Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केजरीवाल यांच्या निषेधार्थ २०० अधिकारी सामूहिक रजेवर

भारतीय लोकराज्याचा पोरखेळ !
केजरीवाल शासन आणि केंद्रशासन यांच्यातील संघर्ष
केजरीवाल यांच्याकडून २ वरिष्ठ अधिकार्‍यांचे निलंबन
केंद्रशासनाकडून निलंबन रहित
     नवी देहली - देहली प्रशासकीय सेवेतील २ वरिष्ठ अधिकार्‍यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निलंबित केल्याच्या निषेधार्थ देहली शासनाचे २०० अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.

भारत-पाक यांच्यातील चर्चेतून अवास्तव अपेक्षा बाळगू नका !

असे कोणी भारतीय नेता का म्हणत नाहीत ? चर्चेतून काही निष्पन्न होत नसेल,
 तर चर्चेचे गुर्‍हाळ चालवून जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करणे कितपत योग्य ?
पाकिस्तानच्या सरताज अझिज यांचे प्रतिपादन
     इस्लामाबाद - भारत-पाक यांच्यात होणार्‍या परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठकीकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नका, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे सल्लागार सरताज अझिज यांनी म्हटले आहे. २५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी चकमकीत ठार

गेल्या काही दशकांपासून एका राज्यातील आतंकवाद संपवू न शकलेले राज्यकर्ते 
देशाच्या अन्य भागांतील आतंकवाद कधी संपवणार ?
एक आतंकवादी पाकिस्तानातून आल्याचा संशय
    श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैनिकांनी २ आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारले. हे आतंकवादी लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे आहेत. यातील एकाचे नाव मंजूर अहमद असून दुसर्‍याची ओळख अद्याप पटलेली नाही. तो पाकिस्तानातून आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. 

प्रयागराज येथील गंगेचे पाणी प्रदूषणामुळे स्नानासही अयोग्य !

भाविकांचे जीवन धोक्यात
     प्रयागराज - माघमेळा जवळ येत आहे. या निमित्ताने गंगा नदीच्या पात्रात कोट्यवधी भाविक स्नान करतात; मात्र नदीचे पाणी स्नान करण्यासही अयोेेग्य असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात कोलकाता येथील हिंदू एक्झिस्टन्स्चे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी केंद्रीय जलमंत्री साध्वी उमा भारती यांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.
१. १४ एप्रिलपासून येथे माघमेळा चालू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रयागराज येथील गंगेच्या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. तेव्हा प्रदूषणामुळे हे पाणी स्नानासही अयोग्य असल्याचे आढळून आले आहे.

राजस्थानच्या सनदी अधिकार्‍याकडून इस्लामचा स्वीकार !

केवळ पदोन्नतीसाठी स्वधर्माचा त्याग करणे, हे हिंदूंना 
धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे दर्शवते !
स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्यानुसार जेव्हा एका हिंदूचे धर्मांतर
 होते, तेव्हा शत्रूच्या संख्येत एकाने वाढ होते, हे लक्षात घ्या !
     जयपूर - राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सालोदिया हे जयपूर येथील निवासी असून त्यांनी स्वत:वर भेदभाव झाल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना आजपासून भारतीय नागरिकत्व मिळणार !

पाक आणि बांगलादेश येथील अत्याचारग्रस्त अल्पसंख्य हिंदू भारतात 
येऊन भारतीय नागरिकत्व देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडत असतांना
 त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे शासन शत्रूराष्ट्राच्या एका गायकाला मात्र 
भारताचे नागरिकत्व देते, हे लक्षात घ्या ! हा जनताद्रोहच नव्हे का ?
     नवी देहली - केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना १ जानेवारी २०१६ पासून भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासनाने ऑगस्टमध्ये सामी यांना अनिश्‍चित कालावधीपर्यंत भारतात रहाण्याची अनुमती दिली होती.

मलेशियात १० सहस्र वर्गफूटाहून अधिक क्षेत्रफळात मुसलमानेतरांना प्रार्थनास्थळ उभारण्यास बंदी !

मुसलमानबहुल राष्ट्रांमध्ये अल्पसंख्यांकांचे नाही, तर बहुसंख्यांकांचे कायदे चालतात, हे लक्षात घ्या !
हिंदु मंदिराच्या स्थानांतरास मलेशिया शासनाचा नकार !
     नवी देहली - मलेशियातील सेलनगोर राज्यातील काजंग येथील श्री महा मरियम्मा लादांग बामर मंदिराचे स्थानांतर करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून हिंदूंकडून करण्यात येत आहे; परंतु अलीकडेच शासनाच्या निर्णयाप्रमाणे या मंदिराला आवश्यक भूमी हस्तांतरण करण्यास शासनाने नकार दिला आहे. 
   मलेशियाच्या कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदीप्रमाणे १० सहस्र वर्गफूटाहून अधिक क्षेत्रफळात मुसलमानेतर प्रार्थनास्थळ उभारता येत नाही आणि श्री महा मरियम्मा लादांग बामर मंदिराच्या आवश्यक भूखंडाचे क्षेत्रफळ १० सहस्र वर्गफूटाहून अधिक आहे, हिच मोठी अडचण ठरली आहे. त्यामुळे हिंदू एक्झिस्टन्स्चे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी यांनी प्रशासकीय अनास्थेमुळे हिंदूंना त्यांच्या धार्मिक अधिकारांना वंचीत ठेवता येत नाही, असे सांगत मलेशियाच्या अधिकार्‍यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील हिंदुत्ववादी नेते राजन झेद यांनीही मलेशियाचे पंतप्रधान नजिब रज्जाक आणि सेलनगोर राज्याचे मुख्यमंत्री इत्यादी नेत्यांना या प्रकरणात पुन्हा लक्ष घालण्याचा आग्रह केला आहे. 

देशातील ७५ सहस्र भिकारी १२ वी हून अधिक शैक्षणिक अर्हताप्राप्त

असे केवळ भारतातच होते !
पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ३ सहस्र भिकारी
     कर्णावती (अहमदाबाद) - देशात भिकार्‍यांची संख्या ३.२ लक्ष आहे. त्यातील २१ टक्के म्हणजे ७५ सहस्र भिकारी १२वी आणि त्या पुढील शैक्षणिक अर्हताप्राप्त आहेत, असे जनगणनेत केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. त्यातील ३ सहस्र तर पदविका आणि पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. या भिकार्‍यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत; कारण नवीन नोकरीत अथवा व्यवसायात त्यांना मिळणारे उत्पन्न हे भिक्षेच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा फारच न्यून आहे, असे भिकार्‍यांचे म्हणणे आहे.
     दिनेश खोदाभाई हा भिकारी म्हणाला, मी जरी भिकारी असलो, तरी प्रामाणिक आहे. मला नोकरी होती, तेव्हा प्रतिदिनी १०० रुपये वेतन मिळत होते; मात्र आता भीक मागून मला २०० रुपये मिळतात.

जामिया मिलीया इस्लामियाच्या दीक्षांत समारोहात पंतप्रधान मोदी अनुपस्थित रहाणार

विद्यार्थी आणि शिक्षक यांचा होता मोदी यांना विरोध !
     नवी देहली - येथील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापिठाच्या दीक्षांत समारोहात उपस्थित रहाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दर्शवला आहे. त्यामुळे १९ जानेवारी या दिवशी होणार्‍या या कार्यक्रमात ते अनुपस्थित रहाणार आहेत, असे विद्यापिठाने कळवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी पूर्वी होकार दिला होता. त्यानंतर विद्यापिठातील विद्यार्थी तसेच काही शिक्षक यांनी मोदी यांना विरोध केला होता.

हिंदुत्वापुढे आमच्यासाठी सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत !

अशा हिंदुत्ववादी नेत्यांकडून हिंदूंना आशा आहे. गिरिराज सिंह यांनी हिंदूंच्या 
समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांचे विधान !
     मुंबई - हिंदुत्व आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. आम्ही प्रथम या देशाचे नागरिक आहोत आणि म्हणूनच आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही बोलतो, असे स्पष्ट मत बिहारचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलतांना केले. या वेळी सिंह म्हणाले,
१. काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेवरून वातावरण तापवण्यात आले होते; परंतु ज्यांनी वातावरण तापवले ते आपला देशच खरा सहिष्णुतावादी आहे, हे विसरले. अन्यथा याकूब मेमनच्या फाशीच्या आवेदनावर विचार करण्यासाठी मध्यरात्री न्यायालयाचे दारे उघडली नसती, तसेच एका आतंकवाद्याला फाशी दिल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत मुंबईत प्रचंड गर्दी झाली नसती.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक
 करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३५ वा दिवस !
३०.१२.२०१५
     रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी आश्रमासमोरील रस्त्यावरून दोघे जण ओय सनातन, असे ओरडत गेले.

पुरो(अधो)गाम्यांचा हिंदुद्वेष आणि पोकळ मानवतावाद जाणा !

     गेल्या काही वर्षांत हिंदूंचे गणेशोत्सव, दिवाळी, होळी आदी सण उत्सवांचा काळ आला की, पुरो(अधो)गाम्यांना आत्महत्या करणारे शेतकरी, दुष्काळी भागात रहाणारे नागरिक, अर्धपोटी रहाणारी जनता यांच्याविषयी कळवळा निर्माण होतो. ते हिंदूंना सण-उत्सव साजरे करण्यात पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा तो पैसा या लोकांना दान म्हणून देण्याचा उपदेशही देतात.

लोकसंख्येचा विस्फोट करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी कायदा करून त्यांच्यावर निर्बंध घाला ! - गिरीराज सिंह, लघुउद्योग राज्यमंत्री

असा कायदा होण्यासाठी आता मंत्रीमहोदयांनीच पुढाकार
 घेऊन प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     मुंबई - हिंदुस्थानात ज्यांना अल्पसंख्यांक म्हणून गणले जाते, त्याच अल्पसंख्यांकांमुळे लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थान अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसायचे असेल, तर सर्वांत आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा आणि जर कुणी हा कायदा मोडला, तर त्याचा मतदानाचा हक्कच काढून घ्यायला हवा. त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादायला हवेत, असे ठाम मत लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी नुकतेच पत्रकारांशी अनौपचारिक केलेल्या चर्चेत व्यक्त केले.

सनातनच्या शिष्टमंडळाकडून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट !

डावीकडून श्री. अनंत गीते, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे 
(सनातन पंचांग भेट देतांना), श्री. चेतन राजहंस 
आणि श्री. रमेश शिंदे
     नवी देहली, ३१ डिसेंबर (वार्ता.) येथील उद्योग भवन येथे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते श्री. अनंत गीते यांची २९ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाकडून सनातन संस्थेला शिवसेनेने कठीण काळात दिलेल्या खंबीर पाठिंब्याविषयी आभार व्यक्त करण्यात आले. या शिष्टमंडळात सनातनचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचा समावेश होता. या वेळी श्री. अनंत गीते यांना गोवा दौर्‍यात सनातनच्या आश्रमात येण्याविषयी निमंत्रण देण्यात आले. पू. डॉ. पिंगळे यांनी श्री. गीते यांना सनातन पंचांग भेट दिले.

जम्मू-काश्मीरमधील शासकीय इमारतींवर राज्याचा ध्वज लावा !

शासकीय इमारतींवर ध्वज लावण्यासाठीही न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, 
तर शासन हवे कशाला ? न्यायालयाकडेच कारभार का देत नाही ?
उच्च न्यायालयाचा राज्यशासनाला निर्देश
     श्रीनगर - कायद्याने दिलेला आदेश आणि त्यातील भावना यांना अनुसरून राज्यातील शासकीय इमारती आणि शासकीय अधिकार्‍यांची वाहने यांवर राज्याचा ध्वज लावावा, असे निर्देश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.
    जम्मू-काश्मीर शासनाने १२ मार्च २०१५ या दिवशी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय अधिकार्‍यांना शासकीय इमारती आणि वाहने यांवर राज्याचा ध्वज लावण्याचा आदेश दिला होता; परंतु दुसर्‍याच दिवशी शासनाने दुसरे परिपत्रक काढून वरील आदेश रहित केला होता. त्यानंतर शासनाचे हे पत्रक न्या. हसनैन मसुदी यांनी रद्दबातल ठरवले आणि १२ मार्च २०१५ चे परिपत्रक पुनर्स्थापित केले. आधीचे परिपत्रक मागे घेण्यासंदर्भात शासनाने कुठलेच कारण दुसर्‍या परिपत्रकात दिलेले नाही, असे न्यायालयाने नमूद केले. राज्याच्या प्रतिष्ठेचा अवमान प्रतिबंधक कायदा १९७९ मध्ये नमूद केलेली भावना आणि अधिकार याला अनुसरून राज्याचा ध्वज फडकवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला समज देऊन पाकमध्ये परत पाठवले !

भारतीय सैन्याचा राष्ट्रघातकी निर्णय !
     कटक - अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील चकन-द-बाग येथून रेहमानला पाकमध्ये पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले आहे, असे संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिकार्‍याने सांगितले. (आतंकवाद्याशी मानवतेच्या दृष्टीकोनातून वागणार्‍या भारतीय सैन्यदलाने आतंकवाद्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून व्यवहार केल्याचे कधी अनुभवले आहे का ? - संपादक) ३७ वर्षीय रेहमान कटक शहराच्या बाहेर एक मदरशा चालवत होता. रेहमान याला अटक झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी त्याची बेकायदा मदरशा बंद करण्यात आली. रेहमानच्या नावावर तीन बँक खाती होती. या बँक खात्यांमध्ये विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा व्हायचा आणि रेहमान थोडे थोडे करून हे पैसे काढून घ्यायचा. रेहमान हा अल्-कायदासाठी भरती प्रक्रिया राबवायचा, अशी माहिती उत्तरप्रदेशमध्ये अटक करण्यात आलेल्या महंमद आसिफ या आतंकवाद्याने दिली.

ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने भारताच्या नकाशातून काश्मीर वगळले !

     न्यूयॉर्क - ट्रान्फरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने तिच्या संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. याप्रकरणी फोरम फॉर हिंदु अवेकनिंग कडून ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलचा निषेध करण्यात आला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असतांना भारताचा विद्रुप नकाशा प्रसारित करून ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने राष्ट्रप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलचा वैध मार्गाने निषेध करणे, हे सर्व राष्ट्रप्रेमी भारतियांचे कर्तव्य ठरते, असे फोरम फॉर हिंदु अवेकनिंगने म्हटले आहे.फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगने ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून भारतीय नकाशाच्या विद्रुपीकरणाविषयी खंत व्यक्त केली होती; मात्र त्यांनी या पत्राला कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.

जिहादी आतंकवादी संघटनांकडे कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध

आतंकवाद्यांसह या आतंकवाद्यांना पोसणारेही तेवढेच दोषी आहेत !
     न्यूयॉर्क - अमेरिकेतील फोर्ब्स नियतकालिक जगातील श्रीमंत व्यक्ती आणि आस्थापना यांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून वेळोवेळी अहवाल प्रकाशित करते. या नियतकालिकाच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक श्रीमंत असणारी जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्. आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ३ बिलियन डॉलर (२० सहस्र कोटी) एवढे आहे. हे पैसे व्यापारी आणि औद्योगिक आस्थापनांकडून गोळा केलेली खंडणी, आणि पेट्रोलियम पदार्थांची अवैध विक्री याद्वारे जमा केली जाते. संपूर्ण जगात इस्लामी राज्य (खिलाफत) स्थापन करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. या शिवाय इतर आतंकवादी संघटनांच्या उत्पन्नाचा तपशील पुढे दिला आहे. 

(म्हणे) अखंड भारत होण्याची शक्यता नाही ! - तारिक अन्वर, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

अखंड मुगलीस्तान आणि अखंड खुरासान होऊ शकतो, तर अखंड भारत का होऊ शकत नाही ?
असे लोकप्रतिनिधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप यावरून लक्षात येते !
     नागपूर - पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन स्वतंत्र देशांचे वास्तव स्वीकारावेच लागणार आहे. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार तारिक अन्वर यांनी व्यक्त केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात भाजपचे नेते राम माधव यांनी व्यक्त केलेल्या मताविषयी ते बोलत होते. राम माधव यांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत होऊ शकतो, असे विधान केले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिळक यांचा अवमान करणारे गाणे यू-ट्यूबवरून प्रसृत

देशप्रेमी नागरिकांनो, राष्ट्रपुरुषांचा अवमान कधीपर्यंत सहन करणार ?
     मुंबई - गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात गायलेल्या एका गाण्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, तसेच आगरकर आणि गांधी यांचा अवमान केला आहे. गांधी, सावरकर, ते टिळक, आगरकर, आले गेले किती शंभर, सुटाबुटात शोभून दिसतोय, भीमराव सार्‍यांत ऐक नंबर... असे या गाण्याचे आरंभीचे बोल आहेत.

बंगालमध्ये स्फोटात दोघे घायाळ

आतंकवादग्रस्त भारत !
     हुगळी - गुप्तीपारा येथील बाजारात ३१ डिसेंबर या दिवशी झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात दोघे जण घायाळ झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट एका दुकानाबाहेर झाला. अज्ञातांनी बॉम्ब एका कॅनमध्ये ठेवला होता. दुकानदार तापस राजबंक्षी आणि निताई दास हे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर हा स्फोट झाला. या स्फोटात हे दोघेही घायाळ झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोतेवार यांना प्रकृती बिघडल्यामुळे सोलापूरच्या रुग्णालयात दाखल

'समृद्ध जीवन' घोटाळा प्रकरण 
अटक केल्यानंतर राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार्‍यांनाही हमखास होणारा आजार ! 

     धाराशिव, ३१ डिसेंबर - चिटफंड आणि गुंतवणूकदार यांना फसवल्याच्या प्रकरणी 'समृद्ध जीवन'चे संचालक महेश मोतेवार हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. ३० डिसेंबर या दिवशी जुना आजार बळवल्याचे कारण दिल्याने त्यांना धाराशिवच्या (उस्मानाबाद) जिल्हा रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर मोतेवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी प्रविष्ट करण्यात आले आहे. 

कारागृहातील विविध विभागांत काम करतांना कार्यपद्धती घालून सुव्यवस्था निर्माण करणारे सनातनचे साधक !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

दुष्काळ निवारणासाठी केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला ३ सहस्र १०० कोटींचे साहाय्य

महाराष्ट्राला मिळालेले साहाय्य विलंबाने आणि तुटपुंजे - विरोधकांची टीका
     नवी देहली - केंद्रशासनाकडून महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ३ सहस्र १०० कोटींचे आर्थिक साहाय्य घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्राला देण्यात आलेल्या या साहाय्याच्या जोडीला मध्यप्रदेशला दुष्काळी भागातील उपाययोजनांसाठी २ सहस्र ३३ कोटींचे साहाय्य घोषित करण्यात आले. देशातील नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाला सामोरे जाणार्‍या राज्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली.

पोलीस निरीक्षकाच्या वेतनवाढीला स्थगिती

असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंक आहेत. त्यांना पोलीस प्रशासनातून बाजूला करणे अपेक्षित आहे !
कामशेत येथे पोलीस निरीक्षकांनी महिलेशी अश्‍लील भाषेत वाद घालण्याचे प्रकरण
     पुणे - कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल्.जी. पांडुळे यांनी ८ ऑगस्ट २०१५ या दिवशी एका महिलेशी अश्‍लील भाषेत वाद घातला होता. त्या प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी पांडुळे यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे वर्मा यांनी त्यांच्या १ वर्षाच्या वेतनवाढीला स्थगिती दिली आहे.

जळगाव येथे ३१ डिसेंबरला होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात आंदोलन

आंदोलनात घोषणा देतांना हिंदुत्ववादी
     जळगाव - येथे ३१ डिसेंबर या दिवशी होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात टॉवर चौक येथे आंदोलन करण्यात आले. येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीत हिंदुत्ववाद्यांनी ३१ डिसेंबरवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वांनी 'बंद करा, बंद करा, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण बंद करा !' अशा घोषणा देत हिंदूंचे प्रबोधनही करण्यात आले. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तर काहींनी 'आम्ही गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरे करू', असे सांगितले. 

श्री क्षेत्र जेजुरी येथील चोरीप्रकरणी ६ पुजार्‍यांविरुद्ध विश्‍वस्तांची पोलिसांकडे तक्रार

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे दर्शवणारी घटना ! 
     पुणे, ३१ डिसेंबर - श्री क्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात भाविकांनी दान केलेली रक्कम आणि मौल्यवान वस्तू ६ पुजार्‍यांनी चोरल्याच्या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. (हा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे ! - संपादक) याविषयीची माहिती श्री मार्तंडदेव संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अधिवक्ता दशरथ घोरपडे यांनी धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांना दिलेल्या खुलाशात दिली आहे. 

उघडपणे होत असलेली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री रोखू न शकणारे पोलीस छुप्या आतंकवाद्यांना काय पकडणार ?

     गोवा राज्यात गणेशचतुर्थीच्या काळात पर्यावरणाला हानीकारक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी असूनही मूर्तींची विक्री केली गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कुडचडे आणि सावर्डे परिसरात गणेशमूर्ती विसर्जन तळ्यात विसर्जन केलेल्या आणि न विरघळलेल्या गणेशमूर्ती दृष्टीस पडत आहेत.

वरातीमागून घोडे, या तर्‍हेेचे शासन ! त्याऐवजी पुढे काय होणार ?, हे आधीच ओळखून कृती करणारे शासन हवे !

     देशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेनंतर अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयक २२ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत संमत करण्यात आले. त्यामुळे बालगुन्हेगाराचे वय यापुढे १८ ऐवजी १६ वर्षे असेल.

मोदी शासनाला घोटाळे उघडकीस का आणता येत नाहीत ?

     नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयात खेचणारे भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम् स्वामी लवकरच काँग्रेसचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमाता ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड इत्यादी विविध ब्रिगेडवाले आतंकवाद्यांशी का लढत नाहीत ? हिंदूंनाच का छळतात ?

     शनिशिंगणापुरातील श्रीशनि मंदिराच्या चौथर्‍यावर चढून धर्मशास्त्राचा भंग करण्याची प्रथा बनते कि काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. २० डिसेंबर २०१५ या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या चार महिला या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवून बाहेर काढले; मात्र या महिलांनी या सुरक्षारक्षकांच्या विरोधातच तक्रार केली आहे.

कायद्यांचे पालन नाही केले, तरी चालेल, अशा वृत्तीचे सरकार कायदे कशाला करतील ?

     गोव्याच्या आगामी अधिवेशनात अनधिकृत घरे अधिकृत करण्यासंबंधीचे विधेयक आणि शासकीय कार्यालयातून लोकांना निर्धारीत वेळेत सेवा मिळण्यासंबंधीचे विधेयक आणले जाणार आहेत. - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा

३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर येथे गड संरक्षण मोहीम !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांचा स्तुत्य उपक्रम 
     कोल्हापूर - १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री अपप्रकार घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले गड, किल्ले यांवर अनेक हिंदू नववर्ष साजरा करण्याच्या नावाखाली मौजमजा, मद्यपान करणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे, चित्रपटातील गाणी लावून त्यावर अंगविक्षेप नाचणे, पत्ते खेळणे, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ, तसेच कचरा टाकून गडावर अस्वच्छता करणे आदी अपप्रकार करतात. यामुळे गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड आणि विशाळगड येथे 'गड संरक्षण मोहीम' आयोजित केली आहे. 

३१ डिसेंबरच्या विरोधात केडगाव (जिल्हा पुणे) येथे प्रबोधन फेरी


     केडगाव - ख्रिस्ती नववर्ष आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात होणारे अपप्रकार यांच्या विरोधात येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच यांच्या वतीने प्रबोधन वाहनफेरी काढण्यात आली. मंचाचे डॉ. नीलेश लोणकर यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवे झेंडे हाती घेतलेल्या धर्माभिमानी युवकांनी 'हिंदु आहे, हिंदूच रहाणार, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार', असे प्रबोधनात्मक लिखाण असलेले फलक हातात धरले होते.

एकाही महाविद्यालयाने स्थानिक चौकशी समितीचा अहवाल संकेतस्थळावर प्रदर्शित केला नाही

पुणे विद्यापिठाच्या परिपत्रकांना महाविद्यालयांकडून केराची टोपली !
     पुणे - महाविद्यालयांमध्ये विद्यापिठाच्या स्थानिक चौकशी समित्या (एल्आयसी) नेमल्या जातात. त्या समित्या महाविद्यालयांची पाहणी करून अहवाल देतात, त्यानुसार महाविद्यालयाला मान्यताही मिळते. असे असले, तरी महाविद्यालयातील एकही प्रश्‍न प्रत्यक्षात सुटलेला दिसत नाही. त्यावर उपाय म्हणून स्थानिक चौकशी समित्यांचे अहवाल महाविद्यालयांनी संकेतस्थळावर जाहीर करण्याची सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने त्यांच्या कक्षेतील महाविद्यालयांना दिली होती.

दत्तभक्त पू. प्रमोद केणे महाराज यांचे २ जानेवारीला टिळक स्मारक येथे स्वानुभव कथन !

     सांगली - गिरनार पर्वताच्या १५९ पेक्षा अधिक आणि सलग अखंडित पौर्णिमा वारी करणारे दत्तभक्त पू. प्रमोद केणे महाराज यांचे शनिवार, २ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे दत्त साक्षात्काराचे स्वानुभव कथन ऐकण्याची संधी भाविकांनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ओंकार वसगडेकर यांनी केले आहे.

सांगली येथे शिवसेनेच्या वतीने 'दारू नको दूध प्या' उपक्रम !

     सांगली, ३१ डिसेंबर (वार्ता.) - इंग्रजांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. हिंदु धर्मातील रुढी, परंपरा, संस्कृती यांना छेद देत इंग्रजांनी भारतीय लोकांच्या मनातील सत्त्व, स्वाभिमान संपवला. त्यासाठी सारी पिढी व्यसनात गुरफटवली. भारतीय इंग्रजांचे उष्टे, खरकटे खाणारा हिंदु समाज ३१ डिसेंबर साजरा करू लागला. यथेच्छ दारू पिणे, थिल्लरपणे गाणी म्हणणे, नाचणे यांमुळे सारी पिढी बरबाद होत आहे. यासाठी शिवसेनेच्या विश्रामबाग शाखेच्या वतीने मुख्य चौकात ३१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून 'दारू नको दूध प्या' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार, तसेच स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम मातोश्री फळे आणि भाजीपाल विक्रेता सेनेचे उपाध्यक्ष, तसेच शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. 

हिंदु जनजागृती समितीच्या समवेत एकत्र येऊन कार्य करा ! - टी. राजासिंह

संभाजीनगर येथील हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन 

गणेश मंदिरात आरती करतांना टी. राजासिंह

     संभाजीनगर - हिंदु जनजागृती समितीची जळगाव येथील सभा पुष्कळ चांगली झाली. अनेक हिंदू याद्वारे एकत्र आले. अशाच प्रकारचे संघटन आपल्याला येथेही निर्माण करायचे आहे, त्यासाठी येथेही तुम्ही समितीच्या समवेत एकत्र येऊन कार्य करा. आता संघटना, पद, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून संघटित व्हायला हवे. समितीचे हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य होण्यासाठी म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करूया, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील कट्टर हिंदुत्ववादी आणि श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते येथे जमलेल्या हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करत होते. जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेहून परततांना ते संभाजीनगर येथे आले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या हस्ते पद्मपुरा, मामा चौक येथील गणेश मंदिरात आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी संभाजीनगर येथील हिंदुत्ववाद्यांच्या समवेत 'संघटित होऊन कार्य करण्याची आवश्यकता' या विषयावर चर्चा केली. माजी उपमहापौर श्री. तरविंदरसिंग धिल्लन यांच्या निवासस्थानी ही चर्चा घेण्यात आली. या वेळी विविध संघटनांचे अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. 

पशूवधगृहाकडे १९ बैलांना घेऊन जाणारे ३ टेम्पो हिंदुत्ववाद्यांनी पकडले !

१८ बैलांची सोडवणूक करणार्‍या बजरंग दलाच्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
 १८ बैलांची सुटका, तर १ बैलाचा गुदमरून मृत्यू : ४ जणांना अटक ! 
     कोल्हापूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) - पेठवडगावहून संकेश्‍वरच्या पशूवधगृहाकडे १९ बैल घेऊन जाणारे ३ टेम्पो येथील बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यांनी २८ डिसेंबर या दिवशी पहाटे २ च्या सुमारास पाठलाग करून पकडले. यातील १ बैल चेंगराचेंगरी झाल्याने टेम्पोतच मरण पावला. या प्रकरणी आरोपी मुताप्पा पट्टनकुडी, मुताप्पा नाईक, मुताप्पा चंद्रकुडी, यल्लाप्पा कुंकरूक (सर्व रा. वड्राळ, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) यांना अटक केली आहे. (गोवंशहत्या बंदीचा कायदा करूनही बैलांची अवैधपणे वाहतूक करून १९ बैल पशूवधगृहाकडे नेणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहेे. - संपादक) 

पुरस्कार परत करणे, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच ! - स्पर्धक विद्यार्थ्यांचे मत

असहिष्णुता आणि पुरस्कारवापसी यांवरून युवा पिढीच्या मनात
 झालेले मत साहित्यिक अन् कलावंत जाणून बोध घेतील का ?
संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात आयोजित वादविवाद स्पर्धा
     संभाजीनगर - येथील देवगिरी महाविद्यालयात आयोजित विनायकराव पाटील स्मृती समारोहात राज्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. असहिष्णुतेचा विषाणू भारतीय नागरिकांच्या मनात घर करते आहे कि नाही, या विषयावर बोलतांना अनेक तरुणांनी परखड मते मांडली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगा !
     राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया (आय.ए.एस्) यांना मुख्य सचिवपद दिले नाही; म्हणून त्यांनी स्वत:शी भेदभाव झाल्याचा आरोप करत हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Pramukh sachiv na banaye janese Rajasthanke 1 hindu IAS adhikariki Islam swikarneki ghoshana.
kya ham Hinduome Jagruti layenge ?
जागो !
     प्रमुख सचिव न बनाए जानेसे राजस्थानके एक हिंदु आय.ए.एस्. अधिकारीकी इस्लाम स्वीकारनेकी घोषणा.
क्या हम हिंदूआेमें जागृती लाएंगे ?

फलटण येथे हिंदु धर्मजागृती सभा

दिनांक : २ जानेवारी २०१६ 
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता 
स्थळ : मुधोजी क्लब मैदान, माळजाईदेवी मंदिराजवळ, फलटण (जिल्हा सातारा) 

     धर्माभिमानी हिंदूंनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त फलटण येथील चौकांत महान भारतीय संस्कृती कक्षाचे पथनाट्य


पथनाट्यात सहभागी बालसाधक
     फलटण (जिल्हा सातारा), ३१ डिसेंबर (वार्ता.) - 'हीच विनवणी पुन्हा तुम्हाला, हिंदूंनो ही सुस्ती सोडा, दिवसरात्र वैर्‍याची आहे, झोप सोडा जागे व्हा, हिंदु तेजा जाग रे ! हिंदु तेजा जाग रे !' असा जागर करत हिंदु बांधवांना देशावर आलेले संकट, तसेच हिंदूंवर होणारे अन्याय, तसेच येणार्‍या काळात निर्माण होणार्‍या समस्या यांची जाणीव करून देण्यासाठी ३१ डिसेंबर या दिवशी शहरातील चौकाचौकात बालसाधकांनी पथनाट्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शंकर मार्केट, पृथ्वी चौक, डी.एड्. चौक, क्रांतीसिंह नाना पाटील चौक यांसह विविध चौकांत पथनाट्य सादर करण्यात आले. 

बुडत्याला हवालाचा आधार !

श्री. भाऊ तोरसेकर
१. एखाद्या प्रसंगाशी संबंध नसलेल्या शब्दांचा वापर करणे, 
हा जनतेची दिशाभूल करण्याचा डाव !
     काही शब्द मेंदू वा बुद्धी यांना गुंगी आणणारे असतात. म्हणजे असे की, ते उच्चारले मग तुमचा मेंदू त्याचा नेमका अर्थ ओळखू शकत नाही. किंबहुना त्याचा योग्य संदर्भातील अर्थ तुमच्या लक्षात येऊ नये, अशाच हेतूने त्या शब्दांचा वापर झालेला असतो, उदाहरणार्थ फ़ुले, शाहू आंबेडकर ही शब्दावली सहजगत्या वापरली जाते; पण त्याचा अर्थ ती उच्चारणार्‍यालाही कितीसा ठाऊक असतो ? पण महाराष्ट्रात असे म्हणायच्या ऐवजी फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी शब्दावली उठसूट बोलली जाते. त्यामागे लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू असतो. असेच अनेक शब्द वा शब्दावली निर्माण केल्या जातात वा त्यांचा सरसकट वापर होत असतो. कधी त्यातून उदात्त भाव तुमच्या मनात निर्माण होतात, तर कधी अत्यंत तिरस्कृत भावना उत्पन्न होते; मात्र खरेच तसे काही आहे काय, याचाही विचार करायचे तुम्ही विसरून जाता.

स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य हे त्यांच्या संकल्पनेचे प्रमुख आधारस्तंभ असून हिंदु राज्य स्थापन करायचे असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्पष्टता असणे

     स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य हे त्यांच्या संकल्पनेचे प्रमुख आधारस्तंभ होते. आपल्याला हिंदु राज्य स्थापन करायचे आहे, याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता होती. शहाजींची दक्षिणेकडील जहागिरी सांभाळणार्‍या आपल्या भावाला, व्यंकोजींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हिंदु राजांशी न लढता त्यांचे संघटन करण्याचा आणि एकेका मुसलमान सरदाराला वेगळे पाडून त्यांना पराभूत करून ठार मारण्याचा उपदेश केला. मिर्झाराजे जयसिंगांनाही त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे आवाहन केले; पण आजच्या निधर्मीवाद्यांप्रमाणे ते त्यांना समजण्याच्या कुवतीच्या बाहेरचे होते. त्या वेळचा कोणताही महत्त्वाचा राजा किंवा सरदार त्यांच्या साहाय्याला आला नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांना स्वराज्यासाठी प्रेरित केले. त्यांच्यामधून नेतृत्व उभे केले आणि त्या आधारावर त्यांच्या मृत्यूनंतरही २५ वर्षे बलाढ्य मोघल सत्तेशी सामना देऊन त्याला पराभूत करणारे हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केले. 
- श्री. दिलीप करंबेळकर (साप्ताहिक राष्ट्रपर्व, २७.४.२००९)

सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी सत्य इतिहास समोर येणे अपरिहार्य !

१. भारतावर पूर्वी झालेल्या राजकीय, सैनिकी आणि आर्थिक 
आक्रमणापेक्षा सांस्कृतिक आक्रमण अतीभयंकर असणे
     भारतावर आजवर पुष्कळ आक्रमणे झाली. अलेक्झांडर आला. चेंगिजखान, नादिरशहा, तैमुरलंग, असे राक्षस एकामागून एक आले. देश लुटून परत गेले. मोगल आले. काही शतके त्यांनी भारतावर राज्य केले; परंतु आमची अस्मिता कायम होती. धर्मधैर्य अतूट होते. ख्रिस्ती मिशनरी आले. समवेत ख्रिस्ती धर्म (ख्रिश्‍चॅनिटी) आला; मात्र आता नवे राक्षसी सांस्कृतिक आक्रमण मात्र अद्भुत आहे ! इथे काही युद्ध करणारे आक्रमक सैतान नाहीत अथवा इस्ट इंडिया कंपनीसारख्या व्यापारी बोटीही नाहीत. हे नवे आक्रमण काही राजकीय दृष्टीने भारताला गुलाम बनवणारे नाही, तरीही हे आक्रमण फार भयानक आहे. पूर्वीची सर्व राजकीय आक्रमणे एकवटली, तरी त्यापेक्षाही अतीभयंकर असे हे आक्रमण आहे. 

चोर सोडून संन्याशाला फाशी ! ही म्हण सार्थ करणारे पोलीस !

१. लोकहो, सनातनची विचारधारा जाणून घ्या ! 
श्री. शंकर नरुटे
अ. आतापर्यंत सनातन प्रभातने खून, दंगली, बलात्कार यांना विरोध केला आहे. समाजाला त्यावर योग्य दृष्टीकोनही दिला आहे.
आ. सनातन संस्था अनेक तरुणांना धर्मशिक्षण देते. सनातनने त्यांच्याकडून साधना करवून घेतली आहे. त्यामुळे अनेक तरुण योग्य मार्गाला लागले आहेत. 
इ. समाजात कुणालाही विचारले, तर असेच ऐकायला मिळते की, सनातनचा साधक म्हणजे मुंगी मारली, तरी पाप लागते, देवाण-घेवाण वाढते, असे सांगणारे असतात. ते कुणाच्या खुनाचा विचार करूच शकत नाहीत.
२. संस्थेतील साधकांची चौकशी करण्याची पोलिसांची रीत
२ अ. पोलिसांची शोध घेण्याची दिशाच चुकलेली असणे : पुरोगामी आणि अधर्मी लोकांनी तपासाची दिशाच चुकवली आहे. सनातन संस्था धर्माच्या बाजूने आहे. या संस्थेकडून अधर्मी कृत्य होऊच शकत नाही, हे लक्षात घेऊन योग्य मार्गाने शोध घ्यायला हवा. खरे खुनी सापडत नाहीत, तर सनातन संस्थेच्या मागे लागणे कितपत योग्य!

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित लेखांना नोव्हेंबर २०१५ मध्ये दिवाळी अंक आणि इतर वृत्तपत्रांतून मिळालेल्या प्रसिद्धीचा आढावा

कुठे केस सोडून अधर्माचरण करणार्‍या हिंदु महिला, तर कुठे भर उन्हातही बुरखा घालून धर्माचरण करणार्‍या धर्माभिमानी मुसलमान महिला !

कु. मृण्मयी गांधी
     सध्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे बहुतांश हिंदु महिलांमध्ये केस मोकळे सोडण्याची चुकीची पद्धती रूढ झाली आहे. महिलांनी सोडलेले केस तोंडावर आल्याने एका विवाहातील हळदीच्या छायाचित्रांमध्ये कुणाचेही तोंडवळे स्पष्ट दिसत नव्हते. केस बांधण्याची पद्धत सध्याच्या महिला आणि विशेषतः तरुणी मागासलेपणाचे लक्षण समजतात. काही नातेवाईक तरुणींनी एका साधिकेला सांगितले,तू जर केस बांधून येणार असशील, तर आमच्यासोबत कार्यक्रमाला येऊ नकोस.
      याउलट बहुतांश मुसलमान महिलांची स्थिती दिसते. वातावरणात कितीही उष्मा असला, तरी धर्मशिक्षण मिळाल्यामुळे मुसलमान महिला काळा बुरखा (डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकणारा आणि केवळ डोळ्यांजवळील भाग उघडा असलेला) घालतात. त्यामुळे केस मोकळे सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. महिला ५ वेळा न चुकता नमाजपठण करत असतात. त्या कधीही आम्हाला मशिदीत प्रवेश मिळालाच पाहिजे, म्हणून सुधारणावादाच्या नावाखाली अडून बसत नाहीत कि परंपरा तोडण्याचा आग्रह धरत नाहीत. यावरून हिंदु महिलांच्या धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट होते.
- कु. मृण्मयी गांधी (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०१५)

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

प्रवेशप्रक्रियांचे भूत

     इयत्ता बारावीनंतर करिअर घडवण्याच्या वेडाने झपाटलेले अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी खाजगी शिकवण्यांना प्राधान्य देऊन इयत्ता बारावीच्या महाविद्यालयातील तासांना अनुपस्थित रहातात. महाविद्यालयातील तासिकांवर त्याचा परिणाम होऊन महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावते. परीक्षा देण्यासाठी असलेला ७५ टक्के उपस्थितीचा निकषही कागदोपत्रीच असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांच्या दुःस्थितीत अधिकच भर पडते. यावर उपाययोजना काढण्याचा एक प्रयत्न म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यल्प उपस्थिती असणार्‍या महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कुठे देशाच्या राजधानीत स्त्रियांवर बलात्कार होऊ देणारे लोकराज्य, तर कुठे अमावास्येला रात्री १२ वाजताही अंगात दागिने घालून संपूर्ण राज्यात कुठेही निर्भयपणे स्त्रियांना फिरता येणे शक्य असणारे रामराज्य !

     देहलीत प्रत्येक १८ घंट्यांत एका महिलेवर बलात्कार होतो, तर प्रत्येक १४ घंट्यांमध्ये एका महिलेचा विनयभंग केला जातो, असे देहली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. (८.१.२०११)
     लोकहो, आज ४ वर्षांनंतरही अशा घटनांचे प्रमाण वाढतच आहे. समाजातील प्रत्येक घटकाला अभय देणारे रामराज्य आपल्याला स्थापन करायचे आहे, हे लक्षात ठेवा !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
       इच्छा आणि आकांक्षा सागरासारख्या अतृप्त आहेत; कारण जशा जशा आपण त्या पुरवत जाऊ, तशा तशा त्या वाढतच जातात ! - स्वामी विवेकानंद (संदर्भ : मासिक संस्कारम्, ऑक्टोबर २०१३)

श्रीकृष्णाने कलियुगातील आणि ईश्‍वरी राज्यातील पोलीस अन् कारागृह यांच्यातील दाखवलेला भेद

कु. नंदिता वर्मा
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र आणि सूक्ष्म-परीक्षण 
   काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात. एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

इतरांचा विचार करणारी आणि सात्त्विकतेची आवड असणारी, ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली प्रेमळ बालसाधिका कु. सौख्यदा शिंदे (वय ८ वर्षे) !

    ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सौख्यदा शिंदे हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (१ जानेवारी २०१६) या दिवशी वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिची गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.
कु. सौख्यदा शिंदे
कु. सौख्यदा शिंदे हिला 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद !
१. सौ. स्नेहा शिंदे (कु. सौख्यदाची आई), 
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. सतत इतरांचा विचार करणे
१. कु. सौख्यदा पूर्वी ठाणे येथे शाळेत जात होती. आम्ही गोव्यात रहायला येणार असल्याने तिचे ठाण्यातील शाळेतून नाव काढले. ठाण्यातील शाळेचा दाखला काढल्यावर आता त्या शाळेत जाणे बंद होणार, हे कळताच तिने मला सांगितले, मी एकदा शाळेत जाईन आणि सर्व मैत्रिणींना भेटून मी यापुढे शाळेत येऊ शकणार नाही, असे सांगीन, म्हणजे त्यांना वाईट वाटणार नाही.

श्रीकृष्ण आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि प्रत्येक इच्छा तत्परतेने पूर्ण करतो यासंदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

सौ. शरण्या देसाई
१. साधक अनुभवत असलेल्या आनंदाचा एखादा क्षण 
स्वतःलाही अनुभवता यावा, यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना करणे
     प्रतिदिन संध्याकाळी मी आणि माझे पती आरती करून झाल्यावर काही काळ नामजप करतो. २२.१.२०१५ या दिवशी आरतीनंतर मी नामजप करतांaना सेवा / साधना करतांना साधक सतत आनंदावस्था कसे अनुभवत असतात ? या संदर्भात वाचल्याचे मला आठवलेे. मी श्रीकृष्णाला प्रार्थना करू लागले, कृष्णा, इतर साधकांना आनंद अनुभवल्याच्या पुष्कळ अनुभूती येतात; पण मला आनंद म्हणजे काय ?, हेही ठाऊक नाही. भाव आणि तुझे अस्तित्व हे मला अनेकदा अनुभवायला मिळाले आहे; मात्र आनंदाची अनुभूती आलेली नाही. हे श्रीकृष्णा, फार नको, मला आनंदाचा एखादा क्षण तरी अनुभवता येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्री. कृष्णमूर्ती यांनी गाठली ६२ टक्के, तर सौ. सरोज पै आणि श्रीमती नागमणी कृष्ण स्वामी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

१. श्री. कृष्णमूर्ती यांचा सत्कार करतांना ६५ टक्के
आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. रमानंद गौडा (डावीकडे
)
२. सौ. सरोज पै यांचा सत्कार करतांना ६५ टक्के
आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. रमानंद गौडा (डावीकडे
)

३. श्रीमती नागमणी कृष्ण स्वामी यांचा सत्कार करतांना ६५ टक्के
आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. रमानंद गौडा (डावीकडे
)

रामनाथी आश्रमाची ओढ लागल्यावर हनुमानाला साहाय्य करण्यासाठी प्रार्थना केल्यावर त्याने प्रत्येक देशात एका रामनाथी आश्रमाची स्थापना करणे

सौ. शोभना शेट
१. रामनाथी आश्रमात जाण्याची ओढ लागणे आणि 
मनोदेह रामनाथी आश्रमात वावरत असल्याचे दिसणे
     ३०.८.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात जाण्याविषयी विचार येत होते. आश्रमाच्या मार्गिकेत, ध्यानमंदिरात मी वावरत असल्याचे दृश्यही मला मधे मधे दिसत होते. आश्रमापासून मी पुष्कळ लांब (विदेशात) रहात असूनही मला अधिक कालावधीसाठी आश्रमात रहाता येत नाही, असे विचारही माझ्या मनात येत होते.
२. हनुमानाने द्रोणागिरी पर्वताप्रमाणे रामनाथी आश्रम 
तळहातावर घेऊन प्रत्येक देशात आश्रमाची स्थापना करणे
    सूक्ष्मातून मी रामनाथी आश्रमाच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरासमोर उभी राहिले आणि मला साहाय्य करण्याविषयी त्याला आळवणी केली. त्या वेळी तो स्मित करत असल्याचे मला दिसले. त्याने मला पुढील दृश्य दाखवले. हनुमान संपूर्ण रामनाथी आश्रम आपल्या तळहातावर घेऊन उंच आकाशात झेपावला. प्रभु श्रीरामाच्या आज्ञेनुसार हनुमानाने संजीवनी आणण्यासाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आपल्या तळहातावर उचलून आणला होता, तसेच हे दृश्य होते. मी हनुमानाला विचारले, तू कुठे निघाला आहेस आणि रामनाथी आश्रम हातात का घेतला आहेस ? त्यावर हनुमानाने उत्तर दिले, माझ्यासमवेत चल आणि ईश्‍वरी नियोजन पहा. आम्ही समुद्रापलीकडे प्रवास करून एका देशात उतरलो. तेथे हनुमानाने रामनाथी आश्रमाची एक प्रतिकृती स्थापन केली. पुन्हा आम्ही उंच आकाशात झेपावलो आणि दुसर्‍या एका देशात उतरलो. तेथे पुन्हा रामनाथी आश्रमाची एक प्रतिकृती स्थापन केली. अशा पद्धतीने आम्ही जगातील प्रत्येक देशात रामनाथी आश्रम स्थापन होईपर्यंत प्रवास करत होतो.

अमेरिकेच्या रज-तम प्रधान वातावरणातही भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवणार्‍या सौ. ज्योती जयराम सोर्ते !

१. व्हर्जिनिया येथे रज-तम प्रधान वातावरणात 
व्यावसायिक परिषदेच्या वेळी सेवा करत असतांना दैवी कण दिसणे
१ अ. परिषद चालू असतांनाही सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे शरणागत अवस्था अनुभवता येऊन देवाप्रती कृतज्ञता वाटणे : १०.१०.२०१४ या दिवशी व्यावसायिक परिषदेनिमित्त आम्ही तीन दिवसांसाठी व्हर्जिनिया येथे गेलो होतो. सकाळचे ७.३० वाजले होते आणि मला एक तातडीची सेवा पूर्ण करायची असल्याने परिषद चालू असतांना मी सेवा करत होते. इतक्या रज-तम प्रधान वातावरणातही देवाने सेवेची संधी दिल्यामुळे सेवा करतांना माझ्या मनाची संपूर्ण शरणागत अवस्था मी अनुभवत होते, तसेच देवाप्रती मला कृतज्ञताही वाटत होती.

साधकांसाठी सूचना

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक
 सनातन प्रभातच्या १२,३३९ वाचकांचे शेष नूतनीकरण १५.१.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
     दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) चे दक्षिण अमेरिका येथील साधक श्री. आल्वारो गर्रीदो यांना आलेल्या विविध अनुभूती

      २९ डिसेेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
श्री. आल्वारो गर्रीदो
१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाची 
ध्वनीफीत ऐकतांना त्यातून पुष्कळ चैतन्य 
मिळून अंतःकरण निर्मळ होत असल्याचे जाणवणे
     अनुभूतींविषयी जाणून घेण्यासाठी ९.११.२०१४ या दिवशी आयोजित स्पॅनिश भाषेतील एका सत्संगाला मी उपस्थित राहिलो. त्या वेळी एक सूक्ष्मातील प्रयोग घेण्यात आला. आम्हाला एक ध्वनीफीत ऐकवण्यात आली. ध्वनीफीत ऐकतांना चांगले वाटते कि त्रासदायक वाटते ?, हे अनुभवण्यास सांगितले होते. ती ध्वनीफीत ऐकल्यावर जणूकाही माझ्या अंतःकरणात साठलेली मलीनता एखाद्या झाडूने स्वच्छ केली जात असल्याप्रमाणे माझे अंतःकरण स्वच्छ (निर्मळ) झाले आहे, असे जाणवले. प्रयोगाच्या वेळी काय जाणवले ?, असे नंतर विचारले असता मला चांगले वाटले असतांनाही मी सूक्ष्मातील प्रयोगाचे चुकीचे उत्तर दिले. ती ध्वनीफीत म्हणजे प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेले एक भजन असून त्यामागील अध्यात्मशास्त्र कळल्यानंतर आरंभीची माझ्या मनाची स्थिती योग्य होती; कारण ध्वनीफितीतून मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते, याची मला जाणीव झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 
परात्पर गुरु डॉ. आठवले
    कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.५.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. त्याच्याकडेच लक्ष द्यावे. दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

भोगवादाच्या पाठीराख्या वृत्तवाहिन्या !

संपादकीय
     आज १ जानेवारी २०१६ ! ख्रिस्ती कालगणनेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस ! मागील चार-पाच दिवसांत काही दूरचित्रवाहिन्यांवर नवीन वर्ष, हिंदु संस्कृती, गुढीपाडवा हे विषय धरून चर्चासत्रांचे कार्यक्रम पहायला मिळाले. नवीन वर्षाचा आरंभ ३१ डिसेंबरची मध्यरात्र कि गुढीपाडवा, हाच चर्चेचा मुख्य गाभा होता. तसे पहाता हा समस्त लोकांच्या प्रबोधनाचा भाग होता. या सूत्रावर चर्चा करण्यासाठी कालगणनेचे अभ्यासक किंवा तत्सम योग्यतेचे वक्ते उपस्थित असणे अपेक्षित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn