Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज पुण्यतिथी

आतंकवादी आणि सैनिक यांच्यात चकमक चालूच

पठाणकोट (पंजाब) येथील आतंकवादी आक्रमण
आतापर्यंत एकूण ४ आतंकवादी ठार, तर ७ सैनिक हुतात्मा
     पठाणकोट - येथील हवाई दलाच्या तळावर जिहादी आतंकवादी आणि सैनिक यांच्यात सलग दुसर्‍या दिवशीही (३ जानेवारीला) चकमक चालू होती. जिहादी आतंकवाद्यांनी २ जानेवारीला आक्रमण केल्यानंतर सैनिकांनी त्या दिवशी सायंकाळपर्यंत ४ आतंकवाद्यांचा खात्मा केला. सर्व आतंकवादी मारले गेले आहेत, असे वाटत असतांनाच ३ जानेवारीला सकाळपासून आतंकवाद्यांनी पुन्हा गोळीबार चालू केला. अजूनही २ आतंकवादी एअरफोर्स स्टेशनमध्ये दडून बसल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिली. सैन्याकडून शोधमोहीम चालू आहे.

देहलीत २ जिहादी आतंकवादी घुसल्याची शक्यता ! - गुप्तचर यंत्रणा

     नवी देहली - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणासारखेच आक्रमण देहलीतही घडवण्याचा कट आतंकवाद्यांनी आखल्याचा संशय आहे. जैश-ए-महंमदचे २ आतंकवादी देहलीत घुसल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर देहलीचे पोलीस आयुक्त बी.एस्. बस्सी यांनी देहलीतील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना कोणत्याही संशयास्पद व्यक्ती वा संशयास्पद वस्तू दिसल्यास त्याविषयी त्यांनी तात्काळ १०० क्रमांक अथवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०९० या क्रमांकावर माहिती द्यावी, असेही आवाहन बस्सी यांनी केले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या चेतावणीनंतर देहलीतील महत्त्वाच्या ठिकाणांची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इंडिया गेटजवळ वाहनांची कसून तपासणी केली जात असून राजपथावरही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदुत्वाच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती शक्य ! - सरसंघचालक

रा.स्व. संघाच्या शिवशक्ती संगमात १ लाख ५८ सहस्रांहून 
अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांचा जनसमुदाय
डावीकडून श्री. मोहन भागवत आणि अन्य मान्यवर
      मारुंजी (जिल्हा पुणे) - हिंदुत्वाच्या अर्थात् भारतीय संस्कृतीच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. भारतीय संस्कृतीच्या धाग्याने सर्व समाजाला गुंफायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी मारुंजी (जिल्हा पुणे ) येथे पार पडलेल्या विराट शिवशक्ती संगम कार्यक्रमात ते बोलत होते.
मोहन भागवत पुढे म्हणाले,
 १. सामाजिक समरसता आणि समता प्रस्थापित झाल्यानंतरच संपन्न राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल. ही समता केवळ कायद्याने येणार नाही, तर मनातून ही विषमता गेली पाहिजे.

माओवाद्यांकडून तिघा अपहृत तरुणांची सुटका

नक्षलग्रस्त भारत !
     पुणे - भारत जोडो यात्रेसाठी सायकलने निघालेल्या पुण्यातील ३ विद्यार्थ्यांचे २ जानेवारी या दिवशी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बस्तर येथून नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. या विद्यार्थ्यांची सुटका ३ जानेवारी या दिवशी करण्यात आली. भारत जोडो अभियाना अंतर्गत शांतीचा संदेश देण्यासाठी आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण खेवले हे विद्यार्थी पुण्यातून छत्तीसगडमार्गे ओडिशातील मलकानगिरी येथे जाण्यासाठी सायकलने २० डिसेंबरला निघाले होते. १० जानेवारीला ते मलकानगिरी येथे भारत जोडो यात्रेत पोहोचणार होते.

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांना वारकरी रत्न पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारतांना (वर्तुळात) पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते
     मुंबई - श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने येथे आयोजित पालखी सोहळा आणि संत संमेलन २०१६ मध्ये शिवसेना खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांना वारकरी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी
     ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री, महामंडलेश्‍वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, आमदार शेंडगे उपस्थित होते.
(याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

हेरगिरी प्रकरणी अटक केलेल्या रंजितचा आतंकवादाशी संबंध !

तपास यंत्रणांचा निष्कर्ष
     नवी देहली - पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वायू सेनेचा बडतर्फ अधिकारी रंजित के.के. याने ज्या पाक महिला हेराच्या जाळ्यात अडकून आय.एस्.आय.ला गुप्त माहिती पुरवली, त्या दामिनी मॅकनॉटसह अन्य तीन महिलांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादी प्रशिक्षण घेतल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या माहितीनुसार या चारही महिलांना प्रशिक्षित करून आत्मघातकी बनवण्यात येणार होते आणि त्यांचा वापर भारताच्या विरोधात करण्यात आला असता. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध केवळ हेरगिरीशी नसून आतंकवादाशीही असल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे.

मध्यप्रदेशमध्ये सिमीच्या आतंकवाद्याला अटक

आतंकवादाने पोखरलेला भारत ! बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेचे 
सदस्य उघडपणे वावरत असतांना त्यांना कारागृहात का टाकत नाही ?
  • वर्धा (महाराष्ट्र) येथील स्फोटात होता हात
  • पोलिसांच्या कारवाईला स्थानिक नागरिकांचा विरोध आणि पोलिसांशी झटापट
      उज्जैन - आतंकवादविरोधी पथकाने १ जानेवारी या दिवशी उन्हेलमधून प्रतिबंधित आतंकवादी संघटना सिमीचा आतंकवादी शराफत खान आणि त्याचा सहकारी जफर यांना अटक केली. ही कारवाई होत असतांना आजूबाजूच्या लोकांनी तीव्र विरोध केला आणि पोलिसांशी झटापट केली. महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये १० वर्षांपूर्वी झालेल्या एका स्फोटाप्रकरणी आतंकवादविरोधी पथक शराफतच्या शोधात होते.

ईश्‍वरी अधिष्ठान असल्यानेच सनातन संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ! - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वाटचालीविषयी जाणून घेतांना पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते
     देवद (पनवेल) - आज धर्मप्रचार करणार्‍या अनेक संघटना आहेत; पण त्या केवळ प्रसंग आणि घटना यांना धरून प्रचार करतात. सनातन संस्थेला ईश्‍वरी अधिष्ठान आहे. त्यामुळे संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर सगळे केवळ प्रचारक आहेत. सनातन संस्थेचे साधक उपासक आहेत, असे गौरवोद्गार हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक आणि धर्माचार्य पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते (वय ८३ वर्षे) यांनी काढले. येथील सनातनच्या आश्रमात ३ जानेवारीला त्यांचे आगमन झाल्यावर ते साधकांशी चर्चा करतांना बोलत होते.
     या वेळी त्यांना आश्रमातील सेवा आणि सनातनचे कार्य यांविषयी श्री. आेंकार कापशीकर आणि श्री. शिवाजी वटकर यांनी अवगत केले. महाराजांनी आश्रमात लावलेले चुकांचे फलक वाचून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियाही समजून घेतली. प.पू. पांडे महाराज यांनी पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला. सन्मानप्रसंगी सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी पू. (ह.भ.प.) महाराजांविषयी माहिती कथन केली. या वेळी ते म्हणाले, धर्मप्रसाराचे कार्य धडाडीने करणारे, धर्मद्रोही आणि विद्रोही यांच्या लिखाणाचे खंडण करणारे पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते हे आधीपासूनच संतपदावर पोहोचलेले आहेत. या वेळी महाराजांच्या मानसकन्या आणि सेवेकरी रुक्मिणी देवकाते अन् नातू ह.प.प. शुभम महाराज वक्ते उपस्थित होते.

चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍या मुफ्ती हारूण नदवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांचे निवेदन

व्हीजन फाऊंडेशनचे कार्यकर्ते पोलिसांना निवेदन देतांना
    जळगाव - रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ वाहतुकीचे नियम मोडून दुचाकीवरून प्रवास करणार्‍या मुसलमान समाजातील तिघा तरुणांवर कारवाई न होण्यासाठी वाहतूक शाखेचे साहाय्यक फौजदार शशिकांत डोले यांना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांनी दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नदवी यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकूर यांना २ जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नदवी यांनी वापरलेल्या चिथावणीखोर भाषेमुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व हिंदुत्ववाद्यांच्या वतीने करण्यात आली.

गुन्हा सिद्ध झालेला असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्ष यांच्यावर बंदी का नको ? - पू. (कु.) स्वाती खाडये

फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा
पू. (कु.) स्वाती खाडये
    फलटण, ३ जानेवारी (वार्ता.) - पानसरे हत्या प्रकरणात केवळ संशयित म्हणून एका साधकाला कह्यात घेण्यात आल्यावर लगेचच सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी आवई उठवली. चर्चासत्रांतून सनातनला दोषी ठरवण्यात आले. त्याच आवई उठवणार्‍या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप सिद्ध केला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी का केली नाही ? वर्ष १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणणार्‍या काँग्रेस पक्षावर बंदी का नको ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सनातनवर बंदीची मागणी करणारे देतील का ? असा परखड प्रश्‍न सनातन संस्थेच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी विचारला. २ जानेवारी या दिवशी फलटणमधील मुधोजी क्लब मैदानात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख हे व्यासपिठावर उपस्थित होते.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
   वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान करागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पुणे शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या एल्सीडी वाटपामध्ये अपव्यवहार

सतत कोणत्या ना कोणत्या खरेदीमध्ये पुणे शिक्षण मंडळाचा अपहार समोर येत आहे. त्यामुळे मंडळाचा कारभार हा आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीचा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे काय ?
     पुणे - गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळामध्ये कुंड्या खरेदी, शालेय साहित्य खरेदी यांमध्ये अनेक अपप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळ अपकारभाराविषयी कायमच चर्चेत राहिले आहे. आता पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी खरेदी केलेले १४ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एल्सीडी) संच गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. (या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त संबंधितांची चौकशी करून कारवाई करतील का ? - संपादक) कागदोपत्री हे एल्सीडी शाळेत असल्याचे दाखवण्यात आल्याचे संभाजी महाराज संघर्ष समितीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

तिरुपती दर्शनाचे तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार !

     बेळगाव - कर्नाटक पोस्टल सर्कल आणि आंध्रप्रदेश येथील तिरुपती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तिरुपती दर्शनाचे तिकीट ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होत आहे. ही सुविधा पोस्टाच्या बेळगाव, बैलहेंगल आणि रामदुर्ग मुख्यालयातून १ जानेवारीपासून चालू झाली आहे. तसेच चिकोडी, अथणी, गोकाक विभागीय मुख्यालयांमध्येही ही सोय उपलब्ध होणार आहे. भाविक त्यांच्या दर्शनाच्या दौर्‍यापूर्वी ६० दिवस आधी संबंधित कार्यालयातून ऑनलाईन स्वरूपात तिकीट आरक्षण करू शकणार आहेत. प्रत्येक भाविकाने त्याचेे छायाचित्र, ओळखपत्र आणि भ्रमणभाष क्रमांक सादर करायचा आहे. दर्शनाच्या तिकिटासाठीचे ३०० रुपये भरून घेतले जाणार असून त्यामध्ये दर्शनासमवेत प्रसादाच्या दोन लाडूंचाही समावेश असणार आहे. एका तिकिटावर अधिकाधिक ६ व्यक्तींना विशेष दर्शन घेता येणार आहे.

मी धमक्यांना घाबरणार नाही आणि क्षमा मागणार नाही ! - डॉ. श्रीपाल सबनीस

  • उमरगा येथे सबनीस यांना दोघा जणांकडून जीवे मारण्याची धमकी
  • लातूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठावरील फलक फाडले
    लातूर, ३ जानेवारी - मोदी यांच्या पाकिस्तान दौर्‍याविषयी काळजी वाटली. मी त्यांच्या धाडसाविषयी गौरवोद्गारच काढले आहेत. त्यासाठी मी मोकळी-ढाकळी भाषा वापरली. तेवढ्यासाठी मला खुनाच्या धमक्या येत असतील आणि दाभोलकर, पानसरे, नंतर सबनीस या भावनेने कोणी धमक्या देत असेल, तर मी घाबरणार नाही. क्षमा मागणार नाही. मी क्रांतिकारकाचा मुलगा आहे. मी माझ्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले नसतील, तर मला मंत्रालयासमोर जाहीर फाशी द्या, असे सांगत ८९ व्या अखिल भारतीय संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी क्षमा मागण्यास नकार दिला. त्यांनी एकप्रकारे आपल्या वक्तव्याचे समर्थनच केले. सबनीस यांचा लातूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. 

मुंबईत दुचाकीस्वाराने पोलीस हवालदाराला उडवले !

पोलिसांविषयी जनतेच्या मनातील धाक अल्प तर झाला नाही ना ?
    मुंबई - मुंबईत अत्यंत बेभान होऊन वेगवान बाईक चालवणार्‍या एका दुचाकीस्वाराने पोलीस हवालदाराला उडवले. मुंबईतील शीव परिसरात ही घटना घडली.
    पोलीस हवालदार नितीन परब यांनी या दुचाकीस्वाराला थांबण्याची सूचना केली; मात्र त्याने गाडी न थांबवता थेट पोलीस हवालदाराच्या अंगावर चढवली. यात नितीन परब हे हवालदार गंभीर घायाळ झाले आहेत.

धर्मशिक्षण वर्गातील युवकांनी उत्साहाने साजरी केली दत्तजयंती !

     सांगली - येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात २८ युवक प्रत्येक आठवड्याला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षण वर्गासाठी एकत्र येतात. दत्तजयंतीच्या पूर्वी झालेल्या वर्गात या युवकांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संतोष देसाई यांनी श्री दत्त या देवतेविषयी माहिती, तसेच हा उत्सव का साजरा करतात, याची माहिती दिली. हा विषय ऐकून या युवकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या चौकात दत्तजयंती साजरी केली. मंडप घालून श्री दत्तगुरूंच्या छायाचित्राचे पूजन, आरती, तसेच प्रसाद वाटप करण्यात आले. यातून आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला, असे या युवकांनी सांगितले.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनुग्रहीत सौ. उज्वला अशोक शहा यांचे निधन !

     ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) - प.पू. भक्तराज महाराज यांच्या अनुग्रहीत सौ. उज्वला अशोक शहा (वय ५५ वर्षे) यांचे २८ डिसेंबर या दिवशी पहाटे ५ वाजता रुग्णाईत असल्याने निधन झाले. त्या श्री. अशोक हिंमतलाल शहा यांच्या पत्नी होत, तसेच त्या किर्तीकुमार शहा (प.पू. दिलीपबाबा यांचे शिष्य) यांच्या वहिनी होत. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा असा परिवार आहे. श्री. अशोक शहा यांनीही प.पू. भक्तराज महाराज यांची सेवा केली आहे. सनातन संस्था श्री. अशोक शहा यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
श्री. अशोक शहा यांनी त्यांच्या पत्नीच्या संदर्भात सांगितलेली एक आठवण...
     वर्ष १९९५-९६ मध्ये माझ्या पत्नीच्या हृदयाचे शस्त्रकर्म मुंबई येथील हिंदुजा रुग्णालय येथे होते. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्मासाठी २८ बाटल्या रक्त हवे, असे सांगितले होते.

आतंकवादी विचारसरणीकडे आकर्षित होण्यासाठी धर्मांधता कारण आहे, हे स्पष्ट सांगायला लाजता कशाला ?

     भारतीय युवक आतंकवादी विचारसरणीकडे आकर्षित होण्याचे कारण सामाजिक आणि आर्थिक नाही. - शरद कुमार, प्रमुख, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

मुंबईच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

    मुंबई - मुंबईतील बहुप्रतिक्षित सागरी मार्गाला आवश्यक अनुमती केंद्राकडून देण्यात आल्याची माहिती नुकतीच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली. या प्रकल्पाला यापूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला होता.
    नरिमन पाँईट ते कांदिवली असा ३५ ते ३६ किलोमीटर लांबीचा रस्ता होणार आहे. त्यासाठी सुमारे १० सहस्र कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्यामुळे शहरातील १८ ठिकाणी उपनगरांतील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार आहेत. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास साहाय्य होणार असल्याचा दावा भाजप शासनाने केला आहे.

धुळे येथे श्रीपाल सबनीस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला

     धुळे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याविषयी केलेल्या विधानांचा भाजपच्या धुळे शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला. पक्ष कार्यकर्त्यांनी २ जानेवारीला सबनीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच धार्मिक भावना दुखावल्या; म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
    भाजपच्या वतीने धुळ्यातील आग्रा रस्त्यावर कराचीवाला खंटाजवळ सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, नगरसेविका प्रतिभा चौधरी इत्यादी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि पाचोरा या ठिकाणी श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत.

महेश मोतेवार पुढील चौकशीसाठी ओडिशा पोलिसांच्या कह्यात

  • समृद्ध जीवन घोटाळा प्रकरण
  • उमरगा न्यायालयाचा निर्णय
    पुणे, ३ जानेवारी - चिटफंड आणि गुंतवणूकदारांना फसवल्याच्या प्रकरणी धाराशिव पोलिसांच्या अटकेत असलेले समृद्ध जीवनचे संचालक महेश मोतेवार यांची पुढील चौकशी करण्यासाठी ओडिशा पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. यासाठी ओडिशा पोलिसांनी उमरगा न्यायालयात आवेदन केले होते. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी मोतेवार यांच्या पुढील चौकशीसाठी न्यायालयाने ओडिशा पोलिसांना तशी अनुमती दिली आहे.
     तत्पूर्वी मोतेवार यांना धाराशिव पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली. पोलीस कोठडीत असतांना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना सोलापूर येथे आणि नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात भरती केले होते. मोतेवार यांच्यावर १ जानेवारी या दिवशी अँजिओग्राफी करण्यात आली, तसेच अन्य वैद्यकीय चाचण्या करून २ जानेवारी या दिवशी त्यांना ससून रुग्णालयामधून सोडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांना कह्यात घेतले.

पाण्याचा निचरा होईल, अशा पद्धतीने गटारीचे बांधकाम करावे ! - शिवसेनेची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
कोल्हापूर, ३ जानेवारी (वार्ता.) - तावडे उपहारगृह ते रुकडी बंधारा असे नवीन गटार बांधतांना रस्त्यावरील येणार्‍या पाण्याचा निचरा होईल, अशा पद्धतीने गटार बांधण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला २ जानेवारी या दिवशी दिले. निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संजय पवार, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, गांधीनगर शहरप्रमुख दिलीप सावंत यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की...
१. तावडे उपाहारगृह ते रूकडी बंधारा हा रस्ता म्हणजे गांधीनगर व्यापार पेठेत जाणार्‍या रस्त्यावरून प्रतीदिन सहस्रो वाहने ये-जा करत असतात. पश्‍चिम महाराष्ट्रातील गांधीनगर ही सर्वांत मोठी कापड व्यापारी पेठ आहे.

आशा पारेख यांनी केली होती स्वत:लाच पद्मभूषण पुरस्कार देण्याची मागणी ! - नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

यावरून शासकीय पुरस्कारांचे बाजारीकरण झाले असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट झाले ! यापूर्वी अशा 
किती जणांना पुरस्कारांची खिरापत वाटण्यात आली आहे, ते शासनाने आता जनतेसमोर आणावे !
     नवी देहली - मला पद्मभूषण पुरस्कार द्यावा, अशी स्वत:च स्वत:ची शिफारस करण्यासाठी अभिनेत्री आशा पारेख या माझ्याकडे आल्या होत्या, असा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केला. पारेख यांचा यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने गौरव झालेला आहे. गडकरी पुढे म्हणाले, पद्मभूषण पुरस्कारासाठी केली जाणारी स्पर्धा योग्य नाही. पुरस्कारासाठी माझ्याकडे वशिला लावायला अनेक जण येतात. त्यामुळे मी त्रस्त झालो आहे. यासाठी जेव्हा आशा पारेख आल्या होत्या, तेव्हा माझ्या घराची लिफ्ट बिघडलेली होती; मात्र त्या तब्बल १२ मजले चढून वरपर्यंत आल्या आणि स्वत:ला पद्मभूषण पुरस्कार देण्याची मागणी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१५ मध्ये २२ सहस्र गुन्ह्यांची नोंद !

एकेकाळी सुसंस्कृत म्हणून ओळख असलेले जम्मू-काश्मीर बनले गुन्हेगारांचे राज्य !
     जम्मू - जम्मू आणि काश्मीर राज्यात वर्ष २०१५ मध्ये २२ सहस्र गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १७ सहस्र गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार यांनी दिली. (५ सहस्र गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस कुठे न्यून पडले, याचा त्यांनी शोध घ्यावा ! - संपादक) पाश्‍चात्त्य नववर्षानिमित्त राज्यातील पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक बोलत होते. ते म्हणाले, वरील गुन्ह्यांव्यतिरिक्त ९३ गुन्हे हे विशेष वर्गात मोडणारे आहेत. या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचे उत्तरदायित्व गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. 
राज्यातील तरुण मादक पदार्थांच्या आहारी
     राज्यातील बरेच तरुण मादक पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांनी विशेष संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांचे निष्कर्ष चांगले निघत आहेत, असेही राजेंद्र कुमार म्हणाले.

असा आदेश द्यावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! सर्वच तक्रारींच्या संदर्भातही २४ घंट्यात कारवाईला आरंभ करा, असाही आदेश पोलिसांना द्या !

     महिलांची छेड काढणार्‍यांना धाक बसावा, यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ घंट्यांत त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करा, असा आदेश महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील पोलिसांना दिला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवादग्रस्त भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
     आतंकवादविरोधी पथकाने मध्यप्रदेशातील उन्हेलमधून प्रतिबंधित आतंकवादी संघटना सिमीचा आतंकवादी शराफत खान आणि त्याचा सहकारी जाफर यांना अटक केली. या कारवाईच्या वेळी त्यांच्या लोकांनी पोलिसांशी झटापट केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
MPke Unnhel me SIMI ke atanki ko bandi banati police ka kattarpanthiyone kiya virodh.
kya yaha virodh deshdroha nahi ?
जागो !
मध्यप्रदेश के उन्हेल में सिमी के आतंकी को बंदी बनाती पुलिस का कट्टरपंथियों ने किया विरोध !
क्या यह विरोध देशद्रोह नही ?

राज्यात संस्कृत अकादमी चालू करणार - मुख्यमंत्री

    नागपूर - संस्कृत ज्ञानभाषा आहे. तिच्या प्रचार-प्रसारात इतक्या वर्षांत आपण मागे पडलो. ही उणीव दूर करून संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात संस्कृत अकादमी चालू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. संस्कृत भारतीच्या विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, योग्य ठिकाणी संस्कृतचा उपयोग होईल यादृष्टीने विचार करण्यात येईल. शालेय शिक्षणात संस्कृतचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करू. विद्यापिठाच्या विस्तारीकरणासाठी राज्यशासनाने आर्थिक पाठबळ दिले. संस्कृत अकादमी झाल्यास संस्कृतमधील संशोधनाला वाव मिळेल.

बेळगाव येथे हुतात्मा दिनी शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर उपस्थित रहाणार !

     बेळगाव, ३ जानेवारी (वार्ता.) - १७ जानेवारी या दिवशी सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. या दिवशी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गावाचे शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश अबिटकर उपस्थित रहाणार आहेत. तसेच सीमावासियांना ते मार्गदर्शनही करणार आहेत.
    वर्ष १९५६ मध्ये अन्यायायाने बेळगाव यांसह सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. या वेळी झालेल्या सीमा आंदोलनात ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेच्या नेतेंमडळींनी उपस्थित रहावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने २ जानेवारीला मुंबई येथे खासदार श्री. अरविंद सावंत यांची भेट घेऊन करण्यात आली. या वेळी श्री. सावंत म्हणाले की, आपण आणि आपला पक्ष सीमावासियांच्या पाठीशी असून सीमाप्रश्‍नाची येत्या काही दिवसांत सोडवणूक व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असून सतत शिवसेना कार्यरत आहे.

शिया धर्मगुरूला मृत्यूदंड दिल्यावरून शिया पंथियांमध्ये तीव्र संताप

एका धर्मगुरूला शिक्षा केल्यावर त्या पंथाचे जगभरातील मुसलमान एकवटतात, हे लक्षात घ्या !
इराणमधील सौदी अरेबियाचे दूतावास पेटवले
    मशाद (इराण) - अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील दोषी शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निम्र यांच्यासह एकूण ४७ जणांना सौदी अरेबियाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. त्यामुळे जगभरातील शिया पंथीय संघटना संतप्त झाल्या आहेत. इराणमध्ये सौदी दुतावासाची नासधूस करून त्याला आग लावण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद मध्य - पूर्वेकडील शियाबहुल देशांसह युरोप आणि पाकिस्तानमध्ये उमटत असून भारतातील जम्मू-काश्मीरमध्येही आंदोलनाची सिद्धता चालू असल्याचे वृत्त आहे.

केरळमधील सी.एस्.आय. चर्चवरील आक्रमणात ७ जण गंभीर घायाळ

आता या घटनेचाही संबंध हिंदूंशी जोडून त्यांना अपकीर्त करण्याचा कंड निधर्मी प्रसारमाध्यमे 
आणि पुरो(अधो)गामी यांनी शमवून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यात नवल ते काय ?
     थिरुवनंतपुरम् - येथील पौडीकोनाम् गावातील पुत्थुकुंणू येथे असलेल्या सी.एस्.आय. चर्चवर ३१ डिसेंबरच्या रात्री ३० जणांच्या जमावाने आक्रमण केले. या आक्रमणात ७ जण घायाळ झाले असून त्यांच्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ३० लोकांच्या समूहाने हे आक्रमण केल्याचे बोलले जात आहे. 
      गंभीर घायाळ झालेले रेजी विजयन्, अलेक्स फ्रान्सिस आणि रेजीन प्रसाद हे इतर चौघांसह चर्चच्या सुशोभीकरणाचे काम करत होते. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या आक्रमणामुळे संतप्त झालेल्या ख्रिस्ती नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन करून वाहतूक अडवून धरली. स्थानिक आमदार एम्.ए. वाहिद आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक शेफिन अहमद यांनी आरोपींना अटक करण्यात येईल, असे निदर्शकांना आश्‍वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

बंगालमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला आरंभ

  • पंतप्रधान मोदी यांना अखेरच्या टप्प्यात समोर आणण्याचे भाजपचे डावपेच !
  • काँग्रेससमवेत आघाडी करण्याविषयी डाव्यांमध्ये संभ्रम !
     कोलकाता - वर्ष २०१६ मध्ये बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला आरंभ झाला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता लक्षात घेऊनच प्रत्येक पक्ष आपापले डावपेच आखत आहे. पंतप्रधान मोदी यांना बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जनतेसमोर आणण्याचे डावपेच भाजप आखत असल्याची माहिती मिळाली आहे. तोवर भाजपचे अन्य राष्ट्रीय नेते प्रचाराची धुरा सांभाळतील. दुसरीकडे काँग्रेससमवेत आघाडी करण्यासंदर्भात डाव्या पक्षांमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे. बंगालमध्ये काँग्रेसशी किती जवळीक साधायची, याविषयीही डाव्यांमध्ये संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.

नम्रता, त्याग, प्रेमभाव, अल्प अहं या गुणांमुळे श्रीमती अनुराधा आचार्य (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती आचार्य यांचे कुटुंबीय - डावीकडून आजींचा नातू कु. शिवम, जावई
डॉ. संजीव, श्रीमती आचार्य, मुलगी डॉ. (सौ.) आरती, श्रीमती अरुणा आचार्य आणि नात कु. ऐश्‍वर्या
श्रीमती आचार्य यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
    जळगाव - येथील सनातन संस्थेच्या हितचिंतक आणि वाचक डॉ. (सौ.) आरती संजीव हुजुरबाजार यांच्या मातोश्री श्रीमती अनुराधा आचार्य यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे येथील प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात घोषित केले. या आनंदवार्तेने उपस्थितांची भावजागृती झाली.
     या वेळी श्रीमती अनुराधा आचार्य यांनी नम्रपणे सांगितले, माझी काहीच पात्रता नाही. मला काहीच प्रसिद्धी नको. स्तर घोषित केल्यावर डॉ. आरती संजीव हुजुरबाजार यांना भावाश्रू आले. या प्रसंगी चर्चा करतांना डॉ. संजीव हुजुरबाजार म्हणाले, आईंच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्यातील पालटांची आधीच जाणीव झाली होती.

शेतकरी आत्महत्या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे ! - रघुनाथदादा पाटील यांची मागणी

    कोल्हापूर, ३ जानेवारी (वार्ता.) - मुलींच्या विवाहासाठी आणि शेतात जलवाहिनी टाकण्यासाठी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्याने शिरोळ तालुक्यातील बाबासाहेब केजकर या शेतकर्‍याने आत्महत्या केली. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच आहे. जिल्ह्यात झालेल्या आत्महत्येविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी केली.
    ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे आता कोल्हापूर जिल्ह्यातही हे सत्र चालू होते कि काय, अशी भीती निर्माण झाली आहे. योग्य हमीभावाच्या अभावी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही आता शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. याचे दायित्व स्वीकारून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र दिले पाहिजे.

शेतकरी आत्महत्या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे ! - रघुनाथदादा पाटील यांची मागणी

    कोल्हापूर, ३ जानेवारी (वार्ता.) - मुलींच्या विवाहासाठी आणि शेतात जलवाहिनी टाकण्यासाठी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्याने शिरोळ तालुक्यातील बाबासाहेब केजकर या शेतकर्‍याने आत्महत्या केली. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच आहे. जिल्ह्यात झालेल्या आत्महत्येविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी केली.
    ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे आता कोल्हापूर जिल्ह्यातही हे सत्र चालू होते कि काय, अशी भीती निर्माण झाली आहे. योग्य हमीभावाच्या अभावी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही आता शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. याचे दायित्व स्वीकारून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र दिले पाहिजे.

हिंदूंची सद्यस्थिती !

सिंहोऽयं प्रबलो निहन्ति सकलान् अस्मान् सदा दुर्बलान्
कार्याऽस्माभिरतः स्वरक्षणकृते काचिन्महासंहतिः।
निश्‍चित्येति समामिलन् शशमृगाजाऽश्‍वाऽदयस्ते यदा
तावत् किञ्चन शुश्रुवे हरिशिशोराराद् मृदूद्गर्जितम् ॥ 
     अर्थ : सिंह हा अरण्यातील सर्वांत प्रबळ प्राणी आहे. त्याच्या प्रबळतेमुळे आणि नित्य होणार्‍या विध्वंसक आक्रमणामुळे भयाकुल झालेले ससा, हरीण, बोकड इत्यादी दुर्बळ प्राणी एकत्रित येऊन आत्मरक्षणाचा विचार करू लागले. आम्हा सर्व दुर्बळांचा नित्य संहार करणार्‍या सिंहाच्या घोर आक्रमणापासून आपले रक्षण आपण कसे करावे ? हा त्या दुर्बळांच्या सभेतला महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. आपण सर्वजण सुसंघटित झालो, तरच हे आत्मरक्षण शक्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपसातले भेदभाव विसरून एखादी महासंहति (प्रचंड संघटना) उभी करावी, हा त्यांचा ठराव सर्वानुमते संमत होणार, तोच त्यांच्या कानावर दुरून सिंहाच्या छाव्याची केवळ मृदू गर्जना आली.

काँग्रेसचे तत्कालीन भ्रष्टाचारी आणि नेभळट शासन अन् आर्य चाणक्यांनी सांगितलेली राजाची कर्तव्ये !

      वर्ष २००९ ते २०१४ या पाच वर्षांत एका बाजूने भ्रष्टाचार चौखूर उधळला, तर नेमक्या याच काळात ज्या शासनाने या भ्रष्टाचारावर प्रभावी उपाययोजना करायची, ते शासनच नेभळट आणि दिवाळखोर ठरले. याची तीन उदाहरणे सहजपणे देता येतील. 
१. या पाच वर्षांत शासन षठीषण्मसी (शासनाचे अस्तित्व अपघातानेच) अनुभवण्यास मिळाले, तर संविधानिक संस्था दुय्यम आणि आनुषंगिक बनल्या. 
२. शासनात तूट आणि भ्रष्टाचारात वैपुल्य यांमुळे या काळात आपली अतोनात हानी झाली.
३. पंतप्रधानांच्या कार्यालयाने आपल्या डोक्यावरील सर्व दायित्वे निःसंकोचपणे इतरांच्या खांद्यावर टाकली. एका बाजूने सोनियांकडून आलेल्या आज्ञांचे पालन केले, तर दुसर्‍या बाजूने मंत्रीमंडळातील मंत्र्यांना वरचढ होऊ देण्यात आले.

चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्राभिमानी शिक्षक सिद्ध होणार का ?

      शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी वर्ष २०१३ पासून बी.एड्. आणि डी.एड्. या शैक्षणिक अहर्तेसमवेतच शिक्षक पात्रतेची परीक्षा (टीईटी) सक्तीची केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ही परीक्षा होऊन अनेक जण उत्तीर्णही झाले. शिक्षणक्षेत्रात शिक्षकाची नोकरी मिळेल, या आशेने अनेक जण ही परीक्षा देतात आणि उत्तीर्णही होतात. सध्या शिक्षकभरती बंद असल्यामुळे असे उत्तीर्ण झालेले अनेक सुशिक्षित बेरोजगार असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

केरळ राज्यात हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या १ जानेवारी हिंदूंचा नववर्षदिन नाही या जनजागृती मोहिमेविषयी समाजातून आलेल्या प्रतिक्रिया !

    केरळमध्ये बहुतांश हिंदू १ जानेवारीला ख्रिस्तींसमवेत नववर्षदिन साजरा करतात. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीने नववर्ष १ जानेवारीला साजरे न करता हिंदूंच्या नववर्षारंभाच्या दिवशीच करा, अशी प्रबोधनात्मक मोहीम राबवली. त्यासाठी ५०० भित्तीपत्रके छापून ती केरळच्या एर्नाकुलम, आलपुझा आणि त्रिशिवपेरूर या ३ जिल्ह्यांमध्ये जागोजागी लावण्यात आली. त्यासमवेत फेसबूक आणि व्हाट्स-अ‍ॅपवरूनही प्रसार केला. त्या वेळी समाजातून आलेल्या प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत.

भारताला दास बनवण्यासाठी मेकॉलेने भारतीय संतांवर चारित्र्यहीनतेचे आरोप करून गुरुकुले नष्ट करण्यासाठी अवलंबलेल्या तंत्राने आज स्वतंत्र भारतात परिसीमा गाठणे

      इंग्लंडमध्ये बसून मेकॉलेने भारताला परतंत्र, दास (गुलाम) बनवण्याचे षड्यंत्र रचले होते. भारत परतंत्र कसा बनेल, असे जेव्हा मॅकॉलेने विचारले, तेव्हा कुणीतरी त्याला सांगितले, भारतातील संतांवर चारित्र्यहीनतेचे आरोप करण्याचे षड्यंत्र रचा. त्यांच्यावर चिखलफेक करा; कारण भारताचे संत भारताला ऊर्जा आणि तेज देतात. ब्रह्मचर्याची शिकवण देऊन ते भारतियांच्या हृदयात ओजाचा संचार करतात. गुरुकुले नष्ट करा, भ्रष्ट करा ! मॅकॉलेने हे षड्यंत्र रचले आणि याच षड्यंत्र आज भारतात परिसीमा गाठली आहे. हिंदूंनो, आता तुम्हालाच त्यांना धडा शिकवायचा आहे. गर्वाने बोला, आम्ही हिंदू आहोत. हिंदुस्थान आमचा आहे ! 
- युवा क्रांतीद्रष्टे संत दिनेश भारतजी (ऋषीप्रसाद, सप्टेंबर २००९)

संरक्षण क्षेत्रात अडथळे बनलेले राजकीय नेते !

१. नेहरूंच्या मृत्यूमुळे देश दुसर्‍या फाळणीपासून वाचणे
      एप्रिल १९६४ मध्ये माऊंटबॅटन भारतात आले आणि रुग्णाईत नेहरूंना भेटले. त्यांनी नेहरूंना सल्ला दिला, अंदमान बेटे इंडोनेशियाला देऊन टाका, काश्मीर पाकिस्तानला द्या आणि आसामचा काही भाग चीनला द्या. एक मासानंतर नेहरूंचे निधन झाले आणि आपण दुसर्‍या फाळणीपासून वाचलो. 
(संदर्भ : भास्कर स. सोमण, अ‍ॅडमिरल यांचे पित्रकृत चरित्र)
२. दिशाभूल करणारे संदेश दिल्यामुळे उच्च अधिकार्‍यांचे हवाई अपघात होणे
     जम्मू आणि काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये हवाई (पायलट) अधिकारी सोंधी, मे.ज. ओबेरॉय, व्हाइस ए.मा. पिंटो आणि आणखी एक उच्च अधिकारी हवाई प्रवास करत होते. अचानक हेलिकॉप्टर भरकटले आणि पंख्याची पाती तारेत अडकून हेलिकॉप्टर खाली कोसळले अन् सर्वजण त्यात हुतात्मा झाले. पाक हवाई वाहतूक नियंत्रणेने (एअर ट्रॅफीक कंट्रोलने) वैमानिकाला (पायलटला) दिशाभूल करणारा संदेश दिला आणि हा अपघात घडवून आणला. चूक संरक्षणमंत्री संजय गांधी यांची होती. चार उच्च अधिकार्‍यांना एका विमानात बसण्याची अनुमती दिलीच कशी ? नागरी हवाई प्रशिक्षक कॅ. सक्सेना यांनी संजय गांधी यांना जाणीव करून दिली होती; मात्र गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

कारागृहातील आतंकवाद थांबवू न शकणार्‍या कारागृहाच्या उत्तरदायींनाच आजन्म कारागृहात टाका !

     सडा, वास्को, गोवा येथील उप-कारागृहात दहशत माजवून कैद्याकडून किंवा त्याच्या कुटुंबियाकडून पैसे उकळणारी टोळी कार्यरत आहे. त्यांच्याकडून नवीन कैद्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या अन्वेषणातून उघड झाली आहे. (२६.१२.२०१५)

हे आहे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीचे फळ !

     उत्तरप्रदेशातील ६० आणि बिहारमधील २६ जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत, तर केरळमधील ५ जिल्हे आणि काश्मीर, तसेच पूर्वोत्तर ३ राज्यांमध्ये हिंदू अल्प झाले आहेत. - केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह

गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदुत्ववादी नेत्यांवरील आक्रमणे आणि हिंदुद्वेष्टे यांविषयी आम्ही काहीही करणार नाही अन् हिंदुत्ववाद्यांनाही काही करू देणार नाही, या वृत्तीचे पोलीस !

     हिंदु धर्मावर टीका करणारे डॉ. झाकीर नाईक यांना केलेल्या मंगळुरू प्रवेशबंदीच्या नंतर पोलिसांनी डॉ. तोगाडिया यांच्याही मंगळुरू प्रवेशावर बंदी घातली आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
श्रीब्रह्मचैतन्य
गोंदवलेकर महाराज
     श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते. श्रीब्रह्मचैतन्य श्रीरामाचे उपासक होते. ते स्वतःला ब्रह्मचैतन्य रामदासी म्हणवत.
गुरुकृपा
     वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधार्थ घर सोडले. त्या वेळी त्यांच्या वडिलांनी कोल्हापूर येथून त्यांना परत आणले. काही काळाने त्यांनी पुन्हा गृहत्याग करून गुरुशोधार्थ पदभ्रमण चालू केले. अनेक संत, सत्पुरुष यांच्या भेटी घेतल्या. अखेर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यापासून जवळ येहेळगावी श्रीतुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व प्राप्त झाले. अतिशय कठोर अशा कसोट्या देत, गुर्वाज्ञापालन करीत, त्यांनी गुरुसेवा केली. या वेळी त्यांचे वय १४ वर्षांचे होते. श्रीतुकामाईंनी त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव दिले, रामोपासना दिली आणि अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. यानंतर श्री तुकामाईंच्या आदेशानुसार महाराजांनी बराच काळ तीर्थाटन केले.

गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक ! - श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

      एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रमस्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.
स्वामी : महाराज, इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत ?
गोंदवलेकर महाराज : कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही !
स्वामी (उत्तर न पटल्याने) : त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील ?
गोंदवलेकर महाराज : ते लवकरच दाखवीन. नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रमस्वामींच्या हातापायांना चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे पुष्कळ लोक गंगास्नानासाठी उतरत, तेथे त्यांना नेऊन बसवले. महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले. काही वेळाने बरीच मंडळी जमली. बैरागी उपस्थितांना म्हणाला, लोकहो, ऐका ! हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्‍वेश्‍वराची अत्यंत मनापासून सेवा केली.

घरी असतांना आश्रमाप्रमाणेच कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करून घराचा आश्रम बनवणार्‍या वर्षा नकाते !

   
वर्षा नकाते
वर्षा नकाते या काही वर्षे सनातनच्या आश्रमामध्ये सेवेला होत्या. आता त्या सोलापूर येथे त्यांच्या आईसमवेत असतात. पुष्कळ वेळा आश्रमातून घरी आल्यावर तेथील कार्यपद्धती, सेवा, तत्त्वे आणि अनुशासन यांचे पालन करण्यात थोडी शिथिलता येते; परंतु वर्षा नकाते घरातही आश्रमाप्रमाणेच कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करतात. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी (४.१.२०१६) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
वर्षा नकाते यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. घरातही आश्रमाप्रमाणेच कार्यपद्धती घालणे
१ अ. शिळा भात अल्पाहारासाठी वापरण्यास सांगणे : एकदा मी रात्री भात प्रमाणापेक्षा अधिक बनवला होता. त्यामुळे तो शेष राहिला होता. तेव्हा वर्षाने सकाळी अल्पाहारासाठी दुसरा पदार्थ करू नको. सगळ्यांनीच रात्रीचा भात खाऊया, असे सांगितले. तिने मला या चुकीची जाणीव करून दिली.

अन्यायाविरुद्ध लढणार्‍या आणि गुरूंवरील नितांत श्रद्धेच्या बळावर तीव्र त्रासांवर मात करून त्यांचे मन जिंकणार्‍या वर्षा नकाते !

वर्षा नकाते
१. प्रेमभाव
    कुणाला काही दुःख झाल्याचे लक्षात आले की, वर्षा लगेच त्याच्या साहाय्यासाठी धावत जाते. इतरांसाठी झिजणे आणि त्यातून इतरांना आनंद देणे, अशी तिची वृत्ती आहे. ती लहान मुलांसमवेत लहान, तर मोठ्यांमध्ये मोठी होते. तिच्यातील या प्रत्येकात सहजपणे मिसळून जाणे, या गुणांमुळे प्रत्येकालाच तिचा आधार वाटतो.
२. अन्यायाविषयी चीड असणे
     लहानपणापासून तिचा स्वभाव अतिशय तापट होता. तिला तिच्यावर किंवा कुणावरही कसलाही अन्याय केलेला सहन होत नसे. त्यामुळे कुठे काही अन्याय होतांना दिसला की, तिला पुष्कळ चीड यायची. अन्याय सहन न झाल्याने ती कधी समोरच्यांचा शब्दांनी, तर कधी मारझोड करूनही प्रतिकार करायची.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
     यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

नामजप करतांना अहं-निर्मूलन होण्यासाठी प्रार्थना होणे आणि कार्यशाळेच्या नंतरच्या सत्रामध्ये स्वतःकडून झालेल्या चुका सांगण्याची संधी देऊन देवाने अहं-निर्मूलन करवूनही घेणे

सौ. रिशिता गडोया
     मला होणार्‍या त्रासात पुष्कळ वाढ झाल्यामुळे मी नामजपाला जाऊन बसले. तेव्हा देवाने मला सर्वकाही श्रीकृष्णाला मानसरित्या सांगण्याचा विचार दिला. त्याप्रमाणे मी माझ्या मनातील सर्वकाही श्रीकृष्णाला सांगून मी ज्या स्थितीतून जात आहे, ते सर्व तुला ठाऊकच आहे. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही, असे सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाच्या कृपेने अहं-निर्मूलन होण्याविषयी माझ्याकडून प्रार्थना झाली.
     नामजप करून मी परत आल्यावर कार्यशाळेच्या पुढील सत्राला आरंभ झाला. माझ्याकडून झालेल्या चुका सांगण्यासाठी मला बोलावण्यात आले. तेव्हा माझ्या मनाची घुसळण चालू झाली. मला कळते आणि मला चांगले कळते या अहंच्या पैलूंमुळे माझा सेवेचा दृष्टीकोन चुकीचा असल्याची जाणीव मला झाली. मला माझ्या चुकांविषयी पुष्कळ खंत वाटू लागली. रात्री उशिरा माझ्या लक्षात आले की, नामजपाच्या वेळी श्रीकृष्णानेच मला अहं-निर्मूलनासाठी प्रार्थना करण्यास सुचवले आणि त्यानेच तसे करवूनही घेतले. माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि माझे अहं-निर्मूलन व्हावे, याची तळमळ माझ्यापेक्षा देवाला अधिक प्रमाणात आहे, हे लक्षात आल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
- सौ. रिशिता गडोया, कॅनडा. (११.८.२०१५)

उपजतच देवाची आवड असणारी व्हाळशी (तालुका डिचोली, गोवा) येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. गार्गी पुष्पराज पराडकर (वय १ वर्ष) !

    
चि. गार्गी पराडकर
व्हाळशी येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. गार्गी पुष्पराज पराडकर हिचा काल मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमी (३ जानेवारी २०१६) या दिवशी पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने चि. गार्गी हिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. गर्भारपण
     गर्भावर (चि. गार्गीवर) चांगले संस्कार होण्यासाठी मी नामजप आणि स्तोत्रे म्हणत असे. त्या वेळी ती ते शांतपणे ऐकत आहे, असे मला जाणवत असे.
२. जन्म ते ४ मास
२ अ. खेळकर : गर्भधारणेनंतर आठ मास पूर्ण झाल्यावर गार्गी जन्मली. त्यानंतर आतापर्यंत ती क्वचितच रडली. रात्री ती नेहमी शांत झोपत असे. तसेच झोपून उठल्यावर एकटीच खेळत असे. तिच्याकडे पुष्कळ वेळ कुणी न गेल्यास ती रडत असे.

अध्यात्माविषयी बोलतांना आवाज बाहेर न पडणे आणि कोणीतरी बोलण्यास विरोध करत आहे, असे जाणवणे

पू. सिरियाक वाले
    अध्यात्म विश्‍वविद्यालयाची कार्यशाळा चालू असतांना जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देतांना काही वेळा मी सहजपणे बोलू शकत होतो; परंतु काही वेळा मात्र त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे महत्त्वाची आणि ती माझ्या मनात येत असूनही मला बोलता येत नसे. त्या वेळी माझा आवाज बाहेर पडत नसे किंवा कोेणीतरी मला बोलू देत नाही, असे वाटे. अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पहिल्या कार्यशाळेच्या वेळी २-३ वेळा असे झाले. ११.६.२०१५ या दिवशी चतुर्थ अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगीही बोलतांना मधेच माझा आवाज बाहेर पडत नव्हता, त्या वेळीही काही क्षण मला बोलता येत नव्हते. त्या क्षणानंतर मात्र मी व्यवस्थित बोलू शकलो.
- (पू.) श्री. सिरियाक वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (२३.६.२०१५)

श्री लिपी सॉफ्टवेअरची मागणी प्रसारसेवकांच्या माध्यमातून संगणक-दुरुस्ती विभागात कळवा !

साधकांसाठी सूचना
     सध्या टंकलेखनासाठी श्री लिपी हे सॉफ्टवेअर वापरण्यात येते. ज्या साधकांना वैयक्तिक संगणक अथवा भ्रमणसंगणक यांमध्ये ते सॉफ्टवेअर घालून हवे आहे, त्यांनी या सॉफ्टवेअरची मागणी प्रसारसेवकांना कळवावी. साधकांनी प्रसारसेवकांची अनुमती घेऊन जिल्ह्यात उपलब्ध असलेला परचेस रिक्विझिशन फॉर्म भरून तो रामनाथी येथील संगणक-दुरुस्ती विभागात पाठवावा.

परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे आणि साधकांवर निरपेक्षतेने प्रेम करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे एस्.एस्.आर्.एफ्.चे श्री. शिरीष सराफ !

    २९ डिसेेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
श्री. शिरीष सराफ
१. साधी आणि सात्त्विक राहणी
     रज-तम प्रधान शहरात राहूनही दादांचे जीवन पुष्कळ सात्त्विक आहे. त्यांचे राहणीमान आणि वेशभूषा अतिशय साधी आहे. त्यांना बाहेरून विकत आणलेले अन्नपदार्थ आवडत नसून घरी बनवलेले साधे पदार्थ अधिक आवडतात. वेळप्रसंगी ते स्वतः अल्पाहार बनवतात; परंतु बाहेरचे खाणे टाळतात.
२. वेळेचे पालन करणे
    ते एखाद्या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेपूर्वीच उपस्थित रहातात. कार्यक्रम संपल्यानंतर ते अनावश्यक बोलण्यात वेळ न घालवता त्वरित प्रस्थान करतात.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

http://3.bp.blogspot.com/-Z5vsNlgJCiQ/Vh0v40B6omI/AAAAAAABuJM/3nRI5dr8JZA/s1600/Baba.jpg
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान


गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

http://1.bp.blogspot.com/--fAFj_7VKEc/Vh088RqKOEI/AAAAAAABuKI/CSmM7j9TVcc/s1600/Ppdr_gabhir.jpg
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
     धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावनेच आढळते; म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत; मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

स्मशानशांतता ?

संपादकीय 
       सीमेवरील, तसेच देशांतर्गत वातावरण शांत असणे आणि सर्वत्र कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित असणे, यासाठी सर्वच देश खटपट करत असतात. त्यासाठीच फ्रान्सने आय.एस्.आय.एस्.ला आव्हान दिले आहे. शांततेसाठी इस्रायल काय प्रयत्न करत आहे, हे तर सर्वश्रुत आहे. देशात अराजकाची स्थिती निर्माण झालेली असतांना भारत त्यासाठी काय प्रयत्न आहे, हे पहाणे औत्सुक्याचे आहे. त्याला कारणही तसेच आहे. नुकतेच पंजाबमधील पठाणकोट येथील सैन्याच्या हवाई तळावर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. सामान्य लोकवस्तीत किंवा सीमेवर नव्हे, तर आता सैन्याच्या तळांवर आक्रमणे करण्याचेच प्रकार वाढत आहे, हे सर्वाधिक चिंताजनक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn