Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उत्तरप्रदेश शासनाकडून प्रसिद्ध विंध्यवासिनी मंदिर आणि बांकेबिहारी मंदिर यांच्या सरकारीकरणाचा घाट !

सर्व क्षेत्रांचे खाजगीकरण होत असतांना केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?
 •  उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या शासनाने कधी मशीद वा चर्च यांचे सरकारीकरण करण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे का ?
 •  हिंदूंनो, तुमच्या मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून ती लुबाडू पहाणार्यांना वैध मार्गाने विरोध करा !
 •  पंडा समाजाकडून विंध्याचल बंदची हाक; शासनाच्या विरोधात मूक मोर्चा
 •  गोस्वामी समाजाकडून बांकेबिहारी मंदिरात चक्री उपोषणास प्रारंभ
    लक्ष्मणपुरी (लखनौ) - समाजवादी पक्षाच्या शासनाने राज्यातील प्रसिद्ध विंध्यवासिनी मंदिर आणि बांकेबिहारी मंदिर या मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा घाट घातला आहे. यास येथील पंडा समाज आणि गोस्वामी समाज यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
१. मंदिरांचे सरकारीकरण करण्याच्या राज्यातील समाजवादी पक्षाच्या निषेधार्थ पंडा समाजाने ४ डिसेंबर या दिवशी विंध्याचल बंदची हाक दिली होती.
२. विंध्याचल बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बंदला पाठिंबा दर्शवत केवळ पूजासामग्रीची विक्री करणार्या दुकानदारांनीच नव्हे, तर अगदी चहा विकणार्या छोट्या छोट्या दुकानदारांनीही त्यांची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शासनाच्या विरोधात त्यांचा रोष प्रकट केला.

गौहत्ती येथे झालेल्या २ स्फोटांत २ जण घायाळ

फटाक्यांप्रमाणे बॉम्बस्फोट होणारा जगातील एकमेव देश भारत !
    गौहत्ती (गुवाहाटी) - येथील फॅन्सी बाजार परिसरात ५ डिसेंबरला अल्प क्षमतेचे दोन स्फोट झाले. या स्फोटात दोन जण घायाळ झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. एका कचराकुंडीत दुपारच्या वेळी हे स्फोट झाले. हे स्फोट देशी बॉम्बचे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या आक्रमणाचे दायित्व अजून कुठल्याही संघटनेने स्वीकारलेले नाही; परंतु उल्फा आतंकवाद्यांचे हे काम असू शकते, असा कयास आहे. काही दिवसांपूर्वीच उल्फाने हिंदी भाषिकांवर आक्रमण केले होते. पोलिसांनी फॅन्सी बाजार परिसर रिकामा करून अन्वेषण चालू केले असून आसाममध्ये सर्वत्र सतर्कतेची चेतावणीही देण्यात आली आहे.

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदु भाविकांवर ग्रेनेडने आक्रमण

१० जण घायाळ, ३ जणांची प्रकृती गंभीर
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत शासनाने बांगलादेशच्या शासनावर दबाव आणून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करावे, अशी अपेक्षा आहे !
    ढाका - बांगलादेशात धर्मांधांकडून मंदिरात, तसेच तेथे जत्रेसाठी जमलेल्या हिंदु भाविकांवर ग्रेनेडच्या आक्रमणासह गोळीबार करण्यात आला. या आक्रमणात १० जण घायाळ झाले आहेत. त्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
    पोलिसांच्या मते बांगलादेशाची राजधानी ढाकापासून ४१५ किलोमीटर अंतरावरील दिनाजपूर जिल्ह्यात एका मंदिरामध्ये जत्रेच्या वेळी रासमेळा हा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमाच्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मंदिराच्या पुजार्यांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशी चेतावणी देण्यात आली होती. याच परिसरात गेल्या मासात इटलीच्या एका डॉक्टरवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो गंभीर घायाळ झाला होता. त्याचबरोबर  आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांकडून इटली आणि जपान यांच्या प्रत्येकी एका नागरिकांचीही हत्या करण्यात आली होती.

परिवर्तन न झाल्यास राष्ट्रद्रोहाची कारवाई करू ! - मुंबई पोलीस

आय.एस्.आय.एस्.मध्ये जाणार्या धर्मांध तरुणांना थांबवण्यासाठी मौलवींचे साहाय्य घेणार !
अशा तरुणांमध्ये परिवर्तन होण्याची वाट पहाणे, म्हणजेे आतंकवादाच्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे ! अशांवर त्वरित कठोर कारवाई केल्यासच आतंकवादी कारवायांवर थोडातरी आळा बसेल !
    मुंबई, ५ डिसेंबर -'आय.एस्.आय.एस्.' मुंबईत पाळेमुळे घट्ट करत असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. मुंबईतील १२ तरुण इराकला जाण्याच्या सिद्धतेत असल्याचे समजल्याने या तरुणांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांच्यात मतपरिवर्तन करण्यासाठी मुल्ला-मौलवींचे आणि काही ज्येष्ठ व्यक्तींचे साहाय्य घेतले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. (मुल्ला-मौलवी स्वतःच पाकधार्जिणे असतात आणि त्यांना जिहाद मान्य असतो, ते स्वतःच मुसलमानांना जिहादसाठी प्रवृत्त करतात आणि मशिदीत त्यांना हिंदूंविरुद्ध भडकवणारी भाषणे करतात, हे आतापर्यंतच्या काही घटनांमधून उघड झाले आहे. असे मुल्ला-मौलवी या तरुणांना जिहादी कारवाया करण्यापासून परावृत्त कसे करणार ? शासनाने आय.एस्.आय.एस्.मध्ये जाणार्या या धर्मांधांना कठोर शिक्षा न केल्यास त्याचे गंभीर परिणाम राष्ट्राला भोगावे लागतील, यात शंका नाही ! - संपादक) या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना इराकला जाऊ देणार नाही. त्यांच्या विचारात पालट करून त्यांना भारतातच ठेवू, असे आश्वाहसन काही मुल्ला-मौलवींनी पोलिसांना दिले आहे. तसे न झाल्यास हे तरुण आमच्या रडारवर असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

देहलीत लष्कर-ए-तोयबाकडून आतंकवादी आक्रमणाची शक्यता

आतंकवादाने पोखरलेला भारत !
    नवी देहली - आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा देहलीत आतंकवादी आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याचा खुलासा देहली पोलिसांच्या प्रथमदर्शी अहवालात करण्यात आला आहे. देहली पोलिसांना गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचे  दोन आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये घुसले आहेत. त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तोयबाने देहलीत आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला आहे.

हिंदु महासभेच्या नेत्याचा शिरच्छेद करण्यासाठी ५१ लाखांचे पारितोषिक

 • मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यास ते थेट कायदा हातात घेण्याच्या गोष्टी करतात. हिंदू मात्र त्यांच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक केल्यावर साधा शाब्दिक निषेधही करत नाहीत ! 
 • बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील मौलाना अनवारूल हक यांचे चिथावणीखोर आवाहन
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - महंमद हजरत यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून हिंदु महासभेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. कमलेश तिवारी यांचा शिरच्छेद करण्यासाठी बिजनौरच्या जमियत शबाबूल इस्लामचे प्रदेश महासचिव मौलाना अनवारूल हक यांनी ५१ लाखांचे पारितोषिक घोषित केले आहे. (भारतीय कायदे धाब्यावर बसवून हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या आणि समाजात तेढ निर्माण होईल, असे आवाहन करणार्‍या मौलाना हक यांच्यावर शासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक)

अयोध्येत राममंदिर उभारणीच्या दिनांकाची घोषणा करून कामास गती द्यावी !

शिवसेनेकडून राममंदिर उभारणीच्या सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत !
    मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच माझ्या हयातीत राममंदिराची उभारणी होईल, असे विधान केले होते. भागवत यांच्या या भूमिकेचे शिवसेनेेने स्वागत केले असून राममंदिर उभारणीलाही पाठिंबा दिला आहे. दैनिक सामना या मुखपत्रात ५ डिसेंबर २०१५ ला छापलेल्या अग्रलेखातून शिवसेनेने राममंदिर उभारणी हा श्रद्धेचा विषय असून न्यायालयापेक्षाही लोकांनी निवडून दिलेल्या शासनाने त्यावर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या दिनांकाची घोषणा करून कामास गती द्यावी, अशी मागणीही शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. या अग्रलेखातील काही महत्त्वपूर्ण सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत... 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसर्या , तर जागतिक क्रमवारीत १२७ व्या स्थानावर

जगातील २०० विद्यापिठांत भारतातील १६ शिक्षणसंस्था
विद्येचे माहेरघर म्हणवणार्याय पुणे शहराला लाजवणारी घटना ! एकेकाळी नालंदा आणि तक्षशीला या विद्यापिठांमध्ये अत्युच्च शिक्षण दिले असतांना भारतातील शिक्षणाविषयी उद्भवलेली ही स्थिती चिंताजनक आहे !
     पुणे, ५ डिसेंबर - देशातील विद्यापिठांच्या क्रमवारीत तिसर्याा क्रमांकावर असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'ब्रिक्स' देशांतील विद्यापिठांच्या क्रमवारीत १२७ व्या स्थानावर आहे. 'टाइम्स' या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 'ब्रिक्स' देशांतील विद्यापिठे आणि उच्चशिक्षण देणार्या संस्था यांची क्रमवारी घोषित केली आहे. ब्रिक्स राष्ट्रसमूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. या ५ देशांतील विद्यापिठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाला १२७ वे स्थान मिळाले आहे.
    या क्रमवारीत पहिल्या २०० विद्यापिठांत भारतातील केवळ १६ शिक्षणसंस्थांचा समावेश आहे. त्यामध्येही पुणे विद्यापीठ ११ व्या स्थानावर आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय्आय्टी) यांसमवेतच पंजाब विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ हे पुणे विद्यापिठाच्या पुढे आहेत. अध्यापन, संशोधन, सायटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, औद्योगिक क्षेत्राशी बांधिलकी अशा विविध सूत्रांच्या आधारे विद्यापिठांची क्रमवारी ठरवली जाते. यातील अध्यापनाविषयी पुणे विद्यापीठ पुढे असून देशात दुसर्या क्रमांकावर आणि जगात १९१ व्या क्रमांकावर आहे. संशोधन आणि सायटेशन याविषयी इतर विद्यापिठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ मागे पडल्याचे दिसत आहे. (पुणे विद्यापीठ आणि देशातील इतर विद्यापिठांची नावे जागतिक क्रमवारीत पुढे येण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक)

पुरस्कार परत करणे देशाचा अवमान ! - खासदार हेमामालिनी

साहित्यिक आणि कलावंत यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     शिर्डी, ५ डिसेंबर - देशातील जनतेने दिलेल्या गौरवाची पावती हा पुरस्कार असतो. एखाद्या व्यक्तीविषयी नाराजी असेल, तर त्या विषयी मत व्यक्त केले पाहिजे; परंतु पुरस्कार परत करणे, म्हणजे देशाचा अवमान आहे. असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करणे, हे राजकारणाने प्रेरित असल्याचे मत अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी बेळगाव येथे येणार !

     बेळगाव, ५ डिसेंबर (वार्ता.) - ४ दिवसांपूर्वी सांबरा विमानतळावर संशयास्पदरीत्या छायाचित्रे काढतांना मारिहाळ पोलिसांनी अटक केलेल्या गुलबर्गा येथील महंमदहुसेनअली कुरेशी याची कसून चौकशी करण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांनी ४ डिसेंबरला कुरेशी याच्या गुलबर्गा येथील घरी भेट देऊन पडताळणी केली आहे. त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाच्या पुढील अन्वेषणासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी येथे येणार आहेत. काल रात्री उशिरापर्यंत यादगीर परिसरात कह्यात घेण्यात आलेल्या तिघांची चौकशी चालू होती. पोलीस पथक सतत तळ पालटत असून कुरेशी याची आई शहनाझ बेगमची भेट घेऊन त्याची माहिती घेण्यात आली. ४ दिवसांनंतरही तो कोणत्या संघटनेशी काम करीत होता, याचा पोलिसांना अजूनही उलगडा झालेला नाही. गुलबर्गा येथील एका उर्दू दैनिकाच्या छायाचित्रकारासह तिघांची चौकशी करण्यात आली आहे.


समीर यांनी केलेल्या आरोपांवर तो खोटा आणि अतिरेकी आहे, असे पोलीस म्हणत असतील, तर धक्कादायक ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर

काही सामाजिक संघटनांच्या दबावापोटी पोलिसांचे काम
     या वेळी पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर म्हणाले, आज प्राप्त झालेला गोपनीय अहवाल न्यायाधिशंनी पाहिला आणि त्यावर गोपनीय आदेश देऊ असे सांगितले. असे सांगतांना या अहवालात काय सांगितले आहे, ही माहिती जर पोलिसांकडून पत्रकारांपर्यंत गेली असेल, तर तेच मुळात आक्षेपार्ह आहे. गतवेळेस श्री. समीर यांनी आरोप केल्यानंतर काही सामाजिक संघटनांनी पुण्यापासून मोर्चा काढला होता. यानंतर असे दिसून येते की, बरीचशी माहिती पोलिसांकडून विकृत स्वरूपात दिली जात आहे. त्यामुळे काही सामाजिक संघटनांच्या दबावापोटी पोलीस काम करत आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. पोलिसांमध्येच अशा काही व्यक्ती आहेत, ज्या शासनाच्या विरोधात काम करतात, असे म्हणण्यास वाव आहे. उद्या कॉ. पानसरे खून प्रकरणात जर खुनी न मिळाल्याने तपास बंद करण्यात आला किंवा ज्याला पकडले तो जर निर्दोष सुटला, तर कॉ. पानसरे यांची हत्या करण्यात आली नाही, असा अर्थ होतो का, असा त्याचा अर्थ होत नाही ? त्यामुळे श्री. समीर यांचा आरोप खोटा आहे, असे पोलिसांचे म्हणणे लांछनास्पद आहे, तसेच ते धक्कादायक आहे. 

आय.एस्.आय.एस्.ने स्वीकारले कॅलिफोर्निया येथे झालेल्या आक्रमणाचे दायित्व !

 • महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही आय.एस्.आय.एस्.चा तडाखा !
 • आक्रमणकर्त्या महिलेचा संबंध जिहाद्यांचा अड्डा असलेल्या पाकच्या लाल मशिदीशी !
      न्यूयॉर्क - कॅलिफोर्निया येथील सॅन बर्नाडिनोमध्ये झालेल्या गोळीबाराचे दायित्व आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने स्वीकारली आहे. (अमेरिकेची सुरक्षायंत्रणा अभेद्य समजली जाते. असे असतांनाही आय.एस्.आय.एस्. तेथे आतंकवादी आक्रमण करण्यात यशस्वी झाली. जर अमेरिकेची ही स्थिती आहे, तर भारताची काय असेल, याचा विचारही न केलेला बरा ! केंद्रशासनाने आताच याविषयी गांभीर्याने विचार करून या आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे ! - संपादक) हे आक्रमण करणार्‍यांपैकी तश्फीन ही पाकची नागरिक असल्याचे समोर आले होते. या तश्फीनचा संबंध पाकमधील जिहाद्यांचे महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणार्‍या लाल मशिदीशी असल्याची माहिती मिळाल्याने आता लाल मशिदीपर्यंत या प्रकरणाचे अन्वेषण पोहोचले आहे. विशेष म्हणजे लाल मशिदीचे इमाम मौलाना अजिज यांनी गेल्याच वर्षी आय.एस्.आय.एस्.ला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. 

इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत नमाज पढण्यास मज्जाव !

इंग्लंड म्हणजे भारत नाही ! भारतात असे झाले असते, तर 
प्रसारमाध्यमांनी रान उठवले असते आणि थेट केंद्रशासनाला लक्ष्य केले असते !
      लंडन - इंग्लंडमधील वेस्ट यॉर्कशायर परिसरात असलेल्या मिरफिल्ड येथील मिरफिल्ड फ्री ग्रामर स्कूल शाळेत शिकणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यांना बाहेरील प्रांगणात नमाज पढण्यास सांगण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत आणि पावसात नमाज पढण्यास सांगितल्यामुळे मुसलमान पालकांत संतापाची लाट पसरली असून त्यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे. 

पुणे शहर आणि विभागामध्ये २ मासांत एकूण ३ कोटी रुपयांची वीजचोरी उघड

अशा वीज चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्यास कायमचे अनुज्ञप्ती नाकारणे आणि कठोर शासन केल्यास वीज चोरी अल्प होऊ शकते !
     पुणे, ५ डिसेंबर - पुणे शहर आणि विभागामध्ये वीजचोरांना पकडण्याची शोध मोहीम महावितरण आस्थापनाने गेल्या २ मासांपासून चालू केली आहे. ती चालू केल्यापासून सुमारे ३ कोटी रुपयांच्या वीजचोर्या उघड झाल्या आहेत. इतक्या अल्प कालावधीत मोठ्या रकमेच्या वीजचोर्या उघड होण्याचे प्रमाण प्रथमच होत आहे.
    सदर मोहिमेमध्ये अनेक दिवस वीजयंत्रणेला फसवणारे वीजग्राहक सापडले असून त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी पुणे विभागातील मोठे वीजग्राहकांच्या वीजवापराचा अभ्यास करण्यात आला. अशा ग्राहकांवर लक्ष ठेवण्यात येऊन संबंधितांच्या वीजयंत्रणेची पडताळणी करण्यात आली. त्यातून हे मोठे वीजचोर हाती लागले. (हीच कृती आधी आणि वेळोवेळी केली असती, तर वीजचोरीमुळे झालेली हानी टाळता आले असते. वीजचोरीमुळे झालेल्या हानीला उत्तरदायी कोण, याविषयी महावितरण प्रशासन उत्तर देईल का ? - संपादक)

नालेसफाईच्या वाहनांच्या व्यवहारात ७० टक्के अपहार !

मुंबईतील नालेसफाई घोटाळा !
    मुंबई - मुंबईतील नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. नालेसफाईतील गाळ वाहून नेणार्‍या वाहनांच्या व्यवहारात ७० टक्क्यांचा अपहार झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१. गाळ वाहून नेण्यासाठी नेमलेल्या ट्रकऐवजी रिक्षा, मोटरसायकल यांवर जीपीएस प्रणाली बसवून फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे.

राजकीय पक्षांवरील १४ खटले मागे घेण्यात येणार

अजब न्याय ! असे खटले मागे घेतल्यामुळे त्या 
पक्षाच्या संबंधित गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना जरब बसणार 
नाही, तर त्यांना तसे करण्यास पुन्हा रान मोकळे केल्यासारखे होईल !
     पुणे, ५ डिसेंबर - राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याकडून विविध समस्यांसाठी आंदोलने करण्यात येतात. त्या वेळी त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्यात येतात आणि असे खटले अनेक वर्षे प्रलंबित रहातात. असे १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे प्रलंबित खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने १३ जानेवारी २०१५ या दिवशी घेतला आहे. तसेच जीवितहानी न झालेले, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे ५ लक्ष रुपयांपेक्षा अधिक नुकसान न झालेले खटलेच मागे घेतले जाणार आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील १८ पैकी १४ राजकीय खटले मागे घेण्याची शिफारस करण्यात येणार आहे.

समीर गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ डिसेंबरपर्यंत वाढ : श्री. समीर गायकवाड यांनी केलेल्या आरोपांविषयीच्या पोलीस अहवालावर न्यायालय दोन दिवसांत निर्णय देणार !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
      कोल्हापूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - २१ नोव्हेंबरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अजित यादव यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समीरने केलेल्या आरोपांवर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस्. चैतन्या यांनी सीलबंद लिफाफ्यातून न्यायालयात हा अहवाल सादर केला. सायंकाळी ४.३० वाजता सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना ५ डिसेंबर या दिवशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर्.डी. डांगे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणीत डांगे यांनी तू केलेल्या तक्रारीवरील पोलिसांचा गोपनीय अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन त्याची प्रत दोन दिवसांत तुला देण्यात येईल, असे सांगितले. दुसरीकडे श्री. डांगे यांनी श्री. समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. 

पुणे येथे वाहनांची खोटी कागदपत्रे सिद्ध करणार्‍या धर्मांध दलालास अटक

 • अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर !
 • ९६ वाहनांची खोटी वाहन पडताळणी प्रमाणपत्रे सिद्ध केली
     पुणे, ५ डिसेंबर - वाहने आणि वाहनचालक यांची खोटी कागदपत्रे सादर करून प्रादेशिक परिवहन खात्याची फसवणूक करणार्‍या तमसीन हैदर सय्यद या दलालास गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
१. तमसीन सय्यद हा गेल्या ७ वर्षांपासून पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलाल म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत त्याने अनेक वाहने आणि वाहनचालक यांची खोटी कागदपत्रे सिद्ध करून ती परिवहन विभागात सादर केली होती. 

देहलीत रहाणे म्हणजे गॅस चेंबरमध्ये रहाण्यासारखे आहे ! - उच्च न्यायालय

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचा
 अभाव असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनीही देशाच्या 
राजधानीत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश !
    नवी देहली - राजधानी देहलीत वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर पोहोचले आहे. येथे रहाणे म्हणजे गॅस चेंबरमध्ये रहाण्यासारखे आहे, अशी खंत देहली उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. हे प्रदूषण प्रामुख्याने बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे निघणारा धूर यांमुळे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रदूषण थांबवण्याच्या संदर्भात न्या. बी.डी. अहमद आणि न्या. संजीव सचदेव यांच्या खंडपिठाने शासनाला विशेष अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

बिलासीपाडा, जिल्हा धुबरी (आसाम) येथील रास महोत्सव मेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती देतांना श्री. चित्तरंजन
सुराल (उजवीकडून दुसरे) आणि समवेत श्री. शिवशंकर कुंडू
बिलासीपाडा - श्रीकृष्णाने गोपींसह कार्तिक पौर्णिमेपासून रासलीला आरंभ केली; या निमित्ताने आसाम राज्यात कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस रास महोत्सव मेळ्याचे आयोजन केले जाते. या मेळ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असून प्रतिदिन सहस्रो भाविक या मेळ्यांना भेटी देतात. धुबरी जिल्ह्यातील बिलासीपाडा येथील धर्माभिमान्यांच्या संपर्काच्या वेळी त्यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार हिंदु जनजागृती समितीने येथील मेळ्यात ग्रंथप्रदर्शन आणि विक्री केंद्र चालू केले आहे. या प्रदर्शनात बंगाली ग्रंथांच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. समितीच्या या विक्री केंद्रासाठी रास महोत्सव समितीने अगदी मोक्याच्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. हिंदू सेवा मंच, पूर्वांचलच्या पदाधिकार्‍यांचेही यासाठी सहकार्य लाभले आहे. 

कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार

    कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्क येथील उपाहारगृहामध्ये (कॅन्टीन) रॅगिंगच्या कारणावरून ५ डिसेंबर या दिवशी सकाळी जोरदार हाणामारी झाली. यात वैद्यकीय शिक्षण घेणार्या सहा विद्यार्थ्यांना पुष्कळ मारहाण करण्यात आली. जयंत रमेश तोंडे (वय २० वर्षे) हा विद्यार्थी गंभीर घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
१. याविषयी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जयंत तोंडे हा एम्बीबीएस्च्या द्वितीय वर्षात शिकत आहे.
२. काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोटारसायकल नगर येथून खरेदी केली. ती  दुचाकी वसतीगृहाखाली धूत होता. त्याचा मित्र अमित त्याला विजेरीचा प्रकाश दाखवून साहाय्य करत होता.

सूरज परमार आत्महत्येच्या प्रकरणी चारही नगरसेवक शरण

    ठाणे - बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे महापालिकेचे चारही नगरसेवक पोलीस उपायुक्तांकडे शरण आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हेमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण अशी या चार नगरसेवकांची नावे परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत होती. या चारही नगरसेवकांना न्यायालयाने ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणाची पूर्वपिठिका अशी,
१. शासकीय अधिवक्त्यांनी मुंबई न्यायालयात सांगितले होते की, आरोपी नजीब मुल्ला यांच्या खात्यातून १ कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळवले आहेत.
२. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलेे, नजीब मुल्लांसोबत बांधकाम आस्थापनात पार्टनर होतो. आस्थापनाच्या व्यवहारातले पैसे खात्यात आले. नजीब मुल्लांचे पैसे खात्यात आले नाहीत.
३. सूरज परमार यांच्या कार्यालयावर वर्ष २०१४ मध्ये आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्सच्या) छाप्यात एक नोंदवही पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामध्ये अनेक नेते आणि अधिकारी यांचा व्यवहार नमूद केला आहे.
४. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक एम्सीएच्आयचे (महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज्) अध्यक्ष सूरज परमार यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ७ ऑक्टोबरला दुपारी घडली होती.

जगातील प्रत्येक १३ वा नवीन कर्करोगाचा रुग्ण भारतीय !

स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षांनंतरही जनतेला चांगले आरोग्य देऊ न शकलेला भारत !
     नवी देहली - जगातील प्रत्येक १३ वा नवा कर्करोगाचा रुग्ण हा भारतीय असून जगात भारतीय कर्करोग पीडितांचे प्रमाण ७.५ टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली. (अशी केवळ माहिती नको, तर कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्यमंत्री काय पावले उचलणार, ते त्यांनी सांगावे ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

सर्व क्षेत्रांचे खाजगीकरण होत असतांना केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?

    उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या शासनाने राज्यातील प्रसिद्ध विंध्यचलवासिनी मंदिर आणि बांकेबिहारी मंदिर या मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा घाट घातला आहे. यास येथील पंडा समाज आणि गोस्वामी समाज यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :     UP shasandwara Vindhyavasini mandir aur Bankebihari mandir ka sarkarikaran karneka shadyantra. - Bahusankhya Hinduonke mandironkahi sarkarikaran kyo ?
जागो ! : उत्तरप्रदेश शासनद्वारा प्रसिद्ध विंध्यवासिनी मंदिर और बांकेबिहारी मंदिर का सरकारीकरण करने का षड्यंत्र । - बहुसंख्य हिंदूंआेंके मंदिरोंकाही सरकारीकरण क्यो ?

छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांची अनुमती !

    मुंबई - महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली आहे. आरोपपत्र दाखल केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. गृहमंत्रालयातील अधिकार्यांलनी या संदर्भात माहिती दिली आहे. कालिना भूखंड आणि महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात भुजबळ यांच्यावर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांना वीर जिवा महाले पुरस्कार जाहीर

    सातारा - प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी शिवप्रतापदिनी दिला जाणारा वीर जिवा महाले पुरस्कार हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. १८ डिसेंबर या दिवशी प्रतापगडावर होणार्‍या शिवप्रताप दिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी दिली.

हिंदी महासागरात भूकंपाचा ७.१ तीव्रतेचा धक्का

     नवी देहली - हिंदी महासागरात ५ डिसेंबर या दिवशी पहाटे भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ अशी दाखवण्यात आली आहे. या भूकंपामुळे जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. दक्षिण हिंदी समुद्रातील टेक्टिनिक प्लेटमध्ये झालेल्या हालचालीमुळे भूकंप जाणवल्याचे तज्ञांचे मत आहे. या भूकंपाचा प्रभाव ऑस्ट्रेलियातील मॅकडॉन्लड बेटाच्या परिसरात अधिक प्रमाणात जाणवला.

पोलीस हवालदाराकडून पोलीस महिलेवर ५ वर्षे बलात्कार आणि फसवणूक

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय राखणार ?
    जालना, अंबड - पोलीस हवालदार संजय रतन सोनवणे याने लग्नाचे आमिष दाखवून पोलीस असलेल्या युवतीवर पाच वर्षे बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या काळात पीडित महिला दोन वेळा गर्भवतीही राहिली होती. संजयने तिच्याशी लग्न न करता दुसर्‍या मुलीसोबत लग्न करून तिची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या काळात पीडितेच्या आईस वेळोवेळी संपर्क करून तुमच्या मुलीचे लग्न मी जमू देणार नाही, अशा धमक्या देऊन शिवीगाळ केली. पीडितेने बोलण्यास आणि भेटण्यास नकार दिल्यावर संजयने तिच्यासोबत काढलेली छायाचित्रे नातेवाइकांना दाखवण्याची धमकी दिली. या प्रकरणी जालना शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भ्रष्टाचार करून भरमसाठ रकमेची विज्ञापने घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरणारी अन्य नियतकालिके आणि अध्यात्म, राष्ट्र अन् धर्म यांसाठीची चळवळ सत्यनिष्ठतेने उभारणारे दैनिक सनातन प्रभात !

    गेल्या १५ वर्षांपासून मी सनातन प्रभात नियतकालिकांसाठी विज्ञापने (जाहिराती) आणण्याची सेवा करत आहे. ही सेवा करतांना या क्षेत्रात विज्ञापनांच्या माध्यमातून भ्रष्टाचार कसा चालतो ?, हे मला जवळून पहायला मिळाले. सर्वांना ते ज्ञात व्हावे, यासाठी ते या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे.

हिंदूंनी शतकानुशतके दिला श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी रक्तरंजित लढा !

बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला 
६ डिसेंबर २०१५ या दिवशी २३ वर्षे पूर्ण !
      प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर पाडून मुसलमान आक्रमणकर्ता बाबर याने तेथे मशीद बांधली आणि हिंदूंच्या वर्मावरच आघात केला. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी दीड लाख हिंदू अयोध्येत जमा झाले आणि ही मशीद पाडून इतकी वर्षे सहन केलेल्या आघाताचा वचपा काढला.

सेक्युलॅरिझमचा भ्रम !

१. ४२ वी घटनादुरुस्ती 
     भारतीय राज्यघटनेत ४२ वी घटनादुरुस्ती करून प्रिएंबलमध्ये अथवा प्रास्ताविकामध्ये सेक्युलर शब्द इतर काही शब्दांसह घालण्यात आला. बी.एम्. बक्षी यांनी घटनेवरील त्यांच्या ग्रंथात यावर भाष्य करतांना म्हटले आहे की, धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक शासनाने द्यावी. घटनेच्या २५ ते ३० कलमानुसार नागरिकासह हे स्वातंत्र्य दिलेले होतेच; मग ते पुन्हा देण्याकरता घटनादुरुस्ती आवश्यक होती का ? नानी पालखीवाला यांनी घटनादुरुस्तीस विरोध केले होता. अवर कॉन्स्टिट्युशन डिफाइल्ड अ‍ॅण्ड डिफेस्ट हे त्याचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांचे म्हणणे असे होते की, घटनेचे प्रास्ताविक हे घटनेचे कलम नव्हे की, जसे कलम सुधारता येते, तसे ते सुधारता येईल. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतीच्या दाव्यात मात्र प्रास्ताविक घटनेचाच भाग असल्याचे न्यायपत्र दिले; तथापि बेरूबारीच्या दाव्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, प्रास्ताविक हा घटनेचा भाग नाही, अर्थात् त्यात सुधारणा-दुरुस्ती संभवत नाही. दुसरे असे की, घटनेवर भाष्यग्रंथ लिहिणारे बसू यांनी असे म्हटले आहे की, सेक्युलर शब्दांत संदिग्धता अथवा अस्पष्टता किंवा व्हेगनेस आहे.

पाकिस्तान बनतो आहे तालिबानी !

     पाकिस्तानचे वर्णन फसलेले राज्य (Failed State) या शब्दात केले जाते. पाकिस्तानवर राज्य कुणाचे ? तालिबान आणि अल्-कायदा या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे निवृत्त सेनाधिकारी सर्व प्रकारचे साहाय्य करत असतात. यामुळे तालिबानींना संपवणे किंवा त्यांचा प्रभाव न्यून करणे हे अतिशय अवघड आहे. पाकिस्तान इस्लामिक जिहादींचा प्रमुख अड्डा आहे. पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज देश आहे. हा देश तालिबानी लोकांच्या हातात गेल्यास जगात काही ठिकाणी अणुबॉम्ब (अणुध्वम्) फुटल्याविना रहाणार नाहीत.

भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

     भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असहाय प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात. अशा या बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे पुढील लेखात पाहूया. म्हणजे बाबर समर्थकांचे खरे स्वरूप सर्वांच्या लक्षात येईल.

बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त होण्याचे असेही एक कारण !

       अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या संदर्भात चर्चा विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती (बाबरी समिती) यामध्ये झाल्या; पण त्या चर्चा विफल झाल्या आणि वादावर तोडगा निघाला नाही. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या काळात एक गोष्ट मान्य करून घेतली की, दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष पुरावे दाखवावेत; म्हणजे या चर्चेत प्रगती होईल. दोघांनी कागदपत्रे आणि लेखी युक्तीवाद देऊन चर्चा चालू केली. बाबरी समितीला साम्यवादी इतिहासकारांचा कंपू साहाय्य करत होता. साहाय्य नाही, खरे तर तो कंपूच चर्चा चालवत होता. हा कंपू भारत इतिहास संशोधन संस्थेचे सहकारी कार्यालय आणि येथील सुविधा वापरून बाबरी समितीची कागदपत्रे सिद्ध करत होता. त्यामुळेच त्या संस्थेच्या सदस्य सचिवाने त्यागपत्र दिले होते. 

रामजन्मभूमी आंदोलनातील अनुभव !

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्याला आज २३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने...
 
अधिवक्ता श्री. हरिशंकर जैन,
लखनऊ, उत्तरप्रदेश.
    रामनाथी, गोवा येथे २० जून ते २६ जून २०१४ या कालावधीत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे तृतीय अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता श्री. हरिशंकर जैन यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील अनुभव सांगितले. त्यातील मार्गदर्शक सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
     मी रामजन्मभूमीपासून १४० कि.मी. अंतरावर असलेली श्री लक्ष्मणाची नगरी लक्ष्मणपुरी येथून आलो आहे. मी त्या प्रांतातून आलो आहे, ज्या प्रांतात काशी आणि मथुरा आहेत.

संस्कृत भाषेत शिक्षण घेण्यास तरुण पिढी निरुत्साही असण्यामागील कारणमीमांसा !

१. संस्कृत हा विषय शाळांमधून मुलांना त्यांची आवड निर्माण होईल, अशा पद्धतीने शिकवला न जाणे
     शाळामधून संस्कृत हा विषय अभ्यासक्रमात असतो; पण तो विद्यार्थ्यांना संस्कृतची आवड निर्माण होईल, अशा रितीने शिकवला जात नाही. व्याकरण न समजल्यामुळे तो अनेकांना कठीण वाटतो. केवळ प्रश्‍न उत्तरे पाठ करून भाषांतराच्या सहाय्याने ८० ते ९० टक्के गुण मिळवता येतात; म्हणून कोणीही खोलात जाऊन या भाषेचा अभ्यास करत नाही. 
     संस्कृत भाषेत एका मूळ धातूपासून (क्रियापदाच्या मूळ रूपापासून) पुष्कळ शब्द सिद्ध होतात आणि सिद्ध झालेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मूळ धातूशी संलग्न असतो, तसेच वाक्यरचनेत शब्दाच्या विभक्तीमुळे वाक्यातील शब्दाचे स्थान पालटले, तरी त्या शब्दाचा अर्थ आणि कार्य (कर्ता, कर्म इत्यादी) पालटत नाही.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
      स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले

कॅथॉलिक चर्चमधील वासनांध पाद्रींना पाठीशी घालणारे धार्मिक ख्रिस्ती नेते !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा !
१. आर्च बिशपने केलेल्या अनैतिक लैंगिक कृत्यांवर पांघरूण घालणारे 
व्हॅटिकन आणि या प्र्र्रकरणाचा भांडाफोड करणारे अवर होली मदर पुस्तक !
     चर्चशी संबंधित ४७ लोकांशी लैगिक दुराचार केल्याचे आरोप असलेले रोमन कॅथॉलिक चर्च सांता फे दे ला क्रूजचे वरिष्ठ पदाधिकारी ६६ वर्षीय पाद्री एड्गारडो स्टोर्नी यांनी आर्च बिशप या पदाचे त्यागपत्र (राजीनामा) दिले. ओल्गा वारनॉटद्वारे लिखित अवर होली मदर पुस्तकात असे ठाम मत व्यक्त केले आहे की, वॅटिकनने वर्ष १९९४ मध्ये या आर्च बिशपच्या विरुद्ध त्यांनी चर्चशी संबंधित ४७ लोकांशी केलेल्या लैंगिक दुराचारासंबंधी चौकशी चालू केली होती.

मंदिराच्या परिसराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी जनमोहीम आरंभ करणे आवश्यक !

(पू.) सौ. अंजली गाडगीळ
    मंदिराच्या आवारात बीभत्स गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनुमती देणे, हे महापापच असणे; कारण यामुळे मंदिराची सात्त्विकता न्यून (कमी) होत असणे : अलीकडेच 'गुंडे' या चित्रपटातील 'तूने मारी एन्ट्रीयारे, दिलमें बजी घंटीयारे...' हे गाणे पहाण्यात आले. या गाण्याचे चित्रीकरण कोलकाता येथील प्रसिद्ध असणार्या दक्षिणकाली मंदिराच्या आवारात केले आहे. मंदिराच्या आवारात एका बीभत्स गाण्याच्या चित्रीकरणाला अनुमती देणे, म्हणजे महापाप करण्यासारखेच आहे. यामुळे देवतांच्या शापालाच ते एकप्रकारे कारणीभूत होत आहेत. एकेकाळी या मंदिराच्या आवारात अनेक साधूंनी तपःश्चर्या केली आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महायोग्यांनीही या मंदिराचे पावित्र्य आपल्या साधनेने वाढवले होते. याच महाकालीशी श्री रामकृष्ण परमहंस बोलत असत. अशा पवित्र ठिकाणी चित्रपटातील नृत्यावर तोकड्या वस्त्रांत विकृत हालचाली करून अंगविक्षेप करणे, म्हणजे समाजातील नीतीमत्ता पराकोटीची घसरली असल्याचे लक्षण आहे. आजकालच्या युवापिढीची आणि मंदिर समितीवाल्यांची ही मानसिकता पाहून अत्यंत खेद वाटतो. खरंच, घोर कलियुग आले आहे. या सर्वांविरुद्ध जनसामान्यांनी आता आवाज उठवून समाजातील विकृत विचारसरणीला आळा घातला पाहिजे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (२.१२.२०१५, दुपारी १.२४)

काँग्रेस शासन नावाची सर्कस !

श्री. प्रशांत जुवेकर
का आणि कसे म्हणावे याला सरकार ।
हे तर सर्व सर्कशीतलेच कलाकार ॥ ध्रु.॥

म्हातारपणी यांना कसले दिव्य सुचले ।
राष्ट्रकुल स्पर्धेत हेसुद्धा पैशासाठी खेळले ॥
आचार-विचार यांनी वेशीलाच टांगले ।
कलमाडीसुद्धा शेवटी स्वतःच कोलमडले ॥ १ ॥

या सर्कशीमध्ये तसा आहे दमाने ताजा ।
म्हणवून घेतो स्वतःच स्वतःला ए. राजा ॥
याच्याच आप्तस्वकियांनी याचा वाजवला बाजा ।
जनताही आता म्हणतेय की, याला पाणी पाजा ॥ २

काँग्रेस शासनाच्या षड्यंत्रामुळे सनातनच्या निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या 
साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
कठीण परिस्थितीतही केवळ साधनेच्या बळावर आनंदावस्था अनुभवणारे सनातनचे साधक
     सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले.

राष्ट्रीय आपत्ती आणि प्रसारमाध्यमांचे दायित्व !

१. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी प्रसारमाध्यमांनी अतिरेक्यांचे 
शस्त्र न बनता राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्याचे दायित्व पार पाडायला हवे !
     कंदाहार प्रकरणात विमानतळावर उभी राहिलेली एअरबस, त्यामधील प्रवाशांच्या यातना आणि त्यांच्या भारतातील नातेवाइकांकडून होणारे भावनात्मक असंतोषाचे दर्शन, हे सारे म्हटले, तर थोडेफार स्वाभाविक आहे. त्याचे अतिरिक्त प्रदर्शन प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने घडवले, ते दायित्वशून्यतेचे कृत्य होते. अतिरेक्यांच्या मागण्या मान्य होतील का किंवा काही अतिरेक्यांची सुटका होईल का, या सर्व गोष्टी या अनावश्यक प्रदर्शनामुळे गौण ठरल्या. आधुनिक आतंकवादाचे एक मान्यवर अभ्यासक वॉल्टर लाक्युअर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, प्रसारमाध्यमे ही अतिरेक्यांचे सर्वांत चांगले मित्र असतात. आतंकवादी कृत्य हे महत्त्वाचे नसते; पण त्याला मिळणारी प्रसिद्धी हीच त्यांचे सर्वस्व असते. ज्या पद्धतीने अशा प्रकारच्या राष्ट्रीय समस्येच्या वेळी दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्या जणू स्पर्धा करून देशभर घाबरटपणाची लाट निर्माण करतात, ते पाहिल्यावर अतिरेक्यांनी त्यांची लढाई भावनात्मक पातळीवर जिंकली, असे म्हणावे लागेल. या देशातील भावनाप्रधान वर्ग आणि उत्तरदायित्वाच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या भावनेने वागणारा वर्ग यांच्यात कलागत लावून देण्याचे काम या काश्मिरी अतिरेक्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. हे सारे पाप प्रसारमाध्यमांकडूनही घडले आहे. चाचेगिरीचा मूळ उद्देश हाच मुळी भावनात्मक युद्ध खेळणे, हा असतो. हे युद्ध मुख्यतः शासन, प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी खेळायचे असते.

परिणामकारक कृती न करता केवळ बातम्या देणारे सीमा सुरक्षा दल !

     जमात-उद-दावा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि २६/११ या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद हा भारतावर आक्रमण करण्याची सिद्धता करत आहे. त्यासाठी तो भारताच्या सीमेलगतच्या क्षेत्रांना भेट देत आहे. - राकेश शर्मा, महानिरीक्षक, भारतीय सीमा सुरक्षा दल (२८.११.२०१५)

महिला पत्रकार राजिना यांच्यावर एखाद्या धर्मांधाने आक्रमण केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

      मदरशांशी संबंधित अपप्रकार मी उघड करणार आहे, तसेच फेसबूकवरून मला धमक्या आणि शिव्या देणार्‍या मुसलमानांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंद करणार आहे, असे रामनाथ गोयंका पुरस्कारप्राप्त महिला पत्रकार राजिना यांनी सांगितले. राजिना यांनी त्यांच्या लहानपणी मदरशात आलेल्या वाईट अनुभवांविषयी त्यांच्या फेसबूक खात्यावर लिहिले होते. त्यानंतर त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. केरळमधील स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करणार्‍या राजिना यांनी त्यांच्या फेसबूकवर लिहिले होते, लहानपणी मी शिकत असलेल्या मदरशातील उस्ताद (मदरशाचा प्रमुख) हा तेथे येणार्‍या लहान मुलांचा लैंगिक छळ करायचा, त्यांच्या गुप्त अवयवांना स्पर्श करायचा आणि कुणी काही विचारलेच, तर त्यांना अश्‍लील उत्तरे द्यायचा. इयत्ता चौथीत शिकणार्‍या मुलींच्या शरीराशीही उस्ताद अश्‍लील चाळे करायचा. या छळाला कंटाळून अनेक मुलामुलींनी मदरसा सोडला होता.

कुठे सीमारेषेचे उल्लंघन सहन न करणारा तुर्कस्थान, तर कुठे सीमा ओलांडून भारतात प्रतिदिन येणार्‍या अतिरेक्यांना न रोखणारा भारत !

     तुर्कीने रशियाच्या पाडलेल्या लढाऊ विमानातील २ वैमानिकांनी पॅरेशूटच्या माध्यमातून विमानातून उडी मारल्याने ते सुरक्षित असल्याचे बोलले जात होतेे. या घटनेत वाचलेले वैमानिक कॅप्टन कोंस्टेनटिन मुराख्तिन यांनी तुर्कीच्या या कृत्याचा बदला घेणार असल्याचे आणि त्यासाठी सिरियातच थांबण्याचे विधान केल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. रशियाने कठोर धोरण स्वीकारल्यानंतर तुर्कीने मात्र सावधगिरीची भूमिका स्वीकारली आहे. तुर्कीचे राष्ट्रपती तैयप अ‍ॅरदोगान म्हणाले, रशियासमवेत तणाव वाढवण्याचा आमचा हेतू नाही. मात्र देशरक्षणासाठीच आम्ही रशियाचे विमान पाडले होते. त्यात गैर काहीच नाही. रशियाच्या लढाऊ विमानाने ५ मिनिटांत १० वेळा तुर्कीच्या हवाई सीमेचे उल्लंघन केल्यावरून तुर्कीने ही कारवाई केली होती. ही कारवाई करण्यापूर्वी रशियाच्या वैमानिकांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या, असे तुर्कीने स्पष्ट केले आहे. (२७.११.२०१५)

मंत्रोच्चारासह आहुती देऊन निर्माण झालेला अग्नि आणि मंत्रोच्चाराविना निर्माण झालेला अग्नि

कु. संध्या माळी
      ४.७.२०१५ या दिवशी सोमयाग चालू असतांना मंत्रोच्चारासह आहुती देऊन निर्माण झालेला अग्नि आणि मंत्रोच्चाराविना निर्माण झालेला अग्नि असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
- कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०१५)

जनतेला दारूडे बनवणारे गोवा शासन ! याऐवजी गंगाजलाला राष्ट्रीय पेय घोषित करा !

    फेणी या गोव्यातील मद्यपेयाला जगाच्या नकाशावर नेण्यासाठी आणि फेणीला योग्य भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्यशासनाच्या वतीने राज्य फेणी धोरण बनवण्यात आले आहे. यानुसार काजू आणि माड यांपासून बनवलेल्या फेणीला राज्य वारसा मद्यपेय म्हणून घोषित केले जाणार आहे. (१.१२.२०१५)

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

 • लक्षावधी वारकरी शेकडो वर्षे वारीला जात आहेत. त्यांना डोके नाही, असे या महाशयांना म्हणायचे असेल, तर यांना मेंदू आहे कि नाही, असा प्रश्‍न पडल्याविना रहात नाही !  
 • (म्हणे) ज्यांना डोके नाही, ते पंढरपूरला जातात !
 • चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची बौद्धिक दिवाळखोरी !
     लोक पंढरपूरला का जातात, हे मला कळत नाही. ज्यांना डोके नाही, तेच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवतात, असे भाविक आणि वारकरी यांची खिल्ली उडवणारे वादग्रस्त विधान चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. (२८.११.२०१५)
-------------------------------------
धर्म न मानणार्‍या पुरोगाम्यांना सनातनचा तेजस्वी 
धर्मप्रसार सहन होत नाही ! - सौ. आनंदी वानखडे, सनातन संस्था
    समीर गायकवाड यांना अटक झाल्यानंतर सनातन संस्थेच्या विरोधात पुरोगामी कंठशोष करत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर न करणे, हा पुरोगाम्यांचा अविवेक आहे. ब्रेकींग न्यूजचा हव्यास असणार्‍या प्रसारमाध्यमांच्या विश्‍वासार्हतेवर आज अविश्‍वास निर्माण झाला आहे. धर्म न मानणार्‍या पुरोगाम्यांना सनातनचा तेजस्वी धर्मप्रसार सहन होत नाही. धर्माला विरोध करणार्‍यांसाठी आणि अल्पसंख्यांकांचे राजकारण करणार्‍यांसाठी सनातन संस्था हे सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) आहे. धर्मद्रोही हे भ्रष्टाचारी असतात, हे सनातन सप्रमाण सिद्ध करते. म्हणूनच सनातनला लक्ष्य केले जात आहे. (३०.११.२०१५)

सात्विक राजकारण्यांची छायाचित्रे सनातन प्रभातला पाठवा !

    वृत्तपत्रांत अथवा भित्तीफलकांवर झळकणारी अलीकडच्या राजकारण्यांची छायाचित्रे पाहून समाजात 'सर्वच राजकारणी रज-तमोगुणी असतात', असा समज झाला आहे. अशा राजकारण्यांच्या छायाचित्रांविषयी सनातनने विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनातूनही ते राजकारणी रज-तमप्रधान असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर एखादा राजकारणी सात्त्विक वाटला, तर त्याचे छायाचित्र सनातन प्रभातला पुढील पत्त्यावर पाठवा ! 'सर्व राजकारणी राजसिक आणि तामसिक नसतात', हे वैज्ञानिक उपकरणांद्वारे सिद्ध करायला त्याचा उपयोग होईल.
नाव : संपादक, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, दू.क्र.:(०८३२)२३१२६६४              
फॅक्स:(०८३२)२३१८१०८, इ-मेल:dspgoa1@gmail.com

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता: तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय '॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


देवाने 'आरोग्यदायी जीवन हवे कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण झालेले हवे ?', असे विचारले, तर 'हिंदु राष्ट्राची स्थापना', असे उत्तर द्यावेसे वाटणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'गेली ७ वर्षे प्राणशक्ती अल्प असल्यामुळे मी कोठे बाहेर जाऊ शकत नाही. कधी कधी मला बसताही येत नाही. अशी माझी स्थिती होते. आज माझ्या मनात सहज विचार आला, देवाने विचारले 'तुला आरोग्यदायी जीवन हवे कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्ण झालेले हवे ?', तर मी उत्तर देईन, 'कार्य पूर्ण झालेले हवे !'
    नंतर माझ्या लक्षात आले की, हे उत्तर द्यावे, असे मला का वाटले. तेव्हा माझ्या मनात विचार आला होता, 'देह कधीतरी सोडावाच लागतो; म्हणून जीवन मागण्यात अर्थ नाही. तसेच जीवन हे साधन असून कार्य हे साध्य आहे. त्यामुळे साध्याचाच विचार माझ्याकडून झाला. जीवन वाढवून मिळाले असते, तर फक्त मलाच थोडे बरे वाटले असते; पण मानवजातीचे हित करणारी हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सर्वत्रच्या मानवांना आनंद होईल.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले                

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणेयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
उत्तम चरित्र म्हणजे कधीही दुराचाराचा विचारही मनात न आणणे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आप नव्हे बाप !

   आम आदमी पक्ष म्हणजेच आप या राजकीय पक्षाने देहलीच्या विधानसभा निवडणुकीत अपूर्व यश प्राप्त केल्यांनतर देहलीतील जनता आणि देशभरातील भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेच्या मनात एक आशा निर्माण झाली होती; परंतु आपचे सत्तेवर आल्यानंतरचे एक एक प्रताप पाहिल्यावर हा पक्ष आप नसून सर्व राजकीय पक्षांचा बाप ठरत आहे, असेच म्हणावे लागेल. आपच्या मंत्रीमंडळाने कालच आमदारांच्या वेतनात ४०० टक्क्यांची वाढ करणारा प्रस्ताव संमत केला. ४०० टक्के वेतनवाढीसोबत पूर्वी नसलेला विदेश दौर्‍यांसाठीचा भत्ता, वार्षिक प्रवास भत्त्यात ६ पटीने केलेली वाढ यातून हा पक्ष आम आदमीचा नाही, यावर जणू त्यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn