Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


सनातनच्या पू. रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस सनातनचे पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस

भारतात आतंकवाद आणि फुटीरतावाद पसरवणार्‍यांना चर्च पैसा पुरवते !

चर्चचे खरे स्वरूप ! सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली चर्चच्या कार्यक्रमांना जाणारे नेते 
या कुकृत्यांच्या विरोधात काही बोलतील का ? शासन या कारवाया त्वरित रोखेल का ?
माकपचे माजी खासदार खगन दास यांचा गंभीर आरोप
      आगरतळा - भारतात आतंकवाद आणि फुटीरतावाद पसरवणार्‍यांना चर्चकडून पैसा पुरवला जात असल्याचा गंभीर आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार खगन दास यांनी येथे केला. त्रिपुरात आदिवासींसाठी वेगळी भूमी मागणार्‍या आय.पी.एफ्.टी. या नव्यानेच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले.

नांदेड येथे एका समाजकंटकाने गोमातेचे डोळे फोडले !

     हिंदूंनो, गोमातेवर आक्रमण करणार्‍यांची हिंदुद्वेष्टी आणि खुनशी मानसिकता जाणा ! भारतभरातील प्राणीप्रेमी अशा घटना घडल्यावर कुठे जातात ? गोमातेच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !
नांदेड - नांदेड शहरातील गोकुळनगर भागामध्ये नोव्हेंबर मासात २५ गायींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर काही समाजकंटकांनी ३ गायींचे डोळे फोडले होते. अशीच एक घटना येथील भाग्यनगरमध्ये घडली आहे. एका अज्ञात समाजकंटकाने धारदार शस्त्राने एका गायीचे डोळे फोडले आहेत. शिवसैनिकांनी त्या गायीला उपचार मिळवून देऊन तिचे प्राण वाचवले आहेत.

भारत हा प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा देश आहे, असे पंतप्रधान मोदी का नाही सांगत ? - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

पंतप्रधान या प्रश्‍नाचे उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे !
     भोपाळ (मध्यप्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्‍यावर असतांना इतरांना श्रीमद्भगवद्गीता भेट देतात; पण ते भारत हा गांधी आणि बुद्ध यांचा देश आहे, एवढेच का सांगतात ? भारत हा प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा देश आहे, असे ते का नाही सांगत, असा प्रश्‍न पश्‍चिमाम्नाय द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केला. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुढे म्हणाले, श्रीकृष्णाने मनुष्याला जीवन जगण्याची कला शिकवली. श्रीकृष्णाने गीता सांगितली.

(म्हणे) संघाच्या कार्यकर्त्यांनी मला मंदिरात जाण्यापासून रोखले !

मंदिर प्रवेश नाकारल्याचा कांगावा करून हिंदूंची सहानुभूती
मिळवण्याचा काँग्रेसी नेत्यांचा व्यर्थ प्रयत्न !
राहुल गांधी बरळले !
      नवी देहली - मी आसामच्या दौर्‍यावर असतांना मला बारपेटा जिल्ह्यातील एका मंदिराला भेट द्यायची होती; मात्र मी मंदिराजवळ पोहोचताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर अनेक महिलांना उभे करून मला मंदिरात जाण्यापासून रोखले होेते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसने संसदेच्या बाहेर शासनाच्या विरोधात निदर्शने केली. त्या वेळी ते बोलत होते.
१. एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखणारे संघवाले कोण लागून गेले ? संघाच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य म्हणजे भाजपचे राजकारण असून ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही,

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी ईरोड (तमिळनाडू) येथे एकादश रुद्रयागाचे आयोजन !

एकादश रुद्रयागाच्या वेळी आहुती देतांना ब्रह्मवृंद
     ईरोड (तमिळनाडू) - सप्तर्षी जीवनाडीमध्ये महर्षी यांनी पूजनीय डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्यानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातनचे समीर गायकवाड यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट !

पोलिसांकडून ३९२ पृष्ठांचे ७७ साक्षीदारांची नोंद असलेले आरोपपत्र शेवटच्या दिवशी प्रविष्ट
वर्ष २००९ मध्ये झालेल्या मडगाव स्फोट प्रकरणातही अडीचशेच्या आसपास
साक्षीदारांची नोंद होती. प्रत्यक्षात साक्ष द्यायला सर्व जण आलेच नाहीत.
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटकेत असलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर १४ डिसेंबर या दिवशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांच्या न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र प्रविष्ट केले. त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३०२ (खून करणे), ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे), १२० ब (खुनाचा कट रचणे) यांसह ३४ आणि अन्य कलमे दाखल करण्यात आली आहेत.

ऋषिमुनींची मंत्रध्वनी चिकित्सा हीच आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी !

हिंदु संस्कृतीला मागासलेली संबोधून नावे ठेवणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !
भारताच्या महान हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !
  • जर्मन संशोधकांचे मत 
  • मंत्रध्वनी चिकित्सेचा विदेशातील रुग्णांवर यशस्वी प्रयोग
      वॉशिंग्टन - प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी वापर करत असलेली मंत्रध्वनी (मंत्रोच्चार) चिकित्सा हीच आजच्या काळातील आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी आहे, असे अमेरिका आणि जर्मन येथील संशोधकांनी मान्य केले आहे. प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी मंत्राद्वारे उपचार करत असत. याच आधारावर अमेरिकेच्या लॉस एंजिल्स आणि जर्मनीच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी अल्ट्रा साऊंड थेरपी विकसित केली आहे. याचाच अर्थ आता भारताच्या प्राचीन उपचार पद्धतीला नवे नाव देऊन मंत्रध्वनी चिकित्सा पद्धतीचा जगात नव्याने वापर होऊ लागला आहे. 

धर्मांधाला अटक केल्यावरून वरिष्ठांकडून पोलीस निरीक्षकाला शिक्षा

मंगळुरू येथे वरिष्ठांच्या विरोधात संतप्त पोलिसांचे आंदोलन
      मंगळुरू (कर्नाटक) - एका दंगलीतील धर्मांध आरोपीला अटक केल्याची शिक्षा म्हणून वरिष्ठांनी येथील एका पोलीस निरीक्षकाला रजेवर पाठवले. या विरोधात पोलीस ठाण्यातील संतप्त झालेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी काम करण्यास ठामपणे नकार दिला. पोलिसांच्या आंदोलनाला येथील सहस्रो ग्रामस्थांनीही साथ दिली. परिणामी वरिष्ठांना नमते घेत पोलीस निरीक्षकांना पुन्हा कामावर बोलवावे लागले. (धर्मांधाचे लागूंलचालन करणार्‍या वरिष्ठांच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवणार्‍या मंगळुरू पोलीस ठाण्यातील पोलिसांचे अभिनंदन ! - संपादक) त्यानंतर पोलीस शांत झाले. दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. 

बरेलीच्या मुसलमानबहुल भागातील प्रत्येक घराची चौकशी

देशात सगळीकडे पाकिस्तानी हेर पसरल्यावर आता त्यांचा शोध घेणे, 
म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे !
पाक हेरगिरी प्रकरण
      बरेली (उत्तरप्रदेश) - बरेलीमध्ये रहात असलेला पाकिस्तानी हेर महंमद एझाझला मेेरठमध्ये अटक करण्यात आल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. त्याप्रमाणे मुसलमानबहुल जुन्या शहरातील प्रत्येक घर आणि त्यात रहाणार्‍या लोकांची चौकशी करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत सर्वांची पार्श्‍वभूमी विस्तृतपणे तपासली जाणार आहे. यासाठी निवृत्त पोलीस अधिकार्‍यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. त्यांना नोडल अधिकार्‍यांप्रमाणे काम करणे आणि जुन्या शहराच्या भागातील प्रत्येक घर आणि तेथे रहाणार्‍यांच्या संदर्भात विस्तृत धारिका सिद्ध करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार केंद्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (देशात गावागावात छोटी पाकिस्ताने निर्माण झाली आहेत. त्यांच्या वस्त्यांमध्ये पाय ठेवण्याचे पोलीसही धाडस करत नाहीत. अशा ठिकाणी पाकिस्तानी हेर लपले असल्यास त्यांचा शोध कसा घेणार ? - संपादक) 

गाम्बिया देशात मुसलमान बहुसंख्येने असल्याने इस्लामिक राष्ट्र घोषित !

८० टक्के हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? 
      बांजुल (गाम्बिया) - पश्‍चिम आफ्रिकेत असलेल्या १८ लक्ष लोकसंख्येच्या गाम्बिया देशाचे अध्यक्ष याह्या जम्मेह यांनी देशात ९० टक्के लोक मुसलमान आहेत; म्हणून देशाला इस्लामिक राष्ट्र्र घोषित केले आहे. या देशाला इंग्लंडपासून वर्ष १९६५ मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती झाली. या देशात ८ टक्के लोक ख्रिस्ती आहेत

(म्हणे) गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करणार्‍या सनातनवर काय कारवाई करणार ?

विधानपरिषदेत शेकापचे आमदार जयंत पाटील यांची मुक्ताफळे
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणण्याचा शासनाचा
विचार ! - पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे-पाटील
      नागपूर - नद्यांचे प्रदूषण होऊ नये; म्हणून सुमारे ५० प्रतिशत प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केले जात नाही; मात्र नदीकाठी उभे राहून नदीमध्ये गणेशमूर्तींचेे विसर्जन करण्याचे आवाहन करणार्‍या सनातन संस्थेवर काय कारवाई करणार, असा प्रश्‍न शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. (धर्मप्रसार करणारे सनातनचे साधक गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, असे धर्मशास्त्र सांगतात.

आम्ही मुंबईकरांना न्याय मिळवून देऊ ! - अमेरिका

२६/११चे मुंबईवरील आक्रमण
     वॉशिंग्टन - आम्ही भारताच्या पाठीशी आहोत. २६/११च्या मुंबई आक्रमणातील सूत्रधारांना जगासमोर आणू आणि मुंबईकरांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन अमेरिकेने दिले आहे. मुंबई आक्रमणातील आरोपी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी डेव्हिड हेडली याला मुंबई मोक्का न्यायालयाने माफीचा साक्षीदार बनवले. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबे यांनी मुंबई आक्रमणातील सूत्रधाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अमेरिका भारताला सर्वतोपरी साहाय्य करेल, असे आश्‍वासन दिले. पत्रकारांना ते म्हणाले, दोन्ही देश आतंकवादाशी लढत आहेत. त्यामुळे आतंकवादाशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. हेडली प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याविषयी मत प्रदर्शित करणे योग्य होणार नाही.

अटक केलेल्या आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी ५ देशांना विनंती पत्रे !

     नवी देहली - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या सैन्यात भरती होऊन इराक आणि सिरीया या देशांतील युद्धात भाग घेतलेला धर्मांध आतंकवादी आरीब मजीद याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) अफगाणिस्थान, इराक, तुर्कस्थान, सौदी अरेबिया आणि लक्झेम्बर्ग या ५ देशांना न्यायिक विनंती पत्रे (लेटर रोगेटरी) पाठवली आहेत.

रशियाकडून तुर्कस्थानच्या बोटीवर गोळीबार

      मॉस्को - रशियाने एशियन समुद्रात तुर्कस्थानच्या एका बोटीवर गोळीबार केला. त्यामुळे या दोन देशांमधील तणाव वाढला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एशियन समुद्रात मच्छीमारांची एक बोट युद्धनौका स्मेतलाइव्हीपासून ५०० मीटर अंतरावर पोहोचली होती. त्यामुळे तिच्या दिशेने गोळीबार करावा लागला, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकरणी रशियाने तुर्कस्थानच्या दूतावासाला समन्स पाठवले आहे.

कर्णावती (अहमदाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घाला !
  • नाताळनिमित्त आयोजित तेलंगण शासनाचे कार्यक्रम रहित करा !
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते
      कर्णावती (अहमदाबाद) - संजय लीला भन्साळी निर्मित आगामी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतिकरण होत असल्याचे या चित्रपटाच्या लघुपटावरून दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, तसेच धर्मनिरपेक्ष तेलंगण शासनाद्वारे नाताळनिमित्त १९५ चर्चमध्ये कार्यक्रम करणे आणि २ लाख ख्रिस्त्यांना कपड्यांचे वाटप करणे, हे निर्णय जनतेच्या निधीचा अपवापर करणारे आहेत. त्यामुळे तेलंगण शासनाने हे कार्यक्रम रहित करावेत, या मागणीसाठी १२ डिसेंबर या दिवशी कर्णावती येथे हिंदुत्ववाद्यांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भारतीय हिंदू सेनेचे गुजरात प्रदेश अध्यक्ष श्री. सुरेश बारोट यांच्यासह त्यांचे सहकारी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रेल्वे कॅन्टीनला १० सहस्र रुपयांचा दंड !

प्रवाशाच्या एका ट्विटवर रेल्वे मंत्रालयाने घेतली दखल !
पाण्याची बाटली एम्.आर्.पी. पेक्षा अधिक रकमेने विकल्याचे प्रकरण
     चंढीगड - रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे एम्.आर्.पी.पेक्षा अधिक पैसे घेतल्याने रेल्वे मंत्रालयाने संबंधित कॅन्टीनला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. श्री. अमन नारंग या प्रवाशाने याविषयी तक्रार केली होती. (सर्व नागरिकांनीच अशी जागरूकता दाखवल्यास भ्रष्टाचारास निश्‍चितच आळा बसेल ! - संपादक)

निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन मुसलमानाचे बालसुधारगृहात जिहादीकरण झाले !

उच्च न्यायालयाची शासनास नोटीस
      नवी देहली - १६ डिसेंबर २०१२ या दिवशी झालेल्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार धर्मांधाची बालसुधारगृहाच्या कारावासातील ३ वर्षांची शिक्षा संपल्यावर, येत्या १५ डिसेंबर या दिवशी मुक्तता करण्यात येणार आहे; मात्र या आरोपीचे तो बालसुधारगृहातील कारावासात असतांना जिहादीकरण झाले असल्याचा अहवाल गुप्तहेर खात्याने दिला आहे.

कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांना सनातन प्रभात 
नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. विशाल देशपांडे
     रामनाथी - कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांनी १० डिसेंबर या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. विशाल देशपांडे यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. आश्रम पाहिल्यावर ह.भ.प. कुळकर्णी म्हणाले, आज सनातनच्या आश्रमाला भेट देऊन आनंद झाला.

संभाजीनगर येथे मुलींच्या विक्रीचे जाळे उघडकीस

     संभाजीनगर - येथील मिसारवाडीतील विवाहितेचे अमानुष छळ प्रकरण काही दिवसांपूर्वी चर्चेत आले. या प्रकरणी पोलीस तपासात मुलींची विक्री करणारे मोठे जाळे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चार दलालांना अटक केल्यानंतर ११ डिसेंबर या दिवशी आणखी दोन दलाल महिलांना कह्यात घेतले. संबंधित टोळीने गरीब कुटुंबांची फसवणूक करून अनेक मुलींना विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
     ही टोळी गरीब कुटुंबांतील मुलींचा शोध घेऊन त्यांचे लग्न लावून देते. लग्न लावण्यासाठी वरपक्षाकडून पैसे वसूल केले जातात.

तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली सेवेतून बडतर्फ !

पाकिस्तानी जहाजाच्या घुसखोरीच्या प्रकरणी केलेले वादग्रस्त विधान भोवले !
     नवी देहली - पाकिस्तानी जहाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना तटरक्षक दल मंडळाने बडतर्फ करण्याचा निर्णय १४ डिसेंबर या दिवशी दिला.
१. लोशाली यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी एका कार्यक्रमात ३१ डिसेंबर २०१४ च्या मध्यरात्री भारतीय सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात असलेली संशयित पाकिस्तानी नौका आपणच स्फोट करून उडवून देण्यास सांगितले होते.

लातूरचे महापौर अख्तर शेख यांचे जातवैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले !

पदासाठी लबाडी करणारे लोकप्रतिनिधी कधीतरी जनहित साधतील का ? 
जनतेशी विश्‍वासघात करणार्‍या अशा लोकप्रतिनिधींवर शासन काय कारवाई करणार आहे ?
     लातूर - शहराचे विद्यमान महापौर अख्तर शेख (मिस्त्री) यांनी दाखल केलेले मिस्त्री इतर मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने बोगस ठरवले आहे. अधिवक्ता गोपाळ बुरबुरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. अधिवक्ता बुरबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
१. महापौर अख्तर शेख (मिस्त्री) यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवतांना वेगवेगळ्या जातींची २ जात वैधता प्रमाणपत्रे दाखल करून इतर मागासवर्गीय जातीसाठी आरक्षित असलेले महापौरपद मिळवले आहे.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! 
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

अंतूर किल्ल्यातील जुन्या तोफेच्या चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट

     संभाजीनगर - येथील कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ल्यातील मध्ययुगीन काळातील जुनी तोफ चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. त्या पंचधातूच्या तोफेची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडेही नव्हती. या प्रकरणी पुरातत्व विभागाचे श्री. महेंद्र साखरे यांनी पिशोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे. एका अज्ञाताच्या विरोधात चोरीचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
     मध्ययुगीन काळातील जुनी तोफ चोरीला गेल्याचे उघड झाल्यावर पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी सांगितले की, अंतूर किल्ला असलेल्या दिशेचा विचार करता येथे तोफ असण्याची शक्यता नाही. तिची राज्य पुरातत्व खात्याकडे नोंद नसल्यामुळे त्या तोफेचा शोध लावणे कठीण काम आहे.

दाऊदला भारतात आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार ! - मुख्यमंत्री

     बीड - दिवंगत गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री असतांना त्यांनी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला फरफटत भारतात आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा पालटत आहे. मुंडे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मोदी यांच्या साहाय्याने पूर्ण करून दाऊदला भारतात आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (मुख्यमंत्र्यांनी हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी कृतीशील आणि तत्पर पावले उचलावीत, ही जनतेची अपेक्षा ! - संपादक)

मुंबईत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २० जणांना अटक

रेव्ह पार्टीच्या माध्यमातून होणारे नैतिकतेचे अधःपतन
रोखण्यासाठी पोलिसांनी अशाच प्रकारे कृतीशील व्हावे !
     मुंबई - मुंबईच्या अंधेरी येथील अंबोली परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत २० जणांना अटक केली आहे. या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ७ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.

मुंबईत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २० जणांना अटक

रेव्ह पार्टीच्या माध्यमातून होणारे नैतिकतेचे अधःपतन
रोखण्यासाठी पोलिसांनी अशाच प्रकारे कृतीशील व्हावे !
     मुंबई - मुंबईच्या अंधेरी येथील अंबोली परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत २० जणांना अटक केली आहे. या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ७ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.

'बाजीराव-मस्तानी' चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववादी एकवटले !

भांडुप, मीरा रोड आणि कोपरखैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
     मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच 'पिंगा' या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, तसेच केंद्रशासनाचे सांस्कृतिक खाते यांच्याकडे तक्रार केली असून इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी त्याचप्रमाणे तेलंगणा शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा कार्यक्रम रहित करावा, या मागणीसाठी १३ डिसेंबर या दिवशी भांडुप, मीरा रोड आणि कोपरखैैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली. 

बारामती येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्याविषयी तहसीलदारांना निवेदन

     बारामती (जि. पुणे) - ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे आणि सार्वजनिक स्थळे येथे नववर्षाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्याविषयीचे निवेदन येथील नायब तहसीलदार श्री. मधुकर ठोंबरे यांना देण्यात आले. या वेळी अपप्रकार करणार्‍यांवर कारवाई करू, असे आश्‍वासन नायब तहसीलदारांनी दिले.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये वृद्धेवर बलात्काराचा प्रयत्न

असुरक्षित मुंबई !
     मुंबई - येथील भाईंदर लोकलमध्ये ७० वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना १२ डिसेंबरच्या रात्री उघडकीस आली. याप्रकरणी २२ वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
     पीडित वृद्ध महिला रात्री १०.३० वाजता विरार-चर्चगेट लोकलमधून सामानाच्या डब्यातून एकटीच प्रवास करत होती. त्याच वेळी नराधमाने तिचा विनयभंग केला आणि भाईंदर स्थानक जवळ येत असल्याचे पाहून त्याने बलात्काराचाही प्रयत्न केला; मात्र स्थानक आल्यावर पीडितेने आरडाओरडा केला.

आमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ आहे का ? - आंदोलनकर्त्यांचा आक्रोश

     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) सामान्य नागरिकांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी यशवंत मैदानावर व्यवस्था केली असली, तरी हे मैदान विधानभवनापासून २ किलोमीटर दूर असल्याने सामान्य आंदोलनकर्त्यांचा आक्रोश शासनाच्या कानावर पडत आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शेतकरी आणि दुष्काळ या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत !

विधीमंडळाचे कामकाज सुरळीत चालू ! 
     नागपूर, १४ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा आताच करावी, असा हट्टाहास सोडून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नरमाईची भूमिका घेत सभागृहाचे कामकाज शांततेत चालू केले. दिवंगत शरद जोशी यांच्या निधनाविषयी आणि प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर पुरवण्या मागण्या घेऊन सभागृहाचे कामकाज चालू करण्यात आले. आज लक्षवेधी रहित करण्यात आली. जवळजवळ एका आठवड्यानंतर विधानसभेचे कामकाज शांततेत चालू झाल्याने सत्ताधार्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

४२ मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करणार्‍या रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा !

१९ वर्षांनी लागलेला क्रूर हत्याकांडाचा निकाल म्हणजे न्याय नव्हे अन्यायच !
शिक्षा जन्मठेपेत पालटण्यासाठीची याचिका प्रलंबित
     कोल्हापूर - येथील ४२ मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करणार्‍या रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ डिसेंबर २०१४ या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रेणुका आणि सीमा या बहिणींचा दयेचा अर्ज फेटाळला होता.
१. मृत्यूदंडाची शिक्षा ही जन्मठेपेत बदलावी, यासाठी भगिनींची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यास या बहिणींना फाशी होईल.
२. देश स्वातंत्र झाल्यानंतर आतापर्यंत एकाही महिला गुन्हेगाराला मृत्यूदंड दिला गेला नाही.

धर्महीनतेमुळे जगात किंमत शून्य असलेले हिंदू कुठे आणि धर्मपालनाने जगाला भारी ठरलेले मुसलमान कुठे !

    सुख उपभोगण्यापेक्षा त्याचा त्याग महत्त्वाचा आहे, ही गीतेची शिकवण हिंदू विसरले आणि त्यांना हिंदुत्ववादी संघटना अन् राजकीय पक्ष यांनी ती शिकवली नाही. याउलट मुसलमानांना धर्मासाठी तन-मन-धन यांचाच काय, पण प्राणांचाही त्याग करायला शिकवले गेल्याने ते आता जगाला भारी ठरले आहेत !

महाधिवक्ता श्रीहरि अणे यांना पदावरून हटवा ! - काँग्रेसचे संजय दत्त यांची मागणी

     नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी ६ डिसेंबर २०१५ या दिवशी व्यक्त केले होते. याप्रकरणी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय दत्त यांनी महाराष्ट्र वि. प. नियम २८९ अन्वये केली आहे. 

वाघांची शिकार करणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा आणि ५ लक्ष रुपयांचा दंड करण्याची केंद्राकडे शिफारस !

बिबट्यांच्या लोकवस्तीवरील आक्रमणावरून राधाकृष्ण 
विखे-पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी ! 
     नागपूर, १४ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात ठिकठिकाणी बिबट्यांनी लोकांवर आक्रमण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिबट्यांपासून लोकांचे संरक्षण होण्यासाठी शासनाने या संदर्भात गांभिर्याने उपाययोजना करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रश्‍नोत्तरांच्या वेळी सभागृहात केली. या वेळी वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, बिबट्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी 'लोकशिक्षणाचे कार्यक्रम' हाती घेण्यात आले आहेत. याला राधाकृष्ण विखे-पाटील यांसह विरोधकांनी आक्षेप घेतला. 'बिबट्यांनी आक्रमण करू नये; म्हणून त्यांच्या अंगावर तशा पाट्या लावणार का ? लोकशिक्षणाचा काय उपयोग होणार आहे ?', असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर पाटील आणि श्री. मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी झाली. 

श्री साई संस्थानच्या समितीसमोर कोणताही विषय चर्चेस नाही !

'सुवर्ण मुद्रीकरण योजने'त सोने ठेवण्याविषयी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे स्पष्टीकरण 
     शिर्डी, १४ डिसेंबर - केंद्रशासनाने चालू केलेल्या 'सुवर्ण मुद्रीकरण योजने'त श्री साई संस्थान २०० किलो सोने गaुंतवणार असल्याचे वृत्त १४ डिसेंबर या दिवशी अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताविषयी जिल्हाधिकारी आणि श्री साई संस्थानच्या समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी स्पष्ट केले ही, केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत संस्थानचे सोने ठेवण्याचा कोणताही विषय अजून समितीसमोर आलेला नाही. 

फलक प्रसिद्धीकरता

चर्चचे खरे स्वरूप जाणा !
     भारतात आतंकवाद आणि फुटीरतावाद पसरवणार्‍यांना चर्चकडून पैसा पुरवला जातो, असा गंभीर आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार खगन दास यांनी येथे केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     CPI(M) ke bhutpurva sansad Khagan Das ka dava, Bharatme atank ke liye charch deta hai paisa. - Media eske virodhme kuchha kahegi ?

जागो !
      मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीके भूतपूर्व सांसद खगन दास का दावा, भारतमें आतंकके लिए चर्च देता है पैसा. 
- मीडिया इसके विरोेधमें कुछ कहेगी ?

मिरज रेल्वे स्थानकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या ! - शिवसेनेचे निवेदन

   
     मिरज, १४ डिसेंबर (वार्ता.) - मिरज शहर हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. तसेच या नगरीस ऐतिहासिक वारसाही आहे. मिरज लोहमार्ग हा कर्नाटक सीमेवरील मुख्य आहे. त्यामुळे मिरज रेल्वे स्थानकास धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मिरज येथील रेल्वे अधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री श्रीकांत माने, तानाजी सातपुते, संदीप माळी, गिरीष जाधव, इतिहास भोरावत, विशाल राजपूत, तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

गोवंशरक्षण करणार्‍या हिंदुत्ववाद्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

     मिरज, १४ डिसेंबर (वार्ता.) - कसायांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या पाच हिंदुत्ववाद्यांना १४ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्यात आली आहे. यात प्राणीकल्याण अधिकारी श्री. अंकुश गोडसे, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. विनायक माईणकर यांचा समावेश आहे.

शासकीय कार्यालयांकडे पाण्याच्या देयकाची ९० लक्ष रुपयांची थकबाकी

लाखो रुपयांची थकबाकी ठेवणारे शासकीय विभाग ! 
शासकीय कार्यालयातून पाण्याची देयके वेळेत भरली जात नसतील, 
तर मग सर्वसामान्यांनी देयक वेळेत भरावे, अशी अपेक्षा कशी करणार ? 
     डोंबिवली - डोंबिवली औद्योगिक विकास मंडळाने पाण्याच्या देयकांची थकबाकी वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात चालू केली आहे. मंडळाने डोंबिवलीतील दूरध्वनी, रेल्वे, टपाल, पोलीस ठाणे यांच्याकडे लक्ष दिले असून या कार्यालयांकडे सुमारे ९० लक्ष रुपयांंपेक्षा अधिक पाण्याच्या देयकांची थकबाकी आहे. गेल्या आठवड्यात ठाकुर्ली रेल्वस्थानकाचे तीन कोटी रुपये पाण्याचे देयक थकल्याने पाणीपुरवठा खंडित केला होता. थकबाकीचे आकडे प्रत्यक्ष पाण्याच्या देयकांचे असून थकबाकी, दंड आणि इतर आकार मिळून ही थकबाकी कोट्यवधीच्या घरात जात असल्याचे सांगण्यात आले.

अतिरेक्यांना लपून-छपून नव्हे, तर भर चौकात फाशी हवी !

       मुंबईत झालेल्या दहशतवादी आक्रमणानंतर त्या दहशतवाद्यांपैकी सापडलेल्या कसाबला ४ वर्षांनी गुपचूप फाशी देण्यात आली. त्यानंतर शासनाने फुशारकी मारत अनेक वाहिन्यांना ही माहिती मोठ्या अभिमानाने दिली. कसाबला भर चौकात फाशी देण्याचे टाळून गुपचूप फाशी देणार्‍या शासनावर आसूड ओढणारा राष्ट्राभिमानाचं काय ? हा लेख दैनिक सामनाने ९.१२.२०१२ या दिवशी प्रसिद्ध केला. त्या लेखाचा संपादित भाग आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

मूलभूत विचार परिवर्तनाची आवश्यकता

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भारतातील मूलभूत समस्या तशाच असणे 
आणि जनतेच्या हितासाठी वापरला जाणारा पैसा घोटाळेबाजांनी संगनमताने 
भ्रष्टाचार करून देशाला लुटणे 
     भारताला स्वातंत्र्य मिळून ५५ वर्षे झाली; पण ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, आरोग्याचा प्रश्‍न आपण सोडवू शकलो नाही. भ्रष्टाचारामुळे कोट्यवधी रुपये लुटले गेले. एकट्या हर्षद मेहताने ८ सहस्र कोटी रुपये खिशात घातले. कर्नाटकात उघडकीला आलेला भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयांचा आहे. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जनावरांच्या चारा घोटाळा प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे.

समाजामध्ये योग्य आचरण कसे करावे ?

१. दुष्टांशी जशास तसे या नियमाने वागणे आवश्यक ! 
        दुष्टांवर मात करण्यासाठी जशास तसे वागावे लागते. याविषयी समर्थ रामदासस्वामी म्हणतात, 
धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ 
- दासबोध, दशक १९, समास ९, ओवी ३० 
अर्थ : दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा. उर्मट माणसासाठी दुसरा उर्मटच योजला पाहिजे. लुच्चा असेल, त्यास दुसर्‍या लुच्च्या माणसासमोर उभे करावे. याप्रमाणे जशास तसे अगत्य योजावे.

काळजाला हात घालणारी अवयव तस्करी !

     नुकतीच अकोला येथे सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी मूत्रपिंडासारखे अवयव विकण्याची वेळ शेतमजुरांवर आल्याची घटना उघडकीस आली. विषण्ण अवस्थेतील शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर पोटासाठी काय विकायची वेळ आली आहे, हे जाणून घेण्यात कोणालाही रस नाही. राजकारण्यांना केवळ सभागृह चालू न देता गोंधळ घालण्यात रस आहे. पैशांची निकड असणारी गरीब जनता स्वतःच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव विकण्यास सिद्ध होते, हे यापूर्वीही काही घटनांतून उघडकीस आले आहे. देशातील गरिबीची भयावह स्थिती यातून प्रतीत होते. आता हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले असून त्यातही फसवणूक करणार्‍या काहींच्या मुसक्या आवळल्या गेल्यानंतर या अवयव विक्री प्रकरणाचे गांभीर्य समोर आले. देशात किती तस्कर यासाठी कार्यरत असतील, याचा विचार केल्यावर त्याची भयावहता लक्षात येईल.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी राजभाषा 
यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे.  सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

हिंदू संघटित झाले, तरच हिंदुत्व टिकेल !

      आजची स्थिती अशी आहे की, हिंदूंना कसे कचाट्यात पकडता येईल, या दृष्टीने अनेक जण पावले उचलत आहेत आणि हिंदुविरोधी पुढारीवर्ग सातत्याने त्यांना खतपाणी घालत आहे. त्यातून सनातन संस्थेची वाटचाल चालूच रहावी, ही सदिच्छा !
     वास्तविक सनातन संस्थेवर आरोप झाल्यावर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन, एक शक्ती उभी करून आरोपकर्त्यांवर खवळून विरोध करायला हवा होता; पण तसे होत नाही. जर आपण सर्व हिंदुत्वाच्या धाग्याने बांधले गेलो असतो, तर विरोधकांना काही चुकीचे करण्याचे धारिष्ट्य झाले नसते. 

हिंदु जनजागृती समितीच्या गोवा येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा

डॉ. मनोज सोलंकी
१. राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     ११.१०.२०१५ या दिवशी जुने बस स्थानक फोंडा, गोवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
१ अ. राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शासनाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात यावी.
२. काले, गोवा येथील फार्ममध्ये स्ट्रे कॅटल मॅनेजमेंट या योजनेअंतर्गत मोकाट गुरे आणणे तातडीने बंद करावे. फार्ममध्ये आतापर्यंत ८४४ हून अधिक गुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करावी. फार्ममध्ये सद्यःस्थितीत असलेल्या गुरांचे योग्यरित्या पालनपोषण करावे.
३. स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बालकांवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर केंद्रशासनाने त्वरित कारवाई करावी.
४. हिंदु संघटना आणि हिंदु संत यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रोखावे.
     वरीलप्रमाणे मागण्या असलेली निवेदने गोवा राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांना सुपुर्द करण्यात आली. 

देशाचा जयजयकार केल्याने पोलिसांचा मार खावा लागणारा जगातील एकमेव देश भारत ! असा लाठीमार कधी पोलिसांनी भारतविरोधी आणि पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या काश्मीरमधील धर्मांधांवर केला आहे का ?

      ४.६.२०१४ या दिवशी पनून कश्मीर संघटनेच्या वतीने काश्मीरमधील लाल चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी १९९२ नंतर प्रथमच भारतमाता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद आणि वन्दे मातरम्, असा जयघोष लाल चौकात झाला. या वेळी तेथील पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते थांबले नाही. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी लाठीमार करून या हिंदूंना कह्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता असणारे आणि साधकांना आनंद देण्यासाठी धडपडणारे संतरत्न : पू. संदीप आळशी !

      मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (१५.१२.२०१५) या दिवशी पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सेवेत असणारे साधक श्री. अविनाश जाधव यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. संदीप आळशी
१. प्रत्येक गोष्टीचा विनियोग योग्य 
प्रकारे होण्यासाठी झटणारे पू. संदीपदादा !
      पू. संदीपदादांना औषध घेण्यासाठी दिवसातून दोन वेळा गायीचे दूध अर्धा पेला घ्यावे लागायचे. मी पुष्कळ वेळा पू. दादांसाठी अर्ध्या पेल्यापेक्षा अधिक दूध नेत असे. पू. दादांना अर्धा पेलाच दूध नेणे अपेक्षित होते. एक दिवस पू. दादांनी मी नेलेल्या दुधापैकी अर्धा पेला दूध त्यांच्यासाठी ठेवलेे आणि उर्वरित दूध वाटीत काढून ठेवले. त्या वेळी पू. दादांनी उर्वरित दूध परत घेऊन जाऊ शकता; कारण मी औषधासाठी दूध घेतो. उर्वरित दूध वापरता येईल, असे सांगितले. आपल्याकडे असणार्‍या प्रत्येक गोष्टीचा विनियोग योग्य प्रकारे करायला हवा, हे देवानेच त्यांच्या माध्यमातून शिकवले.

सनातन-निर्मित ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांच्यातील संतत्वाची देवाने एका साधकाला दिलेली प्रचीती !

पू. संदीप आळशी
१. तीव्र आध्यात्मिक आणि मानसिक त्रास होतांना सेवा करायला न सुचणे अन् या संदर्भात संतांना उपाय विचारण्याचीही स्वतःची पात्रता नाही, अशा प्रकारचे नकारार्थी विचार मनात येणे : मे २०१३ मध्ये एकदा सायंकाळी मला तीव्र आध्यात्मिक त्रास, तसेच परिस्थिती न स्वीकारणे आणि नकारार्थी विचार करणे, या अहंच्या पैलूंमुळे पुष्कळ मानसिक त्रास होत होते. तेव्हा संकलन करण्यासंबंधी काही सुचत नव्हते. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले, तरी कळते; पण वळत नाही, म्हणजे त्रासावरील उपाय कृतीत आणता येत नाही, अशी मनाची स्थिती झाली होती. तसेच त्या त्रासाविषयी संतांना स्थुलातून कल्पना देऊन उपाय विचारण्याचीही स्वतःची पात्रता नाही, अशा प्रकारचे नकारार्थी विचार मनात येत होते.

साधकांना सूचना

सनातन संस्थेच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातन संस्थेच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.१२.२०१५)

प्रत्यक्ष भेट झालेली नसतांना आणि त्रासाविषयी काहीही सांगितलेले नसतांना स्वतःहून उपाय सांगून त्रासातून बाहेर काढणारे पू. संदीपदादा !

     सप्टेंबर २०१५ पासून माझ्या त्रासात पुष्कळ वाढ झाली होती. ७ घंटे आध्यात्मिक उपाय करूनही मला विशेष लाभ होत नव्हता. त्यामुळे मनामध्ये साधनेविषयी पुष्कळ विकल्प येत होते. पूर्वी अशा स्थितीत मी सेवेत मन गुंतवले, तर त्यातून बाहेर पडणे सोपे जायचे; पण त्रासामुळे सेवा करायलाही सुचत नसल्याने मनाची स्थिती पुष्कळ वाईट होती. प्रारब्धामुळे इतकी वर्षे साधना करूनही प्रगती नाही आणि आता त्रासामुळे प्रारब्धावर मात करण्याइतकी साधना होत नाही, या स्थितीमुळे त्रासातून बाहेर पडायला मार्ग सापडत नव्हता.

पू. संदीपदादा यांच्या कृती पाहिल्यावर प.पू. डॉक्टरांची आठवण होणे

पू. संदीप आळशी
१. प्रत्येक क्षण उपाय करण्यात व्यय करणे
      पू. दादा नामजपाला येतात, तेव्हा ते पूर्णवेळ मुद्रा आणि नामजप करतात. त्यांचे इतर कुठेच लक्ष नसते. श्री. भैयाजी यांच्या उपायांना गेल्यावरही भैयाजी येईपर्यंत पू. दादा मुद्रा करून नामजप करतात. हाता-पायांचे बिंदूदाबन करतात. प्रत्येक क्षणाचा ते परिपूर्ण वापर करतात.
२. शीव सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांच्या समवेत असतांना 
त्यांच्याकडून शिकलेल्या सर्व गोष्टी तंतोतंत कृतीत आणणे
      पू. दादा प.पू. डॉक्टरांसारखेच लहान-लहान पाठकोरे कागद पॅडला लावून समवेत ठेवतात. काही आठवले की, लगेच ते त्याच्यावर लिहितात. पू. दादा शीव सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांच्या समवेत होते, तेव्हा प.पू. डॉक्टरांकडून शिकलेले ते सर्व कृतीत आणतात.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

सुदामा भेटल्यावर त्याला आसनावर बसवून त्याच्या पायातील काटे काढतांना
श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाला सुदाम्याचे पाय धुण्यासाठी साहाय्य करतांना त्याच्या राण्या
(९.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

श्रीकृष्ण म्हणजेच साक्षात् प.पू. गुरुदेव।

    
कु. अमृता मुद्गल
कु. अमृता मुद्गल या बालसाधिकेचा प.पू. गुरुदेव म्हणजेच श्रीकृष्ण आहे असा भाव आहे. या उत्कट भावातून तिला सुचलेली कविता येथे देत आहोत.
प.पू. श्रीकृष्ण म्हणजेच साक्षात् प.पू. गुरुदेव।
इकडे परम पूज्य, तिकडे श्रीकृष्ण ।
उजवीकडे परम पूज्य, डावीकडे श्रीकृष्ण ॥ १ ॥
उठतांना परम पूज्य बसतांना श्रीकृष्ण ।
डोळे उघडल्यावर परम पूज्य, डोळे बंद केल्यावर श्रीकृष्ण ॥ २ ॥
स्त्रीयांमध्ये पूज्य ताई, पुरुषांमध्ये परम पूज्य ।
आणि बालकांमध्ये श्रीकृष्ण ॥ ३ ॥

गुरुकृपायोगानुसार व्यष्टी साधनेतील अष्टांग साधनेचा पूर्वीचा आणि नवीन क्रम

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. पूर्वीचा क्रम
१. नाम, २. सत्संग, ३. सत्सेवा, ४. त्याग, ५. प्रीती, ६. स्वभावदोष निर्मूलन, ७. अहं निर्मूलन आणि ८. भावजागृती
२. नवीन क्रम
१. स्वभावदोष निर्मूलन, २. अहं निर्मूलन, ३. नाम, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. त्याग, ७. प्रीती आणि ८. भावजागृती
३. क्रम पालटण्याची कारणे - सर्व कृती मनामुळे होणे
अ. मानवाकडून जी काही कृती घडते, ती त्याच्या मनामुळे घडते. शरिराकडून होणारी प्रत्येक कृती मनामुळे होते. मन चांगले असल्यास, म्हणजे मनात स्वभावदोष आणि अहं नसल्यास शरिराकडून योग्य कृती होते आणि स्वभावदोष आणि अहं असल्यास शरिराकडून अयोग्य कृती होते. 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
 ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भारताच्या आणि हिंदूंच्या र्‍हासाचे एक प्रमुख कारण म्हणजे धर्मद्रोह्यांनी हिंदूंना शिकवलेला धर्मद्रोह ! त्यामुळे हिंदूंमधील एकजूट नष्ट झाली.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक कृती करणे आवश्यक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

ट्रम्प यांचे काय चुकले ?

संपादकीय 
     सध्या अमेरिकेला सहिष्णुतेचा ज्वर चढला आहे. अलीकडेच तेथील रिपब्लीकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी मुसलमानांना अमेरिकेत प्रवेशबंदी करा, अशी मागणी केली होती. या वक्तव्याला पॅरिसमध्ये आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण आणि कॅलिफोर्निया येथे जिहाद्यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार या दोन घटनांची पार्श्‍वभूमी होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना हिटलर, फॅसिस्ट, गौरवर्णीय आय.एस्.आय.एस्.वाले म्हणून हिणवण्यात येत आहे. ब्रिटीश नागरिकांनी तर ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करावी, यासाठी कंबर कसली आहे. ट्रम्प यांच्या बाबतीत राजकारणीच ते, बरळणारच, असे म्हणण्याची सोय नाही. ते अमेरिकेतील प्रतिथयश उद्योजक असून अरबपती आहेत. दुसरी बाब म्हणजे ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. अशी व्यक्ती प्रत्येक वक्तव्य अगदी दहा वेळा विचार करून करते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn