Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मदरशात विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवणार्‍या मुख्याध्यापकास जबर मारहाण

राष्ट्रगीताला विरोध करणारे धर्मांध त्यांचा देश कोणता, हे सांगतील का ?
 • ममता(बानो)यांच्या बंगालची घटना
 • धर्मांधांकडून जबर मारहाण
     कोलकाता - ज्या बंगालच्या भूमीत नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्र्रगीत लिहिले, त्याच राज्यात एका मदरशातील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवले; म्हणून धर्मांध मौलाना आणि त्यांच्या हस्तकांनी मुख्याधापक काझी मासूम अख्तर यांना जबर मारहाण करून मदरशातून हाकलून लावल्याची घटना घडली आहे.
     राज्यातील ताल्पुकुर आरा उच्च मदरसा ही शासन मान्यताप्राप्त शाळा आहे. ज्या धर्मांध मौलानांनी मुख्याध्यापकांवर आक्रमण केले, त्यांचा ओढा आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकचे गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांचे केरळ आणि बंगाल राज्यांत आयोजन !

पठाणकोट येथील पाक पुरस्कृत आक्रमणात केरळचे नागरिक असलेले
 सैन्याधिकारी निरंजन कुमार हे हुतात्मा झाले असतांना त्याच पाकच्या 
गायकाला राज्यात पायघड्या घालणे, हा जाणूनबुजून केलेला देशद्रोह !
केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी करणार गुलाम अलींचे राज्यात भव्य स्वागत !
     थिरुवन्तपुरम् (केरळ) - पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांचे १५ जानेवारीला राजधानी कोची येथे आणि १६ जानेवारीला कोझीकोड येथे आयोजन करण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी हे गुलाम अली यांचे १४ जानेवारीला केरळ राज्यात भव्य स्वागत करणार आहे. या कार्यक्रमास माकपचे नेते एम्.ए. बेबी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. (पठाणकोट आक्रमणात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यावरही केवळ देशप्रेमी शिवसेनेला विरोध करण्यासाठी शत्रूराष्ट्राच्या गायकाचा पाहुणचार करणे, हा देशद्रोहच नव्हे का ? - संपादक) एम्.ए. बेबी म्हणाले, गुलाम अली यांचे कार्यक्रम स्वरालय चंडी या (अ)सांस्कृतिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. या आधी मुंबई आणि पुणे येथे गुलाम अली यांचे नियोजित कार्यक्रम शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे रहित करण्यात आले होते.

अवैध शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारे अभिनेते संजय दत्त १०५ दिवस अगोदरच कारागृहातून सुटणार !

संजय दत्त हे कारागृह प्रशासनाचे जावई आहेत कि काय ? निरपराध हिंदुत्ववाद्यांना 
वर्षानुवर्षे कारागृहात डांबून ठेवले जाते; मात्र गंभीर गुन्ह्यांखाली शिक्षा भोगणार्‍या 
गुन्हेगारांची तात्काळ सुटका होते, यालाच न्याय म्हणायचे का ?
     पुणे - वर्ष १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉॅम्बस्फोटांच्या कालावधीत अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारे अभिनेते संजय दत्त यांना त्यांच्या शिक्षेच्या कालावधीत कोणतीही सवलत किंवा विशेष माफी दिलेली नाही, अशी माहिती यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली होती. प्रत्यक्षात संजय दत्त यांची २७ फेब्रुवारी या दिवशी कारागृहातून सुटका होणार आहे. गृहमंत्रालयाने संजय दत्त यांच्या सुटकेच्या प्रस्तावाला अनुमती दिल्यामुळे ते १०५ दिवस आधीच तुरुंगातून सुटणार आहेत.

(म्हणे) सनातनचे ते पत्र म्हणजे जाहीर धमकी !

     शीख हत्याकांडाच्या प्रकरणात हात बरबटलेल्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने से वक्तव्य करणे हास्यापस्द आहे ! सनातनवर कारवाई करण्याची मागणी करणारे सचिन सावंत यांनी कधी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची जाहीर धमकी देणार्‍या ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे का ?
 • काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांचा हिंदुद्वेष
 • सनातन संस्थेवर कारवाई करण्याची मागणी
      मुंबई - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी विद्यार्थ्याच्या सुरक्षेबाबत सनातन संस्थेने पोलीस विभागाला दिलेले पत्र म्हणजे जाहीर धमकी आहे, असे सनातनद्वेषी वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केले. या संदर्भात सनातनविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी हिंदुद्वेषी मागणीही त्यांनी केली.

सनातनची मानहानी करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार ! - सनातन संस्था

     मुंबई - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाच्या संरक्षणासंदर्भात सनातन संस्थेने कोणत्याही प्रकारचे पत्र पाठवलेले नाही. ते पत्र या प्रकरणातील संशयित असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी पाठवले आहे. या पत्रात कोणतीही धमकी नसून त्या मुलाच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली आहे. असे असतांना सदर पत्राचा उल्लेख करून सनातनने मुलाला धमकी दिल्याचा अपप्रचार करून माध्यमांमध्ये सनातन संस्थेची मानहानी करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या विरोधात सनातन संस्था अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

मालडा (बंगाल) प्रकरणी भाजपचे आमदार कह्यात

     मालडा (बंगाल) - येथे धर्मांधांनी एका मोर्च्यात केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे आमदार शामिक भट्टाचार्य आणि त्यांच्या १० समर्थकांना पोलिसांनी कह्यात घेतले. (धर्मांधांनी हिंसाचार करूनही हिंदूंना अटक करणे हा अन्याय ! - संपादक)

(म्हणे) सनातनवर बंदी का नाही ?

मुक्ता दाभोलकर यांची अविवेकी आरोळी !
     कोल्हापूर - गुन्हेगारी इतिहासासाठी पश्‍चिम महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे सनातनला आणि आरोपीला अपकीर्त करण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदार याची किंवा त्याच्या कुटुंबियांची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व कालावधीत त्याला आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबियास प्रतिदिन २४ घंटे संरक्षण देण्यात यावे, असे पत्र हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. या पत्राविषयी डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, एखाद्या आरोपीने अथवा संबंधित घटकांनी साक्षीदारांच्या जीविताची काळजी घेणारे पत्र का द्यावे, हेच समजत नाही. त्यामुळे हे पत्र म्हणजे धमकीच आहे. सनातनवरील बंदीविषयी त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काहीच बोलत नाहीत. सनातनवर बंदी का नसावी, याविषयी त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

कोणतेही पुरावे नसतांनाही सनातनवर बंदीची मागणी करणे, ही अंधश्रद्धाच ! - सनातन संस्था

     मुंबई - मुक्ता दाभोलकर यांनी पुन्हा एकदा सनातन संस्थेवर अजूनही बंदी का घातलेली नाही ? असा कांगावा करत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीचे स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना सनातनवर बंदी घाला, ही तथाकथित पुरोगामी मुक्ता दाभोलकरांची मागणी म्हणजे अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. डॉ. दाभोलकर हत्येच्या वेळी राज्यातील तत्कालीन काँग्रेसच्या शासनाने सनातन संस्थेवर केलेली बंदीची मागणी काँग्रेसच्याच केंद्रशासनाने फेटाळली होती. भाजपच्या शासनकाळातही पुन्हा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी फेटाळली आहे.
     असे असतांना पुन्हा एकदा मुक्ता दाभोलकर यांना मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावासा वाटणे, हे लोकशाहीवर विश्‍वास नसल्याचेच दर्शक आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या ट्विटचा पुरो(अधो)गामी आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून पराचा कावळा !

* श्रीपाल सबनीस यांच्याविषयी केले होते ट्विट
* सनातनला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न
     मुंबई - हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविषयी केलेल्या एका ट्विटचा पुरो(अधो)गामी आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून पराचा कावळा केला जात आहे. याचे निमित्त करून सनातनला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा अशलाघ्य प्रयत्न पुरो(अधो)गामी आणि प्रसारमाध्यमे करत आहेत.
अधिवक्ता पुनाळेकर यांच्या ट्वीटमधील वाक्य !
     श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्याच्या प्रकरणी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सबनीस यांनी मॉर्निंेग वॉकला जावे, असे वाक्य आहे. यावरून पुरो(अधो)गामी आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातनला लक्ष्य केले जात आहे.

खरेदी चढ्या दराने होत असून भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेनेच्या नगरसेविकांचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवणयंत्र आणि सायकल यांच्या खरेदीचे प्रकरण
     पिंपरी - महिला - बालकल्याण योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजनांतून महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत शिवणयंत्र, ८ वी ते १२ वीत शिकणार्‍या मुलींना सायकल मोफत देण्याची तरतूद पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यानुसार खरेदी करण्यात येणार्‍या सायकली आणि शिवणयंत्रे ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चढ्या दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. (या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त चौकशी करून खरेदीची प्रक्रिया थांबवतील का ? - संपादक) या सर्व प्रकारामुळे पालिकेने साहित्य खरेदीची रक्कम थेट लाभार्थींच्या अधिकोष खात्यात जमा करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
     शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे, सीमा साबळे आणि आशा शेंडगे यांनी सायकल आणि शिवणयंत्रे यांच्या खरेदीतील भ्रष्टाचार उघड केला आहे. गत वेळी हर्क्युलस आस्थापनाची एक सायकल ३ सहस्र ४८० रुपयांना खरेदी करण्यात आली. यंदा मात्र विनानामांकित आस्थापनाची एक सायकल ३ सहस्र ५०० रुपयांहून अधिक किमतीला घेण्याचा घाट घालण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्याचा सूड घेणार नसू, तर राजपथावरील शस्त्रांचे प्रदर्शन कुचकामी - शिवसेना

     मुंबई - भारताला पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेता येत नसेल, तर प्रजासत्ताकदिनी राजपथावर करण्यात येणारे शस्त्र प्रदर्शन कुचकामी ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या देश लढत आहे काय ? या मथळ्याच्या अग्रलेखातून करण्यात आले. या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. बंदुका आणि तोफा यांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत.
२. शरीफ यांच्या समवेतचे चहापान हा आमच्या पंतप्रधानांचा खासगी विषय आहे. चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत.
३. हे वीर का शहीद झाले, हा देशाला प्रश्‍न पडला आहे. हे हौतात्म्य का झाले? जवान वीरमरण पत्करत आहेत, पण देश लढत आहे काय, याचे उत्तर द्या !

इराणमध्ये शिया-सुन्नी वाद चिघळला; जगभर तीव्र पडसाद !

इराकमध्ये सुन्नींच्या २ मशिदी उडवल्या ! जगभरातील शिया पंथियांकडून सौदीचा तीव्र निषेध !
     तेहरान (इराण) - सुन्नीबहुल सौदी अरबमध्ये नुकतीच फाशी देण्यात आलेल्या ४७ जणांमध्ये अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निमर हेही असल्याने शियाबहुल इराणमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरात असणार्‍या सौदी अरबच्या दूतावासाला शिया आंदोलकांनी आग लावली. तसेच मध्य इराणमधील सुन्नी पंथियांच्या २ मशिदी स्फोटकांनी उडवल्या. या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सोलापूर येथे प्रशासन आणि सिद्धेेश्‍वर भक्त यांच्यातील वाद विकोपाला; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

आमदार प्रणिती शिंदे, महापौर आबुटे यांसह ३३ जणांवर गुन्हा
     सोलापूर - जमावबंदीचा आदेश लागू असतांनाही होम मैदानावर अनधिकृतपणे जमाव जमवून चक्री उपोषण करून आपत्कालीन रस्त्यावर विनापरवाना स्पीकर लावून घोषणाबाजी करून लाकडी वासा उभा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, महापौर प्रा. सुशिला आबुटे, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह ३३ जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण भोसले तपास करत आहेत.
सिध्देश्‍वर यात्रेतील वादाची कल्पना असून अंतिम निर्णय मीच घेणार - मुख्यमंत्री
     सिद्धेश्‍वर यात्रेतील वादाची मला पूर्ण कल्पना असून अंतिम निर्णय मीच घेणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.
     सिद्धेश्‍वर यात्रेचा विषय नागरी सुविधांकडील असल्यामुळे ही याचिका योग्य त्या बेंचसमोर चालवावी, असे आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरण बाजूला ठेवले. सिद्धेश्‍वर यात्रेतील आपत्कालीन रस्त्यांच्या संदर्भात सोलापूर शहारातील महेश गाडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

वाढत्या घरफोड्या आणि चोर्‍या यांमुळे पनवेल येथे रहिवाशांची पोलिसांसमवेत बैठक

 पोलिसांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नागरिकांना बैठक घ्यावी 
लागणे, हे निंदनीय आहे. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करून कृतीशील व्हावे !
     पनवेल - नवीन पनवेल वसाहतीत गेल्या काही दिवसांत घरफोड्या, चोर्‍या यांचे प्रमाण वाढले असल्याने रहिवाशांनी पोलीस अधिकार्‍यांसमवेत ३ घंटे बैठक घेतली. या वेळी रहिवाशांनी पोलिसांवर प्रश्‍नांचा भडिमार केला.
१. खिडकीचे गज वाकवून चोर घरात शिरल्याने आता घरात रहाण्याची भीती वाटत असल्याचे एका महिलेने सांगितले.
२. वर्ष २०१५ मध्ये खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात २८ घरफोड्या आणि २८ वाहनचोर्‍या यांची नोंद आहे. याप्रकरणी संतप्त रहिवाशांनी पोलिसांना खडसवले. पोलीस गस्तीवर असताना चोर्‍या होतातच कशा, असेही रहिवाशांनी विचारले.
३. चोरीविषयी रहिवासी पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी जातात; पण पोलीस ती नोंदवून घेण्यास टाळाटाळ किंवा प्रक्रियेत दिरंगाई करतात, असा थेट आरोप रहिवाशांनी पोलिसांवर केला.

अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील भैरवनाथ जन्मोत्सवातील अशास्त्रीय प्रथा बंद !

सनातनचे साधक श्री. बाळकृष्ण निकम यांनी प्रबोधन केल्याचा परिणाम ! 
असे साधक हीच सनातनची शक्ती आहेत ! 
श्री. बाळकृष्ण निकम
     अपशिंगे (जिल्हा सातारा), ६ जानेवारी (वार्ता.) - येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या जन्मोत्सवात काही वर्षांपासून मेणबत्ती लावण्याची अशास्त्रीय प्रथा प्रचलित झाली होती. सनातनचे साधक श्री. बाळकृष्ण निकम यांनी पुढाकार घेऊन त्या विरोधात कृती करून सदर कुप्रथा बंद पाडली. श्री. निकम यांचा आध्यात्मिक स्तर ६४ प्रतिशत आहे. (पुढाकार घेऊन कुप्रथा बंद करणारे श्री. बाळकृष्ण निकम यांचे अभिनंदन ! - संपादक) 

मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार नाकारणारे धर्माभिमानी पत्रकार श्री. मिलिंद चवंडके !

     नगर, ७ जानेवारी (वार्ता.) - पत्रकार दिनानिमित्त, म्हणजेच ६ जानेवारी या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर या उपस्थित होत्या. येथील धर्माभिमानी पत्रकार श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार होता; मात्र त्यांनी तो विनम्रपणे नाकारला. याविषयी सांगतांना ते म्हणाले की, अंनिससारख्या संघटना या धर्माच्या विरोधात उभ्या रहातात आणि धर्मद्रोही कृत्येही करतात. अशा संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या हस्ते अथवा ते उपस्थित असलेल्या व्यासपिठावरून सत्कार स्वीकारणे, हे उचित ठरत नाही. त्यामुळे मी तो सत्कार स्वीकारला नाही. (धर्मद्रोही संघटनांकडून विशेष सत्कार नाकारणारे श्री. मिलिंद चवंडके यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी पत्रकार हीच हिंदु धर्माची शक्ती आहेत.- संपादक) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टने अनेक घोटाळे केले असतांना त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते अशा प्रकारे सत्कार करण्याचे आयोजन केले जाणे योग्य नाही, अशी चर्चाही केली जात आहे.

अब्रुनुकसानीच्या दाव्यात नवाब मलिक यांना जामीन

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावरील आरोपाचे प्रकरण
चक्रावणारा न्याय !
     पुणे - अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी गेल्या मासांत नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर नवाब मलिक हे ४ जानेवारी या दिवशी येथील सत्र न्यायालयात उपस्थित झाले. या वेळी न्यायालयाने त्यांना १० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला. नवाब मलिक यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बापट यांच्यावर तूरडाळीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावर बापट यांनी मलिक यांच्या विरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट केला आहे.

वाहतूक मंत्री दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात

      मुंबई - राज्याचे वाहतूक मंत्री आणि शिवसेना नेते श्री. दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला असून श्री. रावते सुदैवाने बचावले आहेत. या गाडीच्या धडकेत गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला आहे, तर चालकाला मुका मार लागला आहे. ६ जानेवारी या दिवशी दुपारी हा प्रकार घडला.
     रस्त्यावरील सुरक्षा आणि रॅश ड्रायव्हिंगला प्रतिबंध कसा करता येईल या संदर्भातली महत्त्वाची बैठक आटोपून श्री. रावते परत येत होते. त्या वेळी लोअर परेलमध्ये फिनिक्स मिलजवळ एका भरधाव गाडीने रावतेंच्या गाडीला धडक दिली. गाडीला धडक देणार्‍या गाडीच्या चालकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. श्री. रावते यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आणि थो़ड्याच वेळात त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

आतंकवाद्यांचे मृतदेह डुक्कराच्या चामड्यात गुंडाळून आणि डुक्कराच्या मलमूत्रासह गाडा ! - त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय

पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमण
     नवी देहली - आतंकवाद्यांविषयी रशियाने कठोर धोरण अवलंबल्याचा दाखल देत पठाणकोट येथील आक्रमणात भारतीय सैन्याने कंठस्नान घातलेल्या आतंकवाद्यांना डुक्कराच्या चामड्यात गुंडाळून, डुक्कराचे मलमूत्र मृतदेहाच्या तोंडाच्या भागाजवळ टाकून गाडून टाका, असे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सुचवले आहे.राज्यपाल रॉय यांनी ट्विटर या सामाजिक संकेस्थळावरून ५ जानेवारीला पठाणकोट आक्रमणासंदर्भात हे सुचवले आहे. सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्यपाल रॉय यांनी यापूर्वी याकूम मेमन याची फाशी, लव्ह जिहाद आणि गोध्रा हत्याकांड यासंदर्भात असेच सडेतोड मतप्रदर्शन केले होते. आक्रमणात मारले गेलेल्यांना स्वर्गात सुंदर पर्‍या भेटतात अशी जिहादींची धारणा असते. जिहादींची ही धारणा फोल ठरवण्यासाठी वरील उपाय सुचवण्यात आला आहे, असे म्हटले जाते.

देहलीकडून धडा घ्या अन् जागे व्हा ! - वाहतूकतज्ञांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

     मुंबई - देहलीत सम आणि विषम क्रमांकांच्या गाड्यांंसाठी केलेल्या नियमाची अंमलबजावणी मुंबईत करण्याची आवश्यकता नाही, असे शासकीय पातळीवरून स्पष्ट होत असले, तरी वाहतूकतज्ञांनी मुख्यमंत्र्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मुंबईतील प्रदूषणाची पातळी धोकादायक नसली, तरी सुरक्षित पातळीच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देहली, पॅरिस अशा शहरांत होणार्‍या वाहतूक नियोजनातून मुंबईने धडा घेण्याची आवश्यकता आहे, असे वाहतूकतज्ञांच्या संघटना मुंबई ट्रान्सपोर्ट फोरम, मुंबई विकास समिती आदींनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे खडसवले आहे.

आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजतागायत अबाधित ! - ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता

देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, 
असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
     पुणे, ६ जानेवारी - शासन पालटल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटल्याची तक्रार अनेक जण करतांना दिसतात. असे असले, तरी देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यात प्रतिवर्षी वाढ होतांना दिसत आहे. टिळकांसारख्या अनेक पत्रकारांनी पत्रकारितेचा वापर स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती टिकवण्याचे साधन म्हणून केला. त्यामुळेच आपल्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे. जे आजतागायत अबाधित राहिले आहे. काही देशांमध्ये तेथील लोकांना विरोध व्यक्त करण्यासाठी बंदूक हातात घ्यावी लागते. आपल्याकडे लोक व्यवस्थेविषयीचा राग त्यांच्या लिखाणातून व्यक्त करतात. तेच 'उत्तम संपादकीय' म्हणावे लागेल. अद्यापही आपल्या देशात मत स्वातंत्र्य अबाधित असून, तीच आपली खरी शक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देतील ! - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

ठाणे येथे पत्रकारदिनी ज्येष्ठ पत्रकार 
दिनू रणदिवे यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मान ! 
     ठाणे - पाकिस्तानने भारताचा नेहमीच घात केला आहे. निवडणुकीच्या आधी मोदी जी भाषा वापरायचे, तसेच सडेतोड उत्तर मोदी पाकिस्तानला देतील, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते श्री. रणदिवे आणि अन्य ज्येष्ठ पत्रकार यांना पुरस्कार देण्यात आले. या वेळी ठाणे येथील पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते श्री. एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महंमद अफजलच्या फाशीचा सूड उगवण्यासाठी भारतीय दूतावासावर आक्रमण !

हिंदूंनो, अशा मानसिकतेच्या आतंकवाद्यांशी सामना करण्यास आपण सिद्ध आहात का ?
    नवी देहली - अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांनी मरण्यापूर्वी महंमद अफजल याला फाशी दिल्याचा सूड उगवण्यासाठी आक्रमण केल्याचा संदेश भिंतीवर लिहिला आहे. 
    भारतीय संसदेवर वर्ष २००० मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचणार्‍या महंमद अफजल याला वर्ष २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याचा सूड उगवण्यासाठी हे आक्रमण केल्याचा संदेश आतंकवाद्यांनी स्वत:च्या रक्ताने भिंतीवर लिहिला आहे, अशी माहिती अफगाणिस्तान पोलिसांनी दिली. इमारतीच्या भिंतीवर उर्दू भाषेत अफजल गुरू का इन्तकाम, एक शहीद हजार फिदायीन असे लिहिलेले होते. २ जानेवारी २०१६ या दिवशी ४ आतंकवाद्यांनी मझार ए शरीफ येथील भारतीय दूतावासावर आक्रमण केले होते. इंडो-तिबेटियन सुरक्षा दल आणि अफगाण लष्कराच्या जवानांनी हे आक्रमण परतवून लावले होते. यावेळी झालेल्या चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले.

पठाणकोट आक्रमणातील संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया चालू !

अमेरिकेने सुनावल्यानंतर पाकचे थातूरमातूर उत्तर
      आतंकवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकच्या अशा नेहमीच्याच भूलथापांना बळी न पडता, तसेच अमेरिकेच्या पोकळ मध्यस्थीने काही होईल, अशी भाबडी आशा बाळगणे सोडून भारताने आतंकवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी थेट कृती करावी !
      वॉशिंग्टन - पंजाबमधील पठाणकोट आक्रमणातील संबंधितांवर कठोर कारवाई करा, असे अमेरिकेने पाकला बजावल्यानंतर भारताने दिलेल्या पुराव्यानुसार कारवाईची प्रक्रिया चालू आहे, असे नेहमीचेच थातूरमातूर उत्तर पाककडून अमेरिकेला देण्यात आले आहे.

भारतात २६ वर्षांत १३६ आतंकवादी आक्रमणे !

                              शासनाने आतंकवादी आक्रमणाची केवळ आकडेवारी देणे नव्हे, तर 
                         आतंकवादी आक्रमणे होणारच नाहीत, अशी उपाययोजना करणे अपेक्षित !
     नवी देहली - पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ५ आतंकवाद्यांकडून भारताचे ७ सुरक्षा कर्मचारी मारले गेले. अशा प्रकारे मागील २६ वर्षांत संपूर्ण भारतात १३६ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. या आक्रमणांवरून भारतीय सुरक्षादल आतंकवाद्यांशी लढण्यास सक्षम नसल्याचे समोर आले आहे.
१. शासकीय आकडेवारीनुसार मागील २६ वर्षांत पंजाब राज्याला देशात सर्वाधिक ३४ आतंकवादी आक्रमणांना तोंड द्यावे लागले आहे.

मी माझ्या नातवालाही सैन्यात पाठवेन ! - हुतात्मा राणा यांचे वडील

असे नागरिक हीच भारताची खरी शक्ती आहे ! 
     चंदीगढ - हरियाणा राज्यातील चंबा जिल्ह्यातील बासा गोला या गावातील संजीवन राणा आणि जगदीश चंद या दोन सैनिकांना पठाणकोट आक्रमणात आतंकवाद्यांच्या गोळ्या लागून वीरमरण आले. त्यापैकी संजीवन राणा यांच्यावर कांगडा जिल्ह्यातील सहवान या गावी संजीवन राणा यांचा मुलगा शुभम याच्या हस्ते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी संजीवन राणा यांचे वडील आणि माजी सैनिक रत्तन सिंग म्हणाले, "मी पाकिस्तानशी झालेल्या ३ युद्धांत भाग घेतला; मात्र माझ्या मुलाने शहीद होऊन माझ्यावरही मात केली. त्याची अतुलनीय वीरता आणि त्याग नेहमीच आठवणीत राहील. भारतमातेसाठी रक्त सांडले; म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या नातवालाही सैन्यात पाठवेन. जोपर्यंत भारत पाकिस्तानला योग्य कृतीने उत्तर देणार नाही, तोपर्यंत त्याचा खोडसाळपणा थांबणार नाही." (जे एका हुतात्मा सैनिकाच्या वडिलांना कळते, ते भारतीय शासनाला का कळू नये ? - संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ ७ जानेवारी या दिवशी नंदुरबारला भव्य फेरी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सहभागी होण्याचे आवाहन 
     नंदुरबार - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १० जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या सभेच्या प्रचारार्थ ७ जानेवारी या दिवशी भव्य फेरी काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीमध्ये सर्व हिंदुप्रेमी संघटना, संस्था आणि नागरिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

पराक्रमी बाजीरावाने स्वराज्याचे साम्राज्य केले ! - विक्रम एडके

     सोलापूर, ६ जानेवारी - आपल्याला नेपोलियन, अलेक्झांडर हे परकीय ठाऊक आहेत; मात्र आपल्या दैदीप्यमान पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे मोठे साम्राज्य निर्माण करणार्‍या आणि एकही लढाई न हरणार्‍या बाजीराव पेशव्यांचे कार्य ठाऊक नाही. ते केवळ आपल्याला मस्तानीपुरतेच माहीत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट असून मस्तानी पलीकडेही त्यांचे शौर्य आपण सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे मत नगरचे श्री. विक्रम एडके यांनी मांडले. ४ जानेवारी हिराचंद नेमचंद वाचनालयात दि. लक्ष्मी को-ऑप. बँक लि. सेवक सांस्कृतिक मंडळ आयोजित १३ व्या (ख्रिस्ती) नववर्ष व्याख्यानमालेचे चौथे पुष्प एडके यांनी 'न उमगलेले बाजीराव' या विषयावर गुंफले. या वेळी श्री. एडके यांनी आपल्या जवळपास सव्वा दोन घंट्यांच्या व्याख्यानात पराक्रमी बाजीरावांचे विविध पैलू श्रोत्यांसमोर मांडले.'

राज्यात मागील २ वर्षांत पुणे विभाग लाचखोरीत अव्वल

     पुणे विभागाची ओळख 'लाचखोरांचा विभाग', अशी होणे, हे लज्जास्पद आहे. लाचखोरांना कठोरात कठोर शासन करणे आणि धर्मशिक्षण देणे, हाच भ्रष्टाचार थांबवण्याचा सर्वोत्तम उपाय ! 
     नगर, ६ जानेवारी - राज्यामध्ये मागील २ वर्षांत लाचखोरीची आकडेवारी अल्प होण्याऐवजी ती वाढली आहे. या दोन्ही वर्षी पुणे विभाग लाचखोरीमध्ये अव्वल असून त्या पाठोपाठ नाशिक आणि संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. लाचलुचपत विभागाने संपूर्ण राज्यात वर्ष २०१३ मध्ये ६०४, २०१४ मध्ये १ सहस्र ३१६, तर २०१५ मध्ये १ सहस्र २७० कारवाया केल्या आहेत. गेल्या २ वर्षांत पुणे विभागात ४४६, नाशिक विभागामध्ये ४१६ आणि संभाजीनगर विभागामध्ये ३५८ कारवाया झाल्या आहेत. लाचखोरीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस अव्वल स्थानी आहेत.

पुण्यात बलात्कार आणि विनयभंग या घटनांमध्ये वाढ

     विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराची ओळख 'महिलांसाठी असुरक्षित शहर', अशी होणे, हे लज्जास्पद आहे. एकूणच गुन्ह्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे लक्षण आहे. शासन आणि गृह विभाग यांनी हे प्रमाण अल्प करण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांना 'सुरक्षिततेचे चांगले दिवस' दाखवावेत, ही अपेक्षा ! 
 • वर्षभरात १३ सहस्र ७०१ गुन्ह्यांची नोंद 
 •  पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी
 •  वाढली सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाचा 

भारतीय वंशाचा ब्रिटीश मुसलमान बनला नवीन जिहादी जॉन !

     लंडन - भारतीय वंशाचा ब्रिटीश मुसलमान असलेला सिद्धार्थ धर उर्फ अबू रुमासाह हा नवीन जिहादी जॉन असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ याची एक ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध झाली असून त्यात तो ब्रिटनसाठी हेरगिरी करणार्‍या ५ जणांना ठार मारतांना दिसत आहे. ब्रिटिश माध्यमांनी त्याला नवा जिहादी जॉन असे नाव दिले आहे. सिद्धार्थशी संबंधित ध्वनीचित्रफीत ऐकल्यावर त्याच्या आईने तो आवाज त्याचाच असावा, असे द डेली टेलिग्राफला सांगितले. त्याची बहीण कोनिका धर ही उत्तर लंडनमध्ये रहाते. तिने सांगितले, की तो आवाज तिच्या भावासारखा वाटतो; पण खात्रीने तसे सांगू शकत नाही. माझ्या भावाने १० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला.

संघ प्रणित विज्ञान भारतीला गौरवण्यास पंतप्रधान मोदी यांचा नकार

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील नेत्यांनी स्थापन केलेल्या विज्ञान भारती या संस्थेला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विज्ञान परिषदेत गौरवण्यात येणार होते; परंतु ऐनवेळी नकार देत पंतप्रधान मोदी पुरस्कार न देताच निघून गेले. याचा संस्थेचे सचिव ए. जयकुमार यांनी निषेध केला आहे. 
     संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि सह-सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या पुढाकाराने स्वदेशी विज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विज्ञान भारती ही संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेच्या उभारणीत आणि प्रत्यक्ष कामकाजात संघ नेत्यांचा मोठा वाटा आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आहेत. ७ डिसेंबर २०१५ या दिवशी देहलीतील आयआयटी मध्ये एकाच वेळी २ सहस्र ५०० शाळकरी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग केले होते. या विक्रमामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विज्ञान भारतीची नोंद झाली आहे. या जागतिक विक्रमामुळे विज्ञान भारतीचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे ठरले होते; परंतु पंतप्रधानांनी त्यास ऐनवेळी नकार दिला. त्यामुळे संस्थेचा विज्ञान परिषदेतील सत्कार बारगळला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झालेल्या संस्थेचा सन्मान करण्यास पंतप्रधानांनी नकार देणे अत्यंत दु:खद आहे. यामुळे विज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या सर्वच संघटनांना धक्का बसला आहे, असे जयकुमार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी !

अनेक देशांकडून अशा महासंहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती होत असल्यामुळे 
भविष्यात तिसरे महायुद्ध अटळ आहे, असेच म्हणावे लागेल !
    उत्तर कोरिया - उत्तर कोरियाकडून ६ जानेवारीला विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर याच दिवशी सकाळी ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर जपान शासनने हा भूकंप या चाचणीमुळे झाला, असा आरोप केला आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली त्या पंगेयेरी या ठिकाणापासून भूकंपाचे धक्के जाणवल्याचा परिसर अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर आहे. हा मानवनिर्मित भूकंप असल्याची आम्हाला शंका आहे. आम्ही सध्या या भूकंपाची नेमकी तीव्रता आणि केंद्र यासंबंधीच्या माहितीचे विश्‍लेषण करत आहोत, असे कोरियाच्या हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आतंकवाद्यांना घरात घुसून ठार करा ! - चित्रपट अभिनेते अक्षय कुमार

     नवी देहली - पठाणकोटवरील आतंकवाद्यांच्या आक्रमणाने जनमानस संतप्त झाले आहे. या घटनेमुळे चित्रपट अभिनेते अक्षय कुमार व्यथित झाले असून त्यांनी आतंकवाद्यांना थेट घरात घुसून ठार मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
     अक्षय कुमार म्हणाले, मला या अडचणीवर अंतिम तोडगा सापडत नाही; परंतु आतंकवाद्यांनी आपल्या देशात घुसून आपल्या सैनिकांना ठार मारले, तर मी म्हणेन की, त्यांना घरात घुसून मारा.

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रगीताला विरोध करणे, हा देशद्रोह नाही का ?
     बंगालमधील एका मदरशातील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवले; म्हणून धर्मांध मौलाना आणि त्यांच्या हस्तकांनी मुख्याधापक काझी मासूम अख्तर यांना जबर मारहाण करून मदरशातून हाकलून दिले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Bangal ke ek madaraseme chhatronse rashtrageet Jan gan man gavanewale shikshak ki hui pitai.
     Bangalme loktantra hai ya jangalraj ?
    जागो ! 
      बंगाल के एक मदरसे में छात्रों से राष्ट्र्रगीत जन गन मन गवाने वाले शिक्षक की हुयी पिटाई.
     बंगालमें लोकतंत्र है या जंगलराज ?

शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळात २ महिलांचा समावेश

     नगर - येथील शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळात महिलांचा समावेश करण्याचा निर्णय ६ जानेवारी या दिवशी घेण्यात आला. शनि देवस्थानच्या ११ सदस्यीय विश्‍वस्त मंडळाची सूची सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी घोषित केली. त्यात प्रथमच अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोघींची निवड झाली आहे. विश्‍वस्त मंडळाच्या सदस्यत्वासाठी आलेल्या एकूण अर्जांमध्ये १० अर्ज महिलांचे होते.

नंदेश्‍वर (ता. मंगळवेढा) येथे लाच घेतांना धर्मांध महिला तलाठी गजाआड

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित ! 
     
     मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), ६ जानेवारी - तालुक्यातील नंदेश्‍वर येथे शेतजमिनीची फेरफार रजिस्टरला नोंद करून सात-बारा उतारा देण्यासाठी १ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महिला तलाठी नाझमीन हमीद मौलवी यांना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. यापूर्वी अरळी येथे कार्यरत असतांना वाळू प्रकरणात मौलवीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली नंदेश्‍वर येथे करण्यात आली होती. याविषयी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

मद्यपी चालकांच्या वाहनांच्या धडकेत गेल्या ३ वर्षांत ५ वाहतूक पोलिसांचा मृत्यू

अशा प्रकारे होणारे पोलिसांचे मृत्यू ही चिंताजनक गोष्ट असून 
पोलीस प्रशासनाने यासाठी कठोर उपाययोजनांचा अवलंब करावा, ही अपेक्षा ! 
     मुंबई - मद्यपी चालकांच्या वाहनांनी दिलेल्या धडकेमुळे गेल्या ३ वर्षांत ५ वाहतूक पोलिसांचा मृत्यू झाला असून ५२ जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. पोलिसांना धडक दिल्यास चालक परवाना कायमचा रहित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यास साहाय्य होईल. नाकाबंदी, तसेच 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह' कारवाईसाठी पोलिसांना रिफ्लेक्टर जॅकेट आणि बॅटन दिले जाते. तसेच हेल्मेट घालण्याची सक्तीही केली जाते. जीव धोक्यात घालून कारवाई करू नका, अशा सूचना वरिष्ठांकडून वेळोवेळी दिल्या जातात. वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांविरोधात कारवाई केल्याने पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत.

पाकमधून अनेक वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदूंना पुन्हा पाकला जाणे भाग !

 • पाकचा गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्याची तत्परता दाखवणारे भारत शासन पाकमधील हिंदूंच्या बाबतीत निष्क्रीय का ?
 • भारत शासनाच्या नागरिकत्व देण्याविषयीच्या उदासीनतेचा परिणाम
     कर्णावती (अहमदाबाद) - मूळ पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत शासनाकडून भारतीय नागरिकत्व देण्यात आले; मात्र पाकमधून भारतात आलेल्या आणि गेली अनेक वर्षे भारतात राहिलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे घर वापसी होण्याची आशा मावळल्याने या हिंदूंना नाईलाजाने पाकमध्ये जावे लागत आहे. पाकिस्तानमधून भारतात आलेली आणि गुजरातमध्ये राहणारी १०० कुटुंबे गेल्या वर्षाभरामध्ये पुन्हा पाकिस्तानात गेली आहेत. यामध्ये अधिकतर सिंधी आणि कच्छ येथील गुजराती कुटुंबे आहेत. भारत शासन कधीतरी भारतीय नागरिकत्व प्रदान करेल, ही आशा निष्फळ ठरल्याने त्यांना नाईलाजाने सर्व सामान घेऊन पाकची वाट धरावी लागली आहे. ३७ वर्षांचे मोतीराम खत्री वर्ष २००९ मध्ये पाकिस्तामधून पळून भारतात आले होते. त्यांना कर्णावती येथे रहायचे होते; मात्र नाईलाजाने त्यांना परत जावे लागत आहे. खत्री यांच्यासारखी अशी अनेक उदाहणे आहेत. 

काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग निर्माण करावा !

देहली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची मागणी
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
     नवी देहली - काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे चौकशी व्हावी आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग देण्यात यावा, या मागणीसाठी जंतर-मंतर येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला.

धर्मसंकटाची तीन तोंडे !

१. धार्मिक आणि सामाजिक अराजकांचे दायित्व कोणाकडे आहे ?
     आज पहावे, तो या पुण्यभूमीवर सर्वत्र तांडव करत असलेल्या आसुरी प्रवृत्ती वैदिक धर्माचे विशाल मंदिर जमीनदोस्त करण्याचा उद्योग करत आहेत. धार्मिक आणि सामाजिक अराजकांचा हा जो निंद्य प्रसार होत आहे, याचे दायित्व खरोखर कोणाकडे आहे ?

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा धर्मांध मुसलमान आणि त्याला सडतोड प्रत्त्युत्तर देणारा धर्माभिमानी

श्री. विनय तळेकर
१. दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर श्री हनुमान अशोकवाटिका उद्ध्वस्त करत असतांनाचे दृश्य दाखवले जात असता एका मुसलमानाने उपहासात्मक बोलणे आणि त्याच्या बोलण्याला अन्य हिंदूंनी हसून दाद देणे : २३.१०.२०१२ या रात्री ८.३० वाजता दूरचित्रवाणीच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर संकटमोचन श्री हनुमान या कार्यक्रमात श्री हनुमान अशोकवाटिका उद्ध्वस्त करत असतांनाचे दृश्य दाखवले जात होते. त्या वेळी ३ हिंदू आणि १ मुसलमान जेवत होते. अशोकवाटिका उद्ध्वस्त करत असतांनाचे दृश्य पाहून तो मुसलमान म्हणाला, यह देखो, आप लोगोंका भगवान उछल रहा है । हे ऐकून त्यांच्यासमवेत बसलेले ते ३ हिंदू आणि अन्य सहकारी हसू लागले.

राष्ट्रासाठी लायक माणसे पैशाने नव्हे, तर तपानेच सिद्ध होतात !

      श्री अरविंदांचे (योगी अरविंद घोष) योगमार्गातील पहिले मार्गदर्शक विष्णु भास्कर लेले हे प्रथम क्रांतीकारक होते. मायभूमीच्या मुक्तीचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत असे. त्यांना अशी खात्रीलायक वार्ता (बातमी) मिळाली होती की, पेशवाईच्या अखेरच्या धामधुमीच्या काळात कुठेतरी ४० लाख मोहरा पुरलेल्या आहेत. त्या मोहरा आपणास कशातरी मिळाव्यात, म्हणजे आपण सैन्य उभारून इंग्रजांशी युद्ध करू, असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. संतांच्या भेटीतही त्यांचा हा एकच उद्देश असे; पण बहुतेकांनी त्यांना तुझ्याकडे हे काम नाही, असे सांगितले.

प्रजासत्ताकाच्या पुनर्निर्माणात प्रसारमाध्यमांची भूमिका !

१. निरामय, निरोगी आदर्श समाज आणि प्रजासत्ताक यांच्या निर्मितीसाठी मौल्यवान आदर्शांविषयी जनतेच्या मनात दृढ इच्छाशक्ती निर्माण करणे, हे प्रसारमाध्यमांचे मूळ कर्तव्य असणे : सूचना देणे, शिक्षण देणे आणि मनोरंजन करणे, ही प्रसारमाध्यमांची तीन आदर्श अन् लोकप्रिय कार्ये मानली जातात. ही तीन कार्ये त्यांनी पूर्ण दायित्वाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजेत. यासाठीच प्रसारमाध्यमांना देशाच्या प्रगतीमध्ये चौथा स्तंभ अशी संज्ञा दिली आहे. कोणत्याही सूचनेला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, लोकशाही मूल्यांच्या (तत्त्व) रक्षणासाठी जनतेला जागृत करणे, त्यांना शिक्षित आणि जागरूक बनवणे, समाजात पसरलेल्या कुप्रथा, विषमता, सांस्कृतिक संकट आणि आर्थिक संकट यांच्याविरुद्ध आवाज उठवणे (ठामपणे बोलणे) किंवा असे सांगू शकतो की, एक निरामय, निरोगी (स्वस्थ) आदर्श समाज अन् प्रजातंत्र यांच्या निर्मितीसाठी ज्या मौल्यवान आदर्शांची आवश्यकता आहे, त्या सर्वांविषयी जनतेच्या मनात दृढ इच्छाशक्ती निर्माण करणे, हे प्रसारमाध्यमांचे मूळ कर्तव्य आहे.

शासकीय विज्ञापने आणि अनाठायी व्यय !

     केंद्रशासनाकडून २६ मे २०१४ ते २६ मे २०१५ या वर्षभराच्या काळात विज्ञापनांवर ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय केले आहेत. शासकीय विज्ञापनांवर विपुल प्रमाणावर होणारा व्यय हा नेहमीच जनतेसाठी चर्चेचा विषय राहिला आहे; पण हे सर्व कधी, कुठे थांबणार, याविषयी काहीच कल्पना नाही. या विज्ञापनांच्या सततच्या वहात्या प्रवाहामुळे ज्या ज्या माध्यमांचा विज्ञापनांसाठी उपयोग होत आहे, त्यांची तर चंगळच झाली आहे. शासकीय विज्ञापने मिळत असल्याने त्यासाठी केल्या जाणार्‍या व्ययाविषयी आवाज न उठवता पदरात पडत असलेले दान स्वीकारत मार्गस्थ रहाण्याची माध्यमांची भूमिका शासनाच्या पथ्यावर पडली आहे. या विज्ञापनांवर अंकुश ठेवणारेच कोणी नसल्याने ऋण काढून उत्सव का साजरे केले जात आहेत ? देशाची आर्थिक स्थिती नाजूक असतांना विज्ञापनांची कितपत आवश्यकता आहे ? आदी प्रश्‍न निर्माण होत आहेत.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

भारतासंबंधी विचार केल्यावर प्रकर्षाने आढळणारी तेथील गुणसंपदा डोळ्यांसमोर उभी रहाणे

विदेशींना भारताचे महत्त्व कळते; पण हिंदूंना कळत नाही !
जगत्विख्यात लेखक यहुदी मेन्युहिन यांनी नेहरूंना पाठवलेल्या पत्रातील मजकूर 
१. मी जेव्हा भारतासंबंधी विचार करतो, तेव्हा भारतातच प्रकर्षाने आढळणारी एक विशेष गुणसंपदा माझ्या दृष्टीसमोर उभी रहाते. ती म्हणजे प्राचीन दंतकथेतील एडनच्या बगीच्यातील आदिमानवासारखी असणारी निरागसता. असे वाटू लागते की, भारत म्हणजेच तेथील खेडी, तेथील लोकांची धीर-गंभीर उदात्तता, तेथील जीवनातील मनोज्ञ, सौंदर्यपूर्ण सुसंवादित्व !
२. भारत म्हटले की, माझ्या मनात विचार येतो, तो तेथील मंदिरांचा, भारतियांच्या सौजन्ययुक्त सामर्थ्याचा, सहनशीलतेशी हातात हात घालून चालणार्‍या चिकाटीचा, शहाणपणा आणि चातुर्य असूनही आढळणार्‍या सरलतेचा, तसेच तेथील सर्वांगपरिपूर्ण समृद्ध जीवनाचा !
३. हिंदूंमध्ये मला दर्शन होते परंपरागत प्रतिष्ठित असलेल्या मनाच्या मोठेपणाचे आणि सहिष्णुतेचे !
४. जीवनात येणारी सुखे-दुःखे यांची तीव्रता आणि व्यापकता अनुभवतांनाही आपली उदात्त उदासीन वृत्ती ढळू न देण्याची विलक्षण क्षमता अन् कर्तृत्वाने प्राप्त होणारे दिव्य समाधान अनुभवतांनाही टिकून असणारी विनम्रता, ही या खेड्यांची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत.

भारतीय संस्कृतीचा नाश करण्यासाठी सक्रीय भूमिका पार पाडणार्‍या दूरचित्रवाहिन्या

१. दूरचित्रवाहिन्या भारतीय संस्कृतीचा
नाश करण्याची सक्रीय भूमिका पार पाडत असणे
     दूरचित्रवाहिन्यांनी लोकांच्या रिकाम्या वेळेची पूर्ती करण्यासह भारतीय संस्कृतीचे अपहरण करणे, हे लक्ष्य बनवले आहे. दूरचित्रवाहिन्यांनी मनुष्याला दानव बनवण्याची एक जोरदार चळवळ (मोहीम) हाती घेतली आहे. कोणत्याही देशाची संस्कृती सुरक्षित ठेवण्यामध्ये तरुण पिढी, महिला आणि मुले यांचा सर्वांत मोठा वाटा असतो. ज्या देशाच्या तरुण पिढी आणि मुले यांच्यावर देशाच्या संस्कृतीचे संस्कार असतात, त्या देशामध्ये माणुसकी आणि एकसंघ असलेला एक चांगला समाज असतो. कोणत्याही देशाला दुर्बळ बनवायचे असेल, तर त्या देशाची संस्कृती नष्ट करा. संस्कृतीचे पतन म्हणजेच त्या देशाचे वास्तविक पतन आहे. आज प्रसारमाध्यमे आपल्या देशाच्या संस्कृतीचा नाश करण्याची सक्रीय भूमिका पार पाडत आहेत. दूरचित्रवाहिन्या लोकांची केवळ करमणूकच करत नाही, तर त्यांची विचारप्रक्रिया आणि जीवनशैली यांतही पालट करत आहे. हा पालट मोठ्या शहरांमध्ये अतीवेगाने होत आहे.

वाट चुकलेली वृत्तपत्रे आणि पत्रकारिता !

६ जानेवारी या दिवशी झालेल्या पत्रकारदिनाच्या निमित्ताने...
श्री. श्रीकांत भट
     ६ जानेवारी हा दिवस पत्रकारदिन म्हणून ओळखला जातो. अनेकांना पुरस्कारही मिळतो; पण आजची वास्तविकता कुणीच मांडतांना दिसत नाही. काही वृत्तपत्रे, पत्रकार अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत; पण अशांची संख्या जेमतेमच आहे. उर्वरित वृत्तपत्रे, पत्रकार वाट चुकलेलेच आढळून येतात; म्हणून पत्रकारदिनी या सर्वांनी आपले आत्मपरीक्षण केले, तरच पत्रकारदिनाचे सार्थक होईल.
      खरेतर वृत्तपत्रे आणि पत्रकार समाजाचा आरसा असतात. समस्या शोधून त्या वृत्तपत्रातून मांडणे आणि त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा हे पत्रकाराचे कसब ठरते. वृत्तपत्रांनी प्रशासन, शासन, न्यायप्रणाली यांच्या चुका दाखवत त्यांच्याकडून उत्तम व्यवस्था राखण्यासाठीचे प्रयत्न करणे हाच गाभा असतो. आज परिस्थिती विचित्र झालेली दिसून येत आहे. तरी सर्वांनी यातून बोध घेऊन खरी पत्रकारिता अंगीकारावी हीच अपेक्षा !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
    मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
     यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

कार्यकर्त्यांनो, हिंदु धर्मजागृती सभेची सेवा केल्यामुळे २५ गुरुपौर्णिमांचे फळ लाभते, हे लक्षात घेऊन सभेत होणार्‍या ढोबळ; परंतु गंभीर चुका टाळा !

     हिंदु धर्मजागृती सभा म्हणजे हिंदूंचा धर्माभिमान जागृत करणारे यज्ञकुंड ! हिंदुत्वाचे दर्शन घडवणार्‍या या सभेमुळे राष्ट्र-धर्मप्रेमींपर्यंत अल्पावधीत पोचता येते. विविध ठिकाणी पार पडलेल्या या सभांंना आतापर्यंत समाजातून उदंड प्रतिसाद लाभला आहे.
     सभेची सेवा करतांना कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका पुढे देत आहे.
१. बैठकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने ५०
जिज्ञासूंना बैठकांविना भूमीवर बसावे लागणे
     संभाजीनगर येथील एका सभेत बैठकव्यवस्थेचे दायित्व सौ. कल्पना देशपांडे यांच्याकडे होते. सभेसाठी आवश्यक तेवढ्या बैठका मिळाल्या आहेत का, ते त्यांनी स्वतःहून पाहिले नाही. त्यामुळे बैठका अल्प पडल्याने ५० जिज्ञासूंना बैठकांविना भूमीवर बसावे लागले. अशा वेळी त्यांना तेथील दगड टोचू शकतात, तसेच थंडीचा त्रास होऊ शकतो.

अनेक दैवी गुण असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. कृष्णा दोडमणी (वय ४ वर्षे) !

चि. कृष्णा दोडमणी
    चि. कृष्णा मंजुनाथ दोडमणी हा बालसाधक त्याच्या वडिलांसमवेत सनातनच्या रामनाथी आश्रमात रहातो. धान्य विभागातील साधकांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. सेवाभाव
अ. कृष्णा रुग्णाईत असला, तरी तो त्याच्या बाबांजवळ बसून त्यांना सेवा करण्यासाठी शक्य ते साहाय्य करतो.
आ. एकदा कृष्णाचे बाबा तीन मास (महिने) देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेला गेले होते. तेव्हाही त्याला कुणीही बोलावले आणि एखादी लहानशी वस्तू नेऊन देण्याची सेवा सांगितली, तरी तो लगेच करत असे. तो कुणालाच नाही म्हणत नाही.
इ. एकदा धान्य-विभागाजवळील नळाला पाय धुण्यासाठी पाणी येत नव्हते, तर तेथे त्याने एकेक तांब्यातून पाणी नेऊन लहान बालदी पाण्याने भरून ठेवली. ही कृती त्याला कुणीही सांगावी लागली नाही.

स्वतः भावावस्थेत असतांना दुसर्‍या साधिकेने प्रश्‍न विचारताच भावावस्था भंग पावणे आणि त्या वेळी प.पू. डॉक्टरांना साधकांशी बोलतांना उच्च कोटीच्या भावावस्थेतून शब्दांच्या स्तरावर यायला किती कठीण वाटत असेल, याची स्वतःला जाणीव होणे

     मी भावजागृतीसाठी प्रयत्न करायला आरंभ केला आहे. एकदा ५-१० मिनिटे माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला छान वाटत होते आणि त्याच स्थितीत रहावेसे वाटत होते. तेव्हा एक साधिका मला एक प्रश्‍न विचारायला आली आणि तिला उत्तर देतांना माझी भावावस्था भंग पावली.
    त्या वेळी मला जीवनात पहिल्यांदाच जाणीव झाली, प.पू. डॉक्टरांची भावावस्था उच्च कोटीची असल्यामुळे त्यांना साधकांशी बोलतांना शब्दाच्या स्तरावर यायला किती कठीण वाटत असेल !
    (श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने दिलेल्या अनुभूतीसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक)
- श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१५)

सर्व प्रकारच्या अडचणींवर एका संतांंनी सांगितलेली साधना आणि आध्यात्मिक उपाय कसे लाभकारी ठरतात, याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्‍वेता क्लार्क यांना आलेली अनुभूती

    
सौ. श्‍वेता क्लार्क
ईश्‍वराच्या कृपेमुळे मला प्रसारसेवा करण्याची संधी मिळाली. या सेवेच्या निमित्ताने मी एके ठिकाणी नवीन साधिकेकडे रहाण्यास गेले होते. तेथे मला दिलेल्या खोलीतील मांडणीत मी माझे सर्व साहित्य, संतांनी दिलेला प्रसाद, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)ची उदबत्ती, आध्यात्मिक उपायांसाठी संतांनी वापरलेले कपडे इत्यादी वस्तू ठेवल्या. नंतर मी त्या साधिकेसह जेवायला बसले.
१. साधिकेला येत असलेल्या आर्थिक अडचणी
      मागील काही मासांपासून त्या साधिका पुष्कळ आर्थिक अडचणीत आहेत, हेे मला ठाऊक होते. त्यांच्या यजमानांची नोकरी अकस्मात् गेली. त्यांची चारचाकी गाडी नादुरुस्त झाली, यामुळे त्यांना स्वतःचे सर्व दागिने विकावे लागले होते इत्यादी. आम्ही जेवत असतांना ताई मागील ६ मासांपासून त्यांना येत असलेल्या दुःखदायक अडचणींविषयी रडून सांगत होत्या. एवढ्या सार्‍या अडचणी असूनही त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसारासाठी मला त्यांच्या घरी रहाण्यास होकार दिला, तसेच प्रवचनांचे आयोजन करून प्रसारासाठी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.

पू. सौरभदादांविषयी कु. निकिता झरकर यांना जाणवलेली सूत्रे

१. मनातील नकारात्मक विचार जाऊन उत्साह वाटणे
     २.४.२०१५ या दिवशी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे दिवसभर पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी पू. दादांकडे उपायांना गेले. तेव्हा मनातील सर्व विचार जाऊन साधनेसाठी नवीन उत्साह मिळाला.
२. त्रास अल्प होऊन रात्री झोप लागणे
     काही दिवसांपासून मला त्रास होत असल्यामुळे काही आध्यात्मिक उपाय सांगितले आहेत. तेव्हापासून मला रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी अंग दुखते. ज्या दिवशी मी पू. दादांकडे सेवेला जाते, त्या दिवशी मला रात्री झोपही येते आणि सकाळी होणारा त्रासही अल्प प्रमाणात होतो.

प.पू. डॉक्टरांच्या चरणी मागणे !

पू. संदीप आळशी
प.पू. डॉक्टर,
      आम्ही आपल्यापासून आहोत ! (आमच्यातील आत्मा आपल्या परमात्मास्वरूपाचा अंश आहे.)
     आम्ही आपल्यामुळे आहोत ! (घोर आपत्काळात आपल्यामुळे जीवित आहोत.)
     आम्ही आपल्यातच आहोत ! (आमचे अस्तित्व विसरलो, तर परमात्मातत्त्वातच आहोत.)
      कृतज्ञता शब्दांतून व्यक्त केली जाते. आपण आमच्यावर करत असलेली कृपा अमर्याद आहे; म्हणून कृतज्ञतेच्या शब्दांनाही मर्यादा येते. मग आम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करणार ? या कृतज्ञतेप्रीत्यर्थही आम्ही आपल्याला काही देऊ शकत नाही; केवळ आपल्याकडून घेऊच शकतो. आमच्याकडून निष्काम भावाने साधना करवून घ्यावी आणि आपल्या चरणी आम्हा साधकांना स्थान द्यावे, हे आपल्या चरणी मागणे आहे.
- (पू.) श्री. संदीप आळशी (२.१.२०१६)

डिसेंबर २०१५ च्या कार्यशाळेत सौ. क्रिस्टन हार्डि यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. क्रिस्टन हार्डि
१. चैतन्यात सहस्रो शब्दांचे सामर्थ्य असणे
      साधनेच्या संदर्भात साधकांशी आणि नवीन जिज्ञासूंशी मी नेहमीच मानसिक स्तरावर संवाद साधण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आमच्यात सहजता निर्माण होईल; परंतु साधकांना स्थिरता आणि शांती यांची अनुभूती द्यायला हवी, अशी श्रीकृष्णाची आपल्याकडून इच्छा असते. अशी अनुभूती केवळ आपले श्रीकृष्णाशी अनुसंधान असल्यास आणि त्याचे चैतन्य ग्रहण केल्यासच येऊ शकते. याविषयी श्री. मिलुटीनदादांनी (आताचे पू. मिलुटीन पांक्रात्स) सांगितले, चैतन्यात सहस्रो शब्दांचे सामर्थ्य असते, म्हणजेच आपल्याला फारसे बोलण्याची आवश्यकता नसते. श्रीकृष्ण तेथे असतो आणि तोच साधकांशी बोलतो.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी/अमावास्या (९.१.२०१६) सकाळी ७.५४ वाजता
समाप्ती - पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१०.१.२०१६) सकाळी ७.०१ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) रश्मी नल्लादारू यांना आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या
(सौ.) रश्मी नल्लादारू
१. आश्रमापासून दूर असल्याची जाणीव नष्ट होणे : जानेवारी २०१५ मध्ये रामनाथी आश्रमातील कार्यशाळा संपल्यावर मी घरी परतले. तेव्हापासून मी आश्रमापासून दूर परदेशातील माझ्या घरी रहात आहे, ही जाणीव अत्यल्प होत गेली. २५.१२.२०१५ या दिवशी मी पुन्हा रामनाथी आश्रमात आले, तेव्हा एस्.एस्.आर्.एफ्.चे काही साधक माझ्या स्वागतासाठी आले होते. त्या वेळी मी आश्रमातच आहे, तर माझे स्वागत करण्याची काय आवश्यकता आहे ? असे मला वाटले. पूर्वी काही मासांनंतर मी आश्रमात परतल्यावर भावजागृती होऊन माझे डोळे पाणावत असत. मी आश्रमापासून दूर होते आणि आता पुन्हा मला येथे यायला मिळाले, ही जाणीव असायची. या वेळी मात्र तसे न होता मी आताच प्रसारासाठी जाऊन परत घरी आले आहे, असे वाटत होते.

साधकांनो, प्रगतीचा विचार करण्यापेक्षा सतत सत्मध्ये रहाता येणे महत्त्वाचे !

     समजा दोन व्यक्तींचा पगार सारखा आहे. एकाच्या पगारातील काही भाग कर्ज नसल्याने शिल्लक रहातो, तर दुसर्‍याचा महिन्याचा खर्च झाल्यावर राहिलेला शिल्लक भाग कर्ज फेडण्यात खर्च होतो. याचा अर्थ ज्याला कर्ज आहे, त्याचे प्रारब्ध खडतर आहे. तो कर्ज फेडून प्रारब्ध कमी करत आहे. तेव्हा इतकी वर्षे साधना करत आहे, तर प्रगती का होत नाही, असा विचार नको करायला. प्रारब्ध कमी होणे, हेही प्रगतीचे लक्षण आहे. साधना करून सत्मध्ये रहाता येत आहे, हे महत्त्वाचे आहे. - परात्पर गुरु डॉ. आठवले (२७.५.२००८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् 
शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत !
     या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भांडे स्वच्छ हवे
तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ : तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पठाणकोट आक्रमण : इस्रायलच्या नजरेतून !

संपादकीय
     शत्रूची एक गोळी जरी आपल्या देशात आली, तरी त्याला युद्ध मानून त्या दिशेने थेट आक्रमण करणारा बाणेदार देश, अशी आज इस्रायलची जगभरात ख्याती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या आठ मासांनी इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र जगाच्या नकाशावर अवतरले. भारत आणि इस्रायल ही दोन्ही इस्लामेतर राष्ट्रे आपापले शेजारी अनुक्रमे पाक आणि पॅलेस्टाईन यांच्या सततच्या उपद्रवांमुळे त्रस्त होत. पॅलेस्टाईनकडून इस्रायलच्या कुरापती काढल्याच्या बातम्या नित्याच्याच झाल्या होत्या. तथापि अत्यंतिक कठोर पावले उचलून इस्रायलने पॅलेस्टाईनची शब्दश: धूळधाण उडवली. आतंकवाद कसा चिरडावा, याचा जणू वस्तूपाठच इस्रायलने जगासमोर घालून दिला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn