Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज संत जनाबाई पुण्यतिथी
आज संत नामदेव पुण्यतिथी

विनम्र अभिवादन !

आज सरदार उधमसिंह बलीदानदिन

श्री विठ्ठल मंदिरातील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडणारी शासकीय समिती विसर्जित करा !

पंढरपूर येथे धरणे आंदोलनाद्वारे विठ्ठलभक्त आणि धर्माभिमानी यांची मागणी
    
आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी
      पंढरपूर - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सध्या अनागोंदी, भ्रष्ट आणि मनमानी कारभार चालू आहे. मंदिर समितीने प्रक्षाळपूजेची पंचांगानुसार काढलेली तिथी मनाने पालटली. मंदिर समितीच्या गोशाळेतील गैरकारभारामुळे गेल्या काही मासांत अनेक गायींचा मृत्यू झाला. मृत गायींच्या पोटात अनेक किलो प्लास्टिकही सापडले आहे. त्याच जोडीला संत नामदेव पायरी, तसेच प्रवेशद्वार येथे सुरक्षारक्षक बूट किंवा चपला घालून जातात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. मंदिरातील धार्मिक विधी, रुढी-परंपरा, देवाचे राजोपचार पूर्ववत् होण्यासाठी शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडणारी शासकीय समिती विसर्जित (बरखास्त) करणे, या मागणीसाठी ३० जुलै या दिवशी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, टांगा स्टॅण्डजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. तहसीलदार नागेश पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि सनातनच्या सौ. अनिता बुणगे यांनी त्यांचे विचार मांडले.

पंढरपूर येथे झालेल्या धरणे आंदोलनात वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संतप्त !

भाविक आणि मंदिर समिती यांची 
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करू ! - आमदार भालके 
          या प्रकरणी शिष्टमंडळाने काँग्रेसचे आमदार भारत भालके (छायाचित्रात मध्यभागी) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी शिष्टमंडळासमोरच प्रांताधिकार्‍यांना त्वरित संपर्क करून संत नामदेव पायरीजवळ तातडीने फलक लावा, अशी सूचना केली. याशिवाय भालके यांनी मंदिर समिती आणि भाविक यांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासनही दिले.

हिंदु संत आणि नेते यांच्यावरील अन्याय दूर न झाल्यास येत्या निवडणुकांत सरकारला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील ! - ३५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाच्या माध्यमातून चेतावणी

          हिदुत्वनिष्ठ सरकार येऊनही हिदु संत आणि नेते अजून कारागृहातच; हिदूंची घोर निराशा !
       राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमानी आणि हिंदुत्ववनिष्ठ यांनी ८५० हून अधिक संख्येत उपस्थित राहून दर्शवलेला कृतीशील सहभाग ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने होणार्‍या वाटचालीतील महत्त्वपूर्ण घटनाच म्हणावी लागेल ! 
       मुंबईतील आझाद मैदानात २८ जुलै या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ३५ हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यातील काही हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे राष्ट्र आणि धर्म यांसाठीचे प्रेरणादायी विचार पुढे देत आहोत. 
       मुंबई, ३० जुलै (वार्ता.) काँग्रेसचे शासन असतांना हिंदूंचे संत आणि नेते यांना अटक करण्यात आली. त्यांची सुटका व्हावी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना न्याय मिळावा, यासाठी जनतेने हिंदुत्वनिष्ठ सरकार निवडून दिले; परंतु या हिंदूंचे सरकार येऊनही हिंदु संत आणि नेते यांची सुटका अजूनही न झाल्यामुळे हिंदु जनतेची घोर निराशा झाली आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास येत्या निवडणुकांत सरकारला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, अशी चेतावणी ३५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २८ जुलै या दिवशी आझाद मैदान येथे आंदोलनाद्वारे दिली.

देवबंद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

  • चर्चवर कथित दगडफेक झाली, तरी बातम्या देणारी ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे अशा बातम्या देत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
     देवबंद (उत्तरप्रदेश) - येथील एका मंदिरातील मूर्तीचे सादिक नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाने हातोड्याचे घाव घालून भंजन केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सादिक याला अटक केली आहे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मूर्ती तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या जमावाने येथील एका मशिदीची भिंत आणि प्रवेशद्वार पाडले अन् येथे जाळपोळ केली. पोलीस आणि प्रशासन यांनी रात्रीच ही भिंत आणि प्रवेशद्वार बांधून दिले. (पोलीस आणि प्रशासन यांनी अशी तत्परता मंदिरातील मूर्तीविषयी का दाखवली नाही ? - संपादक)
     पोलिसांनी मूर्ती तोडफोडीच्या संदर्भात ६ जणांवर, तर मशिदीच्या प्रकरणी १५ ते २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर खासदार राघव लखन पाल शर्मा यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास ३१ जुलैला मंदिर परिसरात महापंचायत बोलावण्याची घोषणा केली आहे, तर काँग्रेसच्या आमदाराने मशिदीची तोडफोड करणार्‍यांच्या विरोधात २ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. भाजपचे नगराध्यक्ष गजराज राणा यांनी सांगितले की, महापंचायतीच्या आयोजनासाठी प्रशासनाकडे अनुमती मागण्यात आली आहे.

गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवारीची चोरी !

  • तलवार चोरून छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे विटंबना केली जाणे, हे सरकारला लज्जास्पद आहे ! अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • २७ जुलैपासून सहस्रो शिवप्रेमींकडून पुतळ्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण चालू
       संभाजीनगर - गंगापूर येथील साखर कारखान्याच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार २१ जुलै या दिवशी चोरीला गेली. या प्रकरणी नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांनाही सांगितले; मात्र अजूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने तालुक्यातील शिवप्रेमींनी संतप्त होऊन २७ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने आमरण उपोषणास प्रारंभ केला. (केवळ उपोषण करून वाट पहाण्यापेक्षा संबंधित आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावाही घ्या ! - संपादक) या वेळी शिवप्रेमींनी काही मागण्याही मांडल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील, अशीही चेतावणी शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आली आहे. एवढे होऊनही पोलीस प्रशासन गुन्हा प्रविष्ट करत नसल्याने शिवद्रोही मोकाट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला !

      हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव आणि अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी दिलेल्या घोषणांना धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प.पू. आसारामजी बापूंची सुटका करा, शासनाचा धिक्कार असो, धनंजय देसाई आणि प्रज्ञासिंह यांची सुटका करा, अशा घोषणा अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांसह धर्माभिमान्यांनी दिल्यामुळे सर्वांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. तसेच या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मोहीम चालवावी ! - योगऋषी रामदेवबाबा

आपल्या लक्षात येत नाही, ते संतांनी लक्षात आणून दिल्यावर 
त्याप्रमाणे कृती करण्याची बुद्धी सत्ताधार्‍यांना झाल्यास देशाचे कल्याण होईल !
     रोहतक (हरियाणा) - आताच वेळ आहे की, भारताने स्वतःची अन्य देशांनी कह्यात घेतलेली भूमी सोडवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करण्यासाठी मोहीम चालवली पाहिजे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. मोदी यांनी पाकच्या भूमीवरून भारतावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांच्या विरोधातही कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही रामदेवबाबा म्हणाले.
     योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले, नवाज शरीफ म्हणतात की, कोणत्याही किमतीत पाक काश्मीरला प्राप्त केल्याशिवाय रहाणार नाही. भारतीय मुले संपूर्ण काश्मीरला नकाशावर पहातात; पण काश्मीरच्या काही भागावर पाकने नियंत्रण मिळवले आहे. जेव्हा एक घाबरट देश एका महान देशाच्या भूमीवर नियंत्रण ठेवतो, तेव्हा आपण गप्प बसू शकत नाही.

बिलिव्हर्सच्या कारवायांनी पीडित शिवोलीतील एका युवकाने पत्रकार परिषदेत मांडली व्यथा !

       बिलिव्हर्सच्या कारवायांनी पीडित शिवोलीतील (गोव्यातील) एका युवकाने पत्रकार परिषदेत व्यथा मांडली. हा युवक म्हणाला, आजारी असलेल्या वडिलांना चांगले करतो असे खोटे सांगून बिलिव्हर्सवाल्यांनी माझ्या कुटुंबियांना फसवले. आजार बरा करतो, असे सांगून फाईव्ह पिलर चर्चमध्ये नेऊन तेथे बिलिव्हर्सचा प्रमुख डॉम्निक आणि त्याची पत्नी यांनी वडिलांवर अघोरी उपचार केले. तो पुढे म्हणाला की, डॉम्निक पास्टरकडून हिंदु धर्म आणि आणि देवता यांविरोधान अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली. पास्टर आम्हाला सांगायचा की, तुम्ही अत्यंत पाप केल्याने हिंदु धर्मात जन्माला आला आहात. या पापातून मुक्त होण्यासाठी प्रथम हिंदु धर्म सोडायला हवा. राऊरकेला (ओडिशा) येथे धर्मांध विद्यार्थ्याकडून फेसबूकवरून श्रीरामाचा अवमान

* प्रत्युत्तर देणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला मारहाण 
* मुसलमानबहुल भागात कावड यात्रेवरही आक्रमण 
* पोलिसांकडून हिंदु विद्यार्थ्यालाच अटक
      राऊरकेला (ओडिशा) येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर अंकितने प्रत्युत्तर दिल्यावर सुभान याने १५ धर्मांधांना आणून अंकित याला महाविद्यालयातच मारहाण केली. तसेच पोलिसांनी सुभान आणि धर्मांधांना अटक करण्याऐवजी अंकित यालाच अटक करण्याची घटना १३ जुलैला घडली.वर्ष १५८३ मधील लढ्याचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा ! - आमदार नरेश सावळ, गोवा

राष्ट्राची अस्मिता असणार्‍या क्रांतीकारी लढ्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी 
मागणी वारंवार करावी लागणे हे शासनाला लज्जास्पद !
      वर्ष १५८३ मध्ये गोव्यात कुंकळ्ळीतील परकीय सत्तेच्या विरोधात दिलेल्या प्रखर लढ्याच्या इतिहासाचा पाठ्यपुस्तकात समावेश होणे आवश्यक आहे. या लढ्याचा इतिहास संपूर्ण भारतभर पोहोचायला हवा, असे प्रतिपादन डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी केले. कुंकळ्ळी हुतात्मा स्मारक न्यास आणि कुंकळ्ळी नगरपालिका मंडळ यांच्या वतीने कुंकळ्ळी लढ्याच्या ४३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावळ बोलत होते.


काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांनी पोलिसाचे डोळे फोडले !

जिहाद्यांचे हे क्रौर्य निधर्मीवाद्यांना दिसणार नाही; कारण ते मुसलमानप्रेमाने आंधळे झाले आहेत !
     जम्मू-काश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांनी एका पोलीस अधिकार्‍याचे डोळे फोडल्याची घटना घडली आहे. या पोलिसावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुरक्षा अधिकारी शफाकत अहमद यांना १४ जुलै या दिवशी दंगलखोरांनी अमानुष मारहाण केली. अहमद हे खाली पडल्यानंतर दंगलखोरांनी त्यांच्या डोळ्यांवर आक्रमण करून ते फोडले. दंगलखोर सुरक्षारक्षकांना घेरून त्यांच्यावर आक्रमण करू लागले आहेत. तसेच त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे लुटत आहेत.डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला विदेशातून १५ कोटी रुपयांच्या देणग्या !

एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉ. झाकीर नाईक यांना पैसा मिळेपर्यंत आणि त्याचा वापर जिहादसाठी 
होत असतांना भारतीय अन्वेषण यंत्रणा काय करत होत्या ? कि तत्कालीन काँग्रेस सरकारने कारवाई 
करण्यास विरोध केला होता, हे जनतेला समजले पाहिजे !
      डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशनला विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे गृहमंत्रालयाच्या अन्वेषणातून समोर आले आहे. डॉ. नाईक यांच्या संस्थेला वर्ष २०१२ पर्यंत ब्रिटन, सौदी अरेबिया आणि मध्य पूर्व देशांतून १५ कोटी रुपये पुरवण्यात आले होते. ढाका आक्रमणानंतर केंद्रशासनाने डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. हे एफ्सीआर्एच्या तरतुदींचे उल्लंघन आहे, ज्याच्या अंतर्गत डॉ. नाईक यांच्या संस्थेची नोंदणी आहे. हे सिद्ध झाल्यास या संस्थेवर कारवाई करण्यात येईल.


लहान मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने सोलून आणि दगडाने ठेचून संपवले पाहिजे ! - खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस

समाजाला साधना आणि नीतीमत्ता शिकवली, तर 
समाजाची सात्त्विकता वाढून कोणत्याही प्रकारचे 
गुन्हे करण्याची दुर्बुद्धी कोणत्याही व्यक्तीला होणार नाही !
        सातारा - लहान मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने सोलून, दगडाने ठेचून संपवले पाहिजे. अशा घटनांतील आरोपी जामिनावर किंवा शिक्षेविना सुटतात, ही लोकशाहीची शोकांतिका आहे, यासाठी कायद्यात पालट केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केली. येथील कोरेगाव तालुक्यात तडवळे येथे ५ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही टीका केली.
        भोसले पुढे म्हणाले, बलात्कारासारख्या घटना माणुसकीला काळीमा फासणार्‍या आहेत. त्या वारंवार घडत असल्याने समाज कोणत्या दिशेने चालला आहे, हे लक्षात येत नाही. समाजात कायद्याचा धाक आणि नैतिकता राहिली नाही. प्रगतीच्या नावाखाली समाजाची अधोगती चालू आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती; मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. शासकीय यंत्रणाही किती निगरगट्ट आणि बोथट झाली आहे, हे दिसून येते.

आंदोलनात सहभागी होणार्‍या धर्माभिमान्यांची पोलिसांकडून चौकशी !

धर्माभिमान्यांच्या मागेही पोलिसांचा ससेमिरा चालू !
      आंदोलनात कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांचे कोणते पदाधिकारी आणि धर्माभिमानी सहभागी होणार आहेत, त्यांची संख्या किती आहे, याविषयीची विचारणा मुंबई आणि ठाणे येथील गुप्त शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. तसेच या आंदोलनात सहभागी न होण्याविषयी धर्माभिमान्यांना सांगून धर्माभिमान्यांच्या संपर्क क्रमांकाची माहितीही पोलिसांनी मागितली. आंदोलनाची कल्पना पोलिसांना अगोदरच असल्याने त्यांनी आंदोलनाच्या काही घंटे अगोदर धर्माभिमान्यांना भ्रमणभाषवरून विचारणा केली; मात्र पोलिसांच्या धमकीला भीक न घालता बर्‍याच ठिकाणाहून धर्माभिमानी आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी झाले होते. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही धर्माभिमान्यांची आंदोलनाला पुष्कळ उपस्थिती लाभली.फिलिपिन्समध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवरून गेल्या २४ दिवसांत पोलिसांनी २९३ जणांना ठार केले !

तस्करांना ठार करण्याच्या राष्ट्राध्यक्ष ड्युटरेट यांच्या आवाहनाचा परिणाम !
     मनिला (फिलिपिन्स) - फिलिपिन्समध्ये अमली पदार्थ वितरक आणि त्यांचे हस्तक यांच्यामुळे देशात वाढलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिन्यात फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटरेट यांनी नागरिक आणि पोलीस यांना तस्करांना संपवण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम पहाता १ जुलै ते २४ जुलै या कालावधीत पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असल्याच्या संशयावरून २९३ जणांना ठार केले आहे. हा सरकारी आकडा असून ही संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आकड्यात नागरिकांच्या दक्षता पथकांनी ठार केलेल्यांच्या संख्येचा समावेश नाही. सरकारी मान्यता मिळालेल्या या कारवाईमुळे येथे सामाजिक प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे.

देशातील ५७ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्रच नाही !

ही आहे देशाची दयनीय स्थिती ! यास सर्वपक्षीय राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत ! 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील वास्तव !
      देशातील ५७ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनोच्या) जागतिक आरोग्य संघटनेच्या द हेल्थ वर्कफोर्स इन इंडियाया अहवालातून उघड झाले आहे. यातील एक तृतीयांश डॉक्टर हे केवळ माध्यमिक शिक्षण घेतलेले असूनही रुग्णांना उपचार देत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागातील केवळ १८.८ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांकडे वैद्यकीय पात्रता आहे. हा अहवाल वर्ष २००१ मधील जनगणनेतील आकडेवारीनुसार सिद्ध करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सीमेवरील रणगाड्यांची नावे टिपू सुलतान आणि औरंगजेब ठेवली !

आता भारतीय सैन्य आणि संरक्षण विभाग यांना खरा इतिहास 
शिकवण्याची वेळ आली आहे, असे म्हणायचे का ?
      वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताने प्रथमच लडाखमधील भारत-चीन सीमेवर रणगाडे तैनात केले असून यांतील काही रणगाड्यांची नावे टिपू सुलतान, महाराणा प्रताप, औरंगजेब अशी ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत असे १०० रणगाडे सीमेचे रक्षण करत असून यात अजून रणगाडे समाविष्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजली आहे.

पाटणा येथे पीएफ्आयकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा

      पाटणा येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या संघटनेने एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी आणि डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी महंमद तौसिफ नावाच्या संशयिताला अटक केली आहे. तौसिफ हा पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या मिथिलांचल क्षेत्राचा सचिव आहे.

(म्हणे) गणेश मंडळांनी मशिदीसमोर मिरवणूक आल्यावर ध्वनीक्षेपक बंद केल्यासच देशात एकता नांदेल !

हिंदुबहुल भारतात हिंदूंना अशी धमकी मिळते, याहून दुसरे दुर्दैव कुठले ?
पत्रकार परिषदेत आमदार अबू आझमींची गर्भीत चेतावणी
     मी मुसलमानांना सांगेन की, गणेश मंडळांचा मान राखा; मात्र गणेश मंडळांनी मिरवणूक मशिदीसमोर आल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद करायला हवा, तरच देशात एकता नांदेल, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एकप्रकारे चेतावणी दिली. विधानभवनातील पत्रकारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आझमी बोलत होते.
सनातन आणि सीमी यांना एका रांगेत बसवण्याचा प्रयत्न करणारे अबू आझमी
     पुरावे नसतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी का करत आहात ?, असा प्रश्‍न एका पत्रकाराने अबू आझमी यांना विचारल्यानंतर त्यांनी सिमीच्या विरोधात तरी कुठे पुरावे आहेत, तरी त्यांच्यावर बंदी का ?, असा प्रतिप्रश्‍न करून मूळ प्रश्‍नाला बगल दिली.अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर मुसलमानांना हज यात्रेला जाऊ देणार नाही !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात वारंवार आवाज उठवणार्‍या शिवसेनेचा हिंदूंना नेहमीच आधार वाटतो !
शिवसेनेची पुणे येथील आंदोलनात चेतावणी !
     बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा प्रसंगी रस्त्यावर येऊन दोन हात करायला आणि जशास तसे उत्तर द्यायलाही सिद्ध आहे. जर अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर येथून पुढे हज यात्रेला एकाही मुसलमानाला जाऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने ११ जुलै या दिवशी पुणे येथील अमरनाथ यात्रेवरील बंदीच्या विरोधातील आंदोलनात देण्यात आली. (म्हणे) गायींचे सर्वेक्षण करून भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही !

जिहादी आतंकवाद सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी कधी म्हणतात का ?
तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांची दर्पोक्ती !
      प्रत्येक घरात किती गायी आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे निमित्त करून बंगाल राज्याचे भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हिंदु जागरण मंच आणि गोरक्षादल करत आहे. त्यामागे काही राजकीय पक्षांचाही हात आहे, हे प्रयत्न मी खपवून घेणार नाही, अशी दर्पोक्ती तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी केली आहे. येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलतांना त्या पुढे म्हणाल्या, जर कुणी बकर्‍याचे, कोंबडीचे मांस खात असेल, तर कुणाला आक्षेप नसतो; मात्र गोमांसाचा विषय निघाला की, काही लोक ओरडतात. कुणी साडी अथवा धोतर घातले, तर कुणाला आक्षेप नसतो; मात्र सलवार-कमीज अथवा लुंगी घातली, तर आरडाओरड होते. कुणी काय खावे आणि घालावे हे ठरवणारे हे लोक कोण आहेत ?

(म्हणे), पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर बंदी का नाही ?

आतंकवाद्यांची तळी उचलणारे काँग्रेसचे (मौलाना) दिग्विजय सिंह यांचा थयथयाट !
     डॉ. झाकीर नाईक हे कोणत्याही आतंकवादाचे समर्थन करत नाहीत. ते इस्लाम शांतीसाठीच असल्याचे सांगतात. नाईक यांच्या पीस टीव्हीवर भारतात बंदी घातली जात असेल, तर सुदर्शन टीव्हीवर बंदी का नाही, असा हिंदुद्वेषी प्रश्‍न काँग्रेसचे सरचिटणीस खासदार (मौलाना) दिग्विजय सिंह यांनी केला आहे. (पीस टीव्हीवरून चिथावणीखोर वक्तव्याने अनेक धर्मांध हे आतंकवादी म्हणून सिद्ध होत आहेत. सुदर्शन टीव्हीच्या माध्यमातून असे आतंकवादी सिद्ध झाल्यांचे एकतरी उदाहरण ऐकिवात आहे का ? - संपादक) दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे संवेदनाहीन असून भाजपला काश्मीर प्रश्‍न समजलाच नाही.

(म्हणे) अफझलखान भेटीचेच चित्र पाठ्यपुस्तकात असू द्यावे !

छत्रपती शिवाजी 
मुस्लिम ब्रिगेडची गरळओक
        पुणे, ३० जुलै - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास - २ या पुस्तकात अफझलखानवध या चित्राच्या जागी अफझलखानाच्या भेटीचे चित्र छापले आहे. हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी या चित्रात पालट करू नयेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. अफझलखानवधाचे चित्र पुस्तकात छापण्याची, तसेच ते मंत्रालयात लावण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि इतिहासप्रेमी यांनी केली होती. ही मागणी मागे घ्यावी, अशी मागणी पाटील यांनी या वेळी केली. (अशी मागणी करण्याऐवजी सत्य इतिहास समाजापर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना इतिहासातून चांगले भविष्य घडवण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड का मागणी करत नाही ? - संपादक)

डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंगालमध्ये बंदी घाला !

हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ 
संघटना यांची बंगालच्या राज्यपालांची भेट घेऊन मागणी !
    
राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना निवेदन देतांना डावीकडून
श्रीमती राजश्री चौधरी, श्री. उपानंद ब्रह्मचारी, श्री. चित्तरंजन सुराल
     कोलकाता - हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांनी बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची ३० जुलैला भेट घेऊन डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या पीस टीव्हीवर बंगाल राज्यात बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. या शिष्टमंडळात श्री. सुराल यांच्यासोबत हिंदु एक्झिस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी, अखिल भारतीय हिंदु महासभेच्या राज्य अध्यक्षा श्रीमती राजश्री चौधरी, निखील बंग नागरिक समितीचे सरचिटणीस श्री. सुभाष चक्रवर्ती आणि धर्म उत्थान समितीचे श्री. बिकर्ण नासकर उपस्थित होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपालांना डॉ. झाकीर नाईक यांच्या देशद्रोही कारवायांविषयी माहिती दिली. यावर माननीय राज्यपालांनी आतापर्यंत झालेले हिंदूंवरील अत्याचार यापुढे रोखण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील आणि जातीय द्वेष पसरवण्याचे आणि भेदभावाचे वातावरण संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनासोबत त्यातील आरोपांना पुष्टी देणारी कागदपत्रेही जोडण्यात आली. तसेच शिष्टमंडळाने या प्रसंगी राज्यपालांना सनातन-निर्मित ग्रंथ भेट म्हणून दिले.

भांबोरा (जिल्हा नगर) येथील विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या आरोपींसह मद्यपी पोलिसांनाही ग्रामस्थांनी डांबले

जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल ! असे सर्वत्र झाल्यास 
महिलांच्या अत्याचाराच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल !
       नगर, ३० जुलै - येथील कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या तिघांना ग्रामस्थांनी चोप देत २९ जुलै या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. त्यानंतर गावात आलेल्या पोलिसांच्या गाडीतच मद्याच्या बाटल्या आढळल्या आणि त्यांच्या तोंडाला मद्याचा दुर्गंध येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. (असे मद्यपी पोलीस गुन्हेगारीला कसा आळा घालणार ? - संपादक) त्यामुळे त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद होऊन ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. ग्रामस्थांनी संशयितांसह पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात ७ घंटे डांबून ठेवले. जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत संशयितांना कह्यात देणार नाही, अशी भूमिका घेतली. विनयभंग करणार्‍या आरोपींना ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

६ मासांच्या आत गोहत्या रोखण्यासाठी कायदा बनवा !

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा केंद्रसरकारला आदेश
असे आदेश न्यायालयांना का द्यावे लागतात ?
सरकारला हे का कळत नाही ?
     शिमला - गोहत्या रोखण्यासाठी येत्या ६ महिन्यांत (मासांत) कायदा बनवावा, असा आदेश हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजीव शर्मा आणि न्या. सुरेश्‍वर ठाकूर यांच्या खंडपिठाने केंद्रसरकारला दिला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये या खंडपिठाने हिमाचल प्रदेशमध्ये गोहत्येवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. तसेच बेवारस पशूंना हटवण्यासाठी आणि गोसदन बनवून घायाळ पशूंवर उपचार करण्यासाठीही आदेश दिला होता. वरील आदेशाव्यतिरिक्त न्यायालयाने हिमाचल प्रदेश सरकारला आदेश दिला की, त्याने ३ महिन्यांच्या (मासांच्या) आत राज्यात कृषी आयोगाची स्थापना करावी.

काश्मीरमध्ये चकमकीत २ सैनिक हुतात्मा !

काँग्रेसच्या राजवटीत सैनिक हुतात्मा होत होते, 
तसेच आताच्या सरकारच्या काळातही होत आहे ! ही 
स्थिती सरकार पालटल्याने नाही, तर हिंदु राष्ट्राची 
(सनातन धर्म राज्याची) स्थापना झाल्यावरच पालटेल !
       जम्मू - येथील नौगाव सेक्टरमध्ये ३० जुलैच्या रात्री आतंकवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले, तर २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात यश आले. हे आतंकवादी येथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यात एक सैनिक घायाळही झाला आहे. २ दिवसांपूर्वीही येथे २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर एका आतंकवाद्यांला जिवंत पकडण्यात आले होते.

गोरक्षणासाठी माणसांना मारू नका ! - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकांना गोरक्षण का करावे लागते, याचाही आठवले यांनी विचार
 करायला हवा ! सरकार कायदे करते; मात्र त्याची अंमलबजावणी
 होण्यासाठी कठोर पावले उचलत नाही, त्यावरही आठवले यांनी बोलले पाहिजे !
     नवी देहली - गोरक्षकांनी गायींचे रक्षण करावे. त्यासाठी कोणाचाच विरोध नाही. सरकारने त्यासाठी कायदेही केले आहेत; मात्र गोरक्षण करतांना माणसांना का मारता, असा प्रश्‍न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षकांना केला आहे.
     आठवले पुढे म्हणाले की, माणसाचा जीव घेऊन गायींचे रक्षण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. लोकांना मारून गोरक्षण करायला लागलो, तर माणसांचे रक्षण कोण करणार ? गोरक्षणाबरोबरच माणसांचेही रक्षण झाले पाहिजे.
मायावती अद्यापही हिंदु !
     बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती स्वत:ला खर्‍या आंबेडकरवादी म्हणवून घेतात; मात्र त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा प्रश्‍नही आठवले यांनी या वेळी केला. मायावती मनुवादावर टीका करतात. धर्मांतराविषयी बोलतात; मात्र स्वत: अजूनही हिंदु राहिल्या आहेत, असेही आठवले यांनी निदर्शनास आणले.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयातील १७ कर्मचार्‍यांच्या हस्ताक्षरांचे पोलिसांनी घेतले नमुने !

भ्रष्टाचाराने पोखरलेली देवस्थान समिती !
     कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या उदगिरी येथील शेतभूमी अपव्यवहारप्रकरणी शिवाजी पेठ येथील समितीच्या कार्यालयातील २३ पैकी १७ कर्मचार्‍यांचे हस्ताक्षर नमुने पोलिसांनी घेतले आहेत. समितीच्या सावंतवाडी येथील कार्यालयातील ३ लिपिकांकडे २९ जुलै या दिवशी चौकशी करण्यात आली. शीतल इंगवले, अनिरुद्ध गुरव आणि दीपक म्हेत्तर अशी त्यांची नावे आहेत. ३० जुलै या दिवशी त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांच्याही हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले. (हिंदु विधीज्ञ परिषदेने यापूर्वी सीआयडीकडे देवस्थान समितीमधील घोटाळ्यांची पुराव्यासहित माहिती दिली होती, ती अशा प्रकरणातून सिद्ध होत आहे. - संपादक) या तिन्ही लिपिकांचे सावंतवाडी कार्यालयात स्थानांतर करण्यात आले. (स्थानांतर केल्यावर असे भ्रष्ट कर्मचारी दुसर्‍या गावात जाऊनही पुन्हा भ्रष्टाचार करतील. त्यामुळे अशांना बडतर्फच करायला हवे ! - संपादक)

(म्हणे) सनातनी संघटनांच्या दबावाला बळी पडून इतिहास पालटू नये ! - राष्ट्रसेवा समूह

       पुणे - इयत्ता चौथीच्या पुस्तकात योग्य इतिहास मांडला जात आहे. सनातनी संघटनांच्या दबावाला बळी पडून पाठ्यपुस्तकातील इतिहास पालटू नये, अशी मागणी राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. २३ जुलै या दिवशी इतिहासप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने बालभारतीच्या अधिकार्‍यांना निवेदन देऊन इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात अफझलखानभेटीच्या चित्राऐवजी अफझलखानवधाचे चित्र समाविष्ट करून सत्य इतिहास पाठ्यपुस्तकांतून मांडण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. (स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस शासनाने शैक्षणिक संस्थांमध्ये काँग्रेसी आणि डाव्या विचारांच्या लोकांचा भरणा केला. या मंडळींनी भारतियांच्या शौर्याचा इतिहास न शिकवता चरखावादी नेभळट इतिहास शिकवला. त्यामुळेच प्रखर राष्ट्रवाद अंगी बाणवलेली पिढी निर्माण होऊ शकली नाही. आताच्या शासनाने तरी सर्व पाठ्यपुस्तकांमधून सत्य इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, अशीच जनतेची इच्छा आहे ! - संपादक)

पुण्यात दरमास १ सहस्र ६०० हून अधिक नागरिकांना श्‍वानदंश !

या प्रकरणी पालिका प्रशासन किती घटना घडल्यावर उपाययोजना करणार आहे ?
     पुणे, ३१ जुलै - पुण्यात भटक्या कुत्र्यांचा सर्वसामान्य व्यक्तींना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार दर मासाला १ सहस्र ६०० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या आहेत. (अशा कुत्र्यांविषयी कारवाई करण्याचे पालिकेच्या श्‍वान पथकाच्या लक्षात येत नाही का ? - संपादक)
      पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या ६ मासांमध्ये १० सहस्र ०७७ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे रेबिजविरोधी लस घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ५ सहस्र ७२६ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्यांचा त्रास सहन करावा लागला होता. शहराच्या अनेक भागांत पहाटेच्या वेळी, संध्याकाळी आणि विशेषत: रात्री भटकी कुत्री कळपांनी फिरतांना दिसतात. अशी कुत्री अंगावर धावून जाणे, गाड्यांवर चाल करून जाणे, गाड्यांच्या मागे पळणे अशा गोष्टींमुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

गोहत्येवर राष्ट्रव्यापी बंदी, ही बहुसंख्य हिंदूंची अपेक्षा आतातरी पूर्ण होईल का ?
     गोहत्या रोखण्यासाठी येत्या ६ महिन्यांत कायदा बनवावा, असा आदेश हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने केंद्रसरकारला दिला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये न्यायालयाने हिमाचल प्रदेशमध्ये गोहत्येवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Himachal Pradesh uccha nyayalay ka deshme Gohatya par pratibandh laganeka kendra sarkarko adesh. - Hinduonke liye pujya Gomata ki kya ab to raksha hogi ?
जागो ! : हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय का देश में गोहत्या पर प्रतिबंध लगाने का केंद्र सरकार को आदेश.
- हिन्दुआें के लिए पूज्य गोमाता की क्या अब तो रक्षा होगी ?

ठाणे येथून १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक

घुसखोरांसाठी नंदनवन बनलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांची समस्या कायमची 
सोडवण्यासाठी सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत ! 
      ठाणे - येथे अवैधरित्या रहाणार्‍या १४ बांगलादेशी घुसखोरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे. अटक घुसखोरांमध्ये ८ पुरुष, २ महिला आणि ४ मुले यांचा समावेश आहे. हे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात प्रवेश करत कोलकातामार्गे भिवंडीतील मुसलमान वस्तीत आले. तेथील एका घरात अनेक दिवसापासून ते सर्वजण वास्तव्यास होते. गेल्याच आठवड्यात येथून इसिसच्या २ संशयितांनाही पकडण्यात आले होते. (इसिसचे संशयित आणि बांगलादेशी यांची भारतात घुसखोरी म्हणजे पोलिसांचा अन् कायद्याचा वचक नसल्याचेच द्योतक ! - संपादक)मुंबईत मुसळधार पाऊस !

रेल्वे सेवेवर परिणाम
       मुंबई, ३० जुलै (वार्ता.) - मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागांत पाणी साचले आहे. २९ आणि ३० जुलै या दिवशी दिवसभर पावसाचा जोर कायम असतांनाच रात्रीही उपनगरांत पावसाने दमदार उपस्थिती लावली. सतत पडणार्‍या पावसामुळे मध्य, पश्‍चिम आणि हार्बर अशा तिनही मार्गांवरील रेल्वेसेवेवरही परिणाम झाला असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. शहरात २९ जुलै या दिवशी रात्री ८ ते ३० जुलै या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची ४४.७२ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी कामावर मद्यपान करतांना आढळले

मद्यधुंद प्रशासकीय अधिकारी 
जनतेच्या समस्या सोडवणार का ?
       कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कार्यालयात मद्यपान करतांना नागरिकांना आढळून आले. कल्याणच्या गणेशवाडी इमारतीचे रहिवासी पाणी येत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेले होते, त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकाराविषयी संतप्त रहिवाशांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर मद्यधुंद अधिकार्‍यांनी नागरिकांना धक्काबुक्की करून कार्यालयातून पळ काढला, तर एका अधिकार्‍याने चारचाकी रहिवाशाच्या अंगावर घातली; मात्र सुदैवाने ते बचावले. महापालिकेच्या अधिकार्‍यांची दु:स्थिती यातून उघडकीस आली.

शुभ्र साखरेचे शरिरावर होणारे दुष्परिणाम !

१. शुभ्र साखरेचे शरिरावर होणारे दुष्परिणाम
      दैनंदिन शारीरिक क्रियांसाठी आवश्यक ४५ ते ६५ टक्के शक्ती आहारातून घेतलेल्या नैसर्गिक शर्करेद्वारे (पिष्टमय पदार्थांपासून) प्राप्त होते. धान्य, फळे, शेंगा, कंदमुळे, दूध आदींमधून हिची पूर्तता सहजतेने होते. नैसर्गिक शर्करा शारीरिक क्रियांसाठी इंधनाचे कार्य करते. यासाठी ती उपकारक असते; परंतु रिफाइंड साखर पचवण्यामध्ये शारीरिक शक्ती आणि शरिराची आधारभूत तत्त्वे यांचा अपव्यय होतो. हाडे, हृदय, मेंदू, स्वादुपिंड, यकृत इत्यादींची कार्यप्रणाली विस्कळीत होते.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कालावधीत शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. शिवाजी वटकर
१. कोणतीही प्रसारसेवा नसतांना अधिवेशनाला बोलावल्याने कृतज्ञता व्यक्त होणे आणि भावाच्या स्तरावर लाभ होण्यासाठी प्रार्थना करणे

माझ्याकडे सध्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वय कार्यालयाची सेवा आहे. मी प्रत्यक्ष प्रसार किंवा कृती यांच्या स्तरावरील कोणतीही सेवा करत नाही, तरी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी मला बोलावले आहे, हे कळल्यावर गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि या संधीचा भावाच्या स्तरावर राहून मला लाभ घेता येऊ दे, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना केली.

२. अधिवेशनाला येणार्‍या प्रतिनिधींसाठीचे बिल्ले अर्पण म्हणून मिळवण्याची सेवा मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त होणे आणि बिल्ल्यांच्या पालटलेल्या नमुन्याविषयी कार्यपद्धतीचे पालन करून निर्णय घेऊन सेवा पूर्ण केल्याने आनंद मिळणे

अधिवेशनाला येणार्‍या प्रतिनिधींच्या ओळखीसाठी गळ्यात घालावयाच्या नावांसाठी प्लॅस्टीकचे १ सहस्र बिल्ले अर्पण म्हणून मिळवण्याची सेवा मला मिळाली. तेव्हा मला कृतज्ञता वाटली. ईश्‍वरी नियोजननानुसार ते बिल्ले कुणीतरी सूक्ष्मातून दिलेलेच आहेत. ते केवळ मला स्थुलातून जाऊन आणायचे आहेत, हे लक्षात ठेवून मी ही सेवा आनंदाने स्वीकारली. मी बिल्ल्याचा नमुना सहसाधकांनी सांगितलेल्या दुकानात घेऊन गेलो. त्यांना आश्रमातील प्रसाद आणि सात्त्विक उत्पादने भेट दिली. त्यांनी ती मस्तकाला लावून कृतज्ञता व्यक्त केली. पुढील कार्य त्यातील चैतन्यानेच केले. दुकानदारांना नमुने दाखवल्यावर त्यांनी 'तसे मिळणे शक्य नसल्याचे; पण अन्य प्रकारचे देऊ शकतो', असे सांगितले. त्यावर कार्यपद्धतीप्रमाणे मी गोव्यातील संबंधित साधकांना व्हॉट्स अ‍ॅपवरून छायाचित्र पाठवून विचारून घेतले. अनुमती मिळाल्यावर मालकांनी मला बिल्ले अर्पण म्हणून दिले. मी कार्यपद्धतीनुसार विचारून सेवा केल्याने सेवेतून आनंद मिळाला. या प्रसंगावरून अधिवेशनाच्या कोणत्याही सेवेत केवळ 'कृतज्ञताभावात रहाणे', एवढेच मला करायचे आहे, याची मला जाणीव झाली.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा जून २०१६ मधील आढावा

१. पत्रकार परिषदेचे आयोजन
     १०.६.२०१६ या दिवशी गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने फरिदाबाद येथील महावीर जैन भवनामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 
२. व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर प्रवचनाचे आयोजन
       देहलीमध्ये बाल गोकुलम् आणि सामाजिक समरस्ता यांच्या वतीने मुलांसाठी व्यक्तीमत्त्व विकास या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबीर १५.५.२०१६ पासून २१.६.२०१६ पर्यंत घेण्यात आले. या शिबिरामध्ये मुलांसाठी राष्ट्र आणि धर्म प्रेम कसे वाढवावे ?, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कला, नृत्य अन् संगीत यांचेही शिक्षण दिले गेले. आदर्श बालक कसे असावे ?, यासंदर्भात १९.६.२०१६ या दिवशी प्रवचन करण्यात आले.

केरळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा जून २०१६ मधील आढावा

१. हिंदु धर्माची आजची स्थिती या विषयावर प्रवचनाचे आयोजन
     १९.६.२०१६ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील काक्कनाड येथील कुझिकाट देवीच्या मंदिरात एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन देण्यास बोलावले होते. या प्रवचनामध्ये कु. अदिती सुखटणकर यांनी हिंदु धर्माची आजच्या स्थितीविषयी सांगितले आणि ती पालटण्याचा धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे, हाच एकमेव उपाय आहे, असे सांगितले. धर्मशास्त्रानुसार देवालयात देवदर्शन कसे करावे ? नामजप केल्याने होणारे लाभ, कुठला नामजप करणे आवश्यक आहे ?, अशा काही विषयांवर त्यांनी आलेल्या जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा सनातन गौरव विशेषांक

सनातनचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
  • सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
  • सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य
  • सनातनच्या आश्रमांचे सुव्यवस्थापन
  • संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
       ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळावे

दिनांक : ३१ जुलै २०१६
रायगड
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित हिंदु संघटन मेळावा
स्थळ : श्री राम मंदिर, ब्राम्हण अळी, अलिबाग
वेळ : सायं. ५ वा.
संपर्क : ९१६७७६६१३०
ठाणे
१. स्थळ - गणपती मंदिर सभागृह, प.रा विद्यालयाच्या मागे, ब्राह्मण आळी, भिवंडी
वेळ - सायं. ६ वा.
संपर्क - ९९८७०२७४२७

२. श्री त्रिविक्रम मंदिर सभागृह, पारनाका, कल्याण (प.)
वेळ - दु. ४.३०
संपर्क - ९८६७१९०५४३
एक हिंदू म्हणून या हिंदूसंघटन मेळाव्यास उपस्थित रहा !

गोवा राज्याच्या आगामी निवडणुकीत बहुमत मिळण्यासाठी सनातनला अपकीर्त करण्याचे 'आप'चे षड्यंत्र जाणा !

श्री. व्यंकटेश अय्यंगार
'आम आदमी पक्षा'च्या एका नेत्याने 'सनातनवर बंदी घाला', असे खेदजनक वक्तव्य केल्यानंतर माझ्या मनात पुढील विचार आले.

१. भ्रष्टाचार संपवण्याच्या घोषणेवर विश्‍वास दाखवत जनतेने २ वेळा आम आदमी पक्षाला निवडून देणे
आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा जेव्हा पक्षाने देहली विधानसभेची निवडणूक बहुमताने जिंकली, तेव्हा बहुतांश लोकांना (काही लोकांना सोडून) असे वाटले की, आता देशात क्रांती होणार आहे. भ्रष्टाचार संपून देशाची स्थिती चांगली होईल; पण केवळ ४९ दिवसांतच हा पक्ष हार मानून पळून गेला. नंतर देहली विधानसभेच्या दुसर्‍या निवडणुकीतही जनतेने या पक्षावर पुन्हा विश्‍वास दाखवला आणि पक्षाला पूर्ण बहुमत देऊन सत्तेवर बसवले.

२. देहलीत दुसर्‍यांदा सत्ता मिळाल्यावर आप सरकारमध्ये अप्रामाणिक आमदारांचा भरणा झाल्याचे आढळणे
हा पक्ष दुसर्‍यांदा सत्तारूढ झाल्यापासून त्याने देहलीत एकही लोकोपयोगी असे चांगले कार्य केले नाही, तसेच त्या पक्षाचे काही आमदारही संशयाच्या भोवर्‍यात आहेत.

इंग्लंडमधील शासन स्वत:च्या देशातील निवृत्तीवेतनधारकांची घेत असलेली काळजी !

परात्पर गुरु डॉ. आठवले १९७१ ते १९७८ या काळात ७ वर्षे इंग्लंडमध्ये चाकरीला होते. त्यांना इंग्लंडमधून 'एन्.एच्.एरा.' पेन्शन या योजनेअंतर्गत मिळत असलेले मासिक निवृत्तीवेतन (पेन्शन) त्यांच्या बचत खात्यात जमा होते. विशेष म्हणजे त्यांना चाकरी सोडून ३६ वर्षे झाली आहेत. असे असूनही जेव्हा त्यांना वर्ष २००२ मध्ये ६० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांना कुठलाही पत्रव्यवहार न करता निवृत्तीवेतन मिळायला लागले आणि ते वेळेत बचत खात्यात जमा होते. प्रत्येक वर्षी एप्रिल मासात त्यांना त्यांच्याकडून पत्र येते आणि त्यात पुढील वर्षासाठी प्रत्येक मासाला किती पेन्शन मिळणार, ते नमूद केेलेले असते, तसेच आयकर लागत असल्यास त्याचेही विवरण (माहिती) असते. त्या पत्रासमवेत एक माहितीपत्रक असते. त्यात निवृत्तीवेतनाविषयी अद्ययावत माहिती असते. असे गेली १४ वर्षे नियमितपणे चालू आहे. इंग्लंडमध्ये निवृत्तीवेतनधारकाला सर्व माहिती वेळेवर देतात, तर भारतात याच्या एकदम उलट परिस्थिती आहे. यावरून इंग्लंडमधील सरकार स्वत:च्या देशातील नागरिकांची किती काळजी घेते हे दिसून येते.
- श्री. प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१६)

कुंभपर्वस्थळी सनातनच्या साधकांविषयी संतांना वाटणारे प्रेम आणि जिव्हाळा !

    श्रीक्षेत्र उज्जैन येथील कुंभपर्वामध्ये काही संत म्हणाले, आपण कुंभपर्वातून काय चोरून घेऊया ? त्यावर काही संत म्हणाले, सनातनचे साधक !
- श्री. प्रशांत कावरे, अहमदनगर (२२.७.२०१६)

हिंदु राष्ट्राची पहाट ।

सौ. गार्गी मळेवाडकर
अज्ञानाच्या अंधःकारातील ज्ञानाचा दिवा म्हणजे सनातन प्रभात ।
साधकांच्या तळमळीने हा दिवा आता लागेल घराघरांत ॥ १ ॥
घरातील अंधःकार मिटवण्यासाठी श्रीकृष्ण धरील साधकांचा हात ।
यामुळे येतील जगभरातील हिंदू एकसाथ ॥ २ ॥
हिंदूंचा संघटितपणा आणि संतांचे आशीर्वाद ।
यामुळे येईल श्रीकृष्णाला अपेक्षित अशी हिंदु राष्ट्राची पहाट ॥ ३ ॥
- श्रीकृष्णाची गार्गी (सौ. गार्गी गुरुप्रसाद मळेवाडकर), बांदा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२६.२.२०१४)

गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये धर्मप्रसार करतांना साधिकेला आलेले अनुभव !

सौ. स्मिता नवलकर
८.४.२०१६ पासून माझे गुजरात राज्यात प्रसाराचे नियोजन होते. त्यानंतर मी उत्तर भारतात प्रसारदौरा केला. या दोन्ही राज्यांतील दौर्‍यांच्या वेळी मला आलेले चांगले-वाईट अनुभव पुढे देत आहे.
१. धर्मशिक्षणाच्या अभावी गुजरातमधील हनुमान
मंदिरात चालू असलेल्या अनिष्ट प्रथा
१ अ. देवळात आलेली मंडळी देवदर्शनासाठी आलेली नसून महाप्रसाद घेणे, केक खाणे आणि जत्रेतील गंमत अनुभवणे यांसाठीच आली असल्याचे लक्षात येणे : ८.४.२०१६ पासून मी गुजरात राज्यात प्रसारास आरंभ केला. हनुमानजयंतीच्या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) जिल्ह्यातील डभोडा येथे जत्रा असते. त्या निमित्ताने मला हनुमानाच्या मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्याची संधी मिळाली. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती स्वयंभू असून त्या परिसरातील लोकांचे ते श्रद्धास्थान आहे. सकाळपासूनच या मंदिरात पुष्कळ दाटी (गर्दी) होती. प्रथम दाटी पाहून मला फार आनंद झाला. निदान खेडोपाडी तरी लोक देवाधर्माचे उत्सव साजरे करतात, याचे मला कौतुक वाटले; परंतु नंतर लक्षात आले की, आलेली मंडळी देवदर्शनासाठी आली नसून महाप्रसाद घेणे, केक खाणे आणि जत्रेतील गंमत अनुभवणे यांसाठीच आलेली होती.
     पाक काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या न्यायोचित लढाईसाठी नैतिक राजकीय आणि कुटनीतीद्वारे समर्थन देत राहील. - नवाज शरीफ, पंतप्रधान, पाक.

जे अफगाणिस्तानच्या अध्यक्षांना कळते, ते भारताच्या पंतप्रधानांना का कळत नाही ?

     पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवणे हे अल् कयदा आणि तालिबान यांच्या विरोधात लढण्यापेक्षाही कठीण आव्हान आहे. - अश्रफ घनी, अध्यक्ष, अफगाणिस्तान

फ्रान्स इस्लामी आतंकवादाच्या सावटाखाली !, हे फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांचे वक्तव्य भारतीय वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध करण्यास टाळले !

      १४ जुलै या फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या वेळी नीस शहरात झालेल्या आतंकवादी आक्रमणात ८४ जण ठार झाले. या पार्श्‍वभूमीवर, संपूर्ण फ्रान्स इस्लामी आतंकवादाच्या सावटाखाली आहे, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलान्द यांनी नुकतेच पॅरिस येथे केले. या वृत्ताला जगभरातील वृत्तसंस्थांनी प्रसिद्धी दिली; मात्र भारतीय वृत्तसंस्थांनी हे वृत्त प्रसिद्ध करण्याचे टाळले. (भारतीय वृत्तसंस्था फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलान्द यांच्या मताशी सहमत नाहीत कि काय ? बर्‍याच वृत्तसंस्थांनी तसे वृत्त प्रसिद्ध करण्याचे टाळले आहे ! - संपादक)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 
आज जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : अग्रवाल भुवन, पोलीस लाईनजवळ, हाट दरवाजा, नंदुरबार.
हिंदूंनो, धर्मासाठी संघटित व्हा !

अधिकोषाचा अजब कारभार !

मी एका सहकारी अधिकोषात (बँकेत) १ लाख २५ सहस्र रुपये एका वर्षासाठी कायम ठेव म्हणून ठेवले होते आणि त्याचे मला प्रत्येक मासाला व्याज मिळत होते. मला अधिकोषातून या ठेवीवर २०.१.२०१० या दिवसापर्यंत व्याज मिळाले.

मी त्याच अधिकोषात चाकरी करत होतो. मी वर्ष २००० मध्ये चाकरीचे त्यागपत्र दिले. त्यानंतर अधिकोषातून मला 'चाकरीत असतांना तुमच्यामुळे अधिकोषाची हानी (तोटा) झाली, तरी त्वरित पैसे भरा. अन्यथा तुमचे १ लाख २५ सहस्र रुपये जमा केले जातील', असे कळवण्यात आले. तेव्हा मी अधिकोषाला उत्तर पाठवले; पण ते अधिकोषातील अधिकार्‍यांनी मान्य केले नाही आणि माझे १ लाख २५ सहस्र रुपये जमा केले.

बाल्यावस्थेतील पाश्‍चात्त्य उपायपद्धत

    पाश्‍चात्त्य उपायपद्धत बाल्यावस्थेत आहे, उदा. आधुनिक वैद्यांना प्रारब्ध, वाईट शक्ती, कुंडलीनी चक्रातील अडथळा इत्यादी अनेक घटक ज्ञात नसल्याने ते केवळ शरीर आणि मन यांच्यावर लक्षणांनुसार वरवरचे उपाय करतात, याउलट आयुर्वेद या घटकांचाही विचार करतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
(आयुर्वेदात प्रारब्ध इत्यादी घटकांचाही विचार केलेला आहे; पण ते आता आयुर्वेदाच्या महाविद्यालयांत शिकवत नाहीत. - वैद्य मेघराज पराडकर)

आध्यात्मिक गुणांची खाण असलेल्या सनातनच्या संतरत्नांची पुणे येथील शक्ती-उपासक श्री. अनिल बोकील यांनी टिपलेली गुणवैशिष्ट्ये

सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ
कृतीतून आणि (प्रचंड बोलक्या) मौनातून शिकवण 
देणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !
१ अ. पुढच्या पिढीसाठी दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, वस्तू इत्यादी ठेवा संग्रह करण्याच्या सेवेतला आनंद मात्र आपण सोडायचा नाही, ही शिकवण देणे : प.पू. डॉक्टरांच्या प्रेरणेनुसार दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, वस्तू इत्यादी जमा करण्याची सेवा माझ्याकडून होत असते. काही वेळा या संदर्भात सद्गुरु (सौ.) अंजलीताई योग्य सूचना देऊन प्रोत्साहन देत असतात. यांतून आपल्याला काही मिळो न मिळो, पुढच्या पिढीसाठी हा ठेवा संग्रह करण्याच्या सेवेतला आनंद मात्र आपण सोडायचा नाही, ही शिकवण ताईंनी मला कृतीतून आणि (प्रचंड बोलक्या) मौनातून दिली आहे. त्या कधी मला उपदेश अथवा आदेश देत नाहीत. त्यांच्या साध्या साध्या कृतींमधून जे व्यक्त होत असते. त्यातूनच समोरची व्यक्ती अंतर्मुख होऊन त्यांचीच होऊन जाते. त्यांच्या इच्छा मौनानेच जाणून घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील होते. त्याला माझा अपवाद कधीतरी असू शकेल का ?

दोन भविष्यवेत्त्यांनी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेच्या संदर्भात सांगितलेली माहिती

दोन भविष्यवेत्त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या अंगठ्यावरील रेषा पाहून 
यांच्या भविष्यात हिंदु राष्ट्र स्थापनेचा योग आहे, असे सांगणे
     मला नाडीशास्त्रासंदर्भात काहीच माहिती नव्हती. ती माहिती मिळावी आणि त्यावर संशोधन करावे; म्हणून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ३ - ४ साधकांसह भविष्य सांगणार्‍या पुढील दोघांकडे गेल्या.
१. सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ के.टी. बालामणी, लालगुडी, तिरुचिरापल्ली, तमिळनाडू. 
२. सप्तर्षि जीवनाडीचे नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्, तिरुवण्णामलय, तमिळनाडू. 
या दोघांनी यांच्या भविष्यात हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेचा योग आहे, असे सांगितले. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
      (नाडीवाचन करणारे स्त्रियांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पाहून आणि पुरुषांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पाहून त्यानुसार त्या व्यक्तीची नाडीपट्टी शोधून काढतात. हातावरील इतर रेषा दर सहा मासांनी (महिन्यांनी) पालटत असतात; परंतु अंगठ्यावरील रेषा शक्यतो पालटत नाहीत; म्हणून अंगठ्याचा ठसा अधिक उपयोगात आणला जातो. - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ)

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने नोव्हीग्रॅड, क्रोएशिया येथे घेतलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचा आढावा

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 
२६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत चालू 
असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने... 

पुढील रांगेत (डावीकडून) श्री. रॉक, अलेक्झांड्रा, मारी, मैकेन; मागील रांगेत (डावीकडून)
सर्वश्री. देयान, व्लादीमीर, दाव्होर, रॉलन्ड, मतीजा आणि पू. (श्री.) मिलुटीन पांक्रात्स

       स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने नोव्हीग्रॅड, क्रोएशिया येथे ३ ते ५ जून २०१६ या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहा देशांतील सात जिज्ञासू सहभागी झाले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - मैकेन (बेल्जियम), मारी (जर्मनी), मतीजा (सर्बिया), दाव्होर (क्रोएशिया), रॉलन्ड (ऑस्ट्रिया) अलेक्झांड्रा आणि रॉक (स्लोव्हेनिया). मी, श्री. देयान आणि श्री. व्लादीमीर यांनी या कार्यशाळेचे दायित्व सांभाळले.

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का कळत नाही ? त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !

तेथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास प्रतिबंध आहे. (संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !
    संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १६ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

जीवनावर आणि साधनेवरही विपरित परिणाम घडवणार्‍या भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले साहाय्य

सौ. श्‍वेता क्लार्क
        माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी राबवत असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया, तसेच जानेवारी २०१५ मधे स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने झालेल्या कार्यशाळेत पू. लोलाआजी, पू. सिरियाकदादा, कु. अ‍ॅना ल्यु आणि श्री. मिलुटीनदादा यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यांमुळे मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.
१. भीती वाटणे, या दोषाच्या पैलूंच्या प्रकटीकरणामुळे जीवनातील घटनांवर पुष्कळ परिणाम होऊन साधनेत मागे पडल्यासारखे वाटणे : भीती वाटणे, या दोषाच्या पैलूंच्या प्रकटीकरणामुळे माझ्यावर पुष्कळ परिणाम होत असल्याने मी अधिकाधिक दुर्बळ होत असे आणि असे माझ्या जीवनातील प्रत्येक घटनेच्या वेळी दिसून येत होते. माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही, साधनेत मी मागे पडेन किंवा मी कितीही प्रयत्न केले, तरी ते चांगले होणारच नाहीत, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात यायचे आणि असे विचार मनात येणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे, असे पूर्वी मला वाटायचे. या सर्व विचारांचा माझ्या आयुष्यातील बर्‍याच घटनांवर परिणाम होत असे आणि आता साधनेतही या विचारांमुळे मी मागे खेचले जात होतेे.

कोठे पाश्‍चात्त्य पद्धतीने दिनांकानुसार वाढदिवस साजरा करणारे हिंदू, तर कुठे तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करणारे ऑस्ट्रियातील श्री. अद्रियन डूर् !

श्री. अद्रियन डूर्
        पूर्वी मी माझा वाढदिवस पाश्‍चात्त्य पद्धतीने साजरा करत असे. त्या दिवशी सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या असल्या, तरीही मला पुष्कळ ताण जाणवत असे. १९.३.२०१६ या दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस होता. त्या दिवशी मला पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.
१. त्या दिवशी पहाटे प.पू. डॉक्टर माझ्या स्वप्नात आले. स्वप्नातील त्यांच्या दर्शनाने माझी भावजागृती झाली. त्यामुळे माझ्या मनाची झालेली सकारात्मक स्थिती सकाळी उठल्यावरही टिकून होती.
२. दिवसाच्या आरंभी मला आनंद आणि हलकेपणा जाणवत होता.
३. मला औक्षण करत असतांना माझ्यावर पुष्कळ उपाय होत आहेत, असे मला वाटत होते.
४. सुपारी डोक्यासमोर फिरवणे, तुपाच्या दिव्याने ओवाळणे आणि डोक्यावर अक्षता टाकणे, या औक्षणातील प्रत्येक कृतीच्या वेळी माझ्यावर उपाय झाल्याचे मला जाणवत होते.

समाजात सनातन संस्थेविषयी आपुलकी आणि विश्‍वास निर्माण झाल्याविषयी एका साधिकेला आलेला एक अनुभव !

२८.६.२०१६ या दिवशी सकाळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात येण्यासाठी फार्मागुडी (फोंडा) येथील बसस्थानकावर बराच वेळ थांबले होते. त्या वेळी एका गृहस्थाने पाठीमागे बरीच वाहने (ट्रॅफिक) असतांना माझ्या शेजारी चारचाकी गाडी थांबवली. त्यांनी मला विचारले, "तुम्हाला कुठे जायचे आहे ? मी तुम्हाला सोडू का ?" त्या वेळी 'अनोळखी व्यक्तीसमवेत कसे जाणार ?', असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये श्रीगणेशाची मूर्ती पाहून ते हिंदु आहेत, याविषयी मला निश्‍चिती झाली. मी श्रीकृष्णाला प्रार्थना करून त्यांच्या चारचाकी गाडीत बसले. प्रवास करतांना आमच्यात पुढील संवाद झाला. ते म्हणाले "मी कधीच अशा प्रकारे अनोळखी स्त्रियांना गाडीत बसवत नाही. तुम्ही सनातन संस्थेची छत्री घेऊन पावसात उभ्या होता, त्या अर्थी तुम्ही संस्थेच्या स्वयंसेविका असणार, असा विचार करून तुम्हाला मी गाडीत बसण्याविषयी विचारले."

त्या वेळी गुरु क्षणोक्षणी आपली किती काळजी घेतात, असा विचार मनात येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली. तसेच समाजात सनातन संस्थेविषयी किती आपुलकी आणि विश्‍वास निर्माण झाला आहे, हेे माझ्या लक्षात आले.

- सौ. गौरी विवेक चौधरी, फोंडा, गोवा. (२८.६.२०१६)
हिंदुस्थानात सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची कल्पना अतीप्राचीन आहे; परंतु राजनैतिक चेतनेची उणीव होती आणि आजही आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदूंना वेळोवेळी भोगावे लागले आहेत. (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

     १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
१. हा आश्रम म्हणजे हिंदु धर्म आणि सेवा कशी करावी ?, हे शिकण्यासाठीचे योग्य ठिकाण आहे. - श्रीमती सी. सिमानीया स्वर्णलता, भाग्यनगर. (२२.६.२०१६)

भूतकाळातून शिकणे, वर्तमानकाळात सावरणे आणि भविष्यकाळासाठी सतर्क होणे, या त्रिसूत्रीनुसार साधना करा !

      साधकांकडून घडणार्‍या चुका किंवा अयोग्य विचार यांमागे त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू असतात. याचसह प्रारब्ध, कालमहात्म्यानुसार काळगती आणि वाईट शक्तींचा त्रास, हे घटकही असतात.
१. प्रारब्ध 
     बुद्धि कर्मानुसारिणी, म्हणजे जसे पूर्वकर्म (प्रारब्ध) असते, तसे वर्तमानातील कर्म करण्याची बुद्धी होते. 
२. काळगती 
युधिष्ठिर एवढा धर्मराज असूनही त्याला द्युतामध्ये सर्वस्व पणाला लावण्याची बुद्धी झाली, ती काळगतीमुळेच !

देव माझी गुरुमाऊली, तेची माझे सर्वस्व ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

सनातनवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी दिलेले उत्तर

      सनातनवर बंदी येणे, साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, यांसारखी संकटे तर पुढे कुठच्या कुठे कचर्‍यासारखी उडून जातील. यापेक्षा आपत्काळात साधकांच्या प्राणरक्षणाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे, असे महर्षींनी सांगणे
प्रश्‍न : सध्या समाजातील काही धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही व्यक्ती यांच्याकडून, तसेच राजकारणी व्यक्तींकडून पोलीस प्रशासन आणि न्यायालय यांच्यावर दबाव आणून सनातनवर बंदी आणण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात रचले जात आहे. याविषयी काही आध्यात्मिक उपाय करायचे आहेत का ?

धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयतेचे दुष्परिणाम

'रामायणद्वेष म्हणजे संस्कृतीद्वेष. निधर्मीवादाचे (सेक्युलरशाहीचे) हेच धोरण असल्यामुळे भारत आधुनिकीकरणाचा पाठपुरावा करत आहे. 'सायबर वॉर' आणि 'केबल' यांनी संस्कृतीद्वेष शिकवला. असेच चालले, तर भारताचे संपूर्ण अधःपतन होणे, ही आता दूरची गोष्ट राहिली नाही. 'धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयता' (Secular Nationalism) हा तमाशा आहे.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, ऑक्टोबर २०१५)

'भारतीय अभिजन वर्गाने पश्चिेमी (अ)सभ्यता आणि (अ)संस्कृती यांच्यासमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे !' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


रामनाथी, गोवा येथील दैनिकातील साधकांनी कु. प्राजक्ता धोतमल यांना दिलेल्या काव्यमय शुभेच्छा !

कु. प्राजक्ता धोतमल
      सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. प्राजक्ता धोतमल ३० जुलै या दिवशी देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेसाठी गेल्या आहेत. त्यांच्या या पुढील साधनाप्रवासासाठी रामनाथी आश्रमातील त्यांच्या सहसाधकांनी त्यांच्यासाठी केलेले काव्य येथे देत आहोत.
     ईश्‍वरप्राप्तीचा प्रवास तुझा 
     चालू राहील निरंतर असा ।
     चित्रीकरणापासून दैनिकापर्यंत आला 
     थांबून कसे चालेल प्राजक्ता ?
     ठसा उमटावा देवद आश्रमातही आता ।

प्रसाराच्या सेवेसाठी बाहेर असतांना सोन्याचे दागिने काळे पडणे आणि आश्रमात आल्यावर येथील चैतन्यामुळे दागिने नवीन असल्याप्रमाणे चमकू लागणे

       मी प्रसाराच्या सेवेसाठी बाहेर जात असतांना माझे सोन्याचे दागिने (अंगठी, मंगळसूत्र इत्यादी) काळे पडले होते. त्यांची चकाकी अल्प झाल्याचे माझ्या लक्षात आले. मला सोनाराने फसवून अल्प प्रतीचे सोने दिले आहे, असे वाटले. मी रामनाथी आश्रमात काही दिवसांसाठी आले होते. २७.६.२०१६ या दिवशी अकस्मात् माझे लक्ष दागिन्यांकडे गेले. दागिने नवीन असल्याप्रमाणे चमकत होते. तेव्हा आश्रमातील चैतन्याचा स्थूल वस्तूंवरही किती परिणाम होतो !, हे माझ्या लक्षात आले. साधकांनीही भाववृद्धीचे प्रयत्न वाढवून अंतर्मनाच्या शुद्धीसाठी प्रार्थना करायला हवी, असे वाटले.
- सौ. क्षिप्रा जुवेकर, देहली (१.७.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत 
असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या 
निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.
१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.

आरोग्याला हानीकारक पांढर्‍या शुभ्र रासायनिक साखरेऐवजी शक्य तेथे गुळाचा वापर करा !

साधकांना सूचना व वाचकांना विनंती 
      गुळामध्ये साखरेच्या तुलनेत हानीकारक रसायनांचे प्रमाण न्यून असल्याने शक्य तेथे उदा. जेवण, चहा यांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा. गुळाच्या पाण्यात दूध घातल्यावर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे चहा गाळून त्यात दूध घातल्यावर त्यामध्ये किसलेला गूळ घालून ढवळावे. यामुळे दूध फाटत नाही.
     काही ठिकाणी सेंद्रीय गूळ किंवा साखर विकत मिळते. ही गूळ किंवा साखर बनवतांना हानीकारक रसायनांचा वापर होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास सेंद्रीय गूळ किंवा साखर वापरावी. - वैद्य मेघराज पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.५.२०१६)

गणेशोत्सवानिमित्त फलक (होर्डींगज्) आणि फ्लेक्स फलक उपलब्ध !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
     गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी फलक बनवण्यात आले आहेत. या फलकांचे आकार आणि त्यांचा वापर यांविषयीचे विवरण खाली दिले आहे. 


१.मोठे फलक (होर्डींग्ज्)
अ. आकार ८ फूट x ७ फूट आणि १० फूट x १० फूट 
१. शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जित करा !
२. गणेशोत्सवाच्या मंडपात नैसर्गिक सजावट करा !
३. गणेशोत्सवात खर्चिक सजावट, रोषणाई आणि फटाके नको !
४. गणेशोत्सवातील अपप्रकार रोखणे, हे धर्मकर्तव्यच !
५. अशास्त्रीय मूर्तीदान करू नका !
६. गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्यक्रम आयोजित करा !
७. देवतांचा अनादर रोखा !
८. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !
आ. आकार २० फूट x १० फूट 
१. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !
२. श्री गणेशमूर्तीचे दान करू नका; मूर्तीविसर्जन वहात्या पाण्यात करा !

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१.८.२०१६) उ.रा. ३.१५ वाजता
समाप्ती - आषाढ अमावास्या (२.८.२०१६) उ.रा. २.१५ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, 
असे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची झालेली हानी
     बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे सर्वत्र विखुरलेल्या हिंदूंना एकत्र करण्याचे कार्य करावे लागते. हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याप्रमाणे असते. याउलट मुसलमान धार्मिक असल्याने एकत्र असतात आणि इतर धर्मियांविरुद्ध कृती करतात. एवढेच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षण घेऊन धर्मासाठी प्राण द्यायलाही तयार असतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

काश्मीरच्या सत्तेतील फुटीरतावादी !

संपादकीय
      काश्मीरच्या कोकेरनाग येथील एका घरात ३ आतंकवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्याआधारे सैन्याने तेथे कारवाई केली आणि आतंकवादी मारले गेले. त्यात बुरहान हा पोलिसांना हवा असलेला आतंकवादी होता; पण सैन्याला आणि पोलिसांनाही ते ठाऊक नव्हते. तशी माहिती असती, तर बुरहानला ठार केले नसते. त्याला एक संधी दिली गेली असती, अशी माहिती सैन्यानेच आपल्याला नंतर दिली, असा दावा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. बुरहानच्या मरण्यामुळे राज्यात अठरा दिवसांहून अधिक काळ बुरहानच्या पाठीराख्यांनी हिंसाचार केला.

भगव्या आतंकवादाची कल्पना पी. चिदंबरम् यांचीच ! - माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार एस्.डी. प्रधान

अशा माजी मंत्र्यांना आताच्या सरकारने कारवाई करून कारागृहात 
डांबले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
     नवी देहली - रा.स्व. संघाला गोवून राजकीय लाभासाठी समोर आणली गेलेली देशातील भगव्या आतंकवादाची कल्पना तत्कालीन काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांची होती, अशी गोपनीय माहिती संयुक्त गुप्तचर समितीचे माजी प्रमुख आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार एस्.डी. प्रधान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत उघड झाली आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भडकाऊ भाषणांमुळे साध्वी प्रज्ञासिंह आणि असिमानंद यांच्यासारखे लोक भगव्या आतंकवादाच्या षड्यंत्राचे बळी ठरले, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
एस्.डी. प्रधान यांनी केलेले खुलासे !
१. पाकच्या रावळपिंडीत ओसामा बिन लादेन लपला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती आणि ती अमेरिकेला भारतानेच दिली.
२. समझौता एक्स्प्रेस आणि अन्य काही बॉम्बस्फोटांची पूर्वसूचना आधीच मिळाली होती. याची कागदपत्रे उपलब्ध आहेत; मात्र या माहितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि या स्फोटाचे अन्वेषण वेगळ्याच दिशेने करण्यात आले. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण हाती घेतल्यावर सर्वच पालटेल. त्याचप्रमाणे इशरत जहां प्रकरणाच्या अन्वेषणाचेही झाले. इशरत जहांचे नाव लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर होते. ऑगस्ट २००९ मध्ये असलेल्या धारिका काही उद्देशाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पालटण्यात आल्या.

हिंदुत्वावरून रान उठवणार्‍यांनी पाकिस्तानात प्रतिदिन मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा !

दैनिक सामनातील संपादकीयद्वारे उद्धव ठाकरे यांचा निधर्मीवाद्यांना टोला
     मुंबई - भारतात मुसलमान हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान होतो. राज्यात आणि केंद्रातील मंत्रीपदेही मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखवण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधी काळी हिंदुत्वावरून रान उठवणारे आता सामील झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानात प्रतिदिन मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे चांगले, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनातील हिंदूंचा आक्रोश ऐका ! या संपादकीयद्वारे निधर्मीवाद्यांना दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे... 
  १. भारतातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले, तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात. त्यांना आझम खानसारखे पुढारी साथ देतात. भारतातील अल्पसंख्यांक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याची बांग आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर मारली जाते; पण गेल्या काही मासांंपासून पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदु समाजावर निर्घृण आक्रमणे चालू असून ती दिवसेंदिवस वाढतच आहेत.

(म्हणे) बुरहान लपल्याची माहिती असती, तर त्याला मारलेच नसते ! - मेहबुबा मुफ्ती

आतंकवाद्याला पोसणारे राज्यकर्ते असणारा देश कधीतरी आतंकवाद नष्ट करू शकेल का ?
     श्रीनगर - कोकेरनाग येथील एका घरात ३ आतंकवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्याआधारे सैन्याने तेथे कारवाई केली; पण बुरहान त्या घरात आहे, हे सैन्याला आणि पोलिसांनाही ठाऊक नव्हते. त्याची माहिती असती, तर त्याला ठार केले नसते. त्याला एक संधी दिली गेली असती. सैन्यानेच आपल्याला नंतर तशी माहिती दिली, असा दावा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. पीडीपीच्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तसेच बुरहानवरून आंदोलन करतांना ठार झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मेहबुबा म्हणाल्या. (दंगलखोरांच्या प्रती सहानुभूती ठेवणार्‍या मेहबुबा यांच्या विरोधात केंद्रसरकार काही कृती करील का ? - संपादक)
     मेहबुबा पुढे म्हणाल्या की, महंमद अफझलला फाशी देण्यापूर्वी येथे आधीच सुरक्षा करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा हिंसाचार झाला नव्हता. बुरहान ठार झाल्याचे आम्हाला माहिती नव्हते अन्यथा आम्हीही सुरक्षेसाठी उपाययोजना केली असती.
    जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मेहबुबा यांनी केले.

(म्हणे) गोरक्षकांवर बंदी आणावी !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या उलट्या बोंबा !
      मुंबई - गायीला गोमाता म्हणता, मग तिला वार्‍यावर का सोडता ? कित्येक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन गायी मरतात. गोवंडीत अशाच फिरणार्‍या २०० गायींकडे का लक्ष देत नाही ? पशूवधगृहांकडे जाणार्‍या गायींना अडवता, त्यांच्या वाहनचालकांना मारहाण करता. अशा गोरक्षकांवर बंदी आणायला हवी. त्यांना असे करण्याचा अधिकार कोणी दिला, अशी गोद्रोही विधाने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली. इसिसच्या विरोधात मंत्रालयातील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.
     आझमी पुढे म्हणाले, आमचा इसिसला विरोध आहे. जे इसिसमध्ये सहभागी होतील, त्यांना नरकात जागा मिळेल. मी सर्व मौलानांना विनंती करणार आहे की, प्रत्येक मशिदीत इसिसला विरोध करा. पोलीस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत. इस्लामला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालू आहे. (पोलीस काय करतात आणि त्यातून काय निष्पन्न होते, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आझमी यांनी काही न बोलणे योग्य ! - संपादक)
देव असल्याने स्वर्ग-नरक या संकल्पना मानतो ! - अबू आझमी
     एका पत्रकाराने आझमी यांना विचारले, तुम्ही स्वर्ग-नरक या संकल्पना मानता का ? जे दिसत नाही, तिला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अंधश्रद्धा मानली जाते. त्यावर ते म्हणाले, मी स्वर्ग-नरक या संकल्पना मानतो; कारण देव आहे. त्याच्यामुळेच हे जग चालले आहे.

शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी असून सनातनवर बंदी येऊ देणार नाही ! - रणजित आयरेकर, शिवसेना

कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन ! 

आंदोलनात उपस्थित धर्माभिमानी

       कोल्हापूर, २९ जुलै (वार्ता.) - शिवसेनेचे आता स्पष्टच केलेले आहे की, सनातन संस्थेवर बंदी येऊ देणार नाही. शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी राहील. सनातनवर जे बेछूट आरोप केले जात आहेत, ते राष्ट्रीय पातळीवरील षड्यंत्र आहे. पौराणिक काळात वाल्याचा वाल्मिकी झाला; मात्र सध्याचे शासन वाल्मिकीचा वाल्या करत आहेत. संपूर्ण देशात धार्मिक शिक्षण देणारी सनातन संस्था एकमेव आहे. खरोखरच कॉ. पानसरे, दाभोलकर यांना मारले असते, तर शस्त्र मिळाले असते, तसे अद्याप काही मिळाललेे नाही. त्यामुळे शासन दिशाभूल करत आहे; मात्र त्यास जनता बळी पडणार नाही. एकीकडे हिंदूंच्या विरोधात गरळओळ करणार्‍या औवेसी बंधूवर कारवाई होत नाही; मात्र हिंदूंसाठी झटणार्‍या सनातन संस्थेवर कारवाई होते, असे मत शिवसेनेचे युवासेना जिल्हासमन्वयक श्री. रणजित आयरेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने कोल्हापूर येथील शिवाजी चौक येथे २९ जुलै या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांवर होणारा अन्याय न थांबवल्यास सर्व हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील !

सोलापूर येथील राष्ट्रीय हिंदू 
आंदोलनात हिंदुत्ववाद्यांची चेतावणी 

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्मबांधव

        सोलापूर, २९ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आणि कार्य, तसेच संस्थेवरील कथित आरोपांविषयी संस्थेची भूमिका समजून घेण्याअगोदर संस्थेवर बंदीचा निर्णय घेणे हा सनातनवर मोठा अन्याय होईल. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) कोणत्याही दबावास बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी २९ जुलै २०१६ या दिवशी सोलापूर येथे जिल्हा परिषद गेटजवळ सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खालील सूत्रे निवेदनात स्पष्ट करण्यात आली.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे धाडस कुणीही करू नये ! - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, सोलापूर

    
श्रीमती अपर्णा रामतीर्थकर
सनातन संस्थेवर बंदी आणणार, या नुसत्या विचारांनी तथाकथित समाजवादी, हिंदूंचा बुद्धीभेद करणार्‍या विचारवंतांची कीव करावीशी वाटते. सनातन संस्थेेने हिंदू जागा करण्याचे ठरवले, सत्य हिंदूंसमोर आणले, धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगितले. लव्ह जिहाद, मंदिरांत होणार्‍या चोर्‍या, धर्मांतर, संत-महंतांचा केला जाणारा छळ यांविषयी सामान्य गृहिणींना समजले, ते केवळ सनातनमुळेच ! सनातनने आम्हाला धर्मावर प्रेम करायला शिकवले. धर्माची विटंबना थांबवून धर्मासाठी जगायला शिकवले.
     माझ्यासारखी गृहिणी सनातन प्रभातमधील बातम्या वाचून अस्वस्थ व्हायची. त्यातूनच धर्मकार्य करण्याची अंत:स्फूर्ती निर्माण झाली. अनेक वेळा नातेसंबंधांवर बोलणारी मी तळमळीने धर्माविषयी बोलू लागले. सनातनने व्यक्तींना नव्हे, तर त्यांच्यातील धर्मविरोधी कारवायांना विरोध केला. माणूस निर्माण करणारी संस्था माणसांच्या विरोधात कशी असेल ? संस्थेतील साधकांवर नाहक खोटे-नाटे आरोप करून त्यांना अडकवणे, त्यांची चौकशी करणे, हाच धर्मद्रोह आहे. सनातनमुळे आता आमची तरुण मुले-मुली धर्म समजावून घेऊ लागली आहेत. सनातन संस्थेवर बंदी आणून हिंदूंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. सनातनवर बंदी आणण्याचे धाडस कोणीही करू नये. अध्यात्माच्या पायावर उभ्या असलेल्या सनातन संस्थेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये.

गेल्या ६ वर्षांत बांगलादेशातील ९१ सहस्र मुसलमानांचे ख्रिस्त्यांकडून धर्मांतर !

मुसलमानबहुल राष्ट्रातही धर्मांतराचे कार्य अव्याहतपणे 
चालू ठेवणार्‍या ख्रिस्त्यांसारखे धर्मप्रेम किती हिंदूंमध्ये आहे ?
       ढाका - ख्रिश्‍चन टाइम्स च्या संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये केवळ १ टक्का लोक ख्रिस्ती आहेत; मात्र तेथील ख्रिस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये देशभरातील सुमारे ९१ सहस्र मुसलमानांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.
       बार्टन जॉर्ज यांनी वर्ष १९७५ मध्ये लिहिलेल्या रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड या पुस्तकातील माहितीनुसार त्या वेळी बांगलादेशमध्ये ६ लक्ष ख्रिस्ती रहात होते. बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ख्रिस्तींची संख्या त्या वेळी ०.४ टक्के होती. अल्पसंख्यांक ख्रिस्तींना इस्लामी आतंकवादांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागले. या मासाच्या आरंभी म्हणजेच १ जुलैच्या रात्री राजधानी ढाक्यामध्ये केलेल्या आक्रमणाच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांकडून कुराणातील आयात म्हणवून घेतल्याची घटना घडली होती. ज्यांना आयाती म्हणता आल्या नाहीत, त्यांना ठार करण्यात आले. सदर आक्रमणात एकूण २९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांची बैठक

पंढरपुरातील संत, महंत, हिंदुत्ववादी 
संघटना एकवटल्या, आज धरणे आंदोलन
       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ जुलै (वार्ता.) - प्रक्षाळ पूजा प्रतिवर्षी विशिष्ट तिथीला केली जाते. या वर्षी मंदिर समितीने रविवारी करावयाची पूजा परंपरा मोडून सोमवारी केली. मंदिर समितीच्या गोशाळेतील गैरकारभारामुळे अनेक गायींचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अनेक पारंपारीक पुजाविधींमध्ये मनमानीपणे पालट केला आहे. नामदेव पायरी, तसेच प्रवेशद्वार याठिकाणी सुरक्षा रक्षक बुट, चप्पल घालून जातात. या अन् अशा अनेक अपप्रकारांच्या विरोधात संत, महंत, हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून पंढरपूरातील टांगा स्टॅण्डजवळ शिवाजी चौक येथे शनिवार, ३० जुलै या दिवशी सकाळी ११.३० या वेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn