Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

गुरुदेव काटेस्वामीजी यांची आज पुण्यतिथी 
हिंदुद्रोह्यांनो, सत्यमेव जयते हे लक्षात ठेवा !
     असत्याच्या पायावर कोणताही अन्याय, अविवेक अथवा काहीही टिकू शकत नाही. भलेही त्यामागे सत्ता, संपत्तीचे बळ असो ! काळ हाच सत्याचा संस्थापक आहे आणि असत्याचा विनाशक आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१५)

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विनाअट जामीन संमत !

 २० फेब्रुवारीला पुढील सुनावणी 
नॅशनल हेरॉल्डमधील गैरव्यवहाराचे प्रकरण
भ्रष्टाचाराने बरबटलेली काँग्रेस !
      नवी देहली - नॅशनल हेरॉल्डमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पटियाला हाऊस न्यायालयाने विनाअट जामीन संमत केला. न्यायालयाने या दोघांनाही प्रत्येकी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन संमत केला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील याचिकाकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी न्यायालयाच्या या निर्णयास विरोध दर्शवत सोनिया आणि राहुल हे देश सोडून पळून जातील, असा आरोप केला होता; मात्र न्यायालयाने सोनिया आणि राहुल यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला.

आय.एस्.आय. आणि पाक सैन्य यांच्याकडून भारतात केल्या जातात आतंकवादी कारवाया ! - अमेरिकेतील खासदाराची माहिती

कुठे भारताच्या शत्रूराष्ट्राविषयी अचूक माहिती असणारे अमेरिकेतील खासदार, तर कुठे संसदेत 
नको त्या विषयावर गदारोळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडणारे भारतातील खासदार ?
     वॉशिंग्टन - पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय. आणि पाक सैन्य यांच्याकडून भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी आणि अफगाणिस्तानमध्ये हिंसेद्वारे अस्थिरता निर्माण करण्यासाठी काम करत आहेत, असा घणाघाती आरोप अमेरिकेतील एका प्रमुख खासदार एड् रॉयस यांनी केला. अमेरिकेचे ज्या देशांशी राजकीय संबंध आहेत, अशा देशांमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेच्या संसदेने एक समिती स्थापन केली आहे. रॉयस हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या कृत्यांची गंभीर दखल घेत रॉयस यांनी अमेरिकेला पाकशी अणुऊर्जा करार करण्यास तीव्र विरोध दर्शवला.

ऋषिमुनींची मंत्रध्वनी चिकित्सा हीच आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी ! - जर्मन संशोधकांचे मत

भारताच्या महान हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या ! 
हिंदु संस्कृतीला मागासलेली संबोधून नावे ठेवणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !
मंत्रध्वनी चिकित्सेचा विदेशातील रुग्णांवर यशस्वी प्रयोग
       प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी वापर करत असलेली मंत्रध्वनी (मंत्रोच्चार) चिकित्सा हीच आजच्या काळातील आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी आहे, असे अमेरिका आणि जर्मन येथील संशोधकांनी मान्य केले आहे. प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी मंत्राद्वारे उपचार करत असत. याच आधारावर अमेरिकेच्या लॉस एंजिल्स आणि जर्मनीच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी अल्ट्रा साऊंड थेरपी विकसित केली आहे. याचाच अर्थ आता भारताच्या प्राचीन उपचार पद्धतीला नवे नाव देऊन मंत्रध्वनी चिकित्सा पद्धतीचा जगात नव्याने वापर होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च दाबाच्या तारेला स्पर्श होऊन गंभीररित्या घायाळ झालेल्या तरुणाला न्यूयॉर्क येथील माऊंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक औषधोपचार करूनही तो बरा न झाल्यामुळे त्याच्यावर मंत्रध्वनी चिकित्सा म्हणजेच अल्ट्रा साऊंड थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. त्यानंतर हा तरुण केवळ १५ दिवसांत बरा झाला. अशाच प्रकारे जर्मनीतील अनेक डॉक्टरांनी मंत्रध्वनी चिकित्सेद्वारे अनेक असाध्य व्याधी झालेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. पॅरिसमधील सालपेट्री रुग्णालयामध्ये अवयव कापले गेलेल्या २७ लोकांवर अल्ट्रा साऊंड थेरपी म्हणजे मंत्रध्वनी चिकित्सेद्वारे उपचार करण्यात आले आहेत. 

भारतविरोधी वक्तव्ये करू नका ! - नवाज शरीफ यांचा पाकच्या मंत्र्यांना आदेश

     इस्लामाबाद - भारत-पाकिस्तान यांच्यात शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या मंत्र्यांना भारतविरोधी वक्तव्ये न करण्याचा आदेश दिला आहे. (भारतात प्रतिदिन आतंकवाद पसरवणार्‍या पाकच्या या भूलथापांवर भारतीय राज्यकर्त्यांनी कदापि विश्‍वास ठेऊ नये ! - संपादक) शरीफ म्हणाले, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सर्वांनी शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे.

नागपूर रेल्वेस्थानकाला पू. केशव हेडगेवार यांचे नाव द्या !

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी
     नागपूर - नागपूर रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून केली.

निर्भयाच्या बलात्कार्‍यास देहली शासनाचे आर्थिक साहाय्य !

     संपूर्ण देशाला सुन्न करून टाकणार्‍या देहलीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन महंमद अफरोज या आरोपीची येत्या २० डिसेंबरला सुटका होण्याची शक्यता आहे. या आरोपीची सुटका झाल्यानंतर त्याला उदरनिर्वाह करता यावा आणि त्याचे पुनर्वसन व्हावे, या हेतूने देहलीतील केजरीवाल शासन १० सहस्र रुपये रोख आणि एक शिवणयंत्र देणार आहे.
     केंद्रशासनाने या प्रकरणी चिंता आणि अप्रसन्नता व्यक्त केली आहे. अल्पवयीन आरोपीची मानसिक स्थिती संशयास्पद असून सध्या तरी त्याला बालसुधारगृहातच ठेवण्यात यावे, असे केंद्रशासनाने म्हटले आहे. आरोपीची सुटका ही सामाजिक स्तरावर हानी करणारी गोष्ट आहे, अशी भीती केंद्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या अहवालात व्यक्त केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला निर्भयाचे पालक आणि सामाजिक संघटना यांनी विरोध दर्शवला असल्याने त्याला आणखी दोन वर्षे बालसुधारगृहात ठेवले जाणार कि सोडणार, हे २० डिसेंबर या दिवशी स्पष्ट होणार आहे. निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे की, आरोपीला फाशी देणे हीच त्यांच्या मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल.

कॅलिफोर्नियातील आक्रमणानंतर अमेरिकेत मुसलमान आणि मशीद यांवरील आक्रमणांत तिपटीने वाढ !

  • जिहादी आतंकवादाविरुद्ध वेळीच कठोरपणे पावले उचलली असती, तर आज ही वेळ आली नसती ?
  • भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा खोटा अहवाल बनवणारी अमेरिका आता याविषयी काय म्हणणार आहे ?
      वॉशिंग्टन - कॅलिफोर्नियात झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर अमेरिकेतील मुसलमान नागरिक, तसेच मशीद यांवरील आक्रमणांत ३ पटींनी वाढ झाली आहे. कॅलिफॉर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधन करणार्‍या गटाने केलेल्या संशोधनात ही गोष्ट उघड झाली. नोव्हेंबर २०१५ मध्ये मुसलमानांवरील आक्रमणाच्या १२हून अधिक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत सध्या मशिदी, बुरखा घालणार्‍या विद्यार्थिनी, मुसलमान नागरिकांच्या मालकीचे व्यवसाय आदींवर आक्रमणे करण्यात येत आहेत. त्यांना हत्या करण्याच्या धमक्याही मिळत आहेत. कॅलिफोर्नियात अशा प्रकारच्या घटना वाढू शकतील, अशी चेतावणी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि काही नागरी हक्क संघटनांनी यापूर्वी दिली होती.

समान नागरी कायदा असणे, हे देशाचे कर्तव्य ! - केंद्रीय कायदामंत्री

समान नागरी कायद्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलून 
निवडणुकीतील आश्‍वासनाची पूर्ती करावी, ही अपेक्षा !
      नवी देहली - समान नागरी कायदा असणे, हे देशाचे कर्तव्य आहे, असे केंद्रीय कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात नमूद केले. या विषयाशी संबंधित सर्व सूत्रांची चाचपणी करून संब्ंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच याविषयीचा निर्णय घेतला जाईल, असेही गौडा यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीही गौडा यांनी समान नागरी कायदा हा राष्ट्र्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते.

७ कोटीहून अधिक लोकांना देणार २ रुपये किलो दराने गहू-तांदूळ !

बंगाल शासनाकडून येणार्‍या निवडणुकीसाठी लोकांना प्रलोभन !
२ रुपये किलो दराने तांदूळ वाटणे, म्हणजेे येणार्‍या निवडणुकीसाठी ममता यांनी 
मतदारांना दिलेली लाचच होय ! हे लोकराज्याचे अपयश नाही का ?
     कोलकाता - बंगालच्या ममता बॅनर्जी शासनाने राज्यातील ७ कोटींहून अधिक लोकांना २ रुपये किलो दराने गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीतंनर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयी माहिती देतांना ही योेजना २७ जानेवारी पासून चालू होणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीची ही सिद्धता असल्याचे बोलले जात आहे. 
     त्या म्हणाल्या की, लोकांना खाद्य सुरक्षा पुरवण्यासाठी गहू-तांदळासह दर मासाला प्रत्येक शिधापत्रक धारकाला ५ किलो डाळही देण्यात येणार आहे. ७० लाख लोकांनी सबसीडी दराप्रमाणे खादान्य मिळवण्यासाठी आवेदने दिली होती. या लोकांना बाजार दराच्या अल्प दरात डाळ मिळणार आहे. याकरता राज्य आणि केंद्र यांच्या योजनांमध्ये पालट करण्यात आले आहेत.

दिलवाले हा चित्रपट बंद न केल्यास चित्रपटगृह पेटवून देऊ ?

मेरठमध्ये संगीत सिंह सोम सेनेची चेतावणी
हिंदूंच्या सहिष्णुतेचा अंत पहाणारे असहिष्णुतावादी !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मेरठमध्ये शाहरुख खानचा अभिनय असलेला दिलवाले या चित्रपटाच्या विरोधात संगीत सिंह सोम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीपक चित्रपटगृहात जाऊन जोरदार गोंधळ घातला, तसेच ४८ घंट्यात चित्रपट बंद केला नाही, तर चित्रपटगृहाला आग लावण्यात येईल, अशी चेतावणी दिली. 
    संगीत सिंह सोम यांचे कार्यकर्ते १८ डिसेंबर या दिवशी दीपक चित्रपटगृहात पोहोचले. त्यांनी चित्रपटगृहाच्या संचालकांना चित्रपट बंद करण्याची विनंती केली. त्यानंतर संचालकांनी चित्रपट बंद करण्यास असमर्थता दर्शवली. या वेळी कार्यकर्ते आणि चित्रपटगृहाचे व्यवस्थापक यांच्यात वाद झाला. तेव्हा कार्यकर्त्यांनी चित्रपटगृह पेटवून देण्याची चेतावणी दिली. या प्रकरणी चित्रपटगृहाचे व्यवस्थापक अशोक त्यागी यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे. त्यात संघटन प्रदेशाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांवर आरोप लावण्यात आला आहे. शाहरुख खान यांनी असहिष्णुतेविषयी वक्तव्य केल्यावरून जनमत संतप्त झाले.

खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, यासाठी समीर गायकवाड यांचे उच्च न्यायालयात आवेदन

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे प्रकरण !
      मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांनी त्यांच्यावर चालू असलेला खटला कोल्हापूरबाहेर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे चालवावा, अशी मागणी करणारे आवेदन उच्च न्यायालयात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या माध्यमातून सादर केले आहे. न्यायमूर्ती अनिल जोशी यांच्या खंडपिठासमोर त्याची सुनावणी झाली. अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता श्री. सुभाष झा यांनी श्री. गायकवाड यांची बाजू मांडली.

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याविषयी गूगलवर बहिष्कार घाला ! - भाजपा खासदार

देशाचा नकाशा वारंवार चुकीचा दाखवूनही त्याविरुद्ध ठोस कृती 
न करणारा जगातील एकमेव देश भारत !
      नवी देहली - संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा दाखवणार्‍या गूगलवर बहिष्कार घालावा, अशी मागणी भाजपचे खासदार तरुण विजय यांनी राज्यसभेत केली. मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि इतर अमेरिकी आस्थापने भारताच्या नकाशात फेरफार करून चुकीचा नकाशा पसरवत असून जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही, तोपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात यावा, असे विजय यांनी म्हटले आहे.

प्रदूषणात भारताने चीनला मागे टाकले !

       नवी देहली - आर्थिक सुबत्ता, राष्ट्रीय उत्पन्न आदी बाबतीत भारत चीनच्या मागे असला, तरी वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतातील शहरांचा प्रदूषणासंबंधी अभ्यास केल्यानंतर देशातील प्रदूषणाविषयीचा अहवाल १५ डिसेंबर या दिवशी घोषित केला. या अहवालातील नोंदीनुसार राष्ट्रीय वायू गुणवत्ता आकडेवारीत भारतातील १७ पैकी १५ शहरांतील वातावरणाच्या हवेची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा कितीतरी पटीने खालावली आहे. देशात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असली, तरी प्रदूषणाचे मोजमाप करण्याची सुविधा देशांतील शहरांत चीनसह देशांपेक्षा अत्यल्प आहे, असे ग्रीनपीस या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. अमेरिकेतील सर्व मोठ्या शहरांत सरासरी ४ प्रदूषण मोजणारी केंद्रे आहेत. युरोपमध्ये अशी सरासरी ५ केंद्रे, तर चीनमध्ये सरासरी ८ केंद्रे आहेत; मात्र भारतात हीच सरासरी केवळ २.५ एवढी आहे. सर्वेक्षणानुसार लक्ष्मणपुरी (लखनौ), कर्णावती, जयपूर आणि फरिदाबाद येथील हवा सर्वाधिक प्रदूषित आहे. प्रत्येक वर्षी जुलै ते नोव्हेंबर या काळात या शहरांतील हवेची स्थिती अनेक दिवस गुणवत्तेच्या मानकापेक्षा खालावलेली असते.

देहलीत हिंदु महिलांच्या संदर्भात वाढत चाललेली असहिष्णुता !

देहलीत नदीमने केले अल्पवयीन हिंदु युवतीचे अपहरण
राष्ट्रवादी शिवसेनेने केले पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन !
पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन करतांना
राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते
      नवी देहली - येथील संजय अमर वसाहतीतील एका अल्पवयीन मुलीला मटणाच्या दुकानात काम करणार्‍या नदीमने फूस लावून पळवून नेले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी शिवसेना या हिंदुत्ववादी संघटनेने देहलीच्या पोलीस मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. राष्ट्रवादी शिवसेनेचे देहली प्रदेशाध्यक्ष श्री. ईश्‍वर चौधरी आणि उपाध्यक्ष श्री. रमाकांत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदनही पोलीस सहआयुक्त एस्.के. गौतम यांना देण्यात आले. (यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? पोलीस प्रशासन स्वतःच घटनेचे गांभीर्य जाणून तत्परतेने कारवाई का करत नाही ? - संपादक)

सुधींद्र कुलकर्णी यांच्या रूपात आजही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जिवंत ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर


डावीकडून १. श्रीमती विजयाताई भोसले, २. श्री. अभय वर्तक
३. श्री. सतीशकुमार प्रधान यांचा सत्कार करतांना
     वाई (जिल्हा सातारा) - मत आणि जातीद्वेष यांचे राजकारण करून आज राज्यकर्ते तरुणांची माथी भडकवण्याचे कार्य करत आहेत. पुरोगामित्वाचे नवे फॅड सध्या भारतात आले आहे, ते म्हणजे पुरस्कार वापसी ! महाराष्ट्राचा मूळ धर्म हा क्षात्रधर्म आहे; मात्र ब्रिगेडवाले जातीजातीचे राजकारण करून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. मध्यंतरी आर्पीआयच्या काही मंडळींनी कृष्णाजी भास्कर वधदिन साजरा केला; मात्र आज सुधींद्र कुलकर्णींच्या रूपाने असेही कुलकर्णी जिवंत आहेत. त्यांना शरद पवार यांच्यासारखे जातीपातीचे राजकारण करणारे राज्यकर्ते पोसत आहेत. खर्‍या अर्थाने शरद पवार हेच आजचे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहेत, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी मांडले. वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रतापदिन अर्थात् अफजलखानवध आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. पुनाळेकर यांचा पंताजीकाका बोकील आभिवक्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

कथित धर्मनिरपेक्षतावाल्यांच्या फुत्कारामुळे सनातन संपणार नाही ! - पू. नंदकुमार जाधव

शहापूर येथील हिंदु धर्मजागृती सभा
पू. नंदकुमार जाधव
      शहापूर (जिल्हा संभाजीनगर) - डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुरोगाम्यांनी त्यांच्या वैचारिक आतंकवादाचे प्रदर्शन घडवत सनातनच्या विरोधात कंठशोष चालू केला. काँग्रेस, कम्युनिस्ट, रिपब्लिकन आदी पक्ष, तसेच ख्रिस्ती आणि मुसलमान संघटना यांना हाताशी धरून सनातन संस्थेला संपवण्याचे चक्रव्यूह रचले. खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा करा, असे म्हणण्याऐवजी अविवेकीपणे सनातनच्या आश्रमाला टाळे ठोकण्याची, सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी लावून धरली. प्रा. शाम मानव यांनी सवंग लोकप्रियतेसाठी सनातनवर मनमानी आरोप केले. कथित धर्मनिरपेक्षतावाल्यांच्या फुत्कारामुळे सनातन संपणार नाही, असे उद्गार सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी येथे काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. धर्मसभेच्या प्रारंभी शंखनाद, दीपप्रज्वलन, तसेच वेदमंत्रपठण करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी हिंदु राष्ट्र स्थापण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार मशिदीतील मुसलमान महिलांच्या प्रवेशाविषयी गप्प का ? - सनातन संस्था

     मुंबई - श्री शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासाठी आंदोलनाचा देखावा करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महिला आमदार मुसलमान महिलांवर असलेली बुरखासक्ती, मशिदीमधील प्रवेशबंदी, तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला सोडून देण्याची प्रथा, मुंबईतील हाजीअली दर्ग्याच्या आतील भागात मुसलमान महिलांना प्रवेशबंदी यांविषयी गप्प का आहेत ? महिलांवरील अन्याय, महिलांना समान अधिकार, महिला सक्षमीकरण यांविषयी टाहो फोडणारे नेमके अशा विषयांवर मिठाची गुळणी धरून गप्प का बसतात ? हाच का सर्वधर्मसमभाव, असा प्रश्‍न सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.

हिंदुद्रोही बाजीराव मस्तानी चित्रपटात हिंदुसाम्राज्यविस्तारक बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला तडा देणारे चित्रण !

हिंदूंच्या विरोधामुळे चित्रपटाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम !
नाट्यक्षेत्र, पत्रकारिता आणि धर्माभिमानी हिंदू यांचा विरोध वाढला !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली संजय भन्साळी यांचा अतिरेक !
     मुंबई - हिंदुद्रोही आणि इतिहासभंजक असा बाजीराव मस्तानी चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित झाला. त्याला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या चित्रपटात निर्माते आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपलाभ उठवत मनमानी प्रसंग घुसडून हिंदुसाम्राज्यविस्तारक श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला तडा देणारे चित्रण केले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून या चित्रपटावर टीका होत आहे.

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण करणार्‍या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍याला जिवे मारण्याची धमकी

     पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करणारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना अज्ञाताने जिवे मारण्याची धमकी देऊन २५ लक्ष रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी चंद्रकांत घोडके यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा लघुसंदेश कुणी पाठवला, संदेश पाठवलेला भ्रमणभाष क्रमांक कुणाच्या नावावर आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताकवले यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही नावांमध्ये महाराज शब्द का नाही ?

हे सूत्र इतकी वर्षे कोणाच्याच लक्षात का आले नाही ? हिंदूंनो, या मागणीला पाठिंबा देऊन 
केंद्र आणि राज्यशासन यांना तसा पालट करण्यासाठी वैध मार्गाने भाग पाडा !
शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांची विधान परिषदेत मागणी 
     नागपूर, १९ डिसेंबर - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहेत. असे असतांना छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही नावांमध्ये महाराज शब्द का नाहीत ? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. त्यामुळे हे नाव पालटण्यासाठी राज्यशासनाने हालचाली कराव्यात, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी एका औचित्याच्या सूत्राद्वारे विधान परिषदेत उपस्थित केली. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाविषयी सूत्र उपस्थित करणारे विनायक मेटे यांचे अभिनंदन ! - संपादक)
     या सूत्राला महत्त्व देत उपसभापती वसंत डावखरे यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी या नावापुढे महाराज हा शब्द हवाच. हा विषय केंद्राचा असला, तरी केंद्रशासनाशी राज्यशासनाने पत्रव्यवहार करावा आणि तसा पालट कसा करता येईल, याचा विचार करावा. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय समजून घेऊन कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिले. 

लव्ह जिहादच्या संदर्भात कार्य करत असतांना धर्मांधाच्या कारवायांपासून सावध रहा !

     लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणींचे प्रबोधन करणार्‍या हिंदुत्ववाद्यांवर धर्मांध लक्ष ठेवतात किंवा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात, असे काही घटनांमधून लक्षात आले आहे. लव्ह जिहादमध्ये फसलेली तरुणी धर्मांधांच्या प्रभावाखाली असल्यास प्रबोधन करणार्‍या हिंदुत्ववाद्यांची नावे तीच धर्मांधांना सांगत असल्याचे काही घटनांत लक्षात आले आहे. अशा घटनांत धर्मांधांकडून हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणींचे प्रबोधन करतांना हिंदुत्ववाद्यांनी सतर्कता बाळगावी.

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

पुरवठा अधिकारी श्री. पवार निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     जळगाव - बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. अनिल पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, तसेच तेलंगणा शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम रहित करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अविनाश चव्हाण, श्रेयस पिसोळकर, आशिष गांगवे, रवि चव्हाण, शिवसेनेचे श्री. कपिल ठाकूर, सनातन संस्थेचे श्री. प्रीतम पाटील हे उपस्थित होते.

राज्यातील सर्व तीर्थक्षेत्री आणि बुलढाणा जिल्ह्यात मद्यबंदी न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार ! - अस्तित्व संघटनेची चेतावणी

मद्यबंदी करण्यासाठी महिलांचे मुंडण आंदोलन 
     नागपूर, १९ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ठिकाणी, मातृतीर्थ आणि विदर्भ पंढरी बुलढाणा जिल्ह्यात मद्यबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी अस्तित्व संघटनेच्या वतीने महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी येथील टेकडी पॉइन्ट येथे काला मुंडण आंदोलन केले. संघटनेच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता सोनोने यांसह कार्यकर्त्यांनी दारूबंदी न करणार्‍या शासनाच्या धोरणाचा निषेध केला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात मद्यबंदी न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. या आंदोलनात विमलताई भाटकर, डॉ. प्रसाद सोनोने, ज्ञानेश्‍वर लोखंडकर, कु. शुभम शिरसोळे यांसह १२ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण शक्य - डॉ. नीलम गोर्‍हे

      नागपूर १९ डिसेंबर (वार्ता.) औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद महानगरपालिकेने २०११ ला संमत करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनाकडे पाठवला होता; मात्र तत्कालीन शासनाने त्यास असहमती दर्शवली होती. आता शासन भाजप-शिवसेनेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास नामकरण होऊ शकते, असा आशावाद शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला. विधान परिषदेमध्ये आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी प्रश्‍नाद्वारे मागणी केली आहे. हा प्रश्‍न अजून चर्चेला आला नाही. याविषयी दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी यांनी भ्रमणभाषवर डॉ. गोर्‍हे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी वरील आशावाद व्यक्त केला. शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकेने संमत झालेल्या ठरावाविषयी ४ जानेवारी २०११ आणि २० जानेवारी २०११ च्या पत्रान्वये वस्तुनिष्ठ अहवाल शासनाच्या नगरविकास विभागास सादर केला होता.

कोल्हापुरातील ४ लक्ष ७४ सहस्र विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित !

हिवाळी अधिवेशन २०१५
     नागपूर, १९ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या मार्केटिंग फेडरेशनचा ठेका संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील सुमारे ४ लक्ष ७४ सहस्र विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याचे ऑगस्ट २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे. (विद्यार्थी पोषण आहारापासून का वंचित राहिले, याची सखोल चौकशी व्हायला हवी, ही अपेक्षा ! - संपादक) विद्यार्थ्यांना आहार कधी मिळणार, अशी मागणी आमदार श्री. पांडुरंग बरोरा (शहापूर) यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्‍नोत्तरात केली. शालेय पोषण आहार योजनेत खंड पडू नये, याकरिता सर्व शाळांना उसनवारीने अथवा खुल्या बाजारातून धान्य आणि धान्यादी माल खरेदी करून शाळांमध्ये शालेय पोषण आहार देणे चालू ठेवावे, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

नायजेरियन लोकांच्या विरोधात दिवा (जिल्हा ठाणे) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन !

श्री एकवीरादेवी मंदिरासह ३७ देवळे अधिकृत करण्याचा विचार ! - खडसे

      मावळ तालुक्यातील कार्ल्याच्या प्रसिद्ध श्री एकवीरादेवीच्या मंदिरांसह ३५ गावांतील ३७ देवस्थाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम अधिकृत करणे, स्थलांतरित करणे आणि निष्कासित करणे यानुसार देवळांवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. यातील ३७ मंदिरांचे बांधकाम थेट पाडण्याची कार्यवाही न करता ही मंदिरे नियमित करण्याविषयी शासनाचे प्रयत्न रहातील, अशी माहिती महसूल आणि कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी १० डिसेंबरला विधानसभेत दिली. श्री. खडसे म्हणाले, ३७ धार्मिक स्थळांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मावळ येथील वनक्षेत्र विभागाकडून धार्मिक स्थळांची माहिती मागवण्यात आली आहे. शासनाने मंदिरांची सूची प्रसिद्ध करून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यानुसार देवळे अधिकृत करण्यासाठी कृती आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देवळे पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला नाही. एखादे मंदिर अनधिकृत असेल, तर ते मंदिर दुसर्‍या ठिकाणी हालवण्याविषयी शासन निर्णय घेईल.

आझमगडमध्ये काँग्रेसच्या नेत्याची हत्या

     आझमगड (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशातील आझमगड येथील काँग्रेसचे नेते राज नारायण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. १९ डिसेंबरला ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज नारायण त्यांच्या नियमित कामासाठी घराबाहेर पडले असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गोळ्या घातल्या. या गोळीबारानंतर त्यांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राजकीय वैमनस्यातूनच त्यांची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार अस्तित्वात आहे का ? - संपादक)

जागृत हिंदु श्री. संदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव (मुंबई) येथे दिलवाले चित्रपटाच्या विरोधात निदर्शने !


३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नाशिक येथे निवेदन

पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन
देतांना (डावीकडून) सर्वश्री शशिधर जोशी,
प्रवीण सोनवणे, प्रसाद पवार
    नाशिक - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे गंगापूर रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने श्री. शशिधर जोशी, धर्माभिमानी सर्वश्री प्रवीण सोनवणे, प्रसाद पवार आणि शैलेश कादवे उपस्थित होते.
     या वेळी ३१ डिसेंबरच्या निमित्तानेहोणार्‍या अपप्रकारांविषयी समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या प्रबोधनात्मक उपक्रमांविषयी श्री. यादव यांना अवगत करण्यात आले. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून समितीच्या वतीने २७ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन फेरीविषयी त्यांना माहिती देण्यात आली.

हिंदूंनो, गोमातेवर आक्रमण करणार्‍यांची हिंदुद्वेष्टी आणि खुनशी मानसिकता जाणा !

नांदेड येथे एका समाजकंटकाने गोमातेचे डोळे फोडले !
      नांदेड शहरातील गोकुळनगर भागामध्ये नोव्हेंबर मासात २५ गायींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर काही समाजकंटकांनी ३ गायींचे डोळे फोडले होते. अशीच एक घटना नांदेड येथील भाग्यनगरमध्ये घडली आहे. एका अज्ञात समाजकंटकाने धारदार शस्त्राने एका गायीचे डोळे फोडले आहेत. शिवसैनिकांनी त्या गायीला उपचार मिळवून देऊन तिचे प्राण वाचवले आहेत. डोळ्यांतून रक्ताची धार वहात असतांना गाय रस्त्यावरून हंबरडा देत फिरत होती. त्या गायीची अवस्था पाहून शिवसेनेचे गौतम जैन आणि अन्य शिवसैनिक यांनी पुढाकार घेऊन पशू रुग्णालय चालवणारे आधुनिक वैद्य (डॉ.) कळसकर यांना संपर्क केला. त्यांनी त्या गायीवर प्रथमोपचार केले. त्या गायीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर तिला गोशाळेत सोडण्यात येणार आहे, असे गौतम जैन यांनी सांगितले.

आंदोलनातील हिंदुत्ववादी आणि अन्य १४ जण यांच्यावर गुन्हे प्रविष्ट

आगामी बाजीराव-मस्तानी या चित्रपटाच्या विरोधात पुणे येथे आंदोलन केल्याचे प्रकरण
      १८ डिसेंबर २०१५ला प्रदर्शित होणारा हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव-मस्तानीत दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी, चित्रपटातून पिंगा हे गाणे काढावे, या आणि अन्य मागण्यांसाठी १२ डिसेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले होते. शनिवारवाड्यावर झालेल्या या आंदोलनाला पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे सरकार, भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनात चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्यात आला. या प्रकरणी विनाअनुमती मोर्चा काढणे आणि पुतळा जाळल्याप्रकरणी आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह १४ जण आणि त्या व्यतिरिक्त ७० ते ८० जणांच्या जमावाच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

जनतेसाठी राज्यकारभार केला असता, तर ममता बॅनजी यांच्यावर ही वेळ आली नसती !
     पुढील वर्षी बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बंगालच्या ममता बॅनर्जी शासनाने राज्यातील ७ कोटींहून अधिक लोकांना २ रुपये किलो दराने गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bengalki Mamta sarkar lagbhag 7 crore logonko 2 Rs kilome chaval aur gehu degi !
Mamta Jihadiyonse logonki suraksha kab karengi ?
जागो !
: बंगाल की ममता सरकार लगभग ७ करोड लोगों को २ रु. किलो में चावल और गेहूं देगी ! ममता जिहादीयोंसे लोगोंकी सुरक्षा कब करेंगी ?

चेन्नई येथे हिंदुत्ववाद्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांतील हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

१. विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या भव्य 
कार्यक्रमात समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन
     विश्‍व हिंदु परिषदेद्वारे प्रत्येक वर्षी तिरुपति देवाची छत्री कोळथूर येथील श्री श्रीनिवास मेरूमल देवाच्या देवस्थानात आणली जाते. या भव्य कार्यक्रमांतर्गत १२.९.२०१५ या दिवशी श्री श्रीनिवास मेरूमल देवाची पूजा आणि कैलाश आश्रमाच्या माताजी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. सत्संगात माताजींनी कलियुगातील भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांना प्रवचन घेण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी सौ. सुगंधी यांनी प्रभातकाळी म्हणावयाचे श्‍लोक, कुंकू लावणे, सात्त्विक कपडे परिधान करणे, रांगोळी काढणे, यांसारख्या आचारधर्मांचे, तसेच नामजपाचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीच्या कालावधीत करावयाच्या आणि टाळावयाच्या कृतींविषयीही सांगितले. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कोणत्याही आध्यात्मिक कार्यक्रमासाठी निमंत्रण दिल्यास त्या येणार असल्याचे माताजींनी सांगितले.

नॅशनल हेराल्डविषयी समजून घेण्यापूर्वी सोनिया गांधी यांचे खरे स्वरूप जाणून घ्या !

     सध्या नॅशनल हेराल्डचा घोटाळा गाजत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांना केवळ न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगितल्यानंतर काँग्रेसींनी संसद डोक्यावर घेतली. अनेक खासदारांना आपण का आरडाओरड करत आहोत, हेसुद्धा तेव्हा माहिती नव्हते. असे नेतृत्व असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वाचे काही पैलू समाजापर्यंत जाणे आज महत्त्वाचे आहे. त्यासाठीच मनोगत या भाजपच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या संजय बारू यांच्या द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर (अपघाताने झालेले पंतप्रधान) या पुस्तकाचे रश्मी घटवाई यांनी केलेल्या परीक्षणातील काही भाग येथे देत आहोत.

प्रसारमाध्यमांवरील सनातनविरोधी वृत्ते ऐकल्यावरही साधिकांना साधना आणि सेवा करण्यास पाठिंबा देणारे कुटुंबीय !

१. पोलीस विभागातील कार्यपद्धतीला कंटाळून पोलीसपदावरून 
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पतीने अधिक सेवा करण्यास प्रोत्साहन देणे
       पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनच्या एका साधकाला अटक केल्यावर १६.९.२०१५ या दिवशी दूरचित्रवाहिनीवर सतत सनातनच्या विरोधातील वृत्ते दाखवली जात होती. त्या दिवशी मला सेवेला जायला मिळाले नाही. मी ते पहात असतांना माझे पोलिसाच्या पदावरून निवृत्त झालेले पती मला म्हणाले, तू सेेेवेला का गेली नाहीस ? घाबरलीस का ? आता तुम्ही अधिक तळमळीने सेवा करा. प्रसारमाध्यमे सनातनला अपकीर्त करत आहेत, तर तुम्ही जोमाने कार्य करायला हवे. पती पोलीस होते; परंतु त्यांना पोलीस विभागाचे कार्य आणि आचार पटत नव्हते; म्हणून त्यांनी निवृत्ती वर्षाच्या ५ वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांना पोलीस विभागाविषयी पुष्कळ चीड आहे. त्या विभागाची विवशता (असमर्थता) काय आहे ? पोलीस त्रास का देतात ?, ही सर्व सूत्रे त्यांना ठाऊक आहेत. ते नेहमी म्हणतात, पोलीस प्रामाणिक लोकांना त्रास देण्यामागील कारण म्हणजे त्यांच्यावर सतत दबाव असतो. ते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कुणालातरी बळीचा बकरा बनवतात.- एक साधिका (२९.१०.२०१५)

हिंदूसंघटनासाठी व्यक्तीगत अहंकार बाजूला ठेवा ! - पू. डॉ. चारूदत्त पिंगळे

देहली येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन
अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी डावीकडून पू. तनुजा
ठाकूर, स्वामी अर्पितानंद, कर्नल अशोक किणी
आणि दीपप्रज्वलन करतांना पू. डॉ. चारूदत्त पिंगळे
   नवी देहली, १९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूंना संघटित होण्याचा शाप आहे, असे म्हणणे चुकीच आहे. प्रत्येक शापाला उप:शापही असतो. जर हिंदूंनी व्यक्तीगत आणि संघटनात्मक अहंकार अन् संकुचितपणा बाजूला ठेवला, तर हिंदूंचे संघटन लांब नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. येथील श्रीनिवासपुरी येथील भारत सेवाश्रम संघाच्या भवनमध्ये १९ आणि २० डिसेंबर हे दोन दिवस राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भारत सेवाश्रम संघ, भोपाळचे सचिव स्वामी अर्पितानंद, वेदिक उपासना पीठाच्या संस्थापिका पू. तनुजा ठाकूर आणि फेथ फाऊण्डेशनचे अध्यक्ष कर्नल अशोक किणी उपस्थित होते. या वेळी संत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रगीताविषयीचा चक्रावणारा निर्णय आणि त्याचे उत्तरदायित्व !

    गेल्या आठवड्यात एका चित्रपटगृहात एका मुसलमान दांपत्याने राष्ट्रगीताचा अवमान केला. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना धडा शिकवल्यानंतर मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एम्आयएम्चे) आमदार इम्तियाज जलील यांनीही चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे मूर्खपणाचे आहे, असे सांगून राष्ट्रगीताचा अवमान केला. राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देण्याचा असाच प्रसंग १९८५ मध्येही उपस्थित झाला होता. तेव्हा केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला होता. त्याविषयीची माहिती देणारा आणि त्या संदर्भातील कारणमीमांसा करणारा लेख येथे देत आहोत. 

सनातनद्वेष्ट्यांनो, तळपत्या आणि तेजस्वी सूर्याला झाकण्यासाठी प्रयत्न केला, तरी त्याचे अस्तित्व अन् ऊर्जा यांद्वारे कार्य होतेच, हे लक्षात घ्या !

श्री. कुशल गुरव
१. सनातनद्वेष्ट्यांनी सत्याच्या बाजूने 
मार्गक्रमण करणार्‍या सनातन संस्थेला काही 
प्रकरणांमध्ये अडकवून धर्मकार्य बंद पाडण्याचा प्रयत्न करणे
     अवघ्या मानवजातीला परिपूर्ण अध्यात्म कसे जगायचे ?, याची शिकवण देणारी आहे सनातन संस्था. सनातनच्या माध्यमातून समाजाला सत्य समजत असल्यामुळे या सनातनद्वेष्ट्यांच्या डोळ्यांत हे खुपत आहे. त्यामुळे ते काही वर्षांपासून लहानश्या सनातन संस्थेला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवण्यासाठी, संस्थेचे कार्य बंद पाडण्यासाठी खटाटोप करत आहेत. तरीही सनातन संस्था ही सत्याच्या मार्गाने जात असल्याने सनातनद्वेष्ट्यांच्या आरोपांचा बुरखा दिवसेंदिवस फाटतच चालला आहे. ईश्‍वरी पाठबळ असणार्‍या सनातनची कीर्तीही वाढतच चालली आहे आणि ती आणखी वाढणार आहे.

मराठी नियतकालिकांना इंग्रजी विज्ञापन ! तेही शेतकर्‍यांच्या मुलांसाठी ! मराठी दैनिकात इंग्रजी विज्ञापन देणे, हे विज्ञापन देण्याचे कर्मकांड उरकण्यासारखे आहे ! अनेक वर्षे अशी टिपणी लिहूनही प्रशासन अजून चूक सुधारत नाही !

    १९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोवा शासनाच्या कृषी खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. हे विज्ञापन इंग्रजी भाषेत असून शेतकर्‍यांसाठी होते.

सासवने (रामनाथ) येथे हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

स्थळ : श्री फुलाईदेवी मंदिरासमोरील पटांगण, सासवने रामनाथ (अलिबाग)
वार आणि दिनांक : रविवार, २० डिसेंबर २०१५ 
वेळ : सायंकाळी ५.३० संपर्क क्र. : ८३०८६८४९४८ 
हिंदूंनो, सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदु ऐक्याची शक्ती दाखवा !

आतंकवादी कारवायांकडे कानाडोळा करणारे हिंदुद्वेष्टी वृत्तपत्रे !

     आज देशात जिहादी आतंकवाद्यांनी अराजक माजवले आहे. त्यांना साथ देणारे धर्मांधच आहेत. त्यांच्या कारवाया आणि कारस्थाने भयानक आहेत; पण तिकडेे कानाडोळा केला जातो. हिंदूंनी देशहितासाठी काही कडवे धोरण आखले, तर मात्र त्यांवर सर्व जण खवळून उठतात. वृत्तपत्रातून गवागवा केला जातो. 
- श्री. अ.वि. सहस्रबुद्धे, पुणे 

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाच निलंबित करा !

     एका दंगलीतील धर्मांध आरोपीला अटक केल्याची शिक्षा म्हणून वरिष्ठांनी एका पोलीस निरीक्षकाला रजेवर पाठवले. या विरोधात पोलीस ठाण्यातील संतप्त झालेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. पोलिसांच्या या आंदोलनाला सहस्रो ग्रामस्थांनीही साथ दिली. परिणामी वरिष्ठांना नमते घेत पोलीस निरीक्षकांना पुन्हा कामावर बोलवावे लागले. ५४३ खासदारांवर नियंत्रण ठेवता न येणारे पंतप्रधान १३० कोटी जनतेवर काय नियंत्रण ठेवणार !

      हेराल्ड प्रकरणी काँग्रेसकडून २ दिवस संसदेचे कामकाज रोखले गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गदारोळामुळे संसदेत कोणतेही कामकाज होत नसल्याचे दुःख आहे. गरीब नागरिकांच्या संदर्भात अनेक विधेयके प्रलंबित असून गरिबांची हानी होत आहे.

हे भारताला लज्जास्पद ! पोलीस अधिकार्‍यांची कमतरता का होऊ दिली ? याला उत्तरदायींना बडतर्फ करा !

      उत्तरप्रदेशच्या बरेली येथे एक पाकिस्तानी हेर सापडल्यानंतर येथील मुसलमानबहुल जुन्या शहरातील प्रत्येक घराची पोलीस चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त पोलीस अधिकार्‍यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. या संदर्भात बोलतांना पोलीस उपमहानिरीक्षक आर.के.एस्. ठाकूर म्हणाले, आधीच पोलीस अधिकार्‍यांची कमतरता आहे.

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांचा उदोउदो करणे, हेच सेक्युलॅरिझम का ?

     कोकणी भाषा मंडळाच्या वतीने भरवण्यात आलेल्या गोवा युवा महोत्सवाच्या स्थळाला भगवान श्रीकृष्ण, शिव आदी हिंदूंच्या देवतांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार जुझे परेरा यांचे जुझे परेरा नगर, असे नाव देण्यात आले आहे. 

एका जिल्ह्यातील सनातनच्या एका साधकाची पोलिसांच्या विशेष शाखेकडून तिसर्‍यांदा चौकशी !

पोलिसांनी अशा प्रकारे जिहाद्यांची चौकशी केली 
असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
     एका जिल्ह्यातील एका शहरातील पोलिसांच्या विशेष शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी सनातनच्या एका साधकाच्या घरी चौकशीसाठी गेले होते. यापूर्वीही त्या अधिकार्‍यांनी २ वेळा साधकाची चौकशी केली होती. त्याचे पोलिसांसमवेत झालेले संभाषण पुढे दिले आहे.

विज्ञापनातही ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणारे गोवा शासन !

     १९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोवा शासनाच्या वाहतूक खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. या विज्ञापनात झेब्रा क्रॉसिंगवरून मार्ग ओलांडतांना लहान मुलासह एक ख्रिस्ती महिला दाखवली आहे. गोवा हिंदुबहुल राज्य आहे. 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २४ डिसेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ डिसेंबर या दिवशी 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

न्यायालयाने जात-वैधता प्रमाणपत्रे रहित करूनही त्यावर कारवाई न करणारे राज्य प्रशासन, जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी अधिवक्ता बुरबुरे यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागणे दुर्दैवी !

     लातूर शहराचे विद्यमान महापौर अख्तर शेख (मिस्त्री) यांनी दाखल केलेले मिस्त्री इतर मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने बोगस ठरवले आहे. यावर कुठलीच कारवाई न झाल्याविषयी अधिवक्ता बुरबुरे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.
     मद्यपान करून मोटारीखाली नागरिकांना चिरडल्याप्रकरणी सबळ पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाकडून सलमान खान यांची १० डिसेंबर २०१५ या दिवशी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या संदर्भात बोलतांना शासकीय अधिवक्त्या आभा सिंह म्हणाल्या, जर पोलीस आणि तक्रारदार यांनी खोटा खटला उभा केला असेल, तर मी आदरणीय उच्च न्यायालयाला विनंती करते की, त्यांना अटक करावी.

हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

      वास्तविक सनातन संस्थेवर आरोप झाल्यावर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन, एक शक्ती उभी करून आरोपकर्त्यांवर खवळून विरोध करायला हवा होता; पण तसे होत नाही. जर आपण सर्व हिंदुत्वाच्या धाग्याने बांधले गेलो असतो, तर विरोधकांना काही चुकीचे करण्याचे धारिष्ट्य झाले नसते. 
- श्री. अ.वि. सहस्रबुद्धे, पुणे

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे श्री भवानी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आदी ठिकाणी असलेले भ्रष्टाचार शासनाला स्वत:ला का कळत नाही ? हिंदु विधीज्ञ परिषदेला का उघडकीस आणावे लागतात ?

      महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या राजकीय घराण्याचे वजन वापरून डॉ. विखे-पाटील फाऊंडेशन हा शैक्षणिक न्यास देणे लागत असलेले शासनाचे सुमारे २ कोटी रुपये बुडवले. राजकीय दबाव वापरून भ्रष्टाचार केलेल्या या न्यासाने शासनाची जी काही आर्थिक हानी केली आहे, ती वसूल करण्यात यावी, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली

चौकशी करण्यात वर्षानुवर्षे घालवणे, अशी शासनाच्या चौकशी समित्यांची कार्यपद्धत आहे. अशा स्थितीत त्या कधी न्याय देतील का ? तोपर्यंत विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असेल ?

      वर्ष २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात लैंगिक छळाची सर्वाधिक २५ प्रकरणे देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात घडली आहेत. या प्रकारणांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ व्यवस्थापनाने नियमाप्रमाणे एक समिती स्थापन केली असून या समितीच्या वतीने लैंगिक छळाच्या सर्व तक्रारींची चौकशी केली जात आहे.

विदेशींना व्यवसाय करण्यापासून रोखण्यासाठी जनहित याचिका

     व्यावसायिक पारपत्र नसलेल्या विदेशी नागरिकांकडून राज्यात चालवण्यात येत असलेल्या व्यवसायांवर आळा घालण्यासाठी, तसेच शेतजमिनीत चालणार्‍या व्यवसायिक कारवाया रोखण्यासाठी जनरेशन नेक्स्ट या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका दाखल केली आहे.

सनातन परिवाराच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याप्रती कृतज्ञता !

      हिंदु विधिज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना पंताजी बोकीलकाका अभिवक्ता पुरस्कार मिळाला, त्याबद्दल सनातन परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन ! पंताजी बोकीलकाका हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्‍वासू आणि मुत्सद्दी अधिवक्ता (वकील) होते. ते हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांच्याशी सदैव एकनिष्ठ राहिले. हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करायला आलेल्या क्रूरकर्मा अफझलखानाचा डाव फसला आणि त्याच्यावरच उलटला, यात मोठा वाटा पंताजी बोकीलकाका यांनी हुशारीने केलेल्या वकिलीचाही होता. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हेही हिंदु धर्म, हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने देत असलेल्या न्यायालयीन लढ्याला तोड नाही. सनातन संस्थेवर आगपाखड करणार्‍या आणि सनातनवर बंदी आणू पहाणार्‍या सनातनच्या विरोधकांचा डाव हाणून पाडून त्यांच्यावरच उलटवण्यात मोठा वाटा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचाही आहे. सनातन परिवार आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याप्रती कृतज्ञ आहेत. 

वेदकाळातही भारतीय समाज विकसित होता, हे जाणा !

      लक्षावधी वर्षांच्या भारतीय संस्कृतीत आणि समाजात एखादा वंचित किंवा उपेक्षित घटक कधीच नव्हता. पाश्‍चात्त्य मार्क्स (अ) विचारवंतांच्या हॅव आणि हॅव नॉट (श्रीमंत आणि गरीब) या संकल्पनेतून हे शब्द भारतात आले. भारतीय विकसित संस्कृतीचा ७० ते ७५ लक्ष वर्षांपर्यंतचा सत्य इतिहास पुराणांमध्ये दिलेला आहे. पुराणे ही कपोलकल्पित असल्याचे असत्य वारंवार आमच्यासमोर मांडल्यामुळे आम्ही या पुराणांकडे अस्सल इतिहास म्हणून पहात नाही. वेद, उपनिषदे यांचा काळ हा मानवी संस्कृतीतील सर्वोेच्च प्रगतीचा काळ आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र आदींच्या संकल्पना वेदांमध्ये आढळतात. वेदकाळात माणसाचा झालेला विकास हा अद्भुत आहे. हा विकास पर्यावरणाला पूरक असा होता. याची चिन्हे आम्हाला जागोजागी दिसतात. जेव्हा युरोप आणि इतर जग हिमयुगात जगत होते. तेव्हा भारताने विकासाचा परमोच्च बिंदू गाठला होता. सर्व समाजातील घटकांना येथे विकसित होण्याची संधी होती. समाजाच्या प्रत्येक घटकातून निर्माण झालेले संत, ऋषी-मुनी जगाला मार्गदर्शन करत होते. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी भाषा, वेशभूषा होती. त्यामुळे सध्या या देशात ३ सहस्र भाषा आहेत. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात कुठेही कुठल्याही समाजाला विकासाची संधी नाकारल्याचा पुरावा नाही. युरोपात झालेल्या महायुद्धाचा परिणाम युरोपमधील लोकांच्या जीवनावर झाला; मात्र या देशात झालेल्या युद्धांचा थेट परिणाम येथील जनतेवर होत नव्हता. - श्री. गिरीश प्रभुणे, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते, पुणे. (९.१.२०१४)

अधिकोष (बँक) कर्मचारी स्वतःच्या चुकांमुळे खातेदारांना होणार्‍या मनःस्तापाचा विचार करतील का ?

१. नवीन खाते उघडतांना खातेदाराचे नाव दोन वेळा चुकीचे लिहिणे 
आणि केलेल्या चुकीमुळे खातेदाराला मानसिक त्रास सहन करावा लागल्याची खंत नसणे
       एकदा एका युवतीच्या नावे नवीन खाते उघडतांना भारतातील एका मोठ्या अधिकोषातील संबंधित अधिकार्‍याने तिचे नाव दोन वेळा चुकीचे लिहिले. प्रारंभी नाव अशुद्ध लिहिले. दुसर्‍या वेळी कुमारीच्या ऐवजी सौ. असे लिहिले. साहजिकच दोन्ही वेळा खातेदाराला नवीन खातेपुस्तिका छापून द्यावी लागली. यात पहिल्या दोन खातेपुस्तिका वाया गेल्या. दोन्ही वेळेस संबंधित अधिकार्‍यास कल्पना देण्यास गेल्यावर तो ग्राहकावरच चिडचीड करत होता. आपण केलेल्या चुकीमुळे खातेदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला. खातेदाराचा वेळ आणि पैसा दोन्हीही व्यर्थ गेले, याविषयी त्याच्या तोंडवळ्यावर कुठेच खंत दिसत नव्हती. नवीन खातेपुस्तिका छापून देणार्‍या कर्मचार्‍यानेही यावर काय यांची कटकट आहे, असे म्हणून चिडचीड व्यक्त केली.

भारतियांनो, आपल्या भाषांच्या पुनरुज्जीवनासाठी भाषाभिमानी बना !

     महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न चालू केले आहेत; मात्र आज देशामध्ये केवळ मराठी किंवा राष्ट्रभाषा हिंदी यांच्याच नव्हे, तर भारतातील तमिळ, तेलुगु, कन्नड आदी सर्वच भाषा मरणप्राय अवस्थेत आहेत. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी समस्त भारतियांनी भाषाभिमानी बनले पाहिजे ! भाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भारतियांनी भाषाद्रोहाला तिलांजली द्यायला हवी. या संदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन करणारा हा लेख सनातन प्रभातच्या वाचकांसाठी देत आहोत.
लेखक : प्रा. महावीर शरण जैन, सेवा निवृत्त
निर्देशक, केंद्रीय हिंदी संस्थान, बुलंद शहर, उत्तरप्रदेश 

धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे आणि धर्म अन् विज्ञान यांची यथायोग्य सांगड घालणारे सनातनचे साधक

     सनातन धर्म हाच सत्य धर्म आहे. त्या धर्माचे खरे धर्मपीठ आणि त्या धर्मातील तत्त्वांचे माहेरघर असलेल्या सनातन आश्रमाला मला भेट देता येणे, हे माझे परमभाग्य होय. समाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले; परंतु धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे सनातनचे साधक प्रथमच मी पाहिले. धर्म आणि विज्ञान यांची यथायोग्य सांगड सनातनच्या साधकांनी घातली आहे. येथे संगणकाला साधक देवता समजून नमस्कार करतांना मी पाहिले, यावरून त्यांची धर्माचरणाची पद्धत लक्षात येते. ग्रंथ-प्रकाशन सोहळ्याच्या वेळी पुस्तकाचे प्रकाशन कसे करावे, याचे शास्त्र सांगितले गेले. धर्मातील शास्त्रही तसे सर्वांनी शिकण्याची आवश्यकता आहे. सनातनचे हे कार्य पाहून मी भारावलो असून कायमचा सनातनचा झालो आहे ! - पंचनिर्मोही आखाड्याचे महंत श्री अमृतदास जोशी महाराज, केंद्रीय संघटक, अखिल भारतीय वारकरी मंडळ धर्मपरिषद (१९.७.२००७)

दैव देते आणि कर्म नेते, ही म्हण सार्थ ठरवणारे मूढ भारतीय !

     मध्यप्रदेशात शासनाने शाळांमध्ये सूर्यनमस्कार चालू केल्यावर त्याला हिंदुत्वाचे राजकारण म्हटले जाते. योगासनांना अमेरिकेत काही प्रमाणात विरोध झाला; मात्र तेथील शासनाने या विरोधाला भीक घातली नाही. भारतात मात्र जर राष्ट्रपती भवनासमोर कुणी योग शिबिरे आयोजित केली असती, तर भारत शासनाने ती बंद पाडून येथे योगासने करू नयेत, असा फलक लावला असता. अशा वेळी आपण हिंदूंच्या धर्मशिक्षणासाठी प्रयत्न करू शकत नाही. - श्री. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन न्यूज वृत्तवाहिनी.

पुरस्कारवापसीच्या अनुषंगाने सुचलेले विचार

श्री. प्रशांत हरिहर
१. पुरस्कारविजेत्या साहित्यिकांनो,
 पुरस्कार परत करा आणि नाव परत मिळवा !
     आतापर्यंत मला पुरस्कार प्राप्त केलेल्या (म्हणे नामवंत) साहित्यिकांची नावे ठाऊक नव्हती; एका मासात (महिन्यात) ती सर्व नावे एका मागोमाग एक पुढे आली. बिचारे ! त्यांना कुणी ढुंकूनही बघत नव्हते, असे वाटते. आता मात्र ताठ मानेने ते पुढे आले आणि त्यांनी आपापले पुरस्कार परत केले. बिचार्‍या पुरस्काराची लाज वाचली; म्हणून घोषणा द्या, पुरस्कार परत करा आणि नाव परत मिळवा !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमभेटीच्या वेळी भृगुसंहितेचे वाचक पंडित लालदेवशास्त्री यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांना आलेल्या अनुभूती

पंडित लालदेवशास्त्री
      होशियारपूर येथील पंडित लालदेवशास्त्री यांचे २.११.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सपत्नीक आगमन झाले. ७.११.२०१५ या दिवशी पंडित लालदेवशास्त्री यांची (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली.
१. व्यक्त केलेले विचार
१ अ. महर्षि भृगु साक्षात् भगवान नारायणाचे अवतार आहेत ! : महर्षि भृगु साक्षात् भगवान नारायणाचे अवतार आहेत. गीतेमध्ये भगवंताने म्हटले आहे, महर्षींमध्ये मी भृगु आहे. लोकांच्या सर्व मनोकामना भृगूंनी भृगुसंहितेत लिहून ठेवल्याप्रमाणेच पूर्ण झाल्या आहेत. भृगुसंहिता त्यांनी स्वतःच लिहून ठेवल्यामुळे माझा तिच्यावर पूर्ण विश्‍वास आहे.

नाडीवाचन क्रमांक ५०मध्ये प्रथमच महर्षींनी काढलेल्या यंत्रांचे घडलेले दर्शन !

९.१२.२०१५ या दिवशी तिरुवण्णामलई, तमिळनाडू येथे 
झालेल्या नाडीवाचन क्रमांक ५०मधील काही महत्त्वाची सूत्रे
       या नाडीवाचनात महर्षींनी प्रथमच काही यंत्रांच्या आकृत्या नाडीपट्टीवर काढलेल्या दिसून आल्या. महर्षी म्हणतात, आम्ही नाडीपट्टी वाचनातून आध्यात्मिक विवरणाबरोबरच यंत्र, तंत्र आणि मंत्र यांचीही माहिती तुम्हाला देणार आहोत. पुढे पुढे काही आयुर्वेदिक वनस्पतींचीही माहिती देण्यात येईल आणि त्या कुठल्या भागात उपलब्ध होतात, हेही सांगण्यात येईल.

वर्ष २०१०मधील घटनांवरून काही एक न शिकणारे वर्ष २०१५ मधील पोलीस !

मडगाव स्फोटासाठी सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले
यांना गोवण्यासाठी डोंगराकडे दुर्लक्ष करून उंदराला पकडू पहाणारे पोलीस !
      सध्या पोलीस मडगाव स्फोटाचा सनातनशी संबंध जोडण्यासाठी (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांचे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले राष्ट्र अन् धर्म जागृतीपर विचार एकत्रित करत आहेत. (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे चार-पाच वाक्यांत प्रसिद्ध झालेले काही विचार गोळा करून निष्कर्ष काढू पहाणारे पोलीस पुढील सूत्रांचा विचार करतील का ?

जनतेला वाममार्गाला लावणार्‍या शासनाला देवच आता निसर्गाच्या माध्यमातून कठोर शासन करील !

(पू.) सौ. अंजली गाडगीळ
कलियुगातील मानवाची शोकांतिका
कलियुगातील मानवासाठी स्वर्ग बनलेली दारू : आम्ही ईरोड, तमिळनाडूहून बेंगळुरूला रात्री पोहोचलो. चारचाकीतून जातांना रस्त्याच्या कडेने झगमगाटातील अनेक मोठमोठ्या शोरूम दिसत होत्या. या शोरूम कसल्या म्हणून पाहिले असता कळले की, ही दारूची दुकाने आहेत. दारूच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांनी दुकानांत पुष्कळच गर्दी केली होती. हे पाहून खूप आश्‍चर्य वाटले. त्या वेळी कळले की, येथील दारूच्या दुकानांची नावे स्वर्गलोक, प्रेमलोक अशी आहेत. कलियुगातील मानवाचे किती अधःपतन झाले आहे, याचे हे उदाहरण आहे. लोकांना राजरोसपणे दुकानात येऊन दारू खरेदी करायला कसलीही लाज वाटत नाही. दारूचे दुकान म्हणजे त्यांच्यासाठी जणू स्वर्गच बनला आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

(परात्पर गुरु) डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील 
ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
     सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक
 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !
     अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

वेदांमध्ये हिंदु शब्द नाही; म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे अयोग्य !

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
टीका : वेदांमध्ये सनातन धर्माला हिंदु असे नाव दिलेले नाही किंवा तो शब्द वेदांत नाही; म्हणून हिंदु हा शब्द वापरू नका.
खंडण : वेदांमध्ये हिंदु शब्द नाही; म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे अयोग्य ठरते; कारण -
१. एखादे मूल जन्माला येते, त्या वेळी त्याला कोणतेही नाव नसते. पुढे त्या मुलाचे बारसे झाल्यानंतर त्याला नाव प्राप्त होते. त्याचे नक्षत्रावरून ठेवलेले नाव याहून वेगळे असू शकते. समजा एखाद्या मुलाचे नाव विजय असेल, तर लहानपणी त्याला आई-वडील विजू म्हणून हाक मारतात. पुढे सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यानंतर त्याला विजयराव म्हणतात. पुढे मुले झाल्यानंतर ती त्याला बाबा म्हणून हाक मारतात. असा हा विजय जन्म झाल्यानंतर लगेचच बाबा या नावाने ओळखला जात नाही. हिंदु धर्माच्या संदर्भातही असेच आहे. वेदांमध्ये हिंदु हे नामाभिधान नसले, तरी पुढे या धर्माला जर हिंदु असे नाव पडले असेल, तर ते अयोग्य आहे, असे म्हणण्यात अर्थ नाही.

अर्पण किती द्यायचे, याचा निर्णय अर्पणदात्यांनाच घ्यायला सांगा !

साधकांना सूचना
     सनातन संस्थेच्या कार्यामुळे प्रभावित होऊन अर्पणदाते सढळ हस्ते साहाय्य करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी अर्पणदात्यांनी रिकामा धनादेश देऊन त्यावर किती रक्कम घालायची ते ठरवण्याची मुभा साधकांनाच दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशी कृती करणे, हा त्या अर्पणदात्याच्या मनाचा मोठेपणा आहे, तरीही अशा घटनांत साधकांनी धनादेशावर स्वत:ला वाटेल इतकी रक्कम लिहू नये. कोणत्या अर्पणदात्याची ऐपत आणि इच्छा किती आहे, याविषयी आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे अशा प्रकारे रिकाम्या धनादेशावर रक्कम घालण्यास कोणी सांगितल्यास तसे करण्यास नम्रपणे नकार द्यावा आणि अर्पणदात्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्पण देण्यास सांगावे.

समाजातील बहुतांश तथाकथित संत आणि सनातनचे संत यांच्या वर्तनातील भेद !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     संत हे ईश्‍वराचे सगुण रूप असतात. संतांच्या वर्तनातून जिज्ञासू आणि भाविक यांना साधनेसाठी दिशादर्शन होऊन त्यांच्या साधनेला चालना मिळते. त्यामुळे एकूणच व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने संतांचे वर्तन कसे आहे ?, हे महत्त्वाचे ठरते. या पार्श्‍वभूमीवर सनातनचे संत आणि समाजातील अन्य संत यांच्या वर्तनातील लक्षात आलेला भेद पुढील सारणीत दिला आहे.
   ॥ हरि ॐ तत्सत् ॥ 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम 
करीत नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांची फलनिष्पत्ती

     हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते केवळ मानसिक स्तरावर कार्य करतात. त्यामुळे त्यांना ईश्‍वराचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याची फलनिष्पत्ती गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या वाटचालीवरून नगण्य असल्याचे लक्षात येते. याउलट सनातनचे साधक साधना म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत असल्यामुळे त्यांना ईश्‍वराचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे त्यांच्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक असते, तसेच साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगतीही होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.१२.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फक्त हिंदु धर्म अनादी असल्यामुळे त्याचा अंत होणार नाही !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     अध्यात्मात उत्पत्ती-स्थिती-लय हा एक सिद्धांत आहे. त्याचा अर्थ असा की, ज्याची उत्पत्ती झाली आहे, तो काही काळ टिकतो, म्हणजे त्याची ती स्थिती असते आणि नंतर तो लयाला पावतो, म्हणजेच ज्या धर्माची उत्पत्ती झाली आहे, तो काही काळ टिकतो. ती त्याची स्थिती, अवस्था असते आणि नंतर तो लय पावतो.

बोधचित्र

नियमांचा लाभ अपराध्याला !

संपादकीय
     आज २० डिसेंबर. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन आरोपी आज सुटणार. १६ डिसेंबर २०१२ या दिवशी राजधानी देहलीत बसप्रवासात निर्भया या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्या सहा नराधमांच्या गटामध्ये एक असलेला हा गुन्हेगार तेव्हा १७ वर्षांचा असल्याने त्याला ज्युवेनाईल कायद्याचा लाभ मिळाला आणि तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात जाण्याची त्याला शिक्षा मिळाली. ही त्याला शिक्षा मिळाली, तरी त्याच्यासाठी ती सुधारण्यासाठी मिळालेली संधी होती. आज तीन वर्षांनंतर त्याच्या वर्तनात काही सुधारणा झाली आहे का ? भारतीय गुप्तचर यंत्रणेने दाखल केलेल्या अहवालानुसार त्याचे जिहादीकरण झाले आहे. या अहवालावर विसंबून भारतीय शासनाने, त्याला पुढील दोन वर्षे कारागृहातच ठेवण्याची देहली उच्च न्यायालयाला विनंती केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn