Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सबळ पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाकडून सलमान खान यांची निर्दोष मुक्तता !

 • सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रहित होणारा न्याय चक्रावणाराच !
 • मद्यपान करून मोटारीखाली नागरिकांना चिरडल्याचे प्रकरण !
     मुंबई - अभिनेता सलमान खान यांच्या लॅण्ड क्रूझर या वाहनाने २८ सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्री ५ जणांना चिरडले होते. या प्रकरणी सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना ५ वर्षांची शिक्षा दिली होती; मात्र उच्च न्यायालयाने १० डिसेंबरला सत्र न्यायालयाचा निर्णय रहित केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर्. जोशी यांनी निर्णय देतांना सांगितले की, सलमानला दोषी ठरवण्याइतपत सबळ पुरावे शासकीय पक्षाकडे नाहीत. या वेळी न्यायमूर्तींनी शासनावरही ताशेरे ओढून अप्रसन्नता व्यक्त केली. राज्यशासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून याविषयी अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आवाहन द्यायचे कि नाही, ते ठरवले जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केली आहे.

गोमांस महोत्सवाला विरोध करणारे भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना अटक !

 • न्यायालयाचा आदेश धुडकावणार्‍या धर्मांधांची मानसिकता यातून स्पष्ट होते ! शासनाने अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ?
 • न्यायालयाचा आदेश धुडकावत धर्मांधांकडून गोमांस महोत्सवाचे आयोजन
     भाग्यनगर - उस्मानिया विद्यापिठाच्या परिसरात गोमांस महोत्सवाचे अर्थात् बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करणार्‍या ८ विद्यार्थ्यांसह महोत्सवाला विरोध करणारे गोशमहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापिठाच्या परिसरात संचारबंदीचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसर्‍या एका गटाने विद्यापिठाच्या आवारातच डुक्कर मांस महोत्सवाचे (पोर्क फेस्टिव्हल) आयोजन केले होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापिठाच्या आवारात अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करण्यास मनाई असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. उस्मानिया विद्यापिठाला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

राममंदिर उभारणे, हीच कै. अशोकजी सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! - प्रकाश शर्मा, संघ प्रचारक

ठाणे येथे विश्‍व हिंदू परिषदेच्या 
वतीने कै. अशोकजी सिंघल यांना श्रद्धांजली !
      ठाणे - कै. अशोकजी सिंघल यांनी हिंदु धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग केला. राममंदिर उभारणे, हीच त्यांना आपली खरी श्रद्धांजली असेल. अखंड भारत आणि गोमातेचे रक्षण हे त्यांचे स्वप्न होते, असे प्रतिपादन श्री. प्रकाश शर्मा यांनी केले. येथील गडकरी रंगायतन येथे ६ डिसेंबर या दिवशी विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने कै. अशोकजी सिंघल यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्र्रगीत म्हणून आणि महिलांनी वेदमंत्रपठण करून झाला. त्यानंतर मान्यवरांनी कै. अशोकजी सिंघल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी अशोकजी सिंघल अमर रहे । मानव जीवन कैसा हो, अशोकजी सिंघल जैसा हो । जय श्रीराम । या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला.

मंगळुरू येथे झाकीर नाईक यांचे भाषण आयोजित करण्याचा घाट !

      मंगळुरू - एका धर्मांध संघटनेने ३ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथील नेहरू मैदानावर हिंदूद्वेष्ट्या झाकीर नाईक यांचे भाषण आयोजित करण्यासाठी पोलिसांची अनुमती मागितली आहे. या कार्यक्रमास हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला असून या कार्यक्रमामुळे शहरातील धार्मिक सलोख्यावर विपरीत परिणाम होईल, अशी शंका व्यक्त केली आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती आयोजकांकडून मागवली असून ती आल्यावर सभेस अनुमती देण्याचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. झाकीर नाईक यांच्या सभेची अनुमती मागण्याचे पत्र पोलिसांकडे आले आहे, असे पोलीस आयुक्त मुरुगन यांनी मान्य केले; मात्र या कार्यक्रमात झाकीर नाईक काय बोलणार ? याची माहिती आयोजकांकडून मागवली आहे. ती आल्यावर सभेस अनुमती देण्यावर विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

(म्हणे) शरीयत कायद्यातील हस्तक्षेप मान्य करणार नाही !

 • एरव्ही हिंदूंच्या विरोधात गरळओक करण्याची एकही संधी न सोडणारी प्रसारमाध्यमे आता यावर चर्चासत्र घेतील का ?
 • ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे देशविरोधी फुत्कार
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - देशात कोणत्याही पक्षाचे शासन असो, मुसलमानांच्या शरीयत कायद्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप मान्य करणार नाही, असा प्रस्ताव अमरोहा येथे झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे. याशिवाय देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बोर्डाकडून मोहीम राबवण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला. (मुसलमान या देशातील सर्व सुखसोयी, सवलती उपभोगतील; पण कायदे मान्य करणार नाहीत. याला लोकराज्य व्यवस्था म्हणतात का ? - संपादक)

संसदेतील कामकाजाअभावी गरिबांची हानी ! - पंतप्रधान

     नवी देहली - गदारोळामुळे संसदेत कोणतेही कामकाज होत नसल्याचे दुःख आहे. गरिब नागरिकांच्या संदर्भात अनेक विधेयके प्रलंबित असून गरिबांची हानी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसकडून गेल्या २ दिवसांपासून संसदेचे कामकाज रोखले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,

अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत अशोक सिंघल यांना श्रद्धांजली

कै. अशोक सिंघल
      मुंबई - ६ डिसेंबर २०१५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा समितीद्वारे कै. अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम भांडुप (प.)च्या देवम सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्य वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभाग सह संघचालक श्री. राधाकिशन भागिया, बजरंग दलाचे प्रान्त संयोजक श्री. उमेश गायकवाड, विश्‍व हिंदु परिषदेच्या (वि.हिं.प.) महिला शहर प्रमुख, श्रीमती रसिलाबेन शाह, उदासीन आश्रमाचे महंत श्री दयानंद महाराज, संघाचे प्रभाग संपर्कप्रमुख श्री. वेदप्रकाश मिश्रा यांनी श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालक वि.हिं.प.चे जिल्हा सहमंत्री अधिवक्ता संतोष दुबे आणि अन्य पदाधिकारी यांनी एकत्र श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अखेरीस कै. अशोक सिंघल यांच्या अस्थींचा कलश भांडुप येथील तलावात वेदमंत्रांच्या उच्चारात विसर्जित करण्यात आला.

अमेरिकच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदीची मागणी

स्कॉटिश विद्यापिठाने ट्रम्प यांना दिलेली पदवी परत घेतली !
मुसलमानविरोधी वक्तव्य केल्याचे प्रकरण
     लंडन - अमेरिकेमध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नये, असे वक्तव्य करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनॉल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रोष वाढला आहे. ट्रम्प यांनाच ब्रिटनमध्ये प्रवेश बंदी करावी, या मागणीसाठी सुमारे अडीच लाख लोकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय स्कॉटिश विद्यापिठाने ट्रम्प यांना दिलेली पदवी परत घेतली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेत मशिदी बंद करण्याचा आणि मुसलमानांवर कठोर लक्ष ठेवण्याचाही सल्ला दिला होता. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्र्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार आहेत. ट्रम्प यांचे ब्रिटनला नेहमी येणे-जाणे असते. त्यांचे स्कॉटलँड येथे दोन गोल्फ क्लब आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी येथे भेट दिली होती.

इतिहासाशी प्रतारणा नको !

नाना पाटेकर यांनी संजय भन्साळी यांना सुनावले
     पुणे - बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या संदर्भातील वादाविषयी श्री. नाना पाटेकर म्हणाले की, चित्रपट हे कलेचे माध्यम आहे; मात्र कलाविष्कार हा इतिहासाशी प्रतारणा करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. ऐतिहासिक घटना, व्यक्ती, काळ यांच्याशी संबंधित चित्रपट असेल, तर मूळ इतिहासाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. त्याची प्रतारणा करता कामा नये, हे भान संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी चित्रपट करतांना ठेवायला हवे होते. जे इतिहासात नाही, ते चित्रपटात कसे येऊ शकते ?, असा प्रश्‍नही श्री. नाना पाटेकर यांनी या वेळी केला.

उत्तरप्रदेशातील ख्रिस्त्यांची हिंदूंकडून त्रास होत असल्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार

बिनबोभाटपणे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांचा हिंदूंच्या विरोधात कांगावा !
     मेरठ (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशातील ख्रिस्त्यांनी हिंदूंकडून त्रास होत असल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अखिल भारतीय ख्रिस्ती महासभेचे जिल्हाध्यक्ष रॉबिन नाथ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ख्रिस्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नावे येथील जिल्हाधिकारी पंकज यादव यांना नुकतेच निवेदन दिले. यात हिंदूंनी ख्रिस्त्यांची स्मशानभूमी बलपूर्वक लाटली, जून मासात बायबलचा अवमान करून ते फाडण्यात आले, तसेच अलीकडे एका पाद्य्रालाही मारहाण केली, असे म्हटले असून अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबरोबरच प्रशासनाकडून त्यांना कोणतेही साहाय्य मिळत नसल्याचेही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मवाना येथे जॉन इसाक नावाच्या पाद्रीला केलेल्या अटकेलाही या ख्रिस्त्यांनी विरोध केला आहे.भ्रष्टाचार स्वीकारार्ह असल्याचे मानणार्‍यांची संख्या भारतात लक्षणीय !

भ्रष्टाचाराचे समर्थन करणे, हे समाजातील नैतिक मूल्ये ढासळत चालल्याचेच द्योतक आहे. ही 
परिस्थिती पालटण्यासाठी शासनाने वेळीच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !
     नवी देहली - गेल्या १० वर्षांत भारतातील प्रमुख ५ घोटाळ्यांत तब्बल १३ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली असून क्रोएशिया आणि केनिया या देशांनंतर भ्रष्टाचाराच्या परंपरेत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भ्रष्टाचार स्वीकारार्ह आहे, असे मानणार्‍यांची संख्याही भारतात लक्षणीय आहे. स्वतःचे काम पूर्ण करून घेण्यासाठी पैसे, भेटवस्तू अथवा करमणुकीची प्रलोभने देणे न्याय्य असल्याचे देशातील ६६ टक्के लोकांचे म्हणणे आहे, अशी खळबळजनक माहिती यंदाच्या वार्षिक आर्थिक अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आय.एस्.आय.एस्.ला नेस्तनाबूत करण्यासाठी अणूबॉम्बची आवश्यकता नाही ! - रशियाचे अध्यक्ष पुतीन

     मॉस्को (रशिया) - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी केवळ क्षेपणास्त्रेच पुरेशी आहेत, अणूबॉम्बची आवश्यकता नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाने सिरियामधील या जिहादी संघटनेच्या तळांवर क्षेपणास्त्रांचे आक्रमण चालू केले आहे. ९ डिसेंबरला प्रथमच रशियाने २ सहस्र ४०० किलोमीटर अंतरावरून कॅस्पियन महासागरात तैनात असलेल्या पाणबुडीवरून क्षेपणास्त्र सोडले. रशियाच्या या आक्रमणात आतापर्यंत या संघटनेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. रशियाने आता या कॅस्पियन महासागरात पाणबुडी आणि मिसाईल क्रूझर पाठवले असल्याची माहिती रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांनी दिली.

श्री एकवीरादेवी मंदिरासह ३७ देवळे अधिकृत करण्याचा विचार ! - खडसे

     नागपूर, १० डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - मावळ तालुक्यातील कार्ल्याच्या प्रसिद्ध श्री एकवीरादेवीच्या मंदिरांसह ३५ गावांमधील ३७ देवस्थाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम अधिकृत करणे, स्थलांतरित करणे आणि निष्कासित करणे यांनुसार देवळांवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. यातील ३७ मंदिरांचे बांधकाम थेट पाडण्याची कार्यवाही न करता ही मंदिरे नियमित करण्याविषयी शासनाचे प्रयत्न रहातील, अशी माहिती महसूल आणि कृषी मंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी १० डिसेंबरला विधानसभेत दिली.

शासनाकडून शिवप्रतापदिनासाठी शिवभक्तांना सातारा जिल्हाबंदी हे दुर्दैवी ! - नितीनराजे शिंदे

     सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महराजांचे नाव घेऊन शासन सत्तेत आले आहे. या शासनाला जनता हिंदुत्ववादी म्हणते. अशा हिंदुत्ववादी शासनाकडून १८ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतापदिन साजरा करण्यासाठी उपस्थित रहाण्यास बंदी करण्यात येऊन ३१ डिसेंबरअखेर सातारा जिल्हाबंदीच्या नोटिसा पाठवण्यात येतात, हे दुर्दैवी आहे, असे मत 'श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती'चे निमंत्रक आणि माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

गोमुखापासून हरिद्वारपर्यंत प्लास्टिक बंदी !

     नवी दहली - गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लास्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. १ फेब्रुवारी २०१६ पासून या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योग बंद करण्याचा आदेश लवादाने दिला आहे.

विरोधकांना दुष्काळाच्या प्रश्‍नावर उपाययोजना नको, राजकारण हवे ! - मुख्यमंत्री

विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग !
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, नागपूर 
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - दुष्काळाविषयी विरोधकांना अनुभव मोठा आहे; मात्र या प्रश्‍नाविषयी चर्चा करण्यात त्यांना स्वारस्य नाही. राज्यात दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया. दुष्काळावर सकारात्मक चर्चा करून उपाययोजना काढण्याविषयी शासन सिद्ध आहे. राज्यात १५ ते २० सहस्र गावे गेल्या ४ वर्षांपासून दुष्काळग्रस्त आहेत. या परिस्थितीला यापूर्वीचे काँग्रेस शासनच उत्तरदायी आहे. शासनाने यापूर्वी केलेल्या कर्जमाफीची रक्कम, ही अधिकोष आणि विविध सोसायट्या यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरण्यात आली. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असतांनाही विरोधी पक्षनेत्यांना या प्रश्‍नावर निव्वळ राजकारण करायचे आहे. हे निषेधार्ह आहे. विरोधकांनी बहिष्कार टाकण्यापेक्षा सभागृहात चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केले. सलग तिसर्‍या दिवशी विरोधकांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या सूत्रावरून शासनाचा निषेध करून सभात्याग केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस सभागृहात बोलत होते. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

तहसीलदारांनी १ मासाच्या आत खुलासा करून भाविकांची क्षमा मागावी ! - अनंत तरे

कार्ला गडावरील श्री एकवीरादेवीचे मंदिर अवैध ठरवल्याचे प्रकरण 
     लोणावळा (जिल्हा पुणे), १० डिसेंबर - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील कार्ला गडावरील श्री एकवीरादेवीचे मंदिर मावळच्या तहसीलदारांनी अनधिकृत ठरवले आहे. त्या निषेधार्थ देवस्थान न्यासाचे अध्यक्ष अनंत तरे 'यांनी मावळचे तहसीलदार यांनी मंदिर अनधिकृत असल्याची घोषणा मागे घेत एक मासाच्या आत जाहीर खुलासा करून भाविकांची क्षमा मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे'. 

बेळगाव येथील कथित थडगे हटवल्याने वाहनतळ करण्याचा मार्ग मोकळा

     बेळगाव - लक्ष्मी मार्केट, खंजर गल्ली येथील महापालिकेच्या मालकीची खुल्या जागेतील अतिक्रमणे मागील वर्षी हटवून महापालिकेने जागा कह्यात घेतली होती. या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी वाहनतळ निर्माण करण्याकरता संरक्षक भिंतही बांधली होती; मात्र कथित थडग्याच्या सूत्रामुळे वाहनतळ चालू करण्याचे लांबणीवर पडले होते. आता कथित थडगे हटवल्याने वाहनतळ चालू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मशिदींची बाजू मांडण्यासाठी अधिवक्त्यांच्या आयत्या वेळच्या हस्तक्षेप याचिकेस न्यायालयाची मान्यता

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील याचिकेचे प्रकरण 
     मुंबई, १० डिसेंबर (वार्ता.) पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. शैलेंद्र दीक्षित आणि भाजपचे नवी मुंबई येथील श्री. संतोष पाचलग यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करण्याची अनुमती मशिदींच्या वतीने काही अधिवक्त्यांनी मागितली होती. या याचिकेची सुनावणी १० डिसेंबरला उच्च न्यायालयात न्यायमूर्ती कानडे आणि रेवती डेरे-मोहिते यांच्या खंडपिठापुढे झाली. तेव्हा न्यायालयाने त्या अधिवक्त्यांचा हस्तक्षेप मान्य केला आणि त्यांना याचिकेच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेला कालावधी देत ७ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. 

पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध हिंदुत्ववाद्यांचे ठिय्या आंदोलन !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावरच तुम्हाला वारंवार 
अशी आंदोलने करावी लागणार नाहीत, हे लक्षात घ्या ! 
नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद' : धर्मांधाकडून हिंदु युवतीच्या कुटुंबियांना मारहाण ! 
     नाशिक - धर्मांध आबीद अली याने २५ नोव्हेंबर या दिवशी येथील हिंदु युवतीची आई आणि भाऊ यांना घरात घुसून मारहाण केली. त्या युवतीचे अपहरण केले. या संदर्भात आबीदच्या आईनेच हिंदूंच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. (धर्मांध महिलांचा उद्दामपणा ! - संपादक) आबीदने त्या युवतीशी ५ डिसेंबरला निकाह केला आहे. 

बीएस्एन्एल् सीमकार्ड आणि रिचार्ज व्हाऊचरचा २५ लक्ष २३ सहस्र ३३४ रुपयांचा अपहार

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! 
बीएस्एन्एल्चे देवगड वरिष्ठ कार्यालयीन 
साहाय्यक निशिकांत सावंत यांना पोलीस कोठडी 
     देवगड - देवगड बीएस्एन्एल् कार्यालयात मार्च ते जून २०१० या कालावधीमध्ये सीमकार्ड अन् रिचार्ज व्हाऊचरचा २५ लाख २३ सहस्र ३३४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वरिष्ठ कार्यालयीन साहाय्यक निशिकांत अनंत सावंत आणि खाजगी अधिकृत सीमकार्ड अन् रिचार्ज वितरक उमेश केशव नेसवणकर यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी निशिकांत सावंत यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे, तर संशयित उमेश नेसवणकर याचा पोलीस शोध घेत आहेत. 

उर्दू दैनिकाचा संपादक इजाज बिहारीला सात दिवसांची पोलीस कोठडी

      बेळगाव, १० डिसेंबर (वार्ता.) - आठ दिवसांपूर्वी सांबरा विमानतळाची छायाचित्रे काढण्याच्या संशयावरून मारिहाळ पोलिसांनी अटक केलेल्या महंमद हुसेन अली याने दिलेल्या माहितीवरून ७ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी गुलबर्गा येथील उर्दू दैनिकाचा संपादक इजाज बिहारी याला अटक केली आहे. या दोघांना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित केले असता महंमद हुसेन अली याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली, तर इजाज बिहारीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (अल्पंसख्य म्हणून अन्याय होत असल्याची ओरड करणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे असतात ? - संपादक)

राष्ट्र-धर्म कार्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील धर्माभिमान्यांची एकदिवसीय कार्यशाळा

मार्गदर्शन करतांना डावीकडून सौ. संगीता घोंगाणे, पू. (कु.) अनुराधा वाडेकर,
सर्वश्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, सुमित सागवेकर, सुनील कदम
धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळाच्या आवश्यकतेची सर्वांना प्रचीती 
मुलुंड, १० डिसेंबर (वार्ता.) - राष्ट्र आणि धर्माचे कार्य करतांना ते देवाला अपेक्षित असे कसे करायचे, प्रत्येक धर्मसेवा अधिकाधिक परिणामकारक कशी करायची, विविध जिल्ह्यांतील धर्माभिमान्यांमध्ये जवळीक निर्माण होऊन संघटन कसे निर्माण करावे, या हेतूने येथे ६ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबई आणि ठाणे येथील २५ जणांनी घेतला. या शिबिराला सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

बीड जिल्ह्यात वर्षभरात २८३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

हिवाळी अधिवेशन २०१५ 
     बीड, १० डिसेंबर दुष्काळाने होरपळलेल्या बीड जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच असून वर्षभरात २८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. प्रशासनाच्या अहवालानुसार १९० शेतकर्‍यांची कुटुंब साहाय्यासाठी पात्र ठरली, तर ९३ शेतकर्‍यांची कुटुंब अद्याप साहाय्यापासून वंचित आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असून अपुर्‍या पावसामुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न आलेले नाही. 

'बाजीराव मस्तानी' चित्रपट आमदारांना दाखवूनच प्रदर्शित करा ! - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी

विधानसभा औचित्याचे सूत्र... 
श्री. प्रताप सरनाईक
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात थोरले बाजीराव पेशवे, तसेच मराठ्यांच्या इतिहास आणि संस्कृती यांचा विचार न करता चित्रीकरण करण्यात आले आहे. तेव्हा हा चित्रपट आधी आमदारांना दाखवण्यात यावा, त्यानंतरच प्रदर्शनाला संमती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी १० डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. (विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे राष्ट्रपुरुषांचे विडंबन रोखण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे प्रत्येक राष्ट्रपुरुषाचे विडंबन सर्वच आमदारांनी रोखणे हे त्यांचे कर्तव्य आहे. - संपादक) 

कुठे आहे असहिष्णुता ?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची अमीर खान 
यांच्या असहिष्णुतेच्या विधानाला सणसणीत चपराक ! 
     पुणे, १० डिसेंबर - हा देश माझा आहे. त्यामुळे या देशात काही समस्या वाटत असतील, तर त्या सोडवण्याचे धैर्य (हिंमत) आपल्यात हवे; पण समस्यांमुळे असुरक्षितता वाढली आहे, असे अजिबात वाटत नाही. समस्या या सुटायला हव्यात, हे खरे आहे. भारतात असहिष्णुतेचे वातावरण किंवा असुरक्षितता आहे, असे आतापर्यंत मला एकही दिवस वाटले नाही. काही त्रुटी असतील, तर त्या मनमोकळेपणाने सांगितल्या जाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी देशाचा नागरिक या नात्याने प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. 
     नाना पाटेकर हे एका कार्यक्रमानिमित्ताने पुणे येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी 'माझी कन्या भाग्यश्री' योजना पंकजा मुंडे-पालवे

     नागपूर १० डिसेंबर (वार्ता.) राज्यात स्त्रियांची संख्या अल्प असल्याने ती वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न राज्यशासन करत आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासमवेतच त्यांचे पोषण, शिक्षणाची सोय करणे आवश्यक आहे. मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हणतात; मात्र, हे चित्र वास्तवात आणण्यासाठी राज्यशासन 'माझी कन्या भाग्यश्री' ही नवी योजना आणत असून गेल्या शासनाची सुकन्या योजना यात विलीन करत असल्याची माहिती बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. 
१. माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी वर्षाला १५३.२३ कोटी, तर योजनेतील मुलींचे वय १८ वर्षे होईपर्यंत ३,१११.१८ कोटींचा खर्च होणार असून मार्च २०१६ पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे.

हिंदूंनी इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटांवर बहिष्कार घालावा ! - रोहित जांभळे

मलकापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलतांना
शिवसेना युवासेनेचे श्री. रोहित जांभळे
     मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १० डिसेंबर (वार्ता.) - बाजीराव-मस्तानी या चित्रटातील इतिहासाचे विकृतीकरण राखून बाजीरावांचा पराक्रमी इतिहास दाखवा, अन्यथा चित्रपटावर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे आवाहन युवा सेनेचे शाहूवाडी तालुकाप्रमुख, भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य आणि भारत स्वाभिमान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रोहित जांभळे यांनी केले. येथील सुभाष चौक येथे ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी, तर सनातन संस्थेच्या सौ. सुनिता भोपळे आणि आधुनिक वैद्य संजय गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सोलापुरात सिद्धेश्‍वर यात्रा वादावर मुख्यमंत्री तोडगा काढणार आमदार प्रणिती शिंदे

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस
     नागपूर/सोलापूर, १० डिसेंबर श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या विषयावरून देवस्थान आणि जिल्हाधिकारी यांच्यात निर्माण झालेल्या वादावर निश्‍चितपणे तोडगा काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 
१. आमदार प्रणिती शिंदे यांनी ८ डिसेंबर या दिवशी दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले आणि सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही दिली असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

चित्रपटगृहमालकांनी पाकिस्तानप्रेमी खानावळीचे चित्रपट दाखवल्यास राष्ट्रभक्तांची शक्ती दाखवू ! - बजरंग दल-विहिंप यांची चेतावणी

     कोल्हापूर, १० डिसेंबर (वार्ता.) - प्रत्येक वेळी नवीन चित्रपटाच्या वेळी काहीतरी विवादस्पद वक्तव्ये करून चित्रपटाची प्रसिद्धी करणारे अभिनेता अमीर आणि शाहरूख या दोन्ही खानांनी त्यांच्या मनातील भारतविरोधी द्वेषभावना व्यक्त करून भारतीय सैनिकांचा घोर अपमान केला आहे. समाजात सुधारणा करत आहोत, अशा धाटणीचे चित्रपट करून हिंदु धर्माचा वारंवार अपमान करून त्याद्वारे पैसे कमवायचे आणि त्याचा विनियोग भारतातील आपत्तीच्या प्र्रसंगी कधीच करायचा नाही. त्यामुळे या दोन्ही पाकिस्तानप्रेमी खानावळीचे आगामी दिलवाले आणि दंगल हे चित्रपट चित्रपटमालकांनी घेऊ नयेत; अन्यथा राष्ट्रभक्त त्यांची शक्ती दाखवतील, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष संतोष कोळी उपाख्य बाळ महाराज यांनी ८ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, शिवसेना विभागप्रमुख श्री. सागर कलगटगी, सर्वश्री अशोक रामचंदानी, सुधीर सूर्यवंशी, शानुर गनके उपस्थित होते.

नागपुरातील ३१ हुक्का पार्लरवर कारवाई - गृहराज्यमंत्री डॉ. पाटील

     नागपूर १० डिसेंबर (वार्ता.) तरुण पिढीचे वाटोळे करू पाहणार्‍या नागपुरातील ३१ अवैध हुक्का पार्लरवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३, सहकलम १३१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. वर्तमान कायद्यानुसार २०० रुपये दंड आहे; मात्र कडक कायद्यांची आवश्यकता आहे. या संदर्भात लवकरच कठोर कायदे करून याला आळा घालण्यात येईल. त्याचप्रमाणे नागपुरात कुठेही हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाल्यास किंवा आढळून आल्यास तत्काळ कारवाई करावी, असा आदेश सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे पथक यांना दिले आहेत, अशी माहिती शासनाच्या वतीने राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. 
     या संदर्भात आमदार मितेश भांगडीया यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. (शासनाने कारवाईत सातत्य ठेवून सर्व प्रकारचे गैरधंदे कायमस्वरूपी बंद करावेत, ही जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)

महानगरपालिका आयुक्तांकडून चौकशी चालू ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात अग्नीशामकाच्या भरतीत अपहार 
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागात अग्नीशामकांच्या २२ जागांसाठी भरती प्रक्रियेमध्ये संशयास्पद अपहार झाल्याने ही प्रक्रिया रहित करण्याची मागणी उमेदवारांनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे ४ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत केली होती. या प्रकरणाची महानगरपालिका आयुक्तांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याचे आमदार दीपकराव साळुंखे-पाटील आणि हेमंत टकले यांनी याविषयी प्रश्‍न विचारला होता.

मद्यबंदीसाठी 'शोले' चित्रपटाप्रमाणे आंदोलन करणारी महिला कह्यात !

मद्यबंदीविषयी शासनाने जनभावना लक्षात घ्याव्यात, ही अपेक्षा !
      नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - बुलढाणा जिल्ह्यात मद्यबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी 'शोले' चित्रपटाच्या पद्धतीनुसार आंदोलन करणार्‍या एका महिलेला महिला पोलिसांनी १० डिसेंबरला सकाळी ६ वाजता कह्यात घेतले. येथील लक्ष्मीनगर येथील पाण्याच्या टाकीवर प्रेमलता सोनोने नावाची महिला चढली होती. वारंवार अर्ज आणि विनंत्या करूनही शासनाने मद्यबंदीसाठी उचित कार्यवाही न केल्यामुळे प्रेमलता यांनी हे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. (जनतेला न्याय मागण्यांसाठी अशा प्रकारे आंदोलन करावे लागू नये, यासाठी शासनाने प्रयत्नशील रहावे. - संपादक)

प्रदूषणामध्ये देहली पाठोपाठ पुणे शहराचा क्रमांक

 • प्रदूषणामुळे सर्दी, खोकला आणि श्‍वसनाचे विकार यांत वाढ
 • मुंबईपेक्षाही पुणे अधिक प्रदूषित
     पुणे, १० डिसेंबर - सफर इंडिया (सिस्टिम ऑफ एयर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग रिसर्च) या प्रदूषण मापन करणार्‍या संस्थेच्या संकेतस्थळावर ८ डिसेंबर या दिवशी देहलीनंतर पुणे शहर आणि परिसर येथे सर्वांत अधिक प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. पुण्याचे तापमान अल्प झाल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पुण्यातील हवेत मुंबईहून अधिक प्रदूषण नोंदवले गेले असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि सफर इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर (पुणे) डॉ. गुरफान बेग यांनी दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानातून भारत धडा घेईल का ?

डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेवर सातत्याने आक्रमणे करणारे धर्मांध मुसलमान आहेत. विश्‍वभरातील मुसलमानांतील सर्व जाती-उपजाती या आतंकवादाला धर्मयुद्धाचे नाव देऊन त्याचे समर्थनच करतात. त्यामुळे अमेरिकेला वाचवण्यासाठी अमेरिकेत येणार्‍या मुसलमानांवर बंदी घातली पाहिजे, अशी विधाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि संपूर्ण विश्‍वात खळबळ माजली. खरे तर ट्रम्प यांनी त्यांची विधाने शांतपणे आणि अभ्यासपूर्वक मांडली आहेत. त्यातून अमेरिकेचे पुढच्या ६ वर्षांचे राजकारण ठरणार असले, तरी भारतीय राज्यकर्त्यांनीही त्यातून धडा घ्यावा, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमीची इच्छा आहे.     
संकलक : श्री. शिरीषकुमार देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे १० डिसेंबरपासून एक वेळ पाणीपुरवठा

 • दुष्काळाची भीषणता !
 • १० प्रतिशत पाणीकपात
     पिंपरी, १० डिसेंबर - ऐन पावसाळ्यात पावसाने दिलेली ओढ, धरणक्षेत्रात अल्प होत चाललेला साठा आणि पुढील ७ मासांचे नियोजन लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १० डिसेंबरपासून संपूर्ण शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत ८ डिसेंबर या दिवशी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत १० प्रतिशत पाणीकपातीचा निर्णय अंतिम करण्यात आला. याविषयीची माहिती पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

हरिश्‍चंद्र पिंप्री (जिल्हा बीड) येथील राजा हरिश्‍चंद्राचे देशातील एकमेव मंदिराचे काम अपूर्ण

 • भाजप शासनाने राजा हरिश्‍चंद्र यांच्या मंदिराच्या बांधकामात लक्ष घालून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, ही अपेक्षा !
 • गेल्या १० वर्षांपासून मंदिराचे बांधकाम अर्धवट स्थितीत
     बीड, १० डिसेंबर - स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी स्वत:चे राज्य देणार्‍या सत्यवचनी राजा हरिश्‍चंद्राचे मंदिर वडवणी तालुक्यातील पिंप्री येथे आहे. राजा हरिश्‍चंद्र याला स्वप्न पडलेले ठिकाण याच गावात आहे. पिंप्री येथील हे हरिश्‍चंद्राचे एकमेव मंदिर आहे. शासनाकडून या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत २५ लक्ष रुपयांचा निधी यापूर्वी संमत झाला आहे. असे असले तरी गेल्या १० वर्षांपासून त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

हिंदु संतांनी उत्सवासाठी उभारलेला मंडप उद्ध्वस्त करणारा आणि त्यांना अन्नत्याग करून देहत्याग करण्यास भाग पाडणारा हिंदुद्रोही वन विभाग !

      ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील डोंगरावर असलेल्या गंगेश्‍वर शिवमंदिराची आणि परिसराची देखभाल जुना आखाड्याचे पू. रघुनंदनगिरी महाराज उपाख्य फक्कडबाबा करत होते. प्रतिवर्षी येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होतो. २०-२५ सहस्र भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. वर्ष २०१४ च्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने या मंदिराजवळ मंडप उभारला होता; मात्र वनविभागाने तो मंडप अनधिकृत असल्याचे सांगत उद्ध्वस्त केला. या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी पू. रघुनंदनगिरी महाराजांनी अन्नत्याग केला होता; मात्र त्याकडे वनविभागाने किंवा कोणत्याही राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी २.३.२०१४ या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना देहत्याग करणे भाग पडले.

मद्यबंदीची आर्त विनवणी !

चिमुरडीचे धाडस !
     ९ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे इयत्ता ७ वीतील मुलीने मद्यबंदीची विनंती केली, तीही अगदी रडून अन् त्यांच्या समोर हात जोडून ! यवतमाळमध्ये मद्यबंदी करा. माझे वडील पुष्कळ मद्य (दारू) पिऊन येतात. ते आईला आणि आम्हाला मारतात. त्यामुळे आम्हाला दुसर्‍यांच्या घरी रहावे लागते.

भारताला सुखी आणि संपन्न करण्यासाठी वेदांच्या आचरणाला पर्याय नाही !

१. राष्ट्रहितापेक्षा स्वहित जपण्याची मानसिकता निर्माण झाल्याने समाज भ्रष्टाचाराने बरबटून जाणे आणि त्याच्या दुष्परिणामांचे सत्ताधार्‍यांना काहीही न वाटणे, हे क्लेशकारक असणे : अन्नधान्यापासून ते अणुबॉम्बपर्यंत आम्ही स्वदेशी वस्तू निर्माण केल्या; पण ते करत असता आम्ही नीतीमत्ता विसरलो, राष्ट्रहिताच्या मानसिकतेपेक्षा स्वहिताची मानसिकता निर्माण केली. देश भ्रष्टाचाराने बरबटून गेला. 
     या घातक भ्रष्टाचाराचे वर्णन समर्थ रामदासस्वामी यांनी केले होते. आजही ते लागू पडते. ते म्हणतात, 
आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें ।
नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ - दासबोध, समास आठवा, श्‍लोक ४ 
मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती ।
देशा दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ - दासबोध, समास आठवा, श्‍लोक ८
समर्थ पुढे म्हणतात,
अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊन राहे ।
राज्याअंतीं नरक आहे । म्हणोनियां ॥ - दासबोध, समास आठवा, श्‍लोक १०

अवैध वाळूवाहतूक करणार्‍या ३० वाहनांवर तहसील कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई

      पुणे, १० डिसेंबर - येथील वाकड भागात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ३० वाहनांवर हवेली तहसील कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी वाहनांवर ११ लक्ष ७० सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यानंतर ती वाहने वाकड पोलिसांच्या कह्यात देण्यात आली आहेत. हा दंड न भरल्यास त्या वाहनांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात येणार आहे. (अवैध वाळूवाहतूक करणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई आणि त्यांना कडक शिक्षा केल्यासच त्याला आळा बसेल ! - संपादक)

आपल्या देशात सर्वांना समान न्याय नाही हेच खरे !

श्री. भाऊ तोरसेकर
       आपल्या देशात समता आणि न्याय अस्तित्वात आहे किंवा नाही ? या देशातील सर्व नागरिकांना सर्व कायदे सारखेच लागू होतात किंवा नाही ? या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थी आहेत. तसे असते, तर मग सोनिया गांधी वा राहुल गांधी यांना न्यायालयात उपस्थित होण्याच्या विषयावर इतके काहुर माजण्याचे काहीच कारण नव्हते; पण ते माजते. कारण कायदे सर्वांना समान असले, तरी काही माणसे इथे कायद्याच्या कक्षेबाहेर असतात. त्यांना कायद्यानुसारचे लाभ मिळू शकतात; पण कायद्यानुसार येणारी जबाबदारी मात्र कोणी त्यांच्यावर लादू शकत नाही. याचा देहलीतला पुरावा म्हणजे अरविंद केजरीवाल आणि राहुल-सोनियांच्या बाबतीत चाललेला भेदभाव होय ! दोन वर्षांपूर्वी याच देहलीत एक मोठा तमाशा रंगला होता. त्याचा नायक अरविंद केजरीवाल होते.

राष्ट्र-धर्म कार्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील धर्माभिमान्यांची एकदिवसीय कार्यशाळा

धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळाच्या आवश्यकतेची सर्वांना प्रचीती 
मार्गदर्शन करतांना डावीकडून सौ. संगीता घोंगाणे, पू. (कु.) अनुराधा 
वाडेकर, सर्वश्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, सुमित सागवेकर, सुनील कदम
     मुलुंड, १० डिसेंबर (वार्ता.) - राष्ट्र आणि धर्माचे कार्य करतांना ते देवाला अपेक्षित असे कसे करायचे, प्रत्येक धर्मसेवा अधिकाधिक परिणामकारक कशी करायची, विविध जिल्ह्यांतील धर्माभिमान्यांमध्ये जवळीक निर्माण होऊन संघटन कसे निर्माण करावे, या हेतूने येथे ६ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबई आणि ठाणे येथील २५ जणांनी घेतला. या शिबिराला सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. 

तूरडाळ घोटाळा प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

      पुणे, १० डिसेंबर - तूरडाळ प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी अब्रुनुकसानीचा दावा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना १९ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश ८ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांनी हा आदेश बजावला आहे.

वाल्हेकरवाडी (जिल्हा पुणे) येथील कथित दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

पोलिसांचा हलगर्जीपणा !
      पुणे, १० डिसेंबर - येथील चिंचवड भागातील वाल्हेकरवाडी येथे रहाणारे मधुकर पाटील यांच्या घरावर ३० नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता दरोडा पडला होता. त्यातील मुख्य आरोपी सूत्रधार नीलेश भराडीया याला चिंचवड पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले होते. भराडीया आणि अन्य काही जणांची चौकशी चालू असतांना अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. या वेळी भराडीया हा पोलिसांना गुंगारा देत पोलीस ठाण्यातून पसार झाला. तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (चोरट्यावर लक्ष न ठेवू शकणारे पोलीस आतंकवाद्यांकडे कसे लक्ष देणार ? या प्रकरणी संबंधित कर्मचार्‍यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक)

मंगळवेढा येथील पोलीस निरीक्षक सालार चाऊस गुटखा प्रकरणामुळे निलंबित

       मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), १० डिसेंबर - गुटखा प्रकरणात पंढरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात नाव आलेले मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी निलंबित केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी दिली.

महंमदवाडी (पुणे) येथील महिला सुधारगृहातून ३८ महिलांचे पलायन !

      हडपसर, १० डिसेंबर - येथील महंमदवाडी भागामध्ये असलेल्या महिला सुधारगृहातील ३८ महिलांनी ८ डिसेंबरच्या रात्री ९ वाजता संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करून पलायन केले. त्यांतील १० महिलांना हडपसर येथे, तर ८ महिलांना पूलगेट परिसरात पोलिसांनी पकडले. इतर महिलांचा शोध चालू असून यासंबंधी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पाकमधील हिंदूंची दयनीय स्थिती !

      पाकिस्तानमध्ये हिंदूंना शाळेमध्ये कलमा शिकवला जातो. आम्हाला कलमा शिकणे कठीण जाते, तरीही आमच्यावर बलप्रयोग केला जातो. मी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि नोकरीसाठी अर्ज भरला; परंतु मी इस्लामचे शिक्षण घेतले नाही; म्हणून मला नोकरी मिळू शकली नाही. शिक्षणामध्ये असलेल्या अशा अडचणींमुळे बहुतेक मुलांना साधी ए, बी, सी, डीसुद्धा येत नाही. हिंदु मुलींनाही बुरखा घालून बाहेर पडावे लागते. सायंकाळी ५ नंतर हिंदु मुली बाहेर पडत नाहीत; कारण कुठला मुसलमान येईल आणि त्यांना उचलून घेऊन जाईल, याची शाश्‍वती नसते. - एक हिंदु शरणार्थी मुलगी

साधकांना सूचना

      पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.१२.२०१५) दुपारी ३.२५ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (११.१२.२०१५) दुपारी ३.५९ वाजता
आज अमावास्या आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या विरोधात गरळओक 
करणारी प्रसारमाध्यमे यावर चर्चासत्र घेतील का ?
     देशात कोणत्याही पक्षाचे शासन असो, मुसलमानांच्या शरीयत कायद्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप मान्य करणार नाही, असा प्रस्ताव उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

      Jago ! : Muslim parsonal law board ne kaha, Shariyat kanoon me kisika hastakshep nahi sahenge.
kya Shariyat kanoon Musalman aparadhiyonko lagaya jayega ?
      जागो ! : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने कहा, शरियत कानून में किसी का हस्तक्षेप नहीं सहेंगे !
क्या शरीयतका कानून अपराधी मुसलमानको लगाया जायेगा ?

पानसरे हत्या प्रकरणात सनातनला गोवण्याचे प्रयत्न झाल्यावर सनातन संस्था, पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांवर झालेले परिणाम

श्री. संदेश नाणोसकर
      सध्या भारतात गाजत असलेले नाव म्हणजे सनातन संस्था आणि सनातन प्रभात ! पानसरे हत्या प्रकरणात सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक होताच पुरोगाम्यांनी सनातन संस्थेवर बंदी घाला, ही मागणी चालू केली. तसेच प्रसारमाध्यमांनी त्यासंबंधी सनसनाटी वृत्ते, ब्रेकिंग न्यूज, चर्चासत्रे आदींद्वारे सनातनची पुष्कळ अपकीर्ती केली. या सर्व गोष्टींचे सनातन संस्था, पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर झालेले परिणाम पुढे देत आहे.
१. सनातनद्वेष्ट्यांचे षड्यंत्र समाजासमोर येणे आणि अप्रत्यक्षपणे सनातन संस्थेचा प्रसार वाढण्यास हातभार लागणे : या प्रकरणात आरंभीपासून सनातनला स्थुलातून त्रास झाला, तरी त्याचा सनातन संस्थेचे कार्य आणि साधकांची साधना यांवर कोणताही परिणाम झाला नाही. या परिस्थितीतही भगवान श्रीकृष्ण, शंकराचार्य, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या कृपेमुळे सनातनचे साधक शिकण्याच्या स्थितीत राहून साधना करत पुढे जात आहेत. संस्थेचे प्रवक्ते, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, संस्थेचे हितचिंतक आणि हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधी यांनी या प्रकरणी सनातनची सत्य बाजू समाजासमोर मांडली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य वाढतच आहे. तसेच संत, मान्यवर आणि अनेक नागरिक सनातन संस्था समाजासाठी आवश्यक तेच कार्य करत आहेत, अशा आशयाचे अभिप्राय व्यक्त करत आहेत.

नामजपाच्या माध्यमातून सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या आणि सर्वांवर प्रेम करणार्‍या रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९३ वर्षे) !

पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी
      राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याचे दिनांक ८ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. पू. (श्रीमती) शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. श्री. रविकांत शहाणे (आजींचा मुलगा), रत्नागिरी
      दीपावलीनिमित्त आम्ही यंदा नाटे, रत्नागिरी येथे गेलो होतो. त्या वेळी आईविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१ अ. चांगली स्मरणशक्ती
      कुणाला एखादा निरोप सांगायचा असो, कुणाकडून एखादी वस्तू आणायची असो किंवा कुणाला एखाद्या ठिकाणी जायचे असो, ते काम पूर्ण होईपर्यंत ती संबधित व्यक्तीचा पाठपुरावा करत असते.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

गोपींची वस्त्रे चोरी करून झाडावर बसलेला श्रीकृष्ण
(६.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

शेंगदाण्यांना मुंग्या लागल्याचे हातवारे करून दाखवणारा चि. सर्गे व्लादीमीर सिर्कोविच (वय ६ वर्षे) !

चि. सर्गे सिर्कोविच
      सध्या सर्बिया (युरोप) येथील श्री. व्लादीमीर सिर्कोविच हे त्यांची धर्मपत्नी आणि मुलगा यांच्यासह काही दिवस आश्रमजीवन अनुभवण्यासाठी रामनाथी येथील सनातन आश्रमात आले आहेत. त्यांचा मुलगा चि. सर्गे याला इंग्रजी किंवा भारतीय भाषा येत नाही. १२.११.२०१५ या दिवशी मी शेंगदाणे उन्हात वाळत घातले होते. काही वेळाने चि. सर्गे माझ्याकडे आला आणि हाताला धरून त्याने मला अंगणात नेले. नंतर त्याने हातवारे करून शेंगदाण्यांना मुंग्या लागल्याचे मला दाखवले. खरेतर तेथे खेळत असलेल्या इतर बालसाधकांनीही मुंग्या पाहिल्या होत्या; पण चि. सर्गेनेच शेंगदाण्यांना मुंग्या लागल्याचे दाखवले. या प्रसंगातून सर्गेमधील सतर्क असणे आणि भाषा न येण्याच्या अडथळ्यावर मात करणे हे गुण शिकायला मिळाले.
- श्रीकृष्णाच्या चरणाजवळ जायला तळमळणारी श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०१५)

भृगु महर्षींची प्रतिमा आणि संहिता यांचे आश्रमात आगमन झाल्यावर आलेली अनुभूती

श्री. नीलेश सिंगबाळ
१. भृगु महर्षींच्या प्रतिमेच्या आगमनापूर्वी 
भावजागृती होणे आणि मनाला आनंद अन् शांती 
जाणवून वातावरण आणि निसर्गही प्रफुल्लित वाटणे
      २.११.२०१५ च्या सायंकाळी भृगु ऋषींची प्रतिमा आणि त्यांची संहिता यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन होणार होते. आगमनापूर्वी अर्ध्या घंट्यापासून माझी सतत भावजागृती होत होती. माझ्यावर चैतन्याचा वर्षाव होत आहे, असे मला जाणवत होते. त्यामुळे माझ्या मनाला आनंद आणि शांती एकाच वेळी जाणवत होती. त्याच वेळी काही वेळ मनाची निर्विचार स्थितीही मला अनुभवता आली. त्या वेळी वातावरण प्रसन्न वाटत होते. तसेच निसर्गही प्रफुल्लित झाला असल्याचे जाणवत होते. 

यजमानांच्या आजारपणाचे प्रारब्ध हे प्रसाद म्हणून स्वीकारून त्यातून तळमळीने साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्‍या मंगळुरू येथील सौ. लक्ष्मी पै !

सौ. लक्ष्मी पै
श्रीकृष्णा,
     तुझ्या चरणकमली अनंत कोटी कृतज्ञता ! सर्वज्ञ अशा तुला सर्वच समजले आहे, हे ठाऊक असूनही तुझ्या चरणी सर्व समपिर्र्त करावे, या कृतज्ञतेने हे पत्र लिहित आहे.
१. माझा देवाणघेवाण हिशोब संपवून आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने करवून घ्या, अशी प्रार्थना होणे आणि त्यानंतर यजमान आजारी पडल्याने प्रार्थना श्रीकृष्णाच्या चरणी पोचल्याचे जाणवून प्रारब्ध हे प्रसाद म्हणून स्वीकारणे
     वर्ष २०१४ च्या गुरुपौर्णिमेपासून माझ्या यजमानांना एका विचित्र अशा नसांच्या दौर्बल्याच्या रोगाला प्रारंभ झाला. केवळ २ - ३ दिवसांतच हातापायातील शक्ती जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून रहाण्याची वेळ आली. त्या वेळी गुरुपौर्णिमेच्या अंतर्गत मला अनेक महत्त्वाच्या सेवांचे दायित्व देण्यात आले होते. त्या सर्व सेवा देवा तूच माझ्याकडून निर्विघ्नपणे करवून घेतल्या. गुरुपौर्णिमा संपताच हे घोर प्रारब्ध भोगण्याची संधी दिली. गुरुपौर्णिमेच्या आधीपासून माझ्याकडून प्रतिदिन माझा देवाणघेवाण हिशोब संपवून माझी आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने करवून घ्या, अशी प्रार्थना सहजतेने होत होती. माझी प्रार्थना तुझ्या चरणी पोचल्याचे निदर्शक म्हणून हे प्रारब्ध मी प्रसाद म्हणून स्वीकारले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !
- (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

उपासनेने मी शरीर नाही, हे रहस्य कळणे आणि तत्त्वाची अनुभूती येणे

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
     भगवती उपासक आणि सप्तशतीचा आराधक मृत्यू तरून जातो, मृत्यू जिंकतो, अशी फलश्रुती अन् भगवतीचा वरही आहे. मृत्यू जिंकतोे म्हणजे नेमके काय ? ज्ञानी मरत नाहीत का ? ऋषि मृत्यू पावले नाहीत का ? 
      सगळे ज्ञानी, उपासक आणि ऋषि मृत्यू पावतात. मृत्यू तरतो, मृत्यू जिंकतो, याचा अर्थ न मरणे असा नाही. मृत्यू तरतो, म्हणजे मृत्यू जाणतो, अनुभवतो. जन्म आहे तेथे मृत्यू आहेच. जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरिराचा मृत्यू अनिवार्य आहे. ती नियती आहे. मृत्यू शरिराचा आहे. माझा नाही; कारण मी शरीर नाही, हे रहस्य उपासनेने कळते. भगवती तत्त्वाची अनुभूती येते. साक्षात्कार घडतो.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०१३)) 
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

वेगळा विदर्भ कशाला ?

संपादकीय 
    वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. काँग्रेस सत्तेवर असतांना भाजपमधील काही नेत्यांनीही या मागणीचा पुरस्कार केला होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने परत एकदा हे सूत्र ऐरणीवर आले आहे. विदर्भाचा विकास झाला नाही. विकासाची फळे पुण्या-मुंबईला मिळतात. विदर्भाला लुटले जाते, असे वेगळ्या विदर्भाची मागणी करणार्‍यांचे म्हणणे आहे. घरातील भाऊ-भाऊ, काका-पुतणे वेगळे होतात, तर वेगळा विदर्भ का नको, असेही त्यांचे म्हणणे आहे. विदर्भात विजेचे तीन मोठे प्रकल्प आहेत आणि दोन विजेच्या प्रकल्पांचे विस्तारीकरण होणार आहे, त्यामुळे वेगळा विदर्भ झाल्यास महाराष्ट्रात वीजटंचाईचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो; म्हणून वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध आहे, असेही काहींना वाटते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn