Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार)
हिंदु शब्दाला अधिकाधिक गौरवपूर्ण अर्थ प्राप्त करून द्या !
     आपण हिंदु आहोत. हिंदु या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे, याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले, त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल; पण त्याचे काय ! हिंदु या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे, अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदु या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया ! - स्वामी विवेकानंद (संदर्भ : हिंदुतेजा जाग रे ! , पृष्ठ २९)

शनिदेवाच्या चौथर्‍यावर परंपरेनुसार महिलांना प्रवेशबंदी योग्यच ! - सौ. अनिता शेटे, अध्यक्ष, शनिशिंगणापूर देवस्थान समिती

सौ. अनिता शेटे
     नगर - प्रथा परंपरा जपल्याच पाहिजेत. मी महिला असले आणि विश्‍वस्तपदी निवड झाली असली, तरी शनीच्या चौथर्‍यावर महिलांना जाऊ देणार नाही. आपल्या परंपरांचा आपण आदर केला पाहिजे. ही परंपरा ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची आहे. इथे स्त्री-पुरूष असा भेद नसून सर्वांनाच चौथर्‍याखालून दर्शन दिले जाते. देवाची अपकीर्ती करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असे परखड मत शनिशिंगणापूर देवस्थान समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. अनिता शेटे यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांनी सौ. शेटे यांनी घेतलेल्या या कणखर धर्मभूमिकेविषयी त्यांचे अभिनंदन करणार असल्याचे कळवले आहे. विश्‍वस्त मंडळातील अन्य सदस्या सौ. शालिनी लांडे यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
     महिलांना शनिचौथर्‍यावर दर्शनबंदी असल्यामुळे विविध संघटनांकडून आणि लोकांकडून आधीच्या विश्‍वस्त मंडळावर टीका करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी यंदा प्रथमच अनिता चंद्रहास शेटे या महिलेची एकमताने निवड करण्यात आली.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देहत्याग केल्याच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका ! - सनातन संस्था

     मुंबई - सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहत्याग केला असून त्यांचा मृतदेह रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात काचेच्या वातानूकुलीत शवपेटीत ठेवल्याचा खोडसाळ प्रचार व्हॉट्स अ‍ॅप या सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे करण्यात येत आहे. हा प्रचार निराधार आणि अफवा पसरवणारा असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या नित्य दिनक्रमानुसार ते लेखनादी सेवा करत आहेत.
      व्हॉट्स अ‍ॅपवरील या संदेशाद्वारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे बंधू पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले यांच्याकडे सध्या सनातनचा सर्व कारभार देण्यात आला आहे, अशी अफवा पसरवण्यात आली आहे. वस्तूतः पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले यांनी ९.११.२०१३ या दिवशी देहत्याग केला आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थापक वीरेंद्र मराठे, प्रवक्ता अभय वर्तक आणि कायदेविषयक सल्लागार संजीव पुनाळेकर यांच्यात एक विशेष बैठक झाली आहे, असा उल्लेखही या अफवेत केला आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही बैठक झालेली नाही.

(म्हणे) धैर्य असेल, तर राममंदिर बनवून दाखवा !

हिंदूंना धमकी द्यायला आझमी भारतात आहेत कि पाकिस्तानात ?
     सोलापूर - अयोध्येतील जागेचा खटला न्यायालयात चालू आहे. २०१६ संपण्यापूर्वी या ठिकाणी राममंदिर बनवण्याची चर्चा चालू झाली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे शासन आहे. तुमच्यात धैर्य असेल, तर २०१६ संपेपर्यंत तुम्ही अयोध्येत राममंदिर बनवून दाखवा, असे उघड आव्हान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी दिले आहे. समाजवादी पक्षाच्या देश बचाओ, देश बनाओ अभियानांतर्गत ११ जानेवारीला जाहीर सभेत ते बोलत होते.
(म्हणे) हिंदु आणि मुसलमान एकत्र आले, तर रा.स्व. संघ नष्ट होईल !
     आमदार आझमी या वेळी म्हणाले, या देशात मुसलमानांवर पोलीस आणि शासन यांच्याकडून होणार्‍या अन्यायाला रोखण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नाही. या देशातील हिंदू आणि मुसलमान एकत्र आले, तर रा.स्व. संघ आपोआप नष्ट होईल. भाजपकडून मुसलमानांच्या आरक्षणाची अपेक्षा करू नका. भारताला हिंदु राष्ट्र करण्याच्या हेतूने भाजपने योजना राबवण्यास आरंभ केला आहे.

१५ जानेवारीला होणारी भारत-पाक चर्चा रहित झाल्याचा दावा चुकीचा ! - अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

     नवी देहली - पठाणकोट आतंकवादी आक्रमणामागे पाकचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाक यांच्यात १५ जानेवारी २०१६ ला होणारी चर्चा रहित झाल्यासंबंधीचे वृत्त चुकीचे आहे, असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने, भारत-पाक चर्चा रहित झाल्यासंबंधीचे प्रतिपादन डोवाल यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
     दैनिक भास्कर या वृत्तपत्राने नुकतेच भारत-पाक यांच्यातील चर्चा रहित झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात अजित डोवाल यांनी मुलाखतीत १५ जानेवारीला लाहोर येथे होणारी उभय देशांच्या परराष्ट्र्रमंत्र्यांची बैठक रहित करण्यात आली आहे, असे म्हटले होते; मात्र डोवाल यांनी हे वृत्त फेटाळून लावले. पठाणकोट आक्रमणासंदर्भात पाकने समाधानकारक तपास करण्यासंबंधी आपण बोललो असून चर्चा रहित झाल्याविषयी बोललो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुडाळ (सिंधुदुर्ग) आणि राजापूर (रत्नागिरी) येथील हिंदु धर्मजागृती सभांमध्ये हिंदुत्ववाद्यांनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित धर्माभिमानी
शिवसेना सनातनच्या पाठीशी ! - आमदार वैभव नाईक, शिवसेना
५ सहस्र धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत विरोधकांवर शरसंधान !
     कुडाळ, ११ जानेवारी (वार्ता.) - हिंदूंनी एकत्र यावे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदू एकत्र आले, तरच सशक्त असे राष्ट्र बनेल. गर्वसे कहो हम हिंदु है ही घोषणा प्रथम हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. देवळात देवदर्शन कसे घ्यावे ? यापासून पूजा कशी करावी ? ही माहिती सांगणारी सनातन संस्था असून शिवसेना, तसेच कुडाळची तमाम जनता सनातन संस्थेच्या पाठीशी आहे, असे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. वैभव नाईक यांनी कुडाळ, सिंधुदुर्ग येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेस उपस्थित धर्माभिमानी हिंदूंना केले. या धर्मजागृती सभेला ५ सहस्र धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.

पठाणकोट आक्रमणाचा बदला घेणार ! - संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्र्यांनी हे विधान सत्यात उतरवून दाखवावे, ही भारतियांची अपेक्षा !
     नवी देहली - भारतावर आक्रमण करून भारतियांना वेदना देणार्‍यांना त्या वेदनांची आणि जखमांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. ती करून देण्यासाठीची जागा आणि वेळ कोणती हे आपणच ठरवायला हवे, असे विधान करत भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रत्यक्ष नाव न घेता शत्रूराष्ट्र पाकवर निशाणा साधला. सैन्यदिनानिमित्त भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी सैन्यप्रमुख जनरल दलविरसिंह सुहाग यांच्यासह सैन्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     पर्रीकर पुढे म्हणाले, दुसर्‍याची हानी करणार्‍याची जोपर्यंत हानी होत नाही, तोपर्यंत त्याला समोरच्याला होत असलेले दुःख जाणवत नाही. त्यामुळे आपल्या देशाला एखादी व्यक्ती अथवा संघटना सतत वेदना देत असेल, तर त्या व्यक्ती अथवा संघटनेलाही त्याच वेदना द्यायला हव्यात. त्याशिवाय अशी आक्रमणे थांबणार नाहीत. अर्थात् हे माझे वैयक्तिक मत आहे. केंद्रशासनालाही असेच वाटते, असा गैरसमज कुणीही करू नये.

धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक विवाह

प्रयाग येथे लव्ह जिहादचे प्रकरण 
  •  हिंदु नावाने केला विवाह  
  • तक्रार नोंदवूनही पोलीस निष्क्रीय
  • पीडितेने स्वत:ची सुटका केली
हिंदु सहिष्णु असल्यामुळे धर्मांधांकडून हिंदु मुलींचे
दिवसाढवळ्या अपहरण होते ! या विषयी कुणी का बोलत
नाही ? हिंदु तरुणींनो, स्वरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
     प्रयाग (इलाहाबाद) - शहरात नुकतीच लव्ह जिहादची घटना समोर आली आहे. येथील कॅन्ट भागातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला सरताज नावाच्या एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले. तिला दोन मास बंदी बनवून बनावट हिंदु नावाने तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर संधी साधून पीडितेने कुलूप तोडून पलायन केले आणि स्वत:चे घर गाठले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.
१. १५ वर्षीय हिंदु मुलगी कॅन्ट भागातील गणेशनगरात रहाणारी असून एका गरीब कुटुंबातील आहे.
२. २ नोव्हेंबर २०१५च्या सायंकाळी ती कामावर जात असतांना एक ऑटोरिक्षा तिच्या जवळ येऊन थांबली. त्यानंतर या रिक्षातून तिघांनी तिला पळवून नेले आणि मऊआइमा येथे धर्मांधाच्या बहिणीकडे कोंडून ठेवले.

पाकमधील आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा ! - योगऋषी रामदेवबाबा

रामदेवबाबा यांच्या आवाहनानुसार
मोदी शासन आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करील का ?
     नवी देहली - आपल्या देशावर पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस पाकिस्तानने करू नये, याकरिता भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील सर्व आतंकवादी तळांवर आक्रमणे करून ते उद्ध्वस्त करावेत आणि पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन योगगुरु रामदेवबाबा यांनी केले आहे.
     देहली विद्यापिठात रामजन्मभूमी विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात योगगुरु रामदेवबाबा बोलत होते. या वेळी नुकत्याच घडलेल्या पठाणकोट आक्रमणाविषयी बोलतांना रामदेवबाबा म्हणाले, इट का जबाब पत्थर से देंगे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सांगत सुटले होते. त्याचीच मला आता मोदी यांना आठवण करून द्यावीशी वाटत आहे. भारताने आता आक्रमक भूमिका स्वीकारली पाहिजे. आपण केवळ संरक्षणात्मक पवित्रा घेण्यात सिद्ध राहिलो, तर लोकांचा शासनावरील विश्‍वास उडेल आणि संपूर्ण जगात हिंदुस्थानचे नाव खराब होईल. पाकिस्तानला आक्रमणाचे पुरावे सादर करून भारताने जगाला आपला कमकुवतपणा दाखवू नये. शांती आणि क्रांती कधीही एकाच वेळी चालत नाही. शांती निष्क्रियतेत नसून शौर्यामध्ये असते, असेही योगगुरु म्हणाले.

उत्तर कोरियाच्या सीमेवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या !

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे प्रकरण 
हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या शेजारील राष्ट्रे दहशतीच्या छायेत 
     वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचणीनंतर तणाव निर्माण झाला असतांनाच अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू बी-५२, एफ्-१६ आणि दक्षिण कोरियाच्या एफ्-१५ विमानांनी उत्तर कोरियाच्या सीमेजवळ अगदी अल्प उंचीवरून घिरट्या मारल्या.
१. उत्तर कोरियाच्या सीमेपासून १०० कि.मी. अंतरावरील ओसान हवाई तळावरून अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांच्या विमानांनी उड्डाणे केली होती.
२. या भागातील जनतेत विश्‍वासाची भावना निर्माण करणे आणि शक्तीप्रदर्शन करणे, हा त्यामागिल हेतू होता.
३. एशिया पॅसिफिक भागात अमेरिकेने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी बी-५२ ही विमाने फार पूर्वीपासूनच तैनात केली असून त्यांच्या जोडीला एफ्-१६ ही लढाऊ विमानेही तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाची एफ्-१५ विमानेही आहेत. शक्तीप्रदर्शन करून ही सर्व विमाने गुआम विमानतळावर सुरक्षित उतरली.

दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पिंपरी-चिंचवडसह पुणे पोलीस आयुक्तालय आघाडीवर

गुन्ह्यांचे वाढते प्रमाण म्हणजे राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे द्योतक !
महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ अहवाल
     पिंपरी (पुणे) - राज्यात प्रतिदिन सरासरी १ सहस्र ६९, तर मासाला ३२ सहस्र ६८ गुन्हे घडत असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या महाराष्ट्र्रातील गुन्हे २०१४ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील गुन्हेगारीच्या या अहवालात अनेक गंभीर गुन्ह्यांत पुण्याचा सहभाग मोठा आहे. त्यात दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराचा समावेश असलेले पुणे पोलीस आयुक्तालय आघाडीवर आहे. तसेच खून आणि घरफोडी या गुन्ह्यांत मुंबईनंतर पुणे दुसर्‍या स्थानी असून जबरी चोरी आणि फसवणूक यांंमध्ये राज्यात तिसर्‍या स्थानी आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामध्ये राज्यातील मोठ्या ९ शहरांत (पोलीस आयुक्तालय) गुन्ह्यांत पुणे दुसर्‍या स्थानावर आहे. अनैतिक व्यापारातही पुणे प्रथम क्रमांकावर आहे. (पुण्याचे नाव अनैतिकतेमध्ये पुढे येणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे का ? हे सर्व पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! - संपादक)

पुस्तक प्रदर्शनात एकाही वाचकाने सबनीसांचे पुस्तक न घेणे, हा विक्रम ! - प्रा. अनिल गोरे

     दायित्वाचे भान विसरून अयोग्य वेळी अयोग्य विषयावर अयोग्य भाष्य केल्यामुळे जनमानसात प्रतिमा बिघडते, हे २०१६ मधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीसांनी दाखवून दिले आहे.
     मराठी भाषा संवर्धन समितीने ६ ते १२ जानेवारी या काळात भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनात ४२ गाळ्यांवर पुस्तक विक्री चालू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांत प्रदर्शनाला भेट देणार्‍या एकाही वाचकाने किंवा ग्राहकाने श्रीपाल सबनीसांचे कोणतेही पुस्तक विकत घेतले नाही, तसेच त्यांचे एखादे पुस्तक विकायला आहे, याचीही साधी चौकशी कोणी केली नाही. मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात हा एक विक्रम ठरेल, असे मला वाटते.
- प्रा. अनिल गोरे (मराठीकाका), पुणे (मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत प्राध्यापक)

डॉ. सबनीस यांना धमक्या देणार्‍यांच्या निषेधाचा ठराव संमेलनात करणार - डॉ. माधवी वैद्य

शिखांचे हत्याकांड, विस्थापित काश्मिरी हिंदू यांच्यासंदर्भात कधी असे ठराव केले आहे का ?
पिंपरी (पुणे) येथे होणारे आगामी ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
     पुणे - आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला मत प्रकट करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे डॉ. सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याविषयी त्यांना जिवे मारण्याची भाषा करणे, हा प्रकार अयोग्य आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याला वैचारिक पातळीवर विरोध केला गेला पाहिजे. अशा वेळी विचारस्वातंत्र्यावर गदा आणणे चुकीचे आहे. महामंडळ अशा धमक्यांचा निषेध करते. आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याशी मराठी साहित्य महामंडळ सहमत नाही; परंतु त्यांना ज्यांच्याकडून धमक्या आल्या आहेत, त्यांच्या निषेधाचा ठराव संमेलनात आणण्याचा प्रस्ताव आहे, असे मराठी साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. (साहित्य महामंडळाची ही भूमिका दुट्टपी नाही का ? असे जर आहे, तर सबनीस यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठरावही करायला हवा. तसे करण्याचे धाडस महामंडळ करेल का ? - संपादक)

(म्हणे) संजीव पुनाळेकर यांनी सनातन धर्म हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे ! - श्रीपाल सबनीस

श्रीपाल सबनीस यांचा समाजवाद्यांसह पुण्यात सकाळच्या वेळी मोर्चा (कथित मॉर्निंग वॉक) !
श्रीपाल सबनीस यांची हास्यास्पद कृती !
     पुणे - संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांनी मला मारण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. (अधिवक्ता पुनाळेकर यांनी जरा मॉर्निंग वॉकला जात चला सबनीस, असे ट्विट केले होते. या ट्विटविषयी आपली प्रतिक्रया व्यक्त करतांना अधिवक्ता पुनाळेकर मालवणी भाषेत पोटात बद्धोकोष्ठता असेल, तर सकाळी फिरून या, अशी म्हणण्याची पद्धत आहे. माझ्या ट्विटचा असा साधा अर्थ आहे, असा खुलासाही केला होता. असे असतांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करणे, ही असहिष्णुता नव्हे का ? - संपादक) घटनेतील व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन लिहिणार्‍यांना गोळ्या घालण्याची भाषा करणे म्हणजे विवेकाला गोळ्या घालण्यासारखे आहे. याचा शासनासह समाजानेही विचार करावा. कोणताही धर्म हिंसेचे समर्थन करीत नाही. पुनाळकरांच्या पूर्वजांनी कुणाला मारलेले नाही.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोटप्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

राज्यात मुंबई आणि पुणे येथे सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद

सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्यशासन आणि पोलीस तातडीने कोणत्या उपाययोजना
 करणार आहेत ? सायबर चाच्यांकडून दिले जाणारे हे आव्हान पोलीस प्रशासन कसे पेलणार ?
सायबर गुन्ह्यांत १८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक आरोपी अटकेत
     पुणे - राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१४ या अहवालात सायबर गुन्ह्यांच्या दिलेल्या माहितीत माहिती तंत्रज्ञान कायदा (१ सहस्र ३४७ गुन्हे) आणि भारतीय दंड संहिता (५११ गुन्हे) यांच्या कलमानुसार राज्यात १ सहस्र ८५८ गुन्हे प्रविष्ट केले आहेत. यामध्ये ९४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात सायबरचे सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरामध्ये ६०८, तर पुणे शहरात १४० नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०१३ मध्ये ९०७ गुन्हे प्रविष्ट होऊन ५४३ आरोपींना अटक करण्यात आली होती.

तंबाखू अथवा तत्सम पदार्थ खाणार्‍या शिक्षकांना बडतर्फ करण्यात येणार

शिक्षण विभागाने यासमवेत वासनांध शिक्षकांविषयीचे धोरणही ठरवावे, ही अपेक्षा !
     संभाजीनगर - शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी २०१६ या दिवशी शिक्षण उपसंचालक कार्यालयास तंबाखू अथवा तत्सम पदार्थ खाणार्‍या शिक्षकांना बडतर्फ करण्याविषयीचे एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक विभागाच्या जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा येथे कार्यरत शिक्षकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे येथील ओरिएंटल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम या स्वयंसेवी संस्थेने शिक्षण संचालकांकडे यासंबंधी तक्रार केली होती. (विद्यार्थ्यांच्या हितासाठी व्यसनी शिक्षकांविषयी तक्रार करणार्‍या ओरिएंटल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम या संस्थेचे अभिनंदन ! - संपादक)

मुंबईतील नवीन स्थानकाला श्रीराम मंदिर रोड नाव देण्याची मागणी

आंदोलन करतांना हिंदुत्ववादी
       मुंबई - जोगेश्‍वरी ते गोरेगाव यामध्ये सिद्ध करण्यात आलेल्या नवीन स्थानकाला ओशिवराऐवजी त्या ठिकाणी २५० वर्षांपूर्वी पासून असलेल्या श्रीराम मंदिरावरून श्रीराम मंदिर रोड हे नाव देण्यात यावे यासाठी गोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले. वीरसेनेच्या वतीने श्रीराम फाटक, श्री राम मंदिर रोड, गोरेगाव (प.) या ठिकाणी हे आंदोलन झाले.
      नवीन सिद्ध करण्यात आलेल्या स्थानकापासून ओशिवरा नावाचा नाला लांब असूनही स्थानकाला त्याचे नाव दिले जाणे आणि सर्व परिसर श्रीराम मंदिर म्हणून प्रसिद्ध असतांना ते डावलले जाणे हे संतापजनक आहे, हा संदेश आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला.

सर्वधर्मसमभाववाल्यांनी पठाणकोटवर आक्रमण करणारे कोण आहेत, याचे उत्तर द्यावे ! - राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा 
 १. धर्मजागृती सभेत डावीकडून ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर,
पू. नंदकुमार जाधव आणि श्री. सुनील घनवट
 २. धर्मजागृती सभेला उपस्थित जनसमुदाय

     नंदुरबार - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात मुसलमान अधिकारी असल्याचे खोटे दाखले मांडून सर्वधर्मसमभावाचे गुणगान गाणार्या आणि ब्राह्मणद्वेष पसरवणार्याे संघटनांना माझा प्रश्नम आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढावे लागले ते कोण होते, धर्मवीर संभाजी महाराजांना क्रूरपणे मारणारा कोण होता, भारतात आतंकवाद करणारे कोण आहेत, श्रीराम मंदिराऐवजी बाबरीचे समर्थन करणारे कोण आहेत, पठाणकोटवर आक्रमणे करणारे कोण आहेत, याचे उत्तर शोधले, तर सर्व लक्षात येईल, असे उद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर यांनी येथे काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्यारामील कंपाऊंड येथे १० जानेवारी २०१६ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केलेल्या या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. 

भगूरमध्ये २६ फेब्रुवारीला सावरकर साहित्य संमेलन

     नाशिक - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणास यंदा पन्नास वर्षे होत असल्याचे औचित्य साधून २६ फेब्रुवारीला त्यांच्या भगूर या जन्मगावी राज्यस्तरीय सावरकर साहित्य संमेलन होणार आहे. ठाणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि संभाजीनगरचे सावरकरप्रेमी मित्रमंडळ यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. श्री. चंद्रकांत शहासने या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यातील मुंबई आणि पुणे ही शहरे असुरक्षित

एकेकाळी निवृत्तांचे (पेन्शनरांचे) शहर असा नावलौकिक असलेल्या
 पुण्याचे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी असुरक्षित असे नाव होणे, हे लज्जास्पद आहे !
     पुणे - ज्येष्ठ नागरिकांची त्यांची मुले आणि नातेवाईक यांनी काळजी आणि संरक्षण करणे आवश्यक आहे, पण सध्या एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटे रहावे लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यात वर्ष २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधात ३ सहस्र ९८१ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सर्वाधिक गुन्हे हे मुंबईमध्ये ९४४, तर पुणे शहर येथे २६७ आणि वर्ध्यामध्ये १७२ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. ही आकडेवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१४ या अहवालात सविस्तर दिली आहे.

२६ जानेवारीला भूमाता ब्रिगेडचा धर्मद्रोह रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची 'चला शनिशिंगणापूर'ची हाक !

पत्रकार परिषदेद्वारे मोहिमेविषयी माहिती 
पत्रकार परिषदेत डावीकडून सौ. निवेदिता जोशी, पू. नंदकुमार जाधव,
श्री. सुनील घनवट, कु. प्रतिक्षा कोरगावकर, श्री. दिलीप ढाकणे-पाटील

     नंदुरबार - शनिशिंगणापूरच्या चौथर्या वर आंदोलन करण्याच्या माध्यमातून तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना धर्मविरोधी कृती करून धर्मप्रथा, रुढी, नियम यांवर आघात करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. म्हणून हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने 'हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ', या अभियानाचा आरंभ करत आहोत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ११ जानेवारी या दिवशी येथे पत्रकार परिषदेत देऊन चला शनिशिंगणापूरची हाक दिली!
     या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, "श्री शनिशिंगणापूरच्या चौथर्यातवर महिलांना प्रवेश देण्यासाठी आंदोलनाचा दिखावा करणारे धर्मद्रोही एरव्ही किती वेळा मंदिरात श्रद्धेने जातात ? त्यांची मुसलमान महिलांवर असलेली बुरख्याची सक्ती, मशिदीमध्ये प्रवेशबंदी, तीन वेळा 'तलाक' म्हणून बायकोला सोडून देण्याची प्रथा, मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या आतील भागात मुसलमान महिलांना प्रवेशबंदी याविषयी ते गप्प का ? महिलांवर अन्याय, महिलांना समान अधिकार, महिला सक्षमीकरण याविषयी टाहो फोडणार्यांयची नेमकी अशा विषयांवर मिठाची गुळणी का असते ? हाच का त्यांचा सर्वधर्मसमभाव ? धर्माच्या दृष्टीने हे वर्तन अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारांमुळे शनिभक्तांच्या आणि लक्षावधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. तरी पोलीस प्रशासनाने शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी या दिवशी धार्मिक प्रथा मोडण्याचा भूमाता ब्रिगेडचा कार्यक्रम रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून करत आहोत, असेही ते या वेळी म्हणाले. 

साहित्य संमेलन विनाअध्यक्ष घ्यावे ! - विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास ब्राह्मणी 
संमेलन म्हणून हिणवणार्‍या विद्रोह्यांचे फुकाचे सल्ले !
      पुणे - पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रसिद्धीपिसाट आहेत. त्यांनी अनेक परस्परविरोधी विधाने केली आहेत. त्यांचे साहित्य क्षेत्रात विशेष योगदान नाही. त्यामुळे पिंपरी येथे होणारे साहित्य संमेलन विनाअध्यक्ष घ्यावे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने करण्यात आली. १० जानेवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी यांनी सबनीस यांना विरोध दर्शवला.

राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्याचा विषय प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार ! - नायब तहसीलदार शिवाजी गवळी


नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     कागल (जिल्हा कोल्हापूर), ११ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी येथील नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले. या वेळी श्री. गवळी यांना ध्वनीचित्रचकती दाखवून प्रजासत्ताक दिनादिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर श्री. माळी यांनी हेे निवेदन आणि ध्वनीचित्रचकती गटशिक्षणाधिकारी अन् तालुका शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल. तसेच शालेय केंद्राच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचवला जाईल, असे आश्वाासन दिले. 

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी ५ जेसीबी जाळले !

नक्षलवादग्रस्त भारत !
     गया (बिहार) - येथे नक्षलवाद्यांनी बॉम्बफेक आणि गोळीबार करत मोठे आक्रमण केले. डुमरिया-पाटणा राज्य महामार्गावर कामासाठी असलेले ५ जेसीबीही नक्षलवाद्यांनी जाळले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या या आक्रमणात महामार्गावर काम करणार्‍या मजुरांनाही मारहाण करण्यात आली. या आक्रमणाच्या वेळी एका चिठ्ठीद्वारे नक्षलवाद्यांनी महामार्गावर काम करत असणार्‍या के.आय.पी.एल्. या आस्थापनाकडे पैशांची मागणी केली. यापूर्वीही अशा प्रकारे या आस्थापनाकडे पैशांची मागणी केली होती; पण ते देण्यास आस्थापनाने नकार दिल्याने नक्षलवाद्यांनी हे आक्रमण केले.

फलक प्रसिद्धीकरता

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राममंदिर होऊ न देण्यासाठी हा भारत आहे कि पाक ?
     उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे शासन आहे. तुमच्यात धैर्य असेल, तर वर्ष २०१६ संपेपर्यंत तुम्ही अयोध्येत राममंदिर बनवून दाखवा, असे उघड आव्हान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी हिंदूंना दिले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 2016 tak Rammandir banake dikhao : Samajwadi partike neta Abu Ajamika Hindonko khula avhan.
kya ab Hinduonke sath yah asahishnuta nahi ?
जागो !
: २०१६ तक राममंदिर बनाके दिखाओ : समाजवादी पार्टीके नेता अबू आजमीका हिंदूआेंको खुला आव्हान - क्या अब हिंदुआें के साथ यह असहिष्णुता नही ?

पुणे आणि मुंबई यांसह काही ठिकाणी 'सेमी इंग्रजी' शाळांसाठी पात्र शिक्षकांचीही वानवा

शिक्षण विभागाचा पाट्याटाकू कारभार ! 
     पुणे, ११ जानेवारी - इयत्ता १ लीपासून चालू करण्यात येत असलेल्या 'सेमी इंग्रजी' शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नसल्याचे चित्र आहे. शिवाय नियमाला हरताळ फासून शिक्षक नसतांनाही शाळांना अनुज्ञप्ती (परवानगी) दिली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि मराठी माध्यम यांच्या अनेक शाळा 'सेमी इंग्रजी' करण्यात आल्या; परंतु शाळेचे माध्यम पालटतांना विद्यार्थ्यांना नव्या माध्यमातून शिक्षण देता येण्याइतक्या शाळा सक्षम आहेत का, याचा विचार अनुज्ञप्ती देतांना झाल्याचे दिसत नाही. धाराशिव, नगर, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणच्या शाळांच्या संख्येएवढेही इंग्रजी माध्यमांतून शिक्षण घेतलेले शिक्षक नाहीत. (असे असेल, तर विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण कोणत्या गुणवत्तेचे असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) त्याचसमवेत पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या म्हणून चालू केलेल्या खाजगी शाळांमध्येही पात्रताधारक शिक्षक नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. (याविषयी शिक्षण विभागाने ठरवलेले नियम पाळण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार का ? आतापर्यंत देण्यात आलेल्या अनुज्ञप्त्यांची चौकशी करून शिक्षण विभाग कारवाई करेल का ? - संपादक) 

(म्हणे) 'आर्.एस्.एस्.मुक्त भारताची आवश्यकता आहे !'

हिंदुत्ववाद्यांनो, कोळसे-पाटील यांच्या 
वक्तव्याला  तोंड देण्यासाठी तुम्ही काय सिद्धता केली आहे ? 
बी.जी. कोळसे-पाटील यांचा संघद्वेष ! 
     सोलापूर - आज आर्.एस्.एस्.मुक्त भारताची आवश्यकता आहे. त्यांना देशात नेहमी अराजकता पाहिजे. (संघाला अराजकता हवी असती, तर बी.जी. कोळसे-पाटील यांनी असे बोलण्याचे धाडस कधी केले असते का ? धर्मांधांकडून दंगली, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आदींच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात असतांना, राष्ट्र-धर्मप्रेमी संघटनांवर अराजकता पसरवण्याचे आरोप करणार्यांतच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! - संपादक) सर्वधर्मियांचे मूळ एकच असतांना भेदभाव कशाला ? धर्माच्या नावाखाली धर्मगुरूची दुकानदारी चालू आहे. (अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंविषयी कोळसे-पाटील यांनी असा एकेरी उल्लेख केले असते का ? - संपादक) मुठभर लोकांना संविधान उद्ध्वस्त करून देशात मनुस्मृतीचे राज्य आणावयाचे आहे. (कोळसे-पाटील अशी विधाने करूनच संविधानाची पायमल्ली करत राष्ट्रप्रेमी संघटनांवर धादांत खोटे आरोप करत आहेत ! - संपादक) या लोकांना धडा शिकवण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र आले पाहिजे. (अशी चिथावणीखोर भाषा वापरून कोळसे-पाटील हेच असहिष्णुता आणि अराजक पसरवत आहेत, असे कोणी म्हटल्यास चूक ते काय ? - संपादक) हिंदु-मुसलमान समाजामध्ये दंगली घडवून ब्राह्मणवादी सत्तेची बीजे पेरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना कार्यरत आहे. देशात संघामुळे दंगली घडत आहेत. (आझाद मैदान दंगल, मालदा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथील दंगल ही काय संघाने केली आहे का ? - संपादक) या वेळी हुतात्मा स्मृती मंदिरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (हिंदुत्ववाद्यांवर नाना प्रकारची बंधने लादणार्याप पोलिसांनी कोळसे-पाटील यांना अशी वक्तव्ये करत असतांना का थांबवले नाही ? - संपादक)

सुधारकी (पुरोगामी), ख्रिस्ती मिशनरी आणि थिऑसॉफिस्ट यांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने...
स्वामी विवेकानंद
      हा लेख म्हणजे १८९७ या वर्षी चेन्नई येथील व्हिक्टोरिया सभागृहात माझ्या मोहिमेची योजना (My plan of campaign) या विषयावर स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या व्याख्यानाचा संपादित भाग आहे. या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी धर्मविध्वंसक सुधारकांवर कडव्या भाषेत टीका केली होती. सुधारकी (पुरोगामी), ख्रिस्ती मिशनरी आणि थिऑसॉफिस्ट (अध्यात्मविद्या प्रचारक) यांनी हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या स्वामी विवेकानंदांचा कसा छळ केला, याचे दाखले आहेत. आज सनातन संस्थेला पुरो(अधो)गाम्यांचा जसा विरोध होत आहे, तसाच विरोध स्वामी विवेकानंदांनाही झाला होता. या पार्श्‍वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे विचार आजही सुधारकी प्रवृत्तीच्या पुरोगाम्यांना अंतर्मुख करणारे आहेत. स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांतून पुरोगाम्यांच्या धर्मद्रोही वृत्तीचे दर्शन लोकांना व्हावे, हाच हे व्याख्यान संपादित स्वरूपात प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे. 

साहित्य संमेलनाध्यक्षपदाला लागली उतरती कळा !

श्री. नित्यानंद भिसे
      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता कधीच सुटणार नाही, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अर्थात संमेलनाला वाद तेव्हापासून चिकटले, जेव्हापासून संमेलन राजकारण्यांच्या वळचणीला जाऊन बसू लागले. त्यापूर्वीच्या संमेलनांवर असा आरोप थेट करता येणार नाही; कारण करारी वृत्तीच्या साहित्यिका दुर्गा भागवत यांनी संमेलनाध्यक्ष पदावर असतांना त्या वेळी यशवंतराव चव्हाणांना व्यासपिठाच्या खाली बसवले होते. त्यानंतरच्या काळापासून खरे तर संमेलन राजकारण्यांच्या वळचणीला येऊन बसू लागले. मागील दीड-दोन दशकांपासून संमेलनाच्या आधी आणि संमेलनात याचमुळे वाद-विवाद होऊ लागले आहेत. आता तर संमेलनाच्या व्यासपिठावर साहित्यिक अल्प आणि राजकारणी अधिक दिसू लागतात. शासनाच्या २५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी त्या त्या काळातील मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान सांभाळण्यात संमेलनाची हयात पुढे पुढे सरकत आहे. जशी साहित्य संमेलनांची रया निघून जाऊ लागली आहे, तशी त्या लायकीचे अध्यक्षही या संमेलनाला लाभत आहेत.

कायदा पालटणार का ?

     नुकतीच अनेकांनी ३१ डिसेंबरची रात्र ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी मद्य पिऊन रात्र जागवली आणि वाहन चालवले. या दिवशी राज्यातील पोलिसांनी १ सहस्र ९०० हून अधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. त्यातील शेकडो जणांवर पोलिसांनी गुन्हेही प्रविष्ट केले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, ही हल्लीच्या काळात रूढ झालेली प्रथा आहे. काही जण ख्रिस्ती नववर्ष म्हणून, काही जण मेजवानीसाठी, तर काही जण वाढदिवस अथवा विवाह झाल्यानंतरचे सेलिब्रेशन केल्यानंतर मद्यपान करून भरधाव वेगाने गाड्या चालवतात. यामध्ये बहुतांश वेळेला पैसेवाले किंवा उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश हा अधिक प्रमाणात आढळतो. मद्यपान केलेले वाहनचालक मग तो पुरुष असो वा स्त्री असो, हे त्या नशेत नेहमीच धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असतात. अशा वाहन चालवण्यामुळेच अपघात होतात आणि त्यात अनेक जण स्वतः मृत्यू पावतात अथवा अनेकांचे जीव घेतात. त्यालाच सध्या हिट आणि रनची प्रकरणे म्हणतात.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भारतातील हवाई दलाच्या तळावरील आक्रमण ३ दिवस परतवू न शकणारे लष्कर कधी पाकमध्ये जाऊन आक्रमण करू शकेल का ? आतंकवाद्यांनी हेच आक्रमण नागरी वस्तीवर केले असते, तर एव्हाना सहस्रो हिंदू ठार झाले असते ! आता देशाच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना, केवळ एकच मार्ग आहे !

      पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जिहादी आतंकवादी आणि सैनिक यांच्यात सलग दुसर्‍या दिवशीही (३ जानेवारीला) चकमक चालूच होती. जिहादी आतंकवाद्यांनी २ जानेवारी २०१६ला आक्रमण केल्यानंतर सैनिकांनी त्या दिवशी सायंकाळपर्यंत ४ आतंकवाद्यांचा खात्मा केला. सर्व आतंकवादी मारले गेले आहेत, असे वाटत असतांनाच ३ जानेवारीला सकाळपासून आतंकवाद्यांनी पुन्हा गोळीबार चालू केला. अद्यापही २ आतंकवादी एअरफोर्स स्टेशनमध्ये दडून बसल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिली.

योगप्रशिक्षणाबरोबर स्वसंरक्षण प्रशिक्षणही देणे अत्यावश्यक असल्याचे शासनाला कळत कसे नाही ?

     इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही योग प्रशिक्षण देण्याची सिद्धता शासनाने चालू केली आहे. त्यानुसार खेळाच्या तासिकांना योग शिकवला जाणार आहे. त्याविषयीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. - श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री अहिंदूंच्या मेळाव्याला ५० सहस्र उपस्थिती असते, तर बहुतेक ठिकाणच्या हिंदु मेळाव्यांना २-३ सहस्र उपस्थिती असते !

     ३ जानेवारी २०१६ या दिवशी कोल्हापूर येथील शेंडापार्क मैदानात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, भारत मुक्ती मोर्चा, कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स् ऑफ इंडिया, विश्‍व लिंगायत महासभा आणि बुद्धीस्ट इंटरनॅशनल सेंटर यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देशभरात पोहोचावा, यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सरसचिव मौलाना वली रहमानी यांच्या अध्यक्षतेखाली घटना वाचवा, देश वाचवा या अभियानाच्या अंतर्गत एकदिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून ५० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते.
     ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा डिसेंबर २०१५ मधील आढावा

१. दत्तजयंतीनिमित्त मल्याळम् 
भाषेतील चलत्चित्रांच्या माध्यमातून प्रसार
     दत्ताच्या संदर्भातील ४ चलत्चित्रे (दत्ताच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताची उपासना करण्याची पद्धत इत्यादी) मल्याळम् भाषेत सिद्ध करण्यात आली आहेत. त्यांचा प्रसार व्हॉट्स-अ‍ॅप आणि फेसबूक यांच्या माध्यमातून केला. अनेक जणांनी ती पुढे शेअर केली. ही चलत्चित्रे चांगली असल्याचे अभिप्राय अनेक जणांनी दिले.
१ अ. दत्ताच्या नामजपाच्या संदर्भात धर्माभिमान्याला आलेली अनुभूती : श्री. गणेश नावाच्या एका धर्माभिमान्याने सांगितले, ही चलत्चित्रे चांगली आहेत. मी अनेक जणांना ती पाठवली आहेत. मी दत्तगुरूंसंबंधी एका पुस्तकाचे प्रकाशन करणार होतो; पण त्यात अडथळे येत होते. शेवटी त्या पुस्तकावर दत्तगुरूंचे नाव लिहिल्यावर ते अडथळे सुटले. मला ही अनुभूती आली आणि त्याच दिवशी तुमची चलत्चित्रेही मिळाली. अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) - निष्काम मातृसेवेचा आदर्श !

प.पू. दास महाराज
११ जानेवारीला झालेल्या वै. इंदिरा 
डेगवेकर यांच्या मासिक श्राद्धाच्या निमित्ताने...
      जिवाला जन्म मिळाला की, त्यासमवेत त्याचे कर्मही आलेच. हे कर्म काही टाळता येत नाही आणि कर्माच्या मागून त्याचे फळ येतेच. मग जन्म-मरणाचा फेरा चुकवावा तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?, याची उत्तरे भगवंताने द्वापरयुगात श्रीकृष्ण अवताराच्या वेळीच देऊन ठेवली आहेत. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग यासाठीच आहे. सर्व जण याचा अभ्यास करतात; मात्र त्यांच्याकडून तशी कृती घडत नाही. निष्काम कर्मयोग कसा साध्य करायचा ?, याचा आदर्श पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी स्वतःच्या कृतीतून साधकांसमोर ठेवला आहे. तो प.पू. गुरुदेवांच्या चरणी निवेदन करत आहे. 

चैतन्याच्या स्रोताने मायेचे आवरण कसे निघते ?

प.पू. परशराम पांडे
१. नदीला आलेल्या पुराने जशी घाण 
वाहून जाते, त्याप्रमाणे साधनेद्वारे चैतन्याच्या 
स्रोताने रज-तमाचे आवरण निघून जाणे
     जेव्हा पावसाळ्यात नदीला पूर येतो, त्या वेळी तो नदीत असलेली घाण वाहून नेतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने गुरुकृपेद्वारे साधक साधना करत राहिल्यास त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आलेले रज-तमाचे आवरण भगवंताच्या चैतन्याद्वारे निघून जाते आणि त्याचे अंतःकरण शुद्ध होते.
२. दानामुळे आवरण घटणे
     दानामुळे मोठ्या प्रमाणात त्याग होत असतो. त्यामुळेही आपल्यावरील काळ्या शक्तीचे आवरण उणावते. आनंदप्राप्तीसाठी आत्मीयतेने दान करणे, म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधनेद्वारे प्रीतीपूर्वक सेवा करणे. हे खरे सर्वांत मोठे दान आहे.

बालपणापासूनच देवाची ओढ असलेली चेन्नई येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. श्रेया राहुल मराठे (वय साडेतीन वर्षे) !

चि. श्रेया मराठे
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणात कुठलाच त्रास न होणे : मला बाळ होणार, हे समजल्यापासूनच घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही झाले. माझे संपूर्ण नऊ मास आनंदात गेले. त्या काळात मला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही.
१ आ. मुलगी होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे : मला स्वप्नात सतत खेळत असलेली एक मुलगी दिसायची; पण ती मला कधीही रडतांना किंवा चिडचीड करतांना दिसली नाही. तिचा तोंडवळा सतत हसतमुखच असायचा. त्यावरून देवाने मला मुलगी होणार, याची निश्‍चिती आधीच करवून दिली होती.
१ इ. चेन्नईहून पू. बाबांच्या (माझे सासरे सनातनचे संत पू. रत्नाकर मराठे यांच्या) अंत्यदर्शनासाठी अमरावतीला जातांना काहीही त्रास न होणे : गर्भधारणेनंतर सातव्या मासात पू. बाबांना देवाज्ञा झाली. तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी चेन्नईहून अमरावतीला जाणे प्रत्यक्षात कठीण होते; परंतु श्रेया (बाळ) गर्भात असतांनाही आम्ही तेथे सुखरूप जाऊ शकलो. त्या वेळी पू. बाबांचा आशीर्वाद श्रेयाला मिळाला आहे, याची आम्हाला निश्‍चिती झाली.

पू. मिलुटीन पांक्रात्स यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे अमेरिका येथील साधक श्री. मॅथ्यू फोफी यांना आलेली अनुभूती

पू. मिलुटीन पांक्रात्स
१. सन्मानाच्या वेळी सूक्ष्मातून 
प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
     ३.१.२०१५ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे युरोप येथील साधक श्री. मिलुटीन पांक्रात्स यांनी संतपद प्राप्त केल्याप्रीत्यर्थ त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा सन्मान होत असतांना मला गुरुतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले असून ते (गुरुतत्त्व) पू. मिलुटीनदादांभोवती असलेल्या वलयात जात आहे, असे जाणवले. गुरुतत्त्वाचा रंग गुलाबी होता.
    पू. मिलुटीनदादा आसंदीत बसले होते, तेव्हा त्यांचा तोंडवळा मला एखाद्या ब्राह्मणाप्रमाणे वाटला. ते आसंदीत बसले असूनही त्या ठिकाणी मला त्यांच्या स्थुलदेहाचे अस्तित्व जाणवत नव्हते.

ज्योतिषशास्त्र थोतांड आहे, असे म्हणणार्‍यांना चपराक देणारा आणि ज्योतिषशास्त्राचे श्रेष्ठत्व दर्शवणारा अनुभव !

     कृष्णाने (वयाच्या २५ व्या वर्षी योगसामर्थ्याने अग्निसमाधी घेणारे थोर योगी श्री कृष्णा महाराज यांनी) अग्निसमाधी घेणे, ही त्या काळातील अतर्क्य अशी घटना होती. लोक तिला आत्महत्याच मानत होते. माझ्या मनातही शंका होत्या. त्यातच माझ्या एका मित्राने मला सांगितले, गावात एक गुरुजी आहेत आणि त्यांच्याकडे संतांच्या कुंडल्या आहेत. मी कृष्णाचा जन्मदिनांक, नाव, जन्मस्थळ ही माहिती घेऊन सकाळच्या वेळी मयुरेगुरुजींकडे संभाजीनगरला सिडकोमध्ये गेलो. त्यांच्याकडे बरीच गर्दी होती. माझा क्रमांक आल्यावर मी त्यांना सांगितले, हा आमचा मुलगा कामधंदा करत नाही. त्याचे योग सांगा. गुरुजींनी त्रोटक कुंडली मांडली आणि माझ्याकडे आश्‍चर्याने पहात मला म्हणाले, हा मुलगा तर जिवंत नाही. मी तात्काळ मयुरेगुरुजींचे पाय धरले. मी त्यांची क्षमा मागितली आणि सांगितले, मी तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमची परीक्षा पाहिली. हा माझा पुतण्या कृष्णा ! त्यावर ते त्वरित म्हणाले, तुम्ही बाबा भांड का ? मयुरेगुरुजी हसले आणि म्हणाले, बरे झाले तुम्ही आलात. बघूया तुमचे आमचे काय जुळते ते !

कसोटी क्रिकेटची आणि लष्कराची सुरक्षाविषयीच्या वृत्ताला कवडीमोल ठरवणारी आणि क्रिकेटसारख्या खेळाला महत्त्व देणारी राष्ट्रद्रोही प्रसारमाध्यमे !

श्री. प्रशांत जुवेकर
     क्रिकेटच्या सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाल्यानंतर झहीर खेळणार कि नाही ? सचिनचे १०० वे शतक होणार कि नाही ?, अशी वृत्ते हाच कोट्यवधी भारतियांच्या कुतुहलाचा विषय बनला आणि त्यावर वर्तमानपत्रांमधील पानेच्या पाने भरून आलेली वृत्ते वाचायला मिळाली. अशा प्रकारची वृत्ते छापणार्‍या त्याच प्रसारमाध्यमांनी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या सुरक्षाविषयक वृत्ताला मात्र कवडीमोल ठरवले. पाक सैन्याने आपल्या हुतात्मा झालेल्या दोन जवानांचे शीर तोडून नेणे, ही घटना खरेतर मानवाधिकाराला अत्यंत लांच्छनास्पद आहे; पण आमच्या प्रसारमाध्यमांना तिकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे ? तिसरा कसोटी सामना चालू झालाच ना ? - श्री. प्रशांत जुवेकर (९.९.२०११)
    (मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने कारागृहात असतांना केलेले लिखाण - संकलक)

शिवपिंडीवर वाहिलेला बेल निर्माल्यात न टाकता तो पुन्हा विक्रीसाठी देणारे पुजारी !

      एका शहरातील एका शिवमंदिरातील पुजारी मंदिरात शिवपिंडीवर वाहिला जाणारा बेल निर्माल्यात न टाकता तो वेगळा ठेवतात आणि धुऊन स्वच्छ करून परत दुकानात विक्रीसाठी ठेवतात.- एक साधिका, नवीन पनवेल
     (इतरत्रच्या अयोग्य वर्तनापेक्षा देवळात केलेल्या अयोग्य वर्तनामुळे अधिक पाप लागते. हिंदु राष्ट्रात देवपूजा साधना म्हणून भावपूर्ण करणारे पुजारी असतील ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

सतत वर्तमानकाळात रहाण्यास शिकवणारे महर्षि !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. नाडीवाचनात सांगितलेल्या वेळेतच प्रवासाला निघणे, महर्षींना अपेक्षित असणे आणि यावर कोणताही प्रश्‍न न विचारता केवळ आदेशाचे पालन करणे एवढेच आमच्या हाती असल्याचे लक्षात येणे : बर्‍याच वेळा महर्षि आम्हाला दैवी प्रवास करत असतांना आता येथेच तुम्हाला थांबायचे आहे. पुढे कधी निघायचे, हे आम्ही तुम्हाला नंतर सांगू, असा आदेश देतात. आम्ही काही कालावधीनंतर त्यांना आता कधी निघायचे ?, असा प्रश्‍न केल्यास आता तुम्ही हे विचारणे उचित नाही. वेळ येईल, तेव्हा आम्ही सांगू. त्या वेळेची वाट पहा. परत कधी निघायचे ?, असा प्रश्‍न विचारू नये, असे सांगितले जाते. (पुढचे नियोजन करण्यास सोपे जाते, असा दृष्टीकोन ठेवून जर मधेच प्रश्‍न विचारला, तर ते महर्षींना आवडत नाही; कारण पुढच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रश्‍न विचारणे, म्हणजे भविष्यकाळाचा विचार करणे असल्याने ते महर्षींना आवडत नाही, हे आम्हाला काही कालावधीनंतर कळू लागले; म्हणून जोपर्यंत पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा भ्रमणभाष येत नाही, तोपर्यंत आपली सेवा करत रहाणे, हेच आम्ही यातून शिकलो आणि कसे रहायचे, हेही यातून शिकायला मिळाले. - (पू.) सौ. गाडगीळ)

संत, गुरु आणि ऋषि शिकवत असलेली साधना अन् सनातन सांगत असलेली साधना

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. संत आणि गुरु
     हे शिष्याला व्यष्टी साधना शिकवतात. हे शिकवणे स्थळ आणि काळ यांच्या मर्यादेतील असते.
२. ऋषि
    ऋषि शिष्याला विश्‍वाच्या संदर्भातील समष्टी साधना शिकवतात. या शिकवण्याला स्थळ आणि काळ यांची मर्यादा नसते.
३. सनातन संस्था
     सनातन संस्था व्यष्टी आणि पृथ्वीच्या संदर्भातील समष्टी अशा दोन्ही साधना शिकवते. या शिकवण्याला स्थळ आणि काळ यांची थोडीशी कमी मर्यादा असते. तिला संत, गुरु आणि ऋषि या सर्वांचे मार्गदर्शन मिळते. ऋषि नाडीपट्ट्यांद्वारे सनातनच्या साधकांना मार्गदर्शन करत आहेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.११.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे अपूर्ण विज्ञान, तर कुठे परिपूर्ण अध्यात्म !
     विज्ञान अपूर्ण आहे. त्यामुळे त्यात सतत संशोधन करावे लागते. ते संशोधनही मायेतील असल्यामुळे तात्कालिक सुख देणारे असते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही; कारण ते चिरंतन आनंद देणारे परिपूर्ण शास्त्र आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.५.२०१५)

बोधचित्र

आतंकवाद्यांसमोर झुकणार्‍यांचे उदात्तीकरण थांबवा !

संपादकीय
     काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद हे पैगंबरवासी झाल्यानंतर त्यांचे गुणगान करण्यासाठी सर्वचजण पुढे सरसावले आहेत. कोणाला ते शांतीदूत वाटत आहेत, तर कोणाला राष्ट्रवादी मुसलमान नेता ! आपली हिंदु संस्कृती मरणान्ति वैराणी ।, अशी शिकवण देते. एखाद्या व्यक्तीविषयी मनात असलेला वैरभाव तिच्या मृत्यूनंतर काढून टाकावा, असा या शिकवणीमागील मतीतार्थ आहे. असे करतांना त्या व्यक्तीने केलेल्या पापांकडे दुर्लक्ष करा, असे कुठेही म्हटलेले नाही. ही गोष्ट समजून न घेतल्यामुळेच मरण पावलेली व्यक्ती, मग ती कितीही दुराचारी, समाजघातकी असो, त्याकडे दुर्लक्ष करून तिचे गुणगान केले जाते. ही व्यक्ती जर समाजकारणी अथवा राजकारणी असेल, तर विचारायची सोय नाही. हेच चित्र आता मुफ्ती महंमद सईद यांच्याबाबतीत दिसत आहे. सईद यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा करणे होय. त्यांचे गुणगान करणार्‍यांनी सईद यांना श्रद्धांजली वाहण्याच्या नादात आपल्याकडून इतिहासद्रोह होत नाही ना, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुफ्ती महंमद सईद भारतियांच्या लक्षात राहिले पाहिजेत; पण ते राष्ट्रवादी म्हणून नव्हे, तर राष्ट्रघातकी म्हणून ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn