Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

टोंक (राजस्थान) येथे मुसलमानांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा !

    काल परवापर्यंत छुप्या मार्गाने आय.एस्.आय.एस्.ला समर्थन देणारे धर्मांध आता उघडपणे समर्थन देऊ लागले आहेत, ही भारतासाठी धोक्याची घंटाच आहे. आय.एस्.आय.एस्. आणि शत्रूराष्ट्र पाक यांचे समर्थन करणे यालाच देशभक्ती म्हणायचे का ?
मोर्च्यात देण्यात आलेल्या देशद्रोही घोषणा !
 •  आय.एस्.आय.एस्. जिंदाबाद !
 •  पाकिस्तान जिंदाबाद !
 •  भारत मुर्दाबाद !
 •  आर्.एस्.एस्. मुर्दाबाद !
    टोंक (राजस्थान) - अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री. कमलेश तिवारी यांनी प्रेषितांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा कांगावा करत येथे काँग्रेसचे नगरसेवक मगरूब यांच्या नेतृत्वाखाली सहस्रो मुसलमानांनी फेरी काढली होती. या वेळी धर्मांधांनी 'आय.एस्.आय.एस्. जिंदाबाद', 'पाकिस्तान जिंदाबाद', 'भारत मुर्दाबाद' अशा देशद्रोही घोषणा दिल्या. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याविरोधात आवाज उठवला असून देशद्रोही घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

रशियाच्या सैन्याच्या आड येणार्यास नेस्तनाबूत करू !

    मॉस्को - आय.एस्.आय.एस्.चा बीमोड करण्यासाठी रशियाने त्याचे सैन्य सिरियामध्ये पाठवले आहे. या सैन्याच्या आड जो कुणी येईल, त्यालाही नेस्तनाबूत करण्यात येईल, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. सुरक्षा विभागासमवेत झालेल्या बैठकीत रशियाच्या सैन्याला पुतीन यांनी तसा आदेशही दिला.

ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथे 'राष्ट्रीय हिंदू आंदोलन'

१. मराठ्यांच्या आदर्श कुटुंबव्यवस्थेला धक्का पोहोचवणार्या आणि इतिहासाचे विकृतीकरण करणार्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटावर बंदी घालावी !
२. तेलंगण शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम रहित करावा !
या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी व्हा !
दिनांक : रविवार, १३ डिसेंबर २०१५ 
वेळ : सायं. ५ वाजता
स्थळ : १. ठाणे : मीरारोड - श्री सरयुमाता चौक, भाजी मार्केट समोर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, मीरा रोड (पूर्व)
२. नवी मुंबई : गुलाब सन्स डेअरी समोर, कोपरखैरणे
३. मुंबई : बिकानेर स्वीट्ससमोर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, भांडुप (पश्चिेम)
संपर्क क्र. : ९२०२०८९५८
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !

जपानच्या पंतप्रधानांची भारत भेट

बुलेट ट्रेनसह आण्विक आणि संरक्षण करारावर स्वाक्षर्याा
 नवी देहली - मुंबई-कर्णावती (अहमदाबाद) मार्गावरील देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे कंत्राट जपानला देण्यात आले. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅाबे भारतदौर्यावर आले असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची हैदराबाद हाऊस येथे भेट घेतली. बुलेट ट्रेन समवेतच अणू आणि संरक्षण क्षेत्रातील उपकरणांच्या खरेदीसंदर्भातील करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी नागरिकांना येत्या मार्च मासापासून भारतात आगमन झाल्यानंतर व्हिसा देण्याची घोषणा केली.

मराठवाड्यातील तरुण 'आय.एस्.आय.एस्.'च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून कसून चौकशी

 • आय.एस्.आय.एस्.च्या हस्तकांनी संपूर्ण देशच पोखरल्याचे द्योतक !
 • शासनाने अशांवर त्वरित कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
सुरक्षेस्तव गुप्तचर यंत्रणेचे पोलिसांना पत्र
     संभाजीनगर, १२ डिसेंबर - गेल्या १० वर्षांत आतंकवादाच्या प्रकरणांत मराठवाड्यातील आरोपींची अनेक नावे पुढे आली आहेत. असे असतांना मराठवाड्यातील काही तरुण आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची भीती गुप्तचर यंत्रणांना आहे. यासाठी गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रानुसार यापुढे संभाजीनगरसह मराठवाड्यातील अन्य शहरांमध्ये घर भाड्याने देणे आणि खरेदी-विक्री करणे यांविषयीची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. संभाजीनगरमध्ये भाडेकरूंची माहिती घेण्याच्या निमित्ताने पोलिसांनी अनेक घरमालकांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. यवतमाळमध्येही काही तरुण  आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्यांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सिमीवर बंदी आणल्यानंतरही मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांत त्यांचे स्लिपर सेल चालू करण्यात आले आहेत. दौलताबादच्या घाटात सापडलेला मोठा शस्त्रसाठा, पुणे येथील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता या ठिकाणचे स्फोट आदींमधील आरोपीचे धागेदोरे मराठवाड्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. (पोलिसांनी जर वेळीच आतंकवादी संघटनांची पाळेमुळे नष्ट केली असती, तर आज ही वेळ आली असती का ? - संपादक) 

६ वर्षांत जम्मू-काश्मीरमधील ८० मंदिरांचा विध्वंस

जम्मू-काश्मीरमधील मंदिरांचा विनाश वेळीच रोखला नाही, तर उर्वरित मंदिरांचेही अस्तित्व धोक्यात येईल !
    नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरे नाहिशी होत असून गेल्या ६ वर्षांत ८० मंदिरे पाडण्यात आली आहेत, अशी माहिती बीजू जनता दलाचे खासदार भर्त्रृहरी मेहताब यांनी ११ डिसेंबर या दिवशी लोकसभेत दिली. तेथील फुटीरतावादी नेत्यांना, जे देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत, त्यांना शासनाकडून सुरक्षा का पुरवण्यात येत आहे, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. (मंदिरे हिंदूंसाठी चैत्यन्याचे स्त्रोत आहेत. या चैत्यन्यामुळे आज हिंदू टिकून आहेत. आज जम्मू-काश्मीरची जी स्थिती झाली आहे, तिच स्थिती अल्प-अधिक प्रमाणात देशात सगळीकडे आहे, त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वावरच गदा येणार आहे. हे थांबवण्यासाठी हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे ! - संपादक)

बांगलादेशमधील हिंदूंची विदारक स्थिती !

      बांगलादेशमध्ये हिंदु स्त्रियांवर प्रत्येक दिवशी बलात्कार होतच असतात. अशा वेळी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्यासाठी त्यांना खूप वेळा विनंती करावी लागते. तक्रार दाखल झाली, तर पीडिता पोलीस ठाण्यामध्ये साक्ष नोंदवायला येत नाही, तसेच तसे कृत्य करणार्‍याला शिक्षाही दिली जात नाही. बलात्काराच्या विरोधात तेथील न्यायालयाने १६ कायदे केले आहेत; मात्र तेही गुळमुळीत असल्याने बलात्कारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पाकच्या शाहीन-३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताचे अग्नी-४ मात्र तुलनेने सरस !
     नवी देहली - पाकने ११ डिसेंबरला अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या शाहीन-३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र २ सहस्र ७५० किलो मीटरपर्यंत आक्रमण करू शकते; पण भारताचे अग्नी-४ क्षेपणास्त्र हे तुलनेने सरस आहे. अग्नी-४ हे ४ सहस्र किलो मीटरपर्यंत आक्रमण करू शकते आणि केवळ २० मिनिटांमध्ये संपूर्ण पाक आणि चीन यांना लक्ष्य करू शकते.

आसाम येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला उत्तम प्रतिसाद

रंगिया (आसाम) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान
हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी हिंदूंनी मतभेद विसरून संघटित व्हावे ! 
- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
      रंगिया (आसाम) - भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांच्यावर अन्याय होत आहे. आय.एस्.आय.एस्. भारतावर आक्रमण करण्याचे नियोजन करत आहे, तर बांगलादेशी मुसलमान लोकसंख्या वाढवून भविष्यातील फाळणीचे नियोजन करत आहेत, अशा वेळी हिंदूंनी आपसांतील मतभेद विसरून संघटित होऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्र साकारू शकतो, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते रंगिया येथील श्री शंकरदेव विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित हिंदुत्ववाद्यांना संबोधित करत होते. या वेळी भारतीय लोकमंचचे श्री. सुधेंदु तालुकदार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल हेही उपस्थित होते.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
      सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.
      मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती त्यांनी सांगितल्या होत्या. रविवार, २९ नोव्हेंबर २०१५ पासून दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रतिदिन त्याची लेखमाला प्रकाशित करत आहोत. त्या माहितीचे पुस्तकही लवकरच प्रकाशित करणार आहोत.
      राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्‍यांना हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कधीतरी कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे. कारागृहात असतांना तेथील कर्मचारी, प्रशासन, पोलीस आणि इतर कैदी इत्यादींनी केलेला छळ, तसेच त्यांच्या संदर्भातील अनुभव आणि साधनेच्या बळावर त्या वातावरणाला कारागृहातील साधकांनी अन् समाजाला त्यांच्या कुटुंबियांनी स्थिर राहून कसे तोंड दिले, हेही या लेखमालेतून क्रमशः प्रकाशित करण्यात येत आहे. याशिवाय निरपराध साधकांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास याचीही माहिती येथे देत आहोत. यामुळे साधनेचे महत्त्वही वाचकांच्या मनावर ठसेल. त्यामुळे असा कठीण प्रसंग स्वतःवर आल्यास ईश्‍वराने आपले रक्षण करावे, यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे, हेही लक्षात येईल.
      याचबरोबर भावी पिढ्यांचे जीवन सुखात जावे, यासाठी एकूण प्रशासनच पालटून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची अनिवार्यता लक्षात येईल.
संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाकडून मंत्री आणि आमदार यांच्या भेटी

हिवाळी अधिवेशन २०१५
समितीकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर 
राष्ट्र-धर्माच्या अनुषंगाने मांडलेल्या प्रश्‍नांच्या पूर्ततेची आश्‍वासने 
आमदार श्री. भरतकुमार गोगावले
आमदार श्री. सुनील प्रभू 

गुलबर्गा येथील उर्दू दैनिकाचा संपादक एजाज अहमद बिहारी हा पाकमधील दाऊदच्या टोळीच्या संपर्कात असल्याचे उघड !

 • राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ सनातन प्रभातवर वारंवार बंदीची मागणी करणारे हिंदुद्वेष्टे देशद्रोह करणार्‍या संबंधित उर्दू दैनिकावर मात्र एका शब्दानेही बंदीची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
 • एजाजच्या छायाचित्रकाराने कर्नाटकातील ३६ महत्त्वाच्या ठिकाणांची काढलेली छायाचित्रे चौकशीच्या फेर्‍यात
     बेळगाव - सध्या अटकेत असलेला गुलबर्गा येथील एका उर्दू दैनिकाचा संपादक एजाज अहमद बिहारी हा पाकमधील दाऊदच्या टोळीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकमधील ३६ महत्त्वाच्या ठिकाणची छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी मरिहाळ पोलिसांनी एजाज आणि त्याच्या दैनिकाचा छायाचित्रकार महंमद हुसेनअली कुरेशी या दोघा धर्मांधांना अटक केली होती. या छायाचित्रांमध्ये सांबरा आणि हुबळी येथील विमानतळांचा समावेश आहे. ही सर्व छायाचित्रे चौकशीच्या फेर्‍यात आहेत.

समीर गायकवाड यांच्यावर सोमवारी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता

कॉ. पानसरे यांच्या हत्येचे प्रकरण
     कोल्हापूर, १२ डिसेंबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर सोमवार, १४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले जाऊ शकते. दोन पोलीस निरीक्षकांनी जवळजवळ ७०० ते १ सहस्र पृष्ठांचे हे आरोपपत्र सिद्ध केले आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अन्वेषण अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक चैतन्या एस्. यांच्याकडून माहिती घेतली, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याशीही चर्चा केली, असे वृत्त दैनिक सकाळने प्रसिद्धीस दिले आहे.

एम्आयएम्च्या हस्तक्षेपामुळे तणाव : दोन गोरक्षकांना दोन दिवस पोलीस कोठडी

हिंदुत्ववाद्यांनी कत्तलीसाठी नेणार्‍या गोवंशांची सुटका केल्याचे प्रकरण !
    मिरज, १२ डिसेंबर (वार्ता.) - १० डिसेंबर या दिवशी रात्री १०.३० हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांनी कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारी गाडी अडवली. हिंदुत्ववादी कार्यकर्ते गोवंशियांना घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आले. त्याच वेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींची बाजू घेऊन धर्मांध एम्आयएम्चे कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. एम्आयएम्च्या कार्यकर्त्यांनी हे गोवंश कागवाड येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगत हिंदुत्ववाद्यांवरच गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. एम्आयएम्च्या हस्तक्षेपामुळे पोलीस ठाण्यासमोर काही काळ तणावाचे वातावरण होते.

सलमान खान आणि सत्य !

      अभिनेता सलमान खान यांच्यावर २८ सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्री लॅण्ड क्रूझर या वाहनाने ५ जणांना चिरडले होते. या प्रकरणी सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना ५ वर्षांची शिक्षा दिली होती; मात्र उच्च न्यायालयाने १० डिसेंबरला सत्र न्यायालयाचा निर्णय रहित केला. या निर्णयासंदर्भात समाजमनात उठलेल्या प्रतिक्रियांचा दैनिक ११ डिसेंबरच्या संपादकीयमध्ये उहापोह करण्यात आला. सद्यस्थितीविषयीचा हा उपाहासात्मक लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

परीक्षेत अल्प गुण मिळाल्याची तक्रार करणार्या विद्यार्थ्याच्या डोक्यात शिक्षकाने घातली आसंदी

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आणि नैतिकतेचे पूर्ण अध:पतन झाल्याचे दर्शवणारी घटना !
     लातूर, १२ डिसेंबर - येथील एका विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत अल्प गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने त्याची तक्रार केली. त्या वेळी शिक्षकाने आसंदी (खुर्ची) घालून विद्यार्थ्याचे डोके फोडले. त्यामुळे त्याला गंभीर जखम झाली आहे. या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (असे हिंसक प्रवृत्तीचे शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ? अशांना बडतर्फच करायला हवे ! - संपादक)
१. इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारा आकाश पिटले याला प्रथम सत्र परीक्षेत भूगोल विषयात ४० पैकी ३४ गुण मिळाले. त्याने भूगोल विषयाचे शिक्षक प्रकाश नीला यांच्याकडे उत्तरपत्रिका पुनर्पडताळणीची मागणी केली.

पिंपरी (पुणे) येथे एका अल्पवयीन विद्यार्थ्याला शाळेत घुसून अज्ञातांकडून मारहाण

असुरक्षित पिंपरी-चिंचवड !
* विद्यार्थ्याला जिवे मारण्याची धमकी 
* पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट
     पिंपरी, १२ डिसेंबर - येथील शिवसेना पिंपरी शहर उपप्रमुख आणि माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे यांचा मुलगा प्रणव लांडे (वय ११ वर्षे) याला ४ जणांनी शाळेत घुसून पुष्कळ मारहाण केली. आगामी निवडणुकीत तुझ्या वडिलांनी अधिक नाटक केले, तर तुला जिवे मारू, अशी धमकीही दिली. ही घटना येथील एस्.एन्.बी.पी. आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये १० डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे येथे मयूर रानवडे, दर्शन रानवडे आणि इतर दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
   शाळेतील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा अपलाभ घेत सर्व आरोपी शाळेत शिरले. (यामुळे आता शाळांतील सुरक्षित वातावरणही धोक्यात आले आहे, असे लक्षात येतेे. - संपादक) त्यांनी तिसर्या मजल्यावरील इयत्ता ६ वीच्या वर्गात जाऊन प्रणवला बाहेर बोलावले आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खाली वाहनतळाच्या ठिकाणी आणले. त्यांनी प्रणवला धमकी देऊन शाळेतून पलायन केले.

बिजनौरमध्ये कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड

 • अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळावर साधा रंग उडाला, तरी ते कायदा हातात घेतात आणि जनतेला वेठीस धरतात; परंतु देशभरात प्रतिदिन कुठेनाकुठे मंदिरांची तोडफोड केली जात असतांना हिंदूंकडून साधा निषेधही नोंदवला जात नाही !
 • उत्तरप्रदेशमध्ये मंदिरे असुरक्षित
      बिजनौर (उत्तरप्रदेश) - येथील हुतात्मा तीन मार्गावर असलेलल्या प्राचीन मंदिरातील काली माचेच्या मूर्तीची १० डिसेंबर या दिवशी अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. दुसर्‍या दिवशी सकाळी मंदिराचे पुजारी नित्यानंद महाराज मंदिराची स्वच्छता करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली.

ठाणे उपजिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

कापूरबावडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना (उजवीकडे) निवेदन देतांना
    ठाणे, १२ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी, पोलीस आयुक्त श्री. परमवीर सिंह, तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कळवा, नौपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि राबोडी येथील पोलीस ठाण्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी सर्वश्री निशिकांत साखरेकर, भूषण गुंड, मुकुंद घाणेकर, अतुल देव, सौ. राधा सुर्वे, सौ. धनश्री केळशीकर आणि सौ. चांगण उपस्थित होत्या.

बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या विरोधात नंदुरबारमध्ये हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

     नंदुरबार - बाजीराव-मस्तानी या चित्रपटातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास विकृतपणे मांडण्यात आला असल्याने या चित्रपटाला बंदी घालावी, तेलंगणा शासनाने नाताळनिमित्त हाती घेतलेला उपक्रम रहित करावा, या मागण्यांसाठी नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत विविध संघटनांनी एकत्र येऊन निदर्शने केली.

'बाजीराव मस्तानी' या हिंदुद्रोही चित्रपटातील चुकीचा इतिहास न पालटल्यास तो बंद पाडणार !

धर्माभिमान्यांच्या शनिवारवाडा येथील बैठकीतील चेतावणी !
संजय भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले, तसेच पुतळ्याचे दहन केले
     पुणे, १२ डिसेंबर (वार्ता.) - इतिहासाची मोडतोड करून बाजीराव पेशवे यांचा अवमान करणार्या  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटातील इतिहासद्रोही दृश्ये न वगळल्यास या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात येईल, अशी सणसणीत चेतावणी या चित्रपटाच्या विरोधात शनिवारवाडा येथे पार पडलेल्या विविध संघटनांच्या बैठकीत देण्यात आली. या बैठकीनंतर संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळ्याचे दहन करण्यात आले.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर येथे निवेदने

     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १२ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी येथे ११ डिसेंबर या दिवशी प्रांत कार्यालयात साहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना, तर पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. डॉ. कुणाल यांनी आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू असे सांगितले, तर पोलीस निरीक्षकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून आवश्यक ती कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिले. या वेळी श्री. शिवानंद धनवडे, श्री. दत्तात्रय पाटील, सौ. रंजना पाटील, सौ. लतिका साबळे, सौ. पेडणेकर, श्रीमती ज्योती देसाई उपस्थित होत्या.

भारतातून गेलेल्या हिंदु-शीख यात्रेकरूंवर जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण

 • बांगलादेशमध्ये भारतातून गेलेल्या हिंदूंवर झालेल्या या आक्रमणाविषयी भारतीय राज्यकर्ते बांगलादेश शासनाला खडसवणार का ?
 • बांगलादेशमध्ये हिंदूंच्या संदर्भात वाढती असहिष्णुता
     ढाका - बांगलादेशच्या चितगाव येथून ढाका शहरातील गुरुद्वाराकडे निघालेल्या भारतातील ३२ हिंदु-शीख यात्रेकरूंच्या पथकावर येथील जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. जिहादींनी काही यात्रेकरूंना सुर्‍यांनी भोसकले आणि यात्रेकरूंचे सुमारे ४५ सहस्र रुपये लुटले.

फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोही घोषणा देणार्यांना रोखू न शकणारे प्रशासन 'आय.एस्.आय.एस्'.च्या  आतंकवाद्यांना कसे रोखणार ?
    राजस्थानातील टोंक येथे काँग्रेसचे नगरसेवक मगरूब यांच्या नेतृत्वाखाली सहस्रो मुसलमानांनी फेरी काढली होती. या फेरीत धर्मांधांनी 'आय.एस्.आय.एस्. जिंदाबाद', 'पाकिस्तान जिंदाबाद', 'भारत मुर्दाबाद' अशा भारतविरोधी घोषणा दिल्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Rajasthan ke Tonk me Musalmanonki raly me lagaye gaye ISIS ke samarthan me nare. - kya ham Bharat ka Siriya hone denge ?
जागो ! : राजस्थान के टोंक में मुसलमानोंकी रॅली में लगाये गये आय.एस्.आय.एस्.के समर्थन में नारे. - क्या हम भारत का सिरिया होने देंगे ?

राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर अन्याय होऊ देणार नाही ! विष्णु सावरा, आदिवासी विकासमंत्री

मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचे आश्वासन ! 
उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री. रवींद्र वायकर (डावीकडून पहिले)
  
आदिवासी विकासमंत्री श्री. विष्णु सावरा
  नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) - राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर अन्याय होऊ देणार नाही. याविषयी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवीन, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री श्री. विष्णु सावरा यांनी दिले. 'राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर होत असलेल्या खोट्या आरोपांच्या संदर्भातील वास्तव आणि संस्थेला गुन्ह्यात गुंतवण्याचे षड्यंत्र रचणार्यांवर शासनाकडून कारवाई करण्यात यावी', या मागणीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने त्यांना दिले. 
     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे, समितीचे कार्यकर्ते श्री. सचिन वैद्य उपस्थित होते.

स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती नको होती !

सोनिया गांधींनी पंतप्रधान पद न दिल्यासंबंधी शरद पवार यांचा दावा
     नवी देहली - पंतप्रधान पदावर स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती नसावी, तर आपले नियंत्रण असणारी व्यक्ती सोनिया गांधी यांना हवी असल्याने वर्ष १९९१ मध्ये पंतप्रधानपदी पी. नरसिंह राव यांची नियुक्ती केली गेली, असा दावा शरद पवार यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षसोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला.
जावेद अहमद हे सौदी अरबचे नवे राजदूत

     नवी देहली - सौदी अरबमधील भारताचे नवे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौदी अरबकडून जावेद यांच्या निवडीला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. येत्या काही दिवसात ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील.

सनातन संस्थेचा नव्हे, तर हिंदु धर्माचाच द्वेष करणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र !

अंनिसवाल्यांनी तोडलेले अकलेचे तारे आणि हे म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !
श्री. चेतन राजहंस
       महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धर्मद्रोही विचारांचे मुखपत्र म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ! या वार्तापत्रात नेहमीच हिंदु धर्मद्वेषापोटी सनातन धर्मसंस्कृती अन् परंपरा, तसेच सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्था यांवर धर्मद्रोही टीका केली जाते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २००० या वर्षीच्या वार्षिक विशेषांकात मठ्ठ, बुरसटलेली मानसिकता जपणारी सनातन संस्था ! या शीर्षकाखाली १५ पानी (वार्तापत्राचे पृष्ठ ७६ ते ९१) लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख जुना असला, तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सनातन संस्थेविषयीचे आक्षेप आजही तेच आहेत; म्हणून आमच्या वाचकांसाठी त्यातील उतारे वैचारिक प्रतिवादासह प्रसिद्ध करत आहोत. 
      आज १५ वर्षांनंतर लक्षात येईल की, आतापर्यंत सनातन संस्थेविषयी अंनिस करत असलेला हा अपप्रचार जर खरा असता, तर सनातन संस्था केव्हाच रसातळाला गेली असती; पण तसे घडले नाही; कारण ती नावाप्रमाणेच सनातन (नित्य नूतन) आहे आणि पुढेही राहील.
संकलक : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

वैज्ञानिक प्रयोगाद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीमध्ये चैतन्य आणि ऊर्जास्रोत असल्याचे पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी अंनिसवाल्यांना सिद्ध करून दाखवणे

१. समाधी घेतलेल्या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज शरीररूपाने समाधीत असायला 
हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी 
ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवणे 
पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल
संत ज्ञानेश्‍वर
  वर्ष १९७२ मध्ये अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीविषयी वाटले, जर संत ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे. जिवंत समाधीविषयी म्हणजे संजीवन समाधीविषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.
      देशभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, त्यागाची निष्ठा यांच्या प्रसूतीवेदना हिंदुस्थानला जोपर्यंत जाणवणार नाहीत, तोपर्यंत आपण स्वातंत्र्यविश्‍वाच्या त्रिखंडात टिकणार नाही. आजचा सुशिक्षित समाज अशाच क्षुद्र विचारांचा झाला आहे. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान गुन्हा करण्याची बुद्धी आहे, तर वय लहान असले, तरी गुन्ह्याविषयी शिक्षा करणे आवश्यक !

      १६ डिसेंबर २०१२ या दिवशी देहलीमध्ये निर्भयावर सामुहिक बलात्कार झाला होता. या घटनेतील महंमद अफरोज नावाचा राक्षस (पशू) याने प्रथम निर्भया आणि तिचा मित्र यांना बसमधून जाण्यासाठी पटवले. त्यानंतर पाच राक्षस आणि अफरोज मिळून सर्वांनी निर्भयावर बलात्कार केला, त्या वेळी अफरोजने निर्भयाच्या योनीत लोखंडी सळी घुसवली होती. प्रमुख अपराधी अफरोज, या घटनेच्या वेळी सतरा वर्षांचा असल्याने भारताच्या कायद्यातील पळवाटांमुळे (जुवेनाईल अ‍ॅक्ट) ना केवळ फाशीच्या शिक्षेतून वाचला, तर संपूर्ण देशातील आई-वडिलांसाठी काळजीची गोष्ट अशी की, डिसेंबर २०१५मध्ये त्याला बालसुधारगृहातून घरी पाठवण्यात येणार आहे. अगदी सुरक्षित, कोणतीही शिक्षा न देता ! - श्री. सुरेश चिपळूणकर, संकेतस्थळ स्तंभलेेखक

कलबुर्गी यांच्या कुटुंबियांचे संघ परिवाराकडून सांत्वन !

      पुरोगामी विचारवंत एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याविषयी दु:ख व्यक्त केले असून कलबुर्गी यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र लिहिले आहे. संघाचे स्थानिक नेते श्रीधर नडीगर आणि हर्षवर्धन शीलवंत यांनी कलबुर्गी यांची पत्नी उमादेवी यांना भेटून शोकसंदेशाचे पत्र त्यांच्या हाती दिले.

अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेणार्‍या राजकारण्यांना हटवा !

      कोणत्याही मंदिरावर आघात झाला, तर त्याचे दु:ख आपल्याला व्हायला हवे. याविरोधात आपण पेटून उठले पाहिजे. चर्च, मशीद यांना हात लावण्याचे धाडस शासन करत नाही; पण हिंदूंची घुमटी, मंदिरे शासन वाहतुकीला अडचण ठरतात; म्हणून पाडून टाकली जातात. अल्पसंख्यांकांचे हित लक्षात घेऊन राजकारणी निर्णय घेतात. - श्री. नारायण राठवड, सचिव, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तळपता सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर !

     स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा, राष्ट्र, धर्म, अस्पृश्यतानिवारण, मानवजातीचे कल्याण, कविता, नाटक आदी कोणताही विषय पादाक्रांत केला नाही, असे झालेले नाही. प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे प्रचंड धाडस असलेले स्वा. सावरकर हे दूरदृष्टी असलेला तळपता सूर्य होते आणि म्हणून ते पचनी पडणे अनेकांना फार कठीण झाले. - श्री. शरद पोंक्षे, सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत

गोमातेच्या रक्षणासाठी मरण्याची आणि मारण्याचीही सिद्धता आहे ! - आमदार टी. राजासिंह, भाजप

      गोमातेचे रक्षण करण्यासाठी आम्ही काहीही करायला सिद्ध आहोत. मरण्याची आणि मारण्याचीही आमची सिद्धता आहे. भाग्यनगरमध्ये कुणी बीफ फेस्टिव्हल (गोमांस उत्सव) आयोजित करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे भयंकर परिणाम दिसतील, अशी चेतावणी भाजपचे गोशामहल येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली. या प्रकरणी राजासिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यनगरमधील उस्मानिया विश्‍वविद्यालयातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी आणि काही शिक्षक प्रभृतींनी गोहत्या बंदीच्या विरोधात १० डिसेंबर या दिवशी बीफ फेस्टिव्हल आयोजित केले होते. या फेस्टिव्हलला राजासिंह यांनी कडाडून विरोध केला.

(म्हणे) भारतात सध्या मुसलमानांपेक्षा गाय अधिक सुरक्षित !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे लोकसभेतील वक्तव्य
      आपल्या देशात सध्या मुसलमानांपेक्षा गाय अधिक सुरक्षित आहे, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत केले. देशातील वाढती असहिष्णुता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, अशी चेतावणीही थरूर यांनी दिली. असहिष्णुतेच्या विषयावर बोलतांना थरूर यांनी मोदी शासनाच्या मेक इन इंडिया योजनेवर जोरदार टीका केली.

माशेल येथे चित्रपटगृहात चार राखीव दलाच्या पोलिसांचा दादागिरी करण्याचा प्रयत्न, चित्रपटगृहाचीही मोडतोड !

जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस !
        माशेल (गोवा) येथील सिने वर्ल्ड या चित्रपटगृहात ४ डिसेंबरच्या रात्री भारतीय राखीव पोलीस दलाचे दोन पोलीस कर्मचारी, तर गोवा राखीव दलाचे दोन कर्मचारी यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच चित्रपटगृहाची मोडतोडही केली. चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍यांनी या चारही पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली आहे. अदखलपात्र गुन्हा म्हणून हे प्रकरण नोंदवण्यात आले असून या संबंधीचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवला जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली आहे. हे वृत्त दैनिक नवप्रभा या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. उपरोल्लेखित चित्रपटगृहात हेट स्टोरी-३ हा चित्रपट लागला होता. खेळ चालू होण्याच्या काही वेळ आधी चार जण चित्रपटगृहात आले. त्यांनी १२० रुपयांची एकाच रांगेतील चार तिकिटे मागितली. कक्षातील कर्मचार्‍याने १२० रुपयांची एकाच रांगेतील चार तिकिटे उपलब्ध नसल्याचे सांगितले. ते ऐकून त्यांनी चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारातील चित्रपटाचे पोस्टर, चित्रपटांचे वेळापत्रक आणि तिकीट कक्षाच्या काचा बुक्का मारून फोडून टाकल्या. 

वारकरी संप्रदायाचे सनातनप्रेम !

      कथित पुरो(अधो)गाम्यांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांवर बंदी घालू नये !, असा ठराव ८ डिसेंबर २०१५ या दिवशी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित १२ व्या वारकरी महाअधिवेशनात पारित करण्यात आला.

दैव देते आणि कर्म नेते, ही म्हण सार्थ ठरवणारे मूढ भारतीय !

     मध्यप्रदेशात शासनाने शाळांमध्ये सूर्यनमस्कार चालू केल्यावर त्याला हिंदुत्वाचे राजकारण म्हटले जाते. योगासनांना अमेरिकेत काही प्रमाणात विरोध झाला; मात्र तेथील शासनाने या विरोधाला भीक घातली नाही. भारतात मात्र जर राष्ट्रपती भवनासमोर कुणी योग शिबिरे आयोजित केली असती, तर भारत शासनाने ती बंद पाडून येथे योगासने करू नयेत, असा फलक लावला असता.

इसिसला संपवण्याची ओबामांची घोषणा पोकऽऽळ !

     इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिसला संपवायचे, तर ही संघटना ज्या देशांकडून पोसली जात आहे, त्यांनाही खडसवायला हवे; पण अमेरिकाच या देशांना आणि या संघटनेशी संबंधितांना रसद पुरवत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांना विरोध करून अमेरिका इसिसलाच अधिक बळ देत आहे.
- ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद व्य. गोखले
     पॅरिसवर गेल्या मासात आतंकवाद्यांनी केलले आक्रमण वा अमेरिकेत कॅलिफोर्नियात सॅन बर्नाडिनोला सय्यद रिझवान फारूक आणि तश्फीन मलिक या पती-पत्नीने केलेले आक्रमण, ही दोन्ही आक्रमणे एकाच पद्धतीच्या आतंकवाद्यांकडून झाली होती, यात शंका नाही.

मुसलमान नागरिक अयोध्येचा दावा सोडतील, या भ्रमात न रहाता शासनाने हिंदूंनी दिलेल्या बहुमताचा लाभ घेत हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात !

     मुसलमानांनी अयोध्येवरील, तसेच काशी आणि मथुरा यांवरील त्यांचा दावा सोडून द्यावा. - भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार विनय कटियार

भाजपच्या ५०० मुसलमान उमेदवारांपैकी ४९० उमेदवार पराभूत

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
       गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुसलमान उमेदवारांना तिकीट देण्याचा भाजपचा प्रयत्न साफ फसला. स्थानिक नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या ५०० उमेेदवारांपैकी ४९० मुसलमान उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे केवळ १० उमेदवारच या निवडणुकांमध्ये विजयी होऊ शकले.

अशा अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देणार्‍या पर्यटनाचा काय उपयोग ?

      गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे असुरक्षित लैंगिक संबंध हेच एच्आयव्ही संसर्गाचे प्रमुख कारण आहे. - आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, गोवा
      यावरून गोव्यात कसले पर्यटन चालते ते जनतेने लक्षात घ्यावे ! 

आरक्षण देशासाठी घातक ! - गुजरात उच्च न्यायालय

आरक्षण संस्कृतीची पाठराखण करणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन 
घालणारे गुजरात उच्च न्यायालयाचे उद्गार !
      जर आपल्याला कुणी विचारले की, देशाला उद्ध्वस्त करणार्‍या किंवा प्रगती रोखणार्‍या २ गोष्टींची नावे सांगा, तर त्या आहेत आरक्षण आणि भ्रष्टाचार, असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती जे.एस्. पारदीवाला यांनी पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या विषयीच्या खटल्याच्या संदर्भातील सुनावणीच्या वेळी निकाल देतांना आरक्षण आणि भ्रष्टाचार या दोन सूत्रांना देशविघातक, असे संबोधले. 

सनातनच्या साधकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ! - वारकरी संप्रदाय

     सनातन संस्था हा जणू ईश्‍वराचा दरबारच आहे. विखुरलेल्या हिंदूंना एकत्र करण्याचे काम ही संस्था करत आहे. या संस्थेच्या साधकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे सांगत उपस्थित वारकर्‍यांनी ८ डिसेंबर २०१५ या दिवशी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित १२ व्या वारकरी महाअधिवेशनात सनातन संस्थेला भरभक्कम पाठिंबा घोषित केला.

पुणे येथील भामचंद्र डोंगराचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन !

हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांवरील आघातांना वैध मार्गाने आणि संघटितपणे वेळीच विरोध न 
केल्यास संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर भुईसपाट होईल !
तक्रारीनंतरही जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष !
     संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि शासनाकडून वर्ष २०११ पासून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या भामचंद्र डोंगराचे (जिल्हा पुणे) खाणमाफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन होत आहे. हे उत्खनन थांबवण्यासाठी प्रयत्नरत असलेले ह.भ.प. मधुसूदन पाटील महाराज यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत, तरी त्यास कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

(म्हणे) भारतीय न्यायप्रणालीवर बहिष्कार टाका ! - मुसलमान धर्मगुरु

ही वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
भारतात राहून सुविधा लाटणार्‍या; मात्र घटनेला विरोध करणार्‍या धर्मांधांची 
देशद्रोही वृत्ती तथाकथित निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?
      सर्वोच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणी निर्णय देतांना भारतात समान नागरी कायदा कधी लागू करणार ?, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. याविषयी देशातील मुसलमानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जयपूर येथे झालेल्या एका बैठकीत देशातील मुसलमानांनी त्यांचे खटले भारतीय न्यायालयापुढे न चालवता भारतीय न्यायप्रणालीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन मुसलमान धर्मगुरूंनी केल्याचे वृत्त एका उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

सुसज्ज बंगलो रो हाऊस विकणे आहे !

    पुण्यात तळेगावच्या निसर्गरम्य परिसरात भरवस्तीत, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टे., बँका आदींपासून कमी अंतरावर, कायदेशीर, सर्व सोयींनी सुसज्ज बंगलो रो हाऊस विकणे आहे. साधक आणि वाचकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध. संपर्क : ९३२२७३३१७०

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे सनातनच्या साधकाच्या नेत्ररुग्णालयासाठी (पुरुष) नेत्रतज्ञाची आवश्यकता.

    सनातनच्या साधकास प्राधान्य. पात्रता, अनुभव आणि अपेक्षित पगार तसेच भ्रमणभाष क्रमांकासह या संगणकीय पत्त्यावर त्वरित संपर्क करा : siddhiey@gmail.com

पेण (रायगड) येथे जाहीर 'हिंदु धर्मजागृती सभा'

    निधर्मीपणाच्या नावाखाली भारतात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे, तर बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. धर्मांतर, गोहत्या, हिंदुविरोधी कायदे, लव्ह जिहाद, हिंदु संतांची अपकीर्ती, देवतांची विटंबना, आतंकवाद, दंगली यांसारख्या समस्या वाढतच चालल्या आहेत. या सर्व समस्यांविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
स्थळ : श्री रामेश्वनर मंदिर सभागृह, हनुमान आळी, पेण, रायगड
दिनांक : रविवार, १३ डिसेंबर २०१५, सायं. ५ वाजता    संपर्क क्र. : ८४५०९५०४६६

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष करणार्‍या धर्मांध नेत्यांना चेन्नईतील मुसलमान तरुणीची सणसणीत चपराक !

 
पूरग्रस्तांना शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करतांना स्वयंसेवक
    चेन्नईतील महापुराच्या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे राष्ट्रकार्य करून तेथील लोकांना धीर दिला आहे. तेथील रूबिना खान या मुसलमान तरुणीला आलेला अनुभव तिने www.fighterpress.com वर प्रसिद्ध केला आहे. त्यानिमित्ताने देशभरात सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारे काँग्रेसवाले, ओवैसी बंधू, शाहरूख खान आणि अमीर खान यांचे खरे स्वरूप जगासमोर आले आहे.
     चेन्नईत आलेल्या महापुरामुळे येथील स्थिती पुष्कळ वाईट झाली आहे. त्यातच एके दिवशी सकाळी मी खाकी चड्डी घातलेल्या लोकांना पूरग्रस्त भागात फिरतांना पाहिले.

चेन्नईतील पूरग्रस्तांना भारतीय सैन्याच्या बरोबरीने हिंदुत्ववादी संघटनांचा आधार !

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना हिंदु इलयंगार एळूची पेरवई चे कार्यकर्ते

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना  हिंदु मक्कल कत्छी चे कार्यकर्ते

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना  हिंदु मक्कल मुन्नानी चे कार्यकर्ते
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना  शिवसेनेचे कार्यकर्ते
     चेन्नईत गेल्या १०० वर्षांत पडला नव्हता, तेवढा पाऊस गेल्या काही दिवसांत पडल्याने तेथे हाहाःकार माजला. शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि खाजगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. ३०० हून अधिक जणांचा या पुरात बुडून मृत्यू झाला.

समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता यांचे थोतांड अन् दलित शब्दाभोवती घुटमळणारे भोंगळ जातीयवादी राजकारण !

घटनेच्या सारनाम्याचे पहिले पान
श्री. संजय राऊत
 आजवरच्या काँग्रेसी जातीयवादी राज्यकर्त्यांची भोंगळ धर्मनिरपेक्षता आणि स्वार्थांधता यांचा बुरखा फाडणारा लेख विशेषत्वाने हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
   
श्री. संजय राऊत, खासदार, शिवसेना आणि कार्यकारी संपादक, दैनिक सामना
     समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घटना समितीने स्वीकारले नव्हते, तर दलित या शब्दास राज्यघटनेत आधार नाही. घटनेत जे शब्द नाहीत, त्यांचा वापर कायद्याने थांबेल का?
१. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसची कल्पना असणे; 
मात्र पंडित नेहरूंनाही त्याचे महत्त्व नसणे !

शासकीय रुग्णालयातही कोणीतरी चांगले आहे !

   
श्री. राम होनप
अपघातात अस्थिभंग झाल्यानंतर मी एका शासकीय रुग्णालयात भरती होतो. तेथील शिपाई, परिचारिका आणि काही आधुनिक वैद्य रुग्णांशी चढ्या आवाजात, चिडून आणि उद्धटपणे बोलतात, असे अनुभव अनेक रुग्णांना आले आहेत. याला अपवाद होता, तो एका परिचारिकेचा ! ती सर्व रुग्णांची हसून आणि प्रेमाने विचारपूस करत होती, तसेच रुग्णांची सेवा मनापासून करत होती. मी रुग्णालयात दोन वेळा भरती झालो, तरी मला त्या परिचारिकेचा तसाच अनुभव आला. कितीही घाई आणि तातडीची कामे असली, तरी ती सर्व रुग्णांशी प्रेमाने वागत होती. हा अनुभव चिखलात कमळ उमलल्याप्रमाणे होता.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०१५)

भविष्यात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रगीत म्हणण्याची आवश्यकता नाही, असे एम्.आय.एम्.वाल्यांनी म्हटल्यास नवल वाटायला नको !

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची आवश्यकता 
नाही ! - इम्तियाज जलील, आमदार एम्.आय.एम्.
       श्रीनगरमध्ये पाकचे झेंडे लावणे, पाकचे राष्ट्रगीत गाणे, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणे, देशद्रोह्यांच्या प्रेतयात्रेस जाणे, जिहाद्यांना पाठीशी घालणे, मदरशांमध्ये तिरंगा न फडकवणे, ही मानसिकता असणार्‍यांना भारतीय राष्ट्रगीताचे महत्त्व काय कळणार ?

स्त्रीला देवतेच्या रूपात पूजणारा हिंदु धर्म त्यांना जिवंत जाळेल का ?

      आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत आहेत; मात्र हे करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांना शेणाचे गोळे झेलावे लागले. वर्ष १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा लागू झाला. त्याआधी बाईला जिवंत जाळणे, हा धार्मिक अधिकार मानला जायचा. - मुक्ता दाभोलकर, अनिस

भारतात न्यायप्रणालीची ही स्थिती होऊ देणारे उत्तरदायी हे गुन्हेगार नव्हेत का ?

१. महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये एकूण २९ लक्ष ५१ सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या ३ लक्ष ७६ सहस्रांहून अधिक आहे. यांमधील अनेक खटले ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.

खेळण्यांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून त्यांतून हिंदु राष्ट्राची पहाट पहाणार्‍या बालसाधिकांचे भावविश्‍व

कु. ऐश्‍वर्या जोशी
     लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे सुंदर बालपण ! बालपणीच्या त्या रम्य आठवणीत मोठा भाग असतो, तो आपल्या खेळण्यांच्या आठवणींचा ! आपण सर्वच जण लहानपणी खेळण्यांशी खेळलेलो असू; परंतु बालसाधिका कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे) आणि कु. अमृता मुद्गल (वय १३ वर्षे) यांचा खेळण्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपल्याला अंतर्मुख करतो. प्रत्येक खेळणे आपल्याला आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देते. पुढील लेखातून या बालसाधिकांनी त्यांच्या प्रत्येक खेळण्याच्या माध्यमातून आपल्याला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात काही मार्गदर्शक संदेश दिले आहेत, ते पाहूया. 

पू. सौरभ जोशी यांच्याभोवती चांगले वलय दिसत असून त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्‍चितच लाभ होईल, असे संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी सांगणे

शाम मानवांसारख्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
    संमोहन तज्ञ श्री. मनोहर नाईक आणि त्यांचे सहकारी १९.११.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत हे त्यांना घेऊन पू. सौरभदादा यांना भेटण्यासाठी आले. ते येताच पू. सौरभदादा यांनी या असे म्हटले. पू. सौरभदादा यांना पहाताच श्री. नाईक यांनी हात जोडले. त्यानंतर आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत त्यांना पू. सौरभदादा यांच्याविषयी सांगतांना म्हणाले, बाह्यतः हे बहुविकलांग दिसत आहेत; परंतु आध्यात्मिक दृष्टीने उन्नत आहेत. ते संत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही माहिती नसतांना तुमचे हात जोडले गेले. यावर श्री. नाईक म्हणाले, त्यांच्याभोवती वलय (ऑरा) दिसत आहे. चांगले आहे. त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा पुढे निश्‍चितच लाभ होईल. - श्री. संजय जोशी (पू. सौरभदादा यांचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१५)

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्वेरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध  दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ    : 'आश्रम माझा नाही' म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. 'मी आश्रमाचा आहे' म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.               
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

कलियुगातील मानव मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या अधोगतीला जाऊन आदिमानवासारखा होत असतांना म्हणे 'आदिमानवाचा (जंगली मानवाचा) पुढे प्रगत मानव झाला !'

परात्पर गुरु डॉ. आठवले
'ईश्वरापासून दूर असलेल्याला आदिमानव (जंगली मानव) म्हणतात. विविध युगांत मानवाची स्थिती पुढीलप्रमाणे होती.
१. सत्ययुग : अखंड साधनारत असल्याने देवाशी एकरूप असे.
२. त्रेतायुग : साधना थोडी अल्प होऊ लागल्याने वेद, उपनिषदे इत्यादींच्या माध्यमांतून ज्ञानयोगानुसार अध्यात्म आणि साधना शिकवावी लागली.
३. द्वापरयुग : ज्ञानयोगानुसार अध्यात्म समजणे आणि साधना करणे कठीण झाल्यामुळे पुराणांच्या माध्यमातून भक्तीयोग समजवावा लागला.
४. कलियुग : कलियुगात अधोगती होण्याची पुढील कारणे आहेत.
अ. 'देवच नाही', असे विज्ञानवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणतात.
आ. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) घातलेली बंधने चालतात; पण स्वेच्छेच्या आड येतात; म्हणून साधनेतील बंधने चालत नाहीत.
    वरील दोघांच्या शिकवणीमुळे मानव अध्यात्म आणि साधना यांच्यापासून बराच दूर गेल्यामुळे खर्या अर्थाने कलियुगातील मानवच आदिमानव (जंगली मानव) होत आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१५)           

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धडाडीची चळवळ !

संपादकीय 
      काही प्रख्यात आणि धाडसी मुस्लिम नेत्यांनी एकत्र येऊन ४ डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मुस्लिम सुधारणा चळवळ (इंटरनॅशनल मुस्लिम रिफॉर्म मुव्हमेंट) या नावाची संघटना स्थापन केली. त्यामुळे वर्तमान काळात इस्लामसमोर जी आव्हाने उभी राहिल्यासारखी वाटतात, त्यावर उत्तरे शोधण्याची आशा काही प्रमाणात का होईना पल्लवित झाली आहे. या संघटनेच्या घटनेतच ती पुरोगामी, तर्कशुद्ध आणि आधुनिक विचारसरणीची राहील, असे सांगून मुस्लिमांसह सर्व धर्मियांना संघटनेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघटनेचा मूळ उद्देश इस्लामच्या आत्म्यासाठी लढा देणे असा नमूद करण्यात आला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn