Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे संस्थापक 
पं. मदन मोहन मालवीय यांची आज जयंती
 (तिथीनुसार)
पं. मदन मोहन मालवीय

बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना धर्मांध पोलिसांकडून मारहाण !
 • हिंदु महिलेवर बलात्कार, मुलीच्या गुप्तांगात काठ्या खुपसल्या !
 • वर्ष २००७ पासून वारंवार अत्याचार !
 • पोलिसांकडून घटनेची दखल घेण्यास नकार !
 • पीडित आई आणि मुलगी यांचा संरक्षणासाठी आक्रोश !

श्रीनगरमध्ये धर्मांधांनी फडकवले आय.एस्.आय.एस्.चे आणि पाकचे झेंडे !

भारतीय मुसलमानांवर आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव पडणार नाही, 
असे म्हणणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अशी घटना फ्रान्स, रशिया वा अन्य बाणेदार राष्ट्रांमध्ये घडली असती, 
तर त्यांनी एव्हाना अशा देशद्रोही आतंकवाद्यांना थेट जन्नतचा रस्ता दाखवला असता !
 • सैनिकांवर दगडफेक !
 • देशविरोधी घोषणाही दिल्या !
 • हाफीज सईदचे फलकही झळकवले !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये धर्मांधांनी जामिया मशीद आणि त्याच्या परिसरात आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचे, तसेच पाकचे झेंडे फडकवले.

कोची येथील वासनांध फादर एडविन अखेर पोलिसांना शरण

कथित आरोपाखाली कारागृहात असणार्‍या हिंदु संतांची अपकीर्ती करणारी हिंदुद्वेष्टी 
प्रसारमाध्यमे अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंच्या या कुकृत्यांविषयी गप्प का ?
१४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !
शासकीय महिला डॉक्टरच्याही आवळल्या मुसक्या !
     कोची - येथील कोत्तापुरम कॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ (४१ वर्षे) याच्यावर एका १४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. गेले ७ मास फरार असलेला फादर अखेर पोलिसांना शरण आला असून फादरला साहाय्य केल्याच्या आरोपाखाली पुथेन्वेलीक्कारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर अजीथा यांचेही नाव या प्रकरणी चवथा आरोपी म्हणून पोलिसांनी आरोपपत्रात समाविष्ट केले आहे आणि त्यांना अटकही करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील भाजपचे आमदार विश्‍वास सारंग यांच्या फलकावर पाकचा झेंडा ?

काँग्रेसकडून कारवाईची मागणी
     भोपाळ - मध्यप्रदेशमधील नरेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्‍वास सारंग यांच्या फलकावर पाकचा झेंडा झळकल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसींनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर पोलिसांनी मात्र या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. (ढळढळीत झळकणारा फलकही न दिसणारे आंधळे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण कधी करू शकतील का ? अशा कतर्व्यचुकार पोलिसांवर तात्काळ कारवाई करा ! - संपादक)

जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१५ मध्ये १११ आतंकवादी ठार

देशासाठी प्राणपणाने लढणारे सैनिकच देशाचे खरे आशास्थान आहेत !
४१ सुरक्षा कर्मचारी आणि २० नागरिकांनीही प्राण गमावले 
     श्रीनगर - वर्ष २०१५ या सरत्या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये १११ आतंकवादी ठार झाले असून ४१ सुरक्षा कर्मचार्‍यांना प्राणांचे मोल चुकवावे लागले आहे, तर २० निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात गेल्या २६ वर्षांत आतंकवादी कारवायांमध्ये जीव गमवणारे सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक यांंचा हा सर्वाधिक अल्प आकडा आहे; परंतु यावर सुरक्षा दल समाधानी नाही; कारण मोठ्या प्रमाणात आतंकवादी ठार होऊनही येथील तरुणांमध्ये आतंकवादाचे आकर्षण अल्प झालेले नाही. हे यावर्षी आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झालेल्या १०० तरुणांवरून स्पष्ट होते. याबरोबरच क्रूर आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.मध्ये किती तरुण सहभाग झाले असतील, याविषयी अजूनही सुरक्षा संस्थांना संपूर्ण थांगपत्ता लागलेला नाही.

बाली येथे परपुरुषाशी मैत्री करणार्‍या युवतीला मशिदीबाहेर चाबकाच्या फटक्यांची शिक्षा

भारतात असहिष्णुता वाढल्याचा ढोल पिटणार्‍यांना आणि कथित 
महिलामुक्तीवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
      बाली (इंडोनेशिया) - येथील एका विद्यापिठात शिक्षण घेत असलेल्या नूर एलिटा नावाच्या युवतीची तिच्यासमवेत शिकत असलेल्या एका मुलाशी मैत्री झाली. येथे लागू असलेल्या शरीया कायद्यानुसार परपुरुषाशी मैत्री करणे हा गंभीर अपराध मानला जात असल्याने त्या मुसलमान युवतीला मशिदीसमोरील चौकात चाबकांच्या फटक्यांची शिक्षा देण्यात आली. (भारतात आणि विशेषतः हिंदु धर्मात महिलांवर अनेक बंधने लादली जात असल्याची तसेच महिलांना दुय्यम वागणूक दिल्याची ओरड मारणारे अशा घटनांविषयी काहीच का बोलत नाहीत ? - संपादक)

जम्मू-काश्मीरच्या शासकीय इमारतींवर केवळ तिरंगाच फडकेल ! - उच्च न्यायालय

     श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शासकीय इमारतींवर दोन झेंडे फडकावण्याविषयी उच्च न्यायालयाच्या न्या. हसनैन मसूदी यांच्या खंडपिठाने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपिठाने स्थगिती दिली असून शासकीय इमारतींवर केवळ तिरंगाच फडकेल, असे स्पष्ट केले आहे. राज्यशासनाने मार्च २०१५ मध्ये सर्व शासकीय इमारती आणि अधिकारी यांची वाहने यांच्यावर तिरंग्यासह राज्याचाही झेंडा फडकावण्याचा आदेश काढला होता; मात्र दबावामुळे शासनाने त्यांचा निर्णय मागे घेतला होता.

संसदेच्या उपाहारगृहातील खाद्यपदार्थांच्या किमतीत अखेर वाढ

     नवी देहली - संसदेच्या उपाहारगृहाला मिळणार्‍या सबसिडीवर संसदेत वेळोवेळी प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर ती बंद करून अखेर १ जानेवारीपासून येथील खाद्यपर्दार्थांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे उपाहारगृह आता ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवले जाणार असून या पदार्थांची विक्री खर्चाच्या मूळ किमतीनुसारच केली जाणार आहे. खुल्या बाजारातील खाद्यपदार्थांच्या किमतीत सतत वाढ होत असतांना संसदेच्या उपाहारगृहामध्ये अजूनही सबसिडी कायम असल्याविषयी अनेक वेळा प्रसारमाध्यमांमधून यावर चर्चा होत राहिली. या पार्श्‍वभूमीवर लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या खाद्य समितीला या विषयात लक्ष घालण्याचा आदेश दिला होता. खाद्य समितीचा अहवाल आल्यानंतर महाजन यांनी हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार तब्बल ६ वर्षांनंतर येथील खाद्यपदार्थांच्या किमतीत पालट होणार आहेत, तसेच यापुढे वेळोवेळी किमतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने सांगितले आहे. नव्या निर्णयामुळे आता १८ रुपयांना मिळणार्‍या शाकाहारी थाळीची किंमत वाढून ती ३० रूपये करण्यात आली आहे. याप्रमाणेच मांसाहारी पदार्थांच्या किमतीतही वृद्धी करण्यात आली आहे. ही वाढ संसदेचे सर्व खासदार, प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि संसदेला भेट देणार्‍या व्यक्तींसाठी लागू होईल, असेही सचिवालयाने स्पष्ट केले आहे.

बांगलादेशमध्ये धर्मनिरपेक्ष ब्लॉगरच्या हत्येप्रकरणी दोघा जिहाद्यांना फाशीची शिक्षा

     ढाका - धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांची हत्या करणार्‍या दोन जिहाद्यांना बांगलादेशमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर त्यांच्यासमवेत असणार्‍या अन्य ६ जणांना विविध मुदतीच्या शिक्षा सुनावल्या.
१. महंमद फैजल बिन नयेम उपाख्य द्वीप आणि आजाद राणा यांना न्यायालयाने हैदर यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. यासमवेतच १० सहस्र टका (बांगलादेशी चलन)(सुमारे ८ सहस्र ५०० भारतीय रुपये) इतक्या रकमेचा दंडही ठोठावण्यात आला. त्यापैकी आजाद राणा हा सध्या फरार आहे.

माजी सैनिकांना नोकरीचे आमिष दाखवून आय.एस्.आय. भारतीय सैन्याची गुपिते हस्तगत करण्याच्या प्रयत्नात

कुठे देशासाठी प्राणांचे बलीदान करणारे सैनिक, तर कुठे आय.एस्.आय.च्या 
प्रलोभनांना बळी पडणारे निवृत्त सैनिक !
     नवी देहली - गेल्या आठवड्यात पाकच्या आय.एस्.आय. या गुप्तहेर संघटनेच्या अनेक हेरांना अटक झाली आहे. या गुप्तहेरांनी अवलंबलेल्या विविध क्लुप्त्यांंमध्ये अजून एका फसवणुकीच्या प्रकाराची भर पडली आहे. आय.एस्.आय.ने उत्तर भारतात माजी सैनिक कल्याण नावाची एक बनावट संस्था स्थापन करून त्यायोगे माजी सैनिकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सैन्याची गुपिते हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे.

दत्तजयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथप्रदर्शन
श्री क्षेत्र बांगर येथील ग्रंथ प्रदर्शनाचा
लाभ घेतांना जिज्ञासू
     उज्जैन (मध्यप्रदेश) - दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे राष्ट्र आणि धर्मजागृती यांविषयी मार्गदर्शनपर फ्लेक्स आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !
- पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी 
उपाख्य छोटे काका महाराज
    बांगर (देवास) येथील दत्तपादुका मंदिर श्रीक्षेत्रात साधकांकडून प्रथमच फ्लेक्स आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला ५ सहस्राहून अधिक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील संत पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी उपाख्य छोटे काका महाराज यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केल्यावर सांगितले, समाजाला ज्ञान देण्याचे भगवान श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे. या वेळी त्यांनी साधकांना आशीर्वादही दिले.

देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

दत्त अनुसंधानात असतांना
पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी
उपाख्य छोटे काका महाराज
परिचय 
     पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी उपाख्य छोटे काका महाराज यांना नरसिंह सरस्वती यांचा अनुग्रह घेतलेले त्यांचे मोठे भाऊ पू. केशव गुरुनाथ कुलकर्णी हे गुरु म्हणून लाभले. त्यांच्या आज्ञेवरुन वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून दत्त सेवा करण्यास आरंभ केला. वर्ष १९७४ ला ते श्रीक्षेत्र बांगरला आले आणि वर्ष १९७५ ला त्यांनी नोकरीचा त्याग करुन पूर्णकालीन दत्तभक्ती आरंभ केली. सध्या ते दत्तपादुका मंदिर श्रीक्षेत्र बांगर येथील मुख्य व्यवस्थापक म्हणून सेवा करत आहेत. महाराज सतत दत्ताच्या अनुसंधानात असतात.
    उज्जैन, १ जानेवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवास (मध्यप्रदेश) येथील संत पू. गजानन कुलकर्णी (छोटे काका महाराज) यांची नुकतीच भेट घेतली.पू. महाराज यांच्या श्रीक्षेत्र बांगर (देवास) येथील दत्तमंदिरात उभय संतांची भेट झाली. त्या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महाराजांंना समितीसमवेत सनातन संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली. तेव्हा महाराजांनी संस्थेचे कार्य चांगले असल्याचे सांगून या कार्याला शुभाशीर्वाद दिले, तसेच दत्तजयंती निमित्त त्यांच्या मंदिरात सनातन-निर्मित ग्रंथप्रदर्शन अन् फलकप्रदर्शन लावण्याची अनुमती दिली. या प्रसंगी समितीचे श्री. योगेश व्हनमारे उपस्थित होते. या प्रदर्शनास महाराजांचे चिरंजीव श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.

ओझर (नाशिक) येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची सहकुटुंब रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट

     रामनाथी (गोवा) - ओझर, नाशिक येथील अधिवक्ता (नोटरी) श्री. विजय कुलकर्णी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब भेट दिली. अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अधिवक्त्या सौ. वैदेही कुलकर्णी, मुलगे श्री. विपीन आणि कु. शुभम अन् मुलगी कु. ऋतुजा उपस्थित होते. सनातनचे साधक अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्यासंदर्भात माहिती दिली.

बेल्जियमवर आतंकवादाचे सावट !

अशी वेळ भारतावर येण्यापूर्वी देशातून आतंकवाद हद्दपार करणे आवश्यक !
ख्रिस्ती नववर्षाचे कार्यक्रम रहित
     बेल्जियम - आतंकवादी आक्रमणांच्या सावटामुळे बेल्जियम येथे यावर्षीचे ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यात येणार नाही. आतंकवाद्यांचा धोका लक्षात घेऊन सर्व समारोह आणि कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. मागील वर्षी ३१ डिसेंबरला लक्षावधी लोक ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी एकत्रित जमले होते.

डाव्यांनी बंगालचा सर्वनाश केला ! - अर्थतज्ञ अमर्त्य सेन

डाव्यांच्या हिंदुद्वेषी कारभारामुळे बंगालमधील हिंदूंवर मोठ्या 
प्रमाणात अन्याय झाला, त्याची वाच्यता कुणी का करत नाही ?
डाव्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच गडबड असल्याचा आरोप !
     कोलकाता - डाव्यांनी बंगालचा सर्वनाश केला, अशा शब्दांत अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी डाव्यांवर जोरदार शाब्दिक आक्रमण केले. डाव्यांमुळेच बंगाल औद्योगिकीकरणात मागे असल्याची टीकाही त्यांनी केली. वीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

(म्हणे) पाडगावकर यांच्या आधीच मोदीला श्रद्धांजली वहावी लागली असती !

एकेरी भाषा वापरणारे साहित्य संमेलनाध्यक्ष जनतेला कोणती वैचारिक
 दिशा देणार ? सबनीस यांनी अशी टीका करणे, ही असहिष्णुता नव्हे का ?
मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल 
सबनीस यांना नरेंद्र मोदी यांच्या पाकभेटीचा पोटशूळ !
     पुणे - मोदी हा पंतप्रधान नवाज शरीफच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेला, तो हातावर शीर घेऊन गेला; कारण ही मरायची लक्षणे होती. दाऊद पाकिस्तानात आहे, आतंकवाद्यांचे अनेक अड्डे तिथे आहेत.

पन्हाळगड आणि विशाळगड येथे ख्रिस्ती नववर्ष साजरे न करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांकडून नागरिकांचे प्रबोधन !

 • ३१ डिसेंबरला होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची गड संरक्षण मोहीम
 • नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासन आणि पोलीस यांचेही उत्तम सहकार्य
   कोल्हापूर, १ जानेवारी (विशेष प्रतिनिधी) - ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि नवीन वर्ष ख्रिस्ती संस्कृतीप्रमाणे साजरे न करता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरा करण्यात यावे, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी पन्हाळा आणि विशाळगड येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट संरक्षण मोहीम राबवण्यात आली. मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदुत्ववाद्यांना पोलीस आणि प्रशासन यांचेही सहकार्य लाभले. या मोहिमेत २५ धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला होता.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

अथणी (जिल्हा बेळगाव) येथे लाच घेतांना महिला अधिकार्‍याला अटक !

भ्रष्टाचारात पुरुषांबरोबरच आता महिलाही आघाडीवर ! हेच आहे का लोकशाहीचे फलित ?
     अथणी (जिल्हा बेळगाव) - अथणी तालुक्यातील दोडवाड येथील श्री. निंगाप्पा चनाप्पा पाटील यांच्याकडून येथील तहसीलदार कार्यालयातील पहाणी विभागातील महिला पहाणी अधिकारी शहनाजबेगम कुरी यांना लाच घेतांना अटक करण्यात आली. २९ डिसेंबर या दिवशी ही कारवाई लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकून केली.

३१ डिसेंबरच्या रात्री १ सहस्र ९०० हून अधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

 • पाश्‍चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम !
 • मुंबईत ५३९, तर ठाण्यात ७७५ मद्यपींवर कारवाई
     मुंबई, १ जानेवारी - ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक जण मद्यपान करून गाडी चालवतात. रात्री अनेक ठिकाणी मेजवान्या आयोजित करून शहरात हुल्लडबाजी केली जाते. हे रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा विविध भागांत गाड्या आणि वाहनचालक यांची पडताळणी केली. यामध्ये वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये १ सहस्र ९०० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.

मारुंजी (पुणे) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिवशक्ती संगम कार्यक्रम

     पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने येथील मारुंजी या ठिकाणी ३ जानेवारी २०१६ या दिवशी शिवशक्ती संगम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सिद्धता अंतिम टप्प्यात आहे.
१. संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह विनायक थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेे की, या कार्यक्रमासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांच्यासह महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स

     पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा उल्लेख पुण्यतिथी असा केल्याप्रकरणी कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स बजावण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम्.ए. पठाण यांनी हा आदेश दिला आहे. याविषयी राजेश नारायण खडके (वय ४१ वर्षे, रहाणार मध्यवर्ती शासकीय इमारत, कर्मचारी वसाहत) यांनी कालनिर्णयचे व्यवस्थापक आणि संपादक शिवराम जयंत साळगावकर यांच्या विरोधात अधिवक्ता वाजेद खान (बीडकर) यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.
बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे यांचा अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार !
 
श्री. संभाजी साळुंखे यांचा सत्कार करतांना डॉ. अमोल कोल्हे
    कोल्हापूर - येथील शिवाजी स्टेडियम येथे २३ ते ३० डिसेंबर २०१५ या दिवशीपर्यंत राजदीप प्रोडक्शन, पुणे निर्मित जगदंब प्रोडक्शन प्रस्तुत शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या महानाट्याचे प्रयोग दाखवण्यात आले. याला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या वेळी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते आणि कलाकार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले.

फलटण येथे हिंदु धर्मजागृती सभेचा विविध माध्यमांद्वारे प्रसार

     फलटण (जिल्हा सातारा), १ जानेवारी (प्रतिनिधी) - शनिवार, २ जानेवारी २०१६ या दिवशी मुधोजी क्लब मैदानावर सायंकाळी ५.३० या वेळी होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून जवळपास ५० महिला आणि पुरुष कार्यकर्ते या सभेसाठी अविरत प्रसार-प्रचार करत आहेत.
१. प्रसारानिमित्त समितीच्या वतीने शहरातून वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी, चारचाकी यांसह पंचक्रोशीतील बहुसंख्य धर्माभिमानी हिंदू या फेरीत सहभागी झाले होते.
२. शहरातील विविध भागांत समितीच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील तरुण-तरुणींना धर्मावरील आघातांविषयी जागृत करून संघटित होण्याचे आवाहन केले.
३. उद्घोषणा, बैठकांतून विषय मांडणे, पथनाट्य, फलक लावणे (होर्डिंग), रिक्शावरील फलक, हस्तपत्रक, सामाजिक प्रसिद्धीमाध्यमे यांतूनही मोठ्या प्रमाणात घरोघरी विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३६ वा दिवस !
३१.१२.२०१५
१. रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी आश्रमासमोरील रस्त्यावरून दोन दुचाक्यांवरून सहा जण सनातन..., असे ओरडत गेले.
२. रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी आश्रमासमोरील रस्त्यावरून सात-आठ जण सनातन..., असे ओरडत गेले.

हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी केरळ राज्यात पाश्‍चात्त्य नववर्षदिनी चुंबन आंदोलनाचे आयोजन !

अनैतिकतेचे निलाजरे समर्थन करणार्‍यांना कारागृहात का टाकत नाही ?
     कोझिकोडे (केरळ) - हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी येथील नात्तुवेला संस्कार प्रवर्तक संगम या संघटनेच्या वतीने पाश्‍चात्य नववर्षानिमित्त चुंबन आंदोलन करण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत बोलतांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रांगणात करण्यात येणार्‍या या आंदोलनात जोडपी एकमेकांचे चुंबन घेऊन ते विवाह न करता एकत्र रहात आहेत, अशी घोषण करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
     धाराशिव - चिटफंड घोटाळा आणि गुंतवणूकदारांना फसवल्याच्या प्रकरणी समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांची ३१ डिसेंबर या दिवशी पोलीस कोठडी संपणार होती. तत्पूर्वी त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात प्रविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना उमरगा येथील न्यायालयात उपस्थित करणे पोलिसांना शक्य झाले नाही.

आज फलटण येथे हिंदु धर्मजागृती सभा

दिनांक : २ जानेवारी २०१६
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : मुधोजी क्लब मैदान, माळजाईदेवी मंदिराजवळ, फलटण (जिल्हा सातारा)
    धर्माभिमानी हिंदूंनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांच्या विरोधात १० दिवसांनंतर गुन्हा प्रविष्ट !

 • कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक पोलिसाला धमकी द्यायला हा भारत आहे कि पाक ?
 • जळगाव येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या धर्मबांधवांवर कारवाई न होण्यासाठी वाहतूक पोलिसाला धमकी दिल्याचे प्रकरण
     जळगाव, १ जानेवारी - २० डिसेंबर या दिवशी येथील महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ वाहतुकीचे नियम मोडून ३ मुसलमान तरुण दुचाकीवरून प्रवास करत होते. वाहतूक शाखेचे साहाय्यक फौजदार शशिकांत डोले यांनी त्यांना हटकून नियम मोडल्याच्या प्रकरणी १०० रुपये दंडाची मागणी केली. यावर त्या तरुणांनी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांना भ्रमणभाष करून बोलावून घेतले. नदवी यांनी घटनास्थळी येऊन ३ तरुणांची बाजू घेतली आणि यांच्यावर कारवाई कराल, तर बघून घेऊ, अशी पोलिसांना धमकी दिली होती. (अवैध कृत्ये करणार्‍यांना पाठीशी घालणारे पदाधिकारी असलेला समाजवादी पक्ष समाजात अराजकच माजवतील, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? - संपादक) या प्रकरणाचे चलतचित्र (व्हिडिओ क्लिप) सामाजिक संकेतस्थळावर फिरत होते. दबाव वाढल्यावर ३० डिसेंबर २०१५ या दिवशी डोले यांच्या तक्रारीवरून नदवी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (२० डिसेंबर या दिवशी झालेल्या घटनेची तक्रार प्रविष्ट होण्यास १० दिवस का ? हाच प्रकार हिंदूंच्या संदर्भात घडला असता, तर पोलीस प्रशासनाने अशी सवलत दिली असती का ? समाजवादी पक्षाचा एक पदाधिकारी उघडपणे पोलीस प्रशासनास आव्हान देतो आणि त्याच्यावर १० दिवसांनंतर केवळ गुन्हा प्रविष्ट होण्याच्या पलीकडे कोणतीच कारवाई होत नाही, याचा अर्थ काय ? - संपादक) साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल अधिक तपास करत आहेत.

पतंजलीच्या केवळ ५ उत्पादनांमध्ये गोमूत्र समाविष्ट !

मौलवीच्या फतव्यावर आचार्य बालकृष्ण यांचे स्पष्टीकरण
     नवी देहली - योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली उत्पादनांच्या विरोधात एका मौलवीने फतवा काढल्यानंतर रामदेवबाबा यांचे साहाय्यक आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, त्यांची ८०० हून अधिक उत्पादने असून यातील केवळ ५ उत्पादनांमध्ये गोमूत्र मिसळले जाते. मौलवीने त्यांच्या फतव्यात पतंजलीच्या उत्पादनांमध्ये गोेमूत्र समाविष्ट असल्याने ही उत्पादने वापरू नयेत, असे मुसलमानांना आवाहन केले होते.

फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोह्यांना रोखू न शकणारे शासन आतंकवाद्यांना कसे रोखणार ?
     जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये धर्मांधांनी जामिया मशीद आणि त्याच्या परिसरात आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचे, तसेच पाकचे झेंडे फडकवले, देशविरोधी घोेषणा दिल्या आणि सैनिकांवर दगडफेक केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Jammu-Kashmirke Shrinagarme dharmandhone faharaye phir ISIS aur Pak ke zende !
     kya is deshdrohapar shasan rok lagayegi ?
जागो !
     जम्मू-कश्मीरके श्रीनगर में धर्मांधोंने फहराए फिर आय.एस्.आय.एस्. और पाक के झेंडे !
     क्या इस देशद्रोह पर शासन रोक लगाएगी ?

कायदा-सुव्यवस्थेला उघड आव्हान देणार्‍या समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांच्या विरोधात तात्काळ आणि कठोर कारवाई करा ! - हिंदु जनजागृती समिती

     जळगाव - रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ वाहतुकीचे नियम मोडून दुचाकीवरून प्रवास करणार्‍या मुसलमान समाजातील तिघा तरुणांवर कारवाई न होण्यासाठी वाहतूक शाखेचे साहाय्यक फौजदार शशिकांत डोले यांना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी यांनी दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात नदवी यांनी मुसलमान तरुणांवर कारवाई कराल, तर बघून घेण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार म्हणजे सरळसरळ कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिल्याचा प्रकार आहे. वाहतूक पोलिसाला धमकी दिल्यावर १० दिवसांनी गुन्हा नोंदवण्यात येतो, हेही आश्‍चर्यकारक आहे. त्यामुळे केवळ मुसलमान समाजाचे आहेत म्हणून समाजबांधवांना पाठीशी घालणार्‍या नदवी यांच्यावर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात केवळ गुन्हा नोंद होणे हे पुरेसे नसून त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. या संदर्भात हिंदुत्ववादी संघटना लवकरच पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार आहेत. या प्रकरणी आम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नसून नदवी यांच्यासारख्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास यातून समाजात अयोग्य कृती करणार्‍यांना पाठीशी घातले जात असल्याचा चुकीचा संदेश जाईल आणि तसा पायंडा पडेल, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा आढावा

१. मुंबई जिल्हा
१ अ. धर्मशिक्षणाचे फ्लेक्स प्रायोजित करणारे आणि धर्मप्रसाराच्या सेवेत सहभागी होणारे श्री. संदेश देवळे ! : श्री. संदेश देवळे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे धारकरी आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत त्यांच्या मंडळाने धर्मशिक्षणाचे फ्लेक्स प्रायोजित केले होते. सनातन संस्थेच्या जनसंवाद सभेच्या वेळी त्यांनी धर्मप्रेमींचे स्वतःहून संपर्क करून दिले. श्री. देवळे हे स्वतः समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रसाराला यायचे आणि संपर्क करून द्यायचे.
१ आ. लव्ह जिहादचे १०० ग्रंथ घेऊन त्यांचे वितरण करणारे श्री. विशाल पटनी ! : श्री. विशाल पटनी हे बजरंग दलाचे फोर्ट विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी धर्मप्रसारासाठी लव्ह जिहादचे १०० ग्रंथ घेतले.

अहो केजरीवाल, जरा विचारपूर्वक कृती करा !

श्री. ज्ञानेश्‍वर गावडे
     माणसाच्या हातात सत्ता आणि खिशात थोडेफार पैसे जमले की, तो वाट्टेेल ते बोलायला लागतो. तशी तुमची अवस्था झाली आहे. ज्या झाडूने तुम्हाला ही सत्ता मिळाली, त्या झाडूचा तरी किमान मान राखा ! देशातील कचरा काढून टाकण्यासाठी लोकांनी तुम्हाला सत्ता दिली; पण तुम्ही बलात्कार्‍याला साहाय्य करून चक्क कचरा विकत घ्यायला निघाला आहात.
    केजरीवाल, तुम्ही देहलीचे मुख्यमंत्री आहात, सुलतान नाही. जरा विचारपूर्वक कृती करा, नाहीतर हाच झाडू तुम्हाला सत्तेवरून स्वच्छ करील. केजरीवाल, तुम्हाला अजून एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे देवाच्या दृष्टीने विचार केला, तर अधर्म करणारा पापी असतो आणि त्याला साहाय्य करणारा हा महापापी असतो. तुम्ही आता तुमच्या पुण्याईमुळे देहलीचे मुख्यमंत्री झाला आहात; परंतु असा अधर्म केलात, तर पुढच्या जन्मी नक्कीच नरकात रहाल.

महिलांची विनाशकाले विपरीतबुद्धिः ।

     शनिशिंगणापूर येथील शनिमंदिराच्या चौथर्‍यावर एका महिलेने प्रवेश करून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रातील अन्य गावांतील महिलाही अशी कृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच बीड गावामध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी शनीच्या मूर्तीवर तेलाने अभिषेक केला. ही कृती केल्यानंतर सर्व महिलांना आनंद झाला. महिलांनी स्वतःला पुरुषांपेक्षा कुठेच न्यून लेखायला नको, असे संदेश जमलेल्या महिलांनी दिला. आता अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी महिलांना प्रवेश निषिद्ध केला आहे, अशा सर्वत्रच्या मंदिरांमध्ये महिला लढून प्रवेश मिळवणार आहेत.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

भारताचा इंडिया झाल्यामुळे झालेली दुःस्थिती !

१. कृषीप्रधान भारत देश दिवसागणिक खंगत जाणे
     इंडियाची प्रगती होत असतांना भारत मात्र दिवसागणिक खंगत चालला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर इंडिया हा शहरालगतच्या झोपडपट्ट्यांत गुदमरणारा भाग आहे. एखाद्या भूभागाला जेव्हा आपण मातृभूमी, स्वदेश म्हणतो, तेव्हा तो भाग स्वच्छ, सुशोभित आणि आकर्षक करण्याचा प्रयत्न आपण करतो. 
२. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांंचे स्वागत करणार्‍या 
पाट्यांवरील अक्षरे भंग होऊन लोंबकळत असलेली दिसणे
     राष्ट्रीय महामार्गावरून जातांना अमुक ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे, यासारख्या पाट्या दिसतात; पण बहुतेक कमानींची रया पूर्ण गेलेली असते. पाट्यांवरची कधी काळी रंगवलेली किंवा लोखंडी तुकड्यांनी वेल्डिंग केलेली अक्षरे भंग होऊन लोंबकळत असतात. गावात नीट मार्ग नसतात. घराच्या प्रवेशद्वारालगतच कमरेइतका खोल खड्डा खणून त्यात नगरपालिका पाण्याच्या नळाची तोटी ठेवलेली असते आणि सकाळी पुरुष, बायका, मुले यांची धावाधाव चालू असते.

समाजात असहिष्णुता पराकोटीला पोहोचण्यामागील कारणे आणि त्यांवरील उपाययोजना

१. नैतिक शिक्षणाचा अभाव असणे 
     (अ)विद्यावंतांची संख्या अधिक होत आहे, तसा द्वेष, मत्सर आणि असहिष्णुता बृहत् आकारात वाढत आहेत. याला आपल्या शिक्षणव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. सध्या केवळ व्यवहारापुरते अक्षरज्ञान असलेला ढोबळ विद्याभ्यास शिकवला जात आहे. त्यामुळे (अ)विद्यावंतांमध्ये नैतिक शिक्षणाचा अभाव आढळतो.
२. नियतकालिके, दूरदर्शन आणि चित्रपट निर्माते यांनी समाजाचे स्वास्थ्य बिघडवणे
     अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर एका वर्गातील लोकांचे समज आणि आचार-विचार यांची पार्श्‍वभूमी समजून न घेता हीनपणे टीका केली जात आहे. ही अयोग्य वागण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. आज असंख्य नियतकालिके, दूरदर्शन आणि चित्रपट निर्माते हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यकार अन् तथाकथित विचारवंत यांचे विचार समाजात पसरवत आहेत. अशा प्रकारे ते सर्वत्र सातत्याने द्वेष पसरवून समाजाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत.

इतिहासाची काळी पाने !

अफगाणिस्थानातील संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झालेल्या 
त्या भागाला हिंदुकुश म्हणून ओळखणे
     सनातन हिंदु धर्मावरची अमित श्रद्धा, जन्म-मृत्यूचा तो संघर्ष होता. संपूर्ण नगरेच्या नगरे जाळली आणि सर्व लोकसंख्या भस्मसात केली, आक्रमणामागून आक्रमणे झाली, कोट्यवधी बळी पडले आणि तितकेच गुलाम केले गेले. नवेनवे आक्रमक हिंदूंच्या कवट्यांचे पर्वत करत. अफगाणिस्थानात इ.स. १००० मध्ये संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झाली. अजूनही त्या भागाला हिंदुकुश म्हणतात. हत्या झालेल्या हिंदूंच्या कवट्यांचा पर्वत, म्हणजे हिंदुकुश ! मध्य भारतातल्या बहामणी सुलतानाने तर संकल्पच केला होता. प्रतिवर्षी किमान १ लक्ष हिंदूंचे मुडदे पाडण्याचा संकल्प !
     वर्ष १३९९ मध्ये तैमुरने एकाच दिवसात १ लक्ष हिंदूंची कत्तल केली. अन्य प्रसंगी यापेक्षाही अधिक हिंदूंना मारले.
(संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१५)

समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवणारे समर्थ धर्मशास्त्र !

     १८ व्या शतकात ब्रिटिशांनी धर्मसंस्थेवरच आघात केला. प्रस्थापित समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्याकरता सर्वस्वाची बाजी लावली. ब्रिटिशांनी कुटीलतेने आपला कार्यभाग उरकला. समग्र समाजाचे नियमन करणारा धर्म, त्या स्मृती, आता केवळ धार्मिक विधी-विधाने आणि संस्कार यांचा शास्त्रार्थ देण्याइतके मर्यादित झाले. मृतप्राय अवस्थेतले हे धर्मशास्त्र आम्हाला ठाऊक आहे. सहस्रशः वर्षांपासून राजसत्ता पाठीशी असतांना वा नसतांनाही समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवण्यात धर्मशास्त्र केवढे समर्थ ठरले !
      आपल्या पूर्ववैभवानिशी नांदणारा तो स्वयंमेव मृगेंद्र घनदाट अरण्यातच आढळेल. तो का सर्कशीच्या पिंजर्‍यात आढळेल? आज तुम्ही पहात आहात तो सर्कशीच्या पिंजर्‍यातला सिंह !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

देवाला प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्यामुळे कठीण सेवाही सहज पूर्ण होणे

श्री. अनित पिंपळे
      प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला हिंदु दूरचित्रवाहिनीच्या पूर्वसिद्धतेसाठी काही तांत्रिक भागांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना हे क्षेत्र पुष्कळ विस्तृत आहे आणि सेवा करण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, असे लक्षात आले. या सेवेसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि अनुभव मला अन् सहसाधकालाही नव्हते. देवाने ही सेवा दिली आहे, तर देवच सेवा करवून घेईल. आपण केवळ प्रयत्न करूया, असा विचार मनात आला आणि देवाला प्रार्थना करून आम्ही सेवेला आरंभ केला. सेवा करतांना काही शोधायचे असल्यास आवश्यक तीच माहिती आपोआप समोर यायची. कठीण तांत्रिक प्रक्रिया सहजपणे पूर्ण झाली. नंतर अरे, ही सेवा किती अवघड वाटत होती अन् ती कशी पूर्ण झाली, याचे मलाच आश्‍चर्य वाटले. देवा, माझी क्षमता नसतांना तुझ्या या अज्ञानी बालकाकडून तूच सेवा करवून घेतलीस. ही अनुभूती दिल्याविषयी प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! 
- श्री. अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (९.८.२०१५)
     (श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने देण्यात आलेल्या अनुभूतीसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे त्या सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच त्या येतील, असे नाही. - संपादक)

आश्रमात आल्यावर साधकांनी दिलेले प्रेम आणि प.पू. गुरुदेवांनी साधकांच्या माध्यमातून घेतलेली काळजी यांसाठी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या श्रीमती संध्या तबाजी बधाले !

श्रीमती संध्या तबाजी बधाले
१. आश्रमात सर्व साधकांनी दिलेले प्रेम पाहून 
प.पू. गुरुदेवांनी सर्व नात्यांचे प्रेम दिले आहे, असे वाटणे
     आश्रमात आल्यावर सर्व साधक स्वतःहून सोनालीची आई; म्हणून ओळख करून घेत होते. त्यांच्यामधील प्रेमभाव आणि आदर हे गुण शिकायला मिळाले. वयोवृद्ध साधकही पुष्कळ प्रेमाने बोलत होते. तेव्हा मला आश्रमात प.पू. गुरुदेवांनी सर्व नात्यांचे प्रेम दिले आहे, असे वाटले.
२. आश्रमाच्या नियोजनानुसार स्वतःच्या सवयींमध्ये 
सहजतेने पालट करणे जमणे आणि त्या पालटातूनही आनंद वाटणे
    आश्रमात आल्यावर परिस्थितीनुसार देव कशी काळजी घेतो, हे मला अनुभवायला मिळाले. मला रात्री लवकर झोपण्याची सवय होती; पण आश्रमात रात्री १२ नंतर झोपते आणि सकाळी लवकर उठते. हेही मला सहज जमू लागले. त्या वेळी मला लवकर उठून आवरून सेवेला जाण्याचा आनंद वाटत आहे.

अशक्य वाटणार्‍या गोष्टी साधनेमुळे शक्य झाल्याच्या आलेल्या अनुभूती

श्री. अद्रियन डूर
     साधनेला आरंभ केला, तेव्हा बहुतेक वेळा मला वाटायचे की, मी साधना करू शकणार नाही; मात्र कालांतराने मी ती करू शकत होतो. याची दोन उदाहरण पुढे देत आहे.
१. उपायांचे घंटे वाढवायला सांगितल्यावर ते अशक्य वाटणे; मात्र नंतर अधिक घंट्यांपर्यंत सहजतेने उपाय करता येणे : मी नियमित करत असलेले आध्यात्मिक उपाय ३ घंट्यांपर्यंत वाढवायला सांगितले. तेव्हा वाटले, मला सध्या २ घंटे उपाय करणेही कठीण वाटत आहे, तर मी ३ घंटे उपाय कसे करू ? त्यानंतर मात्र मी विनाअडथळा आणि सहजपणे ४ घंटे उपायांसाठी बसू शकत होतो.

प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाल्यावर भावजागृती होणे

      अचानक एका रात्री ११.३० च्या सुमारास मी नामस्मरण करत बसले असतांना मला एक तेजस्वी उभा प्रकाश दिसला. मी त्याकडे दुर्लक्ष करून माझे लक्ष नामस्मरणावर केंद्रित केले; परंतु हा प्रकाश आपल्याला काहीतरी सांगत आहे, असे वाटले; म्हणून मी नीट लक्ष देऊन पाहिले, तर तेजस्वी प्रकाशात प.पू. गुरुदेव उभे असल्याचे दिसले. बरेच मास मला त्यांचे असे दर्शन झाले नव्हते; म्हणून मी त्यांना म्हणाले, आज तुम्ही इथे कसे आलात ? त्यावर ते हसून म्हणाले, कसे चालले आहे, ते पहायला आलो. हे ऐकून तुमचीच कृपा आहे हो, असे म्हणून मी वेगळ्याच जगतात निघून गेले. 
- सौ. भारती बागवे, अमेरिका (२२.३.२०१४)
     (श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने देण्यात आलेल्या अनुभूतीसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे त्या सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच त्या येतील, असे नाही. - संपादक)

एस.एस.आर.एफ.च्या विदेशातील साधिकेला प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र आणि ग्रंथ-विभागातील श्रीकृष्णाचे चित्र यांविषयी आलेल्या अनुभूती

कु. मेरी कियॉन
१. प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र
१ अ. प.पू. भक्तराज महाराजांचे डोळे प्रत्येक हालचाल टिपत असून त्यांतून शांतीची स्पंदने प्रक्षेपित होतांना जाणवणे, तसेच प.पू. भक्तराज महाराज स्मित करत असून त्यांचा तोंडवळा तेजस्वी झाल्याचे जाणवणे : कार्यशाळेच्या शेवटी प.पू. भक्तराज महाराजांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहातांना सर्वांचाच भाव दाटून आला. छायाचित्राच्या दिशेने चालत गेल्यावर त्यांच्या डोळ्यांतून शांतीची स्पंदने प्रक्षेपित होतांना जाणवली, तसेच भोवती अनेक साधक होते आणि तेही हाच सूक्ष्मातील प्रयोग करत असतांनाही त्यांचे डोळे माझी प्रत्येक हालचाल टिपत असल्याचे जाणवले. प.पू. बाबा स्मित करत असून त्यांचा तोंडवळा तेजस्वी झाल्याचे जाणवले. या अनुभूतीतून मला काय शिकायचे आहे ? हे चित्र मला इतके जिवंत का वाटते ?, असे मी प.पू. बाबांना विचारले.

विंडोज फोनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सूचना

सेवेसाठी इतरांनी पाठवलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ डाऊनलोड न करता
 थेट फॉरवर्ड करण्याच्या सुविधेचा वापर करून वेळ अन् धन यांचा अपव्यय टाळा !
     व्हॉट्सअ‍ॅप हे संदेशवहनाचे, तसेच छायाचित्रे, व्हिडिओ आदींची देवाण-घेवाण करण्याचे सोपे माध्यम आहे. अनेक जण अँड्रॉईड स्मार्टफोनच्या, तर काही जण विंडोज फोनच्या द्वारे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. बरेच साधक, तसेच कार्यकर्ते व्हॉट्सअ‍ॅपच्या जागो हिंदु भारत या राष्ट्रीय स्तरावरील गटामध्ये (ग्रुपमध्ये) जोडलेले असून त्यांच्याकडे जिज्ञासू, हितचिंतक, धर्मप्रेमी यांना नियमितपणे छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवण्याची सेवा असते.

सौ. क्रिस्टन हार्डि यांना त्यांचे यजमान श्री. अ‍ॅलन हार्डि यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

      माझे यजमान श्री. अ‍ॅलन हार्डि यांनी अगदी अल्प कालावधीत एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेनिमित्त आश्रमात येणार होते, त्या वेळी तुझ्यासमवेत मीही आश्रमात येऊ शकतो का ?, असे त्यांनी विचारले. आश्रमात येण्यापूर्वी कार्यशाळेला येण्यासाठी मी पात्र आहे का ?, अशी त्यांना स्वतःबद्दल शंका होती; परंतु आश्रमात आल्यानंतर त्या १० दिवसांत मला त्यांच्यात बरेच गुण असल्याचे लक्षात आले. ते पुढे देत आहे. 

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

     अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. क्रिस्टन हार्डि यांना कार्यशाळेच्या वेळी जाणवलेली सूत्रे

   २९ डिसेेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
सौ. क्रिस्टन हार्डि
१. कार्यशाळेसाठी स्वच्छता करतांना पडद्यामागे स्वच्छता करण्याचा विचार श्रीकृष्णाने देणे, त्या वेळी दोषांवर घातलेल्या पडद्यामुळे साधकांची साधनेची हानी होऊ नये, यासाठी प.पू. गुरुदेवांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास सांगितली, याची जाणीव होणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : ऑगस्ट २०१५ मध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आदल्या दिवशी रात्री सभागृहाची स्वच्छता करतांना खिडक्याही स्वच्छ करायला हव्यात, असे श्रीकृष्णाने सुचवले. खिडक्या जरी पडद्यांनी झाकलेल्या असल्या, तरी त्यावर धूळ साचू शकत असल्याने आपण त्या स्वच्छ करायला हव्यात, असे वाटले. पहिला पडदा वर केल्यावर खिडकीच्या खाचेत (पट्टीत) दोर्‍यांची गुंडाळी, स्टेपलरच्या पिना आणि धूळ असा कचरा होता.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


   तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खुष करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्‍वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१२.२०१५)
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     साधकांनी मी, माझे, माझ्यासाठी हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फुटकळ बंधने काय कामाची ?

संपादकीय 
     पाश्‍चात्त्य नवीन वर्षाचे स्वागत हिंदु परंपरांना तिलांजली दिलेल्या भारतियांनी मोठ्या उत्साहात केले. मुंबईत प्रत्यक्ष पोलीस आयुक्तांसह ३५ सहस्र पोलिसांचा ताफा कोणी मद्य पिऊन गाड्या चालवत आहेत आणि कोण नाही, हे पडताळण्यात गुंतला होता. (अशा वेळी मोठे आतंकवादी आक्रमण झाले असते, तर काय झाले असते, हे ईश्‍वरालाच ठाऊक !) देशभरातील मोठ्या शहरांत यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. या सहस्रो पोलिसांनी रात्रभर जागरण करून नाकाबंदी केली. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी थोडेथोडके नव्हे, तर अडीच लाखांच्या कोकेनसह चार नायजेरियाच्या नागरिकांना अटक केली. ३१ डिसेंबरच्या काही दिवस आधीपासून मद्य पिऊन गाडी चालवू नका, तसेच संयम बाळगून ३१ डिसेंबर साजरा करा अशा प्रकारचे संदेश प्रसिद्धीमाध्यमांतून देण्यात येत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn