Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उज्जैन येथे स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्च्यावर धर्मांधांकडून दगडफेक !

 • हिंदूंच्या धार्मिक उत्सवांमध्ये दंगल घडवून त्यांच्या आनंदावर विरजण पाडण्याचा धर्मांधांचा नेहमीचाच डाव असतो. त्यामुळे खरे उत्सव साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
 • महाकाल मंदिराच्या परिसरातील मांसविक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी काढला होता मोर्चा !
 • हॉटेल आणि दुकाने यांची तोडफोड !
 • परिसरात तणाव
 • दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल !
उज्जैन - महाकाल मंदिराच्या परिसरातील मांसविक्रीवर बंदी आणण्यासाठी काढण्यात आलेल्या स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्च्यावर धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच त्यानी दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडून दंगलसदृश वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कवींद्र कियावत आणि पोलीस अधीक्षक एम्.एस्. वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन लोकांना शांत केले. या प्रकरणी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. खबरदारी म्हणून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

डॉ. झाकिर नाईक यांचा कार्यक्रम रहित करावा !

हिंदु जनजागृती समितीची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डावीकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देतांना श्री. मोहन गौडा (उजवीकडून दुसरे)
     बेंगळुरू (कर्नाटक) - डॉ. झाकिर नाईक यांचा मंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रहित करावा, याकरता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ डिसेंबर या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटून निवेदन देण्यात आले. या वेळी "मी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.(म्हणे) अटकसत्रांमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढीस लागली !

तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांचा जावईशोध !
       मुसलमानांमधील सामाजिक-आर्थिक मागासलेपण तसेच आतंकवादी आक्रमणानंतर पोलीस राबवत असलेले अटकसत्र आदी गोष्टींमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढत आहे, असा जावईशोध तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांनी लावला. गुप्तचर विभागाने भूज येथे आयोजित केलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या आय.एस्.आय.एस्.चा धोका आणि देशातील सुरक्षा या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

अमेरिकेतील हॉलीवूड चित्रपटात खलनायकाला भगवान श्रीकृष्ण संबोधून श्रीकृष्णाचे विडंबन !

हिंदू संघटित नाहीत; म्हणूनच विदेशातही हिंदूंच्या देवतांचे विडबन करण्याचे धाडस करण्यात येते ! 
     अमेरिकेत लवकरच प्रदर्शित होणार्‍या एक्स-मेन मालिकेतील एक्स-मेन अपोकलीप्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात चित्रपटाच्या खलनायकाच्या तोंडी माझ्या पूर्वजन्मात मला आरए, कृष्ण, याहवेह या नावांनी संबोधत होते, असा संवाद दाखवण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण जगातील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत आहे. जगात श्रीकृष्णाची सहस्रो मंदिरे आहेत. तेथे त्यांची प्रतिदिन पूजा-अर्चा होते. स्वतःचा गल्ला भरण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे चुकीचे आहे. या संवादामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून हे संवाद वगळण्यात यावे, अशी मागणी अमेरिकेतील राजन झेद यांनी केली आहे.

ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात उभे रहायला हवे ! - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई - समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास, बुरसटलेले विचार असा समज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे रहावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ डिसेंबरला येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनात केले.
पूर्वी इंग्रजांनी पुरोगामी आणि आधुनिकता यांचे चित्र निर्माण केले, तर स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी अन् प्रतिगामी अशी नावे चिकटवून समाजात अपसमज निर्माण केला. समाजकारण आणि राजकारण यांत स्वत:चे प्रभुत्व नाही, अशांनी काही क्षेत्रांतील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरवण्याचा मोठा प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर येथे 'आय.एस्.आय.एस्.' मध्येे सहभागी होण्यासाठी जाणार्‍या तेलंगणच्या तीन तरुणांना अटक

आतंकवादाने पोखरलेला भारत ! 'आय.एस्.आय.एस्.' या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारे धर्मांध तरुण वारंवार सापडणे, ही अशा तरुणांचे मने वळवण्याचा हास्यास्पद प्रयोग करणार्‍या आतंकवादविरोधी पथकाला चपराक ! असे धर्मांध कधीतरी देशप्रेमी होऊ शकतात का ?
   नागपूर - आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी 'इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया' (आय.एस्.आय.एस्.) मध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍या तीन तरुणांना नागपूर विमानतळावर अटक केली. अब्दुल वसीम, उमर हसन फारूखी आणि माज हसन फारूख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते तिघेही तेलंगणचे रहिवासी आहेत. भारतातून मोठ्या संख्येने तरुण आय.एस्.आय.एस्.मध्ये जात असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत दोन तरुणांना आतंकवादविरोधी पथकाने परत आणले आहे.

भारतीय खासदारांना मिळत आहे राजेशाही वेतन आणि भत्ते !

 • प्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना 'वेतनवाढ नको', असे एकतरी खासदार सांगतो का?
 • तरीही वेतनवाढीची शिफारस
 • 'लोकसभेत ठरावाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हात वर करणे किंवा निषेध दर्शवण्यासाठी आरडा-ओरडा करणे, या व्यतिरिक्त खासदार काय करतात ? त्यांना अडीच लक्ष रुपयांहून अधिक पगार आणि विविध भत्ते एवढ्यासाठीच का ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१२.२०१५)
नवी देहली - भारतीय खासदारांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सोयीसुविधा ख्रिस्ताब्द २०१०मध्ये ठरवण्यात आल्या होत्या. खासदारांना मिळणारे राजेशाही वेतन, भत्ते आणि प्रस्तावित वाढ पुढीलप्रमाणे आहे.
खासदारांचे मासिक वेतन अन् भत्ते आणि प्रस्तावित वाढ

(म्हणे) मस्तानीला कुणी बघितले ?

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी 
यांच्याकडून बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे समर्थन
     बाजीराव मस्तानी या चित्रपटातील एका गाण्यावर प्रचंड आक्षेप नोंदवण्यात आला; मुघल-ए- आझम या चित्रपटातील अनारकली या चित्रपटातही प्यार किया तो डरना क्या, हे गाणे होते. या अनारकलीला कुणी बघितले नव्हते, मग मस्तानीला तरी कुणी बघितले ? एका कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे आणि त्याकडे कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे, अशी भूमिका निहलानी यांनी मांडली. (कलेच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करण्याला निहलानी मान्यता देतात कि काय ? - संपादक) 

तेलंगण राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून आयुत चंडी यज्ञास आरंभ !

यज्ञ ५ दिवस चालणार !
      राज्यातील जनतेचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आयुत चंडी यज्ञात असतांना ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी मेजवानी, कपडे वाटप यांसारखे वेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण काय ?
     भाग्यनगर - तेलंगण राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत आयुत चंडी या यज्ञास आरंभ झाला आहे. चंद्रशेखर राव यांचे गाव असलेल्या इर्रावेली (जि. मेडक) येथे या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञासाठी तेलंगण, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपाल, तसेच आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कालावधीत दक्षिण भारताच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही उपस्थित रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेलंगण राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे, या उद्देशाने हा यज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर राव यांनी दिली.

राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली श्री नटराज मंदिराचे पावित्र्य भंग करू नका ! - मंदिराचे पुजारी

      चेन्नई - चिदंबरम् येथील श्री नटराज मंदिराच्या आवारात बांधकाम करण्याच्या सूत्रावरून वाद निर्माण झाला आहे. इतिहासकार आणि पुराणवस्तूशास्त्रज्ञ यांनी हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीविषयी मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या दीक्षित पुजार्‍यांनी संशय व्यक्त केला आहे. आपल्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली मंदिराचे पावित्र्य भंग करू नका, असे दीक्षित यांनी म्हटले आहे. (मंदिरे राष्ट्रीय स्मारक झाल्यावर तेथे श्रद्धेचे महत्त्व न्यून होऊन ते पर्यटनासह पैसा कमवण्याचे एक साधन बनते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धर्महानी होते, हे लक्षात घ्या ! - संपादक)

चेन्नई येथे दत्तजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्ग

     चेन्नई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलाथूर, चेन्नई येथे वीर सावरकर मॅट्रिक स्कूलमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने नुकतेच धर्मशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मशिक्षण वर्गाचा प्रारंभ प्रार्थनेने करण्यात आला. या वेळी दत्तजयंती उत्सव आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यावर तमिळ भाषेतील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन केले. या धर्मशिक्षण वर्गाला कोलाथूरमधील जिज्ञासू उपस्थित होते. 

रामायण, महाभारत इतिहास नव्हे, तर जीवन समृद्ध करणारे धर्मग्रंथ ! - सखाराम महाराज पाटील

    नगर, २६ डिसेंबर (वार्ता.) - रामायण आणि महाभारत म्हणजे झालेला इतिहास नसून ते जीवनाची वस्तूस्थिती सांगणारे ग्रंथ आहेत. रामायण हे कौटुंबिक जीवन, तर महाभारत हे सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन रामायणाचार्य सखाराम महाराज पाटील यांनी केले. दत्तजयंतीनिमित्त भुतकरवाडीतील ताळे मळ्यामध्ये श्री सद्गुरु दत्तसेवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन-कीर्तन सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 
    ते पुढे म्हणाले, "अध्यात्म हे मुख्य जीवन, तर विज्ञान उपजीवन आहे. अध्यात्मामुळे आयुष्य आणि भविष्य समृद्ध होते. त्यामुळे अध्यात्माकडे वळण्याची आवश्यकता आहे." नगरसेवक अनिल बोरुडे आणि हनुमान भूतकर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मुकुंद देवळालीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांचा घोटाळेबाजाचा इतिहास आहे ! मुख्यमंत्री


 • राज्यातील गुन्हेगारीत ६.९४ टक्के घट !
    नागपूर, २६ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात केवळ १५० कोटी रुपये इतक्या किमतीचा तुरडाळीचा साठा शिल्लक होता. तुरडाळीचे दर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अल्प असतांनाही विरोधकांनी ४ सहस्र कोटी रुपयांचा तुरडाळीचा साठा राहिल्याची चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तत्कालीन आघाडीचे शासन हे घोटाळेबाज आहेत. घरगुती आणि वैयक्तिक कारणामुळे काही घटना नागपूर येथे घडल्यानंतर नागपूर येथे गुन्हेगारी वाढल्याचा चुकीचा प्रचार सर्वत्र करून माझी अपकिर्ती केली गेली. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात गुन्हेगारीमध्ये ६.९४ टक्के घट झाली आहे. नागपूर शहर कधीच 'क्राईम कॅपिटल' होऊ शकणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांचा घोटाळेबाजाचा इतिहास आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच येथे केला. विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

झारखंडमध्ये पोलिसांकडून नक्षलवाद्यांची स्फोटके जप्त

नक्षलवादग्रस्त भारत ! 
     लातेहार (झारखंड) - झारखंडमधील लातेहार जंगलातून पोलिसांनी ५९ आधुनिक स्फोटके जप्त केली आहेत. नुकतेच पोलिसांनी मिथिलेश यादव नावाच्या नक्षलवाद्याला अटक केली होती. त्याने पोलिसांना स्फोटकांची माहिती दिली. त्यानुसार केंद्रीय पोलीस दल आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून स्फोटके शोधून काढली. पोलिसांनी ही स्फोटके स्थळावरच निकामी केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुप बिर्थ्रे यांनी दिली.

सनातनविरोधी षमड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंना स्वरक्षणासाठी संघटनाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे महाकाल मंदिराच्या परिसरातील मांस विक्रीवर बंदी आणण्यासाठी काढण्यात आलेल्या स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्चावर धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच दुकानांची तोडफोड केली.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ujjain me Swarnim Bharat manch ke rallypar dharmandhonka pathrao aur dukanoki todphod.
- Aise akraman Hinduonpar kabtak honge ?

जागो ! : उज्जैन में स्वर्णिम भारत मंच के रॅलीपर धर्मांधोंका पथराव और दुकानोंकी तोडफोड ! - एैसे आक्रमण हिंदूआपर कबतक होंगे ?

३१ डिसेंबरच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे येथे निवेदने आणि मुंबई येथे फेरी

पुणे येथे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन
     पुणे - हिंदु धर्मानुसार गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नववर्षारंभ होतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे १ जानेवारी हा नववर्षारंभ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री महिलांची छेड काढणे, दारू पिऊन गाड्या चालवणे, अवैधरित्या रात्री उशिरापर्यंत मेजवान्या करणे आदी अपप्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त होणारे हे अपप्रकार रोखले जावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी पोलीस-प्रशासनाला निवेदने देण्यात आली. 
पुणे येथे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांना निवेदन
     पुण्याचे पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनातील सूत्रे चर्चेसाठी घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. पुण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, विनायक बागवडे, राजू निंबळे उपस्थित होते. 
१. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांना निवेदन दिले असता ३१ डिसेंबरच्या निमित्त सामाजिक स्थिती चांगली राखण्यासाठी काळजी घेऊ, असे ते म्हणाले. या प्रसंगी त्यांना बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या विरोधातही निवेदन देण्यात आले होते. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. धनाजी शिंदे, धर्माभिमानी धनाजी गाळवे, संजय भोसले, समितीचे संदेश कदम उपस्थित होते. 
पुणे येथे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र जाधव
२. भारती विद्यापिठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेंद्र चव्हाण आणि सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशिकांत शिंदे यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. दोघांनीही अपप्रकारांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र दीक्षित, समितीचे सर्वश्री चंद्रशेखर घोलप, नीलेश गोरे, योगेश डिंबळे उपस्थित होते. या शिवाय दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर यांनाही निवेदने देण्यात आली. 
अंधेरी येथील प्रबोधन फेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी
३. नर्‍हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील २ वर्गांमध्ये ३१ डिसेंबर साजरा न करता हिंदु धर्मानुसार गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी दोन्ही वर्गांमध्ये मिळून सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. 
४. याशिवाय कोथरुड पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाणे, या ठिकाणीही निवेदने देण्यात आली. 
५. प्रबोधनपर हस्तपत्रके, भित्तीपत्रके, शाळा, महाविद्यालयांमध्ये निवेदने देणे, कोपरा बैठका घेणे, प्रबोधन कक्ष उभारणे आदी माध्यमातूनही व्यापक स्तरावर प्रबोधन चळवळ राबवण्यात येत आहे. 

मटका अड्ड्यावर धाड : नगरसेवकावर गुन्हा नोंद

सांगली, २६ डिसेंबर (वार्ता.) - सांगली शहर पोलिसांनी मटका अड्ड्यावर धाड घालून बुकी मालक नगरसेवक धीरज अशोक सूर्यवंशी आणि अशोक रामकृष्ण सूर्यवंशी या दोघांसह चौघांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. (अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांकडून जनहिताच्या कामांची काय अपेक्षा करणार ? - संपादक) यात धीरज आणि अशोक हे दोघेही पसार झाले आहेत. २३ डिसेंबरला रात्री शहर पोलिसांच्या पथकाने मटका अड्डयावर धाड घालून संजय महाजन आणि जितेंद्र पळसे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २२ सहस्र ९४२ रुपये जप्त करण्यात आले. या दोघांनी मटका बुकी म्हणून धीरज आणि अशोक यांची नावे घेतल्याने पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा प्रविष्ट केला आहे.

संभाजीनगरमध्ये चौकाचे 'टिपू सुलतान' असे नामकरण करण्याचा धर्मांधांचा डाव शिवसैनिकांनी उधळला !

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानचे नाव एका चौकाला देण्याचा डाव उधळवून लावणार्‍या शिवसैनिकांचे अभिनंदन ! असे धाडस केवळ प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच करू शकतात; म्हणून हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो ! 
    संभाजीनगर - गारखेडा परिसरात हिरवा झेंडा उभारून एका चौकाचे टिपू सुलतान असे अनधिकृतपणे नामकरण करणार्‍या मुसलमानांचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला. या चौकातील हिरवा झेंडा काढण्यात आला असून नामकरण करण्यात आलेला फलकही हटवण्यात आला आहे. 
१. गारखेडा परिसरातील दुर्गेशनगर येथे काही मुसलमानांनी २३ डिसेंबर या दिवशी सकाळी एका चौकात हिरवा झेंडा उभारून त्याचे नामकरण टिपू सुलतान चौक असे करण्याचा कट रचला होता. 

द्रोह करणार्‍यांना भक्तीऐवजी 'अहंकार' सिद्ध करायचा आहे ! - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

श्री शनिशिंगणापूर देवस्थान आणि सोळशी (सातारा) येथील शनि मंदिर येथील चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश केल्याचे प्रकरण 
      पुणे, २६ डिसेंबर (वार्ता.) - जे लोक बंड करून दर्शनाला जातात, त्यांची भक्ती अल्प आणि अहंकार अधिक आहे. त्यात त्यांना भक्तीऐवजी अहंकार सिद्ध करायचा आहे. त्यांना श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी काही देणे-घेणे नाही. खरा शनिभक्त असे कधीच करणार नाही. ते भक्त नसून बंडखोर आहेत. भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात 'अद्रोह' हे दैवी संपत्तीचे लक्षण म्हटले आहे. हे सर्व लोक द्रोह किंवा विद्रोह करतात, ती असुरी संपत्ती आहे, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी केले. 

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण थांबवण्यासाठी आणखी दोन अधिकार्‍यांना धमकी दिल्याचे उघड

    पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण थांबवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना जीवे मारण्यासाठी धमकी दिल्यानंतर आता आणखी दोन अधिकार्‍यांना धमकीचे लघुसंदेश मोहिते दाम्पत्याने पाठवले असल्याचे पोलीस अन्वेषणात पुढे आले आहे. या दाम्पत्याने लघुसंदेशात ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती, तसेच आतापर्यंत १५ खून केले असल्याचेही नमूद केले होते.

भगवद्गीता हाच क्रांतीकारकांचा आदर्श ! - दुर्गेश परुळकर

डोंबिवलीत गीता अभ्यास मंडळाची स्थापना
डोंबिवली, २६ डिसेंबर (वार्ता.) - गीता हाच क्रांतीकारकांचा आदर्श असल्याने ते यशस्वी झाले आणि सुळावर जातांनाही त्यांच्या हातात गीताच होती. गीता आचरणात आणल्यामुळेच सावरकर इंग्रजांना भारी पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील गीता आणि श्रीकृष्ण चरित्र यांच्याच आदर्शातून अफझल खान वधासारखे अनेक पराक्रम केले; म्हणूनच गीतेचे महत्त्व ओळखून इग्रजांनी ती शाळा-महाविद्यालयांतून शिकवण्यावर बंदी घातली आणि दुर्दैवाने आजही शाळा महाविद्यालयांतून गीता शिकवायला बंदी केली जात आहे. हे असे असेल, तर आम्ही बाहेर दुसरे विद्यापीठ उघडू आणि त्यातून गीता शिकवू; असे घणाघाती प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी केले. डोंबिवलीत 'ॐ गीता अभ्यास मंडळा'च्या स्थापनेच्या निमित्त श्रीगणेश मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भूकंपाने उत्तर भारत हादरला !

     नवी देहली - अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यासह उत्तर भारतात ठिकठिकाणी २५ डिसेंबर या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी जाणवलेल्या या धक्क्यांमुळे लोकांनी घराबाहेर पडून रस्त्यावर धाव घेतली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या माहितीनुसार हे धक्के ६.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असून या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ भूभागापासून १८६ किलोमीटर खोलात होता.

शिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख आणि अंबरनाथचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांची हत्या

लोकप्रतिनिधीची हत्या होणे, हे राज्यातील कायदा सुव्यवस्था संपल्याचे लक्षण होय ! 
    अंबरनाथ, २६ डिसेंबर - शिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख आणि अंबरनाथचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञात आक्रमकांनी प्राणघातक आक्रमण करून त्यांची हत्या केली. ही घटना मोरीवली या त्यांच्या घराजवळ झाली. ते एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले होते. गुंजाळ हे बांधकाम आणि मजूर पुरवठा करण्याचा व्यवसाय करायचे. ते व्यवसायानिमित्ताने अंबरनाथला स्थायिक झाले होते. 

आज जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : शिवतीर्थ मैदान, न्यायालय चौक, 
दिनांक : २७ डिसेंबर २०१५, 
वेळ : सायंकाळी ५.३०

भ्रष्टाचार थांबवण्याची हमी द्या, मगच सातवा वेतन आयोग द्या !

केवळ वेतन वाढवल्यामुळे भ्रष्टाचार थांबेल, हा भ्रम आहे. त्यासाठी 
कर्मचार्‍यांची वृत्ती पालटणे आवश्यक आहे !
उच्च न्यायालयाची भूमिका
     नागपूर - शासकीय कर्मचार्‍यांकडून आधी भ्रष्टाचार थांबवण्याची हमी घेऊन नंतरच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य ठरेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्या. अरुण चौधरी यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचारप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता सागर शरद मानकर यांचा जामीन फेटाळतांना न्यायालयाने ही भूमिका स्पष्ट केली. मानकर यांच्यासह इतर अधिकार्‍यांवर कंत्राटदारांशी संगनमत करून शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील पाणी पुरवठा योजनेच्या कामात ३५ लाख ६६ सहस्र ३१२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने '३१ डिसेंबर प्रबोधन' फेरी !

दिनांक : २७ डिसेंबर, रविवार 
स्थळ : चिंचोळी तलाव, जुईनगर, मुंबई 
वेळ : दुपारी ४ 
स्थळ : भारतमाता चित्रपटगृहासमोर, लालबाग, परळ, मुंबई वेळ : दुपारी ४.३०
संपर्क : ९९२०२०८९५८
स्थळ : भोसला मिलिटरी स्कूल मेन गेट, कॉलेज रोड, नाशिक 
वेळ : दुपारी ३.३० ते ४.३०
संपर्क : ९४०४९५६४८१
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे (प.) 
वेळ : दुपारी ४.३० वा.
संपर्क : ९३२४८६८९०६
 हिंदूंनो, या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

पाश्‍चात्त्यांचे नववर्ष साजरे करण्यासाठी दोन आरत्या न करता शिर्डी येथील श्री साई मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर उघडे ठेवणार !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

शिर्डी, २६ डिसेंबर - श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री साईबाबांच्या दर्शनाचा भाविकांना लाभ मिळावा आणि होणार्‍या संभाव्य गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने समाधी मंदिर ३१ डिसेंबर या दिवशी दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती आणि १ जानेवारी या दिवशीची काकड आरती होणा(१ जानेवारी हा हिंदूंचा नवीनवर्षारंभ नाही. तरीही पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे तो असल्याचे गृहीत धरून होणार्‍या संभाव्य गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन आरत्या रहित करणे, हा धर्मद्रोह नव्हे का ? - संपादक) र नाही, अशी माहिती कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली.
शिर्डी महोत्सवाच्या या कालावधीत पायी पालखीने येणार्‍या भाविकांनाही रांगेतून दर्शनास सोडण्यात येणार आहे.

आता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील लोकप्रतिनिधींनी वेतनवाढ मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! 'यथा राजा तथा प्रजा' ही म्हण सार्थ करतील !

संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना 'निवृत्तीवेतना'चाही लाभ मिळणार आहे.

५ वर्षांच्या नोकरीनंतर कोणाला निवृत्तीवेतन मिळत नाही, तर खासदारांनाच का ?

संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार ५ वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणार्‍या 'निवृत्तीवेतना'च्या रक्कमेत वाढ करण्याचा विचार आहे.

धुळे येथे सत्यशोधक (?) संघटनेकडून मनुस्मृति ग्रंथाचे दहन

ग्रंथाचे दहन करणे, ही तथाकथित पुरोगाम्यांची 'असहिष्णुता' नव्हे का ? असे ग्रंथाचे दहन करून त्यातील विचार संपणार नाहीत, हे न कळणारे तथाकथित सत्यशोधकवादी ! 
     धुळे, २६ डिसेंबर - शहरातील सत्यशोधक महिला सभा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंच, सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक युवा आणि विद्यार्थी संघटना यांनी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले. डॉ. आंबेडकर यांनी महाड येथे २५ डिसेंबर १९२७ या दिवशी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले होते. म्हणून या दिवशी या ग्रंथाचे दहन करण्यात आले.

पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

आता पुरोगामी मंडळी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करतील का ? 
     पुणे, २६ डिसेंबर - पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांची मुले अमित बागुल आणि कपिल बागुल यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय परिचारिकेने तक्रार केली असून वर्ष २०११ ते वर्ष २०१५ या कालावधीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. बागुल यांनी पीडित महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले असून ४ वर्षांपूर्वी त्या महिलेच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली असून न्यायालयात खटला चालू असल्याचे सांगितले आहे.

लोणावळा (जिल्हा पुणे) येथे ख्रिसमसच्या दिवशी पोलिसांच्या आदेशाला हरताळ

पोलिसांविषयी वाटणारे भय संपत चालले आहे, असे म्हटल्यास वावगे काय ? 
     लोणावळा, २६ डिसेंबर - मौजमजा करण्याच्या नावाखाली येथील टायगर आणि लॉयन्स या पर्यटन ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी तरुणांनी मद्यपान करून रस्त्यावर धिंगाणा घातला होता. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यानंतर बंद करणार, असे आदेश पोलिसांनी २४ डिसेंबर या दिवशी दिले होते. २५ डिसेंबर या दिवशी काही तरुणांनी मद्य पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला आणि पोलिसांच्या या आदेशाला पहिल्याच दिवशी हरताळ फासला. (पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रस्त्यावर मद्यपान करून धांगडधिंगा घालण्याचे धाडस या तरुणांमध्ये झाले, याचा अर्थ पोलिसांचा समाजातील अपप्रवृत्तींवरचा वचक संपत चालला आहे, हे स्पषट होते. असे निष्क्रीय पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? - संपादक) या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा दोन मद्यपींना अटक केली आहे. 

भारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम अन् नागालॅण्ड राज्ये !

श्री. रमेश शिंदे
    या लेखाचा मथळा वाचून आपल्याला आश्‍चर्य वाटले असेल की, भारतासारख्या सार्वभौम देशमातील राज्यांनाच परदेश म्हटले आहे ? होय, खरेच आहे ते ! याचा साक्षात् अनुभव ईशान्य भारताच्या दौर्‍यात घेतल्यानेच हा मथळा येथे दिला आहे अन् खात्री आहे की, हा लेख वाचून झाल्यावर आपलीही तशी खात्री होईल !
लेखक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतांना आला धक्कादायक अनुभव !
     गत वर्षी आसामच्या दौर्‍यावर गेलो असतांना नागालॅण्ड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत जायचे झाल्यास विशिष्ट परवाना काढावा लागतो, त्यानंतरच त्या राज्यांत प्रवेश करता येतो, असे केवळ ऐकले होते.

इतिहासाला कला म्हणून पालटण्याचा प्रयत्न केलात, तर ती एक विकृती बनते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चित्रपट बाजीराव मस्तानी

      इतिहास हा इतिहासच असतो. या इतिहासाचे सादरीकरण जसेच्या तसे करणेच आवश्यक असते. इतिहासाला पालटण्याचा प्रयत्न केल्यास ती एक विकृतीच बनते.
१. इतिहास हा जनसंस्कृतीने प्रत्यक्ष जगलेला असल्याने त्याला 
कलेच्या नावाखाली अवास्तव बनवाल, तर काळाला ते मान्य होणार नाही !
     इतिहास म्हणजे प्रत्यक्ष वास्तव. इतिहास हा जनसंस्कृतीने प्रत्यक्ष जगलेला असल्याने त्याला कलेच्या नावाखाली अवास्तव बनवले, तर काळाला ते मान्य होत नाही; कारण इतिहासाचा काळ हाच प्रत्यक्ष साक्षीदार असतो. कलेच्या नावाखाली तुम्ही इतिहासाचे भांडवल बनवायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला समाजविरोधाला नक्कीच सामोरे जावे लागते आणि हेच बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत घडले.

३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच !

हिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा ! 
    खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. या दिवशी काय काय करायचे, नवीन काय खरेदी करायचे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, सुटीसाठी कोणत्या ठिकाणी जायचे, याची सिद्धता ते जोमाने करतात. आजही मुख्य शहरांपासून ते ज्या ठिकाणी वीज आणि पाणीसुद्धा नियमित येत नाही, अशा गावागावांमध्येही हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो. पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्‍चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून त्यांना भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान हिंदूंना राहिले नाही. याच गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेखप्रपंच.

तिरुपती येथील श्री बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर लक्षात आलेले भाविकांचे अयोग्य वागणे आणि तेथील मंदिर व्यवस्थापनाची दयनीय स्थिती !

१. श्री बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांना पुष्कळ वेळ रांगेत उभे रहावे लागणे
    ११.११.२०१५ या दिवशी मी तिरुपती येथे श्री बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे दर्शनासाठी न्यूनतम तीन ते चार घंटे किंवा कधी-कधी दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. रांगेत उभे रहाणार्‍यांचे गट बनवून त्यांना काही काळ पहिल्या खोलीत थांबवले जाते आणि नंतर त्या भाविकांना दुसर्‍या खोलीत नेले जाते. अशा प्रकारे शेवटी श्री बालाजीचे दर्शन होते. 

एन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान ! विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख जणेश्‍वर?

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
     राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलासह संत परंपरेचा अवमान करणारा उल्लेख करण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल, संत ज्ञानेश्‍वरमाऊलींचा उल्लेख जणेश्‍वर, संत चोखामेळा यांचा उल्लेख चोखमेला, तर संत सखुबाई यांचा उल्लेख सक्कूबाई असा चुकीचा आणि एकेरी केला आहे. या विरोधात संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता ७ वीच्या हमारे अतीत-२ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०८ वर या घोडचुका करण्यात आल्या आहेत.

पोलिसांचा अजब न्याय !

      टिपू जयंतीवरून कर्नाटकमधील मडिकेरी येथे हिंदुत्ववादी निषेध आंदोलन करत असतांना टिपू समर्थकांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत विश्‍व हिंदु परिषदेचे डी.एस्. कुट्टप्पा यांचा मृत्यू झाला होता; मात्र पोलिसांनी कुट्टप्पा पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी पळत असतांना खाली पडून मरण पावले, अशी लंगडी सबब देऊन त्यांचा मृत्यू हा एक अपघात होता, असे म्हटले आहे.

हे आहे काँग्रेसचे खरे स्वरूप !

     संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या माध्यमातून बाजीराव पेशवा घराघरात पोहोचत आहेत. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक भन्साळी यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने लवकरात लवकर गौरवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्याचा उदोउदो करणारी हिंदुद्रोही विदेशी प्रसारमाध्यमे !

     कर्नल सिटीव्हेंट रेबुका (Col. Sitivent Rebuka) हा फिजी हिंदूंचे बलपूर्वक ख्रिस्तीकरण करणारा हिंसक रोबोट कसा सुधारणावादी (progressive) आहे, ते दिग्दर्शित करणारी २० कडव्यांची इंग्रजी कविता एका फडतुस व्याख्यात्याने लिहिली आणि ती स्टेटस्मन या विख्यात वृत्तपत्राने मुखपृष्ठावर आकर्षक पद्धतीने छापली. प्रसारमाध्यमांनी त्या कवितेला अमाप प्रसिद्धी दिली. त्यामध्ये सुधारणावादी भारताचा गौरव केला. तो क्षुद्र व्याख्याता आता प्राध्यापक झाला आहे !! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी 
(संदर्भ : मासिक घनगर्जित, एप्रिल २०१२)

इतकी वर्षे शासनाला एवढा मोठा भ्रष्टाचार समजला नाही कि उत्तरदायी भ्रष्टाचारात सहभागी झाले होते ? लेखापाल इत्यादी सर्व उत्तरदायींना तात्काळ आजन्म कारागृहात टाका !

     देहलीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वांद्रे अन् सांताक्रूझ येथील ११० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २२ डिसेंबर या दिवशी धाड टाकून जप्त केली. भुजबळ यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

मुसलमानांकडून ही हुशारी शिका ! आपण आक्रमण करायचे आणि आपणच पोलिसांकडे आधी तक्रार करायची !

     कवठेमहांकाळ येथील सनातनचे साधक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर धर्मांधांनी लोखंडी सळ्यांसह आक्रमण केले. श्री. चव्हाण आणि दुसरे साधक श्री. जाधव पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना दीड घंटा बसवून ठेवले. तक्रार नोंदवून घेतो, असे ते सांगत होते; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नव्हते. त्याच वेळी श्री. चव्हाण यांच्यावर आक्रमण करणारा एक जण डोक्याला पट्टी बांधून आला. या वेळी पोलिसांनी त्याची श्री. चव्हाण यांच्या विरोधातील तक्रार तत्परतेने नोंदवून घेतली. 
       धर्मांध मुसलमानांच्या चोराच्या उलट्या.. ! पोलिसांच्या या तत्परतेला काय म्हणायचे ?

अंनिसचा हिंदुद्वेष आणि ख्रिस्तीप्रेम !

     महाराष्ट्र अंनिसने २४ डिसेंबर २०१५ या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मदर तेरेसा यांच्या संदर्भातील चमत्कारांचे जे दावे केले जातात, त्याला विरोध दर्शवला. असे चमत्कार होणे, हे वैज्ञानिकतेच्या पहिल्या पायरीवरही बसत नाही, असे सांगत मदर तेरेसा यांना मानवतेच्या कार्यासाठी संतपद बहाल केले जाऊ शकते, अशी भूमिका अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
    संत सत्यसाईबाबा यांनीही मानवतेसाठी भरपूर कार्य केले. त्यांच्या त्या अतुलनीय कार्याची दखल अंनिसने कधी घेतली नाही, उलट सत्यसाईबाबांच्या कार्यावर नेहमीच टीका केली आणि त्यांचा द्वेष केला. आज ही अंनिस मदर तेरेसा यांनी केलेल्या मानवतेच्या तथाकथित कार्यासाठी त्यांना संतपद बहाल करण्याच्या निर्णयाविषयी सकारात्मक भूमिका घेत आहे. अंनिसच्या हिंदुद्वेषातून निर्माण झालेले हे ख्रिस्तीप्रेम म्हणायचे का ?

मराठी नियतकालिकांना इंग्रजी विज्ञापन ! तेही शेतकर्‍यांच्या मुलांसाठी ! मराठी दैनिकात इंग्रजी विज्ञापन देणे, हे विज्ञापन देण्याचे कर्मकांड उरकण्यासारखे आहे ! अनेक वर्षे अशी टिपणी लिहूनही प्रशासन अजून चूक सुधारत नाही !

    नुकतेच एका राज्यात कृषी खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. हे विज्ञापन इंग्रजी भाषेत असून शेतकर्‍यांसाठी होते.

सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून शिका !

    राजसत्तेच्या विरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अब्दुल्ला अल् झहर तरुणाचा सौदी अरेबियाच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही क्षणी शिरच्छेद होऊ शकतो. वर्ष २०१२ च्या मार्चमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा तो १५ वर्षाचा होता. 
    भारतात उघडपणे पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत विरोधी घोषणा अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष करणारे भारतीय राज्यकर्ते सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून काही शिकतील का ?

भारतात सर्वत्रच आय.एस्.आय.एस्. चा प्रचार करणारी संकेतस्थळे बंद का केली नाहीत ?

     भारतीय युवकांमध्ये जलदगतीने होणारा आय.एस्.आय.एस्.चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने या संघटनेच्या जिहादी विचारांचा प्रचार करणारी ८० संकेतस्थळे बंद केली आहेत.

निर्भयाच्या पालकांना वार्‍यावर सोडणारे राजकारणी !

     आम्हाला अनेक नेत्यांकडून साहाय्याची आश्‍वासने मिळाली; मात्र आता ते नेते त्यांची आश्‍वासने विसरून गेले आहेत, अशी प्रतिक्रिया अत्यंत अमानुष आणि संपूर्ण देशाला हादरवणार्‍या देहलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

कायद्याचा भावार्थ लक्षात न घेता शब्दार्थाने (वय १८ वर्षे नाही) न्याय देणारी न्यायप्रणाली !

     अत्यंत अमानुष आणि संपूर्ण देशाला हादरवणार्‍या देहलीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन बलात्कारी आरोपीची सुटका करण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार घटनेच्या वेळी सदर बलात्कारी अल्पवयीन होता; म्हणून त्यास सोडण्यात आले.

विज्ञापनातही ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणारे गोवा शासन !

     १९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोवा शासनाच्या वाहतूक खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. या विज्ञापनात झेब्रा क्रॉसिंगवरून मार्ग ओलांडतांना लहान मुलासह एक ख्रिस्ती महिला दाखवली आहे. गोवा हिंदुबहुल राज्य आहे. 

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो 
म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे. 
धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया, मानवाचे आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती अल्प होणार असणे
     ततश्‍चानुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया ।
     कालेन बलिना राजन् नङ्क्ष्यत्यायुर्बलं स्मृतिः ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक १ 
अर्थ : श्रीशुक म्हणतात, परीक्षिता ! बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल.

मुंबई महापालिकेच्या पथकाला साहाय्य न करणारे पोलीस कधी जनतेला साहाय्य करतील का ?

     २६ जानेवारी २०१६ म्हणजे प्रजासत्ताकदिनापर्यंत राज्यातील अनधिकृत फलक काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सर्व पालिका आणि नगरपालिका यांना २६ नोव्हेंबर २०१५ या दिवशी दिला. तसे न झाल्यास पालिकेला उत्तरदायी धरले जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले. कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धमकावण्यात येते आणि पोलीसही हवे ते सहकार्य करत नाहीत, असे प्रामुख्याने मुंबई पालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. 

हिंदूंनो, मंदिराच्या सरकारीकरणाचे महाघातक दुष्परिणाम जाणा !

     नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर ट्रस्टच्या विश्‍वस्तांना कुंभपर्वात रसायन टाकून मंदिराचे स्मशान करू. याचे दायित्व देवस्थानचे राहील, अशा प्रकारच्या धमक्यांची पत्रे ऑगस्ट २०१५ मध्ये आली होती; मात्र त्र्यंबकेश्‍वर विश्‍वस्तांनी ती ३ मासांनंतर उघड केली आहेत.

खुनाच्या जाहीर सुपारीकडे दुर्लक्ष करणारे सरकार, प्रशासन आणि पोलीस !

बिजनौरच्या जमीयत शबबुल इस्लामचे सचिव मौलाना अन्वरलाल हक यांनी हिंदु महासभेचे कमलेश तिवारी यांना मारणार्‍यास ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मागेही चार्ली हेब्दोच्या संपादकाची हत्या करणार्‍यास बहुजन समाज पक्षाचे नेते याकुब कुरेशी यांनी ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. एखाद्या गुंडाला खुनाची सुपारी दिली, तर तो गुन्हा ठरतो; मात्र लाखो रुपयांची जाहीर सुपारी दिली, तर त्याकडे शासन दुर्लक्ष करते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदुत्ववादी अधिवक्त्यांना आवाहन !
हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्त्यव्य करणार्‍या धर्मविरोधकांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या !
अनेक धर्मविरोधक हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत असतात. बर्‍याच वेळा अशी चिथावणीखोर विधाने संबंधित व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण करतात, कधीकधी दंगलींना कारणीभूत ठरतात. धर्मकार्यातील स्वत:चा सहभाग म्हणून अशी चिथावणीखोर विधाने करणार्‍यांच्या विरोधात वृत्तपत्रांतील कात्रणे, वृत्तवाहिन्यांवरील चित्रीकरण, ध्वनीचित्रफित आदींच्या आधारे गुन्हा नोंद करा. या कार्यासाठी अधिवक्त्यांनीच पुढाकार घेतल्यास पोलिसांनाही कायद्याचे कारण पुढे करून टाळाटाळ करणे शक्य होणार नाही. अशी चिथावणीखोर विधाने करणार्‍यांच्या विरोधात खटले लढवू इच्छिणार्‍या अधिवक्त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेशी संपर्क साधावा. 
अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते : दू. क्र. ८४५१००६०५८, इ मेल vidhisangh@gmail.com

एकं सत् विप्रा मबहुधा वदन्ती ।

     एकं सत् विप्रा बहुधा वदन्ती म्हणजे एका सत्च्या निरनिराळ्या तर्‍हेने निरनिराळ्या कामाकरिता प्रकट होणार्‍या शक्ती हेच वैदिक लोकांचे इंद्रादिक देव आहेत. इंद्र ही क्रियाशक्ती आहे. सूर्य ही उत्पादक शक्ती आणि अग्नि ही ज्ञानशक्ती आहे. अशाच बाकीच्याही देवता विश्‍वातील पृथक् कार्ये करणार्‍या आहेत. ऋग्वेदामध्ये सर्वांपेक्षा इंद्र आणि अग्नि यांचीच स्तोत्रे अधिक आहेत. याचे कारणही उघड आहे. ज्ञान आणि क्रिया यांच्यावरच तर मनुष्याची सर्व मिजास असते.

भगवान श्रीकृष्णाच्या काळातील प्रसंगांची पुनरावृत्ती सनातनच्या संदर्भात होणे, हा एक काळगतीचाच महिमा आहे, त्याकडे साक्षीभावाने पहायला शिकल्यास ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे प्रत्येक संकट काळच गिळंकृत करून घेणार आहे, या अर्थाचे प.पू. डॉक्टरांचे लिखाण !

प.पू. डॉक्टरांच्या जिथे भगवान श्रीकृष्णावर...... या लिखाणावर एक विद्वान यांचे भाष्य
     मडगाव स्फोट प्रकरणाप्रमाणेच डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, याची खात्री असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण : डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले यांनी सनातनला गुन्हेगार घोषित केले आहे. त्यांनी कितीही आकांडतांडव केले, तरी काळाच्या कसोटीवर सनातनचे निर्दोषीत्व सिद्ध होईल, हे मागील अनुभवावरील पुढील लिखाण वाचून त्यांच्या लक्षात येईल. मडगाव स्फोट प्रकरणाप्रमाणेच याही वेळी न केलेल्या अपराधासाठी सनातनच्या साधकांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो काळच हाणून पाडणार आहे, हे पुरोगाम्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक

भावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका !

    
पू. संदीप आळशी
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.

कारागृहात काही वर्षे घालवलेल्या निरपराध कैद्यांचे अनुभव वाचून येणार्‍या आपत्काळात कारावासात जावे लागले, तर श्रीगुरु त्यासाठी सिद्धता करवून घेत आहेत, असे वाटणे

सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर
     परात्पर गुरूंच्या अपार कृपेमुळेच दैनिक सनातन प्रभातमध्ये कारागृहात काही वर्षे घालवलेल्या निरपराध कैद्यांचे अनुभव वाचायला मिळत आहेत. ते वाचून मनात आलेले विचार पुढे देत आहे.
१. वाईट लोक निरपराध लोकांना त्रास देत आहेत, याची चीड 
येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, असे वाटणे
      प्रशांत यातील काही प्रसंग मला वेळोवेळी सांगत होते. त्या वेळी मला त्यांना किती यातना सहन कराव्या लागत आहेत; म्हणून दुःख व्हायचे. आता ही लेखमाला वाचून वाईट लोक निरपराध लोकांना त्रास देत आहेत, याची अत्यंत चीड येते आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, असे वाटते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटत नाहीत की मतांधता त्यांच्या धर्मनिष्ठेच्या आड येते ?

     केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएस्ईच्या) शाळांतून भारतियांचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणीवपूर्वक डावलण्यात आला आहे. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे शत्रू असणारे बाबर आणि औरंगजेब यांचा इतिहास महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा गंभीर प्रकार कदापि सहन केला जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी नागपूर येथील आंदोलनाच्या वेळी १७ डिसेंबर २०१५ या दिवशी दिली. (१८.१२.२०१५)

११.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींनी भृगुसंहितेद्वारे दिलेला फलादेश

     पंजाब राज्यातील होशियारपूर येथे डॉ. विशाल शर्मा हे भृगुसंहितेचे वाचक (भृगुशास्त्री) आहेत. ११.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांनी सनातन संस्थेसाठी भृगुसंहितेचे वाचन केले. त्यामध्ये झालेला फलादेश पुढीलप्रमाणे आहे.
१. वेगवेगळ्या युगांत गेले अनेक जन्म प.पू. डॉक्टर महर्षी भृगु यांचा फलादेश ऐकत आहेत. त्याचप्रमाणे या जन्मातही ते संपूर्ण भक्तीभावाने हा फलादेश ऐकत असून तो स्वीकारत आहेत.

कालीमातेला मांसाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून हिंदूंनी मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्यच !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
प्रश्‍न : कालीमातेला मांसाचाच नैवेद्य दाखवतात, त्यामुळे हिंदु धर्मात मांसभक्षणाला मान्यता आहे.
खंडन :
१. हिंदु धर्मशास्त्रात कर्मकांडानुसार बळी देण्यामागे शास्त्र असणे
      कालीमातेने असुराचे मुंडके तोडून त्याला मारले; म्हणून बळी देण्याची किंवा मांसाचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा चालू झाली. मांसाच्या नैवेद्यात बळी दिलेल्या प्राण्याचे मांस असते. बळी देण्याविषयीही शास्त्र आहे, त्याला काही नियम आहेत.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
    मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सत्पात्रे दानम् । जसे असते, तसे देणाराही तेवढाच शुद्ध हवा, असा सिद्धांत शिकवणारे उदाहरण

आजपर्यंत झालेल्या नाडीवाचनासाठी महर्षींनी कधीच कुणाकडून दक्षिणा न घेणे; परंतु केवळ परम गुरुजीच परमशुद्ध असल्याने आम्ही केवळ त्यांच्याकडूनच दक्षिणा घेऊ !, असे नाडीवाचकास सूचित करणेे : एकदा दक्षिणा घेण्याविषयी बोलतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, मी अनेक वर्षे नाडीवाचन करत आहे; परंतु या व्यक्तींकडून एवढी दक्षिणा घ्यावी, असे आजपर्यंत कधीच महर्षींनी नाडीपट्टीत सांगितलेले नाही. काही राजकारणी लोकांसाठी, तसेच अध्यात्मातील काही महनीय व्यक्ती यांच्यासाठीही नाडीवाचन झाले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन आणि तेथील टिकवून ठेवलेल्या सांस्कृतिक परंपरेमुळे दक्षिणेत अजूनही दैवी स्पंदने टिकून असण्यामागील कारणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. तमिळनाडूतील लोक खूप भाविक असणे
     तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.
२. दैनंदिन कृतीतही देव पहाण्याची कला
२ अ. कापराने किंवा लिंबाने दृष्ट काढूनच दुकानदारांनी दुकान उघडणे अथवा बंद करणे : अगदी दुकानदारही याला अपवाद नाहीत.

कारागृहात मूल्यशिक्षण कार्यक्रमाचे नाव पुढे करून कैद्यांची फसवणूक करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे ख्रिस्ती !

श्री. प्रशांत अष्टेकर
     मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सनातनच्या सहा निर्दोेष साधकांनी चार वर्षे कारागृहातील नरकयातना भोगल्या. या काळात कारागृहात हिंदु कैद्यांचे धर्मांतर करण्याचाही प्रयत्न केला जातो, हे भीषण वास्तव त्यांच्या लक्षात आले. कधी अन्य पंथीय कैद्यांच्या माध्यमातून, तर कधी समाजसेवी संस्थेचा बुरखा पांघरून हिंदु कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदु कैद्यांच्या धर्मांतरासाठी नानाविध युक्त्या-क्लृप्त्या कशा वापरल्या जातात याचा अनुभव या लेखातून मांडला आहे. हा अनुभव पहाता कारागृहे म्हणजे शासकीय खर्चातून चालवलेली धर्मांतराची केंद्रे आहेत, याची प्रचीती येते.

सनातनच्या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा

१. सनातन डॉट ऑर्ग संकेतस्थळाने ऑक्टोबर 
२०१५ मध्ये प्रथमच गाठला १ लक्ष वाचकसंख्येचा टप्पा ! 
टीप
अ. संकेतस्थळाची वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.
आ. वर देण्यात आलेली सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाची वाचकसंख्या ही तीनही भाषांतील संकेतस्थळांंची एकत्र करून घेतली आहे. या तीनही भाषांतील संकेतस्थळांची वेगवेगळी वाचकसंख्या पुढे दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१५ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून 
संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
      ही वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.
२. संकेतस्थळावरील राष्ट्ररक्षण
आणि धर्मजागृती यांविषयीच्या मोहिमा
२ अ. हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विडंबनाच्या विरोधात संकेतस्थळावर राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमा
१. तंत्रा या आस्थापनाच्या संकेतस्थळावर देवतांची आणि धार्मिक चिन्ह असलेल्या टी-शर्टच्या विक्रीच्या विरोधात जनजागृती अन् निषेध मोहीम

अपराधांचे प्रमाण अतिशय वाढलेले असल्याने सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक !

     
श्री. प्रशांत जुवेकर
सध्या कारागृहात चोरीच्या प्रकरणातील आरोपींचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पैसे, भ्रमणभाष, अलंकार, वाहने इत्यादींची चोरी करणारे आरोपी आहेत. त्यामुळे सर्वांनीच सावध रहाणे, तसेच पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. आपण एकटे असतांना वाटेत कुणी अनोळखी व्यक्तीने पत्ता किंवा इतर माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्याचा प्रयत्न केल्यास बोलण्याचे टाळावे आणि सतर्क रहावे.
२. अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देऊ नये.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
समाजसाहाय्याच्या दृष्टीने भावी आपत्काळातील संजीवनी या सनातनच्या ग्रंथमालिकेचा जास्तीतजास्त प्रसार करा !

वाचकांना विनंती !
     आतापर्यंत भावी आपत्काळातील संजीवनी या सनातनच्या ग्रंथमालिकेतील पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. उर्वरित ग्रंथही लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. १. अग्नीशमन प्रशिक्षण
२. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख)
३. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार
४. रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत. 
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : 'माया समजून घेऊन' म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
 भारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशात ५००० चपराशांच्या नोकर्‍यांसाठी २३ लक्ष अर्ज आले होते. अर्ज करणार्‍यांपैकी काही जण विद्यावाचस्पती (डॉक्टरेट केलेले) होते !'
लोकशाहीने दिलेल्या या वस्तूस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१५)

प.पू. डॉक्टर शतायुषी भव !

प.पू. आबा उपाध्ये
परात्पर गुरु डॉ. आठवले
    प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्था स्थापन करतांना किती दूरदृष्टी ठेवली असेल, याविषयी त्यांच्या प्रगल्भ वृत्तीचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे. 
    त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्याकडे पूजा आणि सेवा यांसाठी येणार्‍या साधकांची वृत्ती इतकी नम्रतेची आहे की, प.पू. डॉक्टरांची शिकवण त्यांच्यात किती खोलवर रूजलेली आहे, याची जाण आम्हाला पावलोपावली होते. 
    एखादी संस्था स्थापन करतांना त्याविषयी कितीतरी दूरवरचा विचार करावा लागतो हे निश्‍चित ! आणि तेसुद्धा सनातन संस्कृती आणि परंपरेने चालत आलेल्याचा अभ्यास करून पुढील येणार्‍या अडचणींना तोंड देत आजपर्यंत आणून ठेवणे, हे किती अवघड आहे, नाही का ? 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

पंतप्रधानांच्या मनात काय आहे ?

संपादकीय 
     अफगाणिस्तानच्या नव्या संसद इमारतीचे उद्घाटन करून भारताकडे परतत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर या दिवशी पाकच्या लाहोर शहरात उतरून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांचा हा पाकदौरा पूर्वनियोजित नव्हता. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानमध्ये संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यावर परतीच्या प्रवासात पाकला भेट देण्याचा निर्णय ट्विट केला आणि दोन्ही देशांतील नेत्यांना अवाक करून सोडून ते सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी लाहोर विमानतळावर उतरले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn