Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

निर्भयाच्या बलात्कार्‍यास देहली शासनाचे आर्थिक साहाय्य !

कुठे बलात्कार्‍यांचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, 
तर कुठे बलात्कार्‍यांना साहाय्य करणारे समाजद्रोही केजरीवाल शासन ?
     नवी देहली - संपूर्ण देशाला सुन्न करून टाकणार्‍या देहलीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन मुसलमान आरोपीची येत्या २० डिसेंबरला सुटका होणार आहे. या आरोपीची सुटका झाल्यानंतर त्याला उदारनिर्वाह करता यावा आणि त्याचे पुनर्वसन व्हावे, या हेतूने देहलीतील केजरीवाल शासन १० सहस्र रुपये रोख आणि एक शिवणयंत्र देणार आहे.

अभिनेता सलमान आणि शाहरुख खान यांच्याकडून मंदिराचा अवमान !

     मुंबई - अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याकडून मंदिराचा अवमान झाल्याची घटना घडली आहे. (अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला पाहिजे ! - संपादक) शाहरुख खान हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बिग बॉस ९ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सलमान खान होते. या कार्यक्रमातील एका दृश्यात कालीमाता मंदिराचा सेट उभारण्यात आला होता.

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वातील राजयोगी स्नानांचा कार्यक्रम !

पहिले राजयोगी स्नान २२ एप्रिल २०१६, दुसरे ९ मे आणि तिसरे २१ मे २०१६ ला होणार
      उज्जैन (मध्यप्रदेश) - उज्जैन येथे एप्रिल २०१६ मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वात ३ राजयोगी (शाही) स्नाने असतील. पहिले राजयोगी स्नान २२ एप्रिल २०१६, दुसरे ९ मे आणि तिसरे २१ मे २०१६ या दिवशी असेल. राजयोगी स्नानांचे हे दिनांक अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या १४ डिसेंबर २०१५ या दिवशी झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. या तारखांविषयी यापूर्वी बैठक होऊ न शकल्याने राजयोगी स्नान, तसेच पेशवाई यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे दिनांक निश्‍चित करता येत नव्हते.

पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांची काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी देहलीत चर्चा !

पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच ! भारताचा विरोध डावलून पाकने
फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे, हा समस्त भारतियांचा अवमानच आहे ! 
अशा भारतद्वेष्ट्या बासित यांना पाकमध्ये हाकला !
भारताचे रोखठोक उत्तर
      नवी देहली - पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताचा विरोध डावलून काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी देहलीत चर्चा केली. गेल्या वर्षीही पाकने फुटीरतवाद्यांशी केलेल्या चर्चेमुळेच भारत आणि पाक यांच्यातील सचिव पातळीवर ठरलेली चर्चा फिसकटली होती. तरीही पाकने पुन्हा फुटीरतावाद्यांशी चर्चा करून उघडपणे भारताला डिवचले आहे. काश्मीर सूत्रावर दोन्ही देशांत होणार्‍या चर्चेत फुटीरतावाद्यांची मध्यस्थी नको, अशी भारताची प्रथमपासूनच स्पष्ट भूमिका आहे.

बरेलीत सहस्रावधी मुसलमानांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदु देवतांची नग्न चित्रे काढली, तसेच झाकीर नाईक या हिंदुद्वेष्ट्या व्यक्तीने हिंदूंच्या देवतांची टिंगल केली तेव्हा मुसलमानांनी अशी मागणी कधी केली होती का ?
हिंसक आंदोलन करून कायदा हातात घेणार्‍यांवर उत्तरप्रदेश शासन काय कारवाई करणार आहे ?
महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे प्रकरण
  • पोलिसांशी झटापट 
  • अनेक वाहनांवर दगडफेक 
  • पोलिसांकडून लाठीमार
कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानाचा अवमान केल्यास संबंधिताला फाशीचीच शिक्षा द्या ! 
- सुब्हानी यांची मागणी
      नॉवेल्टी चौक परिसरात झालेल्या भाषणात सुब्हानी म्हणाले, कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांचा अवमान करून मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. केवळ तिवारीच नव्हे, तर कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी असे केल्यास त्याला फाशीचीच शिक्षा दिली गेली पाहिजे. तरच पुढे असा अवमान करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही.

ओडिशातील काँग्रेसचे आमदार नाबा दास यांना विधानसभेत भ्रमणभाषवर अश्‍लील चित्रफीत पहातांना रंगेहाथ पकडले !

अशा वासनांध लोकप्रतिनिधींना जनतेने आता घरचाच रस्ता दाखवावा !
काँग्रेसकडून चौकशीचा आदेश
      भुवनेश्‍वर (ओडिशा) - ओडिशातील काँग्रेसचे आमदार नाबा दास यांना विधानसभेत भ्रमणभाषवर अश्‍लील चित्रफीत पहातांना रंगेहाथ पकडण्यात आले. विधानसभेत प्रश्‍नोत्तराचा तास चालू असतांना दास ही चित्रफीत पहाण्यात मग्न होते. या घटनेनंतर सत्ताधारी बीजू जनता दलाच्या आमदारांनी दास यांना निलंबित करण्याची मागणी केली. प्रदेश काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

अमेरिकेची आय.एस्.आय.एस्.वर ९ सहस्र हवाई आक्रमणे !

      वॉशिंग्टन - अमेरिकेने मागील वर्षी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.वर ९ सहस्र हवाई आक्रमणे केली होती. अमेरिका आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात यापूर्वी केलेल्या कारवाईपेक्षा अधिक कठोर कारवाई करत आहे; मात्र आता आतंकवादी नेत्यांची वेळ आली आहे. त्यांनी आपली प्रसिद्धी वाढवू नये, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आय.एस्.आय.एस्.वर केलेल्या आक्रमणांच्या आकडेवारीचा खुलासा करतांना सांगितले. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत ओबामा यांनी भविष्यात आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात अमेरिकेची काय रणनीती असेल, या विषयावर चर्चा केली. 

अकोला येथील प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पुणे येथील शारदाज्ञानपीठम्चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून डॉ. श्रीकांत शास्त्री, पं. वसंतराव गाडगीळ, प.पू. नरेंद्रनाथ महाराज,
प्रा. गजानन कुलकर्णी आणि श्री. अनिरुद्ध चौधरी यांना सनातन प्रभात
नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत
      रामनाथी - नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्यानंतर त्यांच्या स्थानी १६ वे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अकोला येथील प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पुणे येथील शारदाज्ञानपीठम्चे संस्थापक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ यांनी १५ डिसेंबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत प.पू. नरेंद्रनाथ महाराज यांचे चिरंजीव सनदी लेखापाल श्री. अनिरुद्ध चौधरी, वेदशास्त्रसंपन्न आणि कथाकार डॉ. श्रीकांत शास्त्री, तसेच प्रा. गजानन कुलकर्णी उपस्थित होते.

देहलीच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

      नवी देहली - देहलीच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर १५ डिसेंबर या दिवशी सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाने छापा टाकला. या छाप्यानंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी संबंधितांच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
      या संदर्भात केजरीवाल म्हणाले की, राजकारणात मोदी माझी वाटचाल रोखू शकत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे भ्याड कृत्य केले आहे.
     आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी या छाप्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले आहे की, सीबीआय हा केंद्र शासनाच्या हातातील पोपट आहे, हे न्यायालयानेही म्हटले आहे.

भारताचा जपानसह संयुक्त नौदल सराव

चीनने व्यक्त केली तीव्र नाराजी !
      बीजिंग - भारत आणि अमेरिका यांच्यात प्रतिवर्षी संयुक्तपणे नौदल सराव केला जातो. या सरावात जपानलाही सहभागी करण्याचा निर्णय भारताने जपानच्या संमतीने घेतला. जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे भारत दौर्‍यावर आले असतांना या संदर्भातील घोषणा करण्यात आली होती. चीनने मात्र या निर्णयावर तीव्र अप्रसन्नता दर्शवली आहे. जपानच्या सहभागामुळे सागरी प्रदेशात काही तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी जपानने घ्यायला हवी, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हाँग लेई यांनी सांगितले. (चीन पाकला साहाय्य करून जो तणाव वाढवत आहे त्याचे काय ? भारतात आतंकवादी पाठवणार्‍या शत्रूराष्ट्र पाकशी मैत्रीचे संबंध ठेवणार्‍या चीनला भारत-जपान संबंधांविषयी बोलण्याचा अधिकार तरी आहे का ? - संपादक) भारत-अमेरिका यांच्यात प्रतिवर्षी होणार्‍या नौदल सरावात जपानला सहभागी करवून घेतल्याने चीन बिथरला असल्याचे दिसून येत आहे. 

पॅरिसमध्ये शाळेत घुसून शिक्षकावर चाकूने आक्रमण

     पॅरिस - येथे एका शाळेत घुसून तेथील शिक्षकावर चाकूने आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्ता हा आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचा सदस्य असल्याचे बोलले जात आहे; कारण आक्रमण करतांना त्याने या संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेशात ट्वीटर आणि स्काईपवर बंदी !

     ढाका - ट्वीटर आणि स्काईप या प्रसिद्ध सामाजिक संकेतस्थळांवर बांगलादेश शासनाने बंदी घातली आहे. बांगलादेशात २ युद्ध गुन्हेगार नेत्यांना गेल्या मासात फाशी देण्यात आली. त्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करून शासनाने हा निर्णय घेतला. बांगलादेश शासनाने यापूर्वी फेसबूकवरही बंदी घातली होती; मात्र व्यापार्‍यांनी व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगून शासनाला बंदी मागे घेण्यास भाग पाडले होते.

निर्वासितांचा ओघ रोखण्याचा जर्मनीचा निर्णय

     बर्लिन (जर्मनी) - सिरिया आणि इराक येथून येणार्‍या निर्वासितांना मुक्त आश्रय देण्याचे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी यापूर्वी घोषित केले होते. त्यांच्या या निर्णयाला त्यांना स्वपक्षातूनच तीव्र विरोध झाला होता; पण आता मर्केल यांनी त्यांच्या धोरणात पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील स्थानिक नागरिकच भावी काळात निर्माण होणार्‍या संकटाने ग्रासले असल्याने बाहेरून जर्मनीत मोठ्या संख्येने येणार्‍या निर्वासितांना आळा घालावा लागणार आहे, असे मर्केल यांनी एका वाहिनीला मुलाखत देतांना सांगितले. निर्वासितांना मुक्त आश्रय देण्याची घोषणा केल्यानंतर मर्केल यांना तीव्र विरोध झाला होता. त्यांची लोकप्रियताही घसरली. आता निर्वासितांचा ओघ थांबवण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांना पक्षातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

बिहार शासन उच्च वर्णियांना मोफत भूमी वाटणार !

      पाटणा - बिहारच्या नितीशकुमार शासनाने गरीब आणि भूमीहीन उच्च वर्णियांना मोफत भूमी देण्याची घोषणा केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राज्याचे राजस्व आणि भूमी सुधारमंत्री मदन मोहन झा यांनी पत्रकारांना सांगितले की, भूदान किंवा दानात मिळालेल्या भूमीशिवाय शासनाकडून भूमीहिनांना लाखो एकर भूमीचे कागदपत्र देण्यात आले आहेत. तरीही मोठ्या संख्येने लोक भूमीपासून वंचित आहेत. अशा लोकांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल. एखाद्या भागात शासनाजवळ पुरेशी भूमी नसेल, तर खरेदी करून गरजू उच्च वर्णियांना दिली जाईल. भूदान यज्ञ समितीने दोन जिल्ह्यांची नावे मागवली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णिया, वैशाली आणि गया या जिल्ह्यांत मोठ्या संख्येने भूमी उपलब्ध आहे. तेथे भूमीहिनांना भूमी वाटण्यात येईल, असेही मंत्री झा म्हणाले.

सिराजुद्दीन आय.एस्.आय.एस्. कडून घेत होता ऑनलाईन बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण

देशात ठिकठिकाणी आय.एस्.आय.एस्.चे हस्तक सिद्ध होत असतांना 
आमच्या सुरक्षा यंत्रणांना हे यापूर्वीच लक्षात का आले नाही ?
      जयपूर - आय.एस्.आय.एस्.चा हस्तक महंमद सिराजुद्दीन आत्मघातकी आक्रमणाची सिद्धता करण्यासह स्वत: आय.एस्.आय.एस्. कडून ऑनलाईन आयडीबॉम्ब बनवणे शिकत होता आणि अन्य युवकांनाही शिकवत होता, असा खुलासा स्वत: सिराजुद्दीनने केल्यानंतर गुप्तचर विभागाने त्याची अनेक घंटे चौकशी केली. या चौकशीत त्यांना आय.एस्.आय.एस्. शी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले असून या संघटनेशी संबंधित अनेक युवकांचीही माहिती मिळाली आहे.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय करू नका ! - तेलंगणच्या राज्यपालांना हिंदु जनजागृती समितीचे निवेदन सादर

शासकीय पैशांतून नाताळ साजरा करणारे निधर्मी तेलंगण शासन हिंदूंच्या यात्रांसाठी 
सोडण्यात येणार्‍या बसच्या तिकिटांत मात्र भाडेवाढ करते, हे लक्षात घ्या !
नाताळ हा सण शासकीय स्तरावर साजरा करण्याच्या तेलंगण शासनाच्या निर्णयाचे प्रकरण
उपजिल्हाधिकारी निर्मला कुमार (डावीकडे)
यांना निवेदन देतांना श्री. चंद्रु मोगेर
 भाग्यनगर - अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय करू नये, अशी विनंती असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण राज्याचे समन्वयक श्री. चंद्रु मोगेर यांनी तेलंगणच्या राज्यपालांना दिले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी निर्मला कुमारी यांच्यामार्फत राज्यपालांकडे पाठवण्यात आले.
१. तेलंगण शासनाने ख्रिस्ती धर्मियांचा नाताळ हा सण शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खलिस्तानी नेत्यांना भारतात प्रवेश देण्याच्या मागणीला भारतीय गुप्तचर विभागाचा विरोध

     नवी देहली - स्वतंत्र खलिस्तान चळवळीला अनुकूल असलेले आणि त्या संदर्भातील कारवायांत गुंतलेल्या काळ्या सूचीतील सर्व शिखांना क्षमा करून त्यांना भारतात येण्याची अनुमती देण्याच्या प्रस्तावाला गुप्तचर विभागाने ठाम विरोध केला आहे. असा प्रयत्न झाल्यास पाकिस्तानी जिहादी गटांशी बब्बर खालसा इंटरनॅशनलसारख्या आतंकवादी संस्था हातमिळवणी करून पंजाबमध्ये उत्पात घडवतील, असे भारताची गुप्तचर संस्था आयबीने स्पष्ट केले आहे.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकप्रिय झिरो रुपी नोट

फिप्थ पिलर संस्थेची लोकप्रिय चळवळ
चेन्नई - तमिळनाडूत ९ वर्षांपूर्वी चालू झालेली एक आगळीवेगळी भ्रष्टाचारविरोधी चळवळ देशात लोकप्रिय होत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत फिप्थ पिलर ही संस्था लाच मागणार्‍याला ५०० रुपयांच्या नोटेसारखी दिसणारी झिरो रुपी नोट देते. त्यानंतर दक्षता चमू सदर लाचखोर व्यक्तीला अटक करते. तमिळनाडूत अशा प्रकारे २५ लाख नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ९ वर्षांत देशभरात भ्रष्टाचाराच्या विरोधात ही चळवळ एक वेगळे शस्त्र बनले आहे.
फिप्थ पिलरनावाची संस्था झिरो रुपी नोट निर्माण करते आणि लाच मागणार्‍याला देते. या मोहिमेच्या प्र्रकल्प समन्वयक लक्ष्मी गुणसेकर यांनी सांगितले की, प्रारंभी आमची भरपूर चेष्टा करण्यात येत होती. सर्व जण आम्हाला हसत होते; परंतु आम्ही ठामपणे या विरोधात उभे राहिलो. तमिळनाडूमध्ये १२ जिल्ह्यांमध्ये या फिप्थ पिलरची केंद्रे आहेत. मुख्य कार्यालय चैन्नईत असून बेंगळुरू, भाग्यनगर (हैदराबाद), देहली आणि राजस्थान येथे शाखा आहेत. आतापर्यंत शाळा-महाविद्यालयात ३ सहस्रांहून अधिक कार्यशाळा झाल्या आहेत.

अधिक दराच्या स्वेटर खरेदीने महानगरपालिकेची ३२ लक्ष रुपयांची हानी ! - सजग नागरिक मंच

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे स्वेटर खरेदी प्रकरण 
     स्वेटर खरेदीपूर्वी त्याच्या किमती अधिक लावल्या आहेत, हे अभ्यास करून का समजून घेतले नाही ? किमती अधिक असतांना ते खरेदी करण्याची संमती कशी दिली ? हा अपप्रकार होऊ देण्यास शिक्षण मंडळही उत्तरदायी आहे !
     पुणे - पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ५० सहस्र विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी आदेशास मंडळाने नुकतीच संमती दिली. विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणारे स्वेटर हे ३९० ते ४५० रुपयांचे असून प्रत्यक्षात ते ३०० ते ३५० रुपयांना मिळत आहेत.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

(म्हणे) 'शासनाने सनातन संस्थेच्या उपक्रमांवर आणि आंदोलनांवर नियंत्रण ठेवावे !'

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी फुंकले मुख्यमंत्र्यांचे कान ! 
पुरोगामी म्हणवणार्‍या मेधा पानसरे यांचा आता 
सनातन संस्थेच्या समाजहितोपयोगी उपक्रमांनाही विरोध 
     नागपूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना अटक केली. त्यानंतर सनातन संस्थेवर पुरोगाम्यांनी अत्यंत अश्‍लाघ्य भाषेत टीका केली. आंदोलने केली. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सनातनच्या वतीने राज्यात 'जनसंवाद सभा' घेण्यात येत आहेत; मात्र त्याविरोधात कॉ. पानसरे यांच्या स्नूषा श्रीमती मेधा पानसरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. त्यांनी सनातनचे उपक्रम आणि आंदोलने यांवर आक्षेप घेतला असून त्यांवर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे. (सनातन संस्थेला अद्याप न्यायालयाने दोषी ठरवलेले नसतांना सनातनचे उपक्रम आणि आंदोलने यांवर आक्षेप घेऊन श्रीमती मेधा पानसरे यांनी त्यांचे पुरोगामित्व किती पोकळ आहे, तेच दर्शवले आहे. सनातन संस्थेचे भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य नाकारणे, हाच का पुरोगाम्यांचा विवेकवाद ? लोकशाहीचे रक्षक म्हणवणारेच सनातनच्या लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याची मागणी करतात, हा लोकशाहीचाच अपमान ! - संपादक) दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा श्रीमती पानसरे म्हणाल्या की, 

(म्हणे) 'सनातन संस्थेच्या नादी लागलात, तर ठार करू !

पुरोगाम्यांचे नवीन फॅड (पद्धत) ! 'सनातनची बदनामी करा, स्वतःला 
सनातनने धमक्या दिल्याचे सांगा, स्वतःचे प्रस्थ वाढवा आणि पोलीस संरक्षण मिळवा !' 
 आता माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांना धमकी आल्याची तक्रार 
     कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि डॉ. भारत पाटणकर यांच्यासारख्यांनी सनातनकडून धमक्यांची पत्रे येत असल्याचे सांगून सनातनची अपकीर्ती केली. आंदोलन केले आणि पोलीस संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला. या पुरोगाम्यांपैकी अनेकांना कुणी ओळखतही नव्हते; मात्र त्यांनी अशा प्रकारे धमकी आल्याचे सांगून प्रसिद्धी मिळवली; मात्र त्यानंतर पोलिसांनी सदर पत्रांविषयी आजवर केलेल्या अन्वेषणात या पत्रांशी सनातन संस्थेचा तसूभरही संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे 'सनातन संस्थेकडून धमकी आल्याचे सांगा आणि संरक्षण अन् प्रसिद्धी मिळवा', अशी टूम (फॅशन) निघाली आहे, असेच म्हणावे लागेल ! 

पुणे विभागाकडून दप्तराच्या ओझ्याचा अहवाल शासनाला अद्याप सादर नाही !

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा
 भोंगळ आणि पाट्याटाकू कारभार !
यावरून शिक्षण विभागालाच विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या
ओझ्याविषयी किती काळजी आहे, हेच दिसून येते !
      पुणे - शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याविषयी न्यायालयाने विचारणा केल्यानंतर शासनाने शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना त्याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दप्तराच्या ओझ्याचा अहवाल प्रतिमासाच्या २८ दिनांकाला शिक्षण उपसंचालकांना सादर करणे आवश्यक आहे.

शकूर अतिक्रमण मोहिमेवरून संसदेत गदारोळ

केवळ राजकीय हेतून संसदेचा वेळ घालवणारे लोकप्रतिनिधी देशाचे हित कधी साधू शकेल का ?
रेल्वेमंत्र्यांचे केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान
      नवी देहली - रेल्वे प्रशासनाकडून देहलीच्या शकूर वस्तीतील अतिकमित झोपड्या हटवल्या. या कारवाईत एका लहान मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रशासनावर केला. याप्रकरणी विरोधी पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाची तीच तीच माहिती देऊ नका ! - पत्रकारांनी अंनिसच्या कार्याध्यक्षांना खडसवले

     नागपूर, १५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊनही अजून खर्‍या मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही, अशी माहिती देत असतांनाच पत्रकारांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना गप्प बसवले. 'या प्रकरणाची सर्व माहिती आम्हाला असल्यामुळे तुम्ही याविषयी तीच तीच माहिती देऊ नका', असे पत्रकारांनी ऐकवताच पाटील यांनी डॉ. दाभोलकर प्रकरणाची माहिती देणे थांबवून पत्रकार परिषद आटोपती घेतली. (अविनाश पाटील यांना खडेबोल ऐकवणार्‍या पत्रकारांचे अभिनंदन ! - संपादक) १४ डिसेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कायद्याचा अभ्यास करून भ्रष्ट आणि निलंबित अधिकार्‍यांना थेट बडतर्फ करणार ! - मुख्यमंत्री

     नागपूर, १५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनेक भ्रष्ट अधिकार्‍यांना निलंबित केले जाते. काही भ्रष्ट अधिकार्‍यांना वारंवार निलंबित केले जाते. अशा अधिकार्‍यांवर बडतर्फीची थेट कारवाई करता येईल का, याचा अभ्यास करून तसा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १५ डिसेंबरला विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या वेळी दिली. शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि श्री. राजेश क्षीरसागर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. 

बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्माचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे
     बेळगाव - येथील शहापूरमधील श्री बालाजी मंदिरातील माहेश्‍वरी भवनात सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांचे तणावमुक्तीसाठी अध्यात्माचे महत्त्व या विषयावर power point द्वारे slide दाखवून मार्गदर्शन झाले. हा कार्यक्रम मारवाडी समाजाच्या वतीने आयोजित भगवद्गीता पारायण या अंतर्गत घेण्यात आला

चिंचवड (पुणे) येथे एका मद्यपीकडून दोन पोलिसांना मारहाणीचा प्रयत्न

पोलिसांवरील वाढती आक्रमणे चिंताजनक असून जनतेमध्ये 
पोलिसांविषयी वाटणारा धाक संपत चालल्याचे हे लक्षण आहे !
       चिंचवड - येथील डांगे चौक भागातील उड्डाणपुलाखाली महेश तिमन्ना पवार यांना मद्यपान करण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांनी पहारा करणार्‍या दोन पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी एका हवालदाराच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याला रोखण्यास गेलेल्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. ही घटना १२ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून ३ वेळा विधानसभा स्थगित !

     नागपूर, १५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा चालू असतांना संबंधित खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे, १५ मिनिटे आणि १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. 

इतिहासद्रोही 'एन्.सी.ई.आर्.टी.' चे मंडळ बरखास्त करावे आणि त्यांची आक्षेपार्ह पुस्तके रहित करून नवी पुस्तके लागू करावी !

हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्र शासन आणि मोदी शासन यांकडे मागणी 
     
डावीकडून श्री. अरविंद पानसरे, श्री. सुनील घनवट आणि श्री. श्रीकांत पिसोळकर
     नागपूर -
केंद्रशासनाच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे'च्या (एन्.सी.ई.आर्.टी.)च्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, अन्य राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांचा घोर अवमान चालूच आहे. त्यामुळे एन्.सी.ई.आर्.टी.चे मंडळ बरखास्त करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. तसेच मंडळाची आक्षेपार्ह पुस्तके रहित करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी १५ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केली. नागपूर येथील टिळक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि महाराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते. 
  (याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या अंकात !) 

बीड येथे ४० सहस्र किलो गोमांस, २ वातानुकूलित कंटेनर, १ चारचाकी कह्यात, ४७ परप्रांतियांना अटक

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती 
     बीड, १५ डिसेंबर (वार्ता.) - येथील रामनगर भागातील शीतगृहावर पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्तिक कारवाईत ४० सहस्र किलो गोमांस, २ वातानुकूलित कंटेनर, १ चारचाकी कह्यात घेऊन ४७ परप्रांतियांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील माहिती दिली. या संदर्भात पोलिसांना या घटनेची माहिती २१ ऑगस्ट २०१५ या दिवशी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा प्रविष्ट केला. या प्रकरणात ४७ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे अवैधरित्या गोमांस नेणार्‍या दोन धर्मांधांना अटक

      अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) - तालुक्यातील वागदरी सीमेवर पहाटे ३.४५ वाजता गोमांस घेऊन जाणार्‍या २ गाड्या पकडण्यात आल्या. (पोलिसांनी गोवंशहत्या बंदी कायद्याची या प्रकरणात अंमलबजावणी करावी, हीच गोप्रेमींची अपेक्षा ! - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी चालक अकबर कैरोद्दीन डकेदार आणि समीर नजीर सय्यद यांना अवैधरित्या गोमांसाची वाहतूक केल्याप्रकरणी अटक केली.

शासनाच्या सर्वच विभागांना वर्षातून दोनदा संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्याची सक्ती

संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याची सक्ती का करावी लागते ?
      पुणे - शासनाच्या सर्वच विभागांना माहिती अधिकार कायद्यानुसार स्वत:हून प्रसिद्ध करावी लागणारी माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येत नाही. त्याविषयी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी तक्रार केली होती. (संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यासाठी जनहितार्थ लढा देणार्‍या सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यानुसार संकेतस्थळावर ३१ डिसेंबपर्यंत अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्याची, तसेच प्रत्येक वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी ही माहिती अद्ययावत करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात येणार ! - राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट देशातील गोवा, केरळ, देहली, हरियाणा, आंध्रप्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांप्रमाणे ६५ वर्षांवरून ६० वर्षे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, आमदार श्री. अजय चौधरी, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. राज्यात १ कोटी १६ लक्ष ज्येष्ठ नागरिक असून त्यांपैकी ५२ टक्के महिला आहेत. वयाच्या अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्‍या राज्य शासनाच्या सोयी सवलती त्यांना मिळत नाहीत, अशी लक्षवेधी विधानसभेत आली होती. या वेळी सामाजिक न्यायमंत्री श्री. राजकुमार बडोले म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पात आर्थिक प्रावधान करून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात येईल. ६० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सोयी-सवलती यांचा लाभ घेता येईल.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - सांगली येथे निवेदन

 सांगली येथे अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली, १५ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन पवार, कालीदास हरिदास, अनुप हरिदास, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख श्री. अमोल पाटील, वाहतूक सेनेचे श्री. धमेंद्र कोळी, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री किरण बुटाले, नितीन कुलकर्णी, प्रदीप तांदळे, विनायक शेवाळे, अभिजित माने, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय रेठरेकर, संतोष देसाई, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी उपस्थित होते.

महाधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव प्रविष्ट करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली !

शिवसेनेच्या आमदारांकडून श्रीहरि अणे यांच्या विरोधात घोषणा ! 
     नागपूर, १५ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - अखंड महाराष्ट्राच्या विभाजनाची भूमिका मांडणारे महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरि अणे यांना तत्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी करून शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी १५ डिसेंबरला विधानसभेत श्रीहरि अणे यांच्या विरोधात 'विशेष हक्कभंग प्रस्ताव' सादर केला; मात्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी तो फेटाळला. याविषयी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व माहिती घेऊन 'सभागृहात निवेदन करण्यात येईल', असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी श्रीहरि अणे यांच्या विरोधात सभागृहात घोषणा दिल्या. 

फलक प्रसिद्धीकरता

बलात्कार्‍यांना साहाय्य करणारे नको, तर बलात्कार्‍यांपासून वाचवणारे शासन हवे !
      देहलीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन महंमद अफरोज या गुन्हेगाराच्या सुटकेनंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी आणि पुनर्वसनासाठी त्याला १० सहस्र रुपये रोख आणि एक शिवणयंत्र देण्याचे देहलीच्या केजरीवाल शासनाने घोषित केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Nirbhaya balatkarka doshi Afroj ko arthik madat dene ki Kejariwal sarkar ki ghoshna.
Kya balatkariko madat denewale kabhi balatkar rokenge ?

जागो !
निर्भया बलात्कार का दोषी अफरोज को आर्थिक मदत देनेकी केजरीवाल सरकारकी घोषणा !
क्या बलात्कारीको मदत देनेवाले कभी बलात्कार रोकेंगे ?

बांगलादेशविषयी महत्त्वाच्या ठरलेल्या स्वर्णसिंग यांच्या तीन सूचना !

१६ डिसेंबरला बांगलादेश मुक्तीयुद्धाला ४४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने...
     या वर्षी १६ डिसेंबरला बांगलादेश मुक्तीयुद्धाला ४४ वर्षे पूर्ण होत आहेत. वर्ष १९७१ मध्ये अमेरिका आणि इंग्लंड यांसह सर्व पश्‍चिम जगत, तसेच मुसलमान राष्ट्रे भारताविरुद्ध होती. तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोपियन देशांचाच भारताला पाठिंबा होता. अशा विपरीत परिस्थितीत आपली कूटनैतिक धुरा तत्कालीन परराष्ट्रमंत्री सरदार स्वर्णसिंग यांनी अत्यंत कणखरपणे सांभाळत मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले होते. 

आसाममध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी मुसलमानाकडून निष्कारण विवाद आणि हिंदुत्ववाद्यांची एकजूट !

श्री. रमेश शिंदे
      आसाम राज्यातील एका ठिकाणी हिंदु जनजागृती समितीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी रात्री ८ च्या सुमारास दोन संशयास्पद व्यक्ती आल्या. त्यांचा पेहराव आधुनिक पद्धतीचा असल्याने ते मुसलमान असल्याचे लक्षात येत नव्हते. सर्व ग्रंथांची माहिती घेतल्यावर त्यांनी प्रदर्शनातील फलक पहाण्यास आरंभ केला. आसाम राज्यातील शिवाजी असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या मोगलांना पराजित करणार्‍या लाछित बडफुकनचा फलक पाहून त्यांनी एक-दुसर्‍याला कोपराने खुणावले आणि वाद घालण्यास आरंभ केला. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही लाछित बडफुकनच्या फलकात बाघ हजुरिका (इस्माईल सिद्दीकी) या मुसलमान सेनाधिकार्‍याचे नाव का दिले नाही ? तुम्ही मुसलमानांचा इतिहास दडपत आहात. त्यांची स्थानिक भाषा समजत नसल्याने आमची त्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती.

मराठी भाषेला अभिजात दर्जा केव्हा ?

      मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती नियुक्त केली होती. मराठी ही अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करणारा व्यापक अहवाल आणि त्यासंबंधीचे सर्व पुरावे त्या समितीने केंद्रशासनाला २ वर्षांपूर्वीच सादर केले होते. त्यानंतर प्रथमच मराठी भाषेसाठी विदेशी भाषातज्ञांचेही मत जाणून घेण्यात आले. त्या समितीनेही मराठी भाषा अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला. एवढेच नव्हे, तर घुमान (पंजाब) येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी असे आश्‍वासन देण्यात आले की, लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात येईल.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

हेडलीच्या साक्षीचे भूत काँग्रेसला पछाडणार ?

श्री. भाऊ तोरसेकर
      डेव्हीड कोलमन हेडली याने माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवले आणि पुरोगामी बाटलीत बंद असलेली अनेक भुते बाहेर येण्याचा धोका निर्माण झाला आहे; कारण हेडली बोलू लागला, तर नको तितक्या गोष्टी उघड्या होण्याची शक्यता आहे. शेवटी हेडलीची साक्ष भले २६/११ च्या मुंबई आक्रमणाशी संबधित व्हायची असली, तरी त्या आक्रमणाचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर संघटना आणि त्यांचेच हस्तक असलेल्या विविध संशयितांशी जोडण्याचा त्यातून प्रयत्न केला जाणार आहे. हेडलीची साक्ष कुणा कह्यात असलेल्या आरोपीच्या संदर्भात व्हायची आता शक्यता नाही; कारण कसाबवरचा गुन्हा सिद्ध होऊन तो कधीच फाशी गेला आहे. म्हणजेच आता जी सुनावणी व्हायची आहे, त्यात पाकिस्तानला गोवण्याला प्राधान्य आहे. मग त्यात पाक गुप्तचर संघटना आणि त्यांनीच पोसलेल्या मुजाहिदीन वा तोयबा अशा संघटनांचे भारतातील हस्तक यांचा विषय त्यातून चघळला जाणे स्वाभाविक आहे.

व्यायामशाळा ते जीम : युवा पिढीमधील संघ भावना आणि राष्ट्रीय भावना लुप्त करणारा प्रवास !

       सध्या भारतीय व्यायामशाळांची जागा
अशा आधुनिक जीमने घेतली आहे !
     गावागावांत बलोपासनेसाठी चालू असलेल्या व्यायामशाळा आणि तालीम यांची जागा जीमने घेतली आहे. प्रत्येक जण नियमित जीममध्ये जाण्यासाठी प्रत्येक मासाला काही ना काही पैसे मोजतो. आरसेे समोर ठेवून एकांतात चालू झालेल्या व्यायामपद्धतीमुळे अर्थकारण झाले; मात्र युवा पिढीमधील संघभावना आणि राष्ट्रीय भावना लोप पावली आहे. त्याविषयीचा ऊहापोह करणारा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

अभिजात अशी मराठी भाषाच गोव्याची राजभाषा होण्यास योग्य !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
      गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

हिंदूंवरील अत्याचारांविषयी कळूनही निष्क्रीय रहाणारा बांगलादेशातील हिंदुद्वेष्टा भारतीय दूतावास !

      बांगलादेशातील हिंदूंना प्रतिदिन मुसलमानांच्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. हिंदूंची घरे बळकावणे, हिंदु मंदिरांची तोडफोड करणे, हिंदु मुलींना उचलून घेऊन जाणे, हिंदु मुली आणि महिला यांच्यावर अनेक मुसलमानांनी सामूहिक बलात्कार करणे, नोकर्‍यांमध्ये हिंदूंना डावलले जाणे ही तेथे सामान्य आणि नित्याची गोष्ट झाली आहे. भेडसावणार्‍या सर्व समस्यांविषयी अनेक वेळा बांगलादेशातील भारतीय दूतावासाला बांगलादेश मायनॉरिटी वॉचकडून पत्रे पाठवण्यात आली. त्या पत्रांना आजवर कोणतेही उत्तर आले नाही. - श्री. रबींद्र घोष, संस्थापक, बांगलादेश मायनॉरिटी वॉच (१८.८.२०१३)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्यातील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा

१. सनातनच्या ग्रंथालयाला आरंभ !
     वीर सावरकर नेताजी मॅट्रिक्युलेशन स्कूल आणि कोळथूर, चेन्नई येथील गुरुवनिता मुरुगर मंदिर येथे ९.१०.२०१५ या दिवशी सनातनच्या ग्रंथालयाला आरंभ करण्यात आला. याविषयी अभिप्राय देतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवप्रिया म्हणाल्या, अध्यात्मप्रसाराचा हा नूतन मार्ग पुष्कळ चांगला आहे. शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ग्रंथांच्या वाचनाला आरंभ केला असून पाल्यांना नेण्यासाठी आलेले काही पालकही या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत.

भावाला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे अन् प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव असणारे चि. सिद्धेश केरकर आणि परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ असणार्‍या चि.सौ.कां. कविता हाडये !

चि.सौ.कां. कविता हाडये
चि. सिद्धेश केरकर
      मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (१६.१२.२०१५) या दिवशी रेडी, जि. सिंधुदुर्ग येथील चि. सिद्धेश केरकर आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करणार्‍या शिरोडा, जि. सिंधुदुर्ग येथील चि.सौ.कां. कविता हाडये यांचा शुभविवाह आहे. चि. सिद्धेश यांच्याविषयी त्यांचा मोठा भाऊ आणि भावी पत्नी यांना अन् चि.सौ.कां. कविता यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चि. सिद्धेश केरकर आणि चि.सौ.कां. कविता हाडये
यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. चि. सिद्धेश केरकर
१ अ. श्री. भूषण केरकर (चि. सिद्धेश 
यांचे ज्येष्ठ बंधू), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ १. मोठा भाऊ पूर्णवेळ साधना करत असतांना घरातील दायित्व उत्तम प्रकारे सांभाळून साधनाही करणे : श्री. सिद्धेश गेली १५ - १६ वर्षे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत असल्यामुळे घरी आई-वडिलांना सांभाळणे आणि घरातील इतर सर्व पहाणे, हे सर्व सिद्धेश यालाच करावे लागते. आई-वडिलांच्या आजारपणात तो त्यांची सर्व काळजी घेतो. हे सर्व करत असतांना तो नियमित नामजप आणि आध्यात्मिक उपाय करतो. त्याचप्रमाणे ग्रंथ आणि दैनिक सनातन प्रभात यांचे नियमित वाचन करून त्याप्रमाणे स्वतःही आचरण करतो.

स्वतःचे लांब केस धुणे आणि विंचरणे या समस्या देवाला आर्ततेने प्रार्थना करून सोडवणारी सौ. मीरा माने !

सौ. मीरा माने
१. केस लांब असल्याने ते नियमित धुणे आणि 
विंचरणे नेहमी कठीण वाटत असल्याने केस धुण्यापूर्वी 
प्रथम कृष्णाला आणि त्यानंतर देवींना आर्ततेने प्रार्थना करणे
       माझे केस लांब असल्याने मला केस धुणे आणि नंतर ते विंचरणे नेहमीच कठीण वाटते. त्यामुळे मला ते धुवावेत, असे वाटतच नाही. १६.१०.२०१५ या दिवशी मी सकाळी केस धुवायचे ठरवले आणि श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, तू या केसांवर आलेले तमोगुणाचे आवरण नष्ट कर. तेव्हा श्रीकृष्णाने सुचवले, केस ही स्त्रीला देवीकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे तू देवींना प्रार्थना कर. त्याप्रमाणे मी श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, श्री दुर्गादेवी, कालीमाता, तसेच गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी आदी नद्यांना आतर्र्तेेने प्रार्थना केली, हे देवींनो, तुमच्या कृपेमुळेच आम्हा स्त्रियांना आमच्या सौंदर्यात भर घालणारे केस मिळाले आहेत; पण मला या लांब केसांची काळजी घेता येत नाही. केसांत सारखा गुंता होतो. कधी कधी पुष्कळ चिडचिड होते आणि माझ्या मनात केस कापावे, असा विचार येतो. मला माझे केस कापायचे नाहीत. त्यामुळे तुम्हीच या केसांवर आलेले तमोगुणाचे आवरण नष्ट करा. केस धुतल्यावर होणारा केसांचा गुंता कसा सोडवायचा आणि केसांची काळजी कशी घ्यायची, हे मला शिकवा.

लाघवी स्वभावाची आणि सात्त्विकतेची ओढ असलेली नवीन पनवेल येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. जानकी विलास पुंडले (वय ४ वर्षे) !

चि. जानकी पुंडले
       चि. जानकी विलास पुंडले हिचा आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (१६ डिसेंबर) ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आईवडील आणि साधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. जानकी हिला सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद !
१. दिनविशेष
      चि. जानकीचा जन्म २९.११.२०११ या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला झाला. या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि सीता यांचा विवाह झाला होता.

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

अर्जुनाला विराट रूपाचे दर्शन देतांना श्रीकृष्ण. (१०.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे
आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म 
आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
     भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण.
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
जगभर झालेल्या प्रदूषणावर हास्यास्पद उपाय नकोत !
     जगभर प्रदूषणाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रदूषणाचा मानवी जीवनावर किती घोर परिणाम होत आहेत, याच्या बातम्या अधूनमधून नियतकालिकांत येतात आणि दूरचित्रवाहिन्यांवर सांगण्यात येतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, खरे महाभयानक प्रदूषण आहे रज-तम कणांचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वाईट शक्तींचे. या मुळाशी जाऊन मानव सात्त्विक कसा बनेल आणि वाईट शक्तींचे पृथ्वीच्या वातावरणातून उच्चाटन कसे होईल, याचा विचार करायला हवा.

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जल-वायू परिवर्तनाच्या समस्येवर ठोस उपाययोजना हवी !

संपादकीय 
     सध्या पॅरिस (फ्रान्स) येथे जल-वायू परिवर्तन या समस्येला उत्तरदायी कोण आणि त्यावर काय उपाययोजना काढावी यावर चर्चा (संमेलन) चालू आहे. या समस्येने जवळपास प्रत्येक देश चिंताग्रस्त झाला आहे. भारतासह प्रत्येक राष्ट्रास याचा फटका बसत आहे. जल-वायू परिवर्तनामुळे एकूणच जागतिक तापमानात वाढ होत आहे आणि त्यावर केल्या जाणार्‍या उपाययोजना अत्यंत तोकड्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून अशा प्रकारची संमेलने चालू असून अद्याप या समस्येवर सर्वमान्य आणि ठोस उपाययोजना निघू शकलेली नाही. विकसित देशांचे असे म्हणणे आहे की, विकसनशील देशांनी कार्बन उत्सर्जनावर मर्यादा ठेवावी, तर विकसनशील देशांचे म्हणणे आहे की, कार्बन उत्सर्जनावर मर्यादा ठेवणे, हे विकसित देशांचे काम आहे. विकसनशील देशांची विकास करण्याची प्रक्रिया चालू असून त्यांच्यावर अनावश्यक अटी लादू नये. दोघेही आपापल्या मतांवर ठाम असून त्यातून सुवर्णमध्ये निघत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे जल-वायू परिवर्तनाच्या समस्येवर वांझोट्या चर्चा नको, तर ठोस उपाययोजना अपेक्षित आहे, असे म्हणावे लागत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn