Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राममंदिराच्या विषयावरील चर्चासत्राला काँग्रेस आणि डावे यांच्या विद्यार्थी संघटनांचा विरोध !

 • धर्मांधांनी मालडा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथे लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून हिंसाचार केला असतांना त्याविषयी मौन बाळगणारे हिंदुद्वेष्टे हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयीच्या चर्चासत्राला मात्र विरोध करतात, हे लक्षात घ्या !
 • राममंदिराच्या विषयावर चर्चासत्र घेतल्यावर काँग्रेस आणि डावे यांच्या पोटात का दुखते ? हिंदूंच्या कार्यक्रमात गोंधळ घालणे, हीच त्यांची सहिष्णुता आहे का ?
देहली विद्यापिठात चर्चासत्राचे आयोजन

नवी देहली - देहली विद्यापिठात 'राममंदिर' या विषयावर आयोजित चर्चासत्राला काँग्रेसप्रणित 'एन्.एस्.यू.आय.' ही विद्यार्थी संघटना, तसेच डाव्यांची विद्यार्थी संघटना यांनी कडाडून विरोध केला. विद्यार्थ्यांनी गोंधळ घालूनही तशातच या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांचे भाषण केले.

मेघालयात स्फोटात ७ जण घायाळ

आतंकवादग्रस्त भारत 
शिलाँग - येथील ईस्ट गारो हिल्स येथे ९ जानेवारीला झालेल्या एका स्फोटात ७ जण गंभीररित्या घायाळ झाले. गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या बंदी असलेल्या आतंकवादी संघटनेचा अजान मोमिन याच्या सांगण्यावरून हा स्फोट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

(म्हणे) 'बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नाही : बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र !'

धर्मांधांच्या हिंदुविरोधी हिंसेचे समर्थन करणार्‍या राज्यकर्त्यांच्या राजवटीत हिंदू कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ? हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
अडीच लाख मुसलमानांनी केलेल्या हिंसक आंदोलनाकडे ममता (बानो) बॅनर्जी यांची डोळेझाक !

कोलकाता - बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नसून काही पक्षांकडून बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे संतापजनक वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी येथे केले. हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सुमारे अडीच लाख मुसलमानांनी ३ जानेवारी या दिवशी मालडा येथे भररस्त्यात ६ घंटे हिंसक निषेधमोर्चा काढला होता. त्या वेळी त्यांनी एक पोलीस ठाणे जाळून टाकले होते. या प्रकरणी १० धर्मांधांना अटकही करण्यात आली आहे.
ममता (बानो) पुढे म्हणाल्या, बंगालमध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. केवळ विरोधक बंगालची हिंसक राज्य अशी प्रतिमा करू पहात आहेत. बंगाल एक शांततापूर्ण राज्य असून सर्व जण मिळून मिसळून काम करतात. राज्यात शांतता असेल, तरच काहीतरी मार्ग निघू शकतील, हे जाणत असल्यानेच माझे शासन धार्मिक हिंसाचाराला कधीही थारा देत नाही. जंगलमहाल येथेही शांततापूर्ण वातावरण आहे. जंगलमहाल हे माओवाद्यांचे सर्वांत मोठे केंद्र मानले जाते.

आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची आवश्यकता ! - श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद शासन संतांच्या आदेशाचे पालन करणार का ?

उज्जैन - पाकला प्रेमाची भाषा समजत नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सैन्याला मोकळीक द्यावी. आतंकवाद्यांना घरास घुसून मारण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी नुकतेच येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. या वेळी श्रीमहंत नरेंद्र महाराजांनी पठाणकोट आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना समस्त संत समाजाकडून श्रद्धांजली वाहिली गेली. ते पुढे म्हणाले, भारतीय सैनिक हे देशाचे खरे नायक आहेत. सैनिकांमुळेच आपण आपल्या घरांत सुखाची झोप घेऊ शकतो. काश्मीरमध्ये शून्य तपमानात जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना संत समाज सॅल्युट करतो. उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वानंतर संत ठिकठिकाणी जाऊन सैनिकांची भेट घेतील आणि त्यांचे मनोबल वाढवतील.

स्वयंसेवकांना संचलनाच्या वेळी हातात काठ्या धरण्यापासून रोखू शकत नाही - चेन्नई उच्च न्यायालय

चेन्नई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना खाकी पॅन्ट घालण्यापासून, तसेच संचलनाच्या वेळी वाद्य वाजवणे अन् हातात काठ्या धरणे यांपासून रोखू शकत नाही, असे मत चेन्नई उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. 
१. रा.स्व. संघाकडून १० जानेवारीला तमिळनाडूमधील इरोड येथे स्वामी रामानुजम्, स्वामी विवेकानंद आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
२. स्थानिक पोलिसांनी संघ स्वयंसेवकांना या कार्यक्रमात संघाचा पोषाख असलेली खाकी पॅन्ट न घालण्याची, तसेच संचलनाच्या वेळी वाद्ये न वाजवण्याची अट घातली. (पोलिसांचा हिंदुद्वेष ! - संपादक)
३. कारवाईची प्रात्यक्षिके करतांना वा प्रशिक्षणाच्या वेळी कनिष्ठ पोलीस कर्मचारी आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी असा पोषाख परिधान करत असल्याने स्वयंसेवकांनी हा पोषाख घालू नये, असे कारण पोलिसांनी पुढे केले.

गोवा पोलिसांकडून लिटल पोलीस संकल्पनेला प्रारंभ

संकल्पनेला इंग्रजी नाव देणारे स्वभाषाभिमानशून्य पोलीस खाते ! मातृभाषेतून कारभार केल्यास 
जनतेशी आपोआपच चांगले संबंध प्रस्थापित होतील, हेही पोलिसांच्या लक्षात येत नाही का ?
      पोलिसांचा गोवा राज्यातील जनतेशी असलेला संपर्क वाढावा, पोलीस व्यवस्थेविषयी असलेले भय दूर व्हावे, यासाठी पोलीस खात्याने लिटल(विद्यार्थी) पोलीस ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे.लिटल पोलीस हा उपक्रम सध्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार असून त्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन तेथील कार्यपद्धतीविषयी माहिती दिली जाणार आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुबहुल देशात राममंदिर विषयावरील चर्चासत्राला विरोध करण्यासाठी हा भारत आहे कि पाक ?
देहली विद्यापिठात राममंदिर या विषयावर आयोजित चर्चासत्राला काँग्रेस प्रणित 'एन्.एस्.यू.आय.'ही विद्यार्थी संघटना, तसेच डाव्यांची विद्यार्थी संघटना यांनी कडाडून विरोध केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dehali vishvavidyalayme Rammandir vishaypar ayojeet seminarko dhongi dharmanirpeksha chhatronka virodh ! 
Yaha seminar Bharatme nahi to kya Pakme hoga ?

जागो ! : देहली विश्‍वविद्यालय में राममंदिर विषयपर आयोजित सेमिनार को ढोंगी धर्मनिरपेक्ष छात्रोंका विरोध ! 
यह सेमिनार भारत में नही तो क्या पाक में होगा ?

भारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही रोखता आले नाही - जैश-ए-महंमदने भारताची खिल्ली उडवली

 • भारतीय सैन्याने अझरसह त्याच्या पिलावळीला त्वरित धडा शिकवून त्यांना भारताची शक्ती दाखवून द्यावी !
 • पठाणकोटवरील आक्रमणाचे प्रकरण
      इस्लामाबाद - भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट येथील सैन्याच्या हवाई तळावर आक्रमण करणार्‍या अवघ्या ६ आतंकवाद्यांना रोखता आले नाही, अशा संतापजनक शब्दांत जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याने भारताच्या सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवली. पठाणकोटवरील आक्रमण कशा पद्धतीने केले, याविषयीची एक चित्रफित त्याने संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. या चित्रफितीमध्ये आतंकवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सवर कसे आक्रमण केले, याचा तपशील नमूद केला आहे. मसूद अझहर म्हणाला, पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात ? भारताने पाकिस्तानला दिलेले पुरावे पाकने स्वीकारू नयेत. या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि फतेह सिंग हे अत्यंत वाईट पद्धतीने मारले गेले. भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ आहेत. भारताने पहिल्यांदा ६ आतंकवादी घुसले असल्याचे सांगितले. मग हा आकडा ५ वर आला आणि नंतर तर ४ आतंकवादी असल्याचे सांगितले. एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे. भारतशासन भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहे.

२६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे जाऊन धर्मद्रोही स्त्रियांना चौथर्‍यावर चढण्यापासून रोखावे !

टी.व्ही. ९ वरील चर्चासत्रात सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांचे आवाहन
श्री . अभय वर्तक
     मुंबई - २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे धर्मद्रोही स्त्रियांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यापासून अडवण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी त्या ठिकाणी पोहोचणे, ही भक्तीच आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ते ७ जानेवारी या दिवशी टी.व्ही. ९ या वाहिनीवरील खास बात चर्चासत्रातील वादाचा फेरा या कार्यक्रमात बोलत होते. श्री. वर्तक पुढे म्हणाले, २६ जानेवारीला शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यासाठी जाऊ इच्छिणार्‍या महिलांची खर्‍या अर्थाने दर्शन घेण्याची वगैरे इच्छा नाही, तर तो ढोंगीपणा आहे. या गावातील महिलांचे म्हणणे आहे, २६ जानेवारीला भूमाता ब्रिगेडला पाऊलही ठेवू दिले जाणार नाही. तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिलेले आहे. अशा परिस्थितीतीत शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे. हिंदुत्ववाद्यांच्या या मोहिमेला अनेक तरुण-तरुणींचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. या चर्चासत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आणि कांचन अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन निखिला म्हात्रे यांनी केले.

मालडा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथील घटना हे भारतीय सुरक्षायंत्रणेसमोरील आव्हान !

बाह्य जिहादी शक्ती आणि अंतर्गत देशद्रोही शक्ती यांच्या कचाट्यात सापडलाय देश !
धर्मांध आंदोलकांनी सीमा सुरक्षा
दलाची जाळलेली गाडी
      पठाणकोटमध्ये ४ दिवस ६ पाक आतंकवाद्यांनी घातलेले थैमान आणि बंगालमधील मालडा जिल्ह्यात अडीच लाख मुसलमानांनी काढलेल्या मोर्च्यात धर्मांधांनी घातलेला हैदोस ! मागील आठवड्याभरात देशात घडलेल्या मुख्यत्वे या २ घटनांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. बाह्य भारतविरोधी शक्ती तसेच अंतर्गत देशद्रोही शक्ती यांपासून देशाची सुरक्षितता अबाधित राखण्यास सुरक्षा यंत्रणांना पूर्णपणे अपयश आले आहे. पठाणकोट घटनेत केंद्रपातळीवर हालचाली चालू झाल्या असून त्याचे जलद गतीने अन्वेषण होईल; पण मालडा आणि त्यानंतर पूर्णिया (बिहार) येथे घडलेल्या घटनांची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. दोन्ही राज्यांत कथित निधर्मी म्हणजे अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुरवाळत सत्तेवर आलेले राज्यकर्ते असल्याने तशी चौकशी होईल कि नाही, हा ऐरणीवरचा प्रश्‍न आहे !

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास अन् त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सोलापुरात दाटीवाटीने गोवंश नेणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट

सोलापूर, ९ जानेवारी - कॅम्प शाळेजवळून टेम्पोमध्ये दाटीवाटीने ७ गोवंश घेवून जातांना त्यांची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता वाहतूक केली. या प्रकरणी शहनवाज नौशाद मणेरी, धनाजी भाऊसाहेब जानकर यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ठ करण्यात आला आहे. पोलीस शिपाई संजय चौधरी यांनी याविषयी तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करत आहेत.

आंतरजातीय विवाहावरून पंढरपूर येथे भरचौकात युवकाची हत्या

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ जानेवारी - आंतरजातीय विवाह केला म्हणून ६ जानेवारीच्या रात्री ८ वाजता १२ ते १३ जणांनी सोमनाथ बाळकृष्ण टाकणे या युवकाची भरचौकात सत्तूरने डोक्यात वार करून हत्या केली होती. सोमनाथ याने विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांची मुलगी सौदामिनी हिच्यासोबत ८ मे २०१४ या दिवशी पळून जाऊन विवाह केला होता. या प्रकरणावरून संतापलेल्या १२ ते १३ जणांनी सोमनाथची हत्या केली. (राज्यात वाढत चाललेली हत्याकांडे कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती ढासळल्याचे दर्शक नाही का ? - संपादक)

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ काढलेल्या वाहनफेरीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

वाहनफेरीत सहभागी धर्माभिमानी
      नंदुरबार - हिंदु जनजागृती समितीने येथे १० जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वाहन फेरीमध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काढलेल्या भव्य मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् अशा घोषणांनी नंदुरबार शहराचा उपनगर विभाग दुमदुमून गेला.
१. सभेच्या प्रसारासाठी नंदुरबार येथे ९ जानेवारी या दिवशी वाहनफेरी आयोजित करण्यात आली होती. ही वाहनफेरी रेल्वेगेट जवळील भगवाचौक येथून सकाळी १० वाजता काढण्यात आली. प्रतिष्ठित व्यापारी श्री. गुलाबजी कोचर यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत पूजन आणि प्रार्थना करून फेरीला प्रारंभ करण्यात आली.

गुन्हेगारी नोंदीचा दस्तावेज नष्ट करण्यासाठीच कलियाचक पोलीस ठाणे जाळले असल्याचा पोलिसांचा संशय

     कोलकाता - मालडा भागातील बलियादंगा, मोठाबरी, कालियाचक आणि मोहब्बतपूर येथे देशविरोधी कारवाया चालू असल्याचा पोलिसांना संशय आहे. अलीकडेच या भागातून पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक प्रशासनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धर्मांधांनी मालड्यातील कलियाचक येथे हा हिंसाचार घडवला असावा, तसेच या भागातील गुन्हेगारी नोंदीचा दस्तावेज नष्ट करण्यासाठी कलियाचक पोलीस ठाणे जाळण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या मालडामध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी केंद्रशासनाने बंगाल शासनाकडे अहवाल मागितला आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर या हिंसाचारामागील नेमके कारण कळू शकेल, असे केंद्राच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

५१ टक्के मुसलमान लोकसंख्या असलेल्या मालडा (बंगाल) जिल्ह्यात भारतीय कायदे कुणीच मानत नाहीत ! - भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य

      कोलकाता - मालडा येथील हिंसाचारानंतर आता राज्य पातळीवर तसेच केंद्रीय पातळीवरही तेथील परिस्थितीसंदर्भात चौकशी होत आहे. हा हिंसाचार रोखण्यात प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याने या घटनेचे खापर त्यांच्यावर फोडण्यात येत आहेे; पण मालडा हे गेल्या १५ वर्षांपासून देशद्रोही घटना घडण्यासंदर्भात कुप्रसिद्ध आहे. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट चलनाची तसेच मानवी तस्करी केली जाते. मालडा हा मुसलमानबहुल जिल्हा असून मुसलमानांची संख्या ५१ टक्के आहे. तर हिंदूंची लोकसंख्या केवळ ३० टक्के आहे. (आज भारतात अनेक जिल्हे, गावे अशी आहेत की, जेथे मुसलमानांची संख्या ही हिंदूंपेक्षा अधिक आहे; पण तरीही त्या ठिकाणी अल्पसंख्य असल्याच्या नावाखाली मुसलमानांनाच सुविधा मिळतात आणि हिंदु मात्र जीव मुठीत धरून आयुष्य कंठतात. - संपादक) तेथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली. (आधीच धर्माच्या नावावर पाक आणि बांगलादेश भारतापासून विभक्त झाला. आता असे आणखी किती जिल्हे भारतापासून विलग होण्याची भारतीय राज्यकर्ते वाट पहात आहेत ? - संपादक)

पुण्यात प्राणघातक अपघातांची संख्या वाढली

दिवसेंदिवस वाढणारे अपघात पहाता रस्ते हे मृत्यूचे सापळे झाले आहेत ! शासन 'रस्ता सुरक्षा सप्ताह' राबवते, त्याच्या फलनिष्पत्तीचा हाच परिणाम का ?
पुणे, ९ जानेवारी - येथे वर्ष २०१५ मध्ये एकूण रस्त्यावरील अपघातांची संख्या अल्प झाली आहे. त्या कालावधीत एकूण १ सहस्र २७६ अपघातांची संख्या नोंदवली असून वर्ष २०१४ मध्ये ती १ सहस्र ४५३ इतकी होती. प्राणघातक अपघातांची संख्या वर्ष वर्ष २०१४ मध्ये ३७८ इतकी होती, तर २०१५ मध्ये ४१६ झाली. किरकोळ अपगातांची संख्या २०१४ मध्ये ५८० होती, ती २०१५ मध्ये ३३० झाली. या अपघातात ४३५ लोकांचे अपघाती मृत्यू झाले असून वर्ष २०१४ मध्ये ३९९ लोक मृत्यू पावले होते.
वर्ष २०१४ मध्ये एकूण अपघातांपैकी दुचाकीचालकांच्या १०८ अपघातांत २४१ जण मृत्यू पावले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत एकूण अपघांतापैकी दुचाकीचालकांचे १२० अपघात झालेले असून त्यामध्ये २१९ नागरिक मृत्यू पावले आहेत.

श्रीपाल सबनीस यांना पुरो(अधो)गामी संघटनांचा जाहीर पाठिंबा

 • सवंग लोकप्रियतेच्या लोभापायी पुरोगाम्यांचा कंठशोष ! हा पाठिंबा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधासाठी अधिक आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल ते काय ?
 • सनातनचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी सभेचे आयोजन
      पुणे, ९ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. अनेक क्षेत्रांतून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत असतांना मात्र काही पुरोगामी संघटना, संस्था आणि निधर्मी राजकीय पक्ष यांनी त्यांना उघड पाठिंबा दिला आहे. तसेच सनातनचे कायदेशीर सल्लागार श्री. संजीव पुनाळेकर यांच्या तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला सबनीस, या ट्विटवरून पुरोगाम्यांनी विनाकारण वादंग निर्माण केला आहे. आता सवंग लोकप्रियतेच्या लोभापायी त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी पुरोगामी संघटना ११ जानेवारी या दिवशी पुणे येथे रामजी शिंदे पुलावर निषेध सभा घेणार आहेत.

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये ५४ कोटी, तर फसवणुकीच्या घटनांमध्ये १८० कोटी रुपये पळवले

पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा चोरांनाच चांगले 
दिवस आले आहेत ! एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या चोर्‍या 
आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार ?
      पुणे, ९ जानेवारी - शहरात वर्ष २०१५ मध्ये चोरीच्या विविध घटनांमध्ये ५४ कोटी रुपये, तर फसवणूक आणि विश्‍वासघात यांमध्ये १८० कोटी ४८ लक्ष ५१ सहस्र रुपये पळवल्याचे समोर आले आहे. फसवणूक आणि चोरी यांच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात रक्कम चोरीला गेली असली, तरी चोरीचा ऐवज किंवा पैसे परत मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. फसवणूक आणि विश्‍वासघात यांमध्ये चोरीला गेलेली रक्कम परत मिळण्याचे प्रमाण ३ प्रतिशत, तर चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये ते प्रमाण २५ प्रतिशत आहे. फसवणूक आणि विश्‍वासघात यांमधील १६ कोटी ५४ लक्ष ७० सहस्र रुपयांची मालमत्ता परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा उल्लेख पुण्यतिथी असा केल्याचे प्रकरण कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा उल्लेख पुण्यतिथी असा केल्याप्रकरणी कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स बजावण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम्.ए. पठाण यांनी हा आदेश दिला आहे. याचिकाकर्ता राजेश नारायण खडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे पुण्यतिथी हा शब्द त्यांच्या निधनाच्या दिवशी वापरला जाणे, हे कायदेशीर नसल्याचे आणि त्यामुळे भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.

दैनिक लोकमतकडून सनातनविषयी विपर्यस्त वृत्त !

      सनातनला आणि आरोपीला अपकीर्त करण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराची किंवा त्याच्या कुटुंबियांची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व कालावधीत त्याला आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबियास प्रतिदिन २४ घंटे संरक्षण देण्यात यावे, असे पत्र हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. हे पत्र अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कॉ. पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने लिहिले आहे. 
       या वृत्ताचा विपर्यास करत दैनिक लोकमतने अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कुटुंबियांच्या मनात धडकी भरेल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे, असे वृत्त प्रकाशित केले आहे.

उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिक्त

देशात कोट्यवधी खटले प्रलंबित असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधिशांची पदे 
रिक्त ठेवली जात असतील, तर जनतेला न्याय कसा मिळणार ?
     नवी देहली - उच्च न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांची संख्या ४५ लक्ष एवढी असतांना न्यायाधिशांच्या १ सहस्र ४४ अधिकृत संख्येपैकी ५९९ जागा (४३ टक्के) अद्यापही रिक्त आहेत. 
१. गेल्या वर्षभर या जागा भरण्याची प्रक्रिया रखडली आहे. उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या जागा भरण्याच्या पद्धतीवरून न्याययंत्रणा आणि केंद्रशासन यांच्यात झालेले तीव्र मतभेद जगजाहीर आहेत.
२. शासनाने नियुक्त केलेला राष्ट्रीय न्यायसंस्थेतील नेमणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने विसर्जित (बरखास्त) केला आहे. 

राज्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत ९० प्रतिशतने वाढ

वाढत्या बलात्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'महाराष्ट्राची ओळख महिलांसाठी सर्वांत असुरक्षित महाराष्ट्र' अशी झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! नागरिकांना 'गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र' देण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासन यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
 • दखलपात्र गुन्ह्यांत ७.३४ प्रतिशतने वाढ
 • प्रती ३ मिनिटाला २ गुन्हे दखलपात्र गुन्हे प्रविष्ट
 • सायबर गुन्ह्यांतही १०७ प्रतिशत वाढ
 • महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत २.१६ प्रतिशतने वाढ
महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ अहवालाचे प्रकाशन

पुणे, ९ जानेवारी - राज्यात वर्ष २०१४ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत ९०.११ प्रतिशतने, तर महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांत २.१६ प्रतिशतने वाढ झाली आहे. राज्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांत १.१ प्रतिशतने वाढ झाली असून चोरट्यांनी राज्यभरात ४७१ कोटी रुपयांची मालमत्ता चोरली आहे. अशी मालमत्ता उघडकीस आणण्याचे प्रमाण २८ प्रतिशत झाले आहे, ही माहिती महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ या अहवालातून उघड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४' या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम येथील राज्य राखीव दलाच्या मैदानावर ७ जानेवारी या दिवशी पार पडला. या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार हेही उपस्थित होते.

(म्हणे) महामंडळ माझा राजीनामा घेणार होते !

 • वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेले साहित्यिक समाजाला दिशा काय देणार ?
 • श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट !
    पुणे, ९ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वक्तव्य केल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्षपदाचे त्यागपत्र (राजीनामा) घेण्याच्या हालचाली चालू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. जीव गेला, तरी मी पदाचे त्यागपत्र देणार नाही. अशी माघार घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असेही सबनीस यांनी सांगितले. त्याविषयी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, सबनीस यांनी कुठल्या आधारावर हा आरोप केला आहे, याची माहिती नाही. महामंडळ म्हणून संमेलनाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. राजीनाम्यातला रही उच्चारलेला नाही. यामुळे सबनीस यांच्याकडे कोणी राजीनामा मागितला, हे स्पष्ट नसून यामुळेही सबनीस यांनी आता एक नवीन वाद ओढवून घेतला आहे. सबनीस पुढे म्हणाले, साहित्य महामंडळाची तटस्थ भूमिका आणि छुपा विरोध याचे आश्‍चर्य वाटते. संमेलनामध्येही भाषणाविषयी मला निर्बंध घालण्यात आले आहेत. समाजातील घडामोडींविषयी व्यक्त न होणे, मला मान्य नाही. विचार परखडपणे व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे.

एआयबी नॉकआऊटप्रकरणी निर्माता करण जोहरला समन्स

     मुंबई - गेल्या वर्षी वरळीतील एन्एस्सीआयमध्ये एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अश्‍लील हावभाव, अश्‍लील विनोद करण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर) अनुमती घेतली नसल्याचाही आयोजकांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला असून निर्माता करण जोहर यांना समन्स बजावण्यात आले आहे.

अमीर खान देशद्रोही ! - भाजपचे खासदार मनोज तिवारी

      नवी देहली - अभिनेते अमीर खान देशद्रोही असून त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, असे विधान भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत केले. या विधानाचा बैठकीतील उपस्थित अन्य विरोधी खासदारांकडून निषेध करण्यात आला; परंतु मी असे काही बोललोच नसल्याचे तिवारी यांनी ९ जानेवारीला स्पष्ट केले. (जनतेने देेशद्रोही अमीर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला, तरच अशा प्रवृत्ती डोके वर काढणार नाही ! - संपादक) अमीर खान यांची अतुल्य भारतच्या सदिच्छा दूत पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्या स्थानी अमिताभ बच्चन यांची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक सूत्रांसंबधी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांनी शासनाला स्पष्टीकरण मागितले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या खासदार तिवारी यांनी अमीरच्या विरोधात विधान केले.

आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाणकोट आक्रमणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

हुतात्मा सैनिकांना सद्गती मिळण्यासाठी सामूहिक श्री गुरुदेव दत्त नामजप केला !
प्रज्वलित दीप हाती घेऊन श्रद्धांजली
वाहतांना हिंदुत्ववादी
     आग्रा - येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून ७ जानेवारी या दिवशी पठाणकोट आक्रमणात वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी ६ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक हिंदुत्ववाद्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम वीरमरण आलेल्या सैनिकांची प्रतिमा असलेल्या कापडी फलकासमोरील भागात गुलाबाच्या पाकळ्या ठेवण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी दीप पेटवून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हुतात्मा सैनिकांना सद्गती मिळण्यासाठी ५ मिनिटे सामूहिकपणे श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला आणि शेवटी प्रार्थना केली. यासाठी येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

न्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

धोनी यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवल्याचे प्रकरण
     अनंतपूर (आंध्रप्रदेश) - भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.
    बिझनेस टुडेच्या एप्रिल २०१३ च्या अंकात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असतांना महेंद्रसिंह धोनी यांचे एक छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. या छायाचित्रात त्यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवण्यात आले होते. या छायाचित्रातील धोनी यांना अनेक भूजा दाखवून त्यांच्या भूजांमध्ये विविध आस्थापनांची उत्पादने दाखवण्यात आली होती. एका हातात तर जोडेही दाखवले होते आणि या छायाचित्राखाली गॉड ऑफ बिग डिल्स, असे घोषवाक्य लिहिण्यात आले होते. यातून धार्मिक भावना दुखावण्यात आल्याच्या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी वर्ष २०१५ च्या फेब्रुवारीमध्ये अनंतपूरच्या न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यापूर्वीही वर्ष २०१४ च्या जूनमध्ये धोनी यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले होते. यासह याप्रकरणी धोनी यांच्या विरोधात देहली आणि पुणे येथेही याचिका दाखल करण्यात आली होती.

खोटी वृत्ते देऊन सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याविषयी 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीस सनातन संस्थेची नोटीस

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी ट्विट केल्याचे प्रकरण !
मिरज, ९ जानेवारी (वार्ता.) - अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी 'तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला श्रीपाल सबनीस', असे ट्विट केले होते. या ट्वीटचा सनातन संस्थेशी काही संबंध नसतांना 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीवरून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारा मजकूर प्रसारित करण्यात आला. यामुळे सनातन संस्थेची समाजात असणारी प्रतिमा मलीन झाल्याने सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संचालक सौ. हेमलता सुधाकर शेट्टी, संचालक श्री. सुधाकर मल्लाप्पा शेट्टी यांना अधिवक्ता अण्णासाहेब जाधव यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे. यात सनातन संस्थेविषयी खोटी वृत्ते दिल्याचा खुलासा करावा, तसेच हानीभरपाई म्हणून ५ लक्ष रुपये इतकी रक्कम देण्यात यावी. तसे न केल्यास तुमच्या विरोधात दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल करण्यात येईल, असे नमूद केले आहे. या नोटिशीत पुढे असे म्हटले आहे की, सदरचे वृत्त प्रसारण करतांना सत्य वस्तूस्थितीचा कोणताही विचार आणि शहानिशा न करता तुम्ही प्रसिद्ध केले आहे. तुमच्या वृत्तवाहिनीचे प्रसारण महाराष्ट्रात, तसेच ज्या ज्या ठिकाणी होते, त्या त्या ठिकाणी सनातन संस्थेची अपकीर्ती आणि मानहानी झाली आहे. सनातन संस्था ही आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक जडणघडणीवर उभी राहिली असल्याने या वृत्तामुळे पैशात कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

आरोपींच्या जामीन आवेदनाला विरोध करण्यासाठी पोलीस उदासीन ! - पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश

     हा पोलिसांचा आळशीपणा आहे कि भ्रष्टाचार ? न्यायालयाने काढलेल्या नोटिसीनंतरही न सुधारणारे पोलीस सर्वसामान्यांचे काय ऐकून घेत असतील ? हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमान असून अशा पोलिसांवर त्यांचे वरिष्ठ कोणती कारवाई करणार आहेत ?
     पुणे, ९ जानेवारी - येथील शिवाजीनगर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला जे. धोटे यांनी पुणे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांना पत्र पाठवून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील आरोपींच्या जामीन आवेदनाला विरोध करण्यासाठी पोलिसांकडून योग्य ती कागदपत्रे सादर केली जात नाहीत. त्याविषयी संबंधित कर्मचार्‍यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस काढल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा होत नाही. (न्यायालयाचे आदेशही न जुमानणारे पोलीस ! - संपादक)

प्रत्येकाने धर्माचरण करणे अपेक्षित आहे ! - श्री ओप्पत्तेश्‍वर महास्वामीजी, ओप्पत्तेश्‍वर मठ

गुळेदगुड्ड (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा
डावीकडून सौ. वीणा नायक, श्री काशीनाथ स्वामीजी,
श्री ओप्पत्तेश्‍वर स्वामीजी आणि श्री. गुरुप्रसाद
     गुळेदगुड्ड (कर्नाटक) - स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ! आपला हिंदु धर्म पुष्कळ श्रेष्ठ आहे, व्यापक आहे. त्यामुळे प्रत्येकाने धर्माचरण करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ओप्पत्तेश्‍वर मठाचे श्री ओप्पत्तेश्‍वर महास्वामीजी यांनी हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री व्यंकटेश कन्नड माध्यम प्रौढशाळेत नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. वीणा नायक, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद आणि मुरुघामठाचे श्री काशीनाथ स्वामीजी उपस्थित होते. या सभेला ९०० हून अधिक हिंदु उपस्थित होते. 

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता ! 
 सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेले ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आधार कार्ड बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च राज्यकर्त्यांकडून वसूल करा !

     आधार कार्ड बनवणे बंधनकारक नाही. घरगुती गॅस जोडणी, दूरध्वनी जोडणी इत्यादींसाठी आधार कार्ड बंधनकारक असणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

स्वामी विवेकानंद यांची भविष्यवाणी आता ८ वर्षांनी सिद्ध होईल !

     या शतकाच्या अखेरपर्यंत भारतमाता विश्‍वातील सर्वोच्च सिंहासनावर बसून आपल्या तेजाने संपूर्ण विश्‍वाला तेजोमय करत आहे, हे दृश्य आज माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे !
- स्वामी विवेकानंद (संदर्भ : मासिक प्रज्वलंत, एप्रिल १९९७)

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय

सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नाविन्यपूर्ण अभ्यास असलेला सनातनचा ग्रंथ !
मुद्रा, न्यास आणि नामजप करत उपाय शोधणे
उपायपद्धतीचे मर्म
     प्राणमय कोश आणि कुंडलिनीचक्रे मिळून प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था बनते. पंचप्राण, पंच-उपप्राण आणि पंचकर्मेंद्रिये मिळून प्राणमय कोश होतो. हा कोश रजोगुणप्रधान आणि वायूरूप असतो. मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना, तसेच मनाला कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित इंद्रियाची कार्यक्षमता अल्प झाल्याने विकार निर्माण होतात. अशा वेळी इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदीय, अ‍ॅलोपॅथिक आदी औषधे कितीही घेतली, तरी त्यांचा विशेष उपयोग होत नाही.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 • महिला आणि मुली यांच्यासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असलेली मायानगरी !
 • शाळेतील कर्मचारी अटकेत
     मुंबई - मुंबईच्या दादर परिसरातील एका नामांकित शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ९ वर्षांच्या मुलीवर याच शाळेतील एका २० वर्षीय कर्मचार्‍याने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. (अश्‍लील दृष्य असलेले चित्रपट आणि मालिका यांचा भडिमार सध्या नागरिकांवर होत आहे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे नैतिकता दिवसेंदिवस अधोगतीला जात आहे. याच्या परिणामस्वरूप अशा घटना न घडल्यास नवल ! यासाठी शासन स्तरावर तत्परतेने ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. - संपादक)

कृत्रिम पदार्थांची निर्मिती करून भारतियांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या चीनच्या निर्यात धोरणाविषयी गाफील असलेले भारतीय राज्यकर्ते !

     चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि कोबी यांची कृत्रिमरित्या निर्मिती होत आहे. प्लास्टिक आणि तत्सम रासायनिक घटकांपासून या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. या पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नैसर्गिक वाटतात आणि शिजवल्यानंतर किंवा खातांनाही ते कृत्रिम आहेत, याची जाणीव होत नाही. सध्या चीन मोठ्या प्रमाणात भारतात अशा कृत्रिम पदार्थांची निर्यात करत आहे. भारतातील व्यापारी भेसळ करून या कृत्रिम पदार्थांची विक्री करत आहेत. भारतियांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या पदार्थांच्या आयातीवर प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही उपाययोजना भारतीय राज्यकर्त्यांनी केलेली नाही.

गोव्यात मागील तीन वर्षांत महिलांवरील अत्याचारांत दुपटीने वाढ !

     पोलीस अहवालानुसार गोवा राज्यात गुन्ह्यांची संख्या घटलेली असली, तरी मागील तीन वर्षांत महिलांवरील अत्याचारात दुपटीने वाढ झाल्याचे गोवा पोलीसदलाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. (५.१.२०१६)

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चर्चेत राहून धर्मावर आघात करणार्‍या वर्षा देशपांडे !

कु. प्राजक्ता धोतमल
      शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून एका महिलेने दर्शन घेतले. ही धर्मद्रोही घटना काळाच्या पडद्याआड जाते न जाते तोच सातारा येथे आणखी एक घटना घडली. स्त्रीस्वातंत्र्याचे नाव पुढे करत नेहमीप्रमाणे जाणीवपूर्वक हिंदु धर्मावरच आघात करण्याच्या परंपरेत २३.१२.२०१५ या दिवशी युवक क्रांती दलाच्या वर्षा देशपांडे यांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. या कृतीचा उद्देशही केवळ प्रसिद्धी हाच होता. 
१. वर्षाताई, याची उत्तरे द्या ! 
अ. शस्त्रकर्मगृहात आधुनिक वैद्य (ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर) कुणाला प्रवेश करू देत नाहीत. तेथे प्रवेश करण्याचा हट्टाग्रह वर्षाताई करणार का ?
आ. मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश बंदी आहे. तेथे जाण्याची हिंमत त्या दाखवणार का ?
इ. चर्चमध्ये अनेक नन्सचे शोषण झाल्याच्या वार्ता येतात. तेव्हा वर्षाताई कुठे असतात ?
ई. काही वर्षांपूर्वी सातार्‍यात उपराकार लक्ष्मण माने यांनी अनेक महिलांचे शोषण केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. तेव्हा वर्षांताईंनी आंदोलन का केले नाही ?

आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आलेल्या धुळे येथील ६ विद्यार्थ्यांचे पोलिसांकडून समुपदेशन

 • धर्मांध समुपदेशनाने सुधारतील हा पोकळ आशावाद आहे !
 • आय.एस्.आय.एस्.चे मूळच उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत !
    जळगाव - सामाजिक संकेतस्थळाद्वारे आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या धुळ्यातील सहा विद्यार्थ्यांची आतंकवादविरोधी पथकाने चौकशी केली आहे. या ६ विद्यार्थ्यांचे पोलिसांकडून सध्या समुपदेशन चालू आहे. त्यांना आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावापासून कसे दूर ठेवता येईल, यासाठी पोलीस प्रयत्नरत आहेत.

इतर राज्यांनीही मध्यप्रदेश शासनाचे अनुकरण करणे अपेक्षित आहे !

     मध्यप्रदेशातील विशेष पोलीस विभाग आणि लोकायुक्त यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वर्ष २०१५ मध्ये प्रतिदिन किमान १ तरी अधिकारी भ्रष्टाचार करतांना पकडला गेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही शृंखला गेल्या ३ वर्षांपासून अशीच चालू आहे. (५.१.२०१६)

सेल्फीच्या नादात बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात दोघांचा मृत्यू

    मुंबई - मुंबईच्या बॅण्डस्टॅण्डवर सेल्फी काढण्याच्या नादात एका मुलीचा आणि तिला वाचवणार्‍या गृहस्थाचा बुडून मृत्यू झाला आहे. बॅण्डस्टॅण्डच्या किनार्‍यावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तरन्नूम, कस्तुरी, नाझिया या तीन मैत्रिणी समुद्र किनार्‍यावर सेल्फी काढत होत्या. त्या वेळी तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या रमेश नावाच्या गृहस्थाने कस्तुरी आणि नाझियाला वाचवले; मात्र तरन्नुमला वाचवण्यात यश आले नाही. तरन्नूमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर रमेशही पाण्यात बुडाले.

मरिन सेंटर संस्थेद्वारे एके-४७ आणि एस्एल्आर्सारख्या घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

राज्य पोलीस महासंचालकांकडे प्रकरणाचा शोध घेण्याची मागणी
      नवी मुंबई - येथील मरिन सेंटर नावाची संस्था एके-४७ आणि एस्एल्आर्सारख्या घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देत आहे. ही शस्त्रास्त्रे केवळ लष्करी आणि पोलीस यांतील उच्चाधिकार्‍यांनाच काही अटींवर वापरता येतात. परंतु अशा संस्थांच्या वतीने दिल्या गेल्या सात वर्षांत या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आलेल्या ३०० ते ४०० व्यक्ती देशी-विदेशी मालकीच्या जहाजांवर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचा अंदाज आहे.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
(आंदोलनाचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

केजरीवालांची बौद्धिक दिवाळखोरी !

सौ. अंजली जोशी
     सध्या भारताच्या राजधानीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि तथाकथित पुरोगामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवालांनी त्यांना भेकड आणि मनोरुग्ण म्हटले आहे. ते वाचून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. केजरीवालांना कोणते विशेषण लावावे ?
अ. कालचे भ्रष्टाचारविरोधी केजरीवाल आज भ्रष्टाचार करणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
आ. स्वतःला आम आदमी (सर्वसाधारण माणूस) म्हणवून घेणारे केजरीवाल आता व्हीआयपी बनले आहेत.
इ. स्वतःच्या पक्षातील आमदारांचे वेतन दोन लक्षपर्यंत वाढवून ते आम आदमीचा (सर्वसाधारण माणसाचा) गळा घोटायला निघाले आहेत.

इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना हुतात्मा म्हणून सन्मान !

     माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष अकाली दलाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हुतात्मा असा सन्मान देण्यात आला, तसेच याप्रसंगी त्यांच्या नातेवाइकांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी शिरोमणी आकाली दलाचे परमिंदर पाल सिंह म्हणाले, जर हिंदू महासभा नथुराम गोडसे यांनी जयंती साजरी करू शकते, तर शीख या तिघांची पुण्यतिथी का साजरी करू शकत नाही ? (५.१.२०१६)

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने शाळेत जाणे सोडले

महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !
      संभाजीनगर, ९ जानेवारी - येथील गांधीनगर भागात रहाणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थिनीने छेडछाड होते म्हणून २२ डिसेंबरपासून शाळेत जाणेच सोडून दिले आहे. खाराकुँआ भागातील शाळेत शिकणार्‍या या विद्यार्थिनीच्या आईच्या भ्रमणभाषवर छेड काढणार्‍या मुलाचा दूरभाष आला. तिने ही गोष्ट पालकांना सांगितली. वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मुलाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. या छेडछाडीच्या प्रकरणाविषयी पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापनाला काही प्रश्‍नही विचारले. पोलीस निरीक्षक एन्.एस्. कोळे यांनी सांगितले की, या तक्रारीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाला काही प्रश्‍न विचारले आहेत. लवकरच संशयित तरुणाला कह्यात घेतले जाईल. (पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक का केली नाही ? संशयित पळून गेल्यास त्याला उत्तरदायी कोण ? - संपादक)

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे 
हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.
परस्परांच्या आवडीवरून विवाह ठरणे, बाह्यरूपाला अधिक महत्त्व असणे, स्त्री किंवा पुरुष यांचे 
श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरणे आणि जानव्यापुरतीच ब्राह्मणांची ओळख रहाणे 
       दाम्पत्येऽभिरुचिर्हेतुर्मायैव व्यावहारिके ।
       स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक ३
अर्थ : विवाह-संबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. (प्रेमविवाह होतील.) व्यवहारात कपटालाच (कपड्यांना) महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. ब्राह्मण्याची ओळख जानवे एवढीच असेल. 

समितीच्या प्रयत्नांमुळे कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले !

      लव्ह जिहादविषयी धर्मांधांचे आता नवीन धोरण आहे. अल्पवयीन आणि तरुण मुलामुलींना प्रथम व्यसनांच्या आहारी लावले जाते. नंतर व्यसनाच्या नावाखाली त्यांना पार्ट्यांमध्ये बोलावून तेथे त्यांचे अश्‍लील छायाचित्र काढले जाते. पुढे या छायाचित्रांच्या आधारावर मुलींचे शोषण होते. यात अनेकदा हिंदु मुलांच्या खांद्यावर बंदुक ठेवून धर्मांध हिंदु मुलींना जाळ्यात ओढतात. हिंदु जनजागृती समितीने लव्ह जिहादवर पुस्तक काढल्याविषयी मी त्यांना पुनःपुन्हा धन्यवाद देते. आज या पुस्तकामुळे कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. - अधिवक्त्या चेतना शर्मा

वरातीमागून घोडे, या तर्‍हेचे शासन ! त्याऐवजी पुढे काय होणार ?, हे आधीच ओळखून कृती करणारे शासन हवे !

     देशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेनंतर अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयक २२ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत संमत करण्यात आले. त्यामुळे बालगुन्हेगाराचे वय यापुढे १८ ऐवजी १६ वर्षे असेल.

पाकचा गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्याची तत्परता दाखवणारे भारत शासन पाकमधील हिंदूंच्या संदर्भात निष्क्रीय का ?

पाकमधून अनेक वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदूंना पुन्हा पाकला जाणे भाग !
      मूळ पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत शासनाकडून भारतीय नागरिकत्व देण्यात आले; मात्र पाकमधून भारतात आलेल्या आणि गेली अनेक वर्षे भारतात राहिलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे घर वापसी होण्याची आशा मावळल्याने या हिंदूंना नाईलाजाने पाकमध्ये जावे लागत आहे.

लोकसंख्येचा विस्फोट करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी कायदा करून त्यांच्यावर निर्बंध घाला !

      हिंदुस्थानात ज्यांना अल्पसंख्यांक म्हणून गणले जाते, त्याच अल्पसंख्यांकांमुळे लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थान अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसायचे असेल, तर सर्वांत आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा आणि जर कुणी हा कायदा मोडला, तर त्याचा मतदानाचा हक्कच काढून घ्यायला हवा. त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादायला हवेत. - गिरिराज सिंह, लघुउद्योग राज्यमंत्री
      राम मद्य पितो, मांस खातो, असे म्हणून हिंदु धर्मावर टीका करणारे पुरोगामी नसून हिंदु धर्मबुडवे आहेत. अशा पुरोगामी लोकांना धडा शिकवण्यासाठी मी अजून जिवंत आहे. हे पुरोगामी म्हणजे नरकगामी असून त्यांना शेवटी नरकातच जागा मिळणार आहे. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू
     ख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या धर्मग्रंथाविषयी सांगू शकतात; पण हिंदूंना आपला धर्मग्रंथच ठाऊक नाही. आपला धर्मग्रंथ मनुस्मृति आहे. ती जाळणार्‍यांनाच राजकीय नेते सहस्रो रुपयांचे हार घालतात. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते (५.१.२०१६) 

भाषा आणि प्रादेशिक अस्मिता - काही अपसमज !

     बर्‍याच वेळा भाषेचा प्रश्‍न अस्मितेशी जोडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यांना अस्मिता म्हणजे काय ? यासंबंधी पुरेसे ज्ञान नसते ते अशा अपप्रचाराला बळी पडतात. कोकणीचे जे कडवे पुरस्कर्ते आहेत, ते जेव्हा कोकणी ही गोव्याची ओळख आहे, असे म्हणतात, तेव्हा ते बहुदा गोव्यातील सासष्टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीनच तालुक्यांचा म्हणजे जुन्या काबीजादीतील लोकांचाच विचार करत असावेत. विशेषतः अल्पसंख्य लोकांचा असा समज झालेला आहे. त्यांनी गोव्याच्या इतर नऊ तालुक्यांचा विचार केलाय का ? त्यांनी गोव्याच्या त्या नव्या काबीजादीतील नऊ तालुक्यात जाऊन पहावे; म्हणजे त्या नऊ तालुक्यांतील लोकांवर मराठी भाषा आणि संस्कृती यांचा किती प्रभाव आहे, हे त्यांना समजून येईल.जुन्या काबीजादीतील लोकांवर पोर्तुगीज शासनाने सुमारे ४५० वर्षे राज्य केल्यामुळे आणि त्यांचा संबंध मराठीपासून तोडला गेल्यामुळे त्यांना मराठी परकी वाटते. त्यांच्यासाठी पोर्तुगीज मिशनर्‍यांनी रोमन लिपीतून कोकणी ग्रंथांची निर्मिती केल्यामुळे आणि मूळ संस्कृतीच नष्ट केल्यामुळे त्यांना तसे वाटते; परंतु नव्या काबीजादीतील लोकांचे तसे नाही.

युद्ध दाराशी आले असतांना त्यासाठी सिद्धता करण्याऐवजी युद्धात नष्ट होणारे पूल आणि रस्ते यांवर साडे तीन सहस्र कोटी रुपये उधळणारे गोवा शासन !

      गोवा शासनाकडून झुआरी नदीवरील नवीन सहा पदरी पूल, मडगाव आणि काणकोण येथील बगलमार्गासह तळपण, गालजीबाग आणि माशें पूल आणि वेर्णा येथील मिसिंग लिंक यांच्या एकूण साडे तीन सहस्र कोटी रुपये खर्चाच्या कामाचा पायाभरणी शुभारंभ १ जानेवारी २०१६ या दिवशी राज्यातील गोव्हा वेल्हा फूटबॉल मैदानात पार पडला.

मदरशात विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवणार्‍या मुख्याध्यापकास अमानुष मारहाण करून राष्ट्रगीताला विरोध करणारे धर्मांध त्यांचा देश कोणता, हे सांगतील का ?

      बंगाल राज्यात एका मदरशातील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवले; म्हणून धर्मांध मौलाना आणि त्यांच्या हस्तकांनी मुख्याध्यापक काझी मासूम अख्तर यांना अमानुष मारहाण करून मदरशातून हाकलून लावल्याची घटना घडली आहे. या घटनेविरुद्ध आतापर्यंत मुख्याध्यापक काझी मासूम अख्तर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल आणि अल्पसंख्यांक आयोग यांच्याकडे सहा वेळा तक्रारी केल्या; मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. मौलवींनी राष्ट्र्रगीत म्हणणे इस्लामच्या दृष्टीने हराम (निषिद्ध) असून ते हिंदूंचे गीत आहे, असे म्हणून अख्तर यांच्याविरुद्ध फतवा काढला आहे. 

हिंदु जनजागृती समितीची आंदोलने शिस्तबद्ध ! - एका शासकीय सुरक्षा अधिकार्‍याचा अभिप्राय

      देहली येथील जंतर-मंतर येथे जानेवारी २०१६ मासात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी एक शासकीय सुरक्षा अधिकारी म्हणाले, अन्य संघटना केवळ खाण्या-पिण्यासाठी आंदोलने करतात; परंतु हिंदु जनजागृती समितीची आंदोलने अतिशय चांगल्या आणि शिस्तबद्ध स्वरूपात असतात. आंदोलनाच्या वेळी जी भाषणे देण्यात येतात, ती ऐकण्याची इच्छा होते.

भारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम आणि नागालॅण्ड राज्ये !

     अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालॅण्ड या राज्यांत जायचे झाल्यास विशिष्ट परवाना काढावा लागतो, त्यानंतरच त्या राज्यांत प्रवेश करता येतो. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

दिवास्वप्नात रमणारे केंद्रीय गृहमंत्री !

      आय.एस्.आय.एस्.चा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
     हिंदुत्व आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. - केंद्रीय (लघुउद्योग) राज्यमंत्री गिरिराज सिंह

अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना १० वर्षांसाठी बँकांची निवडणूक लढवण्यास बंदी !

     सहकारी बँकांवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता गाजवणार्‍या राज्यातील सहकारसम्राटांना १० वर्षे सहकारी बँकांच्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य सहकार विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांना या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

धर्मांधांच्या सभांचे ध्वनीमुद्रण न करता हिंदुत्ववाद्यांच्या मागे लागणारे पोलीस !

     फलटण (जिल्हा सातारा) येथे २ जानेवरी २०१६ या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला गुप्त वार्ता विभागाचे ४ पोलीस, तर गणवेशातील ८ पोलीस उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी सभेमध्ये वक्त्यांनी केलेल्या भाषणाचे ध्वनीमुद्रण केले.

डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी नसतांना गोव्यातील नुसी वोकहार्ट रुग्णालयात रुग्णांवर उपचार !

     सप्टेंबर २०१५ मध्ये गोव्यातील नावेली येथील सत्यवैष्णवी या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या मुलीवर उपचार करतांना तिच्यावर योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार झाले नव्हते, तसेच तिच्यावर उपचार करणार्‍या सातपैकी दोन डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवीही नव्हती. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या मुलीचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने केले होते. 
     प्राथमिक चौकशी करण्यासाठी ४ महिने लागत असतील, तर गुन्हेगारांवर कारवाई होण्यासाठी किती काळ लागेल ?
     आज अनेक हिंदु संघटना स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण धर्मरक्षणाची गोष्ट आली की, ते मूग गिळून गप्प बसतात. - श्री. अनुराग मलिक, अध्यक्ष, हिंदु युवक सभा, सोनीपत, हरियाणा
      फोडा आणि राज्य करा, या हिंदुविरोधकांच्या तत्त्वाला संघटन करा आणि लढा या आधारे आपण तोंड दिले पाहिजे. - पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
    काही भागांमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे, मग त्यांना अल्पसंख्यांक म्हणायचे का ? देशाला विकासाकडे न्यायचे असेल, तर नव्याने लोकसंख्या धोरण सिद्ध करावे लागेल. - केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह
      हे पुरोगामी श्रीरामावर २५७ प्रकारचे विविध आरोप करत आहेत. हे खरे पुरोगामी नसून हिंदु धर्म विध्वंसक आहेत. खरे पुरोगामी आमचे संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी संत होते. प्रकाश आंबेडकर हा तर पूर्ण हिंदु धर्म विध्वंसक आहे. त्यामुळे त्याच्या पक्षाला पूर्ण विदर्भातून आम्ही एकही मत दिलेले नाही. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू

गोव्यात मराठीविषयी असहिष्णुता का ?

१० जानेवारी या दिवशी पणजी (गोवा) येथे मराठी
 राजभाषेच्या मागणीसाठी होणार्‍या आंदोलनाच्या निमित्ताने...
     गोव्यात कोकणी भाषा बहुसंख्येने बोलली जात असतांनाही तेथील लोक मराठी राजभाषा व्हावी, यासाठी चळवळ राबवतात, तर महाराष्ट्रात मातृभाषा मराठी असतांनाही येथील शिक्षणाचे इंग्रजीकरण होत आहे ! महाराष्ट्रातील जनतेने गोमंतकियांकडून आता मराठीचे महत्त्व जाणावे !
    
गेल्या काही दिवसांत सहिष्णुतेचा विषय देशभरात बराच चर्चिला गेला. त्यामध्ये धार्मिक सहिष्णुतेचा विषय होता, तसाच सामाजिक आणि वैचारिक असहिष्णुतेचा विषय होता. काही धर्मतत्त्वांचा आग्रह धरणार्‍यांच्या वक्तव्यांमुळे तर अंधश्रद्धा विरोध, सामाजिक समता या विषयांसाठी संघर्ष करणार्‍या काहींच्या हत्या झाल्यामुळे देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे चित्र निर्माण झाले.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सनातनच्या साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी रेखाटलेली भावचित्रे

  
कु. सर्वमंगला मेदी
   आलेख्य (चित्र काढणे) ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या अनेक साधनांपैकी कला हे ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. काही भक्त अभंगांच्या माध्यमातून, काही भक्त ओव्यांच्या माध्यमातून, तर काही भक्त गौळणींच्या माध्यमातून त्यांचा देवाप्रतीचा भाव प्रकट करतात; परंतु त्यांचा उद्देश देवाची भक्ती त्याच्या गुणगानातून व्यक्त करणे, हा एकच असतो. त्याप्रमाणेच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून साधना करणार्‍या कु. सर्वमंगला मेदी यांनी दोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना त्यांचा देवाप्रती असणारा भाव आणि अनुसंधान चित्रांतून प्रकट केले आहे.

साधकांसाठी सूचना !

उच्च लोकांतून जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकेतील साधनेच्या 
दृष्टीने योग अभ्यासण्यासाठी त्यांच्या जन्मवेळेची माहिती आणि सुस्पष्ट छायाचित्रे पाठवा !
      आतापर्यंत दैनिक सनातन प्रभातमधून ६०० हून अधिक दैवी बालकांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, त्यांच्या शरिरात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट (उदा. शरिरावर विविध शुभचिन्हे उमटणे, त्यांची सात्त्विक आवड, उदा. भजने, देवतांची चित्रे आवडणे) यासंबंधित अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. या संदर्भात संशोधन चालू असून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करत आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार अशा बालकांमधील विशेष योग अभ्यासण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या दैवी बालकांची पुढील माहिती त्यांच्या पालकांनी पुढील पत्त्यावर पाठवावी. त्याचप्रमाणे त्यांची सुस्पष्ट छायाचित्रेही पाठवावीत. संशोधन करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.

दिवास्वप्नात रमणारा संघ !

     ख्रिस्त्यांशी जवळीक साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ख्रिस्त्यांसाठी नवीन संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न चालू झाले असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय ईसाई संघ असे या संघटनेचे नाव ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (५.१.२०१६)

उच्च लोकांतून जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकांचा अभ्यास, तसेच संशोधन करण्यासाठी साहाय्य होण्याच्या दृष्टीने ज्योतिषांना आवाहन !

      आतापर्यंत दैनिक सनातन प्रभातमधून अनेक दैवी (सात्त्विक) बालकांच्या अनुभूती, त्यांच्या शरिरात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट, त्यांची सात्त्विक आवड यासंबंधित अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. यासंदर्भात संशोधन चालू असून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करत आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार अशा बालकांमधील विशेष योग अभ्यासण्यासाठी ज्योतिष तज्ञांची आवश्यकता आहे. जे ज्योतिषी सेवा म्हणून साहाय्य करण्यास सिद्ध आहेत, त्यांनी ते किती वेळ देऊ शकतात, त्यांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक ही माहिती पुढील पत्त्यावर किंवा टंकलिखित करून संगणकीय पत्राने पाठवावी.
सौ. प्राजक्ता जोशी : संपर्क क्र. : ९८२२६६७७५६
पत्ता : सनातन आश्रम, सर्व्हे नं. २४/ब, रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा.
संगणकीय पत्ता : cchhaarraannssppaarrsshh25@ggmmaaiill.ccoomm

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५१००६२०५ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.


प.पू. डॉक्टरांनी लावलेल्या सनातन वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणे

श्री. शंकर नरुटे
१. बिजाचे रूपांतर वृक्षात होणे
      सनातन एक वृक्ष आहे. या वृक्षाचे बिजारोपण प.पू. डॉक्टरांनी वर्ष १९९० मध्ये केले. त्याला प.पू. भक्तराज महाराजांनी विचारधारेतून पाणी घातले आणि आशीर्वाद दिले. काळाच्या वार्‍याने वृक्ष हलू लागला. श्रीकृष्णाने चैतन्यरूपी छाया आणि प्रकाश नेहमीसाठी दिला आहे. तसेच नाम, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती रूपी फांद्या वाढल्या. त्याला साधक रूपी पाने फुटली. झाडाखाली विश्रामासाठी सप्तदेवता येऊ लागल्या. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. झाडाला मोहर आला. हळूहळू फुले बहरली. ६० टक्के फुले झाडावर डोलू लागली (६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांमध्ये वाढ झाली). त्या फुलांचा सुगंध चारही दिशांना दरवळला. हळूहळू फळे लागली आणि ती पिकली. प.पू. डॉक्टरांचा सनातन वृक्ष श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण झाला. वर्षानुवर्षे फळे अर्पण होऊ लागली (सनातनच्या साधकांमध्ये संतांचे प्रमाण वाढले). आता त्या वृक्षाचा आनंद गगनात मावेना.

भारतियांनो, आता समस्या दूर करण्यापेक्षा हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न करा !

श्री. प्रशांत जुवेकर
१. राजधानी देहलीत घडलेल्या निर्भयावर 
बलात्कार करून हत्याकेल्याच्या घटनेमुळे या ढोंगी 
शासनावरचा उरलासुरला विश्‍वास उडून गेला आहे आणि या 
निमित्ताने आखाती देशात झालेल्या आंदोलनाची आठवण होणे
      राजधानी देहलीत घडलेल्या घटनेमुळे या ढोंगी शासनावरचा उरलासुरला विश्‍वास उडून गेला आहे. (यापेक्षा अविश्‍वास आणखी दृढ झाला आहे, हे म्हणणे योग्य ठरेल.) शासनाच्या एकाही मध्यस्थाच्या (दलालाच्या) आश्‍वासनांवर जनता विश्‍वास ठेवण्यास सिद्ध (राजी) नाही. युवावर्ग तर जाहीरपणे शासनाविरोधात प्रतिक्रिया देऊ लागला आहे. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) ट्युनिशिया, सिरीया आणि लिबिया या आखाती देशांत झालेल्या आंदोलनांची आठवण या निमित्ताने होऊ लागली आहे. काँग्रेसला आपला अंत निकट आल्याचे जाणवू लागले आहे.

राष्ट्र-धर्म रक्षणार्थ सदैव कार्यरत असलेल्या दैनिक 'सनातन प्रभात'मधील विविध सेवांमध्ये सहभागी होऊन हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीत हातभार लावा !

सर्वत्रच्या साधकांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

दैनिक 'सनातन प्रभात' म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! साधकांना साधनेसाठी मार्गदर्शक असणार्‍या, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असणार्‍या दैनिक सनातन प्रभातमधून राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांसंदर्भात जनसामान्यांमध्ये जागृती करण्यात येते. सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात दिवसागणिक वाढत असल्यामुळे त्याविषयीची वृत्ते हिंदूंपर्यंत पोहोचवून जागृती करणे आवश्यक बनले आहे. सध्या दैनिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्याही वाढली आहे. त्यामुळे सहसंपादक आणि संरचना या सेवा करू शकणारे किंवा शिकू इच्छिणारे साधक यांची तातडीने आवश्यकता आहे. सहसंपादकाच्या सेवेसाठी मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे आणि वृत्तांचे संकलन करता येणे आवश्यक आहे, तर संरचनेच्या सेवेसाठी इनडिझाईन (InDesign), फोटोशॉप (Photoshop) आणि कोरल ड्रॉ (Corel Draw) या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्या साधकांना वरील सेवांविषयीचे ज्ञान नसून ते या सेवा करण्यास इच्छुक आहेत, त्यांना त्या शिकवल्या जातील. 

मडगाव स्फोटप्रकरणी कारागृहातून निर्दोष सुटलेेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव वाचून आलेले अभिप्राय

१. सनातनच्या साधकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे असणे
     मडगाव स्फोट प्रकरणात अडकवले गेलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. एवढ्या नरकयातना भोगून आल्यानंतरसुद्धा आता त्यांचे छायाचित्रातील तोंडवळे उत्साही दिसत आहेत. हे बघून आनंद वाटला. ही गुरुकृपाच म्हणायची ! समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे । ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली.

नालासोपारा येथे १० जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन

* एन्.सी.ई.आर्.टी.च्या शालेय पुस्तकात श्री विठ्ठलाचा विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा जणेश्‍वर उल्लेख केल्याप्रकरणी विरोध करा ! 
* विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे ! 
* शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थान यांची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

वेळ : सकाळी ११
स्थळ : पंचमुखी हनुमान मंदिर, सिवीक सेंटर समोर, स्टेशन मार्ग, नालासोपारा (पश्‍चिम)
भ्रमणभाष क्रमांक : ८४५०९ ५०४४७


साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक यांना विनंती

सनातनची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसारित करणार्‍या नियतकालिकांच्या प्रत्येकी ५ प्रती पाठवा !
सध्या सनातनची अपकीर्ती करणारी वृत्ते विविध वृत्तवाहिन्या आणि नियतकालिके यांमधून प्रसारित होत आहेत. यामध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, तसेच स्थानिक अशा नियतकालिकांचा समावेश आहे. तरी अशा वृत्तांच्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी या नियतकालिकांच्या प्रत्येकी ५ प्रती घेऊन त्या दैनिक सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयात पाठवाव्यात.
आवृत्तीचा स्थानिक पत्ता : सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट - ओ.एन्.जी.सी., तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड ४१० २२१
संपर्क क्रमांक : ९४०४९५६०८७
सनातनचा अपप्रचार करणारे वार्तांकन वाहिन्यांवर दाखवले जात असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक कार्यालयात कळवावे.


घरी असतांना साधकाला झालेले विविध त्रास आणि रामनाथी आश्रमात आल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !

१. घरात अनंत अडचणी असणे
१ अ. आई रुग्णाईत आणि वयस्कर असल्याने तिचे सर्व जागेवरच करावे लागणे : माझी आई रुग्णाईत असल्याने मी गेल्या १० मासांपासून (महिन्यांपासून) घरी होतो. डिसेंबर २०१४ मध्ये माझी आई पलंगावरून खाली पडल्यामुळे तिच्या हाताचा अस्थिभंग झाला. त्यामुळे शस्त्रकर्म करून (प्लेट घालून) तिचा हात सरळ करावा लागला. ७ दिवस रुग्णालयात ठेवून मी तिला घरी घेऊन आलो. आईचे वय ८४ वर्षे आहे. ती पुष्कळ अशक्त आहे. त्यामुळे ती पलंगावर झोपूनच असे. तिचे सर्व पलंगावरच करावे लागत होते.

सर्वत्रची फुलपाखरे आणि रामनाथी आश्रमातील समाधी लावणारी फुलपाखरे !

डॉ. अजय जोशी
१. सर्वत्रची फुलपाखरे
१ अ. फुलपाखरे थव्याने रहातात ! : फुलपाखरांना थव्याने (समूहात) रहायला पुष्कळ आवडते; कारण ते त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे. त्यांना जरी ऐकू येत नसले, तरी कंपन स्पंदनाची त्यांना जाणीव होते. त्यांची घ्राणेंद्रिये उत्तम कार्य करतात. मानवाला जीभेद्वारे रुचीची जाणीव होते, तर फुलपाखरांना ही जाणीव पायांद्वारे होते आणि अँटिनेद्वारे (AAnntteennnnaaee - फुलपाखरांचे डोक्यावर मिशासारखे दिसणारे दोन तंतू) वासाची जाणीव होते.
१ आ. फुलपाखरे थंड रक्ताचे जीव असणे : फुलपाखरांना थंडीच्या दिवसांत उन्हात बसायला आवडते. ते त्यांच्या पंखाची हालचाल करून उष्णता निर्माण करतात. त्यांना उष्ण हवेची आवश्यकता नाही; कारण ते थंड रक्ताचे जीव आहेत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी 'ऊठ' म्हणून सांगणार नाही. असे बोला की, 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर 'ऊठ' असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ

परात्पर गुरु डॉ. आठवले
'एका वर्षात १२ मास असतात. प्रत्येक मासात ४ आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात ७ वार असतात. प्रत्येक वारात २४ घंटे (तास) असतात. प्रत्येक घंट्यात ६० मिनिटे असतात आणि प्रत्येक मिनिटात ६० सेकंद असतात. त्यामुळे एखाद्या सेकंदाचा काळाच्या संदर्भात उल्लेख करायचा असेल, तर तो वर्ष २०१५ मधील जुलै मासांतर्गत तिसर्‍या आठवड्यातील गुरुवार, सकाळी १० वाजून १० मिनिटे आणि १० सेकंद अशा तर्‍हेने करावा लागेल. 
तसेच युगांच्या संदर्भात आहे. काळाचे मोजमापन सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या आधारे केले जाते. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या चक्रातील प्रत्येक युगात काळाची ४ छोटी युगेही काळानुसार येतात. त्यातील काळाच्या छोट्या चक्रातही काळाची आणखीन छोटी चक्रे असतात. त्यानुसार एका छोट्या चक्रातील कलियुगानंतर दुसर्‍या चक्रातील कलियुग येते. अशी अनेक छोटी कलियुगे असतात. अशी एकाच्या अंतर्गत दुसरे अशी ५ कलियुगे आतापर्यंत झाली आहेत. त्यापुढील सहाव्या युगचक्रातील सत्ययुग २०२३ या वर्षी येणार आहे. '२०२३ या वर्षी (१) कलियुगांतर्गत (२) कलियुगांतर्गत (३) कलियुगांतर्गत (४) कलियुगांतर्गत (५) कलियुगांतर्गत (६) कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे', असे जे आपण सांगतो, त्याचा अर्थ बर्‍याच जणांना कळत नाही. तो वरील उदाहरणावरून लक्षात येणे सुलभ जाईल. '
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१२.२०१५)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक साक्षरता वाढवावी 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      भक्तीच्या माध्यमातून साधकांचा समजूदारपणा, बुद्धीची प्रगल्भता आणि मनाची जाणीव व्यापक झाली की, परमार्थाची दारे उघडतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

चला शनिशिंगणापूर !

संपादकीय
       देवाजवळ जाण्यापासून महिलांना रोखण्याचा भेदभाव का ? सध्याच्या कुठल्याही बुद्धीवादी माणसाला पडावा असा हा वरवर अगदी साहजिक वाटणारा; परंतु त्याची पाळेमुळे खोलवर गेलेला प्रश्‍न काहींना पडला आहे. त्यामुळे एवढ्या साध्या गोष्टीला विरोध करणारे ते संकुचित, प्रतिगामी, बुरसटलेले, अंधश्रद्ध इत्यादी असे ठरवले गेले आहेत. उग्रदेवता शनीच्या प्रकटशक्तीचा महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्याजवळ महिलांनी न जाण्याची परंपरा धर्माने सांगितली आहे, हे सूक्ष्म स्तरावरील सनातन सांगत असलेले या पाठीमागील धर्मशास्त्र ऐकण्याच्या स्थितीत दुर्दैवाने कोणीही नाहीत. शल्यचिकित्सागृहात, मोठी अणूभट्टी किंवा वायूच्या साठ्याच्या ठिकाणी जशी काळजी घ्यावी लागते, तसेच हे अगदी साधे सोपे गणित आहे. जसे सूक्ष्म जिवाणू डोळ्यांना दिसत नाहीत; पण संसर्ग तर होतो, तशीच ही सूक्ष्म ऊर्जा आहे. ही बंधने घालून धर्माने महिलांची विशेष काळजी घेतली आहे, हे विरोध करणार्‍यांच्या लक्षात येत नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn