Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ७ पोलीस ठार

अन्य चकमकीत ३ नक्षलवादी ठार !
पाकचा आतंकवाद नष्ट करू न शकणारे भारत शासन
भारतातीलनक्षलवादही नष्ट करण्याची धमक दाखवत नाही !
      रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर आक्रमण करून ते भूसुरूंगाद्वारे उडवून दिले. यात ७ पोलीस ठार झाले, तर अनेक पोलीस गंभीर घायाळ झाले आहेत. या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गाडीत सुरक्षा दलाच्या २३० बटालियनचे पोलीस होते. आक्रमण झालेला भाग नक्षलवाद्यांच्या धोक्यापासून सुरक्षित समजला जातो.
१. मेलापाडा आणि मोकपाक यांच्या मध्ये हा स्फोट घडवण्यात आला. येथून ३ गाड्या जात होत्या. हा स्फोट शक्तीशाली होता. त्यामुळे पोलिसांची एक गाडी हवेत उडाली. तिचा पूर्णपणे विध्वंस झाला असून मार्गावर मोठा खड्डा पडला आहे.
२. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिसांना येथे पाठवण्यात आले आहे. तेथे शोधमोहीम घेण्याची सिद्धता करण्यात येत आहे.
३. या घटनेच्या पूर्वी नक्षलवादग्रस्त नारायणपूर जिल्ह्यातील सुलेंगा आणि टिरकानार गांवातील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार मारले. त्यात एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश देण्याविषयी २ दिवसांत म्हणणे सादर करावे !

मुंबई उच्च न्यायालयाचा शासनाला आदेश
हिंदूंच्या धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी शासनाने योग्य 
ती भूमिका घ्यावी, अशी सश्रद्ध हिंदूंची अपेक्षा आहे ! 
      मुंबई - ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश मिळतो, त्या ठिकाणी महिलांनाही प्रवेश मिळायला हवा. जर महिलांना शनिशिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल, तर तसा कायदा करावा किंवा मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्‍न असेल, तर येत्या २ दिवसांत यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च या दिवशी शासनाला दिला. सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात महिलांना मंदिर प्रवेश देण्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिला.
     शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. या धर्मपरंपरेच्या विरोधात धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. धर्मपरंपरांचे रक्षण होण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान समितीचे विश्‍वस्त, ग्रामस्थ यांंसह हिंदु जनजागृती समिती आणि अन्य विविध हिंदुत्ववादी संघटना सतत प्रयत्नशील आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत मशिदीला भेट देणार !

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - येथील माधव आश्रमाच्या जवळ असलेल्या मशिदीच्या भेटीचे दिलेले निमंत्रण सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वीकारले असून ते लवकरच या ठिकाणी भेट देतील, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल वुमन लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी दिली आहे. येथील मोहनलालगंज भागात असलेल्या माधव आश्रमाच्या कार्यक्रमानिमित्त सरसंघचालक आले असतांना त्यांची आणि शाइस्ता अंबर यांची बैठक झाली. या बैठकीत भागवत यांनी संबंधित मशिदीला भेट देण्याचे आश्‍वासन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्ववादी कार्यक्रम राबवत असून तो मुस्लिमविरोधी आहे, हा आरोप भागवत यांच्या मशिदीच्या भेटीमुळे दूर होईल, असे अंबर यांनी म्हटले आहे.

(म्हणे) कन्हैया कुमारला पुण्यात येण्यास बंदी घालणे अयोग्य ! - डॉ. श्रीपाल सबनीस

देशविरोधी घोषणा देणार्‍यांना समर्थन देणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांचे खरे स्वरूप जाणा !
      पुणे - कन्हैया कुमारला पुण्यात येण्यास बंदी घालणे अयोग्य आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आहे
     ते पुढे म्हणाले की, कन्हैया दोषी आहे कि नाही, या मतावर आता बोलणे योग्य नाही. कन्हैयाला बोलू न देणे, हे घटनाविरोधी असून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या डॉ. सबनीस यांना तरी स्पष्ट आहे का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा दिलेल्या सबनीस यांना चालतात का ? ते जर त्यांना चालत असेल, तर सबनीस हेसुद्धा देशद्रोहीच आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. - संपादक) सध्या चालू असलेला भारतमाता की जयचा वाद आणि कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट होणे, या घटनांमुळे ज्वलंत सांस्कृतिक प्रश्‍न निर्माण झाले असल्याचे सबनीस यांनी म्हटले आहे.

देहलीत भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणार्‍या मदरशातील ३ तरुणांना मारहाण

      नवी देहली - मदरशातील ३ तरुणांनी भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केल्याची घटना येथे नुकतीच घडली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. देहलीतील रमेश एन्क्लेव्ह भागात झालेल्या या मारहाणीत एकाचा हात तुटला आहे. घायाळ झालेल्या तिघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतमाता की जय ही घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे देशात वाद निर्माण झाला होता.


पाककडून ५५ भारतीय मच्छीमारांना अटक

भारताने पाकच्या मच्छीमारांना अटक केली, अशी बातमी कधी ऐकायला मिळते का ?
      कर्णावती (अहमदाबाद) - आंतरराष्ट्र्रीय सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा कांगावा करत पाकने ५५ भारतीय मच्छीमारांना अटक केली, तसेच त्यांच्या १० बोटी कह्यात घेतल्या. ३० मार्चला सकाळी भारतीय मच्छीमार मासेमारी करून किनार्‍याकडे परतत असतांना पाकने ही कारवाई केली, अशी माहिती राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे सचिव मनीष लोधारी यांनी दिली. उर्वरित १३ मच्छीमार किनार्‍यावर परतल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. पाकने भारतीय मच्छीमारांना अटक करण्याची २ मासांतील ही तिसरी घटना आहे.

(म्हणे) होळी हा महिलाविरोधी सण !

जेएन्यूच्या आवारात होळीच्या विरोधात लावलेल्या भित्तीपत्रकावर हिंदूविरोधी गरळओक
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा 
मार्ग दाखवणार्‍या होळी या उत्सवाला हिंदुद्वेष्ट्यांकडून विरोध !
      नवी देहली - येथील देशद्रोही घोषणांवरून चर्चेत आलेल्या  (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) आवारात आता होळी हा महिलाविरोधी सण असून मौजमस्तीच्या नावाखाली दलित महिलांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत, असे सांगणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहे. व्हॉट इज होली (पवित्र) अबाऊट होली ? या शीर्षकाखाली लावण्यात आलेली ही भित्तीपत्रके सामाजिक प्रसारमाध्यमांवरही प्रसारित करण्यात आली आहेत. (हिंदूंना त्यांच्या सणांचा आध्यात्मिक लाभ होऊ नये, यासाठी धर्मद्रोह्यांनी रचलेले हे षड्यंत्र आहे ! - संपादक)
     फ्लेम्स ऑफ रेझिस्टन्सया संघटनेच्या नावाने लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांमध्ये बहुजन समाजातील असलेल्या होलिकेला जाळण्याचा सण ब्राह्मणवादी मनोवृत्ती असलेले भारतीय का साजरा करतात ? त्यात पवित्र असे काय आहे ?, असे प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. (त्यातील पावित्र्याविषयी सांगून बुद्धीवाद्यांना काय बोध होणार ? हिंदूंच्या प्रत्येक सणाला कधी प्रदूषणाचा, कधी दुष्काळाचा, तर कधी जातीयतेचा रंग देऊन हे सण, उत्सव साजरे करण्यापासून त्यांना रोखण्यासाठीच धर्मद्रोह्यांकडून नवनवीन क्लृप्त्या काढण्यात येतात. याला हिंदूंकडून वैध मार्गाने विरोध होणे स्वाभाविक आहे ! - संपादक) या संघटनेविषयी आपण कधी ऐकलेले नाही. हा कुणीतरी नवा गट स्थापन केला असेल, असे या विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेच्या एका महिला पदाधिकार्‍याने म्हटले आहे.

पाकिस्तान एक गंभीर समस्या ! - डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी पाकवर टीका केल्यावरही भारतीय शासन पाकच्या विरोधात कृती
करणार नाही; कारण तसे करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून त्यामुळे
भारतातील मुसलमानांचा आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांचा विरोध होऊ शकतो !
     वॉशिंग्टन - अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान आमच्या देशासाठी एक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळी आम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायला हवे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएन्एन् या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. लाहोरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या संदर्भात ट्रम्प म्हणाले की, येथे झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी अधिकाधिक ख्रिस्ती नागरिक ठार झाले आहेत. मी इस्लामी आतंकवादाची समस्या सोडवू शकतो; मात्र लोक इस्लामी आतंकवादाच्या सूत्रावरून मलाच विरोध करतात.

वहाबी पंथाच्या धर्मांध मुसलमानांना सुफी मशिदीत प्रवेशबंदी

सुफी सुन्नी बरेलवींना जे वाटते, ते मुसलमानांतील अन्य गटांना का वाटत नाही ?
     बरेली (उत्तरप्रदेश) - येथील दरगाह आला हजरत मदरशाने काढलेल्या फतव्याद्वारे सुफी सुन्नी बरेलवींच्या मशिदींमध्ये वहाबी मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. वहाबी विचार मानणार्‍या कोणत्याही व्यक्तीने जर सुफी सुन्नी बरेलवी विचारधारा मानणार्‍या मुसलमानांच्या मशिदीत प्रवेश केला, तर त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यावे, किंवा मग लोकांनी थेट पोलिसांकडेच तक्रार करावी, असे या फतव्यात म्हटले आहे. गुजरातचे रहिवाशी महंमद अली यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना मौलाना मुफ्ती महंमद सलीम नूरी यांनी हा फतवा काढला आहे.

मध्यप्रदेशच्या छतरपूर येथे सुन्नी आणि वहाबी पंथांमध्ये वाद

वहाबींकडून दगडफेक, अनेक जण घायाळ, ९ जणांना अटक
     भोपाळ - मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील नौगांव येथे सुन्नी आणि वहाबी या मुसलमान पंथियांमध्ये वाद झाला. या वेळी वहाबींनी मशिदीतून केलेल्या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक सुन्नी मुसलमानांनी वहाबींच्या जुन्या रुढीवादी प्रथांना विरोध केल्यावरून हा वाद झाल्याचे म्हटले जाते; परंतु एका पोलीस अधिकार्‍याने वहाबी येथील मशिदीचे नियंत्रण घेतील, या भितीतून सुन्नी मुसलमानांशी त्यांचा वाद झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. मशिदीमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्याचे पोलीस अधिकारी मृगेंद्र त्रिपाठी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश सिंह तोमर यांनी नाकारले आहे. यापूर्वी स्थानिक प्रसारमाध्यमांनी संबंधित मशिदीतून देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे म्हटले होते.

(म्हणे) कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केल्याचे स्वीकारले !

पाकिस्तानचा खोटारडेपणा !
      नवी देहली / इस्लामाबाद - भारतीय गुप्तचर संस्था रॉचे अधिकारी असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने अटक केलेले कुलभूषण जाधव यांनी, त्यांचा बलुचिस्तानमधील आतंकवादी कारवायांत सहभाग आहे, अशी स्वीकृती दिल्याचा दावा पाकने केला आहे. याविषयीचा कथित व्हिडिओ पाकिस्तानने प्रसारित केला आहे; परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाधव यांच्या पाठीशी उभे रहात व्हिडिओमध्ये बोलणार्‍या व्यक्तीकडून हवी ती वाक्ये बलपूर्वक वदवून घेतल्याचे म्हटले आहे.
     पाकिस्तानी सैन्याचे आंतरसेवा जनसंपर्कप्रमुख लेफ्टनंट जनरल असिम बज्वा आणि प्रांतिक माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी इस्लामाबाद येथे एकत्र पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ प्रसारित केला. जाधव अद्यापही नौदलात सेवेत असून ते वर्ष २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत. भारतानेच त्यांना हेरगिरी आणि आतंकवादी कारवायांसाठी पाकिस्तानात पाठवले होते. या कामासाठी जाधव यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि ते भंगारविक्रेता बनून भारतीय गुप्तचर संस्थेसाठी काम करत होते,

मशिदीमधून बांग चालू होताच भाषण थांबवणारे पंतप्रधान मोदी !

     खडगपूर (बंगाल) येथे २७ मार्च २०१६ या दिवशी निवडणूक प्रचार सभेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी मशिदीमधून बांग चालू होताच त्यांचे भाषण मधेच थांबवले. या वेळी बांग संपेपर्यंत म्हणजेच सुमारे साडेपाच मिनिटे मोदी स्तब्ध उभे राहिले. बांग संपल्यावर मोदी म्हणाले की, बांग चालू असल्यामुळे आपण काही क्षणाची विश्रांती घेतली. आपल्यामुळे कुणाची पूजा, प्रार्थना बाधित होता कामा नये.


तळई (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेला २ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, दीपप्रज्वलन करतांना 
पू. नंदकुमार जाधव आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर

सर्वोच्च न्यायालय तलाक पद्धतीची कायदेशीर वैधता पडताळणार

     नवी देहली - काही मुसलमान संघटनांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत सर्वोच्च न्यायालयाने तलाक पद्धतीची कायदेशीर वैधता पडताळण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट करून घेतली आहे. उत्तराखंड येथील रहिवासी शायरा बानो यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. शायरा बानो यांना त्यांच्या विवाहाच्या १३ वर्षांनंतर त्यांच्या पतीने तलाक दिला होता. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की,
१. ३ वेळा तलाक देण्याच्या प्रथेद्वारे मुसलमान पुरुष महिलांना गुलामाप्रमाणे वागवतात. त्यामुळे या प्रथेलाच अवैध ठरवले जावे.
२. मुसलमान महिलांना स्काईप, फेसबूक आणि लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) यांद्वारे तलाक देण्यात येतो. अशा मनमानी तलाकपासून वाचण्यासाठी महिलांकडे कोणताही पर्याय नसतो. 
३. तलाक देण्याची ही पद्धत अत्यंत घृणास्पद असून त्यामुळे महिलांना भेदभाव आणि असमानता यांना सामोरे जावे लागते.

हिंदूंच्या शाही वंशाची राजधानी हूंद (पाकिस्तान) येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्खनन करण्याची पुरातत्वतज्ञांची मागणी !

हिंदूंनो, तुमच्या संस्कृतीच्या जतनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, हे जाणा !
     पाकिस्तान - खैबर पख्तूनख्वाहमधील हूंद हे गाव हिंदूंच्या शाही वंशांची राजधानी म्हणून ओळखली जाते. पाकच्या पुरातत्वाविषयाच्या तज्ञांनी त्या काळची संस्कृती जाणून घेण्यासाठी आणखी खोदकाम करण्याची मागणी केली आहे. हूंद खैबर पख्तूनख्वाहमध्ये सर्वांत समृद्ध प्राचीन स्थळ आहे. तक्षशिला जिंकण्यापूर्वी अलेक्झांडर या गावातच थांबला होता. 
   पुरातत्वाविषयाच्या तज्ञांनी प्रथम केलेल्या खोदकामानंतर त्यांना तेथे बरीच भांडी, संरक्षणाची उपकरणे आणि अन्य वस्तू मिळाल्या. बाजौर आणि मोसागा येथील स्थानिक लोकांनी केलेल्या प्रतिकारानंतर अलेक्झांडर घायाळ झाल्याने त्याला तेथील काम विश्‍वासू अधिकार्‍याकडे सोपवावे लागले होते.(म्हणे) कुराणमुळे एड्सवर केवळ २४ घंट्यांच्या आत उपचार शक्य !

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ? 
पश्‍चिम आफ्रिकेतील घाना देशातील इमाम रशीद यांचा दावा 
     घाना - विज्ञानाच्या प्रत्येक समस्येचे उत्तर कुराणमध्ये आहे आणि यासाठी प्रयोगशाळेत पांढरा कोट घालून प्रॅक्टीस करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असा दावा घाना येथील सलावातिया मुस्लिम मिशनचे नेते शेख इमाम रशीद यांनी केला आहे. अमेरिकेतील इस्लामिक रेडिओ स्टेशन किबला एफ्एम्वर कुराणचे विज्ञान आणि शक्ती या कार्यक्रमांमध्ये शंकानिरसन करतांना इमाम रशीद म्हणाले, जे रुग्ण एड्सशी झुंजत आहेत, त्यांच्यावरही कुराणमुळे केवळ २४ घंट्यांच्या आत उपचार करता येऊ शकतो. पृथ्वीवर असा कोणताही आजार नाही, ज्याचा उपचार कुराणमध्ये दिलेला नाही. (कुराणमध्ये सर्व रोगांवर उपचार दिले असते, तर मुसलमानांना डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासली असती का ? - संपादक)

सौदी अरेबियामध्ये आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी ११ जणांना जन्मठेप

     अबू धाबी - देशात आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोघांना १५ वर्षे, तर १३ जणांना १० वर्षे, ६ जणांना ३ वर्षे आणि दोघांना ५ वर्षे अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच ७ जणांना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली आहे. शासन उलथवून तेथे इसिसप्रमाणे शासन स्थापन करण्याचा आरोप होता.

पुणे विद्यापिठाच्या वार्षिक अहवालात मागील वर्षीच्या अहवालाची पाने

पुणे विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
       पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा अर्थसंकल्प आणि वर्ष २०१४-१५ या कालावधीचा वार्षिक अहवाल नुकताच संमत झाला. त्या अहवालात मागील वर्षीची (२०१३-१४ या शैक्षणिक वर्षांची) पाने जोडली आहेत. (एवढ्या गंभीर चुका विद्यापीठ प्रशासनाकडून झाल्याच कशा ? त्याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर विद्यापीठ प्रशासन कोणती कारवाई करणार आहे, हे स्पष्ट करावे. - संपादक)
     या वार्षिक अहवालात विद्यापिठाने वर्षभरात केलेली कामे, अहवाल, काही धोरणे, निर्णय, महाविद्यालयांची संख्या, शिक्षकांची मान्यता अशी माहिती उपलब्ध असते. या अहवालात विद्यापिठाने जुनीच सांख्यिकी माहिती दिली आहे. जे शैक्षणिक वर्ष चालू असेल, त्याच्या मागील वर्षीचा अहवाल सादर होत असतो. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस २०१४-१५ या शैक्षणिक वर्षाचा अहवाल विद्यापिठाने घोषित केला आहे. विद्यापिठाकडे पुरेसा कालावधी असतांनाही मागील वर्षीची पाने यामध्ये घातल्याने आकडेवारी आणि तपशील यांमध्ये भेद दिसत आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास महाविद्यालयांच्या दिलेल्या सूचीतील काही महाविद्यालये बंद झालेली असूनही त्या महाविद्यालयांची नावे दिसत आहेत.

आरोपींना एक महिन्यात अटक करणार ! - दिलीप कांबळे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ५५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार 
अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून शासनाने त्यांना कठोर शिक्षा देणे अपेक्षित आहे !
     मुंबई, ३० मार्च - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश कदम यांनी ५५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून सध्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांच्याकडून चौकशी चालू आहे. यातील सर्व आरोपींना एक महिन्याच्या आत अटक करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत जाहीर केले. 

आतंकवादविरोधी पथकाने इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या २ युवकांचे प्रबोधन करून त्यांना रोखले !

सामान्य जनतेशी उद्दामपणे वागणार्‍या आणि निरपराध हिंदूंवर 
मर्दुमकी गाजवणार्‍या पोलिसांची जिहाद्यांसमोर गांधीगिरी !
     मुंबई - इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या २ युवकांना आतंकवादविरोधी पथकाने रोखले असून त्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. वाजिद शेख आणि नूर महंमद अशी या युवकांची नावे आहेत.
१. वाजीद आणि नूर यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्यासमवेत आणखी ७ युवकही इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या युवकांपैकी एक युवक तर पत्नी-मुलांसह इसिसमध्ये जाणार होता. त्याच्या पत्नीनेही या युद्धात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली होती, असे सूत्रांनी सांगितले. (यावरून धर्मांधांची मानसिकता लक्षात येते ! - संपादक)

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन अधिकाधिक तरुणांनी देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे ! - इतिहासतज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे

      कुर्ला (पश्‍चिम), मुंबई - आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्याची युवा पिढी लवकर थकते; कारण आपण केवळ छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो, परंतु त्यांना आचरणात आणत नाही. ज्या शिवरायांमुळे आज आपले घर आणि संसार सुरक्षित आहे, त्या शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या ठिकाणी मात्र आपण कचरा टाकून, मेजवान्या करून त्यांचे पावित्र्य नष्ट करतो, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. येथील श्री साईनाथ नगर मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र व्याखानाचे आयोजन २७ मार्च २०१६ या दिवशी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
     या वेळी श्री साईनाथ नगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री कैलाश शृंगारे, अजय समगिरे, महेश शिंदे, डोंबाळे आणि जाधव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिवरायांच्या उत्स्फूर्त घोषणांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाला श्री. उमेशजी गायकवाड, बजरंग दल (कोकण प्रांत) आणि स्थानिक शिवसेनेचे आमदार श्री. मंगेश कुडाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाला ४५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.


पुण्यातील अनेकविध विद्यार्थी संघटनांनी शैक्षणिक सलोखा राखण्यासाठी घेतली प्रतिज्ञा

      पुणे - देहलीतील जेएन्यूतील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता संस्था या ठिकाणचे विद्यार्थी अन् अभाविपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयांमधील वातावरण बिघडू नये आणि शैक्षणिक सलोखा रहावा, यासाठी शहरातील अनेक विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या पटांगणावर प्रतिज्ञा घेतली. या वेळी भारतमाता की जय, वन्दे मातरम् याचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी राजकारण नको, विद्यार्थी हित हवे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिज्ञा केली.
     या वेळी युवा सेना, पुणे विद्यार्थी चळवळ, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, भारतीय जनता युवा मोर्चा, रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, शिवसंग्राम, मराठवाडा जनविकास, युथ संघटना, विद्यार्थी पालक साहाय्य संघ, अखिल भारतीय विद्यार्थी सेना आदी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, परिमंडळ ४ चे उपायुक्त सुधीर कुलकर्णी हेही या वेळी उपस्थित होते.


चांगल्यासाठी खोटे बोलणे पाप नाही ! - अधिवक्ता उज्ज्वल निकम

      पुणे - २६/११ च्या खटल्यात कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावर काही तथाकथित विचारवंतांनी (?) निष्पाप मुलाला फाशी देण्यात येत आहे, त्याला धर्माच्या नावाखाली फसवण्यात आले आहे, अशा प्रकारची चर्चा केली. अशा सूत्रांच्या वेळी भावनिक लाट निर्माण केली आते. त्या वेळी कसाबने बिर्याणीची मागणी केली आहे, असे सांगून मी सर्व चर्चेचा रोख पालटला; कारण मला गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ द्यायचे नव्हते. चांगल्या गोष्टींसाठी खोटे बोलणे पाप नाही, असे प्रतिपादन विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी केले. शिवसमर्थ प्रतिष्ठान आणि विवेक व्यासपीठ यांच्या वतीने २७ मार्च या दिवशी शिवप्रेरणेतून आतंकवादविरोधी लढा या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संदीप कडू, प्रतिष्ठानचे श्री. दीपक नागपुरे, नगरसेविका सौ. मंजुषा नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्यांना अजून नाकही पुसता येत नाही, ते आज राजकारणाविषयी बोलत आहेत. अशा शिक्षणसंस्था आपण निर्माण केल्या आहेत, असे सांगून अधिवक्ता निकम यांनी जेएनयू प्रकरणासंदर्भात अप्रत्यक्ष भाष्य केले.
अधिवक्ता निकम यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. सध्या भारतमाता की जय ही घोषणा देण्यावरून वादंग चालू आहे. खरे तर प्रत्येक कृतीला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नसते. अशा माथेफिरू लोकांकडे दुर्लक्ष करायला हवे.

कन्हैया कुमार १४ एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना संरक्षण देणार 
अशा घटनांमुळे कोण देशद्रोही हेही आता पुढे येत आहे !
     पुणे, ३० मार्च - जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा १४ एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता आहे. येथील काही विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कन्हैया कुमारला भेटले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी तो पुण्यात यायला सिद्ध असल्याचे समजते. 

पुणे विद्यापिठाच्या आवारात कन्हैया कुमारच्या सभेसाठी अनुमती देऊ नका ! - भाजयुमोची कुलगुरूंकडे मागणी

     पुणे, ३० मार्च - देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा एप्रिल २०१६ मध्ये पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर 'त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात कार्यक्रम घेण्यास अनुमती देऊ नये', असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या परीक्षेचा काळ चालू आहे. त्यामुळे शैक्षणिक वातावरण दूषित होऊन विद्यार्थ्यांची हानी होऊ शकते. जर अनुमती दिली, तर ज्या ठिकाणी कन्हैया कुमारचा कार्यक्रम असेल, तिथे आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करू, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.

मल्ल्या बँकांचे ४ सहस्र कोटी रुपये फेडणार

     नवी देहली - 'किंगफिशर एअरलाईन्स'चे मालक विजय मल्ल्या यांनी बँकांचे ४ सहस्र कोटी रुपये फेडण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसा तडजोडीचा प्रस्ताव मल्ल्या यांनी त्यांच्या अधिवक्त्यांमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केला आहे. येत्या सप्टेंबर मासापर्यंत ही रक्कम भरणार असून त्यावर त्यांना बँकांकडून उत्तर अपेक्षित आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

पाकच्या अन्वेषण पथकात एखादा हाफीज सईदही असू शकतो ! - शिवसेना

ज्यांनी आक्रमण केले, त्यांनीच अन्वेषण करण्याचा प्रकार हास्यास्पद होय !
शासनाने पाकला धडा शिकवून आतंकवादाची समस्या कायमचीच सोडवणे अपेक्षित आहे ! 
     नवी देहली - पठाणकोट आक्रमणात पाकिस्तानचाच हात होता. हाफीज सईदने त्याचे दायित्वही घेतले होते. असे असतांना पाकिस्तानी अन्वेषण पथकाचा ज्या पद्धतीने पाहुणचार होत आहे, तो देशाचा स्वाभिमान आणि अस्मिता यांना शोभणारा नाही. पाकिस्तानी पथकाला ज्या पद्धतीने पठाणकोटला नेले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. या पथकात एखादा हाफीज सईदही असू शकतो, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 
    भारतात आलेल्या पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाला जिहादी गटांकडून धोका असल्याची माहिती हाती आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या पथकाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावर राऊत म्हणाले की, पाकिस्तानातून येणारे आतंकवादी, क्रिकेट खेळाडू, कलाकार या सगळ्यांना भारतात सुरक्षा पुरवली जाते; पण देशाच्या सीमेवर लढणार्‍या सैनिकांना आणि भारतातील जनतेला सुरक्षेची हमी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

पुणे महानगरपालिकेने जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय पालटला

केवळ पिण्याचे पाणी वापरणारे तलाव बंद ठेवण्याचे आदेश
सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना पालिका प्रशासनाने
पालटलेला निर्णय समाजद्रोहीच म्हणावा लागेल !
      पुणे - शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जलतरण तलाव जुलैपर्यंत बंद करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच काढले होते. प्रत्यक्षात पिण्याचे पाणी वापरणार्‍या तलावांवरच कारवाई चालू असून बोअरवेलचे पाणी वापरणारे तलाव चालूच आहेत. (पालिका प्रशासनाची कोलांटीउडी ! - संपादक)
१. सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास तलाव बंद करण्याविषयी तलाव व्यवस्थापकांना पत्र पाठवले; परंतु अनेक तलावांसाठी बोअरवेलचे पाणी वापरले जात असल्याने तलाव बंद करण्यासाठी व्यवस्थापकांनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर केवळ पिण्याचे पाणी वापरणारे २१ तलाव बंद करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
२. पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, शासनाने जलतरण तलाव बंद करण्याविषयी उचित निर्णय घ्या, असे निर्देश दिले होते; परंतु सर्व तलाव बंद करा, असे म्हटलेले नाही. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे तलाव बंद करण्याचा सुधारित आदेश काढला आहे.

कांची कामकोटी पिठाचे पिठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती यांनी न्यायालयात सर्व आरोप फेटाळले !

राधाकृष्णन् यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण 
     चेन्नई - लेखापाल राधाकृष्णन् यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची कामकोटी पिठाचे पिठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती यांनी २९ मार्च या दिवशी न्यायालयात सांगितले. प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. राजामनीक्कम् यांच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वेळी पिठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती, तसेच त्यांचे उत्तराधिकारी विजयेंद्र सरस्वती यांचे बंधू रघू, कांची मठाचे व्यवस्थापक सुरेंद्र अय्यर यांच्यासह ८ जण उपस्थित होते. ८० वर्षीय जयेंद्र सरस्वती यांनी बर्‍याच प्रश्‍नांची उत्तरे हात हलवत 'नाही' अशी दिली. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ६० पानी प्रश्‍नावली बनवण्यात आली होती. त्यापैकी ९१ प्रश्‍नांची उत्तरे जयेंद्र सरस्वती यांनी दिली.

असदुद्दिन ओवैसींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कारवाई करा !


तुळजापुरात (जिल्हा धाराशिव) राष्ट्रप्रेमी युवकांची 
तहसीलदार आणि पोलीस यांच्यांकडे निवेदनाद्वारे मागणी ! 
पोलिसांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी 
     तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ३० मार्च (वार्ता.) खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी स्वत:च्या गळ्यावर सुरी ठेवली तरी 'भारतमाता की जय' म्हणणार नाही, असे देशविरोधी वक्तव्य केले. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी तुळजापुरातील समस्त राष्ट्रप्रेमी युवकांच्या वतीने नायब तहसीलदार पवार आणि पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार गौतम शिंदे यांच्याकडे केली आहे. या वेळी सर्वश्री सुहास साळुंके, संतोष इंगळे, संतोष काळे, प्रविण नाडापुडे, निवृत्ती माळी, गुलचंद व्यवहारे, विद्याधर सोनवणे, सुरेश नाईकवाडी, अमित कदम, सवौत्तम जेवळीकर, घोडके यांसह बहुसंख्य हिंदू उपस्थित होते. 

उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेकडून ग्रामदेवतेच्या पूजनाने धर्मप्रसाराच्या सिद्धतेला प्रारंभ !

     उज्जैन - २२ एप्रिलपासून चालू होणार्‍या येथील सिंहस्थ कुंभपर्वात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करण्यासाठी प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे कार्य करण्याची शक्ती मिळावी आणि ते निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी २८ मार्च या दिवशी सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेसाठी आलेल्या सर्व साधकांनी स्थानदेवता श्री काळभैरव देवाला प्रार्थना केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नारळ वाढवला, तर सनातन संस्थेच्या सौ. सुधा बिलावर यांनी श्री काळभैरव देवाचे पूजन केले. त्यानंतर साधकांनी कुंभपर्वासाठी मिळालेल्या ठिकाणी जाऊन स्थानदेवतेची पूजा केली. सर्वदिशा, स्थानदेवता आणि ग्रामदेवता यांना प्रार्थना करण्यात आली. या वेळी पूजेसाठी लावलेल्या दिव्याची ज्योत वारा असूनही स्थिरपणे तेवत होती, तसेच ती मोठीही झाली होती. यातून 'सर्व देवतांनी ही प्रार्थना स्वीकारली', अशी साधकांनी अनुभूती घेतली.

खोट्या उत्तरपत्रिका प्रकरणी आणखी ६ जणांना अटक

जालना येथील १२ वीच्या उत्तरपत्रिका पुनर्लेखनाचे प्रकरण 
या प्रकरणी पोलिसांनी पाळेमुळे खोदून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,
 तसेच शिक्षण मंडळानेही त्या कर्मचार्‍यांच्या निलंबनासमवेत कडक कारवाई करणे अपेक्षित ! 
     संभाजीनगर, ३० मार्च - खोट्या उत्तरपत्रिका प्रकरणाचे धोगेदोरे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत. जालना पोलिसांनी संभाजीनगर विभागीय कार्यालयातून एकूण ६ लिपिकांना अटक केली आहे. त्यातील डी.आर्. ब्रह्मपूरकर आणि पी.पी. देऊळगावकर हे २ लिपिक हे मंडळाच्या गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. (गोपनीय शाखेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनी आणखी कोणत्या प्रकारची माहिती कोणाला दिली आणि त्यामध्ये काही 'अर्थपूर्ण' व्यवहार झाले होते का, याविषयी पोलिसांनी सखोल तपास करावा. - संपादक) सदर आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिक येथे गोदावरी नदी कोरडी पडल्याने त्याखालील मंदिरे दिसू लागली !

     चंदोरी (नाशिक) - नाशिकपासून २५ कि.मी अंतरावर असणार्‍या या गावामध्ये दुष्काळामुळे गोदावरी नदी कोरडी पडल्याने नदीमध्ये बुडालेली मंदिरे दिसू लागली आहेत. ही मंदिरे सुमारे ३४ वर्षे पाण्याखाली होती. आता ती वर आल्यानंतर लोकांनी तेथे दर्शनासाठी जाण्यास प्रारंभ केला आहे. यामधील अधिक मंदिरे शिवाची आहेत. पुरातत्व खात्याकडे मंदिरांविषयी कोणतीही माहिती नाही; मात्र इंग्रजांच्या काळातील राजपत्रामध्ये गोदावरीच्या किनार्‍यावर असलेल्या घाटांची आणि इतर अवशेषांची नोंद आहे.

४ सहस्र रुपयांची लाच घेतांना वनपालासह वनरक्षकाला अटक

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! 
     अमरावती, ३० मार्च - वाहतूक परवाना (पास) देण्यासाठी मोर्शी येथील कार्यालयात कार्यरत एक वनपाल, तसेच वनरक्षक यांनी चार सहस्र रुपयांंची लाच मागितली. ही रक्कम स्वीकारत असतांना २८ मार्च या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वनपाल अनिल विनायकराव चिंचाळकर आणि वनरक्षक मंगेश सूर्यकांत जंगले यांना पकडले आहे. एका लाकूड व्यावसायिकाने कापलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागितला होता.

ब्रुसेल्सच्या जिहादी आक्रमणानंतर मुसलमान शरणार्थींना सामावून घेण्यास पोलंडचा नकार !

भारतात झालेल्या विविध बॉम्बस्फोटांमध्ये बांगलादेशी मुसलमान असल्याचे सिद्ध झाले असूनही 
शासन कोट्यवधी बांगलादेशी मुसलमानांच्या विरोधात ठोस पावले का उचलत नाही ?
     ब्रुसेल्स (बेल्जियम) - २२ मार्च या दिवशी येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचे कारण पुढे करत पोलंड या युरोपीय देशातील नेत्यांनी मुसलमान शरणार्थींना थारा देण्यास नकार दिला आहे. मध्य आणि पूर्व युरोपमधील इतर काही देशही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. 
     युरोपीय संघाने १ लक्ष २० सहस्र शरणार्थींना सदस्य देशांमध्ये विभागून घेण्याची योजना सिद्ध केली आहे. निर्वासितांच्या मुद्यावरून युरोपमध्ये जो पेच निर्माण झाला आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. युद्धग्रस्त मध्य पूर्व आशिया आणि उत्तरी आफ्रिका येथील लक्षावधी लोक युरोपमध्ये आलेे आहेत. या विस्थापितांबरोबर काही आतंकवादीही युरोपमध्ये घुसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ब्रुसेल्समध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर पोलंडच्या पंतप्रधानांनी शरणार्थींना आश्रय देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

पवित्र लिंबांमुळे कुटुंबाची भरभराट होते, या श्रद्धेमुळे एका दांपत्याकडून लिंबासाठी ३९ सहस्र रुपयांची बोली !

आता या दांपत्याला अंधश्रद्धाळू म्हणून हिणवून त्यांच्यावर तथाकथित बुद्धीवादी, 
पुरोगामी आणि अंनिसवाले यांनी टीकेची झोड उठवल्यास आश्‍चर्य ते काय ?
     विल्लीपुरम् (तामिळनाडू) - वातावरणातील अनिष्ट शक्तींचा प्रभाव पडू नये, यासाठी अनेक हिंदू लिंबू आणि मिरची समोरच्या दाराला बांधतात. शहरातील एका मंदिरातील नगुनी उथीराम या उत्सवामध्ये झालेल्या पवित्र लिंबांच्या लिलावाला एका दांपत्याने ३९ सहस्र रुपयांची बोली लावली. सिरूवनैनतूर येथील मंदिरात झालेल्या मुरुगा या ११ दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिर प्रशासनाने लिंबांचा लिलाव केला. ही लिंबे ज्या घरी जातात त्या कुटुंबाची भरभराट होते, अशी स्थानिक हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे या पवित्र लिंबे मिळवण्यासाठी चढाओढ लागते.पेड मीडियामुळे माध्यमक्षेत्राने विश्‍वासार्हता गमावली ! - अभिनेत्री प्रीती झिंटा

      मुंबई - पेड मीडियामुळे (पैसे घेऊन वृत्त देणारी प्रसारमाध्यमे) या क्षेत्राने विश्‍वासार्हता गमावली आहे. पेड मीडिया एखाद्या कर्करोगाप्रमाणे पसरत असल्याने भारतीय माध्यमक्षेत्राविषयी नष्ट होत चाललेली विश्‍वासार्हता ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री प्रीती झिंटा हिने व्यक्त केले आहे. ट्विटरवर आयेजित करण्यात आलेल्या एका प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमात प्रसिद्धीमाध्यमांकडून पसरवल्या जाणार्‍या नकारात्मकतेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना तिने हे विधान केले.शस्त्रास्त्रनिर्मिती क्षेत्राचे १०० टक्के खाजगीकरण अशक्य ! - संरक्षणमंत्री पर्रीकर

प्रदर्शनात बोलतांना संरक्षण मंत्री पर्रीकर
    केपे (गोवा) - काही शस्त्रास्त्रे एकदा खरेदी केली की, दोन किंवा ३ वर्षे पुन्हा खरेदी करावी लागत नाहीत. अशी तुरळक प्रमाणात लागणारी; मात्र महत्त्वाची असलेली शस्त्रास्त्रे बनवणे खाजगी आस्थापनांना लाभदायी नसते. अशी शस्त्रास्त्रे शासकीय कारखान्यातच बनवावी लागतात. त्यामुळे शस्त्रास्त्रनिर्मिती क्षेत्राचे १०० टक्के खाजगीकरण कधीच शक्य नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेतूल येथील संरक्षण प्रदर्शनाच्या ठिकाणी बोलतांना सांगितले. २९ मार्च या दिवशी चालू झालेले हे प्रदर्शन १ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इजिप्त, फीनलँड, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, जपान, रशिया, स्वीडन, इंग्लंड आणि अमेरिका या प्रमुख देशांसह अन्य ४७ देशांतील १ सहस्र ३५ आस्थापनांनी सहभाग घेतला आहे.

शिवजयंतीच्या दिवशी धुळे येथे पोलिसांच्या कारवाईत ५ टन गोमांस शासनाधीन

एका धर्मांधाला अटक, ४ धर्मांध पसार
शासनाने गोवंश हत्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, हीच गोप्रेमींची अपेक्षा !
      धुळे - येथील साक्री तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोमांस घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन आणि ५ टन गोमांस शासनाधीन करण्यात आले. हे गोमांस नंदुरबारहून मुंबईकडे नेण्यात येत होते. त्या गोमांसाची किंमत २ लक्ष ५० सहस्र रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध शेख इरफान शेख युसुफ याला संशयित म्हणून कह्यात घेतले आहे, तर धर्मांध फारुख खान जहीर शेख, युनूस उस्मान पटेल, शेख हारून रज्जाक आणि शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी हे पसार झाले आहेत. पोलिसांनी शासनाधीन केलेले गोमांस नष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गोवंशियांचे रक्षण आणि त्यांच्या हत्या रोखण्यासाठी पोलिसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील गोप्रेमींनी केली आहे.

देवस्थानच्या इनामी आणि अन्य भूमी शेतकर्‍यांच्या नावे करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेकडून मुख्यमंत्र्यांची भेट

शासन ३ मासांत निर्णय घेणार !
      मुंबई - शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात १ लाखांहून अधिक शेतकर्‍यांचे आंदोलन करणार्‍या अखिल भारतीय किसान सभा या डाव्या विचारांच्या संघटनेने ३० मार्चला विधान भवनात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी देवस्थानच्या इनामी आणि वन भूमी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावावर करा, अशी मागणी अन्य मागण्यांसह केल्या. या वेळी मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मागण्यांविषयी तीन मासांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.
     या संदर्भातील माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे आमदार जिवा पांडू गावीत, माजी आमदार नरसय्या आडाम, सचिव अजित नवले आणि अन्य पदाधिकार्‍यांनी विधान भवनातील पत्रकार कक्षात दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे उभयतांनी सांगितले. सचिव डॉ. अजित नवले म्हणाले की, या निर्णयामुळे देवस्थानातील वर्ग-३च्या भूमी या शेतकर्‍यांच्याच आहेत; मात्र त्या देवस्थानची नावे लागल्यामुळे त्या शेतकर्‍यांना मिळत नाहीत. देवस्थानसह वन भूमी, गायरान भूमी, वरकस भूमी, शासकीय भूमी साडे आठ लाखांहून अधिक शेतकरी कसत आहेत. या भूमी शेतकर्‍यांच्या नावावर झाल्यावर त्याचा मोठा लाभ होणार आहे.
     या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाविषयी आमदार जिवा पांडू गावित म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सर्व देवस्थानांच्या भूमीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून तीन मासांत एकूण किती भूमी आहे. किती शेतकरी ती कसत आहेत.

देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण असलेल्या झिरो माईलच्या स्तंभाला तडे

देशाच्या मानचिन्हाच्या ठिकाणची दुर्दशा !
      नागपूर - नागपूर या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी झिरो माईलचा (शून्य मैल) स्तंभ म्हणजे देशाचे भौगोलिक मध्यवर्ती बिंदू आहे. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे, तर देशाचे मानचिन्ह म्हणूनही ओळखले जाते; परंतु देखभाल-दुरुस्तीच्या अभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परिणामी देशाचे हे मानचिन्ह संकटात सापडले आहे. (राष्ट्रीय मानचिन्हांच्या ठिकाणी अशी स्थिती होऊ देणे शासनाकडून अपेक्षित नाही ! - संपादक)
     स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकार्‍याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणाचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले. या ठिकाणी एक स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक आणि रिझर्व्ह बँक चौक यांच्या दरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शवला नाही; परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे.


जुन्नर तालुक्याच्या (जिल्हा पुणे) पश्‍चिम आदिवासी भागातून राजरोस अवैध मातीउपसा

यावरून महसूल विभागाची अवस्था 'आंधळ दळतंय आणि 
कुत्रं पीठ खातयं', अशी झाली आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही ! 
     जुन्नर, ३० मार्च - तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातून सध्या राजरोसपणे अवैध मातीउपसा आणि चोरटी वाहतूक चालू आहे. एकूणच अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करणार्‍यांवर महसूल प्रशासन अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारी आणि अवैध उत्खनन करणारे यांच्यात काही गौडबंगाल आहे का, असा प्रश्‍न स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. 

झोळंबे, दोडामार्ग येथे श्री देव नितकारी आणि श्री देव वेताळ परिवारातील मूर्तींची विटंबना : सहा जणांना पोलीस कोठडी

प्रथेप्रमाणे शिमगोत्सव साजरा करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार 
 मानापमानासाठी देवतांच्या मूर्तींची विटंबना होणे दुर्दैवी आहे ! अशा हिंदूंचे देवाने तरी का रक्षण करावे ? 
     सावंतवाडी - झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानमधील श्री देव नितकारी परिवार आणि श्री देव वेताळ परिवारातील देवतांची तोडफोड करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिमगोत्सवात गावातीलच काही विकृत लोकांनी पारंपरिक कार्यक्रमात विघ्ने आणण्याच्या उद्देशाने केलेल्या अशा कृत्याने झोळंबे गावात कमालीचे तणावपूर्ण वातावरण आहे. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रकरणी १० संशयितांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली. ३० मार्चला सर्वांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी बजावली. 

पाकिस्तान आणि भारत या न्ही देशांशी इराणचे जिव्हाळ्याचे संबंध ! - इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी

     इस्लामाबाद - अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवल्यावर इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकच दृढ होत आहेत. पाकिस्तानची सुरक्षा ही इराणची सुरक्षा आहे, असे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी नुकतेच म्हटले आहे. दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्‍यावर असतांना त्यांनी पाकचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सेनाध्यक्ष, तसेच अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. या वेळी पत्रकारांशी बोलतांना रुहानी म्हणाले की, इराणचे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पाकिस्तान वीज संकट दूर करण्यासाठी इराणचे साहाय्य घेत आहे. यासाठी इराणने त्याच्या भागातील गॅसची १ सहस्र ८०० किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण केली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे ही योजना अर्धवट राहिली होती.

दलाई लामा यांनी अवतार परंपरेचा सन्मान ठेवावा ! - चीनचा सल्ला

लामा यांच्याकडून त्यांच्यासह अवतारपदही समाप्त होण्याचे संकेत 
     बीजिंग - तिबेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनकडून दलाई लामा यांच्या अवतार परंपरेला कायम ठेवायचे आहे; परंतु लामा यांनी त्यांच्यासह अवतारपदही समाप्त होऊ शकते, असे संकेत दिल्यामुळे चीन संतप्त झाला असून त्याने लामा यांना अवतार परंपरेचा सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे. चिनी संसदीय समितीचे अध्यक्ष झू वेईकुन म्हणाले की, दलाई लामा तिबेटी बौद्धांना मूर्ख ठरवत असून त्यांचा आदर करण्यासाठी ते लोकांना बाध्य करू शकत नाही. चीन शासनाकडे दलाई लामा यांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार आहे. यावर झू यांचा दावा फेटाळतांना लामा यांचे सहकारी तेंजिन तकल्हा म्हणाले की, चीन अपप्रचार करत असून चीनने ठरवलेला दलाई लामांचा उत्तराधिकारी तिबेटची जनता स्वीकारणार नाही.गोव्यातील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानची चोरलेली फंडपेटी जंगलात सापडली !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
     डिचोली - नानोडा, डिचोली येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानची चोरलेली फंडपेटी देवस्थानच्या काही सदस्यांना २३ मार्च या दिवशी जवळच्या जंगलात सापडली. हे पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी ही फंडपेटी कह्यात घेतली आहे. डिचोली आणि दोडामार्ग पोलीस यांनी या प्रकरणी पुढील तपास चालू केला आहे. सुमारे आठ मासांपूर्वी श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाचा दरवाजा फोडून आतील फंडपेटी चोरण्यात आली होती.

रंगपंचमीच्या निमित्ताने अपप्रकार टाळण्यासाठी निपाणी येथे विशेष तहसीलदारांना निवेदन

      निपाणी - रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळण्यासाठी येथे विशेष तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन एल्. के. पाटील यांनी स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे श्री. अतीश चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप जाधव, योगेश चौगुले, रणरागिणी शाखेच्या सौ. मनिषा सडोलीकर, सौ. दीपा हिंग्लजे यांसह अन्य उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

भारतातील नक्षलवाद नष्ट करण्याची धमक राज्यकर्ते का दाखवत नाहीत ?
     छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वाहन भूसुरूंगाद्वारे उडवून दिले. या आक्रमणात ७ पोलीस ठार झाले, तर अनेक पोलीस गंभीर घायाळ झाले आहेत.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Chattisgarh ke Dantewada me naksalwadiyoke akraman me CRPF ke 7 police veergati ko prapt
Akhir kab tak hum Naksalwadko sahenge ?

जागो ! : छत्तीसगढ के दंतेवाडा में नक्सलवादियोंके आक्रमणमें सीआर्पीएफ्के ७पुलिस वीरगतिको प्राप्त!
आखिर कब तक हम नक्सलवादको सहेंगे?

श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष तथा जगद्गुरु तुकोबारायांचे विद्या वंशज ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३० मार्च (वार्ता.) श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष तथा जगद्गुरु तुकोबारायांचे विद्या वंशज अधिवक्ता ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज (वय ७३ वर्षे) यांचे मंगळवार, २९ मार्च या दिवशी रात्री १२.३० वाजता मिरज येथील खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. वारकरी संप्रदाय फडकरी परंपरेतील निर्भिड आणि परखड व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. तसेच ते फड परंपरेतील मेरूमणी होते. वारकरी संप्रदायाला येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी आणि वारकर्‍यांचे प्रश्‍न शासन स्तरावर मांडण्यासाठी 'समस्त वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटना' ही वारकरी संप्रदायातील पहिली अधिकृत संघटना त्यांनी उभारली. या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील तीनपैकी ते एक प्रमुख मानकरी होते. विश्‍व हिंदु परिषदेसाठी ते सक्रिय होते. अयोध्येतील राम मंदिर शीलान्यास उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची अंत्ययात्रा ३० मार्च या दिवशी सायंकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिला. या वेळी ४ सहस्र नागरिक उपस्थित होते. 

आसाममध्ये प्रथमच भाजपचे राज्य येण्याची शक्यता !

     नवी देहली - पुढच्या मासात होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये आसाममध्ये भाजप शासन स्थापन करू शकतो, अशी शक्यता एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाले तर भाजपचे शासन स्थापन झालेले पूर्वोत्तर राज्यांतील आसाम हे पहिलेच राज्य असेल. पुढच्या आठवड्यापासून देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आरंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, आसाममध्ये भाजप, आसाम गण परिषद आणि 'बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट'च्या युतीला ७८ जागा मिळतील, तर काँग्रेसला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागेल. बांगलादेशी शरणार्थींचे सूत्रच काँग्रेसला पुन्हा सत्ता स्थापन करण्यापासून रोखेल, असे ५२ टक्के आसामी लोकांचे मत असल्याचेही या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. 
     दुसरीकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करील, असे या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. २९४ विधानसभा जागांपैकी तृणमूल काँग्रेसला १७८ जागा मिळतील.

वृद्धाला लाथ मारणारे भाजपचे आमदार म्हणतात, 'ही एक किरकोळ घटना !'

     कर्णावती (अहमदाबाद) - पोरबंदर येथील भाजपचे खासदार विठ्ठल रदादिया यांनी एका वृद्ध नागरिकाला लाथेने मारहाण केल्याचा 'व्हिडिओ' सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाला आहे. त्यावर 'ही किरकोळ घटना आहे', असे रदादिया यांनी म्हटले आहे. 

सहाराची मालमत्ता विकण्याला हिरवा कंदिल

     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने भांडवली बाजार नियामक मंडळाला (सेबीला) सहारा समुहाची ८६ ठिकाणी असलेली मालमत्ता विकण्याची अनुमती दिली आहे. मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मिळवण्यासाठी देखील वापरण्याची अनुमती न्यायालयाने दिली आहे. परंतु सर्कल रेटपेक्षा ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दराने निविदा आल्या नाहीत, तर या मालमत्ता विकू नयेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे. गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणुकीमुळे रॉय २०१३ पासून कारागृहात असून त्यांच्या जामीनासाठी न्यायालयाने १० सहस्र कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.

४० सहस्र विद्यार्थ्यांना प्रतिमास ४०० रुपये अनुदान मिळणार ! - मुख्यमंत्री, गोवा

माध्यमप्रश्‍न सोडवण्यासाठी मातृभाषाप्रेमींना आर्थिक साहाय्याचे आमिष दाखवण्यापेक्षा 
मातृभाषेचे महत्त्व जाणून ठोस निर्णय का घेत नाही ?
मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनुदान देण्याची योजना 
     पणजी - गोवा शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या प्रत्येक मुलामागे प्रतिमास ४०० रुपये अनुदान देण्याची योजना घोषित केली होती. शासकीय अनुदानावर चालणार्‍या मातृभाषेतील प्राथमिक शाळांमधील एकूण ४० सहस्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी शासकीय तिजोरीवर ४० कोटी रुपये भार पडणार आहे. शासनाने या योजनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
    मुख्यमंत्री पार्सेकर पुढे म्हणाले, हे अनुदान शाळांना तीन मासांतून एकदा दिले जाणार आहे. नजिकच्या काळात ज्या प्राथमिक शाळा त्यांचे माध्यम मराठी, कोकणी किंवा उर्दू करू इच्छितात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या शाळांना ही योजना लागू होणार नाही.

गोवंशाची अवैध वाहतूक रोखल्याप्रकरणी पोलिसांचा गोरक्षकांवरच संशय ! - स्वराज्य संघटना

पोलिसांचा नेहमीप्रमाणेच मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न !
     सावंतवाडी - गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करतांना तिघांना पकडून देऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यावरच संशय व्यक्त करत आहेत. या विरोधात संघटनेच्या वतीने प्रसंगी आंदोलन करू, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे संघटक सोमनाथ गावडे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात होळीतील मानपानावरून दोन गटांत हाणामारी

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे सण-उत्सवांतील आनंद लुटू न शकणारे हिंदू !
     खेड, ३० मार्च - तालुक्यातील धामणी-कदमवाडी येथे होळीसाठी लाकडे गोळा करण्याच्या मानपानावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २४ मार्चच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याने १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळीसाठी लाकडे गोळा करण्याच्या मानपानावरून मनोज कदम यांना गुणाजी कदम यांच्यासह अन्य सात जणांनी बेकायदा जमाव करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीत महेश कदम यांनी गणेश कदम यांच्यासह १२ जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. (संदर्भ : कोकणटुडे संकेतस्थळ)

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
     एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसार आढाव्या अंतर्गत ३० मार्च या दिवशी आपण संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या संकेतस्थळाचे फेसबूक पान आणि गूगल प्लसद्वारे झालेला प्रसार यांविषयी पाहिले. आता त्यापुढील सूत्रे पाहूया.
५. लॉग-इन सुविधा 
५ अ. एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत डिसेंबर २०१५ मध्ये इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन, स्पॅनिश, इंडोनेशियन आणि पारसी या ७ भाषांतील वाचकांच्या ३२९ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. जानेवारी २०१६ मध्ये इंग्रजी, फ्रेंच, क्रोएशियन, जर्मन, सर्बियन, स्पॅनिश, इंडोनेशियन आणि पारसी या ८ भाषांतील वाचकांच्या ३२९ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली.
    डिसेंबर २०१५ मध्ये लॉग-इन सुविधेद्वारे संपर्कात आलेल्या १३ जिज्ञासूंनी, तर जानेवारी २०१६ मध्ये संपर्कात आलेल्या २३ जिज्ञासूंनी नामजपाच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला.

पुरोगाम्यांची वळवळ : समाजहितासाठी धोंडा

      तसे पहायला गेले, तर एखाद्या महाविद्यालयाच्या कट्ट्यावर एखाद्या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी जमणे, ही सर्वसाधारण गोष्ट ! पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मात्र अभाविपचे जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील प्रमुख श्री. आलोक सिंग यांची अनौपचारिक चर्चा आयोजित केल्याने जणू सर्व व्यवहार ठप्प होणार असल्याच्या अविर्भावात डाव्या विद्यार्थ्यांनी या चर्चेचा कार्यक्रम उधळून लावला. एवढेच नाही, तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची होती; पण हा कार्यक्रम विनाअनुमती होत असल्याचे कळल्याने त्याला आम्ही विरोध केला, अशी साळसूद भूमिका डाव्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍यांनी मांडली. अर्थात् देशाच्या बरबादीचे स्वप्न पहाणार्‍या कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्‍या या विद्यार्थ्यांना केवळ विनाअनुमती चर्चा होण्यावर आक्षेप असावा, यावर शेंबडे पोरही विश्‍वास ठेवणार नाही. जेएन्यूमधील सत्य या विषयावर श्री. सिंग वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यामुळे डाव्या विद्यार्थ्यांचे मुख्य दुखणे चर्चेच्या विषयामध्ये दडलेले आहे, हे स्पष्ट आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)     भारतमाता गुन्हेगार, गुंड, लुटारू, भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन आणि देशद्रोही यांच्या जोखडात सापडली आहे. तिला सत्वर वाचवा !
- (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

जन्मतःच साधक वृत्तीची, सेवाभावी आणि कृष्णाच्या अनुसंधानात रहाणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली धोकवडे, रायगड येथील कु. ईशा विश्‍वास गावंड (वय ८ वर्षे) !

कु. ईशा गावंड
     काही मुले मुळातच सत्संगात रमणारी आणि सात्त्विक वृत्तीची असतात. धोकवडे हे रायगड जिल्ह्यातील लहानसे खेडेगाव. तेथे समितीचा धर्मशिक्षणवर्ग चालू झाला आणि कु. ईशा अन् तिचा भाऊ दोघेही आई-वडिलांसमवेत सत्संगात येऊ लागले. तेे दोघेही सत्संगात शांत बसायचे. कु. ईशा सात मासांची असल्यापासून सत्संगात येत आहे. या लेखातून जन्मतःच देवाची आवड असणारी मुले साधनेचे एक एक टप्पे कसे अल्पावधीतच पार करतात, हे आपल्याला पहायला मिळते. कु. ईशा हिच्याविषयी तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. धर्माचरणाच्या कृती मनापासून करणे
        ईशाला लहानपणापासूनच हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण केलेले आवडते. अगदी लहान असल्यापासून ती कुंकू लावणे, बांगड्या घालणे, पैंजण घालणे, सात्त्विक पोशाख घालणे, सात्त्विक केशरचना करणे, हे सर्व आवडीने करायची. नातेवाईक किंवा मैत्रिणींनी तिला टिकली लावण्यास सांगितले, तरी ती लावत नसे. तिला आश्रमातील मुलींप्रमाणे सात्त्विक कपडे घालायला आवडतात.

पू. स्वातीताईंच्या सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या भावानंद सोहळ्यात संत आणि साधक यांनी मनोगतातून घडवलेले पू. ताईंमधील सुंदर गुणमोत्यांचे दर्शन आणि सद्गुरु पू. स्वातीताईंचे अनमोल मार्गदर्शन !

पू. (कु.) स्वाती खाडये
     साधकांना साधनेतील प्रगतीची आनंदवार्ता अनपेक्षितपणे देऊन अचंबित करणार्‍या सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांना २३.९.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अचंबित केले. निमित्त ठरले ते पू. स्वातीताईंनी सद्गुरुपदी विराजमान होण्याचे ! नाशिक येथील सिंहस्थपर्वात आज एक संत - हरिगिरी महाराज येणार; म्हणून साधकांनी भावपूर्ण सिद्धता केली. संतांचे आगमन होण्यापूर्वी पू. (कु.) स्वातीताई यांनी गुरुमाऊलींची मानसपूजा करवून घेतली. या वेळी उपस्थित सर्वच साधकांना गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवणे, भाव दाटून येणे, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. तेव्हा याचे गुपित पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उलगडले. सर्व साधकांमध्ये भाव निर्माण करून सिंहस्थपर्वाचे यशस्वी आयोजन करणार्‍या पू. (कु.) स्वातीताई सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घोषित केल्याचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांची गुरुपौर्णिमेला ७७ टक्के आध्यात्मिक पातळी होती. त्यांच्या तळमळीच्या प्रयत्नांमुळे केवळ ३ मासांतच ती वाढून ८० टक्के झाली. ही सुवार्ता ऐकताच पू. ताईंसह सर्व साधक भावानंदाने न्हाऊन निघाले.

प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्रता आणि एकांत या शब्दार्थांच्या गुंफणीतून उलगडलेले साधनामय जीवनाचे रहस्य !

प.पू. पांडे महाराज
      १५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले. शारीरिक व्याधी हा प्रारब्धाचा भाग आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे; पण अनेक जण असे म्हणतात, साधनेसाठी माझे मन एकाग्र होत नाही. मला एकांत पाहिजे. माझी साधना नीट होत नाही. असे विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांच्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्र आणि एकांत म्हणजे नक्की काय ? ते कसे साध्य करायचे ? याविषयी केलेले सुंदर विश्‍लेषण या लेखात आपण पहाणार आहोत. साधकांनी त्यांच्या साधनाजीवनात या विचारांचे चिंतन आणि परिपाठ करून जर ही सूत्रे अवलंबिली, तर त्यांना त्यांचा नक्कीच लाभ होऊन या लिखाणाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाणारे चिपळूण येथील श्री. भाऊ धोंडू जाधव !

१. पूर्वायुष्य
१ अ. साधना : माझे वडील श्री. भाऊ धोंडू जाधव हे सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी शिवाची भक्ती करायचे. त्यांच्या जीवनात एक संत गुरु म्हणून आले होते. वडिलांवर संकटे येण्याआधीच त्यांचे गुरु स्वप्नात येऊन दृष्टांत द्यायचे. (त्यांच्या गुरूंचे छायाचित्र मी लहान असतांना पाहिले होते. ते अत्यंत तेजस्वी होते.) वडिलांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेने एक शिवमंदिर स्थापन केले.
१ आ. नि:स्वार्थीपणाने लोकांची सेवा करणे : पूर्वी त्यांच्याकडे समाजातील अनेक जण व्यावहारिक अडचणी किंवा आजारपण यांवर उपाय विचारायला येत असत. ते त्यांना विभूती देणे, उतारा काढणे, असे उपाय सांगायचे. त्यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर समाजातील लोकांना चांगले अनुभव यायचेे. त्यांनी यासाठी कधीही कुणाकडून पैसे वा वस्तू स्वीकारल्या नाहीत. ते सर्व नि:स्वार्थीपणाने करत असत. त्यांना पूर्वायुष्यात पुष्कळ कष्ट करावे लागले. त्यातही त्यांना निराश झालेलेे मी कधी पाहिलेच नाही. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत दुःखद प्रसंगातही त्यांची देवावरची श्रद्धा डळमळीत झाली नाही.

चिपळूण येथील श्री. भाऊ (अप्पा) धोंडू जाधव (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. भाऊ (अप्पा) जाधव यांचा सत्कार करतांना श्री. ज्ञानदेव पाटील (डावीकडे)
       चिपळूण, ३० मार्च (वार्ता.) - २९ मार्च या दिवशी झालेल्या भावसत्संगात ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी उपस्थित साधकांना श्री. भाऊ धोंडू जाधव यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता दिली. या वेळी साधकांची भावजागृती होऊन सर्वांनी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. ज्ञानदेव पाटील यांनी श्री. भाऊ जाधव यांना श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री. जाधवकाका यांच्या ६१ टक्के पातळी असणार्‍या पत्नी सौ. सरिता, त्यांची मुलगी सौ. स्नेहल मधुकर गुरव, सून श्रीमती ज्योती जाधव, नातवंडे कु. अभिषेक गुरव, सौ. गायत्री राकेश मोरे, कु. सनातन जाधव आणि कु. ऋतुजा जाधव उपस्थित होते. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री.मधुकर गुरव यांचे ते सासरे होत.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात. 

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

देवा, तू जवळ घेशी, मग मज भीती कशाची ।

वर्षा नकाते
देवा, तुझे कोमल चरण माझ्या हृदयात ।
तुझे गोड नाम माझ्या मुखात ॥ १ ॥
तुझे चैतन्य माझ्या सभोवती ।
तुझा आशीर्वादरूपी हात माझ्या डोक्यावरती ॥ २ ॥
माझ्यात भाव वाढवूनी, तू जवळ घेशी ।
मग मज भीती कशाची ॥ ३ ॥
- वर्षा नकाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०१५)

महर्षीं देत असलेली काळाची शिकवण !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. सेवाकेंद्रात नको, तर हॉटेलमध्ये रहा ! 
असे सांगून महर्षींनी आता स्थळापेक्षा काळाला 
महत्त्व असल्याचे प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवणे
       आम्ही चेन्नईला असतांना बर्‍याचदा चेन्नईला असणार्‍या आपल्या सेवाकेंद्रातच रहातो; परंतु कधी कधी महर्षि पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून चेन्नईला सेवाकेंद्रात राहू नका !, असे सांगतात. अशा वेळी बहुतेक वेळा ते पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घराजवळ असणार्‍या हॉटेल विजय पार्क येथे रहाण्यास सांगतात. यामागे काहीतरी कारण असणार, असे मला वाटायचे. काही काळाने मला त्याचा पुढील अर्थ लक्षात आला.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पांडित्य आणि साधना

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. पोहोण्याचे पुस्तक वाचून पोहता येत नाही, तसे नामजपाची अनेक पुस्तके वाचून नामजप होत नाही किंवा साधनेवरील अनेक पुस्तके वाचून साधना होत नाही; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे.
२. ग्रंथांचा अभ्यास करून त्यांतील विषयावर एखाद्या प्राध्यापकांप्रमाणे प्रवचन देता येईल; पण त्यामुळे साधनेत प्रगती होत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.
भावार्थ : येथे प्रेम हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     व्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ हल्ली स्वैराचार असा झाला आहे. त्यामुळे मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे. यावरील एकमेव उपाय म्हणजे धर्मराज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


फुटीरतावाद्यांविषयीच्या भूमिकेत पालट नको !

संपादकीय 
     अलीकडे पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्यात देहलीत वरचेवर भेटी होत आहेत. मोदी शासन सत्तेत आल्यानंतर काही मासांनंतर भारत आणि पाक यांच्यात सचिव पातळीवरील चर्चा अयोजित करण्यात आली होती; मात्र भारताचा विरोध डावलून पाकने या चर्चेपूर्वी गिलानी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या कारणावरून भारताने ही चर्चा रहित करण्याचे बाणेदार पाऊल उचलले. यामुळे जागतिक पातळीवर भारताची पत वाढली. समस्त भारतियांची मान उंचावली. पाकला काश्मीरप्रश्‍नी भारताशी चर्चा करायची असेल, तर त्याने फुटीरतावाद्यांना मध्ये न आणता थेट भारताशी ती करावी, अशी भारताची प्रथमपासूनच स्पष्ट भूमिका आहे. याउलट पाकचा भारताशी चर्चेचा मार्ग मात्र काश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या अंगणातून जातो. तथापि सध्या बासित आणि गिलानी यांच्यात वारंवार भेटी होऊनही शासन यावर काहीही बोलायला सिद्ध नाही, याचे आर्श्‍चय वाटते. काहीही झाले, तरी पाक आणि फुटीरतावादी हे भारताचे शत्रूच आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या कठोर भूमिकेत पालट न करणे यातच देशहित आहे.

कन्हैया प्रवृत्ती आवरा !

संपादकीय
     रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण, जेएन्यू प्रकरण आणि आता फर्ग्युसन येथील घटना यांवरून कन्हैया प्रवृत्तीची विषवल्ली भारतात सर्वत्र किती खोलवर रूजली आहे, हे जनतेच्या लक्षात आले असेल. ही प्रवृत्ती केवळ शाब्दिक देशद्रोहच प्रकट करते असे नाही, तर तिची आक्रमकता कृतीतूनही दिसून येते. वरील ठिकाणी झालेल्या संघर्षातून हे सहज लक्षात येईल. हे संकट येथपर्यंतच सीमित नाही, तर कन्हैया प्रवृत्तीला खतपाणी घालणारी आणि त्याचे संवर्धन करणारी आणखी एक प्रवृत्ती कार्यरत असून हे संकट अधिक गडद आहे. शासनाला या संकटाचे समूळ निर्मूलन करायचे असेल, तर प्रथम आतंकवाद्यांची ही आश्रयदात्री प्रवृत्ती ठेचावी लागेल. तथापि शासनाने त्या दृष्टीने पावले उचलली आहेत, असे आजतरी दिसत नाही.

विविध सूत्रांवरून विधानसभेत गदारोळ : ७ वेळा कामकाज स्थगित !

जनतेच्या प्रश्‍नांवर मार्ग न काढता केवळ गोंधळ घालणार्‍या 
लोकप्रतिनिधींना जनतेनेच माघारी बोलवावे !
वर्गात गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गाबाहेर काढतात, त्याप्रमाणे विधानभवनात
गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींना विधानसभा अध्यक्ष बाहेर का काढत नाहीत ? 
      मुंबई - मंत्रालयासमोर शेतकर्‍याची आत्महत्या, फर्ग्युसन विद्यापिठात देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी वेगवेगळी पत्रे सादर करणार्‍या प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी, चवदार तळ्यावर जलपूजन, आदी सूत्रांवरून सलग दुसर्‍या दिवशीही म्हणजे २९ मार्चला विधानसभेत गदारोळ कायम राहिला. परिणामी दिवसभरात एकूण ७ वेळा कामकाज स्थगित करावे लागले. एकूणच या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदनही केले; मात्र तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत हा गदारोळ कायम राहिला. वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातील महसूल, वन, कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि महिला-बालविकास विभागांच्या अनुदानाच्या मागण्या चर्चेविना संमत करण्यात आल्या. दोन लक्षवेधी सूचनाही मांडल्या; मात्र त्यावर चर्चा होऊ शकल्या नाहीत.
काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे दिवसभरासाठी निलंबन
     विधानसभेत चालू असलेल्या गदारोळात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तरीही विरोधक त्यांच्या मागणीवर ठाम रहात हौदामध्ये घोषणाबाजी करत कागदपत्रे भिरकावत राहिले. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आदींना कागदपत्रे भिरकावू नयेत, असे निर्देश दिले; मात्र आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

१४ वर्षांपूर्वीच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १० जण दोषी

१४ वर्षांनंतर निकाल देणारी कूर्मगतीने चालणारी न्याययंत्रणा !
     मुंबई - डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या कालावधीत रेल्वेत मुंबई सेंट्रल, वांद्रे, विलेपार्ले, घाटकोपर आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने त्यातील साकिब नाचन, फरहान मवीक, आतीफ, डै अन्सारी, नूर अली, नूर महंमद, नासीर मुल्ला, गुलाम अकबर, मुजम्मील आणि नसीर या १० जणांना दोषी ठरवले आहे, तर तिघांची निर्दोष सुटका केली आहे. दोषींना ३० मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हरियाणा विधानसभेत जाट आरक्षण विधेयक एकमताने संमत

आरक्षणाचा भस्मासुर !
     चंदीगढ - शासकीय नोकरी आणि शिक्षण यांत जाटांना आरक्षण देणारे विधेयक हरियाणा विधानसभेने २९ मार्च या दिवशी एकमताने संमत करण्यात आले. २८ मार्चला झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या विधेयकास संमती देण्यात आली होती. जाटांसह जाट शीख, रोर, बिश्‍नोई आणि त्यागी या ४ जातींनाही मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये नवी वर्गवारी करून आरक्षण देण्यात आले आहे. या सर्व जातींना अ आणि ब वर्गांतील शासकीय नोकर्‍यांमध्ये ६ टक्के आरक्षणाचा शासनाचा प्रस्ताव आहे. याशिवाय शासन मागासवर्ग आयोगाही स्थापन करणार आहे.
हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याची न्यायालयाची अनुमती

     डेहराडून - उत्तराखंड उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याची अनुमती दिली असून येत्या ३१ मार्चला त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनाही मतदानाचा अधिकार असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे.
     काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हरीश रावत यांचे शासन अडचणीत सापडले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. या निर्णयाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री रावत यांनी नैनीतालमधील उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. यू.सी. ध्यानी यांच्या खंडपिठाने सुनावणी केली. दुसरीकडे काँग्रेसच्या ९ आमदारांनीही निलंबनाच्या विरोधात न्यायालयात आव्हान दिले आहे.

(म्हणे) १९८४ ची शीखविरोधी दंगल जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया !

चुकीचा इतिहास सांगून जनतेची दिशाभूल करणारा 
साम्यवादी विचारांचा विद्यार्थी कन्हैया !
     नवी देहली - गुजरातमधील दंगल ही राज्यशासनाच्या पाठिंब्याने घडवण्यात आली; तर १९८४ मधील दंगल ही निव्वळ हिंसक जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे मत जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने २९ मार्च या दिवशी व्यक्त केले. (राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैया कुमार आता काँग्रेसची पोपटपंची करू लागला आहे. शीखविरोधी दंगल ही काँग्रेसप्रणीत दंगली होती. यात काँग्रेसचे नेतेही सापडलेले आहेत. कन्हैया कुमारचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्याने थापा मारू नयेत ! - संपादक) जेएन्यूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जश्‍न-इ-आझादी या कार्यक्रमात कन्हैया बोलत होता.
कन्हैया म्हणाला की,
१. आणीबाणी आणि फॅसिस्टवादामध्ये मूलभूत भेद आहे. आणीबाणीच्या काळात केवळ एका पक्षाच्या गुंडांनी दडपशाही केली; तर फॅसिस्टवादांतर्गत एकंदरच राज्यव्यवस्थेची गुंडगिरी पहावयास मिळते.
२. हिटलरप्रमाणेच मोदींनाही समाजातील बुद्धिवंतांचा पाठिंबा नसून यामुळेच विद्यापिठांवर आक्रमणे केली जात आहेत. मोदी यांच्या राजवटीस भारतातील कोणत्याही बुद्धिमंताचा पाठिंबा नाही.

(म्हणे)आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही ! - असदुद्दीन ओवैसी

१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू, म्हणणारे 
१५ मिनिटांत पाकिस्तानला संपवू असे विचार का मांडत नाहीत ?
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - मुसलमानांनी या देशासाठी पुष्कळ काही केले आहे, मोठे बलिदान दिले आहे. भारतमाता की जय ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीविषयी शंका घेऊ शकत नाही. (भारतमाता की जय म्हटल्याने ओवैसी देशद्रोहीही ठरणार नाहीत; मग ते तसे का म्हणत नाहीत ? - संपादक) आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता नाही. आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही, अशी टीका एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. येथे एका सभेत ते बोलत होते. या सभेपूर्वी झालेल्या पक्षबैठकीत त्यांनी हिंदुस्थान झिंदाबाद आणि जय हिंद अशा घोषणा दिल्या.
     ओवैसी पुढे म्हणाले की, जे आमच्यावर शंका घेत आहेत त्यांचा १८५७ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुठेच पत्ता नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान दिले, आम्ही ब्रिटिशांकडे कधीच दयेची भीक मागितली नाही. (ओवैसी यांनी प्राणांचे बलिदान देणार्‍यांची नावे घोषित करावीत ! - संपादक)

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनकाळातील मंत्री बबनराव पाचपुते यांची मालमत्ता बँकेकडून कह्यात

२८७ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणी कारवाई
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! शासन अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती
कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का ?
     नगर - माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या खाजगी साईकृपा साखर कारखान्यासह बंगला आणि अन्य मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेने कह्यात घेतली केली. अनेक वेळा नोटीस देऊनही २८७ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने अखेर बँकेने मालमत्ता कह्यात घेतली. पंजाब नॅशनल बँकेच्या पुण्यातील कल्याणीनगर शाखेने ही कारवाई केली. (सर्वसामान्यांकडे थोडी थकबाकी राहिल्यावर कारवाई करणार्‍या बँका माजी मंत्र्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकीच्या वसुलीसाठी विलंब का करतात ? - संपादक) पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षे आमदार राहिले होते. नंतर काही कारणाने ते पक्षातून बाहेर पडले.
१. पाचपुते यांच्या साईकृपा शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज् लिमिटेड या कारखान्याने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यापोटी दोन्ही कारखान्यांची इमारत, यंत्रसामुग्री आणि अन्य मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.
२. कर्जाची थकबाकी २८७ कोटी ६० लक्ष ३८ सहस्र रुपये भरण्यासंबंधी बँकेने डिसेंबर २०१५ मध्ये कारखान्याला नोटीस दिली होती; मात्र थकबाकी न भरल्याने शेवटी बँकेने तारण मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला.
३. यामध्ये हिरडगाव (तालुका श्रीगोंदा) येथील कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री आणि अन्य मालमत्ता, देवदैठण येथील आस्थापनाची मालमत्ता, तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील रहिवाशी प्लॉट, श्रोगोंद्यातील पाचपुते यांच्या नावावर असलेला बंगला अशी मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे.
४. या कारखान्याने गेल्या वर्षी शेतकर्‍यांच्या उसाचे पैसे थकवले आहेत.

ममता बॅनर्जी शासनाच्या कार्यकाळात बंगालमध्ये केवळ बॉम्बचेच कारखाने निर्माण झाले ! - अमित शहा

     कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यात केवळ बॉम्बचेच कारखाने निर्माण झाले, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. येत्या काळात बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून निवडणूक प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे. या वेळी भाजप तृणमूल काँग्रेस किंवा डावे पक्ष यांच्याशी हातमिळवणी करणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. (एका राज्यात बॉम्बचे कारखाने उघडले जात असतांना ते रोखण्यास समर्थ असणारे शासन देशात हवे ! - संपादक)

इसिसने अखेर भारतीय पाद्य्राला सुळावर चढवले

     वॉशिंग्टन - इसिसने कॅथॉलिक वंशीय भारतीय पाद्री टॉम उजहुनालिल यांना प्रचंड यातना देत गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर चढवलेे. उजहुनालिल यांना येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणेच सुळावर चढवणार असल्याचे इसिसने आधीच घोषित केले होते. उजहुनालिल हे येमेनमधील मदर तेरेसा मिशनरीज्साठी काम करत होते. त्यांचे ४ मार्चला एका वृद्धाश्रमातून आतंकवाद्यांनी अपहरण केले. तथापि केंद्रशासनाने याविषयी अधिकृत काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. उजहुनालिल यांच्या कुटुंबियांनीही या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. उजहुनालिल हे बेंगळुरूमधील एका चर्चमध्ये काही वर्षे वास्तव्यास होते.

अमेरिकेतील डेअरी क्विन रेस्टॉरंटकडून हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करून अवमान !

  • अमेरिकेतील हिंदूंनी दर्शवला तीव्र विरोध
  • रेस्टॉरंटच्या धर्मांध मालकाने विरोधाला न जुमानल्याने हिंदु धर्माचा अवमान चालूच !
     केमाह, टेक्सास (अमेरिका) - अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केले आहे. रेस्टॉरंटने विविध ठिकाणी हिंदु धर्माचा अनादर करणारे फ्लेक्स फलक लावले आहेत. यात हिंदु धर्माची माकडाशी तुलना करण्यात आली आहे, तसेच देवता आणि ऋषिमुनी यांनाही विडंबनात्मकरित्या चित्रित करण्यात आले आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला आणि अमेरिकेचे नागरिकत्व असलेला महंमद दार हा डेअरी क्विन या रेस्टॉरंट गटापैकी (ब्रॅन्डचा) केमाहमधील रेस्टॉरंटचा मालक (फ्रॅन्चायजी ओनर) आहे.

न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस प्रशासनाने न जुमानणे हे गंभीर ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
* पुढील सुनावणी ४ एप्रिलला 
* पानसरे कुटुंबियांच्या वकीलांचा शासकीय यंत्रणेवर न्यायालयासमोरच अविश्‍वास 
* न्यायालयाने आदेश देऊनही तपास अधिकारी अनुपस्थित 
     कोल्हापूर, २९ मार्च (वार्ता.) - मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलिसांना 'अन्वेषणाचा अहवाल सादर करा', असा आदेश दिला होता. असे असतांना २९ मार्च या दिवशी अन्वेषण (तपास) अधिकारी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारचा पुढील अन्वेषण अहवाल सादर केला नाही याचा अर्थ न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस प्रशासनाने न जुमानणे हे गंभीर आहे, असे मत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. २९ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वतीने बाजू मांडणारे अधिवक्ता विवेक घाटगे यांनी न्यायाधिशांसमोरच शासकीय यंत्रणेवर अविश्‍वास व्यक्त करत हा खटला चालवल्याचे भासवत असल्याचा आरोप केला. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी चालू असून पुढील सुनावणी ४ एप्रिलला होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले. या वेळी श्री. समीर गायकवाड यांची बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता आनंद देशपांडे हेही उपस्थित होते. 

(म्हणे) 'फॅसिस्ट हिंदुत्ववादी ब्राह्मणवादाचे ध्रुवीकरण करण्यासाठी देशाचे राजकारण करत आहेत !'

सर्व श्रमिक महासंघाचा जातीयवाद ! 
     सातारा, २९ मार्च (वार्ता.) - दमन करणार्‍या शासनाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सतत चालूच आहे. १३ वर्षे जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा म्हणून लढणारे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, शेतकरी, शेतमजूर महिला, टोलमुक्त नाके व्हावेत, तसेच सनातनवाद्यांचा भांडाफोड करणारे कॉ. पानसरे यांचा खून झाला, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांनी खरा बसवअण्णा आणि विरशैवांचा खरा इतिहास लिहिला म्हणून त्यांना मारण्यात आले. सध्या फॅसिस्ट हिंदुत्ववादी 'ब्राह्मणवादाचे ध्रुवीकरण' करण्यासाठीच देशाचे राजकारण करत आहेत, अशी माहिती सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. (सर्व श्रमिक महासंघासारखे विद्रोहीच जातीयवादी विद्वेष समाजात पसरवून फॅसिस्टगिरी करत आहेत. - संपादक) 

पोप फ्रान्सिस यांनी ईस्टरनिमित्तच्या संदेशात उपस्थित केले मुसलमान शरणार्थींच्या गंभीर स्थितीचे सूत्र

मुसलमान शरणार्थींना साहाय्य केल्यामुळे उद्या अनेक शरणार्थींनी 
ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास कोणाला आश्‍चर्य वाटू नये !
     व्हॅटिकन - ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर सणानिमित्त व्हॅटिकन शहरातील सेंट पीटर्स स्क्वेअरवरून सहस्रावधी ख्रिस्त्यांना संबोधित करतांना मुसलमान शरणार्थींच्या गंभीर स्थितीचे सूत्र उपस्थित केले. तसेच आतंकवादाचा निषेधही केला. या वेळी त्यांनी युरोप, आफ्रिका आणि इतरत्र आतंकवादी आक्रमणाला बळी पडलेल्यांच्या प्रती सहानुभूतीही व्यक्त केली. 
     युरोपने संकटात सापडलेल्या शरणार्थींना हीन वागणूक दिल्याविषयी पोप यांनी खेद व्यक्त केला. पोप त्यांच्या संदेशात म्हणाले की, पाप आणि दुष्कृत्य यांवर विजय मिळवण्यासाठी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्यानंतर तेे भक्तांसाठी पुन्हा जीवित झाले. ख्रिस्ती समुदाय आतंकवादाला बळी पडलेल्या (मुसलमान) शरणार्थींना सहानुभूती दाखवील, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. (समाजसेवा हे धर्मांतराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे, असे विधान गेल्या वर्षी २४ जानेवारी या दिवशी स्वत: पोप फ्रान्सिस यांनीच केले होते. या पार्श्‍वभूमीवर मुसलमान शरणार्थींना साहाय्य केल्यामुळे उद्या अनेक शरणार्थींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास कोणाला आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक)
      संपूर्ण मानवजातीला जीवन जगू द्या, असा संदेशही त्यांनी ईस्टरनिमित्त सर्वांना दिला. युरोपमधील काही देशांनी शरणार्थींना आश्रय देण्यास नकार दर्शवला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा संदेश दिला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn