Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष
आज गीता जयंती

धर्मांधांकडून सनातनचे साधक श्री. संतोष चव्हाण यंाच्यावर प्राणघातक आक्रमण !

हिंदूंनो, आज सनातनच्या साधकावर आलेली ही वेळ उद्या 
प्रत्येक हिंदूवर येऊ शकते, हे लक्षात घ्या आणि संघटित व्हा !
लोखंडी गजाने बेदम मारहाण, साधकाच्या विरोधातच धर्मांधांची तक्रार
     कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी सनातनवर अकारण चिखलफेक केली. चिथावणीखोर विधाने करत डॉ. भारत पाटणकर, पानसरे कुटुंबीय, दाभोलकर कुटुंबीय आणि त्यांच्या संलग्न संघटना यांनी सनातनच्या साधकांना लक्ष्य करण्याची विधाने केली. जाहीर सभांमधून सनातनच्या साधकांना रस्त्यावरून फिरू देणार नाही, अशा वल्गना करण्यात आल्या. त्याचाच हा परिपाक म्हणायला हवा ! आता या आक्रमणासाठी या सर्व पुरोगाम्यांना पकडून कारागृहात टाकण्याची मागणी विवेकवादाचे ठेकेदार असलेले पुरोगामी घेतील का ?

निर्भयावर बलात्कार करणारा अल्पवयीन मुसलमान मोकाट !

    आता अमीर आणि शाहरूख खान गप्प का ? पुरस्कार वापसी करणारी टोळी आता कुठे गेली ? बलात्कारी, मग तो कितीही वयाचा असो, त्याला त्वरित कठोरात कठोर शिक्षा देण्याचा कायदा मोदी शासनाने करावा, ही अपेक्षा !

जम्मू-काश्मीरमध्ये एका आतंकवाद्याला अटक

आतंकवाद्यांचे उगमस्थान असलेल्या पाकला धडा
 शिकवणे, हाच आतंकवाद रोखण्याचा प्रभावी मार्ग !
बारावीत असतांना झाला होता बेपत्ता
     श्रीनगर - कुपवाडा जिल्ह्यातील हिंदवाडा येथे भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका मोहिमेत हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या फलक नूर या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. नूरला पकडून देणार्‍यास ५ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले होते.

शनिमंदिराच्या चौथर्‍यावर चढण्याचा भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा प्रयत्न !

     आता कुणीही उठून प्रसिद्धीसाठी शनिमंदिराच्या चौथर्‍यावर चढू लागल्याचे यातून स्पष्ट होते ! म्हणूनच आता शासनानेच ठोस पावले उचलून हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी कायदा करणे अनिवार्य बनले आहे ! 

      नगर - येथील शिंगणापुरातील श्रीशनि मंदिराच्या चौथर्‍यावर चढून धर्मशास्त्राचा भंग करण्याची प्रथा बनते कि काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. २० डिसेंबरला भूमाता ब्रिगेडच्या चार महिला या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवून बाहेर काढले; मात्र या महिलांनी या सुरक्षारक्षकांच्या विरोधातच तक्रार केली आहे.

पिंपरी (पुणे) येथे मुसलमान संघटनांनी विनाअनुमती पुणे-मुंबई महामार्ग रोखला !

निरपराध हिंदूंवर दंडुके उचलणारे पोलीस धर्मांधांच्या
 विनाअनुमतीमोर्च्याच्या विरोधात काहीच का करत नाहीत ?
 पोलिसांना आणखी एक आझाद मैदानाची दंगल अनुभवायची होती का ?
प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या उत्तरप्रदेशमधील वक्तव्याचे प्रकरण
     पिंपरी - उत्तर प्रदेशातील हिंदू महासभेचे कार्यकर्ते कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड उलेमा कौन्सिल, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, समाजवादी पक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, आझाद ग्रुप यांच्यासह अन्य संघटनांनी १८ डिसेंबर या दिवशी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली होती; मात्र त्याला हरताळ फासून धर्मांध आंदोलकांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला.

सुब्रह्मण्यम् स्वामी काँग्रेसचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार ?

देशाला रसातळाला नेणार्‍या भ्रष्ट काँग्रेसींना कठोर शिक्षा होईल तो सुदिन !
गांधी कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता
     नवी देहली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयात खेचणारे भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम् स्वामी लवकरच काँग्रेसचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहेत. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट केले आहे.

एअर फ्रान्सच्या विमानात बॉम्बची अफवा !

     पॅरिस - बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे मॉरिशस येथून पॅरिसला जात असलेल्या एअर फ्रान्सच्या प्रवासी विमानाला अचानक केनियाचे कोस्टल शहर मोेम्बासामध्ये उतरवण्यात आले. पोलीस प्रवक्ता चार्ल्स ओविनो यांनी दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७७७ एअर फ्रान्स हे विमान शाल द गोल विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. या विमानात शौचालयाजवळ एक संशयित वस्तू आढळून आली. त्यामुळे विमानात पसरलेल्या बॉम्बच्या अफवेनंतर खबरदारी म्हणून ४५९ प्रवासी असलेले हे विमान अचानक उतरवण्यात आले.

मुसलमानांच्या प्रवेशबंदीची मागणी करणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ

     वॉशिंग्टन - वाढत्या आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत मुसलमानांच्या प्रवेशास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत तब्बल ११ टक्क्यांनी वाढ होऊन ती आता ३९ टक्के झाली आहे. त्यांच्या मुसलमानविरोधी भूमिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट होईल, अशी दिवास्वप्ने पहाणार्‍यांना यामुळे सणसणीत चपराकच बसली आहे. त्यांच्या खालोखाल लोकप्रिय असलेले राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार टेड क्रूझ यांच्या लोकप्रियतेचे रेटिंग अवघे १८ टक्के आहे.
पुतीन यांच्याकडूनही ट्रम्प यांचे समर्थन !
     रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही ट्रम्प यांनी घेतलेल्या स्पष्ट आणि परखड भूमिकेचे समर्थन केले असून ट्रम्प हे अतिशय प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर लखीमपूर आणि ढेकियाजुली (आसाम) येथे धर्मप्रेमी युवकांची बैठक

     ढेकियाजुली (आसाम) - आसामच्या वरच्या भागातील दौर्‍यात (आसाममधील गौहत्तीच्या वरच्या प्रदेशाला अप्पर आसाम, म्हणजेच वरचा आसाम म्हणून ओळखले जाते.) ढेकियाजुली आणि उत्तर लखीमपूर येथे हिंदुत्ववादी युवकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी बोडो समुदायाचे प्रतिनिधी, तसेच अन्य हिंदुत्ववादीही उपस्थित होते. या वेळी त्यांनी वर्ष २०१२ मधील दंगलीनंतर मुसलमानांकडून नियमितपणे होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. त्यांना लॅण्ड जिहादविषयी सांगितल्यावर त्यांनी हाच प्रकार आपल्या भागातही सुरू असल्याचे सांगितले. या वेळी आपापसांतील मतभेद विसरून हिंदू म्हणून एकजूट केल्यास होणारे लाभ सांगितल्यावर त्यांनी त्यास होकार दर्शवला, तसेच उत्तर लखीमपूर येथील युवकांनी लवकरच मोठा कार्यक्रम ठेवून समितीच्या वतीने सुरू असलेली जनजागृती आपल्या भागातही करण्याची सिद्धता दर्शवली. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल, हिंदू सेवा मंच, पूर्वांचलचे श्री. शिवशंकर कुंडू हे उपस्थित होते.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मान्यवरांची भेट !

डावीकडून श्री. योगेश व्हनमारे (प्रदर्शनातील फलकांविषयी
माहिती सांगतांना), श्री. प्रमोद सूद आणि श्री. अरविंद जैन

कोलकातामधील संस्कृत महाविद्यालयाला संस्कृत विद्यापिठाचा दर्जा

     कोलकाता - कोलकातामधील संस्कृत महाविद्यालयाची श्रेणीवाढ करून संस्कृत विद्यापिठाचा दर्जा देणारे विधेयक बंगाल विधानसभेत नुकतेच संमत करण्यात आले. पश्‍चिम बंगाल संस्कृत महाविद्यालय आणि विद्यापीठ, विधेयक २०१५ या विधेयकामुळे १९१ वर्षे जुन्या संस्कृत महाविद्यालयाची श्रेणीवाढ करून विद्यापिठात रूपांतर करणे शक्य होणार आहे. संस्कृत भाषेच्या क्षेत्रात अभ्यासाचे मुख्य केंद्र निर्माण करणे, हा या विद्यापिठाचा मुख्य उद्देश आहे. संस्कृतसह इतर भारतीय भाषा, भारतीय तत्त्वज्ञान, तुलनात्मक साहित्य, जीवनशास्त्र, विज्ञान यांविषयीचे शिक्षणही या विद्यापिठामध्ये देण्यात येणार आहे. संस्कृत भाषेशी जवळचा संबंध असलेल्या विदेशी भाषाही या विद्यापिठात शिकवल्या जाणार आहेत. बंगालचे समाज सुधारक ईश्‍वर चंद्र विद्यासागर यांनी या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा बजावली होती.

(म्हणे) सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले गेले !

ब्राह्मण म्हणजे काय, याविषयी कोणतेही ज्ञान नसतांना डॉ. रावसाहेब कसबे यांचे अज्ञानमूलक विधान
     पुणे - धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव, असा चुकीचा अर्थ लावला गेला. माझ्या जगण्यातील व्यावहारिक आणि ऐहिक प्रश्‍नांना धर्माशी संबंध न जोडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. (ही घ्या धर्मनिरपेक्षतेची आणखी एक व्याख्या ! धर्म हा इतका व्यापक आहे की, मानवाच्या जीवनाचे असे एकही अंग असू शकत नाही, ज्याला धर्माने व्यापलेले नाही ! - संपादक) माणूस धर्मचिकित्सा केल्याशिवाय धार्मिक अंधश्रद्धेतून मुक्त होणार नाही.

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग न वगळल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार - कपिल शर्मा

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
     धुळे - बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला दिसत नाही. इतिहास काय असतो, हे त्यांना शिवसैनिक समजावतील, असे शिवसेनेचे श्री. कपिल शर्मा यांनी या वेळी सांगितले.

शनिदेवतेच्या संदर्भात ऋषीमुनींनी सांगितलेले नियम सर्वांनी पाळायला हवेत ! - सौ. नयना भगत, सनातन संस्था

सौ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा ? या विषयावरील चर्चासत्र
सर्वांना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे अधोरेखित 
करणारे एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र
     मुंबई - शनिशिंगणापूरच्या प्रकरणात महिलांवर अन्याय झालेला नाही. शनिशिंगणापूरच्या मंदिरातील महिलांच्या प्रवेशबंदीचा विषय स्त्रीमुक्ती, तसेच सामाजिक किंवा मानसिक स्तरावरील नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्रीय आहे. हिंदु धर्मामधील प्रत्येक देवतेचे कार्य वेगळे आहे. शनि ही उग्र देवता आहे. ती ब्रह्मचारी आहे. या देवतेविषयी ऋषीमुनींनी सांगितलेले नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. शनि मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. शनिशिंगणापूर येथील मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन एका मुलीने दर्शन घेतल्यानंतर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही, तर तेथे महिलांनी जाऊ नये. अशा ठिकाणी महिलांनी न गेल्यास त्यांचा अपमान होत नाही, तसेच या कमी महत्त्वाच्या गोष्टीला अधिक महत्त्व देऊ नये, अशी ठाम भूमिका पत्रकार परिषदेत मांडलेली होती. त्यांच्या या भूमिकेच्या अनुषंगाने एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

तमिळनाडूतील ६ मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक !

भारताकडून श्रीलंकेच्या मच्छिमारांना अटक, अशी बातमी कधी ऐकायला मिळते का ?
     रामेश्‍वरम् - मच्छिमारी करतांना श्रीलंकेची सागरी हद्द ओलांडल्याच्या आरोपावरून भारतातील ६ मच्छिमारांना १९ डिसेंबरच्या रात्री श्रीलंकेने अटक केली, तसेच त्यांच्या बोटीही हस्तगत केल्या. या सर्व मच्छिमारांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हे सर्वजण तमिळनाडूतील पुदुकोट्टाई जिल्ह्यातील जिगाथपट्टणम् येथील रहिवासी आहेत.

आतंकवादविरोधी पथकाकडून आय.एस्.आय.एस्.ची ८० संकेतस्थळे बंद

महाराष्ट्र पोलिसांचे वरातीमागून घोडे ! ही संकेतस्थळे यापूर्वीच का नाही बंद केली ?
     पुणे - भारतीय युवकांमध्ये जलदगतीने होणारा आय.एस्.आय.एस्. चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने या संघटनेच्या जिहादी विचारांचा प्रचार करणारी ८० संकेतस्थळे बंद केली आहेत. आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावाखाली आलेल्या पुण्यातील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीची नुकतीच सुटका करण्यात आली. त्यानंतर आतंकवादविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. ही मुलगी संकेतस्थळावरील आय.एस्.आय.एस्.च्या चित्रफितीमुळे या संघटनेकडे आकृष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारतीय प्रशासनाची स्थिती अशी होऊ देणारे सर्वपक्षीय राज्यकर्तेच याला उत्तरदायी आहेत. त्यांनाच दूर करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

     गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या आदेशानंतर १० डिसेंबर २०१५ या दिवशी राज्यातील सर्व शासकीय खात्यांच्या कामकाजाची आकस्मिक पाहणी करण्यात आली होती. या पाहणीद्वारे शासकीय खात्यांमधील स्थिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी स्पष्ट केली.
१. बर्‍याच खात्यांमध्ये कर्मचारी उशिरा येतात.
२. धारिका व्यवस्थित हाताळत नाहीत, कामे प्रलंबित ठेवतात, अशा गोष्टी निदर्शनास आल्या आहेत.
३. अनेक शासकीय खात्यांमध्ये बायोमेट्रिक यंत्रे चालत नाहीत.

येरवडा (पुणे) येथे पोलीस कर्मचार्‍याकडून मद्यपान करून गोंधळ

असे पोलीस हे गृह विभागाला कलंकच आहेत !
 अशा पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक !
     पुणे - येथील येरवडा भागामध्ये मागील आठवड्यात काही तरुणांच्या टोळक्याने दोन व्यक्तींना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली होती. त्या वेळी त्यांचे इतर साथीदार हातात तलवारी घेऊन रस्त्यावर फिरले होते. यावर उपाय म्हणून पोलिसांनी येथील चित्रा चौकात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यातील एका पोलीस कर्मचार्‍याने मद्यपान करून एका भाजी विक्रेत्या महिलेला शिवीगाळ केली आणि तिच्या दुकानातील भाजी रस्त्यावर फेकून दिली. (अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक)

संबंधित धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी लक्ष घालावे ! - हिंदु जनजागृती समितीची विनंती

सनातनच्या साधकावरील प्राणघातक आक्रमणाचे प्रकरण
     जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील साधक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर २० डिसेंबर या दिवशी सकाळी धर्मांध मुसलमान आक्रमकांनी प्राणघातक आक्रमण केले. या धर्मांध मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, याकरिता शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीने केली आहे. श्री. उद्धव ठाकरे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांना समितीचे सर्वश्री उदय बडगुजर, दत्तात्रय वाघुळदे, विजय पाटील आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी निवेदन दिले. या वेळी श्री. ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

सातारा येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

सभेच्या प्रसारानिमित्त काढण्यात
आलेली वाहनफेरी
    सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे. सभेच्या आयोजनामुळे शाहूनगरीत भगव्या उत्साहाचे आणि शिवमय वातावरण सिद्ध झाले आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना, गणेशोत्सव मंडळे या ठिकाणी प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदूंमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. 
    २२ डिसेंबर या दिवशी श्री शाहू कलामंदिर, राजवाडा, सातारा या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सभेस जिल्ह्यातील समस्त धर्मप्रेमी, शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी उपस्थित राहून हिंदु ऐक्याची शक्ती दाखवावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

देशाला दुःस्थितीतून बाहेर काढण्यासाठी हातात बंदूक घेणे किंवा परिवर्तनासाठी सकारात्मक प्रयत्न करणे, हे दोनच पर्याय ! - अभिनेते नाना पाटेकर

एका अभिनेत्याला जाणवणारी देशातील भयावह परिस्थिती एकाही राज्यकर्त्याला का जाणवत नाही ?
     पुणे - राज्यकर्त्यांची केवळ नावे पालटतात; परंतु परिस्थिती पालटत नाही. त्यांना शिव्याशाप देऊन वेळ घालवण्यापेक्षा आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. मी आणि माझे यामध्येच आपण गुरफटत आहोत. यामुळे देश ही संकल्पना लोप पावत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बंदूक हातात घेऊन नक्षलवादी होणे किंवा सकारात्मक पालटासाठी प्रयत्न करणे, हे दोनच पर्याय आहेत, असे परखड प्रतिपादन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

गीतेची अशीही काही वैशिष्ट्ये !

१. जीवनात गीता अवश्य वाचावी. गंगा नदी ही जरी संपूर्ण पवित्रच असली, तरी गंगा नदीच्या काठावरील हरिद्वार, काशी, प्रयाग या क्षेत्रांना तीर्थक्षेत्र समजतात. या क्षेत्रांना विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गीताही संपूर्ण पवित्रच आहे; पण त्यातील अध्याय ९, १२ आणि १५ हे तीर्थक्षेत्राप्रमाणे महत्त्वाचे आहेत.
२. संत ज्ञानेश्‍वर यांनी समाधी घेतांना गीतेचा ९ वा अध्याय मांडीवर ठेवून समाधी घेतली आहे. त्यामुळे साधकांनी ९ वा अध्याय वाचायला हवा. - श्री. अनिल बोकील, पुणे

पुणे विभागात त्रुटी आढळलेली सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालये

     पुणे - राज्यातील सर्वाधिक महाविद्यालये ही पुणे विभागात आहेत. या विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ३४८ विनाअनुदानित महाविद्यालये असून त्यातील १२७ महाविद्यालये ही पुणे विभागातील आहेत. या महाविद्यालयांविषयी येणार्‍या तक्रारींनुसार त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते.

गडदुर्गांना भेट द्या ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

     सातारा, २० डिसेंबर - शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना भेटावयाचे असेल, तर त्यांनी रक्त सांडलेल्या आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचे घटक असणार्‍या गडदुर्गांना भेट द्या, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते शिवप्रतिष्ठान आयोजित जाहीर सभेत बोलत होते. येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात त्यांची सभा पार पडली.

ईश्‍वरपूर (इस्लामपूर) येथील प्रख्यात डॉक्टर दाम्पत्याची चाकूने भोसकून हत्या

राज्यात अराजक !
     सांगली, २० डिसेंबर - सांगली जिल्ह्यातील ईश्‍वरपूर (इस्लामपूर) येथील प्रख्यात डॉक्टर दाम्पत्याची अज्ञात आक्रमकांनी त्यांच्या घरातील चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना २० डिसेंबर या दिवशी घडली. फिजिशियन डॉ. प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी स्त्री-रोगतज्ञ डॉ. अरुणा कुलकर्णी या दोघांचीही हत्या करून अज्ञातांनी पळ काढला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी नाकाबंदी करून गुन्हेगारांचा तपास चालू केला आहे.

शाम मानव आणि अंनिसला मदर तेरेसांचे चमत्कार मान्य असतील, तर २१ लाखांचे बक्षीस देऊन स्वतःचा नैतिक पराभव मान्य करावा ! - हिंदु जनजागृती समिती

मदर तेरेसा यांच्या चमत्काराच्या दाव्यासमोर शाम मानव आणि अंनिस गप्प का ?
     नागपूर - सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या चमत्काराला मान्यता देऊन त्यांचा संत होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एरव्ही हिंदु धर्मातील एखाद्या संतांनी चमत्काराचा दावा केल्यावर त्या विरोधात दंड थोपटणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव आणि दाभोलकरांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आता ख्रिस्त्यांनी उघडपणे चमत्काराचा दावा केल्यावर कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ? या घटनेला चार-पाच दिवस होऊनही शाम मानव यांनी वा अंनिसने याविषयी साधी प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. मानव आणि अंनिसला हा चमत्कार मान्य आहे, असेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांपासून चमत्काराच्या दाव्यासाठी ठेवलेले २१ लाख रुपयांचे बक्षिस संबंधितांना देऊन स्वतःचा नैतिक पराभव मान्य करावा आणि समाजाची क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

कोल्हापूर येथे बजरंग दलाच्या वतीने शिवप्रतापदिन उत्साहात साजरा !

     कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापाचे चिंतन आपल्या राष्ट्राला नेहमी प्रेरणादायी ठरले आहे. यातीलच एक पराक्रम म्हणजे अफझलखानाचा प्रतापगडावर केलेला वध होय. जगातील सर्व सैनिकी विद्यापिठात गनिमी काव्याचे आदर्श युद्ध म्हणून प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात धार्मिक वादाचे कारण पुढे करत हा कालबाह्य पराक्रम नामशेष करण्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येऊ लागला.

रेल्वेत तरुणींशी गैरवर्तणूक करणार्‍या भामट्यांना केले जेरबंद !

     पाटलीपुत्र (पाटणा) - पाटणा येथून देहलीला जात असलेल्या श्रमजीवी एक्स्प्रेसच्या एका वातानुकूलीत डब्यात काही भामटे बलपूर्वक घुसले. त्यांनी तेथे गोंधळ घालून काही जागा बळकावल्या, तसेच विरोध करणार्‍या तरुणींशीही गैरवर्तणूक केली. या तरुणींनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना ट्विट करून यासंदर्भात सूचना दिली असता पुढील स्थानकावर रेल्वे सुरक्षादलाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्यापैकी एका आरोपीला अटक केली, तर बाकीचे पळून गेले. (काँग्रेसच्या राज्यात अशी बातमी कधी वाचली होती का ? - संपादक)

पुणे येथील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

     पुणे, २० डिसेंबर - येथील सेवा सदन शाळेच्या वसतिगृहातील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात प्रविष्ट केले आहे. २० डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनींना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही विद्यार्थिनींना उपचारासाठी गोरे रुग्णालय येथे, तर काहींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयांतील विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थिनी सध्या अतिदक्षता विभागामध्ये असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या सर्व विद्यार्थिंनी इयत्ता ५ वी ते ११ वीमध्ये शिकणार्‍या आहेत. 

राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या संपामुळे संभाजीनगर विभागाला १ कोटी ५० लक्ष रुपयांचा तोटा राज्यभर केलेल्या संपामुळे महामंडळाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने संपकर्त्या संघटनांकडून घ्यावी !

     संभाजीनगर, २० डिसेंबर - राज्य परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्र एस्टी वर्कर्स काँग्रेस च्या (इंटक) वतीने १७ डिसेंबर या दिवशीपासून वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. हा संप १८ डिसेंबर या दिवशी दुपारनंतर मागे घेण्यात आला. या दीड दिवसाच्या संपामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संभाजीनगर विभागात सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपयांचा तोटा झाला आहे. (महामंडळाच्या एका विभागाचा तोटा एवढा असेल, तर इतर विभागांचा तोट्याचा विचार केल्यास हा तोटा आणखी किती मोठ्या प्रमाणात असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) 
     या संपाच्या वेळी आंदोलकांनी २०० हून अधिक गाड्या पंक्चर केल्या, तर अनेकांची हवा सोडली होती. त्यामुळे संप मागे घेतल्यानंतर या गाड्यांच्या दुरुस्ती करण्यातच अर्धा दिवस गेला. त्यामुळे एकूण ३९ तासांनंतर महामंडळाच्या बसगाड्या रस्त्यावर धावू लागल्या.

बारामती (जिल्हा पुणे) येथील एका शाळेतील ३ शिक्षकांनी काढली विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना ! अशा घटनांवर शासनाने कठोर 
कारवाई आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे !
     बारामती, २० डिसेंबर - येथील कार्‍हाटी गावच्या एका शाळेतील विद्यार्थी ३ दिवसांच्या सहलीसाठी कोकणात गेले होते. सहलीच्या कालावधीत गणपतीपुळे येथे त्या शाळेतील विद्यार्थिनी समुद्रात पोहून बाहेर येतांना त्यांची छायाचित्रे ३ शिक्षकांनी टिपली. त्यातील काही छायाचित्रे १९ डिसेंबर या दिवशी सामाजिक संकेतस्थळावर ठेवण्यात आली आणि ती सर्वत्र प्रसारित झाली. पालकांना हा अपप्रकार समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. त्या वेळी त्या तिन्ही शिक्षकांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. संबंधित शिक्षकांना निलंबित न केल्यास २१ डिसेंबरपासून शाळा बंद करण्याची चेतावणी पालकांनी दिली आहे. (अशा शिक्षकांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर पोलीस आणि शाळा प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. अशा वासनांध शिक्षकांना शिक्षण व्यवस्थेतून दूर करून त्यांना धर्माचरणाचे धडे देणे आवश्यक आहे. - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरमधील आतंकवाद रोखण्यासाठी आतंकवाद पोसणार्‍या पाकलाच धडा शिकवा !
     जम्मू-काश्मीरमधील हिंदवाडा येथे भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका मोहिमेत हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या फलक नूर या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jammu-Kashmir ke Hindawada me ek jihadi atankwadi giraftar ! - Kashmir me atankwad ko rokne ke liye Pak ko sabak sikhana awashyak !
जागो ! : जम्मू-कश्मीर के हिंदवाडा में एक जिहादी आतंकवादी गिरफ्तार ! - कश्मीर में आतंकवाद को रोकने के लिए पाक को सबक सिखाना आवश्यक !

मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण दिल्यास ते अद्वितीय अशा संस्कृतीपासून दुरावतात, हे लक्षात घ्या !

सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

जिहाद्यांचे समुपदेशन : फुंकर मारून आग विझवण्याचा प्रकार

     पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक हुशार मुलगी आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात असल्याची धक्कादायक गोष्ट नुकतीच उघडकीस आली. अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिकणारी ही युवती फेसबूक, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून परराज्यातील आणि परदेशातील जिहादी समर्थकांच्या संपर्कात होती. जिहादीकरणाची प्रक्रिया चालू झाल्याने तिच्या वेशातही पालट झाला होता. या मुलीचे आतंकवादविरोधी पथकाने म्हणे समुपदेशन चालू केले आहे आणि त्यामुळे मुलीमध्ये परिवर्तन होत आहे.

ज्योतिषासारख्या विषयावर वर्तमानपत्रांनी अघोषित बंदी लादणे, म्हणजे म्हातारीने कोंबडे झाकण्याचाच प्रकार !

१. वृत्तपत्र माध्यम आता भांडवलदारांचा जोड-उद्योग बनले 
असले, तरी लोकांसाठी ते उपयुक्त असणे
     हल्लीचे मोठे वृत्तपत्र हे जनतेसाठी नसते; पण ते जनतेच्या सेवेसाठी असते, असे भासवणे आवश्यक असते. बड्या भांडवलदारांचा तो एक जोड-उद्योेग असतो. म्हणजे प्रत्यक्षात वृत्तपत्रे लोकांसाठी जरी नसली, तरीही ती उपयुक्त निश्‍चित आहेत. 
२. दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी पत्रकार पक्षपाती भूमिका घेऊ शकत 
नसल्याचे आणि सर्वांचे विचार प्रगट करण्यासाठी वृत्तपत्र असल्याचे सांगणे
     संपादकांसारख्या विचारवंतांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान असावे, हे म्हणणे निखालस चूक आहे. या संदर्भात दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आरंभीच सांगितले की, ते कोणाही व्यक्तीवर ती चांगली किंवा वाईट असा शिक्का मारत नाहीत. प्रत्येकात चूक किंवा बरोबर, चांगले किंवा वाईट, असे काही भाग असतातच. त्यामुळे मी आणि पत्रकार पक्षपाती भूमिका घेऊ शकत नाही. थोडक्यात सर्वांचे विचार प्रगट करण्याचे वृत्तपत्र हे माध्यम असते आणि तोच दैनिक लोकसत्ताचा शिरस्ता आहे.

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेस २ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती

       सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना डावीकडून पू. (कु.) स्वाती खाड्ये, मध्यभागी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. अभिजित देशमुख 
सविस्तर वृत्त वाचा लवकरच...

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २४ डिसेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ डिसेंबर या दिवशी 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय : इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीरावमस्तानी चित्रपटाला विरोध करणे
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक
दिनांक : मंगळवार, २२ डिसेंबर २०१५
वेळ : दुपारी ३.३० ते ४.३०
संपर्क क्रमांक : ९४०४९५६४८१

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

आयुर्वेदाला जे सहस्रो वर्षांपासून ज्ञात आहे, ते आता कळणारे पाश्‍चात्य संशोधक !

     तूप आणि लोणी यांमुळे हृदयविकार बळावतो, हा आतापर्यंत असलेला समज खोटा ठरवणारे संशोधन केंब्रिज विद्यापीठ आणि ब्रिटीश हार्ट फाउंडेशन यांच्या वैज्ञानिकांनी केले आहे. वैज्ञानिकांनी १८ देशांतील सहा लाख लोकांच्या एकूण संपृक्त मेदाम्लांच्या सेवनाचे प्रमाण पाहिले आणि जैवनिदर्शकाच्या साहाय्याने त्याचे रक्तातील स्थान आणि इतर बाबी तपासल्या असता त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवत असल्याची बाब खरी नसल्याचे त्यांना दिसून आले.(२४.३.२०१४)

म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले तथ्यहीन आरोप आणि त्या आरोपांचे केलेले खंडण !

कु. मधुरा भोसले
गीताजयंतीच्या निमित्ताने...
       आज गीताजयंती आहे. गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर धर्मद्रोही वारंवार टीका करतांना दिसतात. धर्मद्रोही अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.
१. आरोप : गीतेत स्त्रियांना गौण स्थान दिले आहे.
१ अ. खंडण
१ अ १. गीता हा धर्मग्रंथ आहे ! : मुख्य सूत्र हे की, गीता हा ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हे शिकवणारा धर्मग्रंथ आहे. त्यात स्त्री आणि पुरूष असा भेद नसतो.

श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचे विचार

१. गीतेशी तुलना केल्यावर विश्‍वाचे 
संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते !
    प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही. गीतेशी तुलना केल्यावर जगाचे संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते. मी नेहमी प्रातःकाळी माझ्या हृदय आणि बुद्धी यांना गीतारूपी पवित्र जलाने स्नान घालतो. - तत्त्ववेत्ता थोरो, अमेरिका

भगवद्गीता आणि महाभारत यांचे धडे आपल्या शिक्षणक्रमात हवेच ! - न्यायमूर्ती दवे

१. श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना 
बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे !
     २.८.२०१४ या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर्. दवे म्हणाले, श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे. खरे म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावर भारतात गदारोळ उठण्याचे काहीच कारण नव्हते; कारण महाभारत हे भारताचे आणि श्रीमद्भगवद्गीतासुद्धा भारताचीच ! तिचे धडे भारतात द्यायचे नाहीत, तर मग काय ते केनियात द्यायचे ? युक्रेनमध्ये द्यायचे कि ब्राझिलमध्ये द्यायचे ?

देव तारी त्याला कोण मारी ? या वचनाची अनुभूती घेणारे बांदा, सिंधुदुर्ग येथील नाणोसकर कुटुंबीय !

      वर्ष १९९८ मध्ये आम्ही नाणोसकर कुटुंबीय सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्यानंतर अल्पावधीतच ईश्‍वराने आम्हा सर्वांमध्ये साधनेची गोडी निर्माण केली. त्यानंतर गेल्या १७ वर्षांमध्ये आमच्यावर आर्थिक संकट, घरफोडी, जीवघेणे अपघात, तसेच काही प्रमाणात कौटुंबिक अरिष्टे आली. या सर्वच अरिष्टांतून तळहातावरील फोडाप्रमाणे श्रीकृष्णाने आम्हा सर्वांचेच रक्षण केले आणि साधनेत टिकवून ठेवले. या सर्व ऋणांची परतफेड करणे कदापि शक्य नाही. अनेक अरिष्टांतून साधनेत टिकवून ठेवण्याची किमयाही श्रीकृष्णाने केली. त्याच्याप्रती शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणेही कठीण ! नुकत्याच एका जीवघेण्या प्रसंगात श्रीकृष्णाने आमच्यावरील मातृ-पितृ छत्र कायम ठेवले, याविषयीचा प्रसंग शब्दात मांडण्याचा हा वेडा प्रयत्न !

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

      अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

सनातनच्या साधकांची मुले यशस्वी होण्यामागील कारणमीमांसा !

श्री. संजय घाटगे
     प.पू. गुरुदेव, सनातनच्या साधकांच्या पाल्याने एखाद्या क्षेत्रात लक्षणीय यश मिळवल्यावर, सनातनचे पालक आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक ! या शीर्षकाखाली वृत्त दिले जाते. याविषयी देवाच्या कृपेने झालेले चिंतन येथे देत आहे.
१. मुलांचे खरे पालक आम्ही नसून प.पू. गुरुदेवच !
     आमचे पालक प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव आहेत, तर आम्ही आमच्या मुलांचे पालक कसे असणार ? केवळ आमच्या पोटी ही मुले जन्मली आहेत; म्हणून आम्ही त्यांचे पालक होतो; पण त्यांचे खरे पालक प.पू. गुरुदेवच आहेत ! जे चराचरातील जिवांच्या उद्धारासाठी अवतरले आहेत, ते सनातनच्या साधकांच्या पाल्यांकडे स्वप्नात तरी दुर्लक्ष करतील का ? आमच्या अज्ञानामुळेच हे लक्षात येत नाही, हेच खरे !

पू. दाभोलकरकाकांनी सांगितल्याप्रमाणे नामजपासह सेवा चालू करणे आणि नामजप आतूनच चालू असल्याचे जाणवणे

पू. गुरुनाथ दाभोलकर
      २४.५.२०१५ या दिवशी मी देवद आश्रमात आलो आणि मला जोडारी-कातारी (फॅब्रिकेशन) विभागात सेवा मिळाली. एक दिवस मी सेवा करत असतांना माझ्या मनात घरगुती विचार चालू असल्याने माझे नाम बंद पडले होते. त्याच वेळी माझ्याजवळून पू. दाभोलकरकाका चालले होते; म्हणून मी त्यांना नमस्कार केला. तेही मला नमस्कार दादा, असे म्हणून थांबले आणि म्हणाले, दादा, तुमचे नाम चालू आहे का ? मी नाही, असे म्हणताच ते पुढे म्हणाले, नाम घेत सेवा करायची असते. त्यामुळे मनातील इतर विचार थांबतात आणि सेवा भावपूर्ण होते. त्याक्षणी मी नामजपासह सेवा चालू केली आणि तेव्हापासून माझा नामजप आतूनच चालू आहे, याची सातत्याने जाणीव होते, तसेच माझ्या मनातील इतर विचारही उणावले.
- श्री. गणेश अशोक वाघमारे, भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर ( २७.५.२०१५)

स्वतःकडून झालेल्या अनंत अपराधांविषयी साधकाने प.पू. गुरुदेवांच्या चरणी आर्ततेने केलेली क्षमायाचना आणि त्याला सुचलेल्या प्रार्थना !

श्री. परशुराम गोरल
हे गुरुदेवा,
आपल्या सुकोमल आणि सर्वांगसुंदर चरणांना या पापी जिवाचा साष्टांग नमस्कार !
     हे गुरुराया, माझ्याकडून अनंत अपराध झाले. आई-वडिलांनी या जन्माचा उद्धार करण्यासाठी दिलेली मोकळीक, भावंडांनी दिलेली साथ, तुम्ही प्रत्येक साधकांच्या माध्यमातून मला दिलेले प्रेम आणि प्राणप्रिय गुरुमाऊली, आपण आपल्या चरणांशी एकरूप होण्यासाठी दिलेली संधी, या सर्व गोष्टींचा मी काहीच लाभ करून घेतला नाही. त्याविषयी अंतःकरणापासून आपल्या चरणी मी कान धरून अन् नाक घासून क्षमायाचना करतो.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

कुबड आलेल्या कुब्जेचा उद्धार करतांना श्रीकृष्ण (१३.१२.२०१३, सकाळी १२ ते दुपारी १)

लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी धनाचा संचय करतो, त्या ठिकाणी मोगर्‍याचे फूल किंवा तुळशीपत्र किंवा शमीपत्र ठेवावे, असे महर्षींनी सांगणे

    
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
आपल्या घरातील अथवा आश्रमातील मुख्य धनसंचयाच्या ठिकाणी मोगर्‍याचे फूल ठेवावे. मोगर्‍याचे फूल मिळत नसेल, तर किमान तुळशीपत्र किंवा शमीपत्र ठेवावे. मोगर्‍याचे फूल नवीन मिळेल, तेव्हा आधीचे पालटले तरी चालते. नाहीतर ते तेथेच सुकले तरी चालते. धन किती आहे, यापेक्षा मोगर्‍याचे फूल आपण ठेवतो कि नाही, यालाच अधिक महत्त्व असल्याचे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले.
     (वरील उदाहरणावरून लक्षात आले, महर्षी प्रत्येक कृतीतील तत्त्वाला किती महत्त्व देतात. धनाचा संचय किती आहे, यापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी मोगर्‍याचे फूल ठेवून मिळणारा श्री लक्ष्मीचा आशीर्वादच महत्त्वाचा आहे. हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर धनही हवे. - संकलक)

रुग्णाईत असतांना विठ्ठलाच्या स्मरणात रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. कमल बापूराव डगवारआजी !

      १०.१२.२०१५ या दिवशी वर्धा येथील साधिका सौ. मंदाकिनी डगवार यांच्या सासूबाई ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कमल बापूराव डगवारआजी यांचे देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८८ वर्षे होते. २२.१२.२०१५ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त सौ. मंदाकिनी डगवार यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
     निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
       हरि ॐ तत्सत 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
 ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ
हिंदु धर्मात वर्णाश्रम, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत - १. ब्रह्मचर्याश्रम, २. गृहस्थाश्रम, ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. त्यांचा अनुक्रमे अर्थ आहे - १. ब्रह्मचर्यपालन, २. गृहस्थजीवनाचे पालन, ३. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनीवृत्तीने वनात रहाणे आणि ४. संन्यासजीवनाचे पालन. या चारही शब्दांना आश्रम हा शब्द जोडण्याचे महत्त्व हे की, जीवनाच्या चारही टप्प्यांत आश्रमवासियाप्रमाणे जीवन जगावे, याची आठवण करून देणे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.१२.२०१५)


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

बोलाची कढी आणि बोलाचाच भात

संपादकीय
   केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना समान नागरी कायदा हे देशाचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी समान नागरी कायदा महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले होते. भाजप शासन सत्तेत आल्यानंतरही समान नागरी कायदा होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. अर्थात् नंतर नेहमीप्रमाणे घुमजाव झाले, ते निराळे; मात्र कायदामंत्री उपयुक्त आहे, असे सांगत असलेला कायदा अजूनही अस्तित्वात का आला नाही, याविषयी ऊहापोह होणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn