Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

 पाडवा 
 --------------------------
आज बलीप्रतिपदा

अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय जरी चांगला 
असला, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक ! 
        मुंबई - येथे मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे केली जात असून त्यावर पालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. अवैध बांधकामाविषयी तक्रारीची नोंद झाल्यानंतर जागेची पाहणी करणे, एम्आर्टीपी कायद्यांतर्गत नोटीस सिद्ध करून ती बजावणे, अंतिम आदेशामध्ये दिलेला कालावधी संपुष्टात आल्यानंतर तोडकाम करणे, निष्कासन कारवाईचा अहवाल सिद्ध करणे, अशी कारवाई केली जाते; परंतु अशी नोटीस बजावल्यानंतर पुढील कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अवैध बांधकामांवर कारवाई न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांचे उत्तरदायित्व निश्‍चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली असून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्या कार्यपद्धतीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मिलिन सावंत यांनी दिली.

कोल्हापूर येथे चार चित्रपटगृहांत ए दिल है मुश्किल चित्रपटाचा केवळ एक खेळ बंद !

  • पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची दोन चित्रपटगृहांसमोर निदर्शने !
  • व्यवसायापेक्षा राष्ट्रभक्तीला प्राधान्य देणारे व्यावसायिक हवेत !
         कोल्हापूर, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांचे कोणतेही चित्रपट येथील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका पतित पावन संघटनेने घेतली होती. त्यानुसार पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी पद्मा आणि पार्वती या चित्रपटागृहांच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यानंतर येथील पद्मा, प्रभात, शाहू, पार्वती, पी.व्ही.आर् या चित्रपटगृहांमध्ये ए दिल है मुश्किल या चित्रपटाचे चारपैकी केवळ एक खेळ बंद करण्यात आला आहे. (ए दिल है मुश्किल हा पाकिस्तान कलाकार असलेल्या चित्रपटाचे सर्व खेळ बंद केले असते, तर चित्रपटगृह मालकांना देशाप्रती प्रेम असल्याची भावना निर्माण झाली असती; मात्र केवळ एक खेळ बंद करून एकप्रकारे चित्रपटगृह मालकांनी भारतीय सैनिकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. पाक कलाकारांना पाठिंबा देणार्‍या चित्रपटगृहातील सर्व खेळ बंद होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे लढा दिला पाहिजे. - संपादक)

पाकच्या ४ चौक्या उद्ध्वस्त, अनेक सैनिक ठार झाल्याची शक्यता !

  • अशा छोट्या छोट्या आक्रमणांपेक्षा एकच मोठे आक्रमण करून पाकला संपवण्यातच खरे यश आहे !
  • सैनिकाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा उद्रेक !
       श्रीनगर - भारतीय सैनिक मनदीप सिंह याला ठार करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या घटनेनंतर भारतीय सैन्याने केरन सेक्टर येथील पाकच्या ४ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यात पाकची मोठी हानी झाली असून त्यात काही सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे; मात्र याविषयी भारतीय सैन्यातील अधिकार्‍यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मनदीपच्या मृतदेहाच्या विटंबनेनंतर सीमा सुरक्षा दलाने याचा सूड उगवला जाईल, असे म्हटले होते.
       भारताने कारवाई केली, तरी आर्एस्पूरा, हिरानगर आणि सांबा सेक्टरमध्ये २९ ऑक्टोबरच्या रात्री ते ३० ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत पाककडून गोळीबार चालूच होता. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
       पाक सैन्याने भारतीय चौक्यांबरोबरच आता निवासी भागावरही छोट्या तोफांनी मारा चालू केल्याने सीमारेषेवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवाळीनिमित्त भारत आणि पाक यांचे सैनिक वाघा सीमेवर एकमेकांना मिठाई देतात; पण यंदा मिठाई देणार नाही, असे सीमा सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.

महंमद फरहत खान २० वर्षांपासून हेरगिरी करत असल्याचे उघड !

  • २० वर्षांपासून चालू असलेल्या हेरगिरीची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना न मिळणे, हे लज्जास्पद आहे ! 
  • आता अशा हेरांना तात्काळ खटला चालवून कठोर शिक्षा केली पाहिजे !
        नवी देहली - समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार मुनव्वर सलीम यांचा खाजगी साहाय्यक महमंद फरहत खान याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. फरहतच्या चौकशीतून निश्‍चित अशी महत्त्वाची माहिती हाती लागली असून अन्य काही जणांची नावेही समोर आली आहेत. महंमद फरहत गेल्या २० वर्षांपासून आयएस्आयसाठी हेरगिरी करत होता. गोपनीय माहितीच्या बदल्यात १० सहस्र ते १ लाख रुपयांपर्यंतची लाच त्याला दिली जात होती.
        फरहतने गेल्या २० वर्षांत ४ खासदारांकडे काम केले. चारही खासदार संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. फरहतने संसद आणि संसदीय समितीशी संबंधित कागदपत्रे आयएस्आयला पोचवली आहेत. खासदार मुनव्वर सलीम यांनी राज्यसभा सचिवालयास लिहिलेल्या पत्रात म्हटले की, त्यांनी फरहतला एक वर्षापूर्वी कामावर घेतले. तेव्हा त्याची सगळी चौकशी केली होती; परंतु आता समजले की, तो हेरगिरी करायचा. त्याला मी नोकरीवरून काढून टाकले आहे. या प्रकरणी पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या पाकच्या उच्चायुक्तालयातील मेहमूद अख्तर याने दिलेल्या माहितीनुसार दूतावासातील फारुख हबीब, खादिम हुसेन, मुदस्सर इक्बाल चिमा आणि सादिक इक्बाल हे अधिकारीसुद्धा हेरगिरीत सहभागी होते. या अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून लोकांना हेरगिरीसाठी सिद्ध करण्यात येत होते. त्यांच्याकडून मिळालेली माहिती या ४ अधिकार्‍यांकडे दिली जात होती. त्यानंतर ही माहिती आयएस्आयला दिली जात होती. (हेरगिरीचा गड ठरलेल्या पाकच्या या उच्चायुक्तालयाला टाळेच ठोकले पाहिजे ! - संपादक)

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५ विद्यार्थ्यांना नोव्हेंबर मासाच्या प्रत्येक रविवारी २ घंटे स्वच्छतेची शिक्षा ! - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

आरोपींची वृत्ती पालटण्यासाठी 
कठोरात कठोर शिक्षेची आवश्यकता !
      मुंबई, ३० ऑक्टोबर - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रविष्ट केलेला गुन्हा रहित करण्याच्या बदल्यात १९ ते २२ वयोगटातील ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नोव्हेंबर मासाच्या प्रत्येक रविवारी २ घंटे स्वच्छता करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय आरोपींनी राज्य विधी सहकार्य सेवा प्राधिकरणाला ५० सहस्र रुपये जमा करावे, असेही आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपिठाने दिले आहेत. विनयभंग प्रकरणातील आरोपी भावेश म्हात्रे, आतिश भानुशंगे आणि अन्य तिघांनी आपल्यावर विनयभंगसंबंधीची तक्रार रहित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
१. तक्रारदार मुलगी एका मैत्रिणीसह तिच्या मित्राला औषधे देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती; मात्र तिने तिथे जाऊ नये, म्हणून भावेश आणि इतर आरोपींनी त्या मुलीशी आक्षेपार्ह वर्तन केले आणि मारहाणही केली. याविषयी तक्रारदार मुलीची मैत्रीण आणि आई यांनी लेखी जबाब दिला.
२. त्यानंतर आरोपींनी या प्रकाराविषयी क्षमा मागितली आणि तक्रार मागे घेण्याची विनंती केली. त्यावर तक्रारदार मुलीच्या कुटुंबियांनीही तक्रार मागे घेण्यास अनुमती दिली.

हिंदूंचे शुभचिन्ह असलेल्या स्वस्तिकाच्या आकाराच्या फटाक्यांची बाजारात विक्री !

स्वस्तिकाच्या आकारातील फटाका

  • अन्य धर्मियांच्या धार्मिक चिन्हांचे फटाके सिद्ध करण्याचे धाडस कुणी दाखवेल का ?
  • स्वस्तिक जळून जात असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर
        मुंबई, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदूंचे शुभचिन्ह असलेल्या स्वस्तिकाच्या आकाराच्या भुईचक्राचे फटाके बाजारात विक्रीसाठी ठेवल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहेत. कोपरखैरणे येथील एका दुकानात असे फटाके आढळले. या भुईचक्राला स्वस्तिकाचा आकार देण्यात आला असून भुईचक्र लावल्यावर स्वस्तिक जळून जातेे. अशा प्रकारे हिंदूंसाठी पवित्र असलेल्या स्वस्तिकाच्या चिन्हाचा अवमान होत आहे. याविषयी हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी श्रीकृष्ण, श्रीविष्णु, लक्ष्मी आदी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके बाजारात विक्रीसाठी आढळत होते. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा प्रविष्ट होऊ शकतो.

फटाके विक्रेत्यांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर !

महानगरपालिकेकडूनही डोळेझाक
       पुणे, ३० ऑक्टोबर - दिवाळीच्या निमित्ताने थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या कक्षाच्या ठिकाणी फटाकेविक्रेत्यांनी सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती काळजी यंदाही घेतली नसल्याचे आढळून आले आहे. प्रतीवर्षी फटाक्याच्या कक्षांना आग लागून वित्तहानी, क्वचित जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. असे असूनही फटाक्यांच्या कक्षाच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन, वाळू भरलेल्या बादल्या, पाणी अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध नाही.
१. फटाक्यांचे कक्ष उभारण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे प्रमाणपत्र घ्यावे लागते. आग लागण्याच्या घटना घडू नये म्हणून उपाययोजना करून अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. ही प्रमाणपत्रे असतील, तरच महानगरपालिकेकडून त्यांची जागा कक्ष उभारण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जाते.
२. वर्तकबाग, मुळीक गार्डन, भोसले गार्डन अशा अनुमती दिलेल्या १५ जागांपैकी कुठेच आवश्यक ते सर्व उपाय योजलेले नाहीत.
३. महानगरपालिकेने जागांचा लिलाव करून फटाक्यांचे कक्ष उभारण्यासाठी अनुमती देतांना संबंधितांकडून आवश्यक ती सुरक्षा घेतली जाईल, असे हमीपत्र घेण्याविना काहीही केलेले नाही. (आवश्यक त्या उपाययोजना केल्या नसतील, तर नुसते हमीपत्र घेेऊन काय उपयोग ? प्रत्यक्ष वस्तूस्थिती काय आहे, हे पहाण्याची महानगरपालिकेकडे व्यवस्था नाही का कि आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, असाच कारभार करण्याचा महानगरपालिकेचा निश्‍चय आहे ? - संपादक)

भारतात उत्पादन केल्यास २०० ते ३०० लढाऊ विमाने घेऊ ! - भारतीय वायूदलाची अट

       नवी देहली - स्थानिक आस्थापनांबरोबर विदेशी आस्थापनांनी भागीदारी करून भारतामध्ये उत्पादन केल्यास अशा विदेशी आस्थापनांकडून शेकडो लढाऊ विमाने खरेदी करण्यास आम्ही सिद्ध आहोत, असा प्रस्ताव भारत सरकारने ठेवला आहे, असे भारतीय वायूदलाने सांगितले. भारताची २०० लढाऊ विमाने घेण्याची सिद्धता आहे. ही संख्या ३०० पर्यंतही जाऊ शकते. यासाठी १३ ते १५ अब्ज डॉलर व्यय अपेक्षित आहे. देशांतर्गत उत्पादन चालू झाल्यास आयातीवर होणारा प्रचंड खर्चही वाचवण्याचा सरकारचा उद्देश आहे. संरक्षण मंत्रालयाने याविषयी अनेक विदेशी आस्थापनांकडे प्रस्ताव पाठवले आहेत. या आस्थापनांनी काही प्रमाणात तंत्रज्ञानही हस्तांतरित करावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत.
       भारताच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एफ्-१६ विमानाचे उत्पादन करणार्‍या लॉकहिड मार्टीन या आस्थापनाने भारतात उत्पादन करण्याची सिद्धता दर्शवली असून येथे विमान उत्पादन करून भारतीय सैन्यालाच नव्हे, तर इतर देशांनाही विमानविक्री करण्यात त्यांना रस आहे. स्वीडनच्या साब या आस्थापनानेही त्यांच्या ग्रिपेन विमानाचे भारतात उत्पादन करण्यास सिद्ध असल्याचे सांगितले आहे.

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे व्यापार्‍यांवर घाऊक व्यापार्‍यांकडून चिनी मालाच्या खरेदीची सक्ती

शासनाने चिनी मालाच्या आयातीवर निर्बंध 
घातले नाहीत, तर जनतेत वाढत चाललेले चिनी वस्तूंवरील 
निर्बंधाचे  लोण एक दिवस शासनाला तसे करण्यास भाग पाडील !
        कोपरगाव - पाकला चीन साहाय्य करत असल्याने चिनी वस्तूंच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालून भारतीय बनावटीच्या वस्तू वापराव्यात, असा संदेश सामाजिक संकेतस्थळांवर फिरत आहे. असे असले, तरी येथील व्यापार्‍यांना अन्य ठिकाणांवरून माल आणणारे ठोक व्यापारी हे स्वदेशी माल पाहिजे, तर चिनी माल खरेदी करावाच लागेल, अशी सक्ती करत आहेत. (अशी सक्ती करणारे व्यापारी हे समाजद्रोहीच म्हणावे लागतील. त्या व्यापार्‍यांवर जागृत समाजाने बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - संपादक) त्यामुळे व्यापारीवर्ग हैराण झाला आहे.
        व्यापार्‍यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नाशिक, नगर आणि संगमनेर येथील चिनी वस्तू विकणारे ठोक व्यापारी आहेत. त्यांच्याकडून दिवाळीसाठी ठोक दराने अन्य माल खरेदी करण्यासाठी गेल्यावर असा कटू अनुभव येत आहे. अशी सक्ती केल्याने बर्‍याच व्यापार्‍यांनी माल भरणेच टाळले आहे. (चिनी वस्तूंची खरेदी टाळणार्‍या व्यापार्‍यांचे अभिनंदन ! - संपादक)

बळिराजा महोत्सव समितीत श्रीविष्णूचा अवतार वामनाच्या होणार्‍या विटंबनेस प्रतिबंध करावा !

समस्त हिंदूप्रेमी संघटनांच्या 
वतीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी !
       कोल्हापूर, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - गेल्या काही वर्षांपासून बलिप्रतिपदा दिनी बळिराजा महोत्सव समितीच्या वतीने बळिराजा महोत्सव हा कार्यक्रम केला जातो. याच्या अंतर्गत हिंदु देवता भगवान श्रीविष्णूचा अवतार वामनाचा विविध मान्यवरांच्या हस्ते मस्तकभेद करण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. तरी बळिराजा महोत्सव समितीच्या वतीने श्री विष्णु अवतार वामन यांची विटंबना होण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदूप्रेमी संघटनांच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख यांना २६ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.
       या निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील, श्री. सतेज मांडवकर, वन्दे मातरम् संघटनेचे अध्यक्ष श्री. अवधूत भाट्ये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री. शिवानंद स्वामी, धर्माभिमानी सर्वश्री सुनील ठोंबळ, अजिंक्य पाटील यांची स्वाक्षर्‍या आहेत.

वैयक्तिक शौचालय संमतीसाठी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडून पैशांची मागणी

सर्वसामान्य जनतेला 
लुबाडणार्‍यांवर कठोर कारवाईची अपेक्षा !
        जळगाव - शहरात हागणदारी मुक्त अभियानाला भ्रष्टाचाराची लागण झाल्याचे लक्षात येत आहे. सरकार वैयक्तिक शौचालयासाठी १२ सहस्र रुपये अनुदान देते; परंतु हा पैसा सर्वसामान्य जनतेपर्यंत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी लाच घेतल्याशिवाय पोचत नाही, असे लक्षात येत आहे. शहरातील तांबापूर भागातील वैयक्तिक शौचालयांसाठी अर्जही उपलब्ध करून देत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून येत आहे. तसेच काही महिलांकडून अर्ज भरून घेण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकार्‍यांंनी प्रति अर्ज २०० रुपये प्रमाणे, तर शौचालयासाठी १ सहस्र रुपयांची मागणी करीत असल्याची माहिती तक्रारकर्त्या महिलांनी महापौरांना दिल्यानंतर महापौर नितीन लढ्ढा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागातील अधीक्षक एच्.एम्. खान आणि निरीक्षक भट यांनी पैसे घेतल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे. (या आरोपांची तत्परतेने चौकशी करून संबंधितांची सर्व संपत्ति जप्त करून त्यांना शिक्षा दिल्यासच इतरांवर जरब बसेल. - संपादक)

संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात सापशिडीचा खेळ मोक्षपट म्हणून ओळखला जात होता ! - प्रा. जेकॉब, डेन्मार्क

कुठे संत ज्ञानेश्‍वरांच्या काळातील संशोधन करणारे विदेशी प्राध्यापक 
आणि कुठे संत ज्ञानेश्‍वरांवर टीका करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !
संत ज्ञानेश्‍वर
    पुणे - संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात सापशिडीचा खेळ हा मोक्षपट म्हणून ओळखला जात होता, असे डेन्मार्क देशातील प्रा. जेकॉब यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. प्रा. जेकॉब यांनी इंडियन कल्चरल ट्रेडिशन या अंतर्गत संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ, असा संशोधनात्मक विषय घेतला होता. त्यामध्ये त्यांना संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात सापशिडीचा खेळ खेळला जात होता, अशी माहिती मिळाली. हा खेळ मिळवण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून सापशिडीचे अनेक पट जमवले; परंतु त्यांना संत ज्ञानेश्‍वरांचा पट मिळाला नाही, तसेच त्याचा संदर्भही कुठे मिळाला नाही. याविषयी प्रा. जेकॉब यांनी येथील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा.ल. मंजूळ यांच्याकडे विचारणा केली असता रा.चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून त्यांना दोन मोक्षपट मिळाले. त्यांवर लिहिलेल्या ओव्यांमधून आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी कोठे पडली की काय करावे, याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

कर्नाटकात दलितांच्या मोच्यार्र्नंतर रा.स्व. संघाने मंदिराचे शुद्धीकरण केल्याचा आरोप

      बेंगळुरू - मंदिरात बरोबरीचा अधिकार मिळावा, यासाठी ९ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील उडुपी येथे उडुपी चलो मोर्च्याचे दलितांकडून आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात बेंगळुरू ते उडुपी अशा मार्गात सहस्रो दलितांनी सहभाग घेतला होता. या मोर्च्यानंतर रा.स्व. संघाच्या एका नेत्याने, पेजावर मठाच्या स्वामींनी आणि युवा ब्रिगेडने उडुपी येथील कृष्ण मंदिरात आणि मोर्च्याच्या मार्गावर स्वच्छता अभियान राबवले; परंतु दलितांनी येथे मोर्चा काढल्यानेच संघाने शुद्धीकरण केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला आहे. या शुद्धीकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी काही दलित संघटनांनी २३ ऑक्टोबरला आणखी एका मोर्च्याचे आयोजन करण्याचे ठरवले होते. तसेच युवा ब्रिगेडवर बंदीची मागणी केली होती; परंतु पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या होत्या. त्यामुळे दलित संघटनांना मोर्चा रहित करावा लागला होता. मंदिरात स्वच्छता अभियान राबवले होते. तो दलितविरोधी शुद्धीकरण कार्यक्रम नव्हता, असे स्पष्टीकरण संघाचे कार्यकर्ते सुलिबेले यांनी दिले होते.

आदिवासी भागातील अंगणवाड्यांमध्ये क्षार संजीवनी नसल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

केवळ चौकशी नको, तर कृती आवश्यक 
असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई हवी !
       मुंबई, ३० ऑक्टोबर - राज्यात अतिसारामुळे (डायरिया) आदिवासी बालकांचे मृत्यू होत असताना अंगणवाड्यांसाठी क्षार संजीवनीची (ओआर्एस्) खरेदीच केली नसल्याचे उघडकीस आले होते. त्याची गंभीर नोंद घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अंगणवाडीत क्षार संजीवनी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे सुस्पष्ट धोरण असून ते तात्काळ उपलब्ध करून देण्यासही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सांगितले आहे.
       एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनीच कृती आराखड्याला मान्यता दिली असून त्यात क्षार संजीवनी खरेदी करण्यात टाळाटाळ केली गेली. महिला आणि बालकल्याण विभागाकडे पैसे नसल्याचे कारण देत उच्चपदस्थांनी क्षार संजीवनी खरेदीच्या निर्णयाचे दायित्व आरोग्य विभागाकडे ढकलले होते. अवघ्या ६ कोटी रुपयांची ही खरेदी असून शेकडो बालकांना यामुळे चांगले जीवन मिळणे शक्य असतांनाही ही खरेदी का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

हनगल (कर्नाटक) येथेमहाविद्यालयीन विद्यार्थिनींनी बुरखा घालण्यावरून वादंग !

      हनगल (कर्नाटक) - येथील श्री कुमारेश्‍वर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थिनींनी नियमाप्रमाणे गणवेश घालण्याऐवजी बुरखा परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एका गटाने आक्षेप घेतला आहे, तर बुरखा बंदी केल्यास शिक्षण सोडावे लागेल, अशी भूमिका मुसलमान विद्यार्थिनींनी मांडली आहे. या विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, बुरखा घालणे धर्मानुसार आहे. याच अटीवर त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षण घेण्याची अनुमती दिली आहे. तसेच आम्ही गणवेश घालून वरून बुरखा घालतो. विद्यार्थ्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे की, सर्वांना समान नियम लागू झाला पाहिजे. जर बुरख्यावर महाविद्यालयातील प्राचार्यांनी बंदी घातली नाही, तर इतर विद्यार्थी रंगी-बेरंगी कपडे घालून येतील. महाविद्यालयाचे प्राचायर्र् तीरुमले हे या वादाने त्रस्त झाले असून महाविद्यालयाच्या ३० वर्षांच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्हा पोलिसांच्या हिंदुविरोधी वर्तणुकीचा हिंदु संघटनांकडून निषेध !

      नगरकोईल (तमिळनाडू) - कन्याकुमारी जिल्हा पोलिसांच्या हिंदुविरोधी वर्तणुकीचा विविध हिंदु संघटनांनी निषेध केला आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या विरोधात हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच एक स्वाक्षरी मोहीम राबवली. जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या आयुध पूजा उत्सवाच्या वेळी बंदोबस्तासाठी शुल्क गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच जिल्हा पोलिसांनी अनेक हिंदूंना त्यांचा पारंपरिक धार्मिक उत्सव साजरा करण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप भाजप आणि विविध हिंदु संघटनांनी केला आहे. पोलीस अधीक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. (बदली केल्याने असे अधिकारी वठणीवर येत नाहीत. अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! - संपादक)

चेन्नई येथे हिंदुद्वेषी माजी प्रशासकीय अधिकार्‍याच्या श्रीरामाविषयीच्या अश्‍लाघ्य वक्तव्याच्या विरोधात उपोषण !

उपोषणात सहभागी झालेले धर्माभिमानी
     चेन्नई - माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले, तरी मला कुणी अडवू शकणार नाही, असे अश्‍लाघ्य आणि विडंबनात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हिंदु समाजात संतापाची लाट उसळली. त्याचा निषेध करून ख्रिस्तोदास गांधी यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चेन्नई येथील वल्लूवर कोट्टम या ठिकाणी अखिल भारतीय हिंदु महासभेने २८ ऑक्टोबर या दिवशी एक दिवसाचे उपोषण केले.

करमाळा (जिल्हा सोलापूर) येथे आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी एकावर गुन्हा प्रविष्ट

  • निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे अपप्रकार होणे, हे लोकशाही व्यवस्थेचे अपयश नव्हे का ?
  • मतांसाठी भांडी वाटप
        करमाळा, ३० ऑक्टोबर - सिद्धार्थनगर येथे मतदारांना भुलवण्यासाठी पाण्याची भांडी वाटताना जितेश कांबळे याला निवडणुकीच्या आचारसंहिता पथकाने २९ ऑक्टोबर या दिवशी रंगेहाथ पकडले. (पोलीस आणि निवडणूक आयोग यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधित पक्षावर कठोर कारवाई करावी. त्याशिवाय अशा अयोग्य गोष्टींना आळा बसणार नाही. - संपादक) या प्रकरणी जितेश कांबळे यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
        पथकाने कारवाई केली त्या वेळी जितेश कांबळे यांच्या घरातून तसेच, घराच्या कुंपणातून महिला पिण्याच्या पाण्याच्या स्टीलच्या टाक्या घेऊन बाहेर जात असतांना आढळून आल्या. त्यानंतर आरोपीच्या घराच्या कुंपणात जाऊन पाहिले असता काही पोथडयात बांधून ठेवलेल्या स्टीलच्या १८ टाक्या आढळून आल्या. त्यांची किंमत ९ सहस्र रुपये आहे. त्यामुळे स्टीलच्या पाण्याच्या टाक्या आदर्श आचारसंहिता कक्षेत वाटून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

शिवसेनेने सुनावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने कर्नाटक राज्योत्सवाचे आमंत्रण नाकारले !

अशी कृती केवळ शिवसेनाच करू शकते !
       बेळगाव, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - बेळगावसह सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध मार्गांनी प्रयत्न चालू आहेत. प्रतीवर्षी १ नोव्हेंबर या दिवशी राज्योत्सवाच्या नावाखाली दिवसभर धुडगूस चालू असतो. यंदा राज्योत्सवदिनी येथे कन्नड भाषिकांची गर्दी जमावी, यासाठी प्रशासनाने हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आमंत्रण दिले होते. शिल्पा शेट्टी यांनी आमंत्रण स्वीकारलेही होते; मात्र शिवसेनेने आपल्या पद्धतीने तिला सुनावल्याने तिने हे आमंत्रण नाकारले आहे. (मराठीच्या अस्मितेसाठी कृती करणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन ! - संपादक) यामुळे जिल्हा प्रशासनाची ऐन राज्योत्सवदिनी अडचण झाली आहे. त्यांनी यासाठी राज्योत्सवानिमित्त येथील सरदार्स हायस्कूल मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनाचे हसे झाले आहे.

पाटणा रेल्वेस्थानकावरील वायफायवरून पहाण्यात येणारी अश्‍लील संकेतस्थळे प्रतिबंधित करण्यात येणार !

      पाटलीपुत्र - विनामूल्य वाय-फाय सेवा असल्याने पाटणा रेल्वेस्थानकावर सर्वाधिक अश्‍लील संकेतस्थळे पाहिली जात असल्याचे उघड झाल्याने रेल्वे प्रशासनाने ही संकेतस्थळे वायफायवरून प्रतिबंधित करण्यास प्रारंभ केला आहे. रेल्वेगाड्यांविषयीची माहिती मिळण्यासाठी वाय-फाय सेवा चालू करण्यात आली होती; पण नागरिकांकडून याचा गैरवापर करण्यात येत आहे. (यासाठी देशातील नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! - संपादक)

भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात झालेल्या ९० वर्षीय वृद्धेच्या मृत्यूचा सूड म्हणून २७ भटक्या कुत्र्यांची हत्या !

भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे जनतेचा उद्रेक ! सरकारने लवकरात 
लवकर भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जनहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा !
      थिरूवनंतपुरम् - थिरूवनंतपुरम् येथे ५ भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ९० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर सूड घेण्यासाठी २७ भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याची घटना येथे घडली. जनसेवा शिशुभवन संघटनेच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी या भटक्या कुत्र्यांची हत्या केली. जनसेवा शिशुभवनचे प्रमुख मावेली आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जेव्हा मावेली यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी मानवी साखळी करत विरोध केला. आम्हीच त्यांना बोलावले होते, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जर अटक झाली, तर पोलीस ठाण्यासमोर मृत कुत्र्यांना घेऊन आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणीही त्यांनी दिली. आमचे घर आणि आम्ही सुरक्षित नसल्याने आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, असे एका स्थानिकाने सांगितले. या वेळी स्थानिकांनी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्यावरही टीका केली. वातानुकूलित गाडीमधून फिरणार्‍या मंत्र्यांना भटकी कुत्री किती धोकादायक आहेत कळणार नाही. हे फक्त सामान्य माणसाला कळू शकते, अशा भावना संतापलेल्या स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.

केरळ दुसरे काश्मीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने पाऊल उचलावे !

केरळ राज्यातील मुसलमानांच्या लोकसंख्येत गेल्या दशकात प्रचंड वाढ !
     कोची (केरळ) - वर्ष २००१ ते २०११ या दशकात केरळ राज्यातील मुसलमानांची लोकसंख्या हिंदु आणि ख्रिस्ती धर्मियांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणत वाढली आहे. एका वृत्तपत्राने केलेल्या परीक्षणात आढळून आले आहे.
१. वर्ष २००१ ते २०११ या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या ७८ लाख ६३ सहस्रांवरून ८८ लाख ७३ सहस्र झाली, तर हिंदू १ कोटी ७८ लाखांवरून १ कोटी ८२ लाखांपर्यंत पोचले. तसेच ख्रिस्त्यांची लोकसंख्या ६० लाख ५७ सहस्रांवरून ६१ लाख ४१ सहस्र एवढी झाली. म्हणजेच मुसलमानांची लोकसंख्या १२.२३ टक्क्यांनी, हिंदूंची २.२३ टक्क्यांनी, तर ख्रिस्त्यांची १.३८ टक्क्यांनी वाढली.

चिनी फटाक्यांची तस्करी रोखू न शकणारे सुरक्षादल चिनी सैन्याला कसे रोखणार ?

चिनी फटाक्यांची भारतात मोठ्या प्रमाणात तस्करी !
      नवी देहली - प्रत्येक वर्षी भारतात चीननिर्मित फटाके मोठ्या प्रमाणात तस्करी करून आणण्यात येतात. नुकतेच महसूल गुप्तहेर खात्याने मुंबईच्या बंदरातून ७ कोटी २० लाख रुपयांच्या चीननिर्मित फटाक्यांची चोरटी आयात पकडली. हे फटाके इतर साहित्यांमध्ये दाखवून कंटेनरद्वारे बंदरात उतरवण्यात आले होते. अर्थात यामागे बंदर अधिकारी आणि सीमा शुल्क (कस्टम) विभागातील अधिकार्‍यांचाही हात असतो.

हिंदू ऐक्य वेदीच्या राज्य अध्यक्ष श्रीमती शशिकला यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचा गुन्हा प्रविष्ट !

      कासारगोड (केरळ) - हिंदू ऐक्य वेदी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या केरळ राज्य अध्यक्षा श्रीमती के.पी. शशिकला यांच्या विरुद्ध जातीय भावना भडकवणारी भाषणे केल्याविषयी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय अधिवक्ता सी. शुकूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. (कम्युनिस्टांच्या राजवटीत शासकीय अधिवक्ता शुकूर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदु नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, यात नवल नाही. केरळ राज्यात शेकडो हिंदु नेत्यांची हत्या झाली, त्यातील किती आरोपींना अटक झाली आणि किती जणांना शिक्षा झाली याची आकडेवारी पोलीस घोषित करतील का ? - संपादक) 
       पोलिसांनी सांगितले की, शुकूर यांनी तक्रारीबरोबर जी ध्वनीचित्र-चकती जोडली, त्यातील काही भाग पाहून तक्रार दाखल करून घेण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीमती के.पी. शशिकला यांनी स्वत:वरील आरोप खोटे आहेत, असे म्हटले आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश फटाक्यांच्या दुकानांमध्ये आम्ही चिनी फटाके विकत नाहीचे फलक

शत्रू राष्ट्राला साहाय्य करणार्‍या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशप्रेम दाखवूया !
लालबाग येथील जी.व्ही.
खामकर यांनी दुकानावर
लावलेला चीनच्या
निषेधाचा फलक !
       मुंबई, ३० ऑक्टोबर (वार्ता.) - पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना छुपा पाठिंबा देणार्‍या चीनविषयी शत्रूराष्ट्राला साहाय्य करणारे राष्ट्र, अशी चीड देशवासियांमध्ये निर्माण होत आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालून चीनचा निषेध करण्याची जागृती नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. याचाच एक भाग म्हणजे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश फटाक्यांच्या दुकानांच्या बाहेर व्ही आर नॉट सेलिंग चायनीज क्रॅकर्स, असे फलक लावण्यात आले आहेत. 
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतंजली योग समिती, हिंदु जनजागृती समिती, आझादी बचाव आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी अनेक हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून देशवासियांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला देशवासियांकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबाही मिळत आहे. मुंबई गिरणगाव परिसरातील बहुतांश फटाक्यांच्या दुकानाबाहेर चिनी फटाके विक्रीसाठी नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. लालबाग येथील जी.व्ही. खामकर यांच्या फटाक्यांच्या दुकानावर चीनचा निषेध करत सर्व ग्राहकांना विनंती आहे. आमच्याकडे शत्रू राष्ट्राला मदत करणार्‍या राष्ट्राचे मेड इन चायना फटाके मिळत नाहीत. तुम्हीही ते खरेदी करू नका, असा फलक लावण्यात आला आहे. परिसरातील आजूबाजूच्या दुकानांच्या बाहेरही अशा प्रकारे फलक लावण्यात आले आहेत.

कोणत्याही परीक्षेची प्रश्‍नपत्रिका काढतांना सैराटसारखे प्रश्‍न विचारू नयेत ! - शिक्षण विभागाचे शाळांना आदेश

असे आदेश शाळांना द्यावे लागणे, हेच 
चिंताजनक आहे ! थिल्लर स्वरूपातील प्रश्‍न परीक्षेत 
विचारणार्‍या अशा शाळा त्यांचा दर्जाच दाखवतात !
       ठाणे - विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण?, हा प्रश्‍न भिवंडीमधील चाचा नेहरू हिंदी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी टीका केल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली. त्याचसमवेत अशा प्रकारच्या प्रश्‍नांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने यापुढे कोणत्याही परीक्षेची प्रश्‍नपत्रिका काढतांना सैराटसारखे प्रश्‍न विचारू नयेत, असे आदेशपर परिपत्रक ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दिवाळीच्या सुट्टीनंतर दिले जाणार आहे. (अशा प्रकारचे प्रश्‍न विचारणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाईही व्हायला हवी ! - संपादक)

इटलीला पुन्हा भूकंपाचा धक्का !

        रोम - ३० ऑक्टोबरला इटलीला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केटवर याची तीव्रता ६.६ इतकी मोजण्यात आली. यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. २६ ऑक्टोबरलाही येथे दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे येथील ऐतिहासिक इमारतींची हानी झाली. २ महिन्यांपूर्वी येथे आलेल्या भूकंपामुळे ३०० जणांना मृत्यू झाला होता, तर सहस्रो लोक बेघर झाले होते.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
        १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (इटलीला पुन्हा भूकंपाचा धक्क बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

पीटर मुखर्जींच्या सहभागाविषयी माहिती देण्यात आली नव्हती ! - मुख्यमंत्री

शीना बोरा हत्या प्रकरण
      मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीचा सहभाग नाही, अशी चुकीची माहिती मला सीबीआयकडे तपास देईपर्यंत मला देण्यात आली होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना वरील भाष्य केले. शीना बोरा हत्याप्रकरणात अति हस्तक्षेप केल्याने तत्कालीन आयुक्त राकेश मारिया यांचे स्थानांतर (बदली) करण्यात आले होते. या चुकीच्या माहितीमुळेच राकेश मारिया यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आले, अशी चर्चा आता होत आहे; परंतु मारीया यांचे स्थानांतर (बदली) होण्याच्या १२ दिवसांपूर्वी राकेश मारियांनी शीना बोरा प्रकरण हाताळले. या कालावधीत त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांना माहिती दिलीच नव्हती, असे मारिया यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे.

सरकारने तलाक पद्धत आणि धार्मिक गोष्टी यांमध्ये हस्तक्षेप करू नये ! - मुसलमान महिलांची मागणी

हिंदूंच्या धार्मिक गोष्टींत सातत्याने 
ढवळाढवळ करणारे शासन आणि तथाकथित 
बुद्धीवादी यांना या संदर्भात काय म्हणायचे आहे ?
       नागपूर - मुसलमान पंथातील तलाक पद्धत बंद करण्यात यावी, याकरिता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रयत्नांना विरोध करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे शेकडो मुसलमान महिलांनी २९ ऑक्टोबर या दिवशी मोर्चा काढला.
       आसरा फाऊंडेशनच्या वतीने हा मोर्चा येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट येथून संविधान चौकापर्यंत काढण्यात आला. मुसलमान समाजातील महिलांना शरीयतचा कायदा संमत आहे आणि समान नागरी कायद्याला तीव्र विरोध आहे. (मुसलमान महिलांचे धर्मप्रेम जाणा ! किती हिंदु महिला हिंदु धर्माचरणाविषयी जागरूक असतात ? - संपादक) या देशातील मुसलमान समाज हा सौदी अरब, पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही इस्लामी देशाचे नियम मानत नाही, तर कुराण आणि हदीस यांवर या समाजाचा विश्‍वास आहे. या देशात इंग्रजांनी कधीही मुसलमानांच्या कायद्यात पालट करण्याचा प्रयत्न केला नाही.

संभाजीनगर येथे फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्याप्रकरणी अग्नीशमन दल प्रमुखांचे निलंबन

पालिका आयुक्तांनी केली कारवाई
         संभाजीनगर - येथील जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांच्या १८५ दुकानांना २९ ऑक्टोबर या दिवशी आग लागली होती. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अग्नीशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. (या प्रकरणी पालिका आयुक्तांनी दोषींवर कारवाई करण्यासमवेत फटाक्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करावेत. - संपादक)

डोंगरी (मुंबई) येथील दाऊदच्या अवैध इमारतीवर पालिकेचा हातोडा

मंदिरे पाडण्यासाठी तत्पर असलेल्या प्रशासनाने 
कुख्यात गुंडाच्या अवैध इमारती तात्काळ पाडाव्यात !
         मुंबई - डोंगरी येथील निशानपाडा क्रॉस लेन परिसरातील ७ मजल्यांच्या अवैध इमारतीवर पालिकेने २८ ऑक्टोबर या दिवशी कारवाई करून पाडण्यास प्रारंभ केला. ही पूर्ण इमारत पाडण्याचेे आदेश देण्यात आले आहेत. हे बांधकाम कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
         आतापर्यंत २ मजले पाडले असून उर्वरित मजलेही पाडण्याची सिद्धता पालिकेने केली आहे. ही कारवाई करण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या फौजफाट्यासह आले होते. उर्वरित मजल्यांवर कारवाईची प्रक्रिया चालूच रहाणार असल्याचे पालिकेचे साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी सांगितले.

माझा मुलगा हेरगिरी करत असल्याचे समजले असते, तर त्याला मीच गोळ्या घातल्या असत्या !

हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात 
आलेल्या सुभाष जंगीर याच्या वडिलांचा संताप !
        नागौर (राजस्थान) - शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून निवृत्त झालेले हरिराम यांच्या सुभाष जंगीर या मुलाला हेरगिरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावर हरिराम यांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, त्याच्या वागण्यावरून तो हेरगिरी किंवा चुकीचे काम करत असल्याचे माझ्या लक्षात आले नाही. मला ते समजले असते, तर मी त्याला तेव्हाच गोळ्या घालून ठार केले असते. (याच हेरगिरी प्रकरणी रमजान, शोएब आणि फरहत खान यांनाही अटक करण्यात आली आहे; मात्र त्यांच्या नातेवाइकांपैकी कोणीही त्यांच्या विरोधात विधान केलेले नाही ! - संपादक) हरिराम शिस्तप्रिय असून ते सामाजिक कार्यही करतात.

पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली !

       शिमला (हिमाचल प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील समदो येथे भारतीय सैनिक आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दल यांच्या समवेत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांबरोबर दिवाळी साजरी केल्याने सैनिकांचा आनंदही द्विगुणित झाला. या वेळी मोदी यांनी सैनिकांना मिठाई वाटली. सैनिकांनीही मोदी यांना मिठाई दिली. समदो येथे जाण्यापूर्वी मोदी काही वेळ चांगो या गावातही थांबले. पंतप्रधान गावात आल्याचे बघून ग्रामस्थांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला होता. मोदींनी गावातील लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बहिष्कारामुळे चिनी उत्पादन व्यवसायाला ३५ टक्के प्रमाणात फटका

भारतियांनो, स्वदेशीचा 
अधिकाधिक पुरस्कार करा !
        नागपूर - येथील ग्राहकांनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याने स्वदेशी बनावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. या बहिष्कारामुळे चिनी व्यवसायाला ३५ टक्के इतक्या प्रमाणात फटका बसला आहे. सलग दहा वर्षांनंतर स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली आहे. अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने देशभरातील २० शहरातील व्यापारी संघटनांकडून घेतलेल्या माहितीतून हे उघड झाले आहे.

तुकाराम मुंढेंचे डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संकुलाचे बांधकाम पाडण्याचे आदेश

        नवी मुंबई - नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संकुलात ९ मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत त्याची अनुमती रहित करून ते पाडण्याचे आदेश नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेनी दिले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढेवर अविश्‍वास ठराव आणल्यानंतरही त्यांची कारवाई चालू आहे.
        डी.वाय. पाटील समूहाने वाहनतळाच्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारली आणि प्रत्यक्षातली वाहनतळाची इमारत उद्यानावर उभारण येत आहे. ३० दिवसांत ही स्वतःहून न पाडल्यास महापालिका पाडणार आहे.

नक्षलवाद्यांना ठार केल्याच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबरला ५ राज्यांमध्ये बंद !

     ओरिसा - पाच दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश-ओरिसा सीमेवर पोलिसांनी ३० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबरला ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये बंद पुकारला आहे. २४ ऑक्टोबरला ओरिसातील कमांडोंशी झालेल्या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाले. त्यानंतर २७ ऑक्टोबरला पानस्पूत जंगलात आणखी दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार मारले. याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनीची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कारवाई करणार ! - ठाणे पोलीस

       ठाणे - दिवाळी उत्सवाच्या काळात फटाक्यांच्या ध्वनीमुळे शहरात होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायालयाने सुचवलेल्या ध्वनीच्या मर्यादांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी ठाणे पोलिसांनी दिली आहे.
       १५ नोव्हेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पथके नेमण्यात आली आहेत. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, तर रात्री ७० डेसिबलपेक्षा न्यून, वाणिज्य क्षेत्रात दिवसा ६५, तर रात्री ५५ डेसिबलपेक्षा न्यून, निवासी क्षेत्रात दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबलपेक्षा न्यून, शांतता क्षेत्रात दिवसा ५०, तर रात्री ४० डेसिबलपेक्षा न्यून ध्वनी असणे अपेक्षित आहे.

देशातील सर्व स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषांचा समावेश बंधनकारक !

केंद्र सरकारचा स्तुत्य निर्णय !
        मुंबई, ३० ऑक्टोबर - येत्या १ जुलै २०१७ पासून भारतात विकल्या जाणार्‍या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत घेण्यात आलेल्या या सरकारी निर्णयामुळे सर्व भ्रमणभाष आस्थापनांना स्मार्टफोनमध्ये मजकूर वाचण्यासाठी भारतीय भाषांचा सपोर्ट द्यावा लागणार आहे. यामुळे इंग्रजी भाषा न जाणणार्‍या जवळपास १०० कोटी देशवासियांना भ्रमणभाषचा वापर करता येणार आहे. यामुळे ई-गव्हर्नन्स ट्रान्झॅक्शन, ई-कॉमर्स बिझनेच आदी गोष्टींना चालना मिळेल, अशी माहिती भारतीय सेल्युलर असोसिएशनचे अध्यक्ष पंकज महिंद्रो यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारकडून साजर्‍या करण्यात येणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध !

       बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून १० नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. टिपू धर्मांध आणि हिंसाचारी होता, असे संघाने म्हटले आहे. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक यांचे प्रांत संघचालक व्ही. नागराज म्हणाले की, आमची संघटना रस्त्यावर उतरून टिपू जयंतीला विरोध करणार आहे.

इस्रो १५ जानेवारी २०१७ या दिवशी एकाच वेळी ८२ उपग्रह अंतराळात पाठवणार !

       मुंबई - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) १५ जानेवारी २०१७ या दिवशी एकाच वेळी ८२ उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. यात ६० अमेरिकेचे, २० युरोपचे आणि २ इंग्लंडचे उपग्रह असणार आहेत. आतापर्यंत एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह पाठवण्याचा विक्रम रशियाचा असून त्याने १९ जून २०१४ या दिवशी ३७ उपग्रह अंतराळात पाठवले होते. भारताने यापूर्वी २२ जून २०१६ या दिवशी २० उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवले होते.

शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

         पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०१७ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणार्‍या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे दिनांक जाहीर झाले आहेत. त्यानुसार १० वीची लेखी परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च, तर १२ वीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत होईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लहान मुलांच्या पावडरमुळे महिलेला कर्करोग झाल्याने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आस्थापनाकडून ४६७ कोटी रुपयांची हानीभरपाई !

       सेंट लुइस (अमेरिका) - लहान मुलांसाठी पावडर बनवणार्‍या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या आस्थापनाने एका तक्रारदार महिलेला दंडाच्या रूपात ४६७ कोटी रुपयांची हानीभरपाई द्यावी, असा निर्णय कॅलिफोर्नियातील एका न्यायालयाने दिला आहे. लहान मुलांच्या पावडरमुळे कर्करोग झाल्याची तक्रार या महिलेने केली होती. कर्करोगाने पीडित महिलेवर वर्ष २०१२ पासून उपचार करण्यात येत आहेत. ही महिला अनेक वर्षांपासून या आस्थापनाची बेबी पावडर आणि शॉवर टू शॉवर ही उत्पादने वापरत होती.

सातवली (जिल्हा पालघर) येथे स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी एकाला अटक

       मुंबई - पालघर जिल्ह्यातील सातवलीमधील एका गोदामात १५ किलो स्फोटके सापडली होती. त्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने २९ ऑक्टोबर या दिवशी एकाला अटक केली आहे. तो साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोठून आणला होता, याचा तपास सध्या आतंकवादविरोधी पथक करत आहे.

प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या टोलवाटोलवीविषयीचा तापदायक अनुभव !

        आचारसंहितेच्या काळात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करता येऊ शकते का, या संदर्भात अधिकृत माहिती मिळवण्यासाठी पुणे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी प्रशासनाला भ्रमणभाष केले. त्या वेळी त्यांना आलेला अनुभव पाठवत आहे.
        श्री. गोखले यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नागरिकांसाठी असणार्‍या सारथी लाईनला भ्रमणभाष केल्यावर त्या संदर्भात निवडणूक विभागामध्ये संपर्क साधण्यास सांगण्यात आले. तसा प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने श्री. गोखले यांनी पुन्हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत संपर्क साधला. त्यानंतर श्री. गोखले यांना पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
        पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागात कार्यरत असणार्‍या एका महिला कर्मचार्‍याने सभा घेऊ शकतो असे सांगितले; पण अजून काही विचारण्याच्या आतच दूरभाष बंद केला. श्री. गोखले यांनी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला असता अन्य एका महिला कर्मचार्‍याने दूरध्वनी उचलून सभा घेता येऊ शकत नाही, असे ठामपणे सांगितले. एवढे सांगून दूरभाष बंद करण्यात आला.

चिनी वस्तूंवर बहिष्कार, स्वदेशी धोरण आणि चीनची स्थिती !

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
      उरी आक्रमणामुळे आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत असून आपले जवान हुतात्मा होत आहेत, तर आतंकवादीही पुन्हा पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची हिंमत करत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणजे चीन ! भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी चीन पाकिस्तानला सहकार्य करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या अनुषंगाने भारतातही सोशल मिडियात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तसेच राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे, चिनी वस्तू न विकणे यांविषयी निदर्शनांद्वारे, निवेदने देऊन आदी माध्यमांतून भारतियांचे प्रबोधन करत आहेत. या मोहिमांचा झालेला परिणाम, स्वदेशी हेच राष्ट्रीय धोरण अवलंबण्याची आवश्यकता आणि चीनला नमवण्यासाठी अवलंबायचे उपाय यांविषयी दिशादर्शन करणारे ३ लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, पुणे (संदर्भ : brighemantmahajan.blogspot.com/)

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी : भारतविरोधी के.जी.बी.च्या एजंट (?)

३१ ऑक्टोबर या दिवशी असलेल्या इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त
       डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंड येथे के.जी.बी. (कॉमितेत गोसुदरस्त्वेनॉय बेझोपास्नोस्ती) या रशियन गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी वासिली मित्रोखिन यांचे द मित्रोखिन आर्काइव्ह नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकातील माहितीमुळे आपल्या देशातील राजकीय जगतात प्रचंड खळबळ माजली. वर्ष १९४८ ते १९८५ या काळात म्हणजे एकूण ३७ वर्षे मित्रोखिन के.जी.बी.चा अधिकारी होता. या पुस्तकात के.जी.बी.च्या भारतीय कृत्यांचा गोषवारा आहे. त्याचाच इंदिरा गांधींच्या स्मृतीदिनी घेतलेला वेध...

...तरीही फटाके वाजवणार का ?

     दिवाळी या प्रकाशाच्या सणास फटाक्यांमुळे गालबोट लागत आले आहे. फटाक्यांमुळे भाजणे, कायमस्वरूपी अवयव गमवावा लागणे आदी धोके ज्ञात असूनही तो स्वीकारत त्या धोक्याच्या मार्गावरून चालणारे स्वतःसमवेत इतरांचाही जीव धोक्यात टाकत असतात, हे मात्र ते विसरतात ! त्या फटाक्यांची किंमत आणि त्यामुळे गमवाव्या लागणार्‍या अवयवाची किंमत याची तुलना कदापि शक्य नाही. फटाक्यांमुळे देहास इजा झाल्यास किती वेदना होतात, याचा अनुभव घेण्याची आपल्याला हौस लागली आहे का ? फटाके फोडण्याच्या अतिरेकाच्या नादात जे होरपळले आहेत, ते इतरांना फटाके न फोडण्याचे सांगतांना दिसतात.

पू. जोशीआजोबारूपी संतरत्न । साधकांना अमृत स्वरूपात प्राप्त झाले ॥

पू. जयराम जोशी
साधकांना आपलेसे करणारे खळखळणारे हास्य ।
निर्मळता आहे अंतर्बाह्य ॥ १ ॥

उपाय करून ममत्वाने वात्सल्य देतात ।
कुटुंबातील सदस्याप्रमाणे ॥ २ ॥

क्षणोक्षणी कर्तेपणा वाहिला गुरुचरणी ।
गुरूंची प्रतिमा वसली त्यांच्या मनी ॥ ३ ॥

शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून ।
साधकांना चैतन्य प्रदान केले भरभरून ॥ ४ ॥

प्रेमळ, इतरांना साहाय्य करणारे आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेले जळगाव येथील श्री. मदन कृष्णराव ठाकरे !

श्री. मदन ठाकरे
१. वडिलांचे राहणीमान अत्यंत साधे आहे.
२. कष्टाळू : लहानपणापासून त्यांना सतत कष्ट करण्याची सवय आहे. वडिलांचे जीवन कष्ट करण्यातच गेले. 
- सौ. सुप्रिया पाटील (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि श्री. प्रफुल्ल मदन ठाकरे (मुलगा), लंडन 
३. मोकळेपणा : वडील सर्वांशी मोकळेपणाने बोलतात. अजूनही त्यांच्या मनाविरुद्ध काही प्रसंग घडले, तर ते लगेच विसरून मोकळेपणाने आणि प्रेमाने वागतात.
४. प्रेमभाव 
अ. लहानपणी एकदा मी त्यांच्याकडे हापूस आंब्यासाठी हट्ट केला होता. त्या वेळी त्यांच्याकडे पैसे नसतांना त्यांनी ५०० रुपये उसने घेऊन मला आंबे आणून दिले होते. त्यांनी मला कधीही सहलीला पाठवायला नकार दिला नाही.

ऐश्‍वर्या, म्हणावेसे वाटते तुला शौर्या !

ऐश्‍वर्या जोशी 
चिमुकली सखी नि लडीवाळ प्रिय ऐश्‍वर्या ।
तुझ्या गुणांकडे बघून म्हणावेसे वाटते तुला शौर्या ॥ १ ॥

सुमधुर वाणी अन् गोंडस चेहरा ।
बोलके डोळे नि तोंडवळ्यावर ओसंडणारा आनंद ॥ २ ॥

सहवास तिचा वाटतो हवाहवासा ।
ज्ञानरूपी प्रकाशाचा जणू लहानसा कवडसा ॥ ३ ॥

आकाशातील जणू अढळ ध्रुवतारा ।
ईश्‍वररूपी गुरूंच्या हृदयात सदैव वास्तव करणारा ॥ ४ ॥

देवाने दिधले ऐसे माता-पिता ।

देवाने दिधले ऐसे माता-पिता ।
करती मार्गदर्शन जाण्या संतपदा ॥ १ ॥

करून देती आठवण ध्येयाची ।
कास धरूनी श्रीकृष्ण चरणांची ॥ २ ॥

सत्वरी त्याच्या हृदयासी जा, असे म्हणती । 
कर ध्यान अभ्यासाच्या सांगती ॥ ३ ॥

एका साधिकेने प.पू. डॉक्टरांना उद्देशून केलेली काव्यात्मक कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
तुम्ही शिकवली सारी साधनेची तत्त्वे ।
म्हणून साधक करू शकतील काळावर मात ॥ १ ॥

तुम्ही शिकवले साधनेचे पैलू ।
म्हणून साधक साधनेत स्थिरावून लागले संकटे झेलू ॥ २ ॥

तुम्ही दाखवली साधनेची अंगे ।
म्हणून साधक सारे तुमच्या तत्त्वामागे ॥ ३ ॥

महर्षींनी साधकांच्या जन्माचे रहस्य सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
   नाडीवाचन क्रमांक १०२मध्ये महर्षि म्हणतात, खरे अध्यात्म काय आहे ?, हे साधकांना कळले पाहिजे. नारदांप्रमाणे श्रीमत् नारायणाची स्तुती संपूर्ण जगामध्ये करण्यासाठीच आपल्या सर्व साधकांचा जन्म आहे, हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवले पाहिजे. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

महर्षींनी प.पू. डॉक्टर, कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांच्या कार्याविषयी काढलेले उद्गार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
      महर्षि म्हणाले, जसा सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही, त्याचप्रमाणे परम गुरुजी, कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदाताई) या तिघांशिवाय धर्मस्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे त्रिमूर्तींप्रमाणेच हे ३ गुरु आहेत. या तिघांचाही उल्लेख आता आम्ही तीन गुरु, असा करत आहोत. हे तिघेही गुरु वज्रासारखे आहेत. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०२, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६)
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, दुपारी ४.३२)

विकार-निर्मूलनासाठी एखादा उपाय लागू पडेल कि नाही, हे उपायांचा उद्देश, त्या व्यक्तीचे प्रारब्ध आणि काळ यांवर अवलंबून असणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       शिव-स्वरोदयशास्त्रावर ग्रंथलिखाण चालू होते. विकार-निर्मूलनासाठी उपायांचे ते शास्त्र सनातनच्या साधकांसाठी नवीन होते. त्यामुळे त्या शास्त्राचा थोडाफार अभ्यास झाल्यावर मी माझ्याकडे एखाद्या विकारावर उपाय विचारण्यासाठी येणार्‍या साधकांना स्वरोदयशास्त्राचा कसा काय लाभ होतो, हे पहाण्याचे ठरवले आणि त्यांना त्यानुसार उपाय सांगितले. आश्‍चर्य म्हणजे माझ्याकडे आलेल्या सर्वच्या सर्व, म्हणजे १०० टक्के साधकांना या उपायांचा लाभ झाला आणि त्यांचा तो तो विकार दूर झाला. त्या साधकांनी त्यांच्या अनुभूती लिहून दिल्या. त्यानंतर ग्रंथात घेण्यासाठी स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या उपायांचा व्यक्तीवर झालेला परिणाम वैद्यकीय चाचणीद्वारे अभ्यासण्याच्या संदर्भात प्रयोग चालू केले. तेव्हा असे लक्षात आले की, आधी ज्याप्रमाणे या उपायांचा १०० टक्के लाभ झाला, त्याप्रमाणे या प्रयोगांच्या वेळी तेवढ्या प्रमाणात साधकांना विकार-निर्मूलनासाठी लाभ होत नाही. असे का ? याचे चिंतन करत असतांना मला देवाने पुढील सूत्रे सुचवली.

उत्तम निरीक्षणक्षमता आणि इतरांचा विचार करणारे श्री. प्रफुल्ल मदन ठाकरे अन् काटकसरी आणि इतरांशी जुळवून घेणारी सौ. अवंती ठाकरे !

श्री. प्रफुल्ल मदन ठाकरे आणि
सौ. अवंती प्रफुल्ल ठाकरे
१. श्री. प्रफुल्ल मदन ठाकरे 
(भाऊ) यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. उत्तम निरीक्षणक्षमता
     भावाला लहान मुले पुष्कळ आवडतात. तो त्यांची गुणवैशिष्ट्ये अचूक टिपतो. त्याची निरीक्षणक्षमता चांगली असल्याने तो मला स्वभावदोष-निर्मूलनासाठी चांगले साहाय्य करतो. 
१ आ. नियोजनबद्धता
     कुठे फिरायला जाणे असो किंवा आर्थिक व्यवहार असो, त्याची कुठलीही गोष्ट नियोजनबद्ध असते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी सुरळीत होतात.
                   १ इ. इतरांचा विचार करणे
      लग्नानंतर त्याने स्वत:त बरेच पालट केले. त्याने आवडीनिवडी अल्प केल्या आहेत.

देवद (पनवेल) येेथील सनातन आश्रमात प.पू. पांडे महाराजांनी केलेले मार्गदर्शन आणि तेथे सेवा करतांना आलेल्या अनुभूती

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराजांनी केलेले मार्गदर्शन 
१ अ. स्वच्छता या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ : स्वच्छता (स्व + अच्छ) म्हणजे स्वतःवरचे आवरण काढणे किंवा आत्म्याला बाहेरून स्वच्छ करणे. एखादी वस्तू आपण स्वच्छ करतो, म्हणजे तिच्यावरील धूळ काढतो; त्याचप्रमाणे आपल्याला साधना करून आत्म्यावरील आवरण, म्हणजे धूळ स्वच्छ करायची आहे.
१ आ. स्वच्छतेचा मनावर होणारा परिणाम : आपण जे पहातो, त्याचा मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे वस्तू किंवा कचरा उचलून आपण एखादी जागा स्वच्छ केली की, त्याचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. 
१ इ. मायेतील शिक्षण आणि साधना यांतील भेद : मायेतल्या (महाविद्यालयातील) शिक्षणातून आपल्याला खरे ज्ञान मिळत नसते, ते साधना केल्यानेच मिळते.

कु. सर्वमंगला मेदी त्यांना सुचलेले भावजागृतीसाठी करावयाचे प्रयत्न आणि त्यांनी दिवाळीनिमित्त प.पू. गुरुमाऊलीला दिलेले शुभेच्छापत्र !

कु. सर्वमंगला मेदी 
भावप्रयोग 
     या देहरूपी पणतीत गुणरूपी कापसाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनारूपी वाती अन् भावरूपी तेल घालूया, म्हणजेच भावपूर्ण साधना करूया. गुरुकृपेने संत आणि साधक रूपी कयपंजीच्या माध्यमातून त्यांच्या आदर्शांच्या ज्योतीने आपल्यादेहरूपीपणतीतील ज्योतप्रज्वलित करूया. ज्योतीने ज्योत उजळूया. प्रज्वलित पणतीच्या चैतन्य आणि आनंद रूपी प्रकाशाने आपल्यातील स्वभावदोष अन् अहंरूपी अंधःकार दूर करूया. पणतीच्या सर्वत्र पसरलेल्या प्रकाशामुळे आपल्याला श्रीगुरूंचे दर्शन होत आहे. 
     आता आपण श्रीगुरूंच्या सुकोमल चरणी विनम्र होऊन संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना करूया, हे गुरुदेवा, आत्मजोतहीतुमचीच आणि साधनेत येणार्‍या विविध अडचणीरूपी वारेही तुमचेच ! अडचणीच्या वार्‍याने आत्मजोत फडफडू लागली,

स्वतःतील स्वभावदोष आणि अहंचे पैलू लिहिलेली पाटी गळ्यात घातल्यावर साधकाची झालेली विचारप्रक्रिया

श्री. किरण पोळ
     पू. बिंदाताई, मी माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू लिहिलेली पाटी गळ्यात घातल्यावर माझ्यात पुढील पालट झाले.
     हल्लीच्या किरण पोळ यांना पाहिल्यावर त्यांच्यात पूर्वी अनेक दोष होते, हे खरे वाटत नाही !
- एक संत
१. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेला 
आलो आहे, असे वाटून सर्वांचासाधकाकडे पहाण्याचा दृष्टीकोन 
पालटणे आणि त्यामुळे अनावश्यक बोलणे हा दोष अल्प होणे
     माझी प्रतिमाच मोडीत निघाली. माझी आश्रमातील जवळपास सर्वांशी ओळख आहे. मी गळ्यात पाटी घातल्यामुळे मी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेला आलो आहे, असे सर्वांना वाटायचे. त्यामुळे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आणि माझाही अनावश्यक बोलणे हा दोष अल्प झाला.

साधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥

     दिवाळी आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वात मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. संतांनी दिवाळीच्या आनंदाची तुलना आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक आनंदाशी केलेली आहे.
१. संत ज्ञानेश्‍वर 
मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेकदीप उजळी । 
तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥ 
- ज्ञानेश्‍वरी, अध्याय १५, ओवी ५४ 
सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ॥ 
- ज्ञानेश्‍वरी, अध्याय १५, ओवी १२

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा ऑक्टोबर २०१६ या मासातील तिसर्‍या आठवड्याचा सनातन संस्थेच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या माध्यमातून धर्मप्रसार 
अ. जबलपूर (मध्यप्रदेश) येथे मराठी उद्योजक संघाच्या वतीने आयोजित आनंद मेळाव्यात सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन अन् विक्री केंद्र उभारले होते. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
आ. १३.१०.२०१६ या दिवशी उज्जैन येथे श्री. राम पाटीदार यांनी एका धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेत अखंड हिंदु सेनेचे संस्थापक महामंडलेश्‍वर शेखर आचार्यजी यांनी मार्गदर्शन केले. या विशाल धर्मसभेत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र, धर्म इत्यादी विषयांवरील ग्रंथांचे विक्री केंद्र उभारण्यात आले होते. यासाठी महामंडलेश्‍वर शेखर आचार्यजी, श्री. अभिजीत शर्मा आणि श्री. राम पाटीदार यांचे सहकार्य लाभले. 
- श्री. योगेश व्हनमारे, मध्यप्रदेश
२. प्रवचन 
      राजस्थानच्या देवली (जिल्हा टोंक) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या राखीव तुकडीच्या ३५ जणांना अध्यात्म के मूलभूत सिद्धांत या विषयावर श्री. किरण नोगिया यांनी मार्गदर्शन केले. 
- श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान

निर्मळ मनाचा, उत्तम स्मरणशक्ती आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. मिहीर भूषण भोळे (वय १७ वर्षे)

कु. मिहीर भूषण भोळे
      बलिप्रतिपदा (३१.१०.२०१६) या दिवशी कु. मिहीर भूषण भोळे याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि अन्य नातेवाइक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कु. मिहीर भूषण भोळे याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. जन्मापूर्वी 
अ. गर्भारपणात मी प्रतिदिन दत्ताची भजने म्हणत असे. माझ्याकडून देवपूजा भावपूर्ण होत असे. मी दत्ताची भजने आणि श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असतांना मला गर्भाची हालचाल जाणवायची.

स्वप्नात कैलास पर्वतावरील भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या आसनाच्या मागे भगवान श्रीकृष्ण सुदर्शनचक्र घेऊन उभा असल्याचे दृश्य दिसणे आणि त्या आसनावर प.पू. भक्तराज महाराज अन् प.पू. गुरुदेव यांचे चरण दिसून सभोवताली पांढरा प्रकाश दिसणे, बाजूला फुलांनी रांगोळी काढलेली पाहून भावजागृती होणे, हेच दृश्य संध्याकाळी नामजप करतांना दिसणे

      ११.७.२०१५ या दिवशी दुपारी आश्रमातील भांडी घासण्याची सेवा करून झोपलो असतांना मला एक दृश्य दिसले. यामध्ये निळे आकाशमंडल असून त्यात चंद्र आणि तारे दिसत होते. नंतर मला कैलास पर्वत दिसला. ज्या ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती बसतात, त्या आसनाच्या मागे भगवान श्रीकृष्ण सुदर्शनचक्र घेऊन उभा असल्याचे दिसले. भगवान शिव आणि माता पार्वती बसतात, त्या आसनावर प.पू. भक्तराज महाराज यांचे चरण आणि त्यांच्या बाजूला प.पू. गुरुदेवांचे चरण दिसत होते. 
      दोन्ही चरणांच्या सभोवताली पांढरा प्रकाश दिसत होता. तसेच दोन्ही चरणांच्या बाजूला फुलांनी रांगोळी काढली होती. हे बघून माझी भावजागृती झाली. हेच दृश्य मला संध्याकाळी ध्यानमंदिरात नामजप करतांना दिसले. त्या वेळी श्रीकृष्ण बासरी वाजवत असल्याचे दिसले. 
- श्री. मनोज कुवेलकर, रामनाथी आश्रम, गोवा. (११.७.२०१५) 

रामनाथी आश्रमात आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

१. देवाशी अनुसंधान वाढल्याचे जाणवणे : रामनाथी आश्रमात येण्याची अनुमती मिळाल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हापासून मी प.पू. गुरुदेवांशी सतत बोलत होते. त्यांना सर्व सांगत होते. त्यामुळे देवाशी अनुसंधान वाढल्याची जाणीव झाली. 
२. दैवी कण दिसणे : आश्रमात गेल्यापासून तीन दिवसांत वेगवेगळ्या रंगांचे दैवी कण कपड्यावर, हातावर आणि मुखावर आढळले. 
३. आश्रमात चैतन्याचा प्रचंड स्रोत आहे, असे जाणवले.
४. दैनिक कार्यालयात आसंदीवर बसल्यावर हवेत तरंगल्याप्रमाणे वाटत होते.
५. आश्रमातील भिंतीवर हात ठेवल्यावर हाताच्या सावलीमध्येही प्रकाश दिसत होता; म्हणून भिंतीवर सतत हात ठेवावा, असे वाटत होते.
६. आश्रमात सर्वत्र प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांचे अस्तित्व जाणवून भावजागृती होत होती. 
- सौ. अनिता चारुदत्त जोशी, संभाजीनगर (१९.४.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

फलक प्रसिद्धीकरता

याला भारतीय गुप्तचर 
यंत्रणांचा ढिसाळपणा म्हणायचे का ?
       समाजवादी पक्षाचे खासदार मुनव्वर सलीम यांचा खाजगी साहाय्यक महमंद फरहत खान याला हेरगिरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली असून तो गेली २० वर्षे आयएस्आयसाठी हेरगिरी करत होता. पाक उच्चायुक्तालयाकडून त्याला साहाय्य करण्यात येत होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jasusike liye giraftar sansad Munawwar Salimka sachiv gat 20 varshose ISIke liye kam karta tha.  
Kya ye Bharatiya Guptachar vibhagki akaryakshamata nahi
जागो ! : जासूसी के लिए गिरफ्तार सांसद मुनव्वर सलीम का सचिव गत २० वर्षों से आयएस्आय के लिए काम करता था.
क्या यह भारतीय गुप्तचर विभाग की अकार्यक्षमता नही ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

अनुभूती येण्यामागील कारणे

१. प्रवासात असतांना एखादे दृश्य का दिसते ? त्याच्यापाठी काही कारण नसते, तर वाटेतील ते अनुभव असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातल्या सूक्ष्मातील प्रवासात अनुभूती येतात.
२. ईश्‍वराला अनुभूतीतून काहीतरी शिकवायचे असते. 
३. कधी मायावी वाईट शक्तीही चांगल्या अनुभूती देतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. 
आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भोगवृत्तीचे निर्मूलन व्हावे !

संपादकीय
       आज बलीप्रतिपदा ! साडेतीन मुहुर्तांपैकी आजचा अर्धा मुहूर्त ! असुर घराण्यातील असूनही प्रजेला सुख-समृद्धी देणार्‍या अन् उदारवृत्तीच्या बलीराजाचा आज वामनावताराने उद्धार केला. त्रिपाद भूमीचे दान म्हणून बली राजाच्या जीवनाला कलाटणी दिली. वास्तविक बलीच्या राज्यात प्रजा सुखी होती; मात्र भोगमय विचार आसुरी वृत्तीला पोषक असतात. त्यामुळे त्यागाची भावना असलेले सुख आणि समृद्धी राष्ट्रासाठी पोषक असतात. भगवंताने बलीच्या प्रजेलाही या निमित्ताने योग्य दिशादर्शन केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn