Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिलवाले चित्रपटाच्या प्रदर्शनाला देहलीसह ७ राज्यांतून विरोध !

मध्यप्रदेशमध्ये दिलवाले या चित्रपटाचा फलक जाळला
शाहरुख खान यांनी असहिष्णुतेवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण
     नवी देहली - असहिष्णुतेवर वादग्रस्त विधान करणारे अभिनेता शाहरुख खान यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. १८ डिसेंबरला शाहरुख खान यांचा दिलवाले हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देहली, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरे येथे देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. काही ठिकाणी चित्रपटाचे फलक फाडण्यात आले.

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भालचंद्र महाराज (सिंधुदुर्ग) यांची आज पुण्यतिथी
सनातनच्या पू. आशालता सखदेव आजी यांचा आज वाढदिवस
दिनविशेष

आज शिवप्रताप दिन
अफझलखान वध दिन !

विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख जणेश्‍वर !

एन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान !
वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट
     हिंदूंनो, हिंदूंच्या पुढच्या पिढीला त्यांचा जाज्ज्वल्य इतिहास कळू नये, यासाठीचे हे षड्यंत्र आहे, हे जाणा ! ही स्थिती अशीच राहिली, तर या शिक्षणक्रमामुळे भारताचेही हिरवेकरण व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षणाचे हिरवेकरण रोखण्याची केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करा !

दिलवाले प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान यांची क्षमायाचना

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही !
असहिष्णुतेवर वक्तव्य केल्याचे प्रकरण
     नवी देहली - संकुचित मानसिकता असणारे लोक सामाजिक प्रसारमाध्यमांवर माझ्याविषयी द्वेष पसरवत आहेत, असे सांगत चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी असहिष्णुतेच्या संदर्भात केेलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. १६ डिसेंबर या दिवशी एका वाहिनीशी साधलेल्या संवादात शाहरुख यांनी सांगितले की, देशात कुठेही असहिष्णुता नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागतो. (ज्या देशात रहातो, त्या भूमीशी प्रतारणा केल्याविषयी माफी मागतांना जरतरची भाषा कशाला ? - संपादक)

पाक आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने त्याला शस्त्रास्त्रे देऊ नयेत ! - अमेरिकेच्या खासदारांची ओबामा यांच्याकडे मागणी

      वॉशिंग्टन - पाक आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने त्याच्यावर कुठल्याही प्रकारे विश्‍वास ठेवता कामा नये. अमेरिकेने यापुढे पाकला शस्त्रास्त्रे विकण्याचे बंद करायला हवे, तसेच पाकला देण्यात येणारे अर्थसाहाय्यही रोखायला हवे, अशी मागणी अमेरिकेच्या खासदारांनी (सिनेटचे सदस्य) राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे केली आहे. अमेरिकेने पाकला मागील १४ वर्षांमध्ये सुमारे १ सहस्र ८०० अब्ज रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.

हिंदुद्वेषी एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात शिवसेना-भाजप आमदारांनी रणशिंग फुंकले !

     महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या विरोधात एकत्र आलेल्या शिवसेना-भाजप आमदारांचे अभिनंदन ! अन्य पक्षाच्या आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटत नाहीत कि मतांधता त्यांच्या धर्मनिष्ठेच्या आड येते ?

ओडिशामध्ये मदरशात आतंकवादाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकाला अटक

मदरसे हे आतंकवादाचे अड्डे आहेत, या आरोपांना पुष्टी देणारे उदाहरण !
     भुवनेश्‍वर - ओडिशा राज्यातील कटकमध्ये एका मदरशात लहान मुलांना आतंकवादाचे शिक्षण दिल्याप्रकरणी डॉ. अब्दुर रहमान नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

बांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !

      ढाका - बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ओरी आपल्या घराजवळच्या मंदिराकडे निघाली असता महंमद निजाम आणि महंमद मूसा नावाच्या दोन मुसलमानांनी तिला गाडीत घालून पळवून नेले. ओरीने आरडाओरड केली; परंतु कोणीही तिच्या साहाय्याला आले नाही. धर्मांधांनी ओरीला अज्ञातस्थळी नेऊन तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचे वृत्त आहे. याविषयी मुलीचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेले होते; पण त्यांची तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यांची मुलगी इस्लाममध्ये धर्मांतरित झाली असून तिने मुसलमान मुलाशी विवाह केला आहे, अशी माहिती त्यांना पोलिसांकडून मिळाली. मुलीच्या वडिलांनी इतर कुठलाच पर्याय नसल्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी बांगलादेश मायनॉरिटी वॉचने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून मुलीच्या सुटकेची मागणी केली आहे.

चित्रपट परिनिरीक्षण मंडळात १४ वर्षे केवळ पैसा बोलत होता !

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या मागील भ्रष्टाचाराची चौकशी करून 
शासन उत्तरदायींना शिक्षा करेल, अशी आशा आहे !
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा आरोप
     नागपूर - चित्रपट परिनिरीक्षण मंडळात १४ वर्षे केवळ पैसा बोलत होता. मी आल्यापासून हा भ्रष्टाचार बंद केला आहे. त्यामुळे माझ्यावर राजकीय आरोप करण्यात येत आहेत, असे मत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. ते नागपूर येथे आयोजित स्मिता स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.

अल्-कायदाच्या आणखी एका आतंकवाद्यास अटक !

आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !
     नवी देहली - अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाफर मसूद या आतंकवाद्यास उत्तरप्रदेशमधील संभल जिल्ह्यातून अटक केली. या आठवड्यात अटक करण्यात आलेला तो तिसरा आतंकवादी आहे. पोलिसांनी यापूर्वी अब्दुल रहमान आणि महंमद असिफ या दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे.

घोटाळे आणि अवैध कृत्ये करणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी ! - सनातन संस्था

     मुंबई - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावरील आरोपांच्या संदर्भात प्रविष्ट झालेल्या आरोपपत्रात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिसला) निराशा आली असून सनातनची अपकीर्ती करण्यासाठी ती बेछूट आरोप करत आहे. सनातनचे सर्वच कार्य सनदशीर मार्गाने असल्याने कोणतेही कायदाबाह्य वर्तन संस्था करत नाही; मात्र इतरांवर कारवाईची मागणी करणार्‍या अंनिसमध्ये काय घोटाळे चालू आहेत, ते प्रथम पहायला हवे.

लैंगिक प्रकरणानंतर व्हॅटीकन आता काळ्या धनाच्या व्यवहारातही गुंतल्याचे उघड !

ऊठसूट कुठल्याही सूत्रावरून हिंदु धर्माला लक्ष्य करणारी निधर्मी प्रसारमाध्यमे 
 व्हॅटिकनच्या या कुकृत्यावर चर्चासत्रे घेतील का ?
     व्हॅटीकन (रोम) - ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धार्मिक स्थान असलेले व्हॅटीकन यापूर्वी मिशनर्‍यांच्या लैंगिक प्रकरणाच्या घटनांनी बरेच गाजले होते. त्या पाठोपाठ आता व्हॅटीकनचे अधिकोष (बँक) काळ्या धनाचे रूपांतर पांढर्‍या धनात अर्थात् अवैध धन वैध करण्याच्या व्यवहारातही गुंतले असल्याचे युरोपियन कौन्सिलच्या मनिवाल या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून उघडकीस आले आहे.

अमेरिकेत मशिदीवर लिहिले येशू हाच मार्ग दाखवणारा एकमेव !

     न्यूयॉर्क - अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या जिहादी आक्रमणानंतर तेथील नागरिकांमध्ये मुसलमानांविषयी द्वेष निर्माण झाला आहे. कॅलिफोर्नियातील ओथोन येथील एका मशिदीवर स्प्रे पेंटींगद्वारे येशू हाच मार्ग दाखवणारा एकमेव !, असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय अहमदिया मुसलमान समुदायाच्या सलाम नावाच्या मशिदीवरही येशू असे लिहिण्यात आले आहे. पोलीस या घटनांची चौकशी करत आहे.

सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात उपस्थित रहाणार !

भ्रष्टाचारांच्या आरोपांचे भांडवल करून न्यायालयात उपस्थित रहाण्याच्या कर्तव्याला 
 महत्त्वाची घटना करणारा भारतीय लोकशाहीतील प्रमुख राजकीय पक्ष !
जामीन घेण्याऐवजी अटक करून घेण्याची सिद्धता ?
नॅशनल हेराल्ड प्रकरण
      नवी देहली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या न्यायालयात उपस्थित राहण्याच्या घटनेला काँग्रेस अतिशय महत्त्वाची घटना बनवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार त्यांनी वेळ पडल्यास जामीन घेण्याऐवजी अटक करून घेण्याचा पर्याय निवडला आहे. 
     सूत्रांच्या माहितीनुसार नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या कायदेविषयक सल्लागारांनी सोनिया गांधी आणि राहुल यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार दोघेही १९ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याची सिद्धता करत आहेत. काँग्रेस या घटनेचे भांडवल करण्याच्या प्रयत्नात असून १९ डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती आहे की, या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल १० जनपथ येथून पटियाला हाऊस न्यायालयात पदयात्रेच्या माध्यमातून उपस्थित होणार आहेत. या पदयात्रेत काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा या सदनांतील सर्व खासदार सहभागी होणार आहेत, तसेच काँग्रेसची सत्ता असलेल्या इतर चार राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या संदर्भात काँग्रेसची एक बैठक होणार आहे. या बैठकीत रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. कठेरिया यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

केंद्रीय मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया (१) यांना निवेदन
देतांना श्री. शुभम सोनी आणि श्री. ठाकुरजी
      आग्रा - तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या शासनाद्वारा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी केल्या जाणार्‍या जनतेच्या या निधीचा अपव्य रोखावा, तसेच निर्माता संजय लीला भंसाळी यांच्या इतिहासाचा अनादर करणार्‍या बाजीराव मस्तानी या चित्रपटावर बंदी घालावी, अशा दोन मागण्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया यांना १६ डिसेंबर या दिवशी आग्रा येथे देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. शुभम सोनी, श्री. ठाकुरजी आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन केंद्रीय राज्य मंत्री कठेरिया यांना दिले.


अमेरिकी शासन शीख, मुसलमान समुदायांची बैठक घेणार

      वॉशिंग्टन - अमेरिकेत शीख आणि मुसलमान समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढल्याने अमेरिकी शासन आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत. या समाजापुढील आव्हाने आणि समस्या यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
     अमेरिकी शासनाच्या माध्यम विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले, शासनाचे प्रतिनिधी विविध धार्मिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. सिसिलिया मुनोज हे शासनातर्फे चर्चेत सहभाग घेतील. कॅलिफोर्नियात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी वंशाच्या एका दांपत्याकडून १४ जणांचे हत्याकांड झाल्यानंतरही अमेरिकी शासनाने काही संघटनांची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा अशी बैठक घेण्यात येणार आहे. अमेरिकेत शीख समजाला लक्ष्य करण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढले आहेत. सॅन दिएगो शहरात फुटबॉलचा सामना चालू असतांना शीख गटाला सुरक्षा रक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला होता, तर २०१२ मध्ये शिखांच्या एका धार्मिक स्थळाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला होता.

पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांच्याकडून कोणतीच कारवाई नाही !

असे जर आहे, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचाच कशाला ?
ध्वनीप्रदूषणाविषयी कारवाई करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे प्रकरण
     पुणे - दसरा आणि दिवाळी या कालावधीत होणारे ध्वनीप्रदूषण अल्प करणे अन् ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करणे, या संदर्भात राज्यातील पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांना उच्च न्यायालयाने आदेश बजावले होते; मात्र यासंदर्भात काहीही कारवाई झालेली नाही. उच्च न्यायालयाने या सर्वाची गंभीर नोंद घेऊन त्यांना कठोर शब्दांत पत्र पाठवले आहे. (पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग उच्च न्यायालयाचे आदेश गांभिर्याने घेत नसतील, तर ते सर्वसामान्यांच्या पत्रांची कशी नोंद घेत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

बेगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

     रामनाथी - बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी अवगत केले. आश्रम पाहिल्यावर सौ. जोसलकर म्हणाल्या, सनातन संस्थेकडून जे कार्य केले जाते, त्याविषयी मला कल्पना नव्हती. आश्रम पाहिल्यावर येथील विविध विभागांमध्ये चाललेले कार्य पाहून आनंद झाला. विशेषत: संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेली देवतांची सात्त्विक चित्रांची माहिती अतिशय चांगली आहे.

प्रमाणपत्र नसतांना सादर होणार्‍या सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम या नाटकावर बंदी घालू ! - सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे

हिवाळी अधिवेशन २०१५
      नागपूर- अंनिसच्या सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम या नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण परिमंडळाचे प्रमाणपत्र नसेल, तर नाटकाचे सर्वत्र प्रयोग झालेच कसे, असा प्रश्‍न सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी १७ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला. या प्रकरणाची माहिती घेऊन हे नाटक बंद करण्याचे आदेश देतो, असे आश्‍वासन श्री. तावडे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला या वेळी दिले.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

गोव्यातील किती हिंदू आमदार या सूत्राला पाठिंबा देतात ?

     गोवा राज्यातील प्राथमिक शिक्षणातील मराठी आणि कोकणी माध्यमांतील शाळांनाच शासकीय अनुदान द्यावे आणि इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना देण्यात येणारे शासकीय अनुदान रहित करावे, या मागणीला अनुसरून भारतीय भाषा सुरक्षा मंचाने गोवा मुक्तीदिनी म्हणजे १९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोव्यात १९ ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - ईश्‍वरपूर आणि तासगाव येथे निवेदन

ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना आणि तासगाव येथे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मिरज रेल्वे स्थानकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करा ! - शिवसेनेची रेल्वे अधिकार्‍यांकडे मागणी

रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा करतांना शिवसैनिक
     मिरज - हिंदु धर्मासाठी अद्वितीय असा त्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने मिरज शहर पावन झालेले आहे. या शहराला संत वेणास्वामी, तसेच अन्य आध्यात्मिक आणि ऐतिहासिक यांचा वारसा आहे.

कराड (जिल्हा सातारा) येथील सनातनचे हितचिंतक विजय गायकवाड यांची अमेरिकेतील आयुर्विमा परिषदेसाठी निवड

     सातारा - सनातनचे हितचिंतक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कराड शाखेतील विमा प्रतिनिधी श्री. विजय प्रभाकर गायकवाड यांची अमेरिकेतील आयुर्विमा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेस ग्रामीण भागातून सलग चौथ्या वर्षी निवड होणारे श्री. विजय गायकवाड हे एकमेव विमा प्रतिनिधी आहेत. गेली १५ वर्षे विमा व्यवसाय करतांना आध्यात्मिक उपासनेची मोलाची मदत झाल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. त्यांचे मार्गदर्शक विकास अधिकारी श्री.एस्.आर्. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडाळ (सातारा) येथे शिवप्रतापदिन साजरा करणार

     सातारा - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कुडाळ (तालुका जावली, जिल्हा सातारा) या ठिकाणी ३५६ वा अफजलखान वध दिन अर्थात शिवप्रतापदिन साजरा करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर, कुडाळ येथे समस्त शिवभक्तांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावेे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. सतीश ओतारी यांनी केले आहे.

'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू ! - शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस

उजवीकडे आमदार श्री. संजय पोतनीस
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे
     नागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी, तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या दोन्ही प्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. संजय पोतनीस यांनी दिले. 

'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मुळा प्रवरा आस्थापन घोटाळा प्रकरणी लक्ष घालीन ! - दादा भुसे, राज्यमंत्री, सहकार

श्री. दादासाहेब भुसे यांना
माहिती सांगतांना श्री. सुनील घनवट
     नागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'मुळा-प्रवरा इलेक्ट्रीकल को-ऑ. सोसायटी'कडून वीज देयकाचे येणे बाकी असलेले २ सहस्र कोटी रुपये वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी साहाय्य म्हणून देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन सहकार राज्यमंत्री श्री. दादा भुसे यांना देण्यात आले. तेव्हा या दोन्ही प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

१८ डिसेंबरला तासगाव येथे पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे व्याख्यान !

     तासगाव - गडकोट मोहिमेची माहिती देण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे शुक्रवार, १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता तासगाव येथील चंपाबेन वाडीला ज्ञानमंदिर (गणपती मंदिराशेजारी) येथे गडकोट मोहीम या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी त्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अभिजित घुले यांनी केले आहे.

(म्हणे) बाजीराव नाचत होता, सेलिब्रेशन करत होता !

     असे वक्तव्य अल्पसंख्याकांच्या श्रद्धास्थानांविषयी कुणी करू शकते का ? हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावी आज संजय भन्साळी असे वक्तव्य करण्यास धजावू शकतात. तरी हिंदूंनो, आपले प्रभावी संघटन निर्माण करा !

शासनाने केंद्राला नुसते कळवायचे नाही, तर अभ्यासक्रम पालटण्यासाठी वळवायचे आहे! - महाडचे शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले


प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे करणार ! 
     नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक इतिहास न पालटल्यास जिल्ह्याजिल्ह्यांत आंदोलन उभारण्यात येईल. भाजप शासनाने केंद्राला याविषयी कळवले आहे; मात्र केंद्राला नुसते कळवायचे नाही, तर पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम पालटण्यासाठी वळवायचे आहे, असे ठाम मत महाडचे शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांसमोर मांडले. 

'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मराठी भाषेच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवणार ! - शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे

आमदार श्री. रुपेश म्हात्रे यांना निवेदन देतांना
श्री. अरविंद पानसरे, डावीकडे श्री. सुनील घनवट
     नागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी, तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे यांनी दिले. 

'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू ! - श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार, शिवसेना, पिंपरी-चिंचवड

आमदार श्री. गौतम चाबुकस्वार (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. घनवट
     नागपूर - 'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्था आरोप प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असे आमदार श्री. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार श्री. गौतम चाबुकस्वार यांना देण्यात आले. 

'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या विरोधात शिवसेना आमदारांचा एल्गार !

असा चुकीचा इतिहास शिकवायला हा पाकिस्तान आहे का ? - शिवसेना 
     असा चुकीचा इतिहास शिकवायला हा पाकिस्तान आहे का ? गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही छत्रपतींचा इतिहास सविस्तर समाविष्ट केला पाहिजे. तसेच या पुस्तकात महाराष्ट्रातील संतांच्या नावांचा करण्यात आलेला एकेरी आणि चुकीचा उल्लेख त्वरित हटवावा, अन्यथा शिवसेना पद्धतीने (स्टाईलने) आंदोलन करण्यात येईल, अशी सणसणीत चेतावणी या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी दिली.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी १० सहस्र ५१२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

     नागपूर - शेतकर्‍यांना कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या अनेक उपायांपैकी एक उपाय असू शकतो; परंतु संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवता येत नाहीत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी एकूण १० सहस्र ५१२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले. यात ७ सहस्र ४१२ कोटी रुपये विमा योजनेसाठी देण्यात आले असून १ सहस्र कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे म्हणणे काय आहे ?

१. एन्.सी.आर्.टी.च्या हिंदुद्रोहाच्या विरोधात वर्ष २००८ पासून समिती आणि अन्य संघटनाना सोबत घेऊन महाराष्ट्रभरात जनआंदोलने करत आहे. 
२. वारंवार शासनाकडेही या संदर्भातील पुरावे आणि निवेदने दिले आहेत; मात्र त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही. 
३. सध्या या संदर्भात शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना भेटून त्यांनी विधीमंडळात तीव्र आवाज उठवावा, अशी मागणी केली आहे. 
४. प्रत्येक राज्यशासनाला 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पुस्तकात २५ टक्के पालट करण्याचा अधिकार केंद्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाला सदर पुस्तक पालटले; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रातच आजही हा अवमान चालू आहे. 
५. 'याचा संदर्भ आम्ही कोठून घेतला, याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही', असे मंडळाकडून बेजबाबदारपणाची माहिती देण्यात आली आहे. 
६. देशात सुमारे १३.३३ टक्के विद्यालयांतून 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर चुकीचा इतिहास बिंबवला जात आहे, हे थांबलेच पाहिजे.

वारकर्‍यांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रकार ! - ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, संस्थापक, सांगली जिल्हा वारकरी सेवा संप्रदाय संघटन

     वारकरी संप्रदायात संतांची जी नावे आहेत, त्या नावांवर लक्षावधी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ही नावे जशी आहेत, तशीच घेण्यात आली पाहिजेत. 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पाठ्यपुस्तकात यापूर्वीही चुकीचा इतिहास देणे, तसेच अनेक अयोग्य प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार चुकून होत आहेत कि जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत, हे पहावे लागेल. संतांचे चुकीचे आणि एकेरी उल्लेख करणे हा प्रकार वारकर्‍यांच्या भावना दुखावणारा आहे. हा प्रकार गंभीर असून या चुका त्वरित सुधारल्या पाहिजे.

२५ टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी एस्.टी. कर्मचारी संपावर !

पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारून लाखो प्रवाशांना वेठीस धरणारे जनताद्रोहीच होत ! 
बंदच्या काळात झालेली लाखो रुपयांची वित्तहानी संबंधितांकडून वसूल करा !

लाखो प्रवासी वेठीस
    मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा वर्ष २०१२ ते २०१६ या वर्षांसाठीचा कामगार करार रहित करून महामंडळातील कर्मचार्‍यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील कर्मचारी १६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले. कर्मचार्‍यांच्या संपामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले गेले असून त्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

शिवाजी महाराजांच्या नीतीनेच आतंकवाद नष्ट होईल !
     अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाफर मसूद या आतंकवाद्यास उत्तरप्रदेशमधील संभल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या आठवड्यात अटक करण्यात आलेला तो तिसरा आतंकवादी आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Uttarpradesh ke Sambhal me Al-Kaida ka jihadi atankwadi giraftar. - Aur kitane din ham atankwad chalne denge ?
जागो !
उत्तरप्रदेश के संभल में अल्-कायदा का जिहादी आतंकवादी गिरफ्तार. - और कितने दिन हम आतंकवाद चलने देंगे ?

नोंदणी अर्जावरील लिखाण मराठीऐवजी इंग्रजीत लिहिण्यासाठी दटावणार्‍या उद्दाम धर्मांध महिलेकडून लेखी माफी

रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या मुंबई संस्थेच्या अध्यक्षा 
सौ. रमाताई सावंत यांनी तक्रार प्रविष्ट केल्याचा परिणाम
     मुंबई - रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या मुंबई संस्थेच्या अध्यक्षा सौ. रमाताई सावंत यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या २० डिसेंबरच्या व्याख्यानाच्या संदर्भात म्युनिसिपल हायस्कूल डोंगरी येथे १३ डिसेंबर या दिवशी नियोजन बैठक आयोजित केली होती. शाळेच्या वर्गाच्या नोंदणीसाठी त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात ९ डिसेंबर या दिवशी पैसे भरायला गेल्या.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना हाकलून देऊन नागरिकांना भयमुक्त करा !

१९ डिसेंबर या दिवशी दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
पत्रकार परिषदेद्वारे हिंदुत्ववाद्यांची मागणी
डावीकडून श्री. मोतीराम गोंधळी, श्री. नरेंद्र सुर्वे आणि सौ. दीक्षा पेंडभाजे
     ठाणे, १७ डिसेंबर (वार्ता.) - दिवा भागात नायजेरियन नागरिकांची संख्या जवळजवळ १ सहस्रांच्या घरात गेली आहे. त्यांपैकी काही नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. नायजेरियन नागरिकांच्या अनेक टोळ्या ठाणे जिल्ह्यातही रहात आहेत. अंमली पदार्थांची विक्री, चोरी, फसवणूक करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना हाकलून दिव्यातील नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून मुक्त करावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १९ डिसेंबर या दिवशी दिवा पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी, दिवा येथील समाजसेवक श्री. महादेव बनसोडे आणि सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेला ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. 

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या नायजेरियन नागरिकांना हाकलून द्यावे, या मागणीसाठी दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

स्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, दिवा (पूर्व) 
वार आणि दिनांक : शनिवार, १९ डिसेंबर 
वेळ : सायंकाळी ५ ते ७

शेतकर्‍यांना कर्जमाफी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे विधानभवनासमोर निदर्शने !

     नागपूर, १७ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - काल शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली आहे. त्यामुळे विरोधक संतापले आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या सूत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळी १० वाजता विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. 

३१ डिसेंबरनिमित्त पुणे येथे घेण्यात आलेली गड संरक्षण मोहीम आणि त्याविषयीची सूत्रे

श्री. सुनील घनवट
      ३१ डिसेंबर २०११ आणि १ जाने २०१२ या दिवशी अभिनव भारत निर्माण संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राजगड, ता. वेल्लेे, जिल्हा पुणे येथे गडसंरक्षण मोहीम घेण्यात आली. ती मोहीम १०० टक्के यशस्वी झाली. समितीच्या वतीने गड संरक्षण मोहिमेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या आयोजनातील सूत्र, अडचणी, सूचना आणि करावयाचे प्रयत्न या लेखाद्वारे देत आहोत. या सूत्रांचा पन्हाळागड, सिंहगड, रायगड आदी ठिकाणी गड संरक्षण मोहीम घेण्यासाठी लाभ होऊ शकतो.
     १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री अपप्रकार घडतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले गड, किल्ले यांवर अनेक हिंदू नववर्ष साजरा करण्याच्या नावाखाली मौजमजा करतात. तेथे मद्यपान करणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे, चित्रपटातील गाणी लावून त्यावर नाचणे, पत्ते खेळणे, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ, तसेच कचरा टाकून गडावर अस्वच्छता करणे आदी चुकीचे प्रकार चालतात. यामुळे समस्त हिंदूंचे स्फूर्तीस्थान असलेल्या गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी गड-संरक्षण मोहिमेचे नियोजन करण्याबाबत सूत्रे देत आहोत.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. त्याविषयी काही सूत्रे पुढे दिली आहेत.

अफझलखान वध : हिंदूंना कूटनीतीची प्रेरणा देणारी नियोजनबद्ध आणि धाडसी योजना !

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने...
      हिंदूंच्या संपूर्ण इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले अफझलखान वधासारखे नियोेजनबद्ध प्रकरण घडलेले नाही. या वधापूर्वी शिवछत्रपतींनी केलेली व्यूहरचना, खानाचा प्रत्यक्ष वध आणि नंतर अतिशीघ्रतेने केलेल्या कूट (गनिमी) कारवायांचे दूरदृष्टीपूर्वक नियोजन, यांतून त्यांची नियोजनकल्पकता अन् युद्धकौशल्य अधोरेखित होते.
१. स्वतः शरण येत असल्याचे भासवून 
कपटी खानाला असावध करणे
     प्रथम खानाला जावळीच्या खोर्‍यात आणण्यासाठी खान आल्यानंतर मी शरण येण्यास सिद्ध आहे. खान मला चुलत्याच्या ठिकाणी आहे. त्याने आपणास धीर द्यावा. पातशहांकडूून माफी मिळवून द्यावी. आपण खानासह विजापूरला येण्यासही सिद्ध आहोत, असे नाटक वठवत त्याच्यासह समेटाची बोलणी करून त्याला असावध करण्यात आले. या युक्तीमुळे खान जावळीला आला.

आतंकवाद हा असाच संपवावा लागतो !

     आज शिवप्रतापदिन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा कोथळा काढून त्याला संपवले तो दिवस ! भवानीमातेच्या आशीर्वादाने शिवरायांनी एक नियोजनबद्ध योजना आखून अफजलखानाला अगदी नृसिंहाच्या पद्धतीने संपवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना ठरली. खरेतर आजचा शिवप्रतापदिन हा देशस्तरावर साजरा केला पाहिजे; कारण अफझलखान वधाची ही ज्वाला आजच्या काळातही धगधगत ठेवणे आवश्यक वाटते. त्यातूनच आज देशात फोफावलेल्या आतंकवादाचा बीमोड कसा करावा, या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.

भन्साळीजी, केवळ कल्पनेच्या पंखांनी इतिहासाची उड्डाणे घडत नसतात !

     हिंदु साम्राज्यविस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना संजय भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटात एक प्रेमी असा दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे. या संदर्भात पानिपत, नेताजी, संभाजी यांसारख्या ऐतिहासिक साहित्यकृतींसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक मराठी कादंबरीकार श्री. विश्‍वास पाटील यांनी त्यांना दिलेल्या कानपिचक्या येथे देत आहोत.
१. इतिहासाचे सादरीकरण योग्यरितीने करणे आवश्यक ! 
    इतिहासाचे सादरीकरण घडवून आणतांना कलाकाराचे दायित्व शतपटीने वाढत असते. आपण जे शिवधनुष्य उचलले आहे, त्याचे पूर्ण भान त्याला असावे लागते. केवळ गल्ला गोळा करण्यासाठी इतिहासाचा वापर करणार असाल, तर त्या वाटेला न जाणे उत्तम !

इंग्रजीचे वाढलेले स्तोम भावी पिढीसाठी धोकादायक !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

चर्चमधील पाद्य्रांनी इतर धर्मातील त्रुटींविषयी व्याख्याने देणे, म्हणजे बालवाडीतील मुलाने पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याला शिकवण्यासारखे झाले ! ख्रिस्ती पंथाची स्थापना २०१३ वर्षांपूर्वी झाली, तर हिंदु धर्म अनादी आहे, हे लक्षात न घेता व्याख्याने देणारे आणि इतरांच्या त्रुटी दाखवणारे ख्रिस्ती !

      अमेरिकेतील सेंट लुइस नावाच्या चर्चने विद्यार्थ्यांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना अन्य धर्मातील तथाकथित त्रुटी सांगून त्या धर्मातील लोकांनी काय शिकणे आवश्यक आहे, या विषयावर सतत ३ मास पाद्य्रांची व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या अन्य धर्मांत हिंदु धर्माचाही समावेश आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(* शहिद शब्दाचा अर्थ इस्लामसाठी मेलेला असा आहे. त्यामुळे देशासाठी प्राणार्पण केलेल्या क्रांतीकारकांना किंवा सैनिकांना शहिद संबोधणे अनुचित आहे.)
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांना सूचना

सनातन संस्थेच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
      सनातन संस्थेच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.१२.२०१५)

नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद येथे राबवण्यात आलेले उपक्रम

१. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन : नवरात्रीच्या निमित्ताने धनबाद येथील शक्ती मंदिरात १९.१०.२०१५ ते २२.१०.२०१५ या कालावधीत ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या उपक्रमाचा सुमारे २०० जिज्ञासूंनी लाभ घेतला.
२. सामूहिक पूजामंडपात फ्लेक्स फलक लावणे : नवरात्रीच्या निमित्ताने जमशेदपूर येथील केबल टाऊनच्या सामूहिक पूजामंडपात आचारधर्म आणि देवीपूजन यांच्याशी संबंधित फ्लेक्स फलक लावण्यात आले होते.

अन्वेषण यंत्रणांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराविषयी चौकशी केल्यास त्यांना त्याविषयी विश्‍वस्तांकडे विचारणा करण्यास सांगा !

     सध्या पोलीस आणि अन्य काही अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. या चौकशीत अधिकारी सर्वसामान्य साधकांशी संबंधित नसलेल्या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराविषयी आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी विचारणा करत आहेत. सनातनचे सर्व साधक अध्यात्मप्रसाराचे कार्य निरपेक्ष भावनेने आणि सेवाभावाने करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य साधकाला संस्थेच्या आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाबींची माहिती असणे कायद्याने बंधनकारक नाही. उदा. राजकीय पक्षांतील कार्यकर्ते त्या पक्षाचे विचार पटतात म्हणून त्या पक्षाचा / पक्षाच्या विचारांचा प्रचार करत असतात; मात्र त्यांना त्या राजकीय पक्षाच्या आर्थिक बाबींविषयी काही माहिती नसते किंवा त्याविषयी त्यांना कोणी विचारतही नाही, तसेच इथेही आहे, तरीही अन्वेषण यंत्रणा साधकांवर दबाव आणण्यासाठी असे प्रश्‍न विचारत असतात. अशा वेळी साधकांनी अशा प्रश्‍नांची उत्तरे माहीत नसल्याचे अधिकार्‍यांना सांगावे. तसेच त्यांना संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी माहिती हवी असल्यास सनातन संस्थेच्या विश्‍वस्तांकडे त्याविषयी मागणी करण्यास सांगावे.
- श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.

साधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

     अखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.

सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ 
परिषद यांच्या राज्यस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमांची छायाचित्रे 
योग्य प्रकारे काढून ती पुढील माहितीसह रामनाथी आश्रमात पाठवा !
       विविध राज्यांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ परिषद यांद्वारे महत्त्वाच्या कार्यक्रमांचे (उदा. पत्रकार परिषद, हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने, आंदोलने, निवेदन देणे आदींचे) आयोजन करण्यात येते. बर्‍याच वेळा सनातन संस्थेचे साधक, समितीचे कार्यकर्ते अथवा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते समाजातील संत, मान्यवर अथवा नेते यांच्या भेटी घेतात, तर काही वेळा ते इतर संघटनांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर अथवा अन्यत्र उपस्थित असतात. अशा वेळी छायाचित्रे काढतांना आणि ती रामनाथी आश्रमात पाठवतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

श्रीकृष्णाला मथुरेला जाण्यापासून अडवतांना गोपी (११.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

प्रेमळपणा, सेवाभाव आणि नेतृत्वगुण असलेल्या चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुशीला रमेश आगवेकर (वय ६९ वर्षे) !

सौ. सुशीला आगवेकर
     चिपळूण येथील सौ. सुशीला रमेश आगवेकर यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे दिनांक १६ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी त्यांचा पुत्र श्री. विनायक आणि स्नुषा सौ. मंजिरी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रेमळपणा
      पूर्वी आईच्या वागण्या-बोलण्यात थोडा कडकपणा असायचा; मात्र आता तिच्यात पुष्कळ चांगला पालट झाल्याचे जाणवते. आई बोलण्यातून वा कृतींतून प्रत्येकाला आनंद देते. अगदी स्वयंपाक बनवतांनाही ती प्रत्येकाच्या आवडीचा विचार करते. आम्ही आश्रमातून काही दिवसांसाठी घरी गेल्यावर आमच्या आवडीचे पदार्थ बनवण्याची तिची तळमळ असते. - श्री. विनायक रमेश आगवेकर (सौ. सुशीला आगवेकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

स्वतःला होणार्‍या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांकडे साक्षीभावाने पहाणार्‍या अन् प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या पू. (सौ.) आशालता सखदेवआजी (वय ८० वर्षे) !

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी
     मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१८.१२.२०१५) या दिवशी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कपडे धुण्याची सेवा करणारी साधिका कु. प्रियांका जगताप यांनी त्यांची अनुभवलेली प्रीती, कपडे धुतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या खोलीत जाणवलेले पालट येथे देत आहोत.
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी 
यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी 
सनातन परिवाराच्या वतीने शि.सा. नमस्कार !
१. पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर पुष्कळ शांत वाटून मन स्थिर होते.
२. पू. आजींची प्रीती !
      मी प्रतिदिन कपडे वाळत घालून त्यांच्या खोलीतून बाहेर जात असतांना त्या काहीतरी करत असतात, उदा. दैनिक वाचन. मी कपडे वाळत घालीपर्यंत पू. आजी एकाग्रतेने त्या कृती करत असतात; पण मी जायला निघाले की, त्या तोंडवळा माझ्याकडे करून आणि माझ्याकडे पाहून ये असा निरोप देतात. पुष्कळ वेळा मी जातांना दाराचा आवाज होत नाही, तरी पू. आजींना मी निघालेले कळून त्या मला निरोप देतात.

व्यष्टी आणि समष्टी साधनेनुसार देवघरातील देवांची संख्या

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
व्यष्टी साधनेत साधक अनेक देवांकडून एका देवाकडे येतो, तर समष्टी साधनेत अनेक देव साहाय्य करतात; म्हणून कार्यानुमेय अनेक संतांनी दिलेल्या देवतांच्या मूर्ती आणि वस्तू माझ्या खोलीतील देवघरात अन् आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवल्या आहेत. देवतांच्या हातातही अनेक आयुधे असतात. तसेच हे आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१०.२०१५)

सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले
      पूर्वीच्या युगांत व्यक्ती सात्त्विक असल्याने प्रकृतीनुसार कोणत्याही साधनामार्गाने साधना करू शकत असे. कलियुगात व्यक्तीत स्वभावदोष खूप असल्याने ते दूर केल्याशिवाय साधना करणे अशक्य आहे. यासाठी सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनास प्राधान्य दिले आहे. त्यांचे निर्मूलन करत असल्यामुळे सनातनच्या साधकांची साधनेत जलद प्रगती होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१२.२०१५)
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
                           ॥ हरि ॐ तत्सत् ॥                                                    
                                              दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ
: दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     मूल लहान आहे, म्हणून अग्नि त्याला भाजत नाही, असे नसते, तसेच देहलीतील निर्भयावर बलात्कार करणारा तिच्या मृत्यूस कारणीभूत झाला. असे असतांना त्याला फाशीची शिक्षाच व्हायला हवी.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.१२.२०१५)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 


बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विरोधी पक्षाचे दायित्व !

संपादकीय 
     महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन चालू आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी चर्चा न करता थेट घोषणाच करा, असा बालहट्ट धरत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, तसेच विरोधी पक्षांतील सर्व आमदारांनी अवघे विधीमंडळ दावणीला बांधले. विधीमंडळ अधिवेशनाचा मूळ उद्देशच बासनात बांधून ठेवण्याचा घटनाद्रोही आग्रह विरोधी पक्षांनी करावा, यातून दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या सार्वभौम विधीमंडळाविषयीच्या धारणा विरोधी पक्ष म्हणून कितपत विकसित झाल्या आहेत, याविषयी शंका येते. या हट्टापायी त्यांनी विधीमंडळाचा संपूर्ण १ आठवडा कामकाजाविना वाया घालवला. दुुसर्‍या आठवड्यापासून विरोधक निमूटपणे चर्चेला सिद्ध झाले. जर विरोधकांना चर्चा करायचीच होती, तर मग विधीमंडळातील सभागृहाचे कामकाम आठवडाभर होऊ न देण्याचा आडमुठेपणा त्यांनी का केला ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn