Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष !कोटी कोटी प्रणाम !


सनातनच्या पू. कला प्रभुदेसाई आजी यांचा आज वाढदिवस !

नागरिकांनी एका मशिदीची तोडफोड करून धर्मग्रंथाची पाने जाळली

फ्रान्समध्ये अजूनही धुमसतोय मुसलमानांच्या विरोधात संताप
     अजासिओ (कोर्सिका, फ्रांस) - फ्रान्समध्ये अलीकडे आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी १३० निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. त्याचा संताप अजूनही फ्रान्सच्या लोकांमध्ये धूमसत असल्याचे दिसून येत आहे. फ्रांसमधील कोर्सिका बेटावरील अजासिओ गावातील निदर्शकांनी २५ डिसेंबरच्या रात्री येथील एका मशिदीवर आक्रमण करून तोडफोड केली आणि तेथील धर्मग्रंथाची पाने जाळली. या हिंसाचारात अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी घायाळ झाले. या घटनेनंतर पोलिसांनी सदर मशिदीसह बेटावरील अन्य ४ मशिदींना संरक्षण पुरवले आहे. (फ्रान्सच्या जनतेप्रमाणे राष्ट्रप्रेम जागृत ठेवणे, हे आतंकवादी आक्रमणांना उत्तर आहे का ? - संपादक)

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे चौकशी व्हावी ! - काश्मिरी हिंदूंच्या संमेलनात एकमुखी मागणी

संमेलनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग
      नवी देहली - काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी न्यायिक लवाद नेमावा, अशी मागणी २७ नोव्हेंबर या दिवशी येथे आयोजित करण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होमलॅण्ड डेनिमित्त आयोजित युवा संमेलनात करण्यात आली.

लोकसंख्येचे असंतुलन ही राष्ट्र आणि हिंदू यांसाठी धोक्याची घंटा ! - गिरीराज सिंह, केंद्रीय राज्यमंत्री

भाजपच्या मंत्र्यांनी हे केवळ सांगून न थांबता मुसलमानांमुळे झालेला हा लोकसंख्येचा 
विस्फोट रोखण्यासाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावा ! 
     वाराणसी - सध्या देशात लोकसंख्येचे असंतुलन झाले असून हे राष्ट्र आणि हिंदू यांच्यासाठी धोकादायक आहे. या असंतुलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कायदे कार्यान्वित केले पाहिजेत, असे मत केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या सनातन धर्म बचाव संमेलनात मांडले. 

जळगाव येथील भव्य हिंदु धर्मजागृती सभेने हिंदूंमध्ये स्फुल्लिंग चेतवले !

हिंदु जनजागृती समितीच्या मराठी संकेतस्थळाचे उद्घाटन
      जळगाव - या दिवशी पार पडलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभेने हिंदु मनांत राष्ट्र आणि धर्म तेजाचे स्फुल्लिंग चेतवले ! शिवतीर्थ मैदानावर पार पडलेल्या या सभेत आरंभी सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी दीपप्रज्वलन केले. त्यांच्यासमवेत भाग्यनगरचे भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह, सनातनच्या पू. स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

केंद्रशासनाकडून एका वर्षात विज्ञापनांवर ८०० कोटी रुपयांहून अधिक खर्च

जनहिताचे कार्य केले, तर ते लोकांपर्यंत पोहोचतेच, तसेच त्याच्या विज्ञापनासाठी 
कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत नाहीत, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे !
     पुणे - केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या शासनाने २६ मे २०१४ ते २६ मे २०१५ या वर्षभराच्या काळात विज्ञापनांवर ८०० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले आहेत. यांपैकी मुद्रित माध्यमांतील विज्ञापनांवर ४०५ कोटी रुपये; तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातील विज्ञापनांवर ४६६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. (देश आर्थिक संकटात असतांना विज्ञापनांवर कोट्यवधी रुपये खर्च करणे दुर्दैवी आहे ! - संपादक)

कुंभकोणम् (तमिळनाडू) येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय साधू अधिवेशनाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग
     कुंभकोणम् (तमिळनाडू) - येथे १३ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महामघम उत्सवात १८ ते २० फेब्रुवारी असे ३ दिवस अखिल भारतीय साधू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त कुंभकोणमजवळ असलेल्या गोविन्द्पुरम् येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थान येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस हिंदु जनजागृती समितीनेही सहभाग घेतला. महामघम उत्सवाला दक्षिण भारतातील कुंभमेळा, असेही म्हटले जाते. 

कलम ३७० रहित झाल्यावर काश्मीरचा प्रश्‍न सुटेल ! - अनुपम खेर

     जम्मू - ज्या वेळी घटनेतील ३७० कलम जाईल आणि बंगाल, पंजाब, गुजरात आणि देशातील अन्य भागांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये रहाण्याची अनुमती मिळेल, त्या वेळी काश्मीरचा प्रश्‍न सुटेल. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची वसाहत व्हायला हवी. तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे प्रतिपादन अभिनेता अनुपम खेर यांनी केले.

पाकिस्तानात वर्ष २०१५ मध्ये ४१७ हिंदु मुलींचे धर्मांतर

इस्लामी राष्ट्रातील अल्पसंख्य हिंदूंची परवड !
     अमृतसर (कक्कड) - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस अतिशय दयनीय होत आहे. वर्ष २०१५ मध्ये पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागांतून ४१७ हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आले असून त्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु संघटनांवर बंदी घालण्याची धर्मांधांची मागणी

बांगलादेशात सत्तेवर असलेला पक्षच तेथील हिंदु संघटनांच्या मुळावर उठला असल्याचे समोर 
आल्यावर तरी भारत शासन तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणार का ?
     ढाका - बांगलादेशमध्ये सत्तेवर असलेला अवामी लीग पक्ष सर्वधर्मसमभावाचा ढोल बडवत असला, तरी मौलवींचा समावेश असलेल्या ओलामा लीग या अवामी पक्षाच्याच उपसंघटनेने बांगलादेशमध्ये हिंदु संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 
     ओलामा लीगचे सरचिटणीस मौलाना अब्दूल शेख हसन शरियतपुरी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, हिंदु बुद्धीस्ट ख्रिस्ती युनिटी काऊन्सिल, इंडिजीनस ट्रायबल फोरम आदी संघटना मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवत आहेत. (बांगलादेशातील धर्मांध हिंदूंच्या आया-बहिणींची अब्रू लुटतात, मंदिरांची आणि हिंदूंच्या घरांची तोडफोड करतात. त्यांना हिंदूंनी विरोध केल्यास चूक ते काय ? - संपादक)

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत बनेल ! - राम माधव, भाजप सरचिटणीस

     नवी देहली - भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एक दिवस नक्की एकत्र येतील. ही एकजूट युद्धातून नव्हे, तर चांगुलपणाच्या भावनेतून घडून येईल, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक भेट दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर माधव यांच्या या प्रतिक्रियेला बरीच प्रसिद्धी मिळत आहे. प्रत्यक्षात ही प्रतिक्रिया राम माधव यांनी दोहा येथे अल-जजिरा या वृत्तवाहिनीला मोदी यांच्या लाहोर भेटीपूर्वी दिलेल्या मुलाखतीत दिली होती.

डीडीसीए घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी आयोगाची अरुण जेटली यांना क्लिन चीट !

     नवी देहली - देहली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) यात कथित घोटाळा झाल्याच्या प्रकरणी केजरीवाल शासनाने नेमलेल्या चौकशी आयोगाने त्यांच्या अहवालात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना क्लिन चीट (स्वच्छतेची पावती) दिली आहे. त्यामुळे जेटली यांच्या विरोधात आरोपांचे काहूर माजवणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (केवळ वैयक्तिक आकसापोटी शासकीय वेळ आणि पैसा वाया घालवणारे राजकारणी जनतेला काय सुराज्य देणार ? - संपादक) जेटली यांच्या कार्यकाळात अनियमितता आढळली नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवर बैठक होणार !

गेल्या ६८ वर्षात काहीही न शिकलेले भारताचे राज्यकर्ते ! पाकशी चर्चा करणे
म्हणजे भारताचे सैनिक आणि नागरिक यांचे आणखी बळी जाऊ देणे होय !
मोदी यांच्या पाकभेटीनंतर पुन्हा चर्चेचे गुर्‍हाळ रंगणार
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोर भेटीनंतर प्रथमच भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये परराष्ट्र सचिव पातळीवर बैठक होणार आहे. १५ जानेवारी या दिवशी इस्लामाबाद येथे होणार्‍या या बैठकीत दोन्ही देशांचे सचिव चर्चा करणार आहेत. वृत्तसंस्था एएन्आयनुसार भारताचे परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर पाकिस्तानच्या एजाज चौधरींशी चर्चा करतील. मोदी यांच्या पाकभेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

चिंचवडचे नामकरण चापेकरनगर करावे ! - भागवताचार्य वा.ना. उत्पात यांची मागणी

     चिंचवड - संतांचे जे जीवन असते, ते पाहतांना तो काळ पहायचा असतो, त्यास आताचे निकष लावायचे नसतात. मोरया गोसावी यांची गणेशभक्ती असाधारण होती. त्याचबरोबर चिंचवडमधील चापेकर बंधूंचे योगदान लक्षात घेता चिंचवडचे नामकरण चापेकरनगर करायला हवे, अशी मागणी भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी केली. इतर संतांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे पंढरपूरसाठी मोरया गोसावी पालखी सोहळा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

सीबीएस्ई मंडळाच्या परिपत्रकातील राष्ट्रगीतात चुका

राष्ट्रगीतात वारंवार चुका होणारा जगातील एकमेव देश भारत !
याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
सिंधु, आसिस आणि मागे शब्दांमुळे गोंधळ
     मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएस्ईच्या) वतीने काही दिवसांपूर्वी देशभरातील सर्व शाळांना राष्ट्र्रगीताच्या संदर्भातील परिपत्रक पाठवण्यात आले आहे. त्यानुसार शाळांना राष्ट्रगीताच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या असून, या परिपत्रकात राष्ट्रगीतही नमूद करण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील या परिपत्रकातील राष्ट्रगीतामध्ये सिंध, आशिष आणि मांगे या शब्दांऐवजी सिंधु, आसिस आणि मागे असे शब्द नमूद करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. याविरोधात अनेक पालकांनी आणि संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

रामकृष्ण मिशनच्या मठांमध्ये नाताळ साजरा !

चर्चमध्ये कधी हिंदूंचे सण साजरे केले जातात का ?
हिंदूंकडून संताप व्यक्त
     नवी देहली - देशातील रामकृष्ण मिशनच्या सर्व मठांमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नाताळ (ख्रिस्मस्) साजरा करण्यात आला. त्यामुळे हिंदु धर्माभिमान्यांनी संताप व्यक्त केला असून अनेकांनी मिशनच्या संचालकांकडे लेखी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. रामकृष्ण मिशन हे वेदांच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असे केंद्र आहे. वेदांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्मातील रुढी, परंपरा आणि दैनंदिन व्यवहार यांचा प्रसार करून धर्मप्रसारासाठी कार्य करणे, हे या मिशनचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अन्य धर्मियांचा सण मिशनच्या मठांमध्ये साजरा करणे कितपत सयुक्तिक ठरते ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न झाला आहे.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीने दोन देशांतील संबंध सुधारतील ! - अमेरिका

मोदी यांच्या अचानक पाकभेटीचे जगभरात स्वागत
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचानक पाकभेटीचे जगभरात स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेने भारत-पाक यांच्यातील संबंध सुधारल्यास या देशांना लाभ होईल, असे म्हटले आहे. या दोन देशांच्या द्वीपक्षीय चर्चेमुळे त्यांच्यातील संबंध अधिक दृढ होईल. आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी एकत्र असणे आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्र सचिव बान की मून यांनी म्हटले आहेे.

(म्हणे) पाकिस्तानच्या शत्रूचे असे स्वागत का ?

कुख्यात आतंकवादी हाफीज सईदचा तिळपापड
     इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लाहोर येथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यामुळे मुंबई आक्रमणातील सूत्रधार कुख्यात आतंकवादी हाफीज सईदचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या शत्रूचे असे स्वागत का ? असा प्रश्‍न करत सईदने पाकचे पंतप्रधान शरीफ यांच्यावरही टीका केली आहे. मोदी यांना भेटून शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे या भेटीविषयी शरीफ यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्याने केली आहे.

प्राध्यापक निवडीसाठी नेट-सेट हीच पात्रता अनिवार्य ! - मुंबई उच्च न्यायालय

याचबरोबर नीतिमान, चारित्र्यवान आणि राष्ट्राभिमान 
असलेल्या प्राध्यापकांची निवड करणे अपेक्षित आहे !
      संभाजीनगर - प्राध्यापक निवडीसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने संयुक्त सुनावणीत अंतिम निर्णय दिला आहे. त्यानुसार प्राध्यापक निवडीसाठी नेट-सेट हीच पात्रता अनिवार्य असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. त्याचबरोबर नेट-सेटमधून पीएच्डी आणि एम्.फिल ही पदवी असलेल्या प्राध्यापकांना सूट द्यावी, ही मागणी उच्च न्यायालयाने रहित केली.

हिंदु जनजागृती समितीची '३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखा' चळवळ

जुईनगर, ठाणे आणि लालबाग येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद
जुईनगर, नवी मुंबई

ठाणे

लालबाग, परळ

याविषयी सविस्तर वृत्त वाचा लवकरच

साखर कारखान्यांतील एफ्आर्पीचे धोरण पालटण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पंतप्रधानांशी चर्चा घडवून आणणार ! - सहकारमंत्री

      नागपूर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील ९१ सहकारी आणि ७४ खाजगी अशा एकूण १६५ साखर कारखान्यांनी हंगाम चालू केलेला आहे. १५ डिसेंबर अखेर २२६.५९ लक्ष मे. टन उसाचे गाळप होऊन सरासरी १०.१३ टक्के साखर उतार्‍याने २२९.६४ लक्ष क्ंिवटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. साखर कारखान्यांना एफ्आर्पी देणे बंधनकारक आहे. १६५ पैकी १३० कारखान्यांनी एफ्आर्पी (किमान आधारभूत किंमत) दिलेली आहे. उर्वरित कारखान्यांनी एफ्आर्पी देण्याविषयी त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध कारवाई करा !

जे काम शासनाने स्वत:हून करायला हवे, ते न्यायालयाने शासनाला सांगावे 
लागत असेल, तर शासन नावाचा पांढरा हत्ती पोसण्यात काय हशील ?
उच्च न्यायालयाचा शासनाला आदेश
     पुणे - राज्यात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी वाहनांची संख्या २ लक्षांहून अधिक असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात ९ सहस्त्र खाजगी वाहने राज्य परिवहन बसस्थानकाजवळच्या परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. या सर्व वाहनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.

रुग्णालयातील परिचारिका आणि तिचा प्रियकर यांना अटक

ईश्‍वरपूर येथील डॉक्टर दांपत्याच्या खुनाचे प्रकरण !
     ईश्‍वरपूर, (जिल्हा सांगली) - येथील फिजिशियन डॉ. प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी स्त्रीरोग तज्ञ डॉ. अरुणा कुलकर्णी या दोघांचा काही दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांना चाकूने भोकसून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. कुलकर्णी यांच्याच रुग्णालयात काम करणारी परिचारिका सीमा यादव आणि तिचा प्रियकर निलेश दिवाणजी यांना शनिवारी रात्री अटक केली आहे.

पुणे येथे प्रबोधन कक्षाद्वारे नागरिकांना नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याचे आवाहन

प्रबोधन कक्षावर विषय समजून घेतांना नागरिक
     पुणे, २७ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदा ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रबोधन कक्षाद्वारे जागृती करण्यात आली, तर पोलीस अन् प्रशासन यांनाही निवेदने देण्यात आली. 
१. पौड रस्त्यावरील किनारा हॉटेलसमोर २६ डिसेंबर या दिवशी प्रबोधन कक्ष उभारण्यात आला होता. या वेळी नागरिकांना हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करणे का आवश्यक आहे, हे सांगण्यात आले. या वेळी नागरिकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून अशा कार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थितांना प्रबोधनात्मक चलचित्रही दाखवण्यात आले. 'सध्या देश अधोगतीला जात असून संस्कृतीरक्षणाच्या या कृतीच देशाला वाचवू शकतील', अशी प्रतिक्रिया एका युवकाने व्यक्त केली. 

बार्शीत (जिल्हा सोलापूर) तहसीलदारांना निवेदन

     बार्शी (जिल्हा सोलापूर), २७ डिसेंबर (वार्ता.) - येथील तहसीलदार श्री. बी.व्ही. सोमवंशी यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी तहसिलदार श्री. सोमवंशी यांनी स्वत: पोलिसांना लेखी कळवून याविषयी कृती करू, असे आश्‍वासन दिले. याचप्रमाणे बार्शी पोलीस ठाण्यामध्येही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. कोठावळे, सौ. पवार, सौ. सवाईराम, सौ. होटकर, सौ. लता फल्ले, सौ. रोडे आदि उपस्थित होते.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे एकूण ३४ पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने; अंधेरी येथे निवेदन नाकारले

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. जयराम पवार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
डावीकडून सर्वश्री सचिन घाग, ॐकार कोलते
     मुंबई - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुंबई आणि मुंबई उपनगरांतील दादर, शिवाजी पार्क, वरळी, काळाचौकी, भोईवाडा, भायखळा, माहीम, शाहूनगर, गोवंडी, चेंबूर, ट्रॉम्बे्-मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (प.), पंत नगर-घाटकोपर (पू.), डी.एन्.नगर-अंधेरी (प.), कांदिवली, बोरीवली, दहिसर, मीरा रोड (जिल्हा ठाणे) या पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली. नवी मुंबईतील बेलापूर येथील साहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विजय चव्हाण यांना आणि वाशी, नेरूळ, एन्.आर्.आय्.-सीवूड या पोलीस ठाण्यांत, तर पालघर जिल्ह्यातील वसई शहर, वसई गाव, तुळीज, नालासोपारा, विरार, बोईसर या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांना निवेदने देण्यात आली. याप्रमाणे मुंबईचे निवासी जिल्हाधिकारी श्री. जयराम पवार यांनाही निवेदन देण्यात आले. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजयकुमार लांडगे (उजवीकडे) यांना निवेदन
 देतांना डावीकडून हिंदुत्ववादी सर्वश्री अनिल सावंत, वसंत सणस
      ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले, सार्वजनिक ठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र येऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करणे, शिवीगाळ करणे, रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावून त्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणेे इत्यादी समाजाला अस्वस्थ करणारे आणि पोलीस प्रशासनावरील ताण वाढवणारे असंख्य अपप्रकार घडत आहेत. हे सर्व अपप्रकार थांबले पाहिजेत, या मागणीसाठी ठिकठिकाणी निवेदने देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळात हिंदु गोवंश रक्षा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवकार्य प्रतिष्ठान, योग वेदांत समिती, सनातन संस्था आदी संघटनांच्या प्रतिनिधींसह स्थानिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सदर निवेदने स्वीकारल्यानंतर अनेक पोलीस निरीक्षकांनी सदर अपप्रकार आपणास आढल्यास आम्ही दोषींवर कारवाई करू; असे या वेळी सांगितले. 

फलक प्रसिद्धीकरता

पाकमधील हिंदूंच्या दुस्थितीकडे भाजप शासन लक्ष देईल का ?
     वर्ष २०१५मध्ये पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागांतून ४१७ हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आले असून त्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. याकडे पाकिस्तानचे न्यायालय, तसेच शासन दुर्लक्ष करत आहेत.

नाशिक येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेरीनिमित्त पत्रकार परिषद

नाशिक येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेरीविषयी २६ डिसेबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत उजवीकडून सर्वश्री शशिधर जोशी, जयंत भातंब्रेकर, नरेंद्रभाई ठक्कर, आणि अधिवक्ता पी.आर्.गीते

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pak me es varsh abtak karaya gaya 417 Hindu ladkiyonka dharma parivartan ! - Es Hinduonke liye Bharatki shasan kuch karegi ?
जागो !
पाक में इस वर्ष अब तक कराया गया ४१७ हिन्दू लडकियों का धर्म-परिवर्तन ! - इस हिंदूंआके लिए भारत की शासन कुछ करेगी ?

वाहतूक पोलिसाशी अरेरावी करणार्‍या संगणक अभियंत्याच्या विरोधात गुन्हा

पोलिसांविषयी वाटणारा धाक संपत चालला आहे, असे म्हटल्यास वावगे काय ?
      निगडी (पुणे)- वाहन न लावण्याच्या क्षेत्रामधील (नो-पार्किंग क्षेत्र) वाहनांवर कारवाई करणार्‍या वाहतूक हवालदारावर एका व्यक्तीने अरेरावी करून शिवीगाळ केली. या प्रकरणी संगणक अभियंता असणार्‍या अमरजीत सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. हा प्रकार २५ डिसेंबर या दिवशी घडला.

शिवसेनेची सांगली, मिरज कार्यकारिणी बरखास्त

     सांगली, २७ डिसेंबर (वार्ता.) - शिवसेनेची सांगली, मिरज कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी दिली आहे. पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परत या निवडी करण्यात येणार आहेत. यानुसार तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांसह सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे कोणीही पदे लावू नयेत अथवा पक्षाच्या नावाच्या कागदपत्रांचा उपयोग करू नये.

माहीम (मुंबई) येथील सुफी संतांच्या जत्रेतील ध्वनीप्रदूषण ईदच्या मिरवणुकीपेक्षा अधिक !

     माहीम (मुंबई) - येथे प्रतीवर्षी हजरत मखदूम फकी अली माहिमी या सुफी संतांच्या स्मरणार्थ जत्रा भरते. या वर्षी ही जत्रा २५ डिसेंबरला प्रारंभ झाली असून ३ जानेवारीपर्यंत चालणार आहे. माहीमची जत्रा प्रत्येक दिवशी सकाळी ५.३० वाजता चालू होते आणि ती रात्री १ वाजता संपते. या आठ दिवसांत जत्रेत होणारा ध्वनीक्षेपकांचा आवाज हा ईदच्या दिवशी निघणार्‍या मिरवणुकीपेक्षा अधिक असतो, असे एका सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. (ध्वनीप्रदूषणाचे नियम हे केवळ हिंदूंसाठीच असतात का ? अन्य धर्मियांनी नियमांचे कितीही उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, हेच आतापर्यंत वेळोवेळी उघड झाले आहे ? - संपादक) या यात्रेत दर्ग्यावर चादर चढवण्याचा प्रथम मान पोलिसांचा असतो, तसेच या जत्रेच्या निमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी २ पोलिसांची अधिकृत नेमणूक केली जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पोलिसांच्या वतीने सर्रास उल्लंघन केले जाते, हे स्पष्ट झाले आहे. 

३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार टाळण्यासाठी ३५ सहस्र पोलीस तैनात !

     मुंबई, २७ डिसेंबर - नववर्ष स्वागताच्या जल्लोषावर मुंबई पोलिसांची बारीक दृष्टी रहाणार आहे. ३१ डिसेंबरला रात्री सुमारे ३५ सहस्र पोलीस रस्त्यावर असतील. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस दक्ष आहेत. (भारतीय समाज पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आहारी गेल्याने भारतातील तरुणाई असले विकृत उत्सव साजरे करून देशाच्या सुरक्षा यंत्रणेचा अमूल्य वेळ आणि शक्ती वाया घालवत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! - संपादक)

पनवेल बसस्थानकाबाहेरील दुकानाला लागलेल्या आगीला बिकानेर उत्तरदायी - पेण येथील विद्युत निरीक्षकांचा अहवाल

     पनवेल, २७ डिसेंबर - पनवेल बसस्थानकासमोरील दुकानाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत बिकानेर स्वीट कॉर्नरच उत्तरदायी असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्या वीज वायर, वीज जोडणीत बिघाड असल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अहवाल पेण येथील विद्युत निरीक्षकांनी सादर केला आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यामुळे बाजूच्या मिलेनियम जम्बो झेरॉक्स दुकानाचे मोठे नुकसान झाले. या जळीत हानीभरपाईचे दायित्व बिकानेरच्या मालकाचे असल्याचे अहवालात नमूद आहे. 

सध्याच्या शिक्षणपद्धतीच्या मर्यादा !

सध्याची शिक्षण पद्धत               आदर्श शिक्षण पद्धत
१. नीतीमूल्ये, सदाचरण आणि देशभक्ती यांच्यासारखे विषय शाळेत शिकवणे आवश्यक
     २४.१.२००४ या दिवशी श्री. राहुल बजाज या उद्योजक विचारवंताने व्यापार (Commerce) हा विषय अगदी शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केला पाहिजे, असे आग्रहाने एका भाषणात प्रतिपादन केले होते.
     नीतीमूल्यांसारखे चारित्र्याशी संबंधित विषय लहानपणीच अवगत झाले पाहिजेत, यासाठी दुमत असण्याचे काही कारण नाही; पण हे शिक्षण देणारे शिक्षकही अशाच चारित्र्याचे असावे लागणार. मी वागतो तसे नव्हे, तर मी शिकवतो तसे वागत चला, अशा शिकवण्यानेही नीतीमूल्ये विद्यार्थ्यांत उतरली का ? यापेक्षा याच अभ्यासक्रमातील इतिहास, शास्त्र, भाषा इत्यादी विषयांपेक्षा नीतीमूल्ये या विषयाला विद्यार्थ्यांनी अधिक महत्त्व का द्यावे ? या प्रश्‍नाला विद्वानांजवळ काय उत्तर आहे ? नीतीमूल्ये, सदाचरण आणि देशभक्ती यांसारखे आवश्यक विषय शाळेत शिकवता येतील का ? याचा विचार केला पाहिजे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती होणे, हे तत्कालिन काँग्रेस शासनाच्या मराठीद्वेषी कारभाराचे फलित !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे, यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

उत्सवांतील विकृती !

     उत्सव हे मनाला आनंद देणारे असतात. त्यामुळे भारतात धार्मिक, सामाजिक उत्सवांसमवेतच महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी हे उत्सव तर भारतियांसाठी मोठी पर्वणी असते; मात्र आज उत्सवाचे स्वरूप पालटले आहे. भारतीय परंपरांना छेद देत पाश्‍चात्त्य पद्धतीने उत्सव साजरे केले जात आहेत.

राष्ट्रातील सर्व समस्यांना कारणीभूत असलेली काँग्रेस !

अशा काँग्रेसला जनतेने सत्तेतून पायउतार केले नसते, तर देश पुन्हा एकदा 
पारतंत्र्यात जाऊन देशवासियांना गुलामगिरीचे जीवन जगावे लागले असते !
२८ डिसेंबर - काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने...
१. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माऊंटबॅटन भारताचे शासक असणे : ६.९.१९४७ या दिवशी नेहरू लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यापाशी गेले. त्या वेळी त्यांचे कौतुक करून म्हणाले की, देशावर नियंत्रण ठेवणे मला अवघड आहे आणि तुम्हीच सत्ता सांभाळा. यावरून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लॉर्ड माऊंटबॅटन हे अनेक दिवस भारताचे शासक होते. 
२. काँग्रेसच्या मानसिकतेमुळेच भारताचे तुकडे होणे : आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या समस्यांचे कारण काँग्रेस पक्षच आहे. आज मुसलमानांना वेगळे स्थान दिले जाते, ते काम काँग्रेसनेच केले आहे. या काँग्रेसच्या मानसिकतेमुळेच भारताचे तुकडे झाले आहेत आणि फाळणीच्या वेळेसच १० लक्ष लोक (हिंदू) ठार झाले आहेत. त्या वेळी काँग्रेस आनंद साजरा करत होती. लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्याची पत्नी यांची सुवर्णपत्रयुक्त अशा गाडीतून मिरवणूक काढली होती. या वेळी काँग्रेस अतिशय वाकून लॉर्ड माऊंटबॅटन यांचे आभार व्यक्त करीत होती की, जणूकाही स्वातंत्र्य त्यांनीच दिले आहे.

विस्थापित काश्मिरी हिंदू : शासकीय अनास्थेचे बळी !

काश्मिरी हिंदूंच्या होमलॅण्ड डे निमित्त...
     फोडा आणि राज्य करा ही काँग्रेस नामक काळ्या इंग्रजांची राजनीती स्वातंत्र्यानंतर आजही तेलंगणासारख्या राज्यांच्या रूपात आपल्याला पहायला मिळते. काश्मीरविषयी सांगायचे झाले, तर अहिंसावादी (?) गांधींनी फाळणी करून मुसलमानांची सोय करून दिली; पण हिंदूंना मात्र वार्‍यावर सोडून दिले. आजही लाखो निर्वासित हिंदू अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत. खेदाची बाब म्हणजे बलाढ्य लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांना आजपर्यंतही न्याय मिळवून देऊ शकले नाहीत ! एकूणच निर्वासित हिंदू शासकीय अनास्थेचे बळी ठरले आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

साधकांनो, अनोळखी व्यक्तीच्या रूपात येणार्‍यांवर (अशा पोलिसांवर) भरवसा ठेवण्यापूर्वी त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती गोळा करा !

श्री. प्रशांत जुवेकर
    सध्या पोलीस सर्वशक्तीनिशी आपल्या कार्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोणत्याही मार्गांचा अवलंब करू शकतात. आपल्या बैठका, सत्संग इत्यादी ठिकाणी येऊन किंवा विज्ञापनदाते, वर्गणीदार, देणगीदार इत्यादी कुणाच्याही माध्यमातून ते आपल्याशी जवळीक साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. जवळीक वाढवू पहाणार्‍यांच्या घरी जाणे, त्यांच्या कुटुंबियाची माहिती घेणे, अशा विविध प्रकारे सर्वप्रथम त्यांची पूर्ण माहिती गोळा करावी.
- श्री. प्रशांत जुवेकर (१.३.२०१२)
(मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने तुरुंगात असतांना केलेले लिखाण - संकलक)

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात साधक प्रतिदिन एक संतांनी सुचवलेला मंत्रजप करतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम

पू. (सौ.) योया वाले
तारक शक्ती
१ अ. तारक शक्तीचा प्रवाह ईश्‍वराकडे प्रवाहित होणे : सर्व संकटांचे निवारण होण्यासाठी, तसेच साधकांभोवती संरक्षक कवच निर्माण होण्यासाठी ईश्‍वराचे साहाय्य मिळवण्यासाठी (ईश्‍वराला आळवण्यासाठी) असे होते.
तीन देवतांची तत्त्वे एकत्रित येणे
२. तीन देवतांच्या तत्त्वांचा प्रवाह आश्रमात आकृष्ट होणे : आपत्काळापासून, तसेच साधकांना त्रास देणार्‍या धर्मद्रोह्यांपासून सर्व साधक आणि आश्रम यांचे संरक्षण होण्यासाठी प्रतिदिन साधक हा मंत्रजप करत असल्याने असे होते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या वेळी कॅनडा येथील सौ. साईली गंद्रे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. साईली गंद्रे
२९ डिसेबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या 
कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 
होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
    रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २९ डिसेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत एस्.एस्.आर्.एफ्.च्या (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या)विदेशातील साधकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त्ताने कॅनडा येथील सौ. साईली गंद्रे यांना गेल्या वर्षीच्या कार्यशाळेच्या कालावधीत आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

श्री दत्तमाला मंत्रजप करतांना आलेली अनुभूती

१. सर्व साधक भक्तीभावाने मंत्रजप करतांना साधकांपासून वरच्या दिशेने कळसाप्रमाणे निमूळत्या आकारात दत्तात्रेयांच्या शक्तीचे संरक्षककवच निर्माण होऊन साधकांभोवती आनंददायी चैतन्य पसरले आहे, असे सूक्ष्मातून दिसणे
     एका संताच्या सांगण्यानुसार रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात अन्य साधकांसमवेत मी दत्तमाला मंत्रजप करत होतो. सर्व साधक योग्य उच्चार, मध्यम गती, आर्तता यांसह भक्तीभावाने पठण करत होते. त्या वेळी मंत्रपठणाला बसलेल्या सर्व साधकांपासून वर मंदिराच्या कळसाप्रमाणे निमूळत्या होत गेलेल्या आकारात दत्तात्रेयांच्या शक्तीचे संरक्षककवच निर्माण झाले आहे आणि सर्व साधकांभोवती अधिक प्रमाणात आनंददायी चैतन्य पसरले आहे, असे मला सूक्ष्मातून जाणवले. त्या वेळी पठण करतांना मला वेगळीच स्थिरता आणि आनंद जाणवत होता.

आधुनिक वैद्या सौ. रश्मी नल्लादारू यांना आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

आधुनिक वैद्या
सौ. रश्मी नल्लादारू
१. मुद्रितशोधनाच्या संदर्भातील काही सूत्रे 
पडताळण्याची सेवा करतांना त्रास झाल्यामुळे 
काहीच न सुचणे आणि त्या वेळीश्रीकृष्णाला प्रार्थना 
केल्यावर भाषांतरातील चुका स्पष्टपणे लक्षात येणे
    एका सत्संगात विदेशी भाषांच्या समन्वयाची सेवा शिकण्याच्या दृष्टीने मी संगणकावर मुद्रितशोधनाच्या संदर्भातील काही सूत्रे पडताळण्याचा प्रयत्न करत होते. ही सेवा करतांना मला त्रास होऊ लागल्याने बराच काळ मला संगणकाच्या पडद्याकडे पाहूनही काही सुचत नव्हते; परंतु त्याही स्थितीत मी सेवा शिकण्यास उत्साही होेते. मला काहीच जमत नसल्याने मी माझ्या सहसाधकांचा वेळ वाया घालवत आहे, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, कर्ता-करविता तूच आहेस. त्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांवर तुझे नियंत्रण असू दे आणि माझ्या सहसाधकांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी ही सेवा मला शीघ्रतेने शिकता येऊ दे. अकस्मात् संगणकाच्या पडद्यावरील लिखाणात पालट करण्याची आवश्यकता असलेल्या ३ सूत्रांंकडे माझे लक्ष गेले. माझ्या बुद्धीला ती सूत्रे नीट समजत नव्हती; परंतु अंतर्मनाला काहीतरी चूक असल्याचे जाणवत होते. श्रीकृष्णाने या लिखाणातील चुकांकडे माझे लक्ष वेधले आहे, तर मला त्यातील इतर बारकावेही तोच शिकवेल, असा भाव ठेवून मी शांतपणे विचार करू लागले. काही वेळातच त्या भाषांतरातील चुका माझ्या लक्षात आल्या.

एस्.एस्.आर्.एफ्च्या माध्यमातून साधनेला आरंभ होण्यासंदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

१. साधिकेला रात्री जाग येणे, त्या वेळी खोलीत पांढरा कुर्ता-पायजामा 
घातलेली व्यक्ती दिसणे आणि त्या व्यक्तीभोवती पांढरे वलय दिसणे
      एप्रिल २०११ मध्ये मी एस्.एस्.आर्.एफ्च्या संपर्कात आले. एस्.एस्.आर्.एफ्मध्ये येण्यामागे एक घटना घडली - एप्रिल २०११ मध्ये एकदा रात्री झोपले असता मला जाग आली. त्या वेळी मला पांढरा कुर्ता-पायजमा घातलेली एक व्यक्ती खोलीत उभी असलेली दिसली. तिच्याभोवती पांढरे वलय होते. माझ्याकडे पाहून त्या व्यक्तीने स्मित केले आणि ती अदृश्य झाली. मला त्या वेळी चांगले वाटले. मी घड्याळात पाहिले असता पहाटेचे ३.३० वाजले होते. मला वाटले, हा भास असावा; म्हणून मी पुन्हा झोपले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या घरामध्ये ॐकार ऐकू येणे

१. आधुनिक वैद्या (सौ.) रश्मी नल्लादारू
१ अ. वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी अती अस्पष्ट सूक्ष्म आवाज ऐकू येणे, सेवेला किंवा उपायांना बसल्यावर ऐकू येणारा तो आवाज घरकाम करतांना ऐकू न येणे : मी रामनाथी आश्रमातून घरी परत आल्यापासून, म्हणजे जानेवारी २०१५ पासून आमच्या वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी मला सूक्ष्म आवाज ऐकू येत आहे. तो आवाज अती अस्पष्ट असल्यामुळे तो कसला आहे ?, हे मला ओळखता आले नाही. काही आठवड्यांनंतर तो आवाज मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. अधिकतर तो आवाज मी संगणकावर टंकलेखन करत असतांना किंवा उपायांना बसले असतांना ऐकू येतो. काही वेळा माझ्या मनात विशेष विचार नसून मी एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातांनाही मला तो आवाज ऐकू येतो. इतर घरकाम करतांना मला तो आवाज ऐकू येत नाही.

एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. कार्ल बारवित्स्की यांना श्रीयंत्राकडे पाहून सोनेरी प्रकाश जाणवणे आणि तो मस्तकात प्रवाहित होऊन उबदार वाटणे

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या अनुभूतीबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे ?
      श्रीयंत्राकडे पहाण्याआधी मला चंदनाचा सुगंध लहरींच्या स्वरूपात येत असल्याचे जाणवले. त्यानंतर श्रीयंत्राकडे एकटक पाहिल्यावर त्या ठिकाणी सोनेरी रंगाचा प्रकाश जाणवला. हा प्रकाश माझ्या मस्तकात प्रवाहित होऊन मला उबदार वाटत होते. त्यानंतर मला शब्द ऐकू आले, काळजी करू नको, हे यंत्र निश्‍चित कार्य करेल ! - श्री. कार्ल बारवित्स्की, युरोप (९.८.२०१५)

हिटर लावण्याचा कंटाळा आल्याने थंडी वाजत असतांनाही नामजपाला बसणे, त्या वेळी मनात येणारे अनावश्यक विचार न्यून होण्यासाठी पू. संदीपदादांनी सांगितल्यानुसार ॐ चा जप करू लागल्याने हळूहळू थंडी अल्प होऊन काही वेळाने थंडी वाजेनाशी होणे

     ३.२.२०१५ या दिवशी मी सकाळी नामजप करत होते. तेव्हा अकस्मात मला पुष्कळ थंडी वाजू लागली. अमेरिकेत थंडी अधिक असल्याने हिटर (खोलीतील हवा गरम करण्याचे विजेचे यंत्र) लावावे लागते. नामजपातून उठून यंत्र चालू करण्याचा मला कंटाळा आल्याने थंडी वाजत असतांनाही मी नामजप चालूच ठेवला; मात्र आध्यात्मिक कारणामुळे माझ्या मनात येणार्‍या अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढल्याने मी नामजप करू शकत नव्हतेे. त्याच वेळी अनावश्यक विचार न्यून होण्यासाठी ॐ या बीजमंत्राचा जप लाभदायक ठरतो, असे पू. संदीपदादांनी (पू. संदीप आळशी यांनी) सांगितलेले मला आठवले. त्याप्रमाणे मी ॐ चा जप चालू केला. हळूहळू मला वाजणारी थंडी अल्प होऊन काही वेळाने मला थंडी वाजेनाशी झाली. या अनुभूतीवरून ॐ या मंत्राचे सामर्थ्य माझ्या लक्षात आले. पूर्वीच्या काळी स्वेटर, जॅकेट, कोट इत्यादींसारखे गरम कपडे आणि खोलीतील हवा गरम करणारी यंत्रे नव्हती, तरीही लोक पुष्कळ थंडी असतांनाही केवळ नामजपाच्या सामर्थ्यावर टिकून राहू शकत होते, याची मला निश्‍चिती पटली.
- सौ. शरण्या देसाई, अमेरिका

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता ।
लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ
: दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मातृदेवो भव ।
पितृदेवो भव ।
                                           - (तैत्तिरीयोपनिषद्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २)
     म्हणजे आई आणि वडील यांना देव मानावे, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती गरज सरो वैद्य मरो । अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१२.२०१४)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

आतंकवाद्यांचे प्रबोधनकर्ते !

     गाढवासमोर गीता वाचून उपयोग नसतो, हे बहुधा महाराष्ट्र पोलिसांना ज्ञात नसावे. सध्या देशात विशेषत: महाराष्ट्रात आय.एस्.आय.एस्.चा जिहादी आतंकवादी सापडला नाही, असा दिवस जात नाही. इतकी भीषण परिस्थिती असतांना या आतंकवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून आपल्याकडे आजतरी ठोस धोरण अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. धोरण असलेच, तर ते आतंकवाद्यांचे प्रबोधन करण्याचे असावे कि काय, असे महाराष्ट्र पोलिसांच्या सध्याच्या भूमिकेवरून कुणालाही वाटेल !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn