Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खासदारांचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये होण्याची शक्यता !

प्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना
वेतनवाढ नको, असे एकतरी खासदार सांगतो का ?
अर्थमंत्रालयाच्या संमतीची प्रतीक्षा
      नवी देहली - देहलीतील आमदारांच्या पाठोपाठ आता संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनातही भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना निवृत्तीवेतनाचाही लाभ मिळणार आहे.
१. केंद्रशासनाने खासदारांच्या मूळ वेतनात प्रतिमास ५० सहस्र रुपयांची वाढ करून ते १ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
२. खासदारांच्या मतदारसंघासाठी मिळणारा भत्ता दुप्पट म्हणजे ४५ सहस्र रुपयांवरून ९० सहस्र रुपये करण्याचा शासनाचा विचार आहे

राममंदिर उभारण्याचा निर्णय धर्माचार्य आणि हिंदू घेतील ! - विहिंप

     अयोध्या - राममंदिर उभारण्याचा निर्णय धर्माचार्य आणि हिंदू घेतील, अशी भूमिका विश्‍व हिंदु परिषदेने घेतली आहे. विहिंपचे वरिष्ठ नेते श्री. त्रिलोकीनाथ पांडेय यांनी ही माहिती दिली. राममंदिराच्या उभारणीसाठी विहिंपकडून अयोध्येत शिळा एकत्रित करण्याचे देशव्यापी अभियान हाती घेण्यात आले आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. पांडेय बोलत होते. याविषयी श्रीराम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदासजी महाराज म्हणाले, केंद्रात एक हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आल्यानंतर राममंदिराच्या उभारणीच्या कार्यात गती येईल, असे आम्हाला वाटले होते;

सोळशी (जिल्हा सातारा) येथील शनीच्या चौथर्‍यावर धर्मद्रोही अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी केला प्रवेश !

धर्माभिमानी हिंदूंनो, महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली हिंदु धर्मावर 
हेतुपुरस्सर वारंवार आघात करण्याचा धर्मद्रोह्यांचा डाव ओळखा !
संत आणि हिंदुत्ववादी यांच्याकडून संताप व्यक्त
     सातारा - २३ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता युवक क्रांती दलाच्या अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी सोळशी (जिल्हा सातारा) येथील शनीच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासमवेत अन्य महिलांसह महिला आणि पुरुष पोलीस यांचाही फौजफाटा होता. काही वेळात घटनास्थळी वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या श्रीमती विजयाताई भोसले, तसेच शिवसेना, हिंदु जनजागृती समिती यांच्या महिला पदाधिकारी पोहोचल्या; मात्र त्यांना पाहिल्यावर अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांनी काढता पाय घेतला

नागपूर रेल्वे स्थानकाला प.पू. डॉ. हेडगेवार यांचे नाव द्यावे !

नागपूर विधिमंडळाबाहेर भाजपच्या आमदारांची आंदोलनाद्वारे मागणी 
     नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी असणार्‍या नागपूरचे देशाच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. या भूमीतून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि युगपुरुष प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रकार्य करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. नागपूरातूनच संघाच्या माध्यमातून राष्ट्रकार्याची चळवळ देशभर फोफावली. लाखो देशभक्तांच्या पिढ्या संघाने घडवल्या आहेत. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकाला प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. नरेंद्र बाबुराव पवार यांनी केली.

भाविकांनी अर्पण केलेले सोने वितळवल्याने धर्मभावना दुखावण्याची देवस्थानांना चिंता !

 • सुवर्ण मुद्रीकरण योजनेचे प्रकरण
 • अनेक देवळांची माघार काहींनी विचार करण्यासही दाखवली असमर्थता
      नवी देहली - देशातील देवळांत भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्यावर डोळा ठेवून शासनाने सुवर्ण मुद्रीकरण योजना आणली. तिला प्रारंभी प्रतिसाद मिळाला नाही; मात्र मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि शिर्डीचे साईबाबा मंदिर यांनी अनुक्रमे ४० आणि २०० किलो सोने वितळवण्याची सिद्धता दर्शवली. असे असले, तरी भाविकांनी दागिन्यांच्या रूपात दिलेले हे सोने वितळवून त्याची बिस्कीटे केली जाणार असल्याने या देवस्थानांच्या विश्‍वस्तांना धास्ती लागली आहे.

मंदिरांतील सोने शासकीय योजनेत जमा करणे, हे भक्तांच्या श्रद्धांचे हनन ! - हिंदु जनजागृती समिती

जे छोट्याशा हिंदु जनजागृती समितीला लक्षात येते, ते मंदिरांचा 
कारभार पहाणार्‍या व्यवस्थापनाला का लक्षात येत नाही ?
     मुंबई - केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने २०० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे देवनिधीचा अयोग्य वापरच ! भक्तांनी अर्पण केलेले सोन्याचे अलंकार वितळवून त्याच्या सोन्याच्या विटा बनवणे, हा निर्णय भाविकांच्या श्रद्धेचे हनन करणारा आहे. देवळांनी देवतांच्या अलंकाराची अशा प्रकारे सुवर्ण मुद्रिकरण योजनेद्वारे विल्हेवाट लावू नये,

सोमालिया या इस्लामी देशात ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी

      अल्पसंख्यांकाच्या नावाखाली आणि मतांच्या लालसेपायी भारतीय राज्यकर्ते अन्य धर्मियांना हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. तरी भारतात असुरक्षितता आणि असहिष्णुता असल्याची ओरड केली जाते. अशांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     मोगादिशु - सोमालिया हे इस्लामी राष्ट्र आहे. ख्रिसमस साजरा केल्याने येथील मुसलमान जनतेच्या धार्मिक आस्थेला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. असे कारण सांगत तेथे ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तेथील धार्मिक बाबींशी संबंधित असणार्‍या मंत्रालयाचे ही घोषणा केली आहे.
     या मंत्रालयाने सांगितले आहे की, ख्रिसमस हा सण कुठल्याही स्थितीत इस्लामशी संबंधित नाही. त्यामुळे सोमालिया या इस्लामी राष्ट्रात तो साजरा करण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे देशात अशा प्रकारे ख्रिसमसनिमित्त कोणता कार्यक्रम आयोजित केला जात नाही ना ?, याकडे सुरक्षा अधिकार्‍यांना बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

ख्रिसमस ट्री देऊ शकते तुम्हाला आजारपण ! - संशोधक

सध्या हिंदूंमध्येही ख्रिसमस ट्री उभारून ख्रिसमस साजरा करण्याची टूम निघाली आहे ! 
हे हिंदू याकडे लक्ष देतील का ?
     मुंबई - ख्रिसमस ट्री केवळ आजारपणच देत नाही, तर कधी कधी धोकादायक आणि दीर्घकालीन रोगांचे निमित्तही होऊ शकते. २५ डिसेंबरच्या उत्सवाच्या काळात जेव्हा श्‍वसनासंबंधी रोगांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले, तेव्हा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या अपस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ने यावर संशोधन केले. या संशोधनानंतर सिद्ध केलेल्या अहवालात ख्रिसमस ट्री स्वास्थ्यासाठी हानीकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशोधनाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. लॉरेन्स कुरलेंडस्की म्हणाले, माझ्याकडे असे रुग्ण आले आहेत, ज्यांच्यात आजारपण आणि ख्रिसमस ट्री यांचा दाट संबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांचा मंगळुरू येथील कार्यक्रम रहित करा !

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद
डावीकडून श्री. मंजुनाथ, अधिवक्ता श्री. शशीकुमार,
श्री. मोहन गौडा आणि श्री. हर्षवर्धन शेट्टी
     बेंगळुरू - राज्यातील दक्षिण कन्नड जिल्हा हा अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वादग्रस्त आणि जिहादी आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या कार्यक्रमाला शासनाने अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या परिषदेला सर्वश्री उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता श्री. शशीकुमार, अधिवक्ता श्री. विवेक सिंह, धर्माभिमानी श्री. मंजुनाथ हिंदु जनजागृती समितीचे मोहन गौडा आणि सनातन संस्थेचे श्री. हर्षवर्धन शेट्टी उपस्थित होते.

कॅनडातील संस्कृत भारतीकडून संस्कृत भाषेचा प्रचार

     टोरंटो (कॅनडा) - येथील संस्कृत भारती केंद्र एक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था असून कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये संस्कृतच्या प्रसाराचे कार्य करते. या केंद्राच्या वतीने संस्कृत भाषेचा वापर नेहमीच्या व्यवहारात करण्यासाठी या भाषेत संभाषण करण्याचे बहि:शाल शिक्षण वर्ग घेण्यात येतात. त्याचबरोबर प्रवेश, परिचय, कोविद अशा विविध स्तरावरील परीक्षांचेही आयोजन करण्यात येते. 
     या केंद्राकडून नुकत्याच आयोजित परीक्षांमध्ये ११ वर्षांच्या मुलापासून ते ७० वर्षीय वृद्धानेही भाग घेतला होता. त्यात कॅनडातील बृहन-टोरंटो विभाग आणि अमेरिकेतील बफेलो राज्यातील परीक्षार्थींचा समावेश होता. या कार्यक्रमाला बृहन-टोरंटो विभागातील २५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंहस्थ महाकुंभामध्ये सोनिया आणि राहुल गांधी रहाणार उपस्थित !

गेली अनेक दशके हिंदूंना छळण्याची एकही संधी न सोडणार्‍या काँग्रेसची 
पापे महाकुंभाला भेट दिल्याने धुवून निघणार का ? 
     उज्जैन - सिंहस्थ महाकुंभामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव राहुल गांधी उपस्थिती लावणार आहेत. गांधी कुटुंबीय कुंभमेळ्यात टीकरमाफी आश्रम आणि द्वारका शारदापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतील. याला स्वामी हरिचैतन्य ब्रह्मचारी यांनी दुजोरा दिला आहे.
    माहितीनुसार उत्तरप्रदेशच्या अमेठीमध्ये स्वामी हरिचैतन्य ब्रह्मचारी यांचा मोठा आश्रम आहे. हा आश्रम टीकरमाफी नावाने चालवला जातो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून या आश्रमाशी गांधी कुटुंबियांचे संबंध आहेत. राजीव गांधी यांच्या नंतर ही परंपरा आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी चालवत आहेत.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले 

श्री एकवीरादेवी मंदिराचे संरक्षण करावे !

कार्ला गडावरील श्री एकवीरादेवीचे मंदिर अवैध ठरवल्याचे प्रकरण
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी
      पिंपरी - येथील मावळ तालुक्यातील कार्ला लेणी येथे श्री एकवीरादेवीचे मंदिर सन १२३९ पासून वसलेले आहे. या देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. श्री एकवीरादेवी मंदिराची जागा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते आणि त्याची तशी नोंदही विभागाकडे आहे. असे असतांनाही काही दिवसांपूर्वी मावळ तहसीलदारांनी हे पुरातन मंदिर अवैध असल्याचे घोषित करून ते पाडण्याची नोटीस मंदिर विश्‍वस्तांना बजावली होती. (मावळ तहसीलदारांनी अशी कारवाई करण्याचे धाडस मशीद आणि चर्च यांच्याविषयी दाखवले असते का ? - संपादक)

पुणे येथे गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
      पुणे - डेक्कन येथील आपटे रस्त्यावर २२ डिसेंबर या दिवशी दुपारी रस्त्याने बंदूक घेऊन फिरणार्‍या एका अज्ञात गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर त्या गुन्हेगाराने गोळीबार केला. सुदैवाने ती गोळी एका कर्मचार्‍याच्या बुटाला चाटून गेल्याने ते वाचले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले असल्याचे समजते. (पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे हे द्योतक आहे. गुन्हेगारच जर पोलिसांवर हल्ला करत असतील, तर गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपला असल्याचे स्पष्ट होते. - संपादक) १. पोलीस हवालदार मयूर भोकरे आणि संदेश खडके हे अ‍ॅक्टिवा गाडीवरून (एम्.एस्. १२ जे टी २३७३) पुणे येथील सावरकर भवन परिसरातून जात होते.

'शिवशक्ती फूड्स'च्या उत्पादनावरील देवीचे चित्र काढण्याची व्यापार्‍याची सिद्धता !

हिंदु जनजागृती समितीद्वारे प्रबोधन 
     मुंबई - भाईंदर येथील 'शिवशक्ती फूड्स' यांची 'माँ काली' नावाने छापलेली कुरमुर्‍याची पिशवी कचर्‍यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्‍यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि देवीचा भक्त म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी आस्थापनाचे मालक श्री. अनिल देने यांना दूरभाष केला. श्री. वटकर त्यांना म्हणाले, "चित्रातील त्रिशूळाच्या आकारात नथ, डोळे आणि चेहरा दाखवलेली कालीमाता दाखवण्यात आली आहे. हे चित्र असलेली पिशवी शौचालय, कचरा, गटार येथे टाकल्यास देवतेचा अपमान होऊ शकतो. यामुळे पापही लागते." त्यानंतर श्री. देने यांनी प्लास्टिकच्या पिशवीवरील देवतांची चित्रे काढून टाकण्याचे मान्य केले आणि श्री. वटकर यांचे आभारही मानले. (प्रबोधनानंतर पिशवीवरील चित्र काढून टाकण्याचे तत्परतेने मान्य करणारे श्री. अनिल देने यांचे अभिनंदन ! - संपादक) 

युवकांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावे ! - आनंद पटवर्धन, प्रतापगड उत्सव समिती, वाई

सातारा येथे हिंदु धर्मजागृती सभा 
     सातारा, २४ डिसेंबर (वार्ता.) - अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कायदा धाब्यावर बसवणारे आजचे राज्यकर्ते बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची गळचेपी करत आहेत. राज्यघटनेने सर्वांना दिलेले धार्मिक स्वातंत्र्यसुद्धा हिंदूंना मिळू दिले जात नाही. दिवसेंदिवस वाढत असलेला भ्रष्टाचार, अनैतिकता यांनी परमोच्च सीमा ओलांडल्या आहेत. 'लव्ह जिहाद', पाश्‍चात्यांंचे 'डे' यांसारख्या संस्कृतीवरील आक्रमणांमुळे हिंदूंची स्थिती दयनीय होत आहे. या धर्मावरील सर्व आघातांना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे. यासाठी युवकांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावे, असे प्रतिपादन प्रतापगड उत्सव समितीचे श्री. आनंद पटवर्धन यांनी येथील हिंदु धर्मजागृती सभेत केले. या सभेला ९५० धर्माभिमानी उपस्थित होते. 

३१ डिसेंबरला होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यवतमाळ, नंदुरबार येथे निवेदन v

यवतमाळ येथे पोलीस प्रशासनाला निवेदन 
पोलिसांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
    यवतमाळ - नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर रोजी राज्यातील किल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री, प्रेक्षणीय स्थळी आणि सार्वजनिक स्थळी होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी प्रजापती म्हणाले, ३१ डिसेंबरला पोलीस पहार्‍याचे प्रमाण वाढवण्यात येईल, तसेच कोणाची तक्रार आल्यास त्याची तात्काळ नोंद घेण्यात येईल

महाराष्ट्र सदनप्रकरणी भुजबळांना क्लीन चिट नाही ! - मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

      नागपूर - महाराष्ट्र सदन अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सुयोग निवासस्थानी नुकतीच पत्रकारांशी बोलतांना दिली.
     श्री. फडणवीस पुढे म्हणाले, या अपव्यवहाराची चौकशी चालू आहे. त्यामुळे भुजबळ किंवा अन्य कोणत्याही आरोपीला क्लीन चिट दिलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या अपव्यवहाराच्या संदर्भात काही प्रश्‍नही संशयित आरोपींना विचारण्यात आले आहेत.

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीकडून देवतांचे विडंबन रोखण्यासंदर्भात बँक व्यवस्थापकांचे प्रबोधन 
     सिन्नर (नाशिक), २४ डिसेंबर (वार्ता.) - येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले आणि नगरपालिका अन् तहसील कार्यालय यांना निवेदनही दिले. 
     सिन्नर येथील नगरपालिकेच्या अखत्यारीत येणार्‍या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामधील कोपर्‍यांमध्ये हिंदु देवता आणि साधू-संत यांचे चित्र असलेल्या टाईल्स लावल्या आहेत. जिन्यातील कोपर्‍यामध्ये कुणी थुंकू नये; म्हणून या टाईल्स लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या टाईल्सवरच थुंकल्याचे निदर्शनास आले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ज्ञानेश्‍वर भगुरे आणि अविनाश पवार यांनी बँकेचे व्यवस्थापक राकेश कुमार यांना बाहेर बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला, तसेच सदर टाईल्स काढून टाकण्याची विनंतीही केली. यावर व्यवस्थापकांनी 'लोकांनी येथे थुंकू नये म्हणूनच टाईल्स लावल्याचे सांगून तुम्हीच थुंकणार्‍या लोकांचे प्रबोधन करा', असे उर्मट उत्तर दिले. (असे उद्धटपणे बोलण्याचे धाडस बँक व्यवस्थापकांनी अन्य धर्मियांच्या बाबतीत केले असते का ? - संपादक) यावर श्री. भगुरे यांनी, 'सर्वधर्मसमभाव असलेल्या आपल्या देशात याच चित्रांजवळ चांदतारा, मशीद आणि क्रॉसचे चित्र लावण्याची तुमची हिंमत आहे का', असे विचारल्यावर राकेश कुमार यांनी, 'ही जागा नगरपालिकेची असून आम्ही भाडेतत्त्वावर वापरत असल्याने तुम्ही नगरपालिकेस निवेदन द्या', असे सांगितले. 

भू-विकास अधिकोषाच्या थकित २३३ कोटी रुपये कर्जमाफीची मागणी सहकारमंत्र्यांनी फेटाळली !

राज्यातील २७ भू-विकास अधिकोष (बँका) अवसायनात ! 
     नागपूर, २४ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील भू-विकास अधिकोषांकडे (बँकेकडे) स्वनिधी नसल्याने मागील १७ वर्षांपासून शेतकर्‍यांना कर्जवाटप बंद आहे. राज्यशासनाचे अंदाजे १ सहस्र ८९७ कोटी रुपये इतके कर्ज येणे आहे. त्यामुळे भू-विकास अधिकोषाला राज्यशासनाची थकहमी मिळणार नाही. परिणामी अधिकोषास नाबार्डचे पुनर्वित्त प्राप्त होणार नाही. 'एकरकमी कर्ज परतफेड' योजनेच्या अंतर्गत शासनाने भू-विकास अधिकोषातील थकबाकीदार शेतकर्‍यांना ९४६ कोटी थकित कर्जापैकी ७१३ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. उर्वरित २३३ कोटी रुपये कर्जाची रक्कम शेतकर्‍यांनाच भरावी लागणार आहे, असे सांगून सहकारमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी शेतकर्‍यांना २३३ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची सदस्यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. 

स्वारगेट येथे माजी सैनिकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

जनतेमध्ये पोलिसांविषयीचा धाक का अल्प झाला आहे, याचे आत्मचिंतन
पोलीस प्रशासन आणि गृहविभाग यांनी करायला हवे !
      पुणे - येथील स्वारगेट भागातील व्होल्गा चौकामध्ये वाहतूक पोलीस राजेंद्र गिरी हे २१ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावत होते. त्या वेळी माजी सैनिक निरंजन केदारीसिंग आणि दिप्यो लोचन वृंदावन बेहरा हे दोघे वाहतूक नियंत्रकाचा (सिग्नल) नियम मोडून जात होते. तेव्हा गिरी यांनी त्या दोघांना थांबण्याची सूचना केली, पण ते न थांबल्यामुळे गिरी यांनी त्यांना पकडले. तरीसुद्धा आरोपींनी न थांबता गिरी यांना त्यांच्या समवेत फरफटत नेले आणि त्यांना मारहाण केली.

अभिनेता संजय दत्त मार्च २०१६ मध्ये सुटणार

चक्रावणारा न्याय ! 
     पंढरपूर, २४ डिसेंबर - वर्ष १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या कालावधीत अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याला त्याच्या शिक्षेच्या कालावधीत कोणतीही सवलत किंवा विशेष माफी दिलेली नाही. सर्वसामान्य कैद्याला कायद्याप्रमाणे जी सवलत दिली जाते, तीच त्यालाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे तो मार्च २०१६ मध्ये कारागृहातून सुटणार आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. 

संभाजीनगर येथे मंदिरे पाडण्याच्या विरोधात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर

मंदिरांच्या रक्षणासाठी विविध माध्यमांतून कृती करणारे 
शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांचा आदर्श सर्वत्रचे हिंदु नेते घेतील का ? 
केंद्रीय गृहमंत्री श्री. सिंह (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. खैरे

     संभाजीनगर - शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगर मंतदरसंघातील वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ६ मंदिरे अतिक्रमणाच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाने पाडली आहेत, तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरांवर अशी कारवाई होणार आहे. याविरोधात खैरे यांनी २२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना या विषयावर विस्तृत निवेदन सादर केले आणि मंदिरे पाडण्याची कारवाई स्थगित करावी, अशी विनंती केली आहे.

नाशिक येथे कुंभमेळ्याच्या कालावधीत अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला !

हिंदूंसाठी अमृततुल्य असणार्‍या अशा कुंभमेळ्याविषयी 
बिनबुडाचे आरोप करून त्याचा अवमान करणार्‍यांना चपराक ! 
     नागपूर, २४ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - नाशिक येथे कुंभमेळ्यातील आखाड्याचे ध्वजारोहण झाल्यानंतरच्या २ मासांच्या कालावधीत तेथे उपस्थित रहाणार्‍या साधूंकडून दिवसाकाठी १२० कोटी रुपयांच्या गांजाची उलाढाल झाली आहे, असा प्रश्‍न सदस्य त्र्यंबकराव भिसे आणि अमीन पटेल यानी आज विधानसभेत लेखी प्रश्‍नोत्तरात विचारला; मात्र हा आरोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. 

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात संस्कृत अध्यापक महाविद्यालय चालू करणार !

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांची स्तुत्य घोषणा
      मुंबई - रामटेकमधील कालिदास संस्कृत विद्यापीठ अन्य कुठेही हालवण्याची योजना नाही. आज संस्कृत शिकवण्यासाठी शिक्षक अल्प असल्याने संस्कृतचा विस्तार थंडावला आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला प्राधान्य देण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात एक अनुदानित संस्कृत अध्यापक महाविद्यालय (बीएड् कॉलेज) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना केली. विधानसभेत मल्लिकार्जुन रेड्डी, चरण वाघमारे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला होता.
     वर्धा मार्गावरील कालडोंगरी येथील याच विश्‍वविद्यालयाचे उपकेंद्र चालू करण्याचा आमचा मानस आहे, असेही तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले. यावर आक्षेप घेणारे आमदार सुनील केदार यांना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या १५ वर्षांत तुमच्या शासनाने या विद्यापिठाला एक इंचही भूमी दिली नाही. तसेच निधीसुद्धा दिला नाही. त्यामुळे तुम्ही उलट विनोद तावडे यांचे अभिनंदन केले पाहिजे. 

(म्हणे) मुसलमानांनी आतंकवादाची निर्मिती केली नाही ! - प्रा. झहीर अली

     पुणे, २४ डिसेंबर (वार्ता.) - सध्या आतंकवादाच्या शंभराहून अधिक व्याख्या उपलब्ध आहेत. प्रादेशिक आतंकवाद, राजकीय आतंकवाद असे त्याचे प्रकार आहेत. आतंकवाद हा नवीन जन्माला आला नसून तो पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मुसलमानांनी आतंकवादाची निर्मिती केलेली नाही. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेच आतंकवादाला जन्म दिला आहे, जो आजच्या मुसलमानांकडून वापरला जात आहे. जे आतंकवादी पकडले जातात ते मुसलमान असल्याने मुसलमानांनी आतंकवाद चालू केल्याचे बोलले जाते, असे वक्तव्य प्रा. झहीर अली यांनी केले. एस्.एम्. जोशी सभागृहात हमीद दलवाई स्टडी सर्कलच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (आजवरचा जगाचा इतिहास पाहिल्यास आतंकवादाचा उगम कुठून झाला, हे लक्षात येईल. ज्यांच्या शिकवणीतच काफिरांना ठार मारण्याचे आदेश आहेत, त्या पंथामध्ये अली यांना आतंकवादाचा नाही, तर मग काय सहिष्णुतेचा भास होतो का ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

प्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना 
खासदारांच्या वेतनात वाढ करणे कितपत योग्य ?
     संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना निवृत्तीवेतनाचाही लाभ मिळणार आहे.

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आज वाहनफेरी

दिनांक : २५ डिसेंबर २०१५
स्थळ : व.वा. वाचनालय, स्टेशन रोड, जळगाव.
वेळ : सकाळी ९.३० वाजता
या फेरीत मोठया संख्येने सहभागी व्हा !

फलक प्रसिद्धीकरता

प्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना 
खासदारांच्या वेतनात वाढ करणे कितपत योग्य ?
     संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना निवृत्तीवेतनाचाही लाभ मिळणार आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : MPke vetan me badhotari kar vah har mah 2 lakh 80 sahastra rupaye karne ka prastav.
Deshme karodo log adhepet sote hai, aiseme kya ye badhotari sahi hai ?
जागो ! : सांसदों के वेतन में बढोतरी कर वह हर माह २ लाख ८० सहस्र रुपये करने का प्रस्ताव
देश में करोडो लोग आधेपेट सोते है, ऐसे मे क्या ये बढोतरी सही है ?


मुंबई येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अफझलखान वधाचे पथनाट्य

     मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मुंबई विभागाच्या वतीने 'शिवप्रतापदिनी' अफझलखान वधाचे पथनाट्य सादर करण्यात आले. विलेपार्ले (पू.) येथील श्री शिवाजी नगर आणि श्री शहाजी नगर येथे हा कार्यक्रम झाला. विलेपार्ल्यातील स्थानिक नागरिकांचा या पथनाट्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

अब्दुल वाजिद शेखचा 'आय.एस्.आय.एस्.' शी संबंध नाही !

     कथित कारणांवरून निरपराध हिंदूंना अनेक वर्षे कारागृहात अडकवून ठेवणारे पोलीस आतंकवादी बनू पहाणार्‍या धर्मांधांना मात्र निर्दोष ठरवून त्वरित सोडतात ! पोलिसांच्या अशा अन्वेषणामुळे हिंदूंचा पोलिसांवरील विश्‍वास उडाल्यास त्यात चूक ते काय ? 
आतंकवादविरोधी पथकाची माहिती 
      पुणे, २४ डिसेंबर - आतंकवादविरोधी पथकाने पुणे येथून कह्यात घेतलेल्या मुंबईच्या मालाड-मालवणी येथील अब्दुल वाजीद शेख याचा 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया' (आय.एस्.आय.एस्.) या आतंकवादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. त्याचबरोबर तो 'आय.एस्.आय.एस्.' च्या संपर्कात आला नसून त्याला त्याच्या घरी आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे. अब्दुल वाजिद शेख हा पदवीधर असून त्याचा छोटा व्यवसाय आहे. त्याच्याकडे अद्याप पारपत्र नसून त्याने त्यासाठी आवेदनही केलेले नाही. यापूर्वी 'आय.एस्.आय.एस्.'च्या संपर्कात आलेल्या तरुणांसमवेत त्याचा कोणता संबंध आलेला नाही. त्याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेली नाही. (असे असले, तरी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे ! - संपादक) त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाचे साहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली. 

मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने '३१ डिसेंबर प्रबोधन फेरी !'


 • दिनांक : २६ डिसेंबर, शनिवार 
 • वेळ : दुपारी ४.३० 
 • स्थळ : पानिपत मैदान, नागरदास मार्ग, अंधेरी पूर्व 

 • दिनांक : २७ डिसेंबर, रविवार
 • वेळ : दुपारी ४ 
 • स्थळ : चिंचोळी तलाव, जुईनगर 

 • दिनांक : २७ डिसेंबर, रविवार
 • वेळ : दुपारी ४.३० 
 • स्थळ : भारतमाता चित्रपटगृहासमोर, लालबाग
संपर्क : ९९२०२०८९५८

 हिंदूंनो, या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात जागतिक स्तरावर मोहीम आवश्यक !

    इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात आय.एस्.आय.एस्. या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेच्या जाळ्यात पुण्यातील एक अल्पवयीन मुलगी सापडली. त्यामुळेे या संघटनेचा धोका आणि वाढती व्याप्ती यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसवरील आतंकवादी आक्रमण, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील गोळीबार आणि रशियाचे विमान पाडण्यामध्ये आय.एस्.आय.एस्.चा हात असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. 

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. त्याविषयी काही सूत्रे पुढे दिली आहेत.

प्रसारमाध्यमांनो, सत्याचा विजय होऊन असत्याचा पराभव होणारच आहे, हे लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ वृत्ते प्रसिद्ध करा !

श्री. कुशल गुरव
     काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे सनातन संस्थेच्या बंदीविषयीची जी काही वृत्ते प्रसारित करत आहेत, त्यामुळे या वृत्तवाहिन्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. ना कुणाची पर्वा, ना लाज, ना भीती ! तोंडाला येईल, ते बोलत आहेत. काय म्हणावे या वृत्तवाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना ? सत्य आणि असत्य यांचे ज्ञानही नसल्यासारखी ही वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या का वावरत आहेत ? टी.आर्.पी. वाढवण्यासाठी कि विदेशातून पैसा मिळतो म्हणून ? 
     अशा प्रसारमाध्यमांनी दिलेल्या खोट्या वृत्तांमुळे जनतेला खर्‍या वार्ता कळत नाहीत. त्यामुळे लोकांचा यांच्यावरील विश्‍वास उडाला आहे. याचा या प्रसारमाध्यमांनी विचार करावा. तत्त्वनिष्ठेने जनतेची सेवा करावी.

भ्रमणभाषचा गैरवापर !

     देहली येथे चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर एका अल्पवयीन आरोपीची कायद्यातील पळवाटांमुळे सुटका झाली; परंतु स्त्रियांवरील अत्याचाराचा ऐरणीवर आलेला प्रश्‍न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. आज शाळकरी मुलांमध्ये वाढत चाललेला भ्रमणभाष आणि त्या माध्यमातून होणारा इंटरनेचा वापर, तसेच त्यांच्याकडून सर्फिंग (शोधली जाणारी) होत असलेली अश्‍लील संकेतस्थळे, यांमुळे त्यांच्याकडून अनैतिक कृत्ये घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात मुलांच्या हातात महागडे भ्रमणभाष पडले आहेत, त्याचेच हे दुष्परिणाम आहेत.

श्रीकृष्णाची कृपा असणारी सनातन संस्था आणि नरकासुराचे वंशज असणारे गोव्यातील काही सनातनद्वेष्टे !

श्री. चेतन हरिहर
१. नरकासुर हा शब्द उच्चारताच त्याचे क्रूर रूप, त्याचे अत्याचार 
आणि त्याला मारणारा श्रीकृष्ण दृष्टीसमोर येणे 
     वाचकहो, मथळा वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटत असेल. नरकासुर या शब्दाचा केवळ उच्चार केला, तरी त्याचे डोक्यावर शिंग असलेले भयानक मुख आणि हातातील भयानक आयुधे डोळ्यांसमोर येतात. त्याने त्या काळी केलेल्या अत्याचारांविषयी आपल्या मनात चीड निर्माण होते. अशा क्रूर नरकासुराचा वध श्रीकृष्णाने नरकचतुर्दशीच्या दिवशी केला; म्हणून गोव्यात या दिवशी नरकासुराची प्रतिकृती जाळण्याची प्रथा रूढ आहे आणि हे योग्यच आहे. 

हिंदूंच्या सण-उत्सवांना आलेले बाजारी स्वरूप आणि त्याचे कारण !

      आजच्या आपल्या सण आणि उत्सव यांना आलेले आवाजी आणि बाजारी स्वरूप सर्वांनाच हतबल करणारे आहे. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की, दहीहंडी असो, त्यांचे आजचे रस्त्यावरचे स्वरूप या सणांच्या पावित्र्यालाच नाही, तर मूळ उद्देशालाही हरताळ फासणारे आहे. त्यांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतच्या मिरवणुकांमधील हिडीस नाच आणि फेविकॉलपासून मुन्नी बदनामसारखी त्यामध्ये वाजवण्यात येणारी गाणी पाहून हे सण देवांचे आहेत कि दानवांचे, असा प्रश्‍न पडला आहे !! यांमध्ये नवीन सणांची भर पडत आहे. आता गुढीपाडवाही ढोल-ताशांनी त्यामध्ये समाविष्ट झाला आहे. या सगळ्या प्रकारांना सगळ्याच राजकीय पक्षांचा असलेला पाठिंबा आश्‍चर्यापेक्षा चीड आणणारा आहे. आजच्या आपल्या देवळांची भयानक परिस्थिती, गंगेपासून सर्वच पवित्र नद्यांचे आपण केलेले प्रदूषण आणि महाकुंभापासून अर्धकुंभामधील गोंधळ, अस्वच्छता आणि चेंगराचेंगरी, धर्ममार्तंडांच्या दिवाळखोरीविना दुसरे काय दाखवतात ? (संदर्भ : संपादकीय, त्रैमासिक सद्धर्म, एप्रिल २०१५)

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमध्ये झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

१. ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन
     झुंझुनू येथे विश्‍वप्रख्यात राणी सतीच्या जत्रेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनासाठी जागा आणि मंडप येथील श्री चावोदादी मंदिराचे श्री. उमेशजी खेतान यांनी उपलब्ध करून दिले. 
२. शाळेतील मातृसंमेलनात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन
      सोज रोड (जिल्हा पाली) येथील आदर्श विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. राजेश गेहलोत यांनी विद्यालयात मातृ संमेलनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी सनातन संस्थेच्या सौ. सुशीला मोदी यांना प्रवचन घेण्यासाठी आमंत्रित केले होते. सौ. मोदी यांनी आपल्या प्रवचनामध्ये ६५ जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने तेथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

मराठी भाषेची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करणे आवश्यक !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी राजभाषा 
यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर 
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
      गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे, यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

      देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ आणि २० डिसेंबर असे दोन दिवसीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मान्यवरांनी मांडलेले काही उद्बोधक विचार आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
सर्व विचारधारेच्या हिंदूंना एकत्र आणण्याचा समितीचा प्रयत्न अद्भूत ! 
- सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता मधुमुकुल त्रिपाठी
श्री मधुमुकुल त्रिपाठी
आज हिंदूंवर चोहोबाजूंनी आणि सर्व प्रकारची संकटे घोंघावत आहेत. अशा स्थितीत हिंदूंच्या सर्व विचारधारांना हिंदु राष्ट्राच्या प्रेरणेने एका व्यासपिठावर आणण्याचा हिंदु जनजागृती समितीचा प्रयत्न अद्भूत आहे. सर्व संघटनांनी आपला अहंकार बाजूला ठेवून भारताला गौरवशाली बनवण्यासाठी पुढे यायला हवे. अजमेरच्या दर्ग्यात शासकीय अधिकारी किंवा नेता गेला, तरी या देशात तो सेक्युलर आहे; पण हिंदूंसाठी त्याने काहीही केले, तर तो लगेच कट्टर किंवा जातीयवादी ठरतो. ही स्थिती पालटण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे.

अलीगडप्रमाणे संभाजीनगरमध्येही धर्मांध विद्यार्थी निर्माण करू पहाणारी काँग्रेस !

     सोनिया गांधी यांच्या पुलोआ शासनाने अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या पाच शाखा चालू करण्याची अनुमती दिली. तसेच मदरशांसाठीही भारत शासन मोठ्या प्रमाणात निधी जमा करत आहे. 
      महाराष्ट्रात संभाजीनगरपासून ११ किलोमीटरवर असलेल्या शूलभंजन येथे अलीगड विद्यापिठाची शाखा चालू करण्याचे ठरवले आहे. प्रत्यक्षात संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात शिक्षणाची चांगली व्यवस्था आहे. तेथे उर्दू विभागही निर्माण करण्यात आला आहे. आजवर तेथील एकाही मुसलमानाने उर्दूच्या संदर्भात तक्रार केलेली नाही; मात्र असे असूनही डॉ. आंबेडकर विद्यापिठापासून केवळ ११ किलोमीटरवर अलीगड विद्यापिठाची शाखा चालू करण्याचा हेतू काय आहे ? या लांगुलचालनाच्या राजकारणामुळेच संभाजीनगरातील सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण झाला आहे. 
(संदर्भ : हिंदी विवेक, एप्रिल २०१४) 

जनतेच्या धारणांमध्ये पालट घडवणारे नेते निर्माण व्हायला हवेत !

      भ्रष्टाचार आणि प्रशासनातील विलंब ही लोकशाहीविषयी अनास्था निर्माण होण्याची प्रमुख कारणे आहेत. लोकशाही ही सर्वसमावेशक असायला हवी. देशातील ३५ कोटी जनता गरीब आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. जे नेते जनतेच्या धारणांमध्ये पालट घडवतात, असे नेते निर्माण झाले पाहिजेत. संसदेतील प्रत्येक क्षणाचा चर्चेसाठी वापर व्हायला हवा. लोकशाहीत एक सहमती निर्माण करण्यास वेळ लागत असतो. ते लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. लालफितीमध्ये अडकलेला कारभार आणि संबंधितांचा स्वार्थी हेतू यामुळे आणखी विलंब झाल्यामुळे समस्या निर्माण होतात. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि जातपातरहित समाज निर्माण होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. 
- मीरा कुमार, तत्कालीन अध्यक्षा, लोकसभा. (१०.१.२०१४)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेतील अनसूयेच्या पोटी आलेल्या दत्ताच्या जन्माची अद्भुत कथा

प.पू. पांडे महाराज
१. माता अनसूया तपःपूत आणि पतीव्रता असल्याने भगवंताने ब्रह्मा-विष्णु-महेशाच्या स्वरूपात ऋषींचा वेश घेऊन तिच्याकडे भिक्षा मागायला जाणे : दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता. अनसूयेचे पती हे अत्रिऋषी म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र. सप्तर्षींमधील एक ऋषी. ते तपःपूत आणि सामर्थ्यवान होते. माता अनसूयाही तशीच तपःपूत आणि पतीव्रता होती; म्हणूनच भगवंत ब्रह्मा-विष्णु-महेशाच्या स्वरूपात ऋषींचा वेश घेऊन तिच्याकडे भिक्षा मागावयास गेले.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून
 कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

प्रतिकूल परिस्थितीत ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करणार्‍या ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या श्रीमती राधिका गोविंद कडवआजी (वय ९३ वर्षे) !

श्रीमती राधिका कडवआजी
     ठाणे येथील दैनिक सनातन प्रभातच्या नियमित वाचक श्रीमती राधिका गोविंद कडव (वय ९३ वर्षे) यांनी विजयादशमीच्या दिनी (२२.१०.२०१५) ६१ टक्के पातळी गाठली. त्यांचा सत्कार ६२ टक्के पातळीच्या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. कडवआजींची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. बिकट परिस्थिती
१ अ. मोठे कुटुंब : आजींना ५ मुलगे आणि १ मुलगी आहे. त्यांना एकूण २१ नातवंडे आणि ९ पतवंडे आहेत. सर्वांत लहान मुलाच्या जन्मानंतर आजींच्या यजमानांचे देहावसान झाले.

कठीण प्रसंगांत श्रीकृष्ण साधकांचे रक्षण करतो, याची साधिकेला आलेली अनुभूती !

      आम्ही रामनाथी आश्रमात आल्यानंतर ५.११.२०१५ या दिवशीपासून दत्तमाला मंत्रजपाच्या पठणास प्रारंभ केला. त्यानंतर १३.११.२०१५ या रात्री मला एक स्वप्न पडले.
     स्वप्नात मी एका प्रवासी गाडीमध्ये (बसमध्ये) चढले. त्यानंतर बस भरधाव चालू झाली. मी मधल्या सीटवर बसले. त्यानंतर पाहिले, तर तिथे केवळ ५ - ६ पुरुष होते. बाकी सर्व बस रिकामी होती. ते पुरुष येऊन मला गराडा घातल्याप्रमाणे माझ्यापासून काही अंतरावर बसले. ते सर्व जण माझा गैरफायदा घेण्यास उत्सुक होते. क्षणभर मला भीती वाटली; पण मी मन दृढ आणि अचल करून एकटक खिडकीतून बाहेर पहात बसून राहिले. इतर ३ - ४ जण आणि तो म्होरक्या त्या तरुणाला दटावत होते, शांत बस. हिला काही करायला नको. त्यानंतर माझे सर्व शरीर तेजस्वी झाले आहे आणि पिवळ्या प्रकाशाचे कवच माझ्याभोवती पसरले आहे, असे मला जाणवले. त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोचू शकत नाहीत, असे मला वाटले. इतक्यात ३ - ४ घंट्यांचा प्रवास संपला आणि मी बसमधून उतरले. त्यानंतर तो म्होरक्या खाली उतरून माझ्या मागे आला आणि आईला म्हणाला, मला पैसे द्या. मी तुमच्या मुलीला सुरक्षित आणून सोडले. एरव्ही अशा तेजःपुंज मुलीला आम्ही सोडले नसते. तेव्हा माझे बाबा १ सहस्र रुपयांच्या २ - ३ नोटा त्याला देऊ लागले, तेव्हा त्यांना काहीही देण्याची आवश्यकता नाही, असे मी बाबांना सांगितले. त्यावर बाकी काही नाही, तर निदान प्रवासभाडे तरी द्या, असे तो म्हणाला. त्यावर त्याला ३०० - ४०० रुपये देऊन टाकले आणि तो शांतपणे निघून गेला.

दत्तजयंतीच्या दिवशी गुरुपौर्णिमाच असल्याचे जाणवून वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येणे

श्री. श्रीकांत भट
१. दत्तजयंतीच्या दिवशी आज गुरुपौर्णिमा 
आहे, असे वाटणे, शांती आणि स्थिरता यांची 
अनुभूती येणे अन् दत्ताचा नामजप आपोआप चालू होणे
     ६.१२.२०१४ या दिवशी दत्तजयंती होती. या दिवशी संपूर्ण दिवसभर मला आज गुरुपौर्णिमाच आहे, असे सतत वाटत होते. दिवसभर मी अधिकाधिक शांती आणि स्थिरता यांची अनुभूती घेत होतो. माझा नेहमीचा श्रीकृष्णाचा जप आपोआप बंद होऊन त्याऐवजी श्री गुरुदेव दत्त हा नामजप कधी चालू झाला ?, हे कळले नाही.

सौ. श्रुती सहकारी यांना पठणाच्या वेळी योगतज्ञ दादाजींचे दर्शन होणे

सौ. श्रुती सहकारी
१. भगवान दत्तात्रेय आणि योगतज्ञ दादाजी यांचे दर्शन होऊन भावजागृती होणे : १६.११.२०१५ या दिवशी दत्तमालामंत्राचे पठण करतांना भगवान दत्तात्रेय आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन झाल्यामुळे भावजागृती होत होती. त्या वेळी मनात विचार आले, आपल्याकडून पठण चांगले झाले, असे वाटायला नको; कारण हे मंत्र सिद्ध केलेले आहेत. सिद्ध करणे याची सोपी सरळ व्याख्या म्हणजे मंत्र म्हटल्यावर देवता तेथे येणारच ही स्थिती ! योगतज्ञ दादाजींची अपार कृपा आहे की, त्यांनी असे सिद्ध केलेले मंत्र आपल्याला पठणासाठी दिले आहेत. त्यामुळे आपल्याला देवतांचे विनासायास दर्शन होते.
२. १७.११.२०१५ - पठणाला बसल्यावर ते संपेपर्यंत योगतज्ञ दादाजींचे योगस्थितीत अधांतरी अस्तित्व जाणवले.

दत्तमाला मंत्राचे पठण करतांना आलेल्या विविध अनुभूती

      योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. या मंत्रजपाचे पठण करतांना आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. ध्यानमंदिरातील देवता तत्त्व जागृत झाल्याचे जाणवले.
२. सर्वत्र केशरी प्रकाश प्रक्षेपित होत होता. सर्व देवता पठण चालू होण्यापूर्वी ५ मिनिटे येऊन थांबल्या आहेत, असे जाणवले.
३. साधक पठणाला आल्यानंतर त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भक्तीचे बीज जागृत झाल्याचे जाणवले.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२४.१२.२०१५) सायंकाळी ६.२७ वाजता
समाप्ती - मार्गशीर्ष पौर्णिमा (२५.१२.२०१५) दुपारी ४.४२ वाजता
आज पौर्णिमा आहे.

सनातनचे साधक श्री. विनायक शानबाग यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

     सनातनच्या इतिहासात प्रथमच विवाहसोहळ्यात वराची आध्यात्मिक पातळी घोषित ! 
 (सविस्तर वृत्त उद्या वाचा)

पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणजे परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवेचे मूर्तीमंत उदाहरण !

      पू. (सौ.) गाडगीळकाकूंनी त्या करत असलेल्या सेवांविषयी सांगितले. पू. काकूंना जेव्हा ज्ञान मिळायला लागले, तेव्हा त्या स्वतः टंकलेखन करायच्या. नंतर संकलन करणार्‍या साधकांना वेळ द्यावा लागू नये; म्हणून त्यांनी व्याकरणातील बारकावे आणि ज्ञानाला मथळे कसे द्यायचे ? क्रम कसा लावायचा ?, हेही शिकून घेतले. त्यांनी असे केल्यामुळे ग्रंथ विभागातील साधकांचा वेळ वाचला. नंतर त्यांनी मिळालेले ज्ञान धारिकांना नाव देऊन स्वतःकडेही सांभाळून ठेवले. प्रत्येक वेळी ज्ञानाची एक धारिका पूर्ण झाल्यावर पू. काकू त्या धारिकेला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायच्या, तिला सूक्ष्मातून उदबत्ती ओवाळून तिची आरती करायच्या आणि मगच ती धारिका प.पू. गुरुदेवांकडे पाठवायच्या.
- श्री. विनायक शानभाग

आपत्कालात वाईट शक्तींच्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्रासावर मात करण्याचा उपाय

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. साधकांनो, आपत्कालात त्रास अल्प होत आहे ना, 
याकडे अधिक लक्ष न देता त्रासातही आपली साधना होत 
आहे ना, याकडे अधिक लक्ष द्या, म्हणजे निराशा येणार नाही !
      बरेच साधक आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांना बसतात. सध्या आपत्काल चालू असल्याने त्रास पूर्णतः गेला असे होणार नाही; परंतु त्रासातही आपले अनुसंधान टिकून आहे का, याकडे अधिक लक्ष दिले, तर त्रासातही साधना होईल आणि देवाला अपेक्षित अशी प्रगतीही होईल.
२. सेवा करणे हाच एक आध्यात्मिक उपाय 
                                             आहे, असे समजून साधना करण्यास प्राधान्य द्यावे !
     आपत्कालात सेवा करण्यासच आधी प्राधान्य द्यायला हवे. सत्सेवा हाच त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आहे, असे समजून आपल्याला झेपेल ती सेवा करावी. सेवेत मन गुंतल्याने त्रासाकडे अधिक लक्ष न जाता त्रास कधी अल्प झाला, हेच कळत नाही आणि सेवा झाल्याने मनही आनंदी रहाते.

साधकांचा सेवा आणि त्रास यांसंदर्भातील योग्य दृष्टीकोन

१. अयोग्य दृष्टीकोन : बरे वाटल्यावर सेवा करीन.
२. योग्य दृष्टीकोन : बरे वाटण्यासाठी सेवा करीन.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१२.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद आहे,  
तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
     भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
विविध विषयांतील तज्ञ आणि संत
      व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो. हृदयरोगतज्ञ डॉक्टरांना हृदयाचा विकार होतो. मनोविकारतज्ञांना मानसिक विकार झाल्याचेही आढळते; परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१२.२०१५)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

या आक्रोशावर उपाययोजना कधी ?

संपादकीय
      सैनिकांच्या कुटुंबियांनाच प्रत्येक वेळी अश्रू का ढाळावे लागतात ? असा प्रश्‍न देहलीतील विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रवींद्र कुमार या सैनिकाच्या मुलीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारल्यावर गृहमंत्र्यांकडेही त्याचे काही उत्तर नव्हते ! गेल्या काही वर्षांतील घटना पाहिल्यास आतंकवाद्यांशी लढतांना मरणारे सैनिक असो, नक्षलवाद्यांशी लढून मृत्यूमुखी पडणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान असो, काश्मीर येथे सातत्याने होणार्‍या आतंकवाद्यांशी लढतांना मृत्यूमुखी पडणारे जवान असो, पानबुड्याचा स्फोटांत मृत्यूमुखी पडणारे जवान असो, सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबारात मरणारे जवान असो ! सातत्याने या ना त्या कारणाने सैनिकांच्या कुटुंबियांना अश्रू ढाळावे लागत आहेत, हीच सध्याची कटू स्थिती आहे. देशासाठी रक्त सांडणार्‍या जवानांनी सातत्याने हुतात्मा होणे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न काढली जाणे, हे कोणत्याही देशासाठी निश्‍चतच भूषणावह नाही. काँग्रेस शासनाच्या काळात, तर यापैकी काही अपेक्षित नव्हते; मात्र भाजप शासनाने तिन्ही दलांच्या जवानांच्या सुरक्षितेतेसाठी जे प्रयत्न करणे अपेक्षित आहेत, ते प्राधान्याने केले पाहिजेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn