

स्फोट झाल्यावर आतंकवाद्यांना पकडणारे नकोत, तर स्फोट होण्यापूर्वीच आतंकवाद्यांना पकडणारे पोलीस हवेत ! सक्षम आणि राष्ट्रप्रेमी नसलेल्या पोलिसांना आजन्म कारावासात टाका !

     २८ डिसेंबर २०१५ या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख (वय ३० वर्षे) आणि फैजुल शेख (वय ३२ वर्षे) ठार झाले, तर नवीउल शेख (वय ४२ वर्षे) आणि नसीरूल इस्लाम (वय ४० वर्षे) हे गंभीररित्या घायाळ झाले. पोलिसांनी यांना कह्यात घेतले आहे. गांधींनी चरख्यासारख्या गोष्टी आणून प्रगत हिंदु संस्कृतीला आधुनिकताविरोधी बनवणे हे हिंदुविरोधीच !

गांधी (महात्मा) यांनी आधुनिकतेला काटशह देण्याकरता चरखा, खादी, ग्रामोद्योग चालू 
करून सनातन हिंदु संस्कृतीचा पुरस्कार केला, हे साफ खोटे आहे.
१. प्राचीन वाङ्मयात चरख्याला स्थान नाही !
     प्राचीन वाङ्मयात चरखा कुठेच नाही. त्याला सनातन हिंदु संस्कृतीत कोणतेही स्थान नाही. हा चरखा, ती सूतकताई, ती खादी, ही जी चरखा चलाचलाके लेंगे स्वराज्य लेंगेची रेट्रो टेंडन्सी (retro tendency) (जुन्या शैलीवर आधारित नवीन गोष्ट सांगणे) आहे, ती पश्‍चिमी लेखक टॉलस्टायची उसनवारी आहे. 
२. वैज्ञानिक प्रगती आणि हिंदूंचे अध्यात्म यांत अंतर नाही ! 
    गांधीचे हे ग्रामोद्योगादी धोरण आधुनिकतेला विरोधी असे एकांगी (bias) आहे. त्याला प्रतिशह देण्याकरता त्यांनी चरखा आणला. हे सगळे अ-हिंदु आहेत. हिंदुस्थान तर विज्ञान आणि उद्योगधंदे यांत लक्षावधी वर्षांपासून प्रगत होता. वैज्ञानिक प्रगती आणि हिंदूंचे अध्यात्म यांत कुठेही अंतर नाही.
    टॉलस्टॉय आणि रूसोचा गांधीवर विलक्षण प्रभाव होता. गांधी त्या काळी ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते; परंतु हिंदूंच्या दुर्दैवाने तो प्रसंग टळला. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २००७)

पोलिसांशी झटापट करणार्‍यांना देशद्रोही म्हणून लगेच अटक का केली नाही ?

     आतंकवादविरोधी पथकाने १ जानेवारी २०१६या दिवशी उन्हेलमधून प्रतिबंधित आतंकवादी संघटना सिमीचा आतंकवादी शराफत खान आणि त्याचा सहकारी जफर यांना अटक केली. ही कारवाई होत असतांना आजूबाजूच्या लोकांनी तीव्र विरोध केला आणि पोलिसांशी झटापट केली. (४.१.२०१६)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांकडून राजकारण्यांप्रमाणे केवळ बोलणे नाही, तर कृती अपेक्षित आहे !

      सामाजिक समरसता आणि समता प्रस्थापित झाल्यानंतरच संपन्न राष्ट्राची स्थापना होऊ शकेल. ही समता केवळ कायद्याने येणार नाही, तर मनातून ही विषमता गेली पाहिजे.
- सरसंघचालक मोहन भागवत (४.१.२०१६)

कर्मफलन्यायानुसार येणारे दुःख टाळण्यासाठी धर्मांतर नव्हे, तर साधनाच करणे आवश्यक !

पू. उमेश शेणै
१. हिंदु धर्माचे महत्त्व
       हिंदु धर्माचा पाया ४ भक्कम सिद्धांतांवर आधारित आहे. अपौरुषेय असलेल्या या धर्माला नंतर ऋषी-मुनींची तपश्‍चर्या, संशोधन आणि ज्ञान यांनी अधिक दृढता प्रदान केली आहे. पुनर्जन्म, कर्मफलन्याय, आश्रमव्यवस्था आणि मोक्ष हे चार सिद्धांत हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत; परंतु अलीकडे स्थापन झालेले काही पंथ मात्र आपलाच पंथ श्रेष्ठ आहे, अशी फुशारकी मारत असून पैशाचा प्रभाव आणि अहंकार यांमुळे लोकांच्या मानसिकतेचा दुरुपयोग करत आहेत आणि निष्पाप, अज्ञानी, दारिद्य्राने होरपळलेले दुःखी जीव, अशिक्षित, अडाणी अन् रोगराईने पीडलले लोक यांचे धर्मांतर करत आहेत.

वादंग माजवणार्‍या आणि स्वतः त्रस्त राहून दुसर्‍यांनाही त्रास देणार्‍या माणसांना दुरूनच नमस्कार !

     तीन प्रकारची माणसे असतात.
१. पहिल्या प्रकारची माणसे धर्म आणि धार्मिक कृती समजून घेऊन श्रद्धेने आचरण करतात अन् त्यांना त्यांपासून लाभ होतो. साधी अंघोळ केली, तरी स्वच्छ वाटते. पूजा, महापूजा केली, तर पवित्र झाल्यासारखे वाटते, समाधान मिळते. अन्य अनेक धार्मिक कृती सदाचारी बनवणार्‍या आणि पावन करणार्‍या आहेत.
२. दुसर्‍या प्रकारची माणसे धर्म आणि धार्मिक कृतींचे शास्त्र समजून न घेता; पण श्रद्धेने धर्माचरण करतात, त्यांनाही धर्माचरणाचा लाभ होतो.
३. तिसर्‍या प्रकारची माणसे धर्माचे शास्त्र समजून न घेताच त्याला थोतांड म्हणतात. अशी माणसे धर्माचा अभ्यास न करता स्वतःला सर्वज्ञ समजतात. हे समाजाला सद्वर्तनी बनवणारे धार्मिक आचरण आणि परंपरा यांना नष्ट करण्याच्या मागेच लागलेले असतात; पण समाजाला उन्नत, निर्व्यसनी अन् सदाचारी बनवण्याचा वेगळा पर्याय त्यांच्याकडे नसतो, ना तशी त्यांची इच्छा असते, ना कृती !

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

येणार्‍या आपत्काळात ईश्‍वराचे नाम आणि भक्तीच आपल्याला तारू शकेल ! - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

     तुळजापूर (जिल्हा धाराशिव) - उद्भवलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीला आणि आपत्काळाला संपूर्णपणे आपणच जबाबदार आहोत. आपल्याला या स्थितीतून ईश्‍वराचे नाम आणि भक्तीच तारू शकेल, यासाठी आपण ईश्‍वराचे नाम आणि भक्ती वाढवली पाहिजे, असे मार्गदर्शन अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी त्यांच्या प्रवचनात केले. तुळजापूर येथे नुकतेच त्यांचे जाहीर प्रवचन झाले. या प्रवचनासाठी विविध भागांतून ५० सहस्रांहून अधिक भक्तगण उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री. विलास पुजारी यांनी त्यांचा हार घालून आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. २० मार्च २०१६ या दिवशी तुळजापूर येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेसाठी आशीर्वाद घेतले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित कदम उपस्थित होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जन्मतःच आनंदी अन् देवाच्या अनुसंधानात असणारा पुणे येथील चि. अर्जुन देशपांडे (वय ७ मास) !

१. जन्मापूर्वी
१ अ. आईने सहसाधिकेने सांगितल्याप्रमाणे सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करणे : गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर प्रारंभी दोन मास (महिने) मळमळणे आणि अशक्तपणा यांचा पुष्कळ त्रास झाला, तसेच मागे झालेल्या गर्भपातामुळे मनाची स्थिती अस्वस्थ अन् नकारात्मक होती. पुण्यातील साधिका सौ. रश्मी प्रवीण नाईक यांना माझ्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी धर्माचरणाच्या साध्या-सोप्या गोष्टीतून अधिकाधिक सत्मध्ये रहाण्यास सुचवले. त्या काळात घरी राहून गणपति अथर्वशीर्ष आणि रामरक्षा म्हणणेे चालू ठेवले.

श्री. अशोक सारंगधर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अशोक सारंगधर
१. नकारार्थी विचार येणे हे एक प्रकारचे पापच आहे, असे सांगत असतांना सेवा करण्याविषयी नकारात्मक बोलणे होणे आणि त्याची जाणीव करून दिल्यावर सेवा करण्याचे मान्य केल्यामुळे सेवेतून शिकायला मिळाल्याचा आनंद साधकाने अनुभवणे
       १९.७.२०१५ या दिवशी रात्री ८ वाजता व्यष्टी - समष्टी साधनेसंदर्भात सत्संग होता. त्या वेळी माझ्याकडून साधकांना नकारार्थी विचार येणे हे एक प्रकारचे पापच आहे, हे सांगितले गेले आणि त्यानंतर मी काही सकारात्मकतेविषयी सूत्रे सांगितली. काही वेळाने श्री. शिवाजी उगले यांनी दूरभाषवर मला विचारले, अशोककाका, उद्या पंढरपूर येथील श्री. आप्पासाहेब सांगोलकरकाका संपर्कासाठी येत आहेत. तेव्हा तुम्ही वेळ द्याल का ? तेव्हा माझ्याकडून कारणे सांगून जमणार नाही, असे बोलले गेले. तेव्हा ही चूक सौ. जयश्री सारंगधरने (पत्नीने) दाखवून दिली. त्या वेळी मनात विचार आला, बैठकीत सकारात्मकतेवर सूत्रे सांगितली आणि देवाने लगेच परीक्षा घेतली; पण त्यात मी अनुत्तीर्ण झालो.

लग्नपत्रिकेत विवाह विधीचे पावित्र्य जपण्याविषयी प्रबोधन केल्याने विवाह सोहळा हा एक आध्यात्मिक सोहळा ठरणे

१. सनातन संस्थेने सांगितलेल्या धर्मशास्त्रीय 
तत्त्वांनुसार छापलेली लग्नपत्रिका अनेक जणांना आवडणे 
आणि एका मित्राने ही लग्नपत्रिका दाखवून अन्य मित्रांचे प्रबोधन करणे
     २४.५.२०१४ या दिवशी माझा विवाह झाला. आम्ही सनातन संस्थेने सांगितलेल्या धर्मशास्त्रीय तत्त्वांशी जुळेल, अशा पद्धतीने लग्नपत्रिका छापली होती. अनेक जणांनी ही लग्नपत्रिका आवडली, असे मला सांगितले. तसेच एका मित्राने ही लग्नपत्रिका अन्य मित्रांना दाखवून सर्वांनी असे आदर्श वागले पाहिजे, असे त्यांचे प्रबोधनही केले.

श्री. विनायक शानभाग यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना !

    
श्री. विनायक शानभाग
दैनिक सनातन प्रभातमधील लेख वाचून श्री. विनायक शानभाग यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, असा विचार येणे आणि दुपारी तसेच झाल्याचे कळल्याने मनात आलेला विचार ही पूर्वसूचना असल्याचे लक्षात येणे :
२४.१२.२०१५ या दिवशी श्री. विनायक शानभाग आणि चि.सौ.कां. शिल्पा करी हे दोघे विवाहबद्ध झाले. त्या निमित्ताने सहसाधकांनी त्यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये २४.१२.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या दिवशी सकाळी मी श्री. विनायक शानभाग यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना विनायक शानभाग यांनी अध्यात्मात प्रगती केली असून त्यांची कधीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, असा विचार मनात आला. मी देवाला मग तसे घोषित का केले नाही ?, असे विचारले असता उत्तर आले, हो. विनायकची कधीच

जिवाला ईश्‍वरप्राप्ती होण्याची प्रक्रिया

श्री. राम होनप
      डोंगरावरील पाण्याला उतार लागतो, तेव्हा त्याला विलक्षण गती प्राप्त होते आणि वाटेत कितीही अडथळे आले, तरी कालांतराने पाणी नदीशी अथवा समुद्राशी एकरूप होते. त्याप्रमाणे जिवाला ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ लागते अन् ज्या वेळी प्रारब्ध संपण्याचा उतार लागतो, तेव्हा या दोघांची परिणती ईश्‍वरप्राप्तीत होते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०१५)

सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे दर्शन घेतांना दिव्य सुगंध येणे आणि नाडीपट्टीच्या ठिकाणी मध्यभागी श्रीविष्णु आणि दोन्ही बाजूंना सिंहासनावर सप्तर्षि विराजमान असल्याचे दिसणे

      २२.१०.२०१५ या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा विजयादशमीच्या दिवशी मिरज आश्रमात सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे आगमन झाले. या मणीकांचन योगाचा आनंद मिरज आश्रमातील साधकांना अनुभवायला मिळाला. ही प.पू. डॉक्टरांची साधकांवरील अगाध कृपाच होय. त्याविषयी त्यांच्या चरणी अपार कृतज्ञता व्यक्त होत होती.

प्रत्येक गोष्टीचा स्पंदनशास्त्रानुसार विचार करणारे महर्षि आणि महर्षींनी प्रत्येक गोष्ट स्पंदनांना ओळखूनच करण्यास शिकवणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. सनातन संस्थेनेच मूर्तींना 
अभिषेक करण्यामागील स्पंदनशास्त्र
१ अ. परम गुरुजींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) नावे देवी आणि श्रीबालाजी यांच्या मूर्तींना अभिषेक केल्याने मूर्तींच्या माध्यमातून जागृत होणार्‍या दैवी स्पंदनांचा लाभ १०० टक्के प्रमाणात सनातन संस्थेलाच झाला पाहिजे, अशी अभिषेकामागची महर्षींची भूमिका असणे : पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या तिरुवण्णामलई येथील निवासस्थानाबाहेर असलेल्या देवी मुकांबिका आणि श्रीबालाजी यांच्या मूर्तींना दर पौर्णिमेला आता सनातन संस्थेकडूनच अभिषेक केला जाईल, असे महर्षींनी सांगितले आणि याप्रमाणे दर पौर्णिमेला मूर्तींवर अभिषेक करणे जून २०१५ पासून आरंभ झाले. यामागचा कार्यकारणभाव सांगतांना एकदा पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, देवाला परम गुरुजींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) नावाने अभिषेक केल्याने अभिषेकाच्या माध्यमातून मूर्तींमध्ये जी स्पंदने जागृत होतात, ती सर्वच्या सर्व सनातन संस्थेच्या कार्यालाच मिळावीत, म्हणजेच अभिषेकाचा लाभ अगदी १०० टक्के प्रमाणात परम गुरुजींनाच व्हावा, असा महर्षींचा यामागचा उद्देश आहे.

शिष्यांना काही लिहून घेऊ नये, असे शिकवणारे एक गुरु !

परात्पर गुरु डॉ. आठवले
    एका गुरूंच्या शिष्यांशी बोलतांना त्यांचे शिष्य काही लिहून घेत नव्हते. सनातनचे साधक सर्व सूत्रे लिहून घेतात. त्यामुळे त्या शिष्यांना विचारले, तुम्ही काही लिहून घेत नाही का ? नंतर सगळे आठवते का ? त्यावर गुरूंनी मला सांगितले, ते लिहून घ्यायला लागले, तर त्यांची ऐकण्यातील एकाग्रता भंग होते; म्हणून मी त्यांना लिहून घेऊ नका, असे सांगितले आहे. नंतर किती शिष्यांना किती आठवत असेल आणि ते इतरांना किती सांगू शकत असतील ? शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी विद्यार्थी काहीतरी लिहून घेतात. काहीजण आध्यात्मिक ग्रंथ प्रकाशित करतात. ते सगळे मूर्ख का ?, असे प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची शासने उत्तरदायी !
     पाश्‍चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत!
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ एकदा निर्माण झाले की, ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

निव्वळ फार्स बनलेली मराठी साहित्य संमेलने !

संपादकीय
    १५ जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनांमधून ठोस असे काहीच बाहेर पडत नसल्याने आणि कृतीशील किंवा रचनात्मक असे काहीच घडत नसल्याने या संमेलनांमधून मराठीच्या उत्कर्षासाठी काहीतरी होईल, अशी मराठीजनांनी अपेक्षाच बाळगू नये. नेहमीप्रमाणे यंदाचे संमेलनही वादग्रस्त होत असून ते राजकीय छत्रछायेखाली मोठ्या झालेल्या तथातथित अध्यक्षांच्या उपस्थितीत होत आहे. संमेलनाध्यक्षपद म्हणजे तीन दिवस मिरवून घेण्याचा शोभेचे बाहुले या पलीकडे त्याला काहीच महत्त्व नसते. संमेलनात ठराव केले जातात; मात्र त्यांचे पुढे काय होते, हे साहित्य मंडळासही माहिती नसते. यंदाही संमेलनाच्या पत्रिकेत राजकारण्यांचा भरणा आहे; किंबहुना त्याशिवाय कोणतेच मराठी साहित्य संमेलन पार पडत नाही. या संमेलनात १७ जानेवारी या दिवशी माजी कृषीमंत्री शरद पवार यांची मुलाखत आहे. आता शरद पवार यांनी मराठी साहित्यासाठी असे काय योगदान दिले, याचे तमाम मराठी जनांना न उलगडलेले कोडे आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn