Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ३० व्या संत सद्गुरु 
(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आज वाढदिवस

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ८ आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रे नष्ट केली !

 • काँग्रेसच्या काळात अशा प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही, हे त्यांनी आता सांगायला हवे !
 • पंतप्रधानांना पाकमधील अन्य आतंकवादी केंद्रे अशाच पद्धतीने नष्ट करण्यासाठी शुभेच्छा !
 • ४० आतंकवादी ठार
         नवी देहली - उरी येथील आक्रमणाचा प्रतिशोध घेतांना भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ असलेली ६ ते ८ आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रे नष्ट केली. ही कारवाई २८ सप्टेंबरच्या उत्तररात्री साडेबारा ते २९ सप्टेंबरच्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत म्हणजे ४ घंट्यांच्या कालावधीत सैन्याच्या कमांडोंनी केली. यात ४० आतंकवादी ठार, तर अनेक जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पाकचे २ सैनिक ठार आणि ९ सैनिक घायाळ झाल्याचेही म्हटले जात आहे. येथे काही आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याची सिद्धता करत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सैन्याच्या सैनिकी कारवाई पथकाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या मोहिमेवरील सर्व भारतीय सैनिक सुखरूप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय सैन्याने या कारवाईची माहिती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना दिली आहे. या कारवाईविषयी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेत्यांनी सैन्याचे अभिनंदन केले आहे.

धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अनेक वेळा बलात्कार करून धर्मांतर !

रांची (झारखंड) येथे लव्ह जिहाद
       रांची - शहरात पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इमरान या धर्मांधाने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. याची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) बनवून तिला ब्लॅकमेल केले. तिला ठार मारण्याची धमकी देऊन बलपूर्वक गोमांस खाण्यास लावले. एवढेच नव्हे, तर तिचे नाव पालटून धर्मांतरही केले. येथील पंडरा भागात पीडितेच्या घरात घुसून इमरानने तिला मारहाण केली आणि घरातून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हे पाहून स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडितेने इमरानच्या विरोधात तक्रार केली आहे. पीडितेने न्यायालयाला सांगितलेली सूत्रे खालीलप्रमाणे ...
बहीण संबोधून पीडितेच्या 
घरच्यांचा विश्‍वास जिंकला !
       पीडितेला तिच्या भावासाठी जुनी दुचाकी खरेदी करायची होती. ओएल्एक्स्वर विज्ञापन पाहून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला. यातून इमरानशी परिचय झाला. त्याने तिला दुचाकी पहाण्यासाठी बोलावले. पीडितेने जुनी दुचाकी खरेदी केली.

आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्यभरात निवेदने

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन 
संस्था यांचा आदर्श नवरात्रोत्सव उपक्रम !
        सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. परिणामी या उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होऊन नंतरच्या काळात गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. हे सर्व थांबून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यात यावा, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राज्यभरात पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आले.
        निवेदनात म्हटले आहे की, नवरात्रोत्सवाच्या काळात आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्‍या दंगली यांचा धोका असतो. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी अथवा धर्मांध व्यक्ती कार्यक्रमात घुसून उत्सवात तणाव निर्माण करण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी सतर्क रहाणे आवश्यक असून समारंभाच्या ठिकाणी ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना निमंत्रित केल्यास उत्सव शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरणात होण्यासाठी समिती आणि रणरागिणी शाखा आपल्याला साहाय्य करील.

पुंछ (काश्मीर)मध्ये पाकच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे २ सैनिक ठार !

पाकच्या अशा कुरापतींना कायमचा 
प्रतिबंध करण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे !
        पुंछ - काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात पाक सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून पुन्हा एकदा गोळीबार केला. या महिन्यातला हा दुसरा गोळीबार आहे. या गोळीबारास भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. यात २ पाक सैनिक ठार झाल्याचा आरोप पाकने केला आहे.
कुपवाडामध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन
        उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात २९ सप्टेंबरच्या सकाळी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील नौगाम सेक्टरमधील दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैनिकांंनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने आतंकवाद पसरवण्यास साहाय्यभूत २ सहस्र २१ बँक खाती गोठवली !

वरवरचे उपाय करून आम्ही आतंकवादाच्या विरोधात 
आहोत, असे जगाला दाखवण्याचाप्रयत्न करणारा पाक ! 
त्याच्या या धूळफेकीवर भारताने विश्‍वास ठेवू नये !
         इस्लामाबाद - आतंकवाद्यांसाठी स्वर्ग म्हणून जगभरात ओळख असलेल्या पाकिस्तानात आतंकवाद्यांनी हैदोस घातला आहे. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आता पाकिस्तानच्या स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (एस्बीपी) ने आतंकवाद पसरवण्यास आर्थिक साहाय्य करणारी २ सहस्र २१ बँक खाती गोठवली आहेत. वृत संकेतस्थळ डॉननुसार एस्बीपीने सर्व बँक आणि वित्तीय संस्थांना या खातेधारकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. या सर्व खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती.
         बँकेला ही सूची नॅशनल काऊंटर टेररिझम अ‍ॅथॉरिटीने उपलब्ध करून दिली. या सूचीत लाल मशिदीचे मौलव अब्दुल अझिज, शिया नेते मोहसिन नाजफी, अल्हे सुन्नत वल जमातचे मौलवी अहमद लुधियानवी, परियल शाह, मौलवी कबीर, तहरीक-ए-जाफिरा पाकिस्तानचे सिबतेन शिराजी, टीजेपी मिर्जा अली, लश्कर-ए-जांघवी रमजान मेंगल, शेख नैय्यार आणि शाहिद बिकिक यांचा समावेश आहे. नॅशनल काऊंटर टेररिझम अ‍ॅथॉरिटीच्या नुसार ही सूची परिपूर्ण नाही. यात सहभागी लोकांची नावे ८ सहस्र पर्यंत पोचू शकतात. पाकिस्तानच्या संरक्षणतज्ञांच्या मते केवळ बँक खाती गोठवून आतंकवादाला आळा घालता येणार नाही, तर त्याला प्रोत्साहन देणार्‍या इतरही पारंपारिक गोष्टींना नष्ट केले पाहिजे.

तूप किंवा तेल नव्हे, तर पाण्याने पेटतो मध्यप्रदेशातील मंदिरातील दिवा !

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
      शाजापूर (मध्यप्रदेश) - येथील कालीसिंध नदीच्या काठावर वसलेल्या मंदिरात तूप किंवा तेलाने नव्हे, तर पाण्याने दिवा पेटवला जात असल्याचे समोर आले आहे. गडियाघाटाच्या मातेचे मंदिर असे या मंदिराचे नाव असून गेल्या ५ वर्षांपासून या मंदिरात अखंड दिवा पेटत आहे. कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावर तवंग तयार होतो आणि दिवा पेटतो. मंदिरातील हा चमत्कार केव्हापासून आणि कसा चालू झाला, हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु हा दिवा पहाण्यासाठी दूरदूरहून भाविक येथे येत आहेत.

अमेरिकेच्या साऊथ कैरोलिनातील शाळेत झालेल्या गोळीबारात २ विद्यार्थी आणि १ शिक्षक घायाळ !

    कैरोलिना (अमेरिका) - अमेरिकेतील साऊथ कैरोलिनातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात २ विद्यार्थी आणि १ शिक्षक घायाळ झाले आहेत. गोळीबार करणार्‍या तरुणाला कह्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री टेलर जोन्स यांनी दिली. या गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.

बांगलादेशमध्ये दुर्गामातेच्या मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड !

मुसलमानबहुल देशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या 
धार्मिक सणांवर नेहमीच आक्रमणे होतात; मात्र यावर 
एकही निधर्मीवादी आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही !
        ढाका - बांगलादेशच्या हबीबगंज जिल्ह्याच्या नबीजंग या उपजिल्ह्यातील फुतरमती गावात २७ सप्टेंबरच्या रात्री धर्मांधांकडून दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
        ढाका ट्रिब्यून दैनिकाच्या वृत्तानुसार पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत क्षुल्लक कारणावरून स्थानिक युवकांचा मूर्ती बनवणार्‍याशी वाद झाला होता. या वेळी झालेल्या हातघाईच्या वेळी मूर्तींची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आयकर विभागाचे आता वडापाव विक्रेत्यांवरही छापे !

 • भारताच्या अंतर्गत असणारा काळा पैसा बाहेर आणण्यासाठी कृती करणार्‍या शासनकर्त्यांनी परराष्ट्रात दडवून ठेवलेला काळा पैसाही परत आणावा, ही अपेक्षा !
 • काळा पैसा लपवून ठेवल्याचे प्रकरण
       मुंबई - आयकर विभागाने अंधेरी, घाटकोपर, ठाणे आणि दक्षिण मुंबई येथील छोटे वडापाववाले, इडली-डोसा विक्री करणारे व्यावसायिक, जिलबी आणि स्नॅक्सची विक्री करणार्‍या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर छापे घातले. या वेळी संबंधितांना आजपर्यंत दडवून ठेवलेला काळा पैसा ३० सप्टेंबरपर्यंत उघड करण्याविषयी बजावण्यात आले आहे. अशाच प्रकारचे शंभरहून अधिक छापे कर्णावती (अहमदाबाद), नवी देहली आणि कोलकाता येथील रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या चालकांवरही घालण्यात आले आहेत.

इराणी सैन्याने पाकवर मॉटर्र्र गोळे डागले !

       क्वेट्टा (बलुचिस्तान) - इराणच्या सीमा रक्षकांनी २८ सप्टेंबरला पाकच्या सीमेवरील बलुचिस्तानमध्ये मॉटर्र्र (उखळी तोफ) गोळ्यांद्वारे आक्रमण केले. यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. एकूण ८ मॉर्टर गोळे पंजगूर शहराजवळील गावामध्ये टाकण्यात आले. यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी इराणने पाकच्या मश्कैल शहरामध्ये ६ मॉर्टर गोळे टाकले होते. इराण आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरून पेट्रोल आणि डिझेल यांची तस्करी केली जाते. तसेच मानवी तस्करीही करण्यात येते. पाक आणि इराण यांच्यात ९०० कि.मी.ची सीमा आहे. येथे नेहमीच इराण आणि पाक सैन्यांत चकमकी घडत असतात.

गोयल गंगा समूह आणि पुणे महानगरपालिका यांना पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर्थिक दंड

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्णय
    पुणे - सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंंघन करून मिळालेल्या अनुमतीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायाधीश डॉ. जावेद रहिम आणि डॉ. अजय देशपांडे यांनी गोयल गंगा समूहाला १०५ कोटी रुपयांचा दंड, तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी प्रकल्पाला अनुमती देताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी ५ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. (पुणे महानगरपालिकेचा बांधकाम व्यावसायिकधार्जिणा कारभार ! या प्रकरणात काही आर्थिक लागेबांधे नाहीत ना, याचीही चौकशी पालिका आयुक्तांनी करावी. - संपादक) या प्रकरणात पालिकेने सुनावणीच्या वेळी दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी न्यायाधिकरणाने पालिकेला दोषी धरले आहे. (जी पालिका न्यायाधिकरणाला अशी कागदपत्रे सादर करत असेल, ती सर्वसामान्य नागरिकांची किती फसवणूक करत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! या प्रकरणी पालिका आयुक्तांनी संबंधित कर्मचार्‍यांकडून दंडाची ही रक्कम वसूल करावी. - संपादक)

पुण्यातील सेवा मित्र मंडळाचे श्री गणेश मंदिर पाडण्यास पालिकेची स्थगिती

हिंदुत्वनिष्ठ आणि गणेशभक्त यांच्या तीव्र विरोधामुळे पुणे महानगरपालिकेची माघार !
     पुणे, २९ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ आणि गणेशभक्त यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे येथील शिवाजी रस्त्यावरील सेवा मित्रमंडळाचे श्री गणेश मंदिर पाडण्यासंदर्भातील निर्णयाला पुणे महानगरपालिकेने स्थगिती दिली आहे. गणेशभक्तांनी पालिका आयुक्त आणि अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावर मंदिर न पाडता मंदिराची जागा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाला घ्यावा लागला. (संघटितपणे विरोध करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि गणेशभक्त यांचे अभिनंदन ! - संपादक) 

आतंकवाद्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई करा ! - अमेरिकेचा पाकला कडक सल्ला

       वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार सुसन राईस यांनी भारताचे राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी दूरभाषवरून चर्चा करत उरी येथील आक्रमणाचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, पाकने संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि त्यांच्याशी संलग्न अन्य आतंकवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करावी, असे अमेरिकेला वाटते. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी या चर्चेची माहिती देतांना सांगितले की, राईस यांनी आतंकवादाच्या विरोधातील कारवाईमध्ये सहकार्यात वाढ करण्याचेही आश्‍वासन दिले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून गोतस्करी रोखणार्‍या पोलिसांचा सन्मान !

       गाजीपूर (उत्तरप्रदेश) - राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गाजीपूर जिल्ह्यातील करमपूरमध्ये आयोजित एका सभेत गोतस्करी रोखणार्‍या पोलिसांचा सन्मान केला. (गोहत्या रोखण्यासाठीही शासनाने प्रयत्न करावेत - संपादक) पोलीस अधिकारी शिवानंद मिश्रा आणि त्यांच्या पोलीस पथकाने जीव धोक्यात घालून गोवंश घेऊन जाणारा टँकर पकडला होता.

येरवडा (पुणे) येथे मद्यपी वाहनचालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

राज्यातील असुरक्षित पोलीस ! पोलीस आपल्या वर्दीचा धाक केव्हा दाखवणार ?
    पुणे, २९ सप्टेंबर - येथील येरवडा भागातील चंदननगर चौकात एका मद्यपी वाहनचालक संदीप चोंदे याने वाहतूक पोलीस कर्मचारी युवराज सुंदरलाल चव्हाण यांना २७ सप्टेंबरच्या रात्री पुष्कळ मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला असून चोंदे याला रात्री उशिरा अटक केली आहे.
   चोंदे हा चारचाकी वाहनातून नगर रस्त्यावरून जात होता. वाहतूक नियंत्रक लाल दिवा लागलेला असतांना त्याने तो पाळला नाही. चव्हाण यांनी चोंदे याला अडवल्यामुळे त्याने चव्हाण यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. परिसरात गस्त घालणार्‍या पोलिसांनी चोंदे याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही त्याने झटापट केली.

पुणे महानगरपालिकेने पर्यावरण अहवालाच्या मंजुरीसाठी बोलावलेल्या विशेष सभेत केवळ पाच नगरसेवक उपस्थित

यावरून पालिकेच्या नगरसेवकांना पर्यावरणाची किती काळजी आहे, हेच दिसून येते.
   पुणे, २९ सप्टेंबर - शहरातील पर्यावरणाची माहिती देण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रतीवर्षी पर्यावरण अहवाल सिद्ध करण्यात येतो. त्याला मान्यता देण्यासाठी २६ सप्टेंबर या दिवशी बोलावलेल्या विशेष सभेला केवळ ५ नगरसेवकच उपस्थित होते. पालिकेच्या पर्यावरण अहवालाला मंजुरी देण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची ही विशेष सभा बोलावली; पण त्याला नगरसेवकांची उदासीनता दिसून आली. (उपस्थित न रहाणारे नगरसेवक सर्वसामान्य जनतेच्या इतर प्रश्‍नांकडे कसे पहात असतील, याचा विचारच न केलेला बरा ! विशेष सभेत उपस्थित न रहाणार्‍या नगरसेवकांवर महापौर आणि पालिका आयुक्त यांनी दंडात्मक कारवाई करावी ! - संपादक) त्यामुळे मोजक्या नगरसेवकांनी चर्चा केल्यानंतर अहवालाला मान्यता देण्यात आली.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत !

गांधीनगर (कोल्हापूर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु 
समाजातील १५० लोकांचे बलपूर्वक आणि आमिष दाखवून धर्मांतर ! 
भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी 
पोलीस उपअधीक्षक श्री. अमरसिंह जाधव यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २९ सप्टेंबर (वार्ता.) - गांधीनगर येथे गेल्या काही मासांपासून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित करून सिंधु समाजातील लोकांचे धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पोलिसांनी २७ आणि २८ सप्टेंबर या दिवशी येथे होणारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे कार्यक्रम रहित करावेत, या प्रमुख मागणीचे निवेदन भारतीय सिंधु सभा संघटनेच्या वतीने पोलीस उपअधीक्षक (करवीर) श्री. अमरसिंह जाधव यांना देण्यात आले. या वेळी भारतीय सिंधु समाजातील लोक आणि हिंदुत्ववादी यांची पुष्कळ उपस्थिती होती. 

गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव 
समितीच्या गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन ! 
हळदी-कुंकू समारंभानंतर प्रदर्शन पहाण्यासाठी उपस्थित महिला
     मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) - वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स अन् प्रवचन यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

हिंदु क्रांती दलाच्या विरोधानंतर पाकिस्तानी गायकाचा गुरुग्राम (हरियाणा) येथील कार्यक्रम रहित !

पाकच्या कलाकारांना भारतात 
कार्यक्रम करण्यास बंदीच घातली पाहिजे !
       गुरुग्राम (हरियाणा) - पाकचा प्रसिद्ध गायक आतिफ असलम याचा येथे १५ ऑक्टोबरला होणारा गायनाचा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे. भारत-पाकमधील सध्याच्या तणावपूर्ण स्थितीमुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. हिंदु क्रांती दल या संघटनेने पोलिसांना निवेदन देऊन सांगितले होते की, जर कार्यक्रम झाला, तर अनुचित घटना घडू शकते आणि त्याचे दायित्व प्रशासनाचे असेल. यानंतर पोलिसांनी आयोजकांना कार्यक्रम रहित करण्याचा सल्ला दिला होता.
       यापूर्वी बेंगळुरू येथेही पाक गायक शफाकत अमानत अली याचाही कार्यक्रम रहित करण्यात आला. ३० सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार होता. त्याला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला होता.

राज्यातील सर्व शहर विकास आराखडे मराठीतून द्या ! - मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

 • राज्य भाषा मराठी असतांना उच्च न्यायालयाला असे आदेश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून ही कृती का करत नाही ?
    मुंबई, २९ सप्टेंबर - राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसमवेत मराठीतही द्या. ते देण्यासाठी केवळ प्रक्रिया चालू आहे, असे सांगू नका, तर ही प्रक्रिया ६ मासांत पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठाने राज्य शासनाला दिला.

जनगणनेच्या कामात नोंदवही अद्ययावत ठेवण्याचे काम शिक्षकांना सांगता येणार नाही

निवडणुकीतील अशा त्रुटी लोकशाहीच्या कार्यपद्धतींतील न्यूनत्व पुढे आणतात !
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
   मुंबई, २९ सप्टेंबर - जनगणनेची कामे करतांना त्यामध्ये नागरिकांची माहिती जमा करायची असल्याने शिक्षक ही कामे करू शकतात; परंतु नोंदवही अद्ययावत करण्याची कामे त्यांनी करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठाने २८ सप्टेंबर या दिवशी दिला. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
   जनगणनेच्या नोंदी अद्ययावत करण्याचे कामही शिक्षकांनीच करावे, असा निर्देश राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने २ वर्षांपूर्वी दिला होता. या निर्णयाला राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात याच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

पाकसमवेत युद्धच हवे ! - शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

     नागपूर - कुरापती काढणे ही पाकची जुनी सवय आहे. पाकला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. समजुतदारीने घेऊन काहीही होणार नसून आपल्याला युद्ध हे करावेच लागणार आहे, परंतु त्याकरता आपली पूर्ण सिद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्या देशात युद्धासाठी पोषक वातावरण नाही. देशातील नागरिकांमध्ये पूर्वीसारखी देशभक्ती राहिलेली नाही. ते वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सैनिकी कारवाईचे त्यांनी समर्थन केले. 

'आदर्श' प्रकरणामध्ये दोन लाभार्थी नेत्यांची नावे आरोपपत्रात न घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे अन्वेषण यंत्रणांवर ताशेरे !

अन्वेषण यंत्रणांचे दुटप्पी आणि खरे स्वरूप ! 

     मुंबई, २९ सप्टेंबर - आदर्श प्रकरणामध्ये सोसायटीमध्ये एकूण ४ सदनिका या वर्ष २००२-२००४ च्या तत्कालीन सरकारमधील २ लाभार्थी नेत्यांच्या नावे राखून ठेवण्यात आल्या होत्या. हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या तपासातही उघड झाले होते. त्यांची नावे आरोपपत्रात का नाही, अशी स्पष्ट विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठाने केली होती. तसेच यापूर्वी दिलेला अहवाल कुठलाही सारासार विचार न करता सादर केला, असे सांगत अन्वेषण यंत्रणांवर २८ सप्टेंबर या दिवशी ताशेरेही ओढले. या वेळी अन्वेषण यंत्रणेने सादर केलेल्या नव्या अहवालावरही उच्च न्यायालयाने असंतोष व्यक्त केला. 

नगर येथे महिला शिक्षिकेशी गैरवर्तन करणारा शिक्षक निलंबित !

    नगर, २९ सप्टेंबर - नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेंडी येथील प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाला गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. (अशा शिक्षकांवर कायद्यानुसार कठोर शिक्षाही होणे आवश्यक आहे. - संपादक) संबंधित शिक्षकाच्या विरोधात शिक्षिकेने गैरवर्तन करत असल्याची तक्रार केली होती. शाळेतील इतर महिला शिक्षकांनीही तक्रारीत तथ्य असल्याचा जबाब मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्यासमोर दिला. या शिक्षकाच्या विरोधात ध्वनीमुद्रणही देण्यात आले असल्याचे समजते.

भारत एक उत्तरदायी अण्वस्त्रधारी देश, तर पाकचा अण्वस्त्रांचा इतिहास तणावपूर्ण ! - अमेरिका

     वॉशिंग्टन - अमेरिकेचे संरक्षणमंत्री एश्टन कार्टर यांनी म्हटले आहे की, भारताने अण्वस्त्रांच्या संदर्भातील दायित्व योग्य प्रकारे निभावले आहे; मात्र पाकचा या संदर्भातील इतिहास तणावपूर्णच राहिला आहे. त्याचा अमेरिकेला थेट धोका नसला, तरी आम्ही या संदर्भातील तणाव न्यून करण्यासाठी पाकसमवेत काम करत आहोत.

कारवाया थांबल्यावरच पाकच्या कलाकारांचे स्वागत करू ! - अमेय खोपकर, मनसे

अशी भूमिका केंद्र सरकार का घेत नाही ? 
     मुंबई, २९ सप्टेंबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला वैयक्तिक विरोध नाही; पण पाकिस्तानकडून भारतावर सतत होणारी भ्याड आक्रमणे आणि त्यात सैनिकांचे जाणारे बळी सहन केले जाणार नाहीत. पाकिस्तानने भारतातील कारवाया थांबवल्यानंतरच आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत करू. तोपर्यंत विरोध तसाच राहील, असे मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी २८ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे आणि सरचिटणीस शशांक नागवेकर उपस्थित होते. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sena ne Surgical Strike dwara LoC ke paar bane atanki kendropar akraman kar 40 jihadiyoko mar giraya.
Ab ek hi baar, aar-paarki ladai kare Modi Sarkar !
जागो ! : सेना ने सर्जिकल स्ट्राईक द्वारा एलओसी के पार बने आतंकी केंद्रों पर आक्रमण कर ४० जिहादियों को मार गिराया ।
अब एक ही बार, आर-पार की लडाई करे मोदी सरकार !

पालकांनो, मुलांना धर्मार्ंतराच्या धोक्यापासून वाचवायचे असेल, तर हिदु धर्माची सत्यता अन् विशालता समजून घ्या आणि मुलांना कॉन्व्हेंट शाळेत पाठवणे बंद करा !

अधिवक्त्या (कु.) दिव्या
बाळेेहित्तल
१. भारतातील कॉन्व्हेंट शाळांची स्थिती
१ अ. आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे श्रीमंत, उच्च वर्गीय आणि मध्यमवर्गीय पालक ! : सध्या कलियुगात लोकांचा सर्वाधिक कल कॉन्व्हेंट शाळांकडे आहे. कॉन्व्हेंट शाळा आणि महाविद्यालये यांत प्रवेश मिळणे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. श्रीमंत, उच्च वर्गीय आणि मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश मिळावा; म्हणून मुलांची सिद्धता करवून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.
१ आ. भारतियांमध्ये प्रतिष्ठेचे प्रतीक झालेल्या कॉन्व्हेंट शाळा ! : देहली आणि मुंबई येथील पालक बालकाच्या जन्मापासूनच याचे नियोजन करतात. कॉन्व्हेंट शाळेतील बालवाडीत प्रवेश मिळणे, ही कुटुंबासाठी मोठी घटना असते. आधुनिक अभ्यासाचे साहित्य, इंग्रजी भाषेचे माध्यम आणि आधुनिक जीवनशैली (कपडे आणि अन्नपदार्थ यांसह) यांमुळे भारतियांमध्ये या शाळा प्रतिष्ठेचे प्रतीक झाल्या आहेत. उघडपणे सांगितले जात नसले, तरी ख्रिस्ती पंथाचा प्रसार करणे आणि हिंदु धर्माविषयी न शिकवणे, हाच या शाळांचा मुख्य उद्देश असतो.

हिंदु जनजागृती समितीचा धनबाद येथील सप्टेंबर २०१६ च्या पहिल्या आणि दुसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा आढावा

पहिल्या सप्ताहातील आढावा
१. पुरुलिया येथे समितीच्या संकेतस्थळाला 
भेट देणार्‍या प्रोफाइल मेंबर्सच्या बैठकीचे आयोजन
     हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या प्रोफाइल मेंबर्सच्या बैठकीचे आयोजन ५.९.२०१६ या दिवशी पुरुलिया येथे करण्यात आले होते. बैठकीला उपस्थित सदस्यांना समितीच्या वतीने श्री. चित्तरंजन सुराल यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांमध्ये हिंदुत्वासाठी कार्य करण्याची पुष्कळ तळमळ जाणवली. बैठकीत ३०.९.२०१६ या दिवशी सत्संग समारंभ घेण्याचे नियोजन करण्यात आले.
१ अ. क्षणचित्रे
१. गावात पुष्कळ पाऊस पडत असूनही बैठकीला सदस्य उपस्थित होते.
२. बैठकीची व्यवस्था स्थानिक लोकांनीच केली होती.

मल्ल्यासारख्यांना सीमांच्या बंधनाची आवश्यकता !

      किंगफिशर आस्थापनाचे मालक विजय मल्ल्या हे खंड्या (किंगफिशर) पक्ष्याप्रमाणे कोणाची पर्वा न करता सीमापार उडून गेले, अशी मार्मिक टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच केली. ही टिप्पणी खरंच आपल्याला, राज्यकर्ते, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांना विचार करायला लावणारी आहे. किंगफिशरचा मालक हा भुर्रदिशी देश सोडून उडून जाऊच कसा शकतो ? एकीकडे मल्ल्या यांची मालमत्ता शासनाधीन होत होती, त्यांच्या बंगल्यांवर छापे घातले जात होते, त्यांची विमाने आकाशात उडायची थांबली होती आणि त्यांच्या विरुद्ध अनेक न्यायालयांत खटले प्रविष्ट होत होते.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

        सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी पोलीस चौकशीसाठी आलेल्या 
एका साधिकेला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्‍न विचारून 
वेळ आणि कार्यक्षमता वाया घालवणारे पोलीस अधिकारी !
        एका साधिकेला चौकशीसाठी बोलावल्यानंतर तिची व्यक्तीगत माहिती घेतल्यानंतर तिला तिच्या यजमानांविषयी विचारण्यात आले. सदर साधिकेला जेवढे ठाऊक होते, तेवढे तिने सांगितले. त्या वेळी चौकशी करणार्‍या पोलीस अधिकार्‍याने तिला भावनिक स्तरावर समजावण्याचा प्रयत्न केला. ते तिला म्हणाले, यजमान कधी येणार, ते ठाऊक नाही, तर ते येतीलच कशावरून ? तुम्ही दुसरा विवाह करण्याचा विचार करा. इतके दिवस कुणी वाट पहाते का ? तुमचे आयुष्य वाया जात आहे. याचा तुम्ही विचार करायला हवा. पोलीस अधिकारी बराच वेळ या विषयावर साधिकेला सांगत होते. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी तपास करणे आणि साधिकेला तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनावश्यक सल्ला देणे, याचा कुठेही संबंध नसतांना पोलीस आपला वेळ आणि कार्यक्षमता कशी वाया घालवतात ?, याचे हे उदाहरण आहे. - एक साधिका
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

पितृपक्षात श्राद्ध का करावे ?

     पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते. म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे अधिक श्रेयस्कर असते. यातून हिंदु धर्माने केलेला सूक्ष्म विचार लक्षात येतो, तसेच हिंदु धर्माचे अद्वितीयत्वही अधोरेखित होते. 
श्राद्धविधी न केल्यास होणारी हानी
     लिंगदेह एकाच ठराविक कक्षेत कित्येक वर्षे अडकून पडतात. अडकलेले लिंगदेह आसुरी शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांच्या सांगण्यावरून कुटुंबियांना त्रास देऊ शकतात. लिंगदेह पुढे न जाता एका ठराविक कक्षेत अडकल्याने त्यांच्या कोषातून प्रक्षेपित होणार्‍या कुटुंबियांशी निगडित लहरींच्या प्रादुर्भावाखाली कुटुंबीय राहिल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. 
(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ श्राद्धातील कृतींमागील शास्त्र)

पहिल्या आणि शेवटच्या मुलालाच श्राद्ध करण्याचा अधिकार का असतो ?

       ज्या वेळी प्रथम मुलाच्या संदर्भात गर्भधारणा होते, त्या वेळी त्या जिवाची तीव्र इच्छाशक्ती कार्य करते. यामुळे या मुलाच्या माध्यमातून केलेले विधी तीव्र इच्छाबीजातील शक्तीच्या बळावर पूर्वजांच्या वासना तृप्त करून त्यांना संतुष्ट करतात. शेवटचा मुलगा हा वंश संपुष्टात येण्याचे प्रतीक असल्याने याच्याकडूनही पूर्वजांच्या अपेक्षा तीव्र स्वरूपात असल्याने त्याने केलेले कर्मही पूर्वजांच्या तीव्र इच्छेच्या प्रमाणात कार्य करते. मधल्या मुलाला पहिल्या आणि शेवटच्या मुलाच्या तुलनेत गौण स्थान असल्याने, म्हणजेच या मुलाकडून पूर्वजांच्या अपेक्षा अल्प प्रमाणात असल्याने त्याच्याकडून विधी करवून घेण्यात फलप्राप्ती अल्प असते; म्हणून केवळ पहिल्या आणि शेवटच्या मुलाला हिंदु धर्माने श्राद्धविधी करण्याचा अधिकार दिला आहे.

पीडानाशक नारायण नागबली विधी !

१. प्रेतास उद्देशून लांबकोळा (लांबट) पिंडाचे
दर्भाद्वारे तीन भाग करतात आणि
२. प्रेताच्या पितरांना उद्देशून दुसर्‍या
दर्भावर तीन पिंड ठेवतात.
 
१. नारायण नागबली विधी 
१. सपिंडीकरण विधी : पहिल्या दिवशी नारायण बली केल्यावर दुसर्‍या दिवशी सपिंडी श्राद्ध करतात आणि तो विधी झाल्यानंतर नागबली हा विधी करतात. सपिंडी श्राद्ध याचा अर्थ प्रेतयोनीतील पीडा देणार्‍या जीवात्म्यास पितरादी उत्तम लोकांस पाठवणे. श्राद्धाप्रमाणे सर्व विधी करून पिंडप्रदान विधीमध्ये यजमान आग्नेय दिशेस तोंड करून बसतो. समोर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्भ ठेवतात. पहिल्या दर्भावर प्रेतास उद्देशून एक लांबकोळा (लांबट) पिंड ठेवतात. दुसर्‍या दर्भावर प्रेताच्या पितरांना उद्देशून तीन पिंड ठेवतात.

सौ. उमा रविचंद्रन यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात रेखाटलेल्या चित्रांचे विवरण

 सर्व साधकांना वात्सल्य देणार्‍या कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री ! 

     कमलपुष्प स्वरूप सद्गुरु (सौ.) अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याकडे सर्व साधक मधमाशांप्रमाणे आकर्षित होतात. त्या सर्व साधकांना विपुल प्रमाणात साधनारूपी मध देतात. त्यांच्याकडून मिळणारे वात्सल्य सर्वश्रेष्ठ आहे. अशा दैवी मातांचा अनुग्रह असतांना या जगात आपल्याला कसली काळजी असू शकते का ?
- सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (१५.६.२०१६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे महर्षींनी सांगितलेले जन्मरहस्य !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
      कार्तिकपुत्री (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ) या दोघी भूदेवीच्या जुळ्या मुली आहेत. प.पू. डॉक्टरांसारख्या श्रीमत् नारायणाच्या छत्राखाली देवकार्य करण्यासाठी त्या भूतलावर आल्या आहेत. 
(संदर्भ : सप्तर्षि जीवनाडीपट्टीवाचन क्र. १५४, चेन्नई, तमिळनाडू, १४.७.२०१६)

अचूक निर्णयक्षमता, अफाट कार्यक्षमता आणि चैतन्याचा अखंड स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सनातन परिवाराच्या वतीने सद्गुरु
(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी
साष्टांग नमस्कार !
     संत कसे असतात ?, त्यांचे वागणे, बोलणे कसे असते ?, त्यांचे मन कसे असते ?, ते रागावतात का ?, साधकांनी संतपद प्राप्त केल्यावर त्यांच्यात काय पालट झालेले असतात; म्हणून ते संत होतात ? असे अनेक प्रश्‍न मला पडत असत. सनातन संस्थेच्या माध्यमातून अनेक साधकांनी साधना करून आतापर्यंत संतपद प्राप्त केले आहे. प्रत्येक संतांचे वागणे, बोलणे निराळे असते; पण ध्येय मात्र एकच असते, ते म्हणजे गुरूंना, प.पू डॉक्टरांना आवडेल असेच वागणे, त्यासाठी त्यांचे आज्ञापालन करणे आणि त्याकरता प.पू डॉक्टरांचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण करणे. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला अनेक संतांचा सत्संग मिळाला. त्यापैकी एक असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदाताई सिंगबाळ यांचा आज (भाद्रपद अमावास्या,३० सप्टेंबर २०१६) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा मला साधनेत झालेला लाभ पुढे देत आहे.

छोटे से जीवोंसे हिन्दू राष्ट्र की संकल्पना साकार करनेवाले गुरुदेव के चरणकमलों में कोटि-कोटि प्रणाम ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
सबकी प्रेरणा हैं आप ।
सबका विश्‍वास भी हैं आप ।
सबकी परमश्रद्धा हैं आप ॥ १ ॥

सबकी श्‍वास हैं आप ।
सबकी आस हैं आप ।
सबका विश्‍वास हैं आप ।
हम सभी साधकोंका ध्येय हैं आप ॥ २ ॥

संतांच्या स्पर्शाने तन आणि मन शुद्ध होऊन ताणही दूर होत असल्याची साधिकेने घेतलेली अनुभूती !

कु. माधुरी दुसे
      २४.८.२०१६ या दिवशी दुपारी मी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंसाठी चहा घेऊन गेले होते. त्या वेळी त्यांनी स्वतःला शेंदूर लावला आणि त्याच बोटाने मलाही शेंदूर लावला. त्या मला शेंदूर लावत असतांना त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या नाकाला झाला. तेव्हा मला कृतज्ञता वाटली. त्यानंतर २ - ३ दिवसांनी माझ्या लक्षात आले, मला सर्दी आणि कफ झाला होता. औषधे घेऊनही फरक पडत नव्हता. सद्गुरु बिंदाताईंच्या हाताचा स्पर्श नाकाला झाल्यावर मला शिंका यायला लागल्या आणि कफही मोकळा झाला. नंतर मला हलके वाटू लागले. संतांच्या स्पर्शाने तन आणि मन शुद्ध होऊन ताणही दूर होतो, हे अनुभवायला मिळाले. 
- कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१६) 
प.पू. डॉक्टरांचे प्रतिरूप असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सहवासात अनुभवलेले गुणमोती !

कु. स्वाती गायकवाड
१. पुष्कळ व्यस्त असूनही साधकांना भेटण्यासाठी लागवडीच्या 
शेवटच्या टोकापर्यंत जावे लागले, तरी आनंदाने जाण्याची 
सिद्धता दर्शवणार्‍या, अहोरात्र साधकांचा विचार करणार्‍या आणि 
प.पू. डॉक्टरांच्या प्रीतीचे प्रतिरूप असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदाताई !
      आश्रमातील साधकांनाच नाही, तर आश्रम पहाण्यासाठी आलेल्या साधकांना आणि वाचकांनाही सद्गुरु (सौ.) बिंदाताईंना (सद्गुरु ताईंना) भेटण्याची इच्छा असते. ऑगस्ट २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात २ - ३ शिबिरे झाली. त्या वेळी पुष्कळ साधक सद्गुरु ताईंना भेटायला आले होते. आश्रमात रहाणार्‍या एका काकूंनाही त्यांना भेटायचे होते; कारण दुसर्‍या दिवशी त्या घरी जाणार होत्या. तसे पहाता ताई पुष्कळ व्यस्त होत्या; म्हणून मी त्यांना म्हणाले, सद्गुरु ताई, काकूंना तुमच्या खोलीत भेटायला येण्यास सांगू का ?, म्हणजे तुम्हाला वरच्या माळ्यावर यावे लागणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, नाही, नाही ! मीच त्यांना भेटायला जाईन. साधकांना भेटायला आश्रमातील लागवडीच्या शेवटच्या टोकापर्यंत जावे लागले, तरी मी आनंदाने जाईन. त्यांचे हे बोलणे ऐकून मला वाटले, प.पू. डॉक्टरही स्वतःचा विचार न करता अहोरात्र साधकांच्या साधनेचा विचार करतात. तसेच सद्गुरु ताईंचेही आहे; म्हणूनच साधकांना त्या हव्याहव्याशा वाटतात. प.पू. डॉक्टरांच्या प्रीतीचे जणू त्या प्रतिरूप भासतात.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहून साधक भावविभोर होणे

      सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई या संतद्वयी सद्गुरुपदी विराजमान झाल्याचा सन्मानसोहळा झाल्यावर त्या भोजनकक्षात आल्या. त्या वेळी सर्व साधक भावावस्थेत होते. अनेक साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू आले. साधकांच्या डोळ्यांतील भावाश्रू पाहून सद्गुरु गाडगीळकाकूंच्या डोळ्यांतही भावाश्रू आले. सर्व साधक भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या अपूर्व संगमाची अनुभूती घेत होते. हे सर्व दैवीच वाटत होते. अशा या दिव्य सोहळ्याचा अनुभव आम्हा सर्व साधकांना घेता आला, यासाठी हे गुरुराया, तुज चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- रामनाथी आश्रमातील सर्व साधक बालकद्वयी अर्पितो तवचरणी भाव कृतज्ञतेचे ।

कु. वैष्णवी येळेगांवकर
कु. प्राजक्ता धोतमल
     संकटे येता नाना प्रकारची ।
     तुम्ही वरदहस्त ठेवून आश्‍वस्त केले ।
     सद्गुरु बिंदाताई तुमच्या माध्यमातून ।
     श्रीगुरूंनाच आम्ही अनुभवले ॥ १ ॥
     त्याच त्याच अडचणी घेऊन ।
     अनेकदा तुमच्याकडे आलो जरी ।
     तितक्याच मायेने प्रोत्साहन देऊन ।
     घडवले आम्हाला तुम्ही ॥ २ ॥

भूतलावरील अनमोल दैवी रत्न सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सावळा सुंदर हरि माझा काळा ।
संत-भक्तांचा पांडुरंगा लळा ।
सावळ्या मंजिर्‍या तुळशीच्या गळा ।
आवडे तुजला संत-भक्तांचा मेळा ।
      याप्रमाणे सदैव संत आणि भक्तांनी गजबजलेला अखंड मेळा असलेला हा रामनाथी आश्रम आहे. साक्षात् ईश्‍वरच इथे असल्यामुळे इथल्या प्रत्येक श्‍वासातही अध्यात्माचा गंध येतो. इथे देवाने दैवी गुण, वस्तू आणि दैवी बालक अशा सर्वच गोष्टींची उधळण केली आहे. आश्रमातील सर्वात अनमोल दैवी रत्न म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदाताई ! सद्गुरु (सौ.) बिंदाताई या गुणांची खाण आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये अनेक लेखांमधून प्रसिद्धही झाली आहेत. या लेखात त्या कशा दैवी, देवीस्वरूप आहेत ?, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

नाही उपमा एकही त्यांच्या योग्यतेची ।

सौ. निलीमा सप्तर्षि
काल सद्गुरुद्वयींचा सत्कार झाला ।
त्यांना बघूनी कंठ दाटूनी आला ॥ १ ॥

हसरे चेहरे, बोलके डोळे ।
बरेच काही शिकवूनी गेले ॥ २ ॥

गळ्यातील पुष्पमालाही खुदुखुदु हसत होत्या ।
जीवन धन्य झाले, असे त्या सांगत होत्या ॥ ३ ॥

एक हात डावा, तर दुसरा आहे उजवा ।
दोन्ही हात ईश्‍वराचेच, करतात त्याची सेवा ॥ ४ ॥

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ या संतद्वयी सद्गुरुपदी विराजमान झाल्यावर त्यांनी एकमेकींचा केलेला सन्मानसोहळा स्वप्नात अनुभवणे

श्री. उदय बडगुजर
      २४.७.२०१६ च्या रात्री १० वाजता मला व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ या सद्गुरुपदी विराजमान झाल्या आहेत, असा लघुसंदेश आला. २५.७.२०१६ या दिवशी पहाटे ४.३० ते ५ या वेळेत मला स्वप्नात पुढील दृष्य दिसले. पू. (सौ.) बिंदाताईंनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान झाल्या आहेत, असे सांगून त्यांचा सन्मान केला. काही वेळाने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ याही सद्गुरुपदी विराजमान झाल्या आहेत, असे उद्गार काढून पू. बिंदाताईंचा सन्मान केला.
     प.पू. गुरुमाऊलींनी मला हा भावसोहळा घरी बसून पहाण्याची संधी दिली, त्यासाठी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. 
- श्री. उदय बडगुजर, जळगाव (२८.७.२०१६)

देवतेचा अंश असणारी बिंदाई !

कु. कौमुदी जेवळीकर
                                              श्री गुरूंनी दिली देवतेचा अंश असणारी बिंदाई (टीप) ।
                                              प्रत्येक कठीण प्रसंगात सावरणारी आध्यात्मिक आई ॥
                                              तुला पहाताक्षणीच आठवते रूप श्रीगुरूंचे ।
                                              बाळ तुझे प्रार्थिते, ने ना आम्हाला गुरुचरणांकडे ॥
                                              टीप - सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ 
                               - कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०१६) 
श्राद्धविधी भावपूर्णरित्या करायचे ठरवल्यावर विधीच्या दिवशी कोणताही त्रास न होता प.पू. डॉक्टरांंचे अस्तित्व जाणवून श्राद्धाचा आनंद अनुभवता आल्याची साधिकेला आलेली अनुभूती

     माझ्या सासर्‍यांचे श्राद्ध ३१.१२.२०१४ या दिवशी झाले. पूर्वी श्राद्ध म्हटले की, मला अशुभ कार्य वाटायचे. त्या दिवशी मला डोके दुखणे, थकवा येणे, असे त्रास होत आणि मला उत्साहही नसायचा. या वर्षी मात्र मला वेगळेच वाटत होते. एक प्रकारचा आनंद जाणवत होता.
१. श्राद्धाच्या ८ दिवस आधी एक कावळा 
एकसारखा ओरडणे आणि पोळी ठेवल्यावर ती घेऊन निघून जाणे
     श्राद्धाच्या ८ दिवस आधी एका सकाळी घराच्या पाठीमागच्या झाडावर बसून एक कावळा एकसारखा ओरडत होता. त्याचे ओरडणे थांबतच नव्हते; पण त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून मी आत येऊन कामाला लागले. कावळ्याचे ओरडणेे माझ्या यजमानांच्या लक्षात आले. त्याला काहीतरी खायला द्यावेे; म्हणून ते पोळी घेऊन गच्चीवर गेले. ते गच्चीवर जात असतांना तो कावळा शांतपणे त्यांच्याकडे पहात होता. पोळी ठेवल्यावर लगेच ती तोंडात पकडून तो निघूनही गेला. हे पाहून मला आश्‍चर्य वाटले आणि माझ्या मनात विचार आला, कावळ्याच्या माध्यमातून कोणी पूर्वजच येऊन गेले असावेत. मला पुन्हा तो कावळा दिसलाच नाही.
- आपल्या चरणांची धूळ, सौ. कमल अण्णासाहेब वांडरे, विश्रामबाग, सांगली. (डिसेंबर २०१४)

साधिकेच्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी कावळ्यासाठी ठेवलेल्या पानाच्या ठिकाणी संध्याकाळी ३ कावळे येणे, त्यांचे छायाचित्र काढल्यावर तेथे एक पांढरी आकृती दिसणे आणि एका संतांनी तो लिंगदेह असल्याचे सांगणे

      केरळ येथील साधिका श्रीमती सौदामिनी कैमल (श्री. नंदकुमार कैमल यांची आई) यांच्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी, म्हणजे १९.९.२०१६ या दिवशी सकाळी त्यांनी कावळ्याला पान ठेवले. दुपारी एक कावळा येऊन गेला. संध्याकाळी ६ वाजता एका साधकाचे (श्री. बालकृष्ण यांचे) तेथे लक्ष गेले असता ३ कावळे आले होते. त्यांनी भ्रमणभाषवरून त्याचे छायाचित्र काढण्यासाठी भ्रमणभाषमधून बघितले असता त्यांना त्या परिसरात (पान आणि कावळे असलेल्या ठिकाणी) एक पांढरी आकृती खालून वर हलतांना दिसली. ती छायाचित्रातही दिसत आहे. हे छायाचित्र एका संतांना पाठवले. त्या वेळी त्यांनी तो लिंगदेह असल्याचे सांगितले. हे छायाचित्र बघतांना त्रास जाणवत असल्याचे २ साधिकांनी सांगितले.
- कु. अदिती सुखटणकर, केरळ (२७.९.२०१६)पितृपक्षातील श्राद्ध !

      ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धाविषयीचे लिखाण येथे देत आहोत.

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना 
      सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे 
केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे ! 
     '१.१०.२०१६ या दिवशी 'नवरात्र' चालू होत आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहेत. या धर्मसत्संगांतर्गत 'धार्मिक कृतियोंका शास्त्र' या विषयाचे ६ आणि 'दसरा' या विषयाचा १ धर्मसत्संग आहे, तर 'अध्यात्मशास्त्र' या विषयाचे ८ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे. 
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत. 
        घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू !
- प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (२९.९.२०१६)
उ.रात्री ३.५६ वाजता
समाप्ती - भाद्रपद अमावास्या (१.१०.२०१६) पहाटे ५.४१ वाजता
आज अमावास्या आहे.
       हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न
उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था
आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

सनातन प्रभातसाठी संपादकीय साहाय्य करू इच्छिणारे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

राष्ट्र-धर्म रक्षणार्थ कार्यरत असलेल्या सनातन प्रभातच्या संपादनाच्या सेवेत सहभागी व्हा !
    वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारे, अल्पावधीत त्यांच्यात साधनाबीज रोवणारे एकमात्र दैनिक म्हणून सनातन प्रभातची ख्याती आहे. गेल्या ३ वर्षांपासून या दैनिकाने पृष्ठसंख्या वृद्धी केली असून त्यामुळे राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची वाचनीय सदरे वाचकांना उपलब्ध होत आहेत. यापुढेही दैनिकाची पृष्ठसंख्या प्रतिदिन १० पानी करण्याचा प्रयत्न आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, वाढती पृष्ठसंख्या यांमुळे संपादनाच्या सेवेसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे.
   या दृष्टीकोनातून मराठी किंवा संस्कृत भाषेचे ज्ञान असणे, तसेच या विषयांचे शिक्षक अथवा प्राध्यापक, तसेच संपादकीय सेवेचा पूर्वानुभव असलेल्यांना सनातन प्रभातसाठी पूर्णवेळ अथवा अर्धवेळ संपादकीय संस्करणाची सेवा करण्याची संधी गोवा, पनवेल, पुणे, जळगाव, सांगली, मुंबई या ठिकाणी राहून उपलब्ध आहे.

सनातन प्रभातसाठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात आयोजित
करण्यात आलेल्या वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
    सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते.
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ वार्ताहराची
सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन !
    प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत. सनातन प्रभातसाठी वार्तांकन करण्याची इच्छा अनेक साधक, वाचक, धर्मशिक्षणवर्गातील युवक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केली आहे. आपल्या जिल्ह्यात किंवा प्रमुख शहरांमध्ये अर्धवेळ अथवा पूर्णवेळ वृत्तसंकलनाची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वार्ताहर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच !
सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, 
असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)प्रतिशोध धगधगत ठेवा !

संपादकीय 
         २८सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराच्या शूरवीर सैनिकांनी भारत-पाक सीमारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर्वसूचनेविना लक्ष्य ठेवून लष्करी आक्रमण (सर्जिकल स्ट्राईक) केल्याचे वृत्त भारतीय लष्करी कारवायांचे महासंचालक रणबीरसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले. हे वृत्त येताच अब्जावधी भारतियांच्या मनातील राष्ट्रभावनांची वाट मोकळी होऊन संपूर्ण देशात एक आंतरिक समाधानाची लाट पसरली ! आतापर्यंत हुतात्मा झालेल्या शेकडो भारतीय सैनिकांचे आत्मे यामुळे काही अंशी तरी सुखावले असतील.

केंद्र सरकारकडून मुसलमानांसाठी प्रगतीशील पंचायत योजना !

 • केंद्र सरकारने देशातील ६ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या प्रगतीसाठीही एखादी योजना आणावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
 • देशातील इतर समुदायांची प्रगती झालीच, असे आहे का ?
       नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रगतीशील पंचायतच्या नावाने देशभर पंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंचायतीद्वारे मुसलमानांच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जाणार आहेत.
       प्रगतीशील पंचायतचा प्रारंभ हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथून केला जाणार आहे. यात अल्पसंख्यांक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि अन्य केंद्रीयमंत्री सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, मुसलमानांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार सिद्ध आहे. त्यासाठी या पंचायतीद्वारे देशातील मुसमानांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसने या योजनेवर टीका करतांना, उत्तरप्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केलेला प्रयत्न, असे म्हटले आहे. उलट काँग्रेसने नेहमीच मुसलमानांच्या भल्याचा विचार केला आहे आणि त्यासाठी कामही केले आहे. (काँग्रेसने केवळ मुसलमानांच्या भल्याचा विचार करून त्यासाठीच काम केले आहे, तर हिंदूंना वार्‍यावर सोडले ! - संपादक)

पाकचे समर्थन करणार्‍या आणि इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवणार्‍या मुसलमानांना आपले म्हणायचे का ?

दैनिक सामनाच्या संपादकियातून 
पंतप्रधानांना उपस्थित केलेला प्रश्‍न
       मुंबई - काश्मीरातील जे मुसलमान पाक झिंदाबादच्या घोषणा देत आहेत, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवत आहेत, बुरहान वानीसाठी शोक करत आहेत, अशा मुसलमानांनाही छातीशी कवटाळून आपले म्हणायचे का ? यावरही चिंतन किंवा मंथन झाले, तर बरे होईल, असे मत शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या २८ सप्टेंबरच्या संपादकियातून व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड (केरळ) येथे केलेल्या भाषणात मुसलमानांना आपलेसे करा, असे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी वरील विधान केले.
त्यांनी पुढे म्हटले आहे...
१. मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करणार्‍यांची एक नवी पेढी निर्माण झाली. त्यात राममंदिराचा कळस उतरला हेच आता दिसते. मुसलमान हा देशाचा सदासर्वदा दुश्मन नाही; पण हिंदूंना त्यांच्यामुळे त्यांच्याच भारतात मान-अधिकार मिळत नाही. शासन पालटले, तरी मुसलमानी लांगूलचालनाचे नवे प्रयोग घडतच आहेत. मुसलमानांना मिठ्या मारा असे पंतप्रधान मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा, हे कसले लक्षण समजायचे ?

सैन्याकडे मूलभूत शस्त्रांची कमतरता !

 • युद्धासाठी सिद्ध होऊ इच्छिणार्‍या भारताच्या सैन्याची दयनीय सद्यस्थिती !
 • भारतीय सैन्याला या स्थितीत ठेवणारे राष्ट्रघातकीच होत !
        नवी देहली - पाकबरोबर युद्ध करण्याचा विचार होत असतांना काही निवृत्त सैन्याधिकार्‍यांनी सैन्यातील शस्त्रांच्या कमतरतेवर बोट ठेवले आहे. विशेषतः असॉल्ट रायफल, कार्बाइन आणि आर्टिलरी गन यांसारख्या मूलभूत शस्त्रांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विमानविरोधी बंदूका आणि विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीसारख्या आधुनिक शस्त्रांची आवश्यकताही प्रतिपादित केली आहे. ही शस्त्रे विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. संरक्षण मंत्रालय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठीच्या आर्थिक तरतुदीची रक्कम व्यय करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
        सैन्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या भारताकडे काही दिवस पुरेल इतकाच दारूगोळा आहे. नवीन दारूगोळ्याची मागणी देण्यात आली असली, तरी भारताला या संदर्भात सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

भाजपशासित मध्यप्रदेशात पोलीस अधिकारी झिया-ऊल-हक यांच्याकडून रा.स्व. संघाच्या प्रचारकाला मारहाण !

अशा गुंड पोलिसांवर राज्य 
सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
        बालाघाट/बैहर (मध्यप्रदेश) - येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बैठक चालू असतांना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी बैठक कक्षात प्रवेश करून संघाचे प्रचारक सुरेश यादव यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली. यादव यांना कार्यालयात मारहाण केल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. तेव्हा यादव यांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि औषधाच्या दुकानात गेले अन् तेथे बेशुद्ध झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तेथून त्यांना जबलपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबरच्या रात्री घडली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे आंदोलन केले आणि २६ सप्टेंबरला बैहर शहर बंद ठेवण्यात आले. यादव यांच्या तक्रारीनंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश शर्मा, ठाणे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य काही अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.
        या घटनेच्या दोन दिवसआधी मुसलमान नेते ओवैसी यांच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळावर टीका करण्यात आली होती. याची काही मुसलमान युवकांनी तक्रार केली होती. त्यावरून झिया-ऊल-हक यांनी यादव यांना मारहाण केली. यात तक्रार करणारे नवाब खान, सन्नू खान, दानिश खान आणि शाहीद खान हेही सहभागी होते.

जिंदगी या भारतीय हिंदी वाहिनीद्वारे भारतात प्रसिद्धी मिळालेल्या पाकच्या कलाकारांचा उरी आक्रमणाचा निषेध करण्यास नकार !

 • कलाकारांना धर्म आणि राष्ट्र यांच्या चौकटीत बांधू नका अशी पोपटपंची करणार्‍या पाकप्रेमी भारतियांना चपराक ! पाकचे कलाकार खरे राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्याकडून भारतातील पाकप्रेमी कलाकारांनी राष्ट्रभक्ती शिकून घ्यावी !
 • वाहिनीने बंद केल्या पाक कलाकारांच्या मालिका !
        नवी देहली - काश्मीरच्या उरी येथील आक्रमणानंतर झी आस्थापनाचे संचालक श्री. सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या जिंदगी या हिंदी वाहिनीवरील पाक कलाकारांचा समावेश असणार्‍या मालिका बंद केल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटले की, प्रेम एकतर्फी असू शकत नाही. आम्ही पाकच्या कलाकारांना डोक्यावर बसवावे, त्यांनी आमच्या देशात रहावे, काम करावे, पैसे कमवावेत आणि जेव्हा आमच्या देशावर आतंकवादी आक्रमण होईल, तेव्हा त्यांनी मौन बाळगावे, असे होऊ शकत नाही. (अशी राष्ट्रप्रेमी भूमिका घेणारे श्री. सुभाष चंद्रा यांचे अभिनंदन ! - संपादक)
श्री. सुभाष चंद्रा यांनी मांडलेली सूत्रे
१. आमचा हा निर्णय कोणत्याही व्यक्ती अथवा पाकच्या कलाकारांच्या विरोधात नाही. आम्ही भारतीयता आणि मानवता यांच्या दृष्टीने आमच्या दर्शकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणे आवश्यक होते.

भारतासह, अफगाणिस्तान, भूतान आणि बांगलादेश यांच्या बहिष्कारानंतर सार्क परिषद स्थगित !

        नवी देहली - पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे. नेपाळकडे यंदाच्या या परिषदेचे अध्यक्षपद होते. नेपाळनेच परिषद स्थगित केल्याचे कळवले आहे.
        सार्कच्या एका सदस्य देशाकडून भारतात आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. तसेच भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हा देश ढवळाढवळ करत आहे. या प्रकारांमुळे ही परिषद यशस्वी होणार नाही, असे वातावरण या देशाने निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही या परिषदेत सहभागी होणार नाही, असे भारताने नेपाळला कळवले होते. काही अन्य देशही याच कारणामुळे या परिषदेत सहभागी होणार नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. दक्षिण आशियाई देशांच्या विकासासाठी दहशतमुक्त वातावरण असणे आवश्यक आहे, असे भारताने नेपाळला कळवले होते.

देहलीत तस्करांनी आणलेले २ सहस्र कोटी रुपयांचे ७ सहस्र किलो सोने जप्त !

केवळ अडीच वर्षांत ७ सहस्त्र किलो सोन्याची तस्करी झाली, 
तर आतापर्यंत किती किलो सोन्याची तस्करी झाली असेल, याचा विचारही न केलेला बरा !
भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी सोन्याची तस्करी उघड ! 
     नवी देहली - महसूल गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईत तस्करांनी आणलेले ७ सहस्र किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. या सोन्याची तस्करी करणारी टोळी मागील अडीच वर्षे कार्यरत होती. (ही सुरक्षायंत्रणांची निष्क्रीयताच होय ! - संपादक) भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी उघड होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे, असे सांगण्यात येत आहे. हे सोने म्यानमार ते मणीपूर मार्गे भारतात आणले जात होते. या टोळीकडून लक्षावधी अमेरिकी डॉलरही जप्त करण्यात आले आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणे, हे भ्रष्ट अधिकार्‍यांचे तस्करांशी संगनमत असल्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या तस्करीसाठी उत्तरदायींना कारागृहात टाका ! - संपादक)

नागपूर येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या नायजेरियन तरुणाला अटक

नायजेरियन लोकांचा वाढता विळखा दूर 
करण्यासाठी शासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत !
       नागपूर - येथे १ वर्षापासून अवैधरित्या वास्तव्य करणारा इरिक जॉन क्वेम या नायजेरियन तरुणाला स्थानिक सीआयएसएफ तसेच इमिग्रेशन विभागातील अधिकारी यांनी अटक केली आहे.
१. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो आल्यावर त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे अधिकार्‍याने त्याचे पारपत्र आणि व्हिसा पडताळली. पारपत्रातील क्रमांकाचा शोध घेतला असता तो दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले. त्यामुळे इरिकजवळचे पारपत्र खोटे असल्याचे उघड झाले.
२. तो वर्ष २०१५ मध्ये ३ मासांचा वैद्यकीय व्हिसा घेऊन भारतात आला. ३ मास उलटूनही तो विदेशात परत गेला नाही.
३. देशातील विमानतळांना आतंकवादी आक्रमणाचा धोका असतांनाही इरिक नागपूर, मुंबई येथील विमानळांवर फिरत असल्याचे सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

करूर (तमिळनाडू) पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या टोळीने ६० गाड्या चोरल्याचे उघड !

कायद्याचे रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस ! राज्यकर्तेच भ्रष्ट असल्याने पोलीसही 
तसेच वागू लागले आहेत, ही स्थिती धर्माचरणी राज्यकर्त्यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल ! 
पोलिसांनी हवाल्याचे पैसे लुटल्याचे प्रकरण !
      कोईम्बतूर (तमिळनाडू) - मडुकराई येथील महामार्गावरील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेले करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. अशा प्रकारच्या ६० प्रकरणांमध्ये मुथुकुमार यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. बेहिशेबी पैसे घेऊन जाणार्‍या ६० गाड्या त्यांनी चोरल्याचा आरोप आहे. या गाड्यांच्या मालकांनी गाड्या चोरल्याच्या तक्रारी केल्या; मात्र गाडीतील हवाल्याचे पैसे गेल्याच्या तक्रारी पोलिसात केल्या नाहीत. याच संधीचा अपलाभ पोलीसांच्या टोळीने उठवला, असे जिल्हा पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांना माहिती पुरवणारे केरळमधील कोडाली श्रीधरन् आणि त्यांचा मुलगा अरुण यांचा पोलीस शोध घेत आहेत.
     २५ ऑगस्ट २०१६ या दिवशी कोईम्बतूरपासून जवळच असलेल्या मडुकराई येथील महामार्गावर मुथुकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस टोळीने केरळ येथील एका व्यापार्‍याची गाडी पळवून त्यातील ३ कोटी ९० लाख रुपये लुटले होते. मुथुकुमार यांनी गुन्हा स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

काशी येथे किन्नरांनी केले सामूहिक पिंडदान !

      काशी (वाराणसी) - किन्नरांनी त्यांच्या पितरांच्या अतृप्त आत्म्यांच्या मुक्तीसाठी येथील पिशाच मोचन विमल तीर्थावर सामूहिक त्रिपिंडी श्राद्ध केले. पुरोहित अनुप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ब्राह्मणांनी या श्राद्धविधीमध्ये सहभाग घेतला. या वेळी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासह देशातील किन्नर आखाड्याचे पिठाधिश्‍वर आणि महंत उपस्थित होते. 
    उज्जैन येथे प्रथमच किन्नरांच्या आखाड्याची स्थापना करण्यात आली होती. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर त्रिपाठी यांनी सांगितले, महाभारताच्या काळात शिखंडीने त्यांच्या पितरांचे पिंडदान केले होते. त्यानंतर प्रथमच किन्नरांकडून सामूहिक स्तरावर धार्मिक पद्धतीने पिंडदान करण्यात आले. यापुढे सनातन धर्मियांप्रमाणे किन्नर समाज त्यांच्या पितरांसाठी प्रत्येक वर्षी श्राद्ध-तर्पण विधी करतील. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येक ५ वर्षांनंतर सामूहिकपणे पिंडदान करण्यात येईल.संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने फरिदाबाद येथील टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत तणावमुक्तीसाठी प्रवचन

टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत प्रवचन
करतांना सौ. संदीपकौर मुंजाल
      फरिदाबाद - संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने येथील टागोर अ‍ॅकॅडमी शाळेत नुकतेच तणाव मुक्तीसाठी काय करावे ? या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा ७० शिक्षकांनी लाभ घेतला. या वेळी प्रतिष्ठानच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांनी तणावामागील कारणे आणि त्यांवरील उपाय, आपल्यातील गुणांचा विकास करून व्यक्तिमत्त्व विकास कसा साधायचा ? आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रवचनानंतर शिक्षकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा घेण्याची मागणी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्याचा शिबिरार्थींचा निर्धार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे सोशल मीडिया शिबीर
डावीकडून शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
श्री. शशिधर पै आणि उपस्थित शिबिरार्थी
        कुमठा, उत्तर कन्नडा, २८ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी येथील श्री महासती मंदिराच्या सभागृहामध्ये एक दिवसीय सोशल मीडिया (सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे प्रसार) शिबीर घेण्यात आले. या शिबिरात राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर कसा करू शकतो ?, याविषयी श्री. शशिधर पै यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराच्या शेवटी साधना कशी करायची याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. कृतज्ञता व्यक्त करून शिबिराची सांगता करण्यात आली. या वेळी शिबिरार्थींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

उरी येथील आक्रमण आणि तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या यांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून चेन्नई येथे मोर्चा !

मोर्च्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
सौ. उमा रविचंद्रन्, श्री. राधाकृष्णन् आणि धर्माभिमानी
      चेन्नई - उरी येथील सैन्यदलाच्या तळावरील आतंकवादी आक्रमण आणि तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या यांच्या निषेधार्थ शिवसेनेने चेन्नई शहरातील चेपॉक येथे निषेधमोर्चा काढला. यामध्ये शिवसेनेसह भारत हिंदु मुन्नानी (भारतीय हिंदूंची आघाडी), ऑल इंडिया हिंदु पीपल्स् पार्टी, सत्यसेना, हिंदु जनजागृती समिती इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी श्री. आर्.डी. प्रभु, श्री. जयम पंडियन, श्री. वसंत कुमार, श्री. सिवकुमार, श्री. गणेश बाबु, श्री. कर्णन इत्यादी नेत्यांची भाषणे झाली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यांनी या निषेधमोर्च्यात सहभाग घेतला. या वेळी शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी उरी येथील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी केंद्रशासनाने पाकच्या विरोधात तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली. तसेच राज्यात होणार्‍या हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणी तमिळनाडू शासनाने आतंकवाद्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी आणि तसे न केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी त्यांनी दिली. हुतात्मा झालेल्या हिंदुत्वनिष्ठांना न्याय मिळवून दिला जाईल, असे श्री. राधाकृष्णन् यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

युद्धात पाकला साहाय्य करणार नाही आणि काश्मीर प्रश्‍नी हस्तक्षेप नाही ! - चीनची दुसर्‍यांदा ग्वाही

हिंदी-चिनी भाई भाई म्हणून भारताच्या पाठीत सुरा 
खुपसणार्‍या चीनच्या या भूलथापांना भारताने बळी पडू नये ! 
      बीजिंग - पाकच्या प्रसारमाध्यमांत चीन भारत-पाक युद्धात पाकला साहाय्य करणार आणि काश्मीरप्रश्‍नी चीनचा पाकला पाठिंबा अशा आशयाच्या बातम्या गेल्याच आठवड्यात प्रसारित झाल्या होत्या; मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुंग यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करतांना या बातम्या खोडून काढल्या. पाकमधील चीनचे राजदूत यु बोरेन यांनी पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पाकने चीन भारत-पाक युद्धात पाकला साहाय्य करणार आणि काश्मीरप्रश्‍नी चीनचा पाकला पाठिंबा देणार, अशा बातम्या पत्रकारांना दिल्या होत्या. 
      या बातम्यांना पाकच्या प्रसारमाध्यमांत ठळक प्रसिद्धी मिळाल्याने पाक नागरिक आनंदी झाले होते; मात्र गेंग शुंग यांनी केलेल्या खुलाशाने पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही चीनचे मित्रराष्ट्र आहेत, त्यांच्यातील प्रश्‍न त्यांनी बोलण्याद्वारे सोडवावेत, असे निवेदन गेंग शुंग यांनी या आठवड्यात दुसर्‍यांदा घोषित केले आहे. पाकमधील चीनचे राजदूत यु बोरेन हे काय म्हणाले हे मला माहित नाही, असेही गेंग शुंग म्हणाले.

धर्मांधांना परत पाठवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! - ऑस्ट्रेलियाच्या खासदार हॅनसन

अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीनही खंडांतून जिहादी 
आतंकवादाच्या भयामुळे धर्मांधांविषयी संतप्त भावना प्रकट होत आहेत. गेली तीन दशके 
जिहादी आतंकवाद सहन करत असलेल्या भारतातून कधीही अशा भावना व्यक्त झाल्या नाहीत, 
हा अहिंसावाद आहे कि गांधीगिरी कि सहिष्णुता कि आत्मघात याचे चिंतन भारतीय करतील का ?
      सिडनी - ऑस्ट्रेलियाची संस्कृती आणि विचारसरणी यांच्याशी मेळ न खाणार्‍या धर्मांधांनी देशात निर्माण केलेल्या दलदलीत फसण्याचा धोका ओळखून शासनाने त्यांना ते ज्या देशातून येथे आले तेथेच परत पाठवण्यासाठी पावले उचालावीत. ज्यांच्या निष्ठा या देशाशी आहेत, त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, अशा स्पष्ट शब्दांत खासदार पौलिन हॅनसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण करतांना चेतावणी दिली. पौलिन हॅनसन या वन नेशन या पक्षाच्या नेत्या असून त्यांच्या पक्षाचे संसदेत ४ खासदार आहेत. त्या आधीपासूनच विदेशी नागरिकांच्या ऑस्ट्रेलियातील स्थलांतराच्या विरुद्ध आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर नियमित अत्याचार केले जातात ! - मानवाधिकार संस्थेच्या पाहणीचा निष्कर्ष

       इस्लामाबाद - पाकिस्तानातील असंतुष्ट आणि भ्रष्टाचारी पोलीस अल्पसंख्यांकांना अनावश्यक अटक, शारीरिक छळ, हत्या करणे आणि लैंगिक हिंसा असे अत्याचार नियमितपणे करत आहेत, असे जागतिक मानवाधिकार संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. केवळ वर्ष २०१५ मध्ये अशा प्रकारची सहस्रो प्रकरणे उजेडात आली आहेत, असे या संस्थेने सिद्ध केलेल्या १०२ पानी अहवालात नमूद केले आहे. (काश्मीरच्या जनतेवर होणार्‍या तथाकथित अत्याचाराविषयी जगभर अपप्रचार करणार्‍या पाकिस्तानला ही सणसणीत चपराक होय ! - संपादक)

अमेरिकेत वाहन अनुज्ञप्तीसाठी ख्रिस्ती महिलेला डोक्यावर उपवस्त्र घेऊ देण्यास नाकारण्यावरून तक्रार !

       अलबामा (अमेरिका) - वाहन अनुज्ञप्तीसाठीच्या (परवान्यासाठीच्या) छायाचित्रासाठी योन अ‍ॅलन नावाच्या एका ख्रिस्ती महिलेला डोक्यावर उपवस्त्र घेऊ देण्याचे नाकारणार्‍या येथील अधिकार्‍याला द अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियनने न्यायालयात खेचले आहे. केवळ मुसलमान महिलांनाच डोक्यावर उपवस्त्र घेण्याची अनुमती दिली जाते, असे या ख्रिस्ती महिलेला त्या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले होते.
       ख्रिस्ती धर्मातील शिकवणीनुसार डोक्यावरून उपवस्त्र घेणे, हा अविभाज्य घटक आहे, असे योन अ‍ॅलन या महिलेने सांगितले. (कुठे स्वतःच्या धर्मातील आचरणासाठी कटिबद्ध असणार्‍या ख्रिस्ती महिला, तर कुठे हिंदु धर्मानुसार धर्माचरण न करणार्‍या जन्महिंदू महिला ! - संपादक)

(म्हणे) 'देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही !'

     अंनिसने आतापर्यंत 'देव नावाची संकल्पना जगात नाही', 'अध्यात्म थोतांड आहे', असाच अपप्रचार करून नास्तिकतावादाचे उघड समर्थन केले आहे. असे असतांना 'देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही !', असे सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍या मुक्ता दाभोलकर ! हिंदूंनो, नास्तिकतावाद्यांचे खरे स्वरूप जाणा आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका !
नास्तिकतावादी अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांचे धादांत खोटे विधान ! 
     चिंचवड (पुणे), २८ सप्टेंबर - देवाधर्माच्या उपासनेला अंनिसचा विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक करण्यास विरोध आहे, असे प्रतिपादन मुक्ता दाभोलकर यांनी केले. (असे असते, तर सद्य परिस्थितील सक्षम कायद्यांनीच अंनिसने हे प्रकार उघडकीस आणले असते. श्रद्धेचीच गळचेपी करणार्‍या जादूटोणाविरोधी कायद्याचा आग्रहच धरला नसता ! - संपादक) येथील प्रतिभा महाविद्यालयात अंनिसच्या वतीने आयोजित 'प्रश्‍न विद्यार्थ्यांचे - उत्तर मुक्ता दाभोलकरांचे' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोलकातामध्ये या वर्षी साम्यवादी चीनचे अधिकारीही दुर्गापूजेत सहभागी होणार !

     विश्‍वासघातकी चीनचे कोणते मनसुबे चालू आहेत, हे कोणी ठरवायचे ? चीनच्या कोणत्याही कृतीकडे सहजतेने पहाता येणार नाही; कारण चीन भारताच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट हेतू ठेवूनच करत असतो. त्यामुळे चीनच्या या कृतीने हिंदूंनी हरपून जाऊ नये ! 
     कोलकाता - येथील या वर्षीच्या नवरात्रीतील दुर्गापूजेमध्ये पहिल्यांदाच साम्यवादी चीनच्या उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी सहभागी होणार आहेत. 

बीड येथे पावसामुळे सहस्रो हेक्टर शेतीची हानी !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ :
धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
      बीड - जिल्ह्यात सतत पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सहस्रो हेक्टर शेतीची हानी झाली. कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात एक सहस्रांपेक्षा अधिक घरांची पडझड झाली आहे.

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

केर्ले येथील धर्माभिमान्यांची अभिनंदनीय कृती ! 
तलावाबाहेर काढून ठेवलेल्या मूर्ती आणि त्यांचे विसर्जन करतांना कार्यकर्ते
     केर्ले (जिल्हा कोल्हापूर), २८ सप्टेंबर (वार्ता.) - अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. पंडितराव शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती इतर धर्माभिमान्यांना कळवली. केर्ले गावातील धर्माभिमानी श्री. रामभाऊ मेथे यांच्या नेतृत्वाखाली गावातील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री चंद्रकांत पाटील, येथील कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंचचे कार्यकर्ते सर्वश्री नाना नलवडे, विक्रम माने, सचिन किल्लेदार, अमोल पाटील, सौरभ पाटील, प्रवीण सूर्यवंशी, अमित अतिग्रे, विक्रम माने यांनी सर्व गणेशमूर्तींचे पुन्हा तलावामध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात श्री गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणार्‍या सर्व धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! अशी कृती हिंदूंनी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. - संपादक) या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी उपस्थित सर्व धर्माभिमान्यांना श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचे महत्त्व विशद केले. तसेच अशी कृती पुन्हा होऊ नये, यासाठी सर्वांचे प्रबोधन केले. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn