Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

प.पू. श्रीधरस्वामी यांची आज जयंती
 
 
पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस
पू. सदाशिव (भाऊ) परब

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस
पू. (सौ.) अंजली गाडगीळ


सनातनवर बंदीची खोटी मागणी करण्यापेक्षा विखे-पाटील यांनी शासनाचे थकवलेले २ कोटी रुपये भरावेत ! - सनातन संस्था

     मुंबई - काँग्रेसच्याच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आता केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठीच काँग्रेसवाले सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. विचारस्वातंत्र्याच्या आधारे इतरांवर घोटाळ्याचे आरोप करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना स्वतःवर घोटाळ्याचे आरोप झाल्यावर इतका राग का येतो ? तेव्हा कुठे जाते विचारस्वातंत्र्य ?

(म्हणे) शासनाने सनातन संस्थेवरील बंदीविषयी भूमिका स्पष्ट करावी !

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कांगावा
     नागपूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांमागे वैचारिक विरोध हेच साम्य आहे. यापूर्वीच राज्यशासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवला होता. सनातन संस्थेवर बंदी घालणार कि नाही ? याविषयी शासनाने भूमिका स्पष्ट करावी. आतापर्यंत या संस्थेवर का बंदी घालण्यात आलेली नाही ?, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला.

विरोधकांच्या दबावाखाली सनातन संस्थेवर बंदी घालणार नाही ! - मुख्यमंत्री फडणवीस

      नागपूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव वर्ष २०१२ मध्येच तत्कालीन काँग्रेस शासनाने केंद्रशासनाकडे पाठवला होता; मात्र हा प्रस्ताव केंद्रशासनाने स्वीकारला नाही.

गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे

अशी मागणी करणारे खासदार चंद्रकांत खैरे यांचे अभिनंदन ! 
शासनाने यादृष्टीने लवकर पावले उचलावीत, ही अपेक्षा !
     नवी देहली - गायीचे दूध, गोमूत्र हे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. गोमुत्राने कर्करोगही बरा होतो. त्यामुळे गायीला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने केंद्रशासनाने निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शून्यकालीन सत्रात केली.

विधान परिषदेत राष्ट्रगीताविनाच कामकाज स्थगित

अधिवेशनाचे सूप वाजले !
श्री. संतोष पाटणे
     नागपूर - विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे तीन घंट्यांच्या कामकाजात विधान परिषदेचे कामकाज तब्बल आठ वेळा स्थगित करावे लागले. विशेष म्हणजे तालिका सभापतींनी राष्ट्रगीत न घेताच ९ मार्चपर्यंत कामकाज स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. (जनतेच्या कररूपी पैशांतून विधिमंडळाचे कामकाज चालवले जात असतांना अशा प्रकारे गोंधळ घालून कामकाज बंद पाडणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? - संपादक)

आदिनाथ संप्रदायाच्या वतीने आज घाटकोपर (पश्‍चिम) येथे भव्य दत्तजयंती सोहळा

     मुंबई - आदिनाथ संप्रदायप्रणीत सद्गुरु प.पू. गोपाळ रामचंद्र बसणकर महाराज (समर्थ हिराजीनाथ महाराज यांचे अनुग्रही) यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा, म्हणजेच २४ डिसेंबर २०१५ या दिवशी दत्तजयंतीचा सोहळा आयोजित केला आहे. घाटकोपर (पश्‍चिम) येथील एल्.बी.एस्. मार्गावरील प्रेसिडेन्शीयल टॉवरच्या बी विंगमधील श्री दत्तमंदिर येथे होणार्‍या या कार्यक्रमात नित्य पूजा, श्री दत्त याग हवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, दत्तजन्म आणि दर्शन, भजन अन् महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्री. शामजी हिराजी गोगरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सर्व अनुग्रहित साधक आणि मित्रमंडळींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सनातन-निर्मित 'दत्ताची सात्त्विक नामजप-पट्टी'

     या नामजप-पट्ट्या त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक आकर्षित अन् प्रक्षेपित करतात. या नामजप- पट्ट्यांत त्या त्या देवतेचे तत्त्व सरासरी १० टक्के आले आहे. या नामजप-पट्ट्या संबंधित देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट आणि प्रक्षेपित करू शकतील, असा प्रयत्न त्या बनवतांना केला जातो.

फलक प्रसिद्धीकरता

विकासासाठी भारताला आय.एस्.आय.एस्.पासून मुक्ती मिळवण्याशिवाय पर्याय नाही !
     मालाड-मालवणी येथून गेल्या दोन मासांपासून बेपत्ता असलेल्या तीन धर्मांध युवकांवर आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यातील अब्दुल वाजीद शेख याला पुणे आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले.

सनातन-निर्मित 'दत्ताचे सात्त्विक चित्र'

     कलियुगात कोणत्याही देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांत त्या त्या देवतेचे अधिकाधिक ३० टक्केच तत्त्व येऊ शकते. सनातन-निर्मित दत्ताच्या चित्रात २८.९ टक्के दत्ततत्त्व आले आहे. या चित्रात दत्ततत्त्व येण्यासाठी सनातनच्या साधक-चित्रकारांनी हे चित्र भावपूर्वक रेखाटले आहे

विक्रोळी येथे ईद-ए-मिलादच्या जुलूसाचा मार्ग पालटण्याची विनंती करणार्‍या हिंदुत्ववाद्यांनाच पोलिसांच्या नोटिसा

     मुंबई - विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने जो जुलूस काढण्यात येतोे त्या वेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक हिंदूंना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कन्नमवार नगर क्र. १ आणि २ या हिंदूबहूल भागांतून जुलूस काढण्यात येऊ नये, यासाठी श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीच्या वतीने १ महिन्यापूर्वी विक्रोळी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. याचा पाठपुरावा केला असता पोलिसांनी मिरवणुकीचा मार्ग न पालटता श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विश्‍वनाथ सावंत आणि विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. निरंजन यमजाल यांचा जबाब नोंद करून घेऊन त्यांनाच १४९ ची नोटीस दिली. त्यामुळे स्थानिक हिंदूमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी अरेरावी करत सांगितले की, तुम्ही न्यायालयात जाऊन तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही विरोध केलात, तर आम्ही त्यांना जास्त संरक्षण देऊ. (पोलिसांकडून केवळ हिंदूंवरच कारवाईचा बडगा कशासाठी ? - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     ISIS ke margpar chalanewale 1 dharmandha ko Pune policene hirasatme liya.
     Ab espar kathit nidharmi chup kyon ?
जागो !
     आय.एस्.आय.एस्.के मार्गपर चलनेवाले एक धर्मांध को पुणे पुलीस ने हिरासत में लिया.
     अब इसपर कथित निधर्मी चूप क्यों ?

सनातनच्या २५० ग्रंथांच्या १४ भाषांत ५९ लाखांहून अधिक प्रती !

     मे २०१५ पर्यंत सनातनच्या २५० ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन आणि नेपाळी या १४ भाषांत ५९ लाख १५ सहस्र प्रती प्रकाशित ! 
 सनातनची अनमोल ग्रंथसंपदा मराठी आणि 
इंग्रजी भाषांमध्ये sanatanshop.com वर उपलब्ध !

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर येथील अतीप्राचीन
श्री एकमुखी दत्तमुर्ती
१. मूर्ती 
     कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर भारतातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली ?, याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष १९९७-९८ मध्ये श्री. अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 
२. मूर्तीचे वर्णन 
     पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्‍चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्‍या हातात कमंडलू, तिसर्‍या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्‍या हातात शंख अन् तिसर्‍या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्‍यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.

मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी आपापल्या साधनेनुसार नामजप मनात करावा कि दत्ताचा नामजप सामूहिकरित्या मोठ्याने करावा ?

      सर्वांनी मोठ्याने श्री गुरुदेव दत्त । हा नामजप केल्याने सर्वांच्या मनात व्यापक भाव निर्माण होऊन वातावरणावर पटकन परिणाम होतो, तसेच समष्टी साधनेचे फळ मिळण्यास साहाय्य होते आणि सर्वांना दुःखद प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते. तसेच इतरही जीव यांतून स्फूर्ती घेऊन नामसाधनेला लागतात. याउलट स्वतःच्या साधनेनुसार मनात नामजप केल्याने अध्यात्माचा प्रसार न झाल्याने इतरांना समष्टी साधनेचे महत्त्व कळत नाही. मनात नामजप केल्याने संकुचितपणाची वृत्ती वाढीस लागून केवळ मी नामजप करतो, असा अहं जोपासला जातो; म्हणून कोणतेही कर्म करतांना सर्वांना साधनेचा दृष्टीकोन देऊन त्यांना आपल्यासमवेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून) 

सद्गुणांची खाण असणार्‍या श्री दत्तगुरूंनी केलेले २४ गुण गुरु

पृथ्वी - सहनशीलता 
वायू - विरक्ती
आकाश - अचलता
पाणी - स्नेहभाव
अग्नी - पवित्रता
चंद्र - विकारबाधा न होणे

दत्ताच्या नामजपामुळे होणारे लाभ

अ. दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.
आ. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
- श्री. भरत मिरजे २.११.२००५, रात्री ८.३० 
       गुरुकृपायोगात सांगितलेल्या उपासनेने अद्वैतात विलीन होणे अल्प कालावधीत शक्य असणे : अनेक संप्रदायांमध्ये देवतांचे कोणतेही एकच नाम घेण्याचा प्रघात आहे; परंतु सप्तदेवतांच्या उपासनेने ईश्‍वराशी एकरूप होणे, म्हणजेच अद्वैतात विलीन होणे जिवाला अल्प कालावधीत शक्य होते. नेमका हाच सिद्धान्त प.पू. डॉक्टरांनी गुरुकृपायोगरूपी साधनामार्गात सांगितला आहे.

भावी पिढी सुसंस्कारीत आणि आदर्श बनवणारे

संपर्क : ९३२२३ १५३१७

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वैचारिक क्रांतीची ज्वाला चेतवणारे

धर्मप्रसारात सहभागी व्हा !

सनातन प्रभात
दैनिक : मराठी (चार आवृत्त्या) 
सप्ताहिक : मराठी आणि कन्नड 
मासिक : हिंदी, गुजराती इंग्रजी
आजच वर्गणीदार व्हा !

पू. भाऊकाका परब यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. सदाशिव (भाऊ) परब
     पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांचा दत्तजयंती या दिवशी वाढदिवस आहे. पू. सदाशिव (भाऊ) परबकाका आणि पू. नकातेकाका मागणी-पुरवठा विभागात सेवेसाठी आले असतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत. 
पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून साष्टांग नमस्कार !
१. भाव जागृत होणे
१ अ. पू. भाऊकाकांनी केलेली ग्रंथांची मांडणी पाहून भाव जागृत होणे : कोल्हापूरहून नवीन ग्रंथ छापून आले होते. ते मोजण्याची सेवा चालू होती. पू. काका शिव या लघुग्रंथाची मोजणी करत होते. महाप्रसादाची वेळ झाल्याने पू. काका जेवायला गेले. मी दुपारी त्या खोलीत गेले, तेव्हा त्यांनी केलेली ग्रंथांची मांडणी पाहून माझा भाव एवढा जागृत झाला की, काही क्षण मी स्वतःला विसरूनच गेले. त्यांनी सर्व लघुग्रंथ प्लॅस्टिक पिशवीत घातले होते आणि सर्वच ग्रंथांवरील शिवाचे चित्र एकसारखे दिसेल, अशा आडव्या पद्धतीने ठेवले होते. तेव्हा संतांची प्रत्येक कृती आदर्शच कशी असते, हे शिकायला मिळाले.

दत्त जयंती

     एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
इतिहास
     पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात.

पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) घरी आल्याने दिवाळी-दसरा असल्यासारखे अनुभवणे आणि प.पू. गुरुदेवांची अगाध लीला अनुभवता येणे

१. पू. भाऊकाका म्हणजे साक्षात् प.पू. गुरुदेवांचे रूपच ! : पू. भाऊकाका म्हणजे साक्षात् प.पू. गुरुदेवांचे रूपच ! भावाचा सागर, हसतमुख तोंडवळा, साधेपणा, मोकळेपणा, सहजरित्या वागणे, आनंद, चैतन्य, उत्साहाचे रूप आहे. पू. भाऊकाका म्हणजे आमच्या घरातील प्रमुख व्यक्ती आहे, असे वाटले.
२. पू. भाऊकाका घरी आल्याने दिवाळी-दसरा असल्यासारखे अनुभवणे : पू. भाऊकाकांना देवानेच अमृतनगर येथे २०.५.२०१५ ते १५.६.२०१५ पर्यंत घरी आणले होते. प.पू. गुरुदेवांनी त्यांना आमच्याकडे पाठवल्याने दिवाळी-दसराच असल्यासारखे वाटत होते. प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रत्येक सुटीचा उपयोग सेवेसाठीच करून घ्या. आपल्या चरणी अनंत कोटी कोटी कृतज्ञता पोहचू दे. अखंड कृपाशीर्वादाने जीवन लाभू दे. आध्यात्मिक उन्नती होऊ दे. मोक्ष मिळू दे, अशी प्रार्थना करते.

श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

अर्थ 
     दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.
इतर काही नावे
२ अ. अवधूत
१. अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त । असा जयघोष दत्तभक्त करत असतात. त्याचा अर्थ असा - अवधूत म्हणजे भक्त. भक्तांचे चिंतन करणारे, म्हणजे भक्तांचे हितचिंतक, श्री गुरुदेव दत्त.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

अ. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करावा.
आ. मध्यम त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपासह श्री गुरुदेव दत्त । हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.
इ. तीव्र त्रास असल्यास कुलदेवतेच्या नामजपाच्या जोडीला श्री गुरुदेव दत्त । हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ घंटे करावा. एखाद्या ज्योतीलिर्र्ंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती यांसारखे विधी करावेत. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

मृत्यूनंतर श्राद्धादी विधी केल्याने होणारे लाभ लक्षात आल्यावर हिंदु धर्माकडे वळू लागलेले पाश्‍चात्त्य

१. मृत्यूनंतरचे श्राद्धादी कर्मविधी आणि दत्तगुरूंचा नामजप यांमध्ये लिंगदेहांना पृथ्वीचे वातावरण भेदून नेण्याची क्षमता असल्याने लिंगदेहांना गती मिळणे : श्राद्धादी कर्मात म्हटल्या जाणार्‍या मंत्रशक्तीमध्ये, तसेच दत्तगुरूंच्या नामजपातून निर्माण होणार्‍या नामऊर्जेमध्ये लिंगदेहांना पृथ्वीचे वातावरण भेदून पुढे नेण्याची क्षमता असल्याने हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे पूर्वजांना गती देण्यासाठी श्राद्धादी विधी करणे, तसेच इतर वेळी त्यांच्यासाठी दत्ताचा नामजप करणे हितावह ठरते. एखादी आई जशी आपल्या पाल्याचा हात धरून त्याला हलकेच पुढे पुढे नेत असते, अगदी त्याप्रमाणे श्राद्धादी कर्म केल्याने निर्माण होणारी मंत्रशक्ती अथवा दत्तगुरूंच्या नामजपाची ऊर्जा या लिंगदेहांची एखाद्या आईप्रमाणे काळजी घेऊन त्यांना भूलोकाचे वातावरण पार करून देऊन त्यांच्या सूक्ष्मयोनीतील योग्य स्थळी नेऊन पोचवते. हे योग्य स्थळ म्हणजेच त्यांना कर्मगतीप्रमाणे मिळालेले स्थान; म्हणूनच हिंदु धर्मात सांगितलेल्या मृत्यूनंतरच्या कर्मविधींना अतिशय महत्त्व आहे. 

पूर्वजांना नागरूप घेणे सोपे जात असण्यामागील कार्यकारणभाव आणि दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र

१. पूर्वजांना सर्पयोनीत जाणे सोपे असल्याने ते सूक्ष्मातून नागाच्या रूपात दिसणे आणि त्यांचे नागरूपातील अस्तित्व घरात जाणवणे : बर्‍याचदा पूर्वज नागाच्या रूपात दिसतात; कारण मनुष्यदेहातील शुक्रजंतूंचा (स्पर्मचा) आकारही नागासारखाच असतो. त्यांचे रूप सर्पिलाकार, म्हणजेच सापासारखे असते. हेच मनुष्यदेहातील प्रकृतीचे मूलतत्त्व असल्याने त्याला मेेल्यानंतर आपल्यासारख्या दिसणार्‍या शुक्रजंतूंच्या आकारातील सर्पयोनीमध्ये जाणे सोपे जाते; म्हणून बर्‍याचदा चांगले लिंगदेह असतात, ते पिवळ्या नागाच्या रूपात दिसतात, तर अतृप्त असणारे लिंगदेह हे काळ्या नागांच्या रूपात दिसतात. ही रूपे सूक्ष्म असतात; म्हणून ती कधी स्वप्नात दिसतात, तर काही वेळा त्यांचे नागरूपातील अस्तित्व घरातही जाणवते.

वनस्पतीशास्त्रातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

      योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात नैसर्गिक पालट घडत आहेत.
१. आश्रमात दत्तमाला मंत्रजप चालू केल्यानंतर औदुंबराची रोपे उगवण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. अधिक संख्येने औदुंबराचीच रोपे उगवण्याचे कारण काय ? या ठिकाणी इतर रोपे का आली नाहीत ?
३. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली. आश्रमात अन्य ठिकाणी ही रोपे का उगवली नाहीत ? ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात, वातावरणात किंवा मातीत कोणता पालट झाल्यामुळे ही रोपे उगवली ?
४. औदुंबराच्या या रोपांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : savv.research@gmail.com)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमाला मंत्रजप केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची रोपे उगवण्यामागील कारणमीमांसा

डॉ. अजय जोशी
      देवाने ही चराचर सृष्टी निर्माण केली. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे-झुडपे यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी वनामध्ये रहायचे. वनातील वनस्पतींचे, फुलांचे आणि झाडांचे महत्त्व त्यांनी ओळखले. माणसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगराई दूर होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वनौषधी निर्माण केल्या.
      भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर ! अनेक प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेले आहे, या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिवाचे अस्तित्व असते. त्यामुळे या झाडाची पूजा करावी, असे सांगितले जाते.
डॉ. प्रमोद घोळे
    ही झाडे हवेमध्ये पुष्कळ जास्त प्रमाणात प्राणवायू (ऑक्सीजन) सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही हे पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचे झाड आहे. अशा देववृक्षांनी पुष्कळ अधिक संख्येने सनातनच्या आश्रमात उगवण्याची काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे समजून घेऊया.
    योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमात मंत्रपठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली आहेत. यावरून मंत्रपठणामुळे वातावरण सत्त्वप्रधान होते आणि मंत्रातील तत्त्वानुसार निसर्गातही सकारात्मक पालट होतो, ही गोष्ट सिद्ध होते. दत्तमाला मंत्रजप पठणानंतर आश्रम परिसरात झालेला नैसर्गिक पालट आणि दोन मास (महिने) दत्तमाला मंत्रजप करतांना एका साधकाला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे. 

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस आहे. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून साष्टांग नमस्कार !
       हे ईश्‍वरा, पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अद्वितीयत्वाविषयी काही लिहायची माझी पात्रता नाही. तूच माझ्याकडून तुला अपेक्षित असे लिखाण करवून घे.
     व्यावहारिक नात्यात पत्नीला एकेरी संबोधतात; पण इथे आध्यात्मिक नाते असल्याने आणि अध्यात्मात पू. (सौ.) अंजली माझ्याहून पुढे असल्याने, तसेच त्या संत असल्याने मी त्यांना आदरार्थी संबोधत आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील यज्ञकुंडाजवळील परिसरात आपोआप औदुंबराची रोपटी उगवणे आणि त्यांची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्येपू. (सौ.) योया वाले

तीन देवतांची तत्त्वे एकत्रित येणे 
१. तीन देवतांच्या तत्त्वांचा (एकत्रित) कणरूपी प्रवाह मातीत आकृष्ट होणे : याचे कारण सर्व संकटांपासून रक्षण होण्यासाठी साधक प्रतिदिन संतांनी सांगितलेला (श्री दत्तात्रेयाचा) मंत्रजप करत आहेत. त्यामुळे मातीत औदुंबराचे बीज सिद्ध झाले आणि त्यातून रोप वाढले. 
१ अ. तीन देवतांच्या तत्त्वांचे (एकत्रित) वलय भूमीखाली मातीत निर्माण होऊन ते कार्यरत होणे : परिणामी मातीत बीज सिद्ध होऊन रोपाची वाढ झाली. मंत्रजप केल्याने संबंधित देवतातत्त्व साधकांच्या रक्षणासाठी आल्याचे प्रतीक म्हणून हे रोप उगवले आहे.

सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट

रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिराच्या जवळ आणि यज्ञकुंडापासून १ - २ मीटर अंतरावर
औदुंबराची रोपे जवळजवळ उगवली आहेत.
(औदुंबराची रोपे गोलात मोठी करून दाखवली आहेत.)
     'दत्तमाला मंत्रा'चे पठण करण्यास आरंभ केल्यापासूनच्या सनातन आश्रमाच्या 
परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवणे आणि ही रोपे म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या भोवती
 संरक्षक कवच निर्माण झाल्याचे द्योतक असल्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगणे 

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२४.१२.२०१५) सायंकाळी ६.२७ वाजता
समाप्ती - मार्गशीर्ष पौर्णिमा (२५.१२.२०१५) दुपारी ४.४२ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

सनातन संस्थेच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
      सनातन संस्थेच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या कृपेमुळे अनुभवायला मिळालेल्या चैतन्यरूपी आशीर्वादाविषयी सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. त्या दिवसापासून आश्रमात दिवसेंदिवस दत्ततत्त्व वाढत असल्याची प्रचीती साधकांना येत आहे आणि आश्रम परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट झाला आहे. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली आहेत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे आधुनिक न्यायप्रणाली, तर कुठे अध्यात्मशास्त्र !
     अध्यात्मात वय पाहिले जात नाही, तर वृत्ती, कृती पाहिली जाते; म्हणून लहान वयांच्या संतांच्याही सर्वजण पाया पडतात. याउलट आधुनिक विचारसरणीची न्यायप्रणाली केवळ वय पहाते; म्हणून गुन्हेगारी करायची बुद्धी असलेल्यालाही बालच समजते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१२.२०१५)

बालगुन्हेगारी आणि त्यावरील उपाययोजना !

संपादकीय
     व्याधीचे योग्य निदान झाल्याशिवाय औषधाची मात्रा लागू पडत नाही, हा वैद्यकीय क्षेत्रातील प्राथमिक नियम सामाजिक क्षेत्रातही तंतोतंत लागू पडतो. अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयकाद्वारे बालगुन्हेगारांचे वय १८ वरून १६ करण्याचे घेतलेला निर्णय हा बालगुन्हेगारी विषयीच्या भीषण समस्येचे काही अंशी निराकारण करणारा निश्‍चित आहे; पण समस्येचे उच्चाटन करणारा नव्हे. १६ हे वय जरी फार मोठे नसले, तरी आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ते अल्पवयीन मुलांना सज्ञान बनवण्यास पुरेसे ठरले आहे. तथापि ही सज्ञानता नको त्या गोष्टीतील आहे. सभ्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या किमान गोष्टींचा अशा सज्ञानतेशी दुरान्वयनेही संबंध असल्याचे आढळत नाही. बालगुन्हेगारांची वाढती संख्या हे त्याचे उदाहरण आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn