Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !
सांदीपनिऋषि यांची आज जयंती

अयोध्येत श्रीराम मंदिराचे शिलापूजन !

मंदिर उभारणीस स्थानिक प्रशासनाचा विरोध
     अयोध्या - अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याची सिद्धता चालू करण्यात आली आहे. येथे दोन ट्रक शिळा येऊन पोहोचल्या असून रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या हस्ते शिलापूजनही करण्यात आले आहे. महंत नृत्यगोपाल दास यांनी राममंदिर बांधण्याची वेळ आता आली आहे. थोड्याच दिवसांत अयोध्येत आणखी शिळा पोहोचतील, असे सांगितले. यावर बाबरी प्रकरणातील पक्षकार हाशीम अन्सारी यांनी पंतप्रधानांनी हे सर्व थांबवावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वात राममंदिराच्या उभारणीचा दिनांक घोषित होणार ?

२३ वर्षे उलटून गेल्यावरही अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचे बहुसंख्य हिंदूंचे स्वप्न अपूर्णच !
     उज्जैन - सिंहस्थ कुंभपर्वात राममंदिर उभारणीचा दिनांक घोषित होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या निर्मितीत आता नेतेगिरी चालणार नाही. आपसांत चर्चा करून हिंदु आणि मुसलमान भगवान श्रीरामाचे मंदिर उभारतील, असे श्रीरामजन्म मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष रसीक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण यांनी सांगितले.

मालाड-मालवणी येथील ३ धर्मांध आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी झाल्याचा संशय !

यावरून आतंकवादाने संपूर्ण देश पोखरल्याचेच स्पष्ट होते. हे रोखण्यासाठी
 शासनाने आतंकवाद्यांवर फ्रान्सप्रमाणे कठोर कारवाई करावी !
     मुंबई - मालाड-मालवणी येथून गेल्या दोन मासांपासून बेपत्ता असलेले तीन धर्मांध इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (आय.एस्.आय.एस्.) या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आय्याज सुल्तान (२३), मोहसीन शेख (२६) आणि वाजिद खान (२५) अशी या तिघांची नावे आहेत.

चीनच्या स्मार्ट सिटीत भूस्खलन !

                    ३३ इमारती मातीखाली                                        
       ९१ जण बेपत्ता                           
     बीजिंग - चीनच्या स्मार्ट सिटींपैकी एक असलेल्या शेंझेन या शहरातील हेंगताईयू औद्योगिक पार्कमध्ये भूस्खलन झाले. त्यातच तेथील गॅसच्या पाईपलाईनचा स्फोट झाला. त्यामुळे तेथील तब्बल १ लाख चौरस मीटर जागा ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती प्रशासनाने एका संकेतस्थळावरून दिली आहे. त्यात ३३ इमारती जमीनदोस्त झाल्या असून ९१ जण बेपत्ता आहेत. मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेथील ९०० जणांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आल्याचे सांगितले.

वाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांतून भारतीय संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणांविषयी सतर्क व्हा ! - श्री. बालकिशन ठाकूर, राजीव दीक्षित स्वदेशी रक्षक मंच, वल्लभगढ, फरिदाबाद

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन संपन्न
भविष्यात ठिकठिकाणी अधिवेशनांद्वारे संघटन करण्याचा निर्धार
डावीकडून नीलम दुबे, श्री. गजानन केसकर,
श्री. विनय पानवळकर आणि बोलतांना
श्री. बालकिशन ठाकूर
    नवी देहली, २१ डिसेंबर (वार्ता.) - विदेशी संस्कृतीला भारतात प्रस्थापित करण्यासाठी आतापर्यंत प्रसारमाध्यमांकडून पद्धतशीरपणे भारतीय संस्कृतीला मागास ठरवण्यात आले आणि येत आहे. विज्ञापनांच्या माध्यमातून आपल्यावर विदेशी उत्पादनांचा इतका संस्कार केला गेला की, आज आपल्याला स्वदेशी पेस्ट घ्यायची असेल, तरी बाजारात कोलगेट द्या, अशीच मागणी केली जाते. हे अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा वाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांतून भारतीय संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणाविषयी सतर्क होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राजीव दिक्षित स्वदेशी रक्षक मंच, वल्लभगढ, फरिदाबादचे श्री. बालकिशन ठाकूर यांनी केले. नवी देहली येथील श्रीनिवासपुरी भागातील भारत सेवाश्रम संघाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात ते बोलत होते. १९ आणि २० डिसेंबर असे २ दिवस चाललेल्या या अधिवेशनात नवी देहली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता, विचारक, असे ५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

दोषींवर कारवाई करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ! - पालकमंत्र्यांचे आश्‍वासन

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याचे प्रकरण !
  
डावीकडून श्री. अरविंद पानसरे, श्री. सुनील
घनवट आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील (बसलेले)
   नागपूर (विशेष प्रतिनिधी) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील सहस्रावधी कोटी रुपयांचा घोटाळा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने उघड केला. या घोटाळ्याच्या संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण पथकाच्या विशेष पथकाद्वारे चौकशीला प्रारंभ झाला आहे; मात्र गेले ६ मास या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

बिग बॉसमधील हिंदुद्रोही दृश्यावर हिंदु महासभेचा आक्षेप

या अभिनेत्यांनी एखाद्या मशिदीमध्ये जोडे घालून गळाभेट का घेतली नाही ? 
हिंदू अतीसहिष्णू असल्यामुळेच त्यांचे मंदिरात जोडे घालण्याचे धाडस होते !
                शाहरूख आणि सलमान खान यांनी मंदिरात जोडे घालून गळाभेट घेतल्याचे प्रकरण
      मेरठ (उत्तरप्रदेश) - दिलवाले चित्रपटाच्या प्रचारासाठी बिग बॉस या कायर्र्र्क्रमामध्ये पोहोचलेल्या शाहरूख खान यांनी सलमान खान यांची गळाभेट घेतली. एका काली मंदिरात घेण्यात आलेल्या या दृष्यात या दोन्ही अभिनेत्यांनी जोडे घातले असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष घटना समजून या दृश्याचे प्रसारण दूरचित्रवाहिनीवर अनेक वेळा दाखवण्यात येऊन त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली. (हिंदूंनो, टीआरपी वाढवण्यासाठी वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा दूरचित्रवाहिन्यांवर बहिष्कार टाका ! - संपदाक) त्यावर अखिल भारतीय हिंदु महासभेने आक्षेप घेतला असून कलर्स या दूरचित्रवाहिनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 

(म्हणे) गोहत्या बंदीची मागणी करणारे ढोंगी !

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारे आणि गोधन नष्ट करू पहाणारे अभिनेता ओमपुरी !
     लाहोर - आमचा देश मांसाच्या निर्यातीतून लक्षावधी डॉलर कमावतो. तरीही काही लोकांना देशात गोहत्या बंदी हवी आहे. ही मागणी करणारे सगळे लोक ढोंगी आहेत, असे वक्तव्य हिंदी चित्रपट अभिनेते ओम पुरी यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून केले आहे. या वक्तव्यावरून भारतातील धर्मांध (हिंदु) शक्तींनी त्रास दिल्यास भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन, अशी धमकीही त्यांनी दिली.

बेशुद्ध होईपर्यंत माझ्यावर बलात्कार करायचे !

आय.एस्.आय.एस्.च्या विळख्यातून सुटलेल्या यझिदी तरुणीची व्यथा
      न्यूयॉर्क (अमेरिका) - मला आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी पुष्कळ मारले. त्यानंतर मला एका जिहाद्याकडे सोपवण्यात आले. तो प्रतिदिन माझ्यावर बलात्कार करायचा. मी एकदा त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तेथील एका रक्षकाने मला पकडले. त्या रात्री मला अमानुष मारहाण करण्यात आली. अगदी कपडे काढून मारले. मला पकडणार्‍या रक्षकाच्या कह्यात मला देण्यात आले. त्याने मी बेशुद्ध होईपर्यंत माझ्यावर बलात्कार केला, अशी व्यथा इराकमधील २१ वर्षीय नादिया मुराद बासे ताहा या यझिदी युवतीने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडली. तिची व्यथा ऐकून परिषदेला उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. नादिया आय.एस्.आय.एस्.च्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली असून सध्या ती जर्मनीत रहात आहे.

हरियाणा शासनाकडून गीता जयंतीच्या निमित्ताने विशेष शासकीय कार्यक्रमाचे आयोजन

सनातन संस्थेचाही सहभाग !
गीता जयंतीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन
करतांना सौ. संदीप कौर
     फरिदाबाद (हरियाणा) - गीता जयंतीच्या निमित्ताने हरियाणा शासनाने १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फरिदाबाद जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. संदीप कौर यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी साधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सनातन संस्थेसह इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी, विश्‍व हिंदु परिषद आदी आध्यात्मिक संघटनांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला २०० भाविक उपस्थित होते.

चौकशीची माहिती देण्याविषयीचे निवेदन स्वीकारण्यास सीआयडीचा नकार !

     कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहस्रावधी कोटी रुपयांच्या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडीकडून) चौकशी १९ मे या दिवशी चालू झाली; मात्र आजवर गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात कोणतीही माहिती उघड केलेली नाही कि हिंदु विधीज्ञ परिषदेलाही दिलेली नाही. या संदर्भात श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे निवेदन घेऊन गेले होते.

केंद्रीयमंत्री जेटली यांच्याकडून आप नेत्यांच्या विरोधात मानहानीचा दावा

देहली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचार प्रकरण
     नवी देहली - देहली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कुमार विश्‍वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी या आप नेत्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे हे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
    आप पक्षाकडून जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर भाजपने जेटली यांचे समर्थन केले आहे. जेटली यांची विश्‍वासार्हता आणि प्रामाणिकपणा यांविषयी आम्हाला अभिमान असल्याचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

(म्हणे) विद्यार्थ्यांनी मल्याळम् भाषेऐवजी इंग्रजी शिकावी !

केरळचे मंत्री शिबू बेबी यांची मुक्ताफळे 
     थिरुवनन्तपुरम् - शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम मल्याळम् भाषेऐवजी इंग्रजी असले पाहिजे, असे मत केरळचे कामगारमंत्री आणि केरळ रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पक्षाचे शिबू बेबी जॉन यांनी व्यक्त केले. ते अर्हताप्राप्त परिचारिका संघटना आणि थिरुवनन्तपुरम प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित एका परिसंवादात बोलत होते. इंग्रजीचा परिणामकारक आणि योग्य वापर केल्याने नोकर्‍या मिळणे सोपे जाते. मल्याळम् परिचारिकांना इंग्रजी भाषेचा वापर नीट करता येत नसल्याने विदेशात नोकरी मिळण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आले आहे.

मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा देव सारखाच आहे, असे म्हटल्याने नोकरी गेली !

तथाकथित सर्वधर्मसमभाववाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     शिकागो - मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा देव सारखाच आहे, असे म्हटल्याने शिकागोतील व्हिटॉन या नावाजलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका लॉर्सिया हॉकिन्स यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली. लॉर्सिया हॉकिन्स यांनी त्यांच्या फेसबूकवर हे वक्तव्य पोस्ट केले होते. त्यांच्या या पोस्टमुळे वादाला तोंड फुटताच महाविद्यालयाने तातडीने त्यांना निलंबित केले आहे. 
विद्यार्थ्यांकडून निषेध !
    हॉकिन्स यांच्यावर महाविद्यालयाच्या प्रशासनाने केलेल्या कारवाईचा विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने केली त्याच वेळी ४० विद्यार्थ्यांनी पत्र लिहून प्रशासनाला खडसवले.

अमेरिकेतील हॉलीवूड चित्रपटात खलनायकाला भगवान श्रीकृष्ण संबोधून विडंबन !

हिंदू संघटित नाहीत; म्हणूनच विदेशातही हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे धाडस करण्यात येते !
     न्यूयॉर्क - अमेरिकेत लवकरच प्रदर्शित होणार्‍या एक्स-मेन मालिकेतील एक्स-मेन अपोकलीप्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात चित्रपटाच्या खलनायकाच्या तोंडी माझ्या पूर्वजन्मात मला आरए, कृष्ण, याहवेह या नावांनी संबोधत होते, असा संवाद दाखवण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण जगातील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत आहे. जगात श्रीकृष्णाची सहस्रो मंदिरे आहेत. तेथे त्यांची प्रतिदिन पूजा-अर्चा होते. स्वतःचा गल्ला भरण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे चुकीचे आहे. या संवादामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून हे संवाद वगळण्यात यावे, अशी मागणी अमेरिकेतील राजन झेद यांनी केली आहे.

सनातनचे ग्रंथ काळाची आवश्यकता ! - श्री. गिरीश भालेराव, माधव सेवा न्यास समिती

श्री. गिरीश भालेराव (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक
पू. डॉ. चारूदत्त पिंगळे
      उज्जैन (मध्यप्रदेश) - सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. भालेराव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. भालेराव यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य समजून घेतले. सनातन-निर्मित ग्रंथ पाहिल्यावर ते म्हणाले हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची कुठेच व्यवस्था नाही. काळाची आवश्यकता ओळखून सनातन कार्य करत आहे. सनातनच्या ग्रंथांद्वारे हिंदूंना सरळ आणि सोप्या भाषेत धर्मशिक्षण दिले जात आहे, हे कौतुकास्पद आहे. सनातन संस्थेला कधीही सहकार्याची आवश्यकता भासल्यास मी करीन. या वेळी त्यांनी सिंहस्थ कुंभपर्वात लावण्यात येणार्‍या प्रदर्शनास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
क्षणचित्र 
श्री. गिरीश भालेराव यांनी त्यांच्या शाळेसाठी सनातनची लहान मुलांची ग्रंथमालिका घेण्याची सिद्धता दाखवली.

हिंदु राष्ट्राची मागणी, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ! अधिवक्ता संजीव पुनाळेकर

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला २ सहस्र ५०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती !
     सोलापूर- हिंदु राष्ट्राची मागणी करणे यात घटनाबाह्य काहीही नसून हिंदु राष्ट्राची मागणी हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी व्यक्त केले. ते २० डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हरिभाई देवकरण प्रशाला मैदान याठिकाणी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.

(म्हणे) दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी ३१ जानेवारीपर्यंत शोधा अन्यथा श्रमिक मुक्ती दल कोम्बिग ऑपरेशन (धरपकड मोहीम) करील !

सातारा येथील पत्रकार परिषदेत डॉ. भारत पाटणकर यांचा वैचारिक आतंकवाद
     सातारा - अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि साहित्यिक कलबुर्गी यांचे मारेकरी आणि सूत्रधार शोधण्यास शासन अपयशी ठरले आहे. या हत्यांमागील सूत्रधार आणि मारेकरी ३१ जानेवारीपर्यंत शोधावेत, अन्यथा श्रमिक मुक्ती दल आपल्या पद्धतीने मारेकर्‍यांचा शोध घेणार असून सावंतवाडीच्या दिशेने कोम्बिंग ऑपरेशन (धरपकड मोहीम) हाती घेणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आपण आपल्या पराक्रमाचा इतिहास साजरा करू शकत नाही, ही हिंदूंची गळचेपी - दुर्गेश परुळकर

 
व्याख्यानात बोलतांना श्री. दुर्गेश परुळकर
    कल्याण- एन्.सी.ई.आर.टी.त छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास शिकवला जात नाही, हे दुर्दैवी आहे. आपण आपल्या पराक्रमाचा इतिहास साजरा करू शकत नाही, ही हिंदूंची गळचेपी आहे, अशी खंत प्रख्यात लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांनी येथे शिवप्रतापदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केली.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना जिल्हाधिकारी श्री. प्रदीप कुलकर्णी
     नांदेड - ३१डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

नायजेरियन लोकांना देशाबाहेर हाकलून द्या ! - हिंदुत्ववादी संघटनाची मागणी

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरियन 
लोकांच्या विरोधात दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     ठाणे - अंमली पदार्थांची विक्री करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेणार्‍या, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांचे पारपत्र रहित करून त्यांना देशाबाहेर हाकलून दिव्यातील नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून मुक्त करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने दिवा पूर्व भागात रेल्वे स्थानकाच्या बाहेर १९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदि संघटना, तसेच दिवा येथील नागरिक सहभागी झाले होते. 

बलात्कारी अल्पवयीन मुसलमान गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

निर्भया बलात्कार प्रकरण
     नवी देहली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन मुसलमान गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या गुन्हेगाराच्या सुटकेच्या निर्णयाला विरोध करणारी देहली महिला आयोगाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे या गुन्हेगाराच्या मोकाट रहाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बालसुधारगृहात असतांना उत्तरप्रदेशमधील एका बालगुन्हेगाराने बलात्कारी गुन्हेगाराच्या डोक्यात धार्मिक कट्टरतावादाचे भूत भरवले असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. ३ वर्षे सुधारगृहात राहूनही बलात्कार्‍याच्या मानसिकतेत काही पालट झाल्याचे दिसून आलेले नाही. 

वर्धा येथेही निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वर्धा येथे निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     वर्धा येथे ३१ डिसेंबरच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावाडकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.


      ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रत्नागिरी येथील चि. चैतन्य मच्छिंद्र खेराडे (वय १ वर्ष) याचा आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी (२२ डिसेंबर २०१५) ला वाढदिवस आहे.
चि. चैतन्य याला सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद

चि. चैतन्यची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

ऐतिहासिक चित्रपटांसाठी पुष्कळ काळजी घेण्याची आवश्यकता ! - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

     पुणे - आज तरुण पिढीला इतिहास ठाऊक नाही. त्यामुळे तरुणांनी इतिहासाचा अभ्यास करावाच; परंतु त्यातही भारतीय स्वातंत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ठाऊक असलाच पाहिजे. हल्ली संपूर्ण इतिहास समजून न घेता चित्रपट बनवले जातात. ऐतिहासिक विषयांवर चित्रपट बनवतांना पुष्कळ काळजी घेतली पाहिजे. संबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटावरून काय गोंधळ झाला, हे आपण पाहिले, असे प्रतिपादन ऋषीतुल्य शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. (ऋषीतुल्य शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनातून पैशाच्या मागे लागलेले आणि सत्य इतिहासाला चिरडू पहाणारे संजय भन्साळी बोध घेणार कि स्वतःचे घोडे पुढे दामटणार ?- संपादक) पुरंदरे प्रकाशनाच्या वतीने सुधाकर घोडेकर लिखित 'एक होतं गाव पुस्तका'चे प्रकाशन करण्यात आले.

गृहखात्याशी चर्चा करू ! - महसूलमंत्री

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याचे प्रकरण 
      नागपूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील घोटाळ्याच्या प्रकरणाची गृहखात्याच्या वतीने चौकशी चालू आहे. या प्रकरणी गृहखात्याशी चर्चा करून या प्रकरणात लक्ष घातले जाईल, असे आश्‍वासन महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी दिले. श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या वेळी श्री. खडसे यांना नंदुरबार येथे अनेक वर्षांपासून काही घरांमध्ये छुपेपणाने चालणारी पशूवधगृहे बंद व्हावीत, तसेच तेथील गोवंशियांची कत्तल थांबवावी, शहरातील पालिकेचे पशूवधगृह बंद करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांना 'सनातन-पंचांग वर्ष २०१६' भेट देण्यात आले.

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल

     सङ्घे शक्तिः कलौ युगे । हा प.पू. डॉक्टरांनी दिलेला विचार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा विचार आपल्यामध्ये निर्माण व्हावा. जसे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे रूप असलेल्या भगवान परशुरामाने सृजनांचे राज्य येवो असा संकल्प केला होता. त्याप्रमाणे प.पू. डॉक्टर दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
- ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटना

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

     अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

पोलीस निरीक्षक घोडके यांना धमकी देणार्‍या पती-पत्नीला अटक

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण 
     कराड (जिल्हा सातारा) - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण थांबवा, अन्यथा ठार करू', अशी धमकी काही दिवसांपूर्वी या हत्येचे अन्वेषण करणारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना लघुसंदेशाद्वारे आली होती. त्यांच्याकडून २५ लक्ष रुपयांच्या खंडणीची मागणीही केली होती. या संदर्भात पोलिसांनी चंद्रकांत दिनकर मोहिते (वय ४१ वर्षे) आणि त्यांची पत्नी संगिता चंद्रकांत मोहिते (वय ३५ वर्षे) यांना रेठरे बुद्रुक येथून कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर खंडणीखोरी आणि जिवे मारण्याची धमकी देणे, हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

...असा चालू आहे जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार !

रिक्शांवर भित्तीपत्रके लावतांना कार्यकर्ते !

सभेसाठी ठिकठिकाणी अशा बैठका घेण्यात आल्या !
     जळगाव - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरात २७ डिसेंबर या दिवशी सायं. ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात ३९ व्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

'बाजीराव-मस्तानी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती आणि अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 

अमरावती 

     अमरावती - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी या चित्रपटामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्यामुळे त्यावर तात्काळ बंदी घालावी, तसेच तेलंगण शासनाचा १९५ चर्चसमवेत होणारा नाताळचा कार्यक्रम रहित करावा या दोन मागण्यांसाठी राजकमल चौक येथे २० डिसेंबरला अमरावती येथे आणि अकोला येथे नुकतेच राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. 

फलक प्रसिद्धीकरता

आय.एस्.आय.एस्.चे संकट रोखण्यासाठी जागृत व्हा !
     मालाड-मालवणी (मुंबई) येथून गेल्या दोन मासांपासून बेपत्ता असलेले तीन धर्मांध तरुण आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Mumbai se lapata 3 dharmandh yuvak ISIS me shamil hone ki ashanka ! - ISIS ke prati badhata akarshan kaise rokhenge ?
जागो !
मुंबई से लापता तीन धर्मांध युवक आय.एस्.आय.एस्.में शामील होने की आशंका ! - आय.एस्.आय.एस्.के प्रती बढता आकर्षण कैसे रोखेंगे ?

शासनाने संशोधन केंद्र आणि ग्रंथालय यांसाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक बांधकाम; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

     नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) मुंबई उपनगरातील वांद्रे येथील भूखंड महाराष्ट्र शासनाने मे. असोसिएट्स जनरल्स या संस्थेला नेहरू मेमोरियल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर चालू करण्यासाठी दिला होता; मात्र या भूखंडावर व्यावसायिक बांधकाम करण्यात येत असल्याने या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. याविषयीची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली. आमदार शेलार यांनी हे सूत्र नुकतेच औचित्याच्या सूत्राद्वारे विधानसभेत मांडले होते. 

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय : इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाला विरोध करणे 
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक 
दिनांक : मंगळवार, २२ डिसेंबर २०१५ 
वेळ : दुपारी ३.३० ते ४.३० 
संपर्क क्रमांक : ९४०४९५६४८१

हिंदूंनो, नवीन वर्ष १ जानेवारीला नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्यालाच साजरे करून धर्मपालनाचा आनंद अनुभवा !

१. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान आणि मांसाहार 
करून केवळ मौजमजेत वेळ घालवणारे अधर्मी हिंदू !
श्री. सुनील घनवट
    हिंदु धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे; मात्र या धर्माचे श्रेष्ठत्व स्वतः हिंदु असणार्‍या व्यक्तींच्या लक्षात येत नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे. समाजातील बहुतांश हिंदु पाश्‍चिमात्त्यांच्या अयोग्य कृतींचे अंधानुकरण करतात आणि अशा अधर्मी कृती करण्यातच धन्यता मानतात. याचाच एक भाग म्हणजे हिंदू ३१ डिसेंबरच्या रात्री जागरण करून नववर्षाचे स्वागत आणि १ जानेवारीला नववर्षारंभदिन साजरा करू लागले आहेत. 
     ३१ डिसेंबरच्या रात्री मांसाहार करणे, दारू पिऊन सिनेमातील गाण्यांवर नाच करत धिंगाणा घालणे, मेजवानी करणे, मार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवणे, महिलांची छेडछाड करणे आदी अनेक गैरप्रकारांत वाढ होत चालली आहे. यामुळे तरुण पिढीत विकृती आणि व्यसनाधीनता वाढून हा नववर्षारंभ अशुभ पद्धतीने होतो. स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीत आपण अडकलो आहोत, याचे हे उदाहरण आहे.

राष्ट्र आणि धर्म यांची दु:स्थिती संदर्भात हिंदूंना मार्गदर्शन न करणारे साधू-संत !

१. व्यासपिठावरून मी जेव्हा राष्ट्राच्या दु:स्थितीविषयी आणि हिंदूसंघटन यांविषयी विचार मांडतो, त्या वेळेस व्यासपिठावरील उपस्थित अन्य धर्माचार्य आणि साधू-संत आम्हाला सांगतात, याबाबतीत तुम्ही राजकीय उपदेश करू नका.
२. राजकर्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांची दु:स्थिती केली असतांना त्यांवर बोलणे आणि समाजाला मार्गदर्शन करणे हे साधू-संतांचे कर्तव्य आहे.
३. जर या विषयावर बोलण्यातच साधू-संतांना भीती वाटते, तर साधू-संत धर्मकार्य कसे काय करत असतील ?, असा आम्हाला प्रश्‍न आहे. 
४. साधू-संतांचा पाठीराखा भगवंत असतांना त्यांनी भीती बाळगायचे कारणच काय ? 
- प.पू. डॉ. स्वामी रामविलासदास वेदांतीजी महाराज, अयोध्या (१३.२.२०१४) 

आतंकवादी संकेतस्थळे !

   मागील काही दिवसांपासून इस्लामिक स्टेट म्हणजे, आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेचे भारतातील देशद्रोही हस्तक अटक होत आहेत. नुकतेच पुणे येथे १६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी इंटरनेट जगतातील सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आली. ही गोष्ट उघड झाल्याने त्या अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करून आय.एस्.आय.एस्.कडे जाण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. आतापर्यंत अटक झालेल्या सर्वामध्ये महत्त्वाचा एक घटक पुढे आला आणि तो म्हणजे, इंटरनेट ! आज सामाजिक संकेतस्थळे किती धोकादायक ठरत आहेत, त्याचे भयावह रूप समोर येत आहे. आताच्या काळात इंटरनेट हातातील भ्रमणभाषपर्यंत येऊन पोहोचले आहे आणि हेच इंटरनेट आय.एस्.आय.एस्.चे मुख्य हत्यार बनले आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

भारतीय पालकांच्या मानगुटीवर बसलेले इंग्रजी भाषेचे भूत भावी पिढीसाठी धोकादायक !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रा. शाम मानव यांना भेटण्याची आवश्यकताच काय ?

     मला डॉ. आठवले यांच्याशी चर्चा करायची आहे, असे प्रा. शाम मानव म्हणतात. एक आधुनिक वैद्य दुसर्‍या आधुनिक वैद्यांशी आणि एक अधिवक्ता दुसर्‍या अधिवक्त्यांशी चर्चा करू शकतो; कारण त्यांचे क्षेत्र एकच असते. त्या त्या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास अन् अनुभवही असतो. याउलट शाम मानव कशाच्या आधारावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलायचे आहे, असे म्हणतात ?, हे लक्षात येत नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 
१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते, तर शाम मानव काय आहेत ?
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्माचा अभ्यास आणि साधना करून गुरुकृपेने अध्यात्मातील उच्च पद गाठले आहे. याउलट शाम मानव देवच मानत नाहीत अन् साधनाही करत नाहीत, तसेच ते हिंदु धर्मद्वेष्टे आहेत.
    साधू-संतांनी नेतृत्व करून समाजाला दिशा दिली, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते. त्यासाठी संतांनी केवळ मठ-मंदिरांपुरते संकुचित न रहाता राष्ट्र आणि धर्म यांसाठी मार्गदर्शन आणि निर्भयपणे काम करणे आवश्यक आहे. 
- प.पू. डॉ. स्वामी रामविलासदास वेदांतीजी महाराज, अयोध्या (१३.२.२०१४)

स्वातंत्र्यापासून गेली ६८ वर्षे राजकारण्यांप्रमाणे गांधीगिरी करणार्‍या पोलिसांची गांधीगिरी अजूनही चालू ! याला पोलिसांची अंधश्रद्धा म्हणतात ! अशाने देश लवकर संपुष्टात येईल !

   आय.एस्.आय.एस्. मुंबईत पाळेमुळे घट्ट करत असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. मुंबईतील १२ तरुण इराकला जाण्याच्या सिद्धतेत असल्याचे समजल्याने या तरुणांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांच्यात मतपरिवर्तन करण्यासाठी मुल्ला-मौलवींचे आणि काही ज्येष्ठ व्यक्तींचे साहाय्य घेतले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या पार्श्‍वभूमीवर आम्ही त्यांना इराकला जाऊ देणार नाही. त्यांच्या विचारात पालट करून त्यांना भारतातच ठेवू, असे आश्‍वासन काही मुल्ला-मौलवींनी पोलिसांना दिले आहे.

हे कारागृहाच्या अधीक्षकांना का कळत नाही ? दुसर्‍यांना सांगावे का लागते ?

    गोव्यातील सडा कारागृह आणि म्हापसा न्यायालयीन कारागृह येथे अनेक गैरसोयी असल्याने या कारागृहांची त्वरित दुरुस्ती करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. दुरुस्ती होईपर्यंत हे कारागृह बंद ठेवा आणि दुरुस्तीनंतर वापरा, अशी शिफारस वेल्लोर कारागृह अकादमीने केलेल्या सर्वेक्षण अहवालात केली आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 

सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी २० सहस्र कोटी बुडवेपर्यंत सर्वजण झोपले होते का ?

     गुंतवणूकदारांचे २० सहस्र कोटी रुपये बुडवल्याच्याप्रकरणी न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यावर फरार झालेले सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी २८.२.२०१४ या दिवशी सकाळी लक्ष्मणपुरी (लखनौ) पोलिसांपुढे शरणागती पत्करली. (१.३.२०१४) 

मुसलमान कधी पोलिसात तक्रार करत नाहीत, तर सरळ कायदा हातात घेतात !

     एका व्यक्तीने मशिदीत प्रवेश करून कुराणाची प्रत फाडून टाकल्याने संतापलेल्या मुसलमानांनी त्या व्यक्तीला एका खांबाला बांधून, नंतर दगडाने ठेचून ठार केल्याची घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुळबागिलु गावात नूगल बंडे येथील मशिदीत घडली. (२३.४.२०१४)

चार वर्षे मुंबई विद्यापीठ झोपले होते का ?

      राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आईच्या नावाने असलेले लीलावती आव्हाड इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयाने त्यांच्याकडे शिकत असलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या प्रवेशाला नियमाप्रमाणे प्रवेश नियंत्रण समितीकडून मान्यता मिळवलेली नाही. समितीच्या मान्यतेअभावी प्रवेशच अनधिकृत ठरत असल्याने मुंबई विद्यापिठाने महाविद्यालयातील १ सहस्र २०० विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. चार वर्षे शिकूनही या विद्यार्थ्यांच्या हातात अभियांत्रिकीची पदवी पडलेली नाही. (१.४.२०१४)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह आणि पोलीस यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
       मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी आणि पोलीस यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे फोंडा, गोवा. ४०३४०१
इ-मेल : dspgoa@gmail.com,
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

काकूंनी (आईने) घेतलेल्या परिश्रमांमुळे मृत्यूच्या दाढेतून वाचल्याने प.पू. गुरुदेवांच्या दर्शनाची संधी मिळाल्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तिची भावपूर्णरित्या सेवा करणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक !

      
पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
मातृदेवो भव ।, पितृदेवो भव ।, आचार्यदेवो भव । ही हिंदु संस्कृतीची महान शिकवण आहे. जिच्या कृपेने जिवाचा जन्म होतो, जी या भवसागरात बोट धरून खंबीरपणे उभे रहायला शिकवते आणि जिच्या संस्कारांमुळे हा भवसागर तरून जाण्याची ऊर्जा उत्पन्न होते, अशी माता म्हणजे पहिली गुरु मानली जाते. तिचे अनंत उपकार असल्याने ते काहीही केले, तरी फेडता येणे शक्य नसते. अशा या जीवनातील पहिल्या गुरूंच्या अंतःकाळी ३ मास (महिने) अखंड सेवा करण्याचे सौभाग्य परात्पर गुरूंच्या कृपेने मला प्राप्त झाले. खरोखर माझी आई (श्रीमती इंदिरा डेगवेकर, आईला मी काकू म्हणायचे) म्हणजे आध्यात्मिक गुणांची खाण होती. ती इतरांसाठी आयुष्यभर चंदनासारखी झिजली आणि अंतःकाळी अखंड भगवंताच्या स्मरणात राहूनच तिने अनंताचा प्रवास चालू केला. तिची सेवा करतांना तिच्या या आध्यात्मिक गुणांचे दर्शन घडले. ते परात्पर गुरूंच्या चरणी शब्दरूपाने अर्पण करण्यासाठी श्री शारदामातेने मला शब्दसामर्थ प्रदान करावे, हीच तिच्या चरणी प्रार्थना !

कै. (श्रीमती) डेगवेकरकाकू यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

श्रीमती इंदिरा डेगवेकरआजी
१. सौ. शशिकला महादेव सरपोतदार (काकूंची मोठी मुलगी)
१ अ. पुष्कळ वर्षे आईचे प्रेमळ छत्र लाभणे, ही ईश्‍वराची कृपा ! : ११.१२.२०१५ या दिवशी आम्हा भावंडाचे मातृछत्र हरपले. आम्ही एक भाऊ आणि तीन बहिणी अशी चार भावंडे आहोत. मी आज ७२ वर्षांची आहे. माझ्या आईला ९४ वर्षांचे आयुष्य लाभले. एवढी वर्षे आईचे प्रेमळ छत्र लाभणे, हे खरोखरच आमच्यावर ईश्‍वराची कृपा असल्याचे सिद्ध करते.
१ आ. आईने अतिथी देवो भव या वचनाचे तंतोतंत पालन करणे : आईला घरी येणार्‍या प्रत्येक अतिथीची देवाप्रमाणे सेवा करण्यात आनंद वाटायचा. ती त्यांचे हसतमुखाने स्वागत करायची, त्यांना खाऊ-पिऊ घालायची. एखादी गरीब व्यक्ती दिसल्यास तिला अन्न आणि वस्त्र पुरवण्यात आईला मोठे समाधान लाभायचे.

मातृछत्र हरपल्यावरही स्थितप्रज्ञ राहून श्रीमद्भगवद्गीता जगत असल्याची साक्ष देणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) !

प.पू. दास महाराज
      आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्‍वर अशी आईची महती दैनिक सनातन प्रभातमधून गायली आहे. जिच्या ठायी जिवाला परमात्म्याची अनुभूती येते, तीच आई ! सद्गुरूचे प्रथम रूप म्हणजे आई. ईश्‍वर आईच्या माध्यमातून जिवाला जन्म देतो आणि सद्गुरूंच्या रूपात जिवाला मुक्त करतो; म्हणून आईला सद्गुरूंचे प्रथम रूप मानले जाते. आई जिवावर जसे संस्कार करते, तसा जीव घडतो, उन्नती करून घेतो. असेच उत्तम संस्कारांचे बाळकडू पाजून पू. (सौ.) माईंना घडवणार्‍या माऊली म्हणजे वैकुंठवासी इंदिरा डेगवेकर (काकू) ! त्यांच्याच उत्तम संस्कारामुळे माई घडल्या. याच संस्कारांच्या जोरावर त्यांनी प.पू. डॉक्टरांची कृपा संपादन केली आणि त्या संतपदावर पोचल्या. संतपदावर पोचलेल्या माईनी त्यांच्यावर संस्कार करणार्‍या माऊलीची ३ मास (महिने) अहोरात्र सेवा करून त्यांचा अंतःकाळ सुखकर केला अन् मातृभक्ती कशी करावी ?, याचा आदर्शच साधकांसमोर ठेवला. माईंनी त्यांच्या आईंची प.पू. गुरुदेव समजून कशी सेवा केली. आईच्या मृत्यूनंतरही त्या कशा स्थितप्रज्ञ होत्या आणि त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले ?, याचे निवेदन प.पू. गुरुदेवांच्या चरणी ठेवत आहे.

श्रीमती इंदिरा डेगवेकरआजींच्या देहावसानाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

श्रीमती इंदिरा डेगवेकरआजी
     प.पू. दास महाराज यांच्या सासूबाई आणि पू. (सौ.) माई यांच्या मातोश्री ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती इंदिरा डेगवेकरकाकू यांचे ११.१२.२०१५ या दिवशी पहाटे ४ वाजता देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. २२.१२.२०१५ या दिवशी आजींच्या देहावसानानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त सौ. मांडवी भरत बुगडे यांना आजींच्या देहावसानाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना, रुग्णाईत असतांना आजींविषयी जाणवलेली सूत्रे आणि पू. (सौ.) माई यांनी आजींची मनोभावे केलेली सेवा यांविषयीची माहिती पुढे दिली आहे.
नामजप करतांना आजींविषयी मनात विचार येणे 
आणि दुसर्‍या दिवशी त्यांचे देहावसान झाल्याचे समजणे
      श्रीमती डेगवेकरआजी यांनी देहत्याग केला, त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे १०.१२.२०१५ या दिवशी नामजप करत असतांना माझ्या मनात आजींविषयी विचार येत होते, आता पानवळला गेल्यावर आजींची झोपण्याची खोली रिकामी असणार. आजींची आता भेट होणार नाही. आजींकडून अनुभवलेल्या प्रीतीमय अनमोल क्षणांची मालिकाच माझ्या मनात चालू होती. आजींच्या प्रकृतीविषयी भ्रमणभाष करून विचारपूस करूया, असा विचार मनात आला; पण नंतर नामजप पूर्ण झाल्यावर भ्रमणभाष करूया, असा विचार करून रात्री विलंब झाल्यामुळे भ्रमणभाष करायचा राहून गेला.
  ॥ हरि ॐ तत्सत् ॥ 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रकृती आणि पुरुष
१. प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ
: मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे.
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पंथ, संप्रदाय आणि धर्म
     सर्व पंथ आणि संप्रदाय एकच औषध ज्ञात असलेल्या तथाकथित आधुनिक वैद्यांसारखे आहेत. ते केवळ ठराविकच साधना सांगतात. याउलट धर्म व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग या तत्त्वानुसार साधना सांगतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

हिंदूंसाठीही अश्रू ढळू देत !

संपादकीय
     नादिया मुराद बासे तहा हे नाव आज सर्वांना परिचित झाले आहे. नादिया ही २१ वर्षीय याझीदी युवती. ऑगस्ट मासात आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी तिचे गाव कह्यात घेतले. त्यानंतर तिला गाडीत कोंबून इराकच्या मोसूल शहरात नेण्यात आले. यानंतरचे तिचे जीवन म्हणजे नरकयातना देणारा आणि अनन्वित अत्याचाराने व्यापून टाकणारा प्रवास होता. जिहादी आतंकवाद्यांनी तीन महिने सातत्याने तिच्यावर गटागटाने बलात्कार केला. आय.एस्.आय.एस्.च्या कह्यात असतांनाचे विदीर्ण अनुभव नादिया हिने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर कथन केले. हे अनुभव ऐकतांना अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना रडू कोसळले. स्वतःचे अनुभव सांगितल्यानंतर तिने आय.एस्.आय.एस्.ची राजवट नष्ट करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांना केले. या घटनेनंतर कदाचित् आय.एस्.आय.एस्.चा पाडाव होण्याच्या प्रक्रियेला गती येईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn