Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पूर्णिया (बिहार) येथे ४० सहस्र मुसलमानांची हिंसक निदर्शने

  महंमद पैगंबर यांच्यावरील कथित वक्तव्याचे प्रकरण
 • कुठल्याही प्रकरणात उठसूट हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून चर्चासत्रे घेणारी प्रसारमाध्यमे धर्मांधांच्या या हिंसक कृतींविषयी साधे वृत्त तरी दाखवतील का ?
 • स्वत:चे रक्षण करू न शकणारे पळकुटे पोलीस जनतेचे रक्षण कधी करू शकतील का ?
 • धर्मांधांचे पोलीस ठाण्यावर आक्रमण
 • पोलीस ठाणे सोडून पोलिसांचे पलायन
 • अद्याप कुणालाही अटक नाही
      पूर्णिया (बिहार) - हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या कथित वक्तव्याच्या प्रकरणाचे निमित्त करून सुमारे ४० सहस्र मुसलमानांनी मालडा (बंगाल) पाठोपाठ आता पूर्णिया येथेही हैदोस घातला. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

अल्-कायदाच्या आतंकवाद्यास बेंगळुरूत अटक !

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !
  बेंगळुरू - अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्यास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बेंगळुरूतून अटक केली. मौलाना अंजर शाह असे त्याचे नाव असून त्याच्यावर या संघटनेचे महत्त्वाचे दायित्व सोपवण्यात आले होते. अटकेनंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने शाह याला पटियाला हाऊस न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यास २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
१. भारतात आतापर्यंत अल्-कायदाच्या महंमद आसिफ, जफर मसूद आणि अब्दुल रहमान या ३ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली असून शाह हा अटक करण्यात आलेला चौथा आतंकवादी आहे.
२. मौलाना शाह हा आसिफ या आतंकवाद्याच्या घरी गेला होता. त्या वेळी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी त्याला अटक केली.
३. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना शाह भारतात अल्-कायदाचे पुनरुज्जीवन करण्याच्या षड्यंत्रात महत्त्वाची भूमिका बजावत होता.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन नाकारला

     नवी देहली - गेल्या २ वर्षांपासून कथित बलात्कारप्रकरणी कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना न्यायालयाने जामीन नाकाराला आहे. अभिनेता सलमान खानविरुद्धच्या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पू. बापू यांनी जामिनासाठी आवेदन केले होते.

पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी २ संशयितांना अटक

अशा फितुरांना कठोर शासन केल्यास पुढे होणारी देशाची हानी टाळता येईल !
     नवी देहली - पठाणकोट हवाई तळावर घुसण्यास साहाय्य केल्याच्या संशयावरून या तळावरील २ फितूर कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका कर्मचार्‍यावर माहिती पुरवल्याचा संशय आहे. संशयीत आरोपी हा सैन्याच्या अभियांत्रिकी सेवा विभागाचा चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. ज्या भागातून आतंकवादी हवाई तळाच्या आवारात घुसले, ते स्थान सैन्याच्या अभियांत्रिकी सेवा विभागाच्या देखभाल कार्यशाळेच्या जवळच आहे, तसेच आतंकवाद्यांनी भिंतीवरून हवाई तळाच्या आवारात प्रवेश केला, त्या वेळी तेथील दिवे बंद होते.

शाळांमध्ये राष्ट्रध्वजाच्या संदर्भात प्रवचन घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला अनुमती देऊ ! - विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ ! 
नाशिक आणि नंदुरबारचे पालकमंत्री श्री. गिरीश
महाजन यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे
शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना निवेदन देतांना
(डावीकडून) श्री. सतीश सोनार आणि सौ. शर्मिला बांगर
मुंबईच्या महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांना निवेदन देतांना (डावीकडून)
सौ. शर्मिला बांगर, श्री. सतीश सोनार आणि श्री. अरविंद पानसरे
     मुंबई, ८ जानेवारी (वार्ता.) - राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला शाळेतील मुलांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने घेण्याची अनुमती देण्यात येईल, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे श्री. सतीश सोनार, सौ. शर्मिला बांगर आणि राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

(म्हणे) सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा हातात घेतील आणि सनातनच्या संस्था रहाणार नाहीत ! - नारायण राणे

१५ मिनिटांत ७५ कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी देणार्‍या ओवैसी
 यांच्या विरोधात काहीही न बोलणार्‍यांची धर्मप्रेमी सनातनला मात्र चेतावणी !
     मुंबई - सनातन ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे पिल्लू आहे. या संस्थेला कोण पैसा पुरवते ? यांचे आर्थित स्रोत तपासावेत. सनातनवाल्यांना रान मोकळे आहे का ? ते रस्त्यावरून जाणार नाहीत का ? सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा घेतील हातात आणि महाराष्ट्रात सनातनच्या संस्था रहाणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सनातनला चेतावणी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची स्वाभिमान संघटनेचे नेते नीतेश राणे यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, राज्यशासनाचा सनातनवर वचक नाही. अशा प्रकारे गोळ्या, धमक्या यांचीच भाषा केली जाणार असेल, तर आम्ही काय गप्प बसणार्‍यांपैकी आहोत का ?

राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी करण्याचे लोण

शासनाने मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे धोरण स्वीकारल्यामुळेच मराठीची
 गळचेपीच होणार आहे. मराठी भाषेला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी शासनाने
 सर्वच स्तरांवर प्रयत्न करून तिला चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा ! मराठी
 भाषेला खरी उर्जितावस्था ही हिंदु राष्ट्रातच मिळेल, हे निःसंशय !
     पुणे - विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची उणीव राहू नये, या दृष्टीने राज्यात इयत्ता १ लीपासून सेमी इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली. इयत्ता १ ली पासून गणित आणि विज्ञान हे विषय ऐच्छिक पद्धतीने इंग्रजी माध्यमातून शिकवण्याच्या संकल्पनेला शासनाने वर्ष २००४ मध्ये अनुमती दिली. प्रत्यक्षात त्याचे तपशील, नियमावली आणि निर्णय हा शासनाने १९ जून २०१३ या दिवशीपासून नवा अभ्यासक्रम आल्यानंतर जाहीर केला. (शिक्षण विभागाचा कूर्मगतीचा कारभार ! - संपादक) इंग्रजीतून शिक्षण हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाल्यामुळे शाळा टिकवण्यासाठी त्या सेमी इंग्रजी करण्याचे लोणच राज्यभर पसरले आहे.

१० जानेवारी या दिवशी सांगोल्यात (जिल्हा सोलापूर) ग्रंथालय संघाचे भव्य अधिवेशन

      सांगोला (जिल्हा सोलापूर) - सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि सांगोला तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा येथे १० जानेवारी या दिवशी होणार आहे. सांगोला येथील पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात रविवारी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पाटील यांनी दिली.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांसह स्थानिक आमदार श्री. गणपतराव देशमुख, माजी विधान परिषद सदस्य श्री. दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. दत्तात्रय क्षीरसागर, तालुका ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष श्री. रामदास भोसले यांसह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ग्रंंथालय, ग्रंथालयाचे कार्यकर्ते आणि कर्मचारी यांना विविध पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा आमदार श्री. दत्तात्रय सावंत, माजी आमदार अधिवक्ता श्री. शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. या वेळी परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

श्रीपाल सबनीस यांच्यावर पुस्तकांच्या खरेदीत गैरव्यवहार आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप

     संभाजीनगर - जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात तौलनिक भाषा विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस हे काम करत होते. त्या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसीकडून) करण्यात आलेल्या खरेदीत सबनीस यांनी लिहिलेली ६ पुस्तके आणि त्यांना भेट म्हणून आलेली २७ पुस्तके यांचा समावेश होता. या खरेदीत १० सहस्रांहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची शैक्षणिक कारकीर्दही पुस्तकांच्या खरेदीतील अपव्यवहाराच्या आरोपाने वादग्रस्त ठरल्याचे समोर आले आहे. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात अद्याप प्रलंबित आहे. या संदर्भात डॉ. सबनीस यांना विचारले असता, त्यांनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात असून त्यावर बोलता येणार नाही, असे सांगितले.

सनातनच्या अधिवक्त्यांनी दिलेल्या अनाहूत सल्ल्यावर इतका गहजब घालण्याचे कारणच काय ? - दैनिक सामना

सनातनच्या विरोधात नाहक गरळ ओकणार्‍यांच्या विरोधात दैनिक सामनामधून
 सडेतोड लिखाण केल्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे आभार !
दैनिक सामनातील संपादकियातून सनातनद्वेष्ट्यांवर ओढले आसूड
 
    मुंबई - सबनीस हे जणू महाराष्ट्र आणि समाज यांचे अनमोल रतन असल्याप्रमाणे सध्या प्रत्येक जण त्यांची काळजी वाहतांना दिसत आहे. महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे या दोघांवरही ते मॉर्निंग वॉकला गेलेले असतांनाच आक्रमण झाले होते. त्यांचे खरे मारेकरी अजून सापडू शकले नाहीत, हे सत्य नाकारता येत नाही. आता तब्येत सांभाळा, फ्रेश रहा, असे श्रीपाल सबनीसांना सनातनवाल्यांनी सांगितले आहे; पण त्यात इतका गहजब घालण्याचे कारणच काय ?, असा सडेतोड प्रश्‍न ८ जानेवारीच्या दैनिक सामनामध्ये मॉर्निंग वॉकची दहशत या संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला आहे.
संपादकियामध्ये पुढे म्हटले आहे की,

(म्हणे) सबनीस यांना विरोध करणार्‍यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ !

काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांचे चिथावणीखोर
 वक्तव्य अशा वक्तव्यांविषयी वृत्तवाहिन्या चर्चासत्र घेतील का ?
     पुणे, ८ जानेवारी - श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले विधान मी ऐकले असून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. सध्या सबनीस यांना धमक्या देण्यात येत आहेत. हे योग्य नसून विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. कोण कुठे वॉकला जातो, हे आम्हालाही माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे सबनीस कुंटबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांनी घाबरत कामा नये. गोळ्यांची भाषा केल्यास आम्ही त्याच भाषेत उत्तर देण्यास समर्थ आहोत, असे वक्तव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पुणे वाहतूक विभागाने वर्ष २०१५ मध्ये केली २० कोटी रुपयांची दंडवसुली

पुण्याची बेशिस्त पुणे अशी नवी ओळख निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
 दंड आकारूनही वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नसल्याने पोलीस प्रशासनाने
 आणखी कठोर कारवाई केल्यासच त्याला काही प्रमाणात आळा बसेल !
     पुणे - पुणे वाहतूक विभागाने वर्ष २०१५ मध्ये २० कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यात वाहतूक नियंत्रक दिव्याचे नियम न पाळणारे आणि शिरस्त्राण परिधान न करणारे यांच्याकडून सर्वांत जास्त वसुली करण्यात आली आहे. ही वसुली मागील दोन वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. वर्ष २०१४ मध्ये ही वसुली १२ कोटी ८१ लक्ष ३३ सहस्र २५० रुपये इतकी होती.

नियमांचे उल्लंघन करून परदेशी नागरिकाला पॅन कार्ड परदेशी नागरिकाने या पॅन कार्डचा अपवापर केल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

     मुंबई - केवळ भारतीय नागरिकांना पॅन कार्ड देणे बंधनकारक असतांनाही जल युसूफ या परदेशी नागरिकाला हे कार्ड दिल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र असंतोष व्यक्त केला. केंद्र सरकारच्या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना ८ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेशही खंडपिठाने दिले आहेत. जल युसुफ हे परदेशी नागरिक असूनही त्यांना केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडून पॅन कार्ड देण्यात आले आहे. या कार्डवरून एच्एस्बीसी आणि बाँबे मर्कंटाइल बँकेतही त्यांनी खाते उघडले आहे. मुंबईत मालमत्ताही खरेदी केली आहे.

सबनीस यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे ! - रामदास फुटाणे

आतातरी श्रीपाल सबनीस यातून बोध घेतील का ?
     पुणे, ८ जानेवारी - सबनीस यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. (सबनीस यांच्या चुकीच्या वक्तव्यावर एकही साहित्यिक असे उघडपणे का बोलत नाही ? - संपादक) यामुळे राजकीय पक्षांनी त्यांना धमकावणे, या घटना तर निषेधार्हच आहेत. निवडणूक असल्यामुळे संमेलनाध्यक्षपदी कोणीही निवडून येत आहे, त्यामुळे आतातरी साहित्य महामंडळाने निवडणूक पद्धत बंद करायला हवी. (साहित्य महामंडळाने खर्‍या अर्थी निवडणूक पद्धत बंद करून खरे विचारवंत, नीतिमान, सुसंस्कृत आणि राष्ट्राभिमानी साहित्यिक यांना संमेलनाध्यक्ष करावे. तसा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ घेईल का ? - संपादक) यासाठी महामंडळाने वेळीच प्रयत्न करायला हवे होते. महामंडळाचे पदाधिकारी विचारवंत असून त्यांनी ठरवले, तर निवडणूक रहित होऊ शकते आणि ज्येष्ठ लेखकाला हे पद सन्मानाने मिळू शकते. आज संमेलनासाठी पोलीस संरक्षण मागवावे लागत आहे. उद्या लष्करालाच बोलवावे लागेल, अशा शब्दांत साहित्यिक रामदास फुटाणे यांनी संमेलन आणि सध्या चालू असलेल्या वादावर टीका केली.

सनातनवर आरोप करून भ्रष्टाचारावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा नवाब मलिक यांचा हेतू ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

एबीपी माझा वाहिनीवरील चर्चासत्र
डावीकडून अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर,
नम्रता वागळे आणि नवाब मलिक
     मुंबई - मी केलेल्या ट्विटवरून मुख्यमंत्र्यांकडे माझ्यावर कारवाईची मागणी करणार्‍या मलिकांनी रझा अकादमीने दंगल केली, त्या वेळी मुख्यमंत्र्यांना असे पत्र का लिहिले नाही ? त्यामुळे मलिकांचेच प्राधान्य ठरवण्याची वेळ आली आहे. सातत्याने सनातनवर आरोप करून भ्रष्टाचारावरून लोकांचे लक्ष विचलित करणे, हा नवाब मलिक यांचा हेतू आहे, असे परखड वक्तव्य हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी ७ जानेवारी या दिवशी एबीपी माझा वाहिनीवरील चर्चासत्रात केले. या चर्चासत्रात त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन नम्रता वागळे यांनी केले.

उच्च न्यायालयाकडून सिद्धेश्‍वर यात्रा आयोजनाचे सर्वाधिकार जिल्हाधिकार्‍यांना

    सोलापूर - उच्च न्यायालयाने यात्रा आयोजनाचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकार्‍यांना एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी बहाल केले आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर सिद्धेश्‍वर यात्रेचा वाद मिटला असे म्हटले जात होते; मात्र या निर्णयामुळे पुन्हा वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
१. उच्च न्यायालयाने माय सोलापूर स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हा निर्णय दिला.
२. शौचालय, धूळ नियंत्रण आणि सुरक्षा अशा २९ मागण्या उच्च न्यायालयाने मान्य केल्या. तसेच आपत्कालीन रस्ता वापरायलाही अनुमती दिली.

संस्कृतीप्रेमींना दिसते, ते प्रशासनाला का दिसत नाही ?

     गिरी, म्हापसा (गोवा) येथे ग्रीनपार्क हॉटेलजवळ महामार्गाच्या बाजूला लोकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांची अश्‍लील चित्रे असलेला विज्ञापन फलक (होर्डिंग) लावण्यात आला होता. या विरोधात चेतावणी देणारे निवेदन स्थानिक संस्कृतीप्रेमी हिंदूंनी ४ जानेवारी २०१६ या दिवशी प्रशासनाला दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी हा विज्ञापन फलक काढण्यात आला.

ध्वनीप्रदूषणद्वारे सामान्यांना त्रास देणार्‍या प्रार्थनास्थळावरील अवैध ध्वनीक्षेपक जप्त करा ! - माळी गल्ली परिसरातील नागरिकांचे मिरज शहर पोलीस ठाण्यात निवेदन

प्रत्येक वेळी ध्वनीप्रदूषण कायद्याचे नियम हिंदूंसाठीच का ?
     मिरज - शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये माळी गल्ली येथील शिंदे किराणा दुकान ते बसवेश्‍वर किराणा दुकान या भागात आमच्या माहितीनुसार अवैध मदरशात पहाटे ५ वाजता कर्णकर्शक स्वरात ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरून मोठ्या आवाजात बांग दिली जाते. यामुळे सामान्य नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले यांना गेली अनेक वर्षे पुष्कळ त्रास होत आहे. या संदर्भात तक्रार दिल्यावर ध्वनीक्षेपक तात्पुरता बंद होतो आणि परत चालू होतो. माहिती अधिकार कायद्यानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे या मदरशाला ध्वनीक्षेपकाची अनुमती देण्यात आलेली नाही. तरी ध्वनीप्रदूषण करून सामान्य नागरिकांना त्रास देणार्‍या प्रार्थनास्थळावरील ध्वनीक्षेपक जप्त करा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी मिरज शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रगती मैदान (देहली) येथे आजपासून जागतिक पुस्तक मेळ्याला आरंभ

सनातन संस्थेच्या अनमोल ग्रंथप्रदर्शनाचाही सहभाग !
     देहली - प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील प्रगती मैदानावर ९ ते १७ जानेवारी या कालावधीत जागतिक पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचा सहभाग असून जिज्ञासूंना या प्रदर्शनावर असलेल्या अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांवरील अनमोल ग्रंथांचा लाभ होणार आहे.
इंग्रजी ग्रंथप्रदर्शनाचा पत्ता - हॉल क्रमांक १८ मध्ये स्टॉल क्रमांक ८९
हिंदी ग्रंथप्रदर्शनाचा पत्ता - हॉल क्रमांक १२ए मध्ये स्टॉल क्रमांक ३०६ आणि स्टॅण्ड क्रमांक एस्१/६
ग्रंथप्रदर्शनाची वेळ - सकाळी ११ ते रात्री ८

१० जानेवारीच्या हिंदु धर्मजागृती सभेत हिंदु एकतेचा अविष्कार होणार ! - हिंदु जनजागृती समिती

नंदुरबार येथे पत्रकार परिषद
डावीकडून सौ. निवेदिता जोशी, डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. दिलीप ढाकणे-पाटील
     नंदुरबार - राष्ट्रावर होणारे आघात आणि हिंदु धर्म अन् संत यांची होणारी अपकीर्ती यांविषयी जनप्रबोधन आणि हिंदूसंघटन करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १० जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेत हिंदु एकतेचा अविष्कार होणार, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, सनातन संस्थेच्या सौ. निवेदिता जोशी, हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे श्री. दिलीप ढाकणे-पाटील उपस्थित होते.

थकवा येऊ नये; म्हणून वेदनाशामक गोळ्या घेऊन आतंकवादी करत होते गोळीबार !

पठाणकोट आक्रमणाचे प्रकरण
     नवी देहली - पठाणकोट प्रकरणातील आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या नूर खान एअरबेस हवाईदलाच्या तळावर अनेकदा मॉक ड्रिल (प्रात्यक्षिक) केले आणि त्यानंतरच त्यांनी पठाणकोट हवाईदलाच्या तळावर आक्रमण घडवून आणल्याचे समोर आले आहे, असा दावा गुप्तचर संस्थांकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर आक्रमणाच्या वेळी थकवा येऊ नये, यासाठी ते वेदनाशामक गोळ्या घेत होते, असेही गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. 

आपत्कालीन रस्त्यासह होम मैदान देवस्थानकडेच ! - मुख्यमंत्री

     सोलापूर - ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेच्या अनुषंगाने निर्माण झालेले अडथळे दूर झाले असून वादग्रस्त आपत्कालीन रस्ता पूर्णपणे यात्रेसाठी देवस्थान समितीला खुला करून देण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, खासदार अधिवक्ता शरद बनसोडे यांसह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षासाठी वादग्रस्त आपत्कालीन रस्त्यासह संपूर्ण होम मैदान गड्डा यात्रेसाठी देवस्थान समितीला मोकळे करून देण्याचे आदेश दिला.

शनिमंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी गावोगावी प्रसार करणार ! - धर्माभिमान्यांचा निर्धार

भूमाता ब्रिगेड आणि कथित पुरोगामी यांचा शनिमंदिराच्या 
चौथर्‍यावर चढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध ! 
     नगर, ८ जानेवारी (वार्ता.) - पुरोगामित्वाच्या नावाखाली शनिमंदिराच्या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रसिद्धीलोलुप महिलांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध होत असल्याचे पहायला मिळत आहे. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चौथर्‍यावर चढण्यापासून रोखण्यासाठी देवस्थानाला सुरक्षाकडे करण्यात येणार आहे.

१६ मासांपूर्वी गुप्तचरांकडून सूचना मिळूनही पठाणकोट आक्रमण रोखण्यात सुरक्षायंत्रणांना अपयश !

 • गुप्तचरांकडून मिळणार्‍या माहितीचा उपयोग केला जात नसेल, तर गुप्तचर विभाग हवाच कशाला ? 
 • सूचना मिळून त्याविषयी निष्काळजी रहाणार्‍या सुरक्षायंत्रणांच्या हाती देश काय सुरक्षित रहाणार ?
     नवी देहली - पठाणकोट येथील सैन्याच्या विमानतळावर आक्रमण होणार, अशी सूचना गुप्तचरांनी पूर्वीच दिली होती. या दृष्टीकोनातून १६ महिन्यांपासून अलर्ट होता. मागील २ महिन्यांमध्ये या भागात १४ जणांना अटकही झाली होती; मात्र तरीही भारतीय सुरक्षायंत्रणा हे आक्रमण रोखू शकले नाहीत. ३० ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी सुनील कुमार या सैन्याच्या अधिकार्‍याला अटक केली होती. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील महिला गुप्तहेराला फेसबूकद्वारे माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. मागील दोन महिन्यांत अब्दुल राशीद, फरीद खान, कैफियतउल्लाह, रंजीत, अश्‍विनी कुमार, मोहंमद एजाज, दीना खान, इमामुद्दीन, गोवर्धनसिंह राठौड़ आणि बीरबल खान यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व देहली, पंजाब आणि राज्यस्थान आदी राज्यांतील नागरिक किंवा सेनेचे अधिकारी आहेत. या सर्वांनी सैन्याची महत्त्वपूर्ण माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याचा संशय आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात, राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे शासनाला निवेदन सादर

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा चळवळ !
कर्णावती (अहमदाबाद) येथे जिल्हाधिकारी राजकुमार
बेनीवाल यांना निवेदन सादर करतांना श्री. वैभव आफळे
आणि इतर हिंदु धर्माभिमानी
      मुंबई - प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन देण्यात आले. गुजरातमधील कर्णावती येथे जिल्हाधिकारी राजकुमार बेनीवाल, तसेच बडोदा येथील जिल्हाधिकारी सौ. अवंतिका सिंह यांना ४ जानेवारी या दिवशी निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी कर्णावती येथे धर्माभिमानी सर्वश्री मुक्तेश सिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्रीरंग दातार, वैभव आफळे सनातन संस्थेच्या सौ. दीप्ती रामी, सौ. नीला कद्रेकर, सौ.पारुल मांडे, तर बडोदा येथे ओम साई मित्र मंडळाचे श्री. भारद्वाज, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मनीषा गोडबोले, सनातन संस्थेच्या सौ. पल्लवी अभ्यंकर उपस्थित होत्या.

फलक प्रसिद्धीकरता

पंतप्रधानांच्या विकासाच्या कार्यक्रमाला खिळ बसणारे हे प्रसंग थांबणार कधी ?
     हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या कथित अनुद्गाराच्या प्रकरणाचे निमित्त करून बंगालच्या मालडानंतर आता बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे ४० सहस्र धर्मांधांनी हैदोस घातला आणि पोलीस ठाण्यात तोडफोड केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Biharke Purniya me Musalman sangathan dwara nikale gaye morche ke samay police thane me todphod. - Shasan yaha deshdroha kaise rokengi ?
जागो !
     बिहार के पूर्णिया में मुसलमान संगठन द्वारा निकाले गए मोर्चे के समय पुलिस थाने में तोडफोड ! - शासन यह देशद्रोह कैसे रोकेगी ?

हिंदु जनजागृती समितीच्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा ! - ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी

    सांगली - नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने अन्य हिंदुत्ववादी संघटनांसह जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनासाठी वेळप्रसंगी सांगलीतून महिला वारकरी जाण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्‍वरी भजनी मंडळाच्या ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी यांनी कळवली आहे. (हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याची सिद्धता दर्शवणार्‍या ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी यांचा आदर्श इतरांनी घ्यावा ! - संपादक)

अमेरिकेतील आस्थापनाने संपावर गेलेल्या १९० मुसलमानांना कामावरून काढून टाकले !

नमाजपठणाची सवलत बंद केल्याच्या निषेधार्थ संप पुकारल्याचे प्रकरण
     वॉशिंग्टन - नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्‍यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या मांस आस्थापनाने कामावर काढून टाकले आहे.
    कामावरून काढून टाकण्यात आलेले बरेचसे कर्मचारी सोमालिया देशातील आहेत. कारगिल मीट कॉम्प्लेक्स या आस्थापनात काही वर्षांपासून मुसलमान कर्मचार्‍यांसाठी नमाज पठणासाठी वेगळी खोली ठेवण्याची मूभा देण्यात येत होती; मात्र नमाज पठणानंतर या कर्मचार्‍यांच्या पुन्हा कामावर येण्याच्या वेळेत अनियमितता येऊ लागली होती. त्यामुळे आस्थापनाच्या निरीक्षकाने ही सोय बंद करण्याचा निर्णय घेतला. याच्या विरोधात मुसलमान कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवून संप पुकारला. त्यानंतर संपावर गेलेल्या या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला. यासंदर्भात काऊन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स या संघटनेचे प्रवक्ता म्हणाले, नमाजपठण न करून अल्लाच्या आशीर्वादापासून वंचित रहाण्यापेक्षा नोकरी सोडून देणे त्यांनी निवडले.

धर्मसंकटाची तीन तोंडे !

     ७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखाच्या पूर्वार्धात आपण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि ख्रिस्ती मिशनरी यांमुळे हिंदु धर्माला आलेली उतरती कळा यांचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण विविध धर्मसंकटे आणि त्यावरील उपाययोजना पाहूया.
११. ख्रिस्ती झाल्याविषयी एखाद्या पाद्य्राचे पत्र पुढे केले की, 
चटकन चाकरी मिळते; पण हाडाच्या हिंदूला चाकरी मिळू 
शकत नाही, हा शासनाचा नादानपणा ! 
     आमच्या शासनाचा हा नादान दुबळेपणाच धर्मांतराला प्रत्यक्ष साहाय्य करत आहेत. जे खरेखुरे ख्रिस्ती आहेत, ते काही अस्पृश्यांसाठी राखून ठेवलेल्या जागांचा लाभ घेत नाहीत. हिंदु धर्मावर विश्‍वास असूनही दारिद्य्रामुळे चाकरीची आवश्यकता असणार्‍यांनाच (त्यातही ब्राह्मण म्हटला की, कुठेही त्याची सोय होऊ नये, अशीच सोय असते !) ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले की, चाकरी मिळण्याचा संभव असतो. ही लाजिरवाणी स्थिती पाहून किळस येते. हाडाच्या हिंदूला चाकरी मिळू शकत नाही आणि तेच त्याने ख्रिस्ती झाल्याविषयी एखाद्या पाद्य्राचे पत्र पुढे केले की, चटकन चाकरी मिळते ! अशा रितीने शासनच ख्रिस्ती धर्माच्या प्रसारास प्रोत्साहन देत आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

पाश्‍चात्त्य जीवनशैलीमुळे अमेरिकेतील कुटुंबव्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम !

      नुकतेच ब्रिटनमधील द इकॉनॉमिस्ट या प्रतिष्ठित वृत्तपत्राने एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामुळे पाश्‍चात्त्य जगातील विचारवंतांनाही चक्रावून सोडले आहे. या अहवालाचे शीर्षक आहे २१ व्या शतकात अमेरिकी कुटुंबांचे भवितव्य ! हा अहवाल शिकागो विश्‍वविद्यालयाच्या राष्ट्रीय वैचारिक संशोधन केंद्राने २४.११.१८८८ मध्ये सादर केला होता. या अहवालातील काही सूत्रे खालीलप्रमाणे आहेत.
१. अमेरिकेतील कुटुंबव्यवस्थेची दारूण सद्यस्थिती
     अमेरिकेतील कुटुंबव्यवस्थेमध्ये कुटुंब चालवणे आणि मुलांचे संगोपन यांमधील विवाहसंस्थेचे महत्त्व न्यून झाले आहे. वर्ष १८६० ते वर्ष १८८८ पर्यंतच्या ३६ वर्षांत घटस्फोटांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. वर्ष १८८० मध्ये अविवाहित मातांची संख्या ५ टक्के होती, ती वर्ष १८८८ मध्ये वाढून ३२ टक्के झाली. वर्ष १८७२ मध्ये ७२ टक्के मुले ही त्यांच्या विवाहित आई-वडिलांसमवेत रहात होती; पण वर्ष १८८६ मध्ये मात्र ती संख्या घटून ५२ टक्के मुलेच त्यांच्या आई-वडिलांसमवेत रहातात. अमेरिकेत विवाहित स्त्री-पुरुषांनाही मुले नको असतात. वर्ष १९७२ मध्ये ४५ टक्के जोडप्यांना मुले नव्हती, तर १८८६ मध्ये ६२ टक्के जोडप्यांना मुले नव्हती.

दाऊदसारख्यांचे उदात्तीकरण माध्यमे कधी थांबवणार ? - खासदार श्री. संजय राऊत, कार्यकारी संपादक, दैनिक सामना

१. एखाद्या घटनेवर अतिरेक्यांची मुलाखत घेऊन ती ब्रेकिंग न्यूज 
म्हणून दाखवणार्‍या राष्ट्रघातकी वृत्तवाहिन्या !
     दाऊद हा जणू शांतीदूत आहे, अशा थाटात त्याच्या साठीचे वर्णन आणि तयारीविषयीचे वृत्त दिले जात होते. पाकिस्तानात दाऊद इब्राहिम काय करतोय ?, देहलीत छोटा राजनचे कसे चालले आहे, अशा बातम्यांपासून वाचकांना मुक्ती कधी मिळणार ?, असा प्रश्‍न एका तरुण वाचकाने दूरभाष करून विचारला. लोकांच्या मनातील प्रश्‍न त्याने विचारला आहे. दाऊदचा साथीदार छोटा शकील हा कुणी संत-समाजसेवक आहे, अशा पद्धतीने त्याच्या उदात्त विचारांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. एखाद्या घटनेवर महत्त्वाच्या वृत्तवाहिन्या अशा अतिरेक्यांच्या प्रतिक्रिया घेतात आणि त्या ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवतात. परमात्मा (?) छोटा शकील यांनी त्यांच्या ताज्या मुलाखतीत असे घोषित केले आहे की, काही झाले तरी आमची गँग तिहार कारागृहात घुसून छोटा राजनला मारणार आहे ! हे क्रांतिकारी उद्गार माध्यमांनीही ठळकपणे छापले, याचे आश्‍चर्य वाटते. या पत्रकारितेस काय म्हणावे ?, असा प्रश्‍न पडला.

साहित्य संमेलनाची फलनिष्पत्ती काय ?

      पुण्यातील पिंपरी येथे जानेवारी २०१६ मध्ये ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात करण्यात आले. या संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी २७ डिसेंबर या दिवशी एक पूर्वसंमेलन पार पडले. स्थानिक साहित्यिकांचा सहभाग वाढवणे आणि मुख्य संमेलनाच्या सिद्धतेचा आढावा घेणे, अशी या पूर्वसंमेलनाची दोन उद्दिष्टे होती. सारस्वतांच्या या मेळ्यामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाला चालना देणे, तसेच मराठी भाषेविषयी सामान्यांमध्ये रुची निर्माण करणे या उद्देशाने अनेक कार्यक्रमांची आखणी व्हावी, अशी अपेक्षा असते. वारेमाप पैसा खर्च करून प्रतिवर्षी डामडौलात हे साहित्य संमेलन पार पडते; मात्र यातून ठोस फलनिष्पत्ती म्हणून काय हाती लागते, याचा विचार केला, तर उत्तर समाधानकारक मिळत नाही. संमेलनासाठी व्यय केला जाणार्‍या खर्चाच्या तुलनेत भाषा संवर्धनाचे प्रमाण अगदीच नगण्य आहेत. म्हणूनच अशा साहित्य संमेलनांचे आयोजन म्हणजे डोंगर पोखरून उंदीरही मिळत नाही, असा प्रकार आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     अमेरिकेत आतंकवादाला टेररिझम म्हणतात, पाकमध्ये त्याला जिहाद म्हणतात आणि भारतात त्याला सेक्युलरिझम म्हणतात. (१.८.२०१४)

आतंकवादी विचारसरणीकडे आकर्षित होण्यासाठी धर्मांधता कारण आहे, हे स्पष्ट सांगायला लाजता कशाला ?

     भारतीय युवक आतंकवादी विचारसरणीकडे आकर्षित होण्याचे कारण सामाजिक आणि आर्थिक नाही. - शरद कुमार, प्रमुख, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय
 • एन्.सी.ई.आर्.टी.च्या शालेय पुस्तकात श्री विठ्ठलाचा विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा जणेश्‍वर उल्लेख केल्याप्रकरणी विरोध करा !
 • विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे !
 • शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थान यांची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करा !
नालासोपारा
वेळ : सकाळी ११
स्थळ : पंचमुखी हनुमान मंदिर, सिवीक सेंटर समोर, स्टेशन मार्ग, नालासोपारा (पश्‍चिम)
भ्रमणभाष क्रमाक : ८४५०९ ५०४४७
ठाणे
दिनांक : ९ जानेवारी २०१६, वेळ - सायं. ५ ते ७
स्थळ : सॅटीस पुलाखाली, ठाणे पश्‍चिम रेल्वे स्थानकाबाहेर
संपर्क क्र. : ९३२४८६८९०६
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

एका महिलेच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून तिच्याविषयी चौकशी न करताच तिला आश्रमात आणल्याने झालेली गंभीर चूक !

१. एका महिलेने पोळ्यांचे यंत्र पहाण्यासाठी आश्रमात जाणार असल्याचे 
साधकाला सांगितल्यावर त्याने त्याविषयी स्थानिक साधकांकडे चौकशी न करणे
     काही दिवसांपूर्वी एका राज्यातील एका साधकाच्या शेजारी रहाणारी महिला साधकाला म्हणाली, शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह अन्न देण्याचे कंत्राट (काँटॅ्रक्ट) मला मिळाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांना चपाती देण्यास सांगितल्याने त्या बनवण्यासाठी मला यंत्र घ्यायचे आहे. त्यामुळे तुमच्या आश्रमातील चपाती बनवण्याचे यंत्र पहायला जाण्याविषयी मी एका हितचिंतकांशी बोलले आहे. त्यांनी मला तुम्ही सनातनच्या आश्रमात जा. तुमच्या शेजारी रहाणारे साधक तुम्हाला तेथे घेऊन जातील आणि आश्रमात ते यंत्र पहायला मिळेल, असे सांगितले आहे. माझ्यासमवेत अन्न तपासणारी अजून एक व्यक्तीही आश्रमात येणार आहे.

सनातन पंचांगमध्ये दिनविशेष प्रसिद्ध करण्यामागील दृष्टीकोन !

      सनातन पंचांगाविषयी समाजातून विचारले जाणारे काही प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे सर्वांनाच कळावीत, यासाठी प्रसिद्ध करत आहोत.
प्रश्‍न : सनातन पंचांगात पर्यावरणदिनासारखे आंतरराष्ट्रीय दिनविशेष प्रसिद्ध का होत नाहीत ?
उत्तर : सनातन पंचांग हे धर्मप्रसार आणि धर्मशिक्षण या उद्देशाने प्रकाशित केले जाते. त्यामुळे त्यात आंतरराष्ट्रीय दिनविशेषांचा उल्लेख नसतो.
प्रश्‍न : महात्मा फुले, राजर्षी शाहू इत्यादी सुधारकांचे स्मृतीदिन सनातन पंचांगात का प्रसिद्ध केले जात नाहीत ?
उत्तर : सनातन पंचांग हे धार्मिक विचारांचे असल्याने त्यात धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांचे स्मृतीदिन प्रसिद्ध करण्यास प्राधान्य दिले जाते.

घराचे घरपण टिकून रहाण्यासाठी उपयुक्त (कान)मंत्र !

१. सहा शब्दांचा मंत्र - माझी चूक झाली, हे खरे आहे.
२. पाच शब्दांचा मंत्र - हे तू फार छान केलेस !
३. चार शब्दांचा मंत्र - तुझे मत काय आहे ?
४. तीन शब्दांचा मंत्र - मी पाठीशी आहे.
५. दोन शब्दांचा मंत्र - आभारी आहे.
६. एका शब्दाचा मंत्र - आम्ही
७. कधी उच्चारू नये, असा मंत्र - मी
- चित्रकार श्री. राजा मराठे (संदर्भ : मासिक हितगुज, सप्टेंबर २०१५, मराठे प्रतिष्ठान, मुंबई)

केरळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसार कार्याचा नोव्हेंबर २०१५ चा आढावा

१. केरळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कारवर्गांचे आयोजन
     एर्नाकुलम् जिल्ह्यातील जनार्दन मंदिरात मुलांसाठी संस्कारवर्ग घेण्यात येतो. नोव्हेंबर २०१५ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन वर्ग घेण्यात आले. या वेळी कार्तिक पौर्णिमा, देवालय दर्शन आणि मानसपूजा, अशा विविध विषयांवर समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

दिवे लावण्याची गंमत

कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी
    वर्ष २०१५ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत मला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेथे मला संध्याकाळी दिवे (पणत्या) लावण्याची सेवा मिळाली. माझी सहसाधिका कु. श्रावणी पेठकर मला म्हणाली, चल ! आपण दिवे लावूया ! तेव्हा मला आठवले की, माझी एखादी चूक झाल्यावर माझे पू. आजोबा (सनातनचे पू. जयराम जोशी) मला म्हणतात, चांगले दिवे लावतेस ! ही गंमत मी श्रावणीला सांगितल्यावर ती म्हणाली, आपण आजोबांना भ्रमणध्वनी करून सांगूया की, आपण दिवे लावत आहोत !
- कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१२.११.२०१५)

आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवांना विशिष्ट जागेतच अंत्यसंस्कार करण्यामागील कारणमीमांसा

श्री. संतोष आनंदा गरुड
     मी पू. माईंच्या (प.पू. दास महाराज यांच्या धर्मपत्नीच्या) आई कै. (श्रीमती) इंदिरा डेगवेकर यांच्या संदर्भातील लिखाणाच्या सेवेत होतो. तेव्हा प.पू. दास महाराज यांच्याशी आध्यात्मिक अधिकार आणि अंत्यसंस्काराचे स्थान या विषयावर बोलणे झाले. यातील काही सूत्रे ५.१२.२०१५ या दिवशी प.पू. दास महाराजांनी प.पू. गुरुदेवांना कथन केली होती. प.पू. दास महाराजांचे पहिले गुरु श्रीधरस्वामी यांनी ही सूत्रे महाराजांचे वडील प.पू. भगवानदास महाराज यांना सांगितली होती. प.पू. भगवानदास महाराज यांनी ही सूत्रे पू. माईंच्या वडिलांना सांगितली. त्या वेळी प.पू. दास महाराजांनी ती श्रवण केली. त्यानुसार पू. माईंच्या आईंच्या पार्थिवाचे दहन त्यांच्या स्थानातच करण्यात आले आहे.

नाडीवाचन करणे, म्हणजे एक हठयोगी साधना !

     नाडीवाचन करण्यासाठी ५० वर्षांचा अनुभव गाठीशी असणे महत्त्वाचे असणे, तरच नाडीवाचनातून महर्षि इतरांना सांकेतिक शब्दांत काय सांगू इच्छितात, त्याचा अर्थ कळणे शक्य असणे : पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, जवळजवळ ५० वर्षे तुम्ही साधना म्हणून नाडीवाचन केले असेल, तर तुम्हाला आपोआपच महर्षींचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि नाडीवाचनामध्ये महर्षींना इतरांना काय म्हणायचे आहे, हेही कळायला लागते. कधी कधी महर्षि नाडीवाचनामध्ये सांकेतिक शब्दांचा उपयोग करून माहिती देत असतात. हे सांकेतिक शब्द सांगायला आम्हाला अनुमती नसते. बर्‍याचदा महर्षींना काय म्हणायचे आहे, हे कळणे मोठे अवघड होऊन बसते. त्या वेळी नाडीवाचनाचा अनुभवच उपयोगी पडतो; परंतु त्यासाठी इतकी वर्षे नाडीवाचन चिकाटीने आणि सचोटीने करणे आवश्यक असते. नाडीवाचनामध्ये महर्षींनी लिहिलेल्या वाक्यांतील अर्थाचा अनर्थ होऊ नये, याचे पुष्कळ मोठे दायित्व (जबाबदारी) नाडीवाचकावर असते; म्हणून एक समाजसेवा म्हणून नाडीवाचन करणे पुष्कळ अवघड असते.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (१८.१२.२०१५)

प.पू. दास महाराजांनी दिलेल्या हनुमान चालीसाच्या छायांकित प्रती काढतांना यंत्रात बिघाड होणे आणि प्रतीतील हनुमानाचे चित्र अखंड न येणे

हनुमान चालीसावरील हनुमानाचे मूळ चित्र
हनुमान चालीसावरील हनुमानाचे खंडित चित्र
      प.पू. दास महाराज त्यांना भेटायला येणार्‍यांना हनुमान चालीसाची प्रत भेट देतात. ११.१०.२०१५ या दिवशी प.पू. बाबांनी मला हनुमान चालीसाच्या तीन प्रती दिल्या. त्यातील एका प्रतीच्या १०० प्रती काढून आणण्यास सांगितले. त्यानुसार माझ्या पत्नीने आमच्या खोलीसमोरील दुकानात त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी दिले. १५.१०.२०१५ या दिवशी दुकानमालक असलेल्या ख्रिस्ती बाईने हनुमान चालीसाची एका बाजूची प्रत काढली. दुसर्‍या बाजूला रामनामात तल्लीन झालेल्या हनुमंताचे चित्र आहे. त्या बाजूने छायांकित प्रत काढण्यास आरंभ करतांनाच यंत्र बिघडले. त्यानंतर तिने दुसर्‍या दुकानात जाऊन छायांकित प्रत काढून आणली.

शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
१. ए ५ आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक. या पत्रकाचा वापर वितरणासाठी, तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठीही करता येईल.
२. १० फूट (रूंदी) X ८ फूट (उंची) या आकारातील २ प्रबोधनपर फलक
     या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे शिवजयंती उत्सव साजरा करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात वितरण करावे, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. हे पत्रक दिनांकानुसार आणि तिथीनुसार साजरा करण्यात येणार्‍या शिवजयंतीच्या दिवशीही वापरता येईल.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी/अमावास्या (९.१.२०१६) सकाळी ७.५४ वाजता
समाप्ती - पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१०.१.२०१६) सकाळी ७.०१ वाजता
आज अमावास्या आहे.

साधकांनो, मारुतीरायांप्रमाणे प्रत्येक क्षण सत्साठीच वापरा आणि भगवंताच्या अवतारी कार्यात त्याला तळमळीने साहाय्य करा !

प.पू. दास महाराज
      त्रेतायुगात दुष्ट रावणाने देवादिकांना बंदिवासात ठेवून धर्माला रसातळाला नेले. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीरामाचा अवतार झाला. अवतार कार्याच्या वेळी धर्माची घडी बसवण्यासाठी अकरावा रुद्र, हनुमानाचा जन्म झाला. रामभक्तीच्या बळावर मारुतीरायांनी महापराक्रमी लीला करून धर्माची घडी बसवण्याचे महत् कार्य केले. भक्तीच्या बळावरच धर्मकार्यासाठी शक्ती मिळते, याचा आदर्श मारुतीरायांनी ठेवला आहे. हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून साधकांनी भक्ती करायला हवी. जो भक्ती करील, त्याच्याच हातून धर्मकार्य घडेल. प्रभु रामचंद्रानी कलियुगात डॉक्टर आठवले नाम धारण करून धर्मकार्य आरंभले आहे. (हा प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा यांचा भाव आहे. - संपादक) त्यांच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी हनुमंतासारखी दास्यभक्ती अंगी बाणवणे आवश्यक आहे. यासाठी हा लेखप्रपंच....
१. भगवंताच्या अवतारी कार्यात भगवंताला 
साहाय्य करणे, ही प्रत्येक भक्ताची साधना असणे
      जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा श्रीहरि अवतार धारण करून दुष्टांचा संहार आणि भक्तांचे रक्षण करतो. भगवंत लढत आहे आणि भक्त हातावर हात ठेवून पहात बसला, असे कधीच होत नाही. भगवंताचे अवतारकार्य चालू होते, तेव्हा त्या कार्यात भगवंताला साहाय्य करणे, ही प्रत्येक भक्ताची साधना असते. अशा भक्ताच्या माध्यमातूनच भगवंत धर्माची स्थापना करतो. त्याच्यावर भगवंताची कृपा सर्वप्रथम होते. त्रेतायुगात रावणाच्या दहशतीने त्रिलोकांत हाहाकार माजला. त्याचा संहार करण्यासाठी भगवंताने रामरूप धारण केले. त्याच्या कार्याला गती देण्याचे काम मारुतीरायांनी केले. त्यांनी अनेक लीला करत दास्यभक्तीचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. त्यांच्या या लीलांचे वर्णन रामायणाच्या सुंदरकांडमध्ये केले आहे.

प.पू. डॉक्टरांनी अनुभवलेला आजारपण आणि म्हातारपण यांतील भेद

      गेली १० - १२ वर्षे प्राणशक्ती अल्प असल्यामुळे मी बाहेर कुठे जाऊ शकत नाही. कधी कधी प्राणशक्ती इतकी अल्प असते की, मला खोलीत बसताही येत नाही. इतकी वर्षे मला वाटायचे, आज नाही उद्या मी बरा होईन आणि पूर्वीप्रमाणे सर्वत्र जाऊ शकेन. आज लक्षात आले की, आता बरा झालो, तरी मला कुठे बाहेर जाता यायचे नाही; कारण आता म्हातारपण आले आहे, जे कधीच बरे होऊ शकत नाही ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.११.२०१५)

साधनेसाठी उपयुक्त नसलेले प्रश्‍न विचारून स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवू नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जिथे ईश्‍वरप्राप्तीसाठी मन आणि बुद्धी नष्ट करायचे आहेत, तिथे मन आणि बुद्धी यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात वेळ कशाला घालवायचा ? तोच वेळ साधनेला दिल्यास प्रगती जलद होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१२.२०१५)

ज्या साधकांचा नामजप चांगला होतो, त्यांनी प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही !

     ज्या साधकांचा नामजप चांगला होतो, त्यांनी प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही. प्रार्थनेत अनेक शब्द असतात. तर नामजपात अल्प शब्द असतात. त्यामुळे प्रार्थनेऐवजी नामजपाने अनेकांतून एकाकडे प्रवास होत असतो. तसेच प्रार्थना ही एक प्रकारे स्वेच्छा झाली. तीही नष्ट करायची आहे. साधनेत स्वेच्छेतून परेच्छेकडे आणि पुढे ईश्‍वरेच्छेकडे जायचे आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१२.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अध्यात्मप्रसाराविषयीचा दृष्टीकोन
तू आगे चलता जा, पीछे काफिला तैयार हो जाएगा ।
अगर तू पीछे देखेगा तो काफिलेमें मिल जाएगा ।
भावार्थ : तू आगे चलता जा म्हणजे अध्यात्माचा प्रसार करत रहा. पीछे काफिला तैयार हो जाएगा । म्हणजे साधक निर्माण होतील. अगर तू पीछे देखेगा म्हणजे जर तू किती जण साधना करतात, याचा विचार केलास, तर तू काफिलेमें मिल जाएगा म्हणजे तुझी स्वतःची प्रगती थांबेल; म्हणजेच त्यांना शिकवण्यापेक्षा काफिल्यातील साधकांतला तू एक होऊन जाशील. सुकृतात असेल ते साधना करतील. कोणी साधना करतो कि नाही याचा विचार, म्हणजे फळाची अपेक्षा ठेवणे. ते तू करू नकोस !
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्मद्रोह्यांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे !
     यामुळे धर्मद्रोह्यांचे विचार अयोग्य आहेत, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणेयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
        द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुरोगामी आणि एकांडा शिलेदार !

संपादकीय
     ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या १५ जानेवारीला भरणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आहेत. संमेलन चालू व्हायच्या अगोदरच ते त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धी माध्यमांतून झळकत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर एकेरी भाषेत टीका करून त्यांनी स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानमध्ये तेथील संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करून २५ डिसेंबर या दिवशी परत भारताकडे येत असतांना वाटेत पाकमध्ये उतरले आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची त्यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेतली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn