Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकला अचानक भेट !

 • शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे निमित्त : दीड घंटा चर्चा !
 • अफगाणिस्तानहून भारतात परततांना लाहोरला थांबण्याचा निर्णय !
 • पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच पाकला भेट !
 • ११ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाची पाकला भेट !
नवी देहली, २५ डिसेंबर - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर या दिवशी पाकला अचानक भेट दिली. पंतप्रधानांच्या पाकभेटीवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौर्‍याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी प्रथमच पाकचा दौरा केला असून मागील ११ वर्षांत एखाद्या भारतीय पंतप्रधानाने पाकचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वर्ष २००४ मध्ये पाकचा दौरा केला होता.
१. पंतप्रधानांंनी प्रथम रशिया आणि नंतर अफगणिस्तान येथील त्यांचे नियोजित दौरे पूर्ण केले.

विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाची फलश्रुती अल्प

देशात अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलेले असतांना संसदेचा वेळ वाया जाणे आणि 
जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणे, हा आत्मघातच आहे ! त्यामुळे देशाला 
गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही !
संसदेचे हिवाळी अधिवेशन २०१५
      नवी देहली - २६ नोव्हेंबर या दिवशी चालू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला संपले. या संपूर्ण अधिवेशनात राज्यसभेेच्या कामकाजासाठी जेवढा वेळ दिला गेला, त्याच्या अर्धा वेळच कामकाज झाले. लोकसभेत शासनाला बहुमत असल्यामुळे राज्यसभेपेक्षा अधिक चांगले काम होऊ शकले. याऊलट राज्यसभेत विरोधकांची चलती असल्यामुळे जीएस्टीसह अनेक महत्त्वाची विधेयके अडकून पडली आणि सभागृहाचा अधिक वेळ गोंधळातच वाया गेला.

ईशान्य भारतातील राज्यांच्या अस्थिरतेमागे आय.एस्.आय.

    युद्धबंदी कराराचे उल्लंघन, आतंकवाद्यांची घुसखोरी अशा भारतविरोधी कारवायांत पाक अगोदरच गुंतलेला असून इशान्य भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा त्याचा डाव उघड झाला आहे. असे असतांना आता त्याला योग्य धडा शिकवण्याचे काम भारत शासनाने करायला हवे.
    कोलकाता - भारतीय सैन्य आणि गुप्तचर संस्था यांच्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणे अडचणीचे ठरू लागल्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने आता भारताच्या पूर्वेकडील राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. या भागात आय.एस्.आय. बांगलादेशातील जमात-उल्-मुजाहिदीनसारख्या आतंकवादी संघटनांच्या साहाय्याने अराजकता आणि आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमधील बंगाल एक कडी आहे. (पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला भारतातील देशविघातक धर्मांधांचे नेहमीच साहाय्य मिळत आले आहे. त्यामुळे अशा लोकांना पकडून कठोर शिक्षा केल्यासच भारतातील पाकिस्तानचा हस्तक्षेप थांबणार आहे ! - संपादक)

काश्मीरमध्ये ९ मुलांना अटक !

 • निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीप्रमाणे आता यांनाही अल्पवयीन ठरवून त्यांची सुटका केल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
 • आय.एस्.आय.एस्.शी संबंध ठेवल्याचा संशय
नवी देहली - देशातील विविध भागांमधून काही तरुण आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याच्या सिद्धतेत असल्याचे आढळून आले आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये आय.एस्.आय.एस्.शी संबंध ठेवल्याच्या संशयावरून ९ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. यातील ३ मुले शस्त्रांस्त्रांच्या प्रशिक्षणासाठी सीमेपलीकडील पाकिस्तानात जाण्याच्या सिद्धतेते होती. (देशात ७० टक्के तरुण आहेत; परंतु त्यातील किती जणांनी आतंकवादाशी घरोबा केला आहे, हे जनतेला कळेल का ? - संपादक)
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ही मुले भारतविरोधी आंदोलनात अनेकदा आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवतांना आढळून आली आहेत. एका वृत्तानुसार, या अल्पवयीन मुलांचे वय १५ ते १७ वर्षे असून त्यांच्यावर बॉम्ब बनवणे आणि दगडफेक करणे असेही आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या या सर्वांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

भारत आणि रशिया यांच्यात १६ महत्त्वपूर्ण करार

पंतप्रधान मोदी यांचा रशिया दौरा
     मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यामध्ये २४ डिसेंबर या दिवशी उभय देशांतील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये १६ महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. यांमध्ये सैन्यात वापरण्यात येणार्‍या हेलिकॉप्टरची निर्मिती करणे, भारतात अणूप्रकल्प उभारणे आणि अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील करारांवर उभय देशांनी स्वाक्षर्‍या केल्या.


शमसाबाद (आग्रा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण, ६ घायाळ

हिंदूंना आत्मसंरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही !
     शमसाबाद (आग्रा) - येथे भ्रमणभाषवर बोलण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन दोन कुटुंबियांतील मारहाणीत झाले. त्यानंतर त्यांच्या साहाय्यासाठी आलेल्या लोकांमध्ये संघर्ष होऊन दोन्हीकडून काचेच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यात आली. यात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या आक्रमणात ६ हिंदू घायाळ झाले. दोन्ही गटांकडून पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी एक हिंदू आणि एक मुसलमान यांना अटक केली आहे.

ममता (बानो) बॅनर्जी शाहरूख खानला देणार अडीच कोटी रुपयांची सदनिका !

ममता (बानो) बॅनर्जी शासनाकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी !
बॅनर्जी यांनी स्वखर्चाने ही भेट द्यावी !
     कोलकाता - बंगालचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर झाल्याचे मानधन म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी अभिनेते तथा आय.पी.एल्मधील कोलकाता क्रिकेट संघाचे मालक शाहरूख खान यांना सदनिका देण्याच्या सिद्धतेत असल्याचे बोलले जात आहे. शाहरूख खान यांनी यापूर्वीच बंगाल शासनाने मला ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून काही भेट दिली, तरी मी ती स्वीकारणार नाही, असे घोषित केले होते. तरीही शासन त्यांना ही सदनिका देण्याच्या सिद्धतेत आहे.

आता आय.एस्.आय.एस्.चे संदेश प्रादेशिक भाषांमध्ये !

हे रोखण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केली आहे ?
गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांची माहिती
     नवी देहली - आय.एस्.आय.एस्. (इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया) समर्थक गटांकडून सामाजिक संकेतस्थळांवर उर्दू आणि इंग्रजीसह आता भारताच्या हिंदी, तमिळ, गुजराती अशा विविध प्रादेशिक भाषांमधून संदेश प्रसिद्ध केले जात आहे, असे गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यसभेला दिलेल्या एका लेखी उत्तरात नुकतेच स्पष्ट केले. आय.एस्.आय.एस्.मध्ये होणारी संभाव्य भरती पहाता अशा गटांवर लक्ष ठेवण्याचा आदेश गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. (केवळ लक्ष ठेऊन ही समस्या सुटणार नाही, तर आय.एस्.आय.एस्. शी संबंध ठेवणार्‍या लोकांना कारागृहात टाका ! - संपादक)

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात २ पोलीस घायाळ

आतंकवादग्रस्त भारत !
     श्रीनगर - अनंतनाग येथे ईद-ए-मिलादनिमित्त आयोजित एका मिरवणुकीत आतंकवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस शिपाई घायाळ झाले. या मिरवणुकीत पोलिसांचे पथक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात केले होते. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील अन्वेषण चालू आहे.

राममंदिर उभारणीसाठी मुसलमानांना करसेवेचे आवाहन करणार्‍या उत्तरप्रदेशमधील राज्यमंत्र्याची हकालपट्टी !

 • हिंदुबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांविषयी बोलल्यानंतर मंत्र्याची हकालपट्टी व्हायला हा भारत आहे कि पाक ?
लक्ष्मणपुरी (लखनौ) - अयोध्येत राममंदिराची उभारणी चालू झाल्यास मुसलमानांनी करसेवा करावी, असे आवाहन करणारे उत्तरप्रदेशमधील मंत्री ओमपाल नेहरा यांची अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.
    माजी पंतप्रधान चरण सिंह चौधरी यांच्या जयंतीनिमित्त बिजनौर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान समारंभात ते बोलत होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे जवळचे आणि त्यांचे अत्यंत विश्‍वासू समजले जाणारे ओमपाल नेहरा हे अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री आहेत. नेहरा पुढे म्हणाले, विहिंपसारख्या संघटनांना संपवण्यासाठी मुसलमानांनी राममंदिराच्या निर्मितीत करसेवा केली पाहिजे. राममंदिर अयोध्येत बांधणार नाही, तर मग कुठे बांधणार ? अयोध्या आणि मथुरा या अनुक्रमे श्रीराम अन् श्रीकृष्ण यांच्या नगरी असून तेथे मंदिर नसून कसे चालेल ? मथुरेतही श्रीकृष्णाचे मंदिर बांधले गेले पाहिजे.

(म्हणे) शासनाला आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव अल्प करण्यात यश !

देशात प्रतिदिन आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी सापडत 
असतांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वक्तव्य !
बशोली (काश्मीर) - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचा भारतीय युवकांवरील प्रभाव अल्प करण्यात केंद्रशासनाला यश आले आहे, असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे केला. तीन राज्यांना जोडणार्‍या काश्मीर येथील बहुचर्चित पुलाचे उद्घाटन पर्रीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.आय.एस्.आय.एस्.च्या विचारसरणीकडे आकर्षित होणार्‍या युवकांची संख्या अल्प होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्यात आम्हाला यशही मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंधित असलेल्या हेरगिरी प्रकरणात सैन्यातील काही कर्मचार्‍यांचा संबंध असल्याविषयी ते म्हणाले की, या विषयाशी संबंधित सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांना मुली पुरवणार्‍या पाकमधील ६ उच्चभ्रू महिलांना अटक

पाकमधील उच्चभ्रू महिलाही आय.एस्.आय.एस्.च्या समर्थक !
     कराची - आतंकवादाच्या विरोधात कारवाई करतांना पोलिसांनी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.ला साहाय्य करण्याच्या आरोपाखाली ६ उच्चभ्रू महिलांना अटक केली आहे. सिंधमध्ये अटक करण्यात आलेल्या या महिला आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांना विवाहासाठी मुली पुरवत होत्या, तसेच आर्थिक साहाय्यही करत होत्या, असे त्यांच्या चौकशीत स्पष्ट झाले. मे मासात २ श्रीमंत व्यक्तींनी येथील ४५ इस्मायली शिया पंथियांचे एका प्रवासी बसमध्ये हत्याकांड घडवून आणले होते. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांना या व्यक्तींच्या बायका आय.एस्.आय.एस्.ला साहाय्य करत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक उमर खाताब यांनी दिली आहे. 

दाऊदचे वास्तव्य दुबई आणि दक्षिण आफ्रिका येथे !

पाकिस्तानी डॉन वृत्तसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद हारुण यांचा दावा
     मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे वास्तव्य पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी माझ्या माहितीप्रमाणे तो दुबई आणि दक्षिण आफ्रिका येथे वास्तव्यास असून अधूनमधून पाकिस्तानात ये-जा करत असतो, असा दावा पाकमधील डॉन या वृत्तसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद हारुण यांनी केला आहे. इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : हाऊ टू मेक द रिसेंट ब्रेक थ्रू इन बायलॅटरल टॉक्स इर्रिव्हर्सिबल या विषयावर हारुण यांचे २४ डिसेंबर या दिवशी मुंबईत व्याख्यान झाले. या व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या वेळी दाऊदविषयी बोलतांना ते म्हणाले, शासनाने अशा सर्वच आरोपींच्या विरोधात कारवाई करायला हवी. जर भारत आणि पाकिस्तान यांचे शासन द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलत नसतील, तर इतरांनी त्यात मध्यस्थी करण्यास हरकत नाही. समाजसेवक, सामान्य जनता, संघटना यापैकी कोणीही त्यासाठी पुढाकार घेऊ शकतो.

गोरक्षण करतांना राजकारण करू नका ! - बंगालचे राज्यपाल त्रिपाठी

     कोलकाता - गोरक्षण करतांना राजकारण करू नका, असे मत बंगाल राज्याचे राज्यपाल केदारनाथ त्रिपाठी यांनी येथे व्यक्त केले. गोमाता संरक्षण समितीच्या वतीने बांधण्यात येणार्‍या देशी गायीचे पोषण आणि संशोधन केंद्राच्या पायाभरणीचा शुभारंभ त्रिपाठी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. त्रिपाठी पुढे म्हणाले, गोवंशाची सेवा आणि तिचे रक्षण करणे, ही फार मोठी सेवा आहे. गोवंशाचे संवर्धन आणि त्यांचे पोषण करणे यांसारखे अन्य कुठलेही चांगले कार्य नाही. गोवंशाचे रक्षण हे शेती, दूध उत्पादन, आरोग्य, अर्थव्यवस्था, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचे आहे.

पुरस्कार परत करणे अयोग्य ! - ख्यातनाम बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया

कुठे पुरस्काराला देशाकडून मिळणारा सन्मान समजणारे पं. चौरसिया, 
तर कुठे तथाकथित असहिष्णुतावादी !
     उज्जैन - पुरस्कार परत करणे अयोग्य आहे. देशाकडून मिळाणार्‍या सन्मानला मी कधी परत केले नाही, असे ख्यातनाम बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितले. संगीत माझा धर्म आहे. धर्माच्या नावावर आपसात भेदभाव ठेवणारे लोकही संगीतावर प्रेम करतात, असेही ते म्हणाले.
    पं. चौरसिया उज्जैन येथे एका कार्यक्रमासाठी आले असता एका चर्चेच्या वेळी ते म्हणाले, उज्जैन हे आध्यात्मिक शहर आहे. भगवान श्रीकृष्णाचे शिक्षण येथेच झाले. बासरी त्यांचे प्रिय वाद्य राहिले आहे. मी श्रीकृष्णाच्या बासरीच्या शिक्षणाचे अनुकरण करत आहे. सिंहस्थाच्या संबंधित कार्यक्रमात सहभागी होण्याची मला प्रथमच संधी मिळाली आहे.

निर्भयाच्या आरोपीला उत्तरप्रदेशात पाय ठेवू देणार नाही !

अशा आरोपीला केवळ उत्तरप्रदेशातूनच नाही, तर देशातून तडीपार 
करायला हवे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
मुलायमसिंह यादव यांच्या स्नुषा अपर्णा यादव यांची चेतावणी
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - देहलीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी (आता सज्ञान झाला आहे) कारागृहातून सुटला आहे; मात्र त्याला उत्तरप्रदेशात पायही ठेवू दिला जाणार नाही, अशी चेतावणी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी दिली आहे. या आरोपीच्या संपूर्ण तपशिलासह त्याचे छायाचित्र आम्ही देहली शासन आणि आणि देहली पोलिसांकडून माहिती अधिकाराअंतर्गंत मागवून घेणार आहोत. या माहितीच्या आधारे राज्यातील जनतेला त्या माध्यमातून जागरूक करू, असेही यादव यांनी म्हटले आहे.

सनातनचे साधक विनायक शानभाग यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

विवाहबंधनाच्या दिवशीच एक जीव झाला जीवन्मुुक्त । 
विनायकदादांनी केला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त ॥
 • सनातनच्या इतिहासात प्रथमच विवाह सोहळ्यात आध्यात्मिक पातळी घोषित !
श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ
मध्यभागी श्री. विनायक यांची धर्मपत्नी सौ. विद्या शानभाग (पूर्वाश्रमीची कु. शिल्पा करी)
    रामनाथी (गोवा), २५ डिसेंबर (वार्ता.) - भटकळ (उत्तर कन्नड, कर्नाटक) येथील सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांच्या विवाहानिमित्त त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने एक विशेष आध्यात्मिक भेट मिळाली. विवाहसोहळ्याच्या मंगलदिनी म्हणजे २४ डिसेंबर २०१५ या दिवशी श्री. विनायकदादांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले. सनातन संस्थेच्या इतिहासात विवाहसोहळ्यात आध्यात्मिक पातळी घोषित होण्याची घटना प्रथमच घडली. हे अनुभवत असतांना उपस्थित सर्व आप्तस्वकीय आणि साधक यांची भावजागृती झाली. त्यानंतर सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते श्री. विनायक शानभाग यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात दत्त पालखीचे भावपूर्ण वातावरणात स्वागत !

दत्तपालखीचे पूजन करतांना पू. गुरुनाथ दाभोलकर काका
देवद (पनवेल) - सनातनच्या येथील आश्रमात दत्तजयंतीच्या दिवशी (२५ डिसेंबर) शिवगिरी संप्रदायाच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री दत्तात्रेयांच्या पालखीचे सायंकाळी ७ वाजता शुभागमन झाले. पारंपरिक वेषात दत्तभक्त आणि सुवासिनी ब्रह्मा विष्णु महेश्‍वरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा । अशी नामधून आळवत पालखीसह आश्रमात आले. पालखीच्या अग्रस्थानी श्री. विनायक शिवळकर यांनी धर्मध्वज हातात घेतला होता, तर मिलिंद सुर्वे यांनी धर्मदंड घेतला होता. हातात अब्दागीर घेतलेले भक्त पालखीत सहभागी झाले होते. काही सुवासिनींनी श्रीफळाचे कलश मस्तकावर घेतले होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने आश्रमाच्या अंगणातील वातावरण चैतन्यमय आणि उत्साही झाले होते.

नागपूरमधील राम मंदिरात चोरी

मंदिराच्या सुरक्षेसाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
नागपूर - येथील गणेशपेठ भागातील राम मंदिरातील देवाच्या मौल्यवान ऐवजासह दागिन्यांची चोरी झाली आहे. चोराने १ लाख ४० सहस्र रुपयांचा ऐवज चोरला आहे. चोरी करतांनाची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. नागपूरमध्ये सध्या चोर्‍यांचे प्रमाण बर्‍याच अंशी वाढले आहे.

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

 • हिंदूंनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणे, ही हिंदूंना शिक्षाच होय !
 • मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी केले भूमीपूजन
 • राज्यकर्त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता ?
गुंटूर (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्य शासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. यानंतर नायडू यांनी शासनस्तरावरील ख्रिसमस कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सामाजिक कार्य केल्याविषयी ९ ख्रिस्त्यांचा सत्कार केला. (शासनाने कधी शासकीय स्तरावर हिंदूंचे सण साजरे केले आहेत का ?- संपादक) या वेळी मुख्यमंत्री नायडू म्हणाले,
१. तेलुगु देसम् हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो सर्व धर्मियांच्या हितांचे रक्षण करील. धर्मांतरित ख्रिस्त्यांना अनुसूचित जातीचे लाभ देऊ.

मदर तेरेसा यांच्या संदर्भातील चमत्काराला विरोध; मात्र मानवतेसाठी संतपद देण्यास संमती !

वैचारिक गोंधळामुळे महाराष्ट्र अंनिसची पुन्हा दुतोंडी भूमिका
पुणे, २५ डिसेंबर (वार्ता.) - महाराष्ट्र अंनिसने २४ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन वादग्रस्त समाजसेविका मदर तेरेसा यांच्या संदर्भात चमत्कारांचे जे दावे केले जातात, त्याला विरोध दर्शवला. असे चमत्कार होणे हे वैज्ञानिकतेच्या पहिल्या पायरीवरही बसत नाही, असे सांगत मदर तेरेसा यांना मानवतेच्या कार्यासाठी संतपद बहाल केले जाऊ शकते, अशी अजब दुतोंडी भूमिका अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मदर तेरेसा यांच्या संदर्भात दुसरा चमत्कार घडला (?) असल्याचे चमत्कारिक कारण सांगत पोप फ्रान्सिस यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना संतपद बहाल करणार असल्याचे घोषित केले. ही घोषणा होऊनही अंनिसने ४-५ दिवस मौन बाळगले होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मदर तेरेसा यांच्या चमत्कारांच्या संदर्भात अंनिस गप्प का, असा प्रश्‍न विचारला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ मासांत एकही सुटी घेतली नाही !

इतर लोकप्रतिनिधींनी यातून आदर्श घ्यावा ! 
माहिती अधिकारातून माहिती उघड !
     नवी देहली - २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या १९ मासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही सुटी घेतलेली नसल्याची माहिती, माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी किती सुट्या घेतल्या, त्यांनी किती विदेश दौरे केले, आदींचा तपशील अर्जदाराने मागितला होता. त्यास पंतप्रधान कार्यालयाने उत्तर देतांना वरील माहिती दिली. याशिवाय या माहितीत पुढील गोष्टींचा समावेश आहे. 
१. पंतप्रधान नेहमीच सेवेशी तत्पर राहिले. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

फलक प्रसिद्धीकरता

या मुलांना कठोर दंड केल्यास पुढे त्यांचे मोठ्या आतंकवाद्यांमध्ये रुपांतर होण्याचे टळेल !
जम्मू-काश्मीरमध्ये आय.एस्.आय.एस्.शी संबंध ठेवल्याच्या संशयावरून ९ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. यातील ३ मुले शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी सीमेपलीकडील पाकिस्तानात जाण्याच्या सिद्धतेत होती.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : ISISse judneke sandeha me Kashmir ke 9 avayaska ladkonko banaya gaya bandi !
es atankwadko ham kaise jawab denge ?
जागो ! : आय.एस्.आय.एस्. से जुडने के संदेह में कश्मीर के ९ अवयस्क लडकों को बनाया गया बंदी !
इस आतंकवाद को हम कैसे जवाब देंगे ?

(म्हणे) राममंदिर निर्मितीसाठी धडपडणार्‍या विदुषकांना रोखा !

हिंदूंना विदुषक संबोधणार्‍या ओवैसी यांना कुणी असुर संबोधले, तर त्यांना चालेल का ?
खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे हिरवे फुत्कार !
भाग्यनगर - राममंदिराच्या निर्मितीसाठी धडपडणार्‍या विदुषकांना रोखा, असे हिरवे फुत्कार एम्.आय.एम्. पक्षाचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे सोडले. केंद्रशासनाला त्यांनी ही चेतावणी दिली आहे. अयोध्येत राममंदिर बनवण्यासाठी विहिंपकडून नुकत्याच शिळा आणण्यात आल्या. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते बोलत होते. औवैसी पुढे म्हणाले, राममंदिराविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप यायचा आहे. शासनाने विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदी संघटनांना रोखण्यासाठी त्वरित पावले उचलायला हवीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या हालचालींना अनुमती दिली जाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या शासनाने मंदिर उभारणीसाठी आणले जाणारे दगड हस्तगत करायला हवे होते; मात्र समाजवादी पक्ष तथा विहिंप यांच्याकडून हे प्रकार ठरवून केले जात आहेत. माझ्या हयातीत अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहील या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याची ओवैसी यांनी खिल्ली उडवली.

हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाचे दिवसाचे कामकाज जेमतेम पाच ते साडेसहा घंटेच !

विरोधी पक्षांच्या बहिष्कारामुळे विधीमंडळाच्या कामकाजात घट ! 
     नागपूर, २५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) राज्यातील दुष्काळ, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, पाणीटंचाई, तूरडाळीचे वाढीव दर, राज्यातील गुन्हेगारी अशा अनेक प्रश्‍नांवर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सामोपचाराने आणि बहुसंख्य वेळा गोंधळाच्या वातावरणात चर्चा करण्यात आली; मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार यांनी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकणे आणि सभात्याग याची परंपरा जोपासल्यामुळे विधीमंडळाचे कामकाज पूर्ण झाले नाही. त्यामुळे यंदाच्या या अधिवेशनात विधीमंडळाचे दिवसाचे कामकाज जेमतेम ५ ते ६.३० घंटेच झाले आहे. मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणि अन्य कारणाने विधानसभेचे कामकाज १६ घंटे १९ मिनिटे, तर विधान परिषदेचे कामकाज ७ घंटे २५ मिनिटे होऊ शकलेले नाही. (शासकीय तिजोरीत जमा होणार्‍या जनतेच्या कररूपी पैशांतून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज चालवले जाते. या कामकाजासाठी प्रतिदिन लक्षावधी रुपये खर्च होतात. असे असतांनाही जनतेचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी सभागृहाचा अमूल्य वेळ गोंधळ घालून वाया घालवणारे आणि जनतेच्या पैशांचा चुराडा करणारे लोकप्रतिनिधी कधीतरी जनहित साधू शकतील का ? अशा दायित्वशून्य लोकप्रतिनिधींच्या खिशातून हा पैसा वसूल करायला हवा ! - संपादक) 

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी भव्य वाहनफेरी !

वाहनफेरीत ३२५ हून अधिक वाहने सहभागी 
'हर हर महादेव' च्या जयघोषाने 
जळगाव शहर दुमदुमले !
     जळगाव, २५ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जी.एस्. मैदान (शिवतीर्थ) येथे २७ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या प्रसाराचा एक भाग म्हणून भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजता व.वा. वाचनालय येथून धर्मध्वजपूजन आणि शंखनाद यांनी वाहनफेरीचा प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन श्रीराम मंदिराचे विश्‍वस्त ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी केले, तर पौरोहित्य श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. 
     फेरीच्या अग्रभागी धर्मध्वज आणि त्यामागे रणरागिणीच्या वेशात महिला दुचाकींवर भगवे झेंडे आणि धर्मजागृती सभेचे फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यामागे भगवे झेंडे आणि फेटे घालून दुचाकींवर 'हर हर महादेव', 'जय भवानी जय शिवाजी', 'जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।', 'शिवाजी महाराजांचा विजय असो', 'जय श्रीराम' या घोषणांसह मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झाले. टॉवर चौक येथे हिंदु धर्माभिमानी श्री. दिव्येश चौधरी यांनी पुष्पवृष्टी करून फेरीचे स्वागत केले. त्यानंतर इच्छापूर्ती मंदिर, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, रिंगरोड येथे धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टीने फेरीचे स्वागत करण्यात आले. 
      शिवतीर्थ येथे फेरीचे विसर्जन होऊन सभेत रूपांतर झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव येथील श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी 'धर्मजागृती सभेची आवश्यकता' या विषयावर मार्गदर्शन केले, तर रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी धर्मसभेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

अधिवेशनाच्या काळातील मोर्चे हाताळण्यात पोलिसांना अपयश !

     नागपूर, २५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) अधिवेशनाच्या काळात विविध संघटनांकडून मोर्चे काढणे हे आता नित्याचेच झाले आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विविध संघटनांचे एकूण १२४ मोर्चे निघाले. संगणक परिचालकांच्या मोर्च्याच्या वेळी पोलिसांनी संगणक परिचालकांवर लाठीमार केला. अनेक संघटना विविध मागण्यांसाठी प्रतीवर्षी विधानभवनावर मोर्चे काढतात; मात्र यातील जेमतेम १० टक्के संघटनांना लाभ होतो. उर्वरित संघटनांमधील आंदोलनकर्त्यांना केवळ आश्‍वासनाखेरीज काहीच मिळत नाही. विशेष म्हणजे या वेळी पोलिसांना मोर्चे हाताळण्यात अपयश आले. 

विरोधकांना कारागृहात जायची भीती ! मुख्यमंत्री

     नागपूर, २५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) ' सध्याच्या विरोधकांनी सत्तेत असतांना केलेल्या अपव्यवहाराच्या प्रकरणात त्यांना कारागृहात जाण्याची भीती असून हातात बेड्या पडतील या धास्तीनेच त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत आरोप चालू केले आहेत. गृहमंत्री म्हणून अपयशी असल्याचा सूर त्यांनी लावला आहे; पण मी पार्टटाइम नव्हे, तर फुलटाईम गृहमंत्री आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलेे.ते अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

येणार्‍या धमक्यांमुळे शिक्षण आयुक्त कार्यालयास पोलीस संरक्षण मिळावे - शिक्षण आयुक्तांची मागणी

जेथे राज्याच्या शिक्षण आयुक्तांना धमकी दिली जात असेल, तेथे सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल, याचा विचारच न केलेला बरा ! धमकी देणार्‍या कर्मचारी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यावर पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग यांनी त्वरित कारवाई करणे अपेक्षित !! 
शिक्षण आयुक्तांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट दिल्याचे प्रकरण 
     पुणे, २५ डिसेंबर - शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नुकतीच येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयास अचानक भेट दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयात कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, तसेच काही संघटना जातीचा आधार घेऊन धमकीची भाषा वापरत आहेत. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील महत्त्वाचे अभिलेख आणि बालभारतीची मालमत्ता लक्षात घेऊन तातडीने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 

मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर प्रबोधन फेरी !

दिनांक : २६ डिसेंबर, शनिवार
वेळ : दुपारी ४.३०
स्थळ : पानिपत मैदान, नागरदास मार्ग, अंधेरी पूर्व 
-------------------------------------
दिनांक : २७ डिसेंबर, रविवार
वेळ : दुपारी ४
स्थळ : चिंचोळी तलाव, जुईनगर 
--------------------------------

राज्यातील १८९ जलसिंचन प्रकल्पांची चौकशी करण्याचा उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा आदेश

शासनाने काँग्रेस आघाडी शासनाच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सखोल 
चौकशी करावी आणि दोषींना कठोर शासन करावे, अशी अपेक्षा !
राज्यातील सिंचन घोटाळ्याचे प्रकरण
* काम न करताच काही कंत्राटदारांना रक्कम अदा !
* प्रत्यक्षात ४८ प्रकल्पांची कामे चालूच नाहीत !
* ५ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या निधी वितरणात गैरव्यवहार !
     संभाजीनगर - राज्यातील एकात्मिक राज्य जल आराखडा न करताच करण्यात आलेल्या १८९ सिंचन प्रकल्पांमधील अनेक प्रकल्पांमध्ये गंभीर अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वर्ष २००७ ते २०१३ या कालावधीतील ५ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या निधी वितरणातील गैरव्यवहाराची राज्यशासनाने चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. ए.आय.एस्. चिमा यांनी दिला आहे. (असा होता आघाडी शासनाचा भ्रष्ट कारभार ! - संपादक) जल आराखडा न करता सिंचन प्रकल्प होत असल्याच्या प्रकरणी आक्षेप घेत जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. (जनहितार्थ जलसिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती समाजापुढे आणून त्याविषयी न्यायालयीन लढा देणारे प्रदीप पुरंदरे अभिनंदनास पात्र आहेत. - संपादक) 

आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यासाठी ७ जानेवारीला सुनावणी

हडपसर (पुणे) भागात झालेल्या दंगलीचे प्रकरण 
      पुणे, २५ डिसेंबर - फेसबुक या सामाजिक संकेतस्थळावर छत्रपती शिवाजी महाराज यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी २ जून २०१४ या दिवशी येथील हडपसर भागात दंगल झाली होती. या दंगलीत झालेल्या दगडफेकीत मोहसीन शेख मोहम्मद सादिक याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २२ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यासाठी ७ जानेवारी या दिवशी त्यांना न्यायालयात उपस्थित करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्हा प्रविष्ट झालेल्या सर्वांचे जामीन अर्ज सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी फेटाळले आहेत. त्यातील अक्षय दत्तात्रय सोनावणे यांच्या वतीने अधिवक्ता मिलिंद पवार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी तो अर्ज फेटाळला.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - पलूस आणि शिराळा येथे निवेदन

 पलूस येथे नायब तहसीलदार पी.व्ही. थोरात (उजवीकडे)
 यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली, २५ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, या मागणीसाठी पलूस आणि शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिराळा येथे तहसीलदार श्री. विजय पाटील यांना, तसेच पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्ववादी सर्वश्री अशोक मस्कर, गोरख माने, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राम आवटे, संतोष कुंभार उपस्थित होते. 

हिंदु तरुणीने अश्‍लील चाळे करणार्‍या धर्मांधाच्या कानशिलात मारली

धर्मांधाला सडेतोडपणे उत्तर देणार्‍या तरुणीचे अभिनंदन ! इतरत्रच्या हिंदु तरुणींनी यातून बोध घ्यावा ! 
     नांदेड, २५ डिसेंबर - एका हिंदु तरुणीच्या दुचाकीचा तीन धर्मांध तरुण २२ डिसेंबर या दिवशी पाठलाग करत होते. त्या वेळी एका धर्मांधाने हिंदु तरुणीसमोर अश्‍लील चाळे करून अंगविक्षेप केले. त्यामुळे त्या तरुणीने भर चौकातच त्या धर्मांधाच्या कानशिलात मारली. त्यानंतर त्या तरुणीचा भाऊ आणि उपस्थित अन्य हिंदूंनी त्या धर्मांधाला चोप दिला. त्या वेळी त्या धर्मांधासमवेत असलेले अन्य २ धर्मांध तरुण पसार झाले. नागरिकांनी त्या धर्मांध तरुणाला भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे कह्यात दिले.

रेल्वेमध्ये भ्रमणभाष संचांच्या चोर्‍यांत वाढ

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात ३ सहस्र ५०० तक्रारी प्रलंबित 
     कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानकांतून प्रतिदिन लक्षावधी प्रवासी प्रवास करत असून प्रवाशांच्या खिशातील भ्रमणभाष संच चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वर्षभरात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात ३ सहस्र ५०० भ्रमणभाष संच हरवल्याच्या तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. सध्या भ्रमणभाष संच हरवल्याच्या प्रतिदिन पाचपेक्षा अधिक तक्रारी प्रविष्ट होत आहेत. त्यामानाने तपास लागलेल्या प्रकरणांची संख्या अत्यंत अल्प असल्यामुळे प्रवाशांमध्ये पोलिसांविषयी अप्रसन्नता आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान ! - प्रमोद मुतालिक

     सातारा, २५ डिसेंबर (वार्ता.) - 'हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी जवळून अनुभवले आहे. समितीच्या कार्याची दिवसेंदिवस वृद्धी होत असून यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग आहे. विशेष म्हणजे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान आहे', असे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या निवासस्थानी ते आले होते. सनातन प्रभातच्या वार्ताहराकडे त्यांनी हे मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, धर्माभिमानी हिंदू श्री. मनोत आदी मान्यवर उपस्थित होते. 
     अधिवक्ता गोविंद गांधी यांनी प्रारंभी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. प्रमोद मुतालिक यांचा सत्कार केला. श्री. मंगेश निकम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. मुतालिक यांचा सत्कार करत सातारा जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
श्री. मुतालिक पुढे म्हणाले.... 
१. सर्वधर्मसमभाव हा शब्दच मुळात चुकीचा आहे. धर्म केवळ एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतरांच्या म्हणण्याला, विचारांना, मतांना जन्म आहे; मात्र हिंदु धर्म अनादी, अनंत आहे. त्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. 

बाजीराव मस्तानी चित्रपट म्हणजे हिंदूंच्या शौर्याची विटंबना !

श्री. नित्यानंद भिसे
       हिंदुसाम्राज्यविस्तारक बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा इतका उपमर्द संजय भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात करण्यात आला आहे की, त्याला केवळ हिंदुद्रोही किंवा इतिहासद्रोही म्हणून भागणार नाही. हा चित्रपट प्रत्यक्ष पाहिल्यावर आजपर्यंत देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसींनी हिंदूंना षंढ बनवण्यासाठी इतिहास लपवल्याचा किती दुष्परिणाम भोगावा लागणार आहे, याची केवळ कल्पना करूनही अंगावर काटा आला. हिंदुद्रोह करणारे भन्साळींसारखे अनेक लोक आज समाजात आहेत. त्यांच्या हीन मानसिकतेची कल्पना यावी आणि खर्‍या शौर्यासाठी सत्य इतिहास शिकवणार्‍या हिंदु राष्ट्राची आवश्यकता स्पष्ट व्हावी, याकरिता हा लेखप्रपंच ! 
संकलक : श्री. नित्यानंद भिसे, मुंबई 

वकिली व्यवसाय करतांना न्यायालयाच्या संदर्भात साधिकेला आलेले कटू अनुभव !

अधिवक्त्या
(कु.) दिव्या बालेहित्तल
      न्यायालयाची स्थापना आरोपींना शासन करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे, या मुख्य उद्देशाने झाली; परंतु हा उद्देश साध्य होत आहे का ? न्यायालयात गेल्यावर पीडितांना पूर्णपणे न्याय मिळत आहे का ? याचे उत्तर नाही असे आहे, यात शंकाच नाही. न्यायालये स्थापन होण्याचा मूळ उद्देश संपूर्णपणे नष्ट झाला आहे. पीडित जर न्यायालयाच्या दारात न्याय मागण्यासाठी गेला, तर आरोपीपेक्षा त्यालाच अधिक यातना भोगाव्या लागतात. सध्या केवळ पैसे मिळवणे आणि प्रसिद्धी मिळवणे हेच अधिवक्ता अन् न्यायाधीश यांचे मुख्य ध्येय झाले आहे. अधिवक्ते किंवा न्यायाधीश यांनी पीडितांना न्याय द्यायचा म्हटले, तरी सध्याच्या कार्यपद्धतीत तसा वाव नाही. बहुतेक कायदे ब्रिटीश काळात सिद्ध केले होते आणि स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर आजही मख्खपणे तेच कायदे आपण पाळत आहोत. अधिवक्त्यांंना या कायद्यानुसारच लढावे लागते आणि न्यायाधिशांना पुराव्याच्या आधारावर खटल्याचा निकाल द्यावा लागतो.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

असंवेदनशीलतेची परिसीमा !

     मुंबईमध्ये निकिता शुक्ला नावाच्या एका अंध मुलीला लोकलगाडीमध्ये एका तरुणाने त्रास दिल्याची घटना घडली; मात्र यापेक्षाही संतापजनक प्रकार म्हणजे रेल्वे पोलिसांनी तिचे गार्‍हाणे प्रविष्ट करून घेतले नाही. निकिता शुक्ला चर्चगेटहून लोकलमध्ये बसली. त्या वेळी एका तरुणाने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणासाठी अंध मुलींना प्रतिकार करण्याचे काही प्रकार शिकवलेे आहेत. प्रसंगावधान राखून या कृतींचा वापर करून निकिताने तिला त्रास देणार्‍या तरुणाला मोठ्या जिद्दीने विरोध केला. एका अंध मुलीने लोकलगाडीमध्ये त्रास देणार्‍या तरुणाला विरोध करणे, ही गोष्ट अतिशय कौतुकाची आणि शौर्य दर्शवणारी आहे. यामध्ये सर्वांत संतापजनक गोष्ट म्हणजे ती विरोध करत असतांना रेल्वेच्या डब्यामध्ये असणार्‍या एकाही प्रवाशाने तिला साहाय्य केले नाही. सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

देहली, फरिदाबाद आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश येथे हिंदु जनजागृती समितीने केलेले धर्मप्रसाराचे कार्य

१. एक शाम पाकिस्तान के नाम या कव्वालीच्या कार्यक्रमाला 
अन् फॅशन शोला विरोध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन
    कराची चेंबर ऑफ कॉमर्स, पाकिस्तान दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देहली येथे ११ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत आयोजित प्रदर्शनाला आणि त्यापूर्वी एक शाम पाकिस्तान के नाम या कव्वालीच्या कार्यक्रमाला अन् फॅशन शोला विरोध करण्यासाठी फरिदाबाद येथे ४.९.२०१५ या दिवशी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. 

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठी माणसाला आणखी किती वाट पहावी लागणार ?

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
      गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे, यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

प्रभु रामचंद्राच्या चरणी केलेली प्रार्थना !

     रामचंद्रप्रभु, आमच्या दुर्भाग्याची कथा ऐका ! आमची जीवनरहाटी इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेली, न्यूनगंड जोपासणारा इतिहास आमच्या माथी !
    आस्तिकतेला तिलांजली देणारे हृदय, दौर्बल्य वाढवणारे शिक्षण ! परिणामत: प्रभु, आमच्या बुद्धीचे विलक्षण अधःपतन झाले आहे. ऋषि परंपरेतील भारतभूमीत जन्मलेले आम्ही हीन-दीन बनलो आहोत. प्रभु ! आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. या विपन्न अवस्थेतून आमचा उद्धार करा.
(संदर्भ : मासिक घनगर्जित, फेब्रुवारी २०१५)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

हिंदु राष्ट्ररूपी शिवधनुष्य पेलता येण्यासाठी गुरुदेवांना शरण जाणे आवश्यक !

श्री. प्रशांत जुवेकर
      सनातन संस्थेची शिकवण आचरणात आणणे खरंच कठीण आहे. ते एक शिवधनुष्य आहे. प्रभु रामचंद्र हे साक्षात् श्रीविष्णूचा अवतार होते. या जगन्नियंत्याला, म्हणजे जो हे संपूर्ण ब्रह्मांड चालवतो, त्याला शिवधनुष्याचे कसले भय ? तरीही प्रभु रामचंद्रांनी प्रथम गुरूंना वंदन करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. आपण तर सर्वसामान्य, अधू जीव ! सनातनचे हे शिवधनुष्य पेलण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला क्षणोक्षणी गुरुदेवांच्या चरणी शरणागत भावाने वंदन करावे लागेल. तरच आपल्याला हे हिंदु राष्ट्ररूपी शिवधनुष्य पेलता येईल !
- श्री. प्रशांत जुवेकर (८.६.२०१२)
     (मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने कारागृहात असतांना केलेले लिखाण - संकलक)

श्री दत्तमाला मंत्रपठण करतांना श्री. अविनाश जाधव यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. अविनाश जाधव
     श्री दत्तमाला मंत्राचे पठण करतांना श्रीदत्तात्रेय, योगतज्ञ प.पू. दादाजी, प.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. जाणवलेली सूत्रे
१ अ. मंत्रपठणातील साधक वयोवृद्ध असूनही श्रीकृष्णाच्या कृपेमुळे त्यांना कोणालाही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न होणे : मंत्रपठणासाठी वयोवृद्ध आणि शारीरिक सेवा करणे अशक्य असणार्‍या साधकांची निवड अधिक प्रमाणात केली होती. वयोवृद्ध असूनही नियमित पठणामुळे कुणाचा घसा दुखला किंवा ते आजारी पडले, एका जागेवर बसल्याने पाठदुखी वाढली, असे झाले नाही. सर्वांचीही सातत्याने पठण करण्याची क्षमता नसतांना श्रीकृष्णच या सर्वांच्या माध्यमातून मंत्रपठण करत आहे, असे जाणवत होते.

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

    अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

मंद बुद्धीच्या एका मुलाने साधना म्हणून औदुंबराच्या झाडाला पाणी घालणे आणि काही वर्षांनी त्याच्या बुद्धीचा विकास होऊन त्याचा विवाहसुद्धा होणे

डॉ. अजय जोशी
औदुंबराच्या झाडासंबंधी अनुभूती
      काही वर्षांपूर्वी नागपूर येथे एका इमारतीमध्ये मी दुसर्‍या मजल्यावर रहात होतो आणि तळमजल्यावर एक कुटुंब रहात होते. त्या कुटुंबात एक मुलगा मंद बुद्धीचा होता. तो प्रतिदिन हातांच्या आेंजळीत कलश घेऊन एका औदुंबराच्या झाडाला पाणी घालत असे. त्या वेळी मला साधनेचे ज्ञान नसल्यामुळे हे सगळे व्यर्थ आहे, असा विचार माझ्या मनात येत असे. कालांतराने नोकरीनिमित्त मी अन्य गावी रहात होतो. ७ वर्षांनंतर मी नागपूर येथील घरी आलो. तेव्हा एक देखणा तरुण पत्नीसमवेत तळमजल्यावर त्या घरात रहात असल्याचे मला दिसले. नंतर मला कळले, काही वर्षांपूर्वी मंद बुद्धी असलेला हाच मुलगा औदुंबराच्या झाडाला पाणी घालत असे आणि आता त्याच्या बुद्धीचा विकास होऊन त्याचा विवाहसुद्धा झाला आहे.

नम्रता आणि प्रेमभाव असलेले युरोप मधील श्री. व्लादीमीर सिर्कोविच !

श्री. व्लादीमीर सिर्कोविच
     युरोप मधील श्री. व्लादीमीर सिर्कोविच (व्लादीमीरदादा) ऑगस्ट २०१५ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेसाठी रामनाथी येथील सनातन आश्रमात आले. त्या वेळी त्यांच्या समवेत विदेशी भाषेतील सूक्ष्म-ज्ञानविषयी चित्रे पडताळण्याची सेवा करतांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती पुढे देत आहे.
१. नम्रता : दादांच्या वागण्या-बोलण्यात नम्रता जाणवते आणि ते पूर्वीपेक्षा अधिक आनंदी असल्याचे वाटते.
२. प्रेमभाव : माझा लहान भाऊ श्री. कौस्तुभ क्षत्रिय हा काही मास विदेशात शिक्षणासाठी गेला होता. तेव्हा तो व्लादीमीरदादांच्या संपर्कात होता. ते कार्यशाळेसाठी आश्रमात आल्यावर त्यांनी आठवणीने माझ्याकडे कौस्तुभची चौकशी केली.

दोन दिवस दत्तमाला मंत्रपठण केल्यावर शरिराला येत असलेली घामाची दुर्गंधी नाहीशी होऊन सेवा करण्यास शक्ती मिळणे

श्री. सुरेश कदम
     माझ्या तोंडवळ्यावर आवरण येऊन तोंडवळा काळवंडला होता, तसेच माझ्या शरिराला घामाचा दुर्गंध येत असल्याने मनावर पुष्कळ ताण आला होता. यामुळे मी इतरांमध्ये मिसळत नव्हतो. मला ताण येऊन माझा तोंडवळा आणखी काळवंडला होता. दोन दिवस असे झाल्यावर ७.१०.२०१५ या दिवशी पहाटे ४.३० वाजता उठून नामजप करतांना देवाला देवा, तूच यातून मार्ग दाखव, अशी प्रार्थना केली. त्याच दिवशी श्री. अविनाश जाधव यांनी मंत्रजपाला येऊ शकता का ?, असे विचारले. (एका संतांनी सांगितल्यानुसार रामनाथी आश्रमात संकटनिवारणार्थ मंत्रपठण चालू आहे.) 

बदल गया जीवन मेरा ।

क्या मांगू आपसे देवा ।
आपने तो बदल दिया जीवन मेरा ॥ १ ॥
जो पिछले जन्म तक बदल न सका ।
वो आपने इस जन्म में बदल दिया ॥
आप न मिलते तो क्या होता ? । 

क्रियमाणाचा योग्य वापर करून गुरूंचे आज्ञापालन उत्तम प्रकारे कसे करायचे ?, हे कृतीतून शिकवणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. ताक उपचार चालू असतांना समष्टी सेवेतील 
अडचणी पहाता शरिराला आवश्यक म्हणून एखाद्या 
वेळी काही खाल्ले, तरी चालेल, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
       पू. (सौ.) गाडगीळकाकू दौर्‍याच्या वेळी काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी ताक उपचार चालू केले. या उपचारपद्धतीमध्ये अवघड पथ्ये, जेवणाच्या वेळांचे तंतोतंत पालन करणे, न विसरता वेळेत औषधे घेणे, या सर्व गोष्टी असतात. ३ - ४ दिवसांनी पुन्हा दौर्‍यावर जाण्यापूर्वी त्या प.पू. डॉक्टरांना भेटण्यासाठी गेल्या. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, तुम्ही सेवेनिमित्त सतत बाहेर असल्याने तुम्हाला शारीरिक कष्ट भरपूर होत असतील. आपली समष्टी सेवा पहाता शरिराला आवश्यक म्हणून एखाद्या वेळी काही खाल्ले, तरी चालेल. त्या वेळी उपचारानुसारच व्हायला हवे, असे नाही. यावर पू. काकूही त्यांना हो म्हणाल्या.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

साधकांसाठी सूचना

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १३,२६६ वाचकांचे शेष नूतनीकरण १५.१.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते.
सर्व नियतकालिकांचे आगामी ३ मासांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण खाली देत आहे.
१. सर्व नियतकालिकांचे शेष नूतनीकरण 
 
 

आज्ञापालन म्हणजे काय आणि ईश्‍वरेच्छेने वागणे म्हणजे काय ?, हे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या वर्तनातून शिकायला मिळणे

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
     बर्‍याचदा मंदिरात गेल्यानंतर महर्षींच्या आदेशाप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् आम्हाला तेथील पुजार्‍यांना दक्षिणा देण्यास सांगतात. कधी ते दक्षिणेमध्ये प्रत्यक्ष किती रुपये द्यायचे हे सांगतात, तर कधी तुम्ही दक्षिणा द्या, असे सांगतात. तेव्हा पैसे किती द्यायचे, हे आपण ठरवायचे असते. महर्षी जसे सांगतील तसे आज्ञापालन करणे अपेक्षित असते.
१. प्रत्येक गोष्ट महर्षींना विचारून करणेच 
अपेक्षित आहे, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी शिकवणे
      एकदा तिरुवण्णामलई येथील मंदिरात गेल्यानंतर पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी पुजार्‍यांना दक्षिणा देण्यासाठी खिशातून पैसे काढले. त्या वेळी मी श्री. विनायक शानबाग यांना म्हटले, त्यांना सांगा, आपण नको, तर आम्ही दक्षिणा देतो. त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् एकदम म्हणाले, तुम्हाला पैशांचा अहं झाला आहे का ? येथे दक्षिणा देण्यास महर्षींनी मला सांगितले आहे. तेव्हा मीच येथे दक्षिणा देणार. जेव्हा मी तुम्हाला दक्षिणा देण्यास सांगीन, तेव्हाच केवळ तुम्ही ती द्यावी. मधे मधे हस्तक्षेप करू नये. यावरून कळले की, प्रत्येक गोष्ट महर्षींना विचारूनच करणे अपेक्षित आहे. तेव्हा मी महर्षींची मनोमन क्षमा मागितली. (या प्रसंगात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना पाहून मला प.पू. भक्तराज महाराजांची (बाबांची) आठवण झाली. प.पू. बाबाही असेच रागवायचे; परंतु त्यांच्या रागवण्यातही प्रेम असायचे आणि यातूनही अध्यात्मच शिकायला मिळायचे. तसेच हे आहे. - (पू.) सौ. गाडगीळ)

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर फलक उपलब्ध !
 
१२ जानेवारी २०१६ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची दिनांकानुसार जयंती आहे, त्यानिमित्त प्रबोधनासाठी २.२५ X ३.५ फूटाचा १ आणि ८ X ७ फूट या आकारांतील ५ फलक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहेत. या फलकांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा ग्रंथप्रदर्शने, देवस्थाने, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !
आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांना विचारूनच घेतले पाहिजेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.६.२०१५)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रमाची कास धरा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     ईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

लोकराज्याचा दुर्लक्षित स्तंभ !

संपादकीय 
    गोवा राज्यात भारतीय न्यायव्यवस्था या विषयावर नुकतीच एक व्याख्यानमाला पार पडली. या व्याख्यानमालेत भारताचे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी सहभागी झाले होते. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब आणि प्रलंबित प्रकरणे हाच भारतीय न्यायव्यवस्थेचा सर्वात मोठा अवगुण आहे. उच्च न्यायालयात ५० लाख, तर सर्वोच्च न्यायालयात ७५ सहस्र प्रकरणे प्रलंबित असून संपूर्ण देशात ३ कोटी खटले सुनावणीविना प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी देशातील न्यायमूर्तींची वा न्यायाधिशांची संख्या वाढवणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. न्यायव्यवस्थेच्या एकूण कारभाराविषयी त्यांनी माहितीपर विवेचन केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn