Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आतंकवादाचे सावट दूर करण्यासाठी पाकशी युद्ध नव्हे, चर्चा हवी - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज असे आहे, तर मग आतापर्यंत पाकशी झालेल्या अनेक चर्चांनंतरही आतंकवाद नष्ट का झाला नाही ?

      नवी देहली - भारतावरील आतंकवादाचे सावट दूर करण्यासाठी पाकशी युद्ध करणे हा पर्याय नाही. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संवाद प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मांडले. (आतंकवाद संपवण्यासाठी फ्रान्सने कधी आय.एस्.आय.एस्.शी चर्चा करण्याचा विचार केला नाही. उलट त्यांच्यावर थेट क्षेपणास्त्रे डागली. भारतीय राज्यकर्ते ही गोष्ट लक्षात घेतील का ? - संपादक) लोकसभेतील प्रश्‍नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या. संवाद आणि आतंकवाद या गोष्टी एकाच वेळी चालू ठेवता येणार नाहीत, या पंतप्रधानांच्या विधानाची आठवणही स्वराज यांनी या वेळी करून दिली.

देहलीमध्ये अल् कायदाच्या २ जिहादी आतंकवाद्यांना अटक !

संपूर्ण देशच आतंकवादाने पोखरला गेल्याचे उदाहरण !
     नवी देहली - नाताळ आणि १ जानेवारी यानिमित्त देहलीमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघांना देहली पोलीस दलाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आतंकवादी उत्तरप्रदेशमधील संभल जिल्ह्यातील रहिवासी आहेत; मात्र पोलिसांनी त्यांची नावे घोषित करण्यास नकार दिला आहे.

बलात्कार्‍याला साहाय्य करणे म्हणजे त्याला गुन्हा करण्याचा परवाना देण्यासारखेच आहे !

     बलात्कार्‍याला साहाय्य करणार्‍यांच्या राजवटीत महिलांवरील अत्याचार कधी तरी थांबतील का ? बलात्कार करा आणि केजरीवाल शासनाकडून साहाय्य मिळवा, असे गुन्हेगारांना वाटून राजधानीतील गुन्हेगारी न वाढल्यासच नवल !
निर्भयाच्या वडिलांची केजरीवाल शासनावर टीका
     नवी देहली - निर्भयाच्या बलात्कार्‍याला केजरीवाल शासनाकडून १० सहस्र रुपये आणि शिवणयंत्र देऊन साहाय्य करण्याच्या निर्णयावर निर्भयाच्या वडिलांनी सडकून टिका केली आहे. बलात्कार्‍याला साहाय्य करणे म्हणजे त्याला गुन्हा करण्याचा परवाना देण्यासारखे आहे, असे त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

भारत आय.एस्.आय.एस्. विरुद्धच्या कारवाईसाठी सिद्ध - संरक्षणमंत्री

     नवी देहली - संयुक्त राष्ट्रांनी भारताकडून आलेला प्रस्ताव मान्य केल्यास इराकस्थित इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेवर कारवाई करण्यास भारत सिद्ध आहे, असे प्रतिपादन भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. पर्रीकर यांनी नुकताच अमेरिकाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

धार्मिक भावना दुखावल्या म्हणून हिंदूंनीही मुसलमानांप्रमाणेच प्रतिक्रिया द्यायची का ?

प्रेषितांचा अवमान केल्याचे प्रकरण
हिंसक आंदोलन करणार्‍या मुसलमान नेत्यांना विहिंपचा प्रश्‍न
      नवी देहली - धार्मिक भावना दुखावल्या म्हणून निषेध करणे एक वेळ योग्य आहे; पण हा निषेध करतांना समाजाला वेठीस धरणे आणि निरपराध्यांना त्रास देणे, अत्यंत चुकीचे आहे. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून हिंदूंनीही जर मुसलमानांप्रमाणे हिंसक प्रतिक्रिया द्यायचे म्हटले, तर काय परिस्थिती होईल ? असा प्रश्‍न विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महासचिव सुरेन्द्र जैन यांनी मुसलमान समाजाच्या नेत्यांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना विचारला आहे. अखिल भारतीय हिंदु महासभेचे कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ सध्या देशात अनेक शहरांमध्ये मुसलमान समाजाकडून मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्च्यांच्या वेळी होणार्‍या हिंसक घटना लक्षात घेऊन विहिंपने मुसलमान समाजाच्या नेत्यांना कायद्याच्या चौकटीत राहून निषेध नोंदवण्याचा सल्ला दिला आहे.

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वात गुरु चांडाल योग असल्याने अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी कुंभ प्रशासनाकडून महाअनुष्ठानचे आयोजन !

सिंहस्थ कुंभपर्वातील अडथळे दूर होण्यासाठी मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य प्रयत्न !
 
    उज्जैन - येणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वात गुरु चांडाल योग येत असल्यामुळे अनेक पंडित, विद्वान आणि ज्योतिषाचार्य यांच्याकडून या कुंभपर्वात रोगराई पसरणे, अपघात होणे, मोठ्या नेत्याचा मृत्यू होणे आदी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे ही संकटे टाळण्यासाठी पं. आनंदशंकर व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली महाअनुष्ठान करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रपासून प्रारंभ करण्यात आलेले हे अनुष्ठान रामनवमीला पूर्णाहुतीसह समाप्त होणार आहे.

बंगालमध्ये हिंदूंच्या धार्मिक आणि न्याय्य हक्कांवर गदा

बंगालमध्ये हिंदूंविषयी असहिष्णुता ! आपल्या न्याय्य हक्कांसाठी हिंदूंना 
न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. हा भारत आहे कि पाक ?
कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
      कोलकाता - बंगालमध्ये विशेषत: मुर्शिदाबादसारख्या मुसलमानबहुल जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धार्मिक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. हिंदूंना पूजा-अर्चा, उत्सव, मिरवणुका यांना अनुमती नाकारली जात आहे. भारत सेवाश्रम संघ या जगप्रसिद्ध सामाजिक हिंदु संघटनेला आणि त्यांच्या भक्तांना धार्मिक मिरवणूक काढण्यास आणि पूजा करण्यास विरोध केला जात आहे. हिंदूंच्या धार्मिक अधिकारावरील या अतिक्रमणामुळे हैराण झालेल्या श्री. निलरतन पाठक यांनी कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून हिंदूंना धार्मिक अधिकार परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.

बोको हरामच्या आक्रमणात ३० जण ठार

जगभर फोफावलेला आणि निरपराध्यांचे बळी घेणारा जिहादी आतंकवाद !
     कानो (नायजेरिया) - उत्तर नायजेरियातील ३ गावांवर बोको हराम संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३० जण ठार झाले, तर २० जण घायाळ झाले. नायजेरियात बोको हरामच्या विरोधात तेथील सैन्याने युद्ध पुकारले असून स्थानिक नागरिकांचे त्यांना साहाय्य मिळत आहे. या कारणामुळे बोको हरामने या ३ गावांतील नागरिकांवर आक्रमण केले. प्रत्यक्षदर्शी मुस्तफा करिंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक नागरिकांवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली.

जुना आखाड्यातून राधे माँ आजीवन बहिष्कृत !

     उज्जैन - दशनामी जुना आखाड्याकडून बहुचर्चित स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ यांना आजीवन बहिष्कृत करण्यात आले आहे. काही मासांपूर्वी राधे माँ यांच्यावर अनेकांनी गंभीर आरोप केले होते. उज्जैन येथील सिंहस्थ पर्वात इंदूर बाह्यवळणाजवळील मंडलेश्‍वर नगरात राधे माँ यांच्याकडून मंडप उभारण्यात येणार आहे, अशी चर्चा होती. त्यावर जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक महंत हरि गिरिजी महाराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महंत हरि गिरिजी महाराज पुढे म्हणाले, राधे माँ यांना यापूर्वीच आखाड्याने बहिष्कृत केले आहे. आता आचार्य महामंडलेश्‍वर अवधेशानंद गिरि महाराज यांनीही त्यांना आजीवन बहिष्कृत केले आहे. त्यामुळे येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वात त्यांना भूमी देण्यात येणार नाही. इतर ठिकाणी कुठेही त्यांचा मंडप उभारण्यास त्या स्वतंत्र आहेत. यावर राधे माँ यांचे सचिव संजीव गुप्ता यांनी सिंहस्थ कुंभपर्वात राधे माँ भव्य मंडप उभारतील, असा पुनरुच्चार केला.

धर्माच्या आधारावर मुसलमानांना आरक्षण देता येणार नाही ! - एकनाथ खडसे

" विरोधकांचा  गदारोळ " २ वेळा स्थगित !
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, नागपूर
      नागपूर - शासनाची मुसलमानांना आरक्षण मिळावे, अशी इच्छा आहे; मात्र घटनात्मकदृष्ट्या ते आरक्षण वैध ठरणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसची ६५ वर्षे सत्ता असतांनाही त्यांनी मुसलमानांना आरक्षण का दिले नाही ? मग एका वर्षात युती शासनाने मुसलमानांना आरक्षण देण्याची मागणी करू नये. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, अशी व्यवस्था आहे, असे अल्पसंख्यांक विकास आणि महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी सांगितले. याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला.

झाकीर नाईक यांच्या भाषणाला मंगळुरू येथील हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध

     मंगळुरू - दक्षिण कन्नड सलाफी चळवळ या धर्मांध संघटनेकडून ३ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथील नेहरू मैदानावर हिंदुद्वेष्ट्या झाकीर नाईक यांचे भाषण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी झाकीर नाईक यांचे २ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथे आगमन होत आहे. त्याला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची १६ डिसेंबरला मंगळुरू येथे एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला हिंदू महासभेचे राज्य प्रवक्ते श्री. धर्मेंद्र, हिंदुत्ववादी नेते श्री. कुमार मालेमार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रभाकर पडियार आणि विजयकुमार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याच्या धमकीनंतर अमेरिकेत एक सहस्र शाळा बंद

महाशक्ती समजली जाणारी अमेरिकाही आतंकवादाच्या सावटाखाली
     लॉस एंजिल्स - जगात महाशक्ती समजल्या जाणार्‍या अमेरिकेलाही आतंकवादाचे चटके सहन करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा धमकीवजा संदेश मिळाल्यानंतर येथील १ सहस्रांहून अधिक शाळा १५ डिसेंबर या दिवशी बंद ठेवण्यात आल्या. या शाळांमध्ये एकूण ६ लाख ४० सहस्रांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांना नेमका कशा स्वरूपाचा धोका आहे, हे पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केलेले नाही.

केवळ हिंदूच नव्हे, तर अन्य धर्मियांकडून होणारे ध्वनीप्रदूषणही रोखा !

प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाला आदेश का द्यावे लागतात ?
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनावर ओढले कोरडे
     मुंबई - न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात दिलेले आदेश हे केवळ गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवासाठीच नाहीत, तर सर्व धर्मियांच्या वर्षभरातील उत्सवांच्या वेळी होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठीही आहेत. त्यामुळे हिंदूंच्याच नव्हे, तर सर्व धर्मियांच्याही उत्सवात ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनावर कोरडे ओढले.

स्वित्झर्लंडने कायद्यात पालट केल्याने काळ्या पैशाची माहिती मिळवणे सोपे

     नवी देहली - स्वित्झर्लंडचे शासन तेथील प्रशासकीय कर साहाय्य कायद्यात पालट करणार असून त्याचा लाभ काळ्या पैशांविषयीची माहिती मिळण्यासाठी होणार आहे; कारण अशी लपवून ठेवलेली माहिती या पालटानंतर सहजपणे उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. कायद्यात पालट करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर स्वित्झर्लंडच्या संसदेत चर्चा चालू असून त्यामुळे पालट करण्यास विलंब झाला आहे, असेही जेटली यांनी सांगितले.

मुसलमानाने पत्नीला ई-मेल वरून दिला तलाक !

हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान असल्याची टीका करणार्‍या स्त्रीमुक्तीवाल्या पुरो(अधो)गाम्यांना 
इतर धर्मातील महिलांची फरफट दिसत नाही कि मुद्दामहून दुर्लक्ष करतात ?
पत्नी सावळी असल्याच्या कारणावरून केवळ ४ मासांत लग्न मोडले
     नोएडा (उत्तरप्रदेश) - बायको सावळी आहे; म्हणून लग्नानंतर केवळ ४ मासांतच ई-मेल वरून तलाक (घटस्फोट) देण्यात आल्याचा आरोप येथील एका २६ वर्षीय मुसलमान महिलेने तिच्या पतीवर केला आहे. या प्रकरणी तिच्या पतीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मागील १० वर्षार्ंत अल्पवयिनांचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांत ५० टक्क्यांनी वाढ

शाळांतून धर्मशिक्षण देऊन नैतिकमूल्ये रुजवणे, हाच यावरील उपाय !
     नवी देहली - वर्ष २००५ मध्ये अल्पवयिनांचा सहभाग असलेल्या दखलपात्र गुन्ह्यांची संख्या २५ सहस्र ६०१ होती. ही संख्या २०१४ मध्ये ३८ सहस्र ५८६ एवढी झाली आहे. गेल्या १० वर्षांत अल्पवयीन मुलांचा सहभाग असलेल्या दखलपात्र गुन्ह्यांमध्ये ५०.६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई पराथीभाई चौधरी यांनी लोकसभेत दिली. लोकसभेत एका लेखी प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांतील गुन्ह्यांत सहभागी असलेल्या सर्व अल्पवयीन मुलांवर स्थानिक बाल कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा मुलांची हाताळणी बाल न्याय संरक्षण कायदा २००० अन्वये केली जात आहे. कायद्यानुसार अशा मुलांना बालसुधारगृहात ठेवले जात आहे. अशा मुलांसाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने केंद्रीय पुरस्कृत योजना राबवल्या असून यात एकात्मिक बालसंरक्षण योजनेचा समावेश आहे.

देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात लैंगिक छळाची सर्वाधिक प्रकरणे !

अशा विद्यापिठातून नीतीवान नागरिक कधीतरी निर्माण होतील का ?
     नवी देहली - वर्ष २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात लैंगिक छळाची सर्वाधिक २५ प्रकरणे देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात घडली आहेत. देशात उच्च शिक्षण देणार्‍या १०४ संस्थांमध्ये या वर्षीचा हा सर्वोच्च आकडा आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने (यु.जी.सी.) दिलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांनी लोकसभेत दिली. या संदर्भातील माहिती लेखी उत्तरात देतांना ईराणी यांनी म्हटले आहे की, यापूर्वी देहली महिला आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१३पासून जवाहरलाल नेहरू विद्यापिठात लैंगिक छळाची एकूण ५१ प्रकरणे घडली आहेत. अशा प्रकारणांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ व्यवस्थापनाने नियमाप्रमाणे एक समिती स्थापन केली असून या समितीच्या वतीने लैंगिक छळाच्या सर्व तक्रारींची चौकशी केली जात आहे. देशातील उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये लैंगिक छळाची एकूण २९५ प्रकरणे घडल्याची आकडेवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे.

फ्रान्सने आय.एस्.आय.एस्.च्या तळांवर डागले पहिले क्षेपणास्त्र

     आतंकवादाला वेळीच न रोखल्यास काय परिणाम होतात, हे आय.एस्.आय.एस्.च्या उदाहरणातून संपूर्ण जग पहात आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन अशा सामर्थ्यशाली देशांना या एका संघटनेचा बीमोड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. भारतीय राज्यकर्त्यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा !
     पॅरिस - फ्रान्सनेही पॅरिसवर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्यानुसार फ्रान्सने हा लढा तीव्र केला असून प्रथमच क्षेपणास्त्र डागले असून इराकमधील आय.एस्.आय.एस्.च्या तळाला लक्ष्य केले. फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून शैक्षणिक न्यासाद्वारे २ कोटींहून अधिक रकमेचा अपहार ?

काँग्रेसच्याच विरोधी पक्षनेत्यांवरील या आरोपांविषयी काँग्रेसला काय म्हणायचे आहे ?
" विखे-पाटील फाऊंडेशनच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
" विधीज्ञ परिषदेने फोडले आणखी एका अपहाराचे बिंग !
     पुणे - सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या राजकीय घराण्याचे वजन वापरून डॉ. विखे-पाटील फाऊंडेशन हा शैक्षणिक न्यास देणे लागत असलेले शासनाचे सुमारे २ कोटी रुपये बुडवले. या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पद आहे. राजकीय दबाव वापरून भ्रष्टाचार केलेल्या या न्यासाने शासनाची जी काही आर्थिक हानी केली आहे, ती वसूल करण्यात यावी, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

चिपळूण (रत्नागिरी) येथील सौ. सुशीला रमेश आगवेकर यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनच्या आगवेकर कुटुंबातील चौथ्या व्यक्तीने गाठली ६० टक्क्यांहून अधिक पातळी !
      चिपळूण - येथील सनातनचे साधक श्री. रमेश आगवेकर यांच्या घरी आयोजित केलेल्या सत्संगात ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी साधकांना एक आनंदवार्ता दिली. प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे आदी गुण असलेल्या सौ. सुशीला रमेश आगवेकर (वय ६९ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सांगताच सत्संगाला उपस्थित असणार्‍या सर्व साधकांची भावजागृती झाली. यानंतर कु. दीपाली मतकर यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा आणि प्रसाद देऊन सौ. आगवेकर यांचा सत्कार केला.

देवद (पनवेल) येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या दिंडीचे सनातनच्या आश्रमात शुभागमन !

     देवद (पनवेल) - येथे प्रतीवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त काढण्यात येणार्‍या दिंडीचे येथील सनातनच्या आश्रमात सकाळी ११ वाजता आगमन झाले. दिंडीसमवेत ह.भ.प. परशुराम महाराज, ह.भ.प. बाबा महाराज आणि अन्य उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीने ६३ प्रतिशत आध्यात्मिक पातळी असणारे सनातनचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी दिंडीतील विणेकरी यांच्या पायांवर पाणी घालून त्यांचे औक्षण केले, तसेच समवेत डोक्यावर तुळस घेऊन आलेल्या महिलांचेही सनातनच्या साधिकांनी हळद-कुंकू लावून औक्षण केले. यानंतर आश्रमाच्या वतीने सर्वांना प्रसाद आणि पाणी देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमाता यांचा अपमान करणारे 'एन्.सी.ई.आर्.टी.'चे अभ्यास मंडळ बरखास्त करावे !

'एन्.सी.ई.आर्.टी.'ची आक्षेपार्ह पुस्तके रहित करून नवी पुस्तके लागू करा ! 
हिंदु जनजागृती समितीची राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडे मागणी 
     नागपूर - केंद्रशासनाच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण' संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.) पाठ्यपुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. ते लक्षात आल्यावर हे पुस्तक रहित करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचा निर्णय संसदेने घेतला होता; मात्र गेली ८ वर्षे सातत्याने आंदोलन करूनही एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, अन्य राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांचा अवमान चालूच आहे. त्यामुळे एन्.सी.ई.आर्.टी.चे अभ्यासक्रम ठरवणारे मंडळ बरखास्त करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, तसेच एन्.सी.ई.आर्.टी.ची सर्व आक्षेपार्ह पुस्तके रहित करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी १५ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि महाराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते. 

शिवप्रतापदिन पाकिस्तानात जाऊन साजरा करायचा का ? - नितीन शिंदे यांचा संतप्त प्रश्‍न

सांगलीत शिवप्रतापदिन साजरा करण्यास, तसेच 
अफलझानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली 
     सांगली, १६ डिसेंबर (वार्ता.) - शासनाने सातारा जिल्हाबंदी घोषित केल्यामुळे सांगली शहरात शिवप्रतापदिन साजरा करण्यासाठी सांगली पोलिसांकडे अनुमती मागण्यात आली. ३१ (१) कलम, तसेच अन्य कारणे देत सांगली पोलिसांनी सांगली येथील अनुमती नाकारत असल्याचे लेखी कळवले आहे. याचसमवेत पोलिसांनी अफझलखानवधाचे चित्र लावण्यासही अनुमती नाकारली आहे. त्यामुळे शिवप्रतापदिन पाकिस्तानात जाऊन साजरा करायचा का, असा संतप्त प्रश्‍न 'श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती'चे निमंत्रक आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !
     येत्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.
 १. राष्ट्र्रध्वजाचा मान राखा आणि क्रांतीकारकांचा मूलमंत्र - वन्दे मातरम् । हे ए ५ आकारातील प्रबोधनपर ४ पानांचे हस्तपत्रक. (ज्यांना ४ पानांचे पत्रक छापणे शक्य नसेल, ते केवळ २६ जानेवारीचे २ पानांचे पत्रक छापू शकतात.)
२. ए-२ आकारातील भित्तीपत्रक (याची कलाकृती सोबत दिली आहे.)

फलक प्रसिद्धीकरता

एक दोन आतंकवादी पकडण्यापेक्षा त्यांची पाळेमुळे नष्ट करा !
     नाताळ आणि नववर्षानिमित्त देहलीमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या २ जिहाद्यांना देहली पोलीस दलाच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

कथित आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गोरक्षकांची जामिनावर सुटका !

     मिरज, १६ डिसेंबर (वार्ता.) - १० डिसेंबर या दिवशी रात्री हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षक यांनी कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारी गाडी अडवून १३ गोवंशांची सुटका केली होती. त्या वेळी गाडीतील लोकांच्या कथित मारहाणीच्या तक्रारीवरून २५ हून अधिक हिंदुत्ववाद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील सहा जणांना विविध कलमांन्वये अटक करण्यात आली होती. या सर्व हिंदुत्ववाद्यांची १६ डिसेंबर या दिवशी जामिनावर सुटका करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Dehalime Al kayda ke 2 Jihadi atankwadi giraftar.- kya ab Bharat atankwadionka desh ban gaya hai ?
जागो !
देहली में अल् कायदा के २ जिहादी आतंकवादी गिरफ्तार ! - क्या अब भारत आतंकवादिआका देश बन गया है ?

बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना श्री. दिलीप अलोणी
• ६ मागण्यांचे निवेदन सादर 
• मागण्यांविषयी विचार करण्याचे आश्‍वासन 
     नागपूर - ब्राह्मण समाजाच्या समस्या आणि मागण्या यांविषयी ब्राह्मण समाजाची बाजू मांडण्यासाठी बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या शिष्टमंडळाने १४ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील २१ पदाधिकार्‍यांचा समावेश होता. त्यात राष्ट्रीय महामंत्री श्री. सुरेश मुळे, प्रवक्ता श्री. दिलीप अलोणी (जोशी), प्रदेश युवा अध्यक्ष श्री. नरेंद्र कुलकर्णी, प्रदेश संघटक श्री. सुधाकर एडके (आबा), महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरी केदार, सौ. वनिता कानडे, विदर्भ विभागीय अध्यक्ष मालीराम शर्मा, प्रसिद्धीप्रमुख पत्रकार श्री. सखराम कुलकर्णी यांचा सहभाग होता. या वेळी ब्राह्मण समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ६ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. श्री. दिलीप अलोणी यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांना पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ देऊन ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ब्रह्मवृंदाने स्वस्तिमंगल मंत्रांचा उच्चारही केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महिला आमदारांच्या डान्स बार आंदोलनातील फलकांमुळे गोभक्तांमध्ये अप्रसन्नता

     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) राज्यात 'डान्स बार बंदी' झालीच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत गृहमंत्री रा.रा. पाटील यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी महिला आमदारांनी डान्स बार बंदीसाठी आंदोलन केले; मात्र आंदोलनातील फलकामुळे गोभक्तांमध्ये अप्रसन्नता आहे. डान्स बार बंद व्हायलाच पाहिजेत, यात दुमत नाही; मात्र या आंदोलनात गायीचा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला आहे. या वेळी जे फलक पकडण्यात आले होते, त्यामध्ये एका फलकावर 'गायीला वाचवा आणि बाईला नाचवा' असा उल्लेख करण्यात आला होता. (गोहत्याबंदीविषयी असे उपरोधिक फलक लावून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय साध्य करू पहात आहेत ? - संपादक) या वेळी आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, "शासनाने डान्स बार बंदीसाठी ठोस प्रयत्न करायला हवेत. न्यायालयात शासन त्याची बाजू मांडण्यात न्यून पडले आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपायला हवी. जर गोहत्या बंदी कायदा शासन आणू शकते, तर हा कायदा का करू शकत नाही. त्यासाठी हा कायदा आणणे आवश्यक आहे."  

संगणक परिचालकांच्या मोर्च्यावर पोलिसांचा लाठीमार !

     नागपूर, १६ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील २५ सहस्र संगणक परिचालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर विधानभवनावर १६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या आक्रमणात ५५ परिचारक गंभीर घायाळ झाले असून उपचारासाठी त्यांतील ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १५ डिसेंबर या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला होता; मात्र आंदोलकांच्या मोर्च्याच्या वेळी शासनाच्या वतीने कोणीही समोर आले नाही. त्यामुळे रात्रभर आंदोलनकर्ते टेकडी रस्त्यावर मुक्कामी होते. रात्रभर थांबूनही म्हणणे ऐकण्यासाठी कुणीही मंत्री न आल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी सकाळी गोंधळ घातला. लोखंडी अडथळे (बेरीकेट्स) तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलनकर्त्यांची पोलिसांसमवेत धक्काबुक्की झाली. या मोर्च्याला रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष वाढला. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पाणीही फवारले. विधानसभेत विरोधकांनी हा प्रश्‍न उपस्थित करून दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

श्रीकृष्णाची कृपा असलेले सनातनचे साधक आदर्शच ! - ह.भ.प. दशरथ भोपतराव, विहिंप

पेण येथे हिंदु धर्मजागृती सभा
     पेण (जिल्हा रायगड) - आज सर्व हिंदू झोपलेले आहेत. त्यामुळे आपल्या राष्ट्रात आपल्याच लोकांवर अन्याय होत आहे. याच्या जागृतीसाठी या सभेचे आयोजन केले आहे. हिंदूंच्या कार्यक्रमात सहभागी होणे, हे हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे. सनातन संस्था संमोहित करून लोकांना मारते, असे आरोप आज केले जातात. ज्यांच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे, त्याला कशाचीही आवश्यकता नाही. त्याचे आचार, विचार शुद्ध असतात. त्याप्रमाणे सनातनचे साधक आदर्शच आहेत, असे प्रतिपादन विहिंपचे ह.भ.प. दशरथ भोपतराव महाराज यांनी केले. येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

रासप नेते आणि उद्योगपती रत्नाकर गुट्टेंचे घर अन् कार्यालय यांवर आयकर विभागाचे छापे

     बीड - राष्ट्रीय समाज पक्षाचे (रा.स.प.) नेते आणि उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या परळी, गंगाखेड आणि नागपूर येथील घर, कार्यालय यांवर आयकर विभागाने छापे घातले. रत्नाकर गुट्टे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक गंगाखेड मतदारसंघातून रासपच्या तिकिटावर लढवली होती. 

महाराष्ट्र धर्मसंरक्षक चिमाजी अप्पा पेशवे

     पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर १७४० या दिवशी पुण्यात चिमाजी अप्पा पेशवे यांचे वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदवी स्वराज्याचा सच्चा पाईक आणि महाराष्ट्र धर्माचा महान संरक्षक गमावला. त्यांच्या निधनास १७ डिसेंबर या दिवशी २७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या महान कार्याचा हा अल्पसा आढावा... 

सामाजिक संस्थेच्या नावाखाली शासकीय भूखंड लाटून स्वतःच्या तुंबड्या भरणारे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील !

श्री. हेमंत शिंदे
       निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांनी त्यांच्या पदाचा वापर करायचा आणि स्वतःची संपत्ती वाढवायची, हे भ्रष्ट तत्त्व जुने, शिळे आणि आता जगन्मान्य झाले आहे. काही वेळा ती संपत्ती स्वत:च्या नावाने न वाढवता स्वत:च्या नियंत्रणाखालील सामाजिक संस्थेच्या नावाने वाढवावी, भूखंड खावेत आणि त्यातून भ्रष्टाचार वाढवावा, असा हा कारभार आहे. असा भ्रष्ट कारभार विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या डॉ. विखे-पाटील फाऊंडेशनने तत्कालीन काँग्रेस शासनाच्या साहाय्याने केल्याचे निदर्शनास आले. हा भ्रष्टाचार कसा करण्यात आला आणि त्यामुळे शासकीय तिजोरीची लूट कशी झाली याविषयीची माहिती येथे देत आहे. 
संकलक : श्री. हेमंत शिंदे, पुणे

...म्हणून शिवसेना हिंदूंना जवळची वाटते !

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !
१. आदिवासी विद्यार्थ्यांना बलपूर्वक धर्मांतर करण्यास भाग पाडणारे फादर आणि मुख्याध्यापक !
     डहाणूतील जंगलपट्टी-आदिवासी भागात असलेल्या, शासकीय अनुदान घेणार्‍या, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळांमधे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन तेथील फादर आणि मुख्याध्यापक बलपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडत असून, वेळ आल्यास आदिवासींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे. 

मराठीच्या उत्कर्षासाठी मराठी साहित्य संमेलनांची भूमिका महत्त्वाची !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी राजभाषा 
यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
      गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

झगमगत्या विकासाची (कडवट) फळे !

      सध्या विकासाचे वारे सर्वत्र वहात आहेत. अत्याधुनिक शहरे अधिक अत्याधुनिक बनवणे, बुलेट रेल्वेगाड्यांसाठी कर्ज घेणे, अशांसारख्या योजनांविषयी एकीकडे जोरदार चर्चा चालू आहेत, तर दुसरीकडे याच औद्योगिक विकासाच्या अतिरेकामुळे निसर्गावर होत असलेल्या अत्याचारामुळे अखिल मानवजातीवर निसर्गाचे मोठे संकट कोसळले आहे, अशी स्थिती आहे. मध्यंतरी मेळघाट १०० टक्के वायफाय करणार, असे वृत्त वाचनात आले. ते वाचून हसावे कि रडावे ते समजेनासे झाले.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

पुरस्कार परत करणे, हा एकमेव पर्याय आहे का ?

येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत् । 
(अर्थ - ज्या कोणत्या प्रकाराने शक्य असेल, त्या प्रकाराने माणसाने प्रसिद्ध व्यक्ती बनावे.)
    वरील सुविचार अथवा कुविचार जर कुठे पहायचा असेल, तर देशातील चालू घडामोडींकडे पहावे आणि वरील वचनाची प्रचीती घ्यावी. कथनाचा उद्देश हा की, अशा पद्धतीने प्रसिद्ध पुरुष होण्याची आवश्यकता इतर जनांना असल्यास काही चिंता करण्याचे कारण नाही. ती गोष्ट लक्षात घेण्याजोगी नाही; पण ज्यांचे व्यक्तीमत्त्व विचारांनी बनते, परिपूर्ण होते, त्यांचे अविचारी, बालिश वागणे पाहून आमच्यासारख्या साहित्यप्रेमींनी मार्गदर्शनासाठी कुणाकडे जायचे ?

मोर्चा उधळून लावण्यासाठी काय केले जाऊ शकते ?, याविषयी एका हितचिंतकाकडून मिळालेली माहिती

डॉ. मनोज सोलंकी
       एखादा मोर्चा उधळून लावण्यासाठी विरोधक काय करू शकतात ?, याविषयी एका हितचिंतकाने त्याच्याशी झालेल्या संपर्काच्या वेळी उपयुक्त माहिती देऊन सावध रहाण्याची सूचना काही दिवसांपूर्वी आम्हाला केली. मोर्च्यात विरोधकांचे लोक खिशात एकच दगड घेऊन येऊ शकतात. तसे केल्याने कोणाला कळत नाही आणि मोर्चा चालू असतांना एकाचवेळी त्यांनी आजूबाजूने जात असलेल्या वाहनांवर जर दगडफेक केली, तर जमावाची पांगापांग होऊन मोर्चा विस्कळीत होऊ शकतो आणि हे कोणी केले ते कोणालाही कळणार नाही; कारण त्यांच्याकडे असलेला एकच दगड फेकल्यानंतर पुरावा रहाणार नाही. यामुळे मोर्च्याचे आयोजन फसू शकते आणि मोर्चा काढणारे अडचणीत येऊ शकतात, या दृष्टीने सतर्क रहा, असे या हितचिंतकाने आम्हाला सांगितले. आपल्या मोर्च्यात अशी घटना होऊ नये, या संदर्भात सावधता बाळगायला हवी. 
- डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

अश्‍लीलतेकडे झुकत असल्याचे सांगत एका शाळेत विद्यार्थिनींना स्कर्ट परिधान करण्यास बंदी घालणे, ही पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या ब्रिटनने भारतियांना चपराक !

       ब्रिटनमधील डिस हायस्कूलच्या व्यवस्थापनाने शाळेतील विद्यार्थिनींना स्कर्ट परिधान करण्यास बंदी घातली आहे. मुलींना पँट घालूनच शाळेत येण्याचा आदेश दिला आहे. त्याशिवाय ७ ते ११ वर्षे वयाच्या मुलींना यापुढे मेकअप करून शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुलींचे स्कर्ट दिवसेंदिवस तोकडे होत चालले आहेत. ही बाब अव्यवहार्य आणि अश्‍लीलतेकडे झुकणारी असल्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.(१४.२.२०१४) 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांना सूचना

निरपराध साधकांची सुटका होण्यासाठी मयूरेशस्तोत्र म्हणावे !
      आता आपत्काळाला आरंभ झाला आहे. जसजसा आपत्काळ वाढत जाईल, तसतसा सनातन संस्थेला होणारा विरोधही वाढत जाईल. त्यामुळे सनातनच्या अनेक निर्दोष साधकांना कारागृहात जावे लागणार आहे. त्या वेळी साधकांनी येथे दिलेले मयूरेशस्तोत्र अधिकाधिक वेळा म्हणावे. साधकांना शक्य नसल्यास त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले, तरी चालेल. हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे - कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते. स्तोत्र भावपूर्ण म्हटल्यास फलनिष्पत्ती मिळते. सर्वांत भाव असणे कठीण असले, तरी त्यांनी म्हटल्यास कारागृहातून काही काळ लवकर सुटका होण्यास साहाय्य होते. - कु. वसुधा कुलकर्णी, पुणे

पोलिसांच्या अन्वेषण यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावल्यास पुढील दक्षता घ्या !

हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सनातन
 संस्थेच्या साधकांसाठी मार्गदर्शक सूचना !
       केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्या पद्धतीने दैनिक सनातन प्रभातच्या निष्पाप वितरक साधकांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, याची माहिती देणारी पत्रकार परिषद अलीकडेच सनातन संस्था आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी संयुक्तपणे घेतली. काही सनातनद्वेष्ट्या व्यक्ती आणि संघटना पोलिसांच्या अन्वेषण यंत्रणांना जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले साधक दोषीच आहेत, असे गृहीत धरून किंवा काही माहिती साधक मुद्दाम लपवत आहेत, अशा अपसमजातून त्यांना वेडेवाकडे प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. प्रश्‍नांचा रोख न समजल्यामुळे किंवा पोलिसी चौकशांचा अनुभव नसल्यामुळे साधकांकडून अनाहुतपणे दिली जाणारी उत्तरे कित्येकदा अपसमज निर्माण करणारी ठरतात. त्यामुळे एकाच साधकाला वारंवार चौकशीला बोलावणे किंवा त्याच्याशी संपर्क झालेल्या अन्य निष्पाप परिचितांंना, आप्तांना आणि साधकांना सत्य-असत्य पडताळण्यासाठी अकारण चौकशीला बोलावणे, असे प्रकार घडत आहेत. अनेकांना याचा त्रासही होतो आणि साधनेसाठी द्यावयाचा मौल्यवान वेळही वाया जातोे. साधकांचा नाहक वेळ जाऊ नये आणि पोलिसांनाही अचूक माहिती विनाविलंब मिळावी, यादृष्टीने खालील काही मार्गदर्शक सूत्रे हिंदु विधिज्ञ परिषदेने साधकांसाठी दिली आहेत.

समजूतदार, जिज्ञासू वृत्तीचा आणि लहान वयातच चुकांचे गांभीर्य असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उरण येथील कु. मोक्ष ठाकूर (वय ७ वर्षे) !

      
कु. मोक्ष ठाकूर
कु. मोक्ष वितुल ठाकूर याचा आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (१७ डिसेंबर २०१५) ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. मोक्ष याला सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद
१. जन्मापूर्वी
१ अ. बाळाच्या जन्मापूर्वी ग्रंथ वाचून त्यानुसार कृती करणे : गर्भधारणा झाल्यावर माझ्या पोटी एक साधक मूलच जन्माला येईल, असे वाटले. या कालावधीत मला उलटी किंवा अन्य त्रास झाले नाहीत. या काळात मी सनातन संस्थेने प्रकाशित केलेला आपले बाळ जन्मापूर्वी हा ग्रंथ वाचून त्यात दिल्याप्रमाणे कृती करायचे. मला पारंपरिक पदार्थ खाण्यास आवडायचे.

यज्ञ-यागादी कर्मकांडांचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले
      भगवान श्रीकृष्णाने गीतेत यज्ञानाम् जपयज्ञोऽस्मि ।, म्हणजे यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे काही जण यज्ञ-यागांकडे तुच्छतेने पहातात. बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, यज्ञात आहुती न देता ते तूप इत्यादी गोरगरिबांना द्या. अशा व्यक्तींत जिज्ञासा नसते, शिकण्याची वृत्ती नसते आणि मला सर्व समजते, असा अहंकार असतो. यज्ञ-यागांसंदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे की, यज्ञ-याग ही व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना अधिक प्रमाणात आहे. यज्ञ-यागामुळे पर्यावरणाची शुद्धी होते, पाऊस पडतो, तसेच अनिष्ट शक्तीही दूर जातात. असे होण्यासाठी व्यष्टी साधना करणार्‍याची आध्यात्मिक पातळी न्यूनतम ६० टक्के तरी असावी लागते. समाजात असे फारच थोडे असल्यामुळे यज्ञ-याग करणे महत्त्वाचे आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०१५)

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. साधनेचे प्रयत्न अल्प 
असतील, तर कडक प्रायश्‍चित्त घ्यायला हवे !
        साधनेचे प्रयत्न का होत नाहीत ?, याच्या मुळापर्यंत जायला हवे. १० वर्षांत आपण दोष नष्ट का करू शकत नाही ? व्यष्टी चांगली, तर समष्टी चांगली होते. प्रयत्न अल्प असतील, तर कडक प्रायश्‍चित्त घ्यायला हवे. त्यानेच जाणीव होईल.
२. साधनेचे महत्त्व बिंबवण्यासाठी स्वयंसूचना घ्या.
३. आश्रम म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा कारखाना आहे.
४. दोष न्यून झाले की, मनावरील ताणही न्यून होईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
व्यक्तीस्वातंत्र्यवाले दारू प्यायला, कपडे काढायला, देवतांचे विडंबन करायला अनुमती देतात; पण साधनेसाठी घर सोडणार्‍यांना अनुमती देत नाहीत !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच !

संपादकीय 
     देशाच्या सीमांशी संबंधित प्रश्‍न खर्‍या अर्थाने सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आणि त्याला अनुसरून कृतीची आवश्यकता असते. काँग्रेसच्या राजवटीत या दोन्ही गोष्टींची वानवा होती. काश्मीरविषयी भारताची भूमिका ठाम असली, तरी पाकच्या कह्यातील काश्मीर परत घेण्यास ती असमर्थ ठरली आहे, हे वास्तव आहे. भारताने पाकशी संबंध सुधारण्याचे यथायोग्य प्रयत्न करायचे, पाकने वरवर तशी सिद्धता दाखवायची आणि फुटीरतावाद्यांना मध्ये आणून चर्चा फिसकटवायची, हाच खेळ गेल्या अनेक दशकांपासून चालत आला आहे. खरे तर काश्मीर प्रश्‍न सुटावा, असे पाकला कधीही वाटले नाही आणि वाटणारही नाही. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्यापुरते पाक चर्चेची वारंवार मागणी करतो, हेही उघड आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn