Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बाजीराव मस्तानी चित्रपटाला महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांचा विरोध


कोथरूड (पुणे) येथे आंदोलन करतांना भाजप युव मोर्च्याचे कार्यकर्ते
कोथरूड (पुणे) आणि कोल्हापूर येथील खेळ रहित !
      पुणे - संजय भन्साळी दिग्दर्शित हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव मस्तानी याला अनेक हिंदुत्वनिष्ठांनी, इतिहासप्रेमींनी विरोध दर्शवला होता. उद्दाम चित्रपटकर्त्यांनी मात्र चुका दुरुस्त करण्याचे सौजन्य न दाखवता चित्रपट आहे तसाच प्रदर्शित करण्याची आडमुठी भूमिका घेतली. या अरेरावीला पुण्यातील इतिहासप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनी चांगलाच धडा शिकवला. या चित्रपटाच्या विरोधात १८ डिसेंबर या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच पुणे, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, मुंबई आणि रत्नागिरी येथे मोठा विरोध झाला.

बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी नाही ! - उच्च न्यायालय

     मुंबई - बाजीराव-मस्तानी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. भन्साळी यांच्या या चित्रपटात पिंगा गं पोरी पिंगा या गाण्यावर बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी एकत्र नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर स्वत: बाजीराव पेशवा हे देखील मल्हारी या गाण्यावर नाचतांना दाखवण्यात आले आहे.

अल्पवयीन गुन्हेगार उद्या सुटणार !

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण
      नवी देहली - देहलीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला स्थगिती देण्यास देहली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्याची २० डिसेंबरला सुटका होणार आहे. देहलीत डिसेंबर २०१२ मध्ये चालत्या बसमध्ये त्याने सहकार्‍यांसह निर्भयावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्याला ३ वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी आरोपीची मानसिकता अधिक कट्टर बनल्याची साशंकता गुप्तचर संस्थेने व्यक्त केली होती.

जामिया विद्यापिठातील २ विद्यार्थी अल्-कायदाचे आतंकवादी !

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !
      नवी देहली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील रेहान आणि शारजील हे दोन विद्यार्थी अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेत सक्रीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. रेहान हा देहली येथील असून शाहजील हा उत्तरप्रदेशमध्ये रहाणारा आहे. आतंकवादी महंमद आसिफ याला देहली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने १४ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. पोलिसांनी आसिफकडे चौकशी केल्यावर त्याने रेहान आणि शारजील यांना आतंकवादी प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. आसिफनेच या दोघांचे ब्रेनवॉश करून त्यांना अल्-कायदात सक्रीय केले.

आय.एस्.आय.एस्.साठी आत्मघातकी बॉम्ब बनण्यास इच्छुक अल्पवयीन धर्मांध मुलीला पुण्यात पकडले !

जम्मू-काश्मीरमध्ये फडकणारे आय.एस्.आय.एस्.चे झेंडे, राजस्थान आणि 
कोलकाता येथे पकडलेले हस्तक आणि अन्य अशा किती घटना उघडकीस
आल्यावर शासन अशांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणार आहे ?
पोलीस चौकशीला सामोरे जाण्याविषयीचेही मुलीला प्रशिक्षण
      पुणे - शहरातील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन धर्मांध युवतीला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने त्यांच्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ती मुलगी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आली होती आणि आत्मघातकी बॉम्ब बनण्याची सिद्धता केली होती. तिचे मतपरिवर्तन करण्याचे काम आतंकवादविरोधी पथकाकडून चालू आहे, अशी माहिती पथकाच्या पुणे विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना पंताजीकाका बोकील अभिवक्ता पुरस्कार प्रदान !

वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्या पुरस्कारांचे वितरण 
डावीकडून सर्वश्री  अधिवक्ता देवदास शिंदे, श्रीमती विजयाताई भोसले
, बाबूजी नाटेकर,  अभय वर्तक ,  सतीशकुमार प्रधान,  अधिवक्ता पुनाळेकर
      वाई (जिल्हा सातारा) - वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रतापदिन अर्थात अफझलखानवध आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्या शुभहस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना पंताजीकाका बोकील अभिवक्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंजाब येथील गोरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीशकुमार प्रधान यांना वीर जिवा महाले पुरस्कार देण्यात आला.

तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना व्हॅटिकन संत घोषित करणार !

समाजसेवेच्या नावाखाली असंख्य हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसा यांना व्हॅटिकनकडून 
देण्यात आलेले हे पारितोषिक म्हणायचे का ? तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी गप्प का ?
मदर तेरेसा यांच्याशी संबंधित चमत्कारांना व्हॅटिकनकडून मान्यता 
     ब्रिटन - ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या दुसर्‍या चमत्काराला मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे पुढच्या वर्षी मदर तेरेसा यांना संत घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका वृत्तानुसार मदर तेरेसा यांना वर्ष २०१६ मध्ये संत घोषित करण्यात येणार आहे. 
      यापूर्वी वर्ष २००२ मध्ये बंगालमधील मोनिका बेसरा या पोटाच्या ट्यूमरग्रस्त आदिवासी महिलेला मदर तेरेसासंदर्भात आलेल्या अनुभवाला पोपनी पहिल्यांदा चमत्कार म्हणून मान्यता दिली होती. मदर तेरेसा यांनी भारतात स्थापन केलेल्या मिशनरी ऑफ चेरिटी या संस्थेने सांगितलेल्या प्रार्थनांनी या महिलेचा ट्यूमर बरा झाला, असे पोप यांनी नेमलेल्या आयोगाने ग्राह्य धरले. रोम येथील कॅथोलिक मुखपत्र एवेनरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पोपनी मान्यता दिलेला दुसरा चमत्कार ब्रेन ट्यूमर झालेल्या ब्राझील व्यक्तीच्या संबंधातील आहे. मदर तेरेसा यांना कोलकाता येथील झोपडपट्टयांमध्ये सेवा कार्य केल्याबद्दल यापूर्वी वर्ष १९७९ मध्ये शांतीसाठीच्या नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २००३ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी मदर तेरेसा यांना संत बनवण्याच्या प्रक्रियेस मान्यता दिली होती. मदर टेरेसा यांनी भारतातील गरीबांची सेवा केल्याचे भांडवल करून त्यांच्या संतपद देण्याच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली.

बाजीराव-मस्तानी चित्रपट म्हणजे निवळ हिडीसपणा ! - पानीपतकार विश्‍वास पाटील

दिग्दर्शक भन्साळी यांनी कधी अन्य पंथियांच्या संदर्भात अशी विकृत दृश्ये दाखवण्याचे आणि 
अभिनेता रणवीर सिंह यांनी त्यात काम करण्याचे धाडस दाखवले असते का ? 
हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घालून हिंदुऐक्य दाखवायला हवे !
     मुंबई - वादग्रस्त बाजीराव-मस्तानी हा चित्रपट म्हणजे निवळ हिडीसपणा आहे, अशा शब्दांत बाजीराव पेशवे यांचा जीवनपट मांडणारे पानीपतकार तथा प्रसिद्ध इतिहास संशोधक विश्‍वास पाटील यांनी या चित्रपटावर टीका केली.
    विश्‍वास पाटील पुढे म्हणाले, चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली मारुतीचा गणपती आणि गणपतीचा मारुति कसा करता येईल ? बाजीराव पेशवे हे समाजाचे नायक आहेत. निवळ योगायोग दाखवायचा होता, तर मग भन्साळी यांनी त्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड वापरायचा होता. बाजीराव पेशव्यांच्या नावाचा उपयोग का केला? राजघराण्यातील स्त्रियांना अल्प वस्त्रांत दाखवून दिग्दर्शकाने मोठी चूक केली आहे. त्या काळातील स्त्रिया पडद्या आडच रहात असत. असे असतांना त्या स्वतः कशा काय नाचू शकतील ? लावणी ही नंतर अस्तित्वात आली. मग लावणीची चाल पिंगा या गाण्याला कशी काय वापरली गेली ? एकूणच हा सर्व प्रकार निंदनीय आहे.

संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न !

संस्कृतचा र्‍हास होण्यास त्याचे मोल नसलेले काँग्रेसी राज्यकर्तेच कारणीभूत आहेत. 
संस्कृत भाषा वाचवण्यासाठी आता हिंदूंनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे !
      नवी देहली - भारतातील सर्वांत प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा निश्‍चय श्री. राकेशकुमार मिश्रा यांनी केला आहे. हाच ध्यास मनाशी बाळगून श्री. मिश्रा हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक प्रांताची मातृभाषा आहे; पण संस्कृत ही भारतातील सर्वांत प्राचीन आणि मुख्य भाषा आहे. भातातील केवळ १४ सहस्र लोक संस्कृत भाषा बोलतात. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. भारतात अनेक भाषा प्रचलित आहेत. सुमारे ४ सहस्र वर्षे प्राचीन असलेल्या संस्कृत भाषेचा र्‍हास होत चालला आहे. प्राचीन काळातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेतून लिहिले गेले. दुर्दैवाने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे तथा अपेक्षित राजाश्रयाच्या अभावामुळे संस्कृत भाषा मृतवत् होत आहे.

मध्यरात्री फटाके फोडण्यास विरोध केला म्हणून विवाह विधी पार पाडण्यास चर्चचा नकार

ख्रिस्त्यांची ही असहिष्णुता नव्हे का ?
ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
      थ्रीशूर (केरळ) - येथील ओल्लर सेंट अंथोनी फॉरेन चर्च प्रत्येक वर्षी पाळत असलेल्या सणाच्या दिवशी मध्यरात्रीनंतर मोठ्या आकाराचे आणि आवाजाचे फटाके फोडते. त्यामुळे परिसरातील ख्रिस्ती कुटुंबांच्या घराला मोठ्या प्रमाणावर हानी पोहचते. याविरुद्ध एक ख्रिस्ती नागरिक थेक्कीनियाथ राफेल यांनी न्यायालयात दाद मागितली. याचा सूड म्हणून चर्चच्या पदाधिकार्‍यांनी थेक्कीनियाथ यांचा मुलगा संजू राफेल याच्या जानेवारी २०१६मध्ये होणार्‍या विवाहाचे विधी पार पाडण्यास नकार देऊन असहिष्णुतेचे प्रदर्शन घडवले आहे.

कर्नाटक पोलिसांकडून शाहूल हमीद यांच्या मृत्यूप्रकरणी ३ हिंदुत्ववाद्यांना अटक

हिंदूची हत्या झाली, तरी तो केवळ अपघात अन् मुसलमानाचा मृत्यू जरी झाला 
तरी ती हत्या या पद्धतीने तपास करणारे कर्नाटकचे पोलीस !
तिघांवरही ठेवला हत्येचा ठपका !
      कोडागु (कर्नाटक) - कर्नाटकच्या हिंदुद्रोही काँग्रेस शासनाने राज्यात क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती शासकीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला तेथील हिंदुत्ववाद्यांनी तीव्र विरोध केला. या संघर्षाच्या वेळी टिपू जयंतीचे समर्थन करणार्‍या शाहूल हमीद या युवकाला ट्रकमधून प्रवास करत असतांना गोळी लागली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या हिंदुत्ववाद्यांनीच घडवून आणल्याचा निष्कर्ष काढत कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला आणि त्यांनी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते श्री. कावेरीअप्पा, तसेच धर्माभिमानी श्री. एस्.एच्. भीष्म आणि के.आर्. रमेश यांना हमीदची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

ब्राझीलमध्ये व्हॉटस्-अ‍ॅपवर ४८ घंट्यांसाठी बंदी !

     ब्राझील - एका गुन्ह्याच्या खटल्याच्या प्रकरणी ब्राझीलमधील न्यायाधिशांनी तेथील सर्व दूरसंचार आस्थापनांना पुुढील ४८ घंटे व्हॉटस्-अ‍ॅप बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

अमेरिकेने तैवानला शस्त्रविक्री केल्याने चीनला पोटशूळ

     बीजिंग - अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रांची विक्री केल्यामुळे संतप्त झालेल्या चीनने अमेरिकेच्या चीनमधील राजदूतास समन्स बजावले असून औपचारिक निषेध नोंदवला आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रांसमवेत दोन युद्धनौकांही पुरवल्या आहेत. अमेरिकेच्या या कृतीनंतर संतप्त झालेल्या चीनने या व्यवहारात सहभागी असलेल्या आस्थापनांवर निर्बंध लादण्याची चेतावणी दिली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये अल्-कायदाला इंडियन मुजाहिदीनचे साहाय्य

आतंकवादग्रस्त भारत ! उत्तरप्रदेशात आतंकवाद्यांचे जाळे निर्माण 
होत असतांना राज्यशासन काय करत आहे ?
      मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेेशमध्ये अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेसाठी इंडियन मुजाहिदीन जाळे निर्माण करत आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. या माहितीच्या आधारे गुप्तचर विभागाकडून तपास वाढवण्यात आला आहे. 
      राज्यात अनेक आतंकवादी संघटनांनी त्यांचे जाळे निर्माण केले आहे. राज्याच्या पश्‍चिम भागातील काही जिल्ह्यांमध्ये, तर आतंकवाद्यांनी खोलवर जम बसवला आहे. आधी सलीम पतला या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आणि नंतर इझाझला पकडण्यात आले. या दोन्ही अटकेनंतर आतंकवाद्यांचे जे नेटवर्क पुढे आले आहे, त्याने गुप्तचर विभागाची झोप उडवली आहे. आयबीचे निवृत्त उपसंचालक एस्.पी. सिंह यांच्या मते, अल्-कायदाचा भारतातील प्रवेश हा एक मोठा धोका आहे. नुकतीच भारतीय अल्-कायदा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. अल्-कायदा सर्वांत मोठी आतंकवादी संघटना आहे. यासीन भटकलच्या अटकेनंतर या जाळ्याविषयी खुलासे झाले होते. राज्यात ज्या ठिकाणी बांगलादेशातील प्रमुख आतंकवादी संघटना हुजीचे जाळे आहे. तेथे ते अल्-कायदाला साहाय्य करत आहेत. सिंह यांच्यानुसार अल्-कायदाच अनेक आतंकवादी संघटनांना स्वत:शी जोडत आहे.

सौदी अरेबियात युवकाला शिरच्छेदाची शिक्षा

राजसत्तेच्या विरोधात निदर्शने केल्याचा आरोप 
     रियाध (सौदी अरब) - राजसत्तेच्या विरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अब्दुल्ला अल् झहर या १५ वर्षीय तरुणाचा सौदी अरेबियाच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही क्षणी शिरच्छेद होऊ शकतो. (भारतात उघडपणे पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत विरोधी घोषणा अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष करणारे भारतीय राज्यकर्ते सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून काही शिकतील का ? - संपादक) मागील वर्षी ऑक्टोबर मासात अब्दुल्लाला शिरच्छेदाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेची अंमलबजावणी आता कोणत्याही क्षणी होणार असल्याने अब्दुल्लाच्या कुटुंबियांनी प्रथमच या संदर्भातील स्थिती जगासमोर मांडण्याचे धाडस केले आहे. अब्दुल्ला सध्या १९ वर्षांचा आहे.

भारत घेणार रशियाकडून कोट्यवधी रुपयांची वायू संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली

     नवी देहली - रशियाकडून ४० सहस्र कोटी रुपयांची वायू संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास भारताने मान्यता दिली. अशी प्रणाली खरेदी करणारा भारत चीननंतर दुसरा देश ठरणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेने हा निर्णय घेतला. भारताची राष्ट्रीय वायू सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

उज्जैन सिंहस्थकुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू आणि दस्तक या ऑनलाईन वाहिनीचे मालक श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांची प्रदर्शनाला सदिच्छा भेट !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उज्जैन (मध्यप्रदेश) 
येथे कार्तिक मेळ्यात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन
श्री. कुलश्रेष्ठ (मध्यभागी) आणि श्री. दिवाकर नातू
(उजवीकडे) यांना माहिती सांगतांना
श्री. योगेश व्हनमारे
    उज्जैन - वर्ष २०१६ मध्ये येथे चालू होणार्‍या सिंहस्थकुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू, तसेच आज तक आणि दूरददर्शन या वाहिन्यांचे उज्जैन येथील प्रतिनिधी अन् दस्तक या ऑनलाईन वाहिनीचे मालक श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांनी १७ डिसेंबर या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कार्तिक मेळ्यात लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. 
     हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी श्री. दिवाकर नातू आणि श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांना प्रदर्शनाची माहिती दिली. हे प्रदर्शन पाहून श्री. कुलश्रेष्ठ म्हणाले, समाजाला आवश्यक अशी दिशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. हिंदु समाजाला आवश्यक धर्मशिक्षण तुम्ही उपलब्ध करुन देत आहात हे कौतुकास्पद आहे.

भुसावळ (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
      भुसावळ (जिल्हा जळगाव) - बाजीराव-मस्तानी चित्रपटात केलेले इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाने राज्यातील चर्चमध्ये शासकीय खर्चाने ख्रिसमस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय यांविरोधात भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. येथील अष्टभुजा देवी मंदिराजवळ १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आंदोलन झाले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त जळगाव येथे पत्रकार परिषद

      जळगाव - राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे प्रदेश कार्यवाह अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी यांनी केले. धर्मजागृती सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

१ डिसेंबरपासून १७९ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा दुष्परिणाम !
मद्यपी वाहनचालकांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम
      पुणे - ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी ३१ डिसेंबर या दिवशी रात्री अनेक जण मद्यपान करून गाडी चालवत असतात. या मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच हालचाली चालू केल्या आहेत. शहरातील वाहतूक पोलिसांच्या २८ विभागांत १ डिसेंबरपासून एकूण १७९ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे,

कुरुंदवाड, इचलकरंजी आणि कराड येथे हिंदुत्ववाद्यांनी शाहरूख खान यांचा दिलवाले चित्रपट बंद पाडला !

कोल्हापूर येथील चित्रपटगृहाबाहेर खेळ रहित 
झाल्याचे सूचित करणार्‍या फलकांसह हिंदुत्ववादी
     कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), १८ डिसेंबर (वार्ता.) - कुरुंदवाड येथे राघवेंद्र चित्रपटगृह आणि गिरीश चित्रपटगृह येथे शाहरूख खानचा चित्रपट दिलवाले प्रदर्शित करण्यात येणार होता. या दोन्ही ठिकाणी कुरुंदवाड शिवसेनेच्या युवा शहर मोर्च्याच्या वतीने शिवसैनिकांनी प्रखर विरोध करून चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. शिवसैनिकांनी शाहरूख खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळला, तसेच शिवसैनिकांनी यापुढे खानांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे सांगितले. या वेळी मोर्च्याचे शहराध्यक्ष महेंद्र आंबी, अण्णा खोत, स्वप्नील श्रीधनकर, सुदर्शन माळी, संजय डोंगरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कायद्यात बसत असेल, तर आरोपींविरुद्ध मोक्का लावणार ! - मुख्यमंत्री

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरण
      नागपूर, १८ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - ठाण्यातील विख्यात बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या नोंदवहीत ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांचा उलगडा करण्याचे काम चालू आहे. त्याचे सखोल अन्वेषण केले जाईल. आत्महत्येच्या प्रकरणी कायद्यात बसत असेल, तर आरोपींविरुद्ध मोक्काही लावला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत या प्रकरणी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते. या प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने चालू असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधणार ! - ग्रामविकास मंत्री

     नागपूर - पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने या पुलाची उंची वाढवून नव्याने काम आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. बोईसर येथील आमदार श्री. विलास तरे यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. या वेळी सौ. पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या ५ सहस्र ४५० किलोमीटर लांबीचा रस्ता सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे सांगितले. रस्त्याचा प्रश्‍न आमदार आबिटकर यांनी विचारला होता.

कम्युनिकेशन सुपर हायवेची मुख्यमंत्र्यांची घोषणा अंमलात कधी येणार ?

नाशिक ते अमरावती मार्गावर खड्डेच खड्डे रस्ते दोन्ही बाजूंनी 
खचल्याने महामार्ग अपघातास पोषक
महामार्गावरील खड्डे
     मुंबई-नागपूर महामार्गाला वर्ष २०१९ पर्यंत सुपर कम्युनिकेशन हायवे बनवण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. त्यासाठी ३० सहस्र कोटी रुपयांचे प्रावर्धान करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता दुसरे अधिवेशन चालू असतांनही महामार्गाचे काम चालू झालेले नाही. ही घोषणा शासकीय दप्तरीच धूळ खात पडून आहे. त्या अनुषंगाने केलेला ऊहापोह येथे देत आहे. 
संकलक : श्री. सचिन कौलकर, 
विशेष प्रतिनिधी, नागपूर. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या वेळी वाढदिवस साजरा करण्याच्या अपप्रकारांत वाढ

समाजाला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता दर्शवणारी घटना !
      पुणे - ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि औक्षण करून वाढदिवस साजरे केले जातात. असे असले, तरी सध्या शहरात तरुणांचे वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींकडून रस्त्यावरच साजरे करण्याच्या चुकीच्या प्रथेने जोर धरला आहे. चौकाचौकातील कथित नेत्यांचेही वाढदिवस मध्यरात्री साजरे होऊ लागले आहेत. रात्री १२ वाजण्याच्या ठोक्याला मोठ्या आवाजातील फटाके, ध्वनीवर्धकाचा कर्णकर्कश आवाज, चौकातच केक कापणे आदींमुळे मध्यरात्री सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सर्वच भागांत वाढले आहेत.

राज्यातील १५ शहरांतून प्रतिदिन ११८ कोटी लिटर पाणी वाया जाते

हिवाळी अधिवेशन २०१५
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी
नसतांना कोट्यवधी लिटर पाणी वाया जाणे संतापजनक आहे !
     नागपूर - राज्यातील १५ शहरांतून प्रतिदिन ११८ कोटी लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज असून हे प्रमाण अल्प करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, नगर, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या शहरांमध्ये जलवाहिन्यांतील गळती, जलवाहिन्या फुटल्याने रस्त्यावरून गटारात पाणी जाण्याचे प्रकार सप्टेंबरच्या पाहणीत निदर्शनास आले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे इतिहासाचे विकृतीकरण असणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन रहित

हिंदूंनो, या यशाप्रती श्रीकृष्णचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
      रत्नागिरी, १८ डिसेंबर (वार्ता.) - शहरात इतिहासाचे विकृतीकरण असणारा बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी १७ डिसेंबर या दिवशी दर्शवलेल्या विरोधामुळे या चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन आज १८ डिसेंबर या दिवशी रहित करण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित करण्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पतंजली योग समिती, चित्पावन ब्राह्मण साहाय्यक संघ, रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघ, व्याडेश्‍वर मित्र भजन मंडळ, रिक्शा संघटना, शिवसेना, भाजप, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी विरोध दर्शवला होता.(चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन ! - संपादक)

मद्यपी पोलीस कर्मचार्‍याकडून राज्य परिवहनच्या महिला वाहकांना मारहाण

अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे ?
      संभाजीनगर - संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा कोळी यांच्याशी प्रवासदेयकाचे पैसे परत देण्यावरून राज्य परिवहनच्या महिला वाहक जयश्री सदावर्ते यांच्याशी वाद होत होता. तो वाद वाढल्यामुळे त्या दोघी आणि अन्य महिला वाहक बसस्थानकावरील पोलीस चौकीमध्ये गेले. चौकीमध्ये उपस्थित ए.एस्. दहाडे या पोलीस कर्मचार्‍याने महिला पोलीस कर्मचार्‍याची बाजू घेत जयश्री सदावर्ते, शोभा खोपर्डे आणि संगीता मालवे या महिला वाहकांना मारहाण केली.

भाजप कार्यकत्यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपट विरोधाला माझा पाठिंबा ! - आमदार सौ. मेधा कुलकर्णी

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाच्या विरोधाला पाठिंबा 
देणार्‍या आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन !
दोन गाणी वगळण्याच्या मागणीवर ठाम
      नागपूर -  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित केलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दोन गाण्याविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे म्हटले आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

समीर गायकवाड यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नसतांना शासकीय अधिवक्त्यांनी कोणतेही आरोप करू नयेत ! - अधिवक्ता एम्.एम्. सुहासे

  • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
  • पुढील सुनावणी ३० डिसेंबर या दिवशी
      १८ डिसेंबर, कोल्हापूर (वार्ता.) - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना समीर यांना फाशी होणार !, त्यांना जामीन होणार नाही !, अशा प्रकारची वक्तव्ये केली होती. वास्तविक श्री. गायकवाड यांच्यावर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. या वक्तव्यांमुळे सामान्य माणसांच्या मनात श्री. गायकवाडच आरोपी आहेत, असा समज होऊ शकतो. हा प्रकार म्हणजे श्री. गायकवाड यांच्या मानवाधिकाराचे हनन आहे. शासकीय अधिवक्त्यांनी अशा प्रकारे कोणतीही मिडीया ट्रायल करू नये, असे मत अधिवक्ता एम्.एम्. सुहासे यांनी मांडले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर्.डी. डांगे यांच्यासमोर १८ डिसेंबर या दिवशी सुनावणी झाली असता ते बोलत होते.

विविध प्रकरणांत लक्ष घालून ती पूर्ण करण्यात येतील ! - राम शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण)

विशेष प्रतिनिधी
श्री. सचिन कौलकर आणि श्री. संतोष पाटणे
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. राम शिंदे (बसलेले) यांना निवेदनाविषयी 
सांगतांना श्री. सुनील घनवट आणि समवेत श्री. श्रीकांत पिसोळकर
     नागपूर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुळा-प्रवरा इलेक्ट्रीकल को. ऑ. सोसायटीकडून वीज देयकाचे येणे बाकी असलेले दोन सहस्र कोटी रुपये वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी साहाय्य म्हणून देण्यात यावे; कॉम्रेड गोविंद पानसरे अन् डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणांवरून सनातन संस्थेवर विविध आरोप होत आहेत, या संदर्भात पोलीस अधिकारपदाचा अपवापर करून भूमी आणि सदनिका मिळवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) लोकरंग मंचच्या वतीने सॉक्रेटीस ते दाभोळकर-पानसरे व्हाया तुकाराम या नाटकाचे १०० पेक्षा अधिक अनधिकृत प्रयोग करून समाजात तेढ निर्माण करणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर कारवाई करून नाटकावर बंदी घालावी, अशा विविध विषयांच्या संदर्भातील मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने १७ डिसेंबरला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. राम शिंदे यांना देण्यात आले. या सर्व प्रकरणांत लक्ष घालून मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी समितीला दिले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे; म्हणून चित्रपटाचे परिनिरीक्षण मंडळ नको, असेही का म्हणत नाही ?

     हिंदु जनजागृती समितीने फोंडा, गोवा येथे आंदोलन करून तियात्राला सेन्सॉर लावण्याची केलेली मागणी चुकीची आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवे. तियांत्रांवर कोणतेही (सेन्सॉर) निर्बंध नकोत. - विष्णु वाघ, भाजपचे आमदार तथा अध्यक्ष, कला अकादमी

एन्.सी.ई.आर.टी.च्या चुकीच्या इतिहासाविषयी शासनाने तातडीने लक्ष घालावे ! - पू. सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ समर्थभक्त

      पुणे, १८ डिसेंबर (वार्ता.) - विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक सिद्ध होते. या पाठ्यपुस्तकासाठी एक समिती असते. समितीतील अनेक जण पुस्तक निर्दोष होण्यासाठी प्रयत्न करतात. असे असतांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेच्या (एन्.सी.ई.आर.टी.च्या) पुस्तकांत महाराष्ट्रातील संतांची नावे चुकीची कशी प्रसिद्ध होतात ? या चुका मोठ्या आहेत. ज्या पुस्तकांत संतांचा एकेरी आणि चुकीचा उल्लेख आहे, ज्या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचे नाव नाही, अशा पुस्तकांतून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यायचे ? राष्ट्रभाषेतील पुस्तक लक्षावधी विद्यार्थ्यांकडे जाते. त्यामुळे असा चुकीचा इतिहास शिकवल्यास हेच विद्यार्थी पुढे स्पर्धा परीक्षांसाठी बसल्यावर ते उत्तीर्ण कसे होतील ? या सगळ्या चुकांसाठी नेमके उत्तरदायी कोण ? या चुकांच्या विरोधात दाद कुणाकडे मागायची ? आजपर्यंत अन्य पुस्तकांमध्येही एन्.सी.ई.आर.टी.ने गंभीर चुका केल्या आहेत. मुलांपुढे मोगलांचा इतिहास ठेवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दडपणे, असे प्रकार केले आहेत. निदान भाजप शासनाच्या काळात तरी असे घडणार नाही, अशी अपेक्षा होती. अशा चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होते. याविषयी शासनाने तातडीने लक्ष घालून एन्.सी.ई.आर.टी.कडून मनमानी इतिहास प्रसिद्ध होणार नाही, याकडे पाहिले पाहिजे, असे मत पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी व्यक्त केले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

अशांवर कठोर कारवाई केल्यास अशा घटना पुन्हा घडणार नाहीत !
     पुणे येथील एका १६ वर्षांच्या महाविद्यालयीन धर्मांध मुलीला आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेने त्यांच्या जाळ्यात ओढल्याची माहिती उघड झाली आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtra ke Pune ki 16 varshiya Ladki ISIS me sammilit hone ke liye janewali thi Siriya.
kya ham vidyalayome deshprem sikhayenge ?
जागो ! : महाराष्ट्र के पुणे की १६ वर्षीय लडकी आय.एस्.आय.एस्.में सम्मिलित होने के लिए जानेवाली थी सीरिया !
क्या हम विद्यालयों में देशप्रेम सिखाऐंगे ?

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक 
करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
      सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे २१ वा दिवस !
१७.१२.२०१५ 
     रात्री ९.२६ वा. आश्रमासमोरील रस्त्यावरून काही जण शिवीगाळ करत सनातन बॉम्ब, असे ओरडत गेले.

(म्हणे) शनि मंदिरासह इतर सर्व मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा !

दोन्ही काँग्रेसच्या महिला आमदारांचे तर्कशून्य विधान !
       नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.)- शनि मंदिरासह इतर सर्व मंदिरांत महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी आंदोलन केले. शनि मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारून महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची मागणी विधानभवन परिसरात करण्यात आली. (धर्मशास्त्र जाणून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आंदोलन करणार्‍या दोन्ही काँग्रेसच्या महिला आमदार ! - संपादक)
सासवने (रामनाथ) येथे हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !
स्थळ : श्री फुलाईदेवी मंदिरासमोरील पटांगण, सासवने रामनाथ (अलिबाग)
वार आणि दिनांक : रविवार, २० डिसेंबर २०१५
वेळ : सायंकाळी ५.३० संपर्क क्र. : ८३०८६८४९४८
सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
दिनांक : २० डिसेंबर २०१५
स्थळ : हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर
वेळ : सायंकाळी ५:३०
हिंदूंनो, सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदु ऐक्याची शक्ती दाखवा !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या नायजेरियन नागरिकांना हाकलून द्यावे, या मागणीसाठी दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

स्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, दिवा (पूर्व)
वार आणि दिनांक : शनिवार, १९ डिसेंबर
वेळ : सायंकाळी ५ ते ७

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. त्याविषयी काही सूत्रे पुढे दिली आहेत.

मध्ययुगात भारतभर संपर्क-भाषा म्हणून कार्यरत असलेली मराठी भाषा !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी राजभाषा 
यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

अग्निहोत्राची अपरिहार्यता !

     खरोखर प्रदूषण नावाच्या विषाचे आज संपूर्ण पृथ्वीवर राज्य आहे. सध्या अनेक प्रकारच्या प्रदूषणाने केवळ मानवजातच नव्हे, तर संपूर्ण सजीव सृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे प्राणी आणि पक्षी यांच्या विविध जाती-प्रजाती आणि नैसर्गिक चक्र यांचा पूर्णपणे र्‍हास होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गाचे स्वत:चे असे चक्र असते; परंतु मानवाने स्वत:च्या लालसेपोटी आणि विकासाच्या नावावर अगदी बुद्धी गहाण ठेवून पृथ्वीचा कायापालटच केला आहे. मानवाने विज्ञानाच्या दुरुपयोगामुळे निसर्गाला आव्हान देऊन आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. संपूर्ण जीवसृष्टीला सर्वार्त मोठा धोका या तथाकथित विकासापासूनच आहे.

चोराच्या मनात चांदणे ?

श्री. भाऊ तोरसेकर
१. केजरीवाल यांचा संजय प्रताप सिंह यांना एक न्याय आणि 
राजेंद्रकुमार यांना दुसरा न्याय, असे का ?
       अवघी एक आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. देहलीच्या शासनाचे एक ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय प्रताप सिंह यांच्या साहाय्यकाला सव्वा दोन लाख रुपये लाच घेतांना पकडले होते. सिंह हे देहली शासनामध्ये अनुसूचित जातीजमाती आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाचे प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होते. तेव्हाही केंद्रीय अन्वेषण विभाग मोदी शासनाच्याच अखत्यारीत काम करत होता आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अजिबात तक्रार केलेली नव्हती. उलट त्या धाडीनंतर केंद्राकडे सिंह यांना बडतर्फ करण्याची मागणी केजरीवाल यांनीच केलेली होती. बघायला गेल्यास सिंह यांना कोणी पकडलेले नव्हते, तर त्याच्या साहाय्यकाला पकडलेले होते.

ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा आणि राज्यविस्तारामागील कुटील उद्देश !

१. राज्य जिंकून तेथील पराभुतांना दासांप्रमाणे (गुलामांप्रमाणे) वागवणे, 
ही गोष्ट ख्रिस्ती समाजाला स्वाभाविक आणि योग्य वाटत असणे
      कानडी लेखक श्री. कोटा वासुदेव कारंथ यांनी दाना माडा बेकू (दान करा) या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी पाश्‍चात्त्य भाडोत्री किंवा पैशाच्या लोभाने काम करणार्‍या माणसांनी सद्गुणांच्या आदर्शांचा पाया कसा खिळखिळा आणि कमकुवत केला आहे, हे दाखवून दिले आहे. त्यात श्री. कारंथ म्हणतात, पाश्‍चिमात्य ख्रिस्ती समाजाने त्यांचे नौदल, तोफा आणि बंदुकांचा वापर करून सगळे जग जिंकण्याचे अभियान चालू केले होते. त्यांचे पाऊल ज्या प्रदेशावर पडले ते देश हस्तगत करण्याची त्यांची योजना असे. त्यांनी जिंकलेल्या सर्व प्रदेशांवर त्यांच्या राजाचे शासन असावे, असे त्यांना वाटत असे. त्या देशातील स्थानिक नागरिकांना किंवा त्या राज्यात तेथील शासनाचा अधिकार आहे, ही गोष्ट त्यांना मान्य नसे. त्यांना असे वाटत होते की, पराभुतांना लुटणे, लुबाडणे, त्यांना दास्य पत्करायला लावणे, त्यांच्याकडून चाकरासारखी (नोकरासारखी) किंवा दासासारखी (गुलामांसारखी) कामे करवून घेणे आणि तेथील पैसा आणि संपत्ती लुटून आपल्या देशात नेणे, ही गोष्ट स्वाभाविक आणि योग्य होती.

अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेणार्‍या राजकारण्यांना हटवा !

     कोणत्याही मंदिरावर आघात झाला, तर त्याचे दु:ख आपल्याला व्हायला हवे. याविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. चर्च, मशीद यांना हात लावण्याचे धाडस शासन करत नाही; पण हिंदूंची घुमटी, मंदिरे शासन वाहतुकीला अडचण ठरतात; म्हणून पाडून टाकली जातात. अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन राजकारणी निर्णय घेतात. 
- श्री. नारायण राठवड, सचिव, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ. (२८.४.२०१४)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदु जनजागृती समितीच्या बडोदा, गुजरात येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा

१. हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन
      बडोदा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोरक्षा-गोपालन, हिंदु राष्ट्राची आवश्यकता, तसेच धर्मशिक्षण या विषयांवरील फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

      अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

रामनाथी आश्रमातील कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे) या बालसाधिकेला आलेल्या अनुभूती

कु. अमृता मुद्गल
१. ध्यानमंदिरात उपायांना बसल्यावर
१ अ. प.पू. भक्तराज महाराजांच्या डोळ्यांतून चैतन्य मिळत आहे, असे वाटणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहाताच ते जिवंत आहे, त्यांचे कान हलत आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतून मला चैतन्य मिळत आहे, असे मला जाणवले.
१ आ. प.पू. भक्तराज महाराजांनी विचारपूस केल्यावर आनंद वाटणे : प.पू. भक्तराज महाराजांकडे पहाताच ते मला हलवून विचारत आहेत, काय गं अमृता, तू पुष्कळ थकली आहेस का ? तुला पाणी हवे का ? त्यांनी असे विचारल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला शांत, नम्र अन् साधनेची तळमळ असलेला अमरावती येथील कु. अनय राजेश पुंड (वय ११ वर्षे) !

कु. अनय पुंड
१. जन्म ते एक वर्ष
अ. कु. अनय जन्मापासूनच शांत आहे.
आ. त्याचा स्वभाव मुळातच धार्मिक आहे. तो ६ मासांचा (महिन्यांचा) असल्यापासूनच मी त्याला दिवेलागणीच्या वेळी देवाला नमस्कार करायला सांगायचे. त्याला त्याचा कधीच कंटाळा येत नसे.
२. १ ते ३ वर्षे
२ अ. स्तोत्रे म्हणायला आवडणे : अनयला देवाला नमस्कार करायला, श्री गणपतिस्तोत्र आणि श्रीरामरक्षास्तोत्र म्हणायला आवडत असे. त्या वेळी तो कधीच मला खेळायचे आहे. मी नंतर नमस्कार करीन इत्यादी कारणे सांगत नसे.

सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ 
परिषद यांच्या राज्यस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमांची छायाचित्रे 
योग्य प्रकारे काढून ती पुढील माहितीसह रामनाथी आश्रमात पाठवा !
       विविध राज्यांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ परिषद यांद्वारे महत्त्वाच्या कार्यक्रमांचे (उदा. पत्रकार परिषद, हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने, आंदोलने, निवेदन देणे आदींचे) आयोजन करण्यात येते. बर्‍याच वेळा सनातन संस्थेचे साधक, समितीचे कार्यकर्ते अथवा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते समाजातील संत, मान्यवर अथवा नेते यांच्या भेटी घेतात, तर काही वेळा ते इतर संघटनांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर अथवा अन्यत्र उपस्थित असतात. अशा वेळी छायाचित्रे काढतांना आणि ती रामनाथी आश्रमात पाठवतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

श्रीकृष्ण मथुरेला जातांना राधा किती दुःखी झाली आहे ?, हे श्रीकृष्णाला दाखवण्यासाठी
गोपींनी श्रीकृष्णाला राधाकडे आणले. (१२.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

साधकांची साधना व्यवस्थित व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे पू. नकातेकाका !

पू. महादेव नकाते
१. पू. नकातेकाकांमध्ये साधकांकडून होणारे कार्य 
व्यवस्थित आणि परिपूर्ण व्हावे, ही तळमळ दिसून येणे
     पू. नकातेकाका विभागात आल्यावर ते डिस्पॅच नोट आणि इनव्हॉइस पडताळू लागले. प्रथम त्यांना फार अडचणी आल्या; कारण आम्ही प्रत्येक कागदपत्र कार्यपद्धतीनुसार व्यवस्थित लावले नव्हते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडून झालेल्या चुकांचा व्यावहारिकदृष्ट्या किती मोठा परिणाम झाला असता, हे समजावून सांगितले. तेव्हा आमच्याकडून होणारे कार्य व्यवस्थित आणि परिपूर्ण व्हावे, याची तळमळ त्यांनाच अधिक होती, असे दिसून आले.

प्रतिदिन होणार्‍या खर्चाचा आढावा देवासमोर सादर करण्याविषयी महर्षींनी शिकवणे

       
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
एकदा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, आपण प्रतिदिन करत असलेल्या खर्चाचा आढावा महर्षींसमोर अथवा देवासमोर प्रत्यक्ष सादर करायला हवा. यासाठी एका कागदावर झालेला खर्च लिहून कागदाच्या चारही कोपर्‍यांत हळद ओली करून लावावी. हळदीने पवित्र झालेला कागद देवासमोर ठेवून खर्चाचा तपशील त्याला निवेदन करावा. महर्षींनी असे सांगितल्यावर आम्ही तसे करण्यास आरंभ केला.

प.पू. डॉक्टरांच्या चरणी अपार कृतज्ञताभाव असलेले पू. सुदामराव शेंडेआजोबा !

    
पू. सुदामराव शेंडेआजोबा
मला पू. शेंडेआजोबा यांचा रक्तदाब बघण्याची सेवा मिळाली होती. रक्तदाब पाहिल्यावर त्यांनी मला विचारले, रक्तदाब किती आहे ? त्यांचा रक्तदाब सर्वसाधारण होता. मी त्यांना तसे सांगितल्यावर त्यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. मला वाटले, त्यांचा रक्तदाब सर्वसाधारण आहे; म्हणून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर पू. शेंडेआजोबा म्हणाले, प.पू. डॉक्टर माझ्यासाठी किती करतात ! माझी सेवा करण्यासाठी त्यांनी तुम्हाला पाठवले आहे. प.पू. डॉक्टरच तुमच्या माध्यमातून माझी सेवा करत आहेत. या वयात अजून काय पाहिजे ? हे बोलतांना त्यांचा कृतज्ञतेचा भाव दाटून आला आणि भावाश्रू आले. त्यानंतर त्यांनी मला प.पू. डॉक्टरांनी पाठवलेला प्रसाद दिला. यातून त्यांचा साधकांनी केलेल्या सेवेविषयीचा भाव शिकायला मिळाला.

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. स्वतःतील दोष आणि अहं स्वीकारले 
की, साधनेचा पाया पक्का झाला, असे समजावे !
        एका साधिकेला माझ्यात एवढे दोष आहेत. माझी अंतर्मुखता न्यून पडते, असे वाटत होते. त्याविषयी प.पू. डॉक्टर म्हणाले, खोली पुष्कळ दिवस झाडली नाही की, पुष्कळ कचरा होतो ना ! अंतर्मनात साठवलेले सर्व काढून टाका. दोषांच्या सूचीला घाबरू नका. एकदा सूची बनवली आणि हे सर्व दोष आणि अहंचे पैलू माझ्यात आहेत, हे मनाने स्वीकारले की, आपला पाया पक्का झाला.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

दुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला
 उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर प्रथम मनातले प्रदूषण दूर करा !
     प्रदूषणासंदर्भात सगळीकडे गाजावाजा करून जो उपाय केला जातो, तो रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत

बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

गोवा समस्यामुक्त करा !

संपादकीय 
     आज १९ डिसेंबर, गोवामुक्तीदिन ! गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाले, तो हा दिन ! भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले आणि शेजारी असलेल्या गोवा प्रांतावर पोर्तुगिजांनी ४५० वर्षे राज्य केले. संस्कृती आणि धार्मिक वातावरण यांसंदर्भात गोव्याची नाळ महाराष्ट्र राज्याशी पर्यायाने भारताशी जोडली गेली आहे. वर्ष १९६१ मध्ये भारतीय शासनाने सैन्य पाठवून गोवा प्रदेश पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त केला. गोवा ही हिंदूंसाठी देवभूमी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn