Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आता शिर्डी संस्थानही सुवर्ण मुद्रीकरण योजनेत २०० किलो सोने गुंतवणार !

हिंदूंच्या देवळांची संपत्ती धर्मकार्यासाठी कि गुंतवणूक करण्यासाठी ?
केंद्रशासनाच्या योजनेत गुंतवणूक करणारे शासनाच्या कह्यातील दुसरे मंदिर !
प्रतिवर्षी १ कोटी २५ लाख रुपये व्याज मिळणार
संस्थानाकडील ३८० किलो सोन्यापैकी २०० किलो सोने गुंतवणार
     नवी देहली - केंद्रशासनाने चालू केलेल्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत मुंबईच्या सिद्धीविनायक न्यासाने ४० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिर्डी संस्थाननेही यात सोने गुंतवण्याची सिद्धता दाखवली आहे. या योजनेत सिद्धीविनायक न्यासाच्या ५ पट, म्हणजे २०० किलो सोने गुंतवणार असल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
१. देशातील सर्वाधिक ५ श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराची ख्याती आहे. शिर्डीच्या या संस्थानकडे ३८० किलो सोने आहे.

सनातन संस्थेवर अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार ! - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

श्री. चंद्रशेखर बावनकुळे
     नागपूर - नंदुरबार शहरातील काही घरांमधून चालूू असलेली गोवंशियांची हत्या थांबवण्यासाठी पोलीस महासंचालक यांना पत्र दिले जाईल. सनातन संस्थेवर अन्याय केला जाऊ नये, याविषयी मुख्यमत्र्यांना पत्र देण्यात येईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांची निवेदनेही सादर केली.

धर्मांतरातून ज्यू धर्मियांना वगळा ! - पोप फ्रान्सिस

हिंदूंनो, तुमचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव ओळखा आणि वेळीच सावध व्हा !
      व्हॅटीकन - धर्मांतरातून ज्यू धर्मियांना वगळण्याचा आदेश ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप फ्रान्सिस यांनी सर्व कॅथॉलिक मिशनर्‍यांना दिला आहे. ज्यू धर्मियांनीच येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले, या कथेमुळे ख्रिस्ती आणि ज्यू धर्मियांमध्ये शेकडो वर्षांपासून शत्रुत्व आहे. त्यामुळे ज्यू धर्मियांना होलोकास्टपासून हिटलरच्या वंशसंहारापर्यंत अनेक आक्रमणांना तोंड द्यावे लागले होते. ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात ज्यू धर्मियांनी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले, या समजुतीचे निराकरण करण्यात आले.

सौदी अरेबियातील निवडणुकीत प्रथमच महिला उमेदवार विजयी !

     वर्षानुवर्षे महिलांना मतदानासारखा मूलभूत हक्कही नाकारणारी इस्लामी राष्ट्रे ! हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान मिळते, अशी खोटी ओरड करणारे तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मी, बुद्धीवादी मुसलमान महिलांच्या संदर्भात केल्या जाणार्‍या या भेदभावाविषयी काही बोलतील का ?
     रियाध - सौदी अरेबियातील मक्का, तौबुक आणि इहासा या ३ महानरपालिकांच्या निवडणुकीत प्रथमच ४ महिलांनी विजय मिळवला आहे. सौदी अरेबियाच्या इतिहासात महिलांना यंदा प्रथमच मतदान करण्यास, तसेच निवडणूक लढवण्यास अनुमती मिळाली होती.

आय.एस्.आय.एस्.चा अटकेत असलेला हस्तक सिराजुद्दीन याच्यासह सिरियाला जाऊ पहाणार्‍या भाग्यनगर येथील धर्मांध युवतीला अटक !

देशद्रोही धर्मांधांनी पुरती पोखरलेली भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ! 
अशांना त्वरित कठोर शासन होणे आवश्यक आहे !
महंमद सिराजुद्दीनकडून अनेक धक्कादायक खुलासे !
      जयपूर (राजस्थान) - आय.एस्.आय.एस्.चा नुकताच अटक करण्यात आलेला हस्तक महंमद सिराजुद्दीन याच्यासह सिरियाला जाऊ पहाणार्‍या भाग्यनगर येथील अमिना (वय २० वर्षे) या धर्मांध युवतीला पोलिसांनी ११ डिसेंबरला रात्री अटक केली. महंमद सिराजुद्दीन हा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक असून त्यास १० डिसेंबरला राजस्थान पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने जयपूर येथे अटक केली होती. पोलिसांनी त्याची १० घंटे कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे
या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे २८ वा दिवस !
१२.१२.२०१५ 
रात्री ११.३० वा. आश्रमासमोरील रस्त्यावरून काही व्यक्ती ४ दुचाकींवरून सनातन बॉम्ब, असे ओरडत गेल्या.

भारतीय सैन्यात ३ वर्षांत ४१३ सैनिकांच्या आत्महत्या

आत्महत्या करण्याची मानसिकता असणारे सैनिक शत्रूराष्ट्राशी कसे लढणार ? 
यावर शासन वेळीच उपाय काढील, अशी आशा आहे !
      नवी देहली - वर्ष २०१२ पासून आजपर्यंत भारतीय सैन्यात जवळपास ४१३ सैनिकांनी आत्महत्या केल्या आहेत. या काळात केवळ स्थलसेनेत ३३४, त्या खालोखाल वायूसेेनेत ६७ आणि नौदलात १२ सैनिकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. भारतीय सैन्यात या वर्षी सहकारी सैनिक किंवा अधिकारी यांच्या हत्या करण्याशिवाय आत्महत्यांच्या ६९ घटना समोर आल्या आहेत, असेही सिंह यांनी सांगितले. (केवळ ३ वर्षांत एवढ्या आत्महत्या झाल्या, तर ६८ वर्षांत किती सैनिकांनी आत्महत्या केल्या असतील ? सैनिकांना आत्महत्या करू देणारे नकोत, तर त्यांचे धैैर्य वाढवणारे राज्यकर्ते हवेत ! - संपादक) संरक्षण राज्यमंत्री सिंह म्हणाले, या प्रकरणांमागे कामाच्या जागेवरील अडचणी, कौटुंबिक अडचणी, घरघुती समस्या, आर्थिक अडचणी, मानसिक समस्या आणि तणाव सहन करू न शकणे आदी समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्ष २०१२ पासून एकूण ८ सैनिकांच्या त्यांच्या सहकारी सैनिकांकडून हत्या करण्यात आल्या. नौदल आणि वायूसेना या ठिकाणी सहकारी सैनिक किंवा अधिकार्‍याची हत्या केल्याची घटना आढळून आली नाही.

दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा १६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साही वातावरणात साजरा

दैनिक सनातन प्रभात विशेषांकाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. दैवेश रेडकर,
श्री. संजय जोशी आणि ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे


हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्कार घोषित !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर
श्री. सतीशकुमार प्रधान
प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने होणार पुरस्कारांचेे वितरण !
वीर जीवा महाले पुरस्कारासाठी पंजाब गोरक्षा दलाचे श्री. सतीशकुमार प्रधान यांची निवड !
      सातारा - वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी शिवप्रतापदिन साजरा केला जातो, तसेच त्या निमित्ताने पुरस्कारही दिले जातात. यंदा हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर (मुंबई) यांना पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्कार घोषित करण्यात आला. याशिवाय पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्ववादी श्री. सतीशकुमार प्रधान (पंजाब) यांची वीर जीवा महाले पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

बेंगळुरू येथे २० सहस्र मुसलमानांकडून निषेध मोर्चा

प्रेषितांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा कांगावा !
      बेंगळुरू - उत्तरप्रदेशमध्ये हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा कांगावा करत बेंगळुरू येथे मुसलमानांनी निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्च्यामध्ये सुमारे २० सहस्र मुसलमान सहभागी झाले होते. त्यामुळे बेंगळुरू-म्हैसूर रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली. निषेध मोर्च्यामुळे पूर्व बेंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सर्वत्र पोलीस कुमक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती, अशी माहिती बेंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एम्.ए. सलीम यांनी दिली. (एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस असतांना ३ घंटे वाहतूक खोळंबलीच कशी ? पोलीत त्या वेळी नेकमे काय करत होते ? - संपादक) 

चेन्नईतील धर्मांध संगणक अभियंत्यास सुदान येथे अटक !

आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याच्या सिद्धतेत
शासनाने फितुरांना वेळीच कठोरात कठोर शिक्षा केली असती, तर असे एकामागोमाग एक फितूर 
निर्माण झाले नसते ! शासन आतातरी देशद्रोह्यांवर त्वरित कारवाई करील का ?
      पोर्ट सुदान - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या चेन्नईतील २३ वर्षीय युवकास सूदान पोलिसांनी अटक केली. महंमद नासीर पाकिर महंमद असे त्याचे नाव असून तो संगणक अभियंता आहे. सुदान पोलिसांनी त्यास भारतात पाठवले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे.

सुविधांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर

मध्यप्रदेश शासन उत्तरदायींवर कठोर कारवाई करेल, अशी आशा आहे !
      उज्जैन - सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या बांधकामात अधिकार्‍यांचे लक्ष चुकवून निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. येथील अंकपात भागातील निर्वाणी आखाडा परिसरातील शौचालयांची पाहणी करतांना नगरपालिकेच्या उपायुक्तांच्या नजरेस ही गोष्ट आली. त्यानंतर त्यांनी ठेकेदाराला त्वरित दुसर्‍या विटा मागवण्याचे आदेश दिले.

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वात ४ राष्ट्रांचे वैज्ञानिक करणार गर्दीच्या नियोजनाचा अभ्यास !

  • जगभरातील धार्मिक यात्रांतील गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी उचलले पाऊल !
  • जगात प्रथमच असा अभ्यास होणार ! 
  • ४ कोटी रुपयांचा व्यय !
  • चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाय सुचवणार !
    उज्जैन (मध्यप्रदेश) - जगभरातील विविध ठिकाणच्या धार्मिक उत्सवांनिमित्त होणार्‍या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जागतिक स्तरावर अभ्यास करण्यात येणार असून एप्रिल २०१६ मध्ये उज्जैन येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त या अभ्यासाला आरंभ होणार आहे. जगात प्रथमच अशा प्रकारचा अभ्यास होणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काशी येथे केले गंगापूजन आणि गंगारती !

      नवी देहली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काशी येथील प्रसिद्ध दशावमेध घाटावर गंगापूजन आणि गंगारती केली. शंखनादाने गंगारतीला आरंभ झाला. गंगा आरतीमध्ये ३ डमरू, ९ ब्राह्मण आणि १८ देव कन्या सहभागी होत्या. याप्रसंगी घाटावर उपस्थित भाविकांनी हर हर महादेव असा जयघोष केला.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घाला !

देहलीतील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी जनतेचा निधी वापरण्यास बंदी घाला ! 
देहली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदूआंदोलनातील हिंदुत्ववादी आणि अन्य १४ जण यांवर पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट

    राजस्थानमध्ये काँग्रेसवाल्यांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर २४ घंटे उलटूनही पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. याउलट पुण्यात भाजपच्याच आमदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या प्रकरणी तत्परतेने गुन्हा नोंदवण्यात येतो, ही पुणे पोलिसांची मोगलाईच ! आता हिंदूंनी त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारानुसार वैध मार्गाने निषेधही नोंदवायचा नाही का ?
आगामी बाजीराव-मस्तानी या 
चित्रपटाच्या विरोधात पुणे येथे आंदोलन केल्याचे प्रकरण
     पुणे, १३ डिसेंबर - १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार असलेला हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव-मस्तानी या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी, चित्रपटातून पिंगा हे गाणे काढावे, या आणि अन्य मागण्यांसाठी १२ डिसेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले होते. शनिवारवाड्यावर झालेल्या या आंदोलनाला पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे सरकार, भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनात चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्यात आला. या प्रकरणी विनाअनुमती मोर्चा काढणे आणि पुतळा जाळल्याप्रकरणी आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यासह १४ जण आणि त्या व्यतिरिक्त ७० ते ८० जणांच्या जमावाच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. (हिंदूंच्या वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचे पुणे पोलिसांना वावडे का ? आतंकवादी प्रवृत्तीच्या धर्मांधांच्या समोर थंड बसणार्‍या पोलिसांनी हिंदूंवर मात्र तत्परतेने गुन्हा नोंदवायला हा भारत आहे कि पाक ? - संपादक)

पेण येथे हिंदु धर्मजागृती सभा

दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. दशरथ भोपतराव, समवेत सौ. सुनीता पाटील आणि श्री. नरेंद्र सुर्वे
(सविस्तर वृत्त लवकरच)

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
    मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! 
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

महिलांना गाभार्‍यात प्रवेश द्यावा कि नाही, यासाठी त्र्यंबक देवस्थानने अभ्यास समिती नेमली !

हा धार्मिक प्रश्‍न असल्याने या अभ्यास समितीत धर्माचा अभ्यास असणार्‍यांचा समावेश करावा !
     त्र्यंबकेश्‍वर - येथील त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनासाठी महिलांना गाभार्‍यात प्रवेश बंदी असल्याने महिलांना गाभार्‍यात प्रवेश द्यावा, अशी मागणी काही महिलांनी अर्जाद्वारे देवस्थान संस्थानच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्यांच्या मागणीनुसार मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी महिलांना प्रवेश द्यावा कि नाही, याविषयी देवस्थान संस्थान न्यासाने चार सदस्यांची अभ्यास समिती नेमली आहे.

२९ ते ३१ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी येथे २८ वे सावरकर साहित्य संमेलन

 
डावीकडून श्री. चंद्रशेखर वझे, श्री. दीपक पटवर्धन,
श्री. शंकरराव गोखले, सौ. वंदना परांजपे, सौ. शीतल पाटील
     ठाणे - स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने ७ डिसेंबर या दिवशी गडकरी रंगायतन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठानचे श्री. विद्याधर ठाणेकर यांनी या परिषदेसाठी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्यवीरांना अभिप्रेत असलेल्या अखंड, विज्ञाननिष्ठ, बलसंपन्न भारताची निर्मिती त्यांचे विचार अन् तत्त्वज्ञान यांचा समाजाने पाठपुरावा केला, तरच होणार आहे. त्यांचे पुष्कळ साहित्य ही राष्ट्रोत्थानाची अखंड गंगोत्रीच आहे. तिचे दर्शन नव्या पिढ्यांना व्हावे, यासाठी सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

गृहसचिवांना पुन्हा दुसरे स्मरण पत्र पाठवणार ! - रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

पोलिसांनी बंगाली भोंदूबाबांवर कारवाई न केल्याचे प्रकरण 
गृहराज्यमंत्री श्री. रणजित पाटील यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     नागपूर, १३ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - ख्रिस्ती आणि बंगाली भोंदूबाबांच्या विरोधातील पोलीस तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा ६ मासांच्या आत अहवाल मागवण्याचे आदेश दिले असतांनाही त्यावर पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. याविषयी समितीच्या वतीने गृहराज्यमंत्री श्री. रणजित पाटील यांना स्मरणपत्र देण्यात आले होते; मात्र यावर प्रशासनाने कोणती कारवाई केलेली नाही, असे समितीच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त करत या संदर्भात अतिरिक्त मुख्य गृह सचिवांना पत्र पाठवण्यात येईल, अशी माहिती श्री. रणजित पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलतांना दिली. (मंत्र्यांच्या आदेशाची नोंद न घेणारे असे पोलीस जनतेच्या तक्रारींची कशा प्रकारे नोंद घेत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे, समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. सचिन वैद्य यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचला !

बेळगाव येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले हिंदुत्ववादी
जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
     बेळगाव (कर्नाटक) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलवीत या मागणीसाठी बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तहसीलदार श्री. रवी वाघमारे आणि पोलीस उपायुक्त श्री. अनुपम अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.

पुणे येथे पोलिसांनी वाहनाला लावलेले जॅमर तोडण्याच्या घटनांत वाढ

पोलिसांच्या कारवाईला न जुमानण्याच्या जनतेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस
प्रशासन आणि गृह विभाग यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे !
     पुणे - शहरात चारचाकी आणि दुचाकी वाहने लावण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. मध्यवस्तीत वाहने लावणे, हे जिकिरीचे झाले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने लावणार्‍या वाहनचालकांवर रितसर जॅमर लावण्याची कारवाई करण्यात येते. असे असतांनाही काही वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता जॅमर तोडून पसार होतात.

दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा १६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साही वातावरणात साजरा !

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी धर्मविरोधक विचारांचे 
समूळ उच्चाटन करावे लागेल ! - ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे
      रत्नागिरी, १३ डिसेंबर (वार्ता.) - सनातन प्रभात १६ वर्षे अतुलनीय कामगिरी करत आहे. बहुसंख्य हिंदू असूनही हिंदूंवर अन्याय होतो त्या वेळी पोलीस हिंदूंना संरक्षण देत नाहीत. या वेळी नेमके काय करायला हवे, हा दृष्टीकोन सनातन प्रभात देते. गेली कित्येक वर्षे हिंदूंवर अन्याय होण्याच्या घटना आपण वाचतो आणि सोडून देतो; परंतु दैनिक सनातन प्रभात हिंदूंना सजग करते. धर्मशास्त्र, रुढी, प्रथा परंपरा यांविषयी इतर वृत्तपत्रे विपर्यास करून वृत्त देतात. धर्माची हानी होऊ नये; म्हणून दैनिक सनातन प्रभात धर्मशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य एक व्रत म्हणून करत आहे. संत तुकाराम महाराजांच्या धर्माचे कारण । करणे पाखंड-खंडण ॥ या उक्तीप्रमाणे सनातन समाजातील पाखंड-खंडण दूर करण्याचे काम करत आहेत. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावांच्या खुनासाठी राघोबादादांना देहान्त प्रायश्‍चित्ताची शिक्षा दिली होती, तसे धर्माच्या मूळावर उठलेल्या धर्मविरोधक विचारांचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय हिंदु राष्ट्र स्थापता येणार नाही, असे प्रतिपादन वारकरी-फडकरी दिंडी समाज संघटनेचे ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे यांनी केले.

राज्यांतर्गत देशी आणि विदेशी गायींच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील गोवंशहत्या बंदी कायदा सक्षम !

      मुंबई - राज्यशासनाने गायींच्या रक्षणासाठी जो कायदा केला आहे, त्याने केवळ स्थानिक गायींचे नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गायींचेही रक्षण होऊ शकते; कारण बाहेरून येणार्‍या अशा मांसावरही कायद्याने बंदी आहे. शासनाने स्थानिक, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गायींचे रक्षण करण्याचे ठरवले असेल, तर तो कायद्याचा भाग ठरतो, त्यात सीमेचा प्रश्‍न निर्माण होत नाही, असा युक्तिवाद गोवंश हत्या बंदी कायद्याचे समर्थन करणार्‍या आत्मकमल लब्दी न्यासाच्या वतीने ११ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका !

निधर्मी प्रसारमाध्यमे आता या विषयावर चर्चा का घेत नाहीत ?
     मुंबई - येथील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्याच्या गाभार्‍यात (मजारमध्ये) महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी मुसलमान महिला संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. २०११ पासून येथे महिलांना प्रवेश दिला जात नाही. या प्रकरणाची सुनावणी १५ डिसेंबरला होणार आहे.
१. १५व्या शतकात बांधण्यात आलेल्या या दर्ग्याच्या न्यासाने या संदर्भात म्हटले आहे की, दर्ग्याच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश देणे, हे इस्लामच्या विरोधात आहे आणि ते घोर पाप आहे. अन्य मशिदींप्रमाणेच येथेही नियमाचे पालन केले जाते. मशिदीत महिलांना प्रवेश देणे, हे धर्मविरोधी आहे,

एन्.सी.ई.आर्.टी. प्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार ! - आमदार राजन साळवी, शिवसेना

    
श्री. राजन साळवी
नागपूर, १३ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - भारतीय संस्कृतीविषयी खोटी, तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा एन्.सी.ई.आर्.टी.चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती शिष्टमंडळाच्या वतीने राजापूर येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजन साळवी यांना देण्यात आले. या वेळी श्री. साळवी म्हणाले, हा विषय अतिशय गंभीर आहे. याविषयी विधानसभेत लक्षवेधी लावून या प्रश्‍नावर आवाज उठवण्यात येईल. देशद्रोही आतंकवादी याकूबचे समर्थन करणारे आणि त्याची बाजू घेत न्यायव्यवस्थेवर टीका करणार्‍यांना देशद्रोही घोषित करावे अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना देण्यात आले. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुमचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव ओळखा आणि वेळीच सावध व्हा !
     ज्यू धर्म हा वेगळा धर्म आहे, असे आम्ही समजत नाही, असे म्हणत धर्मांतरातून ज्यू धर्मियांना वगळण्याचा आदेश ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप फ्रान्सिस यांनी सर्व कॅथॉलिक मिशनर्‍यांना दिला आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Isaiyo ke dharmapramukh Pope ka aadesh : Jew ko chhodkar anya dharmiyonko Isai banaye.
Pope ke es avahanpar dhongi sahishnuvadi ab chup kyo ?
जागो : ईसाइयोंके धर्मप्रमुख पोप का आदेश : ज्यूको छोड कर अन्य धर्मियोंको ईसाई बनाएं !
पोपके इस आवाहनपर ढोंगी सहिष्णुवादी अब चूप क्यो ?

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा समर्पणभाव वाखाणण्याजोगा !

एका वरिष्ठ अधिकार्‍याचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीविषयी गौरवोद्गार
     सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा त्याग आणि समर्पणभाव वाखाणण्याजोगा आहे, असे गौरवोद्गार एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍याने काढले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या शिष्टमंडळाने प्रशासकीय अधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले,दैनिक सनातन प्रभातसाठी शासकीय विज्ञापने मिळण्याच्या संदर्भात मी स्वत: प्रयत्न करीन.

इतिहासात फेरफार करून सिनेअभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नाव देऊ नये ! - राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

     देहली - इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १३ डिसेंबर या दिवशी जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भांडुप, मीरा रोड आणि कोपरखैैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलने

कोपरखैरणे
भांडुप
मीरारोड
      मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच पिंगा पिंगा या गाण्यातून करण्यात आलेले इतिहासाचे विकृतीकरण, तेलंगणा शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम रहित करावा, या मागण्यांसाठी १३ डिसेंबर या दिवशी भांडुप, मीरा रोड (पू.) आणि कोपरखैरणे येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली.
(सविस्तर वृत्त लवकरच)

आधुनिक वैज्ञानिक युगात प्रार्थनेचे महत्त्व

अंनिस आणि तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
१. परमेश्‍वरी शक्ती असल्याचे वैज्ञानिक निकषांवर 
पटवून द्यावे लागणे 
      साधारण ३० वर्षांपूर्वी परमेश्‍वराचे अस्तित्व नाही, असे म्हणण्यासाठी धाडस लागत होते; परंतु आताच्या तंत्रयुगात परमेश्‍वराचे अस्तित्व आहे, असे म्हणण्यासाठी धाडस करावे लागते. वेगवेगळ्या वैज्ञानिक निकषांवर घासून, सिद्धान्त निर्माण करून, परमेश्‍वरी शक्ती आहे, हे पटवून द्यावे लागते. 
२. अनाकलनीय गोष्टीसुद्धा विज्ञानाचाच 
अविभाज्य भाग होऊ लागणे 
       निवळ दृढ श्रद्धेने प्रार्थना करून मृत्यूच्या दारातून परत आलेले रुग्ण आणि त्यांच्या कथा ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यांना वेगळे एवढेच आहे की, अशा अनाकलनीय गोष्टी विज्ञानाचाच भाग नव्हे, अविभाज्य भाग बनू पहात आहेत.

तत्कालीन कर्नाटक शासनाच्या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या फुसक्या योजना !

रोगापेक्षा इलाज भयंकर या कोटीतील शासकीय उपाययोजना !
       शासनाने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजना, बडतर्फ, चौकशी समित्या इत्यादी आणि लोकायुक्तांच्या धाडी हे सर्व फुसके बार आहेत. शासन अजूनही निष्फळ; पण रमणीय उपाय योजते, उदा. जानेवारी २००० मध्ये एका सभेत मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर आवाहन केले होते, लाच घेऊ नका. लाच मागितल्यास गोपनीय पत्र पाठवा. आज हे लाच प्रकरण इतके सर्वव्यापी झाले आहे की, जर जनतेने हाच लाच निर्मूलनाचा उपाय आहे, असे समजले, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लाखो गोपनीय पत्रांचा ढीग पडेल ! त्या सर्व गोपनीय पत्रांची नोंद घेऊन त्यात सुचवलेल्या भ्रष्टाचार्‍यांचा शोध घेऊन त्या प्रत्येक भ्रष्टाचार्‍यावर कारवाई करणे शक्य होईल का ? 
      वर नमूद केल्याप्रमाणे विधानसभेत प्रत्यक्ष तक्रार करण्याची आणखी एक उपाययोजना आखली आहे. अशी तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी शासनाकडून पत्र आले की, आपण केलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा.

शासनव्यवस्थेतील दरोडेखोर !

      दळणवळण गतीमान आणि उत्तमरीत्या व्हावे, यासाठी द्रूतगती राष्ट्रीय महामार्ग बांधले जातात. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि मालवाहतूक चालू असते. त्यामुळे रस्ते आणि त्यावरून होणारी वाहतूक हे देशाच्या विकासासाठी एक प्रकारे मोठा हातभार लावत असतात; मात्र एकीकडे वाहतुकीमुळे शासनास अर्थसाहाय्य होत असतांना दुसरीकडे मात्र शासनव्यवस्थेचाच एक भाग असलेले वाहतूक पोलीस रस्त्यावरून जाणारी वाहने अडवून वाहनचालकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत. वाहतूक पोलिसांचा हा धंदा राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील महामार्गांवर बिनदिक्कतपणे चालू आहे. बरे, इकडे रस्त्यावर वाहतूक पोलीस वाहनचालकांना लुटत असतांना तिकडे कार्यालयात बसून राज्य प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही वाहन परवाना देतांना नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. आर्टीओ कार्यालयातील हे अर्थकारण आता लपून राहिलेले नाही. वाहतूक परवाना देतांना नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहेत. चिरीमिरी देणार्‍यांना त्वरित वाहन परवाना दिला जातो.

हिंदु जनजागृती समितीची पुण्यातील देखणी आणि स्फूर्तीदायक हिंदु धर्मजागृती सभा ! - प.पू. आबा उपाध्ये, पुणे

प.पू. आबा उपाध्ये
      पुणे - २९ नोव्हेंबर २०१५ या दिवशी पुण्यातील शनिवार वाडा येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेस जाण्याचा योग माननीय श्री. निरंजन दाते (सनातनचे साधक) यांच्यामुळे आला. माझ्यापुढे अडचण अशी होती की, माझ्या पत्नीला घरी ठेवून यावे लागणार होते. तोही प्रश्‍न दातेकाकांनी सोडवला आणि एका साधकाला घरी गाडी घेऊन पाठवले. सोबत आमची मुलगी राजश्री होती. 
   देवद, पनवेलच्या आश्रमानंतर पुन्हा हा योग आला आणि सभेच्या प्रवेशद्वारापासून स्वागतासाठी असलेले साधक आणि सेविका पाहून मन फारच भरून आले. काय हे शिस्तीचे नियोजन ! ते करणार्‍या सर्व साधकांना माझे धन्यवाद !

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

कुठे भारतभूमीसाठी पुनःपुन्हा बलीदान करण्याची इच्छा असणारे क्रांतीकारक आणि कुठे असहिष्णुतेचा कांगावा करत देश सोडायला निघालेले देशद्रोही !

श्री. संदीप जगताप
पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडणार्‍या भारतभूमीला इंग्रजांच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीविरांनी बलिदान दिले. या देशाला समृद्ध आणि स्वतंत्र करणे, हे त्या क्रांतीविरांना त्यांचे कर्तव्य वाटले. त्यांना समोर असलेली बिकट परिस्थिती पाहून कधी असहिष्णुतेच्या गप्पा माराव्या वाटल्या नाहीत कि इंग्रजांची नोकरी करावीशी वाटली नाही; कारण त्यांना ही भारतभूमी स्वर्गाहूनही अधिक प्रिय वाटते.
१. देशासाठी पुनःपुन्हा बलीदान करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा 
असणारे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ! 
     भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव फासावर चढत असतांनाही देशासाठी बलीदान करण्यासाठी पुनःपुन्हा भारतात जन्म घेण्याची संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. तुम्हा-आम्हाला स्वतंत्र वातावरणात श्‍वास घेता यावा; म्हणून तरुण वयातच शेवटचे श्‍वास मोजण्याची वेळ येणार्‍या या क्रांतीविरांना कधी या देशातील वातावरण असहिष्णु वाटले नाही. उलट त्यांना पुन्हा देशासाठी बलिदान करण्याची संधी मिळावी, असे वाटले.
२. असहिष्णुतेचा ठपका ठेवून देश सोडण्याच्या गोष्टी करणारे अमीर खान ! 
      वरील उदाहरणांच्या अगदी उलट स्थिती आज आपल्याला पहायला मिळते. ज्या देशाने ज्याला आवश्यक ते सर्व दिले, ते अमीर खान या देशावर असहिष्णुतेचा ठपका ठेवून देश सोडण्याच्या गोष्टी करत आहेत आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणारे काही जण त्याला दुजोरा देत आहेत. हे ऐकल्यानंतर प्रश्‍न पडतो, हा देश यांना कधी आपला वाटला होता कि नाही ? जन्मभूमी ही मातेसमान असून तिला सोडून जाणे, म्हणजे केवढी कृतघ्नता ! ती यांना काय कळणार ?

तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाच्या 
संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 
      हिंदुस्थानात हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणण्याची लाज वाटते आणि ते सर्वधर्मसमभावी किंवा निधर्मी असल्याचे अभिमानाने सांगतात !

ख्रिस्ती धर्मप्रचारकांनो, येशूला प्रार्थना करूनही भाजपचा विजय कसा झाला ?, याचे उत्तर द्या ! येशूच्या प्रार्थनेने सर्व होते, ही थाप ठोकून हिंदूंचे धर्मांतर करणे आतातरी थांबवा !

      भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात शासन स्थापन झाल्यावर साउथ इंडिया चर्च ऑफ ख्रिस्त मिशन नावाच्या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे, गेले काही मास आम्ही प्रार्थना करत आहोत की, आमचे कार्य गेली १० वर्षे ज्या अनुकूल स्थितीत चालले होते, ते तसेच चालेल कि वर्ष १९९९ मध्ये भाजप संघ शासन आल्याने कार्याला खिळ बसली होती, तसाच प्रकार घडेल ? मात्र आता ईश्‍वराच्या कार्यात अडथळे येतील, असे वाटत आहे. 

हिंदु जनजागृती समितीच्या छत्तीसगड येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा

१. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
     श्री हनुमान मंदिर, सेक्टर-९, मेन हॉस्पिटल, भिलाईनगर येथे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन प्रत्येक मंगळवारी अन् शनिवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत लावले जाते.
२. क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन
    छत्तीसगडमध्ये दुर्ग येथील विद्यापीठ श्री. लक्ष्मीनारायण महाराज किल्ला मंदिर उच्च माध्यमिक शाळा, मालवीयनगर, दुर्ग आणि भिलाईनगर येथील एंजिल वैली स्कूल, हुडको येथे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूतर्र् प्रतिसाद मिळाला. 

साधनेची तळमळ असणारी, सतत इतरांचा विचार करणारी आणि प्रत्येक विचार अन् कृती आध्यात्मिक स्तरावर करणारी कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे) !

कु. अमृता मुद्गल
१. सेवेची तळमळ
१ अ. शाळेत आणि महाविद्यालयात प्राचार्य अन् प्राध्यापक यांच्याशी धीटपणे बोलून विषय मांडणे : मला प्रसारसेवेत असतांना शाळा आणि महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या कुठल्याही उपक्रमाचे निवेदन द्यायला जातांना भीती वाटत असे. मला नीट बोलता येणार नाही, असे वाटायचे. माझ्या मुली कु. गौरी आणि कु. अमृता शाळेतून घरी आल्यावर माझ्यासमवेत तेथे यायच्या आणि धीटपणे प्राचार्य अन् प्राध्यापक यांच्याशी बोलायच्या. प्राचार्यही त्या दोघींचे कौतुक करायचे. मला त्यांच्या या धीटपणाचे आश्‍चर्य वाटायचे. त्या सांगायच्या, प.पू. गुरुदेवच शक्ती देतात. 

तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही तळमळीने सेवा करणार्‍या सौ. नंदा खंडागळे !

१. तीव्र आध्यात्मिक त्रासावर 
प्रार्थनेने मात करून तळमळीने सेवा करणे
    सौ. नंदा खंडागळे यांंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. अनेकदा त्यांना त्रासामुळे काहीही करावेसे वाटत नाही. मनाची नकारात्मक स्थिती असते, तरीही त्या देवाला प्रार्थना करून तळमळीने २२ साप्ताहिक आणि हिंदी मासिक सनातन प्रभातचे वितरण करतात. सेवेला गेल्यावर त्यांंना कधी कधी शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या परिस्थितीवर त्या प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून मात करण्याचा प्रयत्न करतात. 

सर्वांना आपलेसे करणार्‍या आणि भाव असणार्‍या कर्नाटकमधील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती काशेम्मा धर्मण्णवरआजी (वय ७० वर्षे) !

श्रीमती काशेम्मा धर्मण्णवरआजी
    श्रीमती काशेम्मा धर्मण्णवरआजी (वय ७० वर्षे) या कर्नाटकमधील बदामी तालुक्यातील नीलगुंद गावच्या आहेत. त्यांच्यात भाव आणि वात्सल्य आहे. त्यांच्या संदर्भात जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. पहिल्यांदा भेटल्यावर पुन्हा भेटावे, असे वाटणे
     ८.४.२०१४ या दिवशी श्रीमती काशेम्माआजींना मी पहिल्यांदा भेटले. त्या वेळी त्यांना पुनःपुन्हा भेटावे, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर आत्मविश्‍वास, स्थिरता आणि तेवढ्याच प्रमाणात शरणागत भाव जाणवत होता. त्या सतत भगवंताच्या अनुसंधानात आहेत, असे वाटत होते.

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

श्रीकृष्णाने कालिया नागावर केलेले नृत्य (७.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

नागपूर येथील सौ. नंदा खंडागळे यांनी तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करून गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

   
डावीकडून सौ. नंदा खंडागळे यांचा सत्कार करतांना सौ. नीलिमा सप्तर्षि
     नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) -
येथील साधिका सौ. नंदा खंडागळे यांनी १२ डिसेंबर या दिवशी ६१ टक्के पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी उपस्थित साधकांना भावाश्रू आवरणे कठीण झालेे. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नीलिमा सप्तर्षि यांनी सौ. खंडागळे यांचा सत्कार श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन केला. या वेळी सौ. नंदा खंडागळे यांच्या तोंडवळ्यावर कृतज्ञता जाणवत होती. वातावरण चैतन्यमय जाणवत होते. या वेळी साधकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

संत आणि गुरु यांतील भेद

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. संत
     संत व्यष्टी साधना करतात, म्हणजे स्वतःच्या साधनेकडे लक्ष देतात आणि भक्तांच्या व्यावहारिक समस्या सोडवतात.
२. गुरु
     गुरु समष्टी साधना करतात, म्हणजे स्वतःच्या साधनेसमवेत इतरांकडूनही साधना करवून घेतात.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.१२.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते.
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
     भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
     मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो,

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मद्रोही, बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंनिसवाले फक्त महाराष्ट्रातील हिंदूंचाच बुद्धीभेद (ब्रेन वॉशिंग) करतात, तर सनातन संस्था जगभरच्या सर्वच धर्मांच्या लाखो जिज्ञासूंना ग्रंथांद्वारे साधनेविषयी मार्गदर्शन करते !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आय.एस्.आय.एस्., देशभक्त आणि भारत

संपादकीय 
     सध्या आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने जगभर चालवलेल्या हिंसाचारामुळे तिच्याविषयी वर्तमानपत्रांतून रकानेच्या रकाने भरून वृत्ते येत आहेत. जागतिक स्तरावरही त्याच समस्येविषयी महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत अनेक स्तरांतून, लिखाणातून याविषयी चर्चा झडलेल्या असल्या, तरी भारतीय दृष्टीकोनातून एक अत्यंत धक्कादायक आणि राष्ट्राच्या सुरक्षेला मोठा धोका देणारी घटना नुकतीच घडली. इंडियन आईल कॉर्पोरेशनसारख्या बड्या उद्योगाचा व्यवस्थापक महंमद सिराजुद्दीन याला आय.एस्.आय.एस्.चा हस्तक असल्याच्या कारणावरून नुकतीच राजस्थान पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. यापूर्वीही आय.एस्.आय.एस्.साठी काम करणार्‍या अनेक उच्चशिक्षित धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. मग तो बेंगळुरूतील धर्मांध अभियंता असो, मुंबईतील महिला कि कल्याणमधील चार युवक असोत ! मुसलमान समाजाच्या प्रत्येक समाजघटकातून विविध जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच कि काय गुप्तचर यंत्रणा देशभरातील १५० धर्मांध युवकांवर लक्ष ठेवून आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn