Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. परशराम पांडे महाराज यांचा आज वाढदिवस

आय.एस्.आय.एस्.चा हस्तक महंमद सिराजुद्दीन यास जयपूर येथे अटक !

  • फितुरी करणार्‍या धर्मांधांना कठोरात कठोर शासन करा ! निधर्मी प्रसारमाध्यमे आता यावर चर्चासत्र घेतील का ?
  • सिराजुद्दीन इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक
     जयपूर (राजस्थान) - इराकस्थित आय.एस्.आय.एस्. (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) या क्रूर जिहादी आतंकवादी संघटनेचा हस्तक असणारा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक महंमद सिराजुद्दीन यास जयपूर येथे अटक करण्यात आली. सिरियासारख्या अनेक मुसलमान राष्ट्रांतील नागरिकांशी त्याचे संबंध आहेत.

इस्कॉन मंदिरावर जिहाद्यांचा गोळीबार

  • दादरी आणि देहली चर्च प्रकरणांवरून देशात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करणारी प्रसारमाध्यमे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविरोधात काहीच का बोलत नाहीत ?
  • बांगलादेशमध्ये हिंदूंच्या संदर्भात वाढती असहिष्णुता
     दिनाजपूर (बांगलादेश) - येथील कहारोले भागातील इस्कॉन मंदिरावर १० डिसेंबरच्या रात्री दोन दुचाकी वाहनावरून आलेल्या ५ जिहादी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, तसेच मंदिराच्या दिशेने क्रुड बॉम्बही फेकला; परंतु तो फुटला नाही. गोळीबारात मात्र मिथुनचंद्र आणि रोनोजित चंद्र रॉय हे घायाळ झाले. स्थानिक लोकांनी आक्रमणकर्त्यांपैकी सफायत नावाच्या जिहाद्याला पकडले. त्याच्याकडून क्रुड बॉम्ब जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांत मंदिरांवर बॉम्ब फेकणे आणि गोळीबार करणे या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

मुसलमानांना १ सहस्र ७०० ऑटोरिक्शांची खैरात !

तेलंगण शासनाकडून जनतेच्या पैशांचा दुरुपयोग ! 
भाग्यनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तेलंगण शासनाचा लांगुलचालनाचा प्रयत्न !
     भाग्यनगर - भाग्यनगर शहरात आधीच १ लाख २० सहस्र ऑटोरिक्शांची गर्दी झाली असून आता नवीन ऑटोरिक्शांना अनुमती देण्यात येऊ नये, असे मत एकीकडे पोलिसांनी व्यक्त केले असतांना तेलंगण शासनाने मात्र मुसलमान समाजासाठी १ सहस्र ७०० नवीन ऑटोरिक्शांना अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. एका मासात होणार्‍या भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

आतंकवादी डेव्हिड हेडली बनला माफीचा साक्षीदार !

मुंबईवरील २६/११च्या आक्रमणाचे प्रकरण
      मुंबई - मुंबईवरील २६/११च्या आक्रमणाच्या प्रकरणी पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी आतंकवादी डेव्हिड हेडली याला विशेष न्यायालयाने माफीचा साक्षीदार केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून तपासाला अधिक वेग येण्यास साहाय्य होणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या या आक्रमणात १६६ जण ठार झाले होते. 
(उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच असतो ! मुंबईवरील आक्रमणाचा खटला गेल्या ७ वर्षांपासून चालू आहे. हा खटला कधी संपणार आणि आरोपींना शिक्षा कधी होणार ? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे ! - संपादक)

देहलीत नव्या डिझेल वाहनांवर बंदी घाला ! - राष्ट्रीय हरित लवाद

केजरीवाल यांच्या सम-विषम क्रमांकाच्या
 निर्णयावरही लवादाकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित
      नवी देहली - राजधानी देहलीतील भीषण प्रदूषणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा एक भाग म्हणून येथे यापुढे नव्या डिझेल वाहनांची नोंदणी बंद करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने ११ डिसेंबर या दिवशी दिला. १ जानेवारीपासून देहलीत एकदिवसाआड सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना रस्त्यावर रहाण्याची अनुमती देण्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. हरित लवादाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, प्रदूषण रोखण्यासाठीचा तातडीचा उपाय म्हणून डिझेलवर चालणार्‍या नव्या वाहनांची नोंदणी बंद करण्याचे आणि १० वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य शासनानेही त्यांच्या विभागांसाठी डिझेलची नवी वाहने खरेदी करू नयेत. १० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या डिझेलच्या वाहनांच्या नोंदणीची मुदत संपल्यावर त्याची पुनर्नोंदणी करण्यात येऊ नये.

लुटण्याच्या बाबतीत चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षाही आर्टीओवाले भयंकर !

केंद्रीय मंत्र्यांनी टीका करून न थांबता वाहतूक विभागाची 
ही दुःस्थिती पालटावी, ही जनतेची अपेक्षा !
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची टीका
      नवी देहली - वाहतूक विभाग हा देशात सर्वाधिक भ्रष्ट असून त्यांनी मोठ्या प्रमाणात लूट चालवली आहे. लुटण्याच्या बाबतीत वाहतूक विभाग चंबळ खोर्‍यातील डाकूंनाही मागे टाकेल, या शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागाचा (आरटीओ) समाचार घेतला. एका हिंदी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हरियाणा शासन १९ डिसेंबरला गीता जयंती साजरी करणार !

      चंदिगड - हरियाणा शासनाने डिसेंबर मासाच्या १९ ते २१ तारखेपर्यंत राज्यभर गीता जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर संबंधित अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करण्यात येतील, असे शासनाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या समित्यांचे उपाध्यक्ष अतिरिक्त उपायुक्त असतील आणि शहर न्यायाधीश हे सचिव असतील. तसेच इतर राज्यस्तरीय अधिकारी या समित्यांचे सदस्य असतील. याशिवाय उपायुक्तांना या समितीवर २० मान्यवर नागरिकांची सदस्य म्हणून नेमणूक करता येईल. याप्रसंगी प्रदर्शन, कलाकारांचा जेवणखाण आदींचा व्यय करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला १० लक्ष रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.

आय.एस्.आय.एस्.ला जगातील ४२ आतंकवादी संघटनांचा पाठिंबा !

     न्यूयॉर्क - संपूर्ण जगात इस्लामचे राज्य आणण्याची महत्त्वाकांक्षा समोर ठेवून जगात जिहादी आतंकवादी कृत्ये करणार्‍या आणि त्यासाठी असंख्य निरपराध्यांची हत्या करणार्‍या आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेला जगातील ४२ आतंकवादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आधीच जगासाठी धोकादायक बनलेली आय.एस्.आय.एस्. ही संघटना आणखी घातक आणि सामर्थ्यवान बनली आहे, अशी माहिती स्टॅटिस्टा या सांख्यिकीविषयक संस्थेने दिली आहे.

तमिळनाडूच्या ख्रिस्ती संघटनेकडून ख्रिसमस साजरा न करता पूरग्रस्तांना साहाय्य करण्याचा निर्णय

पूरग्रस्तांना साहाय्य करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती संघटना
हिंदूंचे धर्मांतर करणार नाहीत कशावरून ?
      चेन्नई - अतीवृष्टीमुळे तमिळनाडूसह चेन्नईत आलेल्या महाभयंकर पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले असून शहराची अपरिमित हानी झाली आहे. पूरपीडितांना साहाय्य करण्यासाठी मोठ्या आर्थिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता आहे, हे ओळखून चर्च ऑफ साऊथ इंडिया या ख्रिस्ती संघटनेने या वर्षी ख्रिसमस साजरा न करता चेन्नईतील पूरग्रस्तांना साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी इमॅन्युअल देवाकाडाचियम् यांनी सांगितले, या वर्षी ख्रिसमस साजरा करण्याऐवजी आम्ही तो वेळ आणि शक्ती पूरग्रस्तांचे साहाय्य आणि पुनवर्सनासाठी वापरू. यासाठी चर्चच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून राज्यातील सर्व चर्चना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (आतापर्यंत जेव्हा केव्हा भूकंप, पूर आले तेव्हा ख्रिस्त्यांनी पीडितांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि सहस्रों हिंदूंचे धर्मातर केले. त्यामुळे याही वेळेस त्यांच्याकडून असा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन हिंदूंनी सावध राहणे आवश्यक आहे ! - संपादक)

हरियाणात किमान १०वी उत्तीर्ण असणाराच ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास पात्र

हरियाणा शासनाचा कायदा वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा !
      नवी देहली - ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणारा प्रतिनिधी हा किमान १० वी उत्तीर्ण असायलाच हवा, असा कायदा हरियाणा शासनाने ७ सप्टेंबर २०१५ ला पारित केला होता. त्याविरोधात ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा कायदा निवडणूक लढवण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचे त्यांचे म्हणणे होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा शासनाचा कायदा वैध असल्याचा निर्वाळा दिला. या कायद्यानुसार खुल्या वर्गातील उमेदवार १० वी उत्तीर्ण, तर महिला आणि दलित उमेदवार हा ८ वी उत्तीर्ण असायला हवा. दलित महिला उमेदवाराला ५ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे, तसेच उमेदवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसावी, वीज बिल, कर्जाचे हप्ते थकलेले नसावेत आणि सगळ्यात महत्त्वाचेे म्हणजे घरात शौचालय असले पाहिजे, अशाही अटी या कायद्याद्वारे घालण्यात आल्या आहेत.भारत-पाकिस्तान चर्चेच्या वेळी भारताचा तिरंगा बेपत्ता

भारतात फुटले नव्या वादाला तोंड
      नवी देहली - भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानचा झेंडा होता; मात्र भारताचा झेंडा बेपत्ता असल्यामुळे भारतात नवीन वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा दोन देशांच्या नेत्यांमध्ये भेट होते, तेव्हा दोन्ही देशांचे झेंडे लावलेेले असतात, मग या चर्चेच्या वेळी तिरंगा का नव्हता, असा प्रश्‍न सामाजिक संकेतस्थळांवर भारतियांकडून विचारण्यात येत आहे.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील आक्षेपार्ह गाणी वगळाच ! - भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी

प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी
चित्रपटाच्या विरोधातील 
आंदोलनाविषयी आज पुण्यात बैठक
      नागपूर, ११ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - हिंदुद्रोही चित्रपट बाजीराव मस्तानीमध्ये इतिहासाची मोडतोड करून बाजीराव आणि त्यांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी यांच्या व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपटातील पिंगा आणि मल्हारी ही दोन आक्षेपार्ह अन् चारित्र्यहनन करणारी गाणी वगळण्यासाठी राज्यशासनाने चित्रपट परिनिरीक्षण मंडळास विनंती करावी, अशी मागणी पुणे येथील भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी आणि शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात १२ डिसेंबरला पुण्यात बैठकीचे आयोजन केले आहे.

फेसबूकचे सर्वेसर्वा झुकेरबर्ग मुसलमानांच्या समर्थनार्थ सरसावला !

      वॉशिंग्टन - पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आणि अमेरिकेत नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुसलमानांविषयी अमेरिकेसह जगातच द्वेषभावना वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर फेसबूकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी मुसलमानांना पाठिंबा घोषित केला असून काही जणांमुळे संपूर्ण मुसलमान समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी त्याच्या फेसबूक खात्यावर टाकलेल्या पोस्टद्वारे मांडले. फेसबूकच्या व्यासपिठावर मुसलमानांचे नेहमीच स्वागत आहे, असेही त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे, तसेच मुसलमानांच्या अधिकारांसाठी लढण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला आहे.

उत्तर कोरियाकडे हायड्रोजन बॉम्ब असल्याचे स्पष्ट

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याकडून सुतोवाच
     सिओल - उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी त्यांच्याकडे हायड्रोजन बॉम्ब असल्याचे सुतोवाच केले आहे. सैन्याचे अवलोकन करण्यासाठी आलेले किम यांनी हायड्रोजन बॉम्बसह आण्विकशक्ती आणखी वाढल्याचे नुकतेच सांगितले. त्यामुळे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचे स्पष्ट झाले आहे. 
    याविषयीची माहिती प्योंगयांग स्टेटच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. देशाने शक्तीशाली शस्त्रांची निर्मिती केल्याचा अनेकदा दावा केला आहे; परंतु हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचा खुलासा पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या पंजाबमधील संपर्कांना धर्माभिमान्यांचा उत्तम प्रतिसाद

     लुधियाना (पंजाब) - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पंजाबमधील विविध हिंदु धर्माभिमान्यांच्या भेटी घेतल्या. २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या भेटीत धर्माभिमान्यांनी समितीचे कार्य जाणून घेतले आणि धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी समितीचे सर्वश्री सुरेश मुंजाळ, डॉ. राहुल जाम्ब्वाल, गौरव सेठी उपस्थित होते.

राष्ट्र आणि धर्म प्रेमींना कृतीशील करण्यासाठी हिंदु सेनेने चालू केले हिंदु सेना डॉट इन संकेतस्थळ !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदु सेनेने उचलले आणखी एक पाऊल !
     नवी देहली - हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी, तसेच श्रीराम मंदिराची उभारणी आणि काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचे ध्येय उराशी बाळगून राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या हिंदु सेनेने त्यांचे स्वतःचे हिंदु सेना डॉट इन हे संकेतस्थळ चालू केले 
     असून धर्म आणि राष्ट्र रक्षणाचे कार्य करण्याची आवड असणार्‍यांनी हिंदु सेनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्या माध्यमातून केले आहे.

कर्णावती (अहमदाबाद) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !
जिल्हाधिकारी ए.बी. गोर यांना निवेदन देतांना
डावीकडून श्री. जामदार, श्री. वैभव आफळे
आणि सौ. मानसी कुलकर्णी
     कर्णावती (अहमदाबाद) - प्रतीवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यात येते. या माध्यमातून ३१ डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन मद्यपान करणे, फटाके उडवणे, महिलांची छेड काढणे आदी प्रकार घडतात. हे अपप्रकार रोखण्यात यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० डिसेंबर या दिवशी येथील जिल्हाधिकारी ए.बी. गोर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कद्रेकर, श्री. वैभव आफळे, सनातन संस्थेतर्फे सौ. मानसी कुलकर्णी आणि श्री. जामदार उपस्थित होते.
क्षणचित्र 
     एका आरक्षकाने सांगितले की, तुमचा प्रत्येक विषय महत्त्वाचा असल्याने त्यावर जिज्ञासूंकडून पुढील कार्यवाही केली जाते. मागील मासात तुम्ही दिलेल्या फटाक्याच्या निवेदनानंतर त्या संदर्भातील अनेक प्रकरणांच्या नोंदी झाल्या आणि त्यावर कारवाईही होत आहे.

इशरतजहाँ लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी आतंकवादीच होती ! - हेडलीची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला माहिती

इशरतजहाँचे समर्थन करणार्‍यांनाही आता 
दोषी ठरवून शासन त्यांच्यावर कारवाई करणार का ?
      नवी देहली - गुजरातमधील चकमकीत मारली गेलेली इशरतजहाँ ही मुसलमान तरुणी लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेची आत्मघातकी आतंकवादीच होती, अशी माहिती आतंकवादी हेडली याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला दिली.

(म्हणे) सनातनी प्रवृत्ती आणि इसिस यांच्या आतंकवादावर महावीर अन् बुद्ध यांचा अहिंसेचा संदेश हेच उत्तर !

  • सनातनी प्रवृत्तीचा कोणत्याही प्रकारचा आतंकवाद अस्तित्वात नसतांना त्याविषयी वाटेल ते बोलणारे साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असणे, हे हिंदूंचे दुर्दैव !
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस बरळले !
      सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) - सनातनी प्रवृत्ती आणि इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) यांचा आतंकवाद यांवर भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा अहिंसेचा संदेश हेच उत्तर आहे, अशी मुक्ताफळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उधळली. (तिकडे फ्रान्सने इसिसला चांगलाच धडा शिकवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ट्रम्प यांनी तर धर्मांधांच्या आतंकवादाच्या विरोधात मुसलमानांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची भाषा चालवली आहे. अशा वेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांची ही गांधीगिरी हास्यास्पदच नव्हे का ? दुसरे असे की, अस्तित्वात नसणार्‍या सनातनी प्रवृत्तीचा आतंकवाद निर्माण करून स्वतःचा वैचारिक आतंकवादच सिद्ध केला आहे ! - संपादक) लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आदर्श सेवक पुस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कोण म्हणतो भारत असहिष्णू ?

असहिष्णुतेची आवई उठवणार्‍यांना सणसणीत चपराक !
 शारजाहच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपसंचालक रईद अल बुखातीर यांचा प्रश्‍न
 असहिष्णुतेचे वक्तव्य करणे, हा शुद्ध राजकारणाचा भाग
 सुरक्षित वातावरणासाठी विदेशात जाण्याची भाषा करणार्‍या किरण राव यांना कोणी हे सांगेल का ?
     संभाजीनगर, ११ डिसेंबर - 'गेल्या २० वर्षांपासून मी भारतात येत आहे. मी अनेक शहरांत भ्रमंती केली असून पुष्कळ लोकांना भेटलो. गेल्या वर्षभरातही २-३ वेळा येणे झाले. मला कुठेही असहिष्णुता जाणवली नाही. उलट येथील लोक अतिशय प्रेमाने बोलतात. हिंदु-मुसलमान असा भेदभाव कुठेच आढळत नाही. उलट माझा अरबी पायघोळाचा वेश पाहून लोक आनंद व्यक्त करतात. ते पाहून मला अधिक सुरक्षित वाटते. अशाच वेशात युरोपात गेलो, तर धार्मिक द्वेष आणि असहिष्णुता यांचा सामना मला करावा लागेल. (इतर देश सहिष्णु आहेत, असे म्हणणारे विदेशातील हे वास्तव समजून घेतील का ? - संपादक)

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले 

विधान परिषदेचे कामकाज ४ वेळा स्थगित, विरोधकांचा कर्जमाफीच्या सूत्रावर गदारोळ

 कामकाज १४ डिसेंबरला दुपारी १ वाजेपर्यंत स्थगित 
     नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) विधान परिषदेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षाने चर्चा नको, कर्जमाफीची घोषणा करा, अशा घोषणा देण्यास प्रारंभ केल्याने सभापतींनी २० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. कामकाज चालू झाल्यावर पुन्हा २० मिनिटांसाठी, १५ मिनिटांसाठी आणि त्यानंतर १ घंट्यासाठी कामकाज स्थगित केले. असे एकूण ४ वेळा कामकाज स्थगित करण्यात आले. 
१. 'मी घोषणा करण्यास उभा आहे,' असे म्हणत शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी मराठा आरक्षणावर बोलण्यास प्रारंभ केला. तेव्हा कर्जमाफीच्या घोषणेसाठी पुन्हा गदारोळ चालू झाल्याने कामकाज स्थगित केले. 
२. महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे कर्जमाफीच्या विषयावर म्हणाले, "आम्ही चर्चा करून घोषणा करण्यास सिद्ध आहोत; पण तुम्ही आम्हाला संधीच देत नाही. तुमच्या कार्यकाळात कर्जमाफीसाठी ७० सहस्र कोटी रुपये देऊनही शेतकर्‍याच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत ? याविषयी मी स्वत: शरद पवारांचा सल्ला घेणार आहे."

शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक : कामकाजावर बहिष्कार !

      नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी दोन्ही सभागृह बंद पाडण्याचा सपाटा लावला; मात्र अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे कामकाज रेटून नेण्याचा यशस्वी प्रयत्न सत्ताधार्‍यांनी केला. प्रश्‍नोत्तराच्या वेळी गोंधळ घालणार्‍या काँग्रेसच्या सदस्यांचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केले. शेवटी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रथम प्रश्‍नोत्तराच्या तासापुरता आणि नंतर पुन्हा दिवसभरासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. 

मुंबईतील मंदिरांसमोर गायी न बांधण्याचा अन्यायकारक निर्णय आयुक्तांनी रहित करावा !

आमदार सरदार तारा सिंह यांची औचित्याच्या सूत्राद्वारे मागणी
      नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई शहर आणि उपनगरे येथील विविध मंदिरांसमोर अनेक वर्षांपासून गुराखी गायी बांधत आहेत. हिंदु धर्मात गायीला गोमाता मानत असल्याने भाविक मंदिरातून बाहेर निघतांना गायीचे दर्शन घेतात अथवा पूजा करतात. तसेच श्रद्धेने चारा आणि अन्नधान्य देतात. गायीसमवेत असलेले गुराखी सायंकाळी रस्त्यावर पडलेला चारा अथवा श्रद्धेने दिलेले अन्नधान्य स्वच्छ करतात. हे वर्षानुवर्षे चालू आहे. असे असतांना मुंबई महापालिका आयुक्तांनी मंदिरांसमोर गायी बांधू नयेत, अशा प्रकारचा अन्यायकारक आदेश नुकताच निर्गमित केला आहे.

(म्हणे) 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाला संरक्षण द्या !

स्वाभिमानशून्य आणि विद्रोही विचारांचे आमदार नीतेश राणे !
     नागपूर ११ डिसेंबर (वार्ता.)- संजय लिला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटातील दोन गाण्यांविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे म्हटले आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये राणे यांनी आपल्या राज्यात आपल्या शासनाच्या माध्यमातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. तो पुरस्कार देण्याविषयी काही मराठा संघटनांचा आजही आक्षेप आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी मराठ्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगापुढे पोहोचवला; मात्र तो काल्पनिक न मानता खरा इतिहास आहे, असे गृहित धरून हा पुरस्कार दिला गेला.

अंतूर (जिल्हा संभाजीनगर) किल्ल्यातील मध्ययुगीन तोफेची चोरी !

ऐतिहासिक ठेवा सांभाळू न शकणारे पुरातत्व खाते काय कामाचे ? 
     संभाजीनगर, ११ डिसेंबर - येथील अंतूर किल्ल्यातील मध्ययुगीन तोफ चोरीला गेली आहे. ग्रामस्थ आणि इतिहासाचे अभ्यासक यांनी मागील मासात ही तोफ चोरीस गेल्याची माहिती दिली. (मध्ययुगीन ऐतिहासिक ठेव्याचे योग्य ते संरक्षण करण्यास संबंधित प्रशासन आणि पुरातत्व विभाग असक्षम ठरले आहेत, असेच यावरून लक्षात येते. - संपादक) या किल्ल्यातील तलाव आणि आतील तटबंदी यांच्याजवळ असलेल्या दर्ग्याच्या पायर्‍यांजवळ ही पंचधातूची जुनी तोफ होती; मात्र तिची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडे नव्हती. (एका महत्त्वाच्या तोफेची नोंदही न ठेवणारे पुरातत्व खाते केवळ हिंदूंवर प्रतिबंध लादणे, हिंदूंना गडांवर शौर्याचे उत्सव करण्यास बंदी घालणे यांपुरतेच मर्यादित कार्य करते ! त्यामुळेच पुरातत्व खाते म्हणजे आजच्या शासनावर व्ययाचा बोजा ठरला आहे ! - संपादक) 
१. कन्नड-सोयगाव या तालुक्याच्या सीमारेषेवर अंतूर किल्ला आहे. निर्जन किल्ल्यावर पुरातत्व विभागाचा एकही कर्मचारी नसतो. त्याचा अपलाभ उठवून चोरट्यांनी ती तोफ चोरली. 

सभेच्या पूर्वसिद्धतेसाठी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण येथे २ जानेवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा ! 
     फलटण (जिल्हा सातारा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुधोजी क्लबच्या पटांगणात २ जानेवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या पूर्वसिद्धतेसाठी येथे ७ डिसेंबर २०१५ या दिवशी स्वामी समर्थ मंदिर, दगडी पुलाजवळ संध्याकाळी ७ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. 

जव्हार (जिल्हा पालघर) येथे हिंदु मुलीचे अपहरण आणि खून प्रकरणी धर्मांध अटकेत !

हिंदूंनो, तुमच्या कन्या आणि भगिनी धर्मांधांकडून फसवल्या जाऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी संघटितपणे जागृती आणि कृती करा ! 
     डहाणू (जिल्हा पालघर) - जव्हार येथील माधुरी पटेल (२२ वर्षे) हिंदु तरुणीचे अपहरण करून तिचा खून केल्याप्रकरणी जावेद मेनन (३० वर्षे) या धर्मांधाला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ डिसेंबर या दिवशी जव्हारमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि दुपारनंतर जव्हार शहर बंद ठेवण्यात आले होते. संध्याकाळपर्यंत नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त होता. 
१. येथील माधुरी पटेल ही युवती ६ डिसेंबरपासून घरातून गायब झाली होती. 
२. तिचा मृतदेह भरसटमेटजवळील रस्त्यालगत जामसर हद्दीत पोत्यात गुंडाळून टाकलेला आढळला. 
३. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचून चेहर्‍यावर आणि अंगावर आम्ल टाकण्यात आले होते. (हिंदूंनो, धर्मांधांचे क्रौर्य जाणा ! - संपादक) 

कत्तलीसाठी जाणार्‍या १३ गोवंशांची श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून सुटका : गोवंश पकडून देणार्‍या २२ जणांवर गुन्हा प्रविष्ट !

     मिरज, ११ डिसेंबर (वार्ता.) - मिरज शहरात १० डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजता मिरज-म्हैशाळ रस्त्यावर एका आयशर ट्रकमधून १३ बैल कत्तलीसाठी कर्नाटक राज्यात घेऊन जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या सहकार्याने हा आयशर ट्रक पकडून मिरज शहर पोलिसांच्या कह्यात दिला. या प्रकरणी सांगली येथील प्राणीकल्याण अधिकारी श्री. अंकुश गोडसे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी संजय पवार आणि मारुति कांबळे या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य एकावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींनी मारहाणाची तक्रार दिल्याने श्री. अंकुश गोडसे यांच्यासह २२ जणांवर ३२६ अन्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यापैकी श्री. अंकुश गोडसे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. (गोरक्षकांच्या बाजूने ठामपणे उभे रहाण्यासाठी गोप्रेमींनीच आता संघटित व्हायला हवे ! - संपादक)  

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयकाला विधीमंडळात एकमताने संमती !

हिवाळी अधिवेशन २०१५
      नागपूर, ११ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला १० डिसेंबर या दिवशी विधीमंडळात एकमताने संमती देण्यात आली. अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडले. हे विधेयक सभागृहात एकमताने संमत करण्यात आले. महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही महत्त्वाची घटना आहे.
१. अ‍ॅक्युंपक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील लोकप्रिय चिकित्सा पद्धत असून तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन आणि व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. याच दृष्टीने राज्यात ही पद्धत लागू करण्यात आल्याची प्रक्रिया चालू करत आहोत.

(म्हणे) मुख्यमंत्र्यांनी ५०० गोवंश पाळण्यास घ्यावा ! - राधाकृष्ण विखे-पाटील

     नागपूर ११ डिसेंबर (वार्ता.) - भाजप शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: ५०० गोवंश पाळायला हवा. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या भागात गोग्राम काढायला हवा. प्रत्येक आमदारांनी किमान १ सहस्र गोवंश पाळला असता, तर कितीतरी गोवंश वाचला असता, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

ईरोम थानू यांचा अयोग्य हट्ट आणि मिशनर्‍यांचे खरे स्वरूप !

     मणिपूर येथील अफस्पा कायदा रहित करण्यात यावा, यासाठी ईरोम शर्मिला थानू या गेली १५ वर्षे आंदोलन करत आहेत. या संदर्भात मणिपूरचे नेमके दुखणे काय आहे ? त्याची कारणे काय आहेत ? मानवाधिकाराच्या नावाखाली थानू यांचा हट्ट किती योग्य आहे ? याविषयी विवेचन करणारा लेख एप्रिल २००७ च्या मासिक विवेकमध्ये प्रसिद्ध झाला होता. आठ वर्षांनंतर मणिपूरमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढले असून तेथील स्थिती आणखीच वाईट झाली आहे. अशा समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे लक्षात येण्यासाठी या लेखातील संपादित भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.

पुण्याच्या स्मार्टनेसला लोकप्रतिनिधींकडून खीळ घालण्याचा प्रयत्न

      पुणे, ११ डिसेंबर - स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात पुण्याचा समावेश होण्याच्या प्रक्रियेला स्थानिक राजकारणामुळे खीळ बसली आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील आढावा केंद्रशासनाकडे पाठवण्याची मुदत १५ डिसेंबर आहे. स्मार्ट सिटी योजनेला विरोध नाही; मात्र आराखड्याचा अभ्यास केल्यानंतरच त्यास मान्यता दिली जाईल, यातील कंपनीच्या सूत्रामुळे लोकप्रतिनिधींचे अधिकार अल्प होतील, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भातील सभा ४ जानेवारीपर्यंत बहुमताच्या जोरावर तहकूब करण्याची खेळी खेळली. यामुळे स्मार्ट सिटीच्या योजनेत पुण्याचा समावेश होणार कि नाही, यासंदर्भात प्रश्‍नचिन्हच निर्माण झाले आहे.

नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेल येथे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
      पनवेल - ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या निमिताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना निवेदन देण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री मिलिंद पोशे, राजेंद्र पावसकर आणि सौ. विमल गरुड उपस्थित होत्या.

कोयनानगर धरण परिसरात भूकंपाचा धक्का

      पुणे, ११ डिसेंबर - कोयनानगर धरण परिसरात १० डिसेंबर या दिवशी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेनजीकच्या गोषटवाडीपासून नैऋत्येस ७ किलोमीटरवर आहे. भूकंपाची खोली ९ किलोमीटर इतकी होती, असे कोयना भूकंप मापन केंद्रातील सूत्रांनी सांगितले.

शिवपुत्र छत्रपती संभाजी महानाट्य आता हिंदीमध्ये ! - अभिनेता डॉ. अमोल कोल्हे

      कोल्हापूर, ११ डिसेंबर (वार्ता.) - अमृतमहोत्सवी प्रयोग साकारणार्‍या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे पुढील वर्षी हिंदीमध्ये प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि श्री. महेंद्र महाडिक यांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर येथे २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत.

भारतीय धर्म आणि विविधतेतील एकात्मता !

१. सर्वांमध्ये एकवाक्यता असणे : वैदिक, जैन, बौद्ध, लिंगायत, महानुभाव, शीख इत्यादींच्या धर्मात तीन गोष्टी प्रामुख्याने आढळतात. 
अ. एक ही की, मानव हा त्याच्या देहापेक्षा अधिक सूक्ष्म आणि विशाल आहे. 
आ. दुसरी ही की, दृश्य सृष्टीप्रमाणेच सूक्ष्म आणि विशाल अशी सृष्टी आहे. 
इ. तिसरी ही की, या दोन्हीही सृष्टीचा परस्पर घनिष्ठ संबंध असून त्यात दळणवळण आहे.
मनुष्याचे जीवन या दोहोंना विचारात घेऊनच घालवले पाहिजे हे पूर्वोक्त सर्वांना मान्य आहे.
२. कर्मतत्त्व आणि पुनर्जन्म : या मान्यतेतूनच कर्मतत्त्व आणि पुनर्जन्म यांचा दृष्टीकोन उद्भवतो.

लिव्ह इन नकोच !

      पश्‍चिमी देशातील लिव्ह इन रिलेशनशिप नावाची ही एक कुप्रथा भारतात चांगलेच पाय रोवायला लागली आहे. अनेक युवक-युवती लग्न न करताच सहजीवन चालू करतात, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हणतात. अशा नात्यांमुळे संपूर्ण पश्‍चिमी देशांना कौटुंबिक आणि राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अगणित प्रश्‍नांमुळे त्यातून त्यांना बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग कोणत्याच स्तरावर सापडत नाही. असे असतांना त्या नात्याची आपल्या भारतियांना का भुरळ पडत आहे ? भारतियांनी या कुप्रथेचा स्वीकार का करायचा ?

राज्यातील १२ सहस्र शाळांची पटसंख्या ० ते २०

जय जय महाराष्ट्र माझा !
      नागपूर, ११ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील अनुदानास पात्र असलेल्या शाळा तुकड्यांना अनुदान मिळण्याची मागणी योग्य आहे; मात्र आज आपल्या राज्यात एका बाजूला नवीन विनाअनुदानित शाळांना अनुदानित करा, ही मागणी होत असतांनाच सुमारे १२ सहस्र ६४६ शाळांना केवळ ० ते २० इतकीच पटसंख्या आहे. तेथील शिक्षकांचे वेतन शासनालाच द्यावे लागते, या वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिक्षणाकडे राजकारणाच्या पलीकडे पहाणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभेत व्यक्त केले.

वैदिक हिंदु धर्म

१. हिंदु धर्मावरील आक्षेप !
१ अ. वैदिकधर्मी आणि ख्रिश्‍चन मिशनरी यांतील भेद : आधुनिकांच्या आक्षेपात नेहमीच एक उदाहरण आलेले असते. ख्रिश्‍चन मिशनरी सेवाभावात किती कनवाळूपणा दाखवतो. वैदिकधर्मी माणूस याच्या उलट किती निष्ठुरपणा दाखवतो, सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः। - भर्तुहरि नीतिशतक (अर्थ : दुसर्‍याची सेवा करणे हे फार कठीण काम आहे.) असा ब्रीदघोष करणारा वैदिकधर्मी मनुष्य टच्-मी-नॉट् अशा वर्तणुकीचा असतो. 

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

      रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणांचे कारण आणि सावरकरी उपाय !

१. अखंड हिंदुस्थानचे अखंड पाकिस्तान करणे, हा धर्मांधांचा उद्देश 
असणे आणि त्यासाठी त्यांनी अद्ययावत शस्त्रे वापरणे
     पूर्वी धर्मांध मुसलमान गुंड हिंदूंवर आक्रमण करत असत. त्यांचा पाकिस्तान निर्मिती हा उद्देश होता. त्या वेळी त्यांच्याकडे चाकू, सुरे आणि तलवारी होत्या. आज आक्रमण करण्यासाठी आतंकवादी पाठवले जातात. अखंड हिंदुस्थानचे अखंड पाकिस्तान करणे, हा मोगल आणि अन्य आक्रमकांचा, तसेच डिसेंबर १९०६ मध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचा हेतू होता. आज त्यांच्याकडे अद्ययावत शस्त्रे आहेत. ज्यामधून सटासट गोळ्या सुटतील, अशा बंदुका आहेत. बॉम्ब आहेत. या आतंकवाद्यांचा पुरस्कर्ता पाकिस्तान आहे. त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत.

नक्कलीची (कॉपीची) गंभीर समस्या !

शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारामुळे डी बाडर्र् होणार्‍या 
विद्यार्थ्यांच्या संख्येतील आश्‍चर्यकारक वाढ 
    महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात केवळ पुणे परीक्षा विभागातील २५६ विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी डी बाडर्र् म्हणजे एक वर्षापर्यंत परीक्षेला बसायला मज्जाव केला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्याचे ९९ विद्यार्थी आहेत. ही अवस्था पुणे विभागाची म्हणजे महाराष्ट्रातील एका विभागाची आहे.

पेण (रायगड) येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

        निधर्मीपणाच्या नावाखाली भारतात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे, तर बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. धर्मांतर, गोहत्या, हिंदुविरोधी कायदे, लव्ह जिहाद, हिंदु संतांची अपकीर्ती, देवतांची विटंबना, आतंकवाद, दंगली यांसारख्या समस्या वाढतच चालल्या आहेत. या सर्व समस्यांविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
स्थळ : श्री रामेश्‍वर मंदिर सभागृह, हनुमान आळी, पेण, रायगड
दिनांक : रविवार, १३ डिसेंबर २०१५, सायं. ५ वाजता
संपर्क क्र. : ८४५०९५०४६६

ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

१. मराठ्यांच्या आदर्श कुटुंबव्यवस्थेला धक्का पोहोचवणार्‍या आणि इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालावी !
२. तेलंगण शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम रहित करावा !
या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी व्हा !
दिनांक : रविवार, १३ डिसेंबर २०१५
वेळ : सायं. ५ वाजता
स्थळ
१. ठाणे : मीरारोड - श्री सरयुमाता चौक, भाजी मार्केट समोर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, मीरा रोड (पूर्व)
२. नवी मुंबई : गुलाब सन्स डेअरी समोर, कोपरखैरणे
३. मुंबई : बिकानेर स्वीट्ससमोर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर, भांडुप (पश्‍चिम)
संपर्क क्र. : ९२०२०८९५८
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !

दूरचित्रवाहिनीवर ताळतंत्र सोडून बोलणार्‍या दाभोलकर !

     वर्ष २०११-१२ मध्ये हाजी अली दर्ग्यात महिलांना कबरीजवळ प्रवेश नसल्याप्रकरणी २ महिलांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ज्या व्यक्तीचा तेथे दर्गा आहे, ती एका बाईतूनच निपजली आहे. मग असे असतांना स्त्रियांच्या प्रवेशाला विरोध का ? - मुक्ता दाभोलकर, अंनिस

निराधार योजनेचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय लवकरच !

      नागपूर, ११ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिले.

हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे !

      हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे आणि हिंदूच त्याचे मालक आहेत. ही गोेष्ट सत्य आहे; पण या सत्याला व्यवहारात स्थान मिळवून देण्याचे दायित्वही आपल्याच शिरावर नाही काय ? हे तत्त्व आचरणात आणण्याचे काम आपल्याला करायला नको का ? आपणास जे पाहिजे ते करू शकण्यासारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच आपले तत्त्व आपण कृतीत उतरवू (आणू) शकू. 
- आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (संदर्भ : लोकजागर, दिवाळी २०१४)

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवादामागे अशिक्षितपणा 
आणि बेकारी असल्याचा कांगावा खरा आहे का ?
    इराकस्थित आय.एस्.आय.एस्. या क्रूर जिहादी आतंकवादी संघटनेचा हस्तक असणारा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक महंमद सिराजुद्दीन यास जयपूर येथे अटक करण्यात आली. सिरियासारख्या अनेक मुसलमान राष्ट्रांतील नागरिकांशी त्याचे संबंध आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      ISIS ke liye kam karnewala Indian oil carpo. ka adhikari Mohammad Sirajuddin Jaipur me giraftar.
galli se dehali tak faile es atankwadka jawab kaun dega ?
जागो
      आय.एस्.आय.एस्.के लिए काम करनेवाला इंडियन ऑइल कार्पो. का अधिकारी मोहंमद सिराजुद्दीन जयपुर में गिरफ्तार !
गल्ली से देहली तक फैले इस आतंकवादका जवाब कौन देगा ?

सर्व जाणिवा नष्ट झाल्याने देहभान हरपलेले असतांनाही सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या डेगवे-पानवळ येथील कै. (श्रीमती) इंदिरा डेगवेकरकाकू !

      
श्रीमती इंदिरा डेगवेकर
प.पू. दास महाराज यांच्या सासूबाई आणि पू. (सौ.) माई यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा डेगवेकरकाकू यांचे ११.१२.२०१५ या दिवशी पहाटे ३.४५ वाजता देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची कन्या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ 
                                        - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ८, श्‍लोक ५
अर्थ : जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरिराचा त्याग करून जातो, तो साक्षात् माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. 

केरळमधील जिज्ञासू आणि धर्माभिमानी यांचा धर्मप्रसाराच्या कार्यातील उत्स्फूर्त प्रतिसाद !

१. कोडुंगल्लूर मधील सर्व हिंदु कुटुंबांमध्ये सात्त्विक 
उत्पादने पोचवण्याची तळमळ असणारे श्री. चंद्रमोहन् !
      केरळमधील कोडुंगल्लूर येथील धर्माभिमानी श्री. चंद्रमोहन् हे सात्त्विक उत्पादने पाहून पुष्कळ प्रभावित झाले. कोडुंगल्लूर मधील सर्व हिंदु कुटुंबांमध्ये ही उत्पादने पोचली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. ही उत्पादने घरोघरी पोहोचावीत, या उद्देशाने ते स्वतःच त्या उत्पादनांचे वितरक बनले.
२. कार्यालयामध्ये स्वतःसमवेत कर्मचार्‍यांनाही कापराचे 
उपाय करण्यास उद्युक्त करणारे एरणाकुळम् येथील अधिवक्ता पी. सतीशन् !
       एरणाकुळम् येथील अधिवक्ता पी. सतीशन् यांच्या कार्यालयात १२ ते १५ कर्मचारी आहेत. ते स्वतः आणि तेथील अनेक कर्मचारीसुद्धा सात्त्विक उत्पादने विकत घेतात. त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील मुख्य पटलावर कापूर ठेवलेला असतो. तेथील कर्मचारी थकवा किंवा काही त्रास जाणवल्यास कापराचा सुगंध घेतात.

दैनिक सनातन प्रभातला साधक/ बालसाधक यांच्या संदर्भात अपूर्ण लिखाण पाठवणे, अयोग्य छायाचित्रे पाठवणे, छायाचित्रे न पाठवणे यांसारख्या चुका पुनःपुन्हा करून साधनेची हानी करवून घेऊ नका !

       ज्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे, असे वाटते, त्या साधकांचे किंवा ५० ते ६० टक्के पातळी झाली आहे, असे वाटते, त्या बालसाधकांचे लिखाण दैनिकात पाठवतांना छायाचित्र पाठवावे. ते छायाचित्र दैनिकात छापण्याच्या संदर्भातील चौकटी आतापर्यंत अनेक वेळा दैनिकात छापून आलेल्या आहेत, तरीही साधकांकडून त्यांचे पालन न झाल्याने दैनिकातील साधकांना पुढील अडचणी येतात.
१. साधकाची/बालसाधकाची आध्यात्मिक पातळी काढण्यासाठी लिखाणासमवेत त्याचे योग्य छायाचित्र असणे आवश्यक आहे. लिखाणासमवेत छायाचित्र न पाठवल्याने त्यासाठी संबंधित साधक अथवा जिल्हासेवक यांचा वारंवार पाठपुरावा करावा लागतो, तसेच पाठवलेले छायाचित्र योग्य नसल्यास परीक्षण योग्य येत नाही. त्यामुळे चांगले छायाचित्र मिळण्यासंदर्भातही पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा पाठपुरावा करूनही साधक योग्य छायाचित्र पाठवत नाहीत.
२. लिखाणात साधकाचे/बालसाधकाचे वय, गाव इत्यादी माहिती नसते, तसेच लिखाणाखाली लिखाणाचा दिनांक घातलेला नसतो. 

सनातनच्या संत पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या आई तथा ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती इंदिरा डेगवेकर यांचे देहावसान

     शेवटच्या आजारपणात असह्य वेदना होत असतांनाही (श्रीमती) इंदिरा डेगवेकर अखंड भगवंताच्या अनुसंधानात असायच्या. त्यामुळे देह सोडतांना त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. आजींची सर्व सेवा कुटुंबियांनी भावपूर्ण केल्यामुळे त्यांचीही साधना चांगली झाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१२.२०१५)
      बांदा - पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक उपाख्य सौ. माई यांच्या आई श्रीमती इंदिरा महादेव डेगवेकर (वय ९४ वर्षे) यांचे डेगवे-पानवळ येथील त्यांच्या राहत्या घरी ११ डिसेंबर या दिवशी पहाटे ३.४५ वाजता देहावसान झाले. १६ सप्टेंबरपासून त्या आजारी होत्या. दुपारी १.४५ वाजता त्यांच्या पार्थिवावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, सुन, दोन जावई आणि नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. नियमितपणे त्या साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचन करत असत. गुरुपौर्णिमा २०१५ या दिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. सहा मासांत ती वाढून ६७ टक्के झाली.

साधकांप्रती प्रेमभाव असणारे उजिरे, कर्नाटक येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संजीव शेट्टीगार !

श्री. संजीव शेट्टीगार
१. उजिरे, कर्नाटक येथील श्री. संजीव शेट्टीगार (वय ५९ वर्षे) हे गेल्या ८ वर्षांपासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते प्रतिवर्षी सनातन प्रभातला विज्ञापन देतात. ते हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित असतात.
२. साधक त्यांच्या दुकानात गेले असता ते कितीही व्यस्त असले, तरी साधकांशी प्रेमाने बोलतात.
३. ते प्रतिदिन सकाळी देवपूजा करतात. गणपतीचे आणि देवीचे शतनामस्तोत्र पठण करतात. ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा वापर करतात.
- सौ. मंजुला गौडा, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (नोव्हेंबर २०१५)

तळमळीने परिपूर्ण सेवा करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रत्नागिरी येथील श्री. प्रभाकर सुपलकाका (वय ६६ वर्षे) !

श्री. प्रभाकर सुपल
१. अन्य कार्यक्रमांपेक्षा सेवेला प्राधान्य देणे
      काही दिवसांपूर्वी श्री. सुपलकाका (श्री. प्रभाकर सुपल) यांचा मुलगा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर त्याचा कार्यक्रम होता. तेव्हा काका मुलाला बरे वाटावे, यासाठी थोडा वेळ कार्यक्रमाला थांबले. नंतर त्यांनी सेवेलाच प्राधान्य दिले.
२. जिल्ह्यातील वस्तूसंग्रह सेवा नियोजित
वेळी पूर्ण करून नाशिकला कुंभमेळ्याच्या सेवेसाठी जाणे
      श्री. सुपलकाकांना कुंभमेळ्याच्या सेवेसाठी नाशिकला जायचे होते आणि त्यांच्याकडे जिल्ह्यातील वस्तूसंग्रहाचे दायित्व होते. गुरुपौर्णिमेच्या वेळी बरेच साहित्य जिल्ह्यांतील केंद्रांमध्ये होते. तेव्हा त्यांनी ते साहित्य वेळेत जमा होण्यासाठी नियोजन केले आणि ती सेवा पूर्ण करूनच ते नाशिकला कुंभमेळ्याच्या सेवेसाठी गेले.

प.पू. बाबा, तुम्हीच आमचे सर्वस्व ।

थोर आमचे भाग्य आम्हा । प.पू. बाबा दिधले ॥
आमच्या कल्याणास्तव ते । रात्रंदिन जागले ॥ १ ॥
बाबा, तुमची थोरवी । वर्णावी कशी आणि किती ॥
शब्दांना असे मर्यादा । बुद्धी पडते थिटी ॥ २ ॥
जसजसा आपत्काळ सरसावला ।
बाबा, तुम्ही चिरतरुणाईकडे निघाला ॥
संतसौंदर्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला (टीप १) ।
गुरूंनी असा आशीर्वाद दिधला ॥ ३ ॥

प.पू. पांडे महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून ज्ञानमय मोत्यांची झालेली उधळण !

      
प.पू. पांडे महाराज
२५.४.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमातील साधक श्री. प्रकाश सुतार यांच्या विवाहाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या विवाहाच्या छायाचित्रांचा संग्रह (अल्बम) प.पू. पांडे महाराज यांना दाखवण्यासाठी दिला होता. या छायाचित्रांचा संग्रह (अल्बम) पहातांना प.पू. पांडे महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून चैतन्यमय आणि ज्ञानमय मोत्यांची उधळण झाली. त्या वेळी जेवढे गोळा करता आले, तेवढे शब्दरूपी मोती पुढीलप्रमाणे ओवत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांनी बांधकाम विभागातील 
साधकांचे चैतन्यमय चेहरे पाहून ते ब्राह्मण आहेत, असे म्हणणे 
      अल्बममधील साधकांची छायाचित्रे पहातांना बांधकाम विभागातील साधकांकडे पाहून महाराज म्हणाले, आनंदाने युक्त हे तोंडवळे बघा. हे मुखवटे काढून टाक आणि काय दिसते सांग ? हे असे इतर विभागात दिसते का तुम्हाला ? ब्राह्मण म्हणजे काय ? ब्राह्मण म्हणजे वेगळेपणा नव्हे. ब्राह्मण म्हणजे चैतन्यमय असलेली अवस्था !

प.पू. पांडे महाराज यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ...

प.पू. पांडे महाराज, सगुणी-निर्गुणी तुम्हीच आहात ईश्‍वर ।
प.पू. पांडे महाराज
      प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत ज्या काही अनुभूती आणि अनुभव येतात, त्याविषयी श्री गुरूंनी पुढील काव्य सुचवले.
बाबा (टीप १) तुम्ही जेव्हा पहुडता पलंगावर ।
दिसे जसा श्रीविष्णु शेषावर ॥ १ ॥
आपले एक क्षणाचे दर्शन ।
असे आम्हा दसरा-दिवाळीचा सण ॥ २ ॥
आपल्या चरणांना करता स्पर्श ।
आम्हा साधकांना होतो परम हर्ष ॥ ३ ॥
आपले सुहास्यवदन पाहूनी ।
देहभान जाते हरपूनी ॥ ४ ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
विज्ञानाने अध्यात्माला 
प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही !
       विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे; कारण हल्ली समजले जाणारे विज्ञान शेवटी मायेतीलच आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
        संतांकडून मिळवायच्या गोष्टी देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : देण्यासाठी आमच्याकडे काही नाही मधील काही शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. सर्वकाही घेऊ शकतो मधील सर्वकाही अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

भारतीय समाजातील धर्म आणि चारित्र्य यांचे महत्त्व !

     भारतीय समाज धर्म आणि चारित्र्य यांना मोल देतो. धूर्त तंत्रज्ञानाला (Technology ला) नव्हे. चारित्र्यहीनाला नव्हे. 
       वैदिक धर्म आणि संस्कृती यांची जडणघडणच अशी आहे की, सगळा समाज श्रद्धा अन् चारित्र्य यांच्या आसपास जमा होतो. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०१३)) योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मंत्रजपाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

लोकप्रतिनिधींसाठी किमान शिक्षण अत्यावश्यक करावे !

संपादकीय 
     हरियाणात पंचायत निवडणुका लढवणार्‍या उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रतेसह निकष निश्‍चित करण्याकरता राज्यशासनाने कायद्यात केलेल्या सुधारणा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवल्या आहेत. या सुधारणांनुसार पंचायत निवडणुका लढवणार्‍या उमेदवारांसाठी किमान दहावी उत्तीर्ण ही आवश्यक पात्रता ठेवण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रीमंडळाने निवडणुका लढवणार्‍या लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला असून हाच निर्णय आता नगरपालिका आणि महापालिका यांसाठी लागू करण्याची घोषणा केली आहे. त्याहीपुढे जाऊन श्री. खट्टर यांनी केंद्रशासनाने हीच गोष्ट आमदार आणि खासदार या पदांची निवडणूक लढवणार्‍यांसाठी नियम करण्याचे ठरवल्यास दिशादर्शक ठरेल, असे सांगितले आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने देशावर एकहाती सत्ता गाजवली; मात्र निवडणूक लढवणार्‍या लोकप्रतिनिधींचे किमान शिक्षण किती असावे, यांसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी जाणीवपूर्वकच घेतला नाही. यामुळेच बिहारसारख्या राज्यात राबडीदेवीसारख्या अंगठाछाप व्यक्तीही राज्याच्या मुख्यमंत्री बनू शकल्या. ज्यामुळे बिहारची स्थिती पुढे काय झाली ते देशाने पाहिलेच.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn