Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आय.एस्.आय.साठी हेरगिरी करणार्‍या फरीद खान या भारतीय सैनिकास अटक !

सैन्यातील फितुरांना ओळखू न शकणारे सैन्यदलातील 
उत्तरदायी सैन्यात सेवा करण्याच्या पात्रतेचे आहेत का ?
हेरगिरी प्रकरणी पाचवी अटक
     नवी देहली - समरप्रसंगी अथवा युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्याच्या तुकड्यांचा ठावठिकाणा कुठे असेल, या माहितीचा समावेश असलेली गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी हेरसंस्था आय.एस्.आय.च्या हस्तकाला दिल्याप्रकरणी देहली पोलिसांनी ६ डिसेंबर या दिवशी फरीद खान या भारतीय सैनिकाला सिलिगुडी येथून अटक केली. (सुरक्षायंत्रणांमध्ये अधिकाधिक मुसलमानांना आरक्षण द्यावे; म्हणून कावकाव करणारे निधर्मीवाले आता गप्प का ? - संपादक) सैन्याच्या हेरगिरी प्रकरणात झालेली ही पाचवी अटक आहे.

विधीमंडळाच्या आवारात शिवसेना आणि भाजप आमदारांची समोरासमोर निदर्शने !

हिवाळी अधिवेशनास प्रारंभ !
     नागपूर - ७ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र आणि वेगळ्या विदर्भाच्या सूत्रावरून विधानभवनाच्या परिसरात शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी समोरासमोर येऊन निदर्शने केली. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या हकालपट्टीची मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला कडाडून विरोध केला. विदर्भातील भाजपच्या काही आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने घोषणा दिल्या.

आय.एस्.आय.एस्.ला संपवूनच अमेरिका शांत बसणार ! - बराक ओबामा

आय.एस्.आय.एस्.ला संपवण्याचा विडा उचलणार्‍या अमेरिकेकडून भारतीय राज्यकर्त्यांनी बोध घ्यावा !
सॅन बर्नाडिनो येथील गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच !
     वॉशिंग्टन - कॅलिफोर्नियातील सॅन बर्नाडिनो येथे झालेला गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच होते, अशी स्वाकृती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली. (महासत्ता असणार्‍या अमेरिकेलाही आय.एस्.आय.एस्. दणका देते ! भारताने यातून बोध घेऊन आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात पावले उचलणे आवश्यक आहे ! - संपादक) व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर इस्लामचीही शत्रू असून आता या संघटनेला संपवूनच अमेरिका शांत बसणार असल्याची सज्जड चेतावणीही ओबामा यांनी दिली.

आय.एस्.आय.एस्.कडून ब्रिटनवर आक्रमण करण्याची चेतावणी

जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली युरोपीय देश !
     लंडन - पाश्‍चिमात्य राष्ट्रांनी सिरियामध्ये आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेविरुद्ध उघडलेल्या आघाडीमुळे बिथरलेल्या या संघटनेने ब्रिटनवर आक्रमण करण्याची चेतावणी एका ध्वनीचित्रफितीद्वारे दिली आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटिश खासदारांनी संसदेत सिरियावर हवाई आक्रमणे करण्यास मान्यता दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आय.एस्.आय.एस्.ने ही चेतावणी दिली आहे. इंग्रजी भाषेत असलेल्या या ध्वनीचित्रफितीत म्हटले आहे, सूड उगवण्यासाठी युद्ध चालू झाले असून आता रक्ताचे पाट वाहतील. फ्रान्सपासून त्याचा आरंभ झाला आहे. या चित्रफितीत स्फोटकांचा बेल्ट बांधलेला, तसेचच एके ४७ रायफल घेतलेला आतंकवादी दाखवण्यात आला आहे. या जगात आमच्या बंदुकीपासून जगातील कोणताही देश सुरक्षित राहू शकत नाही, असे आतंकवादी सांगतांना दिसत आहे.

आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्यासाठी ट्यूनेशियाच्या ७०० महिला सिरियात दाखल !

भविष्यात महिला जिहादी आतंकवाद्यांना सामोरे जाण्यासाठी 
भारतीय सुरक्षायंत्रणा सिद्ध आहे का ?
    ट्यूनिस - गृहयुद्धात धर्मांध कट्टरतावाद्यांशी संघर्षरत असलेल्या ट्यूनेशियातील जवळपास ५ सहस्र लोक सिरिया, इराक आणि लिबिया या देशांमध्ये वर्चस्व असलेल्या आय.एस्.आय.एस्. या क्रूर आतंकवादी संघटनेत किंवा अन्य संघटनेत सहभागी होण्याचा विचार करत आहेत. एवढेच नव्हे, तर या आतंकवादी संघटनेत सहभागी होेण्यासाठी जवळपास ७०० ट्यूनिशियाई महिला सिरियाला पोहोचल्या आहेत, अशी माहिती देशाच्या महिला विषयक खात्याच्या मंत्री समीरा मेराई यांनी संसदेत दिली. (इस्लामसाठी काही मुसलमान महिला जिहादी होतांना दिसतात, या उलट हिंदु धर्म संकटात असतांना हिंदु महिला आघातांच्या विरोधात साधा निषेधही नोंदवत नाहीत ! - संपादक) आतंकवादाच्या आरोपाखाली सिरिया आणि ट्यूनिशिया येथील कारागृहांमध्ये शेकडो महिला अटकेत आहेत, असेही मेराई म्हणाल्या.सामाजिक प्रसारमाध्यमे जागतिक आतंकवादाच्या विरोधात लढणार !

     सॅनफ्रान्सिस्को - आय.एस्.आय.एस्.सारख्या जिहादी आतंकवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्रचार आणि भरती करण्यात येते. अशा संघटनांच्या वाढत्या ऑनलाईन प्रभावाला थोेपवण्यासाठी आता फेसबूक, गुगल आणि ट्विटर यांसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या आस्थापनांनी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

४८ घंट्याच्या आत सैन्य माघारी न बोलावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !

इराक आणि तुर्कस्थान यांच्यातील वाद विकोपाला !
इराकची तुर्कस्थानला गर्भित चेतावणी
     इराक - तुर्कस्थानचे सैन्य अनुमतीशिवाय इराकमध्ये घुसल्यामुळे त्यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले असल्याचे इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. तुर्कस्थानने त्याचे सैन्य पुढील ४८ घंट्याच्या आत मागे न घेतल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागेल, अशी गर्भित चेतावणी इराकने दिली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उलंघन असून याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे साहाय्य घेतले जाईल, असेही इराकने म्हटले आहे. तुर्कस्थानने इराकच्या मोसुल या शहराजवळ त्यांचे १५० सैनिक आणि २५ रणगाडे पाठवले आहेत. आय.एस्.आय.एस्.ने मागील वर्षी मोसुल शहराला उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे ही कारवाई केल्याचे तुर्कस्थानने म्हटले आहे.राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी आहे का ?

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पत्रकार परिषदेत प्रश्‍न 
श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय न हटवल्यास 
राज्यव्यापी आंदोलनाची हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
      कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक संजयकुमार अत्यंत गतीने आणि तत्परतेने पत्रकारांना माहिती देतात. श्री. समीर गायकवाड यांची सगळी माहिती, त्यांच्या संदर्भातील सर्व घडामोडी प्रतिदिन पत्रकार परिषद घेऊन सांगतात. श्री. गायकवाड यांनी केलेल्या केलेल्या आरोपांचे लगेच खंडण करतात. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अन्वेषणात मात्र याउलट घडत आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयात उपस्थित न रहाण्याची सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची विनंती न्यायालयाने फेटाळली !

आज न्यायालयात उपस्थित रहावे लागणार !
     नवी देहली - नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित न रहाण्याची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची विनंती देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या ८ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सुनावणीच्या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना देहलीतील पटियाला हाऊस न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.

अखलाखच्या कुटुंबियांनी केली अन्वेषण थांबवण्याची मागणी

  • दादरी प्रकरणामुळे हिंदूंच्या माथ्यावर असहिष्णु असा शिक्का मारण्यात आला ! त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. 
  • हिंदूंनी या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे लावून धरावी !
दादरी प्रकरण
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - दादरी प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय्) करावे, अशी मागणी लावून धरणार्‍या अखलाखच्या कुटुंबियांनी यापुढे या प्रकरणाचे कोणतेही अन्वेषण करण्यात येऊ नये, अशी आश्‍चर्यकारक मागणी केली आहे. (अन्वेषण थांबवण्यामागे कारणे काय, हेही अखलाख यांच्या कुटुंबियांनी जनतेला सांगावीत ! - संपादक) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ६ डिसेंबरला अखलाखच्या कुटुंबियांची भेट घेतली असता त्यांनी ही मागणी केली.

आता गरीब सवर्णांनाही मिळू शकते आरक्षण !

आरक्षणाची कुप्रथा समाजात फूट पाडणारी असल्याने ती हटवून गुणवत्तेच्या आधारे 
सर्वांना संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे !
     नवी देहली - आर्थिकदृष्ट्या गरीब असणार्‍या सवर्णांनाही आरक्षण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जात या घटकाप्रमाणेच व्यवसायाला देखील मागासलेपणाच्या निकषाच्या स्वरूपात स्वीकारले जाऊ शकते, असे राष्ट्र्रीय मागासवर्गीय आयोगाचे मत बनले आहे. या आधारावर गरीब सवर्णांचा इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसींच्या) कोट्यात समावेश करण्याचा विचार आयोग करत आहे.
१. मागासवर्गाचा आधार निश्‍चित करण्यासाठी जाती व्यतिरिक्त इतर घटकांचाही विचार व्हायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा साहनी यांनी मंडल आयोगासंदर्भात दिलेल्या एका निवाड्यात स्पष्ट केल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष जस्टीस व्ही. ईश्‍वरैय्या यांनी म्हटले आहे.

वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरुजी करत असलेले कार्य राष्ट्रकार्यच ! - प.पू. जितेंद्रनाथ महाराज

डावीकडून डॉ. रुपकिशोर मिश्र, श्री. शरद जोशी, सौ. ऐश्‍वर्या आणि
वेदमूर्ती घैसास गुरुजी, आमदार वळसे पाटील, डॉ. मुजुमदार,
प.पू. जितेंद्रनाथ महाराज आणि श्री. बंडू केमसे
    पुणे - वेदमूर्ती घैसास गुरुजी गुरुकुलपद्धतीने वेदांचे अध्ययन, अध्यापन, प्रचार आणि प्रसाराचे कार्य गेली २५ वर्षे निरलसपणे करत आहेत. येणार्‍या लहान मुलांना संस्कारक्षम बनवणे, हे फार मोठे कार्य ते करत असून हे राष्ट्रकार्यच आहे, असे गौरवोेद्गार अंजनगाव (सुर्जी) येथील प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांनी काढले. वेदमूर्ती घैसास गुरुजी यांच्या षष्ठयब्दी निमित्त वेदभवनाच्या विद्यार्थी परिवाराकडून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री वासुदेव निवास ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त श्री. शरदराव जोशी, आमदार दिलीप वळसे पाटील, काशी हिंदु विश्‍वविद्यालयाचे वेदविभाग अध्यक्ष डॉ. श्री रुपकिशोर मिश्र, पुणे येथील सिंबायोसिस संस्थापक पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते. वेदभवनात असतांना गुरुजींनी आम्हाला जी विद्येची पुंजी आणि संस्कार दिले, त्यामुळे आम्ही जीवनात उत्तम नागरिक बनलो आहोत, असे वेदमूर्ती योगेश सोवनी यांनी सांगितले. डॉ. मुजुमदार म्हणाले, अनेक विद्यापिठे जे कार्य करू शकणार नाहीत, असे वेदविद्येचे कार्य वेदमूर्ती घैसास गुरुजी करत आहेत.

११ नोव्हेंबर २०१६ पासून श्रीराम मंदिर उभारणीचे कार्य आरंभणार !

काँग्रेसला सत्ताच्युत केल्यानंतरही श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 
हिंदूंना एवढे आंदोलन का करावे लागते ?
नवी देहली येथील राष्ट्रवादी शिवसेनेने केली घोषणा

सभेत बोलतांना श्री. जयभगवान गोयल
     नवी देहली - वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा नेस्तनाबूत करण्याच्या घटनेला २३ वर्षे पूर्ण झाली. प्रतिवर्षी ६ डिसेंबर हा दिवस हिंदुत्ववादी संघटनांकडून शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा राष्ट्रवादी शिवसेना या हिंदुत्ववादी संघटनेने ६ डिसेंबरला नवी देहली येथे एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत राष्ट्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यूनायटेड हिंदू फ्रंट या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव श्री. जयभगवान गोयल यांनी, केंद्रशासनाने अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे कार्य चालू करावे अन्यथा यूनायटेड हिंदू फ्रंट, हिंदू महासभा , राष्ट्रवादी शिवसेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना या साधूसंतांच्या मार्गदर्शनाखाली ११ नोव्हेंबर २०१६ पासून श्रीराम मंदिराच्या उभारणीस आरंभ करील, अशी घोषणा केली.

डोंगररागांच्या पायथ्याशी असलेल्या भूमीवर दगडाच्या खाणींसाठी अनुमती देण्याचा केंद्रशासनाचा विचार

केंद्रशासनाचा समाजविघातक आणि भयावह निर्णय !
     संभाजीनगर - बांधकामासाठी दगडांची वाढती मागणी आणि गौण खनिजाचा वाढता उपसा लक्षात घेऊन शासनाने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भूमीवर दगडाच्या खाणींना अनुमती देण्याचा विचार चालू केला आहे. त्या दृष्टीने केंद्रशासनाने नियुक्त केलेल्या पर्यावरण समितीकडे दगड खाणींसाठी अनुमती मागणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार शासनाच्या किंवा खाजगी भूमीवर दगडाच्या खाणींसाठी पर्यावरण विभागाची अनुमती घ्यावी लागणार आहे.

श्री क्षेत्र आगडगाव (नगर) येथे सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

     नगर- येथील श्री क्षेत्र आगडगाव येथे सुप्रसिद्ध श्री काळभैरवनाथ आणि श्री जोगेश्‍वरीमाता मंदिर आहे. श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त ३ डिसेंबर या दिवशी सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावले होते. त्याला अनेक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

(म्हणे) पाकशी चर्चा करून मोदी शासनाने देशाचा विश्‍वासघात केला !

भारत-पाक चर्चेवर काँग्रेसची टीका
गेली ६८ वर्षे वारंवार पाकच्या संदर्भात लाळघोटेपणा करणार्‍या आणि भारत-पाक प्रश्‍न
 न सोडवू शकलेल्या काँग्रेसला आता शासनावर टीका करण्याचा नैतिक अधिकार उरतो का ?
     नवी देहली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात बँकॉक येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील झालेल्या चर्चेवर काँग्रेसने जोरदार टीका केली. ही चर्चा म्हणजे मोदी शासनाने देशाचा केलेला मोठा विश्‍वासघात असल्याचे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे ६ डिसेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या पातळीवरील बैठक पार पडली.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ६ सैनिक घायाळ

सैनिकांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेल्या
 आतंकवाद्यांना केंद्रशासन कधी धडा शिकवणार ?
     श्रीनगर - अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या जवळ असलेल्या समथान येथे ७ डिसेंबर या दिवशी सकाळी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस दलाचे ६ सैनिक घायाळ झाले. या सैनिकांना अनंतनाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सैनिक बसने श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होते. त्या वेळी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर श्रीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम चालू करण्यात आली आहे.
     या देशात हिंदू बहुसंख्य आहेत; म्हणूनच हा देश सहिष्णु आहे ! - सौ. मेधाताई कुलकर्णी, भाजप आमदार

श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने १२ वे वारकरी महाअधिवेशन !

     देशात गोहत्या बंदी कायदा करावा, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे विविध आघात रोखणे या आणि अन्य मागण्यांसाठी आळंदी येथे वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एकत्रितरित्या वारकरी महाअधिवेशन आयोजित केले आहे.
स्थळ : श्री मोतीराम महाराज फळेकर फड, गोपाळपुरा, श्रीकृष्ण मंदिराजवळ, श्री क्षेत्र आळंदी, पुणे
दिनांक : ८ डिसेंबर २०१५     वेळ : दुपारी १
भ्रमणभाष : ८९८३३ ३५५१७

डान्सबार बंदीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! - स्मिता पाटील

     संभाजीनगर - केवळ आर्.आर्. पाटील यांची मुलगी आहे म्हणून नव्हे, तर वडिलांनी डान्सबार बंदीचा घेतलेला धाडसी निर्णय समाज उपयोगी होता आणि आहे. त्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी उभे रहाणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. ही भूमिका असल्याने शासनाने ऐकले नाही, तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू आणि आर्.आर्. पाटील यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत राहू, असे माजी उपमुख्यमंत्री आर्.आर्. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील म्हणाल्या.

कांदिवलीत ५० सिलेंडरच्या स्फोटांमुळे भीषण आग !

  • २ सहस्रांहून अधिक झोपड्यांची राख ! 
  • विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न ! 
  •  ७ जणांचा मृत्यू, अनेक घायाळ ! 
     मुंबई - कांदिवलीतील दामूनगर झोपडपट्टीत दुपारी १२:३० वाजता ५० सिलेंडरचे एकामागून एक स्फोट झाले. मोठ्या प्रमाणात आग लागली. परस्परांना लागून असलेल्या झोपड्यांमुळे आगीने जोर धरला आणि भीषण स्वरूप धारण केले. धुराचे लोटच्या लोट बराच वेळ बाहेर पडत होते. यात २ सहस्र झोपड्या जळून राख झाल्या. अग्नीशमन दलाच्या १६ गाड्या आणि पाण्याचे १० टँकर घटनास्थळी आग विझवण्यासाठी आले. या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून घायाळ रुग्णांना शताब्दी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. 

शोकप्रस्तावानंतर विधीमंडळाचे कामकाज स्थगित !

वेळेचा सदुपयोग करणारे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रात असतील ! 
     नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल ओम प्रकाश मेहरा, मणिपूर राज्याचे राज्यपाल, तसेच माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद, अंदमान आणि निकोबारचे माजी नायब राज्यपाल आणि माजी विधान सभा सदस्य रामचंद्र कापसे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे, सांगली येथील माजी मंत्री मदन पाटील, मोहनराव गुदगे, अमृतराव राणे, रामजी वरठा, भगवानशहा मसराम, बाबुराव नरके, निवृत्तीराव गायधनी अशा माजी विधानसभा सदस्यांच्या दुःखद निधनाविषयी विधानसभेत ७ डिसेंबर या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर ८ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. (लोकप्रतिनिधींची अनेक कामे आणि निर्णय रखडलेले असतांना शोकप्रस्तावासाठी दिवसभर विधानसभेचे कामकाज बंद ठेवणारे लोकप्रतिनिधी वेळेचा योग्य वापर कधी करणार ? - संपादक)

डान्सबारसाठी शासनाची नियमावली

     मुंबई - डान्सबारला राज्यात अनुमती मिळाल्यानंतर आता राज्यशासनाने डान्स बारसाठी नवीन नियमावली घोषित केली आहे. डान्सबारमध्ये आता केवळ ४ नर्तिका असणार आहेत. तसेच त्या अल्पवयीन असता कामा नये. शिवाय नाचणार्‍यांवर मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बारमध्ये धूम्रपानाला सक्त बंदी घालण्यात आली आहे. नर्तिकांवर पैसे उधळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे गोमांस घेऊन जाणार्‍या धर्मांध कसायाला अटक

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी !
     संभाजीनगर - येथील सिल्लेखाना भागात रहाणारा धर्मांध फिरोज कुरेशी शकुर कुरेशी हा मालवाहू रिक्शामधून गोमांसाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सिटीचौक पोलिसांनी लेबर वसाहतीत गोमांस घेऊन जाणार्‍या कुरेशीला अटक केली. त्याच्याकडून ५० किलो गोमांस आणि मालवाहू रिक्शा शासनाधीन करण्यात आली आहे. कुरेशी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपच्या आमदारांना निवेदन सादर

आमदार श्री. कृष्णा खोपडे यांना
निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते 
नागपूर ७ डिसेंबर (वार्ता.) - नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाच्या चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील स्थानिक आमदारांना संपर्क करून राष्ट्र-धर्म या संदर्भातील विषय भाजपचे विधानसभेतील आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे आणि विकास कुंभारे यांना देण्यात आले.

परभणी येथे कसायाकडे नेण्यात येणारे १० गोवंश पोलिसांकडून शासनाधीन

धर्मांध वाहनचालक कह्यात 
शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा ! 
     परभणी, ७ डिसेंबर - हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथून परभणीतील कसायाकडे ७ गायी आणि ३ गोर्‍हे घेऊन जाणारा एक टेम्पो पोलिसांनी ५ डिसेंबरच्या रात्री पकडला. बजरंग दल आणि संभाजी सेना यांच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून धर्मांध वाहनचालकाला कह्यात घेण्यात आले आहे. 

नांदेड शहरात मुसलमानांनी ६ डिसेंबर हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळला

हिंदूंनी जर असे काळे दिवस पाळायचे ठरवले, तर वर्षातील ३६५ दिवसही पुरणार नाहीत ! 
     नांदेड, ७ डिसेंबर - नांदेड शहरातील मुसलमानांंनी बाबरी पतनाचा निषेध करण्यासाठी ६ डिसेंबर हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळला. या वेळी मुसलमानांनी त्यांच्या संघटना, प्रतिष्ठान आणि घरे यांवर काळे झेंडे लावले होते. येथे रविवारी भरणार्‍या आठवडी बाजारात एकाही मुसलमानाने आपले दुकान लावले नाही. गेल्या आठवड्यातच हा दिवस 'काळा दिवस' पाळण्यासाठी मुसलमानांची बैठक झाली होती, तसेच ४ डिसेंबर या दिवशी नमाजाच्या वेळीही यासंबंधी सूचना देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (हिंदूंनो, मुसलमानांकडून धर्माभिमान आणि संघटन यांविषयी बोध घ्या ! - संपादक) यामुळे ६ डिसेंबर या दिवशी शहरात तणावाचे वातावरण होते.

उजिरे (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. सुब्राय शेणॉय यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उजिरे (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. सुब्राय शेणॉय (वय ८० वर्षे)(डावीकडे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांना भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देतांना कर्नाटक राज्य प्रसारसेवक श्री. रमानंद गौडा

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचीच पुरोगाम्यांची वृत्ती !

     डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या नागोरी आणि खंडेलवाल यांना गुन्हा मान्य करण्यासाठी ५० लक्ष रुपये देऊ केले होते. पोलीस अशा प्रकारे चुकीच्या लोकांना दाभोलकर हत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असतांना दाभोलकर कुटुंबियांनी पोलिसांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या चौकशीची मागणी केली नाही.

सिद्धरामेश्‍वर यात्रेत प्रशासनाच्या जाचक अटींच्या विरोधात सोलापूर बंद; दगडफेकीत २ घायाळ

     सोलापूर - सिद्धरामेश्‍वर यात्रेत जाचक नियम लागू केल्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंच्या विरोधात सर्वपक्षियांनी ७ डिसेंबर या दिवशी बंदची हाक दिली आहे; मात्र बंदच्या समर्थनार्थ परिवहनच्या बसगाड्यांवर केलेल्या दगडफेकीत २ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे या बंदला गालबोट लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धरामेश्‍वर यात्रेत पालकमंत्री श्री. विजय देशमुख प्रमुख मानकरी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली जाचक नियम लागू केल्याचा दावा केला जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यात्रेत चटई घालण्याची व्यवस्था केली आहे; मात्र या चटईवरून नंदी ध्वज धारण करणारे मानकरी आणि भाविक घसरून पडण्याची शक्यता आहे. याविषयी कायदेशीर गोष्टी आणि परंपरा यांचे दाखले समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत; मात्र जिल्हाधिकारी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. तसेच जे कोणी यात पालट करतील त्यांच्या विरोधात प्रसंगी गुन्हे नोंद करण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.

धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

बैठकीत सहभागी हिंदुत्ववादी
     पुणे, ७ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शनिवारवाडा येेथे २९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदूसंघटनाचा दुसरा टप्पा म्हणून या सभेनंतर हिंदुत्वासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍या धर्माभिमान्यांची १ डिसेंबर या दिवशी येथील उपाशी विठोबा मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपस्थित २५ हून अधिक धर्मप्रेमींनी धर्माचरण करण्याचा, तसेच ग्रामीण भागामध्ये धर्मप्रसारासाठी वेळ देण्याचा निर्धार केला. प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे, तसेच १ जानेवारी हा पाश्‍चात्त्य नववर्षारंभ साजरा न करण्याच्या संदर्भात जनप्रबोधन चळवळ राबवण्याचेही या निमित्ताने ठरवण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अभिजीत देशमुख, कृष्णाजी पाटील, सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते उपस्थित होते. 

घृष्णेश्‍वर, संभाजीनगर येथे सोमयागातील सहाव्या वाजपेय सोमयागास प्रारंभ

     संभाजीनगर, ७ डिसेंबर - वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी व्हावी आणि सकल आपत्ती निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील 'श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमा'च्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेत २५ सोमयागांचे नियोजन केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांसह इतर स्थानीही होणार्‍या या सोमयागांतील सहाव्या वाजपेय सोमयागास घृष्णेश्‍वर, संभाजीनगर येथे ७ डिसेंबरपासून आरंभ झाला. या सोमयागाचे यजमानपद जोधपूर, राजस्थान येथील दीक्षित पुखराज बिस्सा आणि त्यांच्या धर्मपत्नी सोमपीथी सौ. सुमन बिस्सा हे भूषवत आहेत. या सोमयागाची सांगता १२ डिसेंबरला अवभृत स्नानाने होणार आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

लोकहो, सैन्यदलातही घरभेदी आहेत, हे जाणा !
     युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्याच्या तुकड्यांचा ठावठिकाणा कुठे असेल, या माहितीचा समावेश असलेली गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी हेरसंस्था आय.एस्.आय.च्या हस्तकाला दिल्याप्रकरणी देहली पोलिसांनी फरीद खान या भारतीय सैनिकाला अटक केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak ki guptachar sanstha ISI ko gopniya jankari deneke aropme Bhartiya sainik Farid Khan giraftar.
kya ab dhongi secularvadi apana muha kholenge ?
जागो !
: पाक की गुप्तचर संस्था आय.एस्.आय. को गोपनीय जानकारी देनेके आरोप में भारतीय सैनिक फरीद खान गिरफ्तार ।
क्या अब ढोंगी सेक्युलरवादी अपना मुंह खोलेंगे ?

स्वा. सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या आनंदनगर (पुणे) शाखेच्या वतीने 'स्वाक्षरी मोहीम'

     पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यथोचित सन्मान व्हावा, यासाठी केंद्रशासनाने त्यांना 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यापूर्वी करण्यात आली आहे. या मागणीला जनतेकडून पाठिंबा मिळावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी 'स्वाक्षरी मोहीम' राबवण्यात येत आहे. अशीच मोहीम सिंहगड रस्ता भागातील सनसिटी, आनंदनगर येथील शिवसेना शाखेच्या वतीने राबवण्यात येत आहे. ही मोहीम ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत असणार आहे. या मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शिवसेना विभागप्रमुख श्री. भरत कुंभारकर, उपविभागप्रमुख श्री. मनीष जगदाळे, शाखाप्रमुख श्री. अनिल कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री समर्थ रामदासस्वामी म्हणजे राष्ट्रोद्धार-राष्ट्रोन्नती यांसाठी झटणारे अलौकिक संत ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने समर्थ श्री रामदासस्वामींच्या पादुकांना भव्य मानवंदना ! 
डावीकडून श्री. भुजबळ, श्री. फुलारी, मध्यभागी पादुका
आणि मार्गदर्शन करतांना पू. भिडे (गुरुजी) आणि अन्य....

सांगली, ७ डिसेंबर (वार्ता.) - राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती झाल्यासच आत्मोद्धार अन् आत्मोन्नती होऊ शकते, हे ओळखून रामदासस्वामींनी त्यांचे बळ हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी उभे केले. रामदासस्वामी म्हणजे राष्ट्रोद्धार-राष्ट्रोन्नती यांसाठी झटणारे संत होते. देशाच्या बिकट स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिवाजी-संभाजी, ज्ञानोबा-तुकाराम याच मार्गावरून जावे लागेल, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ६ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थासमोर श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने समर्थांच्या पादुकांना भव्य मानवंदना देण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व असा संगम या निमित्ताने अनुभवता आला. यानंतर टिळक चौकापर्यंत धारकर्‍यांच्या वतीने फेरीद्वारे पादुकांना भव्य निरोप देण्यात आला. 

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडाचे पावित्र्य भ्रष्ट करणारी (अधःपतनास उत्तरदायी असणारी) पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती !

अधिवक्ता वीरेंद्र
इचलकरंजीकर
     पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत राज्यातील ३ सहस्र ६७ देवस्थाने येतात. त्यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा दैनिक सनातन प्रभातने याआधीही मांडला होता. हा भ्रष्टाचार समोर आल्यावर मोठी खळबळ माजली. आज राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याची चौकशी होत आहे. हा भ्रष्टाचार आर्थिक स्वरूपाचा होता. त्यात तपास होईल, अशी आशा आहे; परंतु देवस्थान समितीकडून मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट होत आहे, त्याचे काय करायचे ? पावित्र्य भ्रष्ट करण्याच्या समितीने राजरोस चालवलेल्या मालिकेचा एक भाग पुढे देत आहोत. 
१. मनकर्णिका कुंड बुजवून देवस्थान समितीकडून मुतारीची बांधणी 
     मनकर्णिका कुंड हे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या कोल्हापूरस्थित महालक्ष्मी मंदिराच्या एकूण वास्तूचा अविभाज्य भाग आहे. देवळांसमवेत तीर्थ आणि कुंडेे असणे नित्याचे आहे, उदा. तुळजापूर येथेही कल्लोळ तीर्थ आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

अरुंधतीची दांभिकता !

(भारत सोडून इतरत्र) प्रसिद्ध असलेल्या लेखिका अरुंधती रॉय यांनी 
महात्मा फुले समता पुरस्कार स्वीकारला. कुणाकडून ?
     भारतातील सर्व मानवतावादी कार्यांच्या संरक्षक, कथित सेक्युलर विचारधारेच्या ध्वजवाहक आणि (भारत सोडून इतरत्र) प्रसिद्ध असलेल्या लेखिका अरुंधती रॉय यांनी महात्मा फुले समता पुरस्कार स्वीकारला. कुणाकडून स्वीकारला ? आपल्या छगन भुजबळ यांच्याकडून ! या देशात सामाजिक समतेसाठी, सेक्युलरपणासाठी संघर्ष करायचा, तर साथ कुणाचीही चालते. सोबत कोण ? यापेक्षा संघर्ष महत्त्वाचा. असो. छगन भुजबळ म्हटले की, भ्रष्टाचार आठवतो. किती कोटींचा, तर आकडा कितीही सांगता येईल. कदाचित चार सहस्र कोटींचाही असेल; पण भुजबळ महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यामुळे जे भ्रष्टाचाराचे डाग इतरांना दिसतात आणि विशेषत: त्या नतद्रष्ट एसीबीला दिसतात, ते महान लोकांना दिसत नाहीत.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वांत मोठा धोका !

निवृत्त ब्रिगेडियर
श्री. हेमंत महाजन
     भारतात घुसखोरी करून येथेच कायमचे स्थायिक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नेमकी संख्या कधीही मोजली गेलेली नाही; परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या ५ - ६ कोटींच्या घरात आहे. बांगलादेशी घुसखोरांची ही भीषण समस्या वेळीच संपुष्टात न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. कालच्या भागात आपण बांगलादेश सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने होत असलेला ढिसाळपणा आणि घुसखोरी थांबवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता यांविषयी माहिती पाहिली. आता पुढील भाग पाहुया.
९. लोकसंख्यात्मक आक्रमणाविरुद्ध सुचवलेले उपाय 
राष्ट्रीय स्तरावर सुचवलेले काही उपाय खाली दिले आहेत.
अ. प्रकाशचित्रसंहितेचे बहुउद्देशीय ओळखपत्र : देशाच्या सीमावर्ती भागातील सर्व नागरिकांना प्रकाशचित्रसंहितेचे बहुउद्देशीय ओळखपत्र दिले पाहिजे. याचा उपयोग घुसखोरांना शोधून काढण्यासाठी होईल. हे युद्धपातळीवर पूर्ण करायला हवे आहे; पण खोटे ओळखपत्र बनवता येऊ नये; म्हणून त्यात फिंगर प्रिंट, डोळ्यांच्या भुवया, डीएन्ए अशा अनेक ओळखी सामील केल्या जाव्यात.

खोट्या (बोगस) शासकीय चाकर्‍या !

    सध्याच्या जगात सुरक्षित, चांगल्या ठिकाणी आणि चांगले वेतन देणार्‍या आस्थापनात चाकरी मिळावी, अशी बहुतांश युवकांची अपेक्षा असते. त्यात जर शासकीय चाकरी मग ती महानगरपालिका, नगरपालिका अथवा राज्यशासन यांपैकी कोठेही मिळाल्यास आनंद गगनात मावणार नाही; कारण आज शासकीय चाकरी म्हणजे अल्प काम आणि अतिशय चांगले वेतन अशी स्थिती आहे. नेमक्या याच संधीचा लाभ उठवून मुंबई महानगरपालिकेत खोट्या (बोगस) चाकर्‍यांचे पेव फुटले आहे.

भारतीय पत्रकारितेचा झालेला उकिरडा !

श्री. भाऊ तोरसेकर
१. इंग्रजी ही देशातील राष्ट्रीय माध्यमे होऊन बसली आहेत 
आणि त्यामध्ये निर्बुद्धतेचा कळस गाठला गेलाय !
     सामाजिक संकेतस्थळे शक्तीशाली झाल्यापासून भारतीय माध्यमांची विश्‍वासार्हता ढासळली, असे आपण म्हणतो; पण म्हणून त्याच्याही आधी त्यांची विश्‍वासार्हता फारशी नव्हती. म्हणूनच सव्वाशे कोटी लोकसंख्या असून आणि त्यापैकी ६०-७० कोटी भारतीय साक्षर असूनही, भारतात छापील माध्यमे आपल्या भक्कम आर्थिक पायावर कधी उभी राहू शकली नाहीत; कारण अत्यंत अल्प बुद्धीचे लोक मागल्या दोन-तीन दशकांत पत्रकारितेत येत गेले. तसेच सुटसुटीत लिहिता येणे, यालाच बुद्धीमत्ता समजले गेले.

सनातनद्वेषाचा पोटशूळ उठलेल्या स्थानिकांनी सनातनचे कार्य समजून घ्यावे !

१. सनातन संस्थेची स्थापना आणि उद्देश 
श्री. रामचंद्र कुंभार
१ अ. संतांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे कार्य समाजात अध्यात्मप्रसार करणे असून त्यासाठी साधक तन-मन-धनाचा त्याग करत असणे : इंदूरनिवासी प.पू. भक्तराज महाराजांच्या आशीर्वादाने सनातन संस्थेची स्थापना झाली. तिला अनेक संतांचे आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेचे साधक गावोगावी जाऊन सत्संग घेतात आणि अध्यात्माचा प्रसार करून समाजाला साधनेकडे वळवतात. साधकांनी साधना म्हणून नामस्मरण, सत्संग आणि सेवा केल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अनुभूती येतात. सनातनचे साधक तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधना करण्यासाठी आश्रमात आले आहेत. संस्था साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटण्यासाठी त्यांच्याकडून साधना करवून घेते. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले 

साधकांना सूचना

सनातनच्या गोसंवर्धन आणि पंचगव्य 
यांच्याशी संबंधित ग्रंथांविषयीचे फलक उपलब्ध ! 
      प्राचीन काळी भारत धनधान्याने समृद्ध होता आणि या समृद्धीमागील कारण होते - गोमाता ! त्यामुळेच गोविज्ञानासंबंधी जनजागृती करण्यासाठी सनातन संस्थेने गोसंवर्धन (पंचगव्य चिकित्सेच्या लाभांसह) हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. सोबतच पंचगव्यापासून उत्पादने बनवा ! हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. या ग्रंथांविषयी समाजाला माहिती देणारा फलक सनातन संस्थेने सिद्ध केला आहे. ३ फूट x ४.५ फूट या आकारातील हा फलक नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे. या ग्रंथांचा उपयोग गोप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटना आणि कृषीप्रेमी यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यांच्यापैकी अनेकजण हे ग्रंथ प्रायोजितही करू शकतात. त्यामुळे ग्रंथांचा अधिकाधिक प्रसार व्हावा, याकरता हे फलक अधिकाधिक सार्वजनिक ठिकाणी (उदा. देवळे, महाविद्यालये, प्राण्यांची रुग्णालये, वाचनालये आदी) लावावेत. तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांद्वारे आयोजित विविध कार्यक्रम उदा. मेळावे, धर्मजागृती सभा, जनसंवाद सभा आदींमध्येही हा फलक प्रसारासाठी लावावा.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुंडई, गोवा येथील कु. वैष्णवी रामचंद्र कामत (वय १० वर्षे) हिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. सेवेची तळमळ
कु. वैष्णवी कामत
अ. पुणे येथे सनातनच्या ग्रंथांमध्ये पालट करतांना ती मला चार पानांचा संच करणे, ग्रंथ व्यवस्थित ठेवणे यांसारख्या सेवांसाठी साहाय्य करायची.
आ. गोवा येथील घरी मी टंकलेखनाची सेवा करतांना ती मला लिखाण वाचून दाखवत असे आणि स्वतःही लिखाणाचे टंकलेखन करत असे.
इ. तिने मडकई (गोवा) येथील हिंदु धर्मजागृती सभेला सभागृहाची स्वच्छता करण्यापासून साधकांना भोजन वाढण्यापर्यंत विविध सेवा केल्या.
ई. म्हार्दोळ येथे माझ्या आईच्या (सौ. पूनम प्रभुदेसाई यांच्या) घरी गेल्यावर ती विक्रीयोग्य साहित्य व्यवस्थित लावून ठेवण्याची सेवा करते.

गुरुचरणी लीन होण्यासाठी अत्यंत कृतज्ञभाव ठेवून साधकाने केलेली प्रार्थना

श्री. अरविंद गुप्ता
     हे प.पू. गुरुदेव, माझ्या जीवनाला दिशा देणारे प.पू. गुरुदेव, तुम्ही रस्त्यावर पडलेल्या या निरुपयोगी दगडाला आपल्या श्रीचरणी स्थान देऊन साधना करण्याची संधी दिलीत आणि कृतार्थ केलेत. त्यासाठी मी मूढ आणि अज्ञानी तुमच्या श्रीचरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. हे योगेश्‍वर, प.पू. गुरुदेव, या मूढ आणि अज्ञानी जिवामध्ये काहीही करण्याचे सामर्थ्य नाही. कर्ते-करविते आपणच आहात. हे श्रीकृष्णरूपी गुरुदेव, मी कोणत्या शब्दांत आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू, हे माझ्या लक्षात येत नाही.

साधक-पालकांनो, पाल्याचे छायाचित्र आणि गुणवैशिष्ट्ये ग्रंथ विभागात पाठवतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

    आपले मूल उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्याचे वाटत असल्यास अथवा त्याचा वाढदिवस असल्यास पालक त्याची गुणवैशिष्ट्ये आणि छायाचित्रे ग्रंथ विभागात पाठवतात. त्या वेळी पालकांनी पुढील सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. पाल्याची छायाचित्रे काढतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
अयोग्य छायाचित्र
योग्य छायाचित्र मुलगा
योग्य छायाचित्र मुलगी
१ अ. पाल्याचे नेहमीच्या वेशातील छायाचित्र हवे ! : काही पालक पाल्याला मुद्दाम वेगळा पोशाख घालून त्याचे छायाचित्र काढतात, उदा. एका पालकाने आपल्या पाल्याचे पगडी घातलेले छायाचित्र पाठवले. एकाने पाल्याचे मुकुट आणि अलंकार घातलेले छायाचित्र पाठवले आणि एका पालकाने त्याच्या लहान मुलीला नऊवारी साडी नेसवून ते छायाचित्र पाठवले, तसेच काही पालक असात्त्विक कपडे परिधान केलेल्या पाल्याचे छायाचित्र पाठवतात. यापुढे पालकांनी पाल्यांचे नेहमीच्या वेशातीलच छायाचित्र पाठवावे. 

ज्ञान मिळण्याचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप !

१. एकाच वेळी ज्ञानाचा विषय पूर्ण होतो.
२. विषय टप्प्याटप्प्याने आणि ठराविक काळाने पूर्ण होतो.
३. ज्ञान बीज रूपाने प्राप्त होते. कालांतराने त्याचा विस्तार होतो, उदा. प्रथम वैराग्य हा ज्ञानाचा विषय आहे, हे समजते. हळूहळू त्याची व्याख्या आणि महत्त्व यांविषयी ज्ञान प्राप्त होते.
     ज्ञान मिळण्याचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप हे सर्व ईश्‍वराच्या इच्छेने घडत असल्याने कोणताही प्रकार हा त्याच्या ठिकाणी श्रेष्ठतम असतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (२२.६.२०१५)
शरणागतभाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न

     शरणागत भाव कसा वाढवायचा ?, याविषयी श्रीकृष्णाने मला पुढील सूत्रे सुचवली.
कु. सायली गाडगीळ
१. शरणागती म्हणजे शरण + गती = शरणागती. याचा अर्थ देवाला शरण गेल्यावरच प्रयत्नांची गती वाढून लवकर प्रगती होते.
२. सकाळी उठल्यावर अंथरुणात असतांनाच आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण करावे. तसे केल्याने दिवसभरात कोणतीही कृती करतांना कर्तेपणाचा विचार आला, तर लगेच मनाला त्याची जाणीव होते आणि आपण सकाळीच आपले सर्वस्व देवाला दिले आहे, तर आपण आता कर्तेपणा स्वतःकडे कसा घेणार ? असा विचार मनात येतो अन् मग आपण देवाला शरण जाऊ शकतो.
३. आपण आपल्या इच्छेने एक श्‍वासही घेऊ शकत नाही. मग आपण साधनेत प्रगती कशी करणार ? म्हणून देवालाच शरण जाणे आवश्यक आहे, असा विचार नेहमी करावा.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

गोपींनी श्रीकृष्णाने लोणी चोरल्याची तक्रार केल्यावर श्रीकृष्णाला
उखळाला बांधतांना यशोदामाता (२९.११.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

पू. पात्रीकरकाका यांच्या आवाजातील ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । नामजपामुळे भाव जागृत होत असल्याची साधकाला आलेली अनुभूती !

पू. अशोक पात्रीकर
      वर्ष २००६ मध्ये आकाशाकडे पाहून आकाशतत्त्वाचे उपाय करण्यास सांगितले होते आणि आता वर्ष २०१५ मध्ये ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ हा नामजप करण्यास सांगितला आहे. त्यात जाणवलेले भेद पुढे देत आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, 
तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
     भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रद्धेचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आधुनिकांनी हिंदु धर्मावर उडवलेले शिंतोडे पुसताच हिंदु बांधवांना आपली धर्मस्मृती पुन्हा प्राप्त होईल !

      आता हिंदुत्वाऐवजी भारतीयत्व आले. वैदिक वा सनातन हिंदु संस्कृती नव्हे, तर आमचे आधुनिक बांधव भारतीय संस्कृती म्हणू लागले. मोठमोठ्यांना आज हिंदु म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडत आहेत. हे आमचे पराकाष्ठेचे मानसिक अधःपतन आहे. पहाता पहाता हिंदु अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन, भ्याड होत आहे आणि किड्या-मुंग्यासारखा जगत आहेत. आमचे आधुनिक बांधव पतित झाले आहेत; परंतु आमची खात्री आहे की, त्यांच्या अंतःकरणात खोल खोल कुठेतरी आजच्या सनातन प्रणालीकरता निश्‍चित अभिमान आहे. हे कुणीही अमान्य करणार नाही. वेळ येताच ते दिसून येईल. हे धर्मघना, या आधुनिकांनी हिंदु धर्मावर उडवलेले शिंतोडे पुसताच आमच्या बांधवांना आपली धर्मस्मृती पुन्हा प्राप्त होईल. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरातून त्यांना पुन्हा सम्यक जीवनदृष्टी लाभेल. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित (मार्च २०१४))

हिंदूंनी चोख उत्तर द्यावे !

संपादकीय
    मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यातील निजाम पुन्हा जागा झाला. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी बाबरीचा ढाचा पडला. त्याला १३ वर्षे पूर्ण होत असतांना हिंदूंचे तेरावे घालण्याची स्वप्ने पहाणारे ओवैसी बंधू शांत राहिले असते, तरच नवल !संभाजीनगरात ५ डिसेंबरला खासदार ओवैसी यांनी हिरवे फुत्कार टाकले. हा देश कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही, असे सांगितले. एका बाबरीच्या पतनाचा सूड उगवण्यासाठी १ लाख मशिदी उभारू, अशी घोषणा याच ओवैसींच्या धाकट्या भावाने केली आहे. बॅरिस्टर असलेले असदुद्दीन त्यांचे म्हणणे कायद्याच्या चौकटीत राहून मांडण्यात हुशार असले, तरी त्यांच्यात ठासून भरलेली धर्मांधता त्यांनी कधीही लपवलेली नाही. त्यामुळेच ते हिंदुत्वाचा आणि हिंदु राष्ट्राचा तिरस्कार करणारी विधाने सातत्याने करत असतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn