Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !स्वामी श्रद्धानंद यांचा आज स्मृतीदिन

छगन भुजबळ यांची ११० कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

जनतेने लोकप्रतिनिधी निवडतांना त्यांची भ्रष्ट पार्श्‍वभूमीही लक्षात घ्यायला हवी !
महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे प्रकरण
 
   मुंबई - देहलीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वांद्रे अन् सांताक्रूझ येथील ११० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने २२ ऑक्टोबर या दिवशी धाड टाकून जप्त केली आहे.
भुजबळ यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात येत आहे. भुजबळ यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास राज्यशासनाने पूर्वीच अनुमती दिली होती. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हा विषय लावून धरला होता. (अशाच प्रकारे देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांची संपत्तीही शासनाधीन केल्यास देवळांतील सोने वितळवून पैसा कमवण्याच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनांसारख्या योजनांची देशाला आवश्यकता भासणार नाही ! - संपादक)
१. महाराष्ट्र सदन आणि कलिना येथील मध्यवर्ती ग्रंथालय यांच्या उभारणीत असलेल्या अनियमित गोष्टींचा तपास करणार्‍या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विशेष पथकाने जून महिन्यात भुजबळ आणि कुटुंबीय यांच्या १९ ठिकाणच्या संपत्तीवर छापे टाकले होते, तसेच गुन्हेही प्रविष्ट केले होते. त्यामुळे भुजबळ यांची मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील प्रचंड संपत्ती उघडकीस आली होती.

भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा ! - योगी आदित्यनाथ

     नवी देहली - भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत केली. त्यांच्या मागणीला सदनातील भाजपच्या सर्व खासदारांनी पाठिंबा दिला. जिहादी आतंकवादावर मात करण्यासाठी देशभरातील सर्व शाळांमध्ये भगवद्गीता शिकवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

देहलीत सीमा सुरक्षा दलाच्या विमानाला अपघात : १० ठार

शांतता काळात विमान कोसळून सैनिकांचे प्राण जाऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
मृतांमध्ये २ वैमानिक, तर ८ सैनिकांचा समावेश
     नवी देहली - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डण केलेल्या सीमा सुरक्षा दलाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात २ वैमानिक आणि सीमा सुरक्षा दलाचे ८ अभियंता असे एकूण १० जण ठार झाले. सीमा सुरक्षा दलाच्या सुपर किंग या चार्टर विमानाने विमानतळावरून सकाळी ९.४५ वाजता रांचीला जाण्यासाठी उड्डाण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला त्याचा नियंत्रण कक्षेशी संपर्क तुटला.

शिलाँग (मेघालय) येथे ख्रिस्त्यांच्या दबावामुळे हिंदुत्वाचे कार्य उघडपणे करण्यास निर्बंध !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिलाँग येथील श्री जगन्नाथ मंदिरात हिंदुत्ववाद्यांची बैठक !
     मेघालय राज्याची राजधानी शिलाँग येथील श्री जगन्नाथ मंदिरात समितीच्या वतीने हिंदुत्ववाद्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदुत्ववाद्यांसह तेथील केंद्रीय पूजा समितीचे (सेंट्रल पूजा कमिटी) पदाधिकारीही उपस्थित होते. मेघालयात ख्रिस्त्यांच्या दबावामुळे हिंदुत्वाचे कार्य उघडपणे करण्यास बंधने येत असल्याचे तेथील हिंदुत्ववाद्यांनी सांगितले. मेघालयात ख्रिस्तीकरणामुळे उघडपणे गोहत्या होत असून रस्त्याच्या कडेला उघड्यावर गोमांसाची विक्री होत असल्याने हिंदूंना हे सर्व असह्य होत आहे; मात्र राज्यकर्ते आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांची कोणतीही दखल घेत नाहीत.

अरुणाचल प्रदेश येथील निर्जुली गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठक !

     येथे समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदुत्ववाद्यांची बैठक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक जनजातींचे पदाधिकारीही उपस्थित होते. या ठिकाणी श्री. रमेश शिंदे यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगितले. या ठिकाणी उपस्थितांनी ख्रिस्त्यांकडून चालू असलेल्या स्थानिक जनजातींच्या धर्मांतराविषयी माहिती दिली. अरुणाचल राज्यात मंत्र्यांपासून ते सर्वसाधारण गावातील ग्रामीण अधिकार्‍यापर्यंत सर्वच जण ख्रिस्ती असल्याने त्यांच्याकडून हिंदु धर्मियांवर सातत्याने अन्याय केला जातो.

संसदेत कायदा झाल्यानंतरच राममंदिर उभारणार ! - विहिंप

     नवी देहली - संसदेत कायदा झाल्यानंतरच अयोध्येत राममंदिर उभारण्यात येईल, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी येथे दिली. अयोध्येत २१ डिसेंबरला राममंदिराच्या उभारणीसाठी शिळा आणल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याविषयी राय यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यसभेत अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयक संमत !

बालगुन्हेगाराचे वय यापुढे १८ ऐवजी १६ वर्षे !
     नवी देहली - दिवसभराच्या चर्चेनंतर अखेर अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. त्यामुळे बालगुन्हेगाराचे वय यापुढे १८ ऐवजी १६ वर्षे असेल. देशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर या विधेयकात सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती.

ईरोड (तमिळनाडू) येथे महर्षींनी सांगितल्यानुसार वैकुंठ एकादशीच्या दिवशी श्रीरामपट्टाभिषेकाचा नृत्यनाट्याविष्काराचा कार्यक्रम सादर

श्री. पिनेश महादेवन् (डावीकडे) यांना (परात्पर गुरु)
डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असणारा चषक भेट देतांना उजवीकडून पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. शंकर गणेश
     ईरोड (तमिळनाडू) - वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक असतांना महर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगितले होते की, गुरुपौर्णिमेपर्यंत सर्व साधकांकडे श्रीरामपट्टाभिषेकाचे चित्र असायला हवे, तसेच याचे कारण वैकुंठ एकादशीच्या दिवशी उलगडणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी आणि त्यांचे पती श्री. शशिकांत सखदेव आजोबा यांचा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा संपन्न !

     रामनाथी - श्री. शशिकांत सखदेव आजोबा (सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचे पती) यांचा आणि सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांती विधी मार्गशीर्ष शुक्ल नवमी, १९ डिसेंबर या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात चैतन्यमय वातावरणात पार पडला.

लेखक, व्याख्याते दुर्गेश परुळकर गीता अभ्यास मंडळाची स्थापना करणार

     ठाणे - लेखक, व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर मार्गशीर्ष महिन्यात लेखक दुर्गेश परुळकर गीता अभ्यास मंडळाची स्थापना करणार आहेत. याविषयी श्री. परुळकर यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीकडे सांगितले की, समाजामध्ये वावरतांना विशेषत्वाने जाणवते की, आपल्या बांधवांवर सुयोग्य संस्कार झालेले नाहीत. सामाजिक भान नाही. त्यांच्यात सदाचाराचा अभाव जाणवतो. हे संस्कार भगवद्गीतेच्या माध्यमातूनच करता येऊ शकतात. भगवद्गीतेच्या ही न्यायशास्त्र, नीतीशास्त्र सूत्र रूपात मांडते. त्यामुळे गीतेचा अभ्यास माणसाला सदाचाराकडे घेऊन जातो. नैतिकतेकडे नेतो.

(म्हणे) अटकसत्रांमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढीस !

तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांचा जावईशोध !
  • ही ओवैसी यांची भाषा नव्हे का ?
  • आय.एस्.आय.एस्.मध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या अन् होऊ पहाणार्‍या भारतातील बहुतांश आतंकवाद्यांना यापूर्वी कधी अटक केली होती का ? पण तरीही ते आतंकवादाकडे कसे वळाले, याचे उत्तर शर्मा देतील का ?

भाकपप्रणीत नक्षलवाद्यांकडून प्रतिवर्षी सुमारे १४० कोटी रुपयांची खंडणीखोरी !

     नवी देहली - भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणीत नक्षलवादी त्यांच्या विविध स्रोतांच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १४० कोटी रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती देहलीतील संरक्षण अभ्यास आणि विश्‍लेषण संस्थेच्या हवाल्याने लेखी स्वरूपात गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी लोकसभेमध्ये ११ डिसेंबरला दिली आहे. गेल्या दहा वर्षांत नक्षलवाद्यांनी ५ सहस्र २४ नागरिकांना ठार मारले आहे.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

पेण येथे नायब तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन

नायब तहसीलदारांच्या वतीने निवेदन स्वीकारतांना त्यांचे स्वीय साहाय्यक
३१ डिसेंबरला होणार्‍या 
अपप्रकारांच्या विरुद्ध मोहीम
     पेण - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील नायब तहसीलदार श्री. हाडके यांना निवेदन दिले.

१० वीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन कलचाचणीला मुख्याध्यापकांचा विरोध

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची अशी कलचाचणी घेण्यापेक्षा तो 
चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्राभिमानी होण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
     पुणे - येत्या फेब्रुवारी २०१६ मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन कलचाचणी होणार आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच ही परीक्षा असल्यामुळे मुख्याध्यापकांनी या कलचाचणीला विरोध केला आहे. फेब्रुवारीमध्ये कलचाचणी आणि त्यानंतर मार्चमध्ये १० वीची परीक्षा, असे नियोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूरचे माजी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांचे स्थानांतर रहित करा ! - डॉ. हमीद दाभोलकर

      पुणे - कोल्हापूरचे माजी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या स्थानांतरामुळे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे स्थानांतर रहित करावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली. (पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना असलेली ही सहानुभूती कुणी संशयास्पद ठरवली, तर त्यात चूक ते काय ? आजवर एखाद्या मृताच्या नातेवाइकांनी मारेकर्‍यांचा छडा लागलेला नसतांना अशा प्रकारचा आग्रह कधी केला आहे का ? यावरून दाभोलकर कुटुंबियांना डॉ. दाभोलकर किंवा कॉ. पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात रस नसून पोलिसांकडून होणारा हिंदुत्ववादी संघटनांचा छळ आणि विशेषतः सनातन संस्थेच्या साधकांचा छळच अपेक्षित आहे, असे वाटल्यास त्यात नवल ते काय ? - संपादक)

जुन्नर (जिल्हा पुणे) येथे गोमांस वाहतूक प्रकरणी ३ धर्मांध कह्यात

     जुन्नर - येथील जुन्नर-मढ रस्त्यावरील पंचलिंग चौकाच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी १८ डिसेंबर या दिवशी पहाटे नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीच्या वेळी पहाटेच्या सुमारास ७०० किलो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणार्‍या एका जीपसह ३ आरोपींना जुन्नर पोलिसांनी पकडले. त्यांची नावे साजिद अब्दुल रहेमान चौधरी (जुन्नर), गोंवडी (मुंबई) येथील महंमद यासीन शेख मोहीनुद्दीन आणि सलमान नन्हे कुरेशी अशी असल्याची माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी दिली. (आणखी किती गुन्हे उघडकीला आल्यावर शासन गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे ? - संपादक)

सातारा येथे श्री उत्तर चिदंबरम मंदिराच्या वतीने रथोत्सवाचे आयोजन

      सातारा - श्री उत्तर चिदंबरम मंदिर येथे सर्व देवतांच्या वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २० डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत सर्व उत्सव संपन्न होणार आहे.
     श्री नटराज मंदिर येथे गुरुवार, २४ डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता श्री. मदनदादा भोसले यांच्या हस्ते रथपूजन आणि रथप्रस्थानाचा शुभारंभ होणार आहे.

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     नाशिक - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी युवा सेनेचे सर्वश्री शुभम घुले, प्रविण सोनावणे, शैलेश कादवे, अधिवक्त्या सौ. निलिमा साखरीकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. 

३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने चालू ठेवण्याची शक्यता !

महसूल उत्पन्न वाढीसाठी शासनाचा अजब निर्णय ! 
- श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, नागपूर. 
     नागपूर, २२ डिसेंबर - राज्यात मद्यबंदीचा विषय गाजत असतांना शासन मात्र मद्यविक्रीतून अधिकाधिक कराच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळेल, याकडे लक्ष देत आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबर या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने चालू रहाणार असून विविध घटकांच्या पूर्ततेसाठी राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार अल्प करण्यासाठी राज्यशासन हा अजब निर्णय घेणार असल्याचे समजते. 

धर्मावरील आघात रोखायचे असतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही ! - डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

सासवणे (रायगड) येथे हिंदु धर्मजागृती सभा ! 
दीपप्रज्वलनाच्या प्रसंगी डावीकडून
सौ. नंदिनी सुर्वे, मध्यभागी श्री. नरेंद्र सुर्वे आणि डॉ. डहाके

     सासवणे (जिल्हा रायगड) - धर्मांतर, 'लव्ह जिहाद', गोहत्या, पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, इतिहासाचे विकृतीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद यांसारखे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात प्रभावीपणे रोखायचे असतील, तर या देशात हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे उद्गार भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके यांनी काढले. ते सासवणे, रामनाथ (अलिबाग) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. 

संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहातील कैद्यांची पोलिसाला मारहाण

पोलिसांविषयी वाटणारे भय संपले कि काय ?
      संभाजीनगर - येथील हर्सूल कारागृहातील कैदी श्‍वेता युवराज ढगे, योगेश सांगळे आणि रवी पंडित गाडेकर या तिघांना १८ डिसेंबर या दिवशी न्यायालयीन कामकाजासाठी पोलिसांनी न्यायालयात आणले होते. ते कामकाज झाल्यानंतर त्या कैद्यांना घेऊन जवाहर पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार भिकूचंद घिरटे हे त्यांना नेण्यात येणार्‍या वाहनाजवळ आणले.

श्री क्षेत्र मायंबा (जिल्हा नगर) येथे धर्मरथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांद्वारे हिंदु धर्माचा प्रसार

  
   नगर - नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मायंबा हे नाथपंथीय मच्छीन्द्रनाथ महाराज यांचे जागृत समाधीस्थळ आहे. प्रत्येक अमावास्येला या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. ११ डिसेंबर या दिवशी मायंबा येथे सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादने आणि अमूल्य ग्रंथसंपदा असणारा धर्मरथ लावण्यात आला होता. याचा अनेक भाविक-भक्त यांनी लाभ घेतला. देवस्थानच्या अध्यक्षांचे प्रदर्शन लावण्यास साहाय्य मिळाले. 
     क्षणचित्रे - १. येथील बर्‍याच भाविकांनी भ्रमणभाषमध्ये धर्मरथाचे छायाचित्र काढून घेतले.

फलक प्रसिद्धीकरता

तेलंगणच्या पोलीस महासंचालकांचा जावईशोध लक्षात घ्या !
     मुसलमानांमधील सामाजिक-आर्थिक मागासलेपण तसेच आतंकवादी आक्रमणानंतर पोलीस राबवत असलेले अटकसत्र आदी गोष्टींमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढत आहे, असे तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा म्हणाले.

खोटे शिक्षक आणि शिक्षकेतर ३२ कर्मचार्‍यांच्या मान्यता रहित करण्याचा आदेश

पुणे विभागांतर्गत माध्यमिक शिक्षण विभागातील खोट्या शिक्षक नियुक्त्यांचे प्रकरण
     पुणे, २२ डिसेंबर - पुणे विभागाच्या अंतर्गत सध्या माध्यमिक शिक्षण विभागात खोट्या शिक्षक नियुक्त्यांचे प्रकरण चालू आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी बबन दहिफळे यांच्या कार्यकाळातील हे आदेश आहेत. असे आदेश मिळालेले ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मान्यता रहित करण्याचा आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जारी केला. या सर्वांकडून त्यांनी ३ वर्षे घेतलेले वेतन वसूल करण्यात येणार आहे. (या प्रकरणी संबंधितांचे वेतन परत घेतांना ते सव्याज वसूल करावे. त्याचसमवेत या प्रकरणातील संबंधित अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाईही शिक्षण विभागाने करावी. - संपादक)

बाबरी मशिदीच्या सूत्रावरून आमदार मेधा कुलकर्णी यांनी अबू आझमी यांना खडसावले

     नागपूर २२ डिसेंबर- 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान' या विषयावर सभागृहात नुकतीच चर्चा ठेवण्यात आली होती. या वेळी चर्चेत सहभागी सदस्य अबू आझमी यांनी बाबरी मशीद पाडण्यात आल्याचे सूत्र उपस्थित केले. यावेळी 'संविधानावर चर्चा चालू असतांना धर्मावर बोलू नका', असे पुण्याच्या भाजपच्या आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी आझमी यांना खडसावले. सभागृहाच चर्चा चालू असतांना विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी देशात विषमता नांदत आहे, विशिष्ट धर्मावर अन्याय होत आहे. देशात आजही जातीवाद, धर्मवाद आहे अशी भूमिका मांडली. त्यात अबू आझमी यांनी भर टाकली. देशात कुठेही समानता नाही. या देशातील मुसलमान भारत हा आमचा देश आहे, असे मानतात; मात्र त्यांच्यावरच अन्याय होत आहे. (देशात काँग्रेसच्या काळापासून मुसलमानांचे अतिलांगूलचालन करण्यात आले आणि हिंदूंवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे हिंदूंनाही समानता वाटत नाही. - संपादक) तसेच बाबरी मशीद पाडण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवसच का निवडण्यात आला, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर मेधा कुलकर्णी यांनी आझमींच्या अशा वक्तव्याचा विरोध केला. (अबू आझमींना विरोध करणार्‍या भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन ! - संपादक) सत्ताधारी पक्षातील इतर सदस्यांनी या वेळी आझमी यांच्या वक्तव्यांचा विरोध केला. काही काळ कुलकर्णी विरुद्ध आझमी असा सामना रंगला होता.

टोरंट पॉवर आस्थापनाशी करार रहित करा !

आमदार रूपेश म्हात्रे यांची विधानभवन परिसरात उपोषणाद्वारे मागणी 
     नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) टोरंट पॉवर आस्थापनाशी करार रहित करा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानभवन परिसरात नुकतेच उपोषण केले. ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. श्री. बावनकुळे यांच्या आश्‍वासनानंतर आमदार म्हात्रे यांनी उपोषण मागे घेतले. (सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मागणीसाठी उपोेषण का करावे लागते ? - संपादक)

अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेचे पुन्हा आंदोलन, श्रीहरी अणेंच्या त्यागपत्रावर ठाम

     नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) - राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याला विरोध करत शिवसेनेने हिवाळी अधिवेशन गाजवले. आज विधानभवन परिसरात शिवसेना आमदारांनी 'श्रीहरी अणे मुर्दाबाद', अशा घोषणा दिल्या. तसेच १०६ हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला. या वेळी शिवसेना आमदारांनी हुतात्म्यांची प्रतिकृती परिसरात ठेऊन त्या प्रतिकृतीला हार-फुले अर्पण करून वंदन केले आणि आंदोलन केले. 

राज्य सहकारी अधिकोषाच्या १ सहस्र ८८ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ७७ संचालकांवर आरोपपत्र प्रविष्ट ! - सहकारमंत्री

     नागपूर, २२ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - शिखर अधिकोष म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्य सहकारी अधिकोषात १६०० कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अधिकोषाच्या प्राधिकृत अधिकार्‍यांनी अधिकोषाच्या तत्कालीन ७७ संचालकांवर १ सहस्र ८८ कोटी रुपयांच्या अधिकोष हानीस उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर आरोपपत्र ठेवले आहे. तसेच ही रक्कम वसूल करण्यासाठी ७७ संचालकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीवर बोलतांना दिली. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Atanki akraman ke bad police karvai se muslim yuvkome badh rahi hai kattarta. - DGP, Telangan - inko kattartavadi muslimonse sahanubhuti kyauon ?
जागो !
आतंकी आक्रमण के बाद पोलीस कारवाई से मुस्लीम युवकों मे बढ रही कट्टरता. - पोलीस महासंचालक, तेलंगण - इनको कट्टरतावादी मुस्लीमोंसे सहानुभूती क्यो ?

कुर्डुवाडीत (जिल्हा सोलापूर) तहसीलदारांनी दोन घंट्यांच्या थरारनाट्यानंतर तिघा वाळू तस्करांना पकडले

तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न !
     कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) - २२ डिसेंबर येथील तहसीलदार रमेश शेंडगे यांनी वाळू तस्करी करणार्‍या डंपरचा पाठलाग करून ३ वाळू तस्करांना पकडले. या वेळी तस्करांनी त्यांच्यावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला.
     श्री. शेंडगे दुपारी ४ वाजता माढ्याहून टेंबुर्णीकडे निघाले होते. कुर्डुवाडीतील पंढरपूर चौकात त्यांना वाळूने भरलेला डंपर समोरून येतांना दिसला. शेंडगे यंानी तात्काळ गाडी वळवून डंपरचा पाठलाग केला.

२०१४ बंद करण्यात आलेले गहू-तांदुळ अन्यधान्याचे वितरण पुन्हा चालू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

      नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) शासनाच्या सार्वजनिक वितरण अंतर्गत, मुंबई-ठाणे विभाग शिधावाटप क्षेत्रातील सुमारे १३ लक्ष ७९ सहस्र ७६४ केशरी (एपीएल्) शिधापत्रिका धारकांना नोव्हेंबर २०१४ पासून बंद करण्यात आलेले गहू-तांदूळ अन्नधान्याचे वितरण पूर्ववत तात्काळ चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले. मुंबईचे आमदार श्री. सुनील प्रभू यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले होते. नोव्हेंबर २०१४ पासून सदर शिधापत्रिका धारकांना प्रतिमाह करण्यात येत असलेले गहू आणि तांदुळ अन्नधान्याचे वाटप राज्यशासनाने अचानक बंद केले होते. यास एक वर्ष उलटूनही वितरण पुन्हा चालू झाले नव्हते. याविषयी कोणतेही लेखी स्पष्टीकरण शिधापत्रिकाधारकांना कळवण्यात आले नव्हते.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आमदार बंब यांनी घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती !

टँकरसाठी सरपंचाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण !
     गंगापूर - पाण्याच्या टँकरसाठी गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील सरपंचाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे १८ डिसेंबरला विधानसभेत तीव्र पडसाद उमटल्यावरून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून भाजपचे आमदार श्री. प्रशांत बंब यांनी १९ डिसेंबर या दिवशी तातडीची बैठक बोलावली. त्यांनी या बैठकीत दप्तर दिरंगाईमुळे पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावांना होत असलेल्या विलंबाविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. पाण्यासाठी नागरिकांच्या आत्महत्या होईपर्यंत टँकरचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणार का, असा संतप्त प्रश्‍न त्यांनी विचारला. (दप्तर दिरंगाईमुळे अशा घटना घडत असतील, तर याला सर्वस्वी शासकीय अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांवर आतापर्यंत कारवाई न केल्याने अधिकार्‍यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. - संपादक)

देशात महाराष्ट्रातील पोलीस दलाचा गुन्हेगारीत विक्रम !

जय जय महाराष्ट्र माझा !
  • देशात २,३९८ पोलिसांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद ! 
  • महाराष्ट्रात सर्वाधिक ४८७ गुन्ह्यांची नोंद ! 
     नागपूर, २२ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील पोलीस गुन्हेगारीत देशात आघाडीवर असून पोलिसांविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे ऑगस्ट २०१५ मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एन्.सी.आर्.बी) घोषित केलेल्या अहवालावरून निदर्शनास आले आहे. वर्ष २०१४ मध्ये देशातील २ सहस्र ३९८ पोलिसांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ४८७ पोलीस राज्यातील असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी खळबळजनक माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील प्रश्‍नोत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे. (देशातील एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद होते, हे देशातील पोलीस दलाला लज्जास्पद आहे. स्वतः गुन्हेगारीत अडकलेले पोलीस आतंकवाद आणि देशाला पोखरत चाललेल्या गुन्हेगारीपासून जनतेचे रक्षण कसे करणार ?- संपादक) 

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

यवतमाळ येथील धरणे आंदोलनात
सहभागी हिंदुत्ववादी
     यवतमाळ - बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध संघटना, संप्रदाय यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये योग वेदांत समितीचे श्री. विनोद कातरकर, युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे, शिवसेना (उपजिल्हाप्रमुख) श्री. राजेंद्र गायकवाड, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था इत्यादी संघटना सहभागी झाल्या.

देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्याची आवश्यकता ! - श्री. प्रमोद मुतालिक

शनिवारवाड्यावर शिवप्रताप दिन 
     पुणे, २२ डिसेंबर - देशद्रोही याकूब मेमनच्या यात्रेत सहभागी न होण्याविषयी आदेश असतांनाही सहस्रो मुसलमान घोषणा देत सहभागी झालेे होते. प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र दिले आहे, त्यानुसार आज प्रत्येक हिंदूंच्या घरात शस्त्र हवे. ते शस्त्र आपल्या घरात भांडण करण्यासाठी नव्हे, तर आपल्याला देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी हवे आहे, असे क्षात्रतेजयुक्त मार्गदर्शन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने १८ डिसेंबर या दिवशी 'शिवप्रताप दिन' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारवाड्यावर करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. 
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
दत्तजयंती विशेषांक

 प्रसिद्धी दिनांक : २४ डिसेंबर 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ डिसेंबर
या दिवशी दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी' प्रणालीत भरावी !

नगर येथे अखिल भारतीय ब्राह्मण युवा महासंघाच्या वतीने निदर्शने

'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाच्या विरोधाचे प्रकरण 
     नगर, २२ डिसेंबर - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटात इतिहासाचे विद्रुपीकरण केल्यामुळे नुकतीच अखिल भारतीय ब्राह्मण युवा महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील 'माय सिनेमा' चित्रपटगृहात निदर्शने केली़.

लातूर येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने २३ डिसेंबरला पू. भिडे गुरूजींचे व्याख्यान

     लातूर - हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत गडदुर्गाचे स्थान मोलाचे आहे. याच विषयावर गडप्रेमी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २३ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता अंबेजोगाई रस्त्यावरील केशवराज विद्यालय, शामनगर येथे व्याख्यान होणार आहे. तरी लातूर नगरीतील सर्व गडप्रेमी आणि शिवप्रेमी बांधव यांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

(म्हणे) संजय भन्साळी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या !

काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे इतिहासद्रोही मागणी
नीतेशजी, बाजीराव पेशवे महाराष्ट्राचे भूषण आहेत, तर संजय भन्साळी बाजीरावद्रोही आहेत.
     नागपूर - संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट १८ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित झाला अन् दोन दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाला. यातील भव्यदिव्य महाल, पेशवेकालीन श्रीमंती, भन्साळी यांनी मांडलेला इतिहास रंगवलेला असेलही; परंतु बाजीराव पेशवा या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत.

पुणे येथे छेड काढल्याचा जाब विचारल्याने २ धर्मांधांकडून एका कार्यालयाची जाळपोळ

अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर !
     पुणे, २२ डिसेंबर - सोमवार पेठेतील अशोका पॅव्हेलियन या व्यापारी संकुलामध्ये असलेल्या एका कार्यालयातील एका तरुणीची २ धर्मांधांनी छेड काढली. त्याचा त्यांना जाब विचारल्याने त्या दोघा धर्मांधांनी पेट्रोल टाकून जाळपोळ केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अब्दुल नबी शेख आणि नबी बाबाशाह नदाफ या दोघांना अटक केली आहे. त्या दोघा आरोपींना न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश २० डिसेंबर या दिवशी दिले. 

माता-भगिनींच्या शिलावर हात घालणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे ! - पू. संभाजी भिडेगुरुजी

पू. संभाजी भिडे गुरुजी 
     मुंबई - माता भगनींच्या शिलावर हात घालणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे, असे सांगणार्‍या लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केले. ते शिवचरित्र आणि धारातीर्थ मोहीम या विषयांवर फेलोशिप हायस्कूल, ग्र्रँट रोड येथे एका व्याख्यानात बोलत होते. रायगड संवर्धन प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई आणि सर्व धारकरी यांनी मिळून हे व्याख्यान आयोजित केले होते. सर्वांनी मोठ्या संख्येने धारातीर्थ-गडकोट मोहिमेला उपस्थित रहावे, असे आवाहन या वेळी पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. धारावी येथेही पू. भिडेगुरुजींचे व्याख्यान झाले.

१ जानेवारीच्या स्वागतासाठी विना अनुमती मेजवानी केल्यास १० पट दंड वसूल करण्यात येणार

     पुणे, २२ डिसेंबर - गेल्या काही वर्षांत नववर्षाप्रमाणे ख्रिसमससाठीच्या मेजवान्यांचे आयोजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये जेवण, मद्यपान आणि अभिनेते किंवा अभिनेत्री यांना बोलावले जाते. अशा प्रकारे नववर्षाच्या स्वागतासाठी विनाअनुमती आयोजित केल्या जाणार्‍या मेजवान्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अशी मेजवानी झाल्याचे निदर्शनास आल्यावर महसूल न मिळाल्याप्रकरणी १० पट दंड आणि उपहारगृह मालकांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट केला जाणार असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. (मुळातच मद्यपान असणार्‍या अशा मेजवान्यांना अनुमती देणे चुकीचे आहे. त्या मेजवान्या आयोजित करणार्‍या उपहारगृह चालकांकडून आर्थिक दंड वसूल करण्याबरोबरच त्यांच्या व्यवसायाची अनुज्ञप्ती (परवाने) कायमची रहित करणे आणि कठोर शिक्षाही करणे आवश्यक आहे. - संपादक) 

हिंदूंनो, जाणून घ्या आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांतील हिंदु बांधवांची दैन्यावस्था !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु संघटनार्थ बैठकांच्या माध्यमातून जागृती !
बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी अधिवक्ते
सिलचर (आसाम) येथील अधिवक्त्यांसाठी 
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन !
    मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांच्या सीमेवरील आसामचे एक प्रमुख शहर सिलचर ! येथील हिंदु धर्माभिमानी अधिवक्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी समितीच्या वतीने हिंदु विधीज्ञ परीषदेने देशातील विविध न्यायालयांत केलेल्या जनहित याचिकांची माहिती सर्वांना सांगण्यात आली. तसेच माहितीचा अधिकार आणि जनहित याचिका यांचा वापर करून हिंदूंवरील अन्याय कसे दूर केले जात आहेत, हेही उदाहरणांसह सर्वांना सांगण्यात आले. यामुळे हिंदु विधीज्ञ परीषदेचे कार्य सर्वांना लक्षात आले. यानंतर उपस्थित अधिवक्त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

भारतियांनो, इतिहासद्रोही चित्रपटांवर बहिष्कार घालून वैभवशाली इतिहासाचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्यच आहे !

कु. प्रियांका जगताप
कु. प्राजक्ता धोतमल
१. हिंदूंना आदर्श राजा श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या काळापासूनच जाज्वल्य इतिहास लाभणे अन् त्या प्रेरणेतून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधणे 
    दैवयोगाने आपल्याला लाखो वर्षांपासूनचा जाज्ज्वल्य इतिहास लाभला आहे. त्यांपैकी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या कथांद्वारे, म्हणजे इतिहासाद्वारे बालवयातच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले होते.

वैकुंठ एकादशीच्या दिवशी तमिळनाडू येथे होणार्‍या श्रीरामाचा पट्टाभिषेक या नृत्यनाट्याविष्कारातून परम गुरुजींना श्रीराम राज्याभिषेकाची स्पंदने आम्ही देणार; कारण पुढे त्यांना राष्ट्राच्या सिंहासनावर बसायचे आहे, असे महर्षींनी सांगणे अन् तसा समारंभही करवून घेणे

चेन्नई येथील नृत्यगुरू श्री. पिनेश महादेवन आणि त्यांचे शिष्य श्रीराम
पट्टाभिषेका संदर्भातील नृत्यनाट्याविष्काराचा कार्यक्रम  सादर करताना 
 
     २१.१२.२०१५ या दिवशी वैकुंठ एकादशी होती. तमिळनाडूतील श्रीविष्णूच्या जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील दक्षिण दिशेला असणारे वैकुंठ द्वार उघडले जाते. सर्व भाविक याच दारातून मंदिरात प्रवेश करतात आणि श्रीविष्णूचे दर्शन घेतात. सकाळी ४.३० वाजता, म्हणजेच ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी हे द्वार उघडले जाते. इतर वेळी संपूर्ण वर्षभर हे दार बंदच असते. 

बोंगाईगाव (आसाम) येथे हिंदुत्ववाद्यांची बैठक हिंदु राष्ट्रासाठी साधना आणि संघटन या दोहोंची आवश्यकता ! - रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे
      आसाम राज्य हे इस्लामिक स्टेटच्या दिशेने प्रवास करत आहे. भारतात काश्मीरनंतर सर्वाधिक संवेदनशील राज्य म्हणून आसामचा उल्लेख केला जात आहे. आसाममधील नद्यांच्या विस्तीर्ण पात्रातील बेटांवर मुसलमानांनी अतिक्रमण केले असून तेथे चालवण्यात येणार्‍या आतंकवादी निर्मितीच्या प्रशिक्षण शिबिरांची माहिती पोलीस आणि सैन्य दल यांनी कारवाई करून वेळोवेळी उघड केली आहे. अशा स्थितीत हिंदूंनी आपसातील मतभेद विसरून संघटित व्हायला हवे, तसेच या प्रचंड कार्यासाठी ईश्‍वरी बळ मिळण्यासाठी साधना करायला हवी, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते बोंगाईगाव येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात उपस्थित हिंदुत्ववाद्यांना संबोधित करत होते.

कुठे घेऊन चाललोय आपण समाजाला ?

श्री. भाऊ तोरसेकर
१. अल्पवयीनाने कितीही प्रौढ गुन्हा केलेला असला, तरी 
खटला मात्र वयानुसार भरला पाहिजे असा अट्टाहास !
     निर्भयावर तीन वर्षांपूर्वी अत्याचार झाला, तेव्हा तिचे जन्मदाते मातापिता रस्त्यावर आलेले नव्हते. अवघी देहली रस्त्यावर आली होती. दिवसरात्र आक्रोश चालू होता आणि त्यालाच शरण जाऊन नवा कायदा शासनाने विनाविलंब केला होता. त्यानंतरच्या आपल्या दोन अर्थसंकल्पात युपीएचे अर्थमंत्री चिदंबरम् यांनी कोट्यवधी रुपयांचा निर्भया-निधी राखून ठेवला होता. त्याचा कुठे आणि कसा वापर झाला ? ते कुणाला माहीत नाही. नव्या शासनाने अच्छे दिन आणतांना त्या विषयात काय केले, आपल्याला माहीत नाही. आता त्याच प्रकरणातला एक अल्पवयीन आरोपी मुक्त व्हायची वेळ आली, तेव्हा आपले सर्वांचे डोळे कोरडे आहेत.

मराठीचा शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवणारे भाषेचे सखोल अभ्यासक असणे आवश्यक !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

क्रिकेटवर बंदीच हवी !

     आज कोणत्याही भारतियाला तुमचा आवडता खेळ कोणता ?, असे जर विचारले, तर उत्तर म्हणून ते क्रिकेट या खेळाकडे बोट दाखवतील, यात कुणाचे दुमत नसावे. भारतात क्रिकेट हा खेळ राहिला नसून तो एक पंथ निर्माण झाला आहे. काही भारतियांचा क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटू देवता असे म्हणण्यापर्यंतही मजल गेली आहे. इंग्रजांनी जाता-जाता इंग्रजी भाषेसमवेत क्रिकेट हा खेळही भेट म्हणून देऊन गेले. भारतात जितके क्रिकेटप्रेमी असतील, त्याच्या एक चतुर्थांशदेखील संपूर्ण जगात नसतील. त्यामुळे भारतात क्रिकेट हा खेळ न रहाता व्यवसाय म्हणून प्रचलित झाला आहे. या खेळाला अतिप्रमाणात महत्त्व दिल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट असे देशी खेळ आणि गुणवान खेळाडू अक्षरशः देशोधडीला लागले आहेत.

धर्मशास्त्रांचा आधार स्वत:च्या स्वार्थासाठी घेणारा समाज !

     (आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले.
युवकाचे वडील : तुम्ही हे काय केले ? हा कसला संन्यास ? त्याचा गृहस्थाश्रम राहिला आहे. मग वानप्रस्थाश्रम ? ७० वर्षांनंतर संन्यास. धर्मशास्त्रच तसे सांगते. आपण शास्त्रास विरोधी असे वर्तन करता. शास्त्राज्ञा तुडवता. आमचा वैदिक धर्म आपण मातीत मिळवता आहात.
     शंकराचार्य शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतात आणि म्हणतात, ठीक आहे. मी सौदा करायला सिद्ध आहे. 
वडील (तोंडवळ्यावर प्रश्‍नचिन्हासारखा हावभाव करून) : याचा अर्थ काय ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भाषणात असंसदीय भाषा वापरून संसदेत अशीच भाषा वापरली जाते, असे म्हणणारे उमेदवार संसदेत निवडून गेल्यावर संसदेला नाक्यावरचा कट्टाच करतील !

     नरेंद्र मोदी हा जुलमी माणूस आहे. त्याने गुजरातमध्ये लोकांना जिवंत जाळले. तो देशाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, हे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बसपचे मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील उमेदवार हाजी याकूब कुरेशी यांना विचारले असता, मी योग्य तेच बोलत आहे. यातील कोणताही शब्द असंसदीय नाही. संसदेतही अशीच भाषा वापरली जाते, असे उत्तर दिले. (१.४.२०१४)

स्त्रियांच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग दाखवणारा हिंदु धर्म !

१५० वर्षांपूर्वी महिला आघाडीवर नव्हत्या, असे म्हणणे चुकीचे आहे.
     २०० ते २१५ वर्षांपूर्वीच्या काळातही स्त्रिया वेदाध्ययन करत होत्या. हिंदु धर्मातील संत परंपरेतील अनेक स्त्री संत पुष्कळ वर्षांपासून प्रगती करत होत्या. त्यांनी समाजासमोर आपली मतेही त्या त्या वेळी मांडलेली आहेत. - ह.भ.प. माधवदास राठी, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक (३.१२.२०१५)

आरोपीच्या विरोधात २४ वर्षांनी कारवाई करणारे (अ)कार्यक्षम पोलीस !

     पुणे येथे झालेल्या देवतेच्या विटंबनेनंतर एकत्र आलेल्या जमावासमोर प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणी फोंडा (गोवा) येथील स्वामी दुर्गानंद गिरी (पूर्वाश्रमीचे दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी) (वय ७८) यांना २४ वर्षानंतर अटक करण्यात आली. (३.५.२०१४) 

ब्राह्मणांच्या राष्ट्रप्रेमाची तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेली पोचपावती !

     गुजराती माणसाचा धंदा व्यापार करणे, पैसा कमावणे आणि मजेत संसार करणे. तुम्हा मराठी ब्राह्मणांचा धंदा देशसेवा करणे, देशाच्या हिताचा विचार करणे. तुम्ही पोटापाण्यासाठी येथे आलात; पण संध्याकाळी संघात जाण्याचे सोडत नाही. हा वेडेपणा तुम्हीच करू जाणे आणि हळूहळू तुम्ही आमच्या लोकात ते वेड पसरवू पहात आहात. धन्य आहे, तुमच्या लोकांची ! - मुख्यमंत्री मोरारजी देसाई
- दादूमिया (संदर्भ : वेडाकडून वेडाकडे !, मासिक धर्मभास्कर, जून २०१४) एका अहवालाला ७ वर्षे घेणार्‍या शासकीय समित्या ! ७ वर्षांत अहवाल कालबाह्य होतो ! समितीच्या सदस्यांकडून समितीसाठी खर्च झालेले पैसे वसूल करा !

   डेमोक्रेटिक सेक्युलर पार्टीने केलेल्या मागणीनुसार माजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ६ मे २००७ या दिवशी मुसलमानांच्या संदर्भात डॉ. रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने २१ ऑक्टोबर २०१३ या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अहवाल सादर केला होता. (३०.११.२०१३)

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

     अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ 
परिषद यांच्या राज्यस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमांची छायाचित्रे 
योग्य प्रकारे काढून ती पुढील माहितीसह रामनाथी आश्रमात पाठवा !
      विविध राज्यांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ परिषद यांद्वारे महत्त्वाच्या कार्यक्रमांचे (उदा. पत्रकार परिषद, हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने, आंदोलने, निवेदन देणे आदींचे) आयोजन करण्यात येते. बर्‍याच वेळा सनातन संस्थेचे साधक, समितीचे कार्यकर्ते अथवा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते समाजातील संत, मान्यवर अथवा नेते यांच्या भेटी घेतात, तर काही वेळा ते इतर संघटनांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर अथवा अन्यत्र उपस्थित असतात. अशा वेळी छायाचित्रे काढतांना आणि ती रामनाथी आश्रमात पाठवतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि कृतज्ञताभाव असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. डेगवेकरकाकू !

श्रीमती इंदिरा डेगवेकरआजी
१. निखळ हास्याने आनंद आणि चैतन्य मिळाल्याचे जाणवणे
      २१.९.२०१५ या दिवशी माझी डेगवेकरकाकूंशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी केवळ ऐकले होते. प्रथम भेटीतच त्यांनी मला आपलेसे केले. त्या रुग्णाईत असल्यामुळे झोपूनच होत्या. आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला. त्यांच्या निखळ हास्याने आम्हाला आनंद आणि चैतन्य मिळाल्याचे जाणवले.
२. सतत प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात असणार्‍या काकू !
२ अ. काकूंचा हात हातात घेतल्यावर प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण यायची. आताच प.पू. डॉक्टरांना भेटलो कि काय ?, असे वाटायचे.

१५.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींच्या फलादेशानुसार केलेला मिलाप यज्ञ

१. भृगुसंहितेत सांगितलेला मिलाप यज्ञ आणि त्याची पार्श्‍वभूमी
      पंजाब राज्यातील होशियारपूर येथे डॉ. विशाल शर्मा हे भृगुसंहितेचे वाचक (भृगुशास्त्री) आहेत. ११.१२.२०१५ या दिवशी वाचन झालेल्या भृगुसंहितेतील फलादेशाप्रमाणे डॉ. विशाल शर्मा यांनी १५.१२.२०१५ या दिवशी सनातन संस्थेकरता मिलाप यज्ञ केला. हा मंत्रयज्ञ आहे. त्या वेळी श्री. गौरव सेठी आणि सौ. अनन्या सेठी हे दोघे पतीपत्नी यजमान म्हणून उपस्थित होते. त्यांनी ७ वेळा भृगुजींचा मंत्रजप म्हणून या यज्ञाचे यजमानपद स्वीकारले.

महर्षींनी एका नाडीवाचनात नाडीपट्टीच्या वयाचा उल्लेख करतांना वेदांइतकीच ती प्राचीन असणे, असे सांगणे

पू. सौ. अंजली गाडगीळ
      एका नाडीवाचनात महर्षींनी नाडीपट्टीच्या वयासंदर्भात उल्लेख करतांना सांगितले, वेदांची उत्पत्ती कधी झाली हे जसे आपल्याला निश्‍चित माहीत नाही, तसेच या सृष्टीत वृक्ष, पशू, पक्षी, मनुष्य कधी आले, हेही आपल्याला सांगता येत नाही, तसेच तुम्ही या नाडीपट्टीच्या वयाचाही अंदाज लावू शकत नाही.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बंगळुरू, कर्नाटक. (२.१२.२०१५)

भवभूतीप्रमाणे सनातनचे विरोधकांना सांगणे

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः ।
उत्पस्यते हि मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ - भवभूती
अर्थ : या जगात जे कोणी आमची अवहेलना करत असतील, तर त्यांना जे काही समजायचे असेल ते समजू दे. आमची ही धडपड त्यांच्यासाठी नाही. केव्हातरी आणि कुठेतरी आमच्या कष्टांची जाण असलेला मनुष्य निश्‍चितच जन्मेल. ज्याला आमच्या या प्रयत्नांचा पुष्कळ उपयोग होईल; कारण काळ हा अनंत आहे आणि ही पृथ्वीही विशाल आहे.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे फोंडा, गोवा. ४०३४०१
ई-मेल : dspgoa@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

आनंदी, हसरी आणि बालपणापासूनच नामजप करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली, ठाणे येथील चि. सान्वी अमेय लोटलीकर (वय १ वर्ष) !

चि. सान्वी लोटलीकर
       मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी (२३.१२.२०१५) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. सान्वी अमेय लोटलीकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच तिच्या बहिणीला आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
चि. सान्वी हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. धार्मिक ग्रंथाचे वाचन होणे : बाळ पोटात असतांना माझ्याकडून ग्रंथांचे वाचन, पूजा-अर्चा, देवळात दर्शनाला जाणे, अशा कृती अधिक प्रमाणात घडत होत्या. देवाने माझ्याकडून संक्षिप्त महाभारत, रामायण, गजाननविजय, नवनाथस्तुती इत्यादी ग्रंथांचे वाचन करून घेतले.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
     प्रारंभ - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२४.१२.२०१५) सायंकाळी ६.२७ वाजता
     समाप्ती - मार्गशीर्ष पौर्णिमा (२५.१२.२०१५) दुपारी ४.४२ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 
परात्पर गुरु डॉ. आठवले
    धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

कायद्याच्या पलीकडले...?

संपादकीय
     १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री घडलेले निर्भया बलात्कार प्रकरण देशभर गाजले. तसे तर प्रति १२ मिनिटाला १ या हिशोबाने सरासरी भारतात बलात्कार होत असल्याची आकडेवारी आहे. त्यांतील कित्येक सामूहिक बलात्कार असतात आणि कित्येक प्रकरणांत मुलीची हत्याही केली जाते. यापूर्वी आणि त्यानंतरही अशा प्रकारची लक्षावधी प्रकरणे झाली; मात्र निर्भया प्रकरणी संपूर्ण देहलीकर एकत्र येण्यामागे देवाचेच नियोजन असावे; कारण तेव्हापासून बलात्कार्‍यांना शिक्षा होण्याचे प्रमाण काही अंशी वाढले. या प्रकरणात अल्पवयीन धर्मांधाने पीडितेच्या शरिरात लोखंडी गज खुपसण्याचे केलेले अमानुष कृत्य धर्मांधांची क्रूर मानसिकता दर्शवणारे होते. या निमित्ताने बलात्कारांच्या घटनांमध्ये हिंदु मुलींना फसवण्यात धर्मांधांचा मोठा सहभाग असल्याचे चित्रही पुढे आले. बलात्कार वाढण्यास महिलांचा पोशाख आणि अश्‍लील ध्वनीफीती कशा कारणीभूत आहेत, याच्याही चर्चा या निमित्ताने होऊ लागल्या, या सकारात्मक गोष्टी झाल्या. तसेच या प्रकरणानंतर जणू एक संकल्पना बलात्कार्‍यांना मिळाल्याप्रमाणे देहलीमध्येच बसगाड्यांत बलात्कार होण्याच्या प्रकरणांतही वाढ झाली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn