Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 
स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती, रत्नागिरी

सनातनचे पू. महादेव नकाते यांचा आज वाढदिवस

आज मराठी पत्रकारदिन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर
     मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी पत्रकारदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आचार्य जांभेकर यांना विनम्र अभिवादन !

सुरक्षेतील उणिवांविषयी संरक्षणमंत्र्यांकडून चिंता व्यक्त !

सुरक्षेविषयी चिंता करणारे नव्हे, तर सुरक्षेतील उणिवा दूर करणारे संरक्षणमंत्री हवेत !
     पठाणकोट - देशाच्या सुरक्षेतील उणिवांविषयी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्रीकर यांनी ५ जानेवारी या दिवशी तिन्ही दलांच्या प्रमुखांसमवेत घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची दीड घंटा पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पर्रीकर पुढे म्हणाले,
१. पठाणकोट येथील हवाई तळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही आतंकवादी आत घुसलेच कसे, हे आम्ही जाणून घेत आहोत.
२. काही जागा अशा आहेत की, जेथून आतंकवादी घुसखोरी करू शकतात. (या उणिवेला उत्तरदायी असलेल्यांना काय शिक्षा करणार ? - संपादक)
३. हवाई तळावर आक्रमण करणारे एकूण ६ आतंकवादी होते. सर्वांना ठार करण्यात आले आहे.

बॉम्बस्फोटाचा कट रचणार्‍या ब्रिटीश मुसलमान जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा

     लंडन - २००५च्या लंडन बॉम्बस्फोटांच्या १०व्या वर्धापनदिनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या ब्रिटीश मुसलमान जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. साना अहमद खान (२४ वर्षे) हिला कमीत कमी २५ वर्षे कारागृहात घालवावी लागतील, तर तिचे पती अहमद रेहमान (२५ वर्षे) यांना कमीत कमी २७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांनी रचलेला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट ब्रिटीश सुरक्षादलाने उधळून लावला होता. अशा प्रकारचेआणखी ६ कट ब्रिटीश सुरक्षादलाने उधळून लावले होते, अशी माहिती ब्रिटीश पंतप्रधान डॅविड कॅमेरून यांनी संसदेत दिली. अहमद रेहमान त्याच्या झोपण्याच्या खोलीत बॉम्ब बनवत होता.

पठाणकोटची घटना आतंकवादी आक्रमण नव्हे, तर युद्धच !

     पठाणकोटच्या हवाई तळावर झालेले आक्रमण हे वरकरणी जरी आतंकवादी आक्रमण दिसत असले, तरी ते भारताविरूद्ध पुकारण्यात आलेले अघोषित युद्धच आहे, हे जोपर्यंत भारतीय राज्यकर्त्यांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे अशक्य वाटते. काळ जसा पालटत गेला, तसे युद्धाचे चित्रही पालटत गेले. फार पूर्वी ठराविक प्रहरात युद्ध होत असे. कालांतराने युद्धाचे नियम पालटले. आता तर ते स्वरूप इतके पालटले आहे की, एखादी घटना हा युद्धाचाच भाग आहे, हे कळायलाही वेळ लागतो. वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पोळलेला पाक भारताशी समोरासमोर युद्ध करण्याची चूक करण्यास कचरतो; पण म्हणून त्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. आतंकवाद्यांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून पाक त्याचा कार्यभाग साधत आहे.

आय.एस्.आय.एस्.ला सर्वाधिक भीती इस्रायलपासून !

युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांचा निष्कर्ष
आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करायचा असेल, तर भारताला 
इस्रायलसारखा प्रखर राष्ट्र्रवाद अंगी बाणवणे आवश्यक आहे !
     न्यूयॉर्क - आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्र्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे. तोदेनहॉफर यांनी वर्ष २०१५मध्ये आय.एस्.आय.एस्.च्या सान्निध्यात १० दिवस काढल्यानंतर म्हटले आहे की, आय.एस्.आय.एस्.च्या जागतिक विस्तार नियोजनांमध्ये अर्ध्याहून अधिक जगाचा समावेश असला, तरी त्यात इस्रायल देशाचा समावेश नाही.
     एका ज्यू वृत्तपत्राला देलेल्या मुलाखतीत जर्गेन तोदेनहॉफर म्हणतात, अमेरिका तसेच इंग्लंड यांच्या सैन्याला आतंकवाद्यांविरुद्ध लढण्याचा सराव असला, तरी आम्ही त्यांचा पराभव करू शकतो, असे आय.एस्.आय.एस्. ला वाटते;

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या नैवेद्य निर्मितीत भ्रष्टाचार !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !
मंदिरात नैवेद्य बनवण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असेल, तर त्या मंदिरातील इतर
कारभार कसा केला जात असेल, याची कल्पनाच न केलेली बरी ! ही परिस्थिती 
पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत !
     वाराणसी - काशी विश्‍वनाथ मंदिरात दाखवण्यात येणार्‍या नैवेद्यात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. नेवैद्यासाठी मागवण्यात येणार्‍या दुधात पाणी मिसळण्यात येत असून नैवेद्यासाठी उच्च दर्जाच्या तांदुळाऐवजी किरकोळ दर्जाचा तांदूळ वापरण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा भ्रष्टाचार पुन्हा केल्यास नोकरीवरून काढण्याची चेतावणी यासाठी उत्तरदायी मुख्य भंडार्‍यांना देण्यात आली आहे.
     या संदर्भात तक्रार अल्यावर न्यास परिषदेेचे अध्यक्ष आचार्य पं. अशोक द्विवेदी यांनी भंडारगृहाचे निरीक्षण केले असतांना त्यांना हा भ्रष्टाचार आढळून आला. आचार्य पं. द्विवेदी म्हणाले, चौकशीच्या वेळी काही कर्मचार्‍यांकडून समजले की, प्रसादासाठी सुगंधित आणि उच्च प्रतीचा तांदूळ मागवला जातो; परंतु चांगला तांदूळ घरी पाठवून त्या जागेवर जाड्या तांदुळाचा नेवैद्य सिद्ध केला जातो.

बंगालच्या मालडामधील धर्मांधांच्या हिंसाचारप्रकरणी केवळ १० जण अटकेत !

बंगालच्या तृणमूल काँग्रेस शासनाचा धर्मांधांना उघड पाठिंबा !
     कोलकाता - बंगालच्या मालडा येथे २ लाख ५० सहस्र मुसलमानांनी हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी मुसलमानांच्या श्रद्धास्थानाच्या संदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात ४ जानेवारी या दिवशी मोर्चा काढला. या वेळी कित्येक धर्मांधांनी रस्त्यावर सहा घंटे हैदोस घातला, तरीही बंगालच्या शासनाने केवळ १० धर्मांधांना अटक केली आहे. उत्तरप्रदेश शासनाने कमलेश तिवारी यांना २ डिसेंबरला अटकही केली आहे. असे असतांना त्याच्या एक मासानंतर म्हणजे ४ जानेवारीला धर्मांधांकडून हा हिंसाचार घडवण्यात आला.
     या वेळी धर्मांधांनी भररस्त्यात गोळीबार केला, बॉम्ब फेकले, प्रवासी बस, वाहने पेटवली, तसेच सैनिकांच्या वाहनावर आक्रमण केले, सर्वसामान्य नागरिकांच्या घरांत घुसून लुटालूट केली.

...तर महिलांवर बलात्कार करणार्‍यांना मी थेट गोळ्याच घालीन !

देहलीचे पोलीस आयुक्त बी.ए.बस्सी यांचा बलात्कार्‍यांविषयी संताप
महिलांवर बलात्कार करणार्‍यांना गोळ्या घालण्याची गोष्ट फार लांबची आहे, 
आधी पोलिसांनी त्यांचे कर्तव्य जरी नीट बजावले, तरी बलात्कार न्यून होतील !
     नवी देहली - भारतीय राज्यघटनेने अनुमती दिली, तर देहलीमध्ये महिलांवर बलात्कार करणार्‍यांना मी थेट गोळ्याच घालीन, तसेच अशा गुन्हेगारांना फासावर लटकवल्यास मला आनंदच होईल; मात्र आपल्याकडे तशी अनुमती नाही, अशा शब्दात देहलीचे पोलीस आयुक्त बी.ए.बस्सी यांनी बलात्कार्‍यांविषयी संताप व्यक्त केला. (अत्याचार झाल्यावर महिलांना पोलीस ठाण्यात जावेसे वाटेल, अशी परिस्थिती आज एखाद्या तरी पोलीस ठाण्याची आहे का ? - संपादक)
     गेल्या काही मासांपासून बस्सी आणि केजरीवाल यांच्यात पोलीस कारभाराविषयी वाद चालू आहे. पोलीस यंत्रणा राज्यशासनाच्या कह्यात द्यावी, अशी केजरीवाल यांची मागणी आहे. तसा प्रस्तावही त्यांनी सिद्ध केला आहे.

आतंकवादाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन

पुणे आतंकवादविरोधी पथकाचा उपक्रम
आतंकवादाच्या विरोधात जनजागृती करण्यासह आतंकवाद्यांचा नाश केल्यासच
देश आतंकवादमुक्त होईल, यासाठीही पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत !
      पुणे - महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे आतंकवादविरोधी पथकाच्या वतीने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. आतंकवादी कृत्यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आझम कॅम्पस येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आतंकवादविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. घातपाती कारवाया रोखण्यासाठी विद्यार्थी कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात, याविषयीची माहिती धुमाळ यांनी दिली.

श्रीलंकेकडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

     रामेश्‍वरम् - कच्छतीवूजवळील समुद्रात मासेमारी करणार्‍या बारा भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे, अशी माहिती मत्स्य विभागाचे सहसंचालक गोपीनाथ यांनी दिली. (भारताने श्रीलंकेच्या मच्छिमारांना अटक केली, अशी बातमी कधी ऐकायला मिळते का ? - संपादक)

आता युद्धच हवे आरपार !

नाही पहावत आता अश्रू वीरपत्नी अन् वीरमातेचे !
नाही पहावत देह वीरमरण पत्करलेल्या आमच्या जवानांचे !!
पुरे झाल्या सलामी, पुुरे झाले हवेतील गोळीबार !
आता चर्चा-मैत्री नको, तर युद्धच हवे आरपार !!

मरायच्याच इराद्याने आले होते ते,
त्यांना मारून प्रश्‍न का मिटला ?
त्यांचे उत्पत्तीस्थान उखडून टाकायला
मुहूर्त पहायचा कशाला

कॉ. गोविंद पानसरे खुनाच्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी अल्पवयीन साक्षीदारास पोलीस संरक्षण द्या !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संजीव पुनाळेकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र
     मुंबई - गुन्हेगारी इतिहासासाठी पश्‍चिम महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे सनातनला आणि आरोपीला अपकीर्त करण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराची किंवा त्याच्या कुटुंबियांची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व कालावधीत त्याला आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबियास प्रतिदिन २४ घंटे संरक्षण देण्यात यावे, असे पत्र हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. हे पत्र री. संजीव पुनाळेकर यांनी कॉ. पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने लिहिले आहे.

मुसलमानांनी वन्दे मातरम् म्हटल्यास त्यांना इस्लामचा पुनर्स्वीकार करावा लागेल ! - भाग्यनगर येथील माजी नगरसेवक खालिद

ज्यांना भारतमाता आपली वाटत नाही, त्यांना या देशावरील संकट आपले वाटेल का ?
धर्मांध संघटनेने वन्देे मातरम्च्या विरोधात काढलेल्या फतव्याचा दिला दाखला
     भाग्यनगर (हैद्राबाद) - मुसलमानांनी वन्दे मातरम् म्हटल्यास त्यांना इस्लामचा पुनर्स्वीकार करावा लागेल, असे द्वेषमूलक विधान माजी नगरसेवक अमजुद्दौल्ला खान खालिद यांनी येथे केले. येथील नियोजित अखिल भारतीय औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनात वन्देे मातरम् म्हटल्यास मुसलमान या कार्यक्रमावर बहिष्कार घालतील, अशी चेतावणीही त्यांनी दिली. या संदर्भात खालिद यांनी दारूल उलुम देवबंद या संघटनेने काढलेल्या फतव्याचा दाखला दिला आहे. (राष्ट्रीय गीत म्हणायला देशाचा कुणी तरी नागरिक नकार देईल का ? - संपादक)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

धर्मांधांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करू नये, यासाठी त्यांच्या वाढत्या लोकसंख्येला आवर घालणे आवश्यक ! - डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

डावीकडून  सौ. नंदिनी सुर्वे, डॉ. उपेंद्र डहाके 
(दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. नरेंद्र सुर्वे 
     वशेणी (जिल्हा रायगड) - ख्रिस्ती मिशनरी आदिवासी पाड्यांत जाऊन लोकांना फसवून आणि आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात. धर्मांध लव्ह जिहादमध्येही हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी लग्न करतात. त्या माध्यमातून संतती निर्माण करून देशातील मुसलमानांची लोकसंख्या वाढवतात. त्यामुळे आज भारतातील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे जर आपण वेळीच रोखले नाही, तर धर्मांध पुन्हा एकदा भारतापासून वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. ते येथे ३ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. रायगड जिल्ह्यात झालेली ही तिसरी सभा होती. या सभेला २५० हून अधिक जणांची उपस्थिती लाभली. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.

अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना १० वर्षांची निवडणूकबंदी ! - राज्य सहकार विभाग

सत्तेचा अपवापर करणार्‍या अशांवर निवडणूकबंदीच्या जोडीला कठोर कारवाईही व्हायला हवी ! 
सहकारी बँकांना दिवाळखोरीत आणल्याचे प्रकरण 
     मुंबई - सहकारी बँकांवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता गाजवणार्‍या राज्यातील सहकारसम्राटांना १० वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य सहकार विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांना या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

ईश्‍वरावरील दृढ श्रद्धा, समर्पित भाव आणि कर्म यांची सांगड म्हणजे देवाची अनुभूती ! - पू. प्रमोद केणेकाका

     सांगली - मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी चमत्कार करू शकत नाही; कारण मी देव नाही; पण या कलियुगात देव आहे आणि चमत्कार घडू शकतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ईश्‍वरावर दृढ श्रद्धा, समर्पित भाव आणि कर्म यांची सांगड असली, तरच जीवनात आपल्याला देवाच्या अनंत अनुभूती येतात, असे मार्गदर्शन दत्तभक्त पू. प्रमोद केणेकाका यांनी केले. पू. केणेकाका यांचा गिरनार पर्वतावरील अनुभूती कथनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे २ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
     ते पुढे म्हणाले, अनुभूती येण्यासाठी प्रत्येक पायरीवर आपण आपला एकेक दुर्गुण सोडून पुढे गेले पाहिजे. दुर्गुणाचा त्याग करून समूळ मी मरत नाही. जोपर्यंत आपल्या मनाचा गाभारा स्वच्छ आणि पवित्र होत नाही, तोपर्यंत त्यात दत्त महाराज विराजमान होणार नाहीत. यासाठी सर्वानी चांगल्या कर्माचा ध्यास धरा. गुरुभक्ती ही पूर्ण विश्‍वास आणि श्रद्धेने करावी.

पुणे येथे ३ सहस्र ६०० किलो गोमांसाचा टेम्पो शासनाधीन, २ जणांना अटक

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी ! 
     पुणे, ५ जानेवारी - येथील शिवाजीनगर सत्र न्यायालयासमोरच्या रस्त्यावर २ जानेवारीच्या रात्री एक टेम्पो ३ सहस्र ६०० किलो गोमांस मुंबई येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात होता. हा टेम्पो शिवाजीनगर पोलिसांनी शासनाधीन केला आहे. त्यामध्ये विनापरवाना गाय, वळू आणि कालवड यांचे मांस आढळून आले. या प्रकरणी टेम्पोचालक बिलाल गफूर माशाळकर आणि साहाय्यक महेंद्र गायकवाड या दोघांना अटक केली आहे. गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कारंजा (जिल्हा वाशिम) येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा लावला म्हणून शिक्षकाकडून मारहाण !

विद्यार्थ्यांनी टिळा लावला; म्हणून त्यांना मारहाण करायला हे पाकिस्तान 
आहे का ? अशा हिंदुद्वेषी शिक्षकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     कारंजा (जिल्हा वाशिम) - येथील जे.डी. चवरे या शाळेतील विद्यार्थ्यांनी कपाळावर भगवा टिळा लावला; म्हणून शिक्षक मोटघरे यांनी दोन विद्यार्थ्यांना मारहाण केली, तसेच इतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढले. श्री. मोटघरे यांचे वर्गातील मुलांवर कायमच दडपशाहीचे धोरण असते. हिंदु धर्मातील देवतांना अपमानास्पद बोलणे मुद्दामहून हिंदुधर्मातील विद्यार्थ्यांच्या धर्मिक भावना दुखावणे, रामायण, महाभारत या धार्मिक ग्रंथांवर मुलांसमोर जाणूनबुजून टीका करणे, हे नित्याचेच झाले होते, असे मुलांनी सांगितले. 

श्री साईबाबा संस्थानकडे ११ दिवसांत ११ कोटींहून अधिक रुपये दानपेटीत

भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा विनियोग संस्थानने योग्य प्रकारे करावा, ही अपेक्षा ! 
     शिर्डी, ५ जानेवारी - नाताळाच्या सुट्ट्या आणि ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी २४ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात शिर्डीमध्ये श्री साईचरणी विक्रमी गर्दी झाली होती. या काळात ११ कोटी ८७ लक्ष रुपयांची देणगी संस्थानच्या दानपेटीत जमा झाली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मंदिरातील दानपेट्यांमध्ये ८ कोटी १० लक्ष, देणगी स्वीकारण्याच्या विभागात रोख आणि धनादेश स्वरूपात ३ कोटी २४ लक्ष, 'ऑनलाईन' देणगीद्वारे १९ लक्ष रुपये, १ किलो २३१ ग्रॅम सोने, २१ किलो चांदी आणि २१ देशांचे परकीय चलन यांचा यामध्ये समावेश आहे. श्री साईबाबा संस्थानकडे आजमितीला १४०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी, ३८४ किलो सोने, ४ सहस्त्र किलो चांदी आणि ७ कोटी ७० लक्ष रुपयांचे हिरे जमा आहेत.

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला सकारात्मक प्रतिसाद

फलकप्रसिद्धी, कोपरासभा आणि बैठका यांतून वातावरण निर्मिती
     नंदुरबार (प्रतिनिधी) - येथे १० जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी होणारे फलक अनावरण, कोपरासभा आणि हिंदुप्रेमींच्या पार पडणार्‍या लहान बैठका यामुळे या सभेच्या प्रचाराने वातावरणनिर्मिती साधली जात आहे.
१. अनेक उत्साही तरुण हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे या कार्यात सहभागी झाले आहेत. महिलाही घरोघरी सभेविषयीची माहिती देत आहेत. शहरात ठिकठिकाणी सभेची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक वसाहतीत बैठका घेऊन माहिती देणे, कोपरा सभा घेणे यांवर भर देण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मांधाची देशद्रोही मानसिकता जाणा !
     पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणात देशासाठी हुतात्मा झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्याविरोधात फेसबूकवर अवमानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या प्रकरणी मल्लपुुरम् (केरळ) येथील अन्वर नावाच्या २४ वर्षीय धर्मांध युवकास राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पाकच्या सैन्यप्रमुखांना होती पठाणकोट आक्रमणाची पूर्वकल्पना !

     नवी देहली - पाकिस्तानचे सैन्यप्रमुख राहील शरीफ यांना पठाणकोटमधील भारतीय सैन्याच्या हवाई तळावर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाची पूर्वकल्पना होती, अशी माहिती भारतीय गुप्तहेर संघटनांनी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रियेला पाक सैन्याचा विरोध असल्याचेही बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ यांना स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तुम्हाला कोणतेही बंधन नाही; मात्र पाकचे सैन्य देशातील आतंकवादी संघटनांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. याच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया केल्या जात आहेत. 

संभाजीनगर येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त बैठकीचे आयोजन

     
बैठकीला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
     संभाजीनगर - येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने २ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदुत्ववाद्यांना बैठकीचा उद्देश आणि हिंदूसंघटनाची आवश्यकता यांविषयी संबोधित केले. 

इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात येणार - श्रीपाद नाईक

केंद्रशासनाचा स्तुत्य निर्णय ! 
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सर्वच ठिकाणी करावी, ही अपेक्षा ! 
     पुणे, ५ जानेवारी - इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही योग प्रशिक्षण देण्याची सिद्धता शासनाने चालू केली आहे. त्यानुसार खेळाच्या तासिकांना योग शिकवला जाणार आहे. त्याविषयीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. येथील भारती विद्यापिठाच्या वतीने आयुर्वेदिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारती विद्यापिठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, डॉ. नरेंद्र भट आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     keralke Anvar ne Facebook par kiya hutatma Lt. Colonel Niranjan kumar ka anadar. - Aise log deshke liye jan dena kya samzenge ?
जागो !
     केरलके अनवर ने फेसबुकपर किया हुतात्मा लेफ्टिनेंट कर्नल निरंजन कुमार का अनादर. - एैसे लोग देशके लिए जान देना क्या समझेंगे ?

हुतात्मा लेफ्टनंट कर्नल निरंजन यांच्याविरुद्ध अवमानकारक प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या केरळ येथील धर्मांधास अटक !

ही आहे धर्मांधाची देशद्रोही मानसिकता ! पोलीस आता त्यास 
कठोर शासन करणार कि त्याचेही मतपरिवर्तन करत बसणार ?
     मल्लपुरम् (केरळ) - पठाणकोट येथील आतंकादी आक्रमणात देशासाठी वीरमरण आलेले हुतात्मा लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्याविरोधात फेसबूकवर अवमानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या प्रकरणी अन्वर नावाच्या २४ वर्षीय धर्मांध युवकास राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पठाणकोट आक्रमणातील सर्व हुतात्मा सैनिकांना सामाजिक संकेस्थळावरून श्रद्धांजली वाहिली जात असतांना अन्वर याने मात्र विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो मल्लपुुरम् येथील रहिवासी आहे.
     अन्वरने त्याच्या प्रतिक्रियेत लिहिले, एक समस्या न्यून झाली ! आता त्यांच्या पत्नीला आर्थिक साहाय्यता आणि नोकरी देण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकाला काहीही मिळत नाही.

पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी प्रथमदर्शी अहवाल नोंद

     पठाणकोट - पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी ३ प्रथमदर्शी अहवाल नोंद करण्यात आले आहेत. या आक्रमणात पाकचाच हात असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे डी.जी. शरद कुमार यांनी दिली. आक्रमणाच्या वेळी एका आतंकवाद्याने पाकमधील त्याच्या आईशी भ्रमणभाषद्वारे केलेले संभाषण हा महत्त्वाचा पुरावा असल्याचे सांगितले जात आहे.

पेण येथे सनातन संस्थेच्या वतीने समर्थ पादुकांचे पूजन !     पेण - समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणपादुकांचे १ जानेवारी या दिवशी येथील श्री रामेश्‍वर मंदिरात शुभागमन झाले. सनातन संस्थेच्या वतीने सर्वश्री जांभळेगुरुजी, मनीष माळी, अरुण भोईर, कुमार ठाकूर, सौ. शशिकला ठाकूर, सुमित्रा इरले यांनी पादुकांच्या पालखीचे स्वागत केले, तसेच पादुकांचे विधीवत पूजन करून दर्शनही घेतले. 
     या वेळी समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी आणि अन्य समर्थसेवक, तसेच रामेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त अन् स्थानिक समर्थभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पठाणकोट आक्रमणामागची पार्श्‍वभूमी

श्री. भाऊ तोरसेकर
     १ जानेवारीला पहाटे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जिहादी अतिरेक्यांनी आक्रमण केले. असे आक्रमण झाले की, तात्काळ सुरक्षा वा गुप्तचरांच्या कामात ढिलाई झाल्याचा सरसकट आरोप चालू होतो. पठाणकोट आक्रमणाच्या ज्या बातम्या झळकत होत्या, त्यात सातत्याने तांत्रिक क्षेत्राला धक्का लागलेला नाही, असे सांगितले जात होते; परंतु हे तांत्रिक क्षेत्र म्हणजे काय? तर जिथे लढाऊ विमाने उभी वा सज्ज करून ठेवलेली असतात, असे अतिशय सुरक्षित क्षेत्र असते. आक्रमणकर्ते त्यालाच लक्ष्य करायला आले असणार, हे वेगळे सांगायला नको; पण प्रचंड विस्तार असलेल्या या तळावर हे सुरक्षित क्षेत्र नेमके कुठे आहे, त्याची माहिती आक्रमणकर्त्यांना होती, ही खरी बातमी आहे अन्यथा आजवर अनेक पोलीस ठाणी वा लष्करी तळावर अशी आक्रमणे झालेली आहेत. पठाणकोटचे आक्रमण नेमके लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून झाले.

हिंदूंनो, मनोधैर्य खच्चीकरणाची जिहादी मुसलमानांची कूटनीती ओळखून भगवंताचे स्मरण करत जोमाने लढा !

     जिहादी मुसलमानरूपी असुरांचे भय हिंदूंनी मुळीच बाळगायची आवश्यकता नाही. उलट त्यांच्या हिंसात्मक हावभावापुढे नतमस्तक न होता भगवंताचे स्मरण करून प्राणपणाने लढा दिला पाहिजे. प्रारंभी हिंसक आणि रौद्ररूप घेऊन वातावरण निर्मिती करणे, समोरच्याला घाबरवणे आणि त्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करणे, हे राक्षसी गुण सामाईकपणे पृथ्वीवरील कोणत्याही देशातील जिहादी मुसलमानात पहायला मिळतात. कुणाच्याही अध्यात ना मध्यात (याचसमवेत अध्यात्मातही) न पडणारे आपण त्यांच्यापुढे घाबरून जातो. 
- श्री. प्रशांत जुवेकर (२५.६.२०११)
     (मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने कारागृहात असतांना केलेले लिखाण - संकलक)

दिशाहीन आणि प्रकाशहीन चौथा स्तंभ !

आज असलेल्या मराठी पत्रकारदिनाच्या निमित्ताने...
     चौथा स्तंभ कलंडला आहे, अशा आशयाचे लेख प्रतिवर्षी प्रसिद्ध होत असतात. भविष्यात तो अधिकाधिक कलंडत जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. याच चौथ्या स्तंभाचे दायित्व असलेल्या पत्रकारांचा आज दिवस अर्थात पत्रकारदिन ! त्यानिमित्त दिवंगत ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचे पत्रकारिता आणि पत्रकार यांविषयी परखड विचार येथे पाहूया.
१. पत्रकारांच्या पाट्याटाकूपणामुळे पत्रकारितेचा उद्देश निष्फळ !
      पाट्या टाकणे हा रोग आहे. तो आजच्या वृत्तपत्रातील बहुसंख्य पत्रकारांना लागला आहे. त्याचा परिणाम वृत्तपत्रांच्या गुणवत्तेवर होतो. प्रसारमाध्यमांतील क्रांती आणि आधुनिक यंत्रणेची साथ अशा वेळी निष्फळ ठरते. प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित न रहाता वृत्त देणे, हे तर सर्रास चालते. सर्व मोठ्या वृत्तपत्रांच्या वार्ताहरांना भरपूर प्रवासभत्ता असतो. तो व्यय न करता दूरभाष संचावर वार्ता घेतल्या जातात. टेलिफोन जर्नालिझमवर मी यापूर्वी पुष्कळ लिहिले आहे. कुठेही आग लागली की, पोलीस आणि अग्नीशमन दलाला दूरभाष करणे, हे ठीक आहे; परंतु वक्त्याला दूरभाष करून तुम्ही आज काय बोललात, हे विचारणे सध्या सर्रास चालते.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

नात्यामध्ये धर्माचरणाचा अंकुश हवा !

     सध्या बलात्कार आणि त्यातील क्रौर्याने समाजमन अक्षरशः विदीर्ण होत आहे. आज दर दिवशी बलात्कार किंवा विनयभंग, हत्याकांड होत आहे. नवजात शिशु असो अथवा ८० वर्षांचे वृद्ध असो, सध्या कोणीही सुरक्षित नाही. अनेक वेळा महिला अथवा तरुणींवर अतिप्रसंग करणारे नात्यातील, म्हणजे वडील, काका, भाऊ असे आप्तस्वकीय की, जे वर्षानुवर्षे सोबत रहाणार्‍या कुटुंबातील व्यक्तींपैकी एक असतात. अशा वेळेस नाते नावाची एखादी गोष्ट शिल्लक आहे का ? नात्यातील विश्‍वासाहर्तता आहे कि नाही ? नात्यांमधील परिभाषा एवढी कशी पालटली ? स्वकियांपासून होणारा हा धोका कसा ओळखायचा ? असे प्रश्‍न मनात नक्कीच येतात. सद्यस्थितीत नात्यांमधील पवित्रता संपुष्टात येऊन फक्त नरभक्षक शिल्लक राहिला आहे,

हिंदुविरोधी षड्यंत्र उघड करणार्‍या आणि हिंदूंना विजिगीषु बनवणार्‍या पत्रकारितेची आवश्यकता !

श्री. संजय मुळ्ये
आज असलेल्या मराठी पत्रकारदिनाच्या निमित्ताने...
     ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पु.भा. भावे यांच्या पत्रकारितेचे काही पैलू या लेखात दाखवून देण्यात आले आहेत. आजच्या पत्रकाराला आवश्यक असणारे गुण आणि त्याने करावयाचा अभ्यास यांविषयीचे काही विचार या लेखात मांडले आहेत.
     हिंदु धर्मावर सातत्याने होणारी चिखलफेक, हिंदु धर्मियांची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांवर सातत्याने करण्यात येणारी टीका, हिंदूंच्या संतांना करण्यात येत असलेली अपमानास्पद अटक या सर्वांचा एकत्रित अभ्यास केला, तर हिंदुत्ववादाचा बौद्धिक प्रचार, संरक्षण आणि आक्रमण यांची फळी कमकुवत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. ही फळी मजबूत करण्यात पत्रकार सिंहाचा वाटा उचलू शकतात.
१. जिज्ञासू वृत्ती हवी !
     अनेक एकांड्या शिलेदारांनी हिंदूंचा सार्वत्रिक मानभंग करणारे, त्यांना गोगलगाय बनवून टाकणारे, हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे आणि मुसलमान अनुनयाचे चाटण देणारे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. पत्रकारांनी या सर्वांच्या साहित्याचा नीट अभ्यास करून न थकता, न कंटाळता आयुष्यभर हे मुद्दे समाजासमोर कर्तव्यभावनेने मांडायला हवेत. अशा एकांड्या शिलेदारांची काही नावे पुढे देत आहे, उदा. स्वा. सावरकर, पु.भा. भावे, पु.ना. ओक, ज.द. जोगळेकर, अरविंद विठ्ठल कुळकर्णी इत्यादी.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

अशा धर्मांधांना भारतात रहायचा काय अधिकार ?

भगव्या ध्वजाला वंदन करण्याचे टाळणारे मुसलमान !
     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मारुंजी येथे ३ जानेवारी या दिवशी शिवशक्ती संगम या संघ स्वयंसेवकांच्या विराट मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी काही धर्मांध त्यांच्या पारंपारिक वेशात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जेव्हा ध्वजाला वंदन करण्याविषयी सांगण्यात आले, तेव्हा उपस्थित सर्व नागरिकांनी त्यांच्या जागेवरून ध्वजाला प्रणाम केला; मात्र धर्मांधांनी भगव्या ध्वजाला प्रणाम केला नाही.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
 (संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

क्लिष्ट आणि गोंधळाची विधाने करणारे साहित्यिक समाजाला दिशा देणार कि स्वतःसमवेत लोकांनाही भरकटवणार ?

     पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची घोषणा झाल्यापासून विविध विधाने करून लोकांना बुचकळ्यात टाकण्याचे काम नेटाने केले आहे. स्वतःची विद्वत्ता दाखवण्यासाठी अनेकांना उगीचच मोठमोठे क्लिष्ट शब्द वापरून, तसेच लांबलचक वाक्ये बोलण्याची सवय असते. अशामुळे आपल्या विद्वत्तेची (?) छाप लोकांवर पडेल, अशा वेडगळ समजूतीत वक्ता वावरत असला, तरी श्रोत्यांना मात्र तो कंटाळवाणा वाटतो. तसेच लांबलचक वाक्ये केल्याने पहिल्या भूमिकेचा दुसर्‍या भूमिकेशी संबंध उरत नाही आणि त्यातून निव्वळ सावळागोंधळच उडतो. श्रीपाल सबनीस यांचीही अल्प-अधिक प्रमाणात हीच अवस्था असल्याचे आढळून आल्याने संमेलनाच्या माध्यमातून ते समाजाला काही दिशा देणार कि स्वतःसमवेत समाजालाही भरकटवणार, हाच प्रश्‍न मनात उपस्थित होतो. सबनीस यांच्या गोंधळी भूमिकेची, त्यांनी घेतलेल्या भाषा आणि संस्कृतीविरोधी भूमिकेची काही उदाहरणे ....

दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. इंगळेकाका यांचा रौद्री शांती विधी सोहळा संपन्न

  
८५ दिव्यांनी ओवाळल्यानंतर भावपूर्ण मुद्रेत पू. इंगळेकाका
   दुर्ग (छत्तीसगड) - सनातनचे संत पू. चत्त्तरसिंग बाबूलालसिंग इंगळे काका यांनी त्यांच्या वयाची ८५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्त त्यांच्या रौद्री शांती विधीचा सोहळा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष ८, २ जानेवारी या दिवशी येथील सेवाकेंद्रामध्ये अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. हा सोहळा त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला होता. या वेळी त्यांना ८५ दिव्यांनी ओवाळण्यात आले. या प्रसंगी पू. इंगळेकाकांच्या कुटुंबियांसह सनातनचे साधक उपस्थित होते.

शरद पुजारी यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांची तुला !

     मिरज - येथील सनातनचे साधक श्री. गिरीश पुजारी यांचे वडील श्री. शरद रामचंद्र पुजारी (वय ८१ वर्षे) आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुवासिनी पुजारी यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा नुकताच पार पाडला. या वेळी सनातन संस्थेचे ग्रंथ तुला करण्यात आली होती. ३० सहस्र रुपयांचे ग्रंथ आणि उत्पादने यांची उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आले. या वेळी अनेकांनी या ग्रंथांतून अमूल्य ज्ञान मिळाले, असे सांगितले, तर विधीसाठी उपस्थित असणारे नृसिंहवाडी येथील श्री. उपाध्ये गुरुजी यांनीही समाधान व्यक्त केले.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातनचा साधक कु. अक्षद पुजारी याचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक !

  
कु. अक्षद पुजारी
   मिरज - येथील आयडियल इंग्लीश स्कूलच्या इयत्ता ६ व्या इयत्तेत शिकणारा सनातन संस्थेचा साधक विद्यार्थी कु. अक्षद पुजारी (वय १२ वर्षे) याचा चित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. ही परीक्षा प्रफुल्ल दहाणूकर आर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने घेण्यात आली होती. ती इनर व्हील क्लब, मिरज यांनी प्रायोजित केली होती. कु. अक्षद याने पंढरपूरला जाणारी दिंडी-वारकरी असे चित्र रेखाटले होते. (सनातनचे पालक त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक ! - संपादक) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा शाळेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याने मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

संतांनी सांगितलेले उपाय केल्याने झंझावाती वादळाच्या तडाख्यापासून संरक्षण होण्याच्या संदर्भात अमेरिकतील सौ. मृणाल शैलेंद्र नानिवडेकर यांना आलेली अनुभूती

१. अचानक आध्यात्मिक त्रासांमध्ये वाढ होणे, तेव्हा एका संतांनी पाठवलेली औषधांची रिकामी पाकिटे डोक्यावर ठेवल्यावर त्रास उणावणे : १८.७.२०१५ या दिवशी रात्री माझ्या आध्यात्मिक त्रासांमध्ये अचानक वाढ झाली आणि मला माझ्या शरिरामध्ये विचित्र संवेदना जाणवून त्रास होत असल्याचे जाणवले. त्या वेळी मला श्रीकृष्णाने एका संतांनी पाठवलेल्या त्यांच्या औषधांच्या रिकाम्या पाकिटांचा उपायांसाठी उपयोग करण्याविषयी सुचवले. माझे यजमान श्री. शैलेंद्र यांच्या साहाय्याने मी औषधाची पाकिटे प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये लपेटली आणि ती माझ्या डोक्यावर ठेवली. त्यानंतर माझा त्रास काही प्रमाणात न्यून झाला. ईश्‍वर साधकांची किती काळजी घेतो, या एकाच विचारामुळे माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव जागृत झाला.

बालवयातही इतरांना साधना सांगणारा आणि कृष्णमामा काळजी घेत असल्याचे सांगणारा चिपळूण येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. योगेश्‍वर आेंकार जरळी (वय ३ वर्षे) !

       चिपळूण, रत्नागिरी येथील चि. योगेश्‍वर आेंकार जरळी याचा ६.१.२०१६ (मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. योगेश्‍वर जरळी
चि. योगेश्‍वर जरळी याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. शाळेत जायला आवडणे
      चि. योगेश्‍वर प्रतिदिन शाळेत उत्साहाने आणि आनंदाने जातो. तो शाळेत जातांना प्रतिदिन मोठ्याने नामजप करतो अन् श्रीकृष्ण आणि ग्रामदेवता यांना प्रार्थना करतो.
२. मित्रांना साधना सांगणे
       त्याने शाळेतील काही मित्रांना कापूर आणि अत्तर यांचे उपाय कसे करायचे ?, ते सांगितले आहे. तसेच शाळेतील बाईंनी सांगितले, तो जेवणापूर्वी शाळेतील सर्वांना एकत्र करून प्रार्थना करायला सांगतो.

कुणीगल (कर्नाटक) येथील सनातनच्या साधिका सौ. सविता दोंगाळे यांनी गाठली ६१ टक्के पातळी !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी
सौ. सविता दोंगाळे यांचा सत्कार करतांना सनातनचे श्री. रामानंद गौडा
     कुणीगल (कर्नाटक) - येथील सनातनच्या साधिका सौ. सविता गणेश दोंगाळे (वय ३८वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. या निमित्त त्यांचा ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे श्री. रामानंद गौडा यांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला. या विषयी उपस्थित साधकांनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 

हिंदु संस्कृतीचा आदर असलेले आणि साधकत्व असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच !

श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच
     ३.१.२०१६ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे काही प्रसंग येथे देत आहे. हे श्रीकृष्णा, व्लादिमिरदादा यांच्यात असलेले हे गुण आम्हा सर्वांमध्ये लवकर येवोत, ही प्रार्थना !
१. हिंदु संस्कृतीनुसार विवाह करतांना आलेल्या 
अनुभूतींविषयी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ असणे
     आश्रमामध्ये नुकताच एक विवाह झाला. सायंकाळी अल्पाहाराच्या वेळी व्लादिमिरदादा आमच्यासोबत बसले होते. तेव्हा ते म्हणाले, भारतीय संस्कृतीनुसार विवाहाच्या वेळी होत असलेले विधी म्हणजे देवाचाच सहवास असतो. या विधींतून देवतांचे अस्तित्व जाणवते. माझ्या विवाहात मी हे अनुभवले आहे. तेव्हा माझ्यावर पुष्कळ उपाय झाले आणि चैतन्यही जाणवले. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या साधिका सौ. प्रफुल्ला कामत आणि श्रीमती शैलजा दिवागी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त

डावीकडून सौ. प्रफुल्ला कामत,
श्री. रामानंद गौडा आणि श्रीमती शैलजा दिवागी

     बेंगळुरू (कर्नाटक) - येथील सनातनच्या साधिका सौ. प्रफुल्ला कामत (वय ६७ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून, तर श्रीमती शैलजा दिवागी (वय ६९ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटका मिळवल्याचे ४ जानेवारी या दिवशी घोषित करण्यात आले. या निमित्त त्यांचा ६५ टक्के पातळी असलेले सनातनचे श्री. रामानंद गौडा यांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला. या विषयी उपस्थित साधकांनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

व्हॅलेंटाईन डे या पाश्‍चात्त्य कुप्रथेच्या विरोधात प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
     भारतामध्ये अलीकडे १४ फेब्रुवारी या दिवशी पाश्‍चात्त्यांच्या नीतीहीन चंगळवादाचे अनुकरण असलेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या संदर्भात युवांमध्ये प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने पुढील प्रसारसहित्य वितरण प्रणालीवर उपलब्ध केले आहे, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
१. ए-५ आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फलक
३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी ८ फूट X ६ फूट आकारातील होर्डींग
४. ए-२ आकारातील हस्तफलक
     वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा वापर करावा.

पू. महादेव नकातेकाका यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या घरात जाणवलेले पालट

    मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी (६.१.२०१६) या दिवशी पू. महादेव नकाते यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या घरात जाणवलेले पालट पुढे देत आहोत.
पू. महादेव नकाते
पू. नकातेकाका यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज 
महाराज यांची छायाचित्रे जिवंत झाल्याचे जाणवणे
अ. घरात पूजेतील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रामध्ये जिवंतपणा आला असून ते गुलाबी रंगाचे झाले आहे, तसेच छायाचित्रातील प.पू. डॉक्टरांचे डोळे, आपण ज्या दिशेला जाऊ, त्या दिशेला फिरत असल्याचे जाणवते.
आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामध्येही जिवंतपणा आला असून छायाचित्रातील त्यांची काठी हलत असल्याचे दिसते. आपण ज्या दिशेला जाऊ, त्या दिशेने त्यांचे डोळे फिरतात, असे वाटते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये !
      कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी उपासना सोडू नये. हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

  
परात्पर गुरु डॉ. आठवले
   राजाचे सिंहासन जाऊ द्या, साध्या मंत्र्यांच्या खुर्चीवर बसायचे धाडस न करणारे बुद्धीप्रामाण्यवादी शनी शिंगणापूरच्या देवाच्या चौथर्‍यावर जातात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
     राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना काहीतरी करा, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ या गटात येतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

संपादकीय

मालडा येथील धर्मांधांना शिक्षा होईल ?
     बंगालमधील मालडा येथे धर्मांधांनी जो हैदोस घातला, तो दुर्लक्षित करण्यासारखा मुळीच नाही. हिंदू महासभेचे नेते श्री. कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केले होते. हे वक्तव्य करून त्यांना एक महिना लोटला. या कथित वक्तव्यासाठी त्यांना कारागृहात पाठवण्यात आले. तरीही एक महिन्यांनी त्यांचा निषेध करण्यासाठी अडीच लाख धर्मांधांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. या जमावातून एक बस वाट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून धर्मांधांनी बसच्या वाहकाशी वाद घातला. त्यानंतर या माथेफिरूंनी कायदा हातात घेऊन बस पेटवली. त्यातील प्रवाशांनी कशीबशी स्वतःची सुटका करून पळ काढला. त्यानंतर सलग ६ घंटे या धर्मांधांनी जो नंगानाच केला, तो कोणत्याही सामान्य माणसाच्या उरात धडकी भरवून आणणारा होता. धर्मांधांनी रस्त्याच्या बाजूची दुकाने पेटवली, एवढेच काय सीमा सुरक्षा दल आणि पोलीस यांच्या २४ गाड्या पेटवल्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn