Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) देश कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !

एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे फुत्कार !
धर्मांधांच्या अशा फुत्कारांमुळे आणि हिंदुद्वेषी विधानांमुळे 
व्यापक हिंदूसंघटनाची आवश्यकता निर्माण झाली आहे !
     संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळे हा देश कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही. (हा देश प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्र आहे आणि राहील. इस्लाम जन्माला येण्यापूर्वी या देशात सारे हिंदूच असल्यामुळे हा हिंदूंचाच देश आहे, हे ओवैसी यांनी लक्षात ठेवावे ! - संपादक) देशाची राज्यघटना आणि न्यायालय यांवर आमचा विश्‍वास आहे, असे वक्तव्य एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ५ डिसेंबर या दिवशी केले.

श्रीराम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी हिंदू सेनेकडून संघ आणि भाजप कार्यालयांसमोर आंदोलन

     नवी देहली - श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कार्यास लवकर आरंभ करावा, या मागणीसाठी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ डिसेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत वादग्रस्त बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे ६ डिसेंबरला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी देशात शौर्य दिवस साजरा केला. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी देहली येथे संघ कार्यालयासमोर, लक्ष्मणपुरी येथे भाजप कार्यालयासमोर, तसेच अनेक राज्यांत आंदोलने केली.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याचा कट उघड

लष्कर-ए-तोयबाच्या ४ आतंकवाद्यांचा भारतात शिरकाव
आतंकवाद्यांना भारतात पुन्हा आतंकवादी आक्रमण करण्याचे 
धारिष्ट्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण करा !
     नवी देहली - अतीमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करून राजधानी देहलीत आत्मघातकी आक्रमण करण्याचा कट पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने आखल्याची माहिती समोर येत आहे. तोयबाचे ४ आतंकवादी भारतात घुसले असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष्य असल्याची खात्रीशीर माहिती गुप्तचर विभागाने देहली पोलिसांना दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर देहली पोलीस या आतंकवाद्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर शीख युवकाकडून आक्रमण

शीख हत्याकांडाच्या प्रकरणी टायटलर यांच्याविरुद्धचा संताप अद्यापही कायम
     नवी देहली - येथे एका विवाहसोहळ्यात सहभागी झालेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर उमंगसिंह भाटिया या शीख युवकाने आक्रमण केले. त्याने टायटलर यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर काचेचा ग्लास फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या युवकाला अटक केली. वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा सूड उगवण्यासाठी हे आक्रमण केल्याचे भाटिया यांनी सांगितले

शनिमंदिरात स्त्रीने जावे कि नाही, या विषयाकडे आध्यात्मिक दृष्टीनेच पाहिले पाहिजे ! - वैद्य उदय धुरी

मी मराठी वृत्तवाहिनीवर देवस्थानांमध्ये 
महिलांना प्रवेश देणे योग्य आहे का ? या विषयावरील चर्चासत्र
       मुंबई - शनिमंदिरात स्त्रीने जावे कि नाही, या प्रश्‍नाकडे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातूनच पहायला हवे. याविषयी कोणावर बळजोरी मात्र नाही. शरिरातील हिमोग्लोबीन पडताळायचे असेल, तर मला काहीही खाल्ले, तरी चालते; मात्र रक्तातील इएस्आर् पडताळायचा असेल, तर उपाशी रहावे लागते. रक्त एकच आहे; मात्र त्यातील घटक पडताळतांना वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागते, तसेच प्रत्येक ठिकाणी तेथील नियमाप्रमाणे वागावे लागते, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी सांगितले. मी मराठी वृत्तवाहिनीवर पॉईंट ब्लँक कार्यक्रमात देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश देणे योग्य आहे का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात वैद्य उदय धुरी यांच्यासह राजकीय विश्‍लेषक प्रा. अरुणा पेंडसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ. विद्या चव्हाण, श्री शनिशिंगणापूर देवस्थान न्यासाचे विश्‍वस्त श्री. सयाराम बानकर आणि मी मराठीचे संपादक रवींद्र आंबेकर सहभागी होते.

देशात कुठेही असहिष्णुता नाही ! - सरन्यायाधीश

जगभरात जिहादी आतंकवाद्यांकडून होणारी वाढती आक्रमणे 
पहाता आता सर्वत्रच धर्मांधांची असहिष्णुता वाढत आहे !
     नवी देहली - देशात कुठेही असहिष्णुता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर म्हणाले. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत होते. न्यायालयाचे काम घटनादत्त मूल्यांचे रक्षण करणे आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आहे,

आसाममध्ये ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

      गौहत्ती - आसामच्या बक्सा, चिरांग, ग्वालपाडा आणि कोकराझार या जिल्ह्यांमधून जमात उल् मुजाहिदीनच्या ६ जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एल्.आर्. बिश्‍नोई यांनी दिली.

कालीदास जयंतीच्या निमित्ताने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हस्तशिल्प मेळ्याचे आयोजन

प्रदर्शन पहाण्यासाठी आलेल्या जिज्ञासूंना
माहिती सांगतांना सनातन संस्थेचे श्री. हेमंत जुवेकर
सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचाही सहभाग !
    उज्जैन (मध्यप्रदेश) - प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कालीदास जयंतीच्या निमित्ताने येथील कालीदास अ‍ॅकेडमीत हस्तशिल्प मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या मेळ्यात सनातन संस्थेने ग्रंथप्रदर्शन लावले होते. धर्मशिक्षण देणार्‍या आणि धर्मजागृती करणार्‍या ग्रंथ अन् फ्लेक्स फलक यांचे प्रदर्शन सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. जवळपास १ सहस्र ५०० जिज्ञासूंनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. सनातनचे प्रदर्शन लावण्यासाठी येथील हिंदु शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन, तसेच स्थानिक हिंदुत्ववादी श्री. भरत पौडवाल, श्री. अखिलेश उपाध्याय आणि श्रीमती. रुचिका चौहान यांनी साहाय्य केले.

बांकेबिहारी मंदिर आणि विंध्यवासिनी मंदिर यांच्या सरकारीकरणास वाढता विरोध; भक्तांचे दुसर्‍या दिवशीही उपोषण चालूच !

मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या भाविकांचे अभिनंदन !
  • आंदोलनकर्त्यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
  • धर्म रक्षा मंचकडून लवकरच उत्तरप्रदेश बंदची हाक
  • उत्तरप्रदेश युवा ब्राह्मण महासभेकडूनही कडाडून विरोध
     वृंदावन - उत्तरप्रदेशमधील प्रसिद्ध बांकेबिहारी मंदिर, तसेच विंध्यवासिनी मंदिर यांचे सरकारीकरण करण्यास भक्तांचा विरोध वाढत आहे. या निर्णयाच्या विरोधात बांकेबिहारी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आचार्य ब्रदीश यांच्या नेतृत्वाखाली ५ डिसेंबरपासून चालू करण्यात आलेले चक्रीउपोषण दुसर्‍या दिवशीही चालूच होते.
१. या वेळी धर्म रक्षा मंचाचे अध्यक्ष पंडित सौरभ गौड म्हणाले,

कारसेवकांनी बाबरी उद्ध्वस्त करून राम मंदिर पुन्हा बांधले, तर काय बिघडते ? - श्री. मारुति सुतार, श्रीराम सेना

श्रीराम सेनेकडून ६ डिसेंबर शौर्यदिन म्हणून साजरा
सभेला संबोधित करतांना श्रीराम सेनेचे
श्री. मारुति सुतार
     बेळगाव - वर्ष १५२७ मध्ये क्रूर मुघल बादशहा बाबरने सहस्रो हिंदूंची हत्या करून अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी बाबरी मशिद बांधली. हिंदूंचे एक ऐतिहासिक प्राचीन राम मंदिर उद्ध्वस्त करून बाबर मशिद बांधू शकतो, तर कारसेवकांनी ही बाबरी मशिद उद्ध्वस्त करून राम मंदिर पुन्हा बांधले, तर काय बिघडते ?, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे श्री. मारुति सुतार यांनी केले. 
     बाबरी उद्ध्वस्त झाल्याच्या निमित्ताने ६ डिसेबर या दिवशी श्रीराम सेनेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शौर्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने निलजी येथे सकाळी ८ वाजता एका सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुतार यांनी संबोधित केेले. येत्या काळात भारतातील हिंदू समाज एकत्र येऊन साधुसंतांच्या मार्गदर्शनात अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माण करणार. जो कोणी या मंदिराला विरोध करेल त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असेही श्री. सुतार म्हणाले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वांत मोठा धोका !

     भारतात घुसखोरी करून येथेच स्थायिक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नेमकी संख्या कधीही मोजली गेलेली नाही; परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या ५ - ६ कोटींच्या घरात आहे. बांगलादेशी घुसखोरांची ही भीषण समस्या वेळीच संपुष्टात न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील !
निवृत्त ब्रिगेडियर 
श्री. हेमंत महाजन
१. स्लीपर सेल्सना शोधणे सर्वांत महत्त्वाचे !
      एखादा बांगलादेशी भारतात काही घातपात करतो, तेव्हा त्याला भारतातील पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, भ्रमणभाष कार्ड, दूरभाष, रहाण्याची जागा इत्यादी आपोआप मिळत नाहीत. कोणीतरी स्थानिक व्यक्ती त्यांना साहाय्य करते किंवा माहिती देते; म्हणून या घातपाती कारवाया यशस्वी होतात. असे साहाय्य करण्यासाठी कार्यरत असणार्‍या संघटनांच्या अड्ड्यांना स्लीपर सेल्स म्हटले जाते. पोलीस हे सेल्स उद्ध्वस्त करण्याचा म्हणावा तसा प्रयत्न करत नाहीत. त्यात काम करणारे अनेकदा उघडपणे काम करूनही मोकळे रहातात. काही वेळा या स्लीपर सेल्सचे स्वरूपच असे काही असते की, त्यांना अटक करणे राजकीय कारणांमुळे शक्य होत नाही. 

(म्हणे) भारतीय न्यायप्रणालीवर बहिष्कार टाका ! - मुसलमान धर्मगुरु

भारतात राहून सुविधा लाटणार्‍या; मात्र घटनेला विरोध 
करणार्‍या धर्मांधांची देशद्रोही वृत्ती तथाकथित निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणी निर्णय देतांना भारतात समान नागरी कायदा कधी लागू करणार ?, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. याविषयी देशातील मुसलमानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जयपूर येथे झालेल्या एका बैठकीत देशातील मुसलमानांनी त्यांचे खटले भारतीय न्यायालयापुढे न चालवता भारतीय न्यायप्रणालीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन मुसलमान धर्मगुरूंनी केल्याचे वृत्त एका उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी मुसलमानांचे अतीलांगुलचालन केल्यामुळेच भारतात राहून असे आवाहन करण्याचे धारिष्ट्य धर्मांध धर्मगुरूंना होते ! - संपादक) ही अत्यंत गंभीर बाब असून या आधीही मुसलमानांनी न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांना अनेकदा विरोध दर्शवला आहे. (इतर इस्लामी देशातील शरीया कायद्यात अनेक पालट केले असले, तरी येथील मुसलमानांना मात्र शरीया कायद्यात कुणी हस्तक्षेप करणे मान्य नाही. अशांना देशात रहाण्याचा अधिकार आहे का ? - संपादक)

गोसेवेच्या माध्यमातून साधना हा दृष्टीकोन ठेवल्यास गोसेवकांची आध्यात्मिक उन्नती होईल । - परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आध्यात्मिक उन्नतीसाठी गोसेवेतून साधना, हा दृष्टीकोन ठेवा !
     व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांतानुसार साधना केल्यास शीघ्रगतीने आध्यत्मिक प्रगती होते. आज अनेक जण गोपालन, गोसंवर्धन, गोरक्षण, गोकथा प्रसार, पंचगव्यांपासून बनवलेली औषधे आणि उत्पादने यांचा प्रसार आदी गोमातेसंबंधी कार्य करत आहेत. विश्‍वातील ३३ कोटी देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोमातेवरील भक्तीमुळे हे कार्य केले जात असेल किंवा गोसेवेतून साधना व्हावी, हा दृष्टीकोन असेल, तर गोसेवा करणार्‍यांची आध्यात्मिक उन्नती होते.

विधानसभा उपाध्यक्षपद वर्षभरापासून रिक्त; शासन नियुक्तीविषयी उदासीन !

      मुंबई - रिक्त पदे भरण्याची शासनाची मानसिकता विधानसभेच्या उपाध्यक्षपदांच्या संदर्भातही कायम असल्याचे दिसून येते. १२ नोव्हेंबर २०१४ या दिवशी भाजपचे श्री. हरिभाऊ बागडे यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हापासून उपाध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. वर्षभराहून अधिक काळ उपाध्यक्षपद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्ष १९९९ पासून उपाध्यक्षांची निवड हिवाळी अधिवेशनातच होत आली आहे.

उपमहानिरीक्षक सुनील पारसकर मॉडेलवरील बलात्काराच्या प्रकरणी दोषमुक्त

     मुंबई - मॉडेलचा विनयभंग, तसेच तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपातून निलंबित पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर या दिवशी दोषमुक्त केले. मे मासांात पोलिसांनी पारसकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पारसकर यांनी आरोपांतून दोषमुक्त करण्याची मागणी दिंडोशी न्यायालयाकडे केली होती.

विरोधी पक्षांनी दुष्काळाचे राजकारण न करता सभागृह चालू द्यावे ! - मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन !

      मुंबई - राज्यात अत्यंत भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. हे आस्मानी संकट आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुष्काळ क्वचितच पडला आहे. अशा संकटाच्या वेळी पक्षभेद आणि राजकीय स्वार्थ विसरून सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असते. म्हणून आम्ही विरोधी पक्षाला चहापानाला यावे आणि दुष्काळाच्या उपाययोजनावर चर्चा करू, अशी विनंती केली होती; परंतु विरोधी पक्षाला राजकारण करायचे असल्याने त्यांनी येणे टाळले. शेतकर्‍याचे नैराश्य कसे दूर होईल, असा आम्ही प्रयत्न करू; आम्ही सर्व प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देऊ; परंतु विरोधी पक्षांनी दुष्काळाचे राजकारण न करता सभागृह चालू द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधतांना केले.

शासनाला लक्ष्य करण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी

आजपासून महाराष्ट्र शासनाचे हिवाळी अधिवेशन 
      नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील दुष्काळ, वाढती गुन्हेगारी, तूरडाळीचे वाढते भाव या प्रश्‍नांवरून राज्यातील भाजप-शिवसेना शासनाला धारेवर धरण्याची सिद्धता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चालवली आहे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. भाजप-शिवसेना शासनाचे यापूर्वीचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडले, तरी सध्याच्या परिस्थितीत पुष्कळ पालट झाला आहे. एक वर्षात शासनाने कोणती विकासकामे केली अथवा कोणती कामे अपूर्ण राहिली, याविषयी विरोधक खडसवणार आहेत. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी विरोधक मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

(म्हणे) काश्मीरमध्ये सुफीवादाची संस्कृती असल्याने येथील तरुण कट्टरतेकडे वळणार नाहीत !

  • काश्मीरमधील धर्मांध युवकांनी काश्मीरमध्ये अनेकदा पाकचे आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवले असूनही, तसेच पाकच्या समर्थनार्थ घोषणा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या मेहबुबा मुफ्ती यांचे विधान !
  • केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी काश्मीरमध्ये युवकांनी आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवल्याचे हास्यास्पद विधान !
     श्रीनगर - काश्मीरमध्ये सुफीवादाची संस्कृती असल्याने येथील तरुण कट्टरतेकडे वळणार नाहीत, असा आशावाद काश्मीरमधील पीडीपी या पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी येथे व्यक्त केला. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने आयोजित केेलेल्या लीडरशिप समिटमध्ये त्या बोलत होत्या. 

विशिष्ट खाद्यपदार्थांची सवय हा संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही ! - महाराष्ट्र शासन

    मुंबई - विशिष्ट खाद्यपदार्थांची सवय हा एखाद्या समुदायाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही, असे गोवंश हत्याबंदी प्रकरणी जनहित याचिकेच्या संदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे. आम्ही अल्पसंख्यांक असून गोमांस खाणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे, असा दावा काही याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर उत्तर देतांना शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी मुंबई येथील आमदारांना राष्ट्र-धर्माचे विषय सादर !

आमदार श्री. नरेंद्र मेहता (डावीकडे) यांना निवेदन
देतांना समितीचे श्री. बेंद्रे आणि सौ. जयश्री अहिरराव

आमदार श्री. सुनील प्रभू यांना निवेदन देतांना (उजवीकडून पहिले) समितीचे
 श्री. सीमित सरमळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजेश सावंत आणि समितीचे श्री. बळवंत पाठक
     मुंबई - महाराष्ट्र शासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्र-धर्माचे विषय मांडले जावेत आणि त्यावर चर्चा होऊन उपाय निघावेत, या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे वांद्रे येथील श्री. अनिल परब, दिंडोशीचे आमदार श्री. सुनील प्रभू यांना विषय देण्यात आले.

शासनाचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष ! - विरोधकांचे टीकास्त्र

  • वेगळा विदर्भ प्रश्‍नावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली ! 
  • नेहमीप्रमाणे विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ! 
      नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - राज्यात वर्ष १९७२ पेक्षाही अधिक असलेली दुष्काळाची तीव्रता, दुष्काळग्रस्त भागांना साहाय्य निधी न देणे, १ वर्षात वाढलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव न देणे, वाढती गुन्हेगारी आणि राज्यातील सर्व प्रश्‍नांविषयी राज्यशासनाची उदासीनता या कारणांमुळे युती शासनाचा चहा पिण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह राज्यातील विरोधी गटातील सर्वच पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ६ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

हिवाळी अधिवेशनात सुरक्षेसाठी ३ सहस्र पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात

यावरून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीही असुरक्षित आहेत, असेच म्हणावे लागेल ! 
तेथे जनतेच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा ! 
     नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - येथील हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात ३ सहस्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले आहेत. या वेळी प्रथमच मुंबई फोर्स वन कमांडोंना पहार्‍यासाठी तैनात करण्यात येणार आहे. यंदा अधिवेशनासाठीचा पहारा हायटेक आणि स्मार्ट असेल. सर्व पोलीस अधिकारी व्हॉट्स अ‍ॅप आणि अन्य माध्यमांतून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. (जनतेच्या पैशांतून केली जाणारी मोठ्या प्रमाणातील खर्चिक सुरक्षाव्यवस्था अल्प करण्यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा ! - संपादक)

वानवडी (पुणे) येथील अवैध पशुवधगृह गोप्रेमींच्या पाठपुराव्यामुळे उद्ध्वस्त !

२२ गायींना मिळाले जीवदान 
    पुणे - वानवडी बाजार येथे अख्तर कुरैशी नावाचे कसाई आणि त्यांचे सासरे याकूब शेख नावाच हे दोघेजण प्रतिदिन स्वत:च्या घरामध्ये (खाजगी जागेत) गोवंशाची कत्तल करतात, अशी तक्रार अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. याविषयी सहपोलीस आयुक्त श्री. सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वानवडी पोलीस ठाण्याने रात्री उशिरा कारवाई केली आणि २२ गायींना कह्यात घेऊन वडकी येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेत पाठवले.

गोप्रेमी चेतन शर्मांच्या प्रयत्नांमुळे मुंब्रा येथे गोवंशियांचे मांस विकणार्‍या धर्मांधांवर कारवाई

असे सतर्क आणि तत्पर गोप्रेमीच हिंदु धर्माची शक्ती !
     मुंबई - गोप्रेमी श्री. चेतन शर्मा यांना नुकतेच मुंब्रा येथील एका मटणविक्रीच्या दुकानातून गोवंशियांचे मांस विकले जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सापळा रचून संबंधित आरोपींना पोलिसांच्या साहाय्याने पकडले. या वेळी पोलिसांकडून दुकानावर धाड टाकण्यात आली.
    मुंब्रा येथील पप्पू जनाब उपाख्य इक्बाल सबीर कुरेशी हे त्यांच्या अल् मदिना बीफ शॉप या दुकानातून गाय आणि बैल यांचे मांस विकत असल्याचे समजले. कुरेशी यांचा मित्र फैजान इस्माईल यांच्याकडून ते गोमांस मिळवायचे. फैजान यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत. श्री. शर्मा यांनी सापळा रचून मांस विकत घेणार्‍या ४ जणांना अटक करवून दिली. संबंधित आरोपींनी कुरेशी यांच्या दुकानातून एका पिशवीत गोमांस घेऊन ते रिक्शात पाठीमागे ठेवले. या रिक्शात एक पुरुष आणि २ स्त्रिया होत्या. त्या स्वत: प्रवासी असल्याचे भासवत होत्या. या वेळी मुंब्रा पोलिसांनी दुकानावर धाड टाकली आणि आरोपींविरुद्ध प्रथम दर्शनी अहवाल दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलंडमध्ये शीख युवकाला आतंकवादी समजून नाईटक्लबने नाकारला प्रवेश !

शीख आणि मुसलमान यांच्यात जमीन-आकाशाचा भेद आहे. असे असतांना 
विदेशात शीख, तसेच हिंदू यांना मुसलमान समजून त्यांना हीन वागणूक 
दिली जाते. या प्रकरणी भारत शासनानेच पुढाकार घेऊन शीख आणि हिंदू 
यांच्याविषयी विदेशींना असलेला अपसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
     लंडन - नव साहनी या ब्रिटीश शीख युवकाला पोलंड देशातील एका नाईटक्लबने जिहादी आतंकवादी असल्याचे समजून प्रवेश नाकारला. तेथील सुरक्षारक्षकाने शेरेबाजी केली, थुंकले आणि त्याच्या चेहर्‍यावर ठोसा मारला. नव साहनी यांचा जन्म लंडनमध्ये झाला असून ते व्यवसायाने अभियंता आहेत. या घटनेविषयी ब्रिटनमधील पोलंड दूतावासाने क्षमा मागितली आहे.

सनातन संस्था रायगड या न्यासाच्या वतीने विनामूल्य वह्यावाटप

विद्यार्थ्यांना वह्यावाटप करतांना श्री. जांभळे गुरुजी
     पेण - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यंासाठी कार्यरत असणार्‍या सनातन संस्था रायगड या न्यासाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा कांदळे, ता. पेण या शाळेतील आदिवासी आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना संस्कार वह्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमप्रसंगी कांदेळे शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी अन् विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. ७२ गरीब गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रश्‍नांवर येत्या अधिवेशनात आवाज उठवणार ! - श्री. अनिल कदम आणि श्री. बाळासाहेब सानप, आमदार

आमदार श्री. अनिल कदम (डावीकडून पहिले) यांना
निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
 
आमदार श्री. बाळासाहेब सानप (उजवीकडून पहिले)
यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

परीक्षेच्या वेळी नक्कल करण्यास मज्जाव केल्यामुळे सांगलीत प्राध्यापकास मारहाण

प्राध्यापकांना मारहाण करणारे विद्यार्थी निपजणे, हे पाश्‍चात्त्य शिक्षणाचे दुष्परिणाम ! 
    सांगली - विद्यापीठ परीक्षा केंद्रावर नक्कल (कॉपी) करण्यास मज्जाव केल्यामुळे एका प्राध्यापकाला मारहाण करण्याचा प्रकार ईश्‍वरपूर येथे घडला. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

मावळ तालुका (जिल्हा पुणे) येथील ऐतिहासिक मंदिरे प्रशासनाकडून अवैध म्हणून घोषित

हिंदूंनो, अल्पसंख्यांकांची प्रार्थनास्थळे अवैध ठरवून पाडल्याचे कधी ऐकले आहे का ? 
ऐतिहासिक मंदिरे पाडू पहाणार्‍या प्रशासनाला वेळीच खडसवा ! 
कार्ला येथील अवैध म्हणून गणना
केलेले श्री एकवीरा मंदिर
     पुणे, ६ डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि शासकीय आदेश यांनुसार मावळ तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी ३५ गावांतील धार्मिक स्थळांची पाहणी केली. त्या पाहणीत मावळ तालुक्यातील ३७ धार्मिक स्थळे अवैध असल्याची माहिती त्यांनी घोषित केली. यामध्ये कार्ला येथे असलेले श्री एकवीरादेवीचे मंदिर, उधेवाडी, कुरवंडे आणि जांभवली येथे असलेली शिवमंदिरे अवैध ठरवण्यात आलेली आहेत. ही मंदिरे पुरातन असून ती कोणत्या आधारावर अवैध ठरवली गेली, याचा तपशील करावा, अशी मागणी मावळवासियांनी केली आहे; कारण सादर करण्यात आलेल्या अहवालात त्याविषयीचे निकष स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. (हिंदूंनी, प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करायला हवा. - संपादक)

संतप्त जमावाकडून दगडफेक, १२ पोलीस घायाळ

गोमांस वाहतुकीमुळे हरियाणात संघर्ष
     चंदीगड - हरियाणातील पलवाल येथे ३ ट्रकमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून झालेल्या संघर्षात १२ पोलिसांसह अनेक लोक घायाळ झाले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मध्यप्रदेशातील उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्र अन् धर्म विषयक प्रदर्शन

डावीकडून माहिती सांगताना श्री. हेमंत जुवेकर, तसेच ती
समजून घेतांना श्री. प्रशांत शर्मा, श्री. सोनू गेहलोत आणि अन्य
     उज्जैन (मध्यप्रदेश), ६ डिसेंबर (वार्ता.) - कार्तिक मासाच्या निमित्ताने शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर प्रशासनाकडून कार्तिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले. या मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ डिसेंबरपर्यंत असणार आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

या धमकीवजा चेतावणीवर शासन काय कारवाई करणार आहे ?
      एम्.आय.एम्.चे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात बाबरी मशीद पुन्हा नक्की उभारू, असे वक्तव्य केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Sansad Asaduddin Ovaisi kahate hai, Ayodhya me nishchit hi Babri masjid ka punha nirman karenge.
kya yaha court ka avaman nahi hai ?
जागो !
     सांसद असदुद्दीन ओवैसी कहते हैं, अयोध्या में निश्‍चित ही बाबरी मस्जिद का पुन:निर्माण करेंगे !
क्या यह कोर्ट का अवमान नही है ?

जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरे

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी प्रदूषणावर मात 
न केल्याने जगात भारतावर ओढवलेली नामुष्की !
     नवी देहली - जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तब्बल १३ शहरे ही एकट्या भारतातील असल्याची माहिती ग्लोबल सर्वे एजन्सीने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. यात सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई शहराचा २१ वा, तर राजधानी देहलीचा १२ वा क्रमांक असल्याचे या अहवालात म्हटले असून मिस्रची राजधानी काहिरा हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या सूचित पहिल्या स्थानावर आहे. (देशाला विकासाकडे नेतांना त्यातून निर्माण होणार्‍या प्रदूषणाच्या समस्येला देश कसा सामोरा जाणार आहे ? हेही शासनाने सांगावे, अशी अपेक्षा आहे ! - संपादक)

आफ्रिकेतील चाड बेटावर ३ आत्मघातकी आक्रमणात २७ ठार आणि ८० घायाळ

     नजामेना - आफ्रिकेतील चाड बेटावरील आठवडा बाजारात आतंकवाद्यांनी ३ आत्मघातकी आक्रमणे घडवून आणली. या आक्रमणांमध्ये २७ जण ठार झाले असून ८० नागरिक घायाळ घाले आहेत. या घायाळांना त्वरित नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. या आक्रमणाचे दायित्व कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

        रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

भारतातील पोलीस लाखो निरपराध्यांना छळतात ! अशांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातला कळवावे !

     पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍यांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात (फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com) पाठवावेत. - संपादक

बांगलादेशी घुसखोरांना नागरिकत्व देणारे देशद्रोही साम्यवादी !

     बांगलादेशात लोकसंख्येच्या मानाने भूमी पुरेशी नाही, असे ढाक्याच्या विचारवंतांचे मत आहे. याला भारत उत्तरदायी नाही. ज्यांनी प्रथम पाकची निर्मिती केली आणि नंतर ज्यांनी बांगलादेशची लोकसंख्या वाढवली, तेच यासाठी उत्तरदायी आहेत; म्हणून ते हळूहळू भारताची भूमी गिळंकृत करत आहेत. ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच होय. बांगलादेशाच्या सीमेलगत असणार्‍या बंगालमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानच बहुसंख्य आहेत. सीमा ओलांडून भारतात येण्यासाठी त्यांना अधिकतम १ सहस्र रुपये, तर शिधापत्रिकेसाठी २ सहस्र ५०० रुपये मोजावे लागतात. तथापि मतदारसूचीत स्वत: नाव घुसडण्यासाठी या बांगलादेशी घुसखोरांना विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. हे पुण्यकर्म करण्यासाठी तेथील साम्यवादी पक्ष एका पायावर सिद्ध असतात. पश्‍चिम बंगालमध्ये प्रत्येक ४ मतदारांपैकी १ जण मुसलमान असतो. तेथील डाव्या आघाडीच्या शासनाच्या ३ आधारस्तंभांपैकी मुसलमान मतदार हा मुख्य आधारस्तंभ आहे.
(संदर्भ : श्री. दीपक जेवणे, साप्ताहिक विवेक, २६ जून २००५)

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सोनगाव, खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कृष्णा तुकाराम साळुंखेआजोबा (वय ८१ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्री. कृष्णा साळुंखे
     साधना असल्यास मृत्यूसारखा प्रसंग मृत्यू पावणारा आणि त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी आदर्श आणि आनंददायी कसा असतो, याचे उदाहरण साळुंखेआजोबा आणि त्यांचे कुटुंबीय यांनी सर्वांपुढे ठेवले आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१५) 
      सोनगाव, खेड, जि. रत्नागिरी येथील श्री. कृष्णा तुकाराम साळुंखे (वय ८१ वर्षे) यांचे २५.११.२०१५ या दिवशी देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के होती. ७.१२.२०१५ या दिवशी त्यांच्या मृत्यूनंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त रुग्णस्थितीमध्ये त्यांची सेवा करतांना त्यांचा मुलगा आणि नातू यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे अन् मृत्यूनंतर त्यांना, तसेच साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने राबवून स्वतःत आमूलाग्र पालट घडवून आणणार्‍या चिक्कमंगळुरू, कर्नाटक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधिका प्रभु !

सौ. राधिका प्रभु
      ६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण बर्‍याचदा सनातन प्रभात नियतकालिकांतील लेखांत छापून येते. साधकांनी ते लिखाण केवळ न वाचता त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल. 
- (प.पू.) डॉ. आठवले (१५.९.२०१४) 
१. साधकांकडून असलेल्या अपेक्षा आणि स्वतःच्या प्रतिक्रिया यांमुळे स्वतःची साधनेतील अधोगती लक्षात येऊन वाईट वाटणे आणि ध्येय ठरवून स्वतःत पालट घडवून आणणे : प्रारंभीच्या काळात सौ. राधिकाताईंच्या (वय ५० वर्षे) मनात इतर साधकांविषयी पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. त्या साधकांकडून पुष्कळ अपेक्षाही करायच्या. त्यामुळे समष्टी सेवा करतांना त्यांना अडचणी येत असत. काही कालावधीनंतर त्यांना जाणवले, साधकांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया यांमुळे साधनेत स्वतःची अधोगती होत आहे. त्याचे त्यांना वाईट वाटले आणि आता त्यांनी स्वतःत पालट केला आहे.

सनातन उत्तीर्ण होईल या अग्नीपरीक्षेत !

या जगाची रीतच खोटी ।
अग्नीपरीक्षा सत्यासाठी ॥ १ ॥
पतीव्रता ती सीतामाई ।
अग्नीपरीक्षेस सामोरे जाई ॥ २ ॥
सुवर्णासही द्यावी लागे ।
अग्नीपरीक्षा सत्यासाठी ॥ ३ ॥
सत्यवादी अन् सुवर्णरूपी सनातन ।
परीक्षेला या सामोरे जाई ॥ ४ ॥
सनातन उत्तीर्ण होईल या अग्नीपरीक्षेत ।
शंभर टक्के गुणांनी हे मात्र निश्‍चित ॥ ५ ॥
- एक साधिका लहान वयातच देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना घडवण्याचे दायित्व उत्तम प्रकारे सांभाळणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार !

सौ. अश्‍विनी पवार
     कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी, कलियुग वर्ष ५११७ (७.१२.२०१५) या दिवशी सनातनच्या देवद आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून साधकांना सुचलेला अश्‍विनी नावाचा आध्यात्मिक अर्थ आणि कविता पुढे देत आहोत. 
सौ. अश्‍विनी पवार यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. अश्‍विनी नावाचा आध्यात्मिक अर्थ 
- आध्यात्मिक आई बनली देवद आश्रमाची ।
श्‍वि - शरणागत असे सदैव भगवंताच्या चरणी ।
नी - निरागस भावाने जिंकते मन गुरूंचे ।
- पर्वा करत नाही गुरुसेवेत जिवाची ।
वा - वाहते सदा गुरुचरणी परिपूर्ण सेवेचे पुष्प ।
- रममाण करते सर्वांना गुरुकार्यात ।

स्थानिक धर्मांधांवर कारवाई करा !

     भारतीय गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनुसार, आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेला भारतात पाळेमुळे रुजवण्यासाठी स्थानिक मुसलमान आतंकवादी संघटनांशी ही संघटना हातमिळवणी करत आहे. त्याप्रमाणे या संघटनेने लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेशी हातमिळवणी केल्याचे वृत्त होते. त्यामुळे अशा अतिरेकी संघटना अधिक आक्रमक होणार आहेत. या संघटनांना थेट आय.एस्.आय.एस्.चे पाठबळ मिळाल्याने तोयबासारख्या आतंकवादी संंघटना अधिक उग्र होणार हे निश्‍चित आहे. कालपर्यंत या मुसलमान आतंकवादी संघटना विविध प्रकारे भारतात आतंकवादी कारवाया करत होत्या, त्यात आता अधिक भर पडणार आहे.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

फळवाल्या आजीने श्रीकृष्णाला फळे दिली. त्याच्या मोबदल्यात
श्रीकृष्ण तिला धान्य आणून देतांना. (५.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

काश्मीर आणि मणीपूर येथे युद्धबंदी घोषणा राष्ट्रासाठी घातकच !

१. देशांतर्गत संघर्षात युद्धबंदी हा शब्दप्रयोग 
करणे, हा केंद्रशासनाचा धोरणात्मकदृष्ट्या पराभव !
      काश्मीर आणि मणीपूर ही भारतांतर्गत राज्ये आहेत कि ती वेगळी राष्ट्रे आहेत ? त्या ठिकाणी युद्धबंदी घोषीत केली जाते, ही धोरणात्मकदृष्ट्या केवढी मोठी चूक आहे. मुळातच युद्धबंदी ही दोन राष्ट्रांत होते. बंडखोरांशी चालू असलेल्या संघर्षात संघर्ष स्थगिती किंवा शस्त्रसंधी होते. हैद्राबाद संस्थानाच्या बंडखोरीला आळा घालण्यासाठी जी कारवाई केली गेली, त्याला त्या वेळेचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई असा शब्दप्रयोग केला नाही. पोलीस अ‍ॅक्शन (कृती) असा शब्दप्रयोग केला. त्यात मुत्सद्देगिरीच होती. भारतांतर्गत केलेल्या कारवाईमध्ये निमलष्करी दलाचा, म्हणजेच सशस्त्र पोलीस पथकाचा वापर होतो. तो स्थगित ठेवला, तर त्याला युद्धबंदी कसे म्हणता येईल ? हा शब्दप्रयोगच त्यांच्या फुटीरतावादी बंडखोरीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अप्रत्यक्षपणे नमूद करण्यासारखा होतो.

तिजोरी स्वच्छ !

हाती झाडू (चिन्ह) घेऊन निवडणूक लढवली ।
स्वच्छ कारभार करण्याची जनतेला हमी दिली ॥
निवडून आल्यावर स्वच्छतेला सुरुवात केली ।
४०० टक्के वाढ करून प्रथम तिजोरी स्वच्छ केली ॥
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

जिल्ह्यांत होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांच्या ठिकाणी 
लावावयाच्या प्रदर्शनातील फलकांची सूची उपलब्ध !
     जिल्ह्यांत होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांना येणार्‍या हिंदुत्ववादी आणि जिज्ञासूंना समितीच्या कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांना हिंदु धर्म आणि राष्ट्र यांची स्थिती कळावी या उद्देशाने एकूण काही फलक उपलब्ध करण्यात आले आहेत. या फलकांमध्ये हिंदु जनजागृती समिती चे कार्य, धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र्र स्थापनेची आवश्यकता, राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात, सनातनची ग्रंथसंपदा, सनातन प्रभात, आदींविषयी माहिती देण्यात आली आहे.
     राष्ट्र म्हणजे भाषिक, धार्मिक, वांशिक दृष्टीने एकजीव असलेला व विशिष्ट प्रदेशात रहाणारा लोकसमुदाय. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २७.११.२००८)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे धर्मासाठी धन, कुटुंब यांचाच नाही, तर प्राणांचाही त्याग करणारे जगभरचे मुसलमान जिहादी, तर कुठे हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद
      आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नरो वा, कुंजरो वा ।

      केंद्रात भाजपचे शासन सत्तेत आल्यापासून डाव्यांकडून सातत्याने हे शासन कट्टरतावादी, उजव्या विचारसरणीचे असल्याचा आरोप केला जात आहे. मध्यंतरी काँग्रेस, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कंपूने देशात असहिष्णुता वाढल्याचाही मोठा गाजावाजा केला होता. प्रत्यक्षात मात्र शासन नक्की कोणत्या विचारसरणीचे आहे. याचा थांगपत्ता लावणे कठीण झाले आहे. गोमांस खाणार्‍यांनी पाकमध्ये जावे, असे म्हणणारे सदस्य असलेल्या केंद्रशासनाने गायीच्या कातड्यावरील निर्बंधांत घट केली असल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते मार्च २०१५ या काळात ३० लक्ष रुपयांचे ७४ किलो कातडे निर्यात करण्यात आले. तर एप्रिल ते ऑगस्ट २०१५ या काळात अत्यंत धक्कादायक म्हणजे ३५ पट वाढ होऊन जवळजवळ ११ कोटी रुपयांचे कातडे निर्यात करण्यात आले. जर अवघ्या ५ मासांत (महिन्यांत) एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कातडे निर्यात होत असेल, तर गोमांस किती मोठ्या प्रमाणात निर्यात होत असेल, याची कल्पनाच करवत नाही. अर्थातच ही आकडेवारी उजेडात आलेली नाही. देशभरात बेसुमार होणार्‍या गोहत्या आणि अनेक अवैध पशूवधगृहे पहाता याहून मोठी आकडेवारी समोर येईल, हे निश्‍चित ! या कारणानेच या ठिकाणी आकडेवारी दुर्लक्षून चालणार नाही. उजव्या विचारसरणीचे शासन येऊनही गोहत्येमध्ये भीषणवाढ होत आहे, हे सत्य लक्षात घेणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn